http://misalpav.com/node/21321
कोंकणात भटकायचे तर पावसाळा संपल्यासंपल्या लगेच जावे. सगळीकडे निसर्गाचे विलोभनिय दर्शन होते. छायाचित्रकारांना तर पर्वणीच. पण काही कामा निमित्त हल्लीच मालवण आणि गोवा अशी सफर केली. काही निसर्गचित्रे कॅमेरात बंदिस्त केली. तीच आज तुमच्या आस्वादासाठी सादर करीत आहे.
सौंदर्याचे वरदान लाभलेला मालवण किनारा.
मालवणात मुख्य खाद्य मासे. गल्लोगल्ली उपहारगृहे आहेत. तसेच, काही घरांमधूनही 'घरगुती पाककौशल्याचे नमुने' चाखावयास मिळतात. पक्षांना तर काय विचारुच नका. पानं वाढलेलीच आहेत केंव्हाही या आणि झोडा मेजवानी....
मालवणच्या किनार्यावरून सिधुदूर्गाचे दर्शन..
सिंधुदूर्ग किल्ला अधिक जवळून....
एक बुरूज...
मुख्य प्रवेशद्वार.....
गडावर वस्ती आहे. तुरळक शेती होते. मुख्य व्यवसाय मासेमारी, मालवणच्या किनार्यापासून ह्या सागरी गडापर्यंत पर्यटकांची ने-आण करणे इ.इ.इ.
गडावर खुपसा प्रदेश खडकाळ आहे. पण महाराजांच्या कारकिर्दीत नक्कीच इथेही वस्ती, गडाची व्यवस्था पाहणारी खाती, कचेर्या, कोठारं, शस्त्रागार, कारखाने इ.इ.इ. असणार.
भर समुद्रात असलेल्या एका खडकावर सिंधुदूर्ग ताठ मानेने उभा आहे. काही प्रमाणात तटबंदीची पडझड झाली आहे पण तटबंदीची मुळ शान अजूनही टिकून आहे.
चारही बाजुंनी खार्या पाण्याने वेढलेल्या ह्या गडावर 'दूध बाव' आणि 'साखरी बाव' ह्या गोड पाण्याच्या दोन विहिरी आहेत. आजही विहिरींना पाणी आहे आणि त्या सिंचनासाठी वापरात आहेत.
परतीच्या प्रवासात दूर किनार्यावरचे हे मंदीर फारच सुंदर दिसत होते.
दिवसभर पर्यटकांची ने-आण करून थकलेली ही नाव संध्याकाळच्या थंड हवेवर जणू विसावा घेत आहे.
इथून पुढे प्रसन्न मनाने गोव्याच्या वाटेवर निघालो. वाटेत दिसत होते निसर्गाचे अनेक 'तुकडे'. त्यापैकीच एक.
दोन
वर्षापुर्वी गेलो होतो त्या आठवणी जागवल्यात काका तुम्ही, तुमची परवानगी
आहे असं समजुन सिंधुदुर्ग किल्यातल्या त्या ठस्यांचे फोटो डकवत आहे.
हा सिंधुदुर्ग किल्यातल्या महाराजांच्या मंदिरात असलेला वाळुचा गणपती,
आणि हा मालवण गावात असलेल्या साळगांवक्ररांच्या मंदिरातील गणपती, इथं संध्याकाळी आरतीला जमावं खुप छान वाटतं आणि नंतर ओल्या नारळाचा साखर घातलेला प्रसाद.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.