Friday, June 30, 2023

युरोपांश - पॅरीस.

http://misalpav.com/node/27537

विमानाचे पाय जमिनीला आणि माझे हात आकाशाला एकाच वेळी टेकले. पॅरीस..पॅरीस जन्मभर ज्या बद्दल वाचलं होतं त्या शहराच्या भूमीवर उतरणे रोमांचकारी होते. ह्या वर्षी ३ मार्चला पॅरीस शहरी दिलेली भेट निवांत शिवाय सपत्निक होती त्यामुळे आनंद द्विगुणित करणारी आणि विशेष रोमांचकारी होती.

मिपा सदस्य इस्पिकचा॑ एक्का ह्यांचा 'हिवाळ्यातील स्विट्झर्लंड' हा लेख वाचल्यापासून ते डोहाळे लागले होतेच त्यातच इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्या लंडन शहरातील एका पुस्तक प्रकाशनाच्या जाहिरातीने लक्ष वेधून घेतले आणि विचार ठाम झाला ह्या कार्यक्रमाला उपस्थिती लावायचीच. पुस्तक प्रकाशन आणि लंडन सफर ते ही बाबासाहेबांच्या सानिध्यात कोहिनुर हिरा पाहणे, शिवाजी महाराजांची एक तलवार (भवानी नाही) तसेच अफजलखान वधासाठी वापरलेली मूळ वाघनखं पाहणं ह्याचेही आकर्षण होतेच. त्या नुसार ठाण्याच्या ट्रॅव्हल पॅक्स कंपनीच्या सफरीत नांव नोंदणी केली. आता लंडन पर्यंत जातोच आहे तर युरोप दर्शनाचाही ला॑भ उठवावा ह्या विचाराने युरोप सफरीचे आयोजिले होते. दुर्दैवाने, भरमसाठ पाऊस, लंडनची पूर परिस्थिती आणि बिघडलेल्या हवामानामुळे लंडन सफर पुढे ढकलण्यात आली. म्हणजे तेंव्हा ती माझ्यासाठी रद्दच झाली. निदान आपली युरोपदर्शन योजना पार पाडूया ह्या विचाराने मी आमच्या युरोपिय सफरीची आखणी केली, युरेल पास (१५ दिवस अमर्यादित प्रवास), पॅरीस, स्विट्झर्लंड, जर्मनी, इटली ह्या देशांमधील वास्तव्याची सोय केली, स्विट्झर्लंड मधील 'इस्पिकचा एक्का' फेम 'ग्लेशिअर एक्सप्रेस' चे तिकीट आदी आरक्षणं, माझ्या मस्कतमधील गेल्या अनेक वर्षांचा मित्र आणि ट्रॅव्हल एजंट प्रमोद पुरोहितच्या साहाय्याने केली. नुसती तिकिटांची सोय न करता, संपूर्ण प्रवासाचा आराखडा अगदी बारीकसारीक माहितीसह, त्याने तारीखवार तयार केला. एक फाईलच बनवून दिली होती. त्यात दर तारखेचा काय कार्यक्रम आहे, दोन ठिकाणांची अंतरं (उदा. पॅरीस विमानतळ आणि पॅरीसचे माझे वास्तव्याचे ठिकाण) त्यासाठी लागणार्‍या टॅक्सीचे अंदाजी भाडे, निवासाचा खर्च आधीच भरलेला आहे की तिथे प्रत्यक्ष भरावयाचा आहे, शहरदर्शनाच्या बसचे भाडे (जे आगाऊ भरलेले असायचे), बस सुटण्याचे ठिकाण, माझ्या निवासापासून तिथ पोहोचण्याचा मार्ग (गुगल वरून) वगैरे वगैरे अनेक बाबींचा समावेश त्या तारीखवार आराखड्यात होता. विशेष म्हणजे ३ - ३ ठिकाणी गाड्या बदलून दूसर्‍या शहरात जातानाही कुठली गाडी कुठल्या फलाटावर किती वाजून किती मिनिटांनी येईल ह्याचाही तपशील होता.( ही तपशीलवार माहिती मला, १ मोठी बॅग, १ छोटी बॅग, १ लॅपटॉप, १ कॅमेरा हे सर्व घेऊन, मध्यम आकाराच्या बायको बरोबर धावपळ करण्यास अत्यंत उपयोगी पडली.) ह्या माहिती इतकाच महत्त्वाचा युरोपातील गाड्यांचा वक्तशीरपणा. ११.३३ ची गाडी ११.३३ लाच सुटते ३२ किंवा ३४ ला नाही. फलाट क्रमांकही बदलले नाहीत. ऐन वेळेला, विरार लोकल ५ नंबर फलाटावर शिरत असताना केलेली, '३ नंबर प्लॅटफॉर्म पर आनेवाली विरार लोकल आज ५ नंबर पे आएगी' अशी जीवघेणी तारांबळ उडविणारी ध्वनीक्षेपकावरील निवेदनं नाहीत. ध्वनिक्षेपकच दिसले नाहीत मला कुठे.

पॅरीसला निवासस्थानी सर्व सामान टाकल्यावर लगेचच पर्यटन धर्म निभावण्यास बाहेर पडलो. सर्वात पहिली गरज होती वाफाळणारा चहा. पण तिथे आपला भारतिय चहा, जो मस्तपैकी मसाला वगैरे घालून खळखळून उकळलेला असतो तो मिळणे दूरापास्त होते त्यामुळे कॉफी नामक पेयावर समाधान मानले. कॉफी आणि क्रोसाँ नामक पावाची किंमत अदा करून बाहेर आलो आणि आयफेल टॉवरच्या रस्त्याला लागलो. सौ. साडेसात युरो म्हणजे किती रुपये ह्या हिशोबात बोटे मोडत होती. तिला म्हंटले, पर्यटनाची मजा लुटायची असेल तर हिशोब करणं विसरून जा. ह्या थंडीत कुडकुडताना गरमागरम कॉफी मिळाली त्याचा आनंद घ्यायचा, ती किती कडू की गोड होती ह्याचा नाही. पण हे समजवताना (बहुतेक्) मी हातातल्या गुगल मार्गदर्शकावरील एक रस्ता चुकलो आणि आम्ही पॅरीसात अर्धा तास भरकटलो. शेवटी एका वाहतूक पोलीसाला आयफेल टॉवरचा पत्ता विचारल्यावर त्याने त्याच्या मोटरसायकलला जोडलेल्या संगणकातून तपासून मला अगदी आत्मियतेने फ्रेंच भाषेत पत्ता समजविण्याचा प्रयत्न केला. मी त्याला धन्यवाद देऊन वळलो आणि बायकोला म्हणालो, 'एक अक्षर कळले नाही.' पोलीस पत्ता समजावून देत असताना, माझा, त्याचे बोलणे शब्द अन शब्द समजत असल्याचा 'अभिनय' पाहून सौ. मला 'फ्रेंचही समजते' ह्या गैरसमजाने अगदी कौतुकाने माझ्याकडे पाहात होती, तिचा भ्रमनिरास झाला. त्याच्या हातवार्‍याच्या भाषेत समजलेल्या दिशेने १५ मिनिटे चालल्यावर पुन्हा एका सभ्य दिसणार्‍या माणसाला पत्ता विचारला. त्याला इंग्रजी आणि फ्रेच दोन्ही भाषा जेमतेमच येत होत्या. पण पत्ता माहित होता आणि तो समजविण्याची दुर्दम्य इच्छा त्याचे ठायी होती. पण जेंव्हा ते जमेना तेंव्हा त्याने मला विचारले 'तुला अरेबिक समजते का?' तो बहुतेक जॉर्डेनियन होता. अगदी माहेरचा माणूस भेटावा अशी माझी अवस्था झाली. मी 'होSS समजते की!' असे म्हंटल्यावर त्याने अरेबिक मध्ये पत्ता सांगितला. तो अगदी साधा सोपा होता. 'इथून सरळ जा. नदी लागेल. त्याच्या कडेने रस्ता आहे त्या रस्त्याने सरळ सरळ जात राहा अगदी आयफेल टॉवरच्या पायथ्याशीच पोहोचशील.' पत्ता समजला होता. मी त्याला अरेबिकमध्येच 'शुक्रन' (धन्यवाद) म्हणून वळलो आणि आयफेल टॉवरच्या दिशेने चालू लागलो..... बायकोच्या डोळ्यांत कौतुक पुन्हा परतले होते.
नदीरस्त्यावर वळल्यापासून आयफेल टॉवर दिसत होता. पण दिसत होता... दिसत होता... दिसत होता... जवळ कांही येत नव्हता. आम्हालाही तशी घाई नव्हतीच. आजूबाजूचे पॅरीस न्याहाळत चाललो होतो. कचेरीतून घरी लगबगीने परतणारे स्त्री-पुरुष, झगमगणार्‍या शोरुम्स, बिअर आणि वाईनची रेलचेल उडविणारी उपहारगृह, कुत्र्यांना फिरायला नेणारे 'डॉग वॉकर्स' रस्त्याला बर्‍यापैकी गर्दी होती. एवढ्या थंडीत फिरणार्‍या ललना पोटर्‍यांपर्यंत चामड्याचे, उंच टाचेचे बुट घालून, तोकडे उबदार कोट आणि जाळीदार स्लॅक्स सदृष वसने लेऊन चटचटीतपणे घराकडे निघाल्या होत्या. त्यांच्या जाळीदार स्लॅक्स कडे एक कटाक्ष टाकून पत्नीने प्रश्न केला, 'ह्या टवळ्यांना थंडी कशी नाही वाजत?' मी म्हंटलं,' त्यांना पुरुषांच्या नजरांची उब मिळत असते.' 'तुम्ही सरळ समोर बघत चाला.' असा आदेश मिळाल्यावर माझाही नाईलाज झाला.

http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/d/d8/Eiffel_Tower_Day_Sept._2005_%2810%29.jpg/220px-Eiffel_Tower_Day_Sept._2005_%2810%29.jpg
(छायाचित्र आंतरजालावरून साभार.) मी काढलेले छायाचित्र चुकून खोडले गेले (डीलीट झाले).

आयफेल टॉवर.. आयफेल टॉवर म्हणतात तो हाच. सौ. हरखून गेली होती. 'कस्सला स्सही आहे, नाही?'

रॉट आयर्नच्या ३२४ मिटर उंचीच्या मनोर्‍यासमोर आम्ही उभे होतो. फ्रेंच राज्यक्रांतीला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजिलेल्या जागतिक प्रदर्शनाचे प्रवेशद्वार म्हणून हा मनोरा उभारण्यात आला होता. प्रवेशद्वाराचा आराखडा कसा असावा ह्या बद्दल अनेकांकडून विविध आराखडे सरकार दरबारी सादर केले गेले त्यातील गुस्ताव आयफेल ह्या अभियंत्याच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. पॅरीस मधल्या मान्यवर चित्रकार, शिल्पकारांनी आणि समाजधुरीणांनी ह्या आराखड्यास आक्षेप घेतला होता. पॅरीस हे सुंदरतेने नटलेले शहर आहे. तिथल्या, आर्च ऑफ ट्रँफ, नॉन्स्त्र दॅम चर्च, आणि अनेकविध ऐतिहासिक आणि सौंदर्यसंपन्न वास्तुंपुढे हा 'लोखंडाचा ढिग' शहराला विद्रुप करतो आहे असा त्यांचा आक्षेप होता. परंतु, 'नुसत्या कागदावरील आराखडा पाहून टॉवरच्या सौंदर्यावर ताशेरे ओढणे गैर आहे. आणि इजिप्तच्या पिरॅमिड्सचे कौतुक फ्रान्स मध्ये होऊ शकते तर टॉवरला आक्षेप का?' ह्या गुस्तावच्या प्रतिवादाने सरकार समाधान पावले. परंतु, एकूण खर्चाच्या फक्त १/६ खर्च सरकारने केला बाकी गुस्ताव आयफेलने केला आणि टॉवर उभा ठाकला. प्रदर्शन समाप्तीला तो उतरवायचा होता परंतू पुन्हा आयफेलने सरकारला त्याची उपयुक्तता पटवून दिली. पुढे तो फ्रान्सच्या रेडिओ लहरी प्रक्षेपण करण्यात अग्रेसर ठरला. दुसर्‍या महायुद्धात जर्मनांची चढाई रोखण्यातही टॉवर वरील बिनतारी यंत्रणेने महत्त्वाची कामगिरी बजावली. आजही टॉवरवरुन फ्रान्सच्या आकाशवाणीच्या प्रक्षेपणाला मोलाची मदत होते. टॉवरच्या पहिल्या मजल्यावर उपहारगृह आहे तर दुसर्‍या मजल्यावर गुस्ताव्ह आयफेलचे ऑफीस आणि महत्त्वाच्या पाहुण्यांचे स्वागतकक्ष आहे. इथे ह्या उपहारगृहात आयफेल टॉवरला कडाडून विरोध करणार्‍यांचा म्होरक्या रोज येऊन बसायचा. त्याला एकदा एका पत्रकाराने विचारले, 'तुमचा ह्या वास्तूला एव्हढा विरोध होता तर आता तुम्ही रोज इथे का येऊन बसता?' त्यावर तो म्हणाला, 'हा टॉवर मला आजही आवडत नाही. मला तो माझ्या नजरेसमोर नको असतो. पण संपूर्ण पॅरीस मधून तो दिसतो. मी त्याचे दर्शन टाळू शकत नाही. फक्त इथे येऊन बसल्यावर त्याचे दर्शन होत नाही. पण सुंदर पॅरीस शहर मला दिसते, मनाच्या वेदना कमी होतात.'

आयफेल टॉवर वरून पॅरीसचे विहंगम दृष्य...

DXB_0419-web

DXB_0420

दुसर्‍या महायुद्धात हिटलरचे सैन्य आता फ्रान्स काबिज करणार असा अंदाज आल्यावर फ्रेंच सरकारने हिटलरला आयफेल टॉवरच्या वर सहजी जाता येऊ नये म्हणून आयफेल टॉवरच्या उदवाहकाचे (लिफ्टचे) पोलादी दोर कापून टाकले. महायुद्धातील पोलादाची टंचाई पाहता हिटलरला तातडीने पोलादी दोर उपलब्ध झाले नाहीत आणि त्याचा नाईलाज झाला. (परंतू, आयफेल टॉवरला वरपर्यंत जाण्यासाठी पायर्‍या आहेत त्या हिटलरने का वापरल्या नाहीत? असा मला प्रश्न पडतो.) फ्रान्स सोडून जाता जाता हिटलरने आपल्या जनरलला आयफेल टॉवर पाडून टाकण्याची आज्ञा दिली. पण त्या जनरलला सुबुद्धी सुचली म्हणा किंवा कसे पण हिटलरचा तो आदेश पाळला गेला नाही, आणि आयफेल टॉवर शाबूत राहिला.

टॉवरला अनेक मान्यवरांनी भेट दिली आहे (त्यात मिपाचा सदस्य म्हणून मीही आहेच). १८८९ साली जेंव्हा हा टॉवर बांधला तेंव्हा गुस्ताव्ह आयफेलच्या भेटीला थॉमस अल्वा एडीसन हा अमेरीकन शास्त्रज्ञ आला होता. त्यावेळी त्याने गुस्ताव्ह आयफेलला त्याचे नविन संशोधन असलेले फोनोग्राम हे उपकरण भेट दिले. हे थॉमस एडिसन ह्यांचे संशोधन त्या प्रदर्शानात ठेवलेले होते. ह्या दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या भेटीचे दृष्य सर्वात वरच्या मजल्यावरच्या 'महत्त्वाच्या पाहुण्यांच्या स्वागतकक्षात' पुतळ्यांच्या स्वरुपात जतन केलेले आहे.

थॉमस अल्वा एडिसन आणि गुस्ताव्ह आयफेल.

DXB_0432-web . DXB_0431-web

गुस्ताव आयफेल ह्याने ह्या टॉवर नंतर अमेरिकेच्या स्वातंत्र्य देवतेची उभारणीही केली आहे.

आयफेल टॉवरचे सौंदर्य दिवसा जसे भव्य-दिव्य आहे तसे ते रात्रीच्या अंधारात दिव्यांनी उजळल्यावर काळया मखमलीवर चमचमणार्‍या एखाद्या हिर्‍याप्रमाणे लखलखीत आहे आणि आपल्या तोंडून एकच उदगार येतो......'व्वा!'.

20140304_202538-web

टॉवरच्या प्रांगणात ठग लोकांचा वावर आहे. पुरुषांच्या बरोबरीने सुंदर सुंदर तरूण मुली तुम्हाला ठगवायला टपलेल्या असतात. त्यांचे सावज म्हणजे आशियायी आणि त्यातल्या त्यात भारतिय पर्यटक. 'एका तान्या बाळाला कर्करोग आहे आणि त्याच्या उपचाराच्या संदर्भात फक्त एक सही करा' असे भावनिक आवाहन केले जाते. सही केली की २० युरोची मागणी होते. आपण चरफडत देतो आणि आपण ठगवले गेलो आहे हे जाणवतं. काय करणार कर्करोगाचे कारण पुढे केले की मी 'अजूनही' फसतो. ह्या मुली तुम्ही कांही खात असाल तर त्याचीही मागणी करतात. कांही जणी तर हातातील खाद्य पदार्थ हिसकावण्याचा प्रयत्नही करतात. पुरूष पाकिटमार आपली सावजं हेरत असतात. त्यांच्यापासून साभाळावे. पण ह्या सर्वातून आयफेल टॉवर अलिप्त आहे. त्याचे सौंदर्य, भव्यता, त्यामागील कल्पकता आपल्याला नि:शब्द करते. भारावल्या मनाने आम्ही आमच्या निवासाकडे परतलो.

दुसर्‍या दिवशी मोर्चा होता... लुव्ह्र संग्रहालय.

DSC00148

लुव्ह्र संग्रहालय हे एक जगप्रसिद्ध संग्रहालय आहे. त्याचा पसारा पाहता २-४ दिवसांत 'उरकायचा' हा विषय नाही हे सहज लक्षात येतं. त्यातून तुम्ही चित्रकला आणि शिल्पकलेतील दर्दी जाणकार असाल तर संपलंच. कमीत कमी महिना तरी लागेल सर्व दालनं पाहून आणि जाणून घ्यायला. सुदैवाने आम्ही 'जाणकार' नाही. रसिक जरूर आहोत. दिवसभर तंगडतोड करून चित्रकलेचे आणि शिल्पकलेचे कांही अप्रतिम नमुने पाहायला मिळाले. त्यातील ह्या कांही निवडक कलाकृती:

https://farm3.staticflickr.com/2823/13716173373_17990c6be9_n.jpg

https://farm8.staticflickr.com/7236/13716156045_7db5b52df6_n.jpg

https://farm3.staticflickr.com/2893/13716538384_e0fb6219bc_n.jpg

ह्या वरील सर्व तैलचित्रांमधील खेडेगावातील किंचित मागे रेंगाळलेली संध्याकाळ, उन - सावलीचा खेळ आणि एकूणातीलच जिवंतपणा आपली नजर खिळवून ठेवतो. कितीतरी सूक्ष्म तपशील चित्रकाराने मोठ्या कौशल्याने चितारले आहेत.

https://farm8.staticflickr.com/7067/13716173633_02940e1d19_n.jpg

तेच, ह्या चित्रातील खवळलेल्या समुद्राचे रौद्र रुप भयावह वाटते.

https://farm4.staticflickr.com/3726/13716159815_07bbfbb8fa_n.jpg

ह्या आपल्या 'मोनालीसा' काकू. का एवढ्या सर्वांना आवडतात कांही कळत नाही. यमीच्या चारपट गोर्‍याही नाहीएत.

तैलचित्रांमध्ये अजून बरेच कांही पाहण्या-सांगण्याजोगे आहे पण विस्तारभयास्तव जास्त लिहीत बसत नाही. येशूची, मेरीची आणि फ्रेंच राजघराण्यातील कर्तबगार योध्यांची अनेक चित्र आणि शिल्प पाहायला मिळतात. इंग्रजांची चित्र शैली, अरबस्थानातील तैलचित्रे वगैरे देशविदेशाचा मोठ्ठा खजिना आपल्या समोर मांडलेला असतो. काय पाहू, किती पाहू असं होऊन जातं.
https://farm4.staticflickr.com/3742/13716179503_7dce0f388e_n.jpg

ह्या शिल्पातील रेखीवता, सौष्ठव वाखाणण्याजोगे आहे. तर,

https://farm3.staticflickr.com/2893/13716162085_749ddabcb7_n.jpg

ह्या मोहक शिल्पाची निरागसता मला फार भावली.

सर्वात कठीण वाटले ते हे शिल्प..
https://farm4.staticflickr.com/3799/13716177613_df94db80b6_n.jpg

शिकार, शिकारी आणि त्याचा कुत्रा, तिघांच्याही चेहर्‍यावरील वेगवेगळे भाव अगदी ठसठशीत आले आहेत. काळविटाला मृत्यू समोर दिसतो आहे, कुत्र्याच्या चेहर्‍यावर क्रौर्य आहे तर शिकार्‍याच्या चेहर्‍यावर विजयाचे भाव आहेत.
शिकार्‍याच्या हाताचे स्नायु, उभे राहण्याची पद्धत आणि उगारलेल्या सुर्‍यातील आवेश पाहता शिकार हातून सुटणं आता केवळ अशक्य आहे. कुत्रा सावजावर नजर खिळवून आहे. काळविटाचा कान आपल्या तिक्ष्ण दातांमध्ये करकचून पकडला आहे तरीपण स्वतः मात्र काळविटाच्या मार्‍यापासून स्वतःला वाचविण्यासाठी शिकार्‍याच्या दोन पायांत सुरक्षित उभा आहे. अप्रतिम.

बाकी राजे रजवाड्यांची, सरदारांची, प्रेमिकांची अनेक शिल्पे आहेत. संग्रहालय अतिशय सुंदर पद्धतीने राखलेले आहे. थकलेल्या पर्यटकांसाठी बसण्याची सोय ठिकठिकाणी आहे. प्रसाधनगृह आहेत. उपहारगृह आहे. दुर्दैवाने आम्ही गेलो त्या दिवशी चिक्कार म्हणजे चिक्कार गर्दी होती. संध्याकाळच्या वेळी दादर स्टेशनवर धक्के चुकवत चालावं तसं चालावं लागत होतं. बसण्याच्या सर्व जागा व्यापलेल्या होत्या. उपहारगृहाच्या खुर्च्याही रिकाम्या नव्हत्या. मन भरत नव्हतं पण शरीर थकलं. संग्रहालयाच्या मुख्य कक्षात मोठे उपहारगृह आहे. तिथे बसण्यास जागा मिळाली. पण हा परिसर अत्यंत धोक्याचा आहे. म्हणजे तुम्हाला कोणी त्रास वगैरे देत नाही पण इथे पर्यटक निवांत बसतो, क्षणभर बेसावध असतो. इथे बायकांची पर्स, सामानाची पिशवी उचलून पळण्याच्या घटना घडल्या आहेत. माझ्या एका मित्राचा, इथेच कॉफी पित निवांत बसले असता, सामानाची पिशवी चोरट्यांनी पळविली. त्यात रोकड रकमेबरोबरच दोघांचेही (नवरा-बायकोचे) पासपोर्ट चोरीला गेले. कफल्लक अवस्थेत राहयची वेळ आली. सुदैवाने त्याच्या साहेबांनी (अरब स्पॉन्सर) त्याची पॅरीस मध्येच राहायची व्यवस्था केली, पैशांची सोय केली आणि भारतिय दूतावासाने त्यांना भारतात पाठवायची सोय केली. भयंकर मनःस्ताप झाला. इथे आपले पाकिट, पर्स, प्रवासाच्या हलक्या बॅगा वगैरेची काळजी घ्यायची.

संग्रहालयानंतर शिन नदीतील नौकेची सफर केली. ही निव्वळ विश्रांतीची सफर होती. नौका चालत राहते आपण खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत किनार्‍यावरील इमारतींचे सौंदर्य, रोषणाई न्याहाळत बसायचं. पावणेदोन तासांच्या विश्रांती नंतर पुन्हा किनार्‍याला पाय लागले. आमच्या निवासस्थानाजवळच एक गुजराथी उपहारगृह आम्हाला सापडलं होतं तिथे जाऊन उकळलेल्या मसाला चहाचा आस्वाद घेतला. आणि रात्री तिथेच जेवण घेतले.

आता पुढचे वेध लागले होते.....स्विट्झर्लंड.

http://misalpav.com/node/36443

.
वरील चित्रः फोंतेनब्लो प्रासाद आणि संग्रहलय.
संग्रहालये बघण्याची माझी आवड फार जुनी. म्हणजे अगदी वयाच्या पाचव्या -सहाव्या वर्षी सालारजंग म्युझियम बघितले, त्याची मनावर अमिट छाप पडली.
पुढे शाळकरी वयात इंदुरातल्या म्युझियममध्ये जवळ जवळ रोजच जाऊ लागलो. (त्या काळातील आठवणी इथे वाचा) शिवाय मुंबईचे प्रिन्स ऑफ वेल्स अधून मधून बघायला मिळायचे. बडोद्यातली म्युझियमे बघून तर अगदी खुळावलो, आणि पुढे आपण नोकरी केलीच तर ती एकाद्या म्युझीयममधेच करायची असे वाटू लागले. या सर्व संग्रहालयात असलेली पाश्चात्य निसर्गचित्रे आणि संगमरवरी मूर्ती तेंव्हा मला फार आवडत. १९१६९ पासून इंदुरच्या आर्ट्स्कुलात शिकू लागल्यावर अनेक पाश्चात्त्य कलावंत ठाऊक झाले, आणि त्यांची मूळ चित्रे बघण्याची आस लागली.

मध्ये अनेक वर्षे उलटली. दिल्लीतल्या (अलिकडेच जळून भस्मसात झालेल्या) नॅचरल हिस्ट्री म्युझियम मध्ये दहा वर्षे चित्रकार म्हणून नोकरी केली, नंतर अमेरिकन एम्बसीत प्रदर्शन अधिकारी म्हणून बराच काळ काम केले, त्यामुळे 'म्युझियम' या विषयाची बरीच माहिती झाली. या काळात जिथेही जाईन तिथली म्युझीयमे बघण्याचा छंद जोपासला. १९८४ साली तीन महिने अमेरिकेतली संग्रहालये बघणे आणि त्यात काम करणे हे घडून आले. नंतरच्या अमेरिका प्रवासांमधेही बरीच संग्रहालये बघितली.

अलिकडे गेली आठ- नऊ वर्षे पॅरिस मधील अनेक संग्रहालये, रोम मधील व्हॅटिकन आणि अन्य म्युझीयमे बघण्याचा योग आला. अनेक फोटो काढून जमा झाले, परंतु त्यावर काही लिहीण्याचे मात्र जमले नाही. अलिकडेच प्रचेतस यांनी सुचवल्यावर हा उपद्व्याप करण्याचे ठरवले.

पॅरिस मधील अनेक संग्रहालये ज्या इमारतींमधे आहेत, त्या इमारती म्हणजे एकेकाळचे वैभवशाली राजप्रासाद आहेत आणि ते सुंदर उद्यानांनी वेढलेले आहेत. विविध काळी विविध राजांनी आपापली भर घातल्याने काही शतकांनंतर त्यांना आजचे स्वरूप लाभलेले आहे. हा सर्व इतिहास जाणून घेत त्या इमारतींचे अवलोकन करणे हा सुद्धा एक आनंददायक अनुभव आहे. असो. नमनाला घडाभर तेल झाल्यावर आता प्रत्यक्ष विषयाला हात घालतो.

१. फॉन्तेनब्लो (Fontainbleau ) : पॅरिसपासून अंतर ५५ किमी
फ्रान्सच्या इतिहासातील अनेक महत्वाच्या घटनांचा साक्षीदार असलेला हा राजप्रासाद हा आठ शतके फ्रान्सच्या विविध राजे लोकांचे निवासस्थान राहिलेला आहे. १२ व्या शतकात या ठिकाणी एक किल्ला होता. या भागात घनदाट जंगल आणि भरपूर पाण्याचे झरे असल्याने फ्रेंच राजघराण्यातील लोक शिकारीसाठी इथे येऊन रहात.(यातील 'ब्लो' नामक झऱ्यावरूनच 'फॉन्तेनब्लो' हे नाव पडले ) फ्रांसचा राजा फ्रँक्वा-१ अथवा फ्रांसिस -१ (1494-1547) हा कलेचा आश्रयदाता असून याने प्राख्यात चित्रकार लिओनार्दो द विंची याला इटलीतून पाचारण केले. (त्यावेळीच लिओनार्दोने 'मोनालिसा' हे चित्र आपल्याबरोबर फ्रान्सला आणले) याच राजाने नवीनच शोध लागलेल्या अमेरिका खंडात फ्रेंच वसाहती स्थापन केल्या.
राजा फ्रँक्वाचे तात्कालीन चित्रः
.
या राजाने तात्कालीन इटालियन रेनासां शैलीत एक नवीन प्रासाद बांधण्याचे काम ल ब्रेतों (Gilles Le Breton) या वास्तुविदावर सोपवले. इ.स. १५२८ च्या सुमारास या प्रासादातील राजाच्या निवासकक्षापासून प्रार्थनागृहापर्यंत पहुचणारी एक गॅलरी बांधण्यात आली. त्यासाठी इटालीतून खास वास्तुविद आणि चित्र-मूर्तीकार बोलावण्यात आले. १५३३ ते १५३९ या काळात उठावाच्या मूर्ती आणि सपाट चित्रे यांच्या संगमातून सजावटीचे काम पूर्ण झाले. या शैलीला 'फाँतेन्ब्लो स्कूल' असे नाव पडले. इटालियन रेनासां शैलीची फ्रान्समधील ही प्रारंभिक चित्रे आहेत.
फ़्रेंक्वा-१ ची गॅलरी, त्यातील उठावाच्या मूर्ती आणि चित्रे:
.
.
.

प्रार्थनागृह (चॅपेल)
.
१५४० मध्ये प्रासादाभिवती विस्तीर्ण उद्यान बनवले गेले :
.

फ्रान्सिसच्या मृत्युनंतर हेन्री -२ आणि राणी कॅथेरीन द मेदिची यांनी घोड्याच्या नालेच्या आकाराचा जिना बनवला:
.
.
(वरील दोन चित्रे जालावरून साभार)

१५५२ चे सुमारास खालील दालनांवरील गच्चीवर भिंती, उंच खिडक्या, कलाकुसरयुक्त छत आणि कलात्मक सजावट केलेले नृत्यदालन (बॉलरूम ) बनवण्यात आले. या दालनाच्या एका टोकाला भव्य अग्निस्थान ( fireplace ) तर दुसर्‍या टोकाला नृत्याचे वेळी गायक-वादकांना बसण्याची गॅलरी आहे.
नृत्यकक्षात प्रशांत आणि मी:
.
अग्निस्थान:
.
गायक-वादकांना बसण्याची गॅलरी:
.

या प्रासादात एकूण सुमारे १५०० दालने आहेत, अर्थात आपल्याला त्यापैकी फारच थोडी बघायला मिळतात. या दालनांखेरीज इथे नेपोलियन म्युझियम, चिनी वस्तुंचे संग्रहालय, नाट्यगृह अशा अनेक प्रेक्षणीय जागा आहेत. प्रासादाभोवती विस्तीर्ण उद्यान आहे. सर्वत्र जुनी चित्रे आणि संगमरवरी मूर्ती यांची रेलचेल आहे.
राण्यांचे शयनकक्ष :
.
शाही जिन्यातील सजावटः
.

प्रासादातील काही शिल्पे:
.....

...
लहानपणी वाचनात आलेल्या 'त्रिस्तनी राजकन्या' नामक एक गोष्टीची आठवण वरील बघून शिल्प आली. मदुराईच्या मीनाक्षी मंदिरातही असे शिल्प आहे, ते या निमित्तने आठवले.

नेपोलियनचे सिंहासन आणि पलंग:
...

नेपोलियन संग्रहालयातील काही वस्तू:
नेपोलियनच्या बाळाचा पाळणा:
.

नेपोलियनच्या पिस्तुली:
.
नेपोलियनचा तंबू:
.

प्रासादाभोवतालीच्या उद्यानातील शिल्पे:
.
...
...

प्रासादाजवळचे तळे:
.
चौदाव्या लुईच्या काळात तळ्यात बनवलेला मंडपः
.

ही लेखमाला लिहिण्यास उद्युक्त करण्याबद्दल प्रचेतस यांना अनेक आभार.
पुढील भागात पॅरिसच्या आणखी एकाद्या राजप्रासादाची सफर करूया.

-----------------------------------------------------------------------------
फाँतेनब्लो विषयी काही उपयुक्त दुवे:
http://www.musee-chateau-fontainebleau.fr/The-Park?lang=en
https://en.wikipedia.org/wiki/Palace_of_Fontainebleau
http://chateaudefontainebleau.fr/spip.php?page=sommaire&lang=en

(क्रमशः)

दक्षिण फ्रान्स (Côte d'Azur - French Riviera)

 या वेळी पुन्हा नाताळची आठवडाभर सुट्टी होती. काही कारणांनी विमानप्रवास टाळायचा होता. त्यामुळे आठवडाभराच्या सुट्टीत काय करायचं हा प्रश्न होता. फ्रान्समध्ये पॅरिस सोडून आम्ही फक्त शमोनी (Chamonix) बघितले होते. यावेळी अगदी ऐनवेळी दक्षिण फ्रांस (इंग्रजीत, French Riviera, फ्रेंचमधे Côte d'Azur) बघायचं ठरलं. 'फ्रेंच रिविएरा' या नावानं ओळखला जाणारा हा भूमध्य समुद्रालगतचा प्रदेश (तुलनेने) गरम हवामान आणि बीच यासाठी प्रसिद्ध आहे... अर्थातच नाताळाच्या सुट्टीत इथे गर्दी नसते! पण आमचा काही दिवस निवांत घालवणे एवढंच उद्देश होता. हिवाळ्यातले पॅरिस म्हणजे अतिशय मरगळ... सदैव थंड हवा, ढगाळ आकाश आणि कमी सुर्यप्रकाश यामुळे फार फार डिप्रेसिंग वाटतं. या वातावरणापासून दूर जायचच होतं.

थोडी शोधाशोध केल्यावर नीस (Nice), कान्न (Cannes) आणि मोनाको (Monaco) बघायचं ठरलं. फक्त नीसला राहून हे शक्य होतं. मग जाण्याच्या आठवडाभर आधी रेल्वे आणि हॉटेलचे बुकिंग फ्रेंच रेल्वेच्या साईटवरून केलं. निघायच्या दिवशी पॅरिसच्या रेल्वे स्थानकावरुन आमच्या गाडीला निघायलाच एक तास उशिर झाला. फ्रान्सच्या जगप्रसिद्ध TGV नी (माहिती आहे नं?!!) जाण्याची ही दुसरी वेळ होती. ही अतिवेगवान रेल्वे मार्सेय (Marseille) पर्यंतचे साधारण ७५० कि.मी. अंतर तीन तासात कापते आणि पुढे नीसपर्यंतचे २०० कि.मी. कापायला अडीच तास जातात. आम्हाला तशिही काही घाई नव्हती. मस्तपैकी पत्ते खेळत आम्ही रात्री नीसला पोचलो.

नीस तसे जास्त मोठ्ठे शहर नाही. इथे एकच ट्राम आहे पण सार्वजनिक बसचे जाळे (बाकी फ्रान्सप्रमाणेच) चांगले आहे. फक्त १५ युरोत सात दिवसाचा पास घेतला आणि ट्राम पकडून हॉटेलला निघालो. नाताळ असल्याने सगळे शहर उजळून निघाले होते. शहराच्या मुख्य चौकात - प्लास मासेना (Place Masséna) मध्ये - नाताळ बाजार (हा दर वर्षी आणि सगळ्या ठिकाणी एकसारखाच असतो), मोठ्ठा पाळणा आणि इतर जत्रा लागली होती. हॉटेल समुद्रकिनारीच होते. एकंदर इमारत आणि खोलीतले खुर्च्या-टेबलं बरीच जुनी होती. ताजेतवाने होउन पलंगावर बसतोच तोवर भुकेची जाणीव झाली. येताना प्लास मासेनाआधी एक 'बॉलीवूड कॅफे' नावाचं भारतीय हॉटेल बघितलं होतं. तिथे जायचं ठरलं. आत बघतो तर शाहरुख, करीना मंडळींची छायाचित्रे... मालक हॉटेलच्या नावाला इमान राखून होता. त्याचप्रमाणे तो भारतीय जेवणालाही इमान राखून होता. सामोसा चार कोनाचा होता आणि त्यात चक्क बटाटा आणि मटार निघाले. पॅरिसमधले सो-कोल्ड भारतीय हॉटेलवाले त्रिकोणी सामोस्यात गाजर कोबी काय वाट्टेल ते घालतात Sad

दुसऱ्या दिवशी पहिलं काम केलं ते पर्यटन कार्यालयात जाऊन माहिती घेतली. तिथल्या बाईने आम्हाला भरपूर नकाशे आणि माहितीपत्रके दिली. शिवाय या आठवड्याचं हवामान विचारल्यावर चक्क नेटवरून हवामानाचा अंदाज छापून दिला!! मग आमचं ज्ञान, ही नवी माहिती आणि हवामानाचा अंदाज यांचा विचार करून आज नीस हिंडायचं ठरलं. पहिल्यांदा गेलो समुद्रावर! पाणीतर थंड होतंच पण थंड वारं देखिल वाहात होतं.

थोडा वेळ फिरून आम्ही जुन्या नीसकडे मोर्चा वळवला. जुन्या नीसमध्ये अगदीच छोटे छोटे रस्ते आहेत. कार अर्थातच आत येऊ शकत नाही. हलक्या गुलाबी किंवा पिवळ्या रंगाच्या इमारती छान दिसत होत्या. इथे पर्यटकांची रेलचेल होती. नेहमीप्रमाणे सोवेनिअरची दुकानं आणि वेगवेगळी उपहारगृहं दिसत होती. अत्तर व इतर सुगंधी पदार्थांची देखील बरीच दुकानं होती. इथून जवळच असलेले ग्रास (Grasse) गाव सुगंधी द्रव्यं तयार करण्यासाठी बरेच प्रसिद्ध आहे.

इथुन आम्ही बस घेऊन रशियन ओर्थोडोक्स चर्च बघायला गेलो. या प्रकारचे रशिया बाहेरचे हे सर्वात मोठ्ठे चर्च आहे. जसं फ्रांस म्हणाल्यावर आयफेल टॉवर दाखवतात तसं रशियासाठी मोस्कोच्या लाल चौकातल्या एका चर्चचा फोटो दाखवला जातो. हे चर्च देखील तसेच होते. यावरील घुमटांना त्यांच्या आकारामुळे ओनिअन डोम म्हणतात. आतूनही हे चर्च सुंदर होते. मुख्य म्हणजे आत्तापर्यंत असले चर्च बघितले नसल्याने हे भलतंच आवडलं.

इथून बसनी नीस बंदराला गेलो. इथे बघायला खास काही नसल्याने तसेच पुढे नीसबाहेरील 'मो बरोन' (Mont Boron) डोंगरावर गेलो. वर जाईपर्यंत अंधार झाला होता. इथून सगळं नीस दिसतं. रात्री तर अतिशय सुंदर दिसतं. वर जाणारा रस्ता जंगलातुन जाणारा अगदी सुन्सान असल्याने शेवटच्या थांब्यावरून फोटो काढायचं ठरलं. पण बसं थांबली तिथुन काहिच नीट दिसेना. इथे त्या फोटोसाठी परत यायचं ठरवून आम्ही पुढच्या बसने हॉटेलला परतलो.

एकंदर नीसमध्ये भारतीय उपहारगृह मोठ्या संख्येनी आहेत. म्हणजे पिझ्झेरीयाहूनदेखील जास्त! आज दुपारी पण एका भारतीय उपहारगृहातच जेवण केलं. इथेही कांदा भजी म्हणाल्यावर ओनिअन रिंग्स नं देता चक्क आपल्याकडची, ज्याला आम्ही खेकडा भजी म्हणतो, तशी भजी मिळाली.... (माझा आनंद गगनात मावेना वगैरे वगैरे वगैरे ...). रात्री देखील एका भारतीय फास्ट-फूड दुकानातून (इथल्या सॅडविच शॉप प्रमाणे) अगदी स्वस्तात जेवण मिळालं. पॅरिसपेक्षाही नीसमध्ये भारतीय उपाहारगृहांची घनता जास्त आहे आणि पदार्थांचा दर्जा तर कित्तेक पटीनी चांगला आहे. इथे मोठ्या प्रमाणात येणारे इंग्रज पर्यटक याला कारणीभूत असावेत. कारण काहीही असो पण खाण्याच्या बाबतीत चैन होणार होती हे आम्हाला दिसताच होतं.

हवामानाच्या अंदाजाप्रमाणे दुसऱ्या दिवशी निरभ्र आकाश होते. आधी ठरवल्याप्रमाणे आम्ही शमँ द फर द प्रोवान्स (Chemins de Fer de Provence) या छोट्याश्या रेल्वेनी नीसच्या उत्तरेला जाणार होतो. इथे नक्की काय बघायचं ते माहिती नसल्याने सरळ शेवटच्या थांब्याला जाऊन परतायचं ठरलं. हा एकंदर प्रवास सहा तासाचा झाला असता. त्यामुळे भल्या पहाटे उठून सकाळी आठची रेल्वे पकडली. तिथल्या तिकीट खिडकीवरच्या बाईला आमची कल्पना काही आवडली नाही. मग तिने सुचवल्याप्रमाणे शेवटी न जाता, मधल्याच एका आँथ्रेवो (Entrevaux) नावाच्या गावापर्यंतचे तिकिट काढले. आँथ्रेवोला एक जुना किल्ला आहे हे ही तिनी सांगितलं. ही रेल्वे बरीच जुनी आहे. रेल्वेचा एकचं मार्ग नदीशेजारून पुढे पुढे जात जातो. आजूबाजूला डोंगर, मधूनच एखादे खेडे असं सुरेख दृश्य होतं. सकाळी लवकर निघाल्याने सूर्य डोंगरामागेच होता. डिसेंबर महिना असल्याने तो तसाही वरती येणार नव्हता. डोंगराच्या ज्या बाजूला सूर्यप्रकाश पडत नाही तिथे बर्फ होता. वरती नदीवर साठलेलं धुकं आणि खाली रुळावर बर्फ अश्या वातावरणात रेल्वे पुढे चालली होती. अधून मधून छोटी छोटी स्थानकं लागत होती. आजूबाजूला फ्रेंच खेडी बघत आम्ही हळू हळू आमच्या गावाकडे पोहचत होतो.

आँथ्रेवो येण्याआधी तो किल्ला दिसू लागला. आँथ्रेवोला उतरणारे आम्ही दोघेच होतो. बाहेर प्रचंड थंडी होती. आधी स्थानकाशेजारच्या उपहारगृहात जाऊन गरम कॉफी (आणि मी गरम वाईन!!) घेतली. त्याने थोडी तरतरी आली तसा समोरचा रस्ता ओलांडून गावात गेलो. गावं अगदी मध्ययुगीन... मागे डोंगरावर किल्ला आणि समोरून वळसा घालून जाणारी नदी या दोन्हीमध्ये वसलेले! या बाजून गावात जायला नदीवर एक जुना दगडी पूल आणि साखळीने खाली पडणारे दोन दरवाजे होते. गावात प्रवेश केल्यावर डावीकडे 'बंद' पर्यटन कार्यालय दिसलं. बाहेर आँथ्रेवोचा नकाशा लावला होता त्याचाच एक फोटो घेतला. तसाच चालत पुढे गेल्यावर गावाचा मुख्य चौक होता. फार काही मोठ्ठा नव्हता. दोन दुकानं... एक उपाहारगृह.. बस. नकाशाप्रमाणे रस्ता शोधत गावाच्या चर्चकडे आम्ही निघालो. गावात अगदीच सामसूम होती. पण लोकं राहतायत हे जाणवत होतं. (अगदीच व्हेनिससारखी भुताटकी नव्हती!) छोट्या गल्ल्यातून पुढे जात जात शेवटी चर्च आलं.

इथेच गावाच्या तटबंदीमधले दुसरे प्रवेशद्वार होते. चर्चमध्ये गेल्यावर कळलं गावात एवढी शांतता का होती ते... आत बहुतेक तो संडे मास का काय असतो ना तो चालला होता. पन्नासएक लोकांसमोर एक पाद्री काहीतरी म्हणत होता. क्षणभर कळेना आत जावं का नको... शेवटी पटकन जाऊन शेवटच्या खुर्च्यांवर बसलो. चर्च बरचं जुनं होतं. उंच छत, रंगीत काचांच्या खिडक्या सगळं बघतच होतो तेवढ्यात सगळे उठले... मागून ऑर्गनचे सूर येऊ लागले आणि त्यांची प्रार्थना सुरु झाली. आम्हीपण उभारलो. पाद्री आता मंचावरून खाली येऊन एक-दोघांशी हस्तांदोलन करत होते. पुढे पुढे येत ते शेवटी आमच्यापर्यंत आले. पाद्री एकदम टिपिकल पाद्री होते! अगदी गुटगुटीत, हसर्‍या चेहेर्‍याचे!! मागे प्रार्थना सुरूच होती. त्यांनी आमच्याशी हस्तांदोलन करून आमचीपण चौकशी केली. प्रार्थना झाल्यावर एक एक मंडळी जाऊ लागली. पाद्री दारात उभारून प्रत्येकाचा निरोप घेत होते. आम्हीपण पुढे जाऊन चर्च बघितले आणि त्यांचा निरोप घेऊन बाहेर आलो.

आता आम्ही डोंगरावरच्या किल्याकडे मोर्चा वळवला. त्याची उंची पाहता मी एकट्यानेच जायचं ठरलं. सूर्य बऱ्यापैकी वरती आला होता पण हवेत अजून गारवा होताच. दगडी बांधलेल्या रस्त्यांनी जसं जसं मी वरती जाऊ लागलो तसं तसं उकडायला सुरवात झाली. सितादेलापर्यंत पोचलो तेंव्हा जाकीट, स्वेटर काढावा लागला. वरती बऱ्याच खोल्या होत्या. सगळीकडे दिशादर्शक बाण आणि माहिती व्यवस्थित होती. अख्या सितादेलावर मी एकटाच असल्याने जरा वेगळं वाटत होतं.

वरून खाली येताना वर जाणारी काही माणसं दिसली. आधी ठरल्याप्रमाणे बायको मुख्य चौकातल्या उपहारगृहात वाट बघत होती. उपहारगृह खच्चून भरलं होतं. आमचं जेवण येईपर्यंत बराच वेळ गेला. आम्हालाही काही घाई नव्हती. जेवण करून पुन्हा रेल्वे स्थानकावर गेलो तर पुढच्या रेल्वेला अजून बराच वेळ होता. पण बाहेर थंडी अजून वाढली असल्याने प्रतीक्षालयातच बसलो. गाडी साडेसहाला आली आणि परत नीसला पोचायला रात्र झाली.

रात्री नाताळ निमित्त केलेल्या सजावटीचे फोटो काढले.

यावर्षी इथे रशियन बाहुल्यांचं प्रदर्शन देखिल होतं.

तिथेच 'A फॉर डॉक्टर' असला काहितरी रशियन मुळाक्षरांचा बोर्डपण होता.

पुढच्या दिवशी सकाळी कान्न (Cannes) ला जायला रेल्वे पकडली. तसं कान्नमध्ये बघायला काही नाही. चित्रपट मोहोत्सवामुळे या गावाचं नाव झालं. असं म्हणतात की, जेंव्हा चित्रपट मोहोत्सव असतो तेंव्हाच कान्नमध्ये बघण्यासारख काही असतं. पण कान्न काय, पिसाचा मनोरा काय किंवा मोनालिसा काय... कितीही 'हे' असलं तरी आपल्या माहितीतल्या गोष्टी बघण्यातच आपल्याला रस असतो. हा चित्रपट मोहोत्सव जिथे होतो ते 'पॅले दे फेस्टिवल ए दे कॉन्गेस्' (Palais des Festivals et des Congrès)ठराविक दिवशीच उघडे असते. तसाही नुसता हॉल काय बघायचा! आम्ही गेलो तेंव्हा तो बंदच होता. मग त्या समोरच्या 'रेड कार्पेट'वरच फोटो काढले आणि मिनी-ट्रेन घेऊन कान फिरलो.

ती ट्रेन रस्त्यावरून जाणारीच होती. सोबत आजूबाजूच्या स्थळांची माहितीही चालली होती. त्यात कुठलेसे प्रसिद्ध हॉटेल त्यात कोण कोण हॉलीवूड तारे-तारका राहिले होते वै.वै. चालू होतं. पुढे ही ट्रेन थोडासा चढ चढून जुन्या कान्नमध्ये गेली. इथे पुन्हा छोटे रस्ते फिकट रंग दिलेल्या इमारती ई. होते. सर्वात वरती एक चर्च होतं. त्याच्या शेजारून अख्खं कान्न बघायला मिळालं.

टूर झाल्यावर आम्ही जेवण केलं. कान्नजवळ एका बेटावर जंगल कम बाग काहीतरी आहे ते बघायला जायचा बेत होता पण बोटीच्या धाक्यावर जाईपर्यंत बराच उशीर झाला होता. त्यामुळे तिथे समुद्रकिनारी थोडी टंगळ मंगळ करून नीसला परतलो.

आता उद्या दुसऱ्या देशात जायचं होतं! हो, मोनाको (Monaco) हा जगातला दुसरा सगळ्यात छोटा देश. (पहिला वॅटिकन सिटी). क्षेत्रफळ जेमतेम दोन वर्ग किलोमीटर!! नीसहून रेल्वेनी कान्नच्या विरुद्ध दिशेनी गेलं कि अर्ध्या तासात मोनाको येतं. हे शहर समुद्रकिनारी असलेल्या डोंगरावर वसलेले आहे. त्यामुळे अख्या शहरात बऱ्याच ठिकाणी लिफ्ट आणि सरकते जीने आहेत. मोनाको प्रसिद्ध आहे इथल्या फॉर्मुला-१ ग्रॉन् प्री मार्ग आणि मोंटे कार्लो कसिनो साठी. (पार्ल्यानी बिस्कीटाला मोनाको नाव का दिलं मला ठाऊक नाही!) इथेही नेहमीप्रमाणे पहिल्यांदा पर्यटन कार्यालयात गेलो. तिथे बरीच माहिती आणि नकाशे मिळाले. मग बसचे एका दिवसाचे तिकीट काढून (फक्त ३ युरो!!) राजवाड्यात 'चेंज ऑफ गार्ड्स' बघायला गेलो. राजवाडा मुख्य डोंगरापासून वेगळा असलेल्या एका मोठ्या टेकडीवर आहे. बस थांबते तिथेच एक मोठ्ठं मत्स्यालय आहे. हे पण चांगलं आहे म्हणतात. पण आम्ही आत गेलो नाही. या इमारतीच्या मागच्या टेकडीला सरळ कापल्यासारखा कडा आहे, जो सरळ समुद्रात जातो. इथून जुने मिनाको सुरु होते. परत छोटे रस्ते, आकर्षक रंगत रंगवलेली घरं वै. बघत आम्ही राजवाड्यासमोर पोचलो.

राजवाडा काय अगदी लै भारी नव्हता. बाहेर दोन रक्षक पहारा देत होते. बरोबर ११:५५ ला त्यांच्या हलचाली सुरु झाल्या. आतून अजून रक्षक आले. समोरच्या पोलीस मुख्यालयातून ताजे रक्षक आहे. त्यांच्याबरोबर वाद्यवृंद देखील होता. मग त्यांच्या नित्यक्रमाप्रमाणे जुने रक्षक परत निघून गेले आणि त्यांची जागा नवीन रक्षकांनी घेतली. आम्हीपण नव्या पर्यटकांना जागा करून देऊन उरलेले मोनाको बघायला निघालो.

खालच्या चार फोटोत आख्खा देश येतो!!

जुन्या मोनाकोतून फेरफटका मारला, दुपारची पेटपूजा आटोपून घेतली. पुढे बस घेऊन अनोख्या/विलक्षण बागेत (Jardin Exotique de Monaco) गेलो. ह्या बागेत मुख्यतः निवडुंगाची बरीच वेगवेगळी झाडं आहेत. डोंगर उतारावर नागमोडी वाटा करून आजूबाजूला बऱ्याच वेगवेगळया प्रकारचे निवडुंग लावले होते. कड्यावरून समोर राजवाड्याची टेकडी दिसते.

तसंच उतरत खाली आल्यावर तिथे एक गुहा आहे. दर तासाला त्याची टूर असते. चुनखडीतून पाणी झिरपून तयार झालेल्या या गुहेत उतरायला तीनशे पायऱ्या होत्या. आत सगळीकडून पाणी ओघळत होतं. जसं जसं आत जावं तसं उकडायला सुरवात झाली. त्या क्षारयुक्त हवेचा वास देखील विचित्रच होता. पण मी पहिल्यांदाच अशा गुहेत आलो होतो, त्यामुळे मला चिक्कार आवडली.

आता मोनाको मधलं शेवटाचं ठिकाण, म्हणजे मोंटे कार्लो कसिनो, बघायला आम्ही गेलो. त्याच्यासमोर नाताळनिमित्त चिक्कार सजावट केली होती. तिथे आधी पर्यटकांना आत जाता येतं कि नाही याबद्दल शंका होती. मग चारी बाजूनी चक्कर मारली. सगळ्या भारी भारी गाड्या आजूबाजूला लावल्या होत्या... (त्यातच एक इटुकली स्मार्ट कारपण होती!) मग काही पर्यटकांना आत जाताना बघितल्यावर आम्ही पण आत शिरलो.

प्रवेश फी प्रत्येकी २० युरो होती. आता एवढी गर्दी नव्हती. पहिल्या दालनात सुटाबुटातील लोकं black jack खेळत होते. मी पहिल्यांदाच हे प्रत्यक्ष बघत होतो. त्या खेळाचे नियम मलाही माहिती नाहीत. पण सिनेमात इतक्या वेळेला पाहिलंय कि प्रत्यक्ष पाहताना सिनेमाचे चित्रीकरण बघतोय असंच वाटत होतं. कमीत कमी किती पैसे लाऊ शकता हे प्रत्येक टेबलावर लिहिलेले होते. वीस युरो प्रवेश फी देताना दहादा विचार केला होता, ते आकडे बघितल्यावर तर काढता पाय घेतला. कसिनोची इमारत बरीच जुनी आहे. पूर्वी हे ओपेरा हाउस होते. त्यामुळे भिंतीच काय छतदेखील दगडी मुर्त्या आणि चित्रांनी सजवलेले आहे. (फोटो काढायला बंदी होती) दुसऱ्या दालनात रुलेत (Roulette) होते. इथेही पैसेवाल्यांची चलती होती. एकंदर खेळणाऱ्यांत चिंकी पर्यटक (नक्की कुठल्या देशाचे ते कसे कळणार?!!) भरपूर होते. थोडा वेळ ते बघितल्यावर आम्ही शेवटच्या दालनात गेलो. ते दालन फट असलेल्या यंत्रांनी (Slot Machine) भरलेलं होतं. माझं कसिनोत उडवायचं बजेट ठरलेलं आहे... आख्खे दहा युरो! इथे त्याहून जास्त पैसे प्रवेश करण्यासाठीच द्यावे लागले असल्याने मला अजून पैसे उधळायचे नव्हते.

बाहेर आलो तेंव्हा सगळं मोनाको बघून झालं होतं आणि चिक्कार म्हणजे भयानकच आवडलं होतं. एवढासा देश पण किती वेगवेगळी आकर्षण होती! एक दिवस कसा गेला तेच कळलं नाही. हा एक दिवस आणि कान्नमधला एक दिवस... जमिन आस्मानाचा फरक!!! तरी थंडी असल्याने समुद्रकिनारी आम्ही गेलो नाहीच. रात्री रेल्वेने परत नीसला आलो. उद्या इथला शेवटचा दिवस होता. परवा सकाळी परत घरी निघायचं होतं.

शेवटच्या दिवशी आम्ही कॅसल हिल वर गेलो. वरून नीस आणि सभोवतालचा भूमध्य समुद्र मस्त दिसतो. इथे कोणे एके काळी किल्ला होता. नंतर झालेल्या बऱ्याच लढायांमध्ये तो जमीनदोस्त झाला आता तिथे एक छान बाग केलीये. भरपूर फिरल्यावर जुन्या नीसमध्ये पुन्हा एक चक्कर मारली.

नीसमध्ये अजून एक गोष्ट बाकी होती. परवा रात्री रात्रीच्या नीसचा फोटो घ्यायची संधी हुकली होती. आज मी एकटाच त्या टेकडीवर जाणार होतो. बसनी मधल्याच थांब्यावर उतरलो. खरच निर्मनुष्य रस्ता होता. मधेच एखादा जॉगर टेकडीवर पळत जात होता. बरंच धुकं असल्याने फोटो काही खास आले नाहीत. पण चलता है... नीसचे असेच चांगले चांगले फोटो काय गुगलवर भरपूर मिळतील, त्यापेक्षा माझा अनुभव महत्वाचा!

आता उद्या रेल्वेनी घरी परत! एकंदर खरोखर निवांत मजा करायला यायचं असेल तर नीस उत्तम. भारतीयांना तर खाण्यापिण्याचीही चंगळ आहे. उन्हाळ्यात आलं तर सुर्याहून पिवळं!! या प्रवासात हवामानानी आमची साथ काही दिली नाही. आँथ्रेवोचा एक दिवस सोडला तर बाकी ढगाळ हवा होती. थंडी तर होतीच (डिसेंबरमध्ये उकडायला हे काय ऑस्ट्रेलिया आहे!!) पण मस्त मजा आली.

 



































 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

  discovermh.com वाकेश्वर मंदिर,वाई | Wakeshwar Temple, Wai | Discover Maharashtra Discover Maharashtra ...