अदिती खगोलशास्त्रीय कॉनफरन्ससाठी नेदरलँड मधील आसेन गावी येणार आणि नंतर फ्राफुमध्ये ४ दिवस राहणार असे निश्चित झाल्यापासून आमच्या भ्रमणमंडळातल्या हालचालींना वेग आला आणि "रोमांटिशं स्ट्रासं" अर्थात रोमँटिक रोड वर आमचा मोर्चा वळवायचा बेत रचला. आधी ठरले असले तरी काही अपरिहार्य कारणामुळे अभिर येऊ शकत नाही असे समजले, तरी आमच्या बेतात फारसा बदल न करण्याचे ठरवून अदितीची कॉनफरन्स (सुरु होण्याआधीच) संपवून ती फ्राफुत कधी येते याची वाट पाहू लागलो. पण तेवढ्यात अजून एक माशी शिंकली. दिनेशची एक बिझिनेस ट्रीप आडवी आली. अदितीला फ्राफु दाखवण्यासाठी दिनेश नसला तरी चालण्यासारखे होते त्यामुळे त्याला कचेरीच्या कामासाठी जाऊ देऊन मी तिला आणायला स्टेशनवर गेले. नंतरचे दोन दिवस आम्ही एवढ्या अखंड बडबडत होतो,की (सूज्ञ मिपाकरांच्या ते लक्षात आले असेलच, ) फ्रांकफुर्टातील गल्लीबोळही मिपाच्या उल्लेखाने पावन झाले आणि सतत तेच ऐकून ऐकून आईलाही मिपा आणि मिपाकरांचे , खवचे उल्लेख लक्षात यायला लागले.
जर्मनीची आर्थिक राजधानी असलेलं,युरोपातले सगळ्यात मोठे आर्थिक केंद्र
असलेलं ट्रेड फेअरचं हे शहर तरीही जर्मनीतलं सगळ्यात मोठं सिटीफॉरेस्ट ह्या
शहरात आहे! पुस्तकजत्रा आणि मोटारींची जत्रा हे वर्षातून एकदा येणारे
धामधुमीचे दिवस.. त्या काळात हॉटेलांचे दर दुप्पट, तिप्पट होतात आणि मग
येथले काहीजण आपल्याकडील जास्तीची खोली मेसंगेस्टं म्हणजे जत्रेसाठी
आलेल्या लोकांना भाड्याने देतात. दुसर्या महायुध्दात अनेकदा बाँबहल्ल्याला
बळी पडलेलं हे शहर जरी हिरवाईचं असलं तरी इतर गावांच्या मानाने
सुंदरतेच्या बाबतीत जरा डावंचं आहे! पण तरीही ते माझं फ्रांकफुर्ट आहे, मला
अर्थातच ते फार आवडतं. अदितीला फ्राफु दाखवण्याच्या निमित्ताने मी परत
एकदा इथल्या गल्लीबोळातून भटकले. आई, मी आणि अदिती सक्काळीच भटकायला
निघालो.ट्रामने भटकायला मजा येते हे अनुभवाने दोघींनाही पटले होते त्यामुळे
शक्य तिथे ट्रामनेच आम्ही जात होतो. हाउप्ट बानहोफ म्हणजे फ्राफुचे मुख्य
स्टेशन. आपल्या बोरीबंदराची आठवण स्टेशनाची दगडी बांधणीची,जुनी भक्कम
वास्तू पाहून हटकून येतेच.
तेथून २ स्टॉप पुढे असलेल्या विली ब्रांड प्लाट्झ येथे युरोपियन सेंट्रल बँकेची बहुमजली इमारत आहे. ह्या बँकेतूनच युरोझोनची मॉनिटरी पॉलिसी ठरवली जाते. समोरच टुमदार नाट्यगृह आहे.
फ्राफुतली जुनी स्टॉक एक्स्चेंजची इमारतही पाहण्यासारखी आहेच पण येथली अजून एक पहाण्यासारखी इमारत म्हणजे माइन नदीच्या तीरावरची ही काचेची इमारत, वेस्टहाफन टॉवर आणि ह्या इमारतीची बांधणी अॅपलवाइनसाठीच्या खास पेल्यासारखी आहे हे तिचे महत्त्वाचे वैशिष्ट्य! युरोपियन मंडळी विशिष्ट पेल्यातून विशिष्ट पेय पिण्याबाबत फार काटेकोर असतात आणि ह्या खास अॅपलवाइनसाठीचा खास पेला तर असायला हवाच ना!
हेसनमध्ये सफरचंदे फार त्यामुळे सफरचंदाचे अनेकानेक प्रकारचे केक,मार्मलाडं आणि अॅपलवाइनची तितकीच प्रसिध्द! अॅपलवाइनला हेसिश भाषेत एब्बेलवाय म्हणतात आणि फ्राफु दर्शनाच्या रंगीबेरंगी ट्रामला एब्बेलवाय एक्सप्रेस असे सार्थ नाव आहे.
पुढच्याच थांब्यावर आहे रोमर/पाउलकिर्श म्हणजे सेंट पॉल चर्च. शहरातला हा महत्त्वाचा चौक. दुसर्या महायुध्दात येथे बरीच पडझड झाल्यामुळे येथे जुन्यानव्याचा मिलाफ दिसतो. आता हे चर्च धार्मिक कारणासाठी कमी तर प्रदर्शने आणि ख्रिसमस मार्केटासारख्या महत्त्वाच्या इव्हेंट्ससाठी जास्त प्रसिध्द आहे. तेथल्या समोरच्या मोठ्ठ्या अंगणात नाताळचा बाजार फुलतो तर एरवी त्या अंगणातले मेपल्स थकल्याभागल्या प्रवाशांवर सावली धरतात. तिथल्या पारांवर घटकाभर बसून ताजेतवाने होता येते.तेथूनच डावीकडे गेले की 'झाइल' सुरू होते. आपल्या फोर्ट भागासारखाच हा सारा शॉपिंग एरिया! येथे असलेल्या गॅलेरिया काउफहाउफ मध्ये कलात्मकतेने रचलेले जर्मन,स्वीस,फ्रेंच,बेल्जियन चॉकलेटांचे दालन प्रत्येकाला भुरळ पाडतेच, त्याला आम्ही तरी कसे अपवाद असणार?
उजव्या बाजूला गेले की मोठ्ठे मैदान आहे.बाजूची मोठी रोमरबेर्ग म्हणजे सिटीहॉलस्क्वेअरची इमारत लक्षवेधी तर आहेच पण ह्या चौकातही नाताळचा मोठ्ठा बाजार भरतो. एरवी तेथे डोंबार्याचे खेळ चालले असतात, पालं ठोकून फ्राफुच्या आठवणी म्हणून पोस्टकार्डे, टीशर्ट्स, कीचेन्स्, रंगवलेले बियरमग्ज, बेंबेल म्हणजे अॅपलवाइन सर्व करण्यासाठीचा खास जग इ. विकणारे विक्रेते काहीतरी आठवण घ्यायला मोहात पाडतात.
त्या दगडी अंगणात लक्ष वेधून घेतो तो न्यायदेवतेचा पुतळा! डोळ्यावर
पट्टी न बांधता एका हातात समानता दर्शवणारा तराजू तर दुसर्या हातात
चमकणारी धारदार तलवार घेतलेली ही न्यायदेवता मला नेहमीच कर्तव्यकठोरतेचे
काटेकोर पालन करण्याचे प्रतीक वाटते.
त्या दगडी बांधणीच्या रस्त्यावरून उतरणीला खाली गेले की माईनचे विशाल पात्र,त्यावर डुलणार्या नौका,विहरणारी बदके,हंस,पाणकोंबड्या,तीरावर हिरवळीत उन्हे अंगावर घेत पहुडलेली तरुणाई, बाकड्यांवर निवांत बसलेले आजीआजोबा, खेळणारी,बागडणारी मुले, सायकली चालवणारे ,जॉगिंग करणारे उत्साही वीर असे उन्हाळ्यातले नेहमीचे दृश्य दिसले. पूलावर उभे राहून वारा खात, माइनचे विशाल पात्र नजरेत साठवत रेलून उभे राहिले की मन शांत शांत होतं जातं,असा कितीही वेळ तिथे जाऊ शकतो आणि तसेच त्या दिवशीही झालं. शेवटी तंद्री भंग करुन आम्ही एशनहाइमर टोअर ह्या १७ व्या शतकातल्या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या त्या काळच्या वेशीपाशी गेलो. आता ही वेस गावाच्या मध्यात आली आहे पण अजूनही ती जुनी खूण दाखवणारं वेशीचे भक्कम प्रवेशदार तेथे दिमाखात उभे आहे.
अजून एक महत्त्वाची इमारत म्हणजे मेसटुर्म! शेंड्याशी पेन्सिलीसारखी निमुळती होत गेलेली ही इमारत युरोपातली सर्वात उंच इमारत होती आता तिची जागा कॉमर्सबँकेच्या टॉवरने घेतली आहे.
नेपोलियनच्या काळात फ्रांकफुर्ट अनेकदा फ्रेंचांनी काबीज केले, त्यांचे सैन्य जेथवर आले तो आल्टनिडचा ब्रिज आणि नेपोलियन जेथे २ रात्री राहिला तो बोलंगारो पलास्ट म्हणजे आताची इथली मामलेदार कचेरी दाखवली.
फ्रांकफुर्टातल्या अजून कितीतरी गोष्टी दाखवायच्या राहिल्या होत्या पण पावसाचा इतका जोर होता की आता घरी परतणे आवश्यक झाले.
जर्मनीत यायच्या व्हिसाला "शेंगनव्हिसा" असे नांव नसून "राकलेट व्हिसा" असे
नाव आहे असे नंदनला प्रामाणिकपणे वाटते , त्यामुळे संध्याकाळी राकलेटचा
बेत अपरिहार्यच होता.
आमची त्सेंटा आजी आणि अकिम आजोबा ह्यांना आमच्याकडे आलेल्या सर्वांची मूँहदिखाई झालीच पाहिजे असा अलिखित नियम असल्याने अदितीलाही संध्याकाळी त्यांच्याकडे घेऊन गेले.(अपवाद केसु, केसु इथे १.५ वर्ष असले तरी त्यांची आणि फ्लेमिंग कुटुंबाची भेट मात्र ह्या ना त्या कारणाने राहिलीच!) मार्सेला, आजीची मोठी बहिणही तेथे आलेली असल्याने त्यांच्याकडे बर्याच गप्पा रंगल्या.
रोमांटिशं स्ट्रासंचा उल्लेख केल्यावर लगेचच आजी चित्कारली.. तिचे जन्मगाव वालरष्टाइन हे सुध्दा रोमँटिक रस्त्यावर आहे, तेथे अजून त्यांचे ३/४ शतकांपूर्वीचे जुने घर आहे. आजीची मधली बहिण हेडी बॉबफिंगन येथे म्हणजे रोमँटिक रस्त्यावरच राहते. तिने आणि मार्सेलानेही दोन्ही ठिकाणी आम्ही जावे असा आग्रह तर धरलाच पण हेडीला फोन करुन आम्ही तेथे जाणार असल्याचेही कळवले. हेडीलाही आम्ही भेटणार याचा खूप आनंद झालेला जाणवला. झाले,रोमँटिक रोडवरच्या ह्या दोन गावांना भेट देणे तर आता आणखीच आवश्यक झाले. त्या गावांच्या रोमँटिकपणापेक्षाही वेगळ्या नात्याच्या,मैत्रीच्या बंधांनी त्यात गुरफटलो होतो.
हा बव्हेरियातला रोमांटिशं स्ट्रासं आपले नाव सार्थ करत वारुणीद्राक्षांच्या शेतातून,माइनच्या काठाकाठाने वुर्झबुर्ग पासून सुरू होऊन पार फुसनपर्यंत आल्प्सच्या पायात लुडबुड करत जातो. जवळजवळ ३६६ किमीचा हा पट्टा मध्ययुगात महत्त्वाचा व्यापाराचा रस्ता म्हणून प्रचलित होता. दोन दिवसाच्या मर्यादेत फुसनपर्यंत जाऊन भोज्जाला शिवून येण्यापेक्षा आम्ही आजीच्या वालरष्टाइनच्या शेजारच्या नॉर्डलिंगन पर्यंत जायचे ठरवले. नाजूक वळणे घेत जाणारा, आपल्या दोबाजूला द्राक्षवारुणींचे मळे आणि लालचुटुक कौलांची टुमदार घरे लेवून पिवळ्यालाल फुलांनी मढवलेले हिरवे मखमाली गालिचे अंथरुन अगत्य दाखवणार्या ह्या रोमांटिशं स्ट्रासंवरुन जाताना ऑटोबानने गाडी हाकण्याचा अरसिकपणा न करता बुंडेसस्ट्रासंने म्हणजे कंट्रीरोडने त्या रस्त्यावरचं सौंदर्य डोळ्यात आणि बापड्या कॅमेर्यात बंद करण्याचा प्रयत्न करत आमचा प्रवास चालू झाला. त्या रस्त्यांवरुन राहुलच्या आवाजातली कबिरवाणी वेगळीच शब्दातीत अनुभूती देऊन गेली. श्रामोंना त्याबद्दल भाराभर धन्यवाद देत आमच्या गप्पांची गाडी आपसूकच मिपावर वळली.
एकदा कॉफीब्रेक घेऊन, गाडीत पेट्रोल आणि पोटात सँडविचे टाकून पुढच्या रोमँटिक वळणांवर गेलो. त्या परिकथेतच शोभाव्या अशा रस्त्यावरुन आम्ही हेडीच्या बॉबफिंगनला पोहोचलो तेव्हा दुपारचा एक वाजून गेला होता. त्या चिमुकल्या गावात हेडीचे घर शोधायला आम्हाला फार वेळ लागला नाही. एका डौलदार वळणावर हेडीची बंगली आहे. दारातच हेडीची मुलगी, छोटी मार्सेला आमची वाट पाहत प्रसन्नपणे उभी होतीच. ही छोटी मार्सेला म्हटलं तरी लहान मुलगी नव्हे तर पन्नाशीची प्रौढा असेल. हेडी आणि त्सेंटाची मोठी बहिण मार्सेला हिच्या सन्मानार्थ हेडीच्या मोठ्या मुलीचे नाव मार्सेलाच ठेवले.आता एका घरात दोन दोन मार्सेला झाल्या ना.. मग ती मोठी मार्सेला आणि ही छोटी मार्सेला! हेडी, मार्सेला (ज्यु.) आणि आमची भेट बर्याच दिवसांनी होत होती. खूप दिवसांनी आपली आवडती मावशी/काकू/मामी भेटली की कसा आनंदाला आणि गप्पांना बहर येतो? तसेच झाले आमचे.. एकमेकांची ख्यालीखुशाली विचारुन झाली ,आईच्या मागच्या जर्मनीभेटीत हेडीचीही त्सेंटाच्या घरी गाठ पडली होती अशा अगदी घरगुती आठवणीही झाल्या. आई आणि तिच्या गप्पा एकमेकींना भाषांतरित करत तिची अदितीशी ओळख करुन दिली. तीही आमच्याबरोबर असल्याची खबर त्सेंटाने केव्हाच फोनवरुन दिली होतीच म्हणा!
हेडीच्या घरी ताजे, नरम ब्रेत्सेल म्हणजे मीठाचे स्फटिक लावलेले, बदामाच्या आकाराचे पाव आणि वाफाळती कॉफी आमची वाट पाहत होती. गप्पा मारता मारता तिचा समाचार घेऊन झाल्यावर हेडीचे ते चित्रातल्या सारखे दिसणारे घर पाहिले. घर कसले लहानसा व्हिलाच आहे तो! वरच्या मजल्यावरच्या मोठ्या मार्सेलाच्या बिर्हाडापासून तळमजल्यावरच्या पाहुण्यांच्या खोल्या एवढेच नव्हे तर विंटरमध्ये हिटरसाठी आवश्यक असा ६००० लिटर कपॅसिटीचा ऑइलटँकही पाहून झाला. दोन्ही मार्सेलांच्या लहानपणीचे निवडक फोटोही पाहिले. ज्या झाडाची बादली,बादलीभरुन रसाळ,मीठी सफरचंदे नेहमी खातो ते झाड पाहिले आणि तिचे किचनगार्डनही पाहिले. पावसाची रिपरिप सततच चालू होती सक्काळपासूनच, म्हणून हेडी आणि तिच्याहीपेक्षा जास्त मार्सेला हिरमुसली होती कारण तिचा बेत अंगणात ग्रील करण्याचा होता. दिवाणखान्यातल्या एक टेबलावर आम्ही तिला वेळोवेळी दिलेल्या भेटी (म्हणजे आपले लाखेचे काचकाम केलेला करंडा, हत्ती,लाकडी कोस्टर्स असंच काहीबाही..) मांडून ठेवलेल्या आवर्जून आणि अगदी कौतुकाने दाखवल्या. त्या कौतुकाने आम्हाला जरा अवघडल्यासारखेच झाले पण ते अगदी आतून, मनापासूनचे होते वरवरचे,बेगडी नव्हते हे जाणवत होते.
हेडीचे सासर आणि माहेरच्या गावात अगदी ९/१० किमी च अंतर असेल,नसेल.पण माहेरच्या घरी निघालेली ८२ वर्षाची हेडी मोहरली होती, भावूक झाली होती. आम्हाला तिकडे लवकर चलायची घाई करु लागली होती. मार्सेलाच्या गाडीमागे आमची गाडी धावू लागली. त्या चिमुकल्या पण सुसज्ज गावातली एकुलती एक शाळा, मार्केटाची जागा, प्रोटेस्टंटी सुबक चर्च असे दाखवत तिने गावात एक फेरफटका करवला आणि वालरष्टाइनच्या दिशेने आमच्या गाड्या धावू लागल्या. गेटाचे कुलूप काढताना मायेने आपला हात तिथल्या कडीकोयंड्यावर फिरवत म्हणाली, किती दिवसांनी येते आहे, हल्ली जमत नाही पूर्वीसारखं वारंवार इथे येणं. रीटा, तिची दुसरी मुलगी तेथे आठवड्यातून दोनदा कॉस्मेटिक क्लिनिक चालवते आणि घर उघडलं जातं, वावरलं जातं.
इथे आत्ता क्लिनिकची मशिनं आहेत ना ती आमची बसाउठायची खोली होती आणि वेटींग रुम आहे ना ती आईबाबांची खोली. हेडी केव्हाच त्या जुन्या घरात आणि काळात पोहोचली होती. स्वैपाकघर अजूनही तेच आहे. रिटा कॉफी बिफी करते ना इथे. ह्याच चुलीवर तेव्हा १० माणसांचा स्वैपाक घरात रोज होत असे आणि आता... ती जर्मनमध्ये "कालाय तस्मै नम:" असे उसासली आणि जिना चढू लागली. ही पाहुण्यांची खोली. आणि ती शेजारची खोली मार्सेलाची. ही मोठी खोली मी आणि त्सेंटाची. इथे मी झोपायचे आणि त्या बेडवर त्सेंटा, आतल्या खोलीत फॅनी आणि ही आमची कपाटं..ही टेबलक्लॉथची लेस माझ्या आत्याआजीने विणलीय बरं का..एकेक कपाट उघडत हेडी जणू काळाचा एकेक पापुद्राच उलगडत होती. आमचा आवाजाचा गलका वाढला ना की आई वर यायची ,तिची चाहूल लागली की मग आम्ही पांघरुणात गुडुप व्हायचो. चष्म्याआडून निळे डोळे मिस्किलपणे लुकलुकू लागले, सुरकुत्या गायब झाल्या आणि फ्रॉकातली हेडी, त्सेंटा तिथे दिसायल्या लागल्या.
तेथे असलेल्या वस्तूवस्तूंमधून आठवणींचा खजिना डोकावत होता. मागच्या अंगणातला प्रशस्त गोठा आणि त्यापलिकडे असलेले प्रचंड शिवार पाहताना हेडी परत एकदा बालपणात हरवली. वालरष्टाईनमधले आमचे हे सर्वात जुने घर, माझ्या खापरपणजोबांनी बांधलेले.. गावात बराच मान होता आमच्या घराण्याला.. आता नुसत्या आठवणी राहिल्यात..पण गल्लीत अजूनही आमच्या वेळचे काही लोकं आहेत हो, ते ओळखतात,विचारपूस करतात. क्वचित कोणी जुनी मैत्रिणही भेटते,बरं वाटतं. देश,भाषा,धर्म,पंथ सगळ्याच्या पलिकडंचं सार्वत्रिक सत्य बोलत होतं.
डोनाव-रिसमधील ऐतिहासिक महत्त्वाच्या त्या टुमदार वालरष्टाइनची सैर करायला मग आम्ही त्या दोघींबरोबर बाहेर पडलो. गावच्या मुख्य रस्त्यावरचे चर्च आणि क्रोनोग्राम पाहिला. गावातले सर्वात जुने उपाहारगृह,बेकरी,खाटीक शॉप पाहताना त्याला जोडलेल्या जुन्या आठवणी ऐकल्या.
त्या परिकथेतल्या गावातून दुसर्या तशाच गावाकडे आमच्या गाड्या धावू लागल्या. नॉर्डलिंगनच्या आमच्या हॉटेलाच्या दारात सोडून ,आमचा निरोप घेऊन हेडी आणि ज्यु. मार्सेला बॉबफिंगनकडे निघाल्या.
बर्यापैकी पाऊस आणि वारा असल्यामुळे बाहेरून फोटो काढणं जीवावर आलं होतं. शिवाय बाहेरून पहाताना हे घर एवढं मोठं असेल असं वाटलंच नाही.
ही ८२ वर्षांची बाई एकटी त्या तिमजली घरात रहाते याचं कौतुक अजूनही ओसरलं नाही आहे; आणि नुसतीच रहाते असं नाही, सगळं कसं टापटीप, स्वच्छ आणि कलात्मकतेने मांडलेलं!
स्वातीताई, शेवटी तुला भाषांतर करावं लागलंच हां, तुम्ही काय बोलत होतात याचं! ;-)
हाही भाग मस्तच झाला आहे, पुन्हा एकदा फिरून आल्याचा आनंद झाला.
खालच्या फोटोत त्या जुन्या (वालरष्टाईनच्या) घरातली एक बेडरूम. मला जुनं
फर्निचर, जुना टीव्ही, सगळंच जाम आवडलं आणि त्यातही "चोरून" फोटो काढताना
आरशात बरोब्बर हेडी आज्जी सापडली.
कोण कुठल्या हेडी, मार्त्सेला, त्सेंटा आणि त्यांच्यासाठी कोण कुठली अदिती! पण मैत्रीला जात, धर्म, भाषा, वय आड येत नाहीत हेच खरं! स्वातीताई, त्सेंटा आजी आणि तिच्या बहीणींमुळे एकदम जुनं, सुंदरसा लाकडी वास असणारं घर आतून बघायला मिळालं.
नॉर्डलिंगनच्या वर्णनाची वाट पहाते आहे.
ह्याआधी-
पुन्हा एकदा भ्रमणगाथा-१
पुन्हा एकदा भ्रमणगाथा-२
नॉर्डलिंगनला आम्ही पोहोचलो तेव्हा पाऊस आणि वार्याचा जोर इतका वाढला आणि त्याच बरोबर हवेतला गारवाही! त्यामुळे आधी गरमागरम कॉफी प्यायलो. आम्ही ज्या गेस्टहाउसमध्ये उतरलो होतो ते रेल्वेस्टेशनाच्या अगदी १०० पावलांवरच होते, तरीही अजिबात गजबजाट नव्हता. आपल्या कोकणरेल्वेच्या लाईनीवरची लहानलहान स्टेशने कशी असतात? तसेच हे रेलस्टेशन होते.किंबहुना मार्सेलाने आम्हाला तेथे सोडताना स्टेशन दाखवले म्हणूनच तेथे रेल्वेस्टेशन आहे हे समजले. अशा ह्या निर्जन वाटणार्या गावात जेवणासाठी टेबलबुकिंगची गरज आम्हाला वाटली नसली तरी तिथल्या म्यानेजरणीला वाटली. तेवढी तरी गिर्हाइके नक्की करत असेल असे वाटून आणि एवढ्याशा गावात अजून काही हाटेल असेल का? अशी शंका येऊन आम्ही रात्रीच्या जेवणासाठी तेथेच टेबलही बुक केले. बायरिश खासियत "केझं स्पेट्झलं " तेथे मिळते ना एवढी खात्री मात्र करून घेतली. तिने दिलेल्या खोल्यात आमची सामानाची बोचकी टाकून फ्रेश होऊन गावात एखादी चक्कर मारावी असे ठरवत होतो पण पाऊस आणि वारा काही थांबायचे नाव घेत नव्हते.
शेवटी रोममध्ये रोमनासारखे वागावे ह्या धर्तीवर आम्ही बव्हेरियात बायरीशांसारखे वागायचे ठरवून खाली असलेल्या दालनात जेवण्यासाठी गेलो. तासादोनतासापूर्वी सामसूम असलेले ते रेस्तराँ आता माणसांनी फुलून गेले होते. एका टेबलावर काही टुणटुणीत आजोबा बियरचे मास घेऊन पत्त्यांचा डाव टाकत बसले होते. कुठल्या टेबलावर युगुलांचे गुटरगू चालले होते तर काही जण सहकुटुंब जेवायला आलेले होते. ते अवघे १०/१२ टेबलांचे दालन एकदम गजबजून गेले होते. आमच्या साठी आरक्षित टेबल होते म्हणून बरे नाहीतर परत खोलीत जाऊन काही वेळाने परत यायला लागले असते. रक्तवारुणी, बायरिश बियरच्या साक्षीने येथली खासियत केझं स्पेट्झलं,सलाड, चीजबरोबर बेक केलेल्या भाज्या आणि त्याबरोबर जर्मन जेवणात हवेतच असे बटाटे! असा बेत होता. भरपूर हादडल्यावर मात्र शतपावली नव्हे तर सहस्त्रपावलीची गरज भासू लागली. एव्हाना पाऊस थांबला होता आणि आठ वाजून गेले असले तरी उजेडही भरपूर होता म्हणून मग एक फेरफटका मारायला बाहेर पडलो.
१४व्या शतकात बांधलेल्या भरभक्कम दगडी भिंतीची वेस अजूनही ह्या गावाला आहे आणि त्या भिंतीच्या टेहळणी बुरुजांवरुन चालत गावाला प्रदक्षिणाही घालता येते.ह्या बुरुजांवर आणि गावातही जाण्यासाठी चार ते पाच मुख्य बुलंद दरवाजे आहेत. आता जरी लाकडी दरवाजे काढले असले तरी दगडी कमानी मात्र तशाच ठेवलेल्या आहेत. आमच्या हॉटेलापासून अगदी दोनच मिनिटाच्या अंतरावर डाइनिंगर टोअर म्हणजे डाइनिंगर दरवाजा होता. तेथे गेलो तर मोठ्ठा लाकडी जिना दिसला. चढून वर गेलो तर बुरुजावरच पोहोचलो की. त्या भक्कम ,दगडी बांधकामावरुन खालचे गाव पाहत चालत होतो. सूर्यास्ताची वेळ होतच आली होती. तो नेमका क्षण कॅमेर्यात पकडण्याचा प्रयत्न केला आणि मग मात्र त्या अंधार्या वेशीवरुन न चालता लॉपसिंगर दरवाज्याशी खाली उतरलो आणि मग रस्त्यावरुन फेरफटका मारत हाटेलावर परतलो तेव्हा १० वाजून गेले होते. खोलीवर आल्यावर परत एकदा गप्पांचा फड रंगला.
आज जी डोनाव रिस मधील नॉर्डलिंगन आणि आसपासची गावे आहेत त्या भागात सुमारे १.५ कोटी वर्षांपूर्वी साधारण एक किमी व्यासाचा अशनी ७०,००० किमी /तास वेगाने येऊन आदळला आणि तेथे उत्पात झाला. २.५ लाख हिरोशिमा बाँब एकत्र पडल्यावर होईल तसा विध्वंस तेथे झाला आणि १२ किमी व्यासाचा,एखादे मोठे सरोवर होईल एवढा मोठा खड्डा तेथे पडला. त्यावेळी निर्माण झालेल्या प्रचंड उर्जेने तेथल्या दगडधोंड्यांच्या ठिकर्या ठिकर्या तर झाल्याच पण कितीतरी मण दगडधोंडे वितळले आणि तो रस परत त्या खड्ड्यात भरला गेला आणि ते दगडांचे लहानसान तुकडेही परत त्या खड्ड्यात जाऊन बसले. खड्ड्याचा व्यास आता २५ किमी पर्यंत वाढला होता. त्या प्रचंड दाबाने ते वितळलेले, चुरा झालेले ,तुकडे ठिकर्या झालेले दगड एकमेकांवर घट्ट बसले आणि सुवेत नावाचा दगडाचा नवाच प्रकार तयार झाला. ह्या उत्पाताने आजूबाजूच्या साधारण १०० किमी च्या परिसरातली परिसंस्था नष्ट झाली आणि त्या खड्डयामध्ये एक सरोवर तयार झाले. काठाला वनस्पती उगवल्या,पाण्याजवळ प्राणीही आले.साधारण २ कोटी वर्षांमध्ये गाळ,चिकणमाती,वाळू इ.ने ते तळे भरुन आले अन्यथा युरोपातल्या मोठ्या सरोवरांपैकी ते एक झाले असते. हळूहळू तेथे झाडे वाढली, प्राणीजीवन सुरू झाले आणि जीवसृष्टीच्या सॄजनाची सुरूवात झाली.
हा सारा इतिहास तेथल्या बाल्डींगर दरवाज्याजवळ असलेल्या रिसक्रेटर म्युझियममध्ये जपून ठेवलेला आहे. तो पहायला अर्थातच आम्ही तेथे गेलो. इंग्रजी आणि जर्मन अशा दोन्ही भाषांत आलटून पालटून ह्या अशनीपाताची चित्रफित दाखवतात. तेथील संग्रहालयात वेगवेगळ्या प्रकारचे खडक,वेगवेगळ्या दाब आणि तपमानामुळे कसे तयार झाले हे सचित्र समजावले आहे आणि त्या, त्या प्रकारच्या खडकांचे नमुनेही ठेवले आहेत.त्या उत्त्पातात नष्ट झालेल्या प्राणीजीवनाचे पुरावे फॉसिल्सच्या रुपात तेथल्या म्युझियममध्ये जतन करुन ठेवले आहेत. प्रो. ए. एम. शूमाकर आणि डॉ. इ. सी. टी. चॉव यांच्या अथक संशोधनातून रिसचा हा भूभाग अशनीपातातून तयार झालेला आहे हे सिध्द झाले. त्यांच्या स्मरणार्थ आणि सन्मानार्थ त्यांचे नाव ह्या चौकाला दिलेले दिसले.हे गाव म्हणजे भूगर्भशास्त्रज्ञांना अभ्यासाच्या दृष्टीने अगदी खजिनाच असावा असे वाटले.
येथले अजून महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे १९७० मध्ये नासाच्या अपोलो १४ आणि १७ मधील अंतराळवीर येथे फिल्ड ट्रेनिंग आणि चंद्रावरील जिऑलॉजिकल अभ्यासासाठीच्या पूर्वतयारीसाठी आले होते. त्यांनी येथल्या म्युझियमला औचित्यपूर्ण अशी भेट म्हणून 'चंद्रावरचा दगड' दिला आहे. तो पाहण्याची अर्थातच आम्हाला उत्सुकता होतीच! आमचे येथे येण्यामागचे ते ही एक महत्त्वाचे कारण होते.डोळे भरुन किती वेळ ते अद्भुत पाहत होतो पण शेवटी वेळेची मर्यादा होतीच ना.. नाइलाजाने त्या एरवी चित्रातच दिसणार्या,परिकथेत शोभणार्या गावातून घराकडे यायला निघालो.
अदितीला भारतात जाणार्या विमानात बसवून भ्रमणमंडळ काही काळ विश्रांती अवस्थेत गेलेले असले तरी पुढच्या ब्याचची नोंदणी चालू केलेली आहे,तेव्हा त्वरित संपर्क साधा.
र्हाइनच्या दोन्ही काठावर वसलेली युरोपातली एक महत्त्वाची नगरी म्हणजे
क्योल्न! क्योल्न.. लॅटिनमधील कलोनिया म्हणजे कॉलोनी ह्या शब्दापासून आलेलं
नांव क्योल्न! (कदाचित जिभेला जास्त व्यायाम नको म्हणून्)इंग्रज साहेबाने
त्याचे कलोन असे बारसे केले. जर्मनीचे सांस्कृतिक,व्यापारी आणि दळणवळण
केंद्र म्हणून अगदी सुरुवातीपासूनच सक्रिय असलेली ही महत्त्वाची नगरी!रोमन
कालातही हिचं स्थान अग्रणी होतं. जर्मनीतली सर्वात जुनी युनिवर्सिटी
क्योल्नचीच आणि जगप्रसिध्द एव्ह द कलोनचा जन्म इथेच झाला.इथली भाषा क्योल्श
आणि इथली प्रसिध्द बिअरही क्योल्श!
फ्रांकफुर्ट ते क्योल्न हे अंतर १९१ किमी.गाडीने दोन तासात हे अंतर सहज पार
होते पण आयसीइ ने म्हणजे जलद रेल्वेने मात्र तासाभरातच आपण कलोनला
पोहोचतो. तासभर वाचण्यापेक्षाही रेल्वेने जाण्याचे आपुलकीचे कारण म्हणजे
आमचे आकिम आजोबा!ह्या जलद रेलट्रॅकच्या बांधणीच्या टिममधले आमचे आकिम आजोबा
हे एक इंजिनिअर आहेत. रेल्वेने किवा रस्त्याने क्योल्नच्या दिशेने प्रवास
करत असतानाच आकाशाच्या पोटात घुसू पाहणारे दोन उंचच उंच कळस आपण जवळ
आल्याची वर्दी देतातच. हेच ते सुप्रसिध्द क्योल्नर डोम अर्थात कलोन
कॅथीड्रल!कलोनच्या आर्चबिशपची ही गादी! ह्या कॅथिड्रलच्या आवारात, अगदी
अंगणातच रेल्वे स्टेशन आहे असं म्हणता येईल.
अतिशय भव्य असं हे कॅथिड्रल बांधणं कित्येक शतकं चाललं होतं.इस.१२७८
मध्ये सुरू झालेलं बांधकाम साधारण १४७३ च्या सुमाराला थांबलं. लोकांचा ह्या
डोममधला रस आणि पेशन्स संपत चालला होता. ते तसंच अर्धवट कित्येक वर्षे
राहिलं आणि १९ व्या शतकाच्या सुरुवातीला परत काम सुरू झालं आणि शेवटी १८८०
मध्ये मूळ नकाशानुसारच पूर्णत्वाला नेलं आणि लवकरच युरोपातलं एक मोठ्ठं आणि
महत्त्वाचं स्थान त्याला मिळालं. स्पेनमधील सिव्हेले आणि इटालीतील मिलान
येथील कॅथिड्रल नंतर भव्यपणात ह्याचाच नंबर लागतो. ह्या डोमच्या चारही
बाजूनी दगडी पायर्यांवरुन चढून मुख्य द्वारापर्यंत पोहोचता येते. आत
प्रवेश करायच्या आधीच नजरेत भरते ते समोरचे भव्य प्रांगण आणि मुख्य भव्य
द्वाराबाहेरची आणि द्वारावरची कलाकुसर आणि ठिकठिकाणी असलेले
पुतळे!प्रवेशदारावर थोडे उंचावर असलेले अनेक ऑपोस्टल्सचे पुतळे जणू
आपल्याला आशीर्वच देण्यासाठीच आहेत असे वाटते.आत शिरले की जाणवते ती भव्य
शांतता! हो, तेथल्या भव्यतेसारखीच तिथली शांततही भव्य वाटते. इतकी
चच्र्,कथीड्रलं पाहिली.. पण अशी भव्य शांतता क्वचित कुठे आढळली. अगदी
व्हॅटिकन,रोम आणि अगदी पॅरिसमधल्या नॉट्रादॅममध्येही मला असा फिल आला नाही.
आत शिरताच दिसते ती एकेका कोपर्यातली मेणबत्त्यांची आरास. चहूबाजूच्या
कोपर्यांतून एकेक संताचा किवा मेरीमातेचा पुतळा आणि त्याच्यासमोर भक्तांनी
गार्हाणी घालण्यासाठी, अर्चने,प्रार्थनेसाठी केलेली मेणबत्त्यांची आरास
त्या भव्य शांतपणात भर घालत असते. सगळीकडे काचेची तावदाने आणि त्यातील
काचांवर बायबल आणि ग्रीक पुराणातले चित्रित केलेले प्रसंग दिसतात.
सूर्यप्रकाश त्या रंगीत काचातून गाळून आत येतो आणि काचा प्रकाशमान होतानाच
काचांवरची चित्रे सजीव झाल्यासारखी भासतात. ह्या डोममध्येच तीन राजांचे
अवशेष जपणारे चांदी सोने आणि तांब्यावरती कलाकुसर केलेले निकोलस ऑफ वेर्दुन
ह्या फ्रेंच सोनाराने बनवलेले श्राइन आहे.ह्या श्राइनवर अपोस्टल्स आणि
ख्रिस्तपुराणातले अनेक प्रसंग कोरले आहेत. तेथे असलेला ओकच्या लाकडातला
कोरलेला ख्रिस्ताचा पुतळा, गेरो द ग्रेट ह्या कलोनचा अर्चबिशपला मानाचा
मुजरा म्हणून गेरो क्रॉस नावाने ओळखला जातो.
ह्याच डोमच्या कळसावर जाण्यासाठी ५०० च्या वर ,अगदी नेमकंच सांगायचं तर ५०९ दगडी पायर्या आहेत. त्या चढून वर गेले की कलोन शहराचे विहंगम विलोभनीय दृश्य पाहताना सारा थकवा दूर होतो.
कथीड्रल मधून बाहेरच्या प्रांगणात आलं की समोरच कलोन दर्शनाच्या
वेगवेगळ्या गाड्यांचा बोर्ड दिसतो. हॉप ऑन हॉप ऑफ बस ,किवा आपल्या
फुलराणीसारख्या शोकोलाडं एक्सप्रेस म्हणजे चॉकलेट एक्सप्रेस किवा झू
एक्सप्रेस हवे ते तिकिट काढून घेऊन कलोनचा फेरफटका मारता येतो किवा सरळ
हातात कलोनचा नकाशा घेऊन भटकता येतं. कलोनचे रस्ते अगदी आखीव रेखीव आहेत
आणि डोमचे कळस तर कुठूनही दिसतातच, त्यामुळे चुकायची भीती नाहीच. पण हाताशी
वेळ कमी असेल तर मात्र बस किवा फुलराणी घेणे सोयीचे होते. क्योल्नर डोम
व्यतिरिक्त सेंट मार्टिन चर्च, होली ट्रिनिटी चर्च, संत सेव्हरिनची
बॅसिलिका अशी महत्त्वाची धार्मिक स्थळं आहेत पण ह्या सर्वात वलयांकित आहे
ते क्योल्नर डोमच!
पुरातन कलोनला मजबूत वेस होती आणि तिला १२ प्रवेशदरवाजे होते. आजही
त्यातले तीन सुस्थितीत आहेत. १२व्या शतकातला टाऊन हॉल हा आजही वापरात
असलेला कलोनचा टाऊन हॉल हा जर्मनीतलासगळ्यात जुना टाऊन हॉल आहे. कलोनमध्ये
३० च्या वर संग्रहालये आहेत त्यातील सिटी म्युझिअम हे एक महत्त्वाचं
म्युझिअम!प्राचीन कलोनचे देखणे मॉडेल येथे ठेवले आहेच पण दुसर्या
महायुध्दानंतर ९५% बेचिराग झालेल्या कलोनचं चित्रंही येथे दिसते आणि नकळत
आपणही इतिहासाचे पान पालटत मागे जातो.
ह्या इतिहासातून आपल्याला वर्तमानात आणते ते चॉकलेट म्युझिअम! येथे जाताना
चॉकलेट एक्सप्रेसने किवा कथीड्रलच्या मागच्या बाजूने नदीकाठावर उतरुन सरळ
सरळ चालत जायचं. अगदी नदीतच काचेचा जास्त वापर करुन एखाद्या जहाजाच्या
आकाराचे हे म्युझिअम बांधले आहे.देवाचे पेय असलेल्या चॉकलेटच्या उगमापासून
ते पार आजच्या आधुनिक पध्दतींपर्यंतचा सारा इतिहास येथे आपल्याला पहायला
मिळतो. चॉकलेटे बनावायचे पूर्वीचे साचे आणि आताची यंत्रेही तेथे आहेत. कोको
दळण्यापासून ते चॉकलेट तयार होईपर्यंतची सारी यंत्रे कशी काम करतात हे
चित्ररुपाने, मॉडेल्स रुपानदापहायला ठेवले आहे. कोको, कॉफी, व्हॅनिलाची
झाडे तेथे हरितगृहात वाढवली आहेत.कोकोच्या बियांपासून ते पार चॉकलेटची वडी
होईपर्यंतचा प्रवास पाहताना अगदी आरे मिल्क कॉलनीतली शाळेची ट्रीप आठवतेच.
चॉकलेटच्या मोठ्ठ्या कारंज्यासमोर वॅफेलवर ओतून दिलेले चॉकलेट सॉस खाताना
सगळे आपली वयं विसरतात. खिसे हलके आणि पिशव्या जड करुन तेथून निघायचे. अगदी
नाकासमोर सरळ चालत गेले की कलोनचे कॅथिड्र्ल दिसते. नदीच्या पाण्यात पाय
बुडवून ध्यान लावून बसलेल्या साधूसारखं..
कॅथेड्रल पासून १० एक मिनिटाच्या अंतरावर ग्लोकनगासं ४ ह्या रस्त्यावर
एव्ह द कलोनचे मुख्यालय आहे. हेच ते सुप्रसिध्द ४७११ हाउस. इथेच कलोनवॉटरने
पहिले ट्यां केले.. आणि त्याचा सगळा इतिहास त्या घरात अगदी निगुतीने जपला
आहे. १८ व्या शतकात योहान मारिया फारिना ह्या कलोन मध्ये राहणार्या,मूळ
इटालियन असणार्या गंधवेड्याने हा सुगंध तयार केला आणि त्याला नाव दिले
एव्ह द कलोन म्हणजेच कलोनचे पाणी!
त्या काळात एलिट सोसायटीत फ्रेंच जास्त बोलले जात असे त्यामुळे फारिनाने
आपल्या ह्या सुगंधी निर्मितीचे नाव फ्रेंच ठेवले असावे.क्योल्नवर थोडा
फ्रेंच प्रभाव आहेच आणि नेपोलियनच्या सैन्याने कलोन काबीज केले होते आणि
अनेक वर्षे ते फ्रेंचाच्या ताब्यात होते. ह्या क्योल्निश वासर म्हणजेच
कलोनच्या पाण्याने कलोन शहराची कीर्ति जगभर नेली.फरिना २५ नोव्हेंबर १७६६
मध्ये सुगंधात विलिन होऊन गेला पण आजही त्याची आठवी पिढी हे गंधाचं देणं
जगाला देत आहे. ह्या सुगंधाने मोहून गेली नाही अशी व्यक्ती विरळाच! ह्या
आधीचे पोप बेनेडिक्ट १४ ह्यांनी स्वत:साठी स्पेशल कस्ट्म मेड कलोनची खास
मागणी केली होती. त्या घराजवळ जात असतानाच तो परिचित सुगंध जाणवू लागतो. आत
शिरताच तो दरवळ मन प्रसन्न करतो. आत शिरताच एका तोटीतून सतत वाहत राहणारे
,सुगंधाची उधळण करणारे एव्ह द कलोन आहे.तेथील मांडण्यांमध्ये एव्ह द कलोनचे
वेगवेगळे प्रकार, स्प्रे,साबण, टिश्यू विक्रीसाठी सुबकपणे रचून ठेवले
आहेत.कोपर्यातला जिना चढून वर गेले की तेथल्या गॅलरीत एव्ह द कलोनला
वेळोवेळी मिळालेली पदके, बक्षिसे, मानपत्रे आहेतच पण वेगवेगळी जुन्यानव्या
काळातली चित्रे आहेत, जुन्या काळातल्या एव्ह द कलोनच्या कुप्या ,बाटल्या
कलात्मकरीत्या मांडून ठेवल्या आहेत.
सगळीकडे तो परिचित गंध दरवळलेला असतोच.तो गंध मनात मनसोक्त भरुन घेऊन मगच
तिथून बाहेर पडायचे आणि सार्या कलोनचाच दरवळ मनात ठेवून गाडीकडे कूच
करायचे.
(काही प्र.चित्रे जालावरून साभार)
छोटेसे टुमदार गाव आणि तिथले विद्यापीठ म्हणून म्युनस्टर प्रसिध्द आहेच. सायकलींचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्या म्युनस्टरच्या मुख्य स्टेशनात ३०००च्या वर सायकली पार्क करायची व्यवस्था आहे. हॉलंडची सीमा इथून जवळ असल्याचा बहुदा हा परिणाम असावा. साडेनऊच्या सुमाराला आमची टोळी लिखाळच्या दारात हजर! आमच्या पैकी काही जण प्रत्यक्ष प्रथमच भेटत असले तरी औपचारिकपणाची झूल पहिल्या पाचेक मिनिटातच गळून पडली आणि वाफाळत्या चहाबरोबर खिदळणं सुरू झालं , जोडीला बुटरमिल्शकुकन होतंच आणि 'मिसळपावची ताजी तेज तर्रीही'! एवढ्या घाऊक प्रमाणात मराठी भाषक आणि तेही मिपाकर एकत्र आल्यावर मनसोक्त गप्पा रंगल्या आणि त्यातूनच भ्रमणमंडळाची सुपीक कल्पना निघाली. सौ.लिखाळांनी केलेल्या मटकीची उसळ,पोळ्या,भात,टोमॅटोचं अप्रतिम सार आणि गुलाबजामना (पाकासकट) न्याय देत पुढचे बेत सुरू झाले.
लिखाळच्या घराच्या मागे मोठ्ठाली शेतं आहेत,दोबाजूला हिरवीगार सावली असलेली पायवाट आणि मध्येच दिसणारे एखादे 'खेड्यामधले घर कौलारू'! त्या पायवाटेने बसच्या थांब्यावर जायला निघालो. तिथल्या शांततेला छेद देत आमचं खिदळणं चालूच होतं पण एका क्षणी मात्र सगळ्यांनाच ती शांत हिरवाई हवीशी वाटली. वार्याच्या एखाद्या मंद झुळूकेने होणारी पानांची सळसळ सोडली तर कसलाच आवाज नव्हता.ती शांतता वाचत असतानाच बस आली.
आ-से म्हणजे आ सरोवरापाशी पोहोचलो. समोर हंसे कलकलाट केला.. असे दॄश्य!
अनेक काळ्याकरड्या पाणकोंबड्या,बदकांच्या घोळक्यात तो काळाभोर,लालबुंद
चोचीचा,गुंजेच्या डोळ्यांचा राजहंस शोभून दिसत होता. (आधी राजहंस त्याच्या
नावाप्रमाणेच रुबाबदार! त्यात काळा राजहंस पांढर्यापेक्षाही जास्त
रुबाबदार दिसतो असं टोकिओत जेव्हा अगदी पहिल्यांदा काळा राजहंस पाहिला
तेव्हाच मला वाटलं होतं त्याला आता इतरांकडूनही रुकार मिळाला.)त्या तळ्यात
दूरवर एक प्लास्टीकचा भलामोठा हंस डोलताना दिसला. लिखाळने त्याची कहाणी
सांगितली. ह्या खर्या राजहंसाची ती प्रेमिका आहे. जेव्हा तो प्लास्टिकचा
हंस सरोवरातून काढून टाकला तेव्हा या प्रेमवीराने खाणेपिणे सोडले आणि तो
झुरू लागला. ते पाहून परत तो प्लास्टीकचा हंस त्या तळ्यात सोडण्यात आला आणि
एका शुभ्र हंसिनीलाही आणले.तीच आता त्याची प्रेमिका झाली आहे. त्या
सार्या करड्या बदकांच्या कळपात ही राजबिंडी जोडी उठून दिसत होती. लगेचच
'कोचरेकरमास्तरांना' प्राणीमात्रांमध्ये वर्णभेद नसल्याची जाणीव झाली आणि
त्यांनी तशी आपल्या डायरीत नोंद केली. सरोवराभोवतालच्या हिरवळीत बसून
रहावं असा मोह फार होत होता पण ..त्या हिरवळीवरच्या भल्या थोरल्या
गोलकांखाली आमची छबी काढली आणि पुढे निघालो.
( डावीकडून : स्वाती,सौ. लिखाळ, दिनेश, केशवसुमार, विपिन आणि लिखाळ )
जसं आपल्या गोव्यातल्या कोणत्याही देवळापुढे तळं आणि दीपमाळ असतेच असते
तसं युरोपमधल्या कोणत्याही गावात चर्च,कथीड्रलच्या प्राचीन इमारती,त्यात
कोरलेली प्रस्तरचित्रे आणि काचांवरचे नक्षीकाम असतेच असते.पण तरीही
प्रत्येक ठिकाणचा वेगळेपणा,तिथल्या चर्चमधली शांतता अनुभवावीशी
वाटते.दुसर्या महायुध्दात संपूर्ण उद्ध्वस्थ झाल्यावर कोणाला त्या पडझडीची
शंकाही येऊ नये इतकं बेमालूम जोडकाम जवळजवळ सर्वच ठिकाणी केलं आहे,
कलोनच्या कथीड्रलमध्ये,म्युनशनच्या चर्चमध्ये आणि इथल्या सेंट पॉल
कथीड्रलमध्येही ! ह्या कथीड्रलचे अजून एक वैशिष्ठ्य म्हणजे इस. १४०८
पासूनचे आजही चालू असणारे 'ऍस्ट्रॉनॉमिकल क्लॉक'( खगोलशास्त्रीय
घड्याळ?).प्राचीन काळापासून जर्मन तंत्रज्ञान किती प्रगत होते ह्याची साक्ष
म्हणजे हे घड्याळ आहे.
कथीड्रलमधल्या काचांवरची रंगीत चित्रनक्षी प्रकाशात आणखीच उजळून
निघाली होती. ती मनसोक्त पाहून आणि फोटो काढून मुख्य चौकात गेलो.
पूर्वीच्या काळी जेव्हा दळणवळणाची फारशी साधने नव्हती तेव्हा पाठीवर सामान
लादून गावोगाव मालाची विक्री करत हिंडणारे वस्तूविक्ये असत.अशाच एका
वस्तूविक्याचा प्रातिनिधिक पुतळा पाहून राटहाऊसकडे निघालो.
राट हाऊस (टाउन हॉल) अर्थात आपल्या मामलेदार कचेरीसारखा कारभार जिथून
चालतो ती इमारत इथे प्रत्येक गावातच असते आणि जुन्या, प्राचीन,ऐतिहासिक
संदर्भ असलेल्या इमारतीत राट हाऊस वसलेले असते. फ्रांकफुर्ट मधले
'बोलोंगारो पलास्ट' म्हणजेच 'बोलोंगारो पॅलेस' मध्ये असलेले राट हाउस तिथे
नेपोलियन एक रात्र राहिला होता हे मिरवत असते. इथल्या राट हाऊसलाही
ऐतिहासिक संदर्भ आहेच.१४ व्या शतकातला हा भक्कम 'पीस ऑफ वेस्टफालिया' लक्ष
वेधून घेतो तिथे असलेल्या पोलादी हातामुळे आणि त्या हातातली तलवार सांगत
असते , कायद्याविरुध्द वागलात तर गाठ माझ्याशी आहे..
सेंट लांबार्ट चर्च च्या कळसाजवळचे तीन भलेमोठे पिंजरे कुतुहल तर वाढवतातच
पण त्या पिंजर्यांमागचे कारण समजले की थरकाप होतो.लायडनच्या जॉन ह्या डच
व्यक्तीने आणि त्याच्या सहकार्यांनी १६व्या शतकात तत्कालीन
धर्मसत्तेविरूध्द बंड केले त्याची शिक्षा म्हणून त्याला आणि सहकार्यांना
मारून पिंजर्यात ठेवले आणि ते पिंजरे लांबार्ट चर्चच्या वर
बांधले.त्यांच्या मृत शरीरांचीही विटंबना झाली. ती तिथेच तशीच सडली,कुजली.
पन्नासेक वर्षांनी त्या पिंजर्यातल्या अस्थी बाहेर काढल्या परंतु ते
पिंजरे मात्र आजही तिथेच लटकलेले आहेत. धर्म आणि सत्तेचा हा खेळ फार जुना
आणि सगळ्या जगभरच आहे हे पाहून मन सुन्न झाले. अजूनही त्यांच्या
पुण्यतिथीला तेथे मेणबत्त्या लावून अभिवादन केले जाते. कदाचित जर्मनीत
प्रोटेस्टंट पंथी जास्त असल्याचा हा परिणाम असावा.
म्युनस्टरच्या त्या दगडी रस्त्यांवरून हिंडताना वारंवार म्युनशनची (इंग्रज
साहेबाच्या भाषेत म्युनिक) आठवण येत होती.वास्तविक म्युनशन
दक्षिणेला,आल्प्सच्या कुशीत तर म्युनस्टर उत्तरेला! दक्षिण आणि उत्तर
जर्मनीतल्या गावांमधल्या घरांची,रस्त्यांची रचना, भौगिलिक परिस्थितीही खूपच
वेगळी असताना हे 'साम्य' वेगळे वाटले.तिथल्या गल्लीबोळातून थोडा वेळ
निरुद्देश भटकलो तरी कुतुहल काही नवे दाखवत होतेच. घड्याळाचा काटा पुढे
सरकताना डॉर्टमुंडला जाणार्या गाडीची आठवण करून देत होता. त्यामुळे
नाइलाजाने स्टेशनच्या दिशेने चालू लागलो.
गाडीत बसतानाच केसुंनी "रात्री पावभाजी मी करणार.." असे जाहीर केले आणि
विपिनच्या घरी पोहोचल्यावर आम्हाला दोघींना किचन मध्ये फिरकूही न देता
त्यांनी ए वन पावभाजी केली.
अशा मस्त पावभाजीनंतर चॉकलेट आईसक्रीम खात उद्या सकाळी सहाची बस आहे,लवकर उठायला हवं असं म्हणत म्हणत एक वाजेपर्यंत गप्पा चालूच होत्या..
(ब्रुसेल्स वृतांत- पुढील भागात.)
रात्रीचा एक वाजून गेला तरी गप्पा संपल्या नव्हत्या शेवटी एकमेकांना
दटावत सारे झोपायला गेले.सकाळी ६ वाजता बस निघणार होती त्यामुळे झोपलो न
झोपलो तोच उठायची वेळ झाली.सगळेच जण पटापट आवरून विपिनने केलेली मस्त
चहाकॉफी पिऊन ताजेतवाने झाले.बसस्थानकाशी पोहोचलो.आतमधले सारे जण शांत बसले
होते.त्या दुमजली बसच्या वरच्या मजल्यावर आम्ही पोहोचल्या पोहोचल्या
चहेलपहेल सुरू झाली.बस हसूबोलू लागली. एसनला आम्हाला बस बदलायची होती आणि
तिथेच इरफान,विपिनचा अजून एक मित्र वाट पाहत होता.तो ही उत्तम मराठी
बोलणारा असल्याने भाषेची भेळ करायची गरज नव्हती. इथे मात्र आम्हाला सीट नं
दिले. इरफानला एकट्याला वरच्या मजल्यावर जावे लागले तर आमच्या ४ सीट
समोरासमोर आणि २ शेजारच्या बाकावर आल्या होत्या.त्यासमोर एक जर्मन आजी
आजोबा होते.बस सुरू होण्याचा अवकाश, आमची तोंडं खाणे आणि बोलणे ह्या
दोन्हीसाठी अव्याहत सुरू झाली.विषय अर्थातच 'मिसळपावचे व्यसन' होता.
लिखाळची मिसळमयता सांगताना सायली म्हणाली, त्याला काही निरोप द्यायचा असेल
तर खरड तरी टाकावी लागते किवा व्य नि तरी करावा लागतो ; तरच त्याला समजते
नाहीतर तो लक्षच देत नाही.." हास्याचे मजलेच्या मजले त्या दुमजली बसवर चढू
लागले.
आमच्या समोरच्या आजीआजोबांना आमच्या दंग्याचा त्रास होईल असे वाटल्याने
हळूच त्यांच्याकडे पाहिले. तर त्यांच्या कपाळावर आठ्यांचे जाळे नसून
आमच्याबद्दलचे कौतुकच दिसले.आणि ते नुसतं आम्हालाच दिसलं नाही तर थोड्या
वेळाने आजीने बोलून दाखवले.तुम्ही सगळे ट्रीप अगदी एन्जॉय करता आहात. खूप
मजा करता आहात तुम्ही, तुमची भाषा समजत असती तर आम्हाला आणखी मजा आली
असती.आजीचे असे लायसन्स मिळाल्यावर तर आमच्या दंग्याला उत आला.तासदोन
तासाने मात्र सारेच पेंगुळले आणि चहाब्रेकसाठी गाडी थांबेपर्यंत छानशी
डुलकी झाली.
आता आजूबाजूला पाहिले तर फ्लेमिश,फ्रेंच आणि क्वचित डच पाट्या दिसू
लागल्या. जर्मनीतून बेल्जिअममध्ये प्रवेशलो हेच त्या पाट्या आम्हाला सांगत
होत्या.आता मात्र आम्हाला ड्रायव्हरबाबा गाडी फारच हळू चालवतो आहे असे
वाटायला लागले.कधी एकदा ब्रुसेल्सला पोहोचतो असे वाटायला लागले आणि ते तर
अजून बरेच लांब होते.मग मात्र सायलीने पत्ते बाहेर काढले.मूलाहूनही मूल
होऊन सारे 'उनो ' खेळलो.दुसर्याची पाने पाहणे,चिटिंग, ठरवून एखाद्याला
गाढव करणे .. पत्ते खेळताना आवश्यक अशा सगळ्या गोष्टी चालू होत्या.मात्र
उनोमुळे तो मधला कंटाळवाणा वेळ चांगला गेला.आमच्या समोरची आजी म्हणाली
सुध्दा," तुम्ही लोकं हसता तरी नाहीतर खाता तरी.. "एकदाचे ब्रुसेल्सला
पोहोचलो.
इयु आणि नाटोचे मुख्यालय असलेल्या ब्रुसेल्सला कामानिमित्त आणि
फिरण्यानिमित्त जायचा योग जरी २,३ दा आला होता तरी तो प्रसिध्द फुलांचा
गालिचा मात्र पाहता आला नव्हता.१९७१ मध्ये पहिल्यांदा ब्रुसेल्समध्ये हा
अतिभव्य फुलगालिचा इ स्टॅच्युमान्स ह्या आर्किटेक्टच्या कल्पनेनुसार
रेखला,त्यानंतर त्याला ब्रुगं,घेंट,अँटवेर्प,कलोन,लंडन,पॅरिस,लुक्झेंबुर्ग
इ. ठिकाणांहून असे गालिचे तयार करण्यासाठी आमंत्रणं आली.दुसरा असा गालिचा
चितारायला ७६ साल उजाडलं आणि ८६नंतर मात्र दर २ वर्षांनी १५ ऑगस्टच्या
सुमाराला ब्रुसेल्सच्या ग्रँडप्लेस मध्ये फुलांचा भव्य गालिचा तयार करू
लागले.साधारण चारेक दिवस हा गालिचा असतो. फुलांची ती भव्य रांगोळी पहायला
अवघा युरोप लोटतो.ह्यावेळी मात्र आमचाही गालिचायोग आला.ग्रँडप्लेसमध्ये
चारही बाजूनी प्राचीन राजवाड्याच्या इमारती आहेत आणि मध्ये आयताकृती फरसबंद
भव्य अंगण! एरवी त्या अंगणात चित्रकार आपली कलाकारी दाखवत आणि चित्रे विकत
बसलेले असतात पण ह्या फुलरांगोळीच्या आठवड्यात त्यांनाही त्यांची पाले
कोपर्यात हलवावी लागतात.त्या अंगणभर फुलांची ती अतिभव्य रंगीत कशिदाकारी
आणि ती पहायला जमलेली गर्दीही रंगीबेरंगी ! डोळे भरून तो गालिचा कितीवेळ
पाहिला,कॅमेर्यात बंद करून घेतला तरी समाधान होत नव्हते.
बेल्जिअमची काच,लेस आणि चॉकलेटे अगदी प्रसिध्द! नाजूक लेसची कलाकारी
,काचेच्या अनेकविध वस्तू आणि चॉकलेटांच्या राशीचे तिथे जणू प्रदर्शन
मांडलेले असते. छोट्यामोठ्या गल्लीबोळातल्या दुकानांपासून चकचकीत काचेच्या
भव्य दुकानांपर्यंत सगळीकडे बेल्जिअन काचेच्या वस्तू, लेसच्या
पर्सेस,झगे,अंगडीटोपडी आणि चॉकलेटे,प्रालिननचे (चॉकलेटचा एक अत्युत्कृष्ट
प्रकार)असंख्य प्रकार यांची नुसती रेलचेल असते.इंदौरला सराफ्यावर जशी
जिलब्यांची आणि मिठाईची दुकाने,ठेले आहेत ना तशी इथे चॉकलेटांची आणि
प्रालिननची दुकाने आहेत.त्यात आमच्या रोमेनचे प्रामाणिक मत आहे की स्वीस
चॉकलेट जगात कितीही प्रसिध्द असोत.. बेल्जिअन चॉकलेटला तोड नाही ! आता
स्वतः स्वीस असूनही तो असं बोलतो यातंच सारं काही आलं.तेव्हा मुद्दा असा की
तिथून चॉकलेटं न घेता बाहेर पडणं म्हणजे केवळ अशक्य! मग काय? घुसलो एका
दुकानात. त्या गर्दीत आम्ही तिथे गेलेलो इतरांना समजलेच नाही.शेवटी लिखाळ
आम्हाला शोधायला गेला आणि बाकीचे आमच्यावर वैतागले पण चॉकलेटचा बॉक्स
पाहिल्यावर साहजिकच राग पळून गेला.ब्रुसेल्समधला प्रसिध्द 'मानेकन पिस'
अर्थात 'मुत्तुकुमार'चा पुतळा पाहून आम्ही ऑटोमियमकडे जायचे ठरवले.
लोखंडाच्या रेणूची १६५बिलियन पट मोठी प्रतिकृती येथे तयार केली आहे.त्या नऊ
गोलांमध्ये आत शिरता येते आणि सर्वात वरच्या गोलावर चढून दोरीने खाली
येण्याचा डोंबारीखेळही तिथे चालू होता.त्या उंचीवरून दोराने खाली येण्याचे
आम्हाला आकर्षण वाटू लागले पण प्रत्यक्षात मात्र फक्त विपिननेच ते धाडस
केले.
तिथेच पलिकडे 'मिनी युरोप' वसवले आहे.युरोपातील सर्व प्रसिध्द
इमारती,वैशिष्ट्ये यांच्या प्रतिकृती तेथे तयार केल्या आहेत. (असेच
मदुरोडॅमला 'हॉलंड इन नटशेल' उभे केले आहे.)चिमुकला प्रतियुरोपच! बकिंगहॅम
पॅलेस शेजारी आयफेल टॉवर दिमाखात उभा आहे. शेजारी हॉलंडमधल्या पवनचक्क्या
आणि ऍमस्टरडॅममधले कालवे आहेत. ग्रँड प्लेसमधला फुलगालिचा तिथे वर्षभर
पहायला मिळतो. लंडनचे पार्लमेंट हाउस,बर्लिनमधले ब्रांडेनबुर्ग गेट,पिसाचा
झुकता मनोरा,रोमचे कलोझिअम,पाण्यावर तरंगणारी व्हेनिसनगरी.. सारे सारे काही
तिथे आहे. युरोपची मयसभाच आहे ती !
एव्हाना साडेपाच वाजून गेले होते.केसुंना तिथूनच पुढे लंडनला जायचे
असल्याने त्यांनी आमचा तिथेच निरोप घेतला आणि आम्ही परतीच्या गाडीकडे
निघालो.आमची सकाळचीच बस ऑटोमियमपाशी आम्हाला घ्यायला येणार होती.
त्याप्रमाणे थांब्यावर गेलो . बस आलीच लगेच आणि आम्ही आत चढलो. सकाळचेच
सगळे चेहरे आलेत की नाही हे ड्रायव्हरबाबा पाहत होता. आम्ही केसुला न घेता
आलोत असे वाटून आमच्या समोरच्या आजीने "तुमच्या मित्राला कुठे सोडून आलात?
त्याला घेऊन या लवकर. बस सुटेल आता.." असा हल्ला केला.तिला केसु परत न येता
लंडनला गेल्याचे सांगितले तेव्हा लगेचच ड्रायव्हरला कळवा असा तिने धोशा
लावला.जेव्हा तिच्या समोर आम्ही परत एकदा ड्रायव्हरला केसु येणार नसल्याचे
सांगितले तेव्हा ती शांत झाली.
बस सुरू झाल्या झाल्या आजी आजोबांनी आमच्याशी गप्पाच मारायला सुरूवात
केली.तुमची आजची ट्रीप कशी झाली? अशी सुरूवात करून ती , कुठून आलात? इथे
काय करता? सध्या कुठे राहता? आजीचे प्रश्न आणि कुतुहल संपेचना! अशा
बोलण्याबोलण्यातूनच इरफानच्या घरावरूनच ते पुढे जाणार असल्याचे समजले आणि
आजीबाईंनी त्याला आपल्या गाडीने घरी सोडू असे जाहीर केले.पण आमच्या
उत्तरांनी तिचे समाधान होत नव्हते. "तुम्ही सगळे इतक्या वेगवेगळ्या गावात
राहता आणि म्हणता की भारतातही वेगवेगळ्या ठिकाणी राहता तर तुमची ओळख आणि
दोस्ती कशी झाली?"तेव्हा तिच्या तोंडून 'मिसळपाव' असे वदवून घेतले आणि मग
तिचा समज असा झाला की मिसळपाव नावाचे एक गाव भारतात आहे आणि तिथे हे सारे
भेटले.दोस्ती झाली आणि आता पोटापाण्यासाठी योगायोगाने एकाच वेळी जर्मनीत
आलेत. तिचा समज दूर करण्याच्या फंदात मी पडले नाही ,कारण नाहीतरी त्यात
खोटं काय आहे?
परवाच्या शनिवारी विपिन फ्राफुला येणार असल्याने अर्थातच केसुना आवताण
धाडले आणि मुख्य स्टेशनात भेटायचे ठरवले. आम्ही थोडे आधी पोहोचून तिथल्या
एका तुर्की दुकानातून मिठाई वगैरे खरेदी करेपर्यंत केसुंचे फ्राफुत आगमन
होऊन मुख्य स्टेशनाबाहेरच्या चौकात दादाकोंडकेंची गाणी ऐकत साहेब बसले
होते.तिथून मग विमानतळ गाठला आणि कॉफी पित विपिनच्या गाडीची वाट पाहत बसलो
होतो तेव्हाच रविवारी डार्मस्टाटमध्ये फिरायचे ठरवले.विपिनला घेऊन घरी
जाताना आजची संध्याकाळ सत्कारणी कशी लावता येईल त्याचा विचार करू
लागलो.सगळ्यांचं मत शिनूमाला गेलं.'मुंबई मेरी जान'चे परीक्षण वाचल्यापासून
तो सिनेमा 'पहायचाच' ह्या यादीत गेला होता. त्याला 'बुधवार'ची जोड दिली.
नसिर आणि अनुपम तोडीस तोड.. क्या बात है! दोन्ही सिनेमे लागोपाठ पाहिले..
जेवणाचा बेत होता पोळ्या, गाजराची कोशिंबिर,दहीभात,मिरचीचं लोणचं ',केसुंनी
केलेली चटकदार मटकीची उसळ आणि 'थुलुंबा' ही तुर्की मिठाई(त्याला दिनेशने
तुर्की गुलाबजाम असे नाव देऊन अपेक्षा वाढवल्या पण जऽरा अपेक्षाभंगच
झाला..)आणि अर्थातच आईसक्रीम!
दोन दोन सिनेमे पहाताना दोन वाजून गेले.
फ्राफु ते डार्मस्टाट अवघ्या २५ -३० मिनिटांचा प्रवास.. रविवार सकाळ
असल्याने सगळे फ्राफु आळसाच्या आणि सुट्टीच्या मूडात होते,अर्थातच गाडीला
काडीची गर्दी नव्हती.जर्मनीमध्ये किवा एकंदरच युरोपातला ट्रामचा प्रवास मला
नेहमीच आवडतो कारण जरी ट्राममधून फिरताना वेळ जास्त लागतो पण त्या गावात
फेरफटका मारल्यासारखे वाटते.इथेही ट्रामममधून डार्मस्टाट दर्शन करत गावात
एक चक्कर मारली.केसु 'राजुगाईड' झाले होते. ह्या गावातली चार चर्च प्रसिध्द
आहेत त्यातील संत मार्टीन चर्च आणि रशियन चर्च ही दोन महत्त्वाची! रशियन
चर्च केसुंच्या घराजवळच आहे, चालत जाण्यासारखे.मात्र डार्मस्टाट सगळा
डोंगराळ भाग असल्याने रस्ते उंचसखल!एक चढण चढून वळण घेऊन चर्चच्या आवारात
पोहोचलो. बाजूलाच मोठा बागिचा,लग्नाचा हॉल आणि डार्मस्टाटचे चिह्न म्हणून
जो मनोरा कायम चित्रात दाखवतात तो मनोरा आहे. केगेल्न म्हणजे बॉलिंग
खेळण्यासाठीची जागाही तिथेच पलिकडे आहे. मेपल्सच्या बागेत चारही बाजूला
असलेले पुतळे लक्ष वेधून घेत असतानाच काहीतरी करुण कथा सांगत आहेत असे
वाटते.(ती कथा काय ते कळले नाही.)चर्चच्या आवारात आयताकृती दगडी बांधीव फार
खोल नसलेले तळे आहे. चर्चची इमारत बाहेरून फारच देखणी आणि टुमदार आहे.
रशियन चर्चचा घुमट गोल असतो.इतर कॅथलिक आणि प्रोटेस्टंट चर्चांना घुमट
नसतात तर उंच उंच कळस आकाशाच्या पोटात शिरायला पाहत असतात. अपवाद-फक्त
म्युनशनमधल्या फ्राऊअनकिर्शला मात्र गोल घुमट आहे.
डार्मस्टाटच्या श्लॉस भागात गेलो.श्लॉस म्हणजे किल्ला. आता जरी हा भुईकोट
किल्ला नसला तरी त्याच्या खुणा मात्र तिथले दगडी रस्ते आणि १५०० वर्षे जुनी
मजबूत तटबंदीची भिंत दाखवते. तेथल्याच चौकात पहिल्या लुडविकचा भव्य पुतळा
एका उंच मनोर्यावर आहे आणि तेथपर्यंत जिन्याने चढून जाऊन आपण डार्मस्टाटचे
विहंगम दृश्य पाहू शकतो. सिटीसेंटर असल्याने येथे कायम चहेलपहेल असते.
सकाळी खाल्लेले केसुस्पेशल पोहे आता जिरले होते.त्यामुळे आता डार्मस्टाट
मधील प्रेक्षणीय स्थळांच्या यादीत 'हाटेले' दिसू लागली होती. अशोककुमारच्या
पिज्झेरियात भारतीय पदार्थ खाऊन बाहेर आलो तो मिरवणूक सुरू होणार असल्याची
लक्षणे दिसली.चौकात लोकं जमायला सुरूवात झाली होती.म्हातारेकोतारे,लहान
मुलं हातात पिशव्या घेऊन उभी होती.खिडक्या खिडक्यातून लोकं दिसू
लागले.आपल्याकडे कसे गणपतीची मिरवणूक किवा गोविंदा पहायला लोकं उभे असतात
त्याची आठवण झाली आणि योगायोगाने आज अनंतचतुर्दशी असल्याची आठवणही
झाली.दूरवरुन ड्रमचा आवाज येऊ लागला.ही कसली मिरवणूक?अशी चौकशी केली असता
हा मार्टिनक्रेब म्हणजे संत मार्टिनच्या उत्सवाची मिरवणूक असल्याचे समजले.
संत मार्टिनचे चर्च हे डार्मस्टाटमधील एक प्राचीन चर्च.सप्टेंबरच्या
पहिल्या रविवारी त्या चर्चची पारंपरिक जत्रा असते आणि पाठोपाठ येणार्या
रविवारी 'आल्टस्टाटफेस्ट' म्हणजे गावचा उत्सव असतो.तीच उत्सवी मिरवणूक
पहायला आता तिथल्या लोकांबरोबरच आम्हीही उत्सुक होतो.
सर्वात आधी बँडपथक बाअदबबामुलाहिजाहोशिय्यार करत आले.मागोमाग दोन
उंच,पुष्ट,देखण्या आणि सजवलेल्या घोड्यांची बग्गी वाजतगाजत आली.घोडे
चांगलेच दणकट होते.काळ्या रंगाचे आणि भुर्यापांढर्या आयाळीच्या घोड्यांना
पायात फरचे जोडे घातले असावेत अशी मऊ झालर होती.बग्गीनंतर एकेक पथकं येऊ
लागली.प्रत्येक पथकाचा गणवेष होता.त्यांचा बँड आणि त्यात वाजवणारे सगळे
हौशी.. अगदी ८,१०,१२ वर्षांची मुलही फ्लूट,बिगुल,ड्रम वाजवत जात
होती.कुठेही गडबड गोंधळ नाही की वाजवण्यात पुढेमागे नाही.सारे एका
तालासुरात वाजवत चालले होते. प्रत्येक पथकामागोमाग त्यांचा सजवलेला रथ
चालला होता आणि गोळ्या,चॉकलेटे,लहान खेळणी,किचेन्स इ. चा वर्षाव होत होता.
सानथोर सारेच ते वेचत होते.मुलांच्या हातातल्या पिशव्यांचं कोडं आता
उलगडललं.काही गाड्यातून गाजरे,सफरचंदे,वुर्ष्ट(सॉसेजेस्)इ. चे वाटप होत
होते तर काही पथकांचे रथ डार्मस्टाटर बिअर आणि वाईनची पिंपे वाहून नेत
होते आणि अंगूरबाला बँडच्या तालावर थिरकत साकीचे काम करत होत्या.भर दुपारी
लोकं बिअर आणि वाइनचा अस्वाद घेत होते.दंगामस्ती होती पण बेधुंद कोणीही
नव्हते.काही जण स्केटिंगची कौशल्यं दाखवत मिरवणूकीत चालले होते.तर काही
नाचत गात चालले होते.गावचा उत्सव सारे गावकरी साजरा करत होते.
सर्वात शेवटचे पथक होते सफाईपथक! मिरवणूकीदरम्यान रस्त्यात पडलेल्या
गोळ्याचाकलेटांच्या चांद्या,बिअर,वाइनचे प्लास्टीकचे गल्लास,गाजराचा पाला
इ. कचरा यंत्राने साफ करत येणारी गाङी आणि ते सफाईकामगार ह्यांना मनोमन
सलाम करत आम्हीही दोन चार चौक त्या मिरवणूकीत शामिल झालो.
कार्निवालच्या मिरवणूकीची आठवण करून देणारा हा गावचा उत्सव मनात जपत आम्ही फ्रांकफुर्टला परतलो.
ब्रुसेल्सच्या सहलीतच परतीच्या वाटेवर पुढच्या सहलीचे सुतोवाच करून झाले. झेक रिपब्लिक आता युरोपिय युनियनमध्ये आल्यामुळे तिथे शेंगन व्हिसा चालतो.. जायचं का प्रागला? सगळ्यांनी मिळून जर ह्या प्राचीन,सुंदर सुवर्णनगरीला भेट द्यायची असेल तर सोन्याला सुगंधच की.. मग त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या. इंडियन ट्रॅवल कॉर्नरच्या रवि देशपांडेंबरोबर आम्ही ट्यूलिप्सच्या गावाला गेलो होतो , त्यांना गाठले. प्रागबरोबरच थोडे दक्षिणेला ऑस्ट्रीयात येऊन साल्झबुर्गही करायला त्यांनी सुचवले. परत फोनाफोनी ,खरडाखरडी , विरोपाविरोपी सुरू झाली. केसु आणि आम्ही दोघं जरी अगदी जवळच्या गावात राहत असलो तरी नेमके केसु दौर्यावर! दोन दिवस माद्रिद तर दोन दिवस लंडन,मध्येच स्टॉकहोम तर डार्मस्टाटला एखाद दिवस येऊन एकदम इटालीला प्रयाण असे त्यांचे जवळजवळ महिनाभर चालू होते आणि दिनेशच्या पॅरिस आणि आयबेरियात चकरा चालू होत्या. विपिन फ्लोरेन्समध्ये अडकलेले तर इरफान आणि लिखाळद्वय फ्राफुहुन बरेच लांब अंतरावर असल्याने सहलीची तारीख ठरली की आधी फ्राफुला येण्याची बुकिंग करण्यासाठी आवश्यक माहिती गोळा करण्यात व्यग्र, तर डॉन अजून भारतातच होता. त्याचे जर्मनीचे तिकिट पक्के झाल्यावर तोही फ्राफुमध्येच राहणार असल्याने भ्रमणमंडळ कुठे, कधी सहलीला जाणार आहे याची चौकशी सुध्दा न करता त्याने सहलीत आपली जागा पक्की करून टाकली होती.
आता आम्हीही चार्ज्डअप झालो.देशपांडेंनी साल्झबुर्गला फेरियनवोहनुंग म्हणजे हॉलिडेहोममध्ये रहायचे असल्याने तिथे स्वयंपाकाची सोय आहे असे सांगितले होते. मग काय जवळ जवळ रोजच मी आणि शाल्मली जेवणाचे बेत ठरवत होतो आणि शक्यता लक्षात घेऊन बाद करत होतो.डॉन्याला भेळीसाठी चुरमुरे आणायला सांगितले होतेच त्यामुळे तो एक पदार्थ मात्र नक्की होता.
३ ऑक्टोबर हा पूर्व आणि पश्चिम जर्मनीच्या पुन:एकत्रीकरणाचा ऐतिहासिक
दिवस असल्याने सुटी असते. ह्यावर्षी तो शुक्रवारी असल्याने मोठा विकांत
मिळाला होता. तेव्हा गुरुवारीच दुपारी पाचच्या सुमाराला प्रागकडे कूच
करायचे ठरले. लिखाळ आणि शाल्मली १/१०ला रात्रीच फ्राफुत दाखल झाले.
महिन्यादोनमहिन्यांनी प्रत्यक्ष भेटत होतो आणि प्रागच्या सहलीची नशा होती
त्यामुळे वाईनच्या साक्षीने रात्री गप्पा रंगल्या. जेवायला चिनी पध्दतीचा
भात,सूप,चिनी बटाटे आणि डेझर्ट म्हणून वाईनक्रिम!
आमच्या जर्मन आजीआजोबांना भेटायची त्या दोघांना खूप उत्सुकता होती
त्यामुळे दुसर्या दिवशी सकाळी ११च्या सुमाराला त्यांच्याकडे गेलो. तिथेही
इतक्या गप्पा रंगल्या की शेवटी दिनेशला आम्हाला आठवण करुन द्यावी लागली
प्रागला आजच जायचे आहे.
इरफान गेल्सनकिर्शहून ४च्या सुमाराला फ्राफुत पोहोचणार होता तर विपिनचे
विमान फ्लोरेन्सहुन ४.१०ला येणार होते. केसु आणि डॉन्याही ४ च्या सुमाराला
मुख्य स्टेशनातच भेटणार होते. तिथे असलेल्या 'मदन कॅश अँड करी' वाल्याला
रात्रीचे जेवण आणि सामोशांची आर्डर दिली होती. ते बांधून घेऊन 'गणपतीबाप्पा
मोरया'च्या गजरात गाडी विमानतळाकडे वळवली. ठरल्याप्रमाणे ८ नं च्या
फाटकापाशी विपिन सज्जच होता. आता गणसंख्या पूर्ण झाली आणि सीमोल्लंघनासाठी
प्रागच्या दिशेने काकांनी गाडी हाकायला सुरुवात केली. इकडे आमची तोंडे खाणे
आणि बोलणे यासाठी अव्याहत चालू होती. सामोशांचा फन्ना केव्हाच उडला. गप्पा
आणि हसण्याला तर उत आला होता. सहा महिन्यांपूर्वी आम्ही सारे एकमेकांना
प्रत्यक्ष भेटलोही नव्हतो यावर देशपांडेकाका तर सोडाच पण आमचाच आमच्यावर
विश्वास बसत नव्हता. शाळाकॉलेजच्या सहलीत जसा दंगा चालतो ना तस्सा दंगा करत
आम्ही प्रागकडे चाललो होतो.
जर्मनीच्या ऑटोबानवर ( फ्रीवे)स्पीडलिमिट नाही. त्यामुळे जरी मोठा विकांत
असला तरी जास्त रहदारी गृहित धरूनही १०च्या सुमाराला प्रागला पोहोचू असा
अंदाज अनेकवेळा फ्राफु ते प्राग अंतर पार केलेल्या देशपांडेकाकांचा होता.
पण वाटेतल्या अपघातामुळे सगळी गणितं चुकली. एरवी इथे ट्राफिकजॅम होतो
म्हणजे गाड्या ४० ते ६०किमी /तास च्या वेगाने चालत असतात. पण आज मात्र
वाहतुकीची कोंडी इतकी झाली होती की साकीनाक्याच्या ट्राफिकमध्ये अडकलोत असे
वाटावे. ३७ वर्षात ही अशी स्टँडस्टिल राहण्याची दुसरी वेळ ! अशी माहिती
काकांनी पुरवली. अशीच स्थिती पुढेही दोनतीनदा आली. सारेच कंटाळले होते.
अशातच केसुंचे पित्त खवळले होते. ते अनिश्चित रुटिन आणि फिरतीमुळे नसून काल
रात्रीच्या हुकलेल्या चिनी जेवणामुळे असल्याचा निष्कर्ष
म्युनस्टरवाल्यांनी काढला. आता एक छोटा कॉफी ब्रेक घेतला. त्यानंतर केसुंनी
दादाकोंडकेची गाणी आयपॉडवर ऐकत आणि ज्ञानेश्वरांच्या(?) रेड्याच्या सुरात
सर्वांना ती ऐकवत प्रवासात जान आणली त्यामुळे थोडा वेळ जरा बरा गेला. १०
च्या सुमाराला जेवणासाठी एकेठिकाणी थांबलो आणि मदनच्या जेवणाला न्याय दिला.
असं करता करता जेव्हा एकदाचे प्रागला पोहोचलो तेव्हा रात्रीचा १.३० वाजून
गेला होता.
झेक रिपब्लिकची राजधानी, गोल्डनसिटी अर्थात सुवर्णनगरी जिला म्हणतात
त्या प्रागमध्ये आम्ही आलो होतो. हे प्राचीन शहर तितक्याच प्राचीन
इमारतींसाठी आणि स्थापत्त्यासाठी प्रसिध्द आहे. गोथिक आणि बरॅक
स्थापत्त्यशास्त्रांचा प्रभाव या शहरावर दिसतो. दोन्ही महायुध्दांमध्ये
बरीच हानी होऊनही ,बर्याच इमारतींची पडझड होऊनही परत त्या इमारती जशाच्या
तशा बांधून काढून प्राग आपल्या पुरातन दिमाखात परत उभे राहिले आणि सार्या
युरोपाने सुवर्णनगरीचा मान दिला! युरोपातल्या सर्वात सुंदर शहरांपैकी हे
एक! रात्री जरी बराच उशीर झाला होता तरी सकाळी लवकरच चहापाणी उरकून,
प्रागच्या मुख्य स्टेशनात गाडी पार्क करून, हातात नकाशा घेऊन ह्या नगरीत
फिरायला बाहेर पडलो.
मुख्य स्टेशनाची इमारत पहाण्यासारखी आहे. तसं पाहिलं तर इथल्या प्रत्येकच
इमारतीवर कोरीव काम केलेले दिसते. कमनीय युवती,सिंह आदिंचे पुतळे भव्य
प्रवेशद्वारांवर दिसतात. प्रवेशदारेही अगदी पाहण्यासारखी आणि भव्य! जुन्या
वाड्यांच्या मोठमोठ्या शिसवी,सागवानी कोरीव दरवाजांची आठवण यावी असे!
नाचणारे घर अर्थात डान्सिंग हाऊस पहायची उत्सुकता सर्वांनाच होती.दुसर्या
महायुध्दात बेचिराख झाल्यानंतर बर्याच उशिरा म्हणजे १९९२ मध्ये क्रोएशियन
आणि कॅनेडियन आर्किटेक्टने मिळून ह्या इमारतीचा आराखडा केला. १९९६ साली हे
बांधकाम पूर्ण झाले.ह्या इमारतीच्या अगदी विचित्र अशा डिझाइनमुळे बरेच
वादंग झाले पण तत्कालीन झेक अध्यक्ष हावेल तेथून अगदी जवळच राहत होता.
त्याने ही आगळीवेगळी इमारत सांस्कृतिक केंद्र व्हावी म्हणून प्रस्ताव उचलून
धरला आणि ही 'चिवित्र' इमारत आकाराला आली. फ्रेड आणि जिंजर ह्या दोन
प्रसिध्द नर्तकांचे जोडनाव ह्या इमारतीला दिले आहे. सर्वात वरच्या मजल्यावर
फ्रेंच उपाहारगृह आहे तर इतर मजल्यांवर बहुराष्ट्रीय कंपन्यांची हापिसे!
लोकं गमतीने ह्या नाचणार्या घराला पिणारे घर (ड्रंक हाऊस) असेही म्हणतात.
हावेलचे येथे सांस्कृतिक केंद्र करण्याचे स्वप्न मात्र अधुरेच राहिले.
स्टेशनाच्या अगदी लगतच आहे ते 'नारोदनी' म्हणजे 'नॅशनल म्युझिअम'. युरोप
आणि जगाला जोडणारे सांस्कृतिक संग्रहालय असे वर्णन असणारे झेक रिपब्लिकमधील
हे सर्वात मोठे संग्रहालय. भव्य ग्रंथालय,इतिहास,विज्ञान, कला, संगीत
त्यातही झेक संगीताचे एक वेगळे दालन आदि विविध दालने तर येथे आहेतच; पण
आशियाई,आफ्रिकन आणि अमेरिकन संस्कृतीची माहिती देणारीही अनेक दालने येथे
आहेत. अर्थात हे एकच संग्रहालय पहायला दिवस काय आठवडा पुरला नसता.
वेळेअभावी अर्थातच आम्ही ते पाहू शकलो नाही.
तसेच पुढे चालत चर्च पर्यंत गेलो. तिथल्या टॉवरवर लिफ्टने गेलो.शेवटचा मजला
लाकडी,पुरातन पायर्यांवरून चढलो.पूर्ण लाकूडकामाने युक्त असा तो पोटमाळाच
वाटला. फक्त त्याला चारही बाजूंनी खिडक्या आहेत. त्यांचे कोयंडेही अगदी
जुन्या पध्दतीचे आहेत. तेथून सार्या प्रागचा नजारा डोळे भरून पाहिला आणि
कॅमेर्यात बंद करून घेतला.
चालत चालत प्रागच्या मुख्य चौकात आलो. ओल्ड टाउन स्क्वेअर येथे असलेले चर्च
आणि त्या चर्चावर असलेले ऍस्ट्रोनॉमिकल घड्याळ हा अत्यंत कुतुहलाचा भाग
आहे. यापूर्वी म्युनस्टरला असे घड्याळ आम्ही पाहिले होतेच पण आद्य आणि
वेगळे ऍस्ट्रॉनॉमिकल घड्याळ म्हणजे प्रागचेच! इस. १४१० मध्ये कदान नावाच्या
घड्याळजीच्या मदतीने चार्ल्स विद्यापीठातील गणित आणि खगोलशास्त्राचा
प्राध्यापक सिंडॅलने हे घड्याळ तयार केले.अर्थात ह्या घड्याळाचा कर्ता कोण
ह्यावरही प्रवाद आहेतच. १५५२ पर्यंत ते व्यवस्थित चालत होते. मग मात्र बंद
पडले. ते मग दोन तीन वेळा दुरुस्त केले व ते करतानाच त्यात
ख्रिस्तपुराणातील व्यक्तिरेखा आणि घड्याळाच्या बाजूचे चार पुतळे यांची भर
घातली. ऍस्ट्रॉनॉमिकल डायल, सूर्य आणि चंद्राच्या जागा, १२ महिन्यांसाठीची
कॅलेंडर डायल आणि प्रत्येक तासाला खिडकीबाहेर येणार्या ख्रिस्तपुराणातील
अपोस्टल्स आणि इतर व्यक्तिरेखा हे ह्या घड्याळाचे मुख्य आकर्षण!
घड्याळाच्या डाव्या बाजूला दोन पुतळे आहेत. एक म्हणजे वॅनिटी - हातात
आरसा घेतलेला ,स्वतःच्याच सौंदर्यात मग्न असलेला पुतळा आत्ममग्नता दर्शवतो.
तर त्याच्या शेजारी असलेला सोने घेऊन जाणारा ज्यू लोभीपणाचे प्रतिक आहे.
'ज्यू'च का? चे उत्तर असे की ज्यू आधीच लोभी आणि कंजूष म्हणून ओळखले जातात (
आपल्याकडील मारवाड्यांसारखेच जणू ..) त्यात सोने वाहून नेणारा ज्यू म्हणजे
तर लोभीपणाचा कळसच ! उजव्या बाजूला आहे एक सापळा, त्याच्याच हातात
घड्याळाचा तास.. मृत्यूचे प्रतिक असलेल्या सापळ्याच्या हातात काळाची दोरी
आहे आणि एकेक तासाचे टोल वाजवताना तो जाणीव करून देतो आहे.. वेळ पुढे पळतो
आहे,मी जवळ येतो आहे. त्याच्या शेजारी असलेला योगी मात्र वाद्य वाजवण्यात
तल्लीन आहे,सार्या जगापासून,सार्या मोहजालातून अलिप्त आहे. आयुष्यातली
महत्त्वाची सत्येच हे पुतळे सांगतात.
आम्ही तेथे पोहोचलो तेव्हा १२.५५ झाले होते आणि एक वाजता टोल वाजला की
अपोस्टल्स बाहेर येणार त्याची वाट पाहत अलोट गर्दी थांबली होती.आम्हीही
त्या गर्दीतला ठिपका होऊन एक वाजायची वाट पाहू लागलो. बरोब्बर एक वाजता
मृत्यू सापळ्याने दोर ओढायला सुरुवात केली. तास वाजे झणाणा.. सुरु झाले.
घड्याळावरचा कोंबडा आरवला आणि ख्रिस्तपुराणातल्या त्या बारा
व्यक्तिरेखांच्या पुतळ्यांनी एकेक करून दर्शन दिले. कॅमेर्यांचा
क्लिकक्लिकाट झाला. एक वेगळाच अनुभव गाठीशी बांधून आम्ही पुढे निघालो.
सिल्व्हर लाईन असे अधोरेखित केलेल्या रस्त्यांवरून फिरताना खरोखरीच
सुवर्णकाळात फिरतो आहोत असे वाटत होते. बांधीब दगडी रस्ते, लहान
गल्ल्यांतून चालत लहान मुलाचे कुतुहल डोळ्यात घेऊन त्या नगरीला डोळे भरून
पाहत होतो. ख्रिस्टलसाठी प्रसिध्द असलेल्या प्रागमध्ये ख्रिस्टलचे मनमोहक
आकार असलेले प्राणी,पक्षी,फुलदाण्या, घंटा,लोलक ,अलंकार आणि कितीतरी वस्तू
पाहत पुढे चाललो होतो. आठवण म्हणून एखादी लहानशी वस्तू घ्यायचा विचार मात्र
मनातच ठेवावा लागला कारण पुढच्या प्रवासात ती नाजूक वस्तू घरापर्यंत
व्यवस्थित पोहोचेल याची खात्री वाटत नव्हती. रंगीबेरंगी खेळणी,बाहुल्या
यांचे जणू प्रदर्शनच दुकानादुकानांत मांडलेले होते. अगदी अंगठ्याएवढी
चिमुकली ठकू बाहुली पासून ते फूटभर उंची पर्यंतच्या वेगवेगळ्या आकारातल्या
तश्शाच बाहुल्या एका रांगेत उंचीप्रमाणे मांडून ठेवल्या होत्या. त्या एकात
एक बसवता येतात ही नवीच माहिती कळली.(आतापर्यंत फक्त एकात एक डबेच ठेवता
येतात असा माझा समज होता.) तिथेच एका टपरीवजा दुकानात सळयांना मैद्याचे
गोळे विशिष्ट आकारात लावून भाजत होते. आणि बदाम, पिस्ते ,कॅरामल मध्ये
घोळवून ते खायला देत होते. आम्हीही त्याचा आस्वाद घेतला. एकदम 'झाटनामाटिक'
लागते ते!
असेच हिंडत असताना एक बुध्दिबळाचे पट मांडून ठेवलेले दुकान दिसले.
इतक्या विविध पध्दतीने सजवलेले चतुरंग दळ त्या पटांवर मांडलेले होते. ती
बारीक कलाकुसर पाहतानाच एका षटकोनी पटाने लक्ष वेधले त्यात चक्क तीन
प्रकारच्या सोंगट्या होत्या. काळ्या,पांढर्या आणि लाल! तिघांनी एका वेळी
खेळायचा हा षटकोनी बुध्दीबळपट आम्ही पहिल्यांदाच पाहत होतो.
हे आश्चर्य मनात घेऊनच आम्ही चार्ल्स पूलाकडे आलो. व्लटावा नदीवर राजा
चार्ल्सच्या कारकिर्दीत इस.१३५७ मध्ये ह्या पूलाचे बांधकाम सुरू
झाले.पूर्णपणे दगडी बांधकाम असलेला हा भक्कम पूल बांधायला ५० च्या वर वर्षे
लागली आणि जवळजवळ १८७० पर्यंत पलिकडच्या भागाला जोडणारा हा एकच दुवा होता.
नंतर मग इतर अनेक पूल बांधले गेले तरी ह्या चार्ल्सपूलाची शान काही
वेगळीच! आता ह्या पुलावरून वाहने नेता येत नाहीत. फक्त चालत पलिकडे
जायचे.त्या पूलावरून चालताना मुळामुठेवरचे पूर्वीचे जुने पूल उगाचच आठवत
राहिले. जाताना दोन्ही बाजूंचे सौंदर्य पाहत,रमत गमत,आस्वाद घेत जायचे.
घाईगडबडीत जाण्याची ही जागा नव्हे. त्याच पुलापासून पाऊण एक तासाच्या
बोटींच्या फेर्याही निघतात. होडीत बसून सैर करत, बिअर नाहीतर कॉफी पित
प्रागची शोभा पाहण्याची नशा काही वेगळीच.. पण वेळेअभावी आमची ती संधी
हुकली.
चार्ल्स पूल पार करून आम्ही पुरातन किल्ल्याकडे आलो. अतिपुरातन १० व्या
शतकात बांधलेला हा कॅसल म्हणजे फक्त राजमहालच नव्हता तर प्रागचे सांस्कृतिक
आणि शैक्षणिक केंद्र होता. १४ व्या शतकात राजा चार्ल्सच्या सर्व
महत्त्वाच्या राजकीय हालचाली येथूनच होत असत. राजसत्ता आणि धर्मसत्ता
दोन्हीचे हे महत्त्वाचे केंद्र! मेरीमातेचे चर्च ही तेथली पहिली इमारत,
नंतर मग संत जॉर्जची बॅसिलिका, संत व्हिटुसचे कथीड्रल बांधले गेले. आजही
सर्वोच्च पदासाठीचा महाल येथेच आहे.देशाचे महत्त्वाचे सण येथेच साजरे केले
जातात. मौल्यवान राजमुकुटही येथेच ठेवलेला आहे. विशेष म्हणजे येथे असलेली
संग्रहालये आणि जुने महाल अध्यक्षांची कार्यालये सोडता जनतेला पहायला खुले
आहेत.जुन्या आणि नव्याला जोडणारा हा प्राग कॅसल आज मोठ्या रुबाबात
सांस्कृतिक आणि ऐतिहासिक खुणा जपतो आहे.
एकदम दोस्ती करावी असं वाटलं प्राग मला.. वेळ खूपच कमी पडला. परत कधीतरी प्रागला यायच अशी खूणगाठ मनाशी बांधलीच. साल्झबुर्गला जायचे होते. कालच्या स्टाऊच्या (ट्राफिक जाम)अनुभवाने पाय निघत नसतानाही गाडीच्या दिशेकडे जावे लागले. पावसाची रिपरिप चालू झाली होती. अपेक्षेप्रमाणेच सारे अंदाज कोसळले. नऊ सव्वानऊ पर्यंत पोहोचू असे वाटत असताना साल्झबुर्गमध्ये पोहोचलो तेव्हा ११ वाजून गेले होते. पोटात भूक आणि डोळ्यात झोप घेऊन आम्ही योहानाच्या दारात उतरलो. खिचडी खाऊन उद्याची स्वप्ने मनात घेऊन झोपलो .
अधिक चित्रांसाठी रसिकांनी हे कलादालन पहावे.
आज सकाळीच हिमगुंफा पहायला जायचे होते त्यामुळे लवकरच उठलो.पडदे बाजूला
सारल्यावर आपसूकच अऽहा आले!योहानाचे घर डोंगराच्या कुशीत, वळणावळणांची वाट,
दारात असलेलं सफरचंदाचं झाडं,उजव्या हाताला हिरवेगार मखमालीचे आवार, त्यात
चरणार्या पुष्ट गाई, त्यांच्या गळ्यातल्या किणकिणत्या (त्या कोणत्याशा
सिनेमामुळे सुप्रसिध्द झालेल्या)घंटा.. पलिकडेच दाणे टिपणार्या
कोंबड्या,वार्यावर डोलणारी रंगीत गवतफुले, मागच्या बाजूला उंचचउंच आल्प्स,
शिशिररंगात न्हालेली ती केशरीपिवळी झाडं,थोडी वर नजर गेल्यावर दिसणारे
हिरव्या शेंड्यांचे पाइन्स आणि अजून वर पाहिलं की त्या हिरव्यागार पाइन्सवर
जणू खोबरं पेरावं तसं शुभ्र बर्फ!नंदनवनातल्याच एका कोपर्यात आम्ही आलो
नव्हतो ना? रात्रीच्या अंधारात आणि आंबलेल्या शरीर आणि मनाला हे सौंदर्य
दिसल नव्हत.एका अर्थी ते बरंच झालं म्हणा.. सकाळ इतकी प्रसन्नता घेऊन उगवली
की पूछो मत!
जिना उतरुन खाली आलो तर योहानाने नाश्त्याची जय्यत तयारी केली होती. घरचे
दूध, बटर, दारच्या सफरचंदांचा उत्कृष्ठ केक,शेतातल्या स्ट्रॉबेरीचे
मार्मालाडं,अंडीही घरचीच, म्युसली,वेगवेगळ्या प्रकारचे पाव..पूर्वी ती
पावही घरीच करायची पण हल्ली तिच्याच्याने होत नाही अशी माहितीही कळली. काल
प्रागच्या नादात जेवणाचे तसे हालच झाले होते. मिळेल ते खाल्लं होतं.
रात्रीही खूप उशीर झाल्याने खिचडीवर भागवलं होतं. आता मात्र सगळी कसर भरून
काढली. सगळ्यांनी ताव मारला.योहानाही आग्रहाने काय हवे ,नको ते विचारत होती
आणि आम्ही पण येऊ दे केक, आणा अजून अंडी असे सांगत यथेच्छ खाल्ले.
आता वेर्फनला जायचे होते. जगातल्या सगळ्यात मोठ्ठ्या हिमगुंफा येथे आहेत.
पायथ्यापर्यंत गाडी जाते, तिथून मग साधारण अर्धा तास चढून केबलकारच्या
थांब्यापाशी जायला लागते. केबल कारचा थांबा साधारण १००० मीटरवर आहे आणि
रोपवेने आपण १५७५ मीटरवर जातो.नंतर परत अर्धा तास चढायचे की १६४१ मीटर
उंचीवर हिमगुंफेचे द्वार!
आम्हाला पायथ्याशी सोडून देशपांडेकाका परत गेले. ते तरी किती वेळा पाहतील
गुंफा? असा विचार करून आम्ही चढायला सुरुवात केली.कच्चा वळणावळणांचा
रस्ता,हिरवेगार पाइन आणि दुसर्या बाजूला दरीतून खोलवर दिसणारी घरांची सुबक
रांगोळी!आम्ही जरा तरंगतच चढायला सुरुवात केली आणि टप्पोरे थेंब आले की
अंगावर.पाण्याचे ते गार ,बोचरे थेंब नक्को वाटतात त्यापेक्षा बर्फ परवडले.
छत्रीचा तर उपयोग नसतोच."अरे देवा,हा बोचरा पाऊस नको रे बाबा, त्यापेक्षा
स्नो चालेल.." अशी विनवणी देवाने ऐकली चक्क आणि थोडं अजून वर गेल्यावर
हिमवर्षा चालू झाली.शाल्मली आणि डॉन्याचा हा पहिलाच बर्फ! (लहान मुलांना
कसं आपण पहिलाच उन्हाळा,पहिलाच पावसाळा आहे म्हणतो ना अगदी तस्सं..)पण
कितीही वेळा ही वर्षा पहा,अनुभवा त्यातली गंमत ताजीच राहते.आम्ही
सगळ्यांनीच भरपूर आनंद घेत चढणे चालू ठेवले.झाइलबान म्हणजे रोपवेची तिकिटे
आता काढायची होती.
रांगेत उभे राहिलो आणि सभोवार पाहिले तर नजर ठरेल तिथे आता फक्त हिरवा आणि
पांढरा रंग होता आणि धुक्याची हलकीशी लपेटलेली शाल.. परत अऽहाहा.. आले
उस्फुर्तपणे!
रोपवेने आणखी वर गेलो. आता खाली दरीत फक्त धुकेच दिसत होते. अजून वर चढायचे
होते.रस्ता अजूनच कच्चा,चढणीचा आणि वळणांचा झाला होता आणि खाली दरीत फक्त
धुकेच दिसत होते त्यामुळे डोंगराला चिकटूनच चालायचे होते. झाडाझाडांवर
लगडलेली हिमफुले पाहून सगळेच लहान झाले. बर्फाचे गोळे एकमेकांना मारत
खेळायला सुरुवात झाली. शेवटी गुंफेत लवकर पोहोचायला हवे,येताना हवे तितके
खेळू असे एकमेकांना बजावत परत चढू लागलो.
गुंफेच्या दारापाशी फक्त आम्हीच ७ जण!
पाचच मिनिटात दार उघडले. आम्ही तर तिळा,दार उघड! सुध्दा म्हणालो नव्हतो.
अलिबाबाच्या गुहेत शिरल्यासारखे केल्विनच्या पाठोपाठ आम्ही आत शिरलो. दार
परत बंद झाले. आत मिट्ट काळोख. आपल्याला बॅटरी न्यायला,फ्लॅश मारुन फोटो
काढायला परवानगी नाही. उष्णतेने आतील बर्फ वितळू नये म्हणून ही काळजी.
आम्हाला दोघात एक कंदिल दिला. आता एकूण १४०० पायर्या चढणे उतरणे होते.ते
अद्भुत पहायला आम्ही अधीर झालो होतो.बर्फाचा राजवाडा आणि त्यातले ते महाल
केल्विन आम्हाला मॅग्नेशियमच्या ज्योतीच्या प्रकाशात दाखवत होता.तो बर्फाचा
नैसर्गिक चमत्कार पाहताना किती वेळा डोळे विस्फारले गेले. बर्फामुळे तयार
झालेले एका बाजूने पोलार बिअर आणि दुसर्या बाजूने दिसणारा गजराज असे काय
काय पाहिले.बाहेर कितीही तपमान असले तरी आतमध्ये मात्र शून्य अंश से. तपमान
कायम असते. बर्फाच्या लेयरवरून त्याचे वय कसे ओळखतात तेही केल्विनने
सांगितले.
ह्या गुंफांचा शोध अचानकच लागला. १९व्या शतकाच्या शेवटी शेवटी ह्या गुंफा
जगाला माहिती झाल्या. इस. १८७९ मध्ये अँटोन पोझेल्ट ह्या साल्झबुर्गच्या
निसर्ग शास्त्रज्ञाला आप्ल्समध्ये फिरताना ह्या गुंफा सापडल्या.त्याने
त्यावर माहितीपूर्ण लेखही लिहिले पण मग विशेष काही घडले नाही.मॉर्कच्या
अलेक्झांडरने पोझेल्टचे लेख वाचले आणि तो त्या गुंफापर्यंत गेला आणि मग
तिथे जायचा लोकांचा ओघ वाढला.साधारण १९२० नंतरअगदी प्रिमिटिव्ह का होईना
चढणीसाठी रस्ते खोदले आणि मग पुढे वर्षभरात कच्चा का होईना रस्ता तयार
केला गेला आणि इस. १९५५ मध्ये रोपवे बांधला गेला.
अलेक्झांडरची ह्या गुंफांमध्येच चिरनिद्रा घ्यायची इच्छा होती म्हणून मग
त्याचा अस्थीकलश ह्या गुंफांत ठेवला आहे.एका बाजूला त्याचा अस्थीकलश आणि
शेजारीच तयार झालेले हिमरुपी शिवलिंग हिंदू तत्वज्ञानाची जाणीव करून
देतात.
केल्विन माहिती सांगत होता आणि एकीकडे ते बर्फीय चमत्कार दाखवत होता.एरवी
अशी टूअर असते तेव्हा साधारण २५ एक लोकं तरी एका गटात असतात पण आम्ही
जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा फक्त आम्हीच ७ जण होतो आणि त्यांची वेळ
झाल्यामुळे त्याने फक्त आम्हालाच घेऊन टूअर सुरु केली. सगळ्या गुंफेत
तेव्हा फक्त आम्हीच होतो साहजिकच नियम थोडे शिथिल झाले आणि आम्ही भरपूर
फोटो काढू शकलो.
तृप्त मनाने जेव्हा उदंड बर्फ पाहून आम्ही बाहेर आलो तेव्हा बाहेरची गर्दी
पाहून आम्ही लवकर तिथे गेल्याचा विचार किती शहाणपणचा होता हे एकमेकांना
सांगत आम्ही आता उतरु लागलो. आता मात्र मुक्तपणे बर्फात खेळत, एकमेकांना
बफाचे गोळे मारत, बर्फाचे लाडू भरवत मूलाहून मूल झालो. आणि जेव्हा मन भरले
तेव्हा रोपवेत बसलो.
अधिक चित्रांसाठी आप्ल्सच्या कुशीत हे कलादालन पहावे.
गुंफा उतरुन खाली येईपर्यंत एक वाजून गेला होता. आल्प्सच्या त्या
डोंगरात मिळणारे पाणी परडवणारे नाही हे माहित होते त्यामुळे डबाबाटली सोबत
होती. गाडीत बसल्याबसल्याच सँडविचांचा फन्ना उडाला. खाली उतरताना वाटेत
लागतो अतिसुंदर 'होहन वेर्फन श्लॉस '!
होय तीच ही गढी जी "व्हेअर इगल्स डेअर" चित्रपटात दाखवली आहे. जिला 'श्लॉस ऍडलर ' नावाने चित्रसॄष्टीत ओळखतात. तेथे रेंगाळणे अपरिहार्यच होते पण थोडक्या वेळात सारे काही बसवायचे असल्याने नाइलाजाने तेथे जास्त वेळ न घालवता निघालो.
आता जायचे होते ओबेरसाल्झबुर्गला,इगल्सनेस्ट म्हणजेच ते सुप्रसिध्द
टीहाउस,Kehlsteinhaus पहायला. हा सारा परिसर डोंगराळ भागात
आहे.ओबेरसाल्झबुर्ग म्हणजे साल्झबुर्गचा वरचा भाग! आल्प्सचा तो सारा परिसरच
इतका सुंदर आहे की शब्द आणि प्रतिभाही अपुरे पडतात.
हुकुमशहा हिटलरकडे कलाकाराचे मन होते त्यामुळेच बहुदा येथे सुंदर
प्रासाद बांधवून घेतला असावा. तसेच हा सगळा डोंगराळ भाग,रस्ते वळणांचे,
कठिण चढणीचे असल्याने शत्रू तेथे सहजपणे पोहोचू शकणार नाही , असाही विचार
होता.ते पाहून थोरल्या महाराजांच्या राजकारणात गडकिल्ल्यांचे असलेले वेगळे
महत्त्व ह्याने वाचले होते की काय? असा विचार उगाचच मनात आला.
गरुड नेहमी उंचावर ,सहज कोणाला दिसणार नाही आणि कोणाच्या हाती लागणार नाही
अशा ठि़काणी आपले घरटे बांधतो. जर्मनीचा राष्ट्रीय पक्षी गरुड! साहजिकच
ह्या गरुडाधिराजाचे हे घरटे म्हणजेच हिटलरच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त
मार्टिन बोहरमानने बांधवून घेतलेले हे केहलस्टाइन हाउस ! शाही
पाहुण्यांच्या खास खातिरदारीसाठी ह्याचा उपयोग केला जाई.अतिशय सुंदर ठिकाणी
,उंच जागी बांधलेला हा प्रासाद आणि तेथे जाण्याचा डोंगरातून खोदलेला
वळणावळणाचा रस्ता अवघ्या १३ महिन्यात बांधून काढला गेला.अतिशय कठिण चढण आणि
टोकावर पार्किंगसाठी केलेली खास जागा हा स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना
समजला जातो. ह्या सुंदर प्रासादात हिटलर स्वतः फक्त तीन वेळा राहिला. एक तर
अतिशय उंचावर बांधलेला हा प्रासाद आकाशातून सहज लक्ष्य करता येईल अशी
त्याला भीती वाटे. त्या काळातही तेथे वर जाण्यासाठी एक पितळी लिफ्ट बांधली
होती जी ३० सेकंदात ३० मीटर अंतर जाते. ही लिफ्ट बंद पडली तर.. अशीही भीती
त्याच्या मनात असे.त्यामुळे तो तेथे राहणे टाळत असे. इव्हा मात्र त्या
सुंदरतेची भुरळ पडून तेथे अनेकदा जात असे व राहत असे.
दुसर्या महायुध्दाच्या हालचालींचे केंद्रस्थान ह्याच भागात
बेरेष्टेसगार्टन रिजन येथे होते.फ्यूररचे वास्तव्य ह्या भागात जास्त
असल्याने या भागाला 'ब्रांचऑफिस ऑफ बर्लिन' असे गमतीने संबोधले जात असे.
येथेच माइनकान्फ च्या पैशातून १९३३ साली विकत घेतलेले वाखनफेल्ड हाउस
ज्याचेच पुढे बर्गहोफ असे नामांतर झाले तो हिटलरचा प्रासाद आणि हेरमान
गॉरिंग,मार्टिन बोरमान,अल्बर्ट स्पिअर आदि बर्याच अधिकार्यांचे बंगले
होते परंतु महायुध्दातल्या बाँबवर्षेत तेथील घरे उध्द्वस्थ झालीच आणि
बर्गहोफलाही त्याची झळ पोहोचली .तरी बर्गहोफ बर्याच प्रमाणात चांगल्या
अवस्थेत होते. मात्र १९५२ मध्ये बव्हेरियन गवर्मेंटने ते निओनाझी मंडळींची
पंढरी होऊ नये म्हणून उध्द्वस्थ करुन टाकले आणि तेथे झाडे लावली. त्या खुणा
सांगणारी एकही गोष्ट आता तेथे नाही,त्यांची जागा फक्त वृक्षांनी घेतली
आहे. युध्दसमाप्तीनंतर हा सगळाच भाग अमेरिकनांच्या ताब्यात अनेक वर्षं
होता.
वर टीहाउस कडे जाणारा रस्ताही फार सुंदर आहे ,त्या रस्त्याने प्रवास करणे
हाच एक अनुभव आहे असे म्हणतात.तेथे जाण्यासाठी त्यांच्या ठराविक बसनेच जावे
लागते. खाजगी वाहनांना मज्जाव आहे.आम्ही हे गरुडघरटे पहायला अतिउत्सुक
होतो पण.. आम्ही तेथे पोहोचलो तेव्हा पावसाचा जोर वाढला होताच पण वाईट
बातमी म्हणजे वर जाणार्या बसेस पावसामुळे आणि खराब हवेमुळे बंद केल्या
होत्या.आता इगल्सनेस्ट पाहणे शक्य नव्हते. थोडेसे निराश होऊन आणि परत इथे
यायचेच असे मनाशी ठरवून आम्ही पायथ्याशी असलेल्या बंकर्सकडे वळलो. हे
बंकर्सही असे बांधले गेले की सहजासहजी ते दृष्टीस पडणार नाहीत. आज तेथे
दुसर्या महायुध्दाचे माहितीकेंद्र तथा म्युझिअम केले आहे .
आत पोहोचलो ते विस्फारल्या डोळ्यांनीच! एकूण जर्मनीतच हिटलर, दुसरे
महायुध्द यावर बोलणे सारेच जर्मन टाळतात.त्या काळच्या खुणाही शक्य तिथे
पुसून टाकल्या आहेत. त्यामुळे त्याबाबतची माहिती मिळणं तसं कठिणच,पण येथे
मात्र दुसर्या महायुध्दाच्या काळातल्या अनेक खुणा जपल्या आहेत. जुनी
वर्तमानपत्रे, फोटो,चित्रफिती ह्या सार्यातून इतिहास सामोरा येतो.
खुद्द बंकर्स पाहताना तर थक्क व्हायला होते. बंकर म्हणजे
लपण्यासाठी,आसर्यासाठी केलेली सोय ,त्यामुळे मला उगाचच लहानसे जमिनीखाली
केलेले बांधकाम असे काहीतरी चित्रं डोळ्यासमोर होते. पण येथे आपल्याला
दिसते डोंगराच्या पोटात वसवलेले छोटेसे गावच जणू! जमिनीखाली जवळजवळ सहा
मजले उतरुन गेले की एका वेगळ्याच विश्वात प्रवेश!काय नव्हतं तिथे?
हे तर मोठ्ठे बंकर्सकाँप्लेक्सच दिसते. यात वेगवेगळी आठ युनिट्स असून
त्यातील पाच युनिट्स आतून जोडली आहेत.आतमध्ये सुसज्ज दिवाणखाने,
शयनगृहे,भटारखाने,भोजनकक्ष, हमामखाने,कचेरीदालने,वैद्यकियसेवाकक्ष तर आहेतच
पण एक कारागृह सुध्दा आहे. टेलिफोनचे जाळे असून ८०० एक्स्टेनशन्स
आहेत.वीज,पाणी एवढेच नव्हे तर एअरकंडिशनिंगचीही व्यवस्था केलेली दिसून
येते. हवा खेळती रहावी म्हणून मोठमोठ्या पाइप्समधून हवा खेळवली होती
त्यातील काही पाइपलाइन्सचे अवशेष त्या इतिहासाचे मूक साक्षीदार
आहेत.बंकर्सच्या तोंडाशी मशिनगन्स बसवून संरक्षक तटबंदी तयार केलेली आढळते.
तेथल्याच एका दालनात ( पूर्वीच्या बंकरमध्ये ) हिटलरच्या राजकीय
कारकिर्दीचा आढावा घेणारा माहितीपट जर्मन आणि इंग्रजीत तेथे दाखवतात. तो
पाहून संमिश्र भावना मनात घेऊन आम्ही साल्झबुर्गकडे निघालो.
साल्झबुर्ग आणि सांऊड ऑफ म्युझिक! हे दोन शब्द अगदी हातात हात घालून
जातात ना? पण आज आम्हाला साउंड ऑफ म्युझिक मधले साल्झबुर्ग पाहण्याइतका वेळ
नव्हता. त्यामुळे या सुंदर शहरात एक फेरफटका मारावा असं ठरवून मुख्य चौकात
उतरलो.
दर शनिवारी येथे असतो आजूबाजूच्या डोंगरातल्या खेड्यातून आलेल्या
शेतकर्यांचा आठवडी बाजार! आम्ही तेथे पोहोचेपर्यंत संध्याकाळ होत आली होती
,सारे शेतकरीही आपापली पालं आवरायच्या तयारीत होते.चौकात जिकडेतिकडे
मोझार्टचे पुतळे आणि कटआउट्स आहेत. त्याचे हे जन्मगाव.
त्याचे जन्मस्थान पाहून मग गेलो ते तेथल्या प्राचीन चर्चमध्ये.
चर्चसभोवतालचा परिसरही तितकाच सुंदर आहे. चर्चच्या प्रांगणात एक मोठ्ठा
बुध्दिबळपट आहे.(असाच मोठ्ठा पट आमच्या फ्राफुच्या बोलांगरोपलास्ट मध्येही
आहे.)तेथे दोन म्हातार्यांचा डाव अगदी रंगात आला होता आणि आजूबाजूला
बघ्यांचीही भरपूर गर्दी होऊ लागली होती पण ते दोघे मात्र खेळात अगदी रंगून
गेले होते,त्यांचे इतरांकडे लक्षच नव्हते.
तो खेळ थोडावेळ पाहून आम्ही आत गेलो. चर्चमधील कोरीव काम,काचकाम पाहण्यात वेळ तसा बराच गेला. साल्झबुर्गच्या फॅशनस्ट्रीटवर विंडो शॉपिंग करत असताना अचानक लक्षात आलं केसु कुठे दिसत नाहीत.. मग पुढे गेला असेल, तू जाऊन पहा रे.. असे करत करत तेथला सारा परिसर शोधले. एव्हाना पावसाचा जोर वाढला होता. ते थंडगार,बोचरे पाण्याचे थेंब चुकवत केसुंना शोधणे चालूच होते. शेवटी म्याकदादाकडे आसरा घेतला आणि केसुना फोन लावला तर हे महाशय आम्हीच सगळे रस्ता चुकल्याबद्दल आम्हालाच बोल लावत गाडी जिथे पार्क केली होती तेथे उभे होते.साल्झाक नदीच्या किनार्यावरुन दिसणारे दृश्य पाहण्यात जास्त वेळ न घालवता मग आम्ही गाडीकडे निघालो. गाडीपाशी पोहोचल्यावर 'प्रेमळ ' शब्दांची देवाणघेवाण झाली आणि योहानाच्या घरी जायला निघालो.
आज रात्रीचा बेत होता चटकदार भेळ! डॉन्या (आदेशाप्रमाणे) भारतातून चुरमुरे घेऊन आला होता. गोड,तिखट चटण्या, फरसाण ,कांदे ,टोमॅटो इ.कच्ची तयारी सगळी बरोबर घेतली होतीच.तरी कोथिंबिर आयत्यावेळी पिशवीत टाकायची म्हणून फ्रिजमध्ये ठेवली होती ती आठवणीने विसरले होते त्यामुळे प्रेमळ शब्दांची बरसात फारच वाढली. घरी पोहोचल्यावर किचनचा ताबा केसुंनी घेतला आणि फर्मास भेळ बनवली. भेळ व मोझार्ट बीअरचा आस्वाद घेत उद्याच्या सॉल्टमाईन्सचे बेत आखू लागलो.
बाकी बंकरमधे तेलाचे दिवे वगैरे आहेत की गळत होतं?.. कारण त्या "एन्ड"
लिहिलेल्या बोगद्याच्या दिव्या भोवती कसलेसे ओघळ आहेत, गंज/तेलासारखे. बाकी
बंकर्स "जैसे थे" ठेवलेले बघून कौतुक वाटलं.. भिंतीवरच्या रेघोट्या
जशाच्या तशा ठेवताना स्वच्छता जपलेली वाटली.
बुद्धीबळपट, आणि ते खेळणारे आजोबा लै भारी.. बाजुचा विपीग विलोजचा
सिमेट्रीकल फोटुही क्लासच! दोन विलोजच्यामधे कारंजं आहे का नुसते पुतळे?
आपल्याकडे कसे अहमदनगर,नागपूर,वडगांव.. असे नगर,पूर,गाव प्रत्यय लावून गावांची नावं बनतात ना तसे बुर्ग प्रत्यय लावून जर्मन गावांची नावं तयार होतात. हामबुर्ग,वुर्झबुर्ग,साल्झबुर्ग इ. साल्झबुर्ग! साल्झ- मीठ आणि बुर्ग- शहर म्हणजे लवणपूरच म्हणा ना.. येथील ड्युर्नबेर्ग ह्या डोंगराच्या पोटात मीठाच्या खाणी आहेत त्या पहायला अर्थातच आम्ही सारे उत्सुक होतो. वेळाचं गणित कसं जमवायचं हाच मोठ्ठा प्रश्न होता. लिखाळमंडळींची गाडी फ्राफुहून संध्याकाळी ६.३० वाजता सुटणार होती तर इरफानची ७.१५ वाजता,म्हणून मग सक्काळी लवकर निघून लाइष्टनष्टाइनइन्क्लाम हा आल्प्समधला सर्वात लांब,खोल आणि सुंदर धबधबा पहायचा आणि मग खाणी पाहून एकच्या सुमाराला परतीच्या प्रवासाला सुरुवात करायची असं ठरलं. त्याप्रमाणे सक्काळी लवकर उठून, आवरुन योहानाचा आणि त्या सुंदर परिसराचा निरोप घेताना परत इथे यायचेच असे प्रत्येकाच्याच मनात आले.
आम्ही धबधब्याच्या एंट्री पॉइंटपाशी पोहोचलो तेव्हा तिकिटखिडकी उघडायला थोडा वेळ होता. बाजूलाच असलेल्या छोट्याशा पार्कातले झोपाळे, डुलणारे घोडे पाहून सगळे जण मूलाहून मूल होऊन तिथे धावले. तिथे एवढावेळ फक्त पक्षीरवच काय तो होता आणि अचानक आमच्या कलकलाटाची भर पडली.
बहुदा आमच्या आवाजानेच खिडकीवरच्या माणसाने लवकर दार उघडून आम्हाला तिकिटे देऊन आत पिटाळले आणि आमच्या गोंगाटातून सुटला एकदाचा..
एका बाजूला उंचच उंच आल्प्स आणि दुसर्या बाजूला खोल दरी.. हिरवी पिवळी केशरी झाडं डोंगरमाथ्यावरही होती आणि खाली दरीतही..कच्च्या रस्त्यावरुन आम्ही चढायला सुरुवात केली.थोडे वर गेल्यावर एक लाकडी साकव लागला. कुठेही कृत्रिम बांधकाम वाटणार नाही, त्या निसर्गाचा तोल बिघडणार नाही याची पूर्ण काळजी घेऊन रस्टिक फिल देऊन तेथील दोन्ही तिन्ही पूल बांधले आहेत,तीच गोष्ट दोन्ही बोगद्यांची आणि दगडी आणि लाकडी पायर्यांची..थोडे अजून वर चढल्यावर पाण्याचा खळाळता आवाज ऐकू येऊ लागला.
ग्रोसारल नदीत उडी घेणारा,शेकडो वर्षांच्या स्थित्यंतरांनी तयार झालेला हा जलप्रपात पहायला आतुर झालेल्या पावलांचा वेग आपसूकच वाढला.लाइष्टनष्टाइनचा उमराव जॉन (दुसरा) ह्याच्या आर्थिक मदतीने पैशाअभावी बंद पडलेले येथील डोंगरातील बांधकाम इस. १८७६मध्ये पूर्ण झाले आणि कृतज्ञता म्हणून 'लाइष्टष्टाइनक्लाम' हे नाव दिले गेले.अनुपम सॄष्टिसौंदर्य लाभलेला हा प्रपात म्हणजे लवणपूराची शान आहे!
तो नजारा डोळ्यात साठवून घेत आम्ही वर चढत होतो. शेवाळंभरले दगड,पाण्याच्या आघाताने गुळगुळीत झालेले खडक त्या प्रवाहात दिसत होते.काही ठिकाणी इतके उंच आणि निमुळते डोंगरसुळके की आकाशाचा चतकोर निळा तुकडाच चुकारपणे दिसावा आणि त्या निळाईशी स्पर्धा करणारे खाली खोल वाहणारे खळाळते पाणी..
दुपारच्या वेळी सूर्यदेवांची कृपा असेल तर तेथे मनोहारी इंद्रधनुची रांगोळीही उमटते.सृष्टीचे ते सारे नवल पाहत आम्ही बोगदा ओलांडून पुढे गेलो आणि एका वळणावर त्याचे ओझरते दर्शन झाले.कितीतरी वेळ तिथेच त्या निसरड्या पायर्यांवर उभे राहून भारल्या अवस्थेत पाहतच राहिलो.
काही वेळाने त्या गारुडातून जागे होऊन पुढे चढू लागलो.खळाळत्या पाण्याखेरीज आता कसलाच आवाज नव्हता. दुसरा बोगदाही ओलांडून आम्ही पुढच्या वळणावर पोहोचलो आणि 'तो' सामोरा आला.कितीवेळ त्याच्याकडे पाहत राहिलो, मग भानावर येऊन त्याला सामोरा,पाठीशी ठेवून भरपूर फोटो काढून घेतले.
नायाग्रा किवा इग्वासुसारखा हा अतिभव्य धबधबा नाही. त्याच्या तुषारात भिजायला नेणारी धुक्याची पोर नाही. आल्प्स खोदून निमुळत्या डोंगरसुळक्यांतून निसटून खाली ग्रोसारल नदीकडे झेपावणारा हा धबधबा उंचीला उत्तुंग आणि खोलीला अथांग आहे. कधी रंगीत तरी कधी हिरव्या झाडांचा पोषाख ल्यालेला आल्प्स दुधाच्या धारा घेऊन येतो आणि आपल्याला आमोरासामोरा भेटतो,एखाद्या मित्रासारखा! हिवाळ्यात आल्प्सने बर्फाची दुलई गुरफटून घेतली की इथला मार्गही बंद. धबधबा तर गोठतोच पण ह्या चढणवाटेने त्याला भेटायला येणं अशक्य होऊन जातं. वसंतात पुन्हा पाणी खळाळू लागतं आणि ते थेट शिशिराची चाहूल लागेपर्यंत.. तेथून हलूच नये असं वाटत होतं पण लवणखाणींकडेही जायचे होते. नाईलाजाने त्याला ऑफ विडर सेझेन (पुन्हा भेटूया) म्हणून आम्ही ड्यूर्नबर्गकडे निघालो.
ड्यूर्नबर्ग,आल्प्सच्या डोंगरमाळेतला एक प्राचीन डोंगर, मीठाच्या
सगळ्यात जुन्या खाणींपैकी एक असून त्या खाणी पाहणं हा एक अनुभव आहे.प्राचीन
काळात मीठामुळेच साल्झबुर्गला संपन्नता आली ,ह्या मीठाच्या खाणी सापडल्या
हलाइनच्या ड्यूर्नबर्ग डोंगरात आणि म्हणून 'हलाइनचे श्वेतसोने ' असे नाव
मीठाला पडले.ह्या खाणींचा मालक प्रिन्स आर्च बिशप,वोल्फ डिटरिश! दरवर्षी
३६,००००टन मीठ ह्या खाणीतून काढले जात असे.ह्या खाणी पहायला हलाइन या
टुमदार गावातून आपल्याला ड्यूर्नबर्गकडे जावे लागते. तेथे पोहोचल्यावर
आम्हा सर्वांना विशिष्ट एप्रन चढवायला सांगितले आणि एका सरकत्या जिन्याने
खाली नेले. तेथे रेलट्रॅक दिसला.
एक साधारण पन्नाशीची मावशी तिथल्या पारंपरिक वेशात तेथे उभी होती. आत्ता मायनर ट्रेन (पिट रेल्वे)येईल,त्यात बसून आपल्याला खाणींकडे जायचे आहे.तिने माहिती पुरवली. थोड्याच वेळात ती झुकझुकगाडी आली की.. एक इंजिन आणि ३५,४० जण बसतील असे लांबच लांब बाकडे.. एवढीच गाडी. टप नाही की काही नाही.ज्ञानेश्वरांची चालणारी भिंत उगाचच काहीही संदर्भ नसताना आठवली. तर त्या बाकड्यांवर एकामागोमाग एक सगळे सलहान मुले गाडीगाडी करत खेळताना जसे बसतील तसे बसले आणि गाडी सुरु झाली. साधारण ५/७ मिनिटे गाडी बोगद्याबोगद्यातून चालली होती आणि एके ठिकाणी मावशींनी आम्हा सर्वांना उतरायला सांगितले. पलिकडच्या बाजूला आधीच्या ट्रीपमध्ये खाणी पाहिलेले लोकं परत जाण्यासाठी नंबर लावून उभे होतेच.
आम्ही मग पुढे जाऊ लागलो. एका ठिकाणी थांबून मावशींनी जुने लहान बुटके मार्ग आणि नविन मार्ग दाखवले. हे बोगदे बांधताना लाकूड,स्टील आणि काँक्रिटचा वापर केलेला असून आपण आत्ता जमिनीखाली ८० मीटर आहोत अशी माहिती पुरवत मावशींनी सगळ्यांना एका ओळीत चालायला सांगितले. शाळेच्या सहलीला आल्यासारखे बाईंच्या सूचनेने वाटले खरे पण त्या बोगद्यात इतकी कमी जागा आहे की एकावेळी एकच जण जाऊ शकेल. येथल्या दगडांनाही खारट चव आहे हे ती सांगत असतानाच सगळ्यांनाच लग्गेच चव पहायचा मोह आवरला नाही. पुढेपुढे चालत आम्ही सगळे एका दालनात आलो. इथे चित्रफित सुरु झाली.खाणीतून मीठ कसे काढले जात असे पासून बाजारपेठेत कसे पोहोचत असे इथपर्यतचा सारा प्रवास ह्या चित्रफितीतून गोष्टीरुपाने दाखवला आहे.ड्यूर्नबर्गचा प्रिन्स आर्चबिशप, वोल्फ डिटरिश आपल्याला ह्या चित्रफितीतून भेटतो आणि त्याचे बोट धरुन आपणही त्याच्याबरोबर त्या काळात पोहोचतो.विशेष म्हणजे ही फित सलग न दाखवता खाणीच्या चार टप्प्यात ती दाखवतात.
येथून आता लाकडी स्लाइडने खाली जायचे होते. २८ मीटर लांबीची ती घसरगुंडी,एकावेळी दोघातिघांनी बसायचे,एकमेकाला धरुन ठेवायचे , पाय जमिनीला न घासतील असे तरंगते ठेवायचे आणि घसरायचे, मावशी सूचना देत होत्या.घसरगुंडीवर किती वर्षांनी बसलोत असे म्हणत सगळे खाली आले. इथे एका पाइपातून पाणी ठिबकत होते आणि खाली मीठाचे स्फटिकही दिसत होते.सगळ्यांनीच ते खारट पाणी चाखले. जागोजागी लावलेले फलक,पुतळे आणि चित्रांतून खाणीची माहिती सांगितलेली दिसत होती. चालता चालता एक पाटी दिसते. आपण ऑस्ट्रीयातून जर्मनीत येतो. जमिनीच्या पोटात ऑस्ट्रीया-जर्मनी सीमा आहे, जमिनीच्या पोटातल्या सीमेवर सुरक्षा नाही की चेकपोस्ट नाही हे अनुभवताना वेगळेच वाटले.
पुढे एका दालनात आलो. प्रिन्स मीठाची गोष्ट सांगत होता.हजारो वर्षांपूर्वी समुद्रातल्या खार्या पाण्यातले सॉल्ट डिपॉझिटस खडकांवर झाले,त्यापुढे हजारो वर्षांनी आल्पची निर्मिती झाली,आणि आल्प्सच्या काही डोंगरांच्या पोटात हे खडक लपून बसले.मग त्याने ड्यूर्नबर्गच्या पोटात लपलेले हे खडक आणि मीठ लोकांसमोर आणण्यासाठी खाणी खोदवून घेतल्या. आता आम्ही पुढे खरं म्हणजे अजून खाली जाण्यासाठी अजून एका ४२ मीटरच्या घसरगुंडीवरुन मघासारखेच खाली घसरुन आलो. प्रिन्स बिशप आमच्याआधीच इथे स्वागताला येऊन पोहोचलेला होता."पारंपरिक पध्दतीनेकाढले जाणारे मीठ पुरेसे नव्हते. मग मी तज्ज्ञांच्या एका गटाला पाचारण केले. मीठाचा पाण्यात विरघळण्याचा गुणधर्म लक्षात घेऊन त्यांनी एक योजना मांडली.'सोल्युशन माइनिंग' !" प्रिन्स गोष्ट सांगू लागला.
एक साधारण ३० मीटरच्या शाफ्टच्या सहाय्याने डोंगराच्या पोटात मोठ्ठा
खड्डा खोदला. हा खड्डा पाण्याने काठोकाठ भरला.तेथल्या आजूबाजूच्या खडकातले
मीठ ह्या पाण्यात विरघळत गेले आणि बाकीचा भाग पाण्याच्या तळाशी बसला. हा
खड्डा हळूहळू मोठा होत गेला. पाच सहा आठवड्यांनी हे खारट झालेले पाणी,ज्यात
साधारण २७% मीठ होते,पुढच्या प्रक्रियेसाठी बाहेर काढले गेले. ह्या
पाण्याचे बाष्पीभवन करून खाली उरलेले मीठ दाबाखाली वाळवले जात असे. पुढची
१०-१५ वर्षे हे अव्याहत चालू होते,आता खड्ड्याचे चांगल्या मोठ्ठ्या सॉल्ट
लेक मध्ये रुपांतर झालेले होते.
गोष्ट ऐकून जरा भारावूनच एका तराफ्यातून त्या तळ्याच्या पलिकडे गेलो. "आपण आता जमिनीच्या खाली १८० मीटर आहोत." मावशींनी बोलायला सुरुवात केली. एवढा वेळ आम्ही जमिनीच्या पोटात होतो. अरुंद बोगद्यातून चालत होतो. कुठेही एकदासुध्दा आम्हाला गुदमरायला झाले नाही की उकाडा जाणवला नाही. "खाणी बांधल्या तेव्हापासूनच येथे १० अंश से तपमान वर्षभर कायम ठेवले जाते आणि शुध्द हवा खेळवलेली असल्याने तुम्हाला खाणीत,जमिनीच्या पोटात असलात तरी फ्रेश एअर मिळते." जुनी , ऐतिहासिक लाकडी पाइपलाइन दाखवत मावशींनी तत्परतेने प्रश्नाचे उत्तर दिले.आता मात्र ही पाइपलाइन न वापरता नवीन तंत्रज्ञान वापरले जाते हे सुध्दा आवर्जून सांगितले. थोडे पुढे आल्यावर आमचे लक्ष दोन मानवी सांगाड्यांनी वेधले. खाणीचे बांधकाम जेव्हा चालू होते तेव्हा १५७७ मध्ये एक आणि १६१६ मध्ये दुसरा असे दोन मानवी सांगाडे मिळाले. शेकडो वर्षांपूर्वी दरडी कोसळून त्यात गाडले गेलेले हे लोकं आहेत. २००० वर्षे वयाचे हे सांगाडे तेथल्या मीठामुळे सुरक्षित राहिले.ते पाहताना अंगावर काटा आला.
जमिनीच्या पोटात दडलेले ते आश्चर्य पाहून सरकत्या जिन्याने वर आलो आणि मघाचच्या झुकझुकगाडीची वाट पाहू लागलो. आता सगळ्यांचे लक्ष घड्याळाकडे गेले. १ वाजून गेला होता. दिडपर्यंत परतीच्या प्रवासाला सुरुवात केली तर साडेपाच पावणेसहापर्यंत फ्रांकफुर्टात पोहोचू असा विचार मनात आला. खाणीतून बाहेर आल्यावर अक्षरशः पळत आमच्या गाडीकडे गेलो. तहानभूक बाजूला ठेवून,कोठेही न थांबता शक्य तितके लवकर फ्राफुला पोहोचून लिखाळ मंडळी आणि इरफानची ट्रेन गाठायची हे लक्ष्य होते. १३०,१४०/तास च्या वेगाने जात होतो पण तणावाने कोणालाच काही सुचत नव्हते. एखाद्या ठिकाणी कॉफी ब्रेकमध्ये पाच,दहा मिनिटे घालवून वेळेचा अपव्यय नको असेच सगळ्यांचे मत पडले आणि .. चालत्या गाडीला खीळ लागली. पुढे दिसणारा गाड्यांची मोठ्ठाच्या मोठ्ठी रांग पाहिल्यावर अवसान गळाले. त्यात १०,१५ मिनिटे अडकून पुन्हा वेग पकडला आणि परत एकदा स्टाऊ! असे तीन चारदा झाले. घड्याळात आता चार वाजून गेले होते, अजून आम्ही न्यूर्नबर्गच्याच आसपास होतो. दीडपावणेदोन तासात फ्रांकफुर्ट गाठणे अशक्य आहे ,लिखाळची गाडी चुकली हे तर स्पष्ट झाले.इरफानला तरी गाडी मिळेल ह्या आशेने नेटाने,वेगाने पुढे जात राहिलो पण परत एकदा जवळजवळ २० मिनिटे स्टाऊत अडकलो. आता इरफानचीही गाडी मिळणे अशक्य होते.
एकदा गाड्या चुकल्याच आहेत म्हटल्यावर आता त्रास करुन घेण्यात काय अर्थ
आहे? असे वाटले आणि सकाळी नाश्त्यानंतर काहीही न खाल्ल्ल्याची जाणीवही
झाली. मग मात्र एका ठिकाणी थांबून पेटपूजा केली,कॉफी पिऊन जरा ताजेतवाने
झालो आणि पुढचा प्रवास तणावरहित गप्पा करत केला. मानहाइमच्या अलिकडे पुन्हा
स्टाऊ ! हे म्हणजे आता अगदी पोचतोच आहोत ठाण्यात असे वाटावे आणि पनवेलात
ट्रॅफिकने हैराण करावे असे झाले. शेवटी १०च्या सुमाराला फ्रांकफुर्टात
पोहोचलो. विपिनचे ओपन तिकिट असल्याने कोणतीही गाडी चालणार होती. आता ह्या
तिघांच्या तिकिटांचे आणि गाड्या कधी आहेत ते पहायचे होते.तिकिटखिडकीवर जाऊन
ट्रॅफिकमध्ये अडकलेला प्रकार कथन केला आणि काही पैसे भरुन ती तिकिटे
पुढच्या गाडीसाठी व्हॅलिड करुन घेतली. एवढे होईपर्यंत डॉन्याची ट्राम आणि
केसुंची डार्मस्टाटची गाडी लागलेली दिसल्यावर त्यांना जायला सांगितले.
डॉर्टमुंडला जाणारी गाडीही तेवढ्यात १६ नं ला लागलीच. मग विपिनचा निरोप
घेतला. अगदी इमर्जन्सीला हवीच म्हणून ठेवलेली थोडी सफरचंदे आणि पाणी विपिन,
इरफान, लिखाळ, शाल्मली ह्या सर्वांना आता ह्या पुढच्या प्रवासाला उपयोगी
पडत होते. लिखाळ द्वय आणि इरफानच्या गाडीला अजून पाऊण तास होता.इरफानला
पहाटे ४ च्या सुमाराला एसन येथे गाडी बदलून गेल्सनकिर्शला जावे लागणार होते
पण तरी थेट गाडी उपलब्धच नसल्याने इलाज नव्हता.
एव्हाना ११ वाजायला आले होते. सकाळपासून धावपळ चालू होती. आता गाडीची सोय
झाल्यावर सगळ्यांची पोटं बोलू लागली होती. जवळपास २२ तास चालू असणार्या
बर्गरकिंगमुळे ती सोय झाली. सर्वांनी आता मात्र खाऊन घेतले आणि नंतर ह्या
तिघांना म्युनस्टरच्या गाडीत बसवले . आता सुटकेचा खरा नि:श्वास टाकून
आम्हीही घरी जायला निघालो.
जर्मन आख्यान भाग भाग ८
http://www.misalpav.com/node/16661
कलोन कडे हे जगातील दुसर्या क्रमांकाचे सम लैंगिक लोकाचे शहर आहे .पहिले
बहुदा सेन फ्रान्सिस्को असावे .येथे गे परेड हा सर्वात मोठी असते .अजूनही
आपल्या हक्कासाठी ते लढा देत आहेत
ख्रिस्तोफर स्ट्रीट डे म्हणून जगभर साजरा होणारा समलैंगिक लोकांची परेड हि
कलोन मध्ये भव्य प्रमाणात आयोजित होते .१० लाखावर लोक एकत्र येऊन आठवडा
भर विविध कार्यक्रमात सहभागी होतात .आपल्या कम्युनिटी विषयी आदर व सदभावना
व्यक्त करण्यासाठी व आपले हक्क व चळवळी विषयी राजकीय /सामाजिक /सांस्कृतिक
स्तरावरून चर्चा येथे होते
.ख्रिस्तोफर स्ट्रीट डे हा दिवस १९६९ साली सकाळी न्यूयार्क शहराच्या
जवळील ग्रीनविच शहरात पोलीस रेड विरुद्ध अमेरिकन प्रशासनाच्या समलैंगिक
लोकांविषयी असलेल्या दुट्टपी धोरणाविरुध्ध समलैंगिक लोकांनी उस्फुर्तपणे
प्रदर्शने केली .ज्याला हिंसक वळण प्राप्त झाले .हि जगातील बहुदा पहिली
समलैगिक चळवळ होती .जी जगभर फोफावली .माझा जर्मन बॉस (हिल्टन हिथ्रो व
त्याचा ब्राझिलियन नवरा असे हे दोघे न चुकता कलोन ला लंडन वरून भेट देतात
).
१८व्य शतकात सुरु झालेला स्ट्रीट कार्निवल हा कलोन शहरातील पर्यटनाचा
मुकुटमणी . दिवसभर चित्र विचित्र कपडे' घालून आबालवृध्द दैनदिन जीवनातील
समस्या /ताणताणाव फाट्यावर मारून निखळ करमणूक करत असतात .तेव्हा
प्रत्येकाची चित्रविचित्र वेशभूषा व अनेक राजनैतिक नेत्याचे मुखवटे असणारे
पेहेराव कार्निवल ला बहार आणतात .केट ची बहिण सुद्धा कार्निवल साठी आली
होती .आम्ही कालोंच्या गल्ली बोळातून दिवसभर नुसते भटकत होतो .जल्लोषाचे
वातावरण होते
.
कलोन शहराशी निगडीत दंत कथा तेथील स्थानिकात खूप लोक प्रिय आहे .हैन्झाल
मेन्शन म्हणून .कोणे एके काळी कलोन शहरात रात्री बुटकी लोक ( हिम गौरी
नि सात बुटके मधील बुटक्या सारखी बुटके लोक ) रात्रीच्या वेळी शहरात येत व
ते साफ अगदी चकाचक करून व कलोनवासीयांची घरची कामे दिवस उजाडायच्या आधी
निघून जात .त्यांना कोणीही अजून पहिले नव्हते .ह्यामुळे कलोनवासीय खूपच
आळशी बनले होते .एक दिवशी एका शिंप्याच्या पत्नीस हे बुटके दिसतात तरी कसे
हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली .तिने रस्तावर चिकट नि तेलकट
तवंग पसरवला .जेणेकरून हे बुटके पडतील .आणि तिला सकाळी पाहायला मिळतील
.त्या दिवसापासून ते बुटके रागावले नि .कलोन शहरात कधीच परत आले नाही .(आता
कलोन वासियांना स्वताची कामे स्वतः करावी लागतात .)
अर्थात १८व्य शतकात हि दंत कथा लिहिली केली .तिची लोकप्रियता पाहून
शिंप्याच्या बायकोचा दिवा घेऊन त्या बुटक्या लोकांना शोधत आहे .व बुटके
मात्र लपले आहेत असे एक सुंदर शिल्प त्यांनी कलोन च्या मध्यवर्ती भागात
उभारले आहे .
दुसरे छोटेखानी शिल्प एका सत्य कथेवर आधारित एका विक्षिप्त वजिराचे आहे .
.कलोन मध्ये काही शतकापूर्वी शहराचा एक उपराव होता .तो विक्षिप्त म्हणून
प्रसिद्ध होता . आपल्या हवेलीच्या गवाक्षातून तो रस्त्यावरून येणाऱ्या
जाणार्या पादचार्यांवर मल मूत्र विसर्जन करायचा त्याची विक्षिप्त पणाची एक
नोंद म्हणून हा त्याचा पुतळा त्याच्या स्मृती प्रीत्यर्थ उभारला आहे.
३० हून जास्त म्युझियम १०० हून जास्त आर्ट गेलेरीज असलेले ह्या शहरात
अल्पकालीन वास्तव्यामुळे त्या पाहता आल्या नाही .बाकी ह्या शहरात WDR), आर
टी एल व वॉक्स, ह्या वाहिन्यांची मुख्य केंद्र आहे .अनेक मोठे व
महत्वाचे टीवी शो ह्या शहरात होतात .युरोपातील सर्वात मोठा कलोन कॉमेडी
फेस्टिवल येथे होतो .जेथे जगभरातून विनोदी अभिनेते येतात व त्यांना
पुरस्कार सोहळा व नवोदितांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले आहे
.
केनेडाचा (अनिवासी भारतीय रसेल पीटर ह्यांचा एकपात्री विनोदी कार्यक्रम जो
बहुदा वर्ण ह्या विषयावर असतो .ज्यात जगातील काळे /गोरे /पिवळे / ब्राऊन
ह्या सर्व वर्णीय लोकांची तो बिनधास्त खिल्ली उडवतो .)माझा आवडता विनोदी
कलाकार आहे .
केथे ड्रेल वरून वरून कलोन शहराचा नजारा
विक्षिप्त वजीर
कलोन च्या बुतक्यांचे शिल्प
हैन्झ मेन्शन (शिंप्याच्या बायकोचे शिल्प )
केथे ड्रेल ची भव्य घंटा
http://images.orkut.com/orkut/photos/OgAAAJjO30EHYVUBGgX9gter3JziNMxtqpp...
केथे ड्रेल चे घुमटाच्या खांबावर हौशी पर्यटकांनी स्वताचे नाव व पत्ता
लिहायला सुरवात केली .म्हणून त्यांना तारेचे कुंपण घालण्यात आले .
डोमच्या उजव्या बाजूला दुतर्फा दुकाने व मधोमध प्रशस्त रस्ता आहे . तेथे
१२ महिने गर्दी असते .त्यात पर्यटक व हौशी कलोन वासीय असतात .त्या
रस्त्याच्या सुरवातीला मोठी बेकारी आहे .तिच्या सुरवातीला काचेच्या आड
गुटगुटीत बलिना असतात . असतात .१ का युरोला दोन ( अशी स्वस्ताई अजून खचितच कुठे सापडे
माझी मेव्हणी कलोन कार्निवल मध्ये
कलोन कार्निवल ( फुल २ धमाल )
फ्रांक फ्रुर् हे जर्मनीतील प्रमुख व्यापारीकेंद्र आहे . महत्वाचे म्हणजे अनेक
निर्वासित रेफ्युजी ज्यांना संयुक्त राष्ट्रांच्या कृपेमुळे ह्या देशात
आसरा मिळाला.म्हणजे निर्वासितांचा खास पासपोर्ट मिळतो. (ह्यामुळे सर्व
जगात कुठेही अगदी अमेरीकेत सुध्धा ही मंडळी जाऊन आरामात स्थाईक होऊ शकतात
अपवाद .स्वताचा देश सोडून जगाच्या पाठीवर कोठेही .
. ह्यामुळे अफगाण व ट्रायबल पाकिस्तान म्हणजे बलुच व वझिरीस्तान /इराण
//इराक/.सोमालिया /श्रीलंकन तमिळ घाना /नायजेरिया / सुदान /लिबिया /मोरेको
/येमेन व अश्या अनेक धोकादायक देशातील मंडळी जीवाच्या भीतीने येथे येऊन
स्थायिक झाले आहेत ..त्याच्या प्रत्येकाच्या कथा नि व्यथा ह्या अंगावर काटा
आणणाऱ्या आहेत. .पण त्याबद्दल नंतर कधी तरी ..
.तर अश्या शहरात आमचा मुक्काम पडला . .४ तासावर म्युनिक ला तिची धाकटी
बहिण तर ३ तासावर माझी सासुरवाडी .त्यामुळे बाईसाहेब खुश होत्या .पण
जर्मनीचा इतर शहरांच्या तुलनेत हे शहर इतिहास .कला /शिल्पे /जुन्या इमारती
ह्या सर्व बाबतीत जरासे कुमकुवत असून व्यापारापुरते पक्के धंदेवाईक आहे .
आहे ..पंजाबी/गुजराती नि पाकिस्तानी लोक जमेल तसे येथे काही दशकांपूर्वी
स्थायिक झालेले आहेत .तर दक्षिणात्य संगणक तज्ञ काही वर्षांपूर्वी आलेले
आहेत .मी मात्र मराठी माणसे नि मराठमोळ्या वातावरण परका झालो. होतो . (लंडन
व आबू धाबीचे दिवस म्हणजे काय बहार होती. आम्हा मराठमोळ्या
परप्रांतीयांनी तेथे काय आपलेच संस्थान उभारली आहे. .आता तर लंडन मधील
हौन्स्लो मध्ये नवे मराठी मंडळ झाले असून माझे अनेक मित्र कार्यरत आहेत .
.भारतातील कोणतीही वस्तू अगदी टिपिकल भारतीय मानसिकता असलेले /प्रांतवाद
जपणारे अनिवासी भारतीय तेथे मुबलक प्रमाणात मिळतात येथे मी पार उपरा होतो
.( '' एक अकेला इस शहर मे'') .
जर्मनीत कुठल्याही शहरात आल्यावर सर्वप्रथम सरकारी कार्यालयात तुम्हाला रजिस्टर व्हावे लागते .अर्थात लाल फितीचा फटका येथे आम्हाला बसला .त्यामुळे अनेकदा चकरा मारून शेवटी एकदाचे आम्ही रजिस्टर झालो. .मी वैतागुन म्हणालो पण. .''साला आमच्या कडे निदान दोन गांधी सरकवले कि किती तरी सरकारी कामे कशी चुटकीसरशी होतात'' .येथे तोही प्रकार नाही .बाकी अगदी आरामात /सावकाश म्हणजे आपल्या पद्धतीचे वातावरण येथील सरकारी कार्यालयात असते. पण सब्र का फल मिठा म्हणून ह्या नवीन शहरात आमचे स्वागत म्हणून भली मोठी वौचर देण्यात आली .त्यात सवलतीच्या दरात संग्रालय /उपहारगृहे /डिस्को /नि खरेदीच्या दुकानानात आम्ही भाबड्या जीवांनी जर्मनीतील रिसेशन हि राष्ट्रीय आपत्ती समजून आपल्या परीने अर्थव्यवस्थेला उर्जित अवस्था आणणे असा संदेश कम आदेश होता .हा . भांद्वालादारांचा एक सापळा आहे असा पक्का कोम्रेद्वादी विचार मनात आला
.फ्रांक फ्रुट मध्ये सर्वप्रथम आम्ही नेचालर हिस्ट्री म्युझियम मध्ये
जायचे ठरवले .तोंडातून शब्द ऐवजी वाफ बाहेर पडण्या इतका हवेत गारठा होता
.पण थंडी सुरु झाली असे म्हणण्याचे धाडस मला नव्हते.
उणे १० ते २० सेल्सिअस तापमान हिमावार्षावत गारठलेला निसर्ग व
त्यासंबंधित प्रत्येक व्यक्ती हे थंडीचे खरे रूप .अर्थात आमच्या कारगिल
/द्रास मध्ये तर उणे ३२ सेल्सिअस तापमान असते असे सांगून मी स्वताची लाल
करून घेतली .
व आमच्या शूर जवानांमुळे अजून हा प्रदेश आम्ही आमचा म्हणू शकतो हे
सांगण्यात मी चुकलो नाही. .( सर्व प्रकारे सज्ज नाटो फौजा व अमेरिकन व
युकेच्या फौजा ज्यांमध्ये पाशात्या युरोपियन राष्ट्रांचे जांबाज सैनिक
असून अजून अफगाण मोहीम का फत्ते झाली नाही?
अशी चर्चा नुकतीच माझ्या सासर्यांच्या मित्रांसमवेत झाली असल्याने माझ्या वक्तव्याला सूचक महत्व आपसूकच प्राप्त झाले. .
नाश्ता करून काळी कॉफीची कडवट चव जिभेवर रेंगाळत आम्ही प्रथम उ बान घेतली
.मग एस बान घेऊन मग स्ट्रास बान घेऊन आम्ही म्युझियमच्या समोर येऊन ठाकलो..
बान पुराण
बान म्हणजे रेल्वे.
जर्मनीत कोणत्याही शहरात सार्वजनिक वाहतुकीचे चार पर्याय असतात.
पहिला
उ बान : U फॉर (अंडर ग्राउंड ) जर्मनीत U चा उच्चार उ असा करतात . थोडक्या भूमिगत रेल्वे दिल्ली मेट्रो
एस बान : लोकल सदृश रेल्वे लांबच्या प्रवासाला म्हणजे सी एसटी ते कर्जत / विरार एवढ्या लांबचे भले मोठे अंतर जायला सर्वोत्तम पर्याय
स्त्रास बान : कधीकाळी मुंबईचा प्राण असलेली ट्राम म्हणजे येथे स्त्रास बान (रस्त्यावरून जाते म्हणून स्त्रास )
आणि बस : हि मुंबई पुण्यासारखी गल्लीबोळातून शहर दर्शन घडवत आणते (गावाला वळसा घालून इच्छित स्थळी जायचे असल्यास हा पर्याय चांगला आहे .)पण कधी कधी हिचे थांबे मोक्याच्या जागेवर असतात .
मुंबईत जशी हार्बर/ वेस्टर्न/ व सेन्ट्रल अश्या ३ लायनी आहेत .तश्या येथे एस बान च्या S १/२/३/३/४ अश्या लायनी असतात . .
व शहराच्या मध्यभागी कोळ्याच्या जाळ्या सारखे भूमिगत रेल्वेचे चौतर्फा जाळे विणले असते .
. व स्ट्रास बान मुख्यत्वे जमिनीवरून लघु पल्याची ठिकाणे गाठण्यासाठी असतो ..
बस हि इतर शहरांप्रमाणे शहराच्या गल्ली बोलातून जाते .. पण बस आणि स्ट्रास
बान चे थांबे कितीतरी वेळा उ आणि एस बान च्या जवळ असतात ..मध्यवर्ती
स्टेशन अर्थात आपल्या सी एस ती सारखे भव्य फ्रांक फ्रुट आम म्हणून प्रसिद्ध
आहे
दळणवळणाच्या एवढ्या सोयी असल्या तरी येथे अनेक सायकलस्वार रस्तावर दिसतात .
फिटनेस ची हौस व जुनी संस्कुती व सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रदूषणविरहित स्वस्त नी मस्त पर्याय
म्युझियम च्या आवारात शिरतांना वायोलिन चे सूर कानावर पडले .कदाचित ते एवढे काही मनाला हुरहूर लावणारे नव्हते पण धुक्याची गडद झूल घेऊन पहुडलेल्या त्या गर्द झाडा झुडपांच्या पार्श्वभूमीवर ते मला आवडून गेले . येथे भिक मागण्याचा रिवाज नाही .आपली कला सादर करून कष्टाने पैसा मिळवण्याचा हा एक स्तुत्य प्रयत्न असतो. .त्या वादकाची वेशभूषा सुद्धा एका प्राचीन युरोपियन नाईट सारखी होती. त्याला तब्बल अर्धा युरोची बिदागी देऊन मी मार्ग्रस्थ झालो .. सकाळी पोहोचल्याचा एक फायदा म्हणजे रांग जास्त नव्हती.
.आत आल्यावर त्या भव्य इमारतीत पहिले मोठे दालन डायनासोर ने व्यापले
होते . करोडो व लक्षावधी वर्षापूर्वी च्या भूतलावरच्या रहिवाशांचे
.जगभरात उत्खालनात सापडले जीवाश्म व हाडे त्यांनी येथे जमा करून ठेवली होती
. .मेमेथ म्हणजे हत्तीचा पूर्वज व त्याच्या हाडाचा अजस्त्र सापळा पाहून
तसेस दोन मजली उंच डायनासोरचे मांडीचे हाड पाहून माझी छातीच दडपली .
दुसर्या दालनात अनाकोंडा /सिंह आदी जनावरांचे पेंढे भरून ठेवले होते
.त्यातील जगभरातील सापांचा दालन अप्रतिम होते. .भारतीय किंग कोब्रा .आणी
माझ्याहून उंच आफ्रिकन मंबा (सर्वात विषारी साप पाहून मी शहरलो ).पुढचे
दालन जगभरातील चिमण्या व पक्षी जसे मोर /गिधाड /गरुड / शहामृग /व अनेक
विविध पक्षी जमातींचे होते ..जगभरातील पक्षि हे येथे त्यांच्या मूळ
वसतीस्थान व माहितीसह येथे उपलब्ध होते .त्यांच्यावर आधारित छोटी शोर्ट
फिल्म काही तासाच्या अंतराने तेथील थिएतर मध्ये दाखवत होते . मग अचानक
पोटात परत कावळे कोकलायला लागले .त्यांच्या आलिशान उपहारगृहात माझा
मस्तपैकी ब्रंच झाला .
ब्रंच ह्या संकल्पनेचे जनक इंग्रज आहेत . हा इंग्लिश साहेब रविवारी
आपल्यासारखे जरासे उशिरा उठतो .ब्रेक फास्ट जे त्याच्या दैनदिन जीवनातील
प्रमुख जेवण असते .त्याला ब्रेक देऊन लंच व ब्रेक फास्ट ह्यांची सरमिसळ
करून दुपारचे भलामोठा जेवणाचा शाही बेत असतो..इंग्लिश हॉटेलात हा ब्रंच
करणे म्हणजे पर्वणी त्याला साथ फ्रेंच वारुणी हवीच .मी मात्र वारुणीची
तहान येथे बियर वर भागवली
.
.मग मुक्काम पुढचे दालन म्हणजे जगातील सर्वोत्कृष्ट स्फटिक /दगड धोंडे.
थंड झालेल्या ज्वालामुखीचा लाव्हा ह्यांचा होता . अथांग अवकाशातून आलेल्या
उल्कांना पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण आपल्या अनावर आकर्षणाने आपल्या कडे खेचते
व पतंगाप्रमाणे ह्या सुद्धा बिनधास्त झेपावतात व जळून खाक होतात .
त्यापैकी दस का दम असेल्या क्वचितच आपले अस्तित्व टिकवून ठेवतात .
मानवांसाठी तो एक संशोधनाच्या द्र्ष्टीने फार मोठा ठेवा असतो .हा अमूल्य
ठेवा मला हाताळायला मिळाला ह्याचे मी भाग्य समजतो. त्यातल्या काही इतक्या
मोठ्या होत्या कि जर एखाद्याच्या डोक्यावर पडल्या असत्या तर कपाळमोक्ष ठरला
असता.
.
मोठ्या व छोट्या उल्का हाताळतांना ह्या पृथ्वी वरील नाहीत ह्याच गोष्टीचे
थ्रील जास्त होते .तीच गोष्ट डायनासोर व मेमेथ चे खरे खुरे सांगाडे
पाहताना होती .बाकी सुट्टीचा दिवस असल्याने पालक लहान मुलांना घेऊन आले
होते. .पाशात्यां देशात मुलांवर वैज्ञानिक संस्कार व दृष्टीकोन हा
बाल्यावस्थेत जाणीवपूर्वक विकसित केला जातो हि नवी माहिती मिळाली. ..
मला व केट ला फ्रांक फ्रुट फारसे आवडले नव्हते .
कारण ह्या शहर जगभरातील निर्वासित लोकांनी भरलेले आहे अरब व आफ्रिकेतील व
अफगाण व पाकिस्तान मधील निर्वासित ह्या शहरात वस्ती करून आहेत .
. त्यामुळे प्रमुख स्टेशनच्या बाहेर आल्यावर गर्दुल्ले /बेवडे रस्त्यावर
दिसतात व समोरच युरोपातील प्रख्यात व मोठे वेश्यालय आहे . स्टेशन बाहेरील
फार मोठा एरिया हा वेश्यागृहांनी व्यापला आहे .व युरोपातील अत्यंत स्वस्त
दरात येथे हा व्यापार चालतो .येथे पूर्व युरोपातील व दक्षिण अमेरिकेतील
मुलींचा भरणा जास्त असतो . हा बाजार येथे एवढ्या खुल्या रीतीने अधिकृत
रित्या चालतो .कारण जर्मनीत वेश्या व्यवसाय हा काही प्रमाणात कायदेशीर आहे
. .खरे तर शहराच्या मध्यभागी अशी वस्ती असणे हे काही भूषण नव्हे पण
युरोपातील हे प्रमुख व्यापारी शहर बारा महिने व्यापारी संमेलन कितीतरी
मेळावे /प्रदर्शने ह्यांनी व्यस्त असतात .
त्यामुळे परदेशी लोक येथे मोठ्या प्रमाणत व्यापाराला येतात . ह्याच लोकांना डोळ्यासमोर ठेवून लाल इमारती येथे उभारल्या आहेत .
.बाजूला अनेक सेक्स शॉप आहेत .ह्यांच्यात पुस्तके /विडीयो .ह्यांच्यात
निळ्या सिनेमांचे मिनी थिएतर असते . ते पाहून मला थेट चेंबूर ते टिळकनगर
स्थानकादरम्यान राहुलनगर ची आठवण झाली .हे संपूर्ण नगर ( झोपडपट्टी ह्या
सिनेमागृहांसाठी प्रसिद्ध होती .)
तसेस हंटर /हातकड्या /चित्र विचित्र मुखवटे व बाहुल्या आणि बरेच काय काय
विकायला असते .लंडन मध्ये सोहो हा परिसर ह्या सर्व गोष्टींसाठी प्रसिद्ध
आहे .अर्थात तो शहराच्या खूपच आतल्या भागात आहे . येथे अमली पदार्थ
सहजासहजी कसे काय मिळू शकतात ह्याचे मला नेहमीच नवल वाटते . युरोपातील अनेक
शहरात आढळतात तसे सार्वजनिक टेलिफोन बूथ मध्ये खाजगी नंबर सचित्रासह
दिले असतात. तेथे अनेक खाजगी व स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्या वेश्यांचे त्या
कोणती सुविधा किती दराने दिल्या जाणार हे खुलेआम लिहिले असते .. ह्याला
सेक्स मेन्यू कार्ड म्हणतात . अर्थात वेश्याव्यवसायाला मान्यता असल्याने
त्यांना बँकेत कर्ज सुद्धा मिळू शकते .
युरोपियन युनियन मध्ये पूर्व युरोपातील राष्ट्रे सामील झाली नि
त्यांच्या गरीब देशातील बेकारांचे तांडे ह्या प्रगत देशात घुसले नि हा
व्यवसाय येथे बहरात आला ..ज्या पूर्वेतील देशांना युरोपियन युनिअन मध्ये
प्रवेश मिळाला नाही त्या देशातील तरुणी मग आखाती देशात व आजकाल मुंबई गोवा
दिल्ली सारख्या बड्या शहरात आल्या आहेत .केवळ दोन वेळच्या अन्नासाठी
त्यांना हे काम नाईलाजाने करावे लागते . अर्थात त्यांना फसवून येथे आणले
जाते .अशीच एक फसवून आलेली मुलगी कशी बशी पळून निघाली .सध्या ती आमच्या
हॉटेलात काम करते . ती येथे बेकायदेशीर असल्याने शुद्ध मराठी भाषेत भंगी
काम करते .आय मीन करायची .कारण एका जागी जास्त वेळ काम करण्याचा धोका ती
स्वीकारत नाहीत .इमिगेग्रेशन तेथे कधीही धाड टाकू शकते .अत्यंत गोड व
कामसू वृत्तीच्या ह्या मुलीने तिची सर्व कर्मकहाणी व अनुभव आम्हाला
सांगितले . . केट ने तीला विचारले .तू तुझ्या देशात का परत नाही ? मी काही
मदत करू का ?पैशाची...
तर ह्यावर तिने थंड पणाने उत्तर दिले . सध्या माझ्या देशात यादवी चालू
आहे . माझे सारे कुटुंब युद्धात मरण पावले .मी व माझा धाकटा भाऊ वाचलो .तो
सध्या माझ्या एका आप्तांकडे मोठ्या मिनतवारी करून ठेवला आहे .जर
महिन्याला पैसे तिथे पाठविले नाही तर कदाचित त्याला त्रास होईल. .मी येथे
वेटरचा नोकरी मिळावी ह्या आशेवर आली होती . पण नशिबी केवळ २० युरोमध्ये
वेश्या व्यवसाय करणे नशिबी आले. ह्यात तिला हातात फक्त १५ च मिळत होते .
म्हणून तेथून निघून तीने हॉटेलात हे काम स्वीकारले .
'''मी तुमच्या देशात कर न भरता राहते .पण माझा नाईलाज आहे '' ह्यावर मी केट ला सांगितले
.
''भारतातील २ कोटीहून जास्त बेकायदेशीर बांगलादेशी सुद्धा दारिद्र्याला
कंटाळून आपल्या देशात आले .'' पण भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते .
.आमच्या देशात गरीब लोकांना खायला नाही .वर ह्याचे पोषण कोण करणार ? मला
अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्याकाशाचे विधान आवडते''.नैतिकता देशाच्या
सीमेवर संपते '',
ह्याचा अर्थ देशाच्या सुरक्षिततेसाठी आदर्शवाद व नैतिकता बासनात गुडाळून
ठेवायची .प्रगत देशातील पंचतारांकीत हॉटेलात हलक्या दर्जाची कामे अश्या
बेकायदेशीर वस्ती केलेल्या लोकांकडून करून घेतात . कमी पैशात जास्त काम
म्हणजे भरपूर नफा असे अस्सल भांडवलशाहीचे सूत्र वापरतांना कायदा फाट्यावर
मारला जातो .
लवकरच आम्ही ह्या शहरातून मुक्ततेचा मार्ग शोधू लागलो .पण आहे त्या
वास्तव्यात आजूबाजूची शहरे पाहून घेऊ असा विचार डोक्यात आला . नि जर्मनीत
अत्यंत उच्चभ्रू लोकांचे स्टायलीश शहर डिसेलदोर्फ कडे आमचा मोर्चा वळला .
सध्या वास्तव्य म्युनिक शहरात आहे .येथे नुकताच जगप्रसिध्ध ऑक्टोबर फेस्टिवल साजरा करण्यात आला.
आम्ही हॉटेल व टुरिझम च्या व्यवसायात असल्याने भारतात शिकत असल्यापासून ह्या सोहळ्याविषयी खूप काही वाचून होतो.
जर्मनी आणी युरोप मध्ये म्युनिक म्हटले की ऑक्टोबर फेस्ट असे समीकरण आहे.
ह्या शहराविषयी माहिती मी देईनच .पण फेस्ट मधील मदहोश करणाऱ्या अनुभवावर आधारीत
.
माझा ऑक्टोबर फेस्टिवल ( बियर फेस्टिवल ) वर लेख इ सकाळ मध्ये आला आहे.
तोच येथे भाग ११ मधे अडकवत आहे.भूतलावरील सगळ्यात मोठा मानवी सोहळा असे
ह्याचे वर्णन केले जाते.मदिरा आणी मदिराक्षी साठी हा फेस्ट प्रसिद्ध आहे.
जर्मनी मध्ये जर दीर्घकाळ वास्त्यव्यासाठी ( १ एका वर्षाहून जास्त )
जर येणे झाले .की येथे सरकारचा इंटिग्रेशन कोर्स करावा लागतो. ह्या कोर्स
मध्ये बे१ म्हणजे ४ त्या लेवल पर्यत जर्मन भाषा आणी जर्मनीच्या
आर्थिक,सामाजिक,राजकीय,सांस्कृतिक,व युरोपियन युनियन बद्दल माहिती शिकवली
जाते.त्यावर सरकारतर्फे परीक्षा घेऊन त्यात उतीर्ण झालेल्या लोकांनाच येथे
विसा वाढवून दिला जातो. आमच्या देशात राहणार असाल तर आमची भाषा व संस्कृती
जाणून घेतलीच पाहिजे असा पवित्रा येथील सरकारने काही वर्षांपूर्वी घेतला.
युरोपियन युनियन ची स्थापना झाली तेव्हापासून युरोपातील अग्रगण्य
अर्थव्यवस्था असलेल्या जर्मन देशात नागरिकांना सर्वाधिक सोशल बेनिफिट दिले
जातात .( ते देण्यासाठी प्रचंड प्रमाणात कर देखील आकारतात .) ह्यासाठी
युनियन मध्ये नुकतेच सामील झालेले पूर्व युरोपातील विकसनशील देश तर आता
त्यांच्या रांगेत स्वतःचे अवमूल्यन झालेले ग्रीस, पोर्तुगाल, इटली ह्या
देशातील लोंढे जर्मनीत येत आहेत. ह्या मुळे जर्मनी मधील त्यांच्या
सांस्कृतिक व सामाजिक
अस्तित्वाला धोका निर्माण झाला होता .त्यांच्या ह्या समस्येत तुर्कस्थान ने मोलाची कामगिरी बजावली आहे.
१हिल्या व दुसर्या महायुद्धात सहकार्य केल्याबद्दल ह्या देशातील लोकांना दुसर्या महायुद्धानंतर
जर्मनी मध्ये विसा सुलभ रीत्या देण्यात आले . ( ह्या मागील खरे कारण
देशच्या पुनर्विकासासाठी त्यांना स्वस्त व कष्टाळू मजूर हवे होते .इंग्लंड
ने आफ्रिकेतील आपल्या वसाहती मधून उदा केनिया
भारतीय व आफ्रिकन लोक ह्याचं कारणांसाठी इंग्लंड मध्ये आणली .आजही
आफ्रिकेतील काही देशातून भारतीय वंशाची व्यक्ती ( जिचे पूर्वज इंग्रजाकडून
येथे आणले गेले ) ते इंग्लंड मध्ये कधीही येऊन स्थायिक होऊ शकतात.
.त्यांना पासपोर्ट मिळू शक्ती हा कायदा आहे .मात्र श्रीलंकेत नेलेल्या तमिळ
लोकांसाठी ही सवलत नाही ( हाच इंग्रजांचा उरफाटा कारभार )
तुर्की लोकांची तिसरी पिढी येथे नांदत आहे. पण राष्ट्राच्या मुख्य
विचारधारेपासून त्यांनी स्वतःला जाणीवपुर्वक अलिप्त ठेवले आहे. येथे
जन्मलेले अनेक तुर्की हे जर्मन पासपोर्ट धारक असतात .पण त्यांचे पाल्य
त्यांना बालवयात तुर्कस्थानात आपल्या नातेवाईकात रहायला पाठवतात .( कमाल
पाशाचा आधुनिक तुर्कस्थान कधीच इतिहास जमा झाला आहे. आता त्या जागी कट्टर
धर्मांध पिढी निर्माण होत आहे .ह्याच कारणासाठी तुर्कीचे युरोपियन युनियन
मध्ये पदार्पण खोळंबले आहे .) ही मुल तरुण झाली की लग्न करून जर्मनी मध्ये
परत येतात .आल्यावर जर्मन भाषेचा शिक्षणाचा गंध नसला तरीही छोटी मोठी
कायदेशीर व बेकायदेशीर अनेक काम करून आपल उदरनिर्वाह करतात. ह्यांचे सर्वात
महत्वाचे काम प्रजोत्पादन असते., किंमान ३ ते ५ मुले हवीत ह्या कडे
त्यांचा कटाक्ष असतो .( जर्मनी मध्ये दर महिन्यात पालकांना प्रत्येक
मुलामागे २०० ते साडे तीनशे युरो संगोपनासाठी दिले जातात .) माझ्या
परिचयातील एक तुर्की कुटुंब महिन्याला १००० युरो सरकार कडू घेते. येथे
बेरोजगार भत्ता हे फारच रंजक प्रकरण आहे
.माझ्या परिचयातील एक जर्मन कुटुंब उच्च मध्यमवर्गीय मंदीच्या लाटेत
बेरोजगार झाले. त्यांना सरकार कडून बेकार भत्ता त्यांच्या मूळ पगाराच्या ७०
% वर्षभर मिळाला .त्यांच्या मुलांच्या खर्चाची बिले सरकारला दाखवून पैसे
मिळू लागले. अनेक प्रकारची सवलतींची खिरापत त्यांना मिळाली. उदा जर्मनी
मधील प्रवासात सवलत ....
ह्यामुळे किमान १ वर्ष तरी त्यांनी नोकरी शोधण्यासाठी विशेष प्रयत्न केले
नाहीत .त्यांना दर महिन्याला सरकारला दाखवावे लागते की आम्ही नोकरीसाठी
प्रयत्न करत आहोत ह्यासाठी सरकार तर्फ्रे त्यांना नोकरीसाठी अनेक
कार्यालयात पाठवले जाते. पण एखाद्या नोकरीत च्या मुलाखतीत रिजेक्ट कसे
व्हायचे ( उदा लायकीपेक्षा जास्त वेतन मागणे ...) हे त्यांना अनुभवातून
कळून आले .त्या जर्मन जोडप्यातील एका ने नामी शक्कल लढवली .सध्या आपण
मंदीमुळे डिप्रेशन चे बळी झालो आहोत व आपल्यावर उपचार चालू आहेत .असे तो
मुलाखतीच्या सुरवातीला सांगून मोकळा होतो.( वैद्यकीय सेवेचा खर्च विमा
कंपनी देणार असल्याने व सध्या बेरोजगार असल्याने त्यांच्या हफ्त्याचा भार
सरकार आपल्या खांद्यावर घेत असल्याने त्याने स्वतःची ट्रीटमेंट चालू केली
.) त्यामुळे त्याला नोकरीत लगेच रिजेक्ट करतात व हि खुशखबर तो लगेच भ्रमण
ध्वनी वर आपल्या पत्नीस देतो .अर्थात अशी कुटुंब जर्मनीत फारच कमी आहेत. पण
नोकरी गेल्यावर दुसरी शोधण्यासाठी जीवापाड धडपड येथील नागरिक करत नाहीत
हे देखील सत्य आहे. ह्याच साठी इटालियन व इतर प्रगत युरोप राष्ट्रातील
कर्जबाजारी देशातील जनता त्यांच्या देशात कर्जामुळे हे सोशल बेनिफिट कमी
केल्याबद्दल स्वतःच्या देशात आंदोलने करत आहेत
.( ह्याच मुळे युके मध्ये काही महिन्यापूर्वी दंगल उसळली, भले
तत्कालीन कारण छोटेसे होते .) त्या जनतेपुढे सोपा उपाय जो बिहारी व युपी
वाल्यापुढे असतो तोच आहे.
'' जर आपले राज्य ,सरकार आर्थिक विकास करत नसेन, आपल्याला रोजी रोटी देत
नसेन तर युरोपियन युनियन च्या कायद्यानुसार ही लोक युनियन मधील २७ देशात
कुठही बिना विसा जाऊन वास्तव्य करू शकतात'' .आता जर्मन सरकार पुढे पेच
निर्माण झाला ह्या वाढीव लोंढे व त्यांचा खर्च ह्यांचे काय करावे .(
अश्यावेळी भारत चीन व अमेरिका येथून येणारे उच्च शिक्षित मजूर जे
महिन्याला १००० ते २००० युरो, कर म्हणून सरकारला देतात .मात्र पासपोर्ट
धारक नसल्याने ह्या सोशल बेनिफिट पासून वंचित राहतात .त्यांचा प्रमुख आधार
आहे.) विज्ञानात जगात अव्वल असणारे जर्मन राष्ट्राला आशियातील जपान व इतर
राष्ट्राकडून संशोधन व इतर क्षेत्रात स्पर्धा करावी लागत आहे .ह्या
क्षेत्रात अव्वल राहण्यासाठी जर्मन सरकारने अमेरिकेचे एच १ विसा धोरण व
शिष्यवृत्ती च्या धाच्यावर आधारीत धोरण राबवले आहे.
तिसर्या जगातील हुशार व अनुभवी अभियंते ,वैद्यकीय पेशातील लोक, व पी एच
डी साठी विसा नियम शिथिल केले असून प्रचंड सवलतींचा वर्षाव केला आहे.
भारतातून अनेक तरुण ह्या व अनेक क्षेत्रात जर्मनीत सध्या येत आहेत
.त्यापाठोपाठ लाल माकडे सुद्धा येत आहेत .आयटी क्षेत्र म्हणजे येथे
भारतीयांची मक्तेदारी आहे .मला अनेक जर्मन, मी भारतीय आहे हे कळल्यावर
आयटीत आहात का ? असा प्रश्न विचारतात.
.आपल्या लोकांचे ह्या शेत्रातील प्रभुत्व नक्कीच सुखावणारे आहे .आपल्या
अनेक भारतीय आयटी कंपन्या येथे कार्यरत आहेत .पूर्व अविकसित जर्मनीत आयटी
संस्कृती रुजवण्यात आपल्या देशी कंपन्यांचा सिंहाचा वाटा आहे. भारतातील
जर्मन भाषा शिकवणारे अग्रगण्य संस्था गुटे अर्थात मैक्स मूलर भवन मध्ये
मी जर्मन भाषेची मुळाक्षरे गिरवत होतो तेव्हा अभियांत्रिकी, शिक्षण नुकतेच
संपवलेले किंवा शिकत असलेले किंवा सध्या नोकरी करत असलेली मूले येथे भाषा
शिकत होते. एका वर्षाच्या आत ते जर्मनीत दाखल झाले .
आज गुटे मध्ये मुंबईत ( काळा घोडा ) येथे जर्मन भाषा शिकतांना एक गोष्ट
प्रकर्षाने जाणवली .की येथील ८० % शिक्षक ,विद्यार्थी महाराष्ट्रीयन होते .
खुद्द जर्मन सरकार अनुदान देत असल्याने ह्या संस्थेत एक लेवल फक्त १२०००
हजारात करता येते. उर्वरीत जगात दीड ते दोन लाख मोजावे लागतात . येथील
संधींचा भारतीयांनी व माझ्या मराठी बांधवांनी फायदा करून घ्यावा जर्मनीत
मराठी टक्का वाढवा असे मनापासून वाटते .म्हणून हा लेखणी प्रपंच .
ऑक्टोबर फेस्ट च्या लेखाची लिंक
दुसेलडॉल्फ हे नॉर्थ राहिन वेस्ट फालीया ह्या जर्मन राज्याच्या
राजधानीचे शहर आहे .व्यापार व आर्थिक उलाढाल प्रचंड असलेल्या ह्या शहराचा
आत्मा फेशन आहे . युके किंवा भारताप्रमाणे अनुक्रमे लंडन व मुंबई अश्या
एकाच ठिकाणी इंडस्ट्री केंद्रित आहेत तसे येथे नाही. तर हे शहर
वृत्तपत्र व्यवसाय व फेशन साठी प्रसिध्द आहे.
लोकसंख्येच्या बाबतीत हे देशाच्या पहिल्या ५ चात येते .
आम्ही डी बी ह्या मध्यम पल्याच्या गाडीतून फ्रांक फ्रुर्त पासून २ तास प्रवास करत तेथे पोहचलो आम्ही ह्या बान चे सभासद झालो होतो ते पण १५० युरो प्रत्येकी भरून. त्यामुळे जर्मनी व युरोपात जिथे जिथे हि बान जाते विशेतः इटली व फ्रांकारीश म्हध्ये (फ्रांस ला जर्मन ह्या नावाने संबोधतात) तर आपल्याला इंडीश ,युरोपला आयरोपा. तेथे आम्हाला तिकिटात ५०% सवलत मिळणार होती. आम्हा दांपत्यांचा भटक्या स्वभावाचा दूरदर्शी विचार करून मी ३०० युरोची आगाऊ गुंतवणूक केली होती (ह्या बाबतीत मनमोहन माझे आदर्श आहेत .)तेथे गेल्यावरच अनेक पातळ माझ्या जवळून जातांना मॉडेल रेंप वर जाताना जसा नट्टा पट्टा करतात तश्या ह्या सुपर मॉडेल च्या थाटात फिरत होत्या .अधिक तपशीलात लिहू शकत नाही कारण तपशिलाने लिहिण्यासाठी दांडगे निरीक्षण करायला फुरसतच मिळाली नाही . मैत्रिणीचे बायकोत रुपांतर झाल्याचे हे एक दुष्परिणाम असतात. असो .
आमच्या सौ हातात नकाशा घेऊन बारीक अक्षरातील अगम्य रस्तामधून माग काढत हिल्टन हॉटेल चा पत्ता शोधीत होत्या. मी पण त्यात माझी मान मध्येच घालून माझेही लक्ष आहे असा अभिनय करत होतो.(शाळेत बालनाट्यात उत्तेजनार्थ बक्षिश मिळालाय मला. .) तर शेवटी आम्ही हिल्टन ला पोहचलो. तेथे जाण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्याची प्रमुख डागी ही आमची हिल्टन मधील लंडन हित्रोची बॉस. तिने आम्हाला जर्मनीत मध्ये सेटल होण्याची अभिनव कल्पना दिली होती व तिचा पाठपुरावा करून आमच्या कुटुंबांच्या डोक्यात रुजवली होती. तेव्हा तिला सदिच्छा भेट देणे क्रमप्राप्त होते. ( लंडन ला आम्ही तिच्या आतल्या गोटातील माणसे होतो) तिने खरेतर हॉटेलात राहण्यासाठी बोलावले होते. पण दुसर्या दिवशी म्युनिक मध्ये नोकरीसाठी काही कॉल आले होते. त्यासाठी दागीचे मार्गदर्शन ,जमल्याच ओळख ,वशिला ह्या गोष्टी ओघाने आल्या होत्या . ( हिल्टन साला पगार कमी देतो पण जगभरातील हिल्टन मध्ये स्टाफ ला सवलतीच्या दरात राहण्यास मुभा देतो.) तेथे गेल्यावर पहिला शेरा म्हणजे आपल्या हिथ्रोची सर नाही .इति बाईसाहेब.
बाकी हीथ्रोच्या हॉटेलात आमच्या रेशीम गाठी जुळल्याने त्या वास्तू बद्दल आम्हाला ममत्व आहे.त्यात ह्या दागीच्या कुशल नेतृत्र्वाखाली आम्ही सलग ३ वर्ष बेस्ट एअर पोर्ट हॉटेल ऑफ द वल्ड असा किताब पटकावला होता.अर्थात आमची डागी म्हणजे गोबेल ची आजी शोभावी एवढी प्रचार तंत्रात वाकबगार. सतत काही न काही रित्या हॉटेल सतत झोतात राहील ह्याची दक्षता घ्यायची.इराक युद्धात ब्रिटीश सैनिकांसाठी रक्तदान शिबीर तेही रेड क्रोस च्या माध्यमातून हि माझी कल्पना तिला भन्नाट आवडली होती.
तिने आमचे प्रसन्न चित्ताने स्वागत करून व्यवस्थित सरबराई केली. ४५
वर्षाची हि डागी एकदा केट ला म्हणाली होती कि मला घरी जायलाच आवडत
नाही-कारण संध्याकाळी रिकामे घर खायला उठते-हि कर्तुत्ववान महिला अजून
सिंगल होती.तिचा प्रियकर म्हणजे आमचा माजी बॉस हा विवाहित आहे-त्याची
मुलगी आता १६ वर्षाची होती-तो इंग्लिश साहेब आपल्या परिवारासह अमेरिकेत
स्थायिक होण्यासाठी शिगागो हिल्टन ला जॉईन झाला- व जातांना स्कॉट लेंड
वरून हिची वर्णी लंडन ला लावून गेला होता-पुणेकर मुंबईत नोकरी करत असताना व
आठवडा किंवा महिन्यातून एकदा तरी पुण्यात येतात तसे हि लोक अमेरिका ते
युके वारी करत असल्याची वंदता होती- ( डागी ने आम्हाला शिगागो ला जायचे का
म्हणून विचारले होते पण युरोप आम्हाला सोडवला नाही.
हिल्टन चे विशाल मायाजाल अमेरिकेत पसरले आहे. युरोपातही आहे मात्र येथे त्यांचा भर चार तारांकित हॉटेलांवर जास्त असतो. )
तिथून आमची स्वारी निघाली ते शहर पाहण्यासाठी वल्ड कप चा ज्वर सगळीकडे कडे चढला होता.
मुंबईत फेशन स्ट्रीट जवळ जशी खाऊ गल्ली आहे तशी येथे बियर गल्ली आहे.अल्त
बियर हि ह्या शहराची प्रमुख बियर हे नाव बियर ला १८०० व्या साली पडले-भर
उन्हात बियर व सोसेज ब्रेड खाणे हा खाऊ गल्लीतीतील मस्त अनुभव होता. जोडीला
ह्या गल्लीत विविध आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थांचे ठेले होते-आपलाही
होता-पण मी काही तेथे गेलो नाही ,जर्मनीत भारतीय अन्न म्हणून बेचव पदार्थ
विकले जातात- त्यामुळे लंडन व दुबई अबू धाबिची देसी पदार्थांची चव अजूनही
मनी रेंगाळत असते.
.तसे लोक संख्येच्या मानाने १७ टक्के परदेशी नागरिक येथे राहतात पण त्यात
बहुसंख्य तुर्की /ग्रीक व इटालियन ह्यांचा भरणा आहे-येथे जर्मनीतील ३ र्या
क्रमांकाची ज्यू कम्युनिटी आहे काही साडे सात हजार च्या आसपास जी एकूण लोक
संख्येच्या १ टक्का आहे-
.रायन नदींचा किनार्यावरून भटकणे व किनार्याला लागून असेल्या बोटीवर
उपहारगृह आहेत त्यावर भोजन करणे म्हणजे गंमत असते- तेथून आमची स्वारी थेट
टीवी टॉवर कडे गेली-हे ह्या शहराचे प्रमुख आकर्षण आहे-हा एक उत्तुंग मनोरा
असून त्याच्या वर जायला वेगवान विजेचे पाळणे आहेत-१० युरोचे तिकीट देऊन जसे
टपावर आलो-काचेच्या बंदिस्त घुमट असलेल्या टपावरून सर्व शहर नजरेच्या
टप्यात येत होत-तेथून शहराची मनमोहक छबी टिपून घेतली . येथे एक छोटेखानी
यंत्र होते-त्यात २० सेंट युरो चे नाणे टाकले तर ते पार चपटे होऊन बाहेर
येते-म्हणजे लहानपणी आम्ही नाणी रुळाखाली ठेवायचो-व ती चपटी नाणी संग्रहात
ठेवायचो-तसा प्रकार होता-ह्यांचे विमान तळ जर्मनीत ३र्य क्रमांकांचे आहे,
.१हिले फ्रांक फ्रुट तर दुसरे म्युनिक.
रेल्वेस्थानक पण भव्य दिव्या आहे .दिवसाला १००० गाड्या येथे थांबतात युरोपला जाण्यंचा एक प्रमुख थांबा म्हणून हे शहर फेमस आहे.
मग आमची स्वारी तडक को कडे आली . को म्हणजे कोनिग , किंग्स अवेन्यू म्हणजे खरेदीचे मोक्याचे ठिकाण-या रस्त्यावर अनेक जगातील अनेक नामवंत ब्रांड ठाण मांडून बसले आहेत-त्यात ज्वेलरी ,कपडे आदी गोष्टींचा समावेश होतो- ह्या भागात गाळ्यांचे भाव जर्मनीत सर्वात जास्त आहेत-(मी लगेच आमच्या नरीमन पोइंत च्या कार्यालयीन जागांचे भाव जगात महागाईत २ र्या क्रमांकावर आहेत हे सांगून टाकले.
येथील उपहारगृहे नेहमीच एलिट का काय म्हणतात अश्या लोकांनी गजबलेली
असतात- एखाद दुसरी हॉलीवूड चे प्रसिद्ध आजी माजी सेलेब्रेटी सुद्धा येथे
बाहेर बसून शेम्पेन च्या ट्युलिप ग्लास घेऊन (खास ह्या वारुनीसाठी
बनविलेला ) त्या बरोबर चीज आणि द्राक्ष किंवा स्ट्राबेरी असा सरंजाम
असतो. भारतात पंचतारांकित हॉटेलात मुशाफिर गिरी करण्याआधी चकणा म्हणजे
चमचमीत मसालेदार तिखट पदार्थ असे माझ्या मनात समीकरण होते.तेव्हा चीच
वैगेरे हा चकणा म्हणून वापरणे हे म्हणजे सुरवातीला पुचाट वाटले होते-आता
त्याची सवय झाली म्हणा सगळे कसे पॉश वाटते-
बाकी प्रेटी वूमन ह्या प्रख्यात सिनेमात रिचर्ड शाम्पेन सह स्त्राबेरी व
क्रीम मागवतो तेव्हा पासून मला नेहमीच प्रश्न पडायचा ह्या कोन्बिनेशांच्या
एवढ्या लोकप्रिय असण्याचे रहस्य काय आहे.?
.अनेक गौरांगनांना ह्याबाबत विचारले असता हे कॉम्बिनेशन हिट आहे
रात्रीच्या उत्तरार्ध जर मधुर करायचा असेल तर पूर्वार्धात हॉटेलच्या रूम
मधून ह्या जोड गळीची मागणी केले जाते.
अनेक विख्यात कंपन्यांचे बडे अधिकारी वर्षातून अर्धा वेळ जगभरातील
निरनिराळ्या पंचतारांकित हॉटेलातून वास्तव्य करून असतात तेव्हा सिंगल
स्टेटस ने रूम बुक असली तरी रात्री ह्याच खोल्यातून ह्या गोष्टींची मागणी
होते. मग डू नोट डिस्टर्ब चा बोर्ड लटकतो. ह्यावरून माझ्या आयुष्यात
कधीही न विसरणारा एक प्रसंग मला आठवला.
एकदा असाच बोर्ड असतांना आमच्या हॉटेलातून नाईलाजाने एकाचा दरवाजा
वाजवला गेला. . आतील माणसाने खेकसून हॉटेल कर्मचार्यास हाकलले ,रूम मधील
फोन चा रिसीवर आधीच बाजूला काढला होता .सकाळी तो इसम रागात हॉटेलच्या
लॉबीत आला.( आपली गैरसोय झाली आहे अशी बोंब मारली की हॉटेलवाले मग अनेक
फ्री वोवचर देतात. हे त्याला अनुभवाने ठावूक असावे.) अशी काय इमर्जन्सी
होती म्हणून रात्री तुम्ही कडमडला ,तुम्हाला इंग्रजीत लिहिलेला दारावरील
बोर्ड दिसत नाही का ?...
त्याचे सारे बोलणे संपल्यावर रिसेप्शन वरील माझ्या मित्राने त्याला
सांगितले .की रात्री तुमचा मुलीचा फोन आला होता .तुमच्या पत्नी अकस्मात
हदया विकाराने वारल्या ( सदर इसम वयस्कर होता ,ही बातमी कानावर पडताच मटकन
तेथेच खाली बसला .आता आम्हाला इम्ब्यूलेन्स मागवावी लागते का अशी भीती वाटू
लागली. त्याचा तो भकास चेहरा अजूनही डोळ्यासमोर येतो.
.नंतर हन्देल्स्ब्लात्त ,
हेइनिस्चे पोस्त , विर्त्स्चाफ्त्स्वोचे , देऊत्स्चेस
विर्त्स्चाफत्स्ब्लात्त अश्या जर्मनीतील उच्चार व लिहिन्यास किचकट
विख्यात वृत्त पत्रे व प्रसारमाध्यमांचे प्रमुख कार्यालयांना बाहेरूनच
दर्शन झाले-(चांगली २ ते ३ तास पायपीट झाली-मात्र सुसह्य हवामानात व
संगतीमुळे ती सुखकारक झाली इतकेच काय ते मिळवले हे शहर अनेक उद्यानानासाठी
प्रसिद्ध आहे-त्यापैकी एका उद्यानात (म्हणजे बायको नेईन त्या ) मी मुकाटपणे
गेलो-भर शहरात अशी निरव शांतता पाहून खुश झालो-उद्यानात सुंदर तळे होते.
त्यात बदके हंस बगळे असे अनेक जलचर मुक्तपणे विहार करत होते.त्यांचा मला
नेहमीच हेवा वाटतो.कारण उत्क्रांती काय ती फक्त माणसाच्या बाबतीत झाली. हे
जलचर अनेक शतके हेच आपले साधे जीवन मुक्तपणे जगत आहेत.आपण मात्र प्रगतीच्या
नावाखाली आपले आयुष्य भौतिक सुखांच्या पाठी लागून जमेल तेवढे संघर्षमय
करून ठेवले आहे. वर जीवन एक संघर्ष अशी मुक्ताफळे सुद्धा उधळली आहेत . .
क्रमश ..
लाल कौलांचं गाव!
अशाच एका मोठ्या विकांताला बॅगपॅक भरुन गाडीत टाकले आणि लाँग ड्राइव्हवर जायचा विचार केला. रस्ता नेईल तिथे जायचे अशा विचाराने ए ३ ह्या ऑटोबानला (फ्रीवे) ला लागलो आणि एकदम लक्षात आलं आपल्याला रोथेनबुर्गला जाता येईल की.. आता तुम्ही म्हणाल हे कोणत गाव? तर फ्रांकफुर्ट पासून साधारण १८० किमीवर ताउबर नदीवर वसलेलं हे गाव म्हणजेच रोमँटिक रोडवरचा एक थांबा रोथेनबुर्ग! जेव्हा फ्रांकफुर्ट आणि बर्लिन जर्मनीच्या नकाशावरचे ठिपके होते तेव्हा रोथेनबुर्ग मात्र नावारुपाला आलेलं एक स्वतंत्र संस्थान होतं आणि आजही मध्ययुगातला इतिहास जपून ठेवलेलं टूरिस्टांसाठी पर्वणीच असलेलं एक महत्त्वाचं गाव आहे. तेव्हा आम्ही तिथेच आपला तंबू टाकायचं ठरवलं.
एका थांब्यावर गाडी थांबवून जालावर पुढच्या रस्त्याचा शोध घेतला तर तिथे अनेक रोथेनबुर्गे दिसली की .. हे म्हणजे अगदी आपल्याकडे असलेल्या दोन दोन गोरेगाव,तळेगाव सारखेच झाले ना! त्यामुळे ताउबर नदीवरच्या रोथेनबुर्गचा आणि तिथल्या हॉटेलांचाही पत्ता जीपीसला विचारला आणि एका ठिकाणी फोन केला. एबरलाइन बाईंनी अगदी अगत्याने जणू काही आपले पाहुणेच आहेत अशा थाटात कसं या ते सांगितलं आणि साधारण तासाभरात तिथे पोहोचलो. रुमची चावी घेऊन बॅगा आत टाकायच्या आणि फ्रेश होऊन फिरायला बाहेर पडायचे असं ठरवत असतानाच बाईंनी गावचा नकाशा पुढे केला आणि कसं जायचं तेही समजावून सांगितले.
गावाची खंदकयुक्त भिंतीची वेस अनेक शतकांचा इतिहास पोटात घेऊन अजूनही राखणीला उभी आहे. त्या वेशीतून आत शिरलं की बांधीव,दगडी रस्त्यावरून सरळ चालत जायचं की मार्क्ट्प्लाट्झ म्हणजेच बाजाराचा चौक लागतो. ही गावातली "हॅपनिंग प्लेस"!
इथे असलेला टाउनहॉलचा टॉवर म्हणजेच राटहाउसटुर्मवर जाऊन सगळ्या गावाचे विहंगम चित्र मनात आणि कॅमेर्यात साठवता येतं.
बाजारच्या रस्त्याने थोडं पुढे गेलं की ख्रिसमस म्युझिअम आहे. ख्रिसमसच्या दिवसात तर ते खूपच नटलेले सजलेले असतेच पण इतर दिवसातही ख्रिसमससाठीच्या सजावटीच्या वस्तू अगदी पुरातन काळातली सजावट कशी होती हे दाखवणारी चित्रं, मॉडेलं, त्यावेळची अॅड्व्हेंट कॅलेंडरं, ख्रिसमस कार्डे, ख्रिसमस ट्रींचे स्टँड एवढेच नव्हे तर पहिल्या महायुध्दात सीमेवरच्या शिपायांना पाठवण्यासाठी केलेले मिनी ख्रिसमस्ट्री स्टँड्स आणि ज्या पेट्यातून ती पाठवली त्या लहान संदूकाही फार कलात्मकतेने रचून ठेवल्या आहेत.
ख्रिसमस म्युझिअम उजवीकडे ठेवून मोठ्या रस्त्याने सरळ पुढे गेलं की सेंट याकोब किर्श म्हणजे याकोब चर्च लागते. हे प्राचीन चर्च म्हणजे जर्मन लाकडी कोरीव कामाचा उत्तम नमुना आहे. बायबल मधील अनेक प्रसंग लाकडाच्या कोरीव करामतीने जिवंत केले आहेत.
थोडं पुढे गेलं की मध्ययुगीन क्राईम म्युझिअम लागते.ह्या चार मजली संग्रहालयात शिक्षेची आणि छळाची वेगवेगळी क्रूर साधने पाहताना उदासून जायला होतं. त्या काळात चर्चमध्ये प्रवचनात झोपला,पाव बनवताना त्याचा आकार लहान ठेवला अशा 'गुन्ह्यांना'ही ज्या भयंकर शिक्षा होत्या ते पाहताना अंगावर काटा येतो.
ह्यानंतर मात्र एका मोठ्या ब्रेकची मनाला आणि शरीराला गरज भासतेच. तेथेच समोर असलेल्या पुरातन कालीन 'रोटर हान' नावाच्या उपाहारगृहात खास बायरिश केझं स्पेट्झलं (एक प्रकारच्या न्यूडल्स्+चीज+ आणि बिर्याणीवर असतो ना तसा तळलेला कांदा),माउल्ट ताशं (पालक व चीजचे पुरण भरलेला एक प्रकारचा पास्ता) आणि बिअरमासचा आस्वाद घेणं अगदी आवश्यक वाटू लागते.आणि त्यानंतर डेझर्ट म्हणून श्ने बाल (एक प्रकारची पेस्ट्री)!
क्राइम म्युझिअमला उतारा म्हणून खेळणी आणि बाहुल्या कसं वाटतं? १५ व्या शतकातल्या टॉय आणि डॉल म्युझिअम मध्ये ७८०० ऐतिहासिक,पुरातन खेळणी आणि बाहुल्या आहेत. जर्मन आणि फ्रेंच कलाकारांची ही पुरातन कारागिरी पाहताना आपणही वय विसरुन लहानपणात रमतो.
चांदण्या रात्री आकाश अंगावर पांघरून घेत मार्क्ट्प्लाट्झ पासून नाइट
वॉचमन ची टूर सुरू होते. कंदील आणि काठी हातात घेतलेला, त्या काळातले कपडे
घातलेला हा रात्रीचा शिपाईगडी काठी आपटत आणि कंदिलाने रस्ता दाखवत आपल्याला
बोट धरुन त्या काळात कधी नेतो समजतच नाही.
रोथेनबुर्ग ओब डेअर ताउबर म्हणजे जर्मन मध्ये ताउबर नदीवरचं लाल (कौलांच)
किल्लेवजा गाव! कोंबुर्ग रोथेनबुर्गच्या सरदाराने इस. ९५० मध्ये ताउबर
नदीवर लहानसे धरण बांधवले. सन १०७० मध्ये हा 'किल्लेवजा गाव' उंच
डोंगराच्या कुशीत पायाशी ताउबर नदीला ठेवून वसला. स्टॉ़यफर कॅसल बांधताना
हे गाव सापडले. कॅसलच्या मध्यवर्ती भागी बाजारची जागा आहे, थोडं पुढे गेलं
की आहे सेंट याकोब चर्च! पुढे १३ व्या शतकात भिंत आणि मनोरे बांधले गेले
आजही रॉडर कमानी आपल्या खांद्यांवर त्यातील श्वेतमिनार (वाइसरटुर्म) आणि
मार्कुसटुर्म म्हणजे मार्कुसमिनार यांना घेऊन उभ्या आहेत.
त्या जुन्या काळात रइस ज्यू मंडळींचा प्रभाव येथे होता तर नंतर प्रोटेस्टंटांचा पगडा होता. पण १३५६ मध्ये झालेल्या भूकंपात हा स्टॉयफर कॅसल उध्वस्थ झाला. पुढे १७व्या शतकात झालेल्या तीस वर्षांच्या युध्दात प्रोटेस्टंट गावकर्यांनी निकराने लढा दिला पण ४०,००० च्या वर फौज घेऊन आलेल्या कॅथोलिक काउंट ऑफ टिलीने त्यांचा सहजी पाडाव केला आणि गाव धुवून नेले. कंगाल झालेले रोथेनबुर्ग पुढे म्हणजे इ.सन १८०० च्या सुमारास बाव्हेरियाला जोडले गेले आणि कार्ल स्पिट्झवेग सारख्या कलाकारांनी रोथेनबुर्गला नवसंजीवनी दिली. रात्रीचा फौजदार आपल्या रसाळ वाणीतून तो प्राचीन काळ उभा करत असताना परत बाजारापाशी येऊन टूर संपते, आपल्याला त्या काळातच सोडून ..
वेशीच्या भिंतीवर चढून चालताना कालाचा पापुद्रा अलगद उलगडतो. भिंतीतल्या टेहेळणीच्या झरोक्यांतून पाहताना वाटतं , आत्ता खाड खाड बूट वाजवत जर्मन ट्रूप येईल, समोरच्या दगडी रस्त्यावरुन बग्ग्या जातील, घोड्यांच्या टापा ऐकू येतील. त्या भिंतीवरुन फेरफटका मारताना जगभरातील अनेक देशातून केलेल्या भिंतीच्या डागडुजीसाठीच्या मदतीची नोंद कोरलेली आढळली आणि मोठं नवल वाटलं.
तेथून मग रोथेनबुर्गच्या टॉपलर कॅसल मध्ये गेलं की ह्यामागचं रहस्य
समजतं. तेथे १९४५ सालातले रोथेनबुर्गवर बाँबहल्ला झाल्याचे चित्र आहे. ३१
मार्च १९४५ ला १६ विमानातून येथे बाँबहल्ला झाला.३०६ घरं उजाडली, ६
सार्वजनिक इमारती, ९ पाण्याच्या टाक्या आणि ६०० मी. भिंत एवढं सगळं
उद्ध्वस्थ झालं. ३७ जण मरण पावले. अमेरिकेच्या असि. सेक्रेटरीला हे समजले.
त्याला रोथेनबुर्गचे ऐतिहासिक महत्त्व आणि सौंदर्य माहित होते. त्याने
बाँबहल्ला न करण्याचे आदेश दिले आणि चढाई करुन ते काबीज केले.
महायुध्दानंतर लवकरात लवकर डागडुजी केली गेली आणि त्यासाठी जगभरातून
देणग्या स्वीकारण्यात आल्या. त्या भिंतीवरची नावे हाच इतिहास मूकपणे बाळगून
आहेत.
काळाचा एक मोठा पट आपल्या समोर उलगडलेला असतो पण लाल कौलांचं हे गाव मात्र आपल्याच नादात, आपल्या काळात रमलेलं असतं!
ह्या लाल कौलांमध्ये आम्ही अडकून पडलो आणि परत परत तिथे जात राहिलो. उन्हाळ्यातलं 'कूल',कडाक्याच्या थंडीत धुक्याच्या नाहीतर हिमाच्या दुलईत गुरफटलेलं किवा फॉलमधलं रंगीत.. रोथेनबुर्गची सगळीच रुपं भावतात. परत एखादा मोठा विकांत आला किवा अगदी दोन दिवसांसाठी कुठे जावसं वाटलं की गाडी आपेआप त्या लाल कौलांच्या गावाच्या रस्त्याला लागते.
(काही चित्रे जालावरून साभार)
https://www.misalpav.com/node/30637
गुटेनबर्ग
पुस्तकं वाचायला सर्वांनाच आवडतात पण आपल्याला ही पुस्तके कोणामुळे
वाचता येणे शक्य झाले आहे हे मात्र बर्याच जणांना माहित नसते. त्याच कलंदर
अवलियाची ही ओळख!
१५व्या शतकाचा सुरुवातीचा काळ! र्हाइन आणि माइन नद्यांच्या संगमावर वसलेलं
छोटंसं टुमदार गाव, 'माइन्झ'! फ्रिडरिश ( फ्रिलं) ग्लेन्सफ्लाइश आणि एल्स
वायरीश हे सोनारकाम करणारे दांपत्य तिथं सुखानं नांदत होते. त्यांना तीन
मुले फ्रिलं (ज्यु), एल्स (ज्यु) आणि सगळ्यात धाकटा योहानेस (योहान)! त्या
काळी सार्यांनाच लिहावाचायला शिकणे परवडत नसे, पण माइन्झच्या बिशपचे सोनार
असल्याने ग्लेन्सफ्लाइश मंडळी गावातल्या सधन प्रतिष्ठितांपैकीच होती.
नुसतेच सोनारकाम नव्हे तर वेगवेगळ्या आकारातील नाणी तयार करण्यामध्ये
ग्लेन्सफ्लाइश मंडळींची उस्तादी होती आणि त्यांना तो अधिकारही होता, इतकेच
नव्हे तर खोट्या नाण्यांच्या वरच्या फोर्जरी केसेस करिताच्या अझिझ
कोर्टामध्ये त्यांना मानाची जागा होती. त्या काळी माइन्झ मध्ये आपापली
सरंजामी बिरुदे मोठ्या अभिमानाने मिरवण्याची पध्दत होती. ग्लेन्स्फ्लाइश
मंडळी त्यामुळेच गुटेनबर्ग अशी ओळखली जाऊ लागली. १४२७ च्या सुमाराला
त्यांनी हे नाव कागदोपत्री स्वीकारले. म्हणजेच योहानेस गुटेनबर्गचे पूर्ण
नाव खरे तर योहानेस ग्लेन्सफ्लाइश झुअर लाडन झुम गुटेनबर्ग असे लावले गेले.
जरा कळत्या वयाची झाल्यावर फ्रिलं, एल्स आणि योहानेस ही तिन्ही मुले लिहावाचायला शिकू लागली. इतकेच नव्हे तर त्यांच्यासाठी अनेक पुस्तके आणवली गेली. छोट्या योहानेसला तर हा खजिनाच मिळाल्यासारखे होते. कारण त्या काळी फक्त हस्तलिखित पुस्तके उपलब्ध असत. हाताने पुस्तक लिहायला खूप वेळ लागत तर असेच पण मग फक्त मर्यादितच प्रती बाजारात येत आणि त्याही खूप महाग ! त्यात ही पुस्तके हाताळतानाही खूप काळजीपूर्वक वापरावी लागत. रोजची भाकरी मिळवायची भ्रांत असलेल्यांना पुस्तकेच काय लिहिणे, वाचणे ही सुध्दा चैनच होती म्हणायची..
जरा कळत्या वयात आल्यावर योहानेसला जाणवू लागले की आपल्याकडे असलेली ही पुस्तके खूपच किमती आहेत, सामान्यांच्या तर ती आवाक्याच्या बाहेरचीच आहेत. कोमल मनाच्या योहानेसला हे फारच खटकू लागले. सार्यांनाच परवडणारी पुस्तके कशी बरं तयार करता येतील? ह्यावर त्याचा विचार चालू झाला. एकीकडे आपल्या पिढीजात सोनारकामाचे प्रशिक्षणही चालू होतेच. साधारण १४११ च्या सुमारास माइन्झमध्ये अॅरिस्टोक्रॅटांविरुध्द मोठी आंदोलने झाली आणि परिणाम म्हणजे शेकड्याहून अधिक कुटुंबे माइन्झ सोडून इतरत्र स्थलांतरित झाली. एल्सच्या माहेरची काही इस्टेट र्हाइनकाठच्या अल्टाव्हिला येथे होती. गुटेनबुर्ग मंडळी मग तेथे गेली. एरफुर्टच्या युनिवर्सिटीमध्ये योहानेसचे शिक्षण झाले.
सध्या फ्रान्समध्ये असलेल्या स्ट्रासबुर्गमध्ये सुध्दा एल्सच्या माहेरचे नातेवाईक होते. स्ट्रासबुर्ग मध्ये आपली नावनोंदणी करुन सोनारकामाची सुरुवात योहानेसने तेथे केली, पण डोक्यात मात्र सतत छपाईचेच विचार ! एका पडक्या गढीतल्या खोलीत जुजबी दुरुस्त्या करुन तेथे त्याने आपले काम सुरू केले. सोनारकाम आणि आपला छपाईचा ध्यास यात तो इतका बुडून गेला होता की पहा़टे जे तो घर सोडे ते रात्री उशीरा परतत असे. इतर कोणात विशेष मिसळत नसे, सतत त्याच विचारात मग्न असे. साहजिकच शेजार्यापाजार्यांना दिवसचे दिवस त्याचे दर्शन नसे. लोकांना कुतुहल होते हा एवढा वेळ घराबाहेर करतो तरी काय? हळूहळू तर्ककुतर्क सुरू झाले, त्या पडक्या वाड्यात तो बहुदा चेटूक, करणी, जादूटोणा असलं काहीतरी करत असणार.. पण ह्या असल्या अफवांकडे लक्ष द्यायला सुध्दा गुटेनबर्गकडे वेळ नव्हता. तो आपले काम चिकाटीने करत राहिला.
हळूहळू तुरळक प्रमाणात का होईना बाजारात छापील पुस्तके दिसू लागली.
ब्लॉक प्रिंटिंगच्या तंत्राने ही छपाई केली जात असे. सर्वात आधी जे पुस्तक
छापायचे आहे त्या पुस्तकाच्या पानाच्या आकाराचा एक कठीण लाकडाचा ब्लॉक
बनवला जाई. मग त्या पानावरचा शब्द न शब्द ब्लॉकच्या गुळगुळीत पॄष्ठभागावर
अत्यंत काळजीपूर्वक कोरला जाई. त्यानंतर प्रत्येक अक्षराच्या आजूबाजूचे
लाकूड बाजूला केले जाई. असे केल्याने ती अक्षरे वर उचलली जात. आता हा ब्लॉक
शाईत बुडवून त्याचा दाब कागदावर दिला की एक पान छापले जाई. एकेका पानासाठी
५ ते ६ तास लागत असत, तरीसुध्दा हाताने पुस्तक लिहिण्यापेक्षा हे कितीतरी
जलद होते. पण प्रत्येक पानाचा ब्लॉक बनवणे हे मात्र किचकट आणि वेळखाऊ काम
होते. हे सगळे माहिती झाल्यावर योहानेसला पुस्तके छापणे याहून सोपे कसे
करता येईल ह्याचा विचार करण्याचा जणू छंदच लागला. अनेक प्रयोग तो करत होता
पण यश काही येत नव्हते.
जवळची पुंजी ही आता संपत आली होती.
अत्यंत निराश होऊन शेवटी तो माइन्झला परत आला. पण अशा निष्कांचन अवस्थेतही त्याचा ध्यास मात्र कायम होता. अशातच त्याला फाउस्ट भेटला. सोपी आणि स्वस्त छपाई करण्याचे आपले स्ट्रासबुर्गमधले फसलेले प्रयत्न त्याने फाउस्टला सांगितले. तो फारच प्रभावित झाला आणि पैशाची तजवीज करायची तयारी त्याने दर्शवली. योहानेसला परत उभारी आली. परत नव्या जोमाने, नव्या उत्साहाने त्याने आता अथक प्रयत्न सुरु केले. एकीकडे जुन्याच पध्दतीने लॅटिन व्याकरण पुस्तकांची छपाई करण्याचे घाटत होते. एक छापखाना अशा पुस्तकांसाठी आणि एक बायबलसाठी करायचा असेही ठरत आले, पण म्हणावे तसे यश मात्र हातात येत नव्हते. सुलभ छपाई आणि स्वस्त पुस्तकांचे स्वप्न काही खरे होत नव्हते. आता फाउस्टला तो आपला पैसा वाया घालवतो आहे, त्याचा गैरवापर करतो आहे असे वाटू लागले आणि त्याने आर्चबिशपकोर्टात गुटेनबर्ग विरुध्द दावा ठोकला. निकाल फाउस्टच्या बाजूने लागला आणि छपाईची सगळी सामग्री जप्त झाली. गुटेनबर्ग दिवाळखोर झाला.त्याच्याकडे उरली ती फक्त दुर्दम्य इच्छाशक्ती, ध्यास आणि जीवाला जीव देणारे काही सवंगडी! त्यातल्याच एकाने छापखान्यासाठीचे भांडवल पुरवले आणि एक लहानशी जागा भाड्याने घेतली. परत एकदा हा फिनिक्स राखेतून उठला आणि परत एकदा प्रयोगांचे सत्र अथक, अविरत चालू झाले.
'ब्लॉकप्रिंटींग ' हाच गाभा ठेऊन काही नवे करता येईल का? याचा विचार तो करु लागला. आतापर्यंत एकेका पानाचे ब्लॉक तयार करुन छपाई होत असे. ह्याला वाटले, आपण एकेका अक्षराचाच ब्लॉक का करु नये? मग त्याने लाकडाचे एकेका अक्षराचे टाइप तयार केले. हे तर झकासच काम झाले! कारण आता ही अक्षरे कोणत्याही शब्दाकरता वापरता येण्यासारखी होती. पूर्वीसारखा एका पानाकरता एक ब्लॉक आता लागणार नव्हता. A to Z ही अक्षरे सगळे पुस्तक छापायला पुरेशी आहेत हे एकदा लक्षात आल्यावर तर क्रांतीच घडली! लाकडाचे ब्लॉक्स कालांतराने छपाई साठी कुचकामी ठरतात आणि परत नवे ब्लॉक बनवावे लागतात हे लक्षात आल्यावर गुटेनबर्ग लाकडाहून कठीण असे काय वापरता येईल? ह्यावर विचार करु लागला. जन्मजात सोनार असल्याने धातूंच्या गुणांची त्याला उत्तम कल्पना होतीच , म्हणून मग त्याने लाकडी टाइप ऐवजी मेटल टाइप वापरायचे ठरवले. शिसे, टिन आणि अँटिमनीच्या संयोगातून मिश्रधातू तयार करुन त्याने अक्षरांचे टाइप्स बनवले आणि क्रांतीचा नवा अध्यायच लिहिला नव्हे ,नव्हे छापला गेला. त्याच्या ह्या मिश्रधातूने बनवलेल्या टाइप बॉक्स मध्ये सर्व मुळाक्षरे, विरामचिन्हे सगळे धरुन २९० कॅरेक्टर्स होती. त्या काळी पाण्यातली शाई वापरुन लिहिलेली किवा छापलेली पुस्तके असत आणि ती लवकर खराब होत असत. त्यावर उपाय म्हणून तेलातली शाई वापरुन गुटेनबर्गने टिकाऊपणा आणखी वाढवला.
'42 Line Bible' हे लॅटिन भाषेतले पहिले पुस्तक इस १४५२ मध्ये जन्माला आले. दोन खंडातल्या ३०० पानी पुस्तकाच्या प्रत्येक पानावर ४२ ओळी होत्या. सुस्पष्ट आणि रेखीव! कागद आणि वेलम् (एक प्रकारचे चामडे) अशा दोन्ही प्रकारात ह्या बायबलच्या साधारण १८० प्रती छापल्या. आजही त्यातील सुमारे ५० प्रती उपलब्ध आहेत. हे करतानाच थोड्या प्रतींमध्ये पानांवरील काही शीर्षके रंगीत छापण्याचा प्रयोगही त्याने केला. पुढे इस. १४५३ मध्ये फाउस्ट आणि शॉफरने छापलेल्या ‘माइन्झ पीसाल्टर’मध्ये लाल आणि निळ्या रंगात शीर्षके छापली गेली. ही बातमी सार्या युरोपभर पसरली आणि लवकरच युरोपातल्या सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये छापखाने सुरु झाले. सत्तरीला आलेल्या गुटेनबर्गची महती नासावच्या अर्चबिशपना समजली आणि ' होफमान ' म्हणजे ' जंटलमन ऑफ द कोर्ट ' असा त्याचा सन्मान केला गेला. ३ फेब्रुवारी १४६८ रोजी हा कलंदर प्रतिभावंत कलाकार माइन्झ येथेच अनंतात विलिन झाला आणि माइन्झ येथील फ्रांसिस्कन चर्च येथे त्याला चिरविश्रांती देण्यात आली. 'गुटेनबर्ग उनिवर्सिटेट- माइन्झ', असा माइन्झ युनिवर्सिटीच्या नावात मात्र तो चिरकाल जाऊन बसला.
अनेक शतकांनी त्याच्या ५०० व्या, ६०० व्या जयंतीचे निमित्ताने जर्मनी, इंग्लड, अमेरिका, कंबोडिया,हंगेरी अशा अनेक देशांनी त्याच्या नावचे फर्स्ट डे कव्हर ,पोस्ट तिकिटे काढून त्याला मानवंदना दिली तर काही देशांनी आपल्या करन्सीमध्ये स्थान देऊन गौरवले. 'मॅन ऑफ द मिलेनियम' किताबाने गुटेनबर्ग पूर्ण जगतात अमर झाला आहे.
(सर्व फोटो जालावरून साभार.)
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.