http://misalpav.com/node/13247
ही भटकंती जरा जुनी आहे पण जास्त आठवणीत राहीलेली....
सकाळीच पाण्याची बाटली आणि केकचा पुडा घेऊन वाशी-अलिबाग एस-टी धरली आणि कर्नाळ्याचा पायथा गाठला.गणेशचतुर्थीचा दिवस आणि त्यातही मिड-वीक असल्यामुळे कोणीही नव्हते. कधीही पाऊस पडेल असे अन्धारून आले होते.
कर्नाळ्याचा पायथा आणि एकंदर परीसरच गच्च झाडीने झाकलेला आहे. हे जंगल नवख्या माणसाला दचकवेल असे भयाकारी नक्कीच आहे. पण तसे घाबरण्याचे काही कारण नाही. इथे वन्य प्राणि मला तरी कधी दिसले नाहीत. कर्नाळा पक्शी अभयारण्य आहे.
या वेळी माझ्याकडे माझा जुना Canon A400 होता. १-२ भट्क्यांपलीकडे दिवसभरात कोणीही दिसले नाही. कर्नाळा एक दिवस माझा पर्सनल फोटो स्टुडीओ होता.
त्यातलेच काही फोटोज....
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.