http://misalpav.com/node/21680
गेल्या फेब्रुवारीत अहिल्याबाईंच्या महेश्वरास
गेलो होतो. अतिशय सुंदर जागा. नर्मदाकाठी किल्ल्यावर अहिल्याबाईंचा वाडा
जसाच्या तसा जतन केलेला आहे. मी अनेक वर्षांपूर्वी इथे गेलेलो असताना ज्या
स्थितीत किल्ला व गाव होते, जवळ जवळ तसेच अजून असल्याचे पाहून बरे वाटले.
मात्र पूर्वी किल्ल्याच्या अगदी वरच्या बाजूला असलेल्या अहिल्याबाईं च्या
वाड्याच्या दुसऱ्या मजल्यावर व सज्जात जाता यायचे, तिथे आता प्रवेश
प्रतिबंधित आहे. याबद्दल चवकशी करता तिथले व्यवस्थापक कोणी मराठी सद्गृहस्थ
होते, त्यांनी सांगितले, की वर अनेक खोल्या भरून होळकर घराण्याचे हजारो
मूळ दस्तावेज ठेवलेले आहेत, ते आता अगदी जीर्ण झालेले असून सर्व मोडी लिपीत
आहेत. लवकरच पुण्याहून कोणी मोडी जाणणारे विद्वान येउन ते सर्व बघणार
आहेत.
यानंतर मात्र त्यांनी जे सांगितले, ते मला फार धक्कादायक वाटले. त्यांच्या
म्हणण्याप्रमाणे पुण्याचे ते विद्वान ज्या कागदपत्रांना महत्वाचे म्हणून
सांगतील, तेवढे सोडून अन्य सर्व नर्मदेत बुडवण्यात येतील. हे ऐकून आम्ही
सुन्नच झालो, मी त्यांना म्हटले की अहो, त्यात अतिशय महत्वाचे असे दस्तावेज
असू शकतात, ज्यांचे महत्व त्या विद्वानांना ठाउक असेलच असे नाही, तरी
तुम्ही ते दस्तावेज दिल्लीतील राष्ट्रीय अभिलेखागाराला दिले पाहिजेत.
दिल्लीचे नाव काढल्यावर स्वारी गडबडली, आणि काही सारवासारवीचे बोलून नंतर
उठून गेली.
मी होळकरांचे सध्याचे वंशज, यशवंतराव होळकर यांचा (अमेरिकन वा ब्रिटीश
पत्नीपासून झालेला मुलगा-) रिचर्ड यांना भेटून बोलावे, असा विचार केला,
परंतु तेंव्हा ते तिथे नव्हते.
यावर खरोखर जर कुणी काही करू शकत असेल तर करायला हवे. एकदा ते दस्तावेज नर्मदेत गेले की गेलेच....
मध्यप्रदेशात असणारया मिपाकरांना याबद्दल तपास करता येइल, तसेच पुण्याचे कोण विद्वान हे काम करणार आहेत, हेही बघता यावे.
महेश्वरचे मी घेतलेले काही फोटो:
अहिल्याबाई होळकर यांचा वाडा:
अहिल्याबाई यांची गादी:
महेश्वर मधील एक मंदिरे:
मंदिरावरील कोरीव कामः
होळकर राजवंशः
महेश्वर जवळील 'मंडलेश्वर' मधील राम मंदिर. हे एका पार्शी माणसाने (नवस
पावला म्हणून) १९३२ साली बांधले. त्यामुळे इमारत पारशी वळणाची वाटते:
या मंदिरातील श्रीरामाची मूर्ती.
या मंदिराच्या फरशीवर माझा नातू आहान पहिल्यांदाच रांगू लागला:
हारदा येथील राम मंदिर आणि तेथील राम पंचायतनाच्या मूर्ती:
अन्य काही फोटो इथे:
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.