Saturday, July 22, 2023

बालि सहल

 https://www.maayboli.com/node/48512

या महिन्यात, बालि ( BALI ) ला ५ दिवस गेलो होतो. ५ दिवस खुप भटकलो. त्याची फक्त एक झलक.

१) विमानातून उतरल्यावर थेट हॉटेलवर न जाता, तनाह लॉट या देवळाला भेट दिली.

२) बेनोआ भागातल्या आमच्या नोव्होटेल हॉटेलच्या रुमचा व्हरांडा

३) त्या भागतल्या एका हॉटेलच्या प्रवेशद्वारावरचे देखणे शिल्प

४) हॉटेलमधेच सादर झालेला फायर डान्स

५) हॉटेलमधली देखणी ऑर्किड

६) एक रम्य सकाळ

७) या खास जागी ५०,००० रुपियांना एक कप या दराची अप्रतिम कॉफी प्यायलो

८) एका तळ्याकाठचे देऊळ

९) बोटॅनिकल गार्डनमधले एक दृष्य

१०) स्नेक स्कीन फ्रुट

११) कोण आलंय मला बघायला ?

१२ ) शू , कोण आवाज करतंय ? झोप मोडली ना !

१३ ) एक रम्य संध्याकाळ

१४ ) स्पेसशिप ????

१५ ) डिझायनर कासव

१६ ) हे काय असू शकेल ?

१७ ) माझ्या कल्पनेतल्या परफेक्ट देवळाचा परिसर

१८ ) सिंगापूरच्या विमानतळावरील नेहमी भरभरून फुलणारी ऑर्किड्स

हि फक्त झलक बरं का, अजून बघायचेत का ?

तो इंडोनेशियन रुपियातील दर आहे. भारतीय रुपयांत बदलला तर 50,000.00 IDR = 258.26 INR म्हणजे ती कॉफी फक्त रु. २६० ला पडली. खूप जास्त महाग नाही.

एका डॉलरचे वट्ट साडेबारा हजार रुपिया होतात. गेल्या गेल्या आपण करोडपती नाही तरी लखपति होतोच.
कॉफीबद्दल वाचून जरा विचित्र वाटेल. एक मांजरासारखा छोटासा प्राणी असतो तो कॉफीची फळे खातो.
पण बिया मात्र त्याच्या विष्ठेतून तशाच बाहेर पडतात. त्या बिया गोळा करून, स्वच्छ करून त्यापासून कॉफी बनवतात.
हा प्राणी निसर्गात खुप चंचल असतो त्यामूळे अश्या बिया गोळा करणे फारच जिकीरीचे असते. त्यामूळे ती कॉफी खुप महाग असते. बालिमधे तो प्राणी पाळीव म्हणून ठेवतात.
हे सगळे माहीत असूनही कॉफी प्यावीशी वाटली आणि ती खरेच अप्रतिम स्वादाची होती.
तिथेच लाल आल्याची आणि पांढर्‍या हळदीची " कॉफी " प्यायलो.

स्नेक स्कीन फ्रुटची साल खरेच सापाच्या कातेसारखी असते. आतमधे गुलाबीसर गराच्या तीन पाकळ्या असतात आणि त्यात एकच बी असते. चवीला आंबटगोड आणि स्वादाला बोर + अननस + सफरचंद असे लागते.
करकरीत असते त्यामूळे टिकायला चांगले.

स्वच्छता तर खरेच वाखाणण्याजोगी आहे.
ते सुंदर कळसासारखे दिसतेय ते म्यूझियम आहे.. .. आता दर आठवड्याला फोटो देत जाईन.

तनाह लोट

यावर्षीच्या सुट्टीत बालिला जायचे अगदी शेवटच्या दिवसात ठरले. माझा आधी फिजीला जायचा विचार होता पण
लेकीचे आणि माझे वेळापत्रक जुळले नाही. मग तायपेईचा विचार केला होता. नेटवर जी माहिती आहे त्यानुसार
भारतीयांना तैवानचा व्हीसा ऑन अरायव्हल मिळतो असे कळले पण ते चुकीचे होते.

शेवटी थॉमस कूकच्या मानसी गोरे यांनी सुचवल्याप्रमाणे बालि ला जायचे पक्के केले, कधी नव्हे ती मला यावेळेस
माझा पुतण्या, केदारची सोबत होती.

सिंगापूर एअरलाईन्सची तिकिटे तर बूक केली. आणि मी भारतात आल्यावर हॉटेल निवडले. नंतर विचार करता
डेली एस्कर्शनस पण बूक करता येतील असे वाटले आणि ती पण बूक केली. हे सगळे अगदी शेवटच्या दिवशी केले.
सगळ्याचे कन्फर्मेशन यायला वेळ लागणार होता.

आधी कबूल केल्याप्रमाणे मी वर्षूच्या घरी जायला निघालो तरी माझ्या हातात तिकिट वा हॉटेल व्हाऊचर नव्हते.
वर्षूने बरीच वर्षे इंडोनेशियात वास्तव्य केले आहे तिच्याकडून काही टिप्स मिळाल्या. रमेशभैयानी ( मि. वर्षू ) मला
तिथे आर्टइफेक्ट्स घ्यायचा सल्ला दिला.. दोघांचे सल्ले नंतर खुपच उपयोगी पडले.

विमानतळावर पोहोचलो तरी हातात काहीच पेपर्स नव्हते. केदार ते सगळे घेऊन आला. ( थॉमस कूकने घरी पाठवले
होते. )

सिंगापूर एअरलाईन्सने सिंगापूरला पोहोचलो. दूध घातलेला मसाला चहा देणारी ती एकमेव एअरलाईन असावी.
सिंगापूरला जेमतेम १ तास स्टॉप ओव्हर होता. देनपसारचे विमान लागलेलेच होते.

सकाळी बालिला पोहोचलो. व्हीसासाठी फक्त २५ डॉलर्स लागतात. फोटो वगैरे लागत नाही. ते काम झटपट होते.
बाहेर आमचा एजंट विजय माडे आलाच होता. विजय खुप बोलका आहे आणि पुढे ५ दिवस त्याने छान माहिती
दिली. माझ्या सर्व प्रश्नांना छान उत्तरे दिली.

तनाह लोट आणि आमचे हॉटेल दोन वेगवेगळ्या दिशांना असल्याने आधी थेट तनाह लोट ला गेलो.

तनाह लोट चा शब्दश: अर्थ समुद्रातली जमीन. समुद्रात असलेल्या एका खडकावर हे देऊळ १५ व्या शकतात, निराथा नावाच्या संताने बांधले. त्याने तिथे हिंदू धर्म स्थापन केला.
विजयने घाई करायचे कारण म्हणजे भरतीची वेळ होत आली होती. भरती असताना तिथे जाता येत नाही.
आम्ही पोहोचलो त्यावेळी भरतीची सुरवात झालीच होती त्यामूळे थेट त्या देवळाजवळ जाता आले नाही.
तसेही बालितल्या देवळात सर्वांना प्रवेश नसतोच. काही उत्सवांच्या दिवशीच ती उघडतात.

या ठिकाणचा सूर्यास्ताचा नजारा खुप छान असतो. पण तेवढा वेळ आमच्याकडे नव्हता. जे काही बघितले त्याचे
शब्दात वर्णन करणे अशक्य आहे.

१) विमानतळाहून बाहेर पडल्यावर दिसणारे एक देखणे शिल्प.

२) नंतर दिसलेला मारुतीराया

३) वाटेतली भातशेती. तिथे वर्षातून भाताची ३ पिके घेतात.

४) बहुतेक घरांच्या बाहेर दिसणारा हा स्तंभ. पण हे वृंदावन नाही. याबद्दल मग लिहितो.

५) तनाल लोटचे एक देऊळ.

६) जरा जवळून

७) दुसरी बाजू

८) त्यावरचा रस्ता

९) तिथले एक शिल्प

१० ) त्या वाटेच्या उजव्या हाताकडचे दृष्य

११ ) वाटेच्या शेवटी असणार्‍या देवळाचे प्रवेशद्वार

१२ ) तनाह लोटचे प्रथम दर्शन

१३ ) तिथे जायची वाट. भरतीमूळे बंद झाली होती. ( तिथे सूचना व घोषणा होत असूनही काही ऑसी लोक
धाडस करतच होते. )

१४ ) तिच वाट

१५ ) आणखी एक शिल्प

१६ ) लाकडावरचे अप्रतिम कोरीव काम

१७ ) उजव्या हाताला दूरवर दिसणारा एक धबधबा.

१८) डाव्या बाजूचे दृष्य

१९) आवारातल्या विसाव्याच्या जागा

२०) देवळाच्या शिल्पकलेशी मेळ खाणारी निवार्‍याची जागा

२१) तिथले सभागृह

२२ ) तेच सभागृह

२३) वॉटर लिली

२४) विस्तीर्ण पटांगण ( नेटवर लिहिल्याप्रमाणे तिथे दुतर्फा दुकाने नाहीत, सर्व दुकाने मुख्य गेटच्या बाहेरच आहेत. तीसुद्धा आवश्यक वस्तू विकणारीच आहेत. ) आतमधे मोजकी दुकाने आहेत. स्वच्छ टॉयलेट आहे.

२५ ) देवळात जायची वाट

२६) उंचावर दिसलेले एक ऑर्किड

क्रमशः

ज्यांच्या मनात तिथे जायचे आहे, त्यांना खात्रीने सांगू शकेन कि ही मालिका संपेस्तो तूम्हा सर्वांचा अगदी दृढ निश्चय होणार.
आपण फक्त स्वच्छतेचे सुविचार लिहितो, तिथे ती आचरणात आणली जाते..
बी, तूझ्या बीबीची आठवण आली होती, पण घाईत वाचायचा राहिला.

वर्षू, म्हणतेय ते खरेय.. इतका मोकळा, स्वच्छ, हवेशीर विमानतळ बघितल्याबरोबर आपण योग्य जागी पोहोचलो असे वाटू लागते. एकच सांगावेसे वाटते कि जाताना एप्रिल / मे चे प्लानिंग करा. त्यावेळी हवा सुखद असते. या दिवसात जरा गरम असते आणि पाऊसही असतो. आम्हाला दोन्ही मिळाले.. पण अंगोलातला माणूस काय त्याला घाबरणार ? ( मेली कोंबडी आगीला भिते कि काय ? )

बेनोआ

माझे यावेळचे प्लानिंग शेवटच्या दिवसात झाल्याने मला विमानाच्या तिकिटाचे आकर्षक डील मिळाले नाही.
बालि ( देनपसार ) ला जायला सिंगापूर एअरलाइन्स शिवाय एअर एशिआ, जेटस्टार ( या दोन्ही लो कॉस्ट आहेत ) चा पण पर्याय आहे, त्यांच्यावर आकर्षक डील मिळू शकेल. मलेशियन, कोरीयन, कातार वर पण कधी कधी चांगले डील मिळू शकते. पण त्यासाठी तारखा खुप आधीपासून ठरवायला हव्यात.

हॉटेलचेही तसेच. आम्ही निवडलेले नोव्होटेल आम्हाला ८० डॉलर्स पी पी पडले. पण त्यापेक्षा बजेटमधे ( आणि अर्थातच जास्त दरातही ) हॉटेल उपलब्ध आहेत. मी आजवर भारत आणि इतर अनेक देशांतल्या दिडशेच्यावर हॉटेल्स मधे वास्तव्य केले आहे. तरीपण हे हॉटेल मला आजवर अनुभवलेल्या हॉटेल्सपेक्षा सर्वात जास्त आवडले. सेवा उत्तम होतीच शिवाय हॉटेलच्या आतमधला आणि बाहेरचाही परीसर खुप रम्य होता. तर चला
आज तिथली सैर करू.

( बालिचे ९०० च्या वर फोटो आहेत. त्यातले निवडक इथे देताना विषयानुरुप न देता, जसे काढले त्या क्रमाने देतोय.. )

तर हे हॉटेल आहे बेनोआ भागात. दोन्ही बाजूला समुद्र असणारा हा भाग आहे. अर्थातच इथे याच रस्त्यावर अनेक हॉटेल्स आहेत. टोकाला एक गावही आहे. मधोमध रहदारीचा रस्ता आहे.
आमचे हॉटेल रस्त्याच्या दोन्ही बाजूला होते. त्यामूळे रस्ता सारखा ओलांडावा लागायचा. पण त्यासाठी हॉटेलने
एक खास सेवक ठेवला होता. आणि गावातले लोकही विना तक्रार थांबत असत. ( रस्त्यावर तिथे कुठेही स्पीड ब्रेकर दिसला नाही. )

१) रमेशभैयांनी मला बालितल्या कलाकृतींबद्दल सांगितल्यावर मी मनाशी ठरवले होते कि आपण मनसोक्त बघून घेऊ. खरेदी वगैरे करायची नाही. कारण मी पुर्वी मस्कतला असताना अनेक वस्तू जमवल्या होत्या.
पुढे त्यांची देखभाल माझ्याच्याने झाली नाही आणि त्या वस्तू तश्याच पॅकबंद कपाटात राहिल्या. पण
बालित माझा हा निश्चय टिकला नाही. तिथे रस्तोरस्ती अशा सुंदर कोरीव मूर्ती दिसत राहतात.

२) हि आमची रुम

३) हा सज्जा

४) सज्ज्यातून दिसणारे दृष्य

५) ही दुसरी बाजू

६) हॉटेलच्या कॉरीडॉर मधे रोज ताजी निशीगंधाची फुले ठेवलेली असत, त्यामूळे मंद सुगंध सगळीकडे येत असे. शिवाय जागोजाग अशी देखणी ऑर्किडस पण होती.

७) बाहेरच्या बाजूला पण सुंदर बाग होती

८) कुठल्याही नव्या ठिकाणी गेल्यावर मी स्थानिक पेये ( अर्थात नॉन अल्कोहोलिक ) आवर्जून पितो. जरा
मान तिरकी करून हे नाव वाचा बरं.

९) हॉटेलचा खाजगी बीचही होता. तो भराव घालून उथळ केला होता. सुरक्षित भागाच्या बाहेर तो खुप खोल
होता आणि त्यात तूफान लाटा येत. डाव्या बाजूला एक निद्रिस्त ज्वालामुखी पण दिसतोय.

१०) हॉटेलमधलीच एक रूम

११) रुम सुंदर असली तरी मला तो रस्ता खुणावत होता. फ्रेश होऊन आम्ही भटकायला बाहेर पडलो. तिथेच
एक देऊळ पण होते. त्याच्या बाहेरची एक मूर्ती

१२ ) त्या स्तंभावरचे शिखर. त्यातला कलश मुद्दाम पहा.

१३ ) तिथलीच आणखी एक मूर्ती

१४ ) हा दगड म्हणजे लाव्हा स्टोन. तो कोरायला सोपा वगैरे नसतो पण त्यातले सुंदर कोरीव काम बालित
ठायी ठायी दिसते. विजयने सांगितल्याप्रमाणे हि कला कुटुंबात जपली जातेच शिवाय सरकारी शिक्षणसंस्थाही आहेत. मला आवडलेली एक कृती.

१५ ) ते देऊळ बंदच होते. पण गेटही सुंदर होते.

१६ ) गेटमधून आत कॅमेरा सरकावून घेतलेला फोटो. स्वच्छता तर बघा. कचरा म्हणाल तर केवळ दोनचार
चाफ्याच्या फुलांचा. नीट बघितलेत तर मूर्तींना काळा पांढर्‍या चौकटीच्या कापडाचे सरोंग नेसवलेले दिसेल.

१७ ) बाहेरचा नामफलक

१८ ) त्यावरचे बालि लिपीतले लेखन

१९ ) त्यावरचीच सुबक नक्षी

२०) एका हॉटेलच्या प्रवेशद्वारावरची देखणी कलाकृती

२१ ) आणखी एका हॉटेलचे प्रवेशद्वार

२२ ) आणखी एक

२३ ) दुसर्‍या एका हॉटेलचे आवार

२४ ) एका वॉटर स्पोर्ट्स सेंटरचे प्रवेशद्वार

२५) त्याच देवळाच्या समोरच्या बाजूने घेतलेला फोटो. वाहत्या रस्त्यावरची अशी स्वच्छता आपल्या देशात कधी दिसणार ?

२६) पहिल्या रात्री आम्हाला हॉटेलतर्फे कॉम्प्लिमेंटरी डिनर होते. त्यानंतर बीचवर फायर डान्स होता.
तो डान्स म्हणजे अक्षरशः आगीशी खेळ होता. त्या मुलांच्या हातात ओळंब्याप्रमाणे मशाली होत्या आणि त्या
अखंडपणे गरगर फिरवत ते नाचत होते. मधेच त्या दोन मशाली एकमेकांत गुंतवत पण असत.
नजर ठरत नव्हती. अंधारात फोटो चांगले आले नाहीत. पण निदान कल्पना तरी यावी

२७) आणखी एक पोझ

२८ ) आपल्यालाच गरगरायला होतेय, हो ना ?

२९ ) नंतर काही मुलीदेखील सहभागी झाल्या

३०) सतत १० मिनिटे असे नृत्य चाललेले होते. सोबत तालवाद्यांचा गजर होताच. ( लक्षात घ्या नर्तकांच्या
पायाखाली वाळू आहे. त्यात पाय रोवून असे नृत्य सादर करणे म्हणजे सोपे काम नक्कीच नाही. )

३१ ) हॉटेलमधेही ठिकठिकाणी अशी सरोवरातील लिलीची फुले जोपासलेली होती.

३२) दुसर्‍या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट करताना समोर असे कोरल ट्री दिसले. त्या फ्रेममधे काही पक्षीही आलेत्त.

३३ ) हे कोरल ट्री आपल्याकडे फारसे दिसत नाही.

३४ ) हा दुसरा पक्षी

३५ ) नाजूक दिसणार्‍या या फुलांच्या पाकळ्या हाताला मात्र चांगल्याच कडक लागत होत्या.

३६ ) माझा मलाच आवडलेला एक फोटो

क्रमश:

 ५ दिवसांच्या सहलीसाठी माणशी १ ते सव्वा लाख रुपये खर्च येईल. यात विमानभाडे, हॉटेल स्टे आणि थोडेफार साईट सिईंग येईल. शॉपिंगसाठी वेगळे बजेट ठेवावे लागेल. ( मला तिथे एक नवीन बॅग घ्यावी लागली Happy ) अरेंज्ड टूअर यापेक्षा स्वस्त असेल. कारण त्यात ग्रुप बुकिंगचे फायदे मिळतील.

वर्षू, महाभारतावर एक नाच बघितला. पुढे फोटो येतीलच. तिथले पदार्थ चाखायच्या बाबतीत मात्र मी बिनकामाचा. केदारने बरेच खाल्ले ( पण तो स्वतः स्टार शेफ आहे. ) नाही म्हणायला बरेच मसाले आणलेत.
त्यात योग्य त्या रिप्लेसमेंट करून ( चिकनच्या जागी बटाटे वगैरे ) पदार्थ करेन आणि मग सांगेन.

डॉक्टर... कुठेही गेलो तरी मी असाच भटकतो. पण तरीही माझेही बरेच बघायचे राहिले.

त्या मूर्तींचे अनेक फोटो येतील पुढे. लाकडातलेही अप्रतिम कोरीव काम प्रत्यक्ष करताना बघितले. ते पण ओघात येईलच. त्या त्या फोटोसोबत वर्णन लिहीनच.

शांकली ते झाड म्हणजे Cockspur Coral Tree ( Erithrina crista-galli ) म्हणजे पांगार्‍याचेच कूळ. पण झाड खुपच देखणे, ( पुण्यात पोचा सीड्स, सोलापूर रोड वर आहे असे वाचले. ) मूर्ती घडवणारे कलाकार अजूनही आहेत त्यामूळे त्यांची दुरुस्ती सहज शक्य असेल. शिवाय ते कोरीव काम एकसंध नाही, त्यातले
जोडकाम सहज लक्षात येत नाही, ते सोडा. पण बी ने जसे लिहिले होते तसे ते सर्वच कलाकार आहेत.
त्याबद्दलही लिहितोच.

जिप्स्या, पक्ष्यांचे फोटो सहज निघाले ( फुलाचे फोटो काढताना, ) नाहीतर पक्ष्यांचे फोटो काढणे मला जमत
नाही. ( तेथे मार्को पोलो, कांदेपोहे, इंद्रा नाहीतर तू हवेत, )

बालीमधील नृत्यावर एक वेगळा लेख होईल इतके नृत्य आहेत तिथे. केचक नृत्य सर्वात सुंदर. पुर्वी समईच्या प्रकाशात व्हायचे हे नृत्य. पुलंनी खूप सुंदर वर्णन रेखाटले आहे ह्या नृत्याचे.

बालीत जागोजागी छोट्याशा सुपात हिरव्या चाफ्याची फुले ठेवतात. अगदी बाथरुममधेही असतात ही फुले. त्यामुळे वातावरणात एक नैसर्गिक गोडवा भरुन राहतो.

जास्वंदाची झाडे, पांगिर्‍याची झाडे आणि कचनारची झाडे खूप आहेत. देनपासार विमानटळासमोरच कचनारच्या ओळी रस्त्याच्या दुतर्फा दिसतात. त्यावेळी जर फुले असतील झाडाला तर तो परिसर तरल आनंद देतो.

बालिमधे उबुद म्हणून एक शहर आहे. तिथे बातूबुलान म्हणून एक बोळ आहे. तिथे आपल्या गणेशाच्या, शंकराच्या मुर्त्या विकत मिळतात. आणि त्या मुर्त्या ज्लावामुखी दगडापासूनच बनवलेल्या असतात. तसेच महोगामी लाकडापासून बनवलेले हत्त्ती, त्यांची राईस गॉड वगैरे अप्रतिम असतात त्या वस्तू. बुद्धाचे अनेक मुखवटे मिळतात. बाटिक सुद्धा मिळते. पण बाटिक योग्यकर्त्याला आणखी छान मिळते. बालिला गेलात तर योग्यकर्त्याला अवश्य जायलाच हवे. कारण परत परत खर्च होत नाही असा.

रॉबीन, तुम्हाला जर माहिती हवी असेल बालिची तर विनासंकोच विचारा. हे बघा, एक तर विमानाची तिकिट स्वस्त काढायचे. सिंगापूर ऐअरलाईन्स खूप महागडे पडेल. बालिमधे कुठेही अमेरिकन डॉलर्समधेच तुम्हाला खर्च करावा लागतो. बालि खूप स्वस्त नाही पण योग्य तो अभ्यास करुन गेलात तर खर्च कमी करता येऊ शकतो.

कॉफी ब्रेक व तांबलिंगन लेक

आमच्या पहिल्या दिवशीच्या गप्पांतून विजयला माझ्या आवडीनिवडी कळल्याच होत्या. त्यामूळे आमच्या ठरलेल्या ठिकाणांपेक्षाही आजूबाजूची ठिकाणे त्यांने आम्हाला दाखवली.

आमच्या दुसर्‍या दिवशीच्या टुअरमधे बोटॅनिकल गार्डनला भेट होती. तिथून जरा जवळच असलेल्या लेक ताम्ब्लियनला जाऊ असे त्याने सुचवले. अर्थातच आम्ही तयार होतो. कॉफी ब्रेकला जाऊ या का असे त्याने विचारल्यावर मला वाटले त्याला कॉफी प्यायची आहे. मी अर्थातच होकार दिला.

बालितली पर्यटकांना आवडतील अशी ठिकाणे जरा दूरदूर आहेत. शिवाय रस्तेही गावागावातून जाणारे, त्यामूळे प्रवासात जरा वेळ जातोच. तरी आजूबाजूचा निसर्गच नव्हे तर गावेही बघण्यासारखी आहेत. त्यामू़ळे प्रवासाचा कंटाळा येत नाही.

१) आपल्या विभागातील लोकप्रिय उमेदवार अलाणेफलाणे यांनाच प्रचंड बहुमतांनी विजयी करा, अश्या टाईपचे
फलक दिसत होते. त्यांच्याकडे मतदान कसे करतात माहीत नाही पण बर्‍याच फलकांवर फोटोच्या छातीत
खिळा ठोकल्यासारखे दाखवले होते. मला राजकारणात अजिबात रस नसल्याने मी विजयला काही विचारले नाही. असे फलक मात्र गावातच होते. गावाबाहेरच्या रस्त्यांवर असे फलक अजिबात नव्हते.

२) भातशेती अखंड दिसत असे.

३) शेतात बैलाचा वापर कमी दिसला. चिखलणी पण हात यंत्रानेच करत होते.

४) रस्त्याची कल्पना यावी, म्हणून हा फोटो. स्कूटर्स व बाईक्स बर्‍याच दिसत पण त्याही शिस्तीने जात असत. पेट्रोल तिथे स्वस्त आहे त्यामूळे नव्याने सुरु झालेली बससेवा अजून लोकप्रिय झालेली दिसत नाही.
बाईक्स भाड्याने मिळायची सोय आहे.

५) रस्त्यावरचे एक दुकान. डाव्याबाजूचे भिंतीवरचे वॉलपीस बघून ठेवा तसेच विकायला असणार्‍या नारळाच्या कोवळ्या पानांचे पण लक्षात असू द्या. मग सविस्तर लिहितो.

६) विजयचा कॉफी ब्रेक म्हणजे खरं तर एक स्पाईस प्लांटेशन होते. अनेक मसाल्यांच्या झाडाची लागवड तिथे होती. बरीच झाडे मी ओळखल्याने तिथला मॅनेजर माझ्याशी फार आदराने बोलू लागला. हे झाडही मी
ओळखले. बघा तूम्हाला ओळख पटतेय का ती ?

७) अर्थात मी ओळखले ते या दूरियान फळावरून. हे फळ एकाचवेळी लोकप्रिय आणि तेवढेच बदनाम आहे.
फणसासारखे दिसत असले तरी चवीला वेगळे असते. आणि त्याचा स्वादच त्याला बदनाम करतो.
याला एक उग्र दर्प येतो. या उग्र दर्पामूळे सिंगापूर, मलेशिया, थायलंड आणि इंडोनेशियातदेखील हे फळ
सार्वजनिक वाहनांतून न्यायला बंदी आहे. हॉटेल रूमवरही नेता येत नाही. पण मला स्वतःला तो दर्प
तेवढा उग्र वाटत नाही. आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल त्या त्या वेळी मी हे फळ खातो. बालितही खाल्ले.
ताजे फळ भारतात आणणे शक्य नाही पण याचा तळलेला गर किंवा आटवलेला गर बँकॉक
विमानतळावरदेखील मिळू शकतो. त्याला उग्र दर्प येत नाही. एकदा आवर्जून चाखाच.

८) तिथली कॉफीची फुले.

९) इथेच ती ५०,००० रुपियांची कॉफी प्यायलो. त्याशिवाय इथे इतर अनोखी पेये उपलब्ध होती. पांढरी हळद, लाल आले असे अनेक स्वाद चाखले. ते दिसताहेत तेवढे कप कॉफी आम्ही प्यायलो. तिथे अनेक मसाले
व कॉफी विकायलाही होती. भरपूर खरेदी केली.

१०) हे आहे मँगोस्टीनचे झाड. मला कधीचे बघायचे होते. या फळाचे एकंदर रुप आपल्या रातांब्यासारखेच असते पण झाड मात्र फारच वेगळे. फोटोतली फळे कच्ची आहेत. पिकली कि ती काळी होतात.
आतला गर थेट रातांब्यासारखाच पण चवीला जास्त गोड असतो. याची साल जाड असते आणि तिच्यात काही
औषधी गुणधर्म असतात, ( हे पण रातांब्यासारखेच ) तिचे पेयही आम्ही तिथे प्यायलो.

११ ) तिथले कोकोचे झाड मी केदारला दाखवल्यावर त्या मॅनेजरने स्वतः झाडावर चढून मला ते फळ काढून
दिले. कोकोच्या फळातील गराला व बियांना अजिबात चव नसते. सात दिवस आंबवल्यावरच त्यांना तो
रंग व स्वाद येतो.

१२) आता आम्ही एका डोंगराच्या दिशेने जात होतो.

१३) शेतातील पिकेही बदलली.

१४) शेवटी एकदाचे त्या लेक जवळ पोहोचलो. फोटोत दिसतोय तो प्रचंड वृक्ष माझ्या ओळखीचा नव्हता पण
त्यांच्यासाठी तो पवित्र आहे.

१५) त्या झाडाची गोलाकार पसरलेली मूळे बघून ठेवा. या झाडालाही सरोंग गुंडाळलेले आहे.

१६) तिथली गुलाबी फुले.

१७) रम्य परिसर

१८) पिवळे फूल

१९) सभागृह

२०) आजूबाजूचा विस्तीर्ण मोकळा भाग

२१ ) पशुपतीच्या देवळाचे ( बंद ) प्रवेशद्वार

२२) त्या दारावरील कोरीवकाम

२३ ) हेच ते रम्य तळे. नॅशनल जिओग्राफिकच्या वेबसाईटवर त्यांच्या २०१२ सालच्या फोटोग्राफी स्पर्धेतला
या तळ्याच्या एक अप्रतिम फोटो आहे. अवश्य शोधून बघा.

२४) तळ्यातले शांत पाणी.

२५) या देवळाची शिखरे दगडाची नाहीत तर गवताची आहेत. ते खास आकार गवत रचून केलेले आहेत. ठराविक वर्षांनी ते बदलतात.

२६) देवळाच्या एका बाजूने दिसलेले लाकडावरील अप्रतिम कोरीवकाम. ( तो सोनेरी रंग आहे, सोने नाही. )

२७) सांगितलं ना, तिथून पायच निघत नव्हता. या वाटा मला खुणावत होत्या.

२८ ) केदारची पण तिच अवस्था होती.

२९) देवळांच्या कडेने आम्ही जरा दूरवर गेलोच

३०) पुढेही छानच मोकळा भाग होता..

तेव्हा आपण अजून इथे थोडा वेळ रेंगाळू.. ( पुढच्या भागात अजून काही पाहू )

क्रमशः

, ते फणसासारखे फळ दुरिअन आहे. असे म्हणतात It taste like heaven but smell like hell! इथे ही सगळी फळे जळी स्थळी दिसतात. दुरिअनचा केक देखील करतात. दुरिअमच्या आकाराचे ऐस्लानेड म्हणून एक भव्य सभागृह सुद्धा आहे इथे. Singapore Esplanade असे गुगल करुन बघा. सुंदर चित्र बघायला मिळेल. दुरिअनचे फळ जेवढे राकट तेवढी कोवळी त्याची पाने आहेत. आतमधला गर मासल असतो. फ्रिजमधे ठेवल की सगळ्या पदार्थांना दुरिअनचा वास चिकटतो. म्हणून, इथे ट्रेन आणि बसेस मधून दुरिअन घेऊन जायला अनुमती नाही आहे.

पुढे तर मस्त मोकळे मैदान होते. तऴ्यापल्याडच्या डोंगराच्या माथ्यावर मस्तपैकी ढग जमले होते.

१)

२) तुतारीच्या फुलासोबत..

३) तिथला झेंडू पण आपल्याकडच्यापेक्षा जरा वेगळाच होता.

४) परत परत मागे वळून बघत होतो.

५) तिथेच एक रीसोर्ट पण आहे, तिथे जायची वाट.

६) पायाखाली हा सडा.. आपने फुल बिछाये, उन्हे हम ठुकराये ? अशी तौहीन-ए-मुहोब्बत माझ्याकडुन कशी होईल बरं ?

७) झाड मात्र काही ओळखीचे नव्हते... नंतरही परत भेटलेच.. तेव्हा जरा सविस्तर विचारपूस केली.

८) संपुच नयेत असे वाटणारे रस्ते.

९) विजय आणि केदार पुढे गेले तरी मी रेंगाळतच होतो.

१०) रीसॉर्टच्या रुम्स

११) परत रस्ताच

१२) या फळाला केनयात ट्री टोमॅटो म्हणतात.. फार गोड नाही साधारण टोमॅटोसारखीच चव असते.

१३) जरा जवळून बघू.. ही कच्ची आहेत पिकल्यावर छान लाल किरमीजी रंगाची होतात.

१४) टॉयलेट सुद्धा तेवढेच टापटीप.. त्यांच्या भाषेत ( बालीनीज भाषा, ती इंडोनेशियाच्या बहाषा पेक्षा थोडी वेगळी आहे ) बरेचसे ओळखीचे शब्द सापडतात. नावे तर बहुतेक आपल्याकडचीच. बायकांना उद्देशून "वनिता" असा शब्द आहे. तर समस्त पुरुषांना ( समस्त हा शब्द मी ठळक केलाय ते प्लीजच नोट करा ) "प्रिय" असा शब्द आहे. कित्ती चपखल ना !

१५ ) नव्याने फुलझाडे पण लावलेली होती.

१६ ) तिथे एक वेगळेच दुकान होते. तिथे काही देखणे पक्षी उघड्यावर ठेवले होते आणि आपल्या हातावर
वगैरे त्यांना ठेवून फोटो काढून घ्यायची सोय होती. पक्ष्यांच्या पायात साखळी होती पण त्यांची एकंदर
तब्येत बघता त्यांची उत्तम देखभाल केली जातेय हे जाणवत होते. पक्ष्यांसोबत वटवाघळे, इग्वाना, अजगर पण होते.

हे फोटोत दिसताहेत ते एकाच प्रजतीतले नरमादी आहेत. नवराबायको प्रमाणे विरुद्ध दिशेला तोंड करून
बसले आहेत म्हणून नाही म्हणतै.
त्यांनी तसे रंग निवडायचे खास कारण आहे. यातली लाल मादी झाडाच्या ढोलीत राहते तर हिरवा नर दूरदूर
जाऊन तिच्यासाठी चारा आणतो. नराचे लक्ष वेधून घेण्यासाठी ती अशी लालभडक असते. तर नराला
लांबवर प्रवास करायचा असल्याने, हिरवाईत लपण्यासाठी तसाच रंग असतो. झाडावर आल्यावर तो
पंख पसरून आपण आल्याची वर्दी देतो. त्याचे पंख आतून लाल रंगाचे असतात. ( हि माहिती इथे नाही,
यू ट्यूबवर मिळाली. )

१७) याला म्हणतात नजरेतली जरब.

१८) कसा डोळ्याला डोळा भिडवलाय बघा.

१९) आयला, घुबड सुद्धा काण्याडोळ्याने बघू शकते ? का झोपमोड झालीय ?

२०) ही बाळं कशी रांगेत बसली आहेत !

२१ ) या वटवाघळाची एक गंम्मत बघितली. एरवी उलटे टागुन घेतलेले वाघूळ, शी शू करताना मात्र सरळ म्हणजे खाली पाय वर डोके करते. ( तिथे साफसफाई पण त्वरीत केली जात होती. एरवी पक्ष्यांजवळ जशी
विष्ठेची दुर्गंधी येत असते, तशी अजिबात नव्हती. )

२२) इग्वाना

२३) इग्वाना

२४ ) बालसुलभ कुतुहल !

२५) आणि ही आमची लाडकी मंडळी

२६)

२७)

२८)

२९)

आता पुढच्या भागात बोटॅनिकल गार्डनला भेट देऊ..

क्रमशः

एका कार्या बोटॅनिकल गार्डन

एका कार्या बोटॅनिकल गार्डन हे एक अत्यंत सुंदर रितीने राखलेले वनस्पति उद्यान आहे. बालितल्या लोकांना
फुलांचे वेड आहे आणि तिथे जागोजाग फुलझाडे आहेत. हे गार्डन मात्र खास वनस्पतिंसाठी आहे. त्यांच्या दृष्टीने
महत्वाच्या झाडांचा तो संग्रह आहे. यात पहिल्यांदा जाणवते कि ती झाडे मुद्दाम लावली आहेत असे वाटतच नाही तर ते सर्व नैसर्गिक जंगलच वाटते. अर्थात तिथे निवडुंग, ऑर्किड, फर्न यांच्यासाठी खास विभाग आहेतच.

तर चला

१) उद्यानात आपले स्वागत

२) प्रवेश केल्यावर नजरेत भरते ते जटायूचे सुंदर शिल्प

३ अ) त्यानंतर दिसते ते रावणाचे अतिभव्य शिल्प. त्याच्यावर वानरसेनेने हल्ला केलेला आहे.
तिथल्या सर्वच शिल्पांची रचना, सौंदर्य आणि स्वच्छता... अप्रतिम आहे,

३ब) तोच पुतळा मागून

४) हे आहे खास निवडुंगाचे दालन

५) आतमधले निवडुंगाचे प्रकार

६)

७)

८)

९)

१०)

११)

१२ )

१३)

१४)

१५) या एपिफाइट्स बद्दल एकदा लिहायचे आहे !

१६)

१७) बाहेर पडूया आता

१८) असे सुंदर कारंजे बघितल्यावर मन कसे प्रसन्न होते.

१९) सीतेची वेणी... सम एक प्रकार

२०) पुढचे दालन होते ऑर्किड्स चे पण हा त्यांचा फुलण्याचा सिझन नसल्याने काही मोजकीच फुले होती.

२१ )

२२) विसाव्याच्या जागा पण अशा सुंदर

२३)

२४)

२५) सर्व झाडांखाली त्यांची सविस्तर माहिती होती. ( हा फोटो नीट वाचता येत नाही, सॉरी )

२६) या फोटोतले झाड खास वाटणार नाही..

२७) आता लक्षात आली, खासियत !!

२८) त्यांच्या औषधी झाडांचाही संग्रह होताच.. पण कुठेही झाडांना हात लावू नका, फुले तोडू नका असे फलक नव्हते. हे शहाणपण त्यांना उपजतच असावे का ?

२९) मला आवडलेली फ्रेम

३०) अतिभव्य असे झाड होते हे

३१) कॉम्प्यूटरवरचा नव्हे तर खराखुरा वॉलपेपर बनवावा.. याचा.

३२) तिथल्या रावणाच्या पुतळ्याच्या वाटीकेच्या कडेवर दिसलेले हे सुंदर गजमुख.

३३ ) प्रवेशाजवळची बाग

३४) आत यायचा रस्ता

३५) सभोवतालचा भाग

३६) शेवटी मी दूरीयान खाल्लेच. यात फणसासारखी पाती नसतात. पण मोठी बी असते. सर्व गर खाण्याजोगा.
फळात तीन चार कप्पे असतात. केदारने खायला नकार दिला म्हणून मी विजयला विनंती केली.

३७) तिथे असे स्तंभ अनेक घराच्या दाराजवळ दिसत होते. घरात काही शुभकार्य असेल तर असे स्तंभ लावतात. त्या घरासमोर गाडी थाम्बवून फोटो काढणे मला प्रशस्त वाटले नाही. पण आमच्या गाडीसमोर
एका पिक अप मधे ते दिसल्यावर मी फोटो घेतलाच.

३८) बांबू, सुपारीची पाने, भाताच्या ओंब्या असे बरेच साहित्य वापरून अशी कलापूर्ण रचना केली जाते.

३९) बदक छाप चहा का हा ?

४०) रामबुतान. यावरचे काटे मऊ असतात आणि आतला गर आपल्या लिचीसारखाच असतो.

४१) तिथली खासियत. स्नेक स्कीन फ्रुट. याची साल खरबरीत असते पण सहज सुटी होते. आतला गर गुलाबी
रंगाचा असतो. पोत बोरासारखा आणि चव सफरचंद + गाजर + अननस अशी काहीशी

४२ ) हॉटेलमधे स्वगताला अशी फुले होतीच.

बालि नृत्य आणि शिल्पकला

आता देशोदेशीच्या हॉटेलात ब्रेकफास्ट साधारण सारखाच असतो. त्यात ब्रेड, जॅम, सिरियल्स, फळांचे रस, चीज, बटाटे, फळे वगैरे असतातच. पण बालित त्यातही स्थानिक टच होताच.
जॅममधे पिस्ता कलरचा पानदान जॅम आणि श्रीकाया या फळाचा जॅम मला खास आवडला. ते श्रीकाया म्हणजे काय त्याचाही मी शोध घेतलाच. फळांच्या रसासोबत तिथे खास सुगंधित पाणी होते. त्यातही तांदूळ + वेलची, काकडी + हिरवे सफरचंद , गाजर + ओली हळद वगैरे प्रकार मला फार आवडले.

१) तर हा माझा ब्रेकफास्ट

२) केदारला नॉन व्हेजमधेही भरपूर चॉईस होता. आमचा नाश्ता एवढा पोटभरीचा व्हायचा कि दिवसाचे जेवण घ्यायची गरजच वाटत नसे. ( तशीच पद्धत आहे Happy )

३) ब्रेकफास्टच्या टेबलावरुनच समोरच्या झाडावरचे पक्षी न्याहाळता येत असत.

४) आणि त्या कोरल ट्रीची फुले देखील

५) बालितल्या समृद्ध जंगलाची हि देणगी.. अखंड लाकडातले हे टेबल.

६) उन्मळून पडलेल्या झाडांचे बुंधे देखील तिथे शोभिवंत वस्तू असतात.

७) माझी आवड म्हणून मला विजय एका नृत्य कार्यक्रमाला घेऊन गेला. निसर्गाचेच एक भाग झालेले हे स्टेज.
डाव्या बाजूला २५ कलाकारांचा ताफा वाद्यमेळ जमवून होता. मला ती सूरावट थेट आपल्या भूपाली रागाची
वाटली ( पंख होते तो उड आती रे.. लता.. सेहरा )

८) सुरवात झाली ती या क्यूट प्राण्यांच्या नर्तनाने

९) पहिल्या फोटोत जाणवतेय त्याप्रमाणे प्रकाशाची दिशा प्रेक्षकांकडे होती. त्यामूळे फोटो तेवढे क्लीयर नाहीत.
तरीपण या नर्तिकांचे लालित्य नक्कीच जाणवेल.

१०) त्यांच्या पायात घुंगरू नव्हते त्यामूळे तालाचे प्राबल्य नव्हते तर होता केवळ लयीचा अविष्कार

११) या नृत्यमुद्रेतले पुतळेही तिथे जागोजाग आहेत.

१२)

१३) महाभारतातील कुंती आणि सहदेव यांचे कथानक होते ( मला संदर्भ माहित नाही. ) तिथल्या सर्व मुलींना
या नृत्यप्रकाराची ओढ असते. तसे शिक्षणही त्यांना मिळते पण प्रत्यक्ष रंगमंचावर सादरीकरण करण्याएवढे कौशल्य फारच थोड्या मुलींकडे असते.

१४) आणि आता एका अनोख्या दुनियेत आपण जाणार आहोत. दगडातले नाही तर निदान लाकडातले तरी शिल्पकाम प्रत्यक्ष करताना बघायचेच अश्या माझ्या आग्रहावरुन मला विजय SARI REJEKI WOOD CARVER & ART GALLERY ADDRESS SUMAMPAN, KEMENUH GIANYAR इथे घेऊन गेला.

इथली खास बात म्हणजे लाकडाच्या आत जे वेगवेगळे रंग असतात त्यांचा चपखल वापर करून घडवलेली शिल्पं.
एक कलाकार अगदी तल्लीन होऊन काम करत होता.

१५) कुठल्या झाडांच्या खोडापासून अशी शिल्पे घडवतात, ती झाडेही तिथे होती. त्यापैकी एक क्रोकोडाईल बार्क ट्री. असे नाव आपल्याकडच्याही काही झाडांना दिलेले आहे पण हे झाड मला अनोळखी वाटले ( वरती पाने पण दिसताहेत. )

१६) आणि हे आपले पारस भेंडीचे झाड. त्याचाही उपयोग करतात.

१७ ) दरवाज्यावरचे देखणे शिल्प.

१८) आर्ट गॅलरी असली तरी तिथे एवढी शिल्पं होती कि प्रत्येकाची स्वतंत्र मांडणी आणि खास प्रकाशयोजना शक्यच नव्हती. ( त्यामूळे फोटोही तसे क्लीयर नाहीत. )

१९ ) तरीही प्रयत्न करतो. या शिल्पातली मेखला बघाच.

२०) हे दोन्ही रंग नैसर्गिकच

२१) सुंदर मुखवटा

२२) इतालियन पद्धतीचे मुखवटे

२३) रामजानकी

२४) अगदी आपल्या गौरीचे मुखवटे

२५) क्रोकोडाईल बार्कचा काही भाग तसाच ठेवून घडवलेले शिल्प.

२६)

२७) बुद्धीबळाचा पट

२८) फोटोत नीट दिसत नाही, पण त्या डालीच्या आतही कोंबडा आहे.

२९) टेबल

३०) परत रामजानकी

३१) आणखी एक सुंदर टेबल

३२) आपली गणेशमूर्ती, तिथे किंचीत उग्र रुपात असते.

३३)

३४) केवळ अलंकृत शैलीतलीच नव्हे तर नैसर्गिक शैलीतली शिल्पं होती.

३५)

३६) श्री गणेश

३७)

३८)

३९)

४०)

तूम्ही बालिला कधीही गेलात तर या गॅलरीला अवश्य भेट द्या. पैसे डॉलर्स मधेच द्यावे लागतात. व्हीसा कार्ड चालते. त्यातील श्रमांच्या मानाने किमती मला वाजवी वाटल्या. त्यातही बार्गेनींग करता येते. माझा कलाकृती विकत न घ्यायचा निश्यय इथेच ढेपाळला. मी एक सुंदर गणेशमूर्ती इथे घेतली. ( तिचा फोटो नाही इथे )

क्रमशः

तरी मी इथे मोजक्याच मोठ्या कलाकृतींचे फोटो टाकले आहेत. आकाराने लहान शिल्पातही अशीच कारागिरी होती.

झंपी, त्या नृत्याचे नाव ब्रोशर बघून लिहितो. बालिला जायला एप्रिल-मे चांगला. आम्ही गेलो तेव्हा उन्हाळा + पावसाळा होता.
साधना, तो मुकुट पांढर्‍या चाफ्याचा होता. फुलांचे त्यांना अतोनात वेड आहे. तो बसलेल्या म्हातार्‍याच्या पुतळ्याच्या कानावर पण फुल आहेच.

बाहेरून खोड बघून आत कसे रंग असतील याचा कसा अंदाज करतात कोण जाणे ? पण यातला कुठलाही रंग वरून लावलेला नाही. चंदनाच्या मूर्त्याही होत्या पण बालित चंदन होत नाही, हे त्या दुकानात मला आवर्जून सांगण्यात आले.

बी म्हणतोय ते खरे आहे. रस्त्यावर त्या स्वस्त मिळतीलही पण त्यासाठी आपल्याला पारखी नजर हवी. कमी प्रतीचे लाकूड वापरून किंवा ते रंगवूनही मूर्त्या केल्या जातात. तशीही मूर्ती आम्हाला दाखवली त्याने.

श्री गणेश हा तिथे बहुदा द्वारपाल म्हणून असतो. कदाचित ते कारण असावे अशा रुपाचे. घरी मात्र ते पितरांची ( पूर्वजांची ) पूजा करतात असे विजय म्हणाला. त्यांच्या पूजेतल्या आणखी एका सुंदर कलापूर्ण बाबीकडे आपण नंतर बघणारच आहोत.

किंतामणि आणि बालि बर्ड पार्क

पुढच्या दिवशी आमचा प्लान होता किंतामणि ला जायचा. अतिशय रम्य असे हे ठिकाण आहे. इथे एक निद्रिस्त ज्वालामुखी आहे. त्याच्या पायथ्याशी एक सरोवर आहे.
पण फोटोमधून जाणवणार नाही अशी एक गोष्ट म्हणजे इथला सुखद गारवा. हे ठिकाण डोंगरावर असल्याने
पायथ्याचे तपमानापेक्षा इथले तपमान किमान १५ अंश सें ने कमी असते. दुतर्फा फळांच्या बागा आहेत. शिवाय याच भागात स्ट्रॉबेरीची पण शेती आहे.

१) तर हा किंतामणि

२) हा त्याच्या बाजूचाच

३) किंतामणिच्या पायथ्याशी असलेले जंगल

४) काही वर्षांपूर्वीच त्याचा उद्रेक झाला होता. मधल्या काही पट्ट्यात लाव्हाचे थर आहेत/

५) त्याच्या समोरच अशी खास जागा आहे आणि तिथे कपडे वगैरे विकायला असतात. रस्त्यावर भरपूर फळेही असतात.

६) जरा झूम करून

७) परतीच्या वाटेवर आम्हाला मुसळधार पावसाने गाठले. वाटेत दिसलेली बालितली पायर्‍यांची भातशेती.
याला युनेस्कोने जागतिक वारसा ठेव म्हणून मान्यता दिलेली आहे. पावसामुळे मात्र एवढेच फोटोत येऊ शकले

८) बालि लोक दिवसातून तीन वेळा असा नेवैद्य दाखवातात. यातले तबक ते लोक रोज स्वताच्या हाताने तयार करतात. ( नारळाच्या कोवळ्या पानांपासून ) त्यात फुले, समुद्री शेवाळे आणि घासभर का होईना खाऊ असतोच.
अशी तबके जागोजाग दिसतात. घरोघरच्या स्थंभांवर, दुकानाच्या समोर इतकेच नव्हे तर आमच्या हॉटेलच्या
समोर अगदी विमानतळावरच्या ड्यूटी फ्री शॉपमधेही हे होतेच.

९) त्या रस्त्यावर तर प्रत्येक दुकान असे खास कलाकृतींचे होते.

१०) त्यांच्या कलाविष्कारासाठी कुठलेही माध्यम त्यांना वर्ज्य नाही.

११)

१२) माझी न्याहारी सोबर कलिंगडाचा ज्यूस आणि आले घातलेले दही

१३) हॉटेलचा खाजगी समुद्रकिनारा

१४) बीचवरची निवांत जागा

१५ )

१६) परत वॉटर लिलीच

१७) हॉटेलमधलीच वेगळी फुले

१८) तिथल्या बर्ड पार्कचा देखणा दरवाजा

१९) बरेचसे पक्षी तिथे मोकळेच होते आणि ते धटिंगण होते. फोटो काढताना मुद्दाम टक लावून बघत असत.

२०)

२१)

२२)

२३)

२४)

२५)

२६)

२७) पर्वान्गी घेत्लीय

२८)

२९)

३०)

हा पक्षी खुप देखणा होता पण मला त्याचा प्रोफाईल मधला फोटो मिळाला नाही

अजून बरेच पक्षी दाखवायचे आहेत, तेव्हा

क्रमशः

आपले पु. ल. देशपांडे १९६० मधे गेले होते किंतामणी अर्थात चिंतामणीला तेंव्हा हा ज्वालामुखी बर्‍यापैकी जिवंत होता. आता फक्त धग उरली आहे. अगदी पहाटे कोवळ्या किरणात धुर दिसतो. मी सकाळी २ वाजता उठून सुरु केला होता माझा प्रवास किंतामणीच्या माथ्यापर्यंत चढायचा. इथेच जवळ गरम पाण्याचे उष्ण तळे आहेत. तिथे मी स्नान देखील केले होते. कसले उन उन पाणी होते तळ्याची. आई गं!!!

ह्या ज्वालामुखीच्या मातीपासून गणपतीची मुर्ती घेतली होती. घरी येऊन तिची अंघोळ घातली तर छान छान सुरु सुर आवाज येत होता कारण मुर्ती सच्छिद्र होती. खूप वर्ष पुजा केली तिची. मग मागच्या वर्षी घर बदलतना माझे मलाच आवरता सावरता आले नाही. १४ वर्षाचा पसारा बांधाबांध करताना जीवाची खूप वाताहात झाली. अनेक वस्तू टाकून दिल्यात. देवघरातील सगळे देव, पोथ्या समुद्रात विसर्जीत केल्या. त्यात गणपतीची ही मुर्ती देखील शिरवली. खूप दु:ख झाले होते. पण माझ्याकडे तोच एक पर्याय होता.

बालि बर्ड पार्क

पक्ष्यांच्या दुनियेत बर्ड्स ऑफ पॅराडाईज म्हणून एक खास वर्ग आहे. अत्यंत देखणे असे हे पक्षी अर्थातच शिकारीला बळी पडल्याने आता फारच दुर्मिळ झालेत. त्यातले बरेचसे पक्षी या पार्क मधे आहेत. हे पक्षी मी कधी काळी प्रत्यक्ष
बघेन असे स्वप्नातही वाटले नव्हते.
पण वाईट याचे वाटतेय कि ते पिंजर्‍यात असल्याने त्यांचे फोटो मात्र काढता आले नाहीत. एरवी जंगलात हे पक्षी
दिसणे अगदीच कठीण आहे.

तरी जेवढे जमले तेवढे पक्षी दाखवतोच.

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

९)

तिथेही अनेक बर्ड शोज आणि बर्ड फिडींग चे कार्यक्रम होत असतात. निदान चार पाच तास तरी काढले पाहिजेत तिथे.

१०)

११)

१२)

१३)

१४)

हे फुल नाही, फळ आहे

१५)

१६)

१७)

१८)

१९)

ही फॅमिली तर रस्त्यात्च ठाण मांडून बसली होती

२०)

अगदी नाईलाज झाला म्हणून

२१)

२२)

हा पांढरा पक्षी (जलक) बालिचा राष्ट्रपक्षी. सध्या बाहेर तो दिसणे दुर्मिळ आहे. त्यांच्या नाण्यावर पण याला स्थान आहे.

२३) जरा जवळून.. याच्य डोक्यावर तुरा पण असतो.

२४)

२५) क्लोज अप... हे धटींगण पक्षी कॅमेराला अजिबात बूजत नाहीत.

२६) ही मैना, आपल्या शब्दांची, शिटीची हुबेहुब नक्कल करते

२७)

प्रत्येक पक्ष्याची अशी नेमकी माहिती तिथे दिलेली आहे. खास करून चित्ररुप माहिती बघा.

२८)

२९)

३०)

या पक्ष्याचा नीट फोटो काढता आला नाही याचे खुप वाईट वाटतेय. दिसतेय तेवढी झलक बघूनही कल्पना येईलच.

अजून आहेत...

क्रमशः

बालि बर्ड पार्क आणि रेप्टाईल पार्क

हे तर स्टार , यांच्याशिवाय कुठला बर्ड पार्क असू शकेल ?

१)

२)

३)

४)

५)

प्रवेशद्वाराजवळचे देखणे शिल्प

६)

७)

तिथलेच एक पोस्टर

८)

हे नव्हेत पक्षी.... पण तशीच फुले

९)

हे खरे कमळ

१०)

आधी हे फोटो टाकले होते तेव्हा कापडाचे पिळे वाटले होते ना.. आता बघा कशी सुंदर नक्षीची कापडं आहेत ती.

११)

१२)

बालिकर साप झोपताना पण कलाकुसरीनेच झोपतात.

१३)

जिंजर लिली.. हा पुष्पकोश उकलण्यापुर्वी मसाल्याचा जिन्नस म्हणुन वापरतात.

१४) हे खोटे कमळ... पण खरे केळफूल.

१५)

बर्ड पार्क जवळच असल्याने संध्याकाळी मोकळा वेळ होता. मग आम्ही स्पा मधे जाऊन मस्त तासभर मसाज करून घेतला. अवश्य घ्यावा असा अनुभव आहे हा. अगदी मस्त अंग रगडून देतात.

क्रमशः

ती केळी नायजेरियात खातात. केळी लहान असल्याने हलकी असतात. त्यामूळे अशी आकाशाकडे तोंड करून असतात.
पुढे केळ्यांचे वजन वाढल्याने ती खाली झुकायला लागली असतील. आता केळ्यांचे परागीवहन वटवाघळे करतात. त्यांना आवडेल असा गंध व मांसासारखा रंग केळफुलाला आलाय. शिवाय त्यांना आधाराला भक्कम केळफूल असतेच. बँगलोरला मी खारीदेखील हे काम करताना बघितल्या आहेत.

समुद्री कासव

१) क्रुझ लायनर्सचे पण बालि आवडते स्थळ आहे. आमच्या हॉटेलच्या मागेच ही लायनर थांबली होती.

२) बेनोआ गावात पण एक फेरी मारली. आपल्या वर्सोवा सारखेच गाव पण कमालीचे सुंदर. तिथे टिपलेला हा सुर्यास्त. अगदी चित्रात असावी तशी बगळ्यांची माळ आली आहे फोटोत.

३) गावातच एक जुन्या पद्धतीचे जहाजही दिसले

४) संध्याकाळी जेवायला सहजच एका हॉटेलमधे शिरलो. मला खाण्याजोगा एकच प्रकार होता, तो म्हणजे चीज सँदविच.पण ते सुद्धा असे मस्त सजवून दिले होते.

५) रात्री परत बीचवर गेलो तर लायनर तिथेच होते. मग जरा फोटूग्राफीची हौस भागवून घेतली.

६)

७)

८)
हे फोटो कसे काढले विचारू नका कारण ते मी नाही तर माझ्या कॅमेराने आपल्या मनाने काढलेत.

९) हॉटेलमधे जागोजाग असे निशिगंधाचे गुच्छ ठेवलेले असत. सर्व कॉरीडॉर दरवळत असे.

१०) होटेलचा व्हरांडा

११)

१२)

१३) रिसेप्शनमधे लाकडाचा भरपूर वापर केला होता.

१४)

१५)

मग आम्ही एका बेटावर गेलो. तिथे कासवांचे संवर्धन केले जाते. त्या बेटाचे प्रथमदर्शन

१६)
आपण नेहमी बघतो त्यापेक्षा वेगळी कासवे होती

१७)

१८)

१९)

२०) कासवांचे अवयव विकायला तिथल्या सरकारने बंदी घातली आहे.

२१)

२२)

२३)

तिथेच एक वेगळे झाड दिसले... आधी वाटले झाडाला चिमुकल्या छत्र्याच लागल्या आहेत.

२४) मग त्याच झाडाला एक फळही दिसले.. ( तोंडात टाकायचा मोह आवरला Happy )

क्रमश :

 म्यूझियम

बालितले एखादे म्यूझियम बघायची फार ईच्छा होती आणि विजय आम्हाला अगदी योग्य अशा जागी घेऊन गेला.
पूरातन कलाकृती, अवजारे यांचे ते संग्रहालय नव्हते. तरी ती जागा अनोखी अशीच होती.

चला बघू या !

१) प्रथमदर्शन

२) जसजसे पायर्‍या चढून जाऊ तसतसे आणखी काही नजरेच्या टप्प्यात येत जाते. त्या मनोर्‍याखालच्या काचेच्या खिडक्या बघा. आपण तिथे जाणार आहोत.

३) नेहमीप्रमाणेच देखणे प्रवेशद्वार

४) आणि देखणी वास्तू

५) स्वच्छ आवार

६)

७)

८)

९)

१०)

११)

त्या वरच्या सज्ज्यातून दिसणारे देखणे बालि. तिथे उंच इमारतीच नाहीत. काही हॉटेल्स सोडली तर कुठलीच इमारत दोनपेक्षा जास्त मजल्याची नाही. ( विजयने सांगितल्याप्रमाणे नारळाच्या झाडापेक्षा उंच इमारत बांधायची नाही, असा नियम आहे. )

१२ ) सज्ज्यातला आतला भाग

१३)

१४)

१५)

१६)

१७)

१८)

गच्चीवर जायला आड्काठी नव्हती

१९)

२०)

२१ )

तिथे बालिच्या इतिहासातील जनजीवनांची अतिशय देखणी मॉडेल्स होती. यातली खास बाब म्हणजे वृक्षांचे डिटेल्स आणि त्याहून खास बात म्हणजे निसर्गापुढे माणसांचा आकार अगदी लहान दाखवून, आपले स्थान
दाखवले होते ( तरी मानवी आकृतीतले डीटेल्सही वाखाणण्याजोगे होते. )

२२)

२३)

२४)

२५)

२६)

२७)

२८)

या फोटोत मी दिसतोय का, बघा बरं

२९)
कुठलीही वस्तू देखणी करून सोडायची बालिकरांना वाईट्ट सवय आहे.

३०)

आणि सर्व परीसर सुगंधित करुन टाकणारी ही यलांग यलांग ची झाडे ( उच्चार बरोबर असावा. )

३१)

शिवाय चाफा

३२ )

क्रमशः

कसली देखणी वास्तू आहे! भारतीय शैलीच्या खूप जवळाची वाटतेय पण त्याच वेळेला खूप वेगळेपण आहे त्यात. त्या द्वारपालांच्या कमरेची लुंगी आणि डोक्यावरची छ्त्रं बघून गम्मत वाटली.

रच्याकने, बाली हा असुरांचा प्रदेश होता ना? मग तिथे देवता कशा येतील? Wink पण हे सगळे बघून असुर हे स्थापत्य शास्त्रात खूप प्रगत होते हे पटते. मयासुराची मयसभा खरेच अप्रतिम असणार. ती छतावरची नक्षी (१४) आणि तो दरवाजा (२९) सुंदर आहेतच पण मला सगळ्याट जास्त आवडली ती जमिनीवरची नक्षी. सहसा हा प्रकार कुठे पहायला मिळत नाही.

दिनेश, ११व्या फोटोत अँगल जsssरा चुकलाय. नाहीतर एक उत्तम फोटो झाला असता - perfect photo frame! ही मालिका मस्तच चालू आहे पण तुमच्या लेखनाचा अभाव जाणवतोय.

देवालय

देवळाच्या म्हणून माझ्या काही कल्पना आहेत. खुप विस्तिर्ण परीसर, भरपूर झाडे, एखादी नदी वा सरोवर,
गर्दीचा अभाव.. असे सगळे असले म्हणजे गाभार्‍यातला देव मला शोधावा लागत नाही.. तर आमच्या सहलीतले असेच एक देवालय

१) सुंदर शेती आणि भात खाचरे तर होतीच पण पावसाचीही चिन्हं दिसत होती.

२) देवळाच्या प्रांगणातला प्रशस्त मंडप. इथे कोंबड्याच्या झुंजी होतात. तो खेळ तिथे लोकप्रिय आहे.

३) तेवढ्यात पावसाने गाठलेच..

४) देवळाचे प्रवेशद्वार

५) विस्तिर्ण पटांगण

६)

७)

तिथेच एक मनोरा होता. त्यावरून दिसणारे दृष्य.. आणि हो देवळाच्या स्वागतकक्षातच आम्हाला छत्र्या पण दिल्या.

८)
ते रंगीत फलक, तिथे होणार्‍या एका कार्यक्रमासंबंधी होते.

९)

१०)

मुख्य भागात मात्र प्रवेश नव्हता

११)

१२)

कधी संपूच नये असा वाटणारा प्रदक्षिणेचा मार्ग.. आता मी पण काही लिहितच नाही.. नुसते बघत चालत राहू.

१३)

१४)

१५)

१६)

१७)

१८)

१९)

२०)

२१)

२२)

२३)

२४)

२५) हे या वरच्या झाडाचे नाव बरं

क्रमशः

त्या देवळाच्या परीसरातून पायच निघत नव्हता.. इतकं सुंदर आणि शांत वाटत होतं ना तिथे.

१)

२) साधं पुत्रंजीवीचे झाडही असे सुंदर वाढले होते.

३) बहुतेक झाडाखाली असे नाव लिहिलेले होते ( आपल्यासारखे झाडावरच ठोकलेले नव्हते. )

४) सर्वाना आवडलेले हेच ते फुल.. माथावरची बिंदी किंवा कानातला झुमका म्हणून किती छान दिसेल ना ?

५) शेजारून एक नदी पण होती..

६)

७)

हा फुलोरा ओळखता येतोय का बघा.. ( करमळाचा आहे )

८)

९)

कांचन जरा वेगळा ( नाजूक ) वाटला मला.

१०)

११)

१२)

१३)

कसावाचे झाड. आफ्रिकेत हे एवढे मोठे वाढू देत नाहीत. मग त्याची मूळे चिवट होतात आणि खाता येत नाहीत.

१४) कसावाचीच फुले

१५) देवळाबाहेरचा फलक

१६) आता वाचा

१७) बालित रस्त्याच्या कडेने सगळीकडे ही झाडे होती. आधी मला रातांब्याची वाटली पण नव्हती ( हो मी पाने खाल्ली, सवय जात नाही )

१८) स्वप्नातल्या कळ्यांनो

१९) एक देखणा पुतळा ( ऋषीचे नाव विसरलो )

२०) बालि ( देनपसार ) विमानतळ.. प्रवेश भाग इतका भव्य असणारा विमानतळ क्वचितच बघितला मी.

२१)

बालिचा निरोप घेताना

खरं तर इथे समारोप करायला हवा पण वाटेतल्या सिंगापूरातली देखणी ऑर्किडस अजून बघायची आहेत ना..
म्हणून..

क्रमशः

भाग ११ - सिंगापूर विमानतळावरील ऑर्किड्स

खरं तर मागच्या भागातच आपण बालिचा निरोप घेतला. बालिचा देनपसार विमानतळ फार मोठा नसला तरी सुंदर आहे. एमिरेट्स, सिंगापूर एअरलाईन्स नेहमी झोनवाईज बोर्डींगचा आग्रह धरतात पण प्रत्यक्षात ते ना मुंबईला शक्य होत, ना दुबईला ना सिंगापूरला.. पण देनपसार ला मात्र ते अत्यंत उत्तम रितीने साधले.
त्यांनी प्रत्येक झोनप्रमाणेच रांगा लावला. एका मुलीने त्या रांगेत येऊनच पासपोर्ट व बोर्डींग कार्ड चेक केले. त्यानंतर आता पासपोर्ट आत ठेवा, याच्यापुढे चेकिंग होणार नाही असे सांगितले. झोनवाईजच रांगा सोडल्या
त्यामूळे २०/२५ मिनिटात सर्व प्रवासी स्थानापन्न झालेदेखील.

परतीच्या वाटेवर सिंगापूरला ( चांगी एअरपोर्ट ) हॉल्ट होता. गेली १५ वर्षे मी अनेकवेळा सिंगापूरला गेलोय.
दिवसाच्या कुठल्याही प्रहरी, वर्षाच्या कुठल्याही दिवशी तिथली ऑर्किडस अशीच भरभरून फुललेली असतात.
( यापेक्षा विविधता अर्थातच सिंगापूर शहरातल्या ऑर्किड गार्डनमधे आहे. )

आता जास्त न लिहिता या ऑर्किड्सचेच फोटो टाकतो.

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

९)

१०)

११)

१२)

१३)

१४)

१५)

१६)

१७)

१८)

१९)

२०)

२१)

२२)

२३)

आता मात्र बालि सहल समाप्त झाली..... आणि पुढल्या सहलीचे प्लानिंगही सुरु झाले.





No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://itsmytravelogue.blogspot.com

   Cinematographic Wai - Menavali_November 6, 2013 We had a "real" long Diwali Holidays to our Company - 9 days - long enough to m...