आवडतो मज अफ़ाट सागर, अथांग पाणी निळे
निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे
फेस फुलांचे सफेत शिंपित, वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती, गात किनार्याकडे
मऊ मऊ रेतीत रे कधी मी, खेळ खेळतो किती
दंगल दर्यावर करणार्या वार्याच्या संगती
तुफान केंव्हा भांडत येते सागर ही गर्जतो
त्यावेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो
संथ सावळी दिसती जेंव्हा क्षितिजावर गलबते
देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते
क्षितिजावर मी कधी पाहतो मावळणारा रवी,
ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी
प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी
नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी
- कुसुमाग्रज
=======================================================================
=======================================================================
आमचे FB मित्र श्री मधुकर धुरी यांनी केलेले मालवणचे अप्रतिम वर्णनः
(सदर वर्णन इथे देण्यास परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद मधुकर )
मालवणची भौगोलिक रचना खास आहे. पश्चिमेला अथांग अरबी समुद्र. पूर्वेला
कासारटाक्याची घाटी. उत्तरेला गड नदीची खाडी, तर दक्षिणेला कर्ली नदीची
खाडी. या दोन्ही नद्या समुद्राला मिळण्याआधी समुद्राला समांतर वाहतात.
त्यातून जमिनीची एक चिंचोळी पट्टी तयार झाली आहे. शंभरएक मीटर रुंदीची. या
चिंचोळ्या पट्टीच्या पश्चिमेला आहे समुद्रकिनारा, तर पूर्वेला नदी किनारा.
एका बाजूला समुद्राची गाज, तर दुसऱ्या बाजूला माडांच्या बनातून वाहणारी
शांत नदी. कर्ली नदीच्या चिंचोळ्या पट्टीत तारकर्ली वसलंय. नदीच्या मुखाजवळ
आहे देवबाग, तर समोरच्या किनार्यावर आहे भोगवे. गडनदीच्या पट्टीतलं गाव
तोंडवळी, मुखाजवळ आहे तळाशील आणि दुसऱ्या किनाऱ्यावर वसलंय रेवंडी.
मालवणच्या दक्षिणेला सात किलोमीटरवर आहे तारकर्ली. लांबच लांब विस्तीर्ण
समुद्रकिनारा तारकर्लीला लाभलेला आहे. एमआयडीसीने तारकर्लीला प्रसिद्धी
मिळवून देण्यात विशेष हातभार लावलाय. तारकर्लीपासून पाच किलोमीटर दक्षिणेला
असणार्या देवबागपर्यंत कर्ली नदी समुद्राला भेटायला वाहत येते. तारकर्ली
ते देवबाग गाडीरस्ता उपलब्ध आहे. देवबागला बोटीत बसायचं आणि कर्ली नदी
समुद्राला मिळते त्याच्या दुसर्या किनार्यावर असणार्या भोगवे बीचवर
उतरायचं. देवबाग भोगवे सफरीदरम्यान शेकडो सीगल पक्षी तुम्हाला पाहायला
मिळतात. भोगवे किनारा पाहून झाला, की पुन्हा बोटीत बसायचं, निघायचं
निवतीकडे. समुद्रकिनारी टेकडीवर निवतीचा किल्ला आहे बीचला लागूनच. निवती,
भोगवे दोन्ही समुद्रकिनारे अतिशय रमणीय व सुंदर आहेत. देवबागहून बोटीने या
किनार्याना भेट देण्यात विशेष मजा आहे. या बोट सफरीचं अजून एक आकर्षण आहे,
ते म्हणजे डॉल्फिन. निवतीजवळच्या समुद्रात डॉल्फिन हमखास बघायला मिळतात
आणि देवबागचे बोटवाले तुम्हाला डॉल्फिन दाखविल्याशिवाय हार मानत नाहीत.
मात्र तुम्ही नेमकी वेळ गाठायला हवी आणि थोडीफार नशिबाने साथ द्यायला हवी.
तीन-चार तासांच्या या सफरीचं 10 जणांचं मिळून 800 रु. भाडं आहे. तुमचे
स्वतःचे 10 जण नसतील, तर मात्र दरडोई अधिक खर्च सोसायची तयारी हवी. देवबाग,
तारकर्ली करीत कर्ली नदीतून लक्ष्मीनारायणाचं सुप्रसिद्ध मंदिर असणाऱ्या
वालावलपर्यंत जर तुम्हाला बोटिंग करण्याची संधी मिळाली, तर मात्र सोन्याहून
पिवळं; पण त्यासाठी योग्य ती किंमत मोजायची तयारी हवी. देवबागची नदी व
समुद्रकिनारा दृष्ट लागण्याइतका स्वच्छ व नितळ पाण्याचा आहे. देवबाग कर्ली
नदीइतकाच सुंदर किनारा आहे तळाशील गड नदीचा. गड नदी समुद्राला भेटायला येते
ती तोंडवलीपासून. तळाशीलपर्यंत समुद्राला समांतर वाहते. मालवण, हडी,
तोंडवली, तळाशील असा गाडीरस्ता उपलब्ध आहे. नदीच्या एका बाजूला तोंडवली,
तळाशील, तर दुसऱ्या बाजूला ओझर, रेवंडी, कोळंब आहे. ओझरची ब्रह्मानंद
स्वामींची असणारी गुहा व पाण्याचा झरा बघण्यासारखा आहे. ओझरजवळ आहे रेवंडी.
मालवणचा सुपुत्र "वस्त्रहरण'कार मच्छिंद्र कांबळींचं गाव. गावात
भद्रकालीचं मंदिर आहे. रेवंडीतल्या तरीवरून तळाशीलला बोटिंगची सुविधा
उपलब्ध आहे. तळाशीलची मच्छिमारांची वस्ती संपली, की बांद्याच्या पुढे ओसाड
बेट आहे. त्यावरून गड नदीच्या मुखाचं सुंदर दर्शन होतं. रेवंडीतूनसुद्धा गड
नदी समुद्राला मिळते ती जागा बघण्यासारखी आहे. तोंडवळीचा सुरूचा किनारा,
तळाशीलचा माडांच्या चिंचोळ्या पट्टीचा किनारा खास बघण्यासारखा. खुद्द
मालवणात सिंधुदुर्ग किल्ल्याबरोबरच बघण्यासारखी बरीच ठिकाणं आहेत. तिथला
मासळीबाजार, अनेक मंदिरं, रॉक गार्डन, चिवळा आणि त्याला लागून असलेला
कोळंबचा समुद्रकिनारा अशा ठिकाणी सहज जाता येतं. महाराजांच्या वास्तव्याने
पावन झालेलं मालवण गाव. इथे येऊन सिंधुदुर्ग किल्ला न पाहिला तर काय
पाहिलं? मालवणच्या जेटीवरून किल्ल्यात जायला बोटी उपलब्ध आहेत. राजाराम
महाराजांनी स्थापन केलेलं महाराजांचं मंदिर, फांदी असणारं माडाचं झाड,
दुधबाव, दहीबाव, महाराजांच्या हाताचा व पायाचा ठसा, राणीची वेळा इत्यादी
पाहताना वेळ कसा पटकन निघून जातो. मालवणला रेल्वे स्टेशन नाही. रेल्वे
पकडण्यासाठी कुडाळला जावं लागतं. मालवणहून कुडाळला जाताना रस्त्यात धामापूर
लागतं. धामापूरचा तलाव मन प्रसन्न करणारा आहे. तलावात बोटिंगची सोय आहे.
झाडीभरला हा तलाव नुसत्या दर्शनानेच तुम्हाला ताजतवानं करतो. आठवडाभराची
सुट्टी असेल, तर मालवणनंतरचा मुक्काम करायचा सावंतवाडी अथवा वेंगुर्ल्याला.
त्याशिवाय देवगड अथवा कणकवली असासुद्धा पर्याय आहे. आठवड्याची सुट्टी
नसली, तर कोकण रेल्वे आहेच तुम्हाला झटपट मालवणला पोहोचायला. मगे येतालास
ना? येवा, कोकण आपलाच आसा!
=======================================================================
=======================================================================
या रम्य भूप्रदेशी मित्रांसवे पुन्हा या
गेल्यावेळेसच्या कोकण भटकंतीतील वरील निमंत्रणाचा मान ठेवून, नाताळ आणि वर्षाअखेरीस जोडुन आलेल्या सुट्ट्यांचा फायदा घेत पुन्हा एकदा कोकण भटकंती करून आलो. नविन वर्षाच्या स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी, मुंबईच्या कोलाहलापासुन दूर कोकणातील "मालवण" या ठिकाणी आम्ही पाचजण - मी, संदेश, राहुल, प्रतिक आणि आमची "स्विफ्टुकली" गेलो होतो. यावेळेस आम्ही मुंबई ते मालवण व्हाया कोल्हापूर (गगनबावडा, करूळ घाट) असा प्रवास केला. मालवणचा मासळी बाजार/लिलाव, रॉक गार्डन, देवबाग, किल्ले निवती, निवती रॉक्स, मेढा निवती, सागरतीर्थ (आरवली - वेंगुर्ला), तोंडवळी-तळाशील समुद्रकिनारा अशी या वेळची आमची भटकंती होती. संदेश याचे घर मालवणातील देऊळवाडा येथे होते, पण आम्ही चौघेजण मात्र त्याच्या सड्यावरच्या घरात, (कोकणी भाषेत मांगर) कुंभारमाठ येथे राहणार होतो. जहां तक नजर जायेगी वहा तक सिर्फ और सिर्फ आंब्याची झाडे आणि त्यात फक्त एकच संदेशचं घर. आजुबाजुला एकही घर नाही कि कोलाहल नाही. फक्त आम्ही चौघे. पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात सड्यावरून आंब्याच्या मोहराचा सुवास घेत चालतानाचा अनुभव वर्णनातीत आहे.
आमच्यातील एकही जण ३१ डिसेंबर "सेलिब्रेट" करणारा नसल्याने मालवणला समुद्राची गाज ऐकत जुन्या वर्षाला निरोप आणि नविन वर्षाचे स्वागत असा बेत होता. पण नेमकं त्याचवेळेस मालवण (खासकरून तारकर्ली) पर्यटकांनी जबरदस्त गजबजलं होतं. मालवणचे रस्ते, बाजारपेठ, हॉटेल्स पर्यटकांनी ओसंडुन वाहत होते. नेमका याच वेळी मालवणात आम्हाला "सांताक्लॉज" भेटला आणि आमच्या ज्या ज्या इच्छा (शांत निवांत, पर्यटकांची गजबज नसलेला समुद्रकिनारा, मनसोक्त फोटोग्राफी, गरमागरम खमंग मत्स्याहारी जेवण) होत्या त्या त्याने पूर्ण केल्या.
आता हाच सांताक्लॉज तुम्हाला मालवणची सफर घडवून आणणार आहे तर मग येताय ना त्याच्यासोबत समुद्राची हि गाज ऐकायला?
सर्वांची उत्सुकता ताणुन ठेवण्यासाठी सांताक्लॉजने या सिरीजमधल्या ठिकाणांची नावे न सांगण्याचे बजावले आहे. त्यामुळे सगळ्यांनी आपआपले अंदाज बांधा. यातील फोटो त्या त्या भागात येणार असल्याने त्या त्या ठिकाणांची नावे समजतीलच. मालवण ठिकाण मध्यवर्ती ठेवून इतर भटकंती केल्याने या मालिकेचे नाव "मालवणमय".
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
पुढच्या भागात "सांताक्लॉज" तुम्हाला मालवणच्या मासळी बाजारात घेऊन जाणार आहे. 

विष
"देऊळवाडाच" आहे.
चेंजेस डन
आणि बहुतेक अंदाज एक्दम बरोब्बर
चला या ठिकाणांची नावे सांगुनच टाकतो 
१. सागरतीर्थ समुद्रकिनार्यावर, आरवली.
२. सुवर्ण गणेश मंदिर
३. गगनबावडा घाट
४. किल्ले निवती
५. रामेश्वर मंदिराजवळ
६. तोंडवली-तळाशील समुद्रकिनारा
७, ८, ९, १० मालवण धक्का आणि बाजार मधील समुद्र किनारा
११ किल्ले निवती
१२ मालवण धक्का आणि बाजार मधील समुद्र किनारा
१३ देवबाग
१४ किल्ले निवती समुद्रकिनारा
१५ किल्ले निवती
१६ किल्ले निवती
१७ भोगवे समुद्रकिनारा
१८ मेढा निवती
१९ सागरतीर्थ
२० मालवण (जेट्टीवरून काढलेला फोटो)
२१ तोंडवली-तळाशीलला जाणारा रस्ता
२२ रॉक गार्डन
"मालवण मासळी बाजार"
गेल्या भागात ठरल्याप्रमाणे "सांताक्लॉज" आज तुम्हाला मालवणच्या मासळी बाजारात फेरफटका मारायला नेणार आहे. कोळंबीपासुन सुरमयीपर्यंतच्या सगळ्या माशांचा लिलाव येथे होतो. 
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
चोरीचा मामला . . .
प्रचि ३०
प्रचि ३१
प्रचि ३२
प्रचि ३३
देवबाग आणि किल्ले निवती (सूर्यास्त-सूर्योदय)
मागच्या भागात ठरल्याप्रमाणे "सांताक्लॉज" तुम्हाला किल्ले निवतीला
नेणार होता, पण जाता जाता त्याने गाडी देवबागकडे वळवली आणि काहि वेळ देवबाग
किनार्यावर रेंगाळला.
या भागात तुम्हाला देवबागचे काहि ठराविक फोटो ("कोकणमय" भागात देवबागचे
फोटो असल्याने) आणि किल्ले निवतीवरून दिसणारा सूर्योदय-सूर्यास्त दाखवणार
आहे.
देवबाग
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
निवती किल्ल्यावरून दिसणारा सूर्यास्त
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
उगवला चंद्र पुनवेचा...
प्रचि १५
प्रचि १६
पूरबी सूर्य उदेला जी...
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
भल्या सकालला आबाल झुकतं हे खाली
सोनं चमचमतं दर्याला चढते लाली
आमी पान्यामंदी, रापण टाकतो जाली
धन दर्याचं लुटून भरतो डाली
रात पुनवेचं चांदनं प्याली
कशी चांदीची मासली झाली
माज्या जाल्यात होऊन आली
नेतो बाजारा भरून म्हावरां ताजा
मी डोलकर दर्याचा राजा...
प्रचि २०
किल्ले निवती
किल्ले निवती मालवणपासुन साधारण पाऊण-एक तासाच्या अंतरावर वेंगुर्ल्याच्या दिशेने आहे. परूळ्याहुन थोडेच पुढे आणि पाटच्या आधी एक रस्ता भोगवे-किल्ले निवती कडे जातो. मालवण ते वेंगुर्ला सागरीमहामार्गावरील प्रत्येक गाव हे निसर्ग सौंदर्याना ओतप्रत भरलेले आहे. या गावांना जोडणारा समुद्र एकच आहे पण प्रत्येक गावात त्याचे सौंदर्य मात्र वेगवेगळे आहे. वेंगुर्ल्यात दोन निवती आहे. एक मेढा निवती तर दुसरी किल्ले निवती. यातील मेढा निवतीला मी बर्याच वेळा गेलोय. पुढे एक रस्ता भोगवेला जातो आणि दुसरा किल्ले निवतीला. परुळ्याच्या श्री आदिनारायणाचे दर्शन घेऊन साधारण अर्ध्यातासाच्या आतच आपण किल्ले निवतीला पोहचतो. साधारण ४०-४५ उंबर्याच्या या गावाला अतिशय अप्रतिम असे निसर्गसौंदर्य लाभले आहे. एका बाजुला इतिहासकालीन किल्ले निवती तर दुसर्या बाजुला अथांग सागर आणि त्यातुन मध्येच डोकावणारे निवती रॉक्स.
निवती किल्ल्यावरून दिसणारा समुद्र
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
कोकणची माणसं साधीभोळी.....काळजात त्यांच्या भरली शहाळी
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
भोगवे समुद्रकिनारा
या भागात आपण सैर करूया देवबागच्या अगदी समोर आणि किल्ले निवतीच्या
बाजुला असलेल्या भोगव्याच्या नितांतसुंदर आणि अस्पर्श समुद्रकिनार्याची. 
(टिपः "गाज सागराची" या शिर्षकानुसार या मालिकेतील बहुतेक फोटो
समुद्रकिनार्याचे आहे. त्यामुळे काहि कदाचित ते रीपीटेटीव्ह वाटतील, पण
प्रत्येक ठिकाणांचे, गावचे, समुद्रकिनार्याचे सौंदर्य वेगवेगळे आहे हे
प्रत्यक्ष पाहिल्यावरच समजेल
)
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
गॉगल इफेक्ट (गॉगलचा फिल्टर करून काढलेला फोटो)

पुढच्या भागात सांताक्लॉज सोबत सैर करूया आरवली येथील "सागरतीर्थ" समुद्रकिनार्याची
सागरतीर्थ
वेंगुर्ल्यापासुन साधारण १४ किमी आणि वेतोबाच्या आरवलीआधी १ किमी अंतरावर एक नितांतसुंदर समुद्रकिनारा आहे "सागरतीर्थ".
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
(प्रचि: संदेश)
तोंडवली-तळाशील समुद्रकिनारा
मालवणहुन देवगड कुणकेश्वर येथे जाणार्या रस्त्याने साधारण ११-१२ किमी अंतरावर आचर्याच्या आधी तोंडवली तळाशील येथे जाण्यासाठी फाटा आहे. मालवणहुन तोंडवली-तळाशील अंतर १५ किमी आहे. दाट सुरूच्या बनातुन जाणारी वाट आपल्याला अजुन एका अस्पर्श समुद्रकिनारी घेऊन जाते. त्या आधी ओझर येथे श्री. स्वामी ब्रह्मानंद यांची समाधी गुहा आहे. येथील ब्रह्मानंद स्वामींची असणारी गुहा व नितळ पाण्याचा झरा बघण्यासारखा आहे.
श्री. स्वामी ब्रह्मानंद गुहा (ओझर)
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
(वरील सर्व प्रचि संदेशच्या कॅमेर्यातुन
)
तोंडवली-तळाशील समुद्रकिनारा
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
टाईमपास

प्रचि २३
पुढच्या अंतिम भागात भेट देऊया मालवण येथील रॉक गार्डनला आणि पाहुया सन २०१२ मधील शेवटचा सूर्यास्त
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.