https://www.maayboli.com/node/32856
वालावल, नेरूरपार आणि धामापूर
=======================================================================
"योग्या, हे माझ्या गावचे फोटो" नरेश त्याच्या गावचे फोटो दाखवत होता.
कुठंल रे गाव?
कुडाळ जवळील "सरंबळ""
नरेशच्या गावचे फोटो पाहत होतो. कोकण म्हटल्यावर जसं चित्र समोर येतं तसंच ते गाव फोटोत भासत होतं. (आधीच्या भागातील प्रचि ०२ ) तीच ती लाल मातीतली वाट, काजुच्या बागा, विहिर, अंगणातले पक्षी (हॉर्नबिल आणि स्वर्गीय नर्तकाचे काही फोटो होते :-))
"चलो तर मग यंदाची कोकण भटकंती तुझ्या गावातुनच सुरू करू."
साधारण नोव्हेंबर मध्ये कोकण भटकंतीचा प्लान शिजला. पण तारीख ठरत नव्हती.
डिसेंबर हरीश्चंद्रगड आणि इतर भटकंती, जानेवारीमध्ये दोघांच्याही प्रचिंचे
प्रदर्शन, राजमाची आणि दिनेशदा गटग यामुळे प्लान पुढे जात होता. शेवटी
कुठल्याही परीस्थिती फेब्रुवारीमध्ये जायचेच ठरले. ऑफिसमधील आम्ही सहा आणि
नरेशचे दोन मित्र असे आठजण तयार झालो. प्लान तयार झाला आणि गुरूवारी ९
फेब्रु. ला रात्री निघुन मंगळवारी १४ ला पहाटे परत परतायचे ठरले. यात कुडाळ
(सरंबळ), धामापूर, वालावल, निवती, वेंगुर्ला, अरवलीचा वेतोबा, रेडीचा
गणपती, मोचेमाड समुद्रकिनारा, मालवण, आंगणेवाडी , सिंधुदूर्ग किल्ला,
तारकर्ली, देवबाग, कुणकेश्वर आणि शेवटी विजयदुर्ग असा भरभक्कम बेत होता.
निघण्याच्या आदल्यादिवशी एक टांगारू निघाला. शेवटी आम्ही सातजण
ठरल्याप्रमाणे (आरामात ;-)) गुरूवारी रात्री १०:३० - ११ च्या सुमारास
विक्रोळीहुन क्वालिसने निघालो. सुरूवातीला गप्पाटप्पात रमलेल्या एकेकांची
विकेट रात्री १-२ नंतर पडु लागली (अर्थात ड्रायव्हरच्या बाजुला बसलेला
सोडुन
). सकाळी साधारण ७-८ च्या सुमारास आम्ही कुडाळमार्गे सरंबळला पोहचलो. घर
बंदच असल्याने सकाळी सगळ्यांनी मिळुन आधी घर स्वच्छ केले. बॅगा टाकल्या आणि
चुल पेटवून आंघोळीसाठी पाणी ठेवले. चुलीवरच्या गरम पाण्यात एक वेगळाच गंध
असतो तो मला स्वतःला खुप आवडत असल्याने आंघोळ झाल्यावर अधिकस फ्रेश वाटु
लागले.
शुचिर्भुत होऊन मी आणि नरेश गावात एक फेरी मारण्यास निघालो. खरंच गाव खुप
सुंदर होते. दुरंगी बाभुळ, रीठा, काजुच्या बागा पहात/ फोटो काढत फिरत
असतानाच हॉर्नबील, कोतवाल, अजुन एका सुंदर पक्ष्याने दर्शन दिले (फोटो
काढता आला नाही
).
प्रचि ०१
(दुरंगी बाभूळ, रीठा आणि काजू)
गावात फिरून परत घरी येईपर्यंत इतरजणांची तयारी झाली होती. नाश्ता करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो, त्याआधी सरंबळ गावच्या श्री देवी सातेरीचे दर्शन घेतले. मंदिराचे काम चालु होते पण मंदिर आणि परीसर खुपच सुंदर होता. ("सातेरी" म्हणजे "वारूळ".)
प्रचि ०२
श्री देवी सातेरी मंदिर (सरंबळ, कुडाळ) 
प्रचि ०३
श्री देवी सातेरी
सरंबळ गावातुन धामापुरला जाण्यासाठी एक रस्ता आहे तेथुनच आम्ही धामापुर,
वालावल मार्गे निवतीला (मुक्काम) पोहचणार होतो. पण त्या रस्त्याचे काम
चालु असल्याने आम्हाला पुन्हा गावाला वळसा घालुन कुडाळ-धामापूर रस्त्याने
जावे लागले. इथे थोडीशी गफलत झाली. खरंतर पहिल्यांदा धामापूर करून नंतर
वालावल आणि मग पाट मार्गे निवती असं केलं असत तर वेळ वाचला असता पण आम्ही
पहिल्यांदा वालावल नंतर धामापूर आणि परत वालावलला येऊन पाट मार्गे निवतीला
गेलो. अर्थात याचा एक फायदाच झाला. आम्हाला नेरूर या निसर्गरम्य गाव पाहता
आले. 
सरंबळहुन थोड्याच वेळात आम्ही श्री लक्ष्मीनारायणाच्या दर्शनासाठी "वालावल"
गावी पोहचलो. आजपर्यंत वालावल गावाबद्दल जे ऐकल होतं अगदी तसाच परीसर पाहत
होतो. (यावेळी आमच्या कडे कॅनन 1000D आणि 1100D असे दोन कॅमेरा असल्याने
एका कॅमेर्याला 75-300 लेन्स आणि दुसर्याला 18-55 लेन्स लावली होती,
सारखी लेन्स बदलायला नको म्हणुन :-), अर्थात याचा फायदाच वालावल तलावाजवळ
किंगफिशर, नीलपंख टिपण्यासाठी झाला.)
वालवल येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिर:
कुडाळ शहरापासुन १५ किमी अंतरावल असलेलं श्री लक्ष्मीनारायण मंदिर हे
हेमाडपंथी वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे. गर्द वनराईने नटलेलं वालावल गाव
आणि मंदिरालगतचा सुंदर व शांत तलाव मंदिराच्या सौंदर्यात अधिकच भर घालतो.
हे मंदिर सुमारे आठशे वर्षापूर्वेचे असल्याचे जाणकार सांगतात. या मंदिराचं
बांधकाम चौदाव्या शतकात सूर्यभान आणि चंद्रभान प्रभुदेसाई या महापराक्रमी
बंधूंनी केले. त्यांची स्मारके श्री लक्ष्मीनारायण मंदिरासमोरील
दीपमाळांजवळ कल्याण पुरूष म्हणुन उभी आहेत. हे मंदिर पूर्वाभिमुख असुन याची
रचा त्रिस्तरीय आहे. मुख्य देवळी पुरातन असून या मंदिराच्या बांधकामामध्ये
पूर्णतः सागवानाचा वापर केला आहे. सभामंडपातील त्याकाळी बसवलेली लादी
कारागीरांचे कसब दाखविणारी आहे. या अतिप्राचीन मंदिरात असलेले कोरीवकामाचे
स्तंभ देखणे असून मंदिरात अतिशय सुंदर आणि देखणी अशी श्री लक्ष्मीनाराययाची
मूर्ती आहे. मंदिराचा सभागार प्रशस्त असुन येथील दगडी खांबावर व तुळईवरही
कोरीवकाम केलेले आढळते. मुख्य दरवाजा उंचीला कमी असून, त्यावर अप्रतिम
कमळांच्या फुलांचे कोरीवकाम केलेले आहे. मंदिराच्या समोरील द्वारपाल तसेच
डोक्यावरील विष्णूची मूर्तीही प्रेक्षणीय आहे. रामनवमीला येथे नऊ दिवस
यात्रा असते. वालावल गावची कोणतीही व्यक्ती पंढरपूरची वारी करत नाही, असा
गावचा रिवाज आहे. मला स्वतःला सर्वात आवडलेलं ठिकाण म्हणजे वालावल.
मुंबई ते कुडाळ अंतर ~३९५किमी. कुडाळ ते वालावर अंतर ~१०-१२ किमी.
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
(प्रचि: नरेश)
प्रचि १९
(प्रचि: योगेश)
वालावल गावच्या निसर्गमय मोहपाशातुन स्वत:ला नाईलाजाने सोडवून घेत आम्ही धामापूरला निघालो. वाटेतच नेरूरपार हे अतिशय शांत व रमणीय गाव लागले. नेरूरपार नदीच्या पुलावरून नदीचे आणि गावचे अतिशय मनमोहक सौंदर्य दिसते. वाटेतच कलेश्वराचे मंदिर आणि त्याच्या जवळच असलेल्या आणि कमलपुष्पांनी भरलेल्या तलावाने मोहिनी घातली आणि गाडी कलेश्वर मंदिराकडे वळवली.
प्रचि २०
प्रचि २१
नेरूर कलेश्वर:
कुडाळ तालुक्यातील कलेश्वराचे मंदिर अतिशय सुंदर असुन कोरीव कलाकुसरेने
नटलेले आहे. चौकोनी आकाराची शिवपिंडी हे येथील वैशिष्ट्य आहे (कलेश्वर
मंदिरातील फोटो घेण्यास मनाई होत). मंदिरात सहा खांब अप्रतिम कोरीवकामाने
सजवले आहेत. या मंदिरा शेजारीच असलेले दुसरे व स्वतंत्र मंदिर आहे ते श्री
ब्रह्मदेवाचे. ब्रह्मदेवाची मंदिरे फारशी नाहीत त्यामुळे हे मंदिर अतिशय
वेगळे आणि आवर्जुन पाहण्यासारखे आहे. भारतात ब्रह्मदेवाची तीन मंदिरे असुन
त्यापैकी एक नेरूर येथे असुन ब्रह्मदेवाशेजारी विष्णू-लक्ष्मी, सावित्री व
गायत्री देवता आहेत. ब्रह्मा, विष्णु व महेश या तीन देवतांची मंदिरे असणारे
हे एकमेव प्रसिद्ध
देवस्थान.
प्रचि २२
कलेश्वर मंदिर
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
ब्रह्मदेवाचे मंदिर आणि मूर्ती
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
नेरूरपार गावच्या निसर्गसौंदर्याचा पुरेपुर आस्वाद घेत आमची गाडी निघाली धामापूरच्या भगवती मंदिराकडे.
कोकणातील धामापूर हे अजुन एक अत्यंत निसर्गसंपन्न गाव आहे. या गावचे
वैशिष्ट्य म्हणजे येथील सुप्रसिद्ध धामापूरचा तलाव. सुरूवातीला आपल्याला
दिसते ते येथील श्री भगवती देवीचे मंदिर. मंदिराच्या थोड्या पायर्या चढुन
गेल्यावर श्री भगवती देवीचे दर्शन घडते. हे हि मंदिर पुरातन असुन कोरीव
कलाकुसर केलेले आहे. मंदिराचा परिसर स्वच्छ व सुंदर असून भगवती देवीची
मूर्तीही अतिशय आकर्षक व सुंदर आहे. मंदिराला लागुनच अंडाकृती रचनेचा अतिशय
सुरेख तलाव आहे. पाण्यात उतरण्यासाठी पायर्यांची सोय केलेली आहे. या
तलावाविषयी एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी - फार पूर्वी धामापूरमध्ये
ज्यांच्या घरी लग्नसमारंभ असेल, ती व्यक्ती लग्नाच्या आदल्या रात्री
फुलांनी बनविलेले दागिने एका परडीत घालून ते तळ्यात सोडत असे. दुसर्या
दिवशी त्या परडीतील दागिने सोन्याचे झालेले असत. लग्नसमारंभ आटोपल्यानंतर
दुसर्या दिवशी ते दागिने पुन्हा तळ्यात सोडले जात असत. खूप वर्ष असं
चाललं. मात्र, एका व्यक्तीला दागिन्याचा लोभ झाला आणि त्याने ते दागिने
तळ्यात न सोडता स्वतःकडेच ठेवले. त्यावेळी भगवती देवीचा कोप होऊन हि प्रथा
पुढे बंद झाली. स्थानिक संस्थेमार्फत या तलावामध्ये बोटिंगची सोय उपलब्ध
करून देण्यात आली आहे. या तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे कितीही पऊस पडला तरीही
या तळ्यातील पाणी वाहत नाही व कितीही दुष्काळ पडला तरीही येथील पाणी आटत
नाही.
कोकणातील मंदिरे मला का आवडतात हे कुणी विचारल्यास माझे उत्तर असेल, शांत, निवांत आणि स्वच्छ मंदिर व परीसर आणि तेथील आख्यायिका. 
प्रचि ३०
प्रचि ३१
प्रचि ३२
प्रचि ३३
प्रचि ३४
निसर्गसौंदयाने ओतप्रोत भरलेल्या या गावांची भेट आम्हाला पर्यटन आणि तिर्थाटन या दोन्हीचा अनुभव देऊन गेली. या तीनही गावांना भेट दिल्यावर कि मला वि.स.खांडेकरांच्या एका कवितेची प्रकर्षाने आठवण झाली.
रम्य अशा स्थानी
रहावे रात्रंदिन फुलुनि
मंजुळ घंटा सांजसकाळी
गोकुळ गीते गातिल सगळी
होउनि स्वप्नी गौळण भोळी
वहावे यमुनेचे पाणी
रंगवल्लिका उषा रेखिते
सिंदुर भांगी संध्या भरते
रात्र तारका दीप लावते
पहावे अनिमिष ते नयनि
रम्य अशा स्थानी
रहावे रात्रंदिन फुलुनि.......
वालावलच्या श्रीलक्ष्मीनारायणाचे, नेरूरच्या कलेश्वराचे आणि श्री भगवती देवीचे दर्शन घेतल्यावर आम्ही पाट मार्गे "निवतीला" मुक्कामासाठी निघालो.
(तटि: मंदिराची माहिती "कोकण पर्यटन" पुस्तकातुन साभार)
(क्रमशः)
२)<<<< स्थानिक संस्थेमार्फत या तलावामध्ये वोटिंगची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे कितीही पऊस पडला तरीही या तळ्यातील पाणी वाहत नाही व कितीही दुष्काळ पडला तरीही येथील पाणी आटत नाही.>>>>
वोटिगची सोय म्हणजे तिथे पण इलेक्शन होते का?
'श्वास' चित्रपटाचं शुटींग परुळे-वालावलीत झालंय. टायटल्सच्या वेळचा गोफनाच श्रीदेवआदिनारायणाच्या प्रांगणातला.. <<<
परश्याचं घर (जोशींचं घर), परश्याची आई फोनवर बोलते त्या दोन फोनपैकी पहिला
फोन(डॉ. सामंतांचं घर), गोफनाच आणि दशावताराची दृश्ये (आदिनारायण
मंदिरातले नव्हे. पोस्ट ऑफिसच्या जवळ जे मंदिर आहे तिथले), साकवावरून
परश्या-आजोबा चालतायत तो साकव आदिनारायण मंदिरामागचा - परूळ्यातली.
चित्रपटाचा क्लायमॅक्स;परश्या परत येतो ऑपरेशननंतर - काळशे, वालावल आणि मधली खाडी
सजवलेल्या दिपमाळांचा सीन - वालावलच्या आदिनारायण मंदिरातला.
मुक्त धावणारा परश्या आणि थव्याने उडणारे पक्षी हे देवबाग-भोगव्याच्यामधे समुद्रात वाळूचा जो पॅच तयार होतो फेब-मार्च मधे तिथे.
परश्या धावत येतो आणि तो पडणार इतक्यात आजोबा त्याला सावरतात. खाली बघतात खोल टोकेदार कातळ कडा आणि समुद्र - निवतीचा किल्ला.
बाकी मग थोडं काही वरती चिपीच्या माळावर, वेगवेगळ्या शेतांच्यात, कलंबिस्त आणि शिरशिंगेमधे पण केलंय.
हा समुद्रात जो वाळूचा पॅच तयार होतो त्याला या भागांत मोबार म्हणतात. देवबागला टोकाकडे मोबारेश्वराचं मंदिरही आहे. याला मोबारेश्वर नांव कसं पडलं, विचारल्यावर एकाने मला ही माहिती सांगितली होती.
निवती
पाट-परूळे मार्गे म्हापण तिठ्यावरून वेंगुर्ल्याला जाणार्या रस्त्यावर काहि वेळातच म्हापण, कोचरे करत आपण निवती या गावी पोहचतो. या गावाचे वैशिष्ट्यं असं कि अगदी गाव जवळ येईपर्यंत समुद्राचे दर्शन होत नाही. एका वळणावर गाडी आत शिरताच रस्त्याच्या दोन्ही बाजुला घरं आणि डाव्याबाजुच्या घरापासुन अगदी हाकेच्या अंतरावर समुद्र. शे-दोनशे उंबर्याच्या या गावाला अप्रतिम निसर्गसौंदर्याची झालर आहे. येथील प्रमुख व्यवसाय हा मासेमारी. सध्या निवती गावही पर्यटनाच्या नकाशात झळकु लागल्याने तो व्यवसायही भरभराटीस येऊ लागला आहे. काहि वर्षापूर्वी एकही हॉटेल नसलेल्या या गावात आता रीसॉर्ट दिसू लागलेत.
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
विवेक स्वतः आमच्याबरोबर नाही आला, पण त्याने आमच्या राहण्याची, जेवणखाणाची व्यवस्थित सोय त्याच्या घरी करून दिली होती. संध्याकाळी ४ वाजता घरी पोहचताच मामी आमची वाट पहातच उभ्या होत्या. त्यांनी लगबगीने आम्ही राहणार असलेली रूम उघडुन दिली. बॅगा टाकल्या, फ्रेश होऊन तयार होईपर्यंत वैनींनी मस्तपैकी चहा-नाश्ता तयार केला होता त्यावर ताव मारून समुद्राकडे निघालो. मी निवतीला जेंव्हा पहिल्यांदा आलो तेंव्हा पावसाळा सुरू झाल्याने जास्त फिरता आले नाही, सूर्यास्ताचा आनंद लुटता आला नाही, साधा कॅमेरा असल्याने मनासारखे फोटो टिपता आले नाही कि समुद्रात भिजता आले नाही ती सारी कसर या भटकंतीत भरून काढायची होती. एका हातात कॅमेरा आणि दुसर्या हातात चपला सांभाळत मऊशार वाळुतुन चालत चालत निघालो. बीचवर पुढे क्रिकेटचे सामने रंगात आले होते. थोडावेळ तेथे रेंगाळलो.
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
एव्हाना सूर्य अस्ताला जाण्याच्या मार्गावर होता आणि मला सूर्यास्ताचा नजारा चुकवायचा नव्हता.
निसर्गसृष्टीचा आनंद मनमुराद लुटायचा असेल तर घराबाहेर पडाव लागत आणि एकदा
घराबाहेर फिरायचे म्हटलं कि नवीन स्थळ शोधाव. एकदा का त्या इच्छित स्थळी
पोहचलो कि तेथे काय पहाव हे स्वता:च्या आवडीनुसार ज्याने त्याने ठरवावे.
मला समुद्रकिनारी गेल्यावर जास्त काय पहायला आवडतं तर सूर्यास्त आणि
त्यानंतर क्षितिजावर होणारी रंगांची उधळण. प्रत्येक ठिकाणच्या सूर्यास्तात
वेगळेपणा असतो. फक्त नजर पाहिजे तो पाहण्याची, अनुभवण्याची. याही वेळेस
असंच झालं. सायंकाळची विलोभनीय वेळ, रूपेरी वाळुचा मऊशार समुद्रकिनारा,
आकाशात बदलत जाणारे रंग, विविध छटा, पाण्यावर उमटणारे प्रतिबिंब, माझी
पावलं नकळत त्या ओल्या मऊशार वाळुत खेचली जाऊ लागली. एरव्ही स्वत:कडे
कुणाला पाहुही न देणारा हा तेजाचा गोळा हळुहळु आपलं रूप बदलु लागला. आता
त्याचा लालबुंद आणि भव्य आकार सहज स्पष्ट दिसू लागला. सूर्य हळुहळु खाली
येऊ लागला. माझी पर्यायाने कॅमेर्याची नजर फक्त आणि फक्त त्याच्याकडेच.
भव्य व लोभस सूर्याचा लालबुंद गोळा पाण्याजवळ आला. त्याचं पाण्यातलं
प्रतिबिंबही तेव्हढंच लोभस. पाहता पाहता सूर्याचा अस्त झाला. जाता जाताही
तो आकाशावर विविध रंगाच्या छटा , वेगवेगळ्या आकाराच्या रंगीबेरंगी
रांगोळ्या काढुन गेला. निसर्गाचा हा अविष्कार डोळ्यात साठवू कि कॅमेर्यात
अशी संभ्रमावस्था माझी झाली. अगदी काळोख होईपर्यंत निसर्गाचा हा खेळ पाहत
होतो.
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
थोड्यावेळाने, घरी परतलो. संकष्टी असल्याने "शुक्रवारी(ही)" रात्री
शाकाहारी जेवणाचा बेत होता. वाटाण्याचा सांबर, भात, चवळीच्या शेंगाची भरपूर
खोबरं घालुन केलेली भाजी, बटाट्याची भाजी, चपाती आणि उकडीचे मोदक असा
फर्मास बेत वैनींनी केला होता. त्यामुळे "कोकणात" असुनही "शाकाहारी
शुक्रवार" सत्कारणी लागला
(रच्याकने उकडीचे मोदक किती फस्त केले ते विचारू नका
).
जेवणानंतर समुद्रकिनारी पुन्हा गेलो आणि बराच वेळ मित्रांसोबत गप्पा मारत बसलो. आमच्या गप्पांबरोबर समुद्रालाही उधाण येत होते. सूर्यास्ताचा अप्रतिम नजारा समुद्राला साक्षी ठेवून पाहिल्यानंतर आता वेध होते "चांदाची किरण दर्यावरी" पाहण्याचे. अगदी पौर्णिमेचा नाही पण पौर्णिमेच्या नंतरच्या चतुर्थीचा चंद्र आणि चंद्रकिरण सागरावर बघायचे होते. काहिवेळाने चंद्र उगवला आणि "बघुनी नभीची चंद्रकोर ती सागर हृदयी उर्मी उठती" अशी अवस्था त्या रत्नाकराची झाली होती. चंद्र समुद्राच्या मध्यावर येण्यास बराच अवधी होता. दिवसभराच्या थकव्याने आणि दुसर्या दिवशी लवकर उठायचे असल्याने नाईलाजाने आम्ही घराकडे परत निघालो आणि निद्रेच्या स्वाधीन झालो. दुसर्या दिवशी सकाळी लवकर उठुन शुचिर्भुत होऊन चहा पोह्याचा नाश्ता करून मी पुन्हा समुद्राकडे फिरायला गेलो.
समुद्राचा खारावारा आणि अंगावर उडणार्या लाटेंचे तुषार झेलत पाण्यात उभे राहुन कालचा निसर्गोत्सव आठवताना दवणेसरांच्या गीताचे काही बोल ओठांवर आले.
नव्हता पाऊस झरला तरी हा गंधित वारा
थेंबाथेंबामधुनी उजळे सोनपिसारा
भरतीच्या त्या लाटे तरीगे आलो भरूनी
बोलल्याविना हृदयामधले गेले निघुनी...........
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
अर्थात आम्हाला जाग येण्याआधीच निवती गाव जागे झाले होते. मुख्य व्यवसाय मासेमारी असल्याने रात्रभर दर्याचं धन लुटुन सागरपुत्र घरी परतत होते आणि आपल्या धनाच्या राशी बंदरावर टाकत होत्या.
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
थोड्या वेळाने तेथे माशांचा लिलाव सुरू झाला. आम्ही सगळेच पहिल्यांदाच ते पाहत होतो. ४००, ४१०, ५००, १२०० अशी बोली वाढत मासे हातोहात खपले जात होते. कोळंबी, बांगडे, सवंदाळे असे आणि इतर बरेच मासे लिलावात होते.
घेऊनशी जा रं ताजा ताजा दादा ताजा ताजा
चिकना चिकना म्हावरा माझा
प्रचि २३
बोलु नको नै बरफाचा ह्यो
नीट बघं नै कालपरवाचा ह्यो
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
हा मासा मासेमारीच्या जाळ्या खातो/तोडतो तसंच याला कुणी खातही असं आम्हाला सांगितलं.
आणि त्याला समुद्रात परत टाकुही शकत नाही म्हणुन त्याची अवस्था अशी.

प्रचि ३२
एव्हाना सुधीरने (विवेकचा भाऊ) आम्हाला निवतीच्या समुद्रात नेण्यासाठी बोट तयार असल्याचे सांगितले आणि आम्ही "निवतीच्या समुद्रात"सफर करण्यास निघालो".
(क्रमशः)
निवती समुद्रात फेरफटका"
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
निवती रॉक्स
प्रचि ०६
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
निवती किल्ला
प्रचि १८
किल्ले निवती
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
भोगवेचा समुद्रकिनारा
प्रचि २४
मेढा निवती गाव समुद्रातुन
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
सुमारे दोन तास समुद्रात मनसोक्त भटकुन आल्यावर आम्ही समुद्रस्नानाचा आनंद लुटला.
तोपर्यंत वैनींनी दुपारच्या जेवणात ताज्या फडफडीत माशांचा बेत केला होता. "कोकणात जाताना "कालनिर्णय" घरीच ठेवून जा" हा मायबोलीकर निलवेदचा सल्ला लक्षात ठेवून सौंदाळे, बांगडा फ्राय, तिखलं कालवं यावर सगळ्यांनीच यथेच्छ ताव मारला.
मीही यावेळी पहिल्यांदाच तळलेला संवदाळ आणि बांगडा मासा खाल्ला आणि आवडला

प्रचि २८
जेवणानंतर थोडावेळ आराम करून आम्ही वेंगुर्ल्याला निघालो.
(क्रमशः)
जिप्स्या, माझा झब्बु -
निवती रॉक्स -
निवती बीच -
श्री वेतोबा (आरवली), रेडीचा गणपती, मोचेमाड समुद्रकिनारा
निवतीहुन केळुस तिठ्यावरून वेंगुर्ल्याला जायला आम्ही निघालो. इथे मात्र आमचा प्लान निघायला उशीर झाल्याने थोडासा फसला. निवतीहुन साधारण दिड-दोन वाजता निघुन रेडीचा गणपती, अरवलीचा वेतोबा, मोचेमाड समुद्रकिनारा, सागरेश्वर बीच करून मालवणला निघायचे असा बेत होता, पण निवतीमध्येच ३ वाजल्याने आणि काहि वेळ केळुसला घालवल्याने वेंगुर्ला (वेंगुर्ला जेट्टी, सागरेश्वर बीच) काही बघता आले नाही. :(.
प्रचि ०१
केळुसवरून आम्ही पहिल्यांदा अरवलीच्या वेतोबाच्या दर्शनाला निघालो. वाटेत मानसीश्वराचे मंदिर दिसलं.
प्रचि ०२
प्रचि ०३
श्री वेतोबा मंदिर (आरवली)
(मंदिरात मूळ मूर्तीचे फोटो काढण्याची परवानगी नसल्याने वरील फोटो आंतरजालाहुन साभार)
वेंगुर्ल्यापासुन साधारण १५ कि.मी. अंतरावर रेडीकडे जाताना आरवली हे गाव लागते. विजयनगरच्या हिंदू साम्राज्यात "हरवल्ली" नावाने अस्तित्वात असलेल्या गावाचे नाव कालौघात बदलून "आरवली" झाले. "हर" म्हणजे "शिव" आणि "वल्ली" म्हणजे "वस्ती". हरवल्ली म्हणजे जेथे शिवाची वस्ती आहे असा गाव. आरवलीचे श्री देव वेतोबा मंदिर मूलतः वेताळाचे आहे. "बा" हा आदरार्थी शब्द जोडला गेल्याने "वेताळाचे" वेतोबा झाले असावे. "वेताने वेळेवर मन ताळ्यावर आणणारी शक्ती म्हणजे वेताळ!" दक्षिण कोकणात वेताळ उर्फ वेतोबाची सुमारे १४३ मंदिरे आहेत.
मंदिरात प्रवेश करताच सुमारे सात फूट उंचीच्या श्री वेतोबाचे भव्य दर्शन घडते. एव्हढी मोठी मूर्ती क्वचितच पहावयास मिळते. श्री वेतोबाची मूर्ती पूर्वी फणशी लाकडाची होती. त्यामुळे या गावात बांधकामात व इतर व्यवहारात फणसाचे लाकूड वापरत नाही. कालांतराने १९९६ मध्ये भक्तांच्या साह्याने मूर्ती पंचधातूची करण्यात आली. श्री वेतोबाच्या हातात साडेतीन फूट लांबीची तलवार आहे. गावची ती रक्षक देवताच आहे. विशेष म्हणजे या देवास नवस म्हणून केळीचे घड आणि चपला वाहण्याची प्रथा आहे. सभामंडपात अशा मोठ्या आकाराच्या चामड्याच्या चपलांचा ढिगच पाहावयास मिळतो. गावात फिरण्यासाठी त्या देवाला वाहिलेल्या असतात. देवासमोर केवळ नवस म्हणून ठेवलेल्या चपलांचे तळ दुसर्या दिवशी झिजलेले आढळतात. श्री वेतोबाची यात्रा वर्षातून दोनदा कार्तिक वद्य पौर्णिमा आणि मार्गशिर्ष शुद्ध तृतीया या दिवशी भरते.
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
श्री वेतोबाला वाहिलेल्या वहाणांचे जोड
प्रचि ११
आरवलीच्या श्री वेतोबाचे दर्शन घेऊन आम्ही रेडीच्या गणपती मंदिराकडे निघालो. इथे आमच्य अपेक्षापेक्षा जास्त वेळ गेला. रेडी हे लोहखनिजांच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे येथे ट्रकची वाहतुक मोठ्या प्रमाणावर आणि रस्ता अरुंद. यात बराच वेळ गेला.
श्री गणेश मंदिर — रेडी
१८ एप्रिल १९७६ रोजी इथल्या खाणीत ट्रक ड्रायव्हर म्हणुन कामास आलेल्या
सदानंद कांबळी यांनी रात्रपाळीचे काम संपल्यावर आपला ट्रक डोंगरावर आणून
लावला. थोड्या वेळाने घरी जाण्यासाठी ते ट्रक सुरू करू लागले; पण खूप
प्रयत्न करूनही ट्रक सुरू होत नाही हे पाहून ते ट्रकमध्येच झोपले. त्या
रात्री श्री गजाननाने त्यांना दृष्टांत दिला कि, 'मी येथे आहे. मला बाहेर
काढ.' भयचकित होऊन त्यांना जाग आली तेंव्हा पहाटेचे चार वाजले होते. घडला
प्रकार गावकर्यांना सांगावा म्हणून त्यांनी ट्रक सुरू केला आणि काय
आश्चर्य रात्री बंद पडलेला ट्रक सकाळी विनासायास चालू झाला. गावातील
जुन्याजाणत्यांच्या मताने रेडीचे ग्रामदैवत श्री देवी माऊलीलला कौल
लावण्यात आला. तेंव्हा "मूर्ती दिसेपर्यंत खोदा" असा कौल दिला. खोदकाम सुरू
झाल्यानंतर दोन दिवसांनी मूर्तीच्या तोंडाकडचा व कानाकडचा भाग दिसू लागला.
बारा दिवसांनी संपूर्ण मूर्ती खोदून बाहेर काढण्यात आली. अखंड जांभ्या
दगडात कोरलेली हि मूर्ती सहा फूट उंच व तीन फूट रुंद आहे. मूर्ती बसलेल्या
स्थितीत असून एक पाय दुमडलेला आहे. द्विभुज मूर्तीचा एक हात आशीर्वाद
मुद्रेत असुन दुसर्या हातात मोदक आहे. समोरच एक भला मोठा उंदीरही आहे.
तोही याच खोदकामात , पण मूर्तीनंतर सव्वा महिन्यांनी सापडला. मूळ मूर्तीला
आता ऑईलपेंटचा थर लावला आहे.
प्रचि १२
(प्रसन्न मंगलमूर्ती)
प्रचि १३
मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सुरू असल्याने मंदिराचे फोटो काढता आले नाही. श्रींचे दर्शन घेतल्यावर श्री देवी माऊलीच्या दर्शनासाठी निघालो.
श्री देवी माऊली मंदिर, रेडी
श्री माऊली देवीच्या स्थापनेचा इतिहास श्रीदेवीकोशामध्ये सापडतो. श्री
माऊली देवीच्या जागृतपणाची आख्यायिका सांगितली जाते ती पुढीलप्रमाणे -
पोर्तुगिजांनी १८१७ साली डोंगरावरून या मंदिरावर तोफा डागल्या. तेंव्हा
गावकर्यांनी देवीला कौल लावला. दुसर्या दिवशी लक्षावधी गांधीलमाश्या तेथे
उत्पन्न झाल्या व पोर्तुगीज सैन्याच्या दिशेने घोंघावत गेल्या.
पोर्तुगीजांनी घाबरून तेथुन पळ काढला आणि परत कधीही फिरकले नाही. असे हे
श्री देवी माऊलीचे जागृत देवस्था गणपती मंदिरापासुन जवळच असुन अवश्य भेट
देण्यासारखे आहे. याही मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम चालू होते आणि देवीला
कौल लावण्यात आला असल्याने फोटो नाही काढला. पण कौल लावण्याचा विधी मात्र
व्यवस्थित पाहता आला.
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
जवळच असलेला एक पुरातन वाडा
रेडीवरून आम्ही परत निघालो वाटेत पुन्हा त्या अरुंद रस्त्याव वेळ गेला.
सूर्यास्त होण्यासाठी काहिच अवधी बाकी होता आणि आम्हाला अजुन मोचेमाड व
सागरेश्वर बीच किंवा जेट्टी पहावयाची होती. दोन्ही एकदम शक्य दिसत नव्हते.
शेवटी सगळ्यांच्या पसंतीनुसार मोचेमाड समुद्रकिनारी जाण्याचे ठरले आणि आमचा
हा निर्णय योग्यच होता हे मोचेमाडला पोहचल्यावर समजले.
मोचेमाड हे वेंगुर्ल्यापासुन साधारण सात कि.मी. अंतरावर आहे. मी
पाहिलेल्या आत्तापर्यंतच्या सगळ्या समुद्रकिनार्यांपैकी अतिशय सुंदर असा
हा समुद्रकिनारा. त्या समुद्रकिनार्याकडे जाणारी वाटही अगदी मस्त होती.
कौलारू घरांच्या मागुन, काजुच्या झाडाखालुन, आंबा मोहराचा सुवास घेत, लाल
मातीतुन जाणारी होती. वाट संपताच मऊशार शुभ्र वाळु पायाला गुदगुल्या करते.
हा समुद्रकिनारा अतिशय स्वच्छ आणि अवर्णनीय आहे. माझ्या आत्तापर्यंतच्या
भटकंतीतील हा मनाला भावलेला अतिशय सुरेख समुद्रकिनारा होता. वेळेअभावी
जास्त वेळ येथे देता आला नाही पण जेव्हढा वेळ इथे व्यतित केला तो कायमचा
आठवणीत राहणारा असणार आहे.
आधीच्या भागाव सांगितल्याप्रमाणे मोचेमाडच्या संध्याकाळचेही काही फोटो गंडलेत त्यापैकी जे बरे आले आहेत तेच येथे प्रदर्शित करतोय.
कितने गहरे हलके शाम के रंग है छलके
परबत से यूं उतरे बादल जैसे आँचल ढलके
और इस पल में कोई नहीं है
बस एक मैं हूँ, बस एक तुम हो
कुछ ना कहो, कुछ भी ना कहो......
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
वेंगुर्ल्याहुन साधारण ८ वाजता आम्ही मनिषच्या घरी कांदळगावात (मालवण) जायला निघालो तेंव्हा मी ड्रायव्हरच्या बाजुला बसलो होतो. साधारण साडेनऊच्या दरम्यान मालवण-आचरा रस्त्यावर हेडलाईटच्या प्रकाशात मला काळ्या रंगाचा मांजरीपेक्षा थोडासा मोठा एक प्राणी अंधारात हळुहळु जाताना दिसला. ड्रायव्हरने तो "कांडेचोर" असल्याचे सांगितले. तो स्वतः कोकणातला असल्याने त्याला कांडेचोर माहित होता म्हणुन सगळ्यांनी त्याला गाडी थांबवायला सांगुनही त्याने गाडी थांबवली नाही. :राग:. साधारण दहाच्या सुमारास आम्ही मनिषच्या घरी पोहचलो. हातपाय धुतले, बॅगा खोलीत व्यवस्थित लावल्या आणि गरमागरम जेवणावर ताव मारला. या दोन दिवसात बरीचशी ठिकाणे बघितल्याने रविवारचा दिवस फक्त सिंधूदुर्ग किल्ला, तारकर्ली-देवबाग हिच ठिकाणे करण्याचे ठरले.
(तटी: मंदिरासंबंधित माहिती "कोकण पर्यटन" पुस्तकातुन साभार)
(क्रमशः)
तारकर्ली-देवबाग

तेथे थोडावेळ थांबुन देवबागकडे निघालो. "देवबाग" - देवांची बाग. नावाप्रमाणेच सुंदर असे हे गाव. या गावच्या एका बजूला अथांग अरबी समुद्र तर दुसर्या बाजूला कर्ली नदीचे पात्र. तीनही बाजुने पाण्याने वेढलेले असुनही नैसर्गिक आपत्तीपासुन वाचत आलेले हे "देवबाग". कर्ली नदी आणि अरबी समुद्र यांच्या संगमाचे स्थान आवर्जुन बघण्यासारखे आहे. एका बाजुला कर्ली नदीचे निळेशार शांत पाणी तर दुसर्या बाजूला सफेद फेसांचा उसळलेल्या लाटांचा समुद्र. दोन्हीचा संगम खरंच पाहण्यासारखा होता. यावेळी मीही माझा कॅमेरा बंद करून त्या क्षणांचा आनंद घेऊ लागलो. बर्याच वेळा फोटो काढण्याच्या नादात त्या क्षणांचा अनुभव घ्यायचा राहून जातो.
आम्हाला सागराची गाज ऐकत देवबागचा सूर्यास्त पहायचा होता. हाताशी दोन तास होते. तो वेळ सत्कारणी लावण्यासाठी देवबागजवळच असलेल्या त्सुनामी आयलंडवर वॉटरस्पोर्टची मजा लुटली. सिंधुदुर्गात गेल्यानंतर तारकर्ली-देवबागला भेट न देताच आलात तर तुमची कोकण सफर अपूर्णच राहिली.
तारकर्ली
प्रचि ०१
प्रचि ०२
तारकर्ली MTDC
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
देवबाग
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
देवबाग बॅकवॉटर
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
त्सुनामी बेट
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
देवबाग किनार्यावरून दिसणारे भोगवे बीच (मगरीचे तोंड
)
प्रचि २३
प्रचि २४
सांज आली दूरातुन, क्षितीजाच्या गंधातुन
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
(क्रमशः)
जयगणेश मंदिर, श्री रामेश्वर (कांदळगाव), श्रीभराडीदेवी (आंगणेवाडी), जलमंदिर (बिळवस)
जय गणेश मंदिर (मालवण)
मालवण शहरापासुन अर्धा किमी अंतरावर असलेलं "जयगणेश मंदिर" हे अतिशय सुंदर
पर्यटनस्थळ आहे. या मंदिराची स्थापना कालनिर्णयकार ज्योतिर्भास्कर जयंतराव
साळगावकर यांनी केली आहे. श्रीगणेशभक्तांना त्यांच्या व्यवसायात निरंतर जय
मिळवून द्यावा, जागतिक व्यापार-उद्योगापासुन ते खेळापर्यंत सर्वच आघाड्यावर
भारतीयांना जय मिळावा, या संकल्पनेतूनच या मंदिराचे नाव "जय गणेश" असे
ठेवण्यात आले आहे. सभामंडपाच्या गाभार्यातील घुमटावर आतल्या बाजूने
गणपतीच्या आठ मूर्ती कोरलेल्या आहेत. सभामंडपामध्ये उभे राहिल्यानंतर आठ
दिशांना असलेल्या आठही मूर्ती आपल्याभोवती आपले रक्षण करण्यासाठी उभ्या
आहेत अशी दृढ भावना मनामध्ये उत्पन्न होते आणि तेथे उभे राहिल्यानंतर समोर
दिसणारा हा सुवर्णगणेश सिद्धी-बुद्धीसहित आपल्याकडे प्रसन्न मुद्रेने आणि
दयादृष्टीने पाहतो आहे असेच भासते. जय गणेश मंदिरात सिद्धीच्या हातात
ढाल,तलवार आणि बुद्धीच्या हातात कागद, लेखणी असून गणेशाचे पारंपारीक ध्यान
मन प्रसन्न करणारे आहे.
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
रामेश्वर आश्रम (मालवण)
प्रचि ०७
श्री रामेश्वर मंदिर (कांदळगाव)
मालवणपासून अवघ्या सात-आठ कि. मी. अंतरावर असलेले कांदळगावाला ऐतिहासिक
महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही
भूमी. कांदळगावचे रामेश्वर हे ग्रामदैवत. दर तीन वर्षांनी हा रामेश्वर
आपल्या पंचायतनासह सिंधुदुर्ग किल्ल्याच्या भेटीला जातो. हा सोहळा
अविस्मरणीय असतो. सिंधुदुर्ग किल्ला बांधत असताना समुद्रातील भरतीच्या
पाण्याने तटबंदीचे दगड ढासळत होते. किल्ला आकार घेत असताना लावलेले दगड
कोसळत होते. बांधकामात सतत व्यत्यय येत होता. महाराज व्यथित झाले.
त्याचवेळी त्यांना दृष्टांत झाला. मालवणचे ग्रामदैवत श्री रामेश्वर
त्यांच्या स्वप्नात आले. ‘‘मालवणच्या उत्तरेकडे माझी पिंडी आहे. ती
उघड्यावर असून तिच्यावर प्रथम छत्र उभे कर आणि नंतरच किल्ल्याचे बांधकाम
सुरू कर.’’ रामेश्वराने दिलेल्या दृष्टांतानुसार छत्रपतींची स्वारी
उत्तरेकडे शिवपींडी शोधावयास निघाली. जंगलमय, सखल भाग, कांदळवन, पाणी व
चिखलाची दलदल असा परिसर असलेल्या एका राईमध्ये महाराजांना पिंडी आढळून आली.
यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी रामेश्वराच्या सांगण्यानुसार
शिवपिंडीवर एका रात्रीत घुमटी बांधली. स्वयंभू पाषाणाला पुराचे पाणी लागू
नये यासाठी घुमटीच्या चारही बाजूने कठडा उभारला. त्या घुमटीसमोर आठवण
म्हणून वटवृक्षाचे रोपटे लावले. ते वडाचे झाड सध्या ‘शिवाजीचा वड’ म्हणून
ओळखले जाते. घुमटी बांधून झाल्यानंतर किल्ल्याच्या बांधकामात कोणतेही विघ्न
आले नाही आणि सिंधुदुर्ग किल्ला बांधून पूर्ण झाला. छत्रपती शिवाजी महाराज
आणि कांदळगाव यांचे नाव अधिक दृढ करणारा आणि या नात्याची आजच्या पिढीला
साक्ष देणारा असा हा उत्सव. रामेश्वर पंचायतन सकाळी वाजत गाजत बाहेर पडते.
पालखी, तरंगे व वारीसुत्रांसह सिंधुदुर्ग किल्ल्यावर निघालेली ही स्वारी
मार्गातील कामरादेवी, सीमा म्हारतळ, मारुती घाटी यांना सांगणे करून पुढच्या
प्रवासाला निघते. गांगोचा अवसर कोळंब खाप्रेश्वराला भेटायला जातो. कोळंब
पुलावर रामेश्वराच्या स्वारीचे शाही स्वागत होते. त्यानंतर मेढा जोशी
महापुरुष मांडावर देव स्थिर होतात. या मांडावर इतर वारीसुत्रे विसर्जित
होतात. मात्र रामेश्वराचा अवसर विसर्जित होत नाही. दुपारी श्री देव
रामेश्वर आपल्या लवाजम्यासह जोशींच्याच होडीने सिंधुदुर्ग किल्लयावर जातो.
किल्ल्यात प्रवेश करताना २१ नारळ फोडले जातात. हा सोहळाच अपूर्व असा असतो.
(साभार रामेश्वराची सिंधुदुर्ग किल्ला भेट! )
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
श्री रामेश्वर
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
श्रीरामेश्वर मंदिराच्या समोरच असलेले रवळनाथ मंदिर
प्रचि १४
श्री छ्त्रपती शिवाजीमहाराजांनी स्वहस्ते लावलेला वटवृक्ष आणि त्या वटवृक्षाखाली असलेला महाराजांचा पुतळा
प्रचि १५
प्रचि १६
श्रीभराडीदेवी (आंगणेवाडी)
मालवणपासून साधारण १४-१५किमी अंतरावर असलेल्या मसुरे गावातील बारा
वाड्यांपैकी एक असलेली आंगणेवाडी आज जगाच्या कानाकोपर्यात प्रसिद्ध पावली
आहे ती श्रीभराडीदेवीमुळे. पुण्याचे पेशवे श्रीमंत चिमाजीअप्पा यांना एका
मोहिमेमध्ये श्री भराडीदेवीचा कृपाशिर्वाद लाभाला त्यामुळे आनंदित होऊन
त्यांनी दोन हजर एकर जमीन या मंदिराला दान दिली होती. आंगणेवाडीतील भरडावर
ही स्वयंभू पाषाणरूपी देवी अवतरली म्हणुन तिला "श्रीभराडीदेवी" असे
म्हणतात. नवसाला पावणार्या या श्री भराडीदेवीचे महात्म्य दिवसेंदिवस वाढतच
आहे. जत्रौत्सवाला भाविकांचा महापूर लोटतो. हा जत्रोत्सव साधारणपणे
फेब्रुवारी-मार्च महिन्यात असतो.
आम्ही गेलो तेंव्हा जत्रेची तयारी जोरदार चालू होती. मंदिराला रंगरंगोटी चालु होती.
प्रचि १७
प्रचि १८
मंदिराच्या आतील कलाकुसर
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
जलमंदिर (बिळवस)
मालवणहुन आंगणेवाडीला जाताना उजवया हाताच्या रस्त्याने आतमध्ये हे
वैशिष्ट्यपूर्ण सातेरी देवीचे जलमंदिर आहे. मंदिर प्राकाराच्या सभोवताली
खंदकात पाणी खेळवलेले आहे. नैसर्गिक झर्यांमुळे पाण्याची पातळी पाऊसकाळात
जास्त असते. येथील नीरव शांताता अनुभवताना मन प्रसन्न होते.
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
(तटि: सदर भागात "फोटोग्राफिक विशेष" असं काहि नाही, पण या कोकण दौर्याचा एक भाग म्हणुन इथे प्रदर्शित करत आहे.
मंदिराची माहिती "कोकण पर्यटन" मधुन साभार.)
(क्रमशः)
तारकर्ली-देवबाग
सिंधुदुर्ग किल्ल्यावरची भटकंती आणि चैतन्यमय झाल्यावर आम्ही तारकर्ली
समुद्रकिनारी पोहचलो. मालवण शहरापासून अवघ्या ६-७ किमी अंतरावरील तारकर्ली
हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनदृष्ट्या अतिशय प्रगत असे ठिकाण.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने या ठिकाणाचा संपूर्णतः कायापालट केलेला
आहे. तारकर्ली येथे एमटीडीसी तर्फे तंबू निवास आणि हाऊसबोटची व्यवस्था
केली आहे. अतिशय सुंदर असे हे कोकणातील अजुन एक गाव. 
तेथे थोडावेळ थांबुन देवबागकडे निघालो. "देवबाग" - देवांची बाग.
नावाप्रमाणेच सुंदर असे हे गाव. या गावच्या एका बजूला अथांग अरबी समुद्र तर
दुसर्या बाजूला कर्ली नदीचे पात्र. तीनही बाजुने पाण्याने वेढलेले असुनही
नैसर्गिक आपत्तीपासुन वाचत आलेले हे "देवबाग". कर्ली नदी आणि अरबी समुद्र
यांच्या संगमाचे स्थान आवर्जुन बघण्यासारखे आहे. एका बाजुला कर्ली नदीचे
निळेशार शांत पाणी तर दुसर्या बाजूला सफेद फेसांचा उसळलेल्या लाटांचा
समुद्र. दोन्हीचा संगम खरंच पाहण्यासारखा होता. यावेळी मीही माझा कॅमेरा
बंद करून त्या क्षणांचा आनंद घेऊ लागलो. बर्याच वेळा फोटो काढण्याच्या
नादात त्या क्षणांचा अनुभव घ्यायचा राहून जातो.
आम्हाला सागराची गाज ऐकत देवबागचा सूर्यास्त पहायचा होता. हाताशी दोन तास
होते. तो वेळ सत्कारणी लावण्यासाठी देवबागजवळच असलेल्या त्सुनामी आयलंडवर
वॉटरस्पोर्टची मजा लुटली. सिंधुदुर्गात गेल्यानंतर तारकर्ली-देवबागला भेट न
देताच आलात तर तुमची कोकण सफर अपूर्णच राहिली.
मालवणची शान "किल्ले सिंधुदुर्ग"
).
सिंधुदुर्ग किल्ला:
मालवण शहरापासुन अगदी जवळच वसलेला सिंधुदुर्ग किल्ला हा श्री छत्रपती
शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा आत्मा आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी
मालवण बंदरापासुन पुढे नावेतून जावे लागते. हा किल्ला ४ किमी एव्हढ्या
अंतरात पसरलेला आहे. किल्ल्याच्या भिंती ३५ ते ४० फूट उंच आहेत.
किल्ल्यापर्यंतचा जलमार्ग दाट खडकांनी भरलेला आहे. जाणकार खलाशीच
किल्ल्यापर्यंत पडाव नेऊ शकतात. नाव किल्ल्याच्या ईशान्य बाजूस असलेल्या
महाद्वाराजवळ येऊन थांबते.दर्यावर्दी, इंग्रज व पोर्तुगीज यांच्याशी
यशस्वीपणे मुकाबला करावयाचा असेल तर आपली सत्ता समुद्रावर असणे आवश्यक आहे,
हे जाणून शिवरायांनी सागरी किल्ला बांधण्याचा निश्चय केला. कुरटे गावचे
बेट पाहून "चौर्यांशी बंदरी ऐसी जागा नाही" असे उद्गार त्यांनी काढले
होते. किल्ल्याचे महाद्वार पूर्वेस आहे. किल्ल्याचा तट दोन्ही अंगाने आत
वळतो. या दोन तटांच्यामधील भागातून वळणे घेत आत गेले कि समोर महादरवाजा
दिसतो. प्रवेशद्वारी एक मारूतीची प्रतिमा आहे.तटाच्या आत आले की मुख्य
रस्त्यावर राजाराम महाराजांनी बांधलेल्या श्री शिवराजेश्वराच्या मंदिराकडे
जातो. शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर आहे.
सिंधुदुर्ग किल्ल्याविषयी विकिपिडीयावर अधिक माहिती येथे वाचा.
(सिंधुदुर्ग किल्ल्यात जाण्यार्या नावेत ४० माणसे भरल्याशिवाय नेत
नाही. एकतर तुमचा ग्रुप तेव्हढा मोठा असावा लागतो किंवा मग नाव पूर्ण
भरेपर्यंत वाट बघावी लागते.
जर तुम्हाला खाजगी बोट करून जायचे असेल तर माणशी ३५० द्यावे लागता, तेही
जर ग्रुप ८-९जणांचा असेल तरच. अशी तिकिट ३८रूपये आहे. किल्ला बघावयास फक्त
एकच तास देतात. एका तासाच्या आत किल्ला बघुन नावेत परतीच्या प्रवासासाठी
एका तासाच्या आत या अशी ताकीदच नावेतुन उतरताना देतात. :रागः एका तासात
संपूर्ण किल्ला बघणे/अनुभवने शक्य नाही त्यामुळे इतक्या कमी वेळेत जेव्हढा
पाहुन घेता आला तितका किल्ला पाहुन घेतला.)
मालवण पाण्यामध्ये किल्ला, पाहुनी मनामध्ये भरला
प्रचि ०१
(कुठलाही फोटोशॉप इफेक्ट नाही (बॉर्डर आणि वॉटरमार्क सोडुन). लेन्सच्या
पुढे गॉगल धरून, गॉगलचा फिल्टर असा उपयोग करून हा फोटो काढलाय.
)
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २७ (अ)
सागरतळातील जीवसृष्टी जवळुन पाहण्याची संधी सिंधुदुर्गजवळ स्नॉर्केलिंग
आणी स्कुबा डायव्हिंग द्वारे मिळते. कोकणसफरीत एकदा तरी याचा अवश्य अनुभव
घ्यावा. 
स्नॉर्केलिंग करताना पर्यटक
प्रचि २८
किल्ला बघुन झाल्यावर साळगावकरांच्या श्री जयगणेश मंदिरात जाऊन आलो. यानंतर सुरू झाली ती आमची खाद्यभ्रमंती.
बर्याच जणांनी आवर्जुन उल्लेख केलेल्या "चैतन्य हॉटेल" मध्ये पापलेट,
सुरमई, वडे सागोती, कोलंबी फ्राय, कोळंबी लोणचं अशा विविध पदार्थावर ताव
मारून आम्हीही अगदी "चैतन्यमय" झालो. 
चैतन्यमय प्रचि 
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
यानंतर खरेदीसाठी मालवण बाजारात फेरफटका मारला. रविवार असल्याने बहुतेक सगळी दुकाने बंद होती (मालवणात खरेदी करावयाची असेल तर रविवार टाळुन करा. बहुतेक दुकाने रविवारी बंद असतात.). थोडीफार खरेदी करून आम्ही आमचा मोर्चा "देवबाग-तारकर्ली"कडे वळवला.
(क्रमशः)
मी म्हणतोय तो हा भाग. ब्रम्हदेशाच्या राजाची का राणीची समाधी पण इथेच आहे.
राजकोटातून जाणे आता दुर्गंधीमूळे शक्य नसले तर मेढ्यातून एक पाणंद इथे जाते.
तिथेच चांभारणीची वेळ (किनारा) असा एक भाग आहे.

(सिंधुदुर्ग किल्ल्यात जाण्यार्या नावेत ४० माणसे भरल्याशिवाय नेत नाही. एकतर तुमचा ग्रुप तेव्हढा मोठा असावा लागतो किंवा मग नाव पूर्ण भरेपर्यंत वाट बघावी लागते. जर तुम्हाला खाजगी बोट करून जायचे असेल तर माणशी ३५० द्यावे लागता, तेही जर ग्रुप ८-९जणांचा असेल तरच. अशी तिकिट ३८रूपये आहे. किल्ला बघावयास फक्त एकच तास देतात. एका तासाच्या आत किल्ला बघुन नावेत परतीच्या प्रवासासाठी एका तासाच्या आत या अशी ताकीदच नावेतुन उतरताना देतात. :रागः एका तासात संपूर्ण किल्ला बघणे/अनुभवने शक्य नाही त्यामुळे इतक्या कमी वेळेत जेव्हढा पाहुन घेता आला तितका किल्ला पाहुन घेतला.)
>>>> जिप्सीमित्रा - अरे मी तुला सांगीतले होते की स्नोर्केलिंग व मालवण किल्ला अशी बोट ठरवून घे, म्हणजे १ तासाचे लिमीट वाढवता येइल. मालवण किल्ल्यावर सरकारी बोटीने वन्-वे जायचे. तेथे २ तास घालवायचे मग दुसरी खाजगी बोट स्नोर्केलिंगसाठी न्यायला येते. स्नोर्केलिंगच्या पैशात बोटीचेही पैसे घेतात. असो. सर्व प्रचि उत्तम. मी नोस्टॅल्जीक झालोय.कुणकेश्वर, वाडातर, श्रीरामेश्वर (गिर्ये)
कोकण दौर्याचा आमचा शेवटचा दिवस उजाडला. कांदळगाव-आचरा मार्गे कुणकेश्वर, नंतर गिर्येचे रामेश्वर आणि सरते शेवटी विजयदुर्ग करून मुंबई गाठायची असा प्लान होता. त्याप्रमाणे सकाळी लवकर उठुन तयारी करून प्रथम कांदळगावच्या रामेश्वराचे दर्शन घेऊन मुंबईला परतीच्या प्रवासाला निघालो. संध्याकाळी साधारण ४-५ पर्यंत विजयदुर्ग पाहुन मग मुंबईला निघायचे असा बेत होता. प्लानिंगनुसार पहिल्यांदा भेट दिली ती देवगड तालुक्यातील श्री कुणकेश्वर मंदिराला. महाशिवरात्रीच्या जत्रेची तयारी चालु असल्याने संपूर्ण मंदिराला रंगरंगोटी देण्याचे काम चालु होते.
श्री कुणकेश्वर मंदिर
देवगडपासुन १५ किमी अंतराव असलेल्या श्री कुणकेश्वर मंदिराला "कोकणची काशी"
असेही म्हटले जाते. प्राचीन अशा या मंदिराची स्थापना अकराव्या शतकात झाली
असे सांगण्यात येते. हे स्थान समुद्रकिनारी असल्याने सागराअच्य अलाटांनी
मंदिराचा पश्चिम तट नित्य प्रक्षाळला जातो. समुद्राच्या लाटांमुळे मंदिराचे
नुकसान होऊ नये म्हणुन मंदिराच्या कलात्मकपेक्षा मजबुतीकडे जास्त लक्ष
दिलेले आहे. या ठिकाणी पूर्वी कनक नावांच्या वृक्षांची राई असावी म्हणुन
या स्थानास कुणकेश्वर हे नाव पडले असावे. अतिशय नयनरम्य असणारे हे
कुणकेश्वर मंदिर समुद्राच्या सान्निध्यामुळे दे़खणे दिसते. येथील
समुद्रकिनारा स्वच्छ आणी सुंदर आहे. महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठी जत्रा
भरते.
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
कुणकेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही गिर्येच्या रामेश्वराकडे निघालो. वाटेत वाडातर पुलावर गाडी थांबवली आणि फोटोसेशन सुरु केले. 
वाडातर
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
पुढे कुणकेश्वर-वाडातर मार्गे विजयदुर्गच्या वाटेवरच्या गिर्ये गावातील रामेश्वर मंदिराकडे आम्ही पोहचलो.
विजयदुर्गला पोहचण्याआधी काहि किमी अंतरावर गिर्ये येथे मुख्य रस्त्या
पासून ३ कि. मी. अंतरावर इतिहासकालीन श्री देव रामेश्वर मंदिर आहे. पेशवे
नाना फडणीसांचे बंधू गंगाधर भानू यांनी या रामेश्वर मंदिराची उभारणी केली.
देवालय साधे कौलारू आहे. समोर खास कोकणी पध्दतीच्या दिपमाळा आहेत. रामेश्वर
देवालय खोलगट भागात आहे. मुख्य रस्त्यावरून अगर प्रवेशद्वाराच्या नजीकच्या
पठारावरून हे मंदिर दिसत नाही. देवालयात जाण्यासाठी दीडशे मीटर लांब पंधरा
मीटर खोल अशा जांभया दगडाच्या अखंड खडकातून खोदून मार्ग काढलेला आहे.
मंदिरातील मुख्य गाभार्यात शिवपिंडी आहे. बाहेरील बंदिस्त भागात सुमारे
पन्नास किलो चांदीची नंदीवर आरूढ मूर्ती असलेली चतुर्भुज श्री शंकराची
प्रासादिक मूर्ती होती. हि मूर्ती काहि वर्षापूर्वी चोरीला गेली. 
ई.स. १७९२/९३ मध्ये पेशव्यांच्या आरमाराचे प्रमुख आनंदराव धुळप यांनी
इंग्रजांच्या जहाजावरून पकडून जप्त करून आणलेली अजस्त्र घंटा या ठिकाणी
असून ही घंटा पुढे कृष्णराव धुळप यांनी ई.स.१८२७ मध्ये श्री देव रामेश्वरला
अर्पण केली.
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
या रामेश्वर मंदिराच्या आवारातच उजव्या बाजूला मराठांच्या आरमाराचे सरखेल संभाजी आंग्रे यांची समाधी आहे. ते शिव भक्त होते. रामेश्वर मंदिर भोवतालची दगडी तटबंदी, फरसबंदी पटांगण सरखेल संभाजी आंग्रे यांनीच बांधले.
सरखेल संभाजी आंग्रे यांची समाधी
प्रचि २८
गिर्येच्या श्री रामेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही आमच्या कोकण भटकंतीतल्या शेवटच्या ठिकाणाला भेट देण्यासाठी "विजयदुर्ग" येथे निघालो.
(क्रमश: पुढिल अंतिम भागात "किल्ले विजयदुर्ग")
बारा गावच्या, बारा राठीच्या, बारा वायवाटीच्या, बारा देशातल्या मायबोलीकरा.. म्हाराजा
सांगना करुक कारन.. म्हाराजा
तुझ्या कृपाशीर्वादाने "कोकणमय" मालिकेचो ह्यो शेवटचो भाग सादर करतय.. ही सेवा चरणी रुजू करुन घे
म्हाराजा...
देवा रवळनाथा... तुझ्या कृपेने संपूर्ण मालिकेक भरभरून प्रतिसाद गावले... ही कृपा अशीच ठेव म्हाराजा...
ज्येंनी ज्येंनी ही मालिका बगली.. आवर्जून प्रतिसाद दिले त्यांचे मनापासून
आभार. ज्येंनी बगली पण प्रतिसाद देवची बुद्धी नाय झाली त्येंचेव आभार
... प्रतिसाद दिलेल्यांचा भला मागतंय, न दिलेल्यांका प्रतिसाद देवची बुध्दी.. व्हय म्हाराजा.
सगळ्या मायबोलीकर गोतावळ्याक सुखी ठेव.. वाकड्याक सरळ कर आणि तिड्याक
सिध्धो कर.. भांडनान फक्त भांडान वाडता, एकत्र इल्यात तर एकी व्हता ह्यां
पटवून दी... म्हाराजा
मायबोलीची अशीच कायम भरभराट जावंदेत... म्हाराजा
एकूण सगळ्यांचा भला भला जावंदेत... म्हाराजा
आशा करतय कि दहा भागांची हि 'कोकणमय' सफर सगळ्यांका आवडली आसात.. म्हाराजा
माझ्या प्रचिंवर सगळ्यांचोच असोच लोभ कायम रवांदेत.... म्हाराजा..
पुढ्ल्या वर्षी सुद्धा, तुझ्या पायाकडे येंवक, अजून नवीन उत्साहाने कोकण
भ्रमंती करुक.. अशीच ताकद आणि बुद्धी दी ह्या तुका अखेरचा सांगणा... व्हय
म्हाराजा..... 
=======================================================================
=======================================================================
किल्ले विजयदुर्ग:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील वाघोटण खाडीच्या दक्षिणेस
समुद्रात शिरलेल्या एका मोठ्या खडकावर विजयदुर्ग किल्ला बांधलेला आहे. या
किल्ल्यास घेरीया असंही नाव आहे. या किल्ल्यास २००६ साली ८०० वर्षे पूर्ण
झाली. अतिशय प्राचीन असा हा जलदुर्ग म्हणजे मराठ्यांच्या आरमारातील मानाचं
पान आहे. शिलाहार राजा भोज याने महाराष्ट्रात बांधलेल्या सोळा
किल्ल्यांपैकी एक विजयदुर्ग हा एक. पाण्यात पसरलेला, ऐतिहासिक, वैभवशाली,
सामर्थ्यवान, मराठवाडयांच्या आरमारी सामर्थ्याचा तेजबिंदू, आंग्रे
घराण्याचे बलस्थान आणि शिवरायांच्या ऐतिहासिक पराक्रमाची साक्ष देणारा
तरीपण फितुरीला बळी पडलेला विजयदुर्ग किल्ला सिंधुदूर्ग जिल्हयाच्या
उत्तरेला टोकाला आहे. सुमारे ४० किमी. लांबीच्या वाघोटण खाडीच्या आणि अरबी
समुद्राच्या संगमावरच हा किल्ला उभा आहे. हा किल्ला शिवाजी महाराजांनी
इ.स.1653 मध्ये आदिलशाहीतून स्वराज्याच्या काळात कब्जात घेतला आणि
त्यामध्ये अनेक सुधारणा केल्या. स्वराज्याचा भगवा ध्वज तेथे फडकविला.
त्यावेळी विजय संवत्सर चालू होते. त्यावरूनच या किल्ल्याचे नांव विजयदुर्ग
ठेवले. सुमारे 700 वर्षांहून अधिक काळ स्वबळावर अंत्यंत प्रभावी आरमारी
केंद्र म्हणून उभ्या असलेल्या या किल्ल्यावर कान्होजी आंग्रे, तुळाजी
आंग्रे, आनंदराव धुळप यांच्यासारखे शूर व तेजस्वी आरमार प्रमुख होऊन
गेले.जयदुर्ग गावात पायउतार झाल्यावर समोरच आपणास ऐसपैस असा विजयदुर्ग
किल्ला दिसतो.गडावर प्रवेश केल्यावर मारुतीचे मंदीर लागते,हे मंदीर शिवाजी
महाराजांनी गड जिंकल्यावर बांधून घेतले.या मंदीरासमोरून पुढे गेल्यावर
जिबीचा दरवाजा लागतो,या दरवाज्यातून आत गेल्यावर डाव्या हातासच ३० फूट
उंचीची तटबंदी दिसते,इथून पुढे गेल्याणंतर गडाचे मुख्य प्रवेशद्वार
लागते,भव्य अशा प्रवेशद्वाराच्या आत पहारेकर्यांसाठी देवड्या
आहेत.दरवाजातून आत गेल्यावर पोलिस चौकी आहे,तिथे दुतर्फा तोफेचे गोळे
व्यवस्थित मांडून ठेवले आहेत,इथे डाव्या बाजूस खलबत्खाना आहे.तिथून
पायर्यांच्या वाटेने आपण ध्वजस्तंभाजवळ येवून पोहोचतो.हा ध्वजस्तंभाचा
बुरूज पाहून आल्या वाटेने खाली उतरून समोरची सदर व दारूकोठार पहायचे.या
कोठारा शेजारच्या भुयारातून 'खूबलढा तोफा बारा ' या बुरुजावर यायचं या
भुयाराच्या बाजूने ततावर जाण्यासाठी पायर्या असून या पायर्यांच्या
मार्गाने तटावर चढायचे,इथून तटावर फेरफटका मारण्यास सुरवात करावी.
विजयदुर्गास २० बुरुज असून प्रत्येक बुरुजावर नावाचा सिमेंटचा बोर्ड
लावलेला आहे,पुढे तटावरच उभे असलेले लाईट हाऊस लागते,त्याचे पुढेच तटाच्या
खाली चुण्याची घाणी दिसते,या चुण्याच्या घाणीच्या बाजूलच गोड्या पाण्याची
विहीर असून तिच्या पासून फक्त २० फूटांवर समुद्र आहे.विजयदुर्गास तिहेरी
तटबंदी असून गडाच्या पश्चिम तटाबाहेर मोठे दगड टाकून लाटांच्या मारापासून
तटबंदीचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे.गडाचा तट सुस्थितीत असून त्यावर
चढण्यास जागोजागी पायर्या असल्यामूळे संपूर्ण गडास व्यवस्थीत तटफेरी मारता
येते.
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
चुना मळण्याचे जाते
प्रचि १७
हे आमचे इंद्रवज्र 

प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
सुकलेली विहिर
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
=======================================================================
=======================================================================
कोकणचा कॅलिफोर्निया कधी होईल ते माहित नाही पण कॅलिफोर्नियाच्या तोडीचे
सौंदर्य कोकणात आहे हे मात्र मान्य. या चार दिवसात मनसोक्त कोकण भटकलो आणि
खर्या अर्थाने कोकण अनुभवला. कोकणातील काही ठिकाणं तर अक्षरशः वेड लावणारी
आहेत. या निसर्गाच्या नशेतच खरी धुंदी आहे त्याला कुठल्याही कृत्रिम नशेची
गरज नाही. कोकणच हे सौंदर्य असंच अबाधित राहो आणि त्याचा काही अति हौशी
पर्यटकांमुळे बदनाम झालेला "गोवा" न होवो हिच देवाचरणी प्रार्थना.
प्रचि २९
पुन्हा एकदा कोकणात परत येण्याचे आश्वासन देत आम्ही चार दिवसाची कोकण भ्रमंती संपवून मुंबईकडे निघालो.
(तटि: विजयदुर्ग माहिती कोकण पर्यटन पुस्तकातुन साभार. गार्हाण लिहिण्यास मदत केल्याबद्दल मायबोलीकर "नीलुचे" खास आभार. :-))
(समाप्त)

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.