- ओळख
मॉरिशियस ला जायचा तसा प्लान नव्हता. बाकीचे काही देश माझ्या मनात होते. पण माझा नेहमीचा प्रश्न असतो
तो व्हीसासाठी लागणार्या वेळाचा. मोजक्या दिवसांच्या सुट्टीतले दिवस व्हीसा मिळवण्याच्या खटपटीत घालवणे
मला रुचत नाही. अंगोलातून व्हीसा अप्लाय करायचा तर अनेक देशांच्या एम्बसीज इथे नाहीत. त्यासाठी
पासपोर्ट साऊथ आफ्रिकेत पाठवावा लागतो ( तेही केलेय मी. ) त्यामूळे सर्व भारतींयाना ऑन अरायव्हल व्हीसा
देणार्या या सुंदर देशाची ट्रिप नक्की झाली.
मोरपिशी रंगाच्या समुद्राने वेढलेले हे सुंदर बेट. उसाची शेती, हिरवेगार जंगल आणि मोहक आकाराचे पर्वत यांनी नटलेले आहे. खरे तर तो एक छोटासा भारतच आहे. ५२ % लोकसंख्या भारतीय हिंदु आहे, त्यामूळे आपल्याला परकेपणा अजिबात जाणवत नाही.
तर या देशाची चित्रमय झलक दाखवणारी मालिकाच सुरु करतोय. नेहमीचा शिरस्ता सोडून, नेहमी विचारल्या
जाणार्या प्रश्नांची उत्तरे या भागात देतोय.
१) कसे जाल ?
मुंबई आणि दिल्लीहून एअर मॉरिशियसची थेट सेवा उपलब्ध आहे. मला
एमिरेटसचे फ्रिक्वेंट फ्लायर ( स्कायवर्ड्स ) चे माईल्स हवे होते म्हणून मी
ते विमान निवडले. मुंबई ते दुबई - ३ तास, दुबईत ३ तासाचा थांबा
व पुढे दुबई ते मॉरिशियस ६ तासांचा प्रवास आहे. दिवसातून दोन विमाने आहेत. त्यापैकी एक ३८० ( डबलडेकर )
आहे. जर तूम्ही तारखा आधी निश्चित केल्यात तर एमिरेटस वरती चांगले डील मिळू शकते ( साधारण ४०, ०००
रुपये )
२) कधी जाल ?
मॉरिशियस दक्षिण गोलार्धात असल्याने आपल्यापेक्षा उलट ऋतू असतात. पण तरी
ट्रॉपिकल हवामान असल्याने वर्षभर सुखावह हवामान असते. जून, जुलै मधे
बर्यापैकी थंडी असते. पाऊसही पडत असतो.
नोव्हेंबर डीसेंबर मधे उन्हाळा असतो. तिथले वनस्पतिउद्यान अतिशय सुंदर आहे. तिथली फुले बघायची
असतील तर मात्र उन्हाळ्यातच जाणे योग्य. तसे खास कपडे न्यायची गरज नाही. पण पाण्यात जायचे
असेल तर पोहण्याचे कपडे जवळ असावेत.
३) व्हीसा वगैरे
वर लिहिल्याप्रमाणे व्हीसा ऑन अरायव्हल आहे. उतरल्यावर दोन फॉर्म्स भरावे लागतात. एक व्हीसासाठी
आणि एक हेल्थ साठी. व्हीसासाठी कुठलाही चार्ज नाही. परतीचे तिकिट असणे गरजेचे आहे. ( मला विचारले
नाही. ) हॉटेल बुकिंग, फॉरेन एक्सेंज वगैरे असावे पण विचारत नाहीत. भारतातून थेट जात असाल तर
कुठलिही लस घ्यायची गरज नाही. ( मला सगळीकडेच येलो फीव्हर व्हॅक्सीनेशन दाखवावे लागते, पण तेही
विचारले नाही. ) पैसे नेण्यावर बंधन नाही. बिया, प्राणी वगैरे मात्र नेऊ नयेत.
४) कुठे रहाल ?
हॉटेल निवडताना मात्र नेटवरचे रेव्ह्यू वाचूनच निवडा. मी थॉमस कूक तर्फे, ल मेरिडीयन निवडले होते.
खुपच सुंदर प्रॉपर्टी होते. परीसरही सुंदर होता. जेवणाखाण्याची चंगळ होती. तिथेच टॅक्सीस्टॅन्ड असल्याने
भटकायची सोय होती.
मला भेटलेल्या काही लोकांची मात्र निराशा झाली. नेटवरून स्वस्तातले डिल मिळाले, प्रॉपर्टी सुंदर होती पण
जेवणाखाण्याचे हाल होते. प्रॉपर्टी एका बाजूला असल्याने बाहेर जाऊन खायचीदेखील सोय नव्हती.
५) काय खाल ?
शक्यतो हाफ बोर्ड निवडा ( ब्रेकफास्ट आणि डिनर हॉटेलमधेच ). दिवसभर भटकून आल्यानंतर परत जेवणासाठी बाहेर जायचे त्राण रहात नाहीत.
दिवसाचे जेवण मात्र बाहेर घ्यावे लागते. टुअर ऑपरेटर असेल तर तो त्याच्या पसंतीच्या हॉटेलमधे नेण्याची
सक्ती करतो. पण ते जेवण चांगलेच असेल याची खात्री नाही ( महागही असते. ) थाली सिस्टीम असते.
शक्यतो ती घ्या म्हणजे एखाद दुसरा पदार्थ आवडू शकतो.
इतर देशांत मी शक्यतो स्ट्रीट फूड खाणार नाही पण मॉरिशियस मधे मात्र ते आवर्जून खावे, असा सल्ला देईन.
बहुतेक पदार्थ भारतीय चवीचेच असतात. भजी, सामोसे मस्त असतात. डाल पुरी / रोटी अवश्य खा.
मऊसूत चपाती, त्यावर डबल बीन्स / बटाटा भाजी, कोबीचे लोणचे, टोमॅटोची चटणी आणि आपल्याला हवी
तेवढी मिरची घालून देतात. खुपच मस्त आणि पोटभरीचा प्रकार असतो. तिथे मिरची नेहमीच स्वतंत्रपणे देतात.
मिरच्या खुप तिखट असतात. (माझ्यासाठी तरी ) तरी तिथली वेगवेगळी लोणची अवश्य चाखा. जमल्यास घेऊनही या. ( काही मायबोलीकरांनी चाखलीत ती. )
जेवल्यानंतर नारळाचे पाणी, इतर फळांचे रसही प्या. अननस मात्र अगदी
चाखाच. लहान आकाराचा व्हीक्टोरियन अननस तिथे अनेक ठिकाणी मिळतो. तो नीट
कापून त्यावर चिंचेची तिखट चटणी टाकून देतात.
भन्नाट लागतो तो प्रकार. आणि हे प्रकार ( हॉटेलच्या मानाने ) खुपच स्वस्त असतात. साधारणपणे बायकांनी
चालवलेले हे स्टॉल्स ठिकठिकाणी आहेत.
सी फूड पण चांगले मिळते म्हणे.. 
६) काय बघाल ?
शक्यतो हॉटेल स्टे आणि सहली असे पॅकेज निवडा. यात साधारण ३ सहली येतातच. त्यापैकी एक बीच टुअर,
एक शॉपिंग टूअर आणि एक साईट सिईंग टुअर असते. आयटनरी बघून त्यात दाखवली जाणारी ठिकाणे
लक्षात ठेवा. बहुतेक महत्वाची ठिकाणे दाखवली जातातच. हॉटेल पिक अप आणि ड्रॉप असतो.
पण त्या ठिकाणांपेक्षाही बघण्यासारखी काही ठिकाणे आहेतच. चहाचे संग्रहालय, साखरेचे संग्रहालय आहे.
एखादा ट्रेकही करता येईल. निरपेक्ष भटकताही येईल.
७) कसे फिराल ?
अरेंज्ड टूअरशिवाय भटकायचे असेल तर टॅक्सीज उपलब्ध आहेत. भाड्याने बाईक्सही मिळतात. सरकारी
बससेवा आहे. पण त्याची नीट चौकशी करून घ्या कारण त्या मला तितक्या संख्येने दिसल्या नाहीत.
एकट्याने फिरण्यात धोका नाही, तरीपण बेसिक काळजी घ्याच. टॅक्सीचे दर आधी ठरवून घ्या. जास्तीचे ठिकाण
बघायचे असेल तर तोही दर आधीच ठरवा. ( शक्यतो वाद होत नाहीत.. तरीपण )
रस्त्यावरती पाट्याही तितक्याश्या नाहीत. लोकसंख्या व वस्ती विरळ आहे. पण रस्ता चुकलात तर स्थानिक
लोक नक्कीच मदत करतात.
८) काय बोलाल ?
मॉरिशियस मधे इंग्रजी, फ्रेंच या सरकारी भाषा आहेत. फ्रेंचचीच बोलीभाषा असल्यासारखी क्रियोल भाषा तिथले
लोक आपापसात बोलताना वापरतात, पण आपल्याला सुखद वाटेल अशी बाब म्हणजे तिथे बहुतेकांना हिंदी
येते. ते हिंदीदेखील उर्दू शब्दांचा किमान वापर करून बोलले जाते. ( त्या मानाने हिंदीतल्या पाट्या कमी
दिसल्या ) त्यामूळे भाषेची अजिबात अडचण नाही.
९) पैसे
मॉरिशियसचे चलन रुपये आहे. एका डॉलरला साधारण ३० मॉरिशियन रुपये मिळतात. ( म्हणजे आपल्या
रुपयांच्या अर्धे ) याचाच अर्थ एक मॉरिशियन रुपया म्हणजे २ भारतीय रुपये होतात.
पैसे नेण्या आणण्यावर बंधने नाहीत. भारतीय रुपये स्वीकारताना दिसले नाहीत कुणी. त्यामूळे शक्यतो डॉलर्स
जवळ ठेवा.
१०) काय खरेदी कराल ?
वरचा विनिमयाचा दर लक्षात घेता, ऐकताना किमती कमी वाटल्या तरी त्या महागच असतात. माझ्या
अनुभवावरुन सांगतो कि भारतासारखी स्वस्ताई जगात कुठे नाही.
तरीपण गेल्यासारखे थोडे शॉपिंग होणारच ना ? तिथे लोक साधारण कपड्यांची खरेदी करतात. ब्रँडेड कपडे
अर्थातच महाग आहेत. पण स्ट्रीट बझारमधे स्वस्त कपडे मिळू शकतात. तिथे बर्यापैकी भावही करता येतो.
फॅक्टरी आऊटलेट / शॉप हा तिथला फसवा शब्द आहे. तिथे जरा नेट लावला तर ७५ % ( हो ७५ % ) सूट
मिळवता येते.
शिप मॉडेल्स ही पण त्यांची खासियत. लाकडापासून बनवलेल्या या छोट्या बोटी तूमच्या दीवाणखान्याची
शोभा वाढवतील. पण त्यांची किंम्मतही तशीच छान असते. ( त्याची झलक दाखवीनच. )
साखर हा तिथला महत्वाचा उद्योग आहे. तिथे वेगवेगळ्या स्वादाची साखर मिळते. अवश्य नमुना बघा.
साखरेबरोबरच खास रम देखील मिळते.
शिंपले, मोती, पोवळे दिसले पण त्याच्या किंमती जास्तच वाटल्या. ( नायजेरियात स्वस्त मिळतात. )
वर लिहिल्याप्रमाणे लोणची, मसाले, मिरच्या अवश्य घ्या. व्हॅनिलाच्या शेंगा मिळतील. चहा, कॉफीचे मळे
आहेत पण त्यांचा स्वाद मला आवडला नाही. ( केनयातला चहा आणि इथिओपियातली कॉफी जास्त
चांगली असते. )
साखरेचे नमुने, तिथल्या रंगीत वाळूचे नमुने, सध्या अस्तित्वात नसलेल्या डोडो पक्ष्याच्या प्रतिकृती पण
घेता येतील.
११) काय कराल ?
वॉटर स्पॉर्टससाठी हा देश प्रसिद्ध आहे. भरपूर पर्याय आहेत. तूमच्या सहलीत याचा समावेश नसतो पण तिथे
गेल्यावर काही करावेसे वाटले तर अवश्य करा. तिथे भाव करून स्वस्त दर मिळवता येतील. उन्हापासून संरक्षण
करणारे क्रीम व गॉगल मात्र अवश्य जवळ ठेवा. बाकीचे साहित्य तिथे भाड्याने मिळते.
किनार्याजवळचा समुद्र खोल नाही. तिथले पाणीही नितळ आहे. दूरवर मोठ्या लाटा येताना दिसतात.
तिथे मात्र जाऊ नका. आणि तसेही हॉटेलच्या सुरक्षा नियमांचे पालन कराच. झू, बर्ड पार्कस पण आहेत. तिथे माऊंटन बाईकिंगची सोय आहे.
१२) खर्चाचा अंदाज
विमानभाडे, हॉटेल स्टे व ३ टूअर्स यासाठी माणशी १ लाख रुपयांचे बजेट ठेवा, ग्रुप टूअर स्वस्त मिळू शकेल.
स्वतः सगळे अरेंज करणार असाल तर आणखी स्वस्तात होईल.
आता केवळ झलक म्ह्णून काही फोटो टाकतोय.. सविस्तर ओळख नंतर करुन देईनच..
१)
२)
३)
४)
५)
६)
७)
पिक्चर अभी बाकी है
मॉरिशियस - भाग पहिला - ल मेरिडीयन
मॉरिशियस - ओळख - http://www.maayboli.com/node/50140
मी मॉरिशियसला पोहोचलो तो दिवस शनिवार होता. दुपार होऊन गेली होती. एमिरेट्सच्या फ्लाईटमधे भरपूर
खाणे झाल्याने भूक नव्हती. इमिग्रेशन वगैरे लगेचच पार पडले. माझ्याकडे फारसे सामानही नव्हते.
ड्रायव्हर माझी वाट बघतच होता.
हा विमानतळ आहे या बेटाच्या दक्षिण पूर्व टोकाला आणि माझे हॉटेल, ल मेरिडीयन उत्तर पश्चिम टोकाला.
हा १०० किमीचा टप्पा त्या देशाच्या एकमेव हायवेवरून तासाभरातच पार पडला. ड्रायव्हर बोलका होता. हिंदीतून
गप्पा चालल्या होत्या. वाटेतला एक अपघात ( दोन दिवसांपुर्वी झालेला ) त्याने मला कौतूकाने दाखवला. मनात
म्हणालो, बेट्या माझ्या आफ्रिकेत ये, म्हणजे दाखवतो तूला अपघात काय असतात ते.
शनिवार असल्याने बहुतेक दुकाने बंदच होती. पण त्याच्या ओळखीने मी डॉलर्स चेंज करून घेतले. ( खरं
तर तशी गरज नव्हती. डॉलर्स कुठल्याही दुकानात स्वीकारतात तिथे.)
हॉटेल मधे पोहोचल्यावर मन अगदी प्रसन्न झाले. गेल्यागेल्या चिंचेचे अप्रतिम चवीचे सरबत व आईस्क्रीम
देऊन स्वागत झाले. पाच मिनिटात सर्व सोपस्कार करून रुम ताब्यातही मिळाली. आदल्या रात्री दुबईला
जागरण झाले होते म्ह्णून खरे तर झोप येत होती. रुम तर मस्तच होती.. पण निग्रहाने बाहेर पडलो.
हॉटेलचा परीसर, बाहेरचा रस्ता भटकून आलो.. तिथले हे फोटो.
१) रुमचे प्रथम दर्शन
२)
३) सज्जा
४) आतली पायवाट
५) बाहेरचा रस्ता, इथून पाच मिनिटावर एक सार्वजनिक समुद्रकिनारा होता.
६) वडगाव
( या जंजाळात पण शिरलो मी. )
७) रस्त्याच्या कडेने पसरलेली आईसक्रीम क्रीपर
८) हा फोटो आमच्या कोल्लापूरातला म्हणून खपेल.. हॉटेलच्या समोरच अशी शेती आणि मागे देखणे पर्वत होते.
रोज त्यांचे नवे रुप दिसायचे.
९)
१०) हॉटेलच्या मागे त्यांचाच खाजगी समुद्रकिनारा होता.. तशीच छोट्या स्विमिंग पूल्सची मालिकाही होती.
११) "तिन्हीसांजा सखे मिळाल्या ..." गाणे म्ह्णायची जागा
अरसिक माणसं इथे मासे पकडतात.
१२)
१३)
१४)
१५)
१६) हॉटेलच्या बाहेरच्या रस्त्यावर बोराचे झाड होते... मी गोळा करून आणली.
१७)
१८)
१९) अंगत पंगत
२०)
२१) त्या रात्री तर जेवलोच नाही.. दुसर्या दिवशीचा नाश्ता
२२) दुसर्या दिवशीची प्रसन्न सकाळ
वा! मी थोडे माझ्या पोतडीतले फोटो टाकतेय बरं का.
हा माझा अतिशय आवडीचा फोटो. ल मेरीडियनच्या लॉबीतून घेतला आहे. बाग, जेट्टी आणि मग अथांग हिंदी महासागर:
लॉबी :
आम्ही म्हटलं हो..तर म्हणे आम्ही पण मूळचे मराठी आहोत. ते लोक पिढयानपिढया तिथे स्थायिक होते. त्या मुलीला मराठी येत नव्हतं पण तिला भाषा ओळखू आली. तिने 'आम्ही शिवाजी महाराजांची जयंती सेलिब्रेट करतो' असं म्हटल्यावर मी तिला मोठ्ठी स्माईल दिली होती
इथे खूप मराठी लोक स्थायिक आहेत.
भाग दुसरा - शुगर म्यूझियम - Aventure du Sucre
दुसरा दिवस रविवार होता. त्यादिवशी मला कुठलीही टुअर नव्हती म्हणून स्वतंत्रपणे फिरायचे ठरवले.
नेटवर काही छान ठिकाणे दिसत होती. पण रविवार असल्याने ती बंद होती. शुगर म्यूझियम मात्र उघडे आहे,
असे टॅक्सीवाल्याने सांगितले. म्हणून तिथे गेलो.
साखर हा या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा राहिला आहे आणि सध्याही तेच निर्यातीचे प्रमुख उत्पादन आहे.
उसाच्या शेतीत काम करायला म्हणून अनेक भारतीय लोक गेले असले तरी त्यांना गुलाम म्हणणे मला तरी
योग्य वाटत नाही. एकतर ते कसबी होतेच शिवाय त्यांचे फार हाल झाले असे काही वाटत नाही.
या देशाची जमीन आणि हवामान उस उत्पादनासाठी योग्य असले तरी, ज्यावेळी सुरवात केली त्याकाळी सर्व
जमीन नांगरल्यासारखी सपाट होती, असे मुळीच नव्हते. त्यातले मोठेमोठे खडक फोडून बाहेर काढावे लागले,
काही शेतात अजूनही असे ढीग दिसतात.
साखरेचे उत्पादन त्या काळच्या युरपमधे अजिबात नव्हते. साखरेचा कच्चा माल म्हणजे उस तिथे पिकत नव्हता.
बीट व इतर शेतमालापासून मिळणारे उत्पादन मर्यादीत होते, शिवाय ते कारखानेही महायुद्धाच्या काळात बंद
पडले होते. त्यामूळे वसाहतवाद्यांनी या देशाचा चांगलाच उपयोग करून घेतला.
साखरेचे तंत्रज्ञान मात्र मूळ भारताचे. चिनी लोकांनाही आपणचे ते तंत्र दिले.
एका जून्या साखर कारखान्यात हे संग्रहालय आहे. सर्व मशिनरी शाबूत आहे. मांडणी तर अतिशय सुंदर आहे.
साखरेसंबंधी सर्व माहिती रंजक रुपात तिथे मांडलेली आहे. ( केवळ साखरच नव्हे तर एकंदर या देशासंबंधी
इतरही माहिती आहेच. )
तिथे ती माहिती इंग्रजी आणि फ्रेंच दोन्ही भाषांत लिहिलेली आहे, शिवाय छापील पुस्तकही मिळायची सोय आहे.
http://www.aventuredusucre.com/index.php?nv=content&id=33 इथे आणखी माहिती आहे.
जवळच रेस्टॉरंट आहे. साखर आणि रम विकणारे एक दुकानही आहे. एकंदर मस्त जागा आहे ही. चला फोटोतून
ओळख करून घेऊ या.
१) सकाळीच हॉटेलमधून असे मस्त दर्शन झाले
२) रस्त्याच्या दोन्ही बाजूला उसाची शेती
३) पण तिथे जंगलेही भरपूर आहेत.
४) संग्रहालयाचा दर्शनी भाग
५)
६) यंत्रांची मांडणी
७) वेगवेगळ्या प्रकारची साखर
८) मॉरिशियस आधी आणि मग स्वर्ग निर्माण केला
९) जून्या काळचे गलबत
१०)
११) या सर्व ठिकाणी जाता येते
१२) वेगवेगळ्या साखरेची मांडणी
१३) अरब व्यापारी साखरेच्या अश्या ढेपा नेत असत. ( खनिज मिठाच्या अश्याच ढेपा आजही आफ्रिकेत वापरात आहेत.)
१४) चिमणी... हिच्या आधाराने पुर्वी गावे वसली
१५)
१६) प्रत्येक ठिकाणी सविस्तर माहिती आहे
१७) हे काय असेल बरं ?
१८) मेल बॉक्स
१९)
२०)
२१)
२२)
२३) त्या काळातली प्रयोगशाळा
२४) साखर, साखर, साखर
२५) आणि तिची वेगवेगळ्या तपमानातील रुपे
२६) जरा नीट बघा बरं... साखर आपली, चिन्यांची नाही
२७) त्या गलबतातला आतला भाग
२८) कधी काळी उसाची वाहतूक तिथे रेल्वेतून होत असे
२९) उसाचे पण चित्र काढता येते ?
३०)
३१) हा प्रकार मला माहीत नव्हता. उसाची लागवड पेरं लावून करतात एवढेच माहीत होते. पण अशी लागवड सातापेक्षा जास्त वेळा करता येत नाही. नवीन लागवडीसाठी अश्या तर्हेने निवडक वाण निवडून संकरीत "बियाणे" तयार करतात.
३२)
३३) तिथल्या खास जास्वंदी
३४)
३५)
३६)
३७) मागे वळून बघताना
३८) २६ क्रमांकाच्या फोटोतला बोर्ड नीट वाचता येत नाही, तो इथे मोठा करून देतोय.
३९) या देशाचे आकारमान जरी लहान असले तरी तिथे वेगवेगळ्या प्रकारची माती सापडते आणि अर्थातच त्यानुसार उसाचा वाण निवडतात.
४०) साखरेचे स्फटीक वेगळे करणारी यंत्रणा... ( शशांकने माहिती दिलीय प्रतिसादात.. )
पुढे चालू...
तिकडे सहकारी साखर कारखाने आणि त्यांचे राजकारण आहे की प्रायवेट की स्टेट रन्ड?
शेतात कुठेही बांध दिसले नाहीत त्यावरून अंदाज केला कि ती सरकारी किंवा किमान कंपन्यांच्या मालकीची असावी. तसेही त्यांचे जर काही प्रॉब्लेम्स असतील तर आमच्यासारख्या परक्या पर्यटकांशी त्याची चर्चा न करण्याचा संकेत सर्वच टूअर ऑपरेटर्स पाळतात.. तिथेही.
अनन्या... तिथे या प्रोसेसच्या क्लीप्स दाखवल्या जात होत्या. एखाद्या चालू कारखान्याला भेट दिली तर तो
मळीचा वास ( आपल्यासारख्या, सवय नसलेल्यांना
) असह्य होतो. तिथे तो नव्हता.
सध्या तरी तिथे बहुतेक सर्व प्रक्रिया यंत्रांनेच केली जाते.
तिकडचे सगळे साखर कारखाने आणि उसाची शेती ही खासगी आहे. तसेच युरोपात फक्त इथलीच साखर जाणार असा काहीतरी करारच होता आता आतापर्यंत. म्हणजेच मॉरिशससाठी युरोप ही हक्काची मोनोपलीस्टिक बाजारपेठ होती. त्या कराराची मुदत संपल्यानंतर मॉरिशसने पर्यटनासारख्या इतर क्षेत्राकडेही लक्ष द्यायला सुरुवात केल्ये.
उसाला सरसकट सगळीकडेच तुरे येत नाहीत. एका विशिष्ट हवामानाची गरज असते. भारतात फक्त कोईमतूरला असे वातावरण असल्याने तिथे आपले राष्ट्र्रीय उस संशोधन केंद्र आहे. संकरीत बियाणे निर्मितीकरता याचा उपयोग केला जातो.
त्या २२ क्र. च्या प्र चि त मॅस्कट ( massecuite) म्हणून जे दाखवले आहे
त्यात उसाचा रस गरम होत होत साखरेचे क्रिस्टल्स तयार होतात - यात
अल्कोहोलमधे विरघळलेली साखर सीड करतात - या साखरेच्या रेणूच्या आसपास साखर
क्रिस्टलाईज होते. (जसे तिळाभोवती साखर क्रिस्टलाईज होते आणि हलवा तयार
होतो सेम तसेच...) या प्रक्रियेत तो साखरेचा पाक सतत ढवळत रहाणे फार
गरजेचे असते. भारतात (जिथे वीजेचा अजिबात भरवसा नसतो) कुठल्याही साखर
कारखान्यात या मॅस्कटकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देतात. समजा वीज गेलीच तर
मॅन्युअली तो पाक फिरवावा लागतोच - अन्यथा तो पूर्ण मॅस्कट फेकून द्यावा
लागतो - कारण मग तो दगडापेक्षा कठीण होऊन बसतो...
एकंदरीत साखर कारखाना हे माझ्या दृष्टीने तरी अतिशय प्रेक्षणीय स्थान आहे. खूप गुंतागुंतीची प्रक्रिया असते - या साखरेमागे ....
भाग तिसरा - बोटॅनिकल गार्डन, Pamplemousses Botanical Garden, Sir Seewoosagur Ramgoolam Botanical Garden
सोमवारपासून माझ्या सहली सुरु झाल्या. एकेका दिवसात बरीच ठिकाणे बघून व्हायची.
सुरवात झाली ती तिथल्या बोटॅनिकल गार्डन पासून. याचे लोकप्रिय नाव आहे
Pamplemousses Botanical Garden तर शासकीय नाव आहे Sir Seewoosagur
Ramgoolam Botanical Garden.
३७ हेक्टरवर पसरलेले हे उद्यान जगपसिद्ध आहे. फक्त एकच प्रॉब्लेम होता कि सध्या तिथे हिवाळा असल्याने
फारशी फुले नव्हती. हे ड्रायव्हरने आधीच सांगितल्याने सहलीतली अर्धी माणसे उतरायला नाखुष होती.
पण माझ्या गटातल्या लोकांची मेजॉरिटी झाल्याने आमची जीत झाली. मर्यादीतच वेळ दिला होता.
त्यामूळे मनसोक्त भटकता आले नाही... आणि अशा ठिकाणी माझे व्हायचे तेच झाले.. मी हरवलो:
ड्रायव्हरसकट काही माणसे मला शोधायला आत शिरली आणि त्यांनाही मी अडकवून ठेवले.
हे खरे आहे कि फुले नव्हती, पण ती जागा खुपच सुंदर राखलेली आहे. आणि फुले नसल्याने एक मात्र झाले,
तिथे परत त्यांच्या वसंत ऋतूमधे जायचे मी मनात ठरवून टाकले.. तर चला हरवू या !
प्रभाते करदर्शनम.. प्रमाणे नमनाला समुद्र हवाच
१)
२)
३)
४) तिथे इंद्रधनुष्याचे वेगवेगळे प्रकार बघितले, हा नमुना बघा
५)
६) हॉटेलच्या लॉनवर दिसलेली देखणी चिमणी
७) "वडगावाच्या" आत
८) हॉटेलच्या बाजूला एक देवालयही होते. भाविकांची ये जा होती ( सोमवार होता ) तरीही किती सुंदर राखले होते बघा.
९) इथून पुढचे फोटो त्या बोटॅनिकल गार्डनमधले
कमळाचे फळ व बिया.. या बियांच्या लाह्या म्हणजेच मखाणे
१०) बिक्सा अनोटा म्हणजेच आपले कुंकवाचे झाड.. या फळातील बियांपासून सुरक्षित खाद्यरंग तयार करतात.
११)
१२)
१३) मला आवडलेली एक फ्रेम
१४)
१५)
१६) पैगाम / कमांडमेंट्स / आकाशवाणी वगैरे
१७)
१८)
१९)
२०)
२१)
२२) हे झाडासमोरचे चौथरे दिसताहेत त्यावर प्रत्येक झाडाचे नाव आणि माहिती होती
२३)
२४)
२५)
२६)
२७) Brownea Grandiceps, Rose de Venezulela, Scarlet Flame Bean
२८) या ब्राऊनिया ग्रँडीसेप्स ची शेंग पण खुप सुंदर होती ( तर फुल किती सुंदर असेल !! )
२९) एक अजूबा बघितला
३०) जवळ जाऊन बघितले तर असे होते
३१)
३२)
३३) वॉटर लिलीचे खुप फोटो टाकले आजवर... तरी हे दोन टाकतोच
३४)
३५)
३६) खर्या कमळाचे हे कोवळे पान
३७) ही जून पाने ( सहज अर्धा मीटर व्यासाची )
३८) हा कळा
३९) पहिल्या दिवशी असे
४०) दुसर्या दिवशी असे
४१)
४२)
४३)
४४)
४५) Le Château de Mon Plaisir, पण आत जायला वेळ नव्हता
४६) जीव गुंतला...
पुढे चालू
ती कमळाची पानं ही खर्या कमळाची नाही आहेत. ही एक कमळाची वेगळी जात आहे जी फक्त मॉरिशसलाच दिसते.
ते वडगाव मलाही खूप आवडलं होतं. त्याच्या समोरच एक भेटवस्तुंचं दुकान आहे त्यामुळे आम्ही दोन तीनदा तिथे थांबलो होतो.
या ठिकाणची माझ्या पोतडीतून काही :
ही ती सुप्रसिद्ध कासवं :
भाग चौथा - पोर्ट लुई Port Louis & Le Caudan Waterfront
सहलीचा पहिला दिवस हा शॉपिंगचा होता. म्हणून सहप्रवासी पोर्ट लुईसला जायला उतावीळ होते. गार्डनमधून
बाहेर पडल्यावर ( म्हणजे मला बाहेर काढल्यावर ) आम्ही पोर्ट लुईस या मॉरिशियसच्या राजधानीकडे निघालो.
ब्रिटीशांनी वसवलेली हि राजधानी अजूनही या देशाचा आर्थिक केंद्रबिंदू आहे. सर्व जहाजांना इथेच यावे लागते.
बँका, विमा कंपन्याही इथेच आहेत. ( विमानतळ इथे नाही )
रस्ते अरुंद आहेत त्यामूळे वाहतुकिचा खोळंबा होतोच. सध्या त्यावर उपाययोजना चालू आहेत.
इथे जाण्यापुर्वी आम्ही एका जवळच्या डोंगरावरच्या किल्ल्यावर गेलो ( वरपर्यंत गाडी जाते ) तिथून या
शहराचे सुंदर दर्शन होते. या डोंगराच्या मागेच आणखी एक डोंगर रांग आहे आणि त्यातच त्या देशातले तिसर्या
क्रमांकाचे शिखर Le Pouce (812 Mtrs) आहे. ( म्हणजेच फ्रेंच भाषेत (नानाचा) अंगठा
) त्यावरची चढाई
सोपी गणली जाते. माझ्याकडे एखादा जास्तीचा दिवस असता तर नक्कीच गेलो असतो.
तर चला शॉपिंगला..
१) डोंगरावरच्या किल्ल्यातून
२)
३) हा किल्ला अजूनही चांगल्या अवस्थेत आहे
४)
५)
६)
७) मागच्या डोंगररांगा
८)
९)
१०) तोफा कश्या रोखलेल्याच हव्यात, नाही का ?
११) Champ de mars racecourse
१२)
१३) बंदरातला समुद्रही निळाशारच आहे
१४) वासू सपना इल्ले 
१५)
१६) सर अब्दुल रझाक यांच्या नावाची कमान ( शहरात उतरल्यानंतर )
१७) चालत्या गाडीतून टिपलेला एक मॉरिशियन चेहरा
१८)
१९)
२०) तिथले एक फाइव्ह स्टार हॉटेल
२१) इथून पुढचे फोटो Le Caudan Waterfront या भागातले.
२२) तिथे नमस्ते नावाचे इंडीयन रेस्टॉरंट आहे. पदार्थाची चव खास नाही, दर मात्र भरपूर महाग.
२३) लाल पाटी दिसतेय, ती नमस्ते ची
पण बाकी खायला प्यायला भरपूर आहे. फळांचे ताजे रसही छान मिळतात.
२४) बंदरातले सायलोज
२५)
२६) तिथलाच कॅसिनो
२७) या इमारतीत दोन्ही बाजूला कपड्यांची दुकाने आहेत
२८)
२९)
३०)
३१) हा सबवे ओलांडून तूम्ही स्ट्रीट बजार मधे पोहोचता
इथे मात्र तूमच्या बार्गेन कौशल्याला भरपूर वाव आहे. दुकानात ५०० ला मिळणारी वस्तू इथे १०० ला मिळू शकते.
पारखी नजर मात्र हवी. मला तसा धोका दिसला नाही पण खिसा, पाकिट संभाळायच्या
सूचना ड्रायव्हरने दिला होता. मला इथे काही चांगल्या वस्तू मिळाल्या.
३२) जरा फसवा फोटो
३३) दुबईच्या मॉल्सच्या मानाने पिटुकले मॉल्स आहेत तिथे ( दुबईला पण जायचे आहे आपल्याला )
३४)
३५)
३६)
३७) हा पूल (म्हणे) "कुछ कुछ होता है" चित्रपटात आहे
३८) तिथे दिसलेल्या काही जास्वंदी
३९)
४०)
४१)
४२) ही कमान "गरम मसाला" चित्रपटात आहे.. पण त्यावेळी हा भाग मोकळा होता.
४३) वेगळ्या आकाराची तगर
४४)
४५) Blue Penny Museum आतून बघायला वेळ नव्हता 
४६) ही पण चिमणीच
४७)
४८) तिथल्या मॉल्समधे सुव्हेनीयर्स् ची रेलचेल होती. पण मला खास मॉरिशियन काहीतरी हवे होते.
भरतकाम केलेले टेबलक्लॉथ घेतले. त्यावरचे भरतकाम खासच आहे. ( अवल आणि शिष्या प्लीजच नोट)
याचे नाव विचारले तर स्लेव्ह्ज असे सांगितले. साधे टाके वापरून फारसे डीटेलिंग न करता छान परिणाम साधला आहे.
पुढे चालू
भाग पाचवा - बीच टुअर Ile Aux Cerf Island (deer island)
दुसर्या दिवशी समुद्रकिनार्यावरची सहल होती...
१) मला तिथे खुप घराच्या आवारात अशी नैसर्गिक झाडूची झाडे दिसली
२) नेहमीप्रमाणेच मस्त नाश्ता
३) मग "ज्योतिबा" दर्शन
४) मला तिथे मस्त करवंद पण दिसलं, मी ते अर्थातच तोडून खाल्लं.. पण त्यापुर्वी फोटो काढायचे भान होते 
५) मग आम्ही एके ठिकाणी अंडर सी वॉकला गेलो. ( माझा कॅमेरा वॉटर प्रूफ नसल्याने ते फोटो नाहीत
)
३ ते ४ मीटर पाण्यात, डोक्याभोवती हवेची हंडी बाधून चालायचे असते. पोहणे यायची गरज नसते. एक दोन
मिनिटातच आपण तोल संभाळायला शिकतो. मग आजूबाजूला मस्त प्रवाळ आणि रंगीबेरंगी मासे दिसतात.
मार्गदर्शक आपल्याला अगदी संभाळून चालवतो.
त्या ठिकाणचा बीच पण सुरेख होता.
६)
७)
८)
९)
१०)
या फोटोत तुमच्या अगदी डाव्या हाताला जो छोटासा प्लॅटफॉर्म दिसतोय तिथून पाण्यात शिरलो आम्ही
११) डोंगरी शेत माझं गं
१२) या ठिकाणाहून आम्ही स्पीड बोटीने Ile Aux Cerf Island (deer island) ला गेलो. इथून पाच मिनिटावरच हे सुरेख बेट आहे.
१३)
१४) पाण्याची खोली, आकाशातले ढग, सूर्याची दिशा यावर अवलंबून पाण्याच्या रंगाच्या अनेक छटा दिसत होत्या.
१५)
१६)
१७) ते बेट म्हणजे भन्नाट जागा आहे. कुणालाही पाण्यात उतरायचा मोह होईल तिथे.
कॅमेरासकट सर्व सामान तसेच उघड्यावर टाकून सर्वच जण पाण्यात उतरत होते. नितळ पाणी होते.
१८) तिथेच दोन रेस्टॉरंट्स आहेत. एकात भारतीय जेवण मिळते. ३७५ मॉ. रुपयांना चांगले जेवण मिळाले.
१९) तिथेच अनेक वॉटर स्पोर्ट खेळायला वाव आहे. आम्ही ग्लास बॉटम बोटीने एक फेरी मारली. पण ग्लासपेक्षाही
पाणी नितळ होते त्यामूळे ग्लासमधून काढलेले फोटो तेवढे खास नाहीत.
२०) परत त्या बेटावर भटकत राहिलो
२१) मी पण कधी कधी रसिक होऊन मासे पकडतो बरं
२२) मन आम्ही दुसर्या स्पीड बोटीने एका अनोख्या जागेकडे निघालो.
२३)
२४)
२५)
आम्ही एका नदीच्या गॉर्जमधे शिरलो.. पाण्याच्या रंग गहीरा हिरवा झाला
२६)
इथे आम्हाला जायचे होते
२७) पण तिथे जेमतेम एक बोट मावण्याएवढी जागा असल्याने थोडी वाट बघावी लागली
२८) मग या धबधब्याच्या अगदी जवळ गेलो
२९) तिथला थरार मला ना शब्दात पकडता येत ना फोटोत !
३०) परत फिरायला कुणीच तयार नव्हते पण आमच्यामागे पण काही बोटी वाट बघत थांबल्या होत्या
३१)
परत परत मागे वळून बघत होतो.
३२) परत समुद्राकडे
३३) आणि मग भन्नाट वेगाने परत किनार्याकडे
पुढे चालू
भाग सहावा - शिप मॉडेल फॅक्टरी
शिप मॉडेल्स हा मॉरिशियसचा एक महत्वाचा निर्यात उद्योग आहे. मोठ्या बोटींची टु द स्केल अशी मॉडेल्स,
लाकडापासून केली जातात. तश्या एका फॅक्टरीला भेट दिली.. ती मॉडेल्स सुंदर होती पण किमतीही तश्याच होत्या.
१) आजची सकाळ वेगळेच रंग घेऊन आली होती
२) लॉबीमधूनच हे असे दिसत होते
३) आजचे दर्शनही वेगळे
४) रस्त्याच्या दोन्ही बाजूंना शेती
५) इंद्रधनुष्याचे वेगळेच प्रकार दिसले मला तिथे..
७)
८)
९) पोर्ट लुई मधे थोडा खोळंबा होतो खरा, पण एकदा ते पार केले कि रस्ते लहान असले तरी छान आहेत.
१०)
११)
१२) परत इंद्रधनुष्य . असा प्रकार मी यापुर्वी फक्त झीन्नत अमान च्या " सत्यम शिवम सुंदरम" मधे बघितला होता.. अर्थात त्यावेळी ते खरे वाटले नव्हते. ( नव्हतेही पण तसे असू शकते हे आता कळले )
१३)
१४)
१५)
१६)
१७)
१८) सोलर पॉवर्ड बिल्डींग
१९) चिंब पावसानं रान झालं आबादानी
२०)
२१) भूभू असा शहाणा असेल तर मी पण श्वानप्रेमी.. याच्या पाठीवरचे केस मीच विस्कटलेत
२२)
२३) शिप मॉडेल्स
२४) फॅक्टरी
२५) पूर्वतयारी
२६) छान मॉडेल आणि छानच किंमत
२७)
२८)
२९)
३०)
३१)
३२)
३३) पुढच्या भागात ज्वालामुखी बघू... चला निघू या
पुढे चालू
भाग सातवा - निद्रीस्त ज्वालामुखी - Curepipe Volcano Crater
यानंतर आम्ही क्यूअरपाईप या गावी एक निद्रीस्त ज्वालामुखी बघायला गेलो. क्यूअरपाईप हे नाव पडायचे
कारण पुर्वी पोर्ट लुई वरून येणार्या आगगाडीचे पाईप्स या गावी साफ करत असत.
हा ज्वालामुखी फक्त निद्रीस्त आहे, मृत नाही. पुढील हजारएक वर्षात तो
कधीही जागा होऊ शकेल ( मराठी माणसा !!! ) . सध्या त्या विवराच्या तळाशी
सरोवर आहे आणि कडांवर घनदाट जंगल आहे. थेट वरपर्यंत गाडी
जाते आणि त्या विवराच्या भोवती आपण पायी फिरू शकतो.
हा भाग उंचावर असल्याने हवा थंड असते. आम्ही गेलो त्यावेळी पाऊसही होता. तिथेच सोनटक्क्याचे रान माजलेले आहे.
१)
२)
३)
४) तिथला रस्ता आणि सभोवतालचे दृष्य
५)
६)
७)
८)
९) ढाल तेरडा
१०)
११) आपल्यापेक्षा थोडा वेगळा सोनटक्का
१२)
१३)
१४)
१५) साद घालणार्या पायवाटा
१६)
१७) अधून मधून विवरात डोकावत होतोच
१८) विवराचा तळ
१९)
२०) तिथेही इंद्रधनुष्य
२१)
२२)
२३)
२४)
२५)
२६) टिपीकल मॉरिशन थाली... किम्मत १,३०० भारतीय रुपये.. आग्रहही फारसा नव्हता 
२७ ) देवदर्शनाच्या वाटेवर
२८) गोड्या पाण्याचे सरोवर
पुढील भागात देवदर्शन करु ...
हां! याची आहेत प्रचि माझ्याकडे :
अगदी नॅस्टरशियम सकट! 
भाग आठवा - गंगा तलाव
गंगा तलाव हि मॉरिशियस मधील हिंदूंसाठी अत्यंत पवित्र जागा आहे. समुद्रसपाटीपासून १८०० फूट उंचीवर
हा तलाव आहे आणि याचा उगम भारतातील जान्हवी पासून झालेला आहे, असे ते लोक मानतात.
महाशिवरात्रीला पाच ते सात दिवस इथे मोठा उत्सव असतो. देशातील अनेक भागातून लोक पायी इथे येतात.
या तलावाचे पाणी पवित्र मानतात आणि इथून कावड भरून घरी न्यायची प्रथा आहे.
तर चला.
१) रस्त्यातील जंगल
२)
३)
४) गंगा तलावाच्या आधीपासूनच पायी चालत येणार्यांसाठी अशी कायमस्वरुपी व्यवस्था केलेली आहे.
५)
६) प्रत्यक्ष संकुल तर फारच छान आहे
७) पावसाळी हवामान असल्याने फोटो तितकेसे स्पष्ट नाहीत
८)
९)
१०)
११) तिथे कुठलेही दुकान नाही कि कुणी पैसे मागत नाही. पुजारी प्रत्येकाला गंध लावतात. हिंदूंना आवर्जून गाभ्यार्यात जाऊन दर्शन घ्या, असे सांगतात.
१२) त्या तलावातला मासा, १ मीटरपेक्षा जास्त लांब होता
१३)
१४)
१५) या फोटोतली टेकडी आहे त्यावर जाता येते.
१६)
१७) तलावाच्या कडेने असा सुंदर रस्ता आहे
१८)
१९) भक्तांना बसण्यासाठी कायमस्वरुपी व्यवस्था
२०) भरपूर स्वच्छतागृहे
२१) टेकडीवर जायचा सुबक मार्ग
२२) वाटेवर
२३) टेकडीवरून
२४)
२५)
२६)
२७)
२८)
२९)
३०)
३१)
३२)
३३) संकुलाच्या बाहेर शिवाची भव्य मूर्ती आहे ( सध्या डागडूजी चालली आहे. )
३४) दूर्गेची पण मोठी मूर्ती उभारली जातेय.. ही तिची प्रतिकृती
३५)
३६) तिथेच पार्किंग लॉट मधे मला ही सुंदर फुले दिसली
३७)
३८) त्या फुलांचे झाड
३९) आता पुढे..
पुढे चालू
भाग नववा - शमारेल धबधबा, Le Cascade de Chamarel
पुढचे ठिकाण होते, शमारेल चा धबधबा.. हा एका खाजगी जागेत आहे. तिथे जायचा रस्ता सुंदर आहे.
परीसरात कॉफी, अननस वगैरेची शेती आहे.
१०० मिटर्स कोसळणारा हा धबधबा दोन टप्प्यात आहे आणि तो बघायलाही सुंदर सोय केलेली आहे.
१) रस्ता
२)
३) झोकदार वळण
४)
५)
६) मधूनच प्रखर उनही पडायचे
७) अननसाचे शेत
८)
९)
१०)
११) इथेही इंद्रधनुष्य आहेच ( धबधब्याचा वरचा भाग )
१२)
१३)
१४)
१५)
१६)
१७)
१८)
१९)
२०)
२१)
२२)
२३) तिथेच जरा वर एका टेकाडावर चढूनही हा धबधबा बघता येतो.
२४) ही खालच्या टप्प्यावरची जागा
२५) माहितीफलक
२६)
२७)
२८)
२९)
भाग दहावा - सप्तरंगी माती, Seven Colored Earth
या शमारेल धबधब्याच्या जरा पुढे एक निसर्गाचा चमत्कार बघायला मिळतो. ही
जागा सेव्हन कलर्ड अर्थ म्हणून ओळखतात. सात रंग म्हणजे अगदी इंद्रधनुष्याचे
रंग नाहीत पण तरीही वेगवेगळे रंग आहेतच.
लोखंड आणि अल्यूमिनियमच्या संयुगांमुळे इथल्या मातीत हे रंग दिसतात.
ही जागा तशी उघड्यावरच आहे. या जागेच्या भोवती कठडा आहे. आम्ही गेलो होतो त्यावेळी संध्याकाळ होत
होती आणि त्या संधिप्रकाशात ते रंग वेगळेच दिसत होते.
निसर्गाची करणी तरी कशी.. ही माती अत्यंत निकस आहे. इथे गवताचे पाते देखील उगवू शकत नाही. पण तसे असते तर हे रंग आपल्याला दिसूही शकले नसते.
बघूया मला कितपत ते कॅमेरात पकडता आलेत ते !
१)
२)
३)
४)
५)
६)
७)
८)
९)
१०)
११)
१२)
१३)
१४)
१५)
१६)
१७)
१८)
१९)
२०)
२१)
२२)
२३)
२४)
२५)
२६)
२७)
२८)
२९)
३०) निळी मुंगी ?????
पुढच्या भागात समारोप.
कामिनी.. ती माती निकस आहे. पर्यटकांना चिमूट चिमूट भर टेस्ट ट्यूबमधे घालून विकतात. दुसरा काही उपयोग नाही. ( पण त्या ठिकाणी म्हणजे त्या मातीवर कुणाला पाय ठेवता येत नाही. तशी सूचना कुठेही लिहिलेली दिसली नाही तरी तो कठडा ओलांडून कुणी जात नव्हते. )
ग्लास फॅक्टरीचे खूप फोटो नाहीयेत. एक दोनच आहेत ते टाकते :
क्रोकोडाईल पार्क. भारी सुरेख, दाट हिरव्या झाडीनं भरलेलं आणि टुमदार होतं हे. ते फिरताफिरता मस्त नेचर वॉक झाला. :
प्रवेशद्वार :
झोपा काढतायत :
गेटर किंडर गार्डन :
जायंट टॉर्टॉईजः
बालपणीचे जायंट टॉर्टॉईज :
अॅक्वेरियम देखिल अतिशय सुरेख :
सांताक्लॉ़ज :
पावडर-कुंकू चाललंय:
घरात जातोय की बाहेर येतोय?:
तू जा तुझ्या वाटेनं, मी जातो माझ्या वाटेनं (घरासकट):
कोरल :
मॉरिशसच्या समुद्रकिनार्यावर कोरल्सचीच बनलेली वाळू आहे. आणि कोरल्सचे अगणित तुकडेही वाळूत असतात. पायाला बोचत राहतात. मऊ, मुलायम वाळू निदान ल मेरिडियनच्या समुद्रकिनार्यावर नव्हती.
हे दगड नाहीयेत. वाळून स्वतःला लपवलेले दगडोबा मासे आहेत :
सी-टर्टल :
मॉरिशियस - समारोप
माझे विमान संध्याकाळचे होते. त्यामूळे सकाळ तशी मोकळीच होती. पहाटेच बॅग भरून ठेवली. मग जवळच्याच
बीचवर भरपूर भटकलो. त्यादिवशी वादळी हवामान होते. पाऊस पडेल असे वाटत होते. दिवसभर नाही पण
विमानतळावर पोहोचेपर्यंत पडलाच.
एकंदर मस्त ट्रिप झाली..
१) मागच्या भागातल्या "निळ्या मुंगी"चे फुल
२) शमारेल हून बाहेर पडल्यावर एका अत्यंत उंचावरच्या जागी आपण येतो. तिथला नजारा ( सूर्याची पोझिशन मात्र योग्य नव्हती )
३) "माझा" फोटो 
४) तिथला "तिकोना "
५)
६) बहाव्याची झाडे फार हेल्दी दिसत होती.. फुलल्यावर किती मस्त दिसत असतील
७) तिथली " वानरलिंगी "
८)
९)
१०)
११) हॉटेलच्या माझ्या विंग मधून दिसणारा समुद्र
१२)
१३) बीचवर हा स्टॉल होता. मी २ अननस खाल्ले तिथे. इथून मी काही चटण्या घेतल्या ( काही मायबोलीकरांनी चाखल्या त्या )
१४)
१५)
१६)
१७)
१८)
१९)
२०)
२१) निवांत विमानतळ
२२)
२३)
२४)
२५) ए ३८० ( आता मुंबईत पण येते एमिरेट्स चे ३८०. इके ५०१ / ५०२ .. गेल्याच महिन्यात सुरु झाले )
२६) विमानतळावर पोहोचलो तर पाऊस सुरु झालाच
२७)
आता दुबई / अबु धाबीला जाऊ आपण !
हे असेच थोडे सटरफटर. व्यासपीठ मिळालंय त्याचा फायदा घेते.
:
पाऊस भरून आला:

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.