Wednesday, July 19, 2023

अंजनेरी

 http://anandgodse.blogspot.com/2013/07/blog-post.html

शुक्रवार ५ जुलै सकाळी ६ वाजता  अभिजित आणि अमोलला कॉल केला. दोघेही निघालेच होते आर्ध्या तासात तिघे S.T stand वर भेटलो. याहिवेळी नेहमीप्रमाणे अर्ध्याहून जास्त जनांनी येणे टाळलेच होते. मग तिघांनीच पुढे प्रस्थान केले.
९ वाजता अंजनेरी फाट्यावर तिघे येवून पोहोचलो . पुढची रूपरेषा ठरलेलीच होती त्याप्रमाणेच लगेच अंजनेरी गावाची वाट धरली.
वाटेतच राजांची अश्वारूढ भव्य असा पुतळा पाहून तिघेही काही क्षण थबकलो . राजांप्रमाणेच बसवेश्वर व महाराणा प्रताप यांच्याही प्रतिमा तेथे होत्या. राजांना अभिवादन करून पुढे निघालो.

 वाटेतच भव्य अशी मूर्ती असलेले हुनुमानाचे मंदिर असल्याचे ग्रामस्थान कडून कळले व वाट वाकडी करून आम्ही तिकडे निघालो. अवाढव्य मारुतीच्या मूर्तीकडे पाहून खरच शीर नतमस्तक झाले.

गावातून गडाकडे जाणारी वाट धरली वाटेत शानिदेवांचे एक छोटे मंदिर आहे तसेच भगवान महावीरांचा चिंतनात मग्न असा पुतळा लांबूनच दुष्टीपथास पडतो.

जवळच एक भग्न शिवालय आहे. शेजारची गुंफा आणि मंदिरावरील शिल्पे पाहताच लक्ष्यात येते कि मंदिर फार प्राचीन  असावे.

अंजनेरी गाव तसे लहानाच आहे. गावाचा मुख्य व्यवसाय शेती व पशुपालन. गावातून जाताना पावसापासून बचाव व्हावा म्हणून घराच्या भिंतीचा आधार घेणाऱ्या कोंबड्यांची मोठी गम्मत वाटली

गावातून पुढे गडाकडे जाण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला आहे .
गावातून गडावर जाणाऱ्या पायऱ्या पर्यंत साधारण १५ ते २० मिनिट लागतात पण एकीकडे गावातील शाळा, पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरी व भाताची खाचरे तर दुसर्या बाजूला नवरा-नवरी चे सुळके पाहण्यात पायऱ्यापाशी येवून पोहोचल्याचे कळलेही नाही.

साधारणपणे १० ते १५ मिनिटात पायऱ्यांच्या वाटेने तिघे खिंडी जवळ येवून
पोहोचलो . खिंडीमध्ये दोन गुंफा आहेत.

पुढचा रस्ता जर सुखावह होता १० मिनिटात आम्ही अंजनी मातेच्या मंदिरा पर्यंत
येऊन पोहोचलो. मंदिर तसे छोटेसेच आहे पण एकूण रचनेवरून असावे. मंदिराशेजारी २ कुंड आहेत.

मंदिरामागून रस्ता तळ्याकडे जातो. एवढ्या उंचीवर असलेले तळे पाहून आश्चर्य वाटले.  
तळ्याचा आकार पाउलप्रमाणे आहे. हनुमानाणे सूर्याला पकडन्यासाठी केलेल्या उड्डाणावेळी उमटलेले हे पाउल आहे अशी आख्यायिका मंदिरातल्या बाबाजीकडून ऐकायला मिळाली .

तळ्याशेजारून  एक रस्ता वरती जातो. पुढे डावीकडे एक रस्ता साधारण २० पुढे जातो. त्याठिकाणी एक गुंफा आहे. तिथे हनुमानाचा  जन्म झाला असे मानले जाते. मंदिरातील बाबाजी याच गुहेत राहतात.

उजवीकडे जो रस्ता जातो तो सरळ वर जाऊन मुख्य मंदिराकडे जातो. तिथपर्यंत जाण्यास साधारण १५  मिनिट लागले.
मंदिर तसे छोटेसेच आहे. मंदिरात एक हनुमाना समवेत अंजनी मातेची मूर्ती आहे. मंदिरा भोवती अनेक शिल्प विखुरलेली आहेत.

मंदिरा भोवती काही कुंड आहेत. मच्छिंद्र नाथांनी तयार केलेली काही कुंड मंदिरानजीक असल्याचे ऐकले होते पण वातावारण खराब असल्याने ती शोधणे जर अवघडच होते.

पाऊसाने चांगलाच जोर धरला होता काही अंतरा पलीकडे पाहणेहि अशक्य होते. अशा वातावरणात भगवा मात्र डौलाने फडकत होता.

काही वेळ पावसाचा आनंद घेऊन आम्ही त्र्यंबकेश्वरकडे निघण्याचा निर्णय घेतला.

जवळपास पाऊण तासात आम्ही खाली येउन पोहोचलो व त्र्यंबकेश्वरकडे कूच केले.

२ तास  रांगेत उभे राहिल्यानंतर दर्शन झाले. मंदिराजवळून ब्रम्हगिरी खुणावत होताच. घराकडे निघालो ते ब्रम्हगिरीला भेट देण्याचा निश्चय करूनच.     
काही फोटोग्राफ्स

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://itsmytravelogue.blogspot.com

   Cinematographic Wai - Menavali_November 6, 2013 We had a "real" long Diwali Holidays to our Company - 9 days - long enough to m...