https://www.maayboli.com/node/52156
साधारण ७-८ वर्षापूर्वी एका लेखात "ती"चे वर्णन वाचले आणि वाचताक्षणी "ति"च्या प्रेमात पडलो. पुढे आंतरजालावर "ती"चे फोटो पाहिले, अधिक माहिती मिळवली आणि "ति"च्याबद्दलचे आकर्षण आणि भेटायची उर्मी अधिकच दाट झाली. पुढे लेह लडाखवारीहुन परतताना "ति"चे ओझरते दर्शन झाले आणि "ति"च्या अवखळ, अल्लडपणाने मनाला अधिकच भुरळ घातली. खरंतर स्पितीव्हॅलीचा (माझा) हा बेत हा खास "तिच्या"साठीच होता. "ती"चं नाव "चंद्रा".
चंद्रा आणि भागा या दोन नद्या उत्तरेला सूरजतालजवळ बारालाच्याच्या खिंडीतून उगम पावतात. भागा पश्चिमेला पत्तन दरीत, तर चंद्रा दक्षिणेला लाहौल दरीत उतरून बातल येथून पश्चिमेला वळते. पुढे तंडी या गावी या एकमेकांत समरस होतात आणि मग जन्म घेते ती ‘चंद्रभागा’. हीच नदी पुढे काश्मिर आणि मग पाकिस्तानात ‘चिनाब’ या नावानं ओळखली जाते. गेल्यावर्षीची लेह-लडाख टूर संपल्यानंतर जेंव्हा सार्चु मार्गे मनालीला परतत होतो तेव्हा या अवखळ चंद्रभागा नदीच्या ओढीनेच लाहौल स्पितीचा बेत शिजला होता आणि वर्षभराच्या आत तो तडीसही गेला. याच "चंद्राने" मनाला भूल घातली म्हणुन हि "चांद्रभूल".
परदेश राहिला दूर तरी देश आपला छान, किती रंग! कसे रूप! पाहुनी हरते भान."
लहानपणी वाचलेल्या शांता शेळके यांच्या कवितेचा अर्थ आता पूर्णपणे समजू लागला आहे. भटकंतीची आवड ज्यांना लागली आहे त्यांना 'घर सोडा' असं सांगावं लागत नाही; त्यांची पावलं आपोआपच बाहेर वळतात आणि जर ही भटकंती हिमालयाच्या कुशीतली असेल, तर होणारा आनंद हा कॅमेर्याच्या मेमरी कार्डातही मावणारा नसतो. असं म्हणतात, की जंगलातून चालताना कधी कधी ‘रानभूल’ पडते. पायाखाली ठळक वाट असूनही 'चकवा' लागतो. पुन्हा फिरून फिरुन त्याच जागेवर येणं होतं. साधारण ४ वर्षांपूर्वी पहिल्यांदा जेव्हा उत्तराखंडमधील हिमालयाला भेट दिली होती, तेव्हा वाटलं नव्हतं, की हा 'चकवा' दरवर्षी पुन्हा पुन्हा लागणार आहे. उत्तराखंड, काश्मिर, लेह-लडाख आणि आता हिमाचल प्रदेश. हिमालयाची 'हिमभूल' पडते म्हणतात. पण इथं वाट चुकली जात नाही, तर खास वाट चुकवून इथे यावंस वाटतं. इथे निसर्गाचा रौद्र व महाकाय अविष्कार पाहून मनात वादळं निर्माण होतात. त्या रौद्र निसर्गात स्वतःला झोकून द्यावसं वाटतं. खरं तर सगळ्यांनाच हा अनुभव येतो असंही नाही. निसर्गाकडे पाहण्याची मनाची उत्कटता जितकी जास्त, तितकी अशा अनुभवांची तीव्रता जास्त! निसर्ग आपल्याला दोन प्रकारे भेटतो - एक म्हणजे स्वत:च्या उन्मुक्त आणि खर्या अवस्थेत आणि दुसरा म्हणजे साचेबद्ध, आखीव-रेखीव सौंदर्यखुणांच्या स्वरूपात. लाहौल स्पिती परिसरात आपल्याला भेटणारा निसर्ग हा पहिल्या प्रकारातला. कुठल्याही ऋतूत इथला निसर्ग आपल्याला उन्मुक्तपणेच भेटतो. निसर्गाचा समतोल आज जरी आपल्या कर्मामुळे बिघडत चालला असला, तरी तो स्वत: मात्र बेईमान होत नाही. इथला निसर्गही त्याला अपवाद नाही. इथे तुम्ही मानव म्हणून आलात तरीही तो देताना कुठेही डावं-उजवं करत नाही. इथून दूरचे डोंगरही साजिरे दिसतात आणि जवळचेही. फक्त निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याला सामोरं जाताना मनाची प्रांजळता हवी.
आपण हिमालयाच्या कुशीत शिरतो तेव्हा "अनंत हस्ते कमलावराने, देता किती घेशील दो कराने" ही उक्ती अगदी सार्थ ठरते. निसर्गाच्या सर्व छ्टांची मुक्त उधळण जिथे आपण अनुभवतो ती देवभूमी म्हणजेच हिमाच्छादित बर्फशिखरांनी सजलेलं, नटलेलं ‘हिमाचल प्रदेश’. गेल्यावर्षीच्या एप्रिल महिन्यात शिमलामार्गे स्पिती व्हॅलीचा बेत ठरला. 'लाहौल स्पिती' म्हणजे हिमाचल प्रदेशमधील दुर्गम भागातील एक पर्यटनस्थळ. स्पितीचा अर्थ 'मध्यवर्ती भूभाग'. भारत आणि तिबेट सीमेवर वसलेला हा भाग. सीमा कसली, हा सारा परीसर म्हणजे हिमालयातील रौद्रभीषण सौंदर्याची परिसीमाच! या स्वप्नभूमीत येण्यासाठी दोन प्रवेशद्वारं आहेत. पहिलं म्हणजे मनाली-रोहतांग पास-कुंझुमपास मार्गे काझा तर दुसरं शिमला, रिकाँग पिओ, कल्पा नाकोमार्गे टाबो, काझा. आमची भटकंती शिमलामार्गे असल्याने आम्हाला ही दोन्ही प्रवेशद्वारं पाहता आली.
हा परीसर निवांत पहावयाचा झाला तर कमीत कमी ८-१० दिवस हाताशी असले
पाहिजेत. इथे जाण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे जुलै ते सप्टेंबरच्या
मध्यापर्यंत. मात्र हा परीसर निव्वळ 'पिकनिक' करणार्यांसाठी नाही, तर
निसर्गाचं रौद्र भीषण सौंदर्य बघणार्या आणि त्या निसर्गोत्सवाला कॅमेर्यात
टिपणार्या अस्सल भटक्या लोकांसाठीच आहे. दहा दिवसांच्या या भटकंतीत आम्हाला
निसर्गाची विविध रूपं बघायला मिळाली. हिमालयातल्या उंच हिमशिखरांच्या
संगतीत मानवाचा क्षूद्रपणा प्रकर्षानं जाणवला. इथल्या निसर्गाची
शुचिर्भूतता आपल्या मलीन, व्याधिग्रस्त मनाला टवटवीत करते. खरंतर हा हिमालय
नव्हे, तर एक मायावी जादूगार आहे. त्याच्या कुशीत येणार्यांना तो असंच
संमोहित करतो आणि इथे पुन्हा पुन्हा येण्यास भाग पाडतो. आपणही मग आपल्याच
नकळत नतमस्तक होऊन त्याच्याकडे पाहत हात जोडतो आणि परत भेटण्याचं मनोमन वचन
देतो.
(पूर्व प्रकाशितः "फ फोटोचा" दिवाळी अंक २०१४:
देवभूमी हिमाचल - लाहौल स्पिती:
याच भटकंतीतील हा पहिला भाग "स्पिती व्हॅली".
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
चला पुढच्या प्रवासाला.....
पुढिल भागः
२. "हिमभूल" — किन्नौर (हिमाचल प्रदेश)
(तटी: सध्या कामात चिक्कार व्यस्त असल्याने प्रतिसाद देण्यास/नविन भाग टाकण्यास थोडा उशीर होईल. तेंव्हा समजुन घ्यालच अशी आशा आहे. )
किन्नौर
हिमाचल प्रदेश्मधील पूर्वेकडील एक नितांत सुंदर जिल्हा. आधीच्या भागात
म्हटल्याप्रमाणे स्पिती खोर्यात जाण्याचे दोन मार्ग पहिला मनाली-रोहतांग
पास-कुंझुमपास मार्गे काझा तर दुसरा शिमलामार्गे किन्नौर जिल्ह्यातुन
रामपूर, रिकाँग पिओ, कल्पा नाकोमार्गे टाबो, काझा. आमचा प्रवास दोन्ही
मार्गाने झाला. किन्नौर जिल्ह्याचे मुख्यालय रिकाँग पिओ येथे आहे. "सतलज",
"बस्पा", "स्पिती" नदीच्या काठावर वसलेले रिकाँग पिओ, कल्पा, सांगला,
छितकुल हे येथील पर्यटनस्थळे. खरंतर संपूर्ण किनौर जिल्हाच पर्यटनासाठी
योग्य आहे. याच किन्नौर जिल्ह्यातील काही ठिकाणांची हि चित्रसफर. 
किन्नौर कैलाश
छितकुल गाव
शिमल्याहुन सांगला येथे जाताना

सतलज नदीच्या किनारी
सांगला व्हॅली
वाट वळणाची



Cherry on the Top 

मेरे नगपति! मेरे विशाल!
साकार, दिव्य, गौरव विराट,
पौरूष के पुन्जीभूत ज्वाल!
मेरी जननी के हिम-किरीट!
मेरे भारत के दिव्य भाल!
मेरे नगपति! मेरे विशाल!
युग-युग अजेय, निर्बन्ध, मुक्त,
युग-युग गर्वोन्नत, नित महान,
निस्सीम व्योम में तान रहा
युग से किस महिमा का वितान?
कैसी अखंड यह चिर-समाधि?
यतिवर! कैसा यह अमर ध्यान?
(कवी: रामधारी सिंह दिनकर)
छितकुल गाव
हिमाचल
प्रदेशमधील इंडो-चायना सीमेवरील व बस्पा नदीच्या तीरावर वसलेले नितांत
सुंदर गाव. सांगला पासुन साधारण २८-३० किमी अंतरावर असलेले आणि भारत चीन
सीमेवरील भारतातले शेवटचे गाव.
छितकुल गावाविषयी विकीवर अधिक माहिती इथे वाचा:
http://en.wikipedia.org/wiki/Chitkul
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
छितकुल गावातील एक मंदिर
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
छितकुल गावातील शाळा
प्रचि १९
प्रचि २०
किन्नौर कैलाश (कल्पा)
सांगलापासुन साधारण चाळीस एक किमी अंतरावर (शिमल्यापासुन २५० एक किमी
अंतरावर) "रिकाँग पिओ" हे "किन्नौर जिल्ह्याचे" मुख्यालय आहे. रिकाँग पिओ
गावात शिरल्यापासुनच तुम्हाला "किन्नौर कैलाशचे" दर्शन होऊ लागते. आमचा
मुक्काम येथुन पुढे साधारन ४-५ किमी अंतरावरील हिमालयातील अजुन एका सुंदर
गावात "कल्पा" मध्ये होता. कल्पातील हॉटेलच्या गॅलरीतुनच किन्नौर कैलाश आणि
रेंजचे अतिशय सुरेख दर्शन होत होते.
हिमालयातील ज्या काही परीक्रमा होतात त्यात "किन्नौर कैलाशाची" परीक्रमा
देखील आहे. येथील जवळपास ८० फुटाच्या शिळेला शिवलिंग मानुन त्याची अवघड अशी
परीक्रमा केली जाते.
किन्नौर कैलाशबद्दल अधिक माहिती इथे वाचा.
कन्नौर कैलाश माथ्याचा यु ट्युबवरचा व्हिडियो इथे पहा.
सांगलाहुन रिकाँग पिओ (कल्पा) येथे जाणारा रस्ता:
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
"कल्पा" गाव
प्रचि ०५
किन्नर कैलाशाचे दर्शन
प्रचि ०६
बाणाने दाखवलेला किन्नौर कैलाशवरील शिवलिंग
प्रचि ०७
किन्नौर कैलाश रेंजमधील निसर्ग
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
<
प्रचि १२
प्रचि १३
(पूर्वप्रकाशित)
World's Deadliest Road (कल्पा ते नाको प्रवास)
कल्पाहुन
स्पिती खो-यात जाणारा हा सगळा प्रवास Discovery Channel ने गौरविलेला
World Deadliest Road वरचा खडतर प्रवास होता. एका बाजुला रोंरावत जाणार्या
५०० ते १००० फुट खोल सतलज नदीचे पात्र तर दुसर्या बाजुला उंच डोंगर,
त्यातच कधी एखादी दरड कोसळुन तुमच्यासमोर येईल याचा नेम नाही. अर्थात
कोसळणार्या दरडीचा नेम चुकविण्यासाठी BRO (Border Road Organization)
तत्पर असतातच (या रस्त्यावर दरड कोसळण्याचे प्रकार नित्याचेच असतात..
त्यामुळे BROवाले JCB घेऊन सदैव सेवेसी तत्पर असतात.). कल्पा ते नाको हा
सारा प्रवासच एका वेगळ्या दुनियेतला वाटत होता. 
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
मातीच्या टेकाडावरील एक घर
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
दरड कोसळताना
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
चीन मधे उगम पावणार्या सतलज आणि हिमालयातील स्पिती नदीचा संगम
प्रचि १२
प्रचि १३
Spot the Road
प्रचि १४
Spot the Bus
प्रचि १५
थोडं झूम करून
प्रचि १६
प्रचि १७
नाको गाव
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
नाको गावातील एक तलाव
प्रचि २१
प्रचि २२
मॉनेस्ट्री
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
हिंदुस्तान तिबेट रस्ता म्हणजेच World Deadliest Road... अफलातून अनुभव होता.
काल्पा नंतर अंदाजे अर्धा तासाच्या अंतरावर 'रारंग' गावाच्या आसपास एक चेक पोस्ट आहे. तिथुन LAC (Line of Actual Control) सुरु होते. त्या चौकीवर Inner Line permit ची नोंद करुन आम्ही 'नाको' कडे निघालो. 'पुह' ते 'नाको' या SH-30 वरिल रस्त्यात ४५-९० अंशाच्या कोनातील वळणं आहेत. तर दुसर्या बाजूला ५०० ते १५०० फुट खोल सतलज नदीचे पात्र असते. 'नाको' पर्यंतचा चार-पाच तासांचा प्रवास केवळ थरार आहे. तो शब्दात व्यक्त करण कठीण.

हिमालयातील अजंठा "ताबो"
स्पितीच्या दक्षिणेस, स्पिती नदीच्या किनारी वसलेलं ताबो हे गाव काझापासून साधारण ४०-४५ किमी अंतरावर आहे. एक हजार वर्षं इतक्या पुरातन असलेल्या या मॉनेस्ट्रीचा शोध इ.स. ९९६ रोजी रिंगचेन जैंगपो (Rinchen Zangpo) याने लावला. ताबो मॉनेस्ट्री ही स्पिती खोर्यातील सगळ्यात मोठी मॉनेस्ट्री मानली जाते. तिबेटमधील थोलिंग मॉनेस्ट्रीनंतर बौद्धधर्मियांमध्ये ताबो मॉनेस्ट्रीला खूप महत्त्व आहे. येथे काही मॉनेस्ट्री या मातीच्या बनवलेल्या आहेत. कदाचित या भागात पाऊस कमी पडत असल्याने त्या अजूनही सुस्थितीत आहेत. येथील मठातल्या आणि अंजठात असलेल्या चित्रांमध्ये सारखेपणा आहे आणि यामुळेच याला 'हिमालयातील अजंठा' म्हणूनही ओळखलं जातं. याच मॉनेस्ट्रीसमोर डोंगरात काही नैसर्गिक गुंफाही आहेत.
आम्ही सकाळी गेलो तेंव्हा मॉनेस्ट्री बंद होत्या, पुढे काझाला जायचे असल्याने मॉनेस्ट्रीच्या आत असलेली चित्र पाहता आली नाही. मॉनेस्ट्रीच्या आतील चित्रांचे फोटो काढण्यास मनाई आहे.
प्रचि ०१
ताबो गाव
प्रचि ०२
प्रचि ०३
ताबो मॉनेस्ट्री
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
ॐ मणि पद्मे हूँ
प्रचि ११
Mani Stones
are stone plates, rocks and/or pebbles, inscribed with the six
syllabled mantra of Avalokiteshvara (Om mani padme hum, hence the name
"Mani stone"), as a form of prayer in Tibetan Buddhism. The term Mani
stone may also be used in a loose sense to refer to stones on which any
mantra or devotional designs (such as ashtamangala) are inscribed. Mani
stones are intentionally placed along the roadsides and rivers or placed
together to form mounds or cairns or sometimes long walls, as an
offering to spirits of place or genius loci.
"Om" it is blessed to help you achieve perfection in the practice of generosity,
"Ma" helps perfect the practice of pure ethics,
"Ni" helps achieve perfection in the practice of tolerance and patience.
"Päd", the fourth syllable, helps to achieve perfection of perseverance,
"Me" helps achieve perfection in the practice of concentration,
and the final sixth syllable
"Hum" helps achieve perfection in the practice of wisdom.
(info from Wiki)
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
कि आणि ढंकर मॉनेस्ट्री
कि मॉनेस्ट्री (also spelled Key, Ki, Kye or Kee):
काझापासून किब्बरकडे जाताना 'कि मॉनेस्ट्री' लागते. मॉनेस्ट्रीपासून पुढे
चालत थोड्या अंतरावर भगवान बुद्धाचे पितळेचे तीन मोठे पुतळे आहेत. कि
मॉनेस्ट्रीला प्राचीन इतिहास आहे. ११व्या शतकात Ge-lug-pa यांनी
मॉनेस्ट्रीचा पाया रचला. दरवर्षी ऑगस्टमधे हजारो भाविक येथील 'कलाचक्र'
उत्सवाला हजेरी लावतात.
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
ढंकर मॉनेस्ट्री (Dhankar):
ताबो-काझा हायवेपासून साधारण ७ किमी अंतरावर उजवीकडे सुमारे ३३७० मी.
उंचीवर १००० वर्षं जुनी ढंकर मॉनेस्ट्री आहे. या मॉनेस्ट्रीपर्यंत गाडीनं
जाता येतं. ढंकर मॉनेस्ट्रीमध्ये एक छोटेसं संग्रहालयही आहे. स्पिती
खोर्यातील बहुतेक मॉनेस्ट्री या बंदच असल्यान आतुन पाहता आल्या नाहीत आणि
बर्याचशा मॉनेस्ट्रीत आत फोटोग्राफीला बंदी होती. बर्याचशा मॉनेस्ट्रीत
डागडुगीची कामे सुरू होती. ढंकर मॉनेस्ट्रीच्या परीसरातही डागडुगीचं काम
सुरू होते.
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
मातीच्या मिसाईल्स 
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
भूसा भरून ठेवलेला हिमालयीन बोकड
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
(पुढील भागातः काझा, कौमिक, किब्बर, लांग्झा)
काझा, कौमिक, किब्बर, लांग्झा
काझा - स्पिती खोर्याचं मुख्यालय काझा येथे आहे. स्पिती नदीच्या किनार्यावर वसलेल्या या गावात आणि परिसरात बौध्द मठ आणि मंदिरं आहेत. चांगली हॉटेल्स, पेट्रोल पंप, होम स्टे आणि बाजार उपलब्ध असल्याने स्पिती खोर्यातील भटकंती करणारे बरेचसे पर्यटक इथेच थांबतात. ताबो, किब्बर, लांग्झा, पीन व्हॅली, कि मॉनेस्ट्री, काझा, कुंजुम पास ही येथील महत्वाची पर्यटनस्थळं.
काझा
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
जगातील सगळ्यात उंचावरील Petrol Pump
प्रचि ०७(फोटो साभारः मायबोलीकर इंद्रधनुष्य)
प्रचि ०८
प्रचि ०९
काझाच्या हॉटेल स्पिती सराय मधुन काढलेला एक फोटो.
प्रचि १०
किब्बर, कौमिक लांग्झा - किब्बर हे पक्क्या रस्त्याने जोडलं गेलेलं जगातील सर्वात उंचीवरील गाव आहे. लांग्झा गावात एका टेकडीवर बुद्धांचा पुतळा उभारला आहे. पांढर्या शुभ्र हिमनगाच्या धौलाधार पर्वंतरांगामध्ये आणि निळ्याभोर आकाशाच्या पार्श्वभूमीवर शांतीदूत बुद्धाचा पुतळा विलोभनीय दिसतो. इथली घरं तिबेटी शैलीतली असल्याने ही सगळीच गावं एकसारखी वाटतात.
किब्बर गाव
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
लांग्झा
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
कौमिक गाव
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
(पुढील भागाट हिमालयातील एक सुंदर व्हॅली "पीन व्हॅली")
पिन व्हॅली
पिन व्हॅली: काझा परीसरातील मला स्वतःला आवडलेले ठिकाण म्हणजेच पिन व्हॅली. हिमालयातील एक अतिशय सुंदर व्हॅली. कुंगरी ग्लेशिअरच्या कुशीतील मुढ या गावातुनच पुढे "भावा पास" हा साधारण ४०-४५ किमीचा ट्रेक सुरू होतो त्यामुळे येथे गिर्यारोहण करणारे नेहमी येत असतात. येथुनच पुढे सुरू होणार्या हिमाचलमधील नॅशनल पार्क मध्ये स्नो लेपर्ड, Ibex इ.प्राणी आढळतात.
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
काझा ते मनाली व्हाया कुंजुम पास
प्रचि ०१
परतीचा प्रवास
प्रचि ०२
प्रचि ०३
कुंजुम पास-
मनालीहुन येताना कुंझुम हे स्पितीचे प्रवेशद्वार मानले जाते. आम्ही
काझाहुन लोसर, कुंजुमपास मार्गे मनालीला निघालो. येथुन जाणा-या सर्व गाड्या
येथे असलेल्या कुंजुम देवीच्या मंदिराला प्रदक्षिणा घालुनच पुढच्या
प्रवासाला निघतात. कुंजुम पासहुन चंद्रा नदी आणि बर्फाच्छादित शिखराचे
विलोभनीय दृष्य दिसते. हा पास पार केल्यानंतर खोकसरहुन एक रस्ता हिमाचलमधील
एका सुंदर सरोवराकडे चंद्रतालकडे जातो.
प्रचि ०४
प्रचि ०५
कुंजुम देवी
प्रचि ०६
कुंजुमपासच्या पुढे चांद्रताल आणि बातल येथुन मनालीला जाणारा हा सारा परीसर शीत वाळवंट अर्थात कोल्ड डेझर्ट म्हणुन ओळखला जातो. हा सारा परीसर म्हणजे फोटोग्राफर्सना पर्वणीच. हिमाच्छादित शिखरे, खळाळत बेफाम वाहणारी चंद्रा नदी आणि तिच्या तीरातीराने, दगडधोंड्यातील आणि ग्लेशिअरच्या पाण्यातुन जाणारा रस्ता. इथुन पुढे ग्रांफूपर्यंतचा सारा प्रवास हा चंद्रा नदीच्या सोबतीनेच होतो. चंद्रा आणि भागा या दोन नद्या उत्तरेला सूरजतालजवळ बारालाच्याच्या खिंडीतून उगम पावतात. भागा पश्चिमेला पत्तन दरीत तर चंद्रा दक्षिणेला लाहौल दरीत उतरून बातल येथुन पश्चिमेला वळते. पुढे तंडी या गावी या एकमेकात समरस होताता आणि मग जन्म घेते ती "चंद्रभागा". हिच नदी पुढे कश्मिर आणि मग पाकिस्तानात "चिनाब" या नावाने ओळखली जाते.
चंद्रा नदी
प्रचि ०७
प्रचि ०८
चांद्रतालकडे जाणारा रस्ता (फक्त १४ किमी अंतरावर असलेलं स्वप्न भंगल
)
चंद्र ताल -
हिमलयातील सर्वात सुंदर तलावांपैकी एक चंद्रताल. खरंतर याचेच फोटो पाहुन
हि टूर आखली होती. पण Landslide झाल्याने खोकसरहुन तेथे जाणारा रस्ता बंद
असल्याने आम्ही एका नितांत सुंदर अनुभवाला मुकलो.
कदाचित पुन्हा जायला काहितरी निमित्त पाहिजे ना. 
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
मनाली - काझा रस्ता 
प्रचि १५
प्रचि १६
बर्फाच्या भिंती
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
विलोभनीय हिमशिखरे
प्रचि २३
प्रचि २४
पुन्हा एकदा चंद्रा नदी
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
धूssssssssssssम
प्रचि २९
प्रचि ३०
ग्लेशिअर वितळुन रस्त्यावर आलेले थंडगार पाणी 
प्रचि ३१
प्रचि ३२
प्रचि ३३
प्रचि ३४
प्रचि ३५
प्रचि ३६
प्रचि ३७
ग्लेशिअरचा प्रवाह
प्रचि ३८
ग्लेशिअरच्या पाण्यात अडकलेली गाडी
प्रचि ३९
प्रचि ४०
प्रचि ४१
(पुढील अंतिम भागात "मनमोहक मनाली, रोहतांग पास सहित
)
रोहतांग पास आणि मनाली (अंतिम भाग)
रोहतांग पास
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
बियास कुंड
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
मनमोहक मनाली
बियास नदी
प्रचि १५
वशिष्ठी ऋषी मंदिर/गरम पाण्याची कुंडे
प्रचि १६
हिडींबा मंदिर
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
घटोत्कच मंदिर
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
समाप्त
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.