Wednesday, July 12, 2023

मल्हारी मार्तंड (जेजुरी)

 https://www.maayboli.com/node/49709

मल्हारी देवा मल्हारी स्वार घोड्यावरती झाला
देवाचं ठाणं जेजुरी नांदे दक्खन मुलुखाला
दक्खन मुलुखाला देव आलाया वस्तीला
भीती नाही कळीकाळाची देव आधार भक्ताला

प्रचि ०१

जेजुरीचे मंदिर हा महाराष्ट्राच्या मंदिरवास्तुकला परंपरेच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. पुण्याजवळच्या जेजुरी ह्या सुमारे तीस मैलावरील गावी खंडोबाचे हे जागृत समजले जाणारे देवस्थान आहे. धनगर, कोळी व इतर अनेक लोकांचे हे आरध्यदैवत असून इ.स. १६०८ मध्ये या देवळाचे बांधकाम झाले. सभामंडप व इतर काम इ.स. १६३७ साली राघो मंबाजी या मराठा सरदाराने केले, तर सभोवारच्या ओवऱ्या व इतर वास्तू होळकरांनी बांधल्या. इ.स. १७४२ मध्ये होळकरांनी दगडी खांब बांधले आणि सभोवारच्या तटबंदीचे व तलावाचे काम इ.स. १७७० मध्ये पूर्ण झाले.

निसर्गाच्या सन्निध्यात नैसर्गिक रित्या वाढणाऱ्या वास्तूकलेचे जेजुरीचा खंडोबाचे देवालय हे उत्तम उदाहरण आहे. खंडोबा हे शिव, भैरव व सूर्य या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे व म्हणूनच खंडोबाचा उपास रविवार या सूर्याचे वारी करण्याचा प्रघात असावा. कडेपठारावर सुमारे तीनशे मीटर उंच डोंगरावर व पाच किलोमीटर अंतरावर मुख्य देऊळ आहे. किल्लाकोटा हे महत्त्वाचे स्थान खाली आहे.

गेल्या अनेक शतकात धनगर व इतर जमातींच्या भक्तांनी दगडी पायऱ्या, दीपमाळा, व कमानी उभारल्या आहेत. या सर्व बांधकामात मराठी वास्तुकला व निसर्गाशी समरसता दिसून येते. दीपमाळांचे अनेक प्रकार, कमानीवरील उत्तम भित्तिचित्रे व नक्षी हे पाहिल्यावर जेजुरीच्या गतवैभवाची थोडी कल्पना येते.
(विकिपिडियाहुन साभार - अधिक माहिती येथे वाचा.)

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६
फेट्यात तुरा मोत्याचा डुल बाशिंग सोन्याचं
रिकीबीत पाय तोड्याचा हाती पात तलवारीचं
मार्तंड दुष्ट संहारी.... दुष्ट संहारी
मल्हारी.....मल्हारी.......मल्हारी

प्रचि ०७

प्रचि ०८
देव भंडारी रंगला, देव यळकोटी दंगला
देवाचं ठाणं जेजुरी नांदे दक्खन मुलुखाला

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११
गड उंच उंच मंदीर नवलाख त्याला पायरी
हिथ मंडप चांदण्याचा साजिरी त्यात हि नगरी
तिर्थाची किर्ती नवखंड नवखंड नवखंड
मल्हारी.....मल्हारी.......मल्हारी

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

सदानंदाचा जय जय बोला, माझ्या देवाचं जय जय बोला
देवाचं ठाणं जेजुरी नांदे दक्खन मुलुखाला

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७
बाणुबाई म्हाळसा दोघी देवाच्या दोनी अंगाला
देवा खंडोबाकारणी होतीया गर्दी जत्रंला
नाचती वाघ्या अन् मुरळी...वाघ्या अन् मुरळी
मल्हारी.....मल्हारी.......मल्हारी

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१
घाटीची साथ दिमडीला देवरायाच्या दिमतीला
देवाचं ठाणं जेजुरी नांदे दक्खन मुलुखाला

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४
छत्रपती शिवाजी महाराज आणि शहाजीराजे यांची भेट

प्रचि २५

विषय

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

डोंगर भाऊ blog

 https://samantfort.blogspot.com/2022/06/offbeat-shangarh-pundrik-rishi-lake.html  ऑफ़बीट शानगड आणि पुंडरिक ऋषी सरोवर ट्रेक , हिमाचल प्रदेश (...