सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात गोकाकला जाण्याचा योग आला शेवटी. गेले दोन वर्षे मी फक्त घोकत होते जायचंय जायचंय म्हणुन, पण योग मात्र ह्या वर्षी होता.
बेळगाव-गोकाक रस्त्यावर सुगरण पक्षांची एक वसाहत लागली. बांधकाम अगदी जोरात सुरू होते....


गोकाकच्या अलीकडे गोडाचिनमल्की हा अजुन एक धबधबा लागला. रस्ता सांगणा-यांनी हा पण पहाच असा आग्रह केला म्हणुन येथे वळलो. आणि अक्षरक्षः अवाक झालो. मी आतापर्यंत असले मोठे धबधबे कधिच पाहिले नव्हते. माझे धबधबे म्हणजे घाटातले घबधबे.
गोडाचिनमल्की मार्कंडेय नदीवर आहे. सुरवातीला शांतपणे वाहणारी नदी अचानक सँडस्टोनच्या पाय-यांवरुन अल्लद उड्या मारायला लागते..


आणि एका मोठ्या खडकावरुन खाली झेपावते...



पुन्हा सारे कसे शां...त शां....त....

गोकाकला थोडी निराशा झाली. पाणि बरेच आटले होते. ह्याला भारताचा नायगारा म्हणतात असे बेळगावच्या वेब साइटवर वाचले होते. पाहुन फक्त कल्पना करावी लागली. पाणी दोन बाजुच्या कोप-यातच उरलेले होते.



हा घबधबा घटप्रभा नदीवर लागतो. (आंबोलीला हिरण्यकेशी नावाने जन्म घेणारी नदी कर्नाटकात घटप्रभा नावाने ओळखली जाते) कोप-यात १८ व्या शतकात उभारलेले भारतातील पहिले विज निर्माण केंद्र दिसतेय.
खाली उतरुन शांत वाहणारी घटप्रभा आणि तिच्या काठावर फुललेली संपन्नता.

दोन विडीओ शुट केलेले ते अपलोड करायचे राहुनच गेले....
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.