Friday, July 21, 2023

जालना, बुलढाणा

https://kunalstrek.blogspot.com/2021/12/bhokardhans-tukai-caves-chakrdhar-swami.html

भाग १

भोकरदन तुकाई लेणी व चक्रधर स्वामी मंदिर, चांडोळ मधील मंदिर, साकेगावच शिव मंदिर 

सध्या बिनकामाचा असल्यामुळे कुठे तरी आठवडाभर जाऊन येण्याचा विचार आला. म्हणून मग सागर सोबत बोललो आणि त्यांनी बुलढाणा, जालना जिल्ह्यातील प्राचीन मंदिर, मूर्ती, गडी आणि बारवची योजना केली. सगळी त्याचीच योजना मी फक्त जायचा काम केलं. दिवाळीनंतर १७ ते २१ नोव्हेंबर तारीख ठरवली. 

त्याप्रमाणे येण्याजाण्याची ट्रेनची तिकीट काढली. पण एसटीचा संप मिटला नव्हता मग काय करायचं. म्हणून मग सागरने औरंगाबाद मध्ये भाड्याने दुचाकी भेटतात त्याचा नंबर काढला, आणि आम्ही ५ दिवसासाठी औरंगाबाद ते औरंगाबाद असे २००० रुपये देऊन दिवसाला 120 कि.मीचा हिशोबाने दुचाकी (बाईक) घेतली. पण पहिल्याच दिवशी दुचाकीच्या बॅटरीला आलेल्या खराबी मुळे त्याचं धंद्याच नाव खराब होऊ नये म्हणून त्यांनी आमच्या सांगण्या नुसार जालनाल्या येऊन त्याची दुचाकी घेतली. 

आम्ही जाते वेळी औरंगाबाद आणि येते वेळी जालना वरुन तिकीट काढली होती. आमचा प्रवास मध्ये
पहिल्या दिवशी
भोकरदन मधील तुलाई लेणी, श्रीचक्रधर स्वामी मंदिर, चांडोळ मधील नृसिंह आणि खोल महादेव, तसेच साकेगाव येथील शिवमंदिर.
दुसर्‍या दिवशी
चिखली जवळील सतगाव-भुसरी येथील शिव मंदिर, तेथून धोत्रानंदाई येथील ३ प्राचीन मंदिर आणि बारव, आणि बीबी येथील गडी पाहून लोणार येथे मुक्काम.
तिसर्‍या दिवशी मेहकर येथील बालाजी, नृसिंह स्वामी मंदिर, नृसिंह मूर्ती भेटली ती गुहा आणि इतर दोन प्राचीन मुर्ती. पुन्हा लोणारला येऊन परडा येथील मल्लिकार्जुन शिव मंदिर आणि उसवद येथील व्यंकेश्वर महादेव मंदिर करुन पुन्हा लोणार मुक्कामी. 
चौथ्या दिवशी लोणार सरोवर आणि तेथील मंदिर, बारव पाहून सिंदखेडराजा मुक्कामी.
पाचव्या दिवशी देऊळगावराजा येथील बारव, गडी आणि सिंदखेडराजा येथील अवशेष पाहून दुपारी जालना साठी रवाना होऊन. जालना मधील दोन दरवाजे, मस्तगड, आणि एका मंदिरातील प्राचीन मुर्ती पाहून संध्याकाळी मुंबई साठी ट्रेन पकडली. अशी योजना सागर ने आखली होती. 

१६ नोव्हेंबरला आम्ही रात्री ९.३० ची मुंबई-सिकंदराबाद देवगिरी एक्सप्रेस पकडली, सकाळी ४.१५ ला आम्ही  औरंगाबादला पोहचलो. आम्हाला साडे पाच वाजता सिडको चौकातुन बाइक घ्यायची होती. मग तोवर आम्ही स्थानकात थांबून चहा-नाश्ता करुन, सिडकोला शेअर रिक्षाने ६० रुपयात पोहचलो. बाइक वाल्याचे पेपर वाचून आणि सही करून पेट्रोल भरून आम्ही ६.३० वाजता भोकरदन साठी प्रवास सुरू केला.

पहिला दिवस 

भोकरदन लेणी आणि चक्रधर स्वामी मंदिर 

आम्ही औरंगाबाद वरुन सिलोड मार्गे भोकरदनला पोहचलो. साधारणपणे  ८० कि.मी चा मार्ग आम्ही अडीच तासात थोडे थांबत चहा नाश्ता करत पोहचलो. भोकरदनच्या मुख्य रस्त्यापासून तुकाई लेणी/ गुहा २ कि.मी आत गावात आहे. लेणी नदीच्या शेजारी आहे आणि थोडी गावाचा बाहेरच आहे. लेणी मंदिराच्या पाठी मागेच आहे. आम्ही पहिला लेणी पहायला गेलो. 
 
भोकरदन / तुकाई लेणी
यावेळी पाऊस जास्त दिवस होता, त्यामुळे गुहेतील पाणी पुर्णपणे उतरले नव्हते. आम्ही पायर्‍या उतरून खाली गेलो. आमच्या पायाचे तळवे पूर्ण बुडलेले होते, त्यात शेवाळ ही झाले होते. त्यामुळे जपून पाय ठेवत आम्ही आत गेलो.
लेण्यांमध्ये मुख्य ७कक्षा आहेत. कक्षेच्या आत काही शिल्प दिसत नव्हती पण त्याचा बाहेरील आजूबाजूच्या कातळावर सुंदर शिल्प कोरलेले आहेत. प्रत्येक कक्षेच्या दारावर द्वारपाल सारखे, भंग झालेले शिल्प दिसतात. 
पण बहुतेक शिल्पांची झिज झाली आहेत, तर काही तुटली आहेत. त्यामुळे बरेच शिल्प ओळखता येत नाहीत. पण एक मोठा शेषशाहीचा विष्णूचा भंगलेला शिल्प ओळखता येते.पण त्या समोरील भिंतीवरील तीन मोठे कातळ शिल्प आम्हाला नीट ओळखता नाही आले. लेणी/ गुहेची आणि मंदिराच्या फोटो शेवटी ठेवले आहे.
 
 चक्रधर स्वामी मंदिर
लेणी बघून आम्ही चक्रधर स्वामी मंदिर बघायला गेलो. मंदिराचा अर्धा/पायथाचा भाग प्राचीन दिसतो, त्याचावर नवीन बांधकाम केलेले दिसते. मंदिराच्या आतील गाभाऱ्याचे खांब प्राचीन आहेत त्यावर रामायणाचे, भीमाच, महिषारसुर्मार्दिनीचे आणि काही युद्धाची शिल्प आहेत. मंदिराच्या मुख्य मूर्ती जागी चक्रधर स्वामी पंतांच्या लोकांची शीला रुपी मूर्ती आहेत. नेहमी सारखे मंदिर बाहेर खांबाचे आणि इतर मंदिराचे अवशेष दिसले. मंदिर बघून आम्ही चांडोळ साठी निघालो. 


चांडोळचा नृसिंह मंदिर आणि खोल महादेव

भोकरदन ते चांडोल, म्हसळा मार्गे ३५ कि.मी आहे. आम्ही एका तासात पोहचलो. आमची दुचाकी खराब झाल्यामुळे आमचा १ तास भोकरदनलाच वाया गेला. त्यामुळे चांडोलला पोहोचायला आम्हाला दुपार झाली.

चांडोलला नृसिंह मंदिर आणि खोल महादेव हि दोन मुख्य प्राचीन मंदिर आजूबाजूलाच आहेत.त्यामुळे गावाने त्या पूर्ण परिसराला भिंतीचा कुंपण केला आहे. त्याव्यतिरिक्त अजून एक छोट महादेवाचे मंदिर हि गावात आहे. आम्ही गावात विचारत विचारत नृसिंह मंदिर/खोल महादेव मंदिराजवळ पोहचलो.

नृसिंह मंदिर
नृसिंह मंदिर गाभाऱ्यात कोरीव आणि रेखीव शिल्प बघायला मिळत नाही. पण मंदिर परिसरात आढळणाऱ्या खांबाच्या अवशेष वरून, कदाचित नृसिंह किंवा खोल मंदिराच्या खांबाचे ते अवशेष असावे असे वाटते. नृसिंह मंदिरात प्रवेश केल्यावर, आपल्याला समोर मुख्य गर्भगृहात नृसिंहची सध्याचा काळातील मूर्ती दिसते. मध्य गाभाऱ्यात उभे राहिले असता उजवीकडे आणि डावीकडे पण गर्भगृह आहेत. त्यात डावीकडील गर्भगृहात शिवाची पिंड होती तर उजवीकडील रिकामी होते. मंदिराच्या मुख्य दाराच्या उजव्याबाजुला एका दगडावर विशेष करुन ९ आडव्या आणि ५ उभ्या ओळीत वेग वेगळ देवाच्या मूर्त्या दिसतात, त्यातील पाचवी ओळ मध्ये खाली १३ शिवाची पिंड दिसतात. पण गावकऱ्याने त्याला रंग मारल्यामुळे त्यातील काही देवता ओळखता येत नव्हत्या. (त्याचे फोटो चांडोळ च्या फोटो मध्ये दिला आहे.) आणि दरवाज्याचा डाव्याबाजूला एक देवाचं शिल्प दिसते, झीज झाल्यामुळे स्पष्ट दिसत नव्हते. बहुतेक शिवाचे असावे.

नृसिंह मंदिराला चिटकूनच बाजूला उजवीकडे विठ्ठल रखूमाईचा नवीन बांधलेले मंदिर आहे. त्यात प्राचीन मुर्ती किंवा काही अवशेष आम्हाला दिसले नाही. नृसिंह मंदिराचा समोर बाहेर झाडाखाली १ चांगली तर २ भंग अवस्थेत जैन मूर्ती आहे. तसेच काही खांबचे अवशेष हि आहेत.
 
खोल महादेव मंदिर
तिथून आम्ही बाजूचा खोल महादेव मंदिर बघायाला गेलो. खोल महादेव मंदिर लहान आहे. मंदिरातील शिवाची पिंडाचे दर्शन घेण्यासाठी, आत खाली काही पायर्‍या उतरून जायला लागते. बहुतेक म्हणुनच वाटत खोल महादेव मंदिर बोलतात.मंदिराच्या वरील अर्ध काम विटांचे सध्याचा काळातील केलेले दिसते. मंदिराच्या समोर प्राचीन भंग झालेला नंदी आणि समोरील परिसरात एका मंदिराचा अवशेषावर २ कामशिल्प (हे दोन शिल्प बहुतेक मंदिराचा बाहेरील असलेल्या अर्ध्या भिंतीवरील भाग वाटतो) आणि काही मंदिराचे अवशेष दिसतात. आम्हाला तेथील तरुण गावकऱ्याने सांगितले अजून एक असंच प्राचीन मंदिर गावातच आहे. म्हणून आम्ही ते बघायला गेलो. 
 
अजून एक प्राचीन शिव मंदिर (गडीच महादेव मंदिर)
बाईकमुळे आम्ही गल्लीतून विचारत तेथे दोन मिनटात पोहचलो. तरी पण हे मंदिर एका घराच्या पाठी होते, त्यामुळे आम्हाला एका गावकऱ्याने सोबत येऊन दाखवले. मंदिर शिवाचं होत. मंदिर पाषाण बांधणीतील दिसत होते. कळसाच काम नव्याने विटाने बांधलेले आहे. मंदिराचा गर्भगृहाच्या दरवाजाची चौकट नेहमीच्या प्राचीन मंदिरा सारखे सुरेख होती. मंदिराच्या बाहेर भंगलेली गणेश मूर्ती आणि नंदी, आणि एक झीज झालेली मूर्ती होती. मंदिराच्या मुख्य बांधकाम व्यतिरिक मंदिराच्या भोवती चिखली भिंतीचे मंडपाचे काम असावे, असे तिथे पाहता क्षणी वाटते. बाकी मंदिराच्या समोर मोकळ्या जागेत, एक छोट पत्र्याचा छपराचे मंदिर आहे. त्यात एक रंग मारलेली वीरगळ आणि काही अन्य देव दिसतात. रंग मारल्यामुळे वीरगळ प्राचीन आहे का नवीन कळत नव्हते. बाकी अजून काही अवशेष दिसत नाही. मंदिर पाहून येताना गल्ली मध्ये त्याकाळातील दगडी घर दिसतात तर काहींचे अवशेष दिसतात. तर काही आता त्यावर सुधारून नवीन बांधताना दिसतात. अजून काही वर्षात बहुतेक नष्ट होतील. 

साकेगावच शिव मंदिर

चांडोळ गावातील मंदिर बघून आम्ही चिखली साठी निघालो. चिखलीला जाताना वाटेत आम्हाला साकेगाव मधील प्राचीन शिव मंदिर बघायचा होता. साकेगाव पासून चिखली पुढे चार किमी आहे. त्यासाठी आम्ही चांडोळ वरून रुईखेड मार्गे चिखलीला गेलो, साधारण ३१ किमी अंतर होते. तसेच चांडोळ ते रुईखेड रस्ता बऱ्यापैकी कच्चा होता, पण आम्हाला गावातले म्हणाले हा रस्त्याने लवकर पोहचाल. म्हणून आम्ही तिथून गेलो. अंदाजे साडे तीन वाजता, आम्ही चांडोळ वरुन निघालो. साकेगाव मंदिरापर्यंत पोहचेपर्यंत आम्हाला साडे चार वाजले.

मंदिर परिसरात गेलो ना गेलो तिथे देखभाल करणाऱ्या ताई घरी जाता जाता, आमच्या बॅग बघून बोलल्या मोठ्या कॅमेर्‍या (dslr) ने फोटो काढू नका मोबाईलने काढा. त्या ताई मंदिराच्या परिसरातून बाहेर जाताना, दृष्टी आड होई पर्यंत आम्ही कॅमेरा काढतो का बघत होत्या. त्या काय परत आल्या नाही, पण मग आम्ही पण उगाच बघितल तर चार शब्द ऐकायला नको म्हणून कॅमेरा काढला नाही. आधीच ऐकूनच हिरमोड झाला होता. मग काय नुसता बॅग ठेवुन मंदिर बघत होतो. 
 
मंदिर सुस्थितीत दिसत होता. आत मध्ये काळोख होता. बहुतेक आत मध्ये वीज नव्हती. मंदिर शिवाच आहे. गर्भ गाभाऱ्यात शिवलिंग होते, तिथे लावलेल्या दिव्या मुळे थोडा काही प्रकाश होता. 
मंदिराच्या गाभाऱ्यात एक मूर्ती होती पण थोडी झीज झालेली दिसत होती. इतर मंदिरात काळोख असल्यामुळे जास्त शिल्प दिसत नव्हती बहुतेक नव्हतीच. गाभाऱ्याच असलेल्या खांबाच्या पायथ्यावर देवाची शिल्प दिसत होती. बाकी मंदिराच्या बाहेर समोर छोटा शिलालेख असलेली एक गध्देगळ आहे. तिथेच एक सिंह ही ठेवला आहे. 
मंदिराच्या डाव्या बाजुला एक छोट दगडाच साध मंदिर आहे. मंदिर रिकामी होते. 
मुख्य मंदिराचा बाहेरील भिंती वर तसेच कळसावर उत्तम कलाकृती दिसतात. आपल्याला नृत्य शंकर, महिषासुरमर्दिनी आणि कळसावरील भागा जवळ सुंदर शिल्प दिसतात. जातेवेळी शेवटी एका कोपर्‍यातून पूर्ण मंदिराचा एक dslr ने फोटो काढला. आणि मग आम्ही चिखली साठी मुक्कामाला निघालो. 
 
मुक्काम 
चिखली मध्ये ७०० रुपये मध्ये एक चांगला लॉज (शारदा गेस्ट हाऊस) भेटला. तसे इथे खूपच कमी लॉज आहेत. तरी त्यामानाने हा लॉज चांगला होता. 
 
चिखली वरुन आमचा दुसर्‍या दिवशी सकाळी सतगाव-भुसरी येथील प्राचीन शिव मंदिर आणि बारव. नंतर तेथून धोत्रानंदाई येथील ३ प्राचीन मंदिर आणि बारव पाहून, बीबी येथील गडी पाहून लोणार येथे मुक्काम होता. 
 
त्याबद्दल मी सविस्तर दुसर्‍या भागात लिहलं आहे
 
भोकरदन /तुकाई लेणीचे फोटो, भोकरदन
 
 
चक्रधर स्वामी मंदिर, भोकरदन

नृसिंह मंदिर, चांडोळ

खोल महादेव मंदिर, चांडोळ

चांडोळ गावात अजून एक महादेवाचा मंदिर ह्याला (गडीच महादेव मंदिर बोलतात) आहे आणि त्याचा समोर एक पत्र्याचं छोटं मंदिर आहे. त्यात एक विरगळ दिसते, पण तीला रंग मारल्यामुळे ती प्राचीन आहे का नवीन कळत नव्हतं 




गावात अशी काही जुनी घर दिसतात.


सकवार गावातील शिवमंदिर, उजवीकडे कोपऱ्यात लेख असलेली गद्धेगळ

सतगाव- भुसरी मधील प्राचीन विष्णू-शिव मंदिर, 

आम्ही सकाळी ७.३० वाजता नाश्ता करुन सतगाव- भुसरी मधील प्राचीन विष्णू-शिव मंदिर पहायला गेलो. चिखली पासून फक्त १० कि.मी वर असल्यामुळे आम्ही १५ मिनटात पोहचलो. चिखलीवरुन बुलढाणा महामार्गावरील हातनी गावातून आत २ कि.मी वर सतगाव-भुसरी गाव आहे. मंदिर रस्त्यावरुन डाव्या बाजूला थोडं खाली दिसते. त्यामुळे बाइक वर रस्त्यालाच
लाऊन मंदिरात गेलो. 


मंदिर १२\१३व्या शतकातील असावीत. मुख्य मंदिर विष्णुचा आहे, त्याचा बाजूलाच/पाठी शिवाच मंदिर आहे. त्या व्यतिरिक्त अजुन एक लहान मंदिर आहे. पण आम्ही पूर्ण मंदिर परिसर फिरून पहिला, आम्हाला त्या बागे मध्ये अजून तीन चौथर्‍याचे अवशेष दिसले. आणि त्या मंदिर परिसराच्या कुंपणाच्या बाहेर एक गणपतीच लहान मंदिर, हे मंदिर नवीन वाटते पण त्याची दरवाजाची लहान चौकट प्राचीन दिसते. असे मिळून एकूण सात मंदिर त्यावेळी असावेत.

मुख्य मंदिरातील मूर्ती विष्णूची होती हे त्याचा वाहन गरुड वरुन कळते. मुख्य मूर्तीचे फक्त पायाचे तळवे बाकी आहेत बाकी पूर्ण मुर्ती खंड होऊन नाहीशी
झाली आहे. मंदिराचा आतील खांबावर, कळसावर सुंदर शिल्प दिसतात. मंदिरात अजून काही शिल्प अशीच खाली उभी करून ठेवलेली दिसतात. मंदिराच्या बाहेरील भिंतीवर नृत्य आणि काही काम शिल्प ही दिसतात. 

विष्णु मंदिर पाहून आम्ही त्याचा पाठी किंवा बाजूलाच असलेले शिव मंदिर पाहिले. शिव मंदिरात शिवाची पिंड आहे. गावातील काही लोकं नित्य नेहमी पूजा करत असावी, कारण आम्ही गेलो तेव्हा फुल आणि अगरबत्ती लावून पूजा केलेली दिसत होती.  मंदिराच्या दरवाजाच्या चौकटीच्या ललाटीवर सप्त/अष्ट मातृका पट दिसतो. 
मंदिराच्या बाहेरील भिंती किंवा आत अजून काही शिल्प दिसत नाही. एके ठिकाणी मंदिराच्या चौथरा (जागृती) ला एक शिल्पाचा पट लावलेला दिसतो. 

शिव मंदिर बघून आम्ही विष्णु मंदिरच्या बाजूला असलेले लहान मंदिर पाहिले. ह्या मंदिरात काही शिल्प गोळा करून ठेवली होती. ह्या मंदिराचे पुढील खांब आणि दरवाजाची चौकट असा पुढील भाग व्यवस्थित होता. पण बाकी मंदिराचा भाग आणि छप्पर नव्याने दगड रचून आणि (छप्पर) सीमेंट ने केलेला दिसतो.

मंदिराच्या आवारात एक घोडेस्वार वध करताना मुर्ती आहे. तसेच अजून दोन खंड पावलेल्या मुर्ती दिसतात पण फक्त पायाचा भाग असल्यामुळे नीट ओळखता येत नाही. बाकी मंदिर परिसरात मंदिराच्या कळसाचे, खांबाचे असे बरेच अवशेष दिसतात.

तसेच वर सांगितल्याप्रमाणे, मंदिराच्या कुंपणाच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर डावीकडे गणपतीचा छोट मंदिर आहे. 

धोत्रानंदाई मधील तीन मंदिर आणि बारव 
मंदिर बघून आम्ही पुन्हा चिखलीला आमच्या लॉज मधून सामान घेऊन धोत्रानंदाई साठी निघालो. चिखली ते धोत्रानंदाई अंतर ३४ कि.मी आहे. महामार्गावरून गाव आत दीड ते दोन कि.मी आत आहे. 
इथे आम्हाला तीन प्राचीन शिव मंदिर आणि एक बाराव पहायची होती.

गावात पोहोचल्यावर मारुती मंदिरा कडून एक रस्ता सरळ जातो आणि एक उजवीकडे. मारुती मंदिराच्या थोडं पुढे/बाजूस सरळ रस्त्याला प्राचीन शिव मंदिर आहे. (आम्ही हे मंदिर शेवटी पाहिलं म्हणून मी ह्याला तिसरे मंदीर म्हणालो आहे.).  आम्ही उजवीकडच्या रस्त्याला वळलो आणि पहिला तिकडचा शिव मंदिर बघून घेतलं. उजवीकडे वळल्यावर लगेच २ मिनटात आम्ही मंदिराजवळ पोहचलो.

मंदिर परिसराला कुंपण केला आहे. मंदिराच्या आत आणि बाहेरील भिंतीवर कुठेही शिल्प दिसत नाही. मंदिराचा गर्भ गाभाऱ्याला फक्त छप्पर आहे. ते ही सीमेंट चे केलेले आहे. बाकी मंदिराचे फक्त खांबच दिसतात.
मंदिराच्या उजव्या बाजूला एक मोठा सुकलेल कुंड सारखी जागा दिसते. त्याकाळी बहुतेक पाणी साठवत असावे किंवा काही वेगळा असावे. तेथेच एक दगडाच राजन ही आहे.

मंदिर बघून आम्ही तिसरा मंदिर आणि बारव आधी बघायाला गेलो. तिसरं मंदिर जरा गावाच्या बाहेरच आहे. अंदाजे अर्धा किलोमीटर. बाइकमुळे आम्ही लगेच पोहचलो. मंदिर शेत जमिनीत आहे पण रस्त्याचा बाजूलाच आहे.त्यामुळे लगेच दिसते. मंदिराच्या सुरक्षेसाठी कुंपण केला आहे. मंदिरात शिवाची पिंड आहे. मंदिराच्या आत बाहेर शिल्प दिसत नाही. पण मंदिरावरील नक्षी सुंदर आहेत. 
बारव: मंदिराच्या थोडं पुढे रस्त्याने २ ते ४ मिनिटे चालत गेल्यावर डावीकडे बारव आहे. ही बारव नर्सरी बाजूला आहे. बारवच्या बाजूला काही बांधकाम केलेलं आहे. बारव मध्ये थोडं पाणी होतं पण अस्वच्छ होतं. 
बारव मोडकळीस आलेली आहे. बारवच्या एका बाजूच्या पायर्‍यांवर काही तांदळा स्वरूपातील शेंदूर लावलेले देव आहेत. बहुतेक गावातील लोक त्याला देवी मानतात. 
बारव बघून आम्ही तिसरा मंदिर बघायाला पुन्हा गावात
गेलो. 

तिसर मंदिर: हि सुंदर आहे, ह्या मंदिराच्या बाहेरील भिंतीवर शिल्प नाहीत. तसेच मंदिरात आत हि कुठे शिल्प दिसत नाही. पण विशेष करुन मंदिराच्या गर्भ गृहाच्या दरवाजाच्या चौकटीच्या ललाटवर (माथ्यावर) नऊ चेहरे आहेत. ते पाहून खुप नवल वाटल, त्याचा अर्थ नक्की काय कळलं नाही. मंदिर परिसरात काही अवशेष दिसतात. एके ठिकाणी बहुतेक तुटलेल्या खांबाचा 
अवशेष आहे, त्यावर कुबेर आणि स्त्रियांचे शिल्प आहे.

मंदिराच्या बाजुला मारुतीच्या मंदिराच्या बाहेर खाली ७ मुर्ती ठेवलेल्या आहेत. बर्‍यापैकी मूर्तीं खंडित आणि झिज झाली आहे. निट जपवणूक नाही केल्या तर कदाचित काही वर्षात नष्ट होतील किंवा पूर्णपणे झिज होऊन ओळखता हि येणार नाही. कारण आताच  मुर्ती ओळखता येत नाही आहेत. त्यात काली माता, उमामहेश, कालभैरव मुर्ती खंड होऊन सुद्धा ओळखता येतात. पण बाकी मुर्ती ओळखता येत नाही.


बीबीची गडी
मंदिर पाहून आम्ही बीबी ची गडी पाहण्यासाठी निघालो.  धोत्रानंदाई ते बीबी अंतर ३० कि.मी आहे. साधारण आम्हाला १ तास लागला. 


आम्ही दुपारी पोहचलो. 
बाइक असल्यामुळे आम्ही गल्लीतून थेट गडीच्या दरवाजा जवळ पोहचलो. आम्ही ज्या गल्लीतून रस्त्याने आलो त्या बाजूनेच फक्त २ बुरुज आणि गडीची तटबंदी मजबूत दिसली. ह्या तटबंदी आणि बुरुजाच्या बाजूला थोडं मध्य भागी घराची वास्तू आहे. इतर बाजूने तटबंदी दिसत नाही. गडीचा दरवाजा वैगेरे काही दिसत नाही. पायर्‍या हि तुटलेल्या आहेत. पण पायर्‍याने चढते वेळी नीट पाहिले असता, एके ठिकाणी दरवाजाच्या चौकटीचा /सारखा पायथ्याच्या भाग दिसतो. त्यावरून अंदाज लावता येतो. 
पायर्‍या चढून वर गेलो असता, समोर आपल्याला घर दिसतो. घराचा चौथरा दगडाचा आणि त्यावर जुन्या बारीक विटांच काम आहे. त्या घरात एक व्यक्ति राहतात. त्यांना विचारले असता ते बाजूच्या खोली मधील भुयार दाखवतात. हा भुयार सिंदखेडराजाला निघतो असा आम्हाला गावाची मुले सांगत होती. पण त्या घरातील व्यक्तीं ने सांगितले, खाली फक्त खोली आहे. 

त्यांचा घराची खोली सोडली असता बाकी डावीकडच्या दोन्ही खोल्या बिना छत असल्यामुळे आत मध्ये गवत झाले होते. त्या दोन खोली मध्ये एक दरवाजा आहे, त्या दरवाजा जवळ भुयार आहे. पण आम्ही गेलो होतो तेव्हा गवत खूप होतं आणि त्यांनी भुयार साफ केला नव्हते. त्यामुळे त्यांनी आम्हाला दाखवले नाही त्यात त्यांची तब्येत पण खराब असल्यामुळे खाटे वर पडूनच बोलत होते.

मग आम्ही त्या घराच्या आजूबाजूस फिरलो. बाकी काही अवशेष दिसले नाही. गडीच्या आजूबाजूला दाट वस्ती झाली आहे. त्यामुळे अजून काही अवशेष असतील तर कदाचित नष्ट झाले असावेत. पण ती गडी तेवढीच लहान असावी. कारण मघाशी सांगितल्याप्रमाणे फक्त एका बाजूचे बुरुज आणि तटबंदी व्यवस्थित दिसत होती, इतर बाजूचे फक्त ढासळलेली तटबंदी दिसत होती. जी तटबंदी आणि बुरुज व्यवस्थित होती, त्याचा वरती बहुतेक वीट किंवा चिखलाची भिंत असावी. ती नष्ट होऊन पूर्ण माती चा ढीग झाला होता. त्यात गवतामुळे निट दिसत नव्हती.

बाकी गावात गडी व्यतिरिक्त काही विशेष नाही वाटले. मुलानी आम्हाला गावातील मस्जिद बघायाला सांगितले. पण आम्ही त्यांना विचारलं अशीच जुनी आहे का?. फक्त जुनी आहे बोलले, म्हणून आम्ही तिथे न जाता लोणारला
मुक्कामी गेलो. 

तासाभरात आम्ही लोणारला पोहचलो. 
लोणारला आम्हाला लॉज शोधायला बराच वेळ गेला. एवढ प्रसिद्ध ठिकाण आहे, पण मोजून ५\६ हॉटेल असतील. त्यात एक विक्रांत हॉटेल ४\५ स्टार होतं. बाकी म्हणजे २ स्टार पण नव्हते. 

आमचे दोन तास तर त्यातच गेले. मग शेवटी श्रीकृष्णा लॉज मध्ये दिवसाला ५०० रुपये भाड्याने रूम घेतली.
हॉटेल तसं  ठीक ठाक होत. त्यात ८०० रुपये वाली खोली चांगल्या होत्या. पण आम्ही जरा स्वस्त वालीच घेतली. 
आम्ही लोणारला दोन दिवस मुक्काम केला. पहिल्या दिवशी मेहकर, परड आणि उस्वाद केला आणि दुसर्‍या दिवशी लोणार पाहून संध्याकाळी सिंदखेडराजा मुक्कामी गेलो. ह्या बद्दल मी तिसर्‍या दिवशीच्या, तिसऱ्या  भागात लिहले आहे.
सतगाव भुसरी येथील शिव आणि विष्णू मंदिर समूह येथील विष्णू मंदिर 


सतगाव भुसरी येथील शिव आणि विष्णू मंदिर समूह 
सतगाव भुसरी येथील शिव आणि विष्णू मंदिर समूह येथील समूहाच्या बाहेर असलेलं गणपतीचे मंदिर

सतगाव भुसरी येथील शिव आणि विष्णू मंदिर समूह 
सतगाव भुसरी येथील शिव आणि विष्णू मंदिर समूह येथील शिवाचे मंदिर (विष्णू ,मंदिराच्या  बाजूला अथवा पाठीच  लागून आहे.)


धोत्रे नंदाई येथील मारुतीच्या मंदिरा बाजूला असलेले शिव मंदिर 

शिव मंदिर  

धोत्रे नंदाई येथील  गावाच्या थोडे बाहेर शेतात असलेलं मंदिर, ह्याचा पुढे २/ ४ मिनटं  चालत गेल्यावर बारव आहे. 

धोत्रे नंदाई येथील  गावाच्या थोडे बाहेर शेतात असलेलं मंदिर
धोत्रे नंदाई येथील बारव 
धोत्रे नंदाई येथे मारुतीच्या मंदिराच्या बाहेर पायऱ्यांचा बाजूला ह्या मूर्ती ठेवलेल्या आहेत.



धोत्रे नंदाई येथील शिवाचे अजून एक मंदिर, आम्ही पहिले हे मंदिर पाहिले. 

बीबीची गडी 

बीबीची गडी 

बीबीची गडीच्या पायऱ्या 

बीबीची गडी ची बाहेरून दिसणारा बुरुज आणि तटबंदी. 

बीबीची गडीच्या बाजूला फिरले असता, अशी जुनी वास्तू दिसतात. 

बीबीची गडी 

बीबीची गडी बुरुज

मेहकर येथील प्राचीन मूर्ती,  परडा  येथील मालिकार्जून शिव मंदिर आणि उस्वाद येथील शिव मंदिर. 

सतगाव-भुसरी येथील मंदिर, बीबी ची गडी पाहून आम्ही लोणार ला मुक्कामी आलो. 

मेहकर 
भटकंतीचा आज तिसरा दिवस, आज आम्ही मेहकर येथील बालाजी मंदिर, मठ, नृसिंह मुर्ती पाहून, मालिपेठ येथील अजून दोन प्राचीन मुर्ती पहिल्या, आणी नृसिंह मुर्ती जिथे ठेवली होती ती गुहा हि पहिली. ते पाहून आम्ही दुपारी परडा आणि उस्वाद येथील शिव मंदिर पाहिले. 
सकाळी साडेसात ला आम्ही मेहकर साठी निघालो. 
लोणार ते मेहकर अंतर २१ कि.मी आहे. त्यामुळे आम्ही लोणार ला नाश्ता करुन निघालो. मेहकर ला पोहोचायला आम्हाला पाउण तास लागला.

मेहकरला आम्ही पहिले बालाजी मंदिर पहायला गेलो. 
मंदिर शंभर वर्षे जुन असावे. पण मंदिरातील विष्णु ची मुर्ती बाराव्या शतकातील आहे. मंदिरात फोटो काढून देतात. अगदी मूर्तीचा सुधा. मूर्तीला बालाजी का म्हणतात माहित नाही पण मुर्ती विष्णुची आहे. साधारण ११ फुट उंच आहे. मूर्ती कार्तिकी पौर्णिमा निमित्ताने पूर्ण फुल हाराने सजली होती. पण मूर्तीच्या बाजुच्या प्रभावळीवर विष्णुचे दश अवतार दिसत होते.  विष्णु च्या डाव्या पायाजवळ लक्ष्मी मातेची मुर्ती आहे.
मुर्ती बद्दल गावातले सांगतात, मुर्ती ई स वीसन अठराशे मध्ये मंदिर परिसरात एका सागाच्या पेटीत, चंदनाच्या भुस्या मध्ये ठेवलेली सापडली. त्या सोबत ताम्रपट होता. पण ताम्रपट ब्रिटिश सरकारने नेले. मुर्ती ही नेणार होते पण गावातल्या लोकांनी लगेचच त्या जागी मंदिर उभारून तिची पूजा अर्चना सुरू केली. त्यामुळे ब्रिटिश सरकारने मूर्तीला हाथ लावला नाही. बाकी मुर्ती बद्दल वर्णन मंदिरात फलक लावला आहे, त्याचा मी फोटो लावला आहे. 
मंदिराच्या गर्भ गाभार्‍या वर वेद मधील श्लोक लावला आहे. त्यात प्रणिती नदीचा उल्लेख आहे, त्यावरून मेहकर प्राचीन आहे असे म्हणतात.

मंदिर परिसरात अजून ही काही मंदिर आहेत. बालाजी मंदिराचा समोर (बाहेर) गरुड च मंदिर आहे. मुर्ती च्या पाठी आरसा आहे, त्यात पाहिला असता बालाजी मुर्ती दिसते.
गरुड मंदिराच्या बाजूला, डावीकडे शिवाच मंदिर आणि उजवीकडे मारूतीचे मंदिर आहे. तिन्ही मंदिर लहानच आणि नवीनच आहेत. पण शिव मंदिराचे खांब फक्त प्राचीन आहेत. बालाजी मंदिराच्या समोर खाली प्रणिती/पैनगंगा नंदी दिसते, पण लोकांनी तिचा नाला केलेला दिसत होता. 
मंदिराच्या पाठी ( मंदिर परिसरात) ही तीन मंदिर आहे, भवानी माता, कार्तिक आणि केशव. त्यातील उजवीकडचे केशवराज मंदिर मधील मुर्ती प्राचीन आहे. मुर्ती दोन फुट उंच असावी.  ही मुर्ती जेथे आहे त्याच ठिकाणी बालाजीची-श्री शारंगधर मुर्ती आणि केशवराजची मुर्ती सोबत सापडली. केशवराज मूर्तीच्या प्रभावळीवर हि विष्णु दशावतार आहेत.
मंदिर परिसराच्या दरवाजावर (गेट) ही प्राचीन अवशेष दिसतात. तसेच मंदिराच्या दरवाजाच्या (गेट) च्या बाजूला आपल्याला रस्त्याला एक बुरुज आणि थोडी तटबंदी दिसते. 
मंदिर बघून आम्ही मठ बघायाला गेलो. मंदिराच्या इथून आम्ही सरळ रस्त्याने खाली गेलो असता, आपल्याला दरवाजा (गडीचा दरवाजा सारखा) लागतो.
दरवाजातून पुढे आलो असता, डावीकडे मठ लागतो. मठाला दगडी बांधकामाची भिंत आहे, त्यामुळे बाहेरून लगेच दिसत नाही. मठा मध्ये आत नक्षीदार दगडी खांबाचा मंडप आहे.  समोर चौरसाकृती सुकलेले कुंड दिसते. मठ बघून आम्ही नृसिंह मंदिर बघायाला गेलो.

नृसिंह मंदिर
मेहकर मध्ये खूपच गल्लीतून फिरायला लागते. त्यामुळे गुगल नक्षा पेक्षा ही माणसांनाच विचारायला लागते. 
आणि लगेच कळत नाही. विचारत विचारत आम्ही मंदिराजवळ पोहोचलो. 

नृसिंह मुर्ती मेहकर जवळील माळीपेठ/मळीपेठ रोड येथे भुयारात मिळाली. पण सागरने मला सांगितले, प्राचीन काळात नृसिंह देवाची पूजा उपासना एकदम कडक शिस्तीत करायचे. त्यामुळे नरसिंह चे मंदिर असे जमिनी खाली भुयारात असायचे. ते भुयार पाहून मला हि पटले, कारण आत छोट्या मंदिर सारखेच होते.

पाऊणे अकरा वाजता आम्ही नृसिंह मंदिरात गेलो तेव्हा पुजारी पूजा करत होते, त्यामुळे मूर्ती वरील सगळे अलंकार आणि वस्त्रं काढून बहुतेक अभिषेक/स्नान घालत असावेत. त्यामुळे आम्हाला मूर्तीचे मूळ रूप दिसले. आमची वेळ चांगली होती त्यामुळे आम्हाला ती मुर्ती मुळ स्वरुपात दिसली.  मुर्ती बद्दलची सविस्तर माहिती मंदिरात फलकावर लावली होती, त्याचा फोटो मी खाली दिला आहे. 
मुर्ती 2 फुट उंच असावी पण सुंदर दिसत होती.  मंदिराच्या बाजूला तिथेच एक संत/बाबा ह्यांच मंदिर आहे. त्यांना ती मुर्ती भेटली होती.  

माळीपेठ/मळीपेठ येथील दोन विष्णू मंदिर
पुजार्‍याने आम्हाला मेहकर जवळ माळपीठ येथे विष्णुच्या अजून दोन प्राचीन मुर्ती आहेत ह्याची माहिती दिली. त्यातील एक मुर्ती गोपाळ बाळकृष्ण मंदिर मध्ये आणि एक पांडुरंग जावळे म्हणुन गृहस्थ आहे त्यांचा घरी आहे, असे सांगितले. मेहकर पासून माळपीठ १\२ कि.मी असल्यामुळे आम्ही त्या मुर्ती पाहायला गेलो. 

गोपाळकृष्ण मंदिर येथील विष्णू मूर्ती
पहिले आम्ही गोपाळकृष्ण मंदिरात पोहोचलो. हि मुर्ती मुख्य मंदिरात आहे. मंदिर नव्याने बांधलेले आहे, आत देवडी सारखं पुन्हा छोट मंदिर आहे त्याला लोखंडीदार लावुन टाळा लावलेला असतो. त्यात हि विष्णुची मुर्ती आहे. मुर्ती साधारण दोन ते अडीच फुटाची असावी. गावातील लोक ह्या मूर्तीला गोपाळकृष्ण मुर्ती बोलतात. बहुतेक त्यावरूनच ह्या मंदिराला नाव दिलं आहे. गावकरी बहुतेक नित्य नेमाने पूजा अर्चना करत असावे, कारण मूर्तीला वस्त्रं आणि पुष्पहार घातले होते. त्यामुळे मुर्ती आम्हाला मुळ रुपात पाहता आली नाही. मंदिराच्या समोर बाहेर छोट्या पत्र्याचा छताखाली शिवाची पिंड, नंदी, एक जुनी झिज झालेली मुर्ती ठेवली आहे. बहुतेक ती कुठच्या तरी प्राचीन मंदिराच्या खांबावर असावी असी दिसते. तसेच तिथे एका मूर्तीचा झिज झालेला भग्न मूर्तीचा मुखवटा आहे. 

पांडुरंग जावळे ह्यांची विष्णुची मुर्ती
ती मुर्ती पाहून आम्ही पांडुरंग जावळे ह्यांची विष्णुची मुर्ती पाहायला गेलो. मंदिरा पासून अगदी ३००\४०० मीटर अंतरावर असावे. गावात कोणाला ही विचारले असता तुम्हाला सांगतील. जावळे ह्यांचे स्वताचे दुकान आहे त्याचा पाठी मागेच त्यांच घर आहे. 
आम्ही मंदिर पासून दुचाकीवरून २ मिनटात जावळे ह्यांचा दुकाना जवळ पोहोचलो, तिथून डावीकडे दुकानाच्या बाजूने एक छोटा रस्ता जावळे ह्यांचा घराजवळ जातो. अगदी हाकेच्या अंतरावर आहे. 
आत मध्ये गल्लीत अजून वस्ती आहे.

जावळे ह्यांचे दोन मजली घर आहे. त्याचा बाहेरच त्यांनी मंदिर बांधून ही मुर्ती ठेवली आहे. जावळे ह्यांना घर बांधत असताना, आताच्या त्यांचा दरवाज्याच्या पायऱ्या आहेत, तिथे हि मुर्ती सापडली. तो दिवस अक्षय तृतीया होता. म्हणून त्यांनी त्यांचा दरवाजा समोर तिथेच मंदिर बांधले आणि मुर्ती स्थापित केली. ही  मुर्ती सुद्धा दोन ते अडीच फुटाची असावी.  जावळे मूर्तीची नित्य नेमाने पूजा करतात. त्यामुळे ह्या हि मूर्तीला धोतर वस्त्रं आणि पुष्प हार घातला होता. त्यामुळे आम्हाला मूर्तीचा पूर्ण मूळ रूप पाहता आले नाही.  जावळे यांनी आम्हाला मुर्ती आत जाऊन नीट पाहून दिली.  

जावळे ह्यानी आम्हाला जिथे नृसिंह देवाची मूर्ती सापडली ती गुहा दाखवली. जावळे ह्यांचा घराचा  बाजूला डावीकडे गाव गल्लीत रस्ता जातो. तिकडे घेऊन गेले अगदी दोन मिनटात आम्ही चालत पोहोचलो. गल्लीच्या छोट्या रस्त्याचा बाजूलाच गुहा आहे. पण लगेच कळत नाही. त्या जागेला वर छप्पर केले आहे, गुहा खाली आहे. ६\७ पायऱ्या उतरल्यावर आपण गुहे च्या दारातून आत गेल्यावर आपण एका चौरस खोली मध्ये गेल्या सारखे वाटते. आत ४\५ मानस बसतील आणि  वाकून उभी राहतील अशी जागा आहे. दरवाजातून आत गेल्यावर, पुन्हा डावीकडे एक छोटा भुयाराचा दरवाजा (चौकट) लागतो. भुयाराच्या पहिल्या दरवाजा पेक्षा ही आतील दरवाजाची चौकट थोडी लहान आहे. मी अगदीच गुडघ्यांवर आणि डोपरावर लहान मुलां सारखा गेलो. आत मध्ये गुहेच्या ह्या मुख्य गाभाऱ्यात मुर्ती होती. मूर्तीचा  भद्र पिठ अजून तिथेच ठेवलं आहे. आत मध्ये थोडं वाकून उभा राहता येईल येवढा उंच आहे. कारण आत थोड घुमट सारखं भाग आहे. आणि २\३ माणस उभे राहतील येवढी जागा आहे.
गुहेच्या मी विडिओ काढला आहे. लवकरच YouTube वर टाकेल.
गुहा पाहून आम्ही पुन्हा जावळे ह्यांचा घराजवळ आलो. तिथून पुन्हा उजवीकडे पाठी मागे  दोन मिनिटावर जुनी बारव आहे. जावळे ह्यानी आम्हाला ती ही दाखवली. बारव पूर्ण पणे नष्ट झालेली दिसते, बाजूला पूर्ण झाडी झाली होती. बारवचे काही दगड दिसत होते. पण ती बारव कमी आणि कचरा कुंडी जास्त वाटत होती.

श्री पांडुरंग जावळे ह्यानी आम्हाला केलेल सहकार्य आणि त्यांनी केलेला पाहुणचार आम्ही कधी विसरणार नाही. 

कांचन महाल
तिथून आम्ही कांचन महाल पाहायला गेलो. २ कि.मी वर असल्यामुळे, आम्ही लगेच पोहोचलो. महाल तसं काही पाहण्यासारखे नाही आहे, त्यामुळे आम्ही ५ मिनटात पाहून, 

पुन्हा मेहकर मार्गे निघालो. वाटेत आम्हाला मेहकरला रस्त्यात एक प्राचीन वास्तू दिसली ती पाहायला गेलो. दिसताना एखाद्या सरदाराची समाधी असावी अस वाटत होतं. पण तिथे गेल्यावर तेथील लोकानी सांगितले दत्त ( दत्तगुरू ) मठ दिसले. आम्ही ते पाहायला गेलो. आत मध्ये दरवाजा बंद असल्यामुळे लोखंडी दरवाजातून पाहताना समाधी सारखेच दिसत होते  pan बहुतेक लोकानी तिथे दत्ताची मुर्ती/ फोटो ठेवून मठ केला असावा, असे मला वाटले. बहुतेक मी चूक ही असेल.

परडा येथील मल्लिकार्जुन शिव मंदिर
ते पाहून आम्ही लोणारला निघालो.  कारण आम्हाला आता परडाला मल्लिकार्जुन शिव मंदिर पाहायला जायचे होते. त्यासाठी आम्हाला पुन्हा लोणार मधूनच जायचे होते. मेहकर ते परडा अंतर ३४ कि.मी आहे. आणि लोणार ते परडा १२ कि.मी. 
आम्हाला साधारण १ तास पोहोचायला लागला. मंदिर थोडं गावाचा बाहेरच आहे.  दुपारी वाजता आम्ही मंदिरात पोहोचलो. 
मंदिर परिसरात  छोटे कुंड आहेत. त्यामुळे पावसात त्यातील पाण्यामुळे मंदिरात आणि मंदिर परिसरात पूर्ण पाणी भरते. ह्या वर्षी पाऊस जास्त लांबला होता म्हणुन आम्ही गेलो होतो तेव्हा पूर्ण शेवाळ झाले होते आणि काही ठिकाणी त्यावर पाणी ही होतं. त्यामुळे जपूनच पाय टाकायला लागत होता. मंदिर बंद होतं,त्यामुळे गाभाऱ्यात जाता आले नाही. बाहेरूनच बघायला लागले. पण मंदिरातील मध्य  गाभाऱ्यात ७\८ फुट लांब झोपलेली मुर्ती होती. बहुतेक शेषशाही विष्णु अथवा नुसता मुद्रा अवस्थेतील विष्णु मुर्ती होती. मुख्य गाभाऱ्यात आत शिवाची पिंड आहे. आणि दोन मुर्ती देवडी मध्ये दिसत होत्या. लांबून प्राचीन आहे की नाही कळत नव्हते.

मग आम्ही मंदिर परिसरात मंदिराच्या पाठी भिंतीला लागून ठेवलेल्या विष्णु अवताराच्या मुर्ती पाहिल्या. ह्या मुर्ती दीड फुटाचा असतील, त्यात कूर्म (कासव), मत्स्य, बलराम, बुद्ध (बहुतेक) आणि नृसिंह ह्यांच्या मूर्त्या चांगल्या अवस्थेत होत्या. त्या बाजूला अजून काही मूर्त्या भग्न झालेल्या अवस्थेत होत्या. मंदिर परिसरात भिंतीला लागून अश्या अजून काही मुर्ती दिसतात, पण ओळखता येत नाही. 
मंदिराच्या दरवाज्याच्या बाजूला नागाची हि मुर्ती आहे.
तसेच तिथे एक खांब आहे त्याच्यावर लहान शिल्प दिसतात. त्यात काम  नृत्य, ढोल वादक,  काम शिल्प आहेत,  तर खांबाचा एका बाजूला गद्देगळ सारखं ही शिल्प दिसते.

मंदिर बघून बाहेर आल्यावर मंदिरा समोर झाडा खाली एक विरघळ सारखी छोटा खांब आहे. पण त्याचा फक्त वरच्या बाजूला शिल्प आहे. मंदिर परिसराच्या बाहेर दरवाज्याच्या उजवीकडे थोडं आत एके ठिकाणी एक सात चेहरे असलेली पट्टी सारखी  दगडाची शिळा आहे. त्याचा अर्थ काय कळला नाही. त्याचा बाजूलाच एक घोडेस्वारची रंग मारलेली दगडी मुर्ती आहे. तिचा तळ बघितला असता असे वाटते बहुतेक मंदिराच्या खांबाच्या वर मुर्ती असतात तशी असावी. 
मंदिर बघून आम्ही उस्वाद गावातील मंदिर पाहण्यासाठी निघालो.

उस्वाद गावातील मंदिर 
परडा ते उस्वाद अंतर १५ कि.मी आहे. आणि लोणार ते उस्वाद  २२ कि.मी. पण इथे मंठा ते उस्वाद एस.टी बस ठराविक वेळ मध्ये आहेत. बहुतेक एक लोणार ते मंठा वाया उस्वाद पण एस.टी आहे. आमची बाइक असल्यामुळे आम्ही अर्ध्या तासात मंदिरात पोहोचलो.
मंदिर पूर्णा नदीच्या शेजारी आहे. आम्ही संध्याकाळी ५ वाजता पोहोचलो. त्यामुळे संध्याकाळी नंतर सुर्यास्त वेळी वातावरण सुंदर दिसत होते. 
मंदिर नव्याने बांधकाम केलेले आहे. पण आत मंदिरात प्राचीन आहे. आत पूर्ण दगडी खांब आहेत. आणि आत मंडपाच्या  वरती  छतावर  चार कोपर्‍यात सुंदर शिल्प कोरलेली आहेत. मध्य भागी श्रीकृष्ण. त्याचे फोटो मी शेवटी ठेवले आहेत. त्यामुळे जास्त वर्णन लिहित नाही. 

मंदिर बघून आम्ही पुन्हा लोणार साठी निघालो.
वाटेत येते वेळी उस्वादच्या आधी अंदाजे ४\५ कि.मी वर, एका टेकाडवर गडी सारखी वास्तू दिसली होती. आम्ही ती बघायला जाणार होतो पण आम्ही चुकून दुसर्‍याच गावात शिरलो. तिथे हि आम्हाला बाहेरून गडी सारखे अवशेष दिसले होते. पण ती, ती गडी नव्हती. पण त्या गावात हि कोणाच्या तुटलेल्या वाड्या सारखे अवशेष दिसत होते. त्यात संध्याकाळ झाली होती आणि काळोख पडला होता, म्हणून मग आम्ही ती गडी न शोधता, सरळ लोणारला हॉटेल वर गेलो.

दुसर्‍या दिवशी आमच्या भटकंतीचा चौथा दिवस होता. आणि आम्ही त्या दिवशी पूर्ण लोणार बघून संध्याकाळी सिंदखेडराजाला वस्तीला जाणार होतो. त्याबद्दल मी पुढील ब्लॉग/लेखात लिहलं आहे.







बालाजी मंदिर मधील श्रीविष्णूची मूर्ती





बालाजी मंदिर, मेहकर

केशवराज मूर्ती, मेहकर




केशवराज मूर्ती चे मंदिर. इथेच श्री विष्णूची मूर्ती मिळाली होती.

गरुड मूर्ती, बालाजी मंदिर, मेहकर 

शिव मंदिर, बालाजी मंदिर, मेहकर. ह्या मंदिराचे खांब प्राचीन दिसतात. 


मंदिराचा एका बाजूला बाहेरून बुरुज आहेत


मठ, मेहकर

हा दरवाजा रस्त्याला लागतो. त्याचा उजवीकडे मठ आहे.

मंदिर परिसरात असे बरेच जुने वाडे किंवा घर पहायला मिळतात. 


मंदिर परिसरात असे बरेच जुने वाडे किंवा घर पहायला मिळतात. 

नरसिंह मूर्ती, मेहकर 

गोपाळकृष्ण मूर्ती,गोपाळकृष्ण मंदिर. माळीपेठ/मळीपेठ रोड, मेहकर  

मंदिरच्या बाहेर ठेवलेल्या काही मूर्ती

गोपाळकृष्ण मंदिर, माळीपेठ/मळीपेठ, मेहकर 

पांडुरंग जावळे ह्यांचे घर, आणि घराच्या बाजूला बांधलेल्या मंदिरात प्राचीन विष्णूची मूर्ती ठेवली आहे. 



 
पांडुरंग जावळे ह्यांची विष्णूची प्राचीन मूर्ती. 


पांडुरंग जावळे ह्यांचा घरापासून, अगदी काही अंतरावर हि बारव आहे. 



नरसिंह मूर्ती भेटली ती गुहा. माळीपेठ/मळीपेठ, मेहकर.


गुहेच्या आतील फोटो. गुहेच्या आतील विडिओची लिंक खाली दिली आहे. 

माळीपेठ/मळीपेठ, मेहकर, नृसिंह मुर्ती गुहा मंदिर विडिओ लिंक 
https://youtu.be/BYLrCf6809s


कांचन महाल, मेहकर

दत्त मंदिर, मेहकर

दत्त मंदिर, मेहकर

दत्त मंदिर, मेहकर

दत्त मंदिर, मेहकर



नरसिंह मंदिर, मेहकर. 


दत्त मंदिर आतील फोटो. 

परडा येथे जाताना, वाटेत कुडपण येथे दिसलेला दरवाजा

परडा येथे जाताना, वाटेत कुडपण येथे दिसलेला दरवाजा


मल्लिकार्जुन मंदिर, परडा
मल्लिकार्जुन मंदिर, परडा







परडा येथील मल्लिकार्जुन मंदिर

परडा येथील मल्लिकार्जुन मंदिर

परडा येथील मल्लिकार्जुन मंदिर


परडा, मल्लिकार्जुन मंदिर. मंदिराचा बाहेर उजव्या बाजूला हे सात चेहऱ्यची शिळा आणि एक घोडेस्वार ची शिळा आहे. 



मल्लिकार्जुन मंदिर, परडा

उस्वाद येथील शिव मंदिर

उस्वाद येथील मंदिर

उस्वाद येथील मंदिर

माळीपेठ/मळीपेठ, मेहकर, नृसिंह मुर्ती गुहा मंदिर विडिओ लिंक 
https://youtu.be/BYLrCf6809s

जालना, बुलढाणा प्राचीन ४- लोणार दर्शन, अंजनीची बारव

चौथ्या दिवशी आम्ही लोणार पाहून संध्याकाळी सिंदखेडराजाला वस्तीला गेलो. वाटेत अंजनीची बाराव पाहून पुढे गेलो. सिंदखेडराजाला खूपच कमी हॉटेल्स आहेत, त्यामुळे लोणार वरुन सकाळी लवकर उठून आलो असतो, तर बरं झालं असतं. असे वाटू लागले. पण बड्या मेहनतीने शेवटी एक हॉटेल मिळाल. त्यामुळे सिंदखेडराजाला राहण्याची योजना करू नका.

लोणार दर्शन
लिंबी बारव 
आज आम्ही सकाळी उठून पूर्ण लोणार फिरायचा ठरवलं. सगळ्यात पहिला आम्ही लिंबी बारव बघायला गेलो. बारवचा दरवाजा बंद होता. बहुतेक कोरोना मुळे बंद ठेवली होती. बारवला लोखंडी जाळीचा कुंपण होता,  तेथे राहणारे मुलांना पाहून आम्हीही तसेच  त्यावरून उडी मारून आम्ही गेलो.
बारवची अवस्था खराबच होती. त्यामुळे जास्त काही नक्षी काम दिसल नाही, बहुतेक जास्त नक्षी काम नव्हते. त्यामुळे आम्ही बारव पाहून दैत्य सुदन मंदिर पाहायला गेलो. 
लिंबी बारव

दैत्यसुदन मंदिर 


दैत्यसुदन मंदिर 




दैत्यसुदन मंदिर

दैत्य सुदन मंदिर
दैत्य सुदन मंदिर खूपच सुंदर आहे. मंदिर पाहता, आपण कर्नाटकच प्राचीन मंदिर पहात आहोत असे वाटते. पण मंदिर आतून मात्रं साध्या विटांच किंवा जास्त कलाकृती केलेल दिसत नाही. बहुतेक मंदिर आतून मजबूत व्हावे  म्हणून मंदिरात काही बद्दल केले असावेत, किंवा पुन्हा नवीन काम केले असावे. असे मला वाटते.
मंदिराच्या बाजूला, आपल्या डाव्या बाजूला छोट प्राचीन मंदिर आहे. त्यात ब्रह्म, विष्णु आणि गरुड मुर्ती आहेत. आम्ही लवकर गेलो होतो. त्यामुळे तिथे असलेल्या पहारेकरीची नऊ वाजता येण्याची वाट पहात होतो. पण तो काही आला नाही. मग आम्ही दहा वाजता, लोणार सरोवर पहायला निघालो.

धर्मशाळा
सरोवरलाजो रस्ता जातो तिथे सरोवरला पोहोचण्याआधी एक चौक लागते.  त्याचा डाव्या बाजूला रस्त्यालाच पण थोडी उंचावर अशी धर्मशाळा लागते, ती पाहिली. धर्मशाळा बंदच होती, त्याचा लोखंडी दरवाजा वरुन गेलो, बहुतेक कोरोनामुळे लोकांसाठी बंद होती.

लोणार सरोवर आणि सरोवर काठाची मंदिर
लोणार सरोवर जग प्रसिद्ध आहे, मला जास्त काही सांगायची गरज नाही. पहिला सुरवातीचे गोमुख मंदिर आणि पापहरेश्वर मंदिर पाहून, आम्ही तलाव काठावरची मंदिर पाहायला गेलो.
गोमुख मंदिर नंतर खाली सरोवर कडे जाताना वाटेत अजून काही  प्राचीन मंदिर लागतात. गोमुख मंदिर नंतर कुमारेश्वर मंदिर, चोपड महादेव मंदिर, यज्ञेश्वर महादेवी मंदिर, कपिला संगम मंदिर, विष्णु बघिच्छा मंदिर, रामायण मंदिर, वाघ महादेव मंदिर,  मोर महादेवी मंदिर,  कमळजा देवी मंदिर.

कमळजा देवीच्या मंदिराच्या पुढे ही एक अंबरखाना आहे. पण कोरोना मुळे सरोवर बंद असल्यामुळे तेथील झाडी खूप वाढल्यामुळे जंगल झाले होते. त्यामुळे तेथील वाट बंद केली होती. सागर ह्याआधी जाऊन आला होता, त्यामुळे त्यांनी सांगितले. सरोवर काठ मोकळा असतो आणि तिकडे काही विशिष्ट दगड हि दिसतात. पण पूर्ण जंगल वाढल्यामुळे, सरोवराचा काठा पर्यंत जंगल पसरले होते, त्यामुळे काठ दिसत नव्हता. 

नंतर आम्ही view  tower वरुन सरोवराचा दृश्य पाहायला गेलो. इथे हि वेगळी तिकीट घ्यायला लागते. पुन्हा इथे DSLR कॅमेराने फोटो काढून देत नव्हते. पण आम्ही सरोवर पहायला जाताना खाली जंगलात जाते वेळी, (माझ्या कॅमेरा माझा गळ्यात लटकलेला होता) पावती फाडली होती. ती दाखवली त्यावेळी त्यांनी आम्हाला फोटो काढून दिले. सागरकडे पन DSLR होता, पण त्याच्या बॅगेत होता, त्यामुळे त्या वन अधिकाऱ्याला कळल नाही. पण त्या पावतीचा आम्हाला इथे फायदाच झाला. एकच पावती असल्यामुळे, आम्ही दोघांनी आलटून पालटून एकमेकांचे कॅमेरे काढत होतो. कारण पुन्हा एक पावती एक कॅमेरा असा काही बोलायला नको,  म्हणून आम्ही धोका पत्करला नाही.

सरोवर पाहून आम्ही बारा वाजता हॉटेल वर पोहोचलो. 
तसेच आम्ही बॅग घेऊन सिंदखेडराजा साठी निघालो. वाटेत आम्ही अंजनीची बारव पाहिली आणि वस्तीला पोहोचलो.

अंजनीची बारव
अंजनी लोणार पासून सुलतानपूर मार्गे १६.९ कि.मी आहे. आम्ही अर्ध्या तासात तिथे पोहोचलो. 
पाऊस जास्त झाल्यामुळे  बारव एकदम भरली होती, त्यामुळे नीट पाहता नाही आली. तरी पण बारवच्या एका बाजूला छोटा मंडप दिसतो. बाकी बारवच्या तीन बाजूला पायऱ्या आहेत. आम्ही ४.३० वाजता, सिंदखेडराजासाठी  पुढे निघालो. अंजनीवरुन सिंदखेडराजा ४१.४ कि.मी आहे. आम्हाला पोहोचायला एक ते सव्वा तास लागला.
त्यानंतर आम्हाला हॉटेल शोधायला वेळ लागला. शेवटी एक बालाजी लॉज मध्ये आम्ही ९०० रुपये भाडे देऊन राहिलो. पण हॉटेल ठीक होत.


दुसर्‍या दिवशी, आम्ही सकाळी लवकर उठून देऊळराजा येथील गडी, आणि काही बारव पाहणार होतो. आणि नंतर सिंदखेडराजा येथील लखोजीराव जाधव ह्यांचा राजवाडा, समाधी स्थळ, प्राचीन मंदिर आणि बारव पाहून जालना साठी निघणार होतो. वर सांगितल्याप्रमाणे आम्हाला हॉटेल शोधायला खूप मुश्किल झाले.

अंजनीची बारव

अंजनीची बारव


गोमुख मंदिर












 कमळजा देवी मंदिर



धर्मशाळा

धर्मशाळा



लोणार सरोवर view  tower  वरून टिपलेले दृश्य. 

जालना, बुलढाणा प्राचीन ५ - देऊळराजा येथील गडी, बारव, सिंधखेडराजा येथील महाल, समाधी इत्यादी. जालना येथील मस्तगड भुईकोट, दरवाजा.

आज आम्ही देऊळराजा येथील गडी, बारव पाहून.  सिंदखेडराजा पाहून जालण्याला जाऊन मुंबई साठी ट्रेन पकडणार होतो.

देऊळगावराजा बारव 
पहिली बारव
ठरल्याप्रमाणे आम्ही सकाळी साडे सहा वाजता देऊळगावराजा साठी निघालो. सिंदखेडराजा ते देऊळगावराजा 15 कि.मी आहे. अर्धा तासात आम्ही तेथे पोहोचलो. पहिले आम्ही गावाच्या थोड्या बाहेर असलेल्या बारव पाहायला गेलो. गावातील लोकांना विचारात विचारात, आम्ही तिथे पोहोचलो. पण रस्त्याचा बाजूला सकाळी बरेच जण चिंपाट घेऊन बसले होते. त्यामुळे आम्ही तोंडाला मास्क घातला, कारण पूर्ण रस्ताच भरला होता. त्यात आम्ही एकदमच चुकीच्या वेळेत पोहोचलो होतो. ह्या वरुन कळलं गाव हागणदारीमुक्त नाही.

रस्त्याला उजव्या बाजूला एकाचा खाजगी जागेत बारव आहे. तिथे त्याची शेती आणि घर दोन्ही आहे. त्यामुळे आम्ही त्यांना विचारलं आणि त्यांनी आम्हाला विहीर दाखवली. बारव मोठाची विहीर सारखी आहे आणि त्याला जाण्यासाठी पायऱ्या आहेत. काही पायऱ्या उतरून दोन्ही बाजूला छोटी  देवडी आहेत त्यातील एका देवडीच्या बाजूलाच भिंतीवर एक शिलालेख आहे. 
शिलालेखचा फोटो शेवटी दिला आहे. 

दुसरी बारव आणि प्राचीन समाधी 
ती बारव बघून, अजून त्याचा पुढची बारव पहायला गेलो. 
हि बारव अगदी 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरच पुढे एका शेतात आहे. बारव आणि प्राचीन समाधी आहे. समाधी बहुतेक कोणी सरदार किंवा राज घराण्यातील व्यक्तीची असावी. त्यामुळे तिची डागडुजी चांगली ठेवली आहे. पण बारव दुर्लक्षित आहे, त्यामुळे पूर्ण झाडा झुडपाने झाकलेली दिसते. तसेच विहिरीच्या बाजूला असलेल्या मोठा जवळ काही घरा सारखा अवशेषची भिंत ढासळलेली दिसते. ही बारव, पहिल्या बारव सारखीच दिसते, पण आकाराने लहान दिसते. बहुतेक त्याकाळी बारवचे पाणी समाधी समोर असलेल्या चौकट मध्ये सोडत असावेत. सुशोभिकरण साठी. हि बारव बघून पुन्हा आम्ही गावात बालाजी मंदिराच्या बाजूला असलेली बारव पहायला गेलो. पुन्हा नाकतोंड झाकुन घेतलं आणि निघालो.

बालाजी मंदिरा शेजारी असलेली बारव आणि दरवाजा आणि तटबंदी 
बालाजी मंदिराच्या बाजूला लागून रस्त्यालाच बारव आहे. 
रस्त्याचा बाजूला 10 ते 12 फुटाची भिंत असल्यामुळे दिसत नाही, पण त्या भिंतीला सीमेंटच्या दोन छोट्या चौकनी खिडकी आहेत, त्या मधून थोडीशी दिसते. त्या भिंतीच्या दोन बाजूला बारव मध्ये जायला पायऱ्या आहेत. पण तिथे लोकांनी कचरा आणि अडगळ ठेवली आहे. आम्हाला वाटलं आम्हाला काही बारव बघायला भेटत नाही, पण तिथे एकाने सांगितले, मंदिराच्या समोर मंदिर कार्यालयात विचारा ते तुम्हाला सांगतील. 

कार्यालयात विचारले असता तेथील एक काका चावी घेऊन आम्हाला बारव दाखवायला आले. 

बारव वर्णन
बारव खूप सुंदर आहे. बारवच पाणी थोडं स्वच्छ दिसत होते. त्यात पाईप टाकले होते, त्यावरुन ते पाणी कशाला तरी वापरत असावेत. बारवला दोन बाजूने दरवाजा आहेत. तसेच बारवच्या थोडीशी मध्ये अशी, एक मजली दगडी इमारत आहे, त्याचावर बहुतेक नंतर बारीक विटांने अजून एक मजला (बहुतेक नंतर बांधलेला दिसतो) आहे. त्या मजल्यावर जाण्यासाठी भुयार सारख्या पायऱ्या आहेत. तिथून वर गेले असता आपल्याला वरुन बारव दिसते पण पूर्ण दिसत नाही. आणि तेथे वर जुन घर आहे. आम्ही बारव पाहून नाश्ता करून अजून आजुबाजूचे अवशेष पाहून घेतले. मंदिराच्या आजूबाजूच्या पूर्ण परिसरात आपल्याला जुनी वाड्या सारखे घर दिसतात. ह्या वरुन अंदाज लावता येतो. त्याकाळी  ह्या बारवच पाणी प्यायला वापरत असावेत.
दरवाजा 
बारवच्या पुढे, रस्त्याला समोर दरवाजा आहे. आणि बाजूला थोडी फार तटबंदी दिसते. त्याकाळी एक प्रवेश द्वार असावे. 
बाकी नामशेष झालेली दिसते. आम्ही मंदिराच्या समोरच एका छोट्याशा गल्लीत वाडा आहे. वाडा सध्या आतून पूर्ण ढासळलेला आहे, फक्त बाहेरून भिंती चांगल्या दिसतात. तो पाहून घेतला.

शाळेतील गडी 
तो वाडा बघून आम्ही कस्तुरबा कॉन्व्हेंट शाळा बघायला गेलो. कारण त्या शाळेत गडीचा दरवाजा आहे, आणि त्याला लानूनच अथवा त्या गडीतच शाळा बांधली आहे.
गुगल नक्षा वरती बघितल्या वर अंदाज येतो बहुतेक हि गडी असावी. कारण त्याचे तीन बाजूचे बुरुज आणि तटबंदी दिसते. एका बाजूने पडलेली किंवा ढासळलेली असावी, त्यात अतिक्रमण मुळे एका बाजूला घर दिसतात. 

शाळेच्या दरवाज्याने आत गेलो असता. डावीकडे आपण मुख्य दरवाजा आहे, तेथे जातो. दरवाजा रस्त्याने दिसतो पण रस्त्याचा बाजूने प्रवेश बंद ठेवतात. दरवाजा चांगल्या स्थितीत दिसतो. त्याला बहुतेक शाळेने रंगवलं आहे. 

शाळेच्या दरवाज्याने आत आल्यावर उजवीकडे आपल्याला दोन बुरुज दिसतात. पण त्यावर वाढलेली झाडे झुडपे वाढलेली आहेत आणि मुख्य करुन बुरुज आतून ढासळलेला आहे, त्याचा माती वरुन चालणे धोकादायक वाटत होते. म्हणून आम्ही बुरुज लांबूनच बघितला. पन बुरुज आणि तटबंदी बाहेरच्या बाजूने चांगली दिसते. 

त्यामुळे आम्ही बाहेरून बघायला गेलो. पण त्या रस्त्याने पुढे चालू लागलो असता,  एक जन रस्त्याला चिंपाठ घेऊन बसलेला दिसला. आणि तेथे आलेला दुर्गंध आणि रस्त्याला दिसलेली घाण आम्ही समजलो, हा रस्ता हागणदारीचा आहे. मग आम्ही तिथूनच फोटो काढून पाठी फिरलो.

सिंदखेडराजा दर्शन
तिथून आम्ही नाश्ता करून पुन्हा सिंदखेडराजाला आलो.
दुचाकी असल्यामुळे आम्हाला फिरायला जास्त वेळ लागला नाही.
सिंदखेडराजाला बघण्यासारखे म्हणजे, लखोजीराजे ह्यांचा वाडा जेथे राज माता जिजाऊ साहेब यांचा जन्म झाला. तसेच लखोजीराजे ह्यांची समाधी, शिवाच एक प्राचीन मंदिर. काळा कोट बघण्यासारखे आहे. 

लखोजी राजे जाधव ह्यांचा राजवाडा
पहिला आम्ही राजवाडा पाहायला गेलो. वाड्याचा बाहेरच्या तटबंदी अजून चांगल्या दिसतात. पण आत मात्रं चौथरे दिसतात. एके ठिकाणी जिजाऊ साहेबांच जन्म झाला, ती खोली आहे. चौथरा खाली मोठा तळ मजला आहे  बहुतेक त्यावेळी तेथे सैन्य ठेवत असावेत. थोडं पाठी मागे राजदरबार आहे. आम्ही महाल बघून 
काळा कोट बघायला गेलो.

काळा कोट, शिव मंदिर आणि समाधी
काळा कोटमध्ये बहुतेक संग्रहालय बनवत आहेत, त्याच काम चालू आहे. आम्ही तिथे असलेल्या प्राचीन मुर्ती बघायला गेलेलो. ते पाहून आम्ही शिव मंदिर पाहायला गेलो. शिव मंदिर पाहून आम्ही लखोजी राजेची समाधी पाहिली. 

जालना प्रवास
आमचं सिंदखेडराजा बघून झालं. मग आम्ही दुपारी जालना साठी निघालो.  कारण तेथून रात्री आमची मुंबई साठी ट्रेन होती. आम्ही संध्याकाळी ४\५ दरम्यान पोहोचलो. आमच्याकडे बराच वेळ होता. त्यामुळे आम्ही तेथील रस्त्यात लागलेला दरवाजा, तसेच मस्तगड भुईकोट पाहिला.

मस्तगड भुईकोट
भुईकोट होता, रस्त्याचा बाजूने बाहेरून एका बाजूची तटबंदी दिसते. भुईकोटला दरवाजा नाही पण दरवाजा आतील भागातील देवडी आहे. तसेच दरवाजातून आत गेल्यावर एका बाजूला (उजव्या बाजूला) थोडी तटबंदी लागते आहे. आत मैदानात दोन तोफा ठेवलेल्या आहे.
ह्या भुईकोट मध्ये आता नगर परिषदेची पाण्याची उंच टाकी बांधली आहे. आत बरेच नगर परिषदेचे भंगार सामान काही जुन्या गाड्या ठेवल्या आहेत. तसेच काही घरे पण आहेत. आणि बहुतेक काही बैठी कार्यालय आहेत. बहुतेक जालना नगर परिषदेची असावीत. कारण भुईकोटच्या मुख्य दरवाजा वर जालना नगर परिषदेचा फलक लावला आहे.

भुईकोट बघून एक मंदिरात काही वीरगळ, आणि प्राचीन मुर्ती आहेत. त्या बघितल्या. 

अश्या प्रकारे आमचा जालना, बुलढाणा दौरा पूर्ण झाला.

धन्यवाद
पाहिली बारव 


देवडीच्या बाजूला असलेला शिलालेख 







दुसरी बारव आणि समाधी 







बालाजी मंदिरा शेजारी असलेली बारव


बालाजी मंदिरा येथील दरवाजा 



मंदिराजवळ असलेले जुनी घरे. 

शाळेतील गडीचा दरवाजा 





गडीची तटबंदी आणि बुरुज 

गडीची तटबंदी आणि बुरुज 

गडीची तटबंदी आणि बुरुज 


मस्तगड भुईकोट, जालना

जालना येथील एका मंदिरात ठेवलेल्या प्राचीन मूर्ती. 






















 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://itsmytravelogue.blogspot.com

   Cinematographic Wai - Menavali_November 6, 2013 We had a "real" long Diwali Holidays to our Company - 9 days - long enough to m...