https://www.maayboli.com/node/17663
किल्ले
माहुलीच्या जवळच वसलेले हे जैन धर्मियांचे भगवान पार्श्वनाथ यांचे मंदिर
आसनगाव रेल्वे स्थानकापासुन ६ किमी अंतरावर आहे (आसनगाव ते मानस मंदिरला
जाण्यासाठे स्थानकाबाहेर रिक्षा उपलब्ध असतात). मुंबई-नाशिक हायवेवर
शहापुरच्या अलिकडेच असलेला एक रस्ता आपल्याला या मंदिरापर्यंत नेतो. हाच
रस्ता पुढे किल्ले माहुलीला जातो. हिरव्यागार पार्श्वभुमीवर सफेद रंगाचे हे
जैन मंदिर मनाला निश्चितच भुरळ घालते. एका छोट्याशा टेकडीवर हे मंदिर वसले
आहे. येथे छोटी छोटी अनेक मंदिरे पाहताना जणु काहि आपण देवळांच्या गावातच
फिरतोय असा भास होतो. पांढर्या दगडावरचे कोरीवकाम बघण्यासारखे आहे.
रोजच्या धकाधकीच्या जीवनातुन एक दिवस मोकळा ठेऊन या मंदिराच्या प्रांगणात
येऊन शांततेचा अनुभव नक्कीच घ्या.
अशीच हिरवीगारं पार्श्वभुमी असलेले सुंदर मंदिर लोणावळा - पौड मार्गावर
दुधिवरे येथे (श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर) आणि कोळवण जवळ हाडशी येथे (साई
मंदिर) आहे.
==================================================
==================================================
प्रचि १











































No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.