ऑकलंडमधल्या शेवटच्या दिवशी मी म्यूझियममधे होतो, ते आधी लिहिलेच आहे.
त्या म्यूझियमच्या टेकडीच्या पायथ्याशी, विंटरगार्डन नावाची वास्तू आहे. बसमधल्या
ऑटो गाईडने, उद्यानांची आवड असणार्यांनी तिथे अवश्य जावे असे सूचवले होते. (मला तो इशारा पुरेसा होता.)
तर लांबून काचेची इमारत आतमधे काय असेल याचा पत्ता लागू देत नव्हती. आणि
जवळ गेल्यावर मात्र, मला अलिबाबाची गुहा सापडल्यासारखेच झाले.
काचेचे अर्धगोलाकार छत असलेली एक इमारत, मधे मोकळी जागा, आणि मागे पुन्हा
तसलीच एक इमारत, एवढा पसारा.
आत अक्षरशः हजारोंनी फुले फुललेली होती. आत तर होतीच आणि बाहेरही होती.
इथे प्रवेश विनामूल्य आहे. (हे एक नवलच.) फक्त लग्नाचे वगैरे फोटो काढायचे
असतील, तर पैसे घेतात. आत गुलाबांची २/४ च झाडे होती (तिथून जवळच १०८
प्रकारचे गुलाब असलेले एक उद्यान आहे.)
न्यू झीलंडमधे वाढू शकतील तशी सर्व झाडे तर होतीच पण तिथे नैसर्गिक रित्या
वाढू शकणार नाहीत अशी कोको, केळी वगैरे पण झाडे होती. झाडांच्या नैसर्गिक
गरजा लक्षात घेऊन, गरज असेल तेवढा प्रकाश आणि उष्णता देण्याची व्यवस्था
केली होती. (गरज असेल तिथे चक्क वीजेचे दिवे लावले होते.)
म्हणाल तो रंग नव्हे तर त्या रंगाची म्हणाल ती छटा तिथे उपलब्ध होती. फुलात
कमी दिसणारे काहि रंग उदा, निळा, किरमीजी पण तिथे होते.
या फुलांकडे लांबून बघू कि जवळ जाऊन बघू, असे मला झाले होते. (दोन्ही
प्रकारचे फोटो देतोय.) फक्त एकच अडचण होती, ती म्हणजे एखाद्या फुलाचा
स्वतंत्रपणे फोटो काढणे जरा कठीण होते, कारण तिथे फुलांची बरीच गर्दी होती.
मला वाटतं, रोजच असे ते गार्डन फुलते ठेवण्यात तिथल्या कर्मचार्यांचा नक्कीच
सहभाग होता. त्या कर्मचार्यांचा अनुभव मुद्दाम सांगण्यासारखा. तिथे
कमळाच्या तलावाजवळ जास्त किटक (डास वगैरे )होते. मी हाताने ते वारत
होता, तर तिथला एक कर्मचारी त्यांना हाताने आपल्याजवळ ओढल्यासारखे करत
होता. मला एकदम हसू आले, मी त्याला विचारले असे का करतोस, किटक
घालवत का नाहीत ?
तर तो म्हणाला, पॉलिनेशन कसे होणार ? त्यासाठी तर ते हवेतच. शिवाय इथे काही
किटकभक्षी वनस्पति पण आहेत, त्यांना नको का अन्न ?
महाभारतात वर्णन असलेले, सहस्त्र पाकळ्यांचे, रक्तवर्णी कमळ पण तिथे होते.
त्याचा कळाच आपल्या तांब्याच्या गडू एवढा होता. फक्त मला ते उमललेले
पाहता आले नाही..
या इमारतीच्या बाहेरच्या बाजूने देखील भरपूर फुले होती. माझी तर तंद्रीच लागली
होती तिथे. शेवटच्या बसची वेळ झाली, तशी धावत पळत म्यूझियमची टेकडी चढलो.
या फोटोतले किती तूम्हाला दाखवू असे झालेय. जागेच्या अभावामूळे सगळेच इथे
टाकत नाही, असे ठरवले तरी ते भरपूर आहेत. म्हणुन चार भागात देतोय.
(पहिल्या दोन भागात, ग्रुप फोटोज आहेत तर तिसर्या आणि चौथ्या भागात
क्लोज अप्स असतील. )
२)
३)
४)
५)
६)
७)
८)
९)
१०)
११)
१३)
१४)
१५)
१६)
१७)
१८)
१९)
२०)
२१)
२२)
२३)
२४)
२५)
बाकिचे भाग ३ /४ दिवसांच्या अंतराने टाकतोच.
रंग दे, रंग दे, मोहे अपने रंग विच रंग दे...
३)
४)
५)
६)
७)
८)
९)
१०)
११)
१२)
१३)
१४) या फुलातली, बारीक अळी शोधा !
१५ ) हे नाही, पण अळशी (फ्लॅक्स सीड्स ) चे फूल पण असेच असते.
१७)
१८) या फुलाने, बाळ शेंगांचाच वापर सजावटीसाठी करुन घेतलाय.
२०)
२१)
२२)
२३)
२४)
२५)
२६)
२७) खरं तर हा फोटो गंडला आहे. (हे नंतर लक्षात आले) पण निळ्या रंगाची
हि अनोखी छटा, क्वचितच फुलात दिसते.
ऑकलंड वॉर मेमोरियल (म्यूझियम)
मुंबईचे म्यूझियम मला अतिप्रिय आहे. तिथल्या कलाकुसरीच्या वस्तू बघण्यात माझे २/३ तास सहज निघून जातात.
पण तिथे त्या मानाने जागा कमी पडते. सर्वच वस्तू एकावेळी ठेवलेल्या नसतात. आणि त्यामूळे प्रत्येकवेळी काहीतरी नवीन बघयाला मिळते.
कुठलेही म्यूझियम बघताना, माझे मन नकळत तिथल्या वस्तूंशी तूलना करत राहते (हे संग्रहालय निर्माण करण्यात आपल्या वर्षूंच्या काकांचे योगदान आहे.)
ऑकलंड मधले म्यूझियम बघताना माझ्या मनात हेच होते, तरीही मला तिथे जे भावले ते इथे मांडतोय.
अगदी पहिल्यांदा काय जाणवत असेल तर तो त्या इमारतीचा भव्यपणा. एका टेकडीवर ती वसलेली आहे. भोवताली खुप मोठा हिरवा आवार आहे. तसा तिचा आकार काही खास आहे, बाहेरुन कोरीव काम आहे असेही नाही. पण तरीही ती वास्तू त्या अवकाशात उठून दिसते. समोर एक स्मारक आहे. तेही साधेसेच पण भव्य आहे.
न्यू झीलंडचे स्थानिक रहिवासी म्हणजे माऊरी जमात. प्रचंड आडव्या बांध्याचे आणि रुंद चेहरेपट्टीचे हे लोक आहेत. त्यांच्याकडे कदचित आपल्यासारखी कोरीक कामाची पद्धत नसेल. पण तरीही त्यांची रांगडी कला, भव्यतेमूळे आणि साधेपणामूळे आवडते. त्यांची पारंपारीक घरे, होड्या तिथे आहेत. हे काम बहुतांशी लाकडात केलेले आहे.
भरतकाम म्हंटले कि आपल्याकडे साधारण पानाफुलांची नक्षी अपेक्षित असते. पण त्यांच्या कलेत जास्त करुन, भौमितीक आकार दिसले. चिनी भरतकामाचे नमुने आणि त्यांचे नमुने, असे दोन्ही इथे देतोय.
त्या देशांत, गोरे लोक पुर्वीपासून वस्ती करुन आहेत. आणि त्यांनी
अर्थात्च त्यांची कलाकुसर तिथे नेली. त्या काळातल्या कपड्यांचे काही नमूने
इथे देतोय.
ते आल्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने घरे, वस्त्या वसवल्या. त्या
काळातील घरांचे, दुकानांचे नमुने तिथे ठेवले आहे. त्या काळातल्या काळाचा,
जणू त्रिमितीतला फोटोच. त्या घरात आपल्याला जाता येते. पण मधे काच असल्याने
फोटो नीट येत नाहीत.
(एकंदर सर्वच म्यूझियममधे अपुरा प्रकाश, मधे असणार्या कांच्यावरचे पडनारे फ़्लॅशचे प्रतिबिंब हा प्रॉब्लेम असतोच.)
खुपदा म्यूझियममधे, वस्तूंना हात लावायची परवानगी नसते. आणि ते योग्यही आहे. पण तिथल्या काही वस्तू, मुद्दाम हाताळाव्यात यासाठी ठेवल्या आहेत (उदा.प्राचीन काळापासून उपयोगात असलेला. धार लावायचा दगड.)
नॅचरल हिस्टरी विभागात जीवाश्म, किटक वगैरे आहेतच. पण काही छोटे किटक बघण्यासाठी मुद्दाम सूक्ष्मदर्शक ठेवले आहेत. आणि लहान मूले ते मस्त एंजॉय करत होती. मी होतो त्या दिवशी तिथे डिस्कव्हरी चॅनेलचा खास उपक्रम चालू होता. तिथला माणूस मला बोलावत होता, पण माझ्याकडे वेळ कमी होता.
माऊरी लोकांचा नाचगाण्याचा कार्यक्रम तिथे ठराविक वेळी सादर होतो, तोही मला बघता आला नाही.
संग्रहालयातल्या वस्तूंचे जतन, साफसफाई कशी केले जाते तेही तिथे प्रत्यक्ष
बघता येते. तो विभाग तिथे काचेच्या आड आहे आणि तिथले कर्मचारी मन लावून कसे
काम
करताहेत, ते बघता येते.
दोन वर्षांपुर्वी, ख्राईस्टचर्च भागात मोठा भूकंप झाला होता. एकंदर तो देशच भूकंपप्रवण आहे. समजा ऑकलंड मधे भूकंप झाला तर काय़ होईल, याचा अनुभव देणारा एक कार्यक्रम तिथे सादर होतो.
त्यात आपण प्रत्यक्ष सहभागी होऊ शकतो. ऑकलंड हार्बरच्या समोरच एक पसरट,
मृत ज्वालामुखी दिसतो. हा तिथल्या अनेक भागातून दिसतो. सध्या तो मृतच
असल्याने त्यावर सध्या ट्रेकिंग करता येते.
तर याचा अनुभव देण्यासाठी ऑकलंडमधले एक टिपीकल घर तयार केले आहे.
त्याच्या खिडकीतून तो मृत ज्वालामुखी दिसतोच. टिव्हीवर बातम्या चालू आहेत.
आणि हळूहळू वातावरणात बदल होत असलेला जाणवतो. समुद्रातून वाफा येताना
दिसतात. लाईट जाते... आणि...
एक जबरदस्त अनुभव दिला जातो. तो काही जणांच्या ह्रदयाचा ठोका चूकवू
शकतो. (तशी सूचना तिथे आहे.) पण ईजा होण्याची अजिबात शक्यता नाही.
हा अनुभव फोटोत पकडणे शक्यच नव्हते.
ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यास कधीकधी खुप मोठ्या प्रमाणात उष्ण राख बाहेर
पडते आणि ती सभोवताली पसरते. त्याचा जाड थर एखाद्या गावावर बसू शकतो,
आणि त्याखाली लोक जिवंत गाडले जातात. पुढे पावसामूळे त्या राखेचा ठिसूळ
दगड बनतो. पुढे कधी उत्खनन झाल्यास, राखेत त्या देहाच्या आकाराच्या पोकळ्या
दिसतात (देह कुजून जातात.) त्या पोकळ्यांचा साचा घेतल्यास, पुरेश्या तपशीलात
त्या देहाचा, त्या काळातील स्थितीचा पुतळा मिळतो. तसा एक पुतळा तिथे आहे.
जगभरातल्या म्यूझियममधे, खास करुन जिथे वसाहती होत्या, त्या देशात. इजिप्त आणि तिबेटमधल्या वस्तू असतातच. तशा तिथेही आहेत. पण त्यांचे फोटो मी देत नाही.
पण या सगळ्यांपेक्षा, जास्त परिणामकारक जे काही असेल, तर ते तिथले वॉर मेमोरियल.
तो देश, तसा दूरवर असला तरी अनेक युद्धात ओढला गेला. त्या जखमा अजून
तिथे जाणवतात. आणि स्कार्स ऑफ द हार्ट या नावानेच तो विभाग आहे.
प्रत्यक्ष लढाईत वापरलेली साधने तर आहेतच. पण त्याहीपेक्षा प्रत्यक्ष युद्धाच्या ठिकाणी
सैनिक कसे रहात असतील याची कल्पना देणार्या बरॅक्स तिथे आहेत. त्यांनी जपून
ठेवलेल्या वस्तू तिथे दिसतात. तिथे पुतळे नाहीत, पण आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणीच
आहोत असा अनुभव मात्र येतो.
या अनुभवात भर घालतात ते कानावर येणारे आवाज. भिंतिवर दिसत असणारी चित्रे,
फोटो आणि क्लीप्स. तिथल्या भिंतीवर लढाईत कामी आलेल्या सैनिकांची नावे कोरली
आहेत, पण एका रिकाम्या भिंतीवर कोरलेले एक वाक्य, मला फारच भावले.
१. हा मृत ज्वालामुखी ऑकलंड हार्बर आणि आजूबाजूच्या परिसरातून दिसतो. हा फोटो बसमधून काढलाय, म्हणून गाडीचे प्रतिबिंब दिसतेय.
२ संपूर्ण लाकडापासून बनवलेले माऊरी घर,
४. न्यू झीलंडचे मानचिन्ह असलेले एक फर्न (नेचे) तिथे सगळीकडेच दिसते. त्याच्या
पानापासून केलेली एक फ्रेम.
६ अनेक पिढ्यांनी शस्त्रांना धार काढण्यासाठी वापरलेला हा दगड. त्यावर
आपण हात फिरवू शकतो. तिथे बहुतेक वस्तूंशेजारी, त्याची माहिती, व ती कुठे
मिळाली ते लिहिले आहे.
१२ हा फोटो खुपच काहि सांगून जातो.
१७. शिंपल्यांपासून केलेली एक फ्रेम
१९. वॉर मेमोरियलच्या बाहेरचा मोकळा भाग.
२०. तत्कालीन जगाचा नकाशा (मुद्दाम भारताची व्याप्ती बघाच.)
२५. माऊरी लोकांचे रंगकाम / भरतकाम
२६. माऊरी लोकांचे रंगकाम / भरतकाम
२७. माश्यांच्या दातांपासून / शिंपल्यांपासून केलेला हार
२८. गोर्या लोकांच्या पोषाखाचा नमुना
२९. ऑडीटोरियमची बाहेरची बाजू. म्यूझियमच्या मुख्य दालनातच हे आहे.
३०. म्यूझियमच्या बाहेरच्या बाजूचे फोटो
३१. आजूबाजूचा विस्तीर्ण हिरवा परिसर. (इथेच एक मोठे गोड्या पाण्याचे
सरोवर आहे. तिथून पुर्वी शहराला पाणीपुरवठा केला जात असे. सध्या ते या
उद्यानाचा भाग आहे. तिथेच एक गुलांबाची बाग पण आहे.)
३२. म्यूझियमच्या बाहेरच्या बाजूचे फोटो
३३. जिथे मनसोक्त फिरता येते, अशी हिरवळ.
३४. समोरचा रस्ता. ऑकलंड शहरातली महत्वाची १४ ठिकाणे दाखवणारी एक बस आहे. ती दर अर्ध्या तासाने इथे थांबते.
३६. म्यूझियमच्या समोरच्या बाजूचे फोटो
३७. म्यूझियमच्या समोरच्या बाजूचे फोटो
'पोलिनेशिअन्स Maori' बद्दल छान माहिती कळली. हे लोकं पागान होते का??
अजून ही राहात आहेत तिकडे??
ज्वालामुखी उद्रेक होतानाचा अनुभव विलक्षण थरारक असेल नै???
सर्व फोटोज मस्त..
त्या पुतळ्याचा फोटो बघताना शहारे आले..
चायनीज गाऊन आणी भारतीय (ती पेजली प्रिन्ट ची) एम्ब्रॉयडरी चे नमुने का आहेत तिकडे???
ओ ओह!!! फारच प्रश्नचिन्हे अवतरलीयेत!!!!!
त्या लोकांचे ओरिजीन्स अजून नीट कळलेले नाहीत. पण तिथे ते अजून आहेत. मुख्य
प्रवाहातच आहेत, आणि वेगळेपणामूळे सहज ओळखू येतात. तसे ते स्वभावाने मवाळ
असतात.
तिथे माऊरी, गोरे, चिनी, भारतीय, कोरियन असे सगळेच लोक दिसतात आता. (आणि
मिश्र जोडपीही दिसतात.) या सगळ्यांचा प्रभाव तिथल्या प्रत्येक गोष्टिवर
पडलाय. भारतीय जेवण जेवणारे स्थानिक लोक खुपच दिसतात आणि माझ्यासारखे
शाकाहारी देखील.
ऑस्ट्रेलिया काय किंवा न्यू झीलंड काय, हे ब्रिटीश वसाहतीच होत्या.
त्यामूळे त्यांचे ब्रिटिशांचे स्थानिकांशी युद्ध झालेच. शिवाय, जिथे जिथे
ब्रिटन लढला, तिथे तिथे त्यांना लढावे लागले. मी तुर्कनामा मधेही, हा
उल्लेख वाचलाय. सध्या मात्र त्यांचे कुणाशीच वैर नाही. त्यांचा
अण्वस्त्रांना विरोध आहे.
(त्यांच्या माजी पंतप्रधान, श्रीमती हेलन यांनी स्वतः देशभर फिरून
पर्यटकांसाठी कार्यक्रम तयार केला होता. तो डिस्कव्हरीवर दाखवलाही होता.)
ऑकलंड झू
खुप
वर्षांपूर्वी मी हैद्राबादचे प्राणीसंग्रहालय बघितले होते. तिथली रचना मला
इतकी आवडली होती, कि नंतर बाकी कुठ्ल्या झू मधे जायला मी तयारच नसायचो.
न्यू झीलंडमधे पण यापूर्वी झू मधे जायचे टाळलेच होते.
नेटवर तिथले आकर्षक फोटो बघून जावेसे वाटले. प्राणी बघण्यापेक्षा मला
तिथल्या रचनेत जास्त रस होता. (आफ्रिकेतल्या माणसाला प्राण्यांचे काय कवतिक
असणार ? )
मला तो परिसर खुप आवडला. प्रत्येक प्राण्याला भरपूर जागा होतीच शिवाय शक्य
तितके नैसर्गिक वातावरण उपलब्ध करुन दिले होते. (सिंहाचा मुद्दाम लोंग शॉट
देतोय) मला कौतूक वाटले कि जिथे जिराफ, झेब्रे ठेवले होते त्या परिसरात,
खास केनयात दिसणारी जांभळ्या फुलांची झुडूपे होती.
आधी न बघितलेल्या प्राण्यात, आकाराने अगदी छोटी (म्हणजे ८/१० इंच ) माकडे होती. तिथले खास म्हणजे उडण्याचा आळस असणारे पक्षी बघितले.
पक्षी बघण्यासाठी पिंजर्यातच मचाण वगैरे होते. बरेचसे स्थनिक पक्षी दिसले.
तिथल्या अनेक पिंजर्यांच्या आत आपण जाऊ शकतो. न्यू झीलंडमधे साप नाहीत,
पण काही खास प्रकारच्या पाली दिसतात. त्याही तिथे आहेत (त्यांच्या
पोहोतुकुवाचे परागीवहन एक पालच करते.)
तिथले माहितीफलक पण अगदी रंजक होते (एक नमुना देतोय) मी भारतात असताना, इंद्रा, जिप्सी यांचे फ्लेमिंगो बघायला जायचे प्लान ठरत होते. मला त्यांच्याबरोबर जायला जमले नाही, पण ते पक्षी मात्र दिसले तिथे.
एक प्रगतीशील प्राणीसंग्रहालय म्हणून या प्राणीसंग्रहालयाला नावाजले जाते. कदचित पुढच्या भेटीच्या वेळी, ते आणखी आकर्षक झाले असेल.
मला तिथे जास्त वेळ काढता आला नाही, ( हे झू आणखी एका मोठ्या वेस्टर्न स्प्रिंग नावाच्या उद्यानाला लागूनच आहे. ) त्यामूळे हि अगदी त्रोटक चित्रझलक..
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
न्यू झीलंड हा कुठल्याही देशापासून दूर असल्याने, तिथले पक्षीही वेगळ्या तर्हेने उत्क्रांत झालेत. उदा. २२ नंबरचा जो पक्षी आहे तो झाडावर चढताना पण चोचीचा आणि पायांचा वापर करतो. आकाराने देखील तो जरा मोठाच असतो. असाच एक पक्षी तर दुसर्या पक्ष्यांच्या बिळातील पिल्ले ओढून खातो.
तिथे एक पक्षी समुद्रकिनार्यावरच्या दगडाखालचे किडे पकडण्यात पटाईत असतो, आणि यासाठी त्याची चोचही वाकडी (तीदेखील उजव्याच बाजूला) झालेली आहे. वाकडी चोच असणारा तो जगातील एकमेव पक्षी आहे.
तिथे चिमण्याही बिनघोर फिरताना दिसतात. बागेत वगैरे असणार्या मोकळ्या हॉटेलमधे तर त्या टेबलावर येऊनही खरकटे खाताना दिसतात. (माणसे तिथे असतानाच.) आणखी एका पक्ष्यांची अख्खी कॉलनीच इथे सादर करणार आहे.
तरी पण अभयारण्याची सर कशालाच येणार नाही - पूर्ण निसर्गातच प्राणी, पक्षी, वनस्पती वाढले पाहिजेत - आपण तिथे फक्त अभ्यास करायला वा निरीक्षण करायला किंवा नुसता दर्शनाचा आनंद घ्यायला जायचे - पण त्यांच्यात कुठल्याही प्रकारची ढवळाढवळ करायची नाही....... प्राणीसंग्रहालयात तेथील प्राण्यांना आयते खायला मिळत असल्यामुळे ते प्राणी वा त्यांच्या पुढील पिढ्या (लगेच नाही पण काही काळाने) जीवनसंघर्षाला मुकतील व त्यांची जगण्याची नैसर्गिक शक्तिच गमावून बसतील (जसे लॅबोरेटरीमधील उंदीर निसर्गातल्या उंदरांइतके बिलकुल चपळ नसतात- त्यांना पिंजर्यातून बाहेर सोडले तर ते स्वतःचा बचाव करुच शकत नाही ) हे पूर्णपणे वैयक्तिक मत, कोणाला एखादे वेळेस आवडणारही नाही...... याठिकाणी का लिहितो आहे असंही वाटलं - पण परत असे वाटले की हे कोणीतरी लिहायला पाहिजे......
ईडन गार्डन, ऑकलंड
ऑकलंड शहरातच एका टेकडीवर ईडन गार्डन ही बाग निर्माण केली आहे. इथे आधी दगडाची खाण होती. ती बंद पडल्यावर एका खाजगी संस्थेमार्फत ईथे उद्यान विकसित केले गेले आहे.
तिकिटाच्या ऐवजी आपल्याला बागेचा नकाशाच मिळतो. तिथे ऋतूमानानुसार वेगवेगळी फुले फुलतात. सध्या लिटिल किसेस नावाची देखणी फुले आहेत (जानेवारी २०१२ ) तिथे ट्यूलिप्स पण भरभरुन फुलतात (साधारणपणे संप्टेंबर मधे)
बागात व्यवस्थित आखलेल्या वाटा आहेत. आपण त्या मार्गे डोंगरावर जाऊ शकतो. चढ जरा तीव्र आहे.
पण तशा सूचना तिथे आहेतच. (तब्येत ठिक आहे ना ? पायात बूट आहेत ना ? वगैरे.
तिथे अनवाणी चालण्याची फॅशन आहे. मी पण तिथे तसाच भटकायचो,)
वाटेत अनेक ठिकाणी विश्रामाच्या जागा आहेत. त्यांची योजना एवढी चपखल जागी
आहेकि तिथून हलावेसेच वाटत नाही. वरती पोहोचल्यावर शहराच्या एका भागाचे
विहंगम दृष्य दिसते.
तिथे मला एक ८ फूट वाढलेला तेरडा दिसला. फुले आपल्या तेरड्यासारखीच होती.
त्यांचा राष्ट्रीय वृक्ष पोहोतुकावा, त्यालाच ते क्रिसमस फ्लॉवर असेही म्हणतात कारण त्या सुमारास त्याला लाल फुलांचा बहर येतो. त्या दिवसात सगळीकडे तोच दिसतो. सध्या अर्थातच त्याचा बहर ओसरलाय.
बागेतच एक छोटेसे हॉटेल आणि स्वच्छतागृह आहे. दोन्हीही उत्तम आहेत.
इथे मी मोजकेच फोटो देतोय, फेसबुकवर बरेच टाकलेत. अवश्य बघा
http://www.facebook.com/media/set/?set=a.10150593360983470.409713.703983...
5.
7.
8. पोहोतुकावा
12.
13.
14.
15.
16.
17.
18.
19.
21.
22.
23.
24.
25.
26.
27.
28.
29.
30.
31.
32.
33.
34. गेटच्या बाहेर डोके काढून टाटा करणारी हि फुले, परत कधी येणार,,, असेच विचारत होती.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.