https://www.maayboli.com/node/44399
तर चला मंडळी माझ्याबरोबर स्विस टुअरला. हि केवळ एक झलक. ( जसजसा वेळ मिळेल तसतसा या प्रत्येक जागेचे भरपूर फोटो दाखवीनच. )
सुरवात करुया फुलांपासून. डोळे भरून फुले बघितली, भरपूर फोटो काढलेत.
हि आहे आर गॉर्ज. यावेळची ट्रिप खास करुन या जागेसाठी होती.
४० मिनिटे या अरुंद गॉर्जमधून या खळाळत्या नदीच्या सोबतीने आपण जाऊ.
दहाएक मीटर खोल असलेली हि नदी खुप वेगात आपल्या पायगती वहात राहते.
हे आहे एक धरण 
आयूष्यात पहिल्यांदा हिमनग बघितले मी.
ही आहे एक ग्लेशियर. आपण हिच्या पोटातही जाऊ शकतो.
हा आहे इतिहासकालीन डेव्हील्स ब्रिज.
गुलाबासाठी प्रसिद्ध असलेले, रॅपर्सव्हील
नमुना म्हणून केवळ एक गुलाब.
हे आहे वडूझ गाव. ( हो याच नावाचे गाव आहे हे. )
त्यांच्या परिकथेचा संदर्भ असलेले एक गाव, हैदीलँड
हे आहे त्यांचे सर्वोच्च शिखर, जुंगफ्रॉव
हा र्हाईन नदीवरचा धबधबा, आपण त्या मधल्या सुळक्यावर पण जाणार आहोत.
आणि मग झुरीकमधल्या या सुंदर नदीच्या काठी, पाण्यात पाय बुडवून निवांत बसणार आहोत.
सर्व भारतीयांच्या लाडक्या टिटलीसच्या वाटेवर.
टिटलीसच्या शिखरावर.
त्याच्या पायथ्याची एक नदी.
हा देखील एक इतिहासकालीन पूल, लुझर्न गावचा. सर्व फुले खरी आहेत का तेदेखील बघूच.
आणि मग स्विस आल्प्सवरून उड्डाण करत परतही येऊ.
तर चला !
. स्विस जितकं प्रत्यक्षात सुंदर आहे, तितकंच तुमच्या कॅमेर्यातूनही उतरलंय.. ते अरुंद गॉर्ज म्हणजेच ग्लेशियर शुक ना? आधीच्या ट्रिप्सच्या वेळी मिसलं होतं. मागच्या वेळी चुकून त्याचा शोध लागला. टुरिस्ट इन्फॉर्मेशन काउंटरवरच्याने या जागेविषयी सजेस्ट केलं. आम्ही दुसरीच माहिती विचारायला गेलो होतो.. काय प्रकार आहे म्हणून सहज पहायला गेलो, तर बापरे! स्वर्गातच पोहोचल्यासारखं वाटलं एकदम! उन्हाळ्यात गेलो असल्याने बाहेर नॉर्मल तापमान आणि इथे आत एकदम थंड! पाण्याचा कसला तो दुधाळ रंग.. चहूबाजूला पसरलेले काळे खडक (त्यातले काही क्वार्ट्झ ही होते!) त्या ठिकाणाहून कधीच बाहेर पडू नये. असे वाटत होते. जसे काही याच्या पलिकडे जगच नाही..अशी जादूई दैवी जागा आहे ती.. तिच्या नुसत्या आठवणीनेच व्याकूळ व्हायला झाले.
अरे वा खुपच छान.गॉर्ज आणि तो फॉल बघायचा राहिला आहे अजुन. तुमचे फोटो अगदि मस्तच.
हा माझा झब्बु.
हा त्या पुलावर काहितरि वाद्य वाजत होता.
ईटरलेकन.



हि युंगफ्राउवरिल आईस केव्ह.


इन टु द आल्प्स - आर गॉर्ज
तर आता एकेक स्थळाला सवडीने भेट देऊ या. स्विसला गेल्यावर आपले वास्तव्य जर झुरीक मधे असले तर
या सहलींना जाणे सोपे पडते. विमानतळावरुन रेल्वेने थेट झुरीक स्टेशनला जाता
येते. ( विमानतळ म्हणजे फ्लुगाहफेन मग ओर्लिकॉन आणि मग झुरीक स्टेशन )
हॉटेल जर याच भागात असले तर उत्तम.
झुरीक स्टेशनसमोरचा एकच रस्ता दिवसभर गजबजलेला असतो. पण आजूबाजूचे भाग दिवसाही निवांत असतात.
आपल्याला या सहली भारतातूनही बूक करता येतात पण तिथे गेल्यावर सगळी माहितीपत्रके बघून सहली निवडल्याच चांगले. तसे स्विसमधे कुठल्याही भागात बसने / ट्रेनने जाणे अवघड नाही. पण जर सहलींने गेलो तर तिकिटासाठी धावपळ वाचतेच शिवाय तिथले उत्तम गाईडस आपल्याला सुंदर माहिती देत राहतात.
स्टेशनजवळच एका मोठ्या पटांगणातून या सहली निघतात. बेस्ट ऑफ स्वित्झर्लंड आणि ग्रे लाईन या दोन कंपन्या तिथून सहली काढतात. त्यांच्या वेळा काटेकोर पाळाव्या लागतात कारण ठरल्या मिनिटाला बस तिथून निघते.
तर आज आपण जाऊ, इन टू द आल्प्स या सहलीवर. या सहलीचा पहिला टप्पा म्हणजे आर गॉर्ज.
या जागेबद्दल फारशी माहिती नेटवरही नाही. पण या जागेचा एखादा फोटो तुम्हाला भारून टाकू शकतो.
आणि आता तिथे जाऊन आल्यावर मला आवर्जून सांगावेसे वाटते, कि फोटोतूनही त्या जागेची नीट्शी कल्पना
येत नाही.
आर हे एका नदीचे नाव. अनेक वर्षांपासून तिने एका डोंगराला भेदत एक अरुंद दरी निर्माण केलीय. एरवी अश्या
दरीत शिरणे धोकादायक असू शकते. पण स्विस तंत्रज्ञांनी गेल्या शतकापासूनच हि भक्कम पायवाट
तयार केली आहे. आजही तिची देखभाल त्याच तर्हेने करतात.
हि वाट अगदी सोपी आहे. साधारण ४० मिनिटात आपण ती पार करू शकतो. शेवटच्या
टप्प्यात किंचीत चढ आहे. दोन्ही बाजूंना खायची प्यायची सोय आहे. दोन्ही
बाजूंना ( जरा पायपीट करायची तयारी असेल तर )
रेल्वे स्टेशन्स आहेत. ( रेल्वे मात्र गॉर्ज मधून न जाता, स्वतंत्र बोगद्यातून जाते. )
स्विसमधे जायला जुलै / ऑगस्ट हे महीने सर्वात चांगले कारण हा त्यांचा
उन्हाळा असतो आणि सगळीकडे मस्त वातावरण असते. फुले तर असंख्य असतात. मला या
फुलांसाठी वेगळे बाफ काढावे लागतील पण
अगदी खास फुलांचे फोटो इथेच देतो.
तर चला...
झुरीक मधून बाहेर पडल्यावर अशी सुंदर निसर्गदृष्ये दिसू लागतात.
एका कड्यावर थांबल्यावर पायाशी दिसलेली हि फुले.
आल्प्सचे प्रथम दर्शन
हा फोटो खास लाजो साठी. या ठिकाणी MERINGUES चा शोध लागला, असे सांगितले.
आणि हा फोटो निंबुडासाठी. या जागेचा संदर्भ शेर्लॉक होम्सच्या कथेत आला आहे असे सांगितले. कोपर्यात त्याचा पुतळाही दिसतोय.
आणि हे एक खास फुल.
गॉर्जमधून बाहेर पडणारी हि आर नदी.
या बोगद्यातून आपण गॉर्जमधे शिरतो
इथून या पायवाटेला सुरवात होते.
या ठिकाणी हि गॉर्ज जेमतेम मीटरभर रुंद आहे.
मग हि वाट अदृष्य झाल्यासारखी वाटते.
मग वाट दिसूही लागते.
बाहेरचे आणि आतले तपमान यात फरक असल्याने, नदीवर धुकेही असते.
या वाटेची माहिती देणाला फलक.
या वाटेवर काही बोगदेही लागतात. अंधार पडल्यावर इथे खास प्रकाशयोजना असते.
बोगद्यातून दिसणारे धुके
धुक्याच्या सानिध्यात
या गॉर्जच्या भिंतीही चांगल्याच उंच आहेत. काही ठिकाणी त्या २०० मीटर्स उंच आहेत. डोक्यावर आकाशाचा अरुंद पट्टा दिसत राहतो.
मधेच ही गॉर्ज थोडी तिरकस आहे.
पाण्याचा प्रवाह खोल आहे. आणि त्याचा सदोदीत आवाज येत राहतो. ( पण अजिबात दुर्गंधी येत नाही )
हि पायवाट सोडून जायचे नाही अशा सुचना दिलेल्या असतात आणि ते पाळण्यातच आपले हित असते.
( सहल संयोजक, आपण गॉर्जमधे आपल्या जबाबदारीवर जातोय, असे लेखी निवेदन घेतात. )
वाटेत एक धबधबा दिसतो. त्याची माहीती.
आणि हा प्रत्यक्ष धबधबा.
त्या धबधब्यानंतर हि गॉर्ज थोडी रुंद होते.
खळखळ वाहणारे पाणी.
अत्यंत जबाबदारीने वावरणारे पर्यटक. कुठेही ढकला ढकली होत नाही.
मग आपल्याला शेवट दिसू लागतो, तरी तो तसा दूरच आहे.
मग आपण प्रवाहापासून थोडेसे वर चढत जातो.
ग्लेशियर मिल.. म्हणजे थोडक्यात मोठा रांजण खळगा.
~
ग्लेशियर मिलची माहिती
उंच कडे
मला आवडलेली एक फ्रेम.
शेवट आल्यावर आपल्याला थोडा चढाव लागतो.
तिथली पार्किंग लॉट. इथली जागा जरा कमी असल्याने, केवळ लहान गटांच्या सहलीच इथे आणल्या जातात.
तिथले एक झोकदार वळण
ती गॉर्ज सोडताना, मन उदास होते. मागे वळून पाहताना..
समोरून येणारी नदी आणि तिच्यावरचा पूल
पुढे रेल्वे ट्रॅक आणि स्टेशनचा परीसर दिसतोय.
तिथे रस्त्याच्या कडेला उगवलेली निळी फुले.
या ठिकाणाहून आपण बाहेर पडतो. या दरवाज्यातून बाहेर न पडता त्याच तिकिटात आपण परत जाऊ शकतो.
एकदा तरी भेट द्यावीच अशी हि जागा आहे. परत एकदा रेल्वेने तिथे जावेसे वाटतेय.
स्वित्झर्लंडला गेल्यावर भरपूरच फिरायला लागतं. त्याकरता सरळ एक स्विस पास घेऊन टाकायचा. ट्रेन, बस, ट्रॅम सगळीकडे पुन्हा पुन्हा तिकीटं काढायला लागत नाहीत.
स्टेशनवर चौकशी खिडकीत आपलं त्या दिवसाचं डेस्टिनेशन सांगितलं की गाडी किती वाजता, कोणत्या प्लॅटफॉर्मवरून निघणार, पुढे कोणत्या ठिकाणी स्टेशन बदलायचे आणि तिथेही कोणत्या प्लॅटफॉर्मवरून किती वाजता गाडी पकडायची ते परतीच्या प्रवासाची सगळी आखणी करून, प्रिंटआऊट काढून हातात देतात. एकदम शिस्तशीर काम. ट्रेनही सेकंदाबरहुकुम वेळेवर येते.
फर्स्टक्लास, सेकंडक्लास सारखाच असतो. फक्त फर्स्टक्लासमध्ये गर्दी कमी आणि पैसे जास्त.
ट्रेनमध्ये अनाउन्समेंट करताना फ्रेंचमध्ये "पुश्शिनाहे" असं म्हणत
राहतात ते पहिल्यांदा मजेचं (आणि नंतर कंटाळवाणं होतं). त्याचा अर्थ पुढचं
स्टेशन!
बरेचजणं स्वित्झर्लंडमध्ये एकाच शहरात राहून पूर्ण देशभर फिरतात. ते शक्य असलं तरी ट्रेनचा प्रवास खूप करावा लागतो. आम्ही गेलो होतो तेव्हा (जिनिव्हा एअरपोर्टला उतरून) मॉंत्र्यु, झरमॅट, ल्युसर्न आणि झुरीक (येथूनच परतीचं विमान) असा प्रवास आखला होता. त्या त्या ठिकाणाहून आजूबाजूची ठिकाणं पाहणं सोपं जातं. माँत्र्युहूनच गोल्डनपास एक्स्प्रेस निघते तर झरमॅटहून ग्लेशियर एक्स्प्रेस निघते.
ग्रुएर येथिल चीज फॅक्टरी आणि अतिसुरेखसं मेडीएवल शहर पाहून मॉंत्र्युला परत येताना त्या स्टेशनवर योगायोगानं गोल्डनपास ट्रेनमध्ये बसलो. ती परतीच्या मार्गावर होती आणि टुरीस्ट सीझन सुरू झाला नव्हता त्यामुळे (पुन्हा योगायोगानंच) पहिल्या डब्यात चढलो आणि जॅकपॉटच लागला.
काही गोल्डनपास ट्रेन्समध्ये हा पहिला डबा फर्स्टक्लासचा असतो आणि मोटरमन वरच्या मजल्यावर बसलेला असतो. डब्याला पुढे फक्त काच आणि त्यातून पहिल्या रांगेतल्या सहा सीटसना अप्रतिम दृष्य दिसतं. डब्यात आम्हीच तिघं होतो (आमच्याकडे फर्स्टक्लासचा स्विसपास होता नाहीतर चढू दिलं नसतं कारण या डब्याकरता एक स्पेशल अटेंडट होती) आणि रात्र झाली असली तरी तो अनुभव केवळ अदभुत होता. या सीटस आधीच बुक कराव्या लागतात आणि थोडा प्रिमीयमही द्यावा लागतो. नंतर दिवसा प्रवास करावा म्हणून आम्ही चौकशी केली तर सीटस ऑलरेडी भरल्या होत्या.
स्विसची ट्रान्सपोर्ट सिस्टीम तर अगदी झक्कास आहे. आणि हवी ती माहिती सहज उपलब्ध असते.
अगदी साधे तिकिट काढले तरी, लगेच असणार्या गाड्यांचे टाईमटेबल हातात देतात.
तुमचा सिझन अगदी जराश्याने चुकला. यावर्षी त्यांचा उन्हाळा नेहमीपेक्षा नंतर सुरु झाला. काही ठिकाणचे रस्त्यावरचे बर्फ अजून तसेच होते. ऑगस्ट पासून परत बर्फ पडायला सुरवात होईल असे कळले. ते ऑक्टोबरमधे थोडेसे कमी होते.
यावेळेस चीज / चॉकलेट फॅक्टरी टाळलीच. म्यूझियम पण बघायचे बाकी ठेवले.
त्याला पुर्ण दिवस हवा आणि बाहेर इतका सळसळता निसर्ग असताना.. शिवाय
मोजक्या दिवसात सगळे बसवायचे होते ना !
माझ्या व्हीसा अॅप्लिकेशनमधे थोडा तांत्रिक प्रॉब्लेम होता. अर्ज
करण्यापुर्वी मी भारतात ६ महिने नव्हतो, त्यामूळे अर्ज प्रिटोरियाला करायला
हवा होता. पण मी प्रत्यक्ष जाऊन माझी बाजू मांडली. बारकासा इंटरव्ह्यू
झाला, पण व्हीसा मिळाला.
तुमच्या आधीच्या स्विस वर्णनात तुम्ही एकच गॉर्जचा फोटो दाखवला होता आणि तो मी पाहिलेल्या गॉर्जशी मिळताजुळता होता. मात्र, हे फोटो पाहिल्यावर लक्षात आलं, की मी ग्रिन्डेलवाल्ड मधल्या ग्लेत्शरश्लुकला (ग्लेत्शर गॉर्ज) गेले होते. आर गॉर्ज आणि तो वेगवेगळे आहेत. ग्रिन्डेलवाल्डच्या गॉर्जच्या बाहेरच्या बाजूला एक छोटेसे क्रिस्टल म्युझिअम आहे. हे गॉर्ज तसे बर्यापैकी निर्जन ठिकाणी वसलेले आहे. आम्ही तिकडे कारने गेलो असल्याने आणि इतरही लोक तसेच- पर्सनल कारने आलेले दिसले त्यामुळे पब्लिक ट्रान्स्पोर्टच्या व्यवस्थेची कल्पना नाही. तिथेही चालण्यासाठी अशीच लाकडी वाट बनवलेली होती.
इन टु द आल्प्स - र्होन ग्लेशियर
आर गॉर्जच्या अविस्मरणीय अनुभवानंतर आपण र्होन ग्लेशियरकडे जाणार आहोत. या साठी आपल्याला
ग्रिमसेल पास, फुरका पास इथून जावे लागणार आहे. ग्लेशियर नुसती लांबूनच नाही बघायची तर अगदी तिच्या पोटातल्या निळाईत शिरायचे आहे.
इथे आपल्याला एकावर एक अशी दोन धरणे लागणार आहेत. त्या धरणाच्या बॅकवॉटरमधल्या बेटावर आपण जाऊ.
इथे आणखी एक मजेशीर गोष्ट कळली. इथे खालच्या धरणातले पाणी एकदा वीजनिर्मिती
झाल्यावर परत वरच्या धरणात पंपाने नेतात. आता यात आपल्याला काहीतरी
खटकणारच कारण पंपासाठी परत वीज वापरावी
लागणार. पण ज्या काळात वीजेची मागणी जास्त असते त्या काळात असे पंपाने वर
पाणी नेणे त्यांना परवडते कारण त्या पीक अवर्स मधे वीजेचा दरही जास्त
असतो. शिवाय असे केल्याने पाणी गोठत नाही.
त्या दोन धरणावरचे एक सरोवर मात्र हिवाळ्यात गोठते. या उन्हाळ्यातही आपल्याला तिथे हिमनग दिसतील.
स्विसमधल्या ग्लेशियर एक्स्प्रेस बद्दल वाचले असेलच. तिचा एकंदर प्रवास साडेसात तासाचा असल्याने आपल्याकडे तेवढा वेळ नाही. ( नाव जरी एक्स्प्रेस असले तरी ती तशी संथपणेच जाते आणि ती ज्या परीसरातून जाते तिथले प्रत्येक दृष्य देखणे आहे. यू ट्यूबवर तो प्रवास आहे. )
सध्या जी ग्लेशियर एकस्प्रेस आहे ती आधुनिक आहे आणि तिचा बराचसा प्रवास बोगद्यातून होतो. पण एक
फायदा असा कि ती वर्षभर चालू असते. त्या पुर्वीची ग्लेशियर एकस्प्रेस
जमिनीवरून जात असे पण ति केवळ उन्हाळ्यात म्हणजेच २/३ महिनेच चालत असे.
आधुनिक ट्रॅक बनल्यावर जुनी मोडीत निघाली पण तिचे ट्रॅक्स शाबूत होतेच.
स्विसमधल्या हौशी लोकांना तिची फार आठवण येत असे म्हणून त्यांनी मोडीत
निघालेली इंजिन्स, व्हीएटनाम वरुन परत आणली आणि केवळ हौसेखातर ( अर्थात
केवळ उन्हाळ्यात, आणि वीकेंड्सनाच ) ती परत चालवली जातेय.
ती जिथे संपत असे तिथेच ही ग्लेशियर संपत असे पण आता, ती थोडी मागे सरकलीय.
हे आहे ते धरण. यापले पाणी शेवाळामूळे नाही तर खनिजांमूळे हिरवे दिसतेय.
हे वरचे धरण
आपण त्या धरणावरच्या बेटावर आहोत. पुर्वी कामगारांसाठी बांधलेले हॉस्टेलचे आता हॉटेल जालेय.
धरणाच्या पाण्याच्या पातळी पर्यंत जायची सोय आहे. धरणाच्या सुरक्षिततेचा फारसा बाऊ केलेला दिसत नाही.
कदाचित छुपे कॅमेरे असतील.
वर जायचा रस्ता
बर्फाचे तळे
तळ्याचा रम्य परीसर
तळ्यातला हिमनग. याच्या पाठीवर बसून सफरीवर निघावे असे वाटतेय ना ?
तिथेच खालच्या पातळीवर आणखी एक सरोवर आहे.
इथे फार रेंगाळता येणार नाही, पावसाची लक्षणे दिसताहेत आणि आपल्यावर पार तिकडे जायचे आहे.
वरुन दिसणारी र्होन नदी
शिट्ट्या वाजवून हे साहेब आपले स्वागत करतात 
रस्त्याला समांतर जाणारा दिसतोय तो जुन्या ग्लेशियर एक्स्प्रेसचा ट्रॅक.
र्होन ग्लेशियरचे प्रथम दर्शन. असे एखादे दृष्य मी आयुष्यात कधीतरी प्रत्यक्ष बघेन, असे माझे स्वप्न होते.
वरुन काळीकबरी दिसणारी हि ग्लेशियर पोटात अथांग निळाई बाळगून आहे. ( आपण जाणार आहोत तिथे. )
खाली जायला अत्यंत सुरक्षित अशी वाट आहे. ( वाट सोडली नाही तरच
)
इथे आपण जरा रेंगाळू, दूरवरचे दृष्य मनात साठवून घेऊ.
बर्फाच्या अंतरंगात एक प्रकारची अल्गी वाढते आणि तिच्यामूळे बर्फाला असा सुंदर गुलाबी रंग येतो.
ग्लेशियरच्या पोटात एक गुहा केली आहे. चक्क १०० मीटर्स आत जाऊ शकतो आपण. हातात हातमोजे मात्र लागतील.
पायाखाली भक्कम आधार आहे.
हा तिथला नैसर्गिक रंग आहे. मी फ्लॅश वापरलेला नाही. ( तो माणूसही खरा आहे
)
वाटेला कठडा नाही पण अवघड चढावर अगदी सहज एकमेकांना हात दिला जातो. तिथल्या जादुई वातावरणात, समोर दिसणारी प्रत्येक व्यक्ती मित्र होऊन जाते.
पहिल्या फोटोत लक्षात आले नसेल तर आता नीट बघा. या सर्व गुहेवर पांढर्या कापडाचे आच्छादन आहे.
अर्थात सुरक्षिततेसाठी. आपल्या आणि ग्लेशियरच्याही !
आणि त्या परीसरातही अशी देखणी फुले फुललेली आहेत. अगदी त्या वाटेवरच !
तिथे एक सुंदर हॉटेलही आहे. इथे बसून आपण मस्तपैकी हॉट चॉकलेट पिऊ.
तिथले सुंदर फर्निचर
हि बस एका जर्मन हौशी ग्रुपची आहे. आत सर्व सुविधा आहेत आणि तो ग्रुप हि बस घेऊन थेट हिमालयापर्यंत येत असतो.
बघा पावसाने गाठलेच आपल्याला.
परत एकदा र्होनचे दर्शन !
हाऊ ग्रीन इज दॅट व्हॅली 
इन टु द आल्प्स - डेविल्स ब्रिज
र्होन ग्लेशियरलाच आम्हाला पावसाने गाठले होते. त्यामूळे डेविल्स ब्रिज पावसातच बघावा लागला. पावसाला मी भित नसलो तरी कॅमेरा मात्र जपावा लागत होता. त्यामूळे अर्थातच फोटो काढण्यावर मर्यादा आली.
खरं तर हा एक पूल आहे पण त्यामागे मोठा इतिहास आहे. उत्तर युरपमधून दक्षिणेकडे जाताना, खास करुन इतालीकडे जाताना एक नदी Reuss River पार करावी लागते. या भागात हि नदी एका खोल गॉर्ज मधून Schöllenen Gorge वाहते.
व्यापारासाठी ती पार करण्यासाठी म्हणून सन १२३० मधे पहिला लाकडी पूल बांधण्यात आला. पण तो वारंवार कोसळत असे. सोळाव्या शतकात पहिल्यांदा तिथे दगडी पूल बांधण्यात आला. १७९९ मधल्या इताली आणि स्विस लढाईत तो पूर्णपणे कोसळला आणि पर्यायी मार्ग शोधण्यात आला.
पुढे तो परत बांधायला सुरवात झाली पण तो वारंवार कोसळत असे. त्याच काळात एक मिथक निर्माण झाले आणि त्यावरूनच या पूलाला हे नाव पडले. मी ऐकलेले व्हर्जन असे. (नेटवरचे वेगळे आहे. )
हा ब्रिज बांधता येत नसल्याने तिथल्या गावप्रमुख म्हणाला, केवळ सैतानच हा बांधू शकेल. ते नेमके सैतानाने ऐकले. तो बांधून द्यायला तयार झाला पण त्याने अट घातली, या पूलावरून जाणार्या पहिल्या व्यापार्याचा मी बळी घेणार. गावाने हि अट मान्य केली पण सैतानाने पूल बांधल्यावर मात्र कुणी त्यावरून जायला तयार होईना.
शेवटी गावप्रमुखाची सुंदर मुलगी त्यावरून जायला तयार झाली. तिच्या
सौंदर्यावर सैतान भाळला आणि तिचा बळी घेण्यासाठी हाती घेतलेली शिळा त्याने
दूर भिरकावली ( २२० टनाची हि शिळा आजही खालच्या भागात दिसते. आपण ती
पुढच्या भागात बघू. ) हि कथा आमच्या गाईडने आम्हाला ऐकवली. नेटवर एका
बकर्याचा उल्लेख आहे. ( युरपमधल्या अनेक पुलांना डेविल्स ब्रिज म्हणतात आणि प्रत्येक पूलाशी निगडीत एक कथा असते. )
पुढे रहदारी वाढली तशी याच पूलावर आणखी एक पूल बांधण्यात आला. पण जून्या पूलाला धक्का लावलेला
नाही.
अजूनही ती गॉर्ज उरात धडकी भरवतेच. सध्या त्या नदीला कमी पाणी आहे पण ज्यावेळी बर्फ वितळत
असेल त्या वेळी नक्कीच पूर येत असणार.
आजूबाजूच्या डोंगरातून अनेक बोगदे केलेले आहेत आणि तिथून आपण या पूलाचे
सर्व कोनातून दर्शन घेऊ शकतो. स्विस लोकांना डोंगर पोखरायची जणू हौसच आहे,
आणि आमचे सगळे डोंगर आतून पोकळ आहेत
असे ते गमतीने म्हणतात.
ज्यावेळी जग अणुयुद्धाच्या छायेत होते त्या काळात, नवीन घर बांधणार्याने एक बंकरही तयार करावा, असा
नियम होता. त्याकाळात निर्माण झालेले अनेक बंकर्स आता गूगल आपला बॅकप डाटा ठेवण्यासाठी वापरते.
( सध्या गूगलचे हेडक्वार्टर्स झुरीक मधे आहे. )
या पूलाभोवतीचा वाटा फक्त माणसांसाठीच आहेत. पण त्या अत्यंत सुरक्षित आहेत. त्या परीसरात, कड्यांवर
खुपच संदर फुले होती. त्यातले केवळ काही नमुनेच इथे पेश करतोय.
या पास जवळच आता तब्बल ५७ किमी लांबीचा एक रेल्वे टनेल बांधून तयार आहे. सध्या त्यात सिक्यूरिटी इक्विपमेंटस बसवण्याचे काम चालू आहे.
तर चला ...
डोक्यावर पावसाचे ढग होतेच
त्या काळात अर्थातच वाहतूक बग्गीतून होत असे. त्या काळातला ड्रेस केलेला एक बग्गीवाला.
खोल गॉर्जमधे जाणारी नदी.
हा डेविल्स ब्रिज
त्या लढाईचे चित्रण करणारे एक पेंटींग तिथे आहे. ( या लढाईवर अनेक चित्रकारांनी चित्रे काढली आहेत. )
जूना आणि नवा पूल
देखणा गुलाबी तूरा
हंडीसारखे फुल
जांभळी फुले
खाली जाणारी नदी
दगडात कोरलेले स्मारक
दोन्ही ब्रिज जरा लांबून
जून्या पूलाकडे येणारा रस्ता
परीसरातली हिरवाई, यातच वरची फुले होती
बंगी जंपिंग.. ( त्या माणसाच्या आकारामूळे पूलाच्या आकाराची कल्पना येईल. )
दूसर्या बाजूने पूल
जरा खालच्या बाजून नदी
नदीकडे जायची वाट..
याबरोबरच पहिली सहल संपली.
हैदीलँड, रॅपर्सविलचे गुलाब
दुसर्या भागात आपण हैदीलँडला जाणार आहोत पण वाटेत रॅपर्सविल या गावी थांबणार आहोत. हा भाग गुलाबांसाठी प्रसिद्ध आहे.
तिथे एक राजवाडा आहे. तो भाग झुरिक लेकला लागूनच आहे. त्यामूळे तलावाचे सुंदर दृष्य राजवाड्याच्या
अंगणातून दिसते. राजवाडा तसा लहानच आहे.
पण माझे लक्ष तिथल्या गुलाबांच्या बागेकडेच होते. राजवाडा मी आधी बघितला
होता, त्यामूळे तिथे जास्त वेळ न काढता मी त्या बागेकडे धावलो. एक नव्हे तर
दोन बागा आहेत तिथे.
ऑकलंड आणि नैरोबी मधले गुलाब बघितल्यानंतर यात काही विशेष नाही असे कुणाला वाटायची शक्यता आहे. पण त्या कुणाला म्हणजे मला नाही 
मला तर प्रत्येक गुलाब सुंदरच दिसतो. त्यामूळे गुलाबांच्या फोटोंचा मारा. तोही दोन भागात 
खरे तर गुलाबात रंग तीनच पांढरा, लाल आणि पिवळा. पण यांचे वेगवेगळे मिश्रण आणि आकार यांची
विविधता काय वर्णावी ? हे खरे तर जोपासलेले गुलाब. आल्प्समधे जंगली गुलाबही ( अल्पाईन रोझेस ) दिसतात. ते मात्र या ३ रंगातच असतात.
नैरोबीप्रमाणेच, इथल्या गुलाबांना सुगंध नव्हता, काही मोजक्याच फुलांना सुगंध होता.
तसे हे गावही अगदी निवांत आहे आणि हेरीटेज म्हणून जपलेही आहे. पण जो मोजका वेळ होता तो मी
या बागेतच घालवला. ( वेळेचे बंधन होते म्हणून बरे नाहीतर मी तिथे हरवलोच
असतो. ) कधी नव्हे ते अगदी प्रखर प्रकाश होता त्यामूळे काही फोटो जरा
जास्तच ब्राईट दिसतील. तसेच प्रदर्शनात असतात तसे हे गुलाब काही खास
डिस्प्ले ला ठेवलेले नव्हते त्यामूळे कळ्यांचा "अडसर" आहे, काही फोटोत.
या सहलीत मला मूळचे पुण्याचे पण आता स्कॉटलंडमधे स्थायिक झालेले प्रा.
आफळे भेटले. त्यांच्या सौभाग्यवती मायबोलीच्या वाचक आहेत आणि
प्राध्यापकांची आणि माझी भेट झाली, याचा त्यांना
आनंद झाला असे प्राध्यापकांनी आवर्जून कळवले.
आणखी एक खास म्हणजे. पुर्वी मी स्विसला गेलो कि नाजूक भरतकाम केलेले रुमाल आणत असे. तसे यावेळेस कुठेच दिसले नाहीत. कुणाला विचारायच्या आधीच त्याचे कारण कळले.
स्विसमधे बंद पडलेल्या कापडगिरण्या बर्याच दिसत राहतात. अर्थात
कापड्गिरणी म्हंटल्यावर आपल्या नजरेसमोर येते तसे ते दृष्य नसते. ( म्हणजे
त्रिकोणी छप्परे आणि चिमणी ) या इमारती साध्याच पण सुबक आहेत. गेल्या
शतकातच तिथे कापड उद्योग भरभराटीला आला होता. त्या गिरण्या पाण्याची
वाहत्या पाण्याची शक्ती वापरून चालवल्या जात असत. पण आता कामगारांचे वेतन
परवडत नसल्याने, सर्वच गिरण्या बंद पडल्या आहेत. तिथे मिळणारे बहुतेक कपडे
भारतातून किंवा चीनमधून आलेले असतात. आणि हे
ते गाईड अगदी प्रामाणिकपणे सांगतात. त्यामूळे यावेळेस भाचेनातीसाठी मोजे सोडल्यास, तशी खरेदी झालीच नाही.
नाही म्हणायला एक उद्योग मात्र स्विसकडे अजून आहे आणि आपण सर्वांनी त्याचा लाभ घेतलेला आहे.
बहुतेक विमानातली सीट कव्हर्स अजूनही स्विस मेड असतात कारण अग्निविरोधी कापडाचे एकाधिकार
अजून त्यांच्याकडे आहेत.
एक वेगळे फुल
1
2
3
4
राजवाड्याचा दर्शनी भाग
तिथे सावलीसाठी ( बहुतेक ) असा उलटा डोम आहे.
राजवाड्याचा सज्जा / जिना
राजवाड्यातला गालिचा
डोमची सावली
नको विसरू संकेत मिलनाचा, तृषित आहे मी तुझ्या दर्शनाचा... हे गाणे म्हणायची जागा 
तिथून दिसणारे लेक झुरिक
बागेचे पहिले दर्शन
६
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19 अशी भाऊगर्दी असल्यावर एकच कसे निवडायचे ?
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
हैदीलँड, रॅपर्सविलचे गुलाब, क्लोज अप्स
तिथे जितका वेळ होतो तितका वेळ प्रखर प्रकाशच होता, त्यामूळे अर्थातच काही रंग भडक वाटतील.
पण मी जे रंग बघितले तसे तुम्हाला दिसावेत म्हणून, फारसे प्रोसेसिंग केलेले नाही.
( पुढे मात्र वातावरण प्रसन्न झाले. हैडीलँड ला तर गडगडासह पाऊस पडला ! )
4
7
8
10
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
हैदीलँड, रॅपर्सविल ते वडुझ, एक नयनरम्य रस्ता
रॅपर्स्विल सोडल्यानंतर पुढचे ठिकाण होते वडूझ. Vaduz.
याच नावाचे गाव महाराष्ट्रात पण आहे.
तिथे आपण पुढच्या भागात जाणार आहोत. या भागात मात्र केवळ रस्त्याचे फोटो. कधीही संपू नये असे वाटेल
असा हा रस्ता.
अत्यंत आरामदायी बस, सुंदर रस्ता, कुशल चालक.. आणखी काय पाहिजे. प्रत्येक वळणावर सुंदर दृष्य समोर
येत होते.
सध्या फारच कमी शेती होते तिथे. बहुतेक चराऊ कुरणेच आहेत. या काळात बर्फ वितळल्यामूळे गायींना
वर डोंगरात चरायला नेतात आणि खालच्या भागातला चारा कापून ठेवतात. गायींना वर नेणे आणि आणणे
अर्थातच उत्सवी असते.
पण तिथली शेती अशी ३/४ महिन्यांचीच. त्यामूळे शेतकरी शेती न करता, एखाद्या कारखान्यात काम करणे
पसंत करतात. तिथे त्यांना वर्षभर काम असते.
तर चला, सीट बेल्ट बांधा. डुलकी मात्र येऊ देऊ नका.. प्लेन शिफॉनमधली एखादी सुंदर तरूणी दिसूही शकेल.. पुढे काय होतं ते माहीत आहेच.
1
2
3
4
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
27
28
29
30
31
32
हैदीलँड, वडुझ एका चिमुकल्या देशाची राजधानी
वडुझ हि Liechtenstein देशाची राजधानी. हा देश अगदी चिमुकला. इथे जायला वेगळा व्हीसा लागत नाही.
तूम्हाला हवा असल्यास पासपोर्टवर त्या देशाचा शिक्का मारून देतात.
हा देश स्वित्झर्लंड पासून स्वतंत्र आहे. अजूनही इथे राजघराणे आहे, त्यांचा मोठा राजवाडा उंचावर आहे आणि त्याची प्रतिकृती खाली आहे.
इथेच छोटीशी टॉय ट्रेनही आहे पण रेल्वे स्टेशन मात्र २ किमीवर आहे. एक
चर्च, काही प्रशासकीय इमारती, म्यूझियम, पार्किंग लॉट एवढाच पसारा. पण आहे
ते अत्यंत देखणे. इथल्या इमारतीत सरळ रेषांचा वापर जास्त आहे. त्या
वेगळेपणामूळे त्या खासच भासतात.
हा देश तसा पर्यटकांवरच अवलंबून आहे, आणि ते इथे भरपूर असतात. तरीही कुठेही गडबड गोंधळ अजिबात नसतोच. मी आधीही इथे गेलो होतो, तरी परत जावेसे वाटले.
1
2
3.
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
हैदीलँड, हैदीलँड
या
सहलीचा शेवटचा टप्पा आहे हैदीलॅंड. हा हैदी म्हणजे एका स्विस परीकथेचा
नायक. त्याची कथा म्हणजे तशी नेहमीचीच.. अनाथ मुलगा, त्याची सावत्र आई
वगैरे. पण ही कथा ज्या परीसरात घडली असे मानतात, ती
जागा म्हणजे हैदीलँड.
परत परत जावेसे वाटावे अशी ही जागा. तुमचे नाव हैदी किंवा पीटर असेल तर इथे तुम्हाला एक चॉकलेट बक्षीस मिळते.
कथा मी नीट ऐकली नाही. विस्तीर्ण कुरणे, त्यात चरणार्या गायी, फळांनी लगडलेली चेरी / पेअर्स / सफरचंदाची झाडे, सभोवार फुललेली अनोखी फुले, देखण्या पायवाटा, सुबक पुष्करणी, विस्तीर्ण दरीकडे बघत निवांत बसावे अशी जागा..(. परीराज्य आणखी काय वेगळे असते हो ? )
आणि मग ढग दाटून आले, गडगडासह पाऊस पडू लागला, तर तुम्ही पण माझ्याबरोबर हुदडायला यालच ना ?
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
युंगफ्राऊ, Jungfrau
आज आपण टॉप ऑफ युरप, युंगफ्राऊ / यंगफ्राऊ ला जाऊ.
बहुतेक सहली झुरीक रेल्वे स्टेशनजवळच्या एका मैदानातूनच सुटतात. युरपमधील इतर देशांतून येणार्या / जाणार्या बसेसही इथेच येतात.
आधी बूक केले असेल तर प्रश्नच नाही पण आयत्यावेळीही जागा असल्यास टुअर घेता
येते. वेळेआधी १० मिनिटे बसमधे बसावे अशी अपेक्षा असते. त्या वेळात
गाईडची ओळख होते. दिवसभराचा कार्यक्रम कळतो.
पण हवी ती सीट मिळवायची असेल तर मात्र अर्धा तास तिथे जाणे उत्तम.
आमची ही बस मस्तपैकी डबलडेकर होती. मी अर्थातच पहिल्यांदा जाऊन वरची फ्रंट सीट पकडली होती.
झुरीक सोडल्याबरोबर मस्त दृष्यांची मालिका नजरेसमोर सरकत राहते.
जुंगफ्राऊला जाण्याआधी १५/२० मिनिटे, इंटरलाकेन ला बस थांबते. तिथे तर
गुलाबांचे ताटवेच आहेत. तिथेच हँगग्लायडर्स बर्यापैकी दिसतात. ( गाईडने
सांगितल्याप्रमाणे त्यात बरेच अपघातही होत असतात. )
जुंगफ्राऊला जाण्यासाठी आपल्याला कॉग व्हील ट्रेनने जावे लागते. या रेल्वेला दोन रुळांच्या मधे आणखी एक
दातेरी रुळ असतो. या हिरव्या पिवळ्या रेल्वेचा प्रवास अविस्मरणीयच ठरतो.
या डब्यांना मोठमोठ्या खिडक्या आहेत आणि त्यातून बाहेर झुकून फोटो काढायला अजिबात हरकत नसते.
या प्रवासाची सुरवातच एका मोठ्या धबधब्याच्या दर्शनाने होते. आणि बघता बघता आपण उंची गाठत
राहतो.
ट्रॅकच्या आजूबाजूला तर रानफुलांची पखरणच असते. दूरवर युंगफ्राऊ दिसत
राहतो. पण अशा ठिकाणी असतो तसा ढगांचा दंगाही असतोच. त्यामूळे ही शिखरे
लपंडाव खेळत राहतात.
याच वाटेवर खुप सुंदर घरे दिसतात. रेल्वेट्रॅकला समांतर असा पायी चालत
जाण्याचा रस्ताही आहे. त्या रस्त्यावर बरीच माणसे चालताना दिसतात. ( मी कधी
जाणार ? ) आणि त्यांच्या चेहर्यावरचा आनंद ओसंडून वहात असतो.
पण हि गाडी थेट वर जात नाही. मधे एका स्टेशनावर गाडी बदलावी लागते. हि दुसरी गाडी आहे लाल रंगाची
ही मात्र थोड्याचा वेळात एका लंबलचक बोगद्यात शिरते. ( मग मात्र काचा बंद कराव्या लागतात.)
हिमालयाच्याच काय लेहलडाखच्या तुलनेतही जुंगफ्राऊची ऊंची ४,१५८ मिटर्स
नगण्य आहे पण एकदम एवढ्या ऊंचीवर जाणे, आपल्याला त्रासदायक ठरु शकते.
म्हणून वाटेत ही गाडी दोनदा थांबते आणि सर्वांनी तिथे उतरून जरा हालचाल
करावी अशी अपेक्षा असते.
या दोन्ही जागाही खुप सुंदर आहेत. तिथल्या खिडक्यांतून खुप सुंदर दृष्य दिसते. या गाडीचे शेवटचे स्टेशनही बोगद्यातच आहे.
आता बाकीचे पुढच्या भागात. सध्या हे फोटो बघा 
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
पण सगळे शॉर्टकट वापरतात, म्हणून शॉर्टकटच प्रचलित झालाय.. आता शॉटकटच उच्चारायला इतका अवघड जातोय तर पूर्ण नावाचं काय व्हायचं? 
धन्स हो दिनेशदा.. पण अवघड वगैरे काही नाही.. जर्मन भाषेतले उच्चार जसा शब्द दिसतो, तसेच करायचे असतात. फ्रेंचसारखं नाही ते- की दिसतंय एक आणि उच्चार भलताच... मात्र जे हे अल्फाबेटच इकडे यॉट असं म्हणवलं जातं. त्यामुळे त्यापासून सुरु होणारे झाडून सगळे शब्द य वरुनच उच्चारले जातात. त्यामुळे एक गंमतच होते इकडे. ज वरुन नाव असणार्या सगळ्यांना य वरुनच हाक मारली जाते. आमचा एक मित्र-जगदिश, त्याला इकडे यगदिशच म्हणतात. तो तरी बिचारा किती लोकांना खरा उच्चार सांगत बसेल? सोडून देतो तो.. त्यामुळे आम्हीही आता त्याला (चिडवत सुरुवात करुन) यगदिशच म्हणायला लागलोय
हा staubacch waterfall चा अजून एक फोटो

आणि Lauterbrunnen vally

हि लाल गाडी अगदी थेट शिखरावर जात नाही. तशी १००० फुटभर खालीच थांबते. त्या शिखरावर त्यांची वेधशाळा आहे. पण जिथे ही गाडी थांबते तिथेही बघण्यासारखे खुपच आहे.
आजूबाजूला अनेक शिखरे दिसत असतात. ढगांचा खेळ चालूच असतो पण आम्ही होतो तोपर्यंत हवामान छानच होते. भटकायला भरपूर मोकळी जागा आहे.
अगदी खाली स्की करणार्यांची गर्दी दिसते. त्यातली माणसे अक्षरशः ठिपक्याएवढीच दिसतात.
ही जागा एका कड्यावर आहे. आजूबाजूला संरक्षक म्हणून खांब आहेत. त्यापलिकडे जाणे खरेच धोक्याचे आहे.
पण तरी तिथे लोक जातच असतात. ( त्यात आपल्या महान देशाचे आणि आपल्या पूर्वेकडील देशांतले लोकच असतात. )
बर्फावर चालताना फारसा त्रास होत नाही आणि तितकिशी थंडीदेखील वाजत नाही. डोळे मात्र शुभ्रता बघून दीपतात.
त्या ठिकाणी काही कावळे पण दिसतात पण अजिबात कचरा नसतो. ( तिथे होणारा कचरा एका खास रासायनिक प्रक्रियेने नष्ट केला जातो. )
तिथेच एक गुहा आहे आणि त्यात काही सुंदर शिल्पं आहेत ( दोन्ही मानवनिर्मित
) खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे. भारतीय जेवण पण मिळते. पण ते जेवण स्विस
हॉटेलमधे घेणे चांगले कारण तिथली सेवा तत्पर आहे. ( बॉलीवूड नावाच्या
हॉटेलमधला कारभार भोंगळ आहे. पुढच्या भागात सविस्तर लिहितो. )
हॉटेलमधल्या खिडकीतूनदेखील उत्तम दृष्य दिसत राहते.
इथल्या गाड्या या खासच आहेत. साधारण पणे टूअर कंपनी एखादा डबा आरक्षित करते. सगळे बसल्यावर ती एक दोन डब्याची गाडी सोडतात. त्यामूळे सर्व डबे भरत बसायची वाट बघावी लागत नाही. याच डब्यात एखाद्या छोट्या गटाची पण स्वतंत्र व्यवस्था होऊ शकते.
येतानाही परत एकदा गाडी बदलावी लागते. या गाडीचा परतीचा मार्ग मात्र वेगळा तरी तितकाच सुंदर आहे.
आम्ही येतानाही ढगांचा दंगा सुरूच होता. त्यामुळे एकाच जागेची एकापाठोपाट घेतलेली प्रकाशचित्रे
वेगवेगळी आली आहेत.
जाताना एक सुंदर बोगदा आणि सरोवर ( मानवनिर्मित ) दिसत राहते. हो ट्रेन जरी कॉगव्हील ट्रेन असली तरी
यापेक्षा तीव्र उताराची गाडी माऊंट फिलाटस वर जाते. तिचे डबेच उतरत्या रचनेचे आहेत.
जिथे ही गाडी संपते ते स्टेशनदेखील सुंदर आहे. सर्वच ठिकाणी पाण्याची / टॉयलेट्सची उत्तम व्यवस्था असते.
हे पुढचे फोटो...
27
28
29
30
31
32
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48
49
50
51
52
53
54
र्हाईन फॉल हि अगदी छोटीशी ( म्हणजे वेळेच्या दॄष्टीने ) सहल. साडेतीन तासात आपण परतही येतो. ( बाकीच्या सहली १०/११ तासांच्या आहेत. ) त्यामूळे परतीचे विमान दुपारी २ नंतरचे असेल तर शेवटच्या दिवशीही हि सहल करता येते आणि येताना थेट विमानतळावर जाता येते.
तर हा र्हाईननदीवरचा धबधबा. युरपमधील सर्वात मोठा. गोविंदा आणि राणी मुखर्जीचे एक गाणे इथे चित्रीत
झाले होते. ( कुठले ते जाणकारांना विचारा
)
या धबधब्याला भिडायचे अनेक पर्याय आहेत. अंग न भिजवता नदीच्या काठाकाठाने पायी जाता येते. धबधब्याच्या थोड्या मागे एक रेल्वेचा ब्रिज आहे. त्यावर आता जाता येते का ते माहीत नाही, पण गेल्या वेळेस मी गेलो होतो. उजव्या बाजूला एक राजवाडा आहे तिथून खाली उतरत ( आता लिफ्ट आहे ) एका सज्ज्यावर येता येते. तिथून धबधब्याला हात लावता येतो.
शिवाय बोटी आहेतच. या बोटींचेही पर्याय आहेत. एक बोट लांबूनच जाते तर एक
चक्क धबधब्याच्या जवळच नेते. आणखी एक पर्याय म्हणजे त्या मधल्या
सुळक्यापाशी ती सोडते. दहा मिनिटांनी परत न्यायला येते.
ऐन धबधब्याच्या मधे चारी बाजूंनी पाणी वहात असताना, नुसते असणेच थरारक असते.
पण हे सर्व अत्यंत सुरक्षित आहे. बोट अजिबात हेलकावत नाही. तसेच सुळक्यावर जायला व्यवस्थित पायर्या आहेत. तिथल्या धक्काही सुंदर आहे.
तिथे मात्र दोन भारतीय बायकांनी घोळ घातला. गाईडने नेमक्या सुचना देऊनही त्या दोघी हरवल्या.
वेळ झाली तरी बसकडे आल्याच नाहीत. नियमानुसार दहा मिनिटे त्यांची वाट बघून, गाईडने बस सोडली.
अशा वेळी एक सर्टीफिकेट तयार करून दोन साक्षीदारांच्या सह्या घेतात. मी सही केली पण ती करताना~
खरोखरच लाज वाटली. आणि नवल म्हणजे गाईडलाही वाईटच वाटत होते. ( त्यांना परत
यायला समजेल ना ? पैसे असतील ना ? अशी काळजी तिला वाटत होती. )
मी अर्थात वेळेवर परत आलो होतो. येताना तिथल्या भारतीय स्टॉलवर गेलो तर
गर्दी होती म्हणून परत आलो. दहा मिनिटे थांबायचे ठरले म्हणून परत तिथे
गेलो तर तिथल्या भोंगळ कारभाराचा चांगलाच
अनुभव आला. सामोसे घ्यायचे होते, नुसते मागितल्याबरोबर सुटे पैसे द्या. दोनच आहेत, जास्त मिळणार
नाहीत. मी तरी किती तयार ठेवू. तुम्ही असेच बस सुटताना येता. मग घाई करता.. अशी बडबड.
( विशिष्ठ शहरातला दिसत नव्हता पण त्याचे ग्राहक मात्र तिथलेच असावेत. )
अर्थात मी घेतलेच पण काही खास नव्हते.
परतीच्या वाटेवर एअरपोर्टवरून काही गेस्टस पिक अप केले पण त्यापुर्वी थोडा काळ आपण जर्मनीत असतो.
तिथे सरकारी गेट आहे पण पासपोर्ट कंट्रोल नाही. पासपोर्ट जवळ ठेवावा अशी अपेक्षा असते, पण कुणी
विचारत नाही. जर्मनीमधले अन्नपदार्थांचे भाव तुलनेने कमी असल्याने, अनेक स्विस लोक केवळ
खरेदीसाठी तिथे जात असतात.
मी सहसा व्य्क्तींचे फोटो इथे टाकत नाही. पण हे बाळ मात्र खुप आवडले. ऐट तरी बघा. बाजारहाटीला निघालय. ते मावेल एवढी पिशवी आहे. झेब्रा वरूनच क्रॉस करायचा निर्धार आहे.
धबधब्याचे पहिले दर्शन
आणि दुसरे दर्शन
जागूचे मित्र !
बोटीतून सुळक्याकडे जाताना
धक्क्यावर पोहोचल्यावर
सुळक्याच्या वाटेवर
सुळक्याच्या वरून
तो सज्जा दिसतोय, तिथून धबधब्याला हात लावता येतो.
परत जाणारी बोट
दूरवरून दर्शन
सुळक्याच्या मागे
सुळक्याच्या पायतळीचा बोगदा
गुलाबी बोट, ( हि धबधब्याच्या जवळ नेते )
सुळक्यावर जायचा जिना
फेसाळ पाणी
फेसाळ पाणी
या जागी मला रफीचे, सौ बार जनम लेंगे.... आठवलं !
अर्थात त्यासाठी सौ बार मरायची तयारी आहे माझी !
सुरक्षित धक्का
जर्मनीतली शेती ( इथून पुढचे सर्व फोटो चालत्या बसमधून घेतले आहेत )
रांगोळी
जर्मन स्विस बॉर्डर
जरा फोटुग्राफी !
जरा फोटुग्राफी !
मला आवडलेली घरे
मागे वळून बघताना.
माऊंट टिटलीस
स्विसमधे भारतीयांच्या पसंतीचे एक ठिकाण म्हणजे माऊंट टिटलीस. इथे घेऊन जाणारा आणि गोलाकार
फिरणारा गोंडोला हे मुख्य आकर्षण. पण हा गोंडोला शेवटच्या टप्प्यातच आहे. आधी आपण ६ आसनी छोट्या
पाळण्यातून वर जातो. तिथे अर्ध्या वाटेत एक रिसॉर्ट आहे.
पुढच्या टप्प्यात ८० व्यक्ती मावतील एवढा चौरस पाळणा आहे आणि शेवटच्या
टप्प्यात तो फेमस गोल पाळणा आहे. याचा मधला भाग आणि खिडक्या स्थिर असतात.
आपण उभे असतो तेवढाच भाग गोल फिरतो.
पण एक फेरी होईतो आपण मुक्कामी पोहोचलेलो असतो.
तर चला.
नेहमीप्रमाणेच आपला प्रवास सुंदर दृष्यमालिकांनी सुरु होतो
निळाई
इथून पहिला पाळणा सुरु होतो. फोटोतली जपानी बाई, शेवटपर्यंत माझ्या सोबत होती. एकटीच होती, तिला
गप्पा मारायला कुणीतरी हवेच होते.
पाळण्याने जरा उंची गाठताच आपल्याला सुंदर दॄष्ये दिसू लागतात.
पायथ्याची नदी व पार्किंग लॉटमधल्या बसगाड्या. एकावेळी एवढे पर्यटक वर असतात.
खास भारतीय पाट्या
आधी साधे डोंगर दिसतात
मग बर्फाचे
सुंदर "कोनाडे"
बर्फच बर्फ
आणखी बर्फ
तिथले आईस फ्लायर. पुर्वी हे ३ सीटर्स होते आता ६ सीटर्स आहेत.
त्या आईस फ्लायर मधून
आपले पाय अधांतरी असतात ( तरी ते पाळणे पुर्ण सुरक्षित आहेत. )
माझ्याकडचा कॅमेरा बघून चेकाळलेल्या मुली
हाच तो गोलाकार पाळणा
आपल्याकडे हा आकार असता तर नक्कीच शिवाचा हात गणला गेला असता !
घसरगुंडी... डाव्या कोपर्यात जी बाई उभी आहे तिथे खाली टायरमधून घसरायची सोय आहे. टायर म्हणजे
अगदी टायर नाही. त्याला चांगला भक्कम बेस असतो. आपण गिरक्या घेत खाली जातो. ( त्यावेळी कॅमेरा
बांधून ठेवावा लागतो नाहीतर तोंडावर आपटतो. म्हणून तिथला फोटो नाही. ) वर
येण्यासाठी मात्र सरकता जिना आहे. आपला टायर आपण वर घेऊन यायचा.
परत बर्फच
तिथले लेटेस्ट आकर्षण, क्लीफ वॉक. हा नाजूक दिसणारा पूल चालताना थरथरतो. तरीही तो पुर्ण सुरक्षित आहे.
तिथेही बर्फाची गुहा आहेच. पण आतले फोटो परत देण्याऐवजी खास तुमच्यासाठी तिथली आकडेवारी.
खिडकीतून
पायथ्याची नदी. पाण्याचा रंग बहारीचा निळा आहे.
मी जितक्यावेळा तिथे गेलोय तितक्यावेळा भारतीय हनिमनू जोडप्यांना या पूलावर फोटो काढताना बघितलय.
पूलावरुन आठवलं, अजून आपल्याला लुझर्नचा पूल बघायचाय. तो पुढच्या भागात बघू.
लुसर्न / लुझर्न / LUCERNE
टिटलीसहून परत येताना लुसर्न इथे थोडा वेळ थांबलो. एका रम्य सरोवराच्या सभोवती वसलेले हे गाव.
या गावातून रिगी / फिलाटस आदी पर्वतांचे दर्शन घडते.
तसे गाव निवांत असते पण आम्ही गेलो होतो त्यादिवशी कसलीतरी जत्रा होती, त्यामूळे भरपूर गर्दी होती.
गावातले मुख्य आकर्षण म्हणजे सरोवरावरचा लाकडी पूल. मूळ पूल १४ व्या शतकातला होता पण सध्या आहे तो १९९३ साली नव्याने बांधलेला.
पूलापेक्षा सुंदर असते ती त्याची सजावट. दोन्ही बाजूने अखंड फुलाची मालिका असते. त्यांचे रंग, पाण्याचा रंग,
पूलावरुन दिसणारी दृष्ये आणि पाण्यातले पक्षी...
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
17
18
19
20
21
23
26
रानफुले
आतापर्यंतच्या फोटोत त्या त्या ठिकाणची सुंदर फुले दाखवत होतोच. पण ते निवडक होते. त्यापेक्षा
खास फुले मला जागोजाग दिसत होती. ही तिथली रानफुले मला नदीकाठी, कड्यावर, कपारीत कुठेही दिसत.
यापैकी अगदी थोडीच मुद्दाम लावलेल्या बागांतली होती, बहुतेक अशीच उगवलेली.
मी यावेळेस चांगल्या म्हणजे योग्य वेळी गेलो होतो तिथे, म्हणून मला ही रंगांची उधळण अनुभवता आली.
एरवी तिथल्या अगदी कमी काळातल्या उन्हाळ्यात एक जीवनचक्र या झाडांना पुर्ण करायचे असल्याने,
त्यांना पण घाईच असते.
1.याला जास्वंदीच्या कुळातले म्हणावे का ?
2.फुल आणि सोबतचा फळ / बोंड दोन्ही खास होते - पॉपी
3.हे तर एक सेमीपेक्षा लहान व्यासाचे होते
4.सुंदर रंग पण आकार ३ मिमी एवढाच
5.हे तसे खुप कॉमन फुल आहे. Dandelion
6.मी आधी इथे दिला होता तो या फोटोचा छोटा भाग होता.
7.आपल्याकडे एका मोबाईल फोनवर असे चित्र असते ना ? Dandelion
8.हे त्याचेच फुल Dandelion
9.हा बहुतेक कळा असावा.
10. नदीकाठी हे दिसले
11. काही मंडळी तर मला चक्क हात करायची !
12. हा फोटो अपुर्या प्रकाशामूळे नीट आलेला नाही.
13. मला त्या निळ्या फुलाचा फोटो काढायचा होता, तर मागच्या धिटुकल्याने स्वतःवर फोकस घेतला.~
Trumpet Gentian
14.हे पण वरच्यापैकीच, पण ठेवण जरा वेगळी होती. Hawkweed
15.हे पुर्ण उमलल्यावर कसे दिसत असेल ? Bull Thistle
16.पाकळ्यांचा वेगळा आकार , Birds eye primrose
17.हि फुले स्विसमधे " संरक्षित " वर्गातली आहेत. Alpine Saxifrase - only found on alpine rocks
18.अत्यंत अवघड जागी, टिचभर माती असताना अशी फुले दिसत असत. Alpine Daisy
19.हि पण तशीच
20. हि गवताळ रानात दिसत. Geranium
21. अति नाजूक काम.
21. हे तर त्याहून नाजूक प्रकरण
22. आणि हि अनवट रचना
23. हा बहुतेक वेल होता.
24. हे वरच्यापैकीच असणार, पण लांबवर आणि पानाआड दडलेले होते. Trumpet Gentian
25. मोहक रंगछटा
26. डेव्हिल्स ब्रिजजवळच्या कड्यावर हे होते. नेमका अंधार पडत आला होता.
27. हे पण तेच असावे पण दांडोरा आखुड होता.
28. अनवट राग, जरा विस्ताराने
29. हि खुप लांब होती, नीट फोकस करता आला नाही.
30. हि पण नदीकाठी
31. ही पण तिथेच
32. रोज संध्याकाळी तिथल्या म्यूझियमच्या दारातले हे झाड, मला सुगंधी आमंत्रण द्यायचे. ५/१० मिनिटे
तिथे रेंगाळत असे मी.
33. झाडावर असे तुरे होते. तिथे अशी सुंगंधी फुले फारच कमी दिसली.
34. फुलही नाजूक आणि देखणे. मुद्दाम हातावर घेऊन फोटो काढलाय.
35. हे तिथल्याच एका वेलावर होते.
सोनुलीचे खास आभार, काही नावे कळली.
2 - पॉपी
5,7,8 - Dandelion
13,24 - Trumpet Gentian
14 - Hawkweed
15, 23 - Bull Thistle
16 - Birds eye primrose
17 - Alpine Saxifrase - only found on alpine rocks
18 - Alpine Daisy
20 - Geranium
झुरीक आणि परतीचा प्रवास
माझा पुर्ण दिवस सहलींवरच जायचा पण मुक्काम झुरीक मधे होता. तरी सकाळी लवकर उठून व संध्याकाळी
मी नदीकाठी एक फेरफटका मारत असे. झुरीक स्टेशनसमोरचा रस्ता जरा गजबजलेला
असतो. तिथे अनेक दुकाने आहेत. त्यामूळे पर्यटकांची गर्दी असते. पण बाकीचे
भाग निवांत आहेत.
संध्याकाळी कूप या सुपरमार्केटमधून कॉफीचे दोन ग्लास आणि थोडेसे खायला घेऊन मी भटकत असे.
तिथेही अर्थातच फुलाफळांची रेलचेल होती. रात्री १० वाजेपर्यंत दिवसासारखा
उजेड असायचा. तर तिथले आणि माझ्या आवडत्या देशाचे निरोप घेतानाचे फोटो.
१.लाल मोहक फळे
२.निळी फळे
३. पांढरी फुग्यासारखी फुले
४. म्यूझियमच्या मागचे गार्डन
५. तिथला एक सुंदर पुतळा ( असे सहा आहेत तिथे )
६. तिथेही अनवट राग होताच
७. सहली जिथून निघतात तिथे प्लम्स चे झाड आहे, पण फळे पिकली नव्हती.
८. नदीकाठचा पांढरा तुरा
९. नदीकाठचेच जांभळट फुल
१०. नदी
११. वरच्या फोटोतली गुलाबी फुले, जरा जवळून
१२. झाडाची झुकलेली फांदी
१३. लाल मण्यासारखी फळे
१४. बदकाची सुंदर पोझ
१५. आणखी एक पोझ
१६. पाय टाकूनी जळात बसला, असला ???
१७. लगेच विचारपूस करायला आलेले बदक.
१८. नदीजवळच्या उद्यानातले एक शिल्प
१९. सध्या झुरीक स्टेशनचा विस्तार होतोय. मार्ग थोडे बदललेले आहेत. पण त्याने स्टेशनसमोरच्या
बागेला मात्र धक्का लागलेला नाही.
२०. ट्रेनची वाट बघताना
२१. ट्रेनचा वरचा मजला. झुरीकहून एअरपोर्टला जायला ट्रेन फार स्वस्त आणि सोयीची आहे. १२ मिनिटात थेट विमानतळाच्या तळमजल्यावरच जातो आपण.
२२. मधे ओर्लिकॉन नावाचे स्टेशन लागते. ( तिथेही मी राहिलेलो आहे. )
२३. कातार एअरवेज ची खिडकी खास होती. तो काळा अर्धचंद्राकृती भाग दाबून
काचेचा रंग जास्तीत जास्त मोरपिशी करता येत होता. शिवाय पायलटचे सर्व
खिडक्यांवर नियंत्रण होतेच. ( विमान उडताना आणि उतरताना सर्व खिडक्यांवरील
तावदाने उघडी ठेवावीत असा नियम आहे. एरवी हवाई सुंदर्यांना प्रत्यक्ष
फेरी
मारून ते साधावे लागते. ) यापुढचे फोटो किंचीत धूसर आहेत कारण ते (उडत्या ) विमानातून काढलेले आहेत.
या विमानात इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरण्यावर बंदी नव्हती.
२४. विमानातून झुरीक
२५. विमानातून झुरीक विमानतळ
२६. विमानातून दिसलेले लेक ( बहुतेक लेक झुरीक )
२७. आल्पस
२८ आप्ल्स
२९ दरीमधून जाणारी नदी
३०. निळे सरोवर
३१. परत आल्प्स
३२. एक सुंदर आकाराची नदी दिसली. पण आजूबाजूला वस्ती दिसत नव्हती
३३. ती नदी टायग्रीस असावी असे वाटले.
३४. पण टायग्रीस नव्हती हे समोरच्या फलकावरुन कळले.
३५. टायग्रीस मग लागली पण फोटोच्या कक्षेत नव्हती.
३६. भूगोलातली फॉन थ्यूनन थिअरी ऑफ सिटी एक्स्पांशन आठवली ना ?
या बरोबरच हि मालिका संपवतोय. मला या सहलीने खुप आनंद दिला. फोटोच्या रुपात का होईना, तुम्हाला
दाखवू शकलो यातच समाधान. इतक्या वेळा जाऊनही स्विस परत भेटीचे निमंत्रण द्यायला विसरत नाही.
आणि मी पण तसे वचन द्यायला चुकत नाही.
स्विझर्लंड : स्विस स्केप्स आगगाडीच्या रुळांवरुन...
Switzerland : Swissscapes- From Train Tracks…
मुखपृष्ठ : प्रचि ००१:
स्विझर्लंड हा अतिशय सुंदर देश आहे हे वेगळे सांगायची जरूरच नाही. हा
अख्खा स्विझर्लंड अनेक रेल्वे कंपन्यांच्या विविध ट्रेन्सच्या देशभर
पसरलेल्या अतिशय दाट जाळ्याने जोडला गेला आहे.
या देशाचा जवळ जवळ ६०% भूभाग आल्प्स पर्वतराजीच्या पसाऱ्याने व्याप्त असला
तरी जगातील अतिशय जास्त घनतेचे रेल्वेचे जाळे या देशात पसरलेले आहे.
ग्लेशियर एक्स्प्रेस, बर्निना एक्स्प्रेस, गोल्डन पास ट्रेन हे इथले काही
प्रसिद्ध मार्ग.
अतिशय सुंदर, स्वच्छ ट्रेन्स; त्याला मोठ्या किंवा अधिक मोठ्या काचेच्या भिंती आणि काही ठिकाणी काचेचं छप्परही.
आम्ही या ट्रेनचा ८ दिवसांचा फॅमिली स्विस रेल पास काढला होता. त्यामुळे
त्या ८ दिवसात यातल्या कुठल्याही मार्गावरून कितीही वेळा प्रवास करणं शक्य
होतं . आणि विशेष म्हणजे हा पास फक्त रेल्वे पुरताच आहे असं नसून
प्रवासाशी संबंधित ट्राम,बस इतकंच नव्हे तर कनेक्टिन्ग बोटी यामधूनही
प्रवास करण्याची मुभा होती.
अनेक किल्ले, गढ्या, पॅलेसेस आणि म्युझियम्स यामध्ये विनामूल्य प्रवेश हेही यांमध्ये समाविष्ट होतं
सेकंद टू सेकंद वक्तशीर पणा हे ह्या संपूर्ण प्रवास व्यवस्थेचं आणखीन एक उपयुक्त आणि प्रमुख वैशिष्ट्य.
नितांत सुंदर, रमणीय निसर्ग सौंदर्य, उंच सखल भागातून, दऱ्या टेकड्यातुन
जाणारे रेल्वे मार्ग आणि हे सगळं सगळं ट्रेन मधून बघायची सोय, त्यामुळे हा
स्विस ट्रेन्सचा प्रवासही अतिशय अनोखा, देखणा आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा
होऊन जातो.
यातील गोल्डन पास रेल्वे मार्ग हा तर अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. या वेगवेगळ्या रेल्वे मार्गावरून जाताना टिपलेली हि काही वेचक क्षणचित्रे.
मात्र काचेच्या आतून हि टिपली गेली असल्यामुळे तो एक अडसर आणि त्या
काचेमधील प्रतिबिंब (Reflection) तुम्हाला यातल्या काही क्षण चित्रांमध्ये
आढळेल.
एखाददुसरं प्रकाशचित्र मात्र रेल्वे स्टेशनला उतरून अथवा रेल्वे स्टेशनच्या बाहेरूनही काढलेलं आहे.
प्रचि ०१ : आमचा मुक्काम स्विझर्लंड मधल्या इंटरलाकेन या टुमदार शहरात होता. तिथून लुसर्न या Heritage शहरात (ह्याची पुढे कधीतरी माहिती बघू)
जाताना आम्ही गोल्डन पास लाईन या रेल्वे रुटने प्रवास केला. गोल्डन पास
लाईन हा संपूर्ण मार्ग अतिशय सिनिक आहे. आमची गाडी सुरु झाली आणि रिमझिम
पाऊस सुरु झाला.
त्या पावसात हे ट्रेनच्या खिडकीतून दिसणारं प्रकाश चित्रं...
प्रचि ०२: आता हा पाऊस ढगांनाही खाली घेऊन आला...
प्रचि ०३. : धुक्यात लपेटलेली आणि अंगाखांद्यावर थोडासा बर्फ मिरवणारी ही आल्प्स पर्वतराजी...
प्रचि ०४: ग्रुएर कॅसल हे स्वित्झर्लंडमधले एक अतिशय छान ठिकाण आहे. पायथ्याशी चीझ फॅक्टरी आणि काही अंतरावर चॉकलेट फॅक्टरी (पण ह्याबद्दल नंतर कधी तरी). तर दुसऱ्या दिवशी ग्रुएर कॅसलला जाताना दिसलेले हे दृश्य...
प्रचि ०५: हलक्या उताराच्या टेकडीवरच्या कुरणांत चरणाऱ्या ह्या स्विस गायी...
(
एक अंदरकी बात : या गायींचं दृष्य ट्रेन मधून खूप आल्हाददायक दिसतं. ट्रेन
A.C. असल्यामुळे, काचांनी छान बंद असल्यामुळे त्या कुरणातल्या गायींचं
कर्तृत्व तिथे कळत नाही. अगदी दुरुन डोंगर साजरे आणि दुरुनंच गायी
साजर्या....
पण जेंव्हा केंव्हा त्या कुरणांच्या शेजारून जायची वेळ यायची तेव्हा मात्र नाक मुठीत धरायची वेळ यायची..
स्विस गायींचं बाकी काहीही आणि कितीही वेगळेपण असलं तरी शेणामुताच्या
वासाबाबत त्या आणि आपल्या भारतीय गायी सारख्याच. त्यात त्या मुळातच
धष्टपुष्ट, जास्त चारा तब्येतीत खाणार आणि तब्येतीत...
उगाच नाही माझा मुलगा तिथे म्हणायचा . . . . . "अख्खा ग्रामीण स्विझर्लंड हा एक मोठा गोठा आहे.”)
प्रचि ०६: तिसऱ्या दिवशी माउंट टिटलिसला जाताना.... प्रवासाची सुरुवात (ट्रेनमधून उतरल्यावर वेगवेगळे रोप वे, केबल वे यामधून माऊंट टिटलिसच्या शिखरावर जाण हा एक रोमांचकारक (माझ्या पत्नीसाठी भीतीदायक) अनुभव होता. . . .त्याबद्दल पुढे कधीतरी. . . . )
प्रचि ०७: डोंगराच्या पार्श्वभूमीवरचे टिपिकल स्विस स्ट्रक्चर.
प्रचि ०८: बर्फाच्छादित आल्प्स
प्रचि ०९: गोल्डन पास ट्रेन वळणदार रुळांवर
प्रचि १०: स्विस स्केप. . . आणि तो रस्ताही किती सुंदर. . . वाटतं ना या रस्त्यावरून जाऊन त्या घरापाशी बसावं ?
प्रचि ११: सार्नेन तलाव (Lake Sarnen) आणि काठावरचे गाव. हा रस्ताही किती वळणदार आणि छान. . . . . आणि गर्दीत वसलेलं चर्च...
प्रचि १२: तलावाच्या पलीकडच्या काठावरची डोंगर उतारावरची घरे आणि छोटंसं चर्च . . . . . . चॅपेल
प्रचि १३: तलाव संपता संपता . . . . स्विस कुरण आणि गायी...
प्रचि १४: त्याआधी इंटरलाकेन सोडल्यावर लागणारा ब्रिन्झ तलाव(Lake Brienz) आणि त्याच्या काठावरचे ब्रिन्झ स्टेशन -०१
प्रचि १५: ब्रिन्झ स्टेशन -०२
प्रचि १६: गोल्डन पास पॅनोरमिक ट्रेन
प्रचि १७: एंजेल बर्ग (Engel Berg) स्टेशनच्या बाहेरील दृश्य..
प्रचि १८: माउंट टिटलिस पाहिल्यावर ट्रेनने परतीचा प्रवास सुरु..
प्रचि १९: इंटरलाकेन वरून थुन कॅसल ला जाताना. . . . .
हा संपूर्ण कॅसल हे आता एक छान म्युझियम आहे.
प्रचि २०: इंटरलाकेन वरून Chateau-De-Chillon ला जाताना, वाटेत थुन तलाव (Lake Thun) लागतो...
प्रचि २१: त्यात फेरीबोटी आणि लेक सफारीच्या बोटीही ये-जा करत असतात......
प्रचि २२: थुन लेक : उंचावरून......
प्रचि २३: एक वळणदार रस्ता, उंचावरून....
प्रचि २४: ढगाळ वातावरण, कुरण... आणि घर......
प्रचि २५: पर्वत पायथ्याच्या उतारावरचे कुरण......
प्रचि २६: छोटेसे चर्च......
प्रचि २७: इथे मात्र घरांची दाटी....
प्रचि २८: आणि थोड्या अंतरावरची घरांची विरळता....
प्रचि २९: डोंगरमाथ्यावरची ताजी हिमवृष्टी....
प्रचि ३०: हिमकणांनी माखलेले पाईन वृक्ष....
प्रचि ३१: क्लोज अप....
प्रचि ३२: तेच दृश्य थोडं पुढे गेल्यावर....
प्रचि ३३: आल्प्सच्या पार्श्वभूमीवरची अजून एक वस्ती....
प्रचि ३४: कलती संध्याकाळ....
प्रचि ३५: हिमाच्छादित शिखर....
हि बहुतेक सर्व प्रकाशचित्रे चालत्या गाडीतून (ट्रेन स्टेशनमध्ये थांबली असतानाचे काही किरकोळ अपवाद वगळले तर. . . . . आणि तेही लगेच कळून येईल) काढली आहेत.
त्यामुळे एरवी असतो तसा स्थिर कॅमेरा , Sharp फोकस इथे नाही आणि म्हणून
Crisp Images ही नाहीत. हलत्या ट्रेनमुळे आणि तिच्या वेगामुळे काही चित्रं
ब्लर आली आहेत, पण जे सौंदर्य मी डोळ्यांनी पाहिलं ते तुम्हीही पहावं (ब्लर तर ब्लर) यासाठी ती इथे दिली आहेत. ती चालवून घ्यावीत.
या प्रवासात स्विझर्लंडची खासियत असलेली ती कुरणं आणि गायीही दिसल्या. पण त्या ट्रेनमधून आल्या त्या मात्र हलत्या आणि अस्पष्ट (Un-Focused). त्यामुळे एखादा अपवाद वगळता ते प्रचि मात्र इथे दिले नाहीत.
हा ट्रेनच्या प्रवासातून दिसणारा रमणीय, नितांत सुंदर स्विझर्लंडचा फक्त एक भाग झाला. ट्रेनमधून उतरून तिथली विविध ठिकाणं, गढ्या, किल्ले, पर्वतराजी आणि जवळून पाहिलेली, ज्यांच्या अंगाखांद्यांवर चढलो ती बर्फाच्छादित शिखरे आणि पुन्हा त्यावरून दिसणारं आणखीन तसंच आणि वेगळंही निसर्ग सौंदर्य; हि या देशाची खासियत आहे. . . . . आणि स्विस आर्किटेक्चरही....
या प्रवासात कुठलंही छान कुरण, त्यातलं घर,त्याच्याकडे येणार रस्ता
दिसला कि मन त्या रस्त्यावरून बास्केट लावलेली सायकल चालवून प्रवास करायचं.
मग झाडाखाली विसावा घ्यायचं, कुरणामध्ये लोळायचं आणि मग त्या बाहेरून
सुबक,सुंदर आणि अस्सल ग्रामीण वाटणाऱ्या घरामध्ये प्रवेश करायचं,
आरामासाठी.
एखाद्या घराच्या धुरांड्यामधून पांढरा स्वच्छ धूर येत असला तर जीभही चाळवली
जायची त्या चुलीवर खुरपूस भाजल्या जात असलेल्या पदार्थाच्या कल्पनेने.
अशा ठिकाणी कायमचं रहाणं, इथून कामावर जाणं किंवा किंबहुना इथेचं
आजूबाजूला काम असणं आणि ह्या वातावरणात जगणं हे एकंदरीत किती आल्हाददायक ,
स्फूर्तिदायक असेल.
The Grass is Always Greener on Other Side ही म्हण मला माहित आहे पण या ठिकाणी मात्र ते खरंच खरं आहे याबद्दल दुमत नसावं.
आजही हे फोटो मी कधी बघतो किंवा अशीच सिनरी असलेलं एखादं कॅलेंडर,
वॉलपेपर, स्क्रीन सेव्हर समोर येतो तेव्हा ह्या प्रवासाची परत आठवण येते (अगदी बजरंगी भाईजान मध्ये ती मुलगी पोलीस स्टेशनमध्ये स्विझर्लंडचं चित्र म्हणजे तिच्या घराचं ठिकाण सांगते ते चित्र पाहिल्यावरही)
आणि हा सगळाच प्रवास मनात उलगडत जातो आणि तोही आगगाडीच्या चाकांच्या तालावर. . . . .
ब्लाउसी लेक (Blausee Lake).
एका गावात एक निळ्या डोळ्यांची सुंदर मुलगी रहात होती. तिचा प्रियकरही त्याच गावात रहात असे. गावाजवळच्या एका छोट्या तळ्यावर ती त्याला भेटायला जायची. सूर्यास्तापासून ते अगदी चंद्राचे प्रतिबिंब त्या नितळ पाण्यात उमटे पर्यंत ती दोघे तिथेच असायची. असेच मजेत दिवस चालले होते. पण एके दिवशी काही वेगळेच घडले. पाय घसरून तो पडला. पडला तोच एका टोकदार दगडावर. डोक्याला मार लागला आणि सगळाच खेळ संपला.
ती अगदी सैरभैर झाली. जे घडल आहे त्यावर तिचा विश्वास बसत नव्हता. त्याच्या आठवणीनी व्याकूळ झालेली ती अजूनही रोज संध्याकाळी तळ्यावर जात होती. तळ्याच्या मध्यात बोट घेऊन जायची आणि तिथेच बसून ती आक्रोश करत रहायची. अशा कितीतरी रात्री गेल्या पण ती आपले दुख:त्या तळ्याला रोज सांगत राहिली. आणि एक दिवस नाका-तोंडात पाणी जाऊन गुदमरून मृत झालेले तिचे शरीर पाण्याच्या तळाशी सापडले. शेजारीच खचून रुतलेली ती बोटही.
तिच्या निळ्या डोळ्यांच्या स्पर्शाने तळ्याचे पाणी त्यादिवशी निळे झाले ते कायमचेच...........
तेच हे ब्लाउसी लेक. ब्लाऊ म्हणजे Blue म्हणजेच निळे. गर्द झाडीत वसलेले हे अगदी छोटेसे तळे आहे. आम्ही गेलो होतो तेंव्हा तिथल्या नावाड्याने आम्हाला वरील कथा सांगितली. खर सांगायचं तर त्याची सत्यासत्यता पडताळून पहावी असे वाटलेच नाही.
तर, स्वित्झर्लंडच्या सहलीत ईंटरलाकेनला भेट देणार असाल तर आवर्जून याचाही समावेश करावा असं हे ठिकाण आहे. आल्प्स पर्वतरांगाच्या आसपास आढळणाऱ्या जलाशयांमध्ये हे सगळ्यात देखणे आहे असे ऐकले. 'कांडेरगृंड' नावाच्या गावाजवळ 'कांडेर' नदीच्या खोऱ्यात एका विस्तीर्ण उद्यानाच्या साधारण मध्यावर हे तळे आहे. तळ्याच्या एका बाजूला प्रचंड उंचीचा एक कातळ आहे. निळे आणि संपूर्ण पारदर्शक असे पाणी, नितांत सुंदर परिसर, खच्चून भरलेले निसर्ग सौंदर्य, डोळ्यांसाठी पर्वणी ठरावी असे सगळे दृश्य आहे. वल्ह्याच्या एका छोट्याश्या बोट राईडची सोय आहे. बोटीच्या तळाला काच लावलेली आहे जेणेकरून तळ्याच्या मध्यभागी सुद्धा, जिथे खोली साधारण ४० फुट आहे, पाण्याच्या पारदर्षषकतेचा अनुभव घेता येतो आणि जलाशयाचा तळ अगदी स्पष्ट दिसतो. पलीकडेच लहान मुलांना खेळण्यासाठी 'प्ले एरीया' पण आहे. बसायला लाकडी बाक आहेत. ग्रीलची पण सोय आहे. तसे तळे निरखून बोट राईड ईत्यादीसाठी तास-दीडतास खूप झाला. पण एक पूर्ण दिवस तिथे घालवायला आवडावा असे हे ठिकाण नक्कीच आहे.
१५००० वर्षांपूर्वी तळ्याच्या मागच्या डोंगरावरून दरड कोसळल्याने खळगा तयार होऊन या तळ्याची निर्मिती झाली. जलाशयाच्या तळाशी जिवंत झरे आहेत त्यामुळे पाणी स्वच्छा आणि पिण्यास योग्य आहे. आश्चर्य म्हणजे भर हिवाळ्यातही तापमान जेंव्हा शून्याच्या कितीतरी खाली गेलेले असते तेंव्हाही या तळ्याचे पाणी गोठत नाही. या पाण्याचे तापमान वर्षभर ८ ते ९ डिगरी सेल्सिअस असे स्थिर रहाते. त्यामुळे यात रंगीबेरंगी मासे आणि बदकं वर्षभर वास्तव्याला असतात. (पर्यटकांना हे गोड्या पाण्यातले ताजे मासे मिळण्याची सोय शेजारच्या हॉटेल चालकाने केलेली आहे). तळ्यातले सगळे पाणी दर ८ दिवसांनी पूर्णपणे नव्याने येते, जुने वाहून जाते अशी अजून एक माहिती त्या नावाड्याने दिली.
एवढेसे ते तळे पण त्यातही देखणे छोटेखानी लाकडी पूल बांधलेले आहेत. तळ्याच्या संपूर्ण बाजूबाजूने 'वॉक वे' केलेला आहे. त्यावरून फेरफटका मारताना अजून काही बारकावे लक्षात येतात. पाण्यात तळाशी काही ओंडके, झाडांची खोडं पडलेली दिसतात. चौकशी केल्यावर समजले की ती तशीच २०० वर्षांहून अधिक काळ तिथेच पडून आहेत, अजिबात न कुजता, खराब न होता. हा त्या पाण्याचा अजून एक गुणधर्म. तळ्या भोवतीच्या या फेरफटक्यातच आपल्याला एक देखणे शिल्प दिसते. कुण्या शिल्पकाराने त्या 'निळ्या डोळ्यांच्या' मुलीची आठवण म्हणून तिचे दगडी शिल्प पाण्याच्या तळाशी बनवले आहे.
जुलै-ऑगस्ट या उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये इथे बरीच गर्दी असते. पण आम्ही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गेलो होतो तेंव्हा हवा तर मस्त होतीच पण गर्दी अजिबातच नव्हती. अजून एखादाच ग्रुप तिथे आलेला होता. त्यामुळे थोडे सिझनच्या आधी गेले तर निवांतपणे तिथल्या सृष्टी सौदर्याची, शांततेची मजा घेता येऊ शकते. तळ्याच्या मागच्या बाजूने 'ट्रेक / ट्रेल' साठी पण मार्ग तयार केलेला आहे. आवड आणि सवड असल्यास तिकडेही एक फेरफटका मारता येतो.
उघडण्याच्या वेळा : उन्हाळ्यात - सकाळी ९ ते संध्याकाळी ५,
हिवाळ्यात - सकाळी १० ते संध्याकाळी ५
१. झुरीकहून जायचे असल्यास,
स्वत:ची गाडी असल्यास साधारण २.३० तासांचा प्रवास आहे. अंतर १५० किमी.
ट्रेनने जायचे असल्यास ३ तासाचा प्रवास आहे. झुरिक मुख्य स्थानकावरून
ट्रेन मिळेल Zurich - Spiez - Frutigen (इथे ट्रेन बदलावी लागते) -
Kandergrund.
(झुरिकहून झरमॅटकडे जाणाऱ्यांनाही 'ब्लाउसी लेक' बघून पुढे जाता येऊ शकते.)
२. 'इंटरलाकेन' या लोकप्रिय पर्यटन स्थळापासूनही बस किंवा ट्रेनने ब्लाउसीला जाणे सहज शक्य आहे.
स्वतःची गाडी असल्यास ४५ मिनिटांचा प्रवास आहे. अंतर ४० किमी.
ट्रेनने जायचे असल्यास १.३० तासांचा प्रवास आहे. Interlaken Ost east - Spiez - Frutigen (इथे ट्रेन बदलावी लागते) - Kandergrund.
**********
काही फोटो ....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
























No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.