Saturday, February 10, 2024
कोस्टल कर्नाटक
गोवा आणि कर्नाटक या दोन राज्यांच्या सीमेवर समुद्रकिनाऱ्यावर हे टुमदार, समृद्ध असे शहर वसलेले आहे . शांत व सुंदर समुद्र किनारे व ऐतिहासिक मंदिरांसाठी कारवार प्रसिद्ध आहे . या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या पाच किनाऱ्यांचा आनंद घेता येतो . त्यामुळेच कारवारला समुद्र किनाऱ्यांचे शहर म्हटले जाते .
गोकर्ण
सुंदर समुद्रकिनाऱ्याकाठी असलेल्या या क्षेत्राला इतिहास काळापासून महत्व आहे. हे मंदिर इसवी सनाच्या तिसऱ्या- चौथ्या शतकातील असून त्याचा वेळोवेळी जीर्णोद्धार झालेला आहे.छत्रपती शिवराय व संभाजी महाराज यांचा या भागाशी संबंध आला आहे . दक्षिण दिग्विजयाच्या वेळी शिवाजी महाराजांची अनेक ठाणी या भागात होती. गोकर्ण महाबळेश्वर हे कर्नाटकात उत्तर कन्नड जिल्ह्यातील कुमठा तालुक्यात आहे. कारवार पासून दीड तासाच्या अंतरावर आहे. तर कुमठा बंदरापासून ३१ किमीवर आहे.
उडुपी हे नाव आपल्याला उडुपी हॉटेल्स व खाद्यपदार्थांमुळे परिचित असते. उडुपी हे ठिकाण भव्य पुरातन मंदिरे तसेच सुंदर समुद्रकिनाऱ्यासाठी ओळखले जाते . येथील श्रीकृष्ण मंदिर तेराव्या शतकातील आहे. मंदिरातील रथ व रथयात्रा गोकर्णप्रमाणेच असते . रथ सुंदर रंगीबेरंगी पताकांनी सजवलेला असतो. तो सोहळा पाहण्यासारखा असतो. एकदा कालीकतवरून येत असताना उशीर झाला म्हणून उडुपीत मुक्काम केला होता .कालीकतवरून येताना जागोजागी एका आचार्य /स्वामींचे पोस्टर लागलेले दिसत होते . मुक्काम ज्या हॉटेलमध्ये केला होता तेथे जवळच श्रीकृष्ण मंदिर होते. मंदिरातून जोराचा घंटानाद ऐकू येत होता. कसला एवढा उत्सव चालू आहे हे पाहण्यास मंदिरात गेलो तेव्हा तेथे रथोत्सवाचा सोहळा पाहण्यास मिळाला. गर्दी खूप नव्हती . त्या मठाचे वयोवृध्द स्वामी ते त्यामंदिरात आले होते. (रस्त्यात ठिकठिकाणी दिसलेले पोस्टर त्यांचेच होते, हे लक्षात आले.) त्यानिमित्ताने पूर्वनियोजित उत्सव होता. सजविलेल्या रथातून स्वामी मंदिराला प्रदक्षिणा
Subscribe to:
Post Comments (Atom)
http://mumbaichaganpati.blogspot.com back up incomplete
http://mumbaichaganpati.blogspot.com/2010/08/shree-ashtavinayak-yatra-mahad-shree.html Shree Ashtavinayak Yatra.- Mahad ( Shree Varad vina...
-
पुणे खादाडी :- अमर्यादित पण मिनी थाळी हवी असतील तर आपटे रोड वरील आशा डायनिंग हॉल ला पर्याय नाहीं. लॉ कॉलेज रोडवरील कृष्णा डायनिंग हॉल मध्ये...
-
http://bhargavasarma.blogspot.com/2010/01/basar-rare-temple-of-goddess-saraswathi.html Basar - A Rar...
-
https://matriwords.com/2019/02/17/hampi-continues-to-live-part-1/ Hampi Continues to Live – Part 1 In this several-part series...







No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.