Monday, February 12, 2024

ग्रँड कॅन्यन

 https://drifteradwait.wordpress.com/%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1-%e0%a4%95%e0%a5%85%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%a8/

२०११ च्या मार्च महिन्यात माझा ग्रांड  कॅन्यन ला जायचा योग आला.( घंटा योग, कॉलेज बंक करून निघालो). स्प्रिंग ब्रेक ला अजून वेळ होता, पण मला स्वस्थ बसवत नाही. Houston वरून बस चा २५ तासांचा प्रवास होता. (म्हणजे तसे विमानाने पण जाता येते, पण आम्ही पडलो चीप कॅटगरी, उशिराने जाइन पण एसटी नेच जाईन). Houston To Dallas To Falstaff असा प्रवास होता माझा.
बस चांगल्या होत्या म्हणजे WI-FI आणि चार्जर्स वागिरे पण होते बस मध्ये. पण अमेरिकेतले बस स्टेन्ड हे जगातील सर्वात भंगार बस स्टेन्ड आहेत असे माझे मत आहे. औरंगजेब च्या जनानखान्याचे Management ह्याच्यापेक्षा चांगले असेल. सीटनंबर वगैरे काही भानगडच नव्हती. ज्याची बस असेल तो दारासमोर २-३ तास आधी रांगा लावून उभा राही. आणि बस ला ५ मिनिटे कमी असताना मग बसमध्ये सोडले जाई. अमेरिकन मूर्खपणाचा एक नवीन अनुभव प्रत्ययास आला. प्रवासाने ज्ञान वाढते म्हणतात ने उगाच नाही. असो.

Image

२५ तासांनी Flagstaff ला येऊन पोचलो एकदाचा. तिथून ११० मैलांवर ग्रांड  कॅन्यन नावाचे गाव आहे. तिथे दुसर्या दिवशी पोचलो. माझे हॉटेल मध्ये रिझेर्वेशन असल्याने निश्चिंत होतो. सामान मोटेल वर टाकून माझा DSLR घेऊन निघालो दरी बघायला.

Image

प्रचंड…ह्याशिवाय दुसरा शब्दच सुचत नाही ग्रांड कॅन्यन पाहिल्यावर. इथे आल्यावर मला मी इथे एकटाच देसी आहे ह्याची अचानक जाणीव झाली. जपानी आणि चिंकी लोक त्यांच्या हाय टेक कॅमेर्यांनी पटापट फोटो काढण्यात गुंतले होते. अमेरिकन टूरिस्ट sound of silence, life is so beautiful वगैरे बरळत होते as usual…

अमेरिकन भूगार्भाशास्त्राज्ञांच्या नुसार ग्रांड कॅन्यन ही सुमारे वीस बिलिअन (की मिलियन? माझा नेहमी गोंधळ होतो.) वर्षापूर्वी तयार झाली आहे. तेव्हापासून colorado नदीच्या घर्षणामुळे ही साडेचारशे किलोमीटर लांबीची आणि सुमारे दीड किलोमीटर खोलीची महाकाय दरी अजूनच खोल खोल होत आहे.जसजसे आपण दरी उतरत जातो, तसतसे आपल्याला ह्याचा पुरावा आपल्याला विविध प्रस्तारांच्यारूपाने पाहायला मिळतो. आणि आपण जसे दरीत खोल उतरत जातो, तसे तापमान वीस अंशांनी वाढते. (आणि मुलांनो, आजचा भूगोलाचा तास इथेच संपला.)

Image

मी संध्याकाळ CANYON च्या काठी फोटो काढत घालवली आणि हॉटेलवर परत आलो. दुसर्या दिवशी hiking चा प्लान होता आणि म्हणून रात्री जरासा लवकरच झोपलो. दरी उतरायला मी south kaibab trail चा वापर करणार होतो. grand canyon national park service च्या सौजन्याने सकाळी पाचपासून रात्री दहा वाजेपर्यंत बस सर्विस फुकटात उपलब्ध असते.(आनंदी आनंद गडे, फुकट…)

Image

भल्या पहाटे पहिली बस पकडून मी south kaibab trailhead ला पोचलो आणि दरी उतरायला सुरुवात केली. सोबत पार्ले जी चे ३पुडे, getorade, first aid kit आणि camelback mule बरोबर होती. उतरायला सुरवात करताना अंधार होता. समोरचे फारसे काही दिसत नव्हते. माझ्या बरोबर New Zealand चे एक कपल होते. सौथ आफ्रिकेबरोबर आपली टेस्ट चालू होती त्याची चर्चा करत करत आम्ही कॅन्यन   उतरायला लागलो. एक भारतीय आणि दोन New Zealanders अमेरिकेतल्या ग्रांड कॅन्यन मध्ये क्रिकेट ची चर्चा करत होते. लैच भारी.

सूर्योदय पाहण्यासाठी आम्ही थोडा वेळ थांबलो. त्या मुलीचे पाय दुखायला लागले होते. सर एडमंड हिलरीचे नाव घेऊन त्यांची मी थोडी थट्टा केली आणि त्यांना मागे टाकून पुढे निघालो. GC हि काय चीज आहे हे तिथे खाली उतरल्याशिवाय कळत नाही. एखादी दरी उतरली कि दुसरी हजर असतेच असते. चमकणारे चित्रविचित्र आकाराचे खडक, त्यामधून मधूनच डोकावणारे निवडूंग अन मधूनच अंगाला झोंबणारे उन वारे अन सगळ्या प्रदेशावर पसरलेला चमत्कारिक गूढ असा लाल प्रकाश अन विरळ मनुष्यवस्ती ह्यामुळे आपण मंगळ किंवा दुसर्याच कोणत्यातरी ग्रहावर असल्याचा सारखा भास होत असतो .

मध्यान्ही च्या सुमारास मी कॉलोराडो नदीजवळ जाऊन पोचलो. थोडावेळ नदीच्या काठावर पाय बुडवून शांत निसर्गाचा अनुभव घेत बसून रहिलो. अति उष्णतेमुळे माझ्या स्याक मधले स्नीकर्स वितळून गेले होते. Zantherra ने GC च्या तळाशी अप्रतिम लॉज बांधली आहेत . तिथल्या हॉटेलात थांबून थोडी पोटपूजा करून GETORADE ची बाटली पोटात रिकामी केली आणि माझ्या CAMELBACK मध्ये पाणी भरून घेतले.
Image

BRIGHT ANGEL TRAIL ने परत यायला सुरुवात केली. साधारण सहा किलोमीटर चढल्यावर अचानक थंडी चा कडाका वाढला आणि बर्फ पडायला सुरुवात झाली. मी सकाळी गरम होतअसल्यामुळे आणि जास्त सामान नको म्हणून गरम कपडे घेतलेच न्हवते.शेवटचे 8 किलोमीटर्स हाफ चड्डीत चढायला लागले. थोडक्यात म्हणजे पूर्ण वाट लागून गेली. नको तिथे शहाणपणा दाखवल्याची खोड चांगलीच जिरली..असो.
हळू हळू निसरड्या बर्फावरून चालण्याची कसरतकरत एकदाचा bright angel trail starts here च्या पाटीशी येऊन पोचलो आणि आजूबाजूची पब्लिक काय म्हणेल याचा विचार न करता जोरात शिवाजी महाराज कि जय म्हणून आरोळी ठोकली-(काय करणार, जुनी सवय). गोरे हसायला लागले कि कोण वेडा आला आहे…पण मी लक्ष दिले नाही त्यांच्याकडे.

जागोजागी “एका दिवसात काठावरून नदीपर्यंत आणि परत काठावर येण्याचा प्रयत्न करू नये, बर्याचजणांना हॉस्पिटल मध्ये दाखल करायला लागते आणि बर्याच जणांना जीव गमवायला लागला आहे “अश्या पाट्या होत्या. पण पाटीकडे दुर्लक्ष करणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हा पुण्याचा अभिमानबरोबर असल्यानेच मी हा ट्रेक करू शकलो ह्याची मला नम्र जाणीव आहे ह्याचीही जिज्ञासूंनी नोंदघ्यावी…

जे कोणी मराठी लोक अमेरिकेत आहेत त्यांनी at least एकदा तरी ग्रांड कॅन्यन  बघून यावी ही माझी विनंती. ही खरडपट्टी वाचून एक माणूस जरी ही ग्रांड कॅन्यन बघायला आला तर माझा मराठी टायपिंग मध्ये गेलेला वेळ वसूल झाला असे मी समजेन.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...