Friday, February 9, 2024
मुन्नार: किंग ऑफ हिल स्टेशन
या वाटेवर बरेच मसाल्यांचे मळे लागतात. प्रत्येकी १००रु एंट्री फी देऊन आत जाता येते . आतमध्ये Group-wise एक guide असतो. तो अनेक मासाल्यांची झाडे दाखवतो व त्याबद्दल माहिती देतो. Stevia, ज्याचे पान साखरेपेक्षाही कित्येकपटीने गोड असणारी वनस्पती व little-apple ही वनस्पती पहिल्यांदाच येथे पहिली. या गार्डन मध्ये खरेदी करताना मात्र चौकसपणे करावी . मुन्नार पाहताना प्रथम टॉप स्टेशनच्या दिशेने गेलेले चांगले. मुन्नार शहरातून वर निघाल्यावर घाट सुरू झाल्यानंतर Botanical garden आहे. खरंतर ही फुलांची बाग आहे. विविध फुले पाहत पाहत वर्तुळाकार फिरत फिरत आपण बाहेर पडतो . त्यानंतर वर जाऊ लागतो तसे चहाच्या मळ्यांनी आच्छादलेल्या हिरव्यागार डोंगररांगा दिसू लागतात. डावीकडे फोटोपॉइंट म्हणून चहाच्या टेकडीच्या पार्श्वभूमीवर फोटो घेण्याचे सुंदर ठिकाण लागते. जसे बहुतेक पर्यटनस्थळी Instant photo प्रिंट देणारे photographer आढळतात तसेच येथेही आढळतात. चहाच्या मळ्यातल्या कामगारांची टोपली व त्यांच्या डोक्यावर असते तशी टोपी घालून येथे फोटो काढून देतात. तेथून मध्ये-मध्ये थांबत थांबत आपण त्या चहाच्या मळ्यांची विलोभनीय दृश्य पाहत टेकडी चढून वर जात असताना ज्यांना चहाची आवड आहे ते तेथे ताज्या चहाचा आस्वाद घेऊ शकतात. वर चढून गेल्यावर कन्ननदेवन हिल्सची चहाची फॅक्टरी आहे. आपण ही फॅक्टरी १००/- रु एंट्री फी देऊन पाहू शकतो व निरनिराळ्या चवीचा चहा चाखू शकतो , मात्र ते फुकट नाही. येथे चहाची खरेदीही करता येते. या फॅक्टरीमध्ये छोट्या छोट्या ग्रुपने सोडले जाते त्यामुळे आपल्याला थोडावेळ रांगेत उभे राहावे लागते. आतील माहिती देण्याकरिता एक माणूस नेमलेला आहे. तसेच तेथे स्क्रीनवर एक छोटा माहितीपटही दाखवला जातो.
या फॅक्टरीमध्ये चहाची पाने आत कशी आणतात यापासून त्याचे वर्गीकरण करून पॅकिंग करेपर्यंतची सर्व प्रक्रिया पाहायला मिळते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चहाची पाने अर्धादिवस सुकवून पुढे बारीक बारीक केली जातात. ही प्रक्रिया ज्या पट्ट्यावर पाने ओतली जातात तो पट्टा पुढे सरकत असताना घडत असते. Hopper वरुन पुढे सरकत असताना पानांचे बारीक तुकडे केले जातात. त्यानंतर fermentation केले जाते, त्यापुढे बॉयलरने हीट देऊन किनवण प्रक्रिया केली जाते. आता चहाचा रंग तपकिरी झालेला असतो. तो पुढे त्याच्या गुणवततेनुसार विभागला जातो व त्याचे पॅकिंग केले जाते. मोठा असतो तो उत्तम प्रतीचा मानलो जातो व dust असतो तो कमी प्रतीचा मानला जातो. जगभर मध्यम गुणवत्तेचा चहा जास्त प्रमाणात वापरला जातो. KDHPचा चहा ‘Ripple’ या ब्रॅंड-नेम ने विकला जातो. त्याव्यतिरिक्त तो मोठ्या कंपन्यांनाही विकला जातो. चहाच्या कारखान्यातून बाहेर पडलो की या मार्गावर मथूपेट्टी नावाचे धरण लागते. हे धरण उथिरापुझ्झा, चंदूवऱ्हाई आणि कुंडळे या तीन नद्यांच्या संगमावर आहे. या धरणातील पाण्याने जलविद्युत निर्मिती केली जाते. या धरणाच्या valve वरूनच पुढे जावे लागते. या धरणाच्या दरवाज्यातून सोडलेले पानी हे वरील valve वरुन पाहणे हा एक विलक्षण अनुभव आहे. या धरणापसून ते पुढे echo-point, कुंडला-धरणापर्यंत आपण महाराष्ट्रात आहोत की काय असे वाटावे इतके मराठी ऐकू येते. येथे बहुतांश पर्यटक महाराष्ट्रातील असतात. ‘Echo-point’ हे अत्यंत गर्दीचे असे ठिकाण आहे. येथे बोटिंग इत्यादि activity व खरेदीसाठी खूपशी छोटी छोटी दुकाने आहेत. येथील पाण्याच्या पलीकडील बाजूस निलगिरीचे जंगल आहे व त्यामागे पहाडी भाग आहे. त्यामुळे येथे जोरात ओरडले की आवाजाचा प्रतिध्वनि (Echo) ऐकू येतो. बरेचजण या गोष्टीची प्रचिती घेत असतात.
‘Echo-Point’ वरून पुढे निघालो की कुंडले नदीवरील कुंडला धरण लागते. इथे water sports आहेत तसेच घोड्यावरून सैरसपाटा मारता येतो. येथे प्रदूषण होऊ नये म्हणून सर्व Boats या Paddle-boats आहेत, तसेच येथे तराफेही आहेत. बहुतांश पर्यटक येथूनच परत जातात. ज्यांना माहिती आहे ते पुढे top-station पर्यन्त जातात. वाटेत खूप सुंदर ठिकाणे आहेत. आपण गाडीतून जात असताना आपल्याला खूपदा खाली उतरण्याचा मोह आवरता येत नाही त्यामुळे खरंतर चालतच जावे असे वाटते. पुढे छोटी खिंड लागते, ज्यापासून जवळच तामिळनाडू राज्याची सीमा आहे.
आम्ही एकदा तेथे जीपने गेलो होतो. गाडी चालवणारा एक स्थानिक मुलगा होता, तो वाटेत तेथील बरीच माहिती सांगत होता . मुलगा एकदम चुणचुणीत वाटला . येथील जवळच्याच खेड्यातील राहणारा होता. त्याच्या बोलण्यातून समजले की सिझन मध्ये एका दिवसाला त्याला ४००रु मिळतात . इतरवेळी मात्र पोट भरण्यासाठी काही छोटीमोठी कामे करावी लागतात . परंतु नोटबंदीनंतर पर्यटक बरेच कमी झाल्याने सिझनलाही फारशी कमाई होत नाही. येथील स्थानिक लोकांचा रोजगार हा बराचसा पर्यटकांवरच अवलंबून असल्याने नोटबंदी नंतर तो अडचणीत सापडला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
उस्वाया
रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...
-
http://bhargavasarma.blogspot.com/2010/01/basar-rare-temple-of-goddess-saraswathi.html Basar - A Rar...
-
https://matriwords.com/2019/02/17/hampi-continues-to-live-part-1/ Hampi Continues to Live – Part 1 In this several-part series...
-
https://wanderingtamil.blogspot.com/2019/01/koothanur-mahasaraswathi-temple.html?view=flipcard Koothanur Mahasaraswathi Tem...


No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.