Sunday, February 4, 2024

लोहरीचा आनंद घ्यायचाय? मग, पंजाबमधील 'या' शहरांना नक्की द्या भेट

 


Monika Lonkar –Kumbhar

Lohari 2024 : आज देशात लोहरी आणि भोगीचा उत्साह पहायला मिळत आहे. मकर संक्रांतीचा सण सोमवारी(१५ जानेवारी) देशभरात साजरा केला जाणार आहे. त्यापूर्वी देशात आज लोहरी आणि भोगीची धामधूम पहायला मिळत आहे. लोहरीचा सण हा शीख धर्मामध्ये खास मानला जातो. पंजाबमध्ये या लोहरीची एक वेगळीच शोभा पहायला मिळते.

लोहरीच्या दिवशी पंजाब राज्यातील अनेक शहरांमध्ये लोहरी स्पेशल कार्यक्रमांचे खास आयोजन केले जाते. मग, या कार्यक्रमामध्ये भांगडा या लोकनृत्याचा लोक मनापासून आनंद घेताना दिसतात. लोहरीच्या दिवसापासून रात्र लांब आणि दिवस लहान होतो, असे मानले जाते.

जर तुम्ही यंदाची लोहरी पंजाबमध्ये साजरी करण्याचा विचार करत असाल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे. कारण, आज या लेखामध्ये आम्ही तुम्हाला पंजाब राज्यांमधील काही शहरांबद्दल सांगणार आहोत. जिथे तुम्ही फिरण्याचा आनंद घ्याल आणि लोहरीचा ही आनंद घेऊ शकाल.

चंदीगढ

चंदीगढ या शहराबद्दल बोलायचे झाल्यास हे ठिकाण फिरण्यासाठी अतिशय उत्तम आहे. हे शहर पंजाब आणि हरियाणा या दोन्ही राज्यांची राजधानी देखील आहे. चंदीगढ शहरातील सुप्रसिद्ध रॉक गार्डन, सुखना तलाव आणि रोझ गार्डन सारखी अनेक पर्यटनस्थळे येथे आहेत.

ही पर्यटनस्थळे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असल्यामुळे येथे नेहमीच देशी-विदेशी पर्यटकांची गर्दी पहायला मिळते. लोहरीनिमित्त या शहरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे खास आयोजन केले जाते. या कार्यक्रमांमध्ये तुम्ही देखील सहभागी होऊ शकता आणि लोहरीचा आनंद घेऊ शकता.

जालंधर

पंजाब राज्यातील सर्वात जुने शहर म्हणून जालंधरची खास ओळख आहे. फिरण्यासाठी हे शहर एक उत्तम पर्याय आहे, त्यामुळे, येथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. लोहरीनिमित्त या शहरामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे खास आयोजन केले जाते. या कार्यक्रमांची तयारी बऱ्याच दिवसांपासून केली जाते.

सुवर्ण मंदिर (अमृतसर)

लोहरीच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही सुवर्ण मंदिराला अवश्य भेट देऊ शकता. शिखांचे पवित्र पूजेचे ठिकाण म्हणून अमृतसरची खास ओळख आहे. या पवित्र मंदिराला भेट देण्यासाठी देशी-विदेशी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. या शहरात प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. लोहरीनिमित्त या मंदिराला नक्की भेट द्या आणि लोहरी निमित्त आयोजित केलेल्या येथील सांस्कृतिक कार्यक्रमांचा नक्की आनंद घ्या.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://mumbaichaganpati.blogspot.com back up incomplete

 http://mumbaichaganpati.blogspot.com/2010/08/shree-ashtavinayak-yatra-mahad-shree.html  Shree Ashtavinayak Yatra.- Mahad ( Shree Varad vina...