https://www.instagram.com/p/C3VMolWJpf-/?img_index=1
कसबा संगमेश्वरातील उपेक्षित मंदिरे 🛕
रत्नागिरी जिल्ह्यातील अलकनंदा, वरुणा व शास्त्री नदीच्या संगमाचे ठिकाण असलेले संगमेश्वर एक पवित्र धार्मिक स्थळ आहे. सह्याद्री खंडामध्ये या प्रदेशाला दक्षिण काशी क्षेत्र असे म्हटले आहे.
हजारो वर्षापूर्वी ह्या परिसरास काशी एवढेच महत्त्व प्राप्त होते.
येथे अनेक ऋषी जप तप करीत असत, विंध्याचल पर्वताला नमवून अगस्ती ऋषी ह्यांनी हरिहरेश्वर अन् सभोवतालच्या परिसरात वास केला, त्यामुळेच ह्या परिसरात अनेक मंदिर बांधण्यात आली.
सातव्या शतकात चालुक्य राजा कर्ण याने आपली राजधानी करवीर, कोल्हापूर इथून संगमेश्वर येथे स्थापन केली. त्यानंतर या गावाला मोठी तटबंदी बांधून मंदिरे आणि महाल उभारले. बाराव्या शतकात लिंगायत समाजाचे बसव यांचे वास्तव्य संगमेश्वरमध्ये होते, तर सोळाव्या शतकात विजापुरी अंमल होता. सतराव्या शतकात शेख मुकर्रबखानाने छत्रपती संभाजीराजांना बेसावध स्थितीत संगमेश्वरातच कैद केले होते. येथील प्रमुख मंदिराला सन २०१२ मध्ये पुरातत्व विभागाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले.
हे मंदिर ज्यांनी उभं केलं त्यां शिल्पकारांच्या कलाविष्काराचं कौतुक करावं तेवढ थोडंच आहे. संगमेश्वरमधील या मंदिरांचा परिसर अत्यंत शांत व रमणीय आहे.
मंदिरावर अप्रतिम शिल्पसौंदर्य कोरलेले आहे.
महाद्वार, मुख्य मंडप, नंदीमंडप आणि भिंतींवर कोरलेल्या अष्टभैरव, द्वारपाल, शंकर, देव-दानव, यक्ष, किन्नर, नृत्यांगना यांच्या प्राचीन प्रतिमा या गतकालीन शिल्पवैभव आपल्यासमोर उभे करतात. कसबा संगमेश्वर या नावने हा परिसर ओळखला जातो व येथील विविध हेमाडपंती देवळांमधे अतिशय सुंदर शिल्पं पाहता येतात.
महाराष्ट्रतील सर्वात मोठया उंचीची सतिशिळा - मुपो. विटाई, ता. साक्री, जिल्हा धुळे 🗿
सतीवरील काव्य ✍️
एका अखंड सौभाग्यवतीस नमन.
स्वामी कसे जाऊ देऊ एकट्याने तुम्हाला
थांबा थोडं भरू द्या मळवट कपाळी.
वाण वाटते सतीचे चंदनकाष्ठाच्या चितेवर.
तुमचे मस्तक मांडीवर घेऊन सहगमन करते ही अखंड सौभाग्यवती...!!!
जी स्त्री पतीच्या मृत्यूनंतर स्वतः मरणाला कवटाळते, ती स्त्री उत्तम व एकनिष्ठ असते, ती तीन कुळांचा म्हणजे आईचे, बापाचे व पतीचया कुळाचे उद्धार व पवित्र करते. सतीने पतीबरोबर चितेवर जाणे याला सहगमन अशी संज्ञा देण्यात आली आहे. म्हणजे ती पतीबरोबर स्वर्गात जाते.
जर एखाद्या विधवा स्त्रीला पतीच्या चितेवर चढता नाही आले. आणि पतीचे दहन झाले, तरीही पतीच्या पादुका बरोबर घेऊन नंतर सती जाऊ शकते. या कृत्याला अनुगमन किंवा अनुमरण म्हणतात.
रणांगणावर पतीचा मृत्यू जर खूप दूर झाला असेल, तर त्याची पत्नी त्याच्या गावी सती योद्ध्याच्या पादुका घेऊन सती जात असे. अशा स्मारकावर अंकित केलेले सूर्य चंद्र हे त्याच्या कीर्तीचे साक्ष म्हणून कोरलेले असतं.
जर त्या स्त्रीचा सामाजिक-आर्थिक स्तर चांगला असेल, प्रतिष्ठा चांगली असेल तर त्या सतीशिळा अलंकृत केलेली असे.
सदरील सतीशिळा ही धुळे जिल्यातील साक्री तालुक्यातील विटाई ह्या गावातील आहे. साधारण नवव्या शतकातील राष्ट्रकुट साम्राज्यातील भाग असलेल्या ह्या प्रदेशातील ह्या सतीशिळेवर सती जाणारी महिला योध्या समवेत समागम अवस्थेत दर्शवण्यात आलेली आहे त्यामुळे ह्याला समागम सती शिळा देखील म्हणतात.
चतुर्भुज शिळेच्या एका बाजूस योद्धा विजयी मुद्रेत हात वर करून स्वर्गा रोहन करीत आहे तर दुसऱ्या बाजूनं सदरील सती ही आपल्या मुला समवेत सती जाण्यापूर्वी शिव अर्राधना करताना दाखवलेले आहे हेतू शिव आराधनेचे पुण्याफळ तिच्या मुलास लाभो एव्हढेच.
पुढील बाजूस सती पूर्ण कुटुंबं समवेत गळ्यात ग्राविका हा माळेसारखा दागिना समवेत कानात गोलाकार कर्णकुंडले, कमरेला मेखला गुंडाळलेले वस्त्र व कमरपट्टी दिसत आहे. सदरील सतीचा एक हात मुलाच्या डोक्यावर आशीर्वाद मुद्रेत आहे.
चौकटिखाली शिलालेख कोरलेले असून त्यात राष्ट्रकूट गोविंद तृतीय असा उल्लेख केलेला आहे.
सदरील शीला ही २५ फूट पेक्षाही मोठी असावी परंतु मंदिरच्या बांधकामात गाडली गेल्यामुळे बरीच क्षती तिला पोहोचलेली दिसते.
तुम्ही देखील ह्यापेक्षा मोठी सतिशिला पहिली आहे का ?
सिर्सितील सहस्त्रशिवलिंगे 💠☘️
कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड भागातील सीर्सी ह्या गावात शाल्मली नदीपात्रातील खडकात शिव आराधने साठी जवळपास एक सहत्र म्हंजे १००० शिवलिंग कोरलेली आहे.
ज्यातील मुख्य लिंगासमोर विशाल नंदी सर्वांचे लक्ष वेधून घेतो.
इतिहासातील प्रमाण पाहिले तर विजनगरचे शासक सदाशिवराय ह्यांनी वर्ष १६७८ ते १७१८ साल दरम्यान ह्या शिवलिंगाची स्थापना केल्याचे सांगितले जाते.
तसेच काहींच्या मते ह्या शिवलिंगाची स्थापना कर्नाटक मधील राजा सोंडा अकसप्पा नायक ह्यांनी पुत्र प्राप्तीच्या आरधने पोटी ऋषीच्या सांगण्यावरून सहस्र शिळेवर शिवलिंग कोरले, ज्याचे फळ म्हणून त्यांना राज्याला उत्तराधिकारी मिळाला.
सिर्सीतील सहत्रलिंगे ही नदीपात्रातील काळया खडकावर कोरलेली असून प्रत्येक शिवलिंगाचे आकार हे वेगवेगळे आहे. नदीपात्रातील जेव्हा पाण्याची पातळी कमी असते तेव्हाच शिवलिंग समवेत इतर शिल्पाचे व्यवस्थित निरीक्षण आपल्याला करता येते. अलीकडच्या काळात ह्यातील बऱ्याच शिवलिंगाची झीज झालेली असून त्यावर पर्यारी जलप्रवाह करून हे स्थान सुरक्षित ठेवणे फार गरजेचे आहे.
अश्या प्रकारे नदी पत्रात शिवलिंग कोरण्याची संस्कृती भारताबाहेर कांबोडियातील देशात अकराव्या शतकात खेमार साम्राज्यातील राजा उदयादीत्यवर्मन द्वितीय ह्याच्या कारकीर्दीत kbal spean नावाच्या नदीपात्रात अश्याच प्रकारची सहस्त्रलिंग कोरलेली आढळतात, ज्यामुळे त्या काळात दक्षिण पूर्व आशियाई देशांतील हिंदूंचे प्रस्थ लक्षात येते.
Giant Maa Sita / Hanuman Pad, Lepakshi (AP) 👣
This giant footprint is from the veerbhadra temple at lepakshi, Andra Pradesh. Some say its footprint of Mata Seeta Devi, some says it's of Bhagwan Hanuman.
Bhagwan Hanuman landed at this spot and the force was so great that his footprint was left pressed into the solid stone.but I don't know this is true or falls I am also belived like everyone but there is no any solid proof to prove its footprint of Mata Seeta Devi or Bhagwan hanumana.
Constructed at Penukonda during King Achutaraya’s reign in 1530 by Virupanna Nayaka and Viranna, brothers who were Governors in Vijayanagar Empire.
This is one of the divyakshetras, (Shiva’s significant pilgrimage place) as per Skanda Purana.
Legend is that the mandir was built by Maharshi Agastya.
It is believed that Pakshi Jatayu fell here after battle with Ravana to rescue Ma Sita.
Sri Rama is believed to have said to the brave bird “Le Pakshi” — ‘rise, bird’ in Telugu. From this, the place got it’s name.
The mandir is dedicated to Veerbhadra whom Shiva created in anger after Daksha Yagna.
The mandir floor also has a huge footprint believed to be that of Ma Sita that was created when Ravana stopped here for sometime after abducting her. The footprint is always moist.
The monolith Nandi sculpted from a single block stone is positioned in such a way that it faces Nagalinga inside the mandir complex.
The Hall has the famous Hanging pillar that doesn’t touch the ground. One can pass thin objects like piece of cloth from one side to other.
Monuments of BHARAT : Ekshila Nandi 🐂 Lepakshi Complex 🛕 Andhra Pradesh 🗺️
In
the Anantapur district of Andhra Pradesh, this hidden gem often flies
under the radar of mainstream tourist destinations. But let me tell you,
it's a place worth checking out!
Whether it's the intricately
carved Veerabhadra Temple, the 18ft monolith of Nagalinga or the giant
Nandi sculpture (largest such sculpture in India) - the stunning
architecture of Lepakshi is a testament to the craftsmanship of the 16th
century Vijayanagara artisans.
Truly fascinating...!!!
Monuments of BHARAT : Sage Bhringi And His Dance Inventions 🩰
The sculpture on the left is that of Sage Bhringi that on the right is that of Apsara Ramba,
Sage
Bhringi is known as the master of dance and it is known that Bhringi
taught dance to the four Apsaras Ramba, Urvasi, Menaka and Thilottama.
Hence, you see Ramba copying the steps / mudras of Sage Bhringi here
and is beautifully carved in the Natyamamdapa inside the Lepakshi
Veerbhadra temple.
Beautiful sight !
Snake Charmer's of Shree Veerbhadra Temple, Hindupur. Andhra Pradesh.
श्रीक्षेत्र नांदूर - मध्यमेश्वर 🦌
नाशिकच्या
गोदावरी व निफाडच्या कादवा नदी संगमतीरी नांदूर गावात मध्यमेश्वर नावाचे
शंकराचे पुरातन मंदिर आहे. सदर भूमीला पौराणिक महात्म्य लाभल्यामुळे नांदूर
गावाची प्रचिती अध्यात्मिक महती सोबतच येथील पक्षी अभयारण्य मुळे सर्वदूर
पोहोचली आहे.
येथील मृगव्याधेश्वर मंदिरारबद्दल अशी अख्यायिका आहे
की, वनवासात प्रभू श्री राम वास्तव्यास असताना रावणाच्या आज्ञप्रमाणे मारीच
राक्षसाला कांचनमृगाचे रूप धारण करून पंचवटीत सीता पर्णकुटी जवळ पाठवले.
मायावी कांचांमृगाचे तेज बघता देवी सीतेला त्याचा उपयोग आपल्या कांचुकिसाठी
करण्याचा मोह झाला ते श्रीरामांना बोलून दाखविले . सीतेचा हाच मोह पूर्ण
करण्यासाठी
प्रभू त्या मृगाची शिकार करण्यासाठी त्याचा पाठलाग करत
नांदूर ह्यागावी पोहोचले. मृगाचा नेम लागताच प्रभूंनी बाण मारला.
ज्याठिकाणी त्याचे खुर घायाळ झाले त्या जागी नांदूर मध्यमेश्वराची स्थापना
करण्यात आली.
सदरील परिसरात शिवाची अनेक मंदिर असून त्यापैकी
मध्यमेश्वर, बाणेश्र्वर, श्रीरामाचे - रामेश्वर, गंगेश्वर अशी अनेक पुरातन
मंदिर आहेत. ह्यापैकी मध्यमेश्वराच्या मंदिरातील घंटा दगडी असून त्यास
इंदूरच्या होळकरांनी भेट दिल्याचे सांगितले जाते.
मध्यमेश्वरचे श्रीमुख देखील अपत्य प्राप्ती झाल्यामुळे इंदूरच्या होळकरांनी दिल्याच्या नोंदी आहेत.
You know you’ve found real gold when it’s not on display.
📍Location : Remains Of Holkar Wada, Tal. Niphad Dist.Nashik
वीरगळ" 🤺 🚩
हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्।
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः।।
गीतेतील
या श्लोकाप्रमाणे जर युद्धात माणूस मेला तर तो तत्काळ स्वर्गाला जातो, आणि
जिंकला तर त्याला पृथ्वीवरील राज्य उपभोगायला मिळते. या संकल्पनेतून
"वीरगळ" तयार झाले.
🔹वीरगळ परंपरा ही कर्नाटकातून महाराष्ट्रात आली
असे मानले जातात. कर्नाटक राज्यात मोठमोठे वीरगळ आढळून येतात, त्यातील
काही वीरगळ हे शिलालेखांनी युक्त आहेत. महाराष्ट्रात शिलालेख कोरलेले वीरगळ
तुलनेने कमी आहेत. कानडी भाषेत कल्लू म्हणजे दगड. वीरकल्लू म्हणजे वीरांचा
दगड. त्यावरून महाराष्ट्रात वीरगळ असा शब्द प्रचलित झाला असावा.
हे
वीरगळ याच वीर पुरुषांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला (सहसा - दगडांचा
अथवा लाकडाचा) स्तंभ असतो. हा जरी निर्जीव दगड दिसत असला तरी याला स्वत:चा
जिवंत असा इतिहास आहे.
🔹सदरील चित्रातील वीरगळ ही मु.पो. बलसाणा, ता. साक्री जिल्हा धुळे येथील कानबाई मंदिर परिसरातील आहे.
🔹सदर
वीरगळ ही स्तंभ / वैशिष्ट्यपूर्ण श्रेणीतील सैन्यातील मोठ्या वीराची /
सेनापतीची आहे. स्तंभाच्या चारही बाजूने यात "घोडदळ - पायदळातील
युद्धप्रसंग" दाखविलेला आहे.
🔹वैशिष्ट्यपूर्ण / स्तंभ वीरगळीचे वाचन करत असताना त्याचे वाचन खालच्या बाजूने वरच्या दिशेला प्रत्येक बाजूने करावे.
१)
पहिल्या बाजूस घोडदळ युद्धप्रसंग शत्रू सैन्याला नामोहरम करताना दिसत आहे
तसेच मारुतीराया अभय मुद्रेत वीरांचे मनोबल वाढविणारे आहे.
२)
दुसऱ्या बाजूस घोडदळ वीराच्या नेतृत्वात पायदळ सैन्याची तुकडीसमवेत
युद्धप्रसंग दर्शविलेले आहे तसेच वरील भागात हत्तीस्वार सैनिकांकडून
शत्रुसैन्या पायी तुडविल्याचे प्रतीक युद्धाची भीषणता दर्शविणारे आहे.
३)
तिसऱ्या बाजूस वीराचे दोन पत्नी सोबत अप्सरा समवेत स्वर्गारोहन दाखवलेले
आहे त्यात वरील बाजूस वीराचे अंतरिम विधी वैदिक पद्धतीने केल्याचे शिल्प
आहे. वरील बाजूस वीराची पूर्णाकृती प्रतिकृती कोरलेली आहे.
४)
स्तंभाच्या चौथ्या बाजूस स्वर्गातील चौरांगाचे पाट ह्याचा मान वीराला स्थान
मिळालेले असून त्यावरून वीरगती प्राप्त झालेला वीर एकतर मोठा सेनापती,
मुख्य अधिकारी किंवा त्याचे शौर्य त्याकाळी मोठा असावा.
स्वर्गाचा
प्रतिनिधी पुरोहित शिष्यगण समवेत शिवपिंडी समोर वीरास ( वीरपत्नी समवेत)
वेदमंत्र सांगत आहे. शिव पिंडीवर अर्पण कमळ फुलाची वेलबुट्टी / पुष्पमाला
दाखवलेली आहे.
सदरील वीर हा आपल्या अश्र्वा सोबत युद्धात धारातीर्थी गेल्याचे सदरील वीरगळीच्या वरीलबाजूवरून समजते.
सातमाळेतील भुलेश्वर - श्री वटेश्वर महादेव मंदिर 🪷
नाशिक
जिल्ह्यात चांदवड तालुक्यातील प्रसिद्ध अश्या धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी
असलेले धोडंबे हे साधारण पाच हजार लोक वस्तीचे एक गावं. नाशिकहून
मुंबई-आग्रा महामार्गावर ५० कि.मी. अंतरावर वडाळभोई गाव लागते. डाव्या
हाताने वडाळभोईतून भायाळेमार्गे धोडंबेकडे जाता येते. वडाळीभोईतून धोडंबे
हे अंतर आठ कि.मी. आहे तर चांदवड ते धोडंबे हे अंतर २६ कि.मी. आहे. कदरू
आणि विनता नदीच्या संगमावर धोडंबे गाव वसले आहे. धोडप किल्ल्यामुळे गावाला
धोडंबे असे नाव पडले असावे तसेच धौम्य ऋषींमुळे गावाला धोडंबे हे नाव पडले
असेही ग्रामस्थ सांगतात.
मध्ययुगीन काळात प्रचलित झालेली
वास्तुशैली म्हणजे हेमाडपंती स्थापत्य शैली. हेमाडपंत स्थापत्य जगप्रसिद्ध
करणारा हेमाद्री कोण होता, याबद्दल अनेक प्रवाद आहेत. हेमाद्री ऊर्फ
हेमाडपंत हा यादव राजा महादेव याचा श्रीकरणाधिप आणि नंतर यादव राजा
रामदेवराव (१२७१–१३११) याच्या पदरी मंत्री होते, असे म्हटले जाते.
हेमाडपंताने असंख्य मंदिरे बांधली आणि हिंदू धर्माच्या प्रचार-प्रसारार्थ
मोठे योगदानही दिले. त्यामुळे दगडातील प्रत्येक मंदिराला हेमाडपंती
म्हणण्याची प्रथा रूढ झाली. हेमाडपंती मंदिरशैली हेमाद्रीच्या पूर्वीही
होती; मात्र हेमाद्रीने या मंदिर संस्कृतीला बळ दिल्याने सर्वच मंदिरांना
हेमाद्रीवरून हेमाडपंती मंदिरे म्हंटले जावू लागले. असे असले तरी हेमाडपंती
शैली वैशिष्ट्यपूर्ण असल्याने आजही ही मंदिरे डोळ्यांची पारणे फेडतात.
हेमाडपंत यांनी प्रचलित चुन्याने दर्जा न भरता घडीव दगडांवर दगड रचून तयार
केलेली वास्तू हे हेमाडपंती मंदिरांचे वैशिष्ट्य मानले जाते तर या मंदिराचे
स्तंभ वैशिष्ट्यपूर्ण व एकसंध पाषाणात घडविलेले आरसपानी आहेत. ते चौकोनी,
षटकोनी, अष्टकोनी साधारणतः चौरस आकारात सजलेली दिसतात. हेमाद्री कोण होता
याचा शोध या मंदिराच्या सुंदरतेवरूनही लावता येतो. यादवांच्याच काळात घडीव
दगडांची देवळे उभारण्याचे तंत्र कसे किंवा का आले हे आज तरी सांगता येणे
कठीणच; पण यादव सम्राटांनी, विशेषतः त्यांचा प्रधान अमात्य हेमाद्रीने ही
शैली अधिकाधिक विकसित केल्याचे दिसते.
गावात हेमाडपंती वटेश्वर हे
महादेव व शेजारी विष्णू मंदिर आहे. ही दोन्ही मंदिरे फक्त २ ते ३ फूट अंतर
ठेवून आहेत. मंदिराच्या आजूबाजूला अनेक लहान मोठी मंदिरे आहेत. महादेव
मंदिरा बाहेर अनेक समाधी आहेत. मंदिर १२व्या शतकातील असून मुखमंडप,
सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना असून अजून एक वैशिष्ट्य
म्हणजे गर्भगृह व सभामंडप दोन्ही ही तारकाकृती आहेत. (उर्वरित कॉमेंट
मद्ये) यामुळे
मंदिराच्या बाह्यअंगावर क्षिप्त-उक्षिप्त भाग तयार झाले असून त्यावरील
मूर्ती, नक्षीकाम बघण्यात वेगळाच आनंद मिळतो. येथील अजून एक वैशिष्ट्य
म्हणजे येथील अप्सरा ह्या विविध प्रकारच्या प्राण्यांवर आरूढ झालेल्या असून
सोबत सेविका देखील आहेत.
महादेव मंदिरात काही वर्षांपूर्वी
दरोडेखोरांनी चांदीचा मुकुट व पंचधातूची नागाची मूर्ती असा सुमारे तीन ते
चार लाखांचा ऐवज चोरला होता. यावेळी मंदिरात झोपलेल्या एका वृद्धाला
दरोडेखोरांनी ठार केले होते. त्यामुळे आता ग्रामस्थांकडूनच मंदिराची विशेष
काळजी घेतली जाते. दगडातील अप्रतिम नक्षीकाम पाहताना थक्क करणारे हेमाडपंती
शैलीतील प्राचीन वटेश्वर मंदिर अन् खव्यासाठी प्रसिद्ध असलेले धोडंबे आपली
वेगळी ओळख आजही टिकवून आहे.रावणेश्वर श्री महादेव मंदिर, शिवूर बंगला - वैजापूर, जि. छ. संभाजीनगर
वैजापूर
शहरापासून साधारण २८ किमी अंतरावर शिवूर बंगला परिसरात / गावातील महादेव
मंदिर हे रावणेश्र्वर श्री महादेव मंदिर म्हणून ओळखले जाते.
रावणेश्र्वर
- खोलेश्वर - नर्मदेश्वर - पितळी महादेव - माणकेश्वर अश्या वैविध्य
शिवालयांनी शिवूर गाव समृद्ध आहे. त्यापैकी रावणेश्र्वर श्री महादेव मंदिर
हे प्राचीन असून शिवलिंगाची स्थापना परम शिवभक्त लंकाधिश रावण ह्याने
केल्याची अख्यायिका आहे.
रावणाने अमरत्व प्राप्त व्हावे म्हणून
शिवाचे अनुष्ठान ह्याजागी केल्याचे प्रतीक म्हणून नऊ शिरकमळे अर्पण
केल्याचे शिल्प मंदिराच्या प्रवेश द्वारापाशी दर्शविलेले आहे.
रावणेश्वर
श्री महादेव मंदिर हे महाराष्ट्रातील रावणाच्या नावाने ओळखले जाणारे एकमेव
मंदिर आहे ज्याची स्थापना रावणाने केली. पुढे जाऊन मालवा राणी पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर यांनी ह्या मंदिराची पुनर्बांधणी ज्योतिर्लिंग श्री
घृष्णेश्वर महादेव मंदिर जीर्णोद्धारावेळी केल्याचे समजते.
मंदिराच्या
देवकोष्ठ मध्ये आतल्या बाजूस कालभैरव व मंगलमूर्ती गणेशाची तसेच
बहिर्भागात महिषासुर मर्दिनी - उमा महेश्वर - विष्णुमुर्ती सोबत गजद्वंद
शिल्प कोरलेले आहे ज्यात माहुताची युद्धप्रसंगी झालेली दमछाक शिल्पकाराने
उत्तमरीत्या दर्शविलेली आहे.
श्री देव सप्तेश्वर मंदिर - संगमेश्वर रत्नागिरी 🕉️
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
कोकणातील संगमेश्वर या गावाजवळ हे मंदिर वाकाटक राजांनी, शिलाहार राजवटीत इ. स. 12 व्या शतकात बांधले.
सात प्रवाहांचा स्वामी म्हणजेच श्री देव सप्तेश्वर 🔱
सप्तेश्र्वर
मंदिर देवराई ( देवाच्या नावाने राखून ठेवलेले वनक्षेत्र ) परिसर सध्या
महाराष्ट्र राज्याच्या अधिपत्यात असून जंगम गुरव कुटुंबीयांकडे पूजा व
देखभाल यांचा वहिवाटीचा हक्क आहे.
संगमेश्वराच्या डोंगरावर ऐन झाडीत दडलेलं श्री सप्तेश्वराचं मंदिर आवर्जून पाहण्यासारखं आहे.
निसर्गाचा
वरदहस्त लाभलेल्या या मंदिराचं प्राचीन जलव्यवस्थापन आणि या रमणीय परिसरात
मिळणारी शांततेची अनुभूती घेण्यासाठी कोकणात दडलेला हा खजिना आवर्जून
पाहायला हवा.
वैशाखवणव्यातील चौल्हेर छटा 💚
बागलाण
प्रांतातील तिळवण येथील किल्ले चौल्हेर / चाल्हेरीचा किल्ला / चौरगड
किल्ला हा मध्यम गिरिदुर्ग श्रेणीतील किल्ला आहे. सदरील किल्ल्याची उंची
३७०० फूट असून चढाई श्रेणी मध्यम आहे.
चौल्हेर किल्ल्याचा नैसर्गिक रचना साल्हेर प्रमाणे आहे , त्यामुळेच ह्याला साल्हेरचा जुळा भाऊ म्हणून देखील संबोधतात.
गडावर पाण्याचे तळे मुबलक प्रमाणात असून मोती टाके, शेवाळ्या टाके, हत्याऱ्या टाके, खेकड्या टाके आदी खोदिव टाके आहे.
किल्ल्याचे
पायथ्याशी आधी मोठा कोट होता येथे गवळी राजे राज्य करीत होते. त्याच
काळातील एक घोडेपागा आजही वाडी चौल्हेर गावात पहावयास मिळते.
किल्ल्याच्या
शिखरावरून मुख्यत्वे दीर भावजायाचा डोंगर, मार्कंडेय किल्ला , सप्तशृंगी
गड, साल्हेर सालोटा दुर्गजोडी, हरगड - मुल्हेर - मोरागड, मांगी - तुंगी,
न्हाविगड, राजद्येर - कोळढेर - इंद्राई, धोडप, कन्हेरगड दृष्टीस पडतात.
चौल्हेर किल्याचे हेच भौगोलिक महत्त्व लक्षात घेऊन केंद्रबिंदू म्हणून गवळी राजांनी त्याची बांधणी केली असावी.
चौल्हेरच्या
ह्या भटकंती मध्ये पहाटे तीव्र उन्हाळा, दुपारी पावसाळा अन् परतीला हिवाळा
अश्या सर्व ऋतूंचा अनुभव प्रवास विस्मरणीय करून गेला.
नरसिंह जयंती 🦁
धर्माच्या
रक्षणासाठी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला भगवान
विष्णूने नरसिंहाच्या रूपात अवतार घेऊन राक्षस राजा हिरण्यकश्यपाचा वध केला
याचसोबत भगवान नरसिंहाच्या परम भक्तीने भक्त प्रल्हाद यांना वैकुंठधाम
प्राप्त झाले होते, असे पुराणात म्हटले आहे.
नरसिंह हे अवतार भगवान विष्णू अर्धसिंह आणि अर्धमानव अशा रुपात प्रकट झाले.
भगवान विष्णूंचा सर्वात उग्र अवतार म्हणून नरसिंह अवतार ओळखला जातो.
श्री
नरसिंह स्वामींची विविध रूपे म्हणजे भार्गव नरसिंह, चतुर्वत नरसिंह,
योगानंद नरसिंह, करंजी नरसिंह, उग्र नरसिंह, क्रोधा नरसिंह, मलोल नरसिंह,
ज्वाला नरसिंह आणि पवन नरसिंह.
सदरील शिल्प हे कर्णेश्वर मंदिरातील
असून चतुर्भूज भगवान नरसिंह भारवाहक स्वरूपात हिरण्यकश्यपूचा वध अत्यंत
क्रूरपणे करताना दर्शिवलेले आहे.
आदिवासी
कुलदेवी म्हणून मान्यता असलेली पंडोरी देवी उर्फ याहा मोगी देवी
सातपुड्यातील आदिवासींचे श्रद्धास्थान आहे. हे क्षेत्र हेलो दाब म्हणजे
'क्षीत क्षेत्र" म्हणून प्रसिद्ध आहे. प्रति देवमोगारा म्हणून हे स्थान ता.
अक्कलकुवा जिल्हा नंदूरबार मधे सर्वश्रुत आहे.
याहा मोगी देवीला आदिवासींची अन्नपूर्णा म्हणून देखील संबोधले जाते.
येथे
उन्हाळ्यात देखील उणे शून्य तापमान असते. अल्प परीचीत थंड हवेचे ठिकाण
म्हणून देखील हे क्षेत्र निसर्गप्रेमी कडून पर्यटनासाठी निवडले जाते.
गं ड भे रुं ड 🔹💠
एक धड , दोन डोकी व दोन पंख असलेला, प्रसंगि पक्षिरुप अथवा अर्ध मानव देहधारी ( द्विमुख राक्षसी ) पक्षी म्हणजे गंडभेरूंड.
गंड
भेरुंडाच्या उत्पत्तीबद्दल एक दंतकथा सांगितली जाते. ती अशी की, नृसिंहाला
भगवान विष्णूचा अवतार मानून त्याची योजना हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी
झाली. परंतु हिरण्याकश्यपूचा वध केल्या नंतर प्राप्त झालेल्या शक्तीचा
त्याने दुरुपयोग करायला सुरुवात केली. त्यामुळे इतर देवीदेवतांनी आपला
सर्वनाश होईल ह्या भीतीने भगवान शंकराची प्रार्थना सुरू केली. ती ऐकून
शंकराने शरभ अवतार घेतला आणि नृसिंहाला मारले. मग भगवान विष्णूने गंड
भेरुंडाचे रूप धारण करून शरभाशी झुंज दिली. तेव्हापासून गंड भेरूंड हे
महशक्तीचे प्रतीक मानले जाते.
सदरील गंडभेरुंड हे चतुर्गजविजयी
पक्षीदेहधारी गंडभेरुंड प्रकारातील आहे. ह्यात द्विमुखी गंडभेरुंडाने
आपल्या दोन्ही पायात व दोन्ही चोचीत अत्यंत हिंस्र पद्धतीने प्रत्येकी एक -
एक हत्ती दाबून धरलेला आहे.
लाकडी नक्षीकामात क्वचितच गंड भेरुंड
चे शिल्प कोरलेले आढळते. सदर शिल्प हे राजवाडी येथील महादेव मंदिरातील
लाकडी तुळयावर कोरलेले आहे.
महाराष्ट्रातील किल्ले प्रवेशद्वार अथवा
मंदिराच्या परिसरात शरभ शिल्प सहजासहजी आढळते, गंडभेरुंड हे क्वचितच
दृष्टीस पडणारे सामर्थ्य शिल्प सापडते.
मत्स्यः कूर्मो वराहश्च नरसिंहश्च वामनः










































































.jpg)
























































No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.