नागपूर जिल्हा
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक जिल्ह्यांत विविध स्वरूपाची पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांची जिल्हावार माहिती महाभ्रमंती या सदरामधून आपल्याला मिळत असते. आज या सदरात परंपरा व आधुनिकता यांचा उत्तम संगम असलेल्या नागपूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती घेणार आहोत. नागपूर येथील संत्र्यांमुळे नारंगी शहर ओळखले जाते. ताडोबा, नागझिरा, नवेगाव आणि पेंच या अभयारण्यामध्ये जाण्यास हे मध्यवर्ती ठिकाण आहे.
खिंडसी तलावहिरव्यागार वनश्रीने नटलेल्या निसर्गरम्य परिसरात खिंडसी तलावाचा परिसर एखाद्या रत्नासारखा चमकून उठतो. स्थानिक लोकांसाठी तर हे एक अत्यंत आकर्षणाचे केंद्र बनले आहे. रामटेक तालुक्यात असलेल्या खिंडसी तलावाच्या सभोवताली घनदाट जंगल आहे. नागपूरपासून 53 किलोमीटर आणि रामटेकपासून 3.5 किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे. वैदर्भिय जनतेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून हे स्थळ आकर्षक आणि आवडीचे पर्यटन स्थळ बनले आहे. येथे येणारे पर्यटक मोटरबोट्स, पेडल बोट्स, रोवींग बोट्स, वॉटर स्कूटर्स आदींच्या माध्यमातून जलतरणाचा आनंद घेऊ शकतात. लहान मुलांसाठी येथे साहसी पार्कही आहे. तर साहसी उपक्रम करणाऱ्या मोठ्यांसाठी जंगलात ट्रेकिंगचीही सुविधा आहे.
| रामटेक या शहराचे सौंदर्य पाहून प्रत्यक्ष भगवान श्रीरामही येथे काळी काळ थांबले. त्यांच्या या वास्तव्यानेच या शहराचे नाव रामटेक असे पडले. येथील टेकडीवर श्रीराम व लक्ष्मणाची मंदिर आहेत. महाकवी कालिदासाचे स्मारकही येथे आहे. येथेच त्यांनी मेघदूत हे सुप्रसिद्ध संस्कृत महाकाव्य लिहिले असे मानले जाते. तोतलाडोह धरण नागपूर जिल्ह्यात नागपूरपासून 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या रामटेकजवळील पेंच नदीवर असलेले तोतलाडोह नावाचे धरण आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर हा परिसर आहे. हे धरण पेंच नदीच्या जलविद्युत प्रकल्पाचा एक भाग आहे. येथील परिसर अतिशय मनमोहक आहे. नवेगाव बांध नागपूरपासून 56 किलोमीटर अंतरावर पारशिवनी तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर नवेगाव बांध आहे. पारशिवनीच्या वनक्षेत्रात हे धरण अर्थातच बांध आहे. या धरणाच्या सभोवताली अतिशय समृद्ध असे पर्वत आहेत. हिरवळीची चादर ओढली गेल्यामुळे हा परिसर अतिशय शांत असून या क्षेत्रात असलेले विविध पक्षी पाहण्यासारखे आहेत. गोरेवाडा तलाव नागपूरच्या वायव्येकडे असलेला गोरेवाडा तलाव हा 2350 फूट खोल आहे. या तलावातील पाण्याचा उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी होतो. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने 1911 मध्ये या तलावाची निर्मिती केली होती. या तलावाच्या चहूबाजूला घनदाट जंगल असून या जंगलात वन्यप्राणीही आहेत. सेमिनरी हिल नागपुरातील सेमिनरी हिल ही लहान आकाराची टेकडी आहे. सेंट चार्ल्स यांच्या नावावर या टेकडीचे नाव ठेवण्यात आले आहे. या टेकडीवरून शहराचे विहंगम दृश्य पाहता येऊ शकते. सेमिनरी हिलचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे अगदी लागूनच असलेले जपानी गार्डन होय. सेंट चार्ल्स सेमिनरी आणि एस. एफ. एस. कॉलेज या टेकडीच्या वर आहे. येथील चालण्याचे मार्ग लाकडाने तयार करण्यात आल्याने सकाळी ताज्या हवेत चालणाऱ्यांना सुखद अनुभव मिळत असतो. सेमिनरी हिलच्या सर्वात वरून नागपूर शहराचे विहंगम दृश्य अनुभवता येऊ शकते. फुटाळा तलाव नागपुरातील अतिशय प्रसिद्ध स्थळ म्हणजे फुटाळा तलाव ! सर्वच वयोगटातील लोकांसाठी हे ठिकाण अतिशय योग्य आहे. नागपूरचे पूर्वीचे राजा भोसले यांनी हा तलाव बांधला आहे. रंगीत फवारे आणि आल्हाददायक वातावरण येथील वैशिष्ट्य आहे. सायंकाळी हॅलोजन दिव्यांमुळे येथील वातावरण अधिकच आकर्षक होत असते. तीन बाजूंनी वेढलेला तलाव, हिरव्यागार जंगलाचे कवच आणि एका बाजूला अतिशय सुंदर अशी व्यापक चौपाटी हेदेखील येथील मुख्य आकर्षण आहे. तलावाच्या किना-यावर आणि टेकडीवरून सूर्यास्ताचा मोहक अनुभव घेता येऊ शकतो. हा परिसर निसर्गाचा एक अद्भूत चमत्कारच आहे. सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, अनेक स्थलांतरित पक्षी या तलावाकडे आकर्षित होत असतात. त्यामुळे पक्षीप्रेमींसाठीही हा परिसर उपयुक्त असाच आहे. या विविध वैशिष्ट्यांमुळे गेल्या अनेक वर्षांपासून कुटुंबीयांकरिता हे अतिशय लोकप्रिय पिकनिक स्थळ ठरले आहे. अंबाझरी तलाव नागपूरच्या पश्चिमेकडे 6 किलोमीटर अंतरावर अंबाझरी तलाव आहे. शहरातील हा सर्वात मोठा आणि अतिशय मनमोहक तलाव आहे. या तलावाच्या देखभालीची आणि व्यवस्थापनाची जबाबदारी नागपूर महानगर पालिकेची आहे. तलावाला लागूनच अतिशय सुंदर असा अंबाझरी बगिचा आहे. 1958 मध्ये निर्माण करण्यात आलेल्या या बगिच्याचे क्षेत्रफळ 20 एकर इतके आहे. लहान मुलांसाठी येथे करमणुकीची वेगवेगळी साधने आहेत. कस्तूरचंद पार्क कस्तूरचंद पार्क हे नागपुरातील सर्वात मोठे बैठकीचे ठिकाण आहे. मध्यवर्ती रेल्वे स्थानकापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे. हजारावर लोक बसू शकतील, एवढी त्याची क्षमता आहे. शहरात जेव्हा मोठ्या मिरवणुका काढण्यात येतात तेव्हा हे स्थळ अतिशय लोकप्रिय ठरत असते. नगरधन किल्ला रामटेक तालुक्यात असलेल्या नगरधन या गावात हा किल्ला नागपूरच्या ईशान्येकडे 38 किलोमीटर आणि रामटेकच्या दक्षिणेकडे 9 किलोमीटर अंतरावर वसलेला आहे. नगरधन या जुन्या शहराची स्थापना सूर्यवंशी राजांनी केली आहे. नगरधन किल्ला हा या गावाचे वैशिष्ट्य असून, भोसले राजघराण्याचे राजा रघुजी भोसले यांनी हा किल्ला बांधला असल्याचे समजले जाते . या किल्ल्याच्या आतील भागात चौकोनी आकाराचा राजमहाल आहे. काही इमारतीही आहेत. या किल्ल्याच्या वायव्येकडील मुख्य द्वार अजूनही सुस्थितीत आहे. सीताबर्डी किल्ला नागपुरातील सीताबर्डी किल्ला हा सीताबर्डी येथील 1817 च्या युद्धाचे प्रतीक आहे. नागपूरच्या मध्यभागी एका लहान टेकडीवर हा किल्ला वसलेला आहे. नागपूरचे राज्यकर्ते आप्पासाहेब उर्फ मुधोजी द्वितीय यांनी तिसऱ्या अँग्लो—मराठा युद्धाच्या काळात ब्रिटीशांच्या ईस्ट इंडिया कंपनीविरोधात लढा सुरू करण्यापूर्वी हा किल्ला बांधला होता. हा परिसर टेकड्यांनी वेढलेला असून, तो आता सीताबर्डी या नावाने ओळखला जातो. हा परिसर नागपूरचे अतिशय महत्त्वाचे असे व्यावसायिक केंद्र आहे. या किल्ल्यात ब्रिटीश सैनिकांचे थडगे आणि महात्मा गांधींना ज्या तुरुंगात ठेवण्यात आले होते, तो सेल आहे. सध्या प्रांतीय लष्कराचे कार्यालय या किल्ल्यात आहे. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या दोन दिवशीच हा किल्ला सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात येतो. झिरो माईल झिरो माईलचे चिन्हांकन नागपुरात असल्यामुळे, हे शहर भारताचे केंद्रिंबदू आहे. हे चिन्हांकन भारताच्या मध्यवर्ती बिंदूचे चिन्ह आहे. अंतर मोजण्यासाठी ब्रिटीश राज्यकर्त्यांनी येथे झिरो माईल स्टोन उभारला होता. या झिरो माईल स्टोनचे स्वरूप चार घोडे आणि एक स्तंभ असे आहे. ते वाळूच्या दगडांनी बनलेले आहे. विधानभवनाच्या नैऋत्येकडे ते आहे. नागपूर हे भारताचे मध्यवर्ती शहर आहे, असे समजून ब्रिटीश राज्यकर्त्यांनी हे ठिकाण निश्चित केले आणि तिथे झिरो माईल स्टोन उभारला. हे शहर देशाचे मध्यवर्ती शहर असल्याने नागपूरला दुसरे राजधानीचे शहर करण्याचीही त्यांची योजना होती. जपानीज रोझ गार्डन नागपूरच्या सिव्हील लाईन भागात हे जपानी रोझ गार्डन आहे. हे गार्डन म्हणजे निसर्ग प्रेमींसाठी मोठी पर्वणीच आहे. नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घेण्याची इच्छा मनात बाळगणाऱ्यांसाठी हे ठिकाण अतिशय आकर्षक आहे. पक्ष्यांच्या सान्निध्यात राहण्याचा आनंदही येथे घेता येतो. पावसाळ्यात या गार्डनचे सौंदर्य अधिकच फुलत असते. उंच झाडे, हिरवे गवत आणि मनमोहक निसर्गाने ओतप्रोत असलेले हे गार्डन सकाळी आणि सायंकाळी ‘वॉकींग’ करणार्यांसाठीही अतिशय उपयुक्त आहे. या रोझ गार्डनमध्ये लाल आणि पिवळे गुलाब मुख्य आकर्षण आहे. या गार्डनच्या सभोवताल असलेले आणि अतिशय काळजीपूर्वक सुशोभित करण्यात आलेले काही लोखंडी शिल्प पाहिले की, हे खरोखरच जपानी गार्डन असल्याचे संकेत मिळतात. व्हीसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान नागपूरच्या जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाला व्हीसीए ग्राऊंड या नावानेही ओखले जाते. 2008 मध्ये ह गाऊंड उभारण्यात आले. त्याचवर्षी त्याचे उद्घाटन झाले. शहरातील जुन्या व्हीसीए मैदानाची जागा त्याने घेतली. हे मैदान रणजी ट्रॉफी आणि दुलिप करंडक स्पर्धेकरिता विदर्भ आणि सेंट्रल झानच्या संघांकरिता होम ग्राऊंड आहे. नागपूरपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या जामठा येेथे आहे महाराजबाग आणि झू शहराच्या मध्यभागी असलेले महाराजबाग आणि झू हे नागपूरचे मध्यवर्ती प्राणीसंग्रहालय आहे. शहरातील भोसले आणि मराठा राज्यकर्त्यांनी ते बांधले आहे. येथे काही दुर्मिळ जातीचे पक्षी आणि प्राणी आहेत. शहरातील अतिशय मनमोहन स्थळ अशी त्याची ओळख आहे. महाराज बागेत अतिशय दुर्मिळ प्राणी असल्याने योग्य उद्देशासाठी त्याचे बॉटनिकल गार्डनमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. या महाराजबागेतच प्राणीसंग्रहालयही आहे. शहरातील असे हे एकमेव स्थान असल्याने नागपूरकरांना त्याचा अभिमान आहे. रमण सायन्स सेंटर नागपूर शहरात असलेल्या या रमण सायन्स सेंटरला नोबेल पुरस्कार विजेते भारतीय भौतिकतज्ञ चंद्रशेखर व्यंकट रमण यांचे नाव देण्यात आले आहे. अतिशय उपयुक्त असे हे सायन्स सेंटर असून ते मुंबईच्या नेहरू सायन्स सेंटरशी संलग्न आहे. वैज्ञानिक कामकाजांना प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच उद्योग आणि मानव कल्याणाकरिता वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा विकास करण्यासाठी या सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. विविध स्वरूपाच्या विज्ञान प्रदर्शनीही येथे भरविण्यात येतात. मध्यवर्ती संग्रहालय (अजब बंगला) नागपूर शहरातील मध्यवर्ती संग्रहालयाला अजब बंगला या नावानेही ओळखले जाते. शहराच्या पश्चिमेकडे दीड किलोमीटर अंतरावर सिव्हील लाईन्स भागात ते आहे. 1863 मध्ये स्थापन झालेले हे संग्रहालय शहरातील सर्वात जुने आहे. प्राचिन काळात उपयोगात येणाऱ्या अनेक पुरातत्व वस्तू, शिल्पाकृती येथे संग्रहित आहेत. आर्ट, आर्चिओलॉजी, अॅन्थ्रोपोलॉजी, जिऑलॉजी, उद्योग आणि नैसर्गिक इतिहास अशा सहा गॅल-यामध्ये या सर्व वस्तू संग्रहित करण्यात आलेल्या आहेत. नॅरो गेज रेल संग्रहालय नागपूरच्या कामठी रोडवरील कडबी चौकात असलेले हे नॅरो गेज रेल संग्रहालय भारतातील असे एकमेव संग्रहालय आहे. 4.5 एकर जागेत असलेल्या या संग्रहालयात भारतीय रेल्वेच्या अनेक जुन्या आणि वारसा वस्तूंचे एकप्रकारे प्रदर्शनच भरविण्यात आले आहे. यात प्रामुख्याने लोकोमोटीव्ह आणि कॅरिएजचे मॉडल्स, हॅण्ड लॅम्प, जुने टेलिफोन संच आदींचा समावेश आहे. पेंच सिलारी हा परिसर प्रामुख्याने पेंच राष्ट्रीय उद्यान व व्याघ्र संरक्षित क्षेत्र म्हणून ओळखला जातो. सातपुडा टेकड्यांच्या दक्षिणेकडील पायथ्यापर्यंत सुमारे २५७ चो.की.मी. पर्यंत याचे क्षेत्र पसरले आहे. १९७५ मध्ये याला केंद्र सरकारतर्फे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले. तर १९९९ मध्ये या परिसरास व्याघ्र संरक्षित क्षेत्राचा दर्जा मिळाला. बोर वन्यजीव अभयारण्य बोर धरणामुळे निर्माण झालेल्या या घनदाट अरण्यासामध्ये विविध दुर्मिळ प्रजातींचे जीव आढळतात. बोर धरणसुद्धा पर्यटकांचे प्रमुख आकर्षण केंद्र बनले आहे. सेवाग्राम शेगाव गावातील आपल्या वास्तव्यादरम्यान महात्मा गांधींनी या आश्रमाची स्थापणा केली. या आश्रमाच्या संकुलामध्ये महत्मा गांधींचे निवासस्थान असलेल्या ‘बा कुटी’ व ‘आदी निवास’ आहेत. लेक गार्डन अद्भूत निसर्गाचा आनंद लुटायची जर कुणाची इच्छा असेल, तर त्याने नागपुरच्या सक्करदरा भागातील लेक गार्डनला अवश्य भेट द्यायला हवी. निसर्गाच्या आनंदासोबतच तुम्हाला मनासारखी विश्रांतीही येथे घेता येईल. यासाठी सक्कर दऱ्यातील लेक गार्डन सारखे दुसरे स्थळ नाही. आठवड्याची सुटी घालविण्यासाठी आणि मनासारखा आनंद लुटण्यासाठी हे सर्वोत्तम स्थळ आहे. या लेक गार्डन मध्ये खेळण्यासाठी पाच विस्तारित मैदान आहेत. गांधीसागर तलाव नागपुरच्या महाल भागात असलेला गांधीसागर तलाव हा शुक्रवारी तलाव आणि जुम्मा तलाव या नावानेही ओळखला जातो. रमण सायन्स सेंटरच्या अगदी समोर हा तलाव आहे. सुमारे 275 वर्षांपूर्वी नागपूरचे तत्कालीन राज्यकर्ते चांद सुल्तान यांच्या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून हा तलाव अस्तित्त्वात आला असल्याचे बोलले जाते. नाग नदीला सोडण्यात येणाऱ्या पाण्यातून या तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. जलसाठ्याशी संबंधित या तलावाचे नाव जुम्मा तलाव असेही ठेवण्यात आले आहे. 1742 मध्ये पहिले रघुजी यांनी आपल्या राज्याची राजधानी म्हणून नागपूरला घोषित केले आणि भोसले व ब्रिटीशांच्या राज्यकाळात या तलावाचे नाव शुक्रवारी तलाव असेही ठेवण्यात आले. या तलावाच्या मधोमध एक छोटेसे बेट आहे. या बेटावर आकर्षक शिवमंदिर आणि बगिचाही आहे. पिवळ्या रंगांच्या मर्क्युरी दिव्यांमुळे रात्रीच्या वेळी या तलावाचे सौंदर्य अधिकच मोहक असते. येथे येणाऱ्यांसाठी नौकाविहाराचीही सोय आहे. सातपुडा बॉटनिकल गार्डन नागपूरच्या फुटाळा तलावाजवळील सेमिनरी हिल्स भागात असलेले सातपुडा बॉटनिकल गार्डन हे अतिशय अद्भुत गार्डन असून, हजारो लोकांसाठी ते आकर्षणाचे केंद्रिंबदू ठरले आहे. सिटी सेंटरच्या ईशान्येकडे असलेल्या या सातपुडा बॉटनिकल गार्डनमध्ये अनेक दुर्मिळ वनस्पती आहेत. जीवशास्त्र, प्राणीशास्त्र आणि पर्यावरण विज्ञानाचा अभ्यास करणार्यांसाठी हे गार्डन अतिशय उपयुक्त ठिकाण आहे. कारण, येथे विविध वनस्पतींची महत्त्वूपर्ण माहिती उपलब्ध आहे. खेकरा नाला तलाव नागपूरपासून 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या खाप्रा येथील खेकरा नाला हे सौंदर्याने ओतप्रोत असलेले धरणाचे ठिकाण आहे. खापाजवळील छिंदवाडा मार्गावर ते आहे. साहसी कृत्य करणाऱ्यांसाठी विशेषत: पर्वतरोहकांसाठी हे ठिकाण अतिशय आदर्श असेच आहे. येथील मुख्य आकर्षण म्हणजे, खेकरा नाला धरणाच्या सभोवताली असलेला अतिशय शांत आणि निश्चल असा तलाव, सभोवताल असलेले घनदाट जंगल, हिरवागार निसर्ग, आरोग्यासाठी पोषक वातावरण हे होय. संकलन – विलास सागवेकर, उपसंपादक |
खरंय नागपुरला "प्रेक्षणीय स्थळं" अशी काही नाहीत. तिथली हवाही अशी नाही
की दिवसभर उन्हातान्हात भटकून तुम्ही फार काही पाहु शकाल. एवढा घाम गाळून
बघायचेच ठरवले तरी तशी मेहनत करुन बघण्यासारखं खरंच काही नाही.
तुम्ही कुठे रहाणार आहात? विमानतळ शहरापासुन म्हणजे समजा सीताबर्डीपासुन
१२-१५ किमी आहे. पण वेळ फार नाही लागत. फारतर अर्धा तास कारने.
रेशीमबागेत बघण्यासारखे काये? तुम्हाला संघाविषयी उत्सुकता असेल तर जाता
येईल. तिथे हेडगेवाराम्च्या स्मॄतीप्रित्यर्थ "स्मृतीमंदीर" आहे. शाळा आहे.
असली सावजी सगळे पुर्व नागपुरात आहेत अशी माझी जुनी माहिती आहे. रेशीमबाग पुर्व नागपुरातच आहे. त्यामुळे तिकडे गेलात तर मग भरपूर सावजी सापडतील. त्यापैकी सध्या कुठला सावजी फॅशनमध्ये आहे ते माहीत नाही.
तुम्हाला आवड असेल तर सकाळी टेकडीच्या गणपती मंदिरात जाता येईल. मग तिकडुन निघून बर्डीवर मेन मार्केटमध्ये शॉपिंग+खानपान (काय ते नागपूर खादाडी धाग्यावर पहा). करता येईल. मग हवंतर दीक्षाभुमिला जाता येईल. (मला टाइमिंग माहीत नाही तिथले). संध्याकाळी फुटाळा लेकला जायचं आणि परत येताना शंकरनगर चौकातल्या नवीन हल्दीराममध्ये जायचं (नाव विसरले.) . तिथे असंख्य मिठाया आणि बाकी बरंच काही आहे. त्यामुळे ऑल्मोस्ट जेवणच होईल.
मी नागपुरला गेले की कपडे खरेदी अजिब्बात मिस करत नाही. बेस्ट क्वालिटी, रिझनेबल किमती आणि प्रचंड व्हरायटी. सगळ्या लेटेस्ट फॅशन्स. त्या पुण्यात मला वर्षभरानी आणि नंतरही वर्षानुवर्षं दिसतात.
पुडाची वडी या धाग्यावर मृण्मयी नी दिलेले - बर्डी (सीताबर्डी)ला अभ्यंकर रोडवर, मुंजे पुतळ्याजवळ 'सुरुची' नावाचं दुकान आहे. आजुबाजूच्या हल्दीराम आणि इतर दुकानांच्या गर्दीत हे अगदी बकाल आणि छोटसं दुकान वाटतं. (वर्षानुवर्षं ते तसंच आहे.) तिथून पुडाच्या वड्या मागवता येतील. प्रवासात न्यायला स्पेशल पॅकिंग करतात. भरपूर तिखट, अजीबात मिर्च्या नकोत असल्या स्पेसिफिकेशन्ससगट करून देतात. वड्या आपल्यासमोर प्याक करतात.
इथेच मोठं हल्दिरामचं दुकानही आहे जवळच. हीरा स्वीट्स पण आहे. हीरा स्वीट्स मध्ये सोनरोल्स चांगले मिळतात. पर्सनली मला सोनपापडी अन सोनरोल हल्दिरामपेक्षा हीरा स्वीट्सचे जास्त आवडतात.
बाकी तुम्ही जुन्या नागपूरात वेळेअभावी नाही जाणार बहुतेक नाहीतर इतवारी, महाल या भागांत बरंच मार्केट आहे. इतवारीमध्ये अजूनही बहुतेक लाल ईमली चं एक दुकान आहे, त्यांच्याकडे चांगल्या प्रतीचे लोकरीचे कपडे मिळतील.
नागपूरात दीक्षाभूमी, टेकडी गणपती, गांधी सरोवर, महाराजा झू, रामन सायन्स सेंटर, रेल्वे संग्रहालय बर्डी परिसर पाहिला त्यांचाच हा लेखा-जोखा..............
नागपूर ला निघालेलो आम्ही तिघे ...
दि. ५ सप्टेंबर २०१५ ला नागपूर ला जाण्यासाठी निघालो.. पण व्हाया
मुंबई असे जायचे असल्याने "कोयंबतुर एक्सप्रेस ने जाण्याचे ठरले ..
'मुंबई'त 'चैत्यभूमी' व नूतनीकरण झालेले मत्यालय पाहीले . पण
अर्थातच अगोदर चैत्यभूमी ला गेलो. खालील दोन्ही चित्रमालिका तेथील च !
...
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पार्थिवावर मुंबई,
दादर येथे समुद्र किनार्यावर अग्नी संस्कार करण्यात आले. बौध्द
संस्कृतीनुसार या स्थळावर एक चैत्य उभारण्यात आला. त्यामुळे या परिसराला
‘चैत्यभूमी’ असे म्हणतात. भारतीय संविधानाचे शिल्पकार, थोर नेते, पत्रकार,
विचारवंत असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मानवी समतेसाठी आणि हक्कांसाठी लढणारे
एक झुंजार नेते होते. एकीकडे अथांग पसरलेला अरबी समुद्र तर दुसरी कडे
दादरची चैत्यभूमी दिसते. दादर चैत्यभूमी ही राष्ट्रपुरुष डॉ.बाबासाहेब
आंबेडकर यांच्या स्मरणार्थ बनवलेली आहे. दर वर्षी 6 डिसेंबर म्हणजेच
बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनाला आणि 14 एप्रिल या त्यांच्या
जन्मदिनी चैत्यभूमी कडे लाखोंच्या संख्येने भारताच्या काना-कोपर्यातून
अनुयायी येत असतात.
चैत्यभूमीच्या परिसरातील भव्य प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर अतिशय सुंदर
असा अशोकस्तंभ आपले लक्ष वेधून घेतो. त्यामागे असलेला अथांग समुद्र आणि
त्यावरील मानवाने केलेल्या अफाट प्रगतीची साक्ष देणारा सी-लिंक ही
सूर्यप्रकाशाने उजळून निघत असतो. तेथे अनुयायांच्या सोयीसाठी पोलिसांची कडक
सुरक्षा व महापालिकेची यंत्रणा ही चांगलीच सज्ज आहे.
.
.
हा फोटो सी-लिकं जवळचा
एकीकडे अथांग पसरलेला अरबी समुद्र तर दुसरी कडे चैत्यभूमी , सागरा त उभा सी-लिकं !.. हा दुर्मिळ योगायोग पहावा असाच आहे.
..
..
..
..
समुद्रातील अजून एक देखणं शिल्प ............ " हाजी अली "
छत्रपती शिवाजी टर्मिनस व रु न ८.२० सायंकाळी दोरांतो नागपूर एक्सस ने नागपूर कडे निघालो
.दोरांतो चा एक फोटो तो ब न ता है ...
'दोरांतो एक्सप्रेस' ने बरोब र ७.२० सकाळी नागभूमीत आगमन झालं .... १ल्या दिव शी दिक्षाभूमी व टेकडी गणपती ही ठिकाणी झाली. दोन्ही ठिकाणे नागपूरातील मर्मस्थाने म्ह्णून च ओळ्खली जातात .
नागपूरा त दोरांतो एक्सप्रेस' समोर एक चित्रपट्ट (फोटो)
'दिक्षाभूमी ' ही भारतातील बौद्ध ध्रर्माचे एक प्रमुख केंद्र आहे. नागपुरातील ह्या ठिकाणी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑ क्टोब्रर १९५६,ला ३,८०,००० अनुयाया सोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली
..
..
..
..
..
..
टेकडी गणपती
(आंतरजाला वरुन साभार )
दुस-या दिवशी नागपूरातील गांधी सागर, रामन सायन्स सेंटर, शून्य मैलाचा दगड, रेल्वे संग्रहालय, महाराजा बाग, पंजाबराव देशमुख शेतकी विद्यापीठ ही ठिकाणे पाहीली .
सर्वप्रथम गांधी सागर ... मला वाटतं हे सरोवर सध्या वापरात नसावं ...
अगदीच दुरावस्था झालेलं वाटलं ... मन थोडं नाराज ही झालं ... पाण्याचे
स्त्रोत असे दुरावस्था झालेलं पाहावत नाही . पण नजाकत भरलेलं ते लेणं पाहणं
एक वेगळा अनुभव होता.
(माहित गारांनी गांधी सागर चा इतिहास सांगावा, प्लीज... आंतरजालावर खूप शोधण्याचा प्रयत्न केला आहे )
तदनंत र .. शून्य मैलाचा दगड..
या शिल्पाला भेट दिल्याशिवाय नागपूरात आलेल्या प्रवाशाने नागपूर सोडू
नये पण याची माहीती देण्यास नागपूर वासीय उदासिन वाटले एका बुजूर्ग
व्यक्तीने एवढेही म्ह्ट्ले. " काय आहे तेथे ? एक पुतळा तर आहे " .... पण
आपल्या देशाची आगामी पिढी त्याबाबतीत नागपूरात आश्वासक वाटली एका शाळकरी
मुलाने नुसता पत्ता नाही सांगितला तर, शून्य मैलाचा दगड पाहण्याविषयी
आग्रह ही केला
" शून्य मैलाचा दगड " या इतिहासविषयक व भौगोलिक देखण्या शिल्पाभोवती
प्रचंड गवत माजले आहे. पुरातत्वीय खाण्याचा निळा बोर्ड ही तेथून पसार आहे.
शुक्रवार तलाव आधी चांद (हा बहुधा गोंड राजा असावा) नावाच्या राजाने बांधला होता. नाग नदीच (तेव्हा ती नदीच होती, आता नाला झालाय) पाणी तिकडे वळवून केलेला.
नंतर भोसल्यांच्या काळात त्याच अजून सुशोभीकरण झाल. टेकडी गणपती ते महाल ह्या भागापर्यंत त्याचा विस्तार होता. भोसले राजे त्यांच्या महालातून जलविहार करत टेकडीच्या गणपतीच दर्शन घ्यायला जायचे अश्या आख्यायिका सांगतात लोकं.
नंतर ब्रिटिशांनी तो रेल्वे लाईन टाकण्यासाठी बुजवला. आणि आत्ताचा उरलेला आहे.
शून्य मैल म्हणजे झिरो मैल दगड. ब्रिटीश कालखंडात जेव्हा भारताचा सर्व्हे पूर्ण झाला, तेव्हा नकाशाच्या उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम टोकांना जोडणाऱ्या रेषा ह्या ठिकाणी एकमेकांना छेदल्या गेल्या. It was center of British India, Geometrically. आजही तसा प्रयोग केल्यास नागपूरच्या जवळपास रेषा इंटरसेकट्ट होतात.
नागपूरातील प्रसिद्ध डॉ. पंजाबराव देशमुख शेतकी विद्यापीठ
नागपूरात प्रवासानिमित्त गेलेल्यांनी " रेल्वे संग्रहालय " जरूर पहावे.
आज महाल भ्रमंतीत आपण जाऊया ऐतिहासिक पाताळेश्वर मार्गावर ! नावावरूनच लक्षात आले असेल या मार्गावर प्राचीन पाताळेश्वर मंदीर आहे. श्रीमंत भोसले यांच्या मोठ्या राजवाड्याच्या उत्तरेला हा मार्ग आहे. मार्गावर भ्रमंती करण्यासाठी आपल्याला अभ्यंकर ©️®️
पुतळ्याजवळील ऐतिहासिक पाताळेश्वर दरवाज्यातून प्रवेश करावा लागेल. पाताळेश्वर मंदिराची निर्मिती सन १८३० मध्ये श्रीमंत राजे रघुजी महाराज भोंसले यांनी केली. राजवाड्याच्या उत्तर द्वाराजवळ खोदकाम सुरु असतांना जमिनीच्या आत हे शिवलिंग सापडले. हे शिवलिंग पाताळात सापडल्याने त्या शिवलिंगाची स्थापना त्याच ठिकाणी करून भव्य असे शिवमंदीर बांधण्यात आले आणि त्या मंदिराला श्रीपाताळेश्वर मंदीर असे संबोधित करण्यात आले. आजही हे पाताळेश्वर शिव मंदिर सिनियर भोंसले ईस्टेटच्या ( मोठा राजवाडा ) मालकीचे आहे. या मंदिराजवळच श्रीमंत महाराणी बाकाबाईसाहेब भोसले यांचा राजवाडा आहे. अलीकडच्या काळात श्रीमंत राजे बहादूर फत्तेसिंगराव महाराज भोसले पाताळेश्वर मंदीरात दररोज दर्शनाला येत असत हे दृश्य बघितलेली मंडळी आजही हयात आहेत. पाताळेश्वर मंदीरात महाशिवरात्री आणि श्रावणात यात्रा असते. इथली श्रावण सोमवारची शेज बघायला भक्त लांबून येत असतात.
पाताळेश्वराला लागूनच पूर्वी पुरोहित उपहारगृह ( हॉटेल) होते. इथले आलुबोन्डे महाल भागात प्रसिद्ध होते. गोखले यांचे सायकल रिपेरिंगचे दुकान हे देखील या भागातील तत्कालीन वैशिष्ट्य म्हणता येईल. जवळच कुमारील भागवत यांचे समाधान संचय हे स्टेशनरीचे दुकान देखील होते अशी माहिती जुनी मंडळी देतात. माझ्या पिढीने निशिगंधा प्रोव्हिजन्स हे स्टेशनरी दुकान बघितले. आज दोन्हीही अस्तित्वात नाहीत. भाऊसाहेब सुर्वे आणि तत्कालीन मंडळींनी प्रारंभ केलेले मराठा लान्सर्स आजही इथे आहे. पाताळेश्वर द्वाराच्या कमानीतच महादेवराव यांचे सायकल रिपेरिंगचे दुकान आता आतापर्यंत होते. या मार्गावर चौरासिया चाळीत जयंत ट्युटोरिअल्स क्लासेस (JTC) या नावाने त्याकाळातले पहीले कोचिंग क्लास सुरु झाले पुढे जागा कमी पडायला लागल्याने ते न्यू इंग्लिश शाळेत गेले.
बाकाबाईचा वाडा ! श्रीमंत राजे रघुजी महाराज
(द्वितीय) यांच्या धर्मपत्नी श्रीमंत महाराणी बाकाबाईसाहेब भोसले यांचा
राजवाडा ! पूर्वीचे निलसिटी आणि सध्याचे दादासाहेब धनवटे नगर विद्यालय आणि
सध्याचे नागपूर शहर कोतवाली पोलीस ठाणे हा संपूर्ण परिसर म्हणजेच श्रीमंत
महाराणी बाकाबाईसाहेब यांचा वाडा. ©️®️
इसवी सन १७५५ साली हा वाडा बांधण्यात आला. बाकाबाईसाहेब यांची कारकीर्द ४०
वर्षांची. त्यांचा जन्म २ मार्च १७८१ रोजी चांदुर तालुक्यातील शंकरपूर
येथे झाला. वडिलांचे नाव विठुजी व आईचे नाव राजकुवर तसेच माहेरचे आडनाव
महाडिक होय. बाकाबाईंचा विवाह दुसऱ्या रघुजी महाराजांसोबत १७९० साली झाला.
दुसऱ्या रघुजीराजांनंतर आप्पासाहेब उर्फ मुधोजी भोसले यांच्या गादीवर
बसण्याच्या महत्त्वाकांक्षेच्या आड बाकाबाईसाहेब भिंत म्हणून उभ्या होत्या.
परंतु बाकाबाईसाहेबांना शह देण्यासाठी आप्पासाहेब व त्यांच्या दरबाऱ्यांनी
तैनाती फौज स्वीकारली व नागपूर राज्य खालसा होण्याच्या पायरीवर नेऊन
ठेवले. यावेळी श्रीमंत महाराणी बाकाबाईसाहेबांनी तत्कालीन परिस्थितीशी
मिळते-जुळते घेऊन राज्य वाचवले व त्यांच्यामुळेच तिसरे रघुजीराजे
इंग्रजांच्या मदतीने गादीवर येऊ शकले. राजा अल्पवयीन असल्याने श्रीमंत
महाराणी बाकाबाईसाहेबांना अंतर्गत कारभार सांभाळण्याची मुभा मिळाली व
त्यांनी उत्कृष्टपणे सांभाळला. इंग्रजांना साथ देणारी आणि भोसल्याचे राज्य
बुडविणारी खलस्त्री म्हणून महाराणी बाकाबाई यांचे चित्र आजवर रंगविले गेले
आहे. मात्र, स्वतःच्या जोरावर राज्य चालविणारी ती कर्तृत्ववान स्त्री होती.
अनेक राजघराण्यांची संस्थाने खालसा झाल्यानंतर त्यांच्या वंशजांचे हाल
झाले. मात्र, नागपूरकर भोसल्यांचे वंशज आजही सुस्थितीत आहे, याचे श्रेय
श्रीमंत बाकाबाईलाच द्यावे लागेल. काही लोक मात्र इंग्रजांना शरण गेल्याने
श्रीमंत बाकाबाईना विरोध म्हणून जनतेने मारबत उत्सव सुरु केला असेही
म्हणतात मात्र इतिहास संशोधक त्यास दुजोरा देत नाहीत. एक मात्र खरे , की तह
स्वीकारल्यांनंतर इंग्रजांनी श्रीमंत बाकाबाईना वाड्याबाहेर काढले आणि
नागपूर संस्थानच्या महाराणी अतिथी निवासात ( आजचे कोतवाली ) आणि नंतर
केळीबाग मंदिरात राहू लागल्या. केळीबाग मंदिरात त्या अखेरपर्यंत वास्तव्यास
होत्या असे जुने जाणकार लोक सांगतात. केळीबाग मंदीरातील बुढीचं खाटलं ही
श्रीमंत महाराणी बाकाबाईंची अखेरची निशाणी होय. श्रीमंत बाकाबाईचा वाडा
आजही जुन्या पाऊलखुणा घेऊन नागपुरातील जुन्या भागात- महालात मोठ्या दिमाखात
स्थितप्रज्ञपणे उभा आहे. श्रीमंत बाकाबाईचा वाडा म्हणजे जुने नील सिटी
स्कुल (सध्याचे दादासाहेब धनवटे नगर विद्यालय). याच शाळेत संघ संस्थापक
आद्य सरसंघचालक परमपूजनीय डॉ केशव बळीराम हेडगेवार शिक्षण घेत होते. पूजनीय
डॉक्टरांच्या जीवनातील अत्यंत लोकप्रिय असे व्हिक्टोरिया राणीच्या
राज्यारोहण दिवसानिमित्त वाटलेली मिठाईफेक प्रकरण आणि रिस्ले सर्क्युलर
विरुद्ध वंदे मातरम गायन हे दोन प्रसंग याच नील सिटी शाळेतील म्हणजेच
बाकाबाईच्या वाड्यातले आहेत. श्रीमंत बाकाबाई अत्यंत धार्मिक वृत्तीच्या
होत्या. वाड्याचे आत त्यांचे खाजगी देवालय होते. आज बाकाबाईंच्या देवघरात
धनवटे नगर शाळेची रसायनशास्त्र प्रयोगशाळा आहे यावरून देवघर किती प्रशस्त
असावे याची कल्पना येते.ब्रिटिश कमिशनर नील यांचे काळात या वाड्यात निल
सिटी स्कुलची स्थापना झाली. स्वातंत्र्यानंतर पुढे दादासाहेब धनवटे नगर
विद्यालय म्हणून ही शाळा ओळखल्या जाते. सद्यस्थितीत या शाळेचे व्यवस्थापन
नागपूर शिक्षण मंडळाकडे आहे. याच ठिकाणी जुन्या काळी व्यायाम शाळा आणि
विविध वस्तू भांडार देखील असे. मराठा लान्सरच्या कबड्डी स्पर्धा हा तर
पंचक्रोशीतील प्रतिष्ठेचा उत्सव या शाळेत होत असे. त्यासाठी एकाचवेळी ६/७
मॅचेस ( मैदान ) लागत. संगीत नाटक, वादविवाद, नाट्यस्पर्धा , व्याख्यान
यासाठी धनवटे नगरचे मैदान सदैव फुललेले असे. ©️®️
श्रीमती बिंझाणी महीला महाविद्यालय ! नागपूर शिक्षण मंडळ संचालित हे कला महाविद्यालय खरं तर १९६१ चे. मग त्याआधी इथे काय होते ? अशी विचारणा केली असता अत्यंत आश्चर्यकारक माहिती मिळाली. आज जिथे श्रीमती बिंझाणी महीला महाविद्यालय आहे तिथे नील सिटी स्कुलमध्ये शिकणाऱ्या मुलांचेशिवाजी बोर्डिंग या नावाने वसतीगृह होते. या वसतिगृहाला लागूनच नील सिटीचे पर्यवेक्षक आणि रजिस्ट्रार यांचे निवासी बंगले देखील होते. दवंडे मास्तर आणि आष्टीकर मास्तर हे या बंगल्यात राहणारे शेवटचे अधिकारी म्हणता येतील. पुढे हे बोर्डिंग बंद होऊन श्रीमती बिंझाणी महीला महाविद्यालय प्रारंभ झाले. याच भागात सीपी एन्ड बेरार शिक्षण संस्थेची सीपी एन्ड बेरार शाळा देखील आहे. ©️®️
बिंझाणीच्या मागेच श्रीमंत नाईक आणि श्रीमंत टालाटुले यांचे वाडे आहेत. श्रीमंत नाईक यांचे महालात तीन वाडे आहेत त्यातील दोन पाताळेश्वर मार्गावर तर एक नाईक मार्गावर. श्रीमंत विजयसिंह नाईक यांचा परिवार इथे आजही वास्तव्यास आहे. टालाटुले वाड्यात श्रीमंत धुंडीराज आत्माराम टालाटुले आणि सदाशिव धुंडीराज टालाटुले यांचे वंशंज आजही राहातात. ©️®️
लाकडी बैलांचा बाजार ! विदर्भात पोळ्याचा दुसरा दिवस हा तान्हा पोळा म्हणून साजरा होतो. श्रीमंत राजे रघुजी भोसले (द्वितीय) यांनी २१५ वर्षांपूर्वी सुरू केलेली ही परंपरा आजही कायम आहे. कृषी प्रधान देशात बैलांचे विशेष महत्त्व आहे. सामान्यांसह बालगोपाळांना हे महत्त्व कळण्यासाठी राजे रघुजी भोसले यांनी १८०६ मध्ये पोळ्याचा दुसरा दिवस पाडवा म्हणून साजरा करण्याची प्रथा सुरू केली. त्यासाठी लाकडी बैल तयार करून त्याला सजवणे, आंब्यासह विविध खाऊंनी तयार केलेले तोरण तयार करणे, लाकडी बैलांची पुजा करणे व नंतर तोरण तोडून बैलांची मिरवणूक काढणे, अशी प्रथा सुरू झाली. याच तोरण तोडण्याला पोळा फुटला असे म्हटले जाते. तर, पाडव्यालाच तान्हा पोळा अथवा लाकडी बैलांचा पोळा संबोधले जाते. राजे भोसले यांनी स्वत: आठ फूट उंच व सहा फूट लांब लाकडी बैल तयार केला. त्याची खिडकी हनुमान मंदीरापर्यंत वाजत-गाजत मिरवणूक काढली व नारळ फोडून लहान मुलांना खाऊ आणि पैसे (बोजारा) वाटण्याची परंपरा सुरू केली. ती परंपरा आजही भोसला पॅलेससह संपूर्ण शहरात कायम आहे. या सणाच्या निमित्ताने भरणारा लाकडी बैलांचा बाजार हा याच पाताळेश्वर मार्गावर बाकाबाईच्या वाड्यापुढे दरवर्षी भरतो. याच परिसरात दत्त प्रासादिक जनरल स्टोअर्स ,दत्त बुक बाइंडिंग ही प्रतिष्ठाने देखील प्रसिद्ध होती. या मार्गावर नावाजलेले वकील देशपांडे यांचा वाडा , खंडेलवाल बिल्डिंग देखील आहेत. पाताळेश्वरकडून दक्षिणामूर्ती मार्गावर महामहोपाध्याय साहित्याचार्य बाळशास्त्री हरदास यांचे दक्षिणामूर्ती मंदीर आणि रामचंद्र पंचवटीकर यांचा वाडा आहे.
दामले वाडा ! जुन्या पिढीतील डॉ वासुदेवराव माधवराव दामले यांचा वाडा आपल्याला दिसेल. पूर्वी हा खरे यांचा वाडा होता. इथे लोक शिक्षण संस्थेची लोकांची शाळा होती. काही वर्ग दामले वाड्यात आणि काही धनवटे नगर विद्यालयात आज जिथे रमेश चांडक शाळा आहे त्या बाजूस भरत. डॉ दामले यांचा जन्म १९०४ चा. रॉबर्टसन मेडिकल कॉलेज ( मेयो ) मधून त्यांनी LMP केले. १९३५-१९४० या काळात नागपुरात पसरलेल्या कॉलराच्या साथीवर डॉ दामले यांनी अथक परिश्रम घेऊन नियंत्रण मिळवले. १९५७ मध्ये दीपक हॉटेल ( पंचशील सिनेमाजवळ ) येथे झालेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नागपूर अधिवेशनाची जवाबदारी डॉ वासुदेवराव दामले यांचेकडेच होती. नागपूरचे महापौर रिखबचंद शर्मा, मारोतराव उर्फ डोमाजी जाधव हे डॉ दामले यांचेकडे येत. डॉ देविदास दुरूगकर हे डॉ दामले यांचे स्नेही होते. परमपूजनीय श्रीगोळवलकर गुरुजी जेव्हा दक्षिणामूर्ती मंदिरात येत तेव्हा डॉ दामले श्रीगुरुजींना वंदन करीत. ३१ मार्च १९८३ मध्ये डॉ वासुदेवराव दामले यांचे निधन झाले. त्यांचे पश्चात त्यांचे चिरंजीव डॉ विवेकानंद दामले यांनी दवाखाना चालविला. काळानुसार दामले वाड्याने - लोकांची शाळा, दामले यांचा दवाखाना , मॅटर्नीटी होम , मंगल कार्यालय ,एलआयसी कार्यालय अशी स्थित्यंतरे बघितली. आज या वाड्यात प्रभाकरराव दटके स्मृती न्यासाचे काम चालते. पुढे दाणी वाडा होता. माजी मंत्री दादासाहेब देवतळे यांची बिल्डिंग याच भागात आहे. पुढे चांदे गल्लीत , चांदे आणि नाईक यांचे वाडे आहेत. शंभूजी केरबाजी नाईक यांचे वंशज आजही नाईक वाड्यात राहतात. हीच चांदे गल्ली पुढे पंचांग गल्लीस मिळून केळीबागेत जाते. याच ठिकाणी सी पी एन्ड बेरार शाळेत संस्कृतचे शिक्षक असलेले स मो मोहरील (महामहोपाध्याय बाळशास्त्री हरदास यांचे नातेवाईक) यांचा ही वाडा होता.
महालचा राजा ! दामले
वाड्यासमोरचा पाताळेश्वर गणेशोत्सव मंडळातर्फे स्थापन करण्यात येणार महालचा
राजा हा गणपती ही अलीकडच्या काळातील पाताळेश्वर मार्गाची नवी ओळख झाली
आहे. सचिन नाईक हे या मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. पाताळेश्वर
मार्गावरचे आणखी एक आध्यात्मिक केंद्र म्हणजे मधुराद्वैत संप्रदायाचार्य
गुलाबराव महाराज यांचे परमशिष्य सद्गुरू बाबाजी महाराज पंडीत यांचा मठ !
सध्या प्रभाकरराव कायरकर हे व्यवस्थापन पाहतात. याच भागात प्रख्यात खोखो
प्रशिक्षक चिचूभाऊ मंगरूळकर राहात असत.
या मार्गावर १९५२ साली स्थापन
झालेला श्याम बिस्कीट हा नागपुरातील पहीला बिस्कीट कारखाना होता. ही
फॅक्ट्री म्हणजे बिस्कीट , ब्रेड, पेपरमिंटच्या गोळ्या बनवणारी त्याकाळातील
आधुनिक युनिट होते. दीनानाथ चंदानी हे याचे मालक. आज त्यांचेच रसना बेकरी
हे दुकान येथे आहे. पूर्वी याच भागात बैद्यनाथ कंपनीच्या काढे बनविण्याच्या
भट्ट्या होत्या.
पाताळेश्वर मार्गावर पुढे दवे वाडा आहे. येथेच
बोमनवार ,काळबांडे , आदमने , पटेल गवळी , बेलखोडे ही मंडळी राहात असत.
पायोनियर ड्राय क्लिनर्स हे देखील अलीकडच्या पिढीला माहीत असणारे एक दुकान.
गोविंद तुकाराम जोशी यांचे महाराष्ट्र टेलरिंग हाऊस हे
स्वातंत्र्यापूर्वीचे प्रसिद्ध दुकान देखील याच मार्गावरचे. पुढे ते विलास
जोशी यांनी चालवले. पाताळेश्वर मार्गाच्या अखेरीस मुळे यांचे किराणा दुकान
आणि राजा समर्थ यांचा वाडा होता. आज दोन्ही ठिकाणी मॉल आहेत.
एकूणच आजच्या भ्रमंतीनंतर लक्षात आले असेल की पाताळेश्वर मार्ग हा ऐतिहासिक ,शैक्षणिक , आध्यात्मिक आणि औद्योगिक विकासाचा मार्ग आहे. आज कालौघात अनेक संदर्भ बदलले जरी असले तरी जुन्या आठवणींना उजाळा देऊन पूर्वजांनी केलेल्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणे ही निश्चितीच आजच्या नव्या पिढीची जवाबदारी किंबहुना कर्तव्य आहे. असो.. या मार्गाचे अधिष्ठान श्रीपाताळेश्वरास मनोभावे वंदन करून आपली आजची भ्रमंती थांबवूया. पुढील भ्रमंती आता आठवड्यातून एकदाच म्हणजे दर बुधवारी होईल. भेटूया.. नमस्कार !
डॉ भालचंद्र माधव हरदास
नागपूर /९६५७७२०२४२
सद्गुरू मुकुंदराज महाराज साधु यांच्या गोपालकृष्ण मंदिर व साधू गल्लीतील कालच्या भ्रमंतीनंतर आज जाऊया जलालपुऱ्यातील बेनिगिरी वाडा आणि श्याम-चित्रा सिनेमा परिसराची भ्रमंती करायला. त्यासाठी काल सांगितल्याप्रमाणे भोसला बुधवार ©️®️ दरवाजाकडून आपल्याला परत जलालपुऱ्यात यावे लागेल. जलालपुऱ्यातील पोलीस चौकी समोरच आपल्याला दिसेल देशपांडे वकिलांचा वाडा वजा बंगला! ॲड. देशपांडे अत्यंत कडक शिस्तीचे मात्र सौ इंदूताई देशपांडे तेवढ्याच प्रेमळ आणि सुस्वभावी. इंदूताई राष्ट्र सेविका समित्याच्या आघाडीच्या कार्यकर्त्या व एक प्रामाणिक समाजसेविका होत्या. परिसरातील लहान मुली, युवती आणि माता भगिनींना समितीच्या माध्यमातून समाजकार्यात जोडून ठेवण्यात इंदूताईनी जीवाचे रान केले. वंदनीय उषाताई चाटी आणि वं प्रमिलताई मेढे यांचा इंदूताईशी स्नेहसंबंध होता. या परिसरातील अनेक जुनेजाणते लोक आजही इंदूताईंच्या कार्याची आवर्जून आठवण करतात. श्रीरामजन्मभूमी आंदोलनात अकारण केसेस टाकलेल्या अनेक संघ कार्यकर्त्यांना सहीसलामत बाहेर काढून कडक शिस्तीच्या ऍड देशपांडे सरांनी महत्कार्य केले होते.
पुढे गेल्यावर दिसेल तो चिलाटे वाडा ! भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे नेते आणि स्वातंत्र्यसंग्राम सैनिक कै. आनंदरावजी चिलाटे यांचे निवासस्थान. वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षापासून महात्मा गांधींजीच्या विचार प्रभावाने प्रेरीत होऊन आनंदराव यांनी स्वातंत्र्य आंदोलनात उडी घेतली. चले जाव आंदोलनातही ते सक्रिय सहभागी होते. मुख्य म्हणजे भारतीय संस्कृती आणि एकत्र कुटुंब पद्धती चिलाटे परीवाराने जोपासली आणि आजही कायम ठेवली आहे हे विशेष!आज आनंदरावजींचे पुत्र राजकुमार चिलाटे व अन्य बंधू परिवारासह येथे असतात.©️®️
चिलाटे समोर तराळ यांचा वाडा होता परंतु ७० च्या दशकात तो कालडा परिवाराने घेतला. याच भागात गोपालक परीवार नंदवशी, घाटे,सत्तभय्या ,दांडले अजूनही मोठ्या प्रमाणात राहतात.पुढे सैनिस वाडा, महाकाळकर, अवस्थी, भापकर, कोलारकर, जैस्वाल,वसंतगडकर, देवघरे यांची ही घरे आहेत.©️®️
राजेंद्र हायस्कुल मधील निवृत्त शिक्षक आणि ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक प्रभाकरराव ठेंगडी हे देखील याच परिसरात अजूनही राहतात. अभिनय, दिग्दर्शन,लेखन या सर्व प्रांतात ठेंगडी सरांनी मुशाफिरी केली. आजवर सरांनी ५० च्या वर नाटकांचे दिग्दर्शन करून त्यांचे प्रयोग महाराष्ट्रात केले. ज्वालामुखी, राधी , खरं काहीच नसतं , मी स्वामी या देहाचा ही त्यांच्या गाजलेल्या नाट्यकृतींपैकी काही नावं. कै सानेगुरुजी जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या श्यामची आई या नाटकाने त्याचे महाराष्ट्रभर नाव झाले. श्रेष्ठ रंगकर्मी पुरस्कार , नागपूर धडपड पुरस्कार , सखारामपंत जोशी पारितोषिक आणि आदर्श शिक्षक पुरस्कारांनी गौरवान्वित प्रभाकरराव ठेंगडी हे कलानिकेतन या नाटयसंस्थेचे अध्यक्ष आहेत.
बेनिगिरी वाडा किंवा बेनिगिरी बुवांचा मठ ! चिटणीस पार्कच्या मागच्या बाजूस अत्यंत प्राचीन शिवमंदीर आहे. एकदम कोणाच्या द्रुष्टीस न पडणारे हे ठिकाण कालौघात गेलेल्या चित्रासिनेमा गृहाच्या मागे आहे.
बेनिगिरी वाडा किंवा बेनिगिरी बुवांचा मठ असेही लोक या वास्तूस संबोधतात. महादेवाचे मुख्य गर्भगृह त्यापुढे नंदी आणि गर्भगृहात चढायला बारा पायऱ्या अशी मुख्य मंदीराची पूर्वाभिमुख रचना असून या सभोवताली पुन्हा ११ महादेवांच्या पिंडी वेगवेगळ्या मंदीरात विद्यमान आहेत. प्रत्येक महादेव पिंडी समोर नंदी आहेच. बेनिगिरी मंदीर त्याअर्थाने बारा ज्योतिर्लिंगाचा देवालय समूह आहे. अनेक जुने जाणते लोक या मंदीराला गिरी -गोसावी लोकांचे समाधीस्थान मानतात. याच बेनिगिरी वाडा परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नेताजी सायं शाखा अनेकवर्ष लागायची. याच ठिकाणी ©️®️प्रकाश कन्या विद्यालय देखील होते. जुन्या वाड्यात जायला जसा मोठा दरवाजा राहायचा तसा दरवाजा या ठकाणी होता. चौसोपी दिंडी दरवाज्याच्या वर दत्तात्रय देवघरे यांचे मातीचे घर होते याच घरी शाखेचा ध्वज -दंड राहत असे. बेनिगिरी वाडयातील शाळेचे विस्तीर्ण मैदान हे त्याकाळी आमच्या जुन्या मोहिते इतवारी भागातील सर्वात मोठे संघस्थान होते. प्रतिनिधी सभेनंतरचे वृत्तकथन अनेक वर्षे याच बेनिगिरी वाड्याने ऐकले. या शाखेचे जुने नाव नाका शाखा असे होते. १९७० मध्ये परमपूज्य श्रीगोळवलकर गुरुजी आणि १९७४ मध्ये परमपूजनीय बाळासाहेब देवरस नेताजी शाखेत येऊन गेल्याची माहिती जुनेजाणते लोक देतात. पावसाळ्यात बेनिगिरी शिवमंदीरात शाखा लागत असे. बेनिगिरी वाड्यासंबंधात एक आश्चर्यकारक संदर्भ असा की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आद्य सरसंघचालक डॉ केशव बळीराम हेडगेवार यांनी याच बेनिगिरी वाड्यातून ©️®️©️®️१९२३-२४ मधे "स्वातंत्र्य" नावाचे एक दैनिक प्रारंभ केले होते. संघ संस्थापक डॉ हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक श्रीगोळवलकर गुरुजी यांच्या पदस्पर्शाने पावन बेनिगिरी वाडा ऐतिहासिक म्हणावा लागेल. आधुनिकीकरणाचा तडाखा या जुन्या वास्तूला बसला आणि हा वाडा पुढे जमीनदोस्त झाला. आता या ठिकाणी बेनिगिरी सहनिवास हे टोलेजंग संकुल उभे आहे. बेनिगिरी शिवमंदिर मात्र ऊन वारा थंडी पाऊस याचा मारा झेलत इतिहाससाक्षी आहे. परिसरातील लोक महाशिवरात्री , श्रावण मास , कोजागिरी , गुरुपौर्णिमा इत्यादी उत्सव याठिकाणी साजरे करतात. लोकसहभाग आणि शासनाचे पाठबळ या माध्यमातून हे पवित्र स्थान प्रकाशझोतात आले पाहिजे. नागपूरकरांनी बेनिगिरी शिवमंदिराला अवश्य भेट देऊन आपल्या नगरीतला हा अनमोल ऐतिहासिक ठेवा अवश्य पाहावा. ©®️
बेनिगिरी शिवमंदिराकडून दोन रस्ते जातात एक श्याम सिनेमाकडे तर दुसरा चित्रा सिनेमाकडे. अगदी जवळजवळ असणारी हि दोन्ही चित्रपटगृहे आज अस्तित्वात नाहीत. श्याम सिनेमाचे जुने नाव व्यंकटेश नाट्यगृह होते. श्रीमंत भोसले , चिटणीस, बुटी या मंडळींसाठी संगीत मैफिली , संगीत बारी , नाट्य प्रयोग असले की व्यंकटेश नाट्यगृहात विशेष व्यवस्था केली जात असे.
दुरूगकर वाडा ! स्वातंत्र्यपूर्व काळात नागपुरात महानगरपालिका न म्हणता म्युन्सिपल कमेटी होती. त्यावेळी एकूण १२ वॉर्ड होते. त्यातील चिटणीस पार्क ते चिंतेश्वर अश्या विस्तारलेल्या वॉर्डाचे प्रतिनिधी हे या दुरूगकर मोहल्यातील सुपुत्र डॉ वासुदेवराव तानबाजी दुरूगकर होते. १९४३ ते १९४८ पर्यंत ते या नगर समितीचे अध्यक्ष देखील राहीले. उल्लेखनीय म्हणजे यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि हिंदू महासभा यांची युती होती. १३ मार्च १९५० ला डॉ वासुदेवराव यांचे निधन झाले. पुढे त्यांचे सुपुत्र डॉ देविदास वासुदेवराव उर्फ देवा दुरूगकर हे गांधीबाग वॉर्डाचे तीन वेळा म्हणजेच १५ वर्षे नगरसेवक होते. चौथ्यांदा देखील ते निवडणूक लढले मात्र त्यावेळी जनसंघाचे दिवाकरराव ( छोटूभय्या ) धाक्रस हे निवडून आले. डॉ देविदासजी यांचा झेंडा चौक महाल येथे दवाखाना होता. भारत महीला विद्यालय, रामनगर भारत शाळा, केंद्र विद्यालय आणि दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा या संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. नागपूर मनपाचे शिक्षण समिती अध्यक्ष म्हणून त्यांनी सर्वाना अनिवार्य शिक्षण हे त्याकाळी सुरु केलेले अभिनव पाऊल म्हणता येईल. नागपूर मनपाचे उपमहापौर राहीलेले डॉ देविदास वासुदेवराव दुरुगकर यांचे १३ मे १९७८ रोजी निधन झाले . आपले आजोबा डॉ वासुदेवराव दुरुगकर यांच्या मृत्यूच्या चार दिवसानंतर म्हणजेच १७ मार्च १९५० रोजी जन्मलेले रवींद्र देविदास दुरुगकर हे सहकार क्षेत्रात आज मोठं नाव आहे. ते महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बँकेचे गेली २२ वर्ष संचालक असून २ वेळा उपाध्यक्ष देखील राहिले आहे. विदर्भ प्रीमियरचे १२ वर्षे संचालक, गांधीबाग सहकारी बँकेचे १५ वर्षांपासून अध्यक्ष आहेत. परिसरातील केजाजी महाराज देवस्थानचे देखील ते अध्यक्ष आहेत. श्याम सिनेमागृह हे दुरुगकर यांच्या मालकीचेच होते. १९९४ मध्ये ते त्यांनी विक्री केले तेव्हा विक्री करताना दुरुगकर परिवाराचे ९४ सदस्य उपस्थित होते ! राजकीय , सामाजिक आणि धार्मिक कार्यासोबत परिसरातील जनतेशी नाळ घट्ट असणारा दुरुगकर परिवार आजही सक्रीय आहे.
खजांजी वाडा ! नागपूरकर श्रीमंत राजे रघुजी महाराज ( प्रथम ) भोसले यांच्यासोबत काशिनाथपंत थेटे कुटुंब नागपुरात आले. मात्र भोसल्यांच्या राजकोषागाराचे प्रमुख झाल्याने त्यांचे आडनाव खजांजी असे झाले. काशिनाथपंत यांचे नंतर सोनोपंत , आबाजीपंत , माधवराव , बाळाजीपंत , गणपतराव , भालचंद्रपंत अशी खजांजी परंपरा होती. याच घराण्यातील सत्पुरुष म्हणजे विश्वनाथ महाराज होत. विश्वनाथ महाराज ( खजांजी ) यांची शिष्य परंपरा सेलू घोराडचे संत केजाजी महाराज , संत नामदेव महाराज अशी आहे. आज चित्रा सिनेमागृहाजवळ संत केजाजी महाराज देवस्थान असून विठ्ठल रुख्मिणी मंदीर आणि विश्वनाथ महाराज समाधीस्थान आहे. श्रीमंत फत्तेसिंगराव महाराज भोसले मोठ्या राजवाड्यातून बग्गीने केजाजी देवस्थानात येत असत असे जुनेजाणते लोक सांगतात. नागपूरचे निवृत्त निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र भालचंद्र खजांजी हेच याच घराण्याचे सुपुत्र होत.
चित्रा सिनेमागृह हे तसे शंकरराव बेनिगिरी यांच्या मालकीची जागा असलेले जुने चित्रपटगृह होते. उमरेडचे बाळासाहेब ( अण्णा ) नाईक हे इथले व्यवस्थापन पाहात होते. दर होळीला चित्रा सिनेमागृहाच्या अंगणात परिसरातील नागरिक होळी मिलन करायचे. या परिसरात घाटे , सुपुत्रकार , काळे , क्षेत्रपाळ ही जुनी मंडळी आजही राहतात.
जाधव वाडा ! चित्रा सिनेमागृहाजवळील जाधव वाड्याने नागपूर नगरीला प्रथम नागरिक दिला आहे. मारोतराव महादेवराव उपाख्य डोमाजी जाधव हे नागपूरचे महापौर म्हणजे याच परिसराचे सुपुत्र ! जाधव परिवार सुरुवातीपासूनच ऐतिहासिक अश्या भारत व्यायाम शाळेत आखाडा पैलवानी करणारे म्हणून सुपरिचित. मारोतराव उर्फ डोमाजी जाधव हे राजकारणात सक्रीय , त्यांचे मधले बंधू सदाशिवराव हे चित्रा सिनेमात हिंदू हॉटेल नावाने व्यवसाय करीत तर लहान बंधू गंगाधरराव जाधव हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांनी भारलेले स्वातंत्र्यशाहीर म्हणून सुपरिचित नाव . निखारा , जय जय मृत्युंजय , बलिदान हे गंगाधर जाधवांचे ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. ज्वलजाज्वल्य विचारप्रवाह आणि हिंदुत्वाचा धगधगता निखारा म्हणजे क्रांतिवीर गंगाधरराव. १९४१ मध्ये स्वा. सावरकर नागपुरातुन कलकत्त्ता दौऱ्यास जाताना काही काळ गाडीचा मुक्काम नागपूर रेल्वे स्थानकावर होता. तात्यांच्या स्वागताला सावरकर भक्तांची झुंबड उडाली होती. सावधान दैनिकाचे संपादक रामचंद्र मावकर हे तात्यांच्या गळ्यात आपला पहीला हार पडावा म्हणून गर्दीत पुढे गेले आणि स्थानकातच पाय घसरून मावकरांचा दुर्दैवी अंत झाला. तेव्हा पुढील कार्यक्रम रद्द करून स्वा. सावरकर हे मावकरांच्या अंत्ययात्रेस गंगाबाई घाटावर उपस्थित होते. यावेळी तात्यांचे श्रद्धांजलीपर भाषण झाले. याच श्रद्धांजली सभेत स्वातंत्र्यशाहीर गंगाधरराव जाधव यांनी काव्य रचले ते असे.... हा पत्रकार झुंजार.. प्रतिभेचा किमयागार.. हिंदुत्वगुण साकार. गंगाधरराव जाधव म्हणजे प्रखर हिंदुत्ववादी ! जास्तीत जास्त काळ ते भूमिगत असत. पुढे ते हा परिसर सोडून तुकडोजी चौक परिसरात निवासाला गेले. त्यांच्या स्मरणार्थ नागपूर ©®️ महापलिकेने तुकडोजी महाराज चौकाकडून पुढे जाणाऱ्या मार्गाचे क्रांतिवीर गंगाधरराव जाधव मार्ग असे नामकरण केले आहे . जाधव घराण्यातील आखाड्याची परंपरा आजही कायम असून सदाशिवराव जाधवांचे सुपुत्र चंद्रशेखर जाधव हे नागपूर शहराचे मुख्य अग्निशमन अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. चंदू पैलवान म्हणून सुपरिचरित चंद्रशेखरजी १९९३ पासून भारत व्यायाम शाळेचे अध्यक्ष आहेत. नुकताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विकासनिधीतून आणि पै. चंद्रशेखर जाधव यांच्या प्रयत्नामुळे भारत व्यायाम शाळेचा जीर्णोद्धार झाला आहे.
मुसळे परिवार ! पोस्टमास्तर नारायणराव मुसळे परिवार या भागात अनेक पिढ्यांपासून निवासी आहे. वारकरी उपासक असलेला विठ्ठलराव नारायणराव मुसळे परिवार आजही सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. या भागातील मुसळे , बिलसे , जाधव ,दुरूगकर , सुंकुरवार या परिवारातील तरुणांनी १९६३ मध्ये गांधीबाग नवयुवक क्रेडिट सोसायटी काढली आज तिचे गांधीबाग सहकारी बँक या नावाने सहकार क्षेत्रात मोठे नाव आहे. परिसरातील अनेकांना रोजगार , स्वयंरोजगार देऊन सामाजिक दायित्वाचे मूलभूत कार्य गांधीबाग सहकारी बँक करीत आहे. प्रियदर्शिनी क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी ही देखील अशीच एक संस्था या भागात सुरु आहे.
केजाजी देवस्थानाकडून पुढे गेल्यास बुद्धुखा का मिनारा ही जुनी मशीद आहे. याच परिसरात जुन्या काळी मंजुळाबाई बावनकुळे यांची लाकडाची वखार ( टाल) होती. स्वतः अल्पशिक्षित असूनही मंजुळाबाईंनी त्यांच्या सर्व मुलामुलींना उच्च शिक्षित करून डाक्टर- इंजिनियर केले. डॉ वसंत बावनकुळे हे त्यांचे सुपुत्र आजही या ठिकाणी वास्तव्यास आहेत. या परिवारातील बाबा बावनकुळे यांनीच शिवसेनेची नागपूरात शाखा स्थापना केली होती. कावळे यांचा ही लाकडाचा टाल पूर्वी या भागात होता. डडेमल ,दयमवार, मोरस्कर , पुपलवार , चंदनखेडे ही मंडळी देखील अनेक पिढ्यांपासून या भागात आहेत.
वामनराव वाघ ! संघ-जनसंघाचे जुने कार्यकर्ते वामनराव वाघ यांचा देखील जुना वाडा येथे आहे. वाघांच्या वाड्यात खाजगी जुने विठ्ठल रुख्मिणी मंदिर आहे. विलोभनीय अश्या या मंदिरात आषाढी कर्तिकीला महापूजा होते. बुद्धुखा मिनारानंतर गांधीबाग सुरु होत असल्याने हा भाग महाल -इतवारी -गांधीबाग असा संमिश्र स्वरूपाचा आहे. मुस्लिम लोकवस्ती देखील इथे मोठ्या प्रमाणात आहेत. पूर्वी ८० च्या दशकात या ठिकाणी शेख भाई आणि फारुख भाई किरायाने सायकली चालवायला देत असत. फारुकची सायकल या नावाने उन्हाळ्यात सायकल शिकण्याचा या भागातील बच्चेकंपनीत ©®️एक कार्यक्रमच असे.
१९८४ आणि १९९२ मधील हिंदू मुस्लिम दंगा ही एक दुर्दैवी किनार देखील काही जुनेजाणते लोक बोलून दाखवतात मात्र त्यानंतर आजतागायत हा परिसर आपली सामाजिक संवेदनशीलता जपून आहे. एकूणच काय महाल आणि गांधीबाग यांच्या सीमेवर असल्याने सर्वभाषिक समाजाचे दर्शन आपल्याला या भागात होईल. तेव्हा नक्की बघा ही स्थानं ! उद्या पुन्हा भेटूया नमस्कार !
मित्र हो..नमस्कार ! काल कबूल केल्याप्रमाणे आपली आजची भ्रमंती आपण महालातील ऐतिहासिक मुकुंदराज पथावर करूया. मुकुंदराज महाराज साधू यांचे वास्तव्याने पावन झालेल्या या मार्गावर येण्यासाठी सध्या सात मार्गाने आपणास येता येते. ©️®️ रुईकर पथाकडून दोन मार्ग, नाका गल्लीकडून दोन वाटा, नागोबा गल्ली-रिसालदार गल्लीकडून एक- एक तसेच बुधवार दरवाजातून एक अश्या सात मार्गाने मुकुंदराज पथावर जाता येते.आपण आपली भ्रमंती बुधवार दरवाज्यातून प्रारंभ करूया. काल सांगितल्याप्रमाणे भोसलेकालीन पत्थरफोड दरवाजा आणि बुधवार दरवाजा असे दोन दरवाजाचे स्थळ असणारे हे एकमेव अद्भुतस्थान आहे.
या दरवाज्याला लागूनच
भोसले कालीन पठाणी मशीद आहे. बुधवार आणि पत्थरफोड दरवाजावरील भागात आज
नागपुर महानगरपालिकेचे प्रशस्त असे जवाहर वाचनालय आणि अध्ययन कक्ष आहे. ©️®️पठाण
मशिदीच्या अगदी समोर अत्यंत जुने मूलचंद किराणा भांडार आजही आहे. सिंध
प्रांतातून आलेले मूलचंद लाहुरी यांनी हे दुकान प्रारंभ केले. लाहुरीचे
दुकान याच नावाने ते अजूनही ओळखले जाते. पुढे इंदूरकर वाडा, पुरातन मारोती
मन्दिर आपणास पाहता येईल.
वझलवार वाडा ! २४ एप्रिल १९२३ रोजी
दत्तात्रय गोविंदराव उपाख्य भय्याजी वझलवार यांचा जन्म झाला.वझलवार घराणे
मूळचे तेलंगण प्रांतातील होते. यांचे मूळ उपनाम वझलवारू.. पुढें वझलवार
झाले. चित्रकला ,पेंटिंग यात भय्याजींना विशेष रस होता. ग्वाल्हेर
घराण्याचे पंडीत शंकरराव प्रवर्तक हे भय्याजींचे गुरू! वर उल्लेख केलेल्या
बुधवार दरवाजाजवळील पठाणी मशिदीत पूर्वी जलसा होत असे. ©️®️
त्यात अनेक नामवंत कलाकार सेवा देत. १९३२ मधील जलसा सुरू असताना वयाच्या
१६ व्या वर्षी गोविंदरावांचा मुलगा भय्या चांगला गायन करतो म्हणून त्याला
या मशिदीतील जलस्यामधे गायनाची संधी मिळाली आणि वसंतराग पेश करून त्याने
वाहवा मिळवली. या प्रसंगी उपस्थित असलेले उस्ताद अजीमबक्ष अवलिया यांनी
भय्याजींचा सत्कार करून पुढे ताजबाग मुक्कामी त्याला संगीताचे शिक्षण
दिले. पंडीत भीमसेन जोशी, पंडीत जसराज, पं वसंतराव देशपांडे यांचे
भय्याजीशी स्नेहाचे संबंध होते. समोरच राहणारे शंकरराव लाखे यांची आई ही
भय्याजींची प्रथम शिष्या ! पुढे भय्याजी वझलवार यांनी १९३५ मध्ये रुईकर
पथावरील विजय फोटो स्टुडियो जवळील पारखी वाड्यात श्रीशारदा गायन शाळा
काढली. उषा पारखी, शरद सुतवणे, सोनल मानसिंह ही भय्याजींच्या
शिष्यवर्गापैकी काही नावे आहेत. १६ फेब्रुवारी २००३ रोजी भय्याजींचे निधन
झाले आणि वझलवार वाड्यातून निघणाऱ्या संगीताच्या सुरांना मुकुंदराज पथ
कायमचा पोरका झाला
घटवाई वाडा ! याच मार्गावर घटवाई यांचे देखील
वाडे आहेत. हे देखील तेंलंगणमधून स्थलांतरित झाले. बालाजी हे या घराण्याचे
कुलदैवत. यांचे मूळ आडनाव घट्टूवारू..पुढे घट्टू वार..घटवाई असे झाले.
कमलाकर घटवाई, बाळकृष्ण घटवाई, माधवराव घटवाई अश्या शाखा आजही येथे आहेत. ©️®️अलीकडच्या
काळातील पिढीला गोपालकृष्ण भजन मंडळाचे संस्थापक भालचंद्र माधवराव उपाख्य
भानुकाका घटवाई माहिती आहेत. त्यांचे चिरंजीव प्रख्यात गायक गुणवंत घटवाई ,
दीपक घटवाई हा वारसा पुढे जपत आहेत.
साधू गल्लीतील आणखी एक वाडा
म्हणजे लाखे वाडा ! वामनराव लाखे, शंकरराव लाखे हे इथे राहत असत. हा मोठा
वाडा आणि पुढे असलेला चोपकर यांचा वाडा हा अघोर यांचा होता. शंकरराव लाखे
हे सरकारी अधिकारी होते. पुढे संघ शिक्षा वर्गातील मेसची जवाबदारी अनेक
वर्षे शंकरराव लाखे यांनीच सांभाळली. ©️®️आज
त्यांची मुले चंद्रकांत आणि ओंकार लाखे इथे राहतात. चंद्रकांत लाखे हे
महाराष्ट्रातील प्रकाशन क्षेत्रांतील एक दिग्गज नाव आहे. अनेक सामाजिक
-सांस्कृतिक कार्यात ते अग्रेसर असतात. महामहोपाध्याय बाळशास्त्री हरदास
यांच्या ग्रंथसंपदेचे प्रकाशन अधिकार आता लाखे यांचेकडेच आहे हे येथे
उल्लेखनीय.
लाखेच्या वाड्यासमोरच हिंदू महासभेचे नेते बाबुराव
मैराळ यांचा वाडा होता आज तिथे गुलाबराव इंगळे पेंटर कुटुंबीय राहतात.याच
भागात गोपालक सत्तभय्या परीवार याचेही १५० वर्षांपासून वास्तव्य आहे. ©️®️परिसरातील
नागरिकांना दूध पुरवठा करणे हे कार्य हा परीवार पिढ्यांनपिढ्या करत आहेत.
पुनापूर भवानी माता संस्थान, नागपूरकर भोसले यांचेशी सत्तभय्या परिवाराचा
घरोबा आहे. रतनलालजी बन्सीलालजी सत्तभया यांची परंपरा आज प्रल्हादजी
सत्तभय्या चालवतात.
इथले देव घराणे प्रसिद्ध आहे. वनवासी कल्याण
आश्रमाचे चंदूजी देव इथेच राहत असत. मांगलकर,खेडीकर, कोहळे, सातपुते,
दुर्बुळे ही कुटुंब देखील गेली किमान ६०/७० वर्षाहुन अधिक काळ येथे
वास्तव्य करून आहेत. भाईक बिल्डींग ही देखील अलीकडच्या काळातील साधु
गल्लीची एक ओळख असे.
कायरकर सदन ! प्रभाकरराव कायरकर हे औद्योगिक न्यायालयातून निवृत्तीनंतर आपला पूर्ण वेळ बाबाजी महाराज पंडीत यांच्या पाताळेश्वर मार्गावरील मठाचे व्यवस्थापनात घालवतात. त्यांची मुले चेतन (पिंटू) , किशोर आणि समीर आज विविध सामाजिक कार्यात सक्रिय आहेत.©️®️
शुक्रवार तलावावरील लेक व्यूह लॉजचे मालक आणि नील सिटीचे स्कुलचे मुख्याध्यापक तात्याजी वझलवार हे देखील याच गल्लीत राहायला होते. ©️®️ तात्याजी वझलवार यांना विदर्भाचे गांधी म्हणत असत. जनसंघ भाजपचे नेते मधुकरराव तम्बाखे , वाणी कुटुंब हे देखील याच भागातील. पूर्वी वाणी यांचे घरी देवीचे एक पुरातन स्थान होते असे जुने लोक सांगत असत.
स्व.श्री.विठ्ठलराव पतकी- रा.स्व.संघाचे बंगाल प्रांतातील पहिले प्रचारक याच गल्लीत १९४६ ते १९७० पर्यंत वास्तव्यास होते. तत्पूर्वी मध्य भारतातील ख्यातीप्राप्त क्रिकेटपटू आणि यष्टीरक्षक म्हणून विठ्ठलरावांची ख्याती होती. ©️®️ विदर्भ प्रीमियर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत मुख्य व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम केले. अनिल, विजय, अशोक, अजय आणि संजय ही त्यांची पाच मुले होत.
मुकुंदराज गल्लीने अनेक सुखदुःख आणि स्थित्यंतरे बघितली. सत्तरच्या दशकातील एक दुर्दैवी घटना आजही अनेक लोकं सांगतात ती अशी की या ठिकाणी एका अपघाती अग्निकांडात सात नागरिकांचा मृत्यू झाला होता. ©️®️
पुढे येतो तो गोसावी वाडा ! प्रल्हादपंत गोसावी महाराज हे श्रीमंत राजे भोसले यांच्या दसरा मार्गावरील लहान राजवाड्याचे पुजारीपण सांभाळायचे. लक्ष्मीनृसिंह हे गोसावी घराण्याचे कुलदैवत ! नारायणराव गोसावी यांची तीन मुले प्रकाश ,विनायक आणि मधुकर यांनी नोकरी व्यवसाय सांभाळून सामाजिक कार्याचा वसा पुढे नेला. ©️®️ मधुकर गोसावी हे पूजनीय गोळवलकर गुरूजींच्या सेवेत प्रबंधक म्हणून राहीले आहेत. याच गोसावी वाड्यात अनेक वर्षे वेलंकीवार परीवार राहात असे. वेदमूर्ती विष्णुपंत श्रीहरी वेलंकीवार आणि वेदमूर्ती मनोहर श्रीहरी वेलंकीवार यांनी वैदीक परंपरा सांभाळली. जुन्या काळात गोसावी वाड्यात महालक्ष्मी सणाच्या दिवशी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली ती आज इथे सविस्तरपणे सांगण्याची आवश्यकता नाही मात्र त्या घटनेच्या अनुषंगाने गोसावी वाड्यातील भोसलेकालीन विहीर उपसल्यानंतर खाली विहिरीला दरवाजासदृश्य एक कपार होती अशी माहिती आजही ती घटना पाहीलेले जाणते लोक देतात. असो.. ©️®️ याच ठिकाणी कळमकर वाडा, मधुकरराव वैद्य यांचा वाडा, प्रख्यात गायक शरदराव भालेराव,व्हायोलिन वादक शिरीष भालेराव राहात असत.पुढे जुना महाजन वाडा देखील आहे. उदयराव महाजन परिवार सध्या तिथे राहतो. आमचे नेताजी शाखा कार्यवाह आणि सध्या नंदनवन नगर संघचालक संजयजी अजंटीवाले यांचे वास्तव्य बरीच वर्षे या वाड्यात होते. विदर्भ प्रांत प्रचार प्रमुख अतुलजी पिंगळे यांचे देखील वास्तव्य महाजन वाड्यात काही काळ झाले आहे. ©️®️ दिवाकर वाडा , अभ्यंकर , उपगडे, क्षीरसागर, देशकर ही देखील नावे जुनीजाणती मंडळी सांगत असतात. नागपूर महानगरपालिकेचे ऑक्ट्रॉय अधिकारी आणि गांधीबाग बँकेचे संस्थापक स्व. ब्रिजलालजी बिलसे हे देखील याच मुकुंदराज पथावरचे वैभव होते.
मुकुंदराज पथावर आणखी एक पुरातन वाडा आहे तो म्हणजे देशपांडे भुवन. ©️®️ १९३२ मध्ये श्रीरामचंद्र देशपांडे (भैयाजी) यांनी हा वाडा खरेदी केला.जुन्या मध्य प्रांत आणि वऱ्हाडचे( सीपी एन्ड बेरार) रामचंद्रजी देशपांडे हे इन्स्पेक्टर जनरल ऑफ स्कुलस् पदावर कार्यरत होते. या घराने तीन पिढया नांदवल्या. पिढीजात औषधाचा व्यवसाय सर्व मुलांनी सांभाळला. वास्तुविशारद देवेन्द्र देशपांडे यांनी या वाड्याला नवे करतांना मंदिराचे रूप दिले आहे.©️®️
पुढे येतो तो कावळे वाडा ! ज्येष्ठ व्हायोलिन वादक आणि संगीततज्ज्ञ विष्णुपंत गंगाधर कावळे यांचा २०० वर्षे पुरातनवाडा साधू मंदिराच्या अगदी समोर आहे. ©️®️ पंडीत भास्करराव मोरोणे आणि पं. श्रीधरराव पार्सेकर यांचे शिष्य असलेल्या विष्णूपंत कावळे यांचे महाराष्ट्रासह विदेशात एकल व्हायोलिन वादनाचे कार्यक्रम झाले. अनेक मान्यवर कलावंताना त्यांनी साथसंगत केली. १९८७ मध्ये दूरसंचार विभागातून सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी अखेरपर्यंत शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसारासाठी कार्य केले.आकाशवाणी आणि दूरदर्शनचे ते कलावंत होते. गुरू श्रीधरराव पार्सेकर आणि भास्करराव मोरोणे यांच्या स्मृतीनिमित्त ते गेल्या ५५ वर्षांपासून संगीत महोत्सव आयोजित करीत असत. या महोत्सवात अनेक स्थानिक आणि मान्यवर कलावंतांनी हजेरी लावली आहे. पार्सेकर हे मूळचे गोव्याचे असल्यामुळे त्यांच्या स्मृतीनिमित्त कावळे यांनी तेथेही संगीत महोत्सव सुरू केला होता. ©️®️ गायकी अंगाचे सुरेल व्हायोलिन वादन असल्यामुळे त्यांच्या वादनाला पं. गजाननबुवा जोशी, पं. व्ही.जी. जोग, एन. राजम या आंतरराष्ट्रीय कलावंतांनी दाद दिली होती. आयुष्याच्या शेवटपर्यंत संगीताची सेवा करताना त्यांनी अनेक शिष्य घडविले. शिरीष भालेराव हे विष्णूपंतांचेच शिष्य ! विष्णूपंतांचे पश्चात त्यांचे चिरंजीव प्रवीण विष्णुपंत कावळे हे पार्सेकर संगीत महोत्सव साजरा करीत ही परंपरा पुढे नेत आहेत . ©️®️
मित्र हो ... सायंकाळ होत आहे.. आता आपण जाऊया ज्या महापुरुषाच्या नावाने या मार्गाचे नाव आहे त्या मुकुंदराज साधू मठात अर्थात गोपालकृष्ण साधू मंदिरात दर्शनाला ! ©️®️
राधा माधव सुंदरं, यदुवरं! साधू कुलस्वामिनम्!
श्रेष्ठं सर्व कलानिधीं गुणनिधे, श्रीराजराजेश्र्वरं! कृष्णानंद मुकुंदराज तनयं, आख्यान निर्माणकं!
वन्दे नाथ मुकुंदराज सदयं साधू कुलाभुषणं!
राधा मुकुंद ! राधा मुकुंद !! राधा मुकुंद !!!
साधू घराण्यात श्रीशांतीब्रह्म एकनाथ महाराजांची २५० वर्षांची दैदिप्यमान परंपरा आहे. मुकुंदराज हे दत्त उपासक होते. गुरूंच्या आज्ञेनुसार, श्रीकृष्णाची उपासना, ही उपास्य दैवत म्हणून त्यांनी स्वीकारली. या मठातील देवता विग्रहाची कथा मोठी अद्भुत आणि विलक्षण आहे. मुळ पुरूष सदगुरू मुकुंदराज साधू यांना तसेच श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले (तृतीय) यांना एकाच दिवशी झालेल्या स्वप्नदृष्टांतुनच आजच्या, श्रीकृष्ण, राधा व रूक्मिणी या तीनही नयनमनोहर मूर्त्या ज्या पूर्वी श्रीमंत राजे भोसलेंच्या राजवाड्यात गुप्त अवस्थेत होत्या, या मुर्तींनीच द्रुष्टांत देवून या जागी स्थापना करण्यासाठी सांगितले. हा दृष्टांत झाल्यावर श्रीमंत राजे रघुजी महाराज यांनी राजपुरोहितांकरवी या मूर्तीचे षोडशोपचार पूजन करून स्वतः वाजतगाजत पालखीने या मूर्त्या साधू मठात आणल्या. तेंव्हापासून या मुर्ती साधू मंदिर येथे विराजमान झाल्या आहेत. सदगुरू मुकुंदराज महाराज साधू व त्यांचे चिरंजीव सदगुरू कृष्णानंद महाराज साधू यांच्या जीवंत समाध्या देखील मंदिरातच आहेत. श्रीकृष्णानंद महाराज यांनी कीर्तनाची एकुण ३६५ चरित्रे लिहिली. कृष्णानंद महाराज उत्कृष्ट गायक होते, त्यांना भूगंधर्व अशी पदवी होती. मुकुंदराज महाराज यांचे निर्याण झाल्यानंतर कृष्णानंद महाराज साधु , बाबाजी महाराज साधु, भाऊसाहेब महाराज साधु यांनी ही परंपरा चालवली. विलास, प्रशांत, मोहन, रवींद्र हे नागपूरस्थित साधु तसेच परगावस्थित बंधू विनोद, अनंत, राहूल व मिलिंद आणि बहिणींही यथायोग्य मंदिरात सेवेत असतात. शुभा, वंदना, सुषमा, मीना, दिपाली, अश्विनी, किरण या सर्व साधू तसेच अलका व संध्या घटवाई यांची देखील सेवा साधू मंदिरात घडते.साधु मठातील श्रीरामनवमी , जन्माष्टमी , श्रावणातील भागवत , चक्रीभजन आणि कुळाचारी उत्सव यामुळे वर्षभर या परिसरात भक्ती , ज्ञान आणि मांगल्याचा सुगंध दरवळत असतो. भानुकाका घटवाई यांनी गोपालकृष्ण भजन मंडळाच्या माध्यमातून साधू मंदिरात अखंड सेवा केली. आज दीपक आणि गुणवंत घटवाई ही गुरुसेवा मुकुंदराजचरणी अर्पण करीत असतात. प्रस्तुत लेखकाला देखील मुकुंदराज साधु मंदीरात कीर्तनसेवेची संधी प्राप्त झाली आहे हे अहोभाग्यच म्हणावे लागेल. समस्त साधू कुटुंबीय आणि परिसरातील आप्त-स्नेही- हितचिंतक यांच्या सहकार्याने उच्चविद्याविभूषित हभप प्रा रवींद्रजी साधु ही दीव्य परंपरा आजच्या आधुनिक युगात देखील पुढे नेत आहेत ही सद्गुरूनाथ मुकुंदराज महाराजांचीच केवलकृपा ! साधुंच्या मुकुंदराज गोपाळकृष्णास मनोभावे वंदन करून आजची ही मुकुंदराज पथावरील भ्रमंती आपण आटोपती घेऊया ..राधा मुकुंद ! राधा मुकुंद!! राधा मुकुंद !!!
---------------------------------------------
✍️ डॉ भालचंद्र माधव हरदास
नागपूर / ९६५७७२०२४२
#नागपूरकर #भोसल्यांच्या #पठाण #तुकडीचा #तळ #जलालपूरा- #नाका #गल्ली
मित्र हो! नमस्कार..बुधवार बाजारातील भ्रमंतीनंतर आज जाऊया वॉकर रोड
अर्थात रुईकर पथाची पोटगल्ली असलेल्या जलालपूरा नाका गल्लीत. न्यू इंग्लिश
हायस्कुलकडून बडकस चौकाकडे जाणाऱ्या रुईकर रस्त्यावर डावीकडे ही गल्ली
आहे.मुंजे आणि पिंपळापुरे बंधुंनी प्रारंभ केलेले श्रीविद्या प्रकाशन इथेच
गल्लीच्या सुरुवातीला होते त्यामुळे जुने लोकं याला विद्या प्रकाशनची
गल्ली असेही म्हणतात. खरंतर या भागात श्रीमंत रघुजीराजे भोसले यांच्या
सैन्यातील पठाण तुकडीचा तळ असे. ही तुकडी अत्यंत जहाल समजल्या जाई त्यामुळे
या भागास जहालपुरा हे नाव पडले. पुढे अपभ्रंश होऊन जलालपूरा झाले. पठाण
तुकडीचा तळ आज जिथे जलालपूरा पोलीस चौकी आहे तिथे असे. या पठाणी
सैनिकांसाठी बुधवार दरवाज्याजवळ पठाणी मशीद देखील तेव्हापासून आहे. या
दरवाज्याजवळ पिंजारी काम करणारे मुस्लिम बंधू राहात असत.©️®️
पत्थरफोड दरवाज्याच्या आंत आखाडा होता. हाताने पत्थर अर्थात दगड फोडणारे
पैलवान मल्ल या ठिकाणी तयार होत असल्याने यास पत्थरफोड दरवाजा हे नाव पडले.
पत्थरफोड आणि बुधवार असे दोन दरवाजे अगदी जवळजवळ असलेले नागपूर भोसले
संस्थानातील हे एकमेव स्थळ आहे. ब्रिटीश काळात या भागाला सर्कल नंबर 7 नाका
असे म्हटले जाई.विद्या प्रकाशन गल्लीत सुरुवातीला इंदूरकर आणि शर्मा यांचा
वाडा होता.
घाडगे वाडा! पांडुरंग घाडगे , आत्माराम घाडगे ,श्रीधर
घाडगे यांचा वारसा पुढे प्रभाकर उपाख्य नाना घाडगे ( वर्धा नगर कार्यवाह) ,
वसंतराव घाडगे ( नागपूर कार्यवाह/खदान नगर संघचालक) ,डॉ अशोकराव घाडगे (
भंडारा नगर कार्यवाह) यांनी चालवला. घाडगे यांच्या वाड्यातील एका खोलीतूनच
विवेकांनंद सहकारी संस्था प्रारंभ झाली आहे हे माझ्या रुईकर पथ या लेखात
मागे आले आहेच. न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये NCC चे ऑफिसर असणारे आमचे
चंद्रकांत घाडगे सर हे देखील याच वाड्याचे सुपुत्र. आज घाडगे घराण्याची
आठवी पिढी येथे वास्तव्यास आहे.©️®️
तांबेकर वाडा! स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निस्सीम भक्त आणि क्रांतिकारक कै कमलाकर मुरलीधर तांबेकर यांचा वाडा देखील इथेच आहे. गांधीहत्येच्या खोट्या आरोपात क.मु. तांबेकर यांना गोवण्यात आले होते मात्र त्यातून तांबेकरांची निर्दोष मुक्तता झाली. स्वा. सावरकरांनी स्थापन केलेल्या अभिनव भारत संघटनेचे विसर्जन झाल्यावर शिक्षक असलेल्या तांबेकर सरांनी आपले जीवन सावरकरांच्या विचार प्रसारासाठी वाहून घेतले. प्रसिद्ध चित्रकार भाऊ समर्थ यांच्याकडून सुरेख चित्रं काढून अर्ध्या हिंदुस्थानात कमलाकरजी चित्र प्रदर्शन घेऊन फिरत होते. बाबुराव मैराळ, लक्ष्मणराव उर्फ बाबुराव देशपांडे, मनोहर बढे, चलपे ही मंडळी त्यांच्यासह नेहमी हिंदू महासभेच्या कार्यात असत. आणीबाणीच्या काळात क. मु.तांबेकरांच्या मागे सीआयडी व पोलीस सतत असत. १९७७ मध्ये तांबेकरांनी अयोध्येला पायी जावून श्रीरामजन्मभूमीवर कृपालकुंडलअंकीत भगवा ध्वज फडकवला होता. स्वभाषा आणि स्वभूषा याचा सदैव पुरस्कार करणारे क मु तांबेकर यांनी राज्यशास्त्र एम ए झाल्यावर इंग्रजी भाषेत दिली जाणारी पदवी स्वीकारण्यास बाणेदारपणे नकार दिला तेव्हा नागपुर विद्यापीठात मोठी खळबळ उडाली होती. तांबेकरांनी प्रारंभ केलेले अरुणोदय गणेश मंडळ आजही या गल्लीत अस्तित्वात आहे. त्या काळात येथे भाई ए बी बर्धन , क मु तांबेकर ,मनोहरराव खोलकुटे, श्री. ल. काशीकर, विक्रमराव सावरकर व नागपुरातील इतर मान्यवर यांचे वादविवाद आयोजित होत असत. आपल्या पित्याचा हा हिंदुत्वाचा वारसा आजही त्यांचे सुपुत्र राष्ट्रीय वाचनालयाचे अध्यक्ष पद्मश्री तांबेकर पुढे नेत आहेत. ©️®️
जहालपुऱ्यातील स्वातंत्र्यशाहीर गंगाधरराव जाधव (नागपूरचे माजी महापौर डोमाजी जाधव यांचे लहान बंधू) हे हिंदूसभेचे कट्टर आणि झुंजार कार्यकर्ते. वंदे मातरम , हा पत्रकार झुंजार , आ रहा है हिंद में तुफान सावरकर... ©️®️ अश्या ज्वलजाज्वल रचना गंगाधरराव जाधवांनी करून ठेवल्या आहेत.
बडकस वाडा! बालाजी कुलदैवत असलेले बडकस घराणे यांचे महालात सहा सात मोठे
चौसोपी वाडे होते.याच घराण्यावरून वॉकर रोड/ रुईकर पथ जेथे संपतो त्या
चौकास बडकस चौक हे नाव मिळाले. ©️®️
माधवराव, विनायकराव, लक्ष्मीकांत (गुरुजी काका) हे पुत्र तर सुशीलाताई (
शास्त्री) , लीलाताई (व्याघ्र) आणि इंदूताई पाठक या तीन कन्या असा मोठा
परीवार बडकस वाड्यात राहात असे. यातील माधवराव म्हणजेचविदर्भ प्रीमियर
सोसायटीचे संस्थापक सदस्य माधव लक्ष्मणराव बडकस होत. आज हा भव्य वाडा
अस्तित्वात नसून त्याठिकाणी सिद्धवार परीवार यांचे घर आहे.
याच गल्लीत
रुईकर पथावर मेडिकल स्टोर्स असलेले बाबुराव डांगे यांचा परीवार निवास करीत
होता. दत्तोपंत ठेंगडी, आबाजी थत्ते, मामा मुठाळ यांची डांगेकडे सतत उठबस
असे.©️®️
महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आणि नागपूर हीच कर्मभूमी असलेले आणि कट्यार काळजात घुसली या अजरामर कलाकृतीचे निर्माते ज्येष्ठ नाटककार, लेखक पुरुषोत्तम दारव्हेकर मास्तर याच नाका गल्लीत राहायचे हे©️®️ अनेकांना आज माहिती नसेल. घेई छंद मकरंद, छळतसे काजळ काळी रात, जा उडुनी जा पाखरा ,तेजोनिधी लोहगोल,दिन गेले भजनाविण सारे,मुरलीधर श्याम हे नंदलाल, या भवनातिल गीत पुराणे ही अजरामर गीते दारव्हेकर मास्तरांची. त्यातील तेजोनिधी... हे गीत तर त्यांनी वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी लिहीले होते. गांधीहत्येनंतर झालेल्या संघाच्या सत्याग्रहात दारव्हेकर मास्तर, लाखे, वकील ,मोहरील ही मंडळी सहभागी झाली होती. ©️®️
न्यू इंग्लिश हायस्कुल महालचे मुख्याध्यापक रावबहादूर पुरुषे मास्तर हे देखील या ऐतिहासिक गल्लीत राहायचे. सोनी किराणा भांडार यांचा देखील वाडा इथे आहे.मुक्तापुर येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांचाही वाडा नाका गल्लीतलाच. नाका गल्लीत तांबोळी, कुमार डबीर सर, चिमोटे, ताम्हण ,बापट, मोहरील यांचे वाडे/ घरे इथे होती. वसंत गोपाळराव उपाख्य बाळासाहेब पिंपुटकर यांचाही वाडा इथे होता. बाळासाहेबांच्या घरीच नाका शाखा आणि पुढे नेताजी म्हटल्या जाणाऱ्या शाखेचा ध्वजदंड राहात असे. माझी सर्वात मोठी ताई आत्या सौ मालतीताई त्रिकांडे आणि मामा ज्येष्ठ स्वयंसेवक वसंतराव त्रिकांडे हे पिंपुटकर वाड्यातच राहात असत. नाका शाखा हि घाडगेच्या वाड्याजवळ,पुढे जलालपुरा नाका येथे आणि नंतर चित्रा सिनेमाजवळील बेनिगिरी वाड्यात लागत असे. १९७०-७१ ला द्वितीय सरसंघचालक पूजनीय श्रीगुरुजी बेनिगिरी वाडा शाखेत डॉ बळवंतराव पांडे यांच्या कारने आले होते असे जुने जाणते कार्यकर्ते सांगतात. प्रस्तुत लेखकाचा संघ प्रवेश १९८५ मध्ये याच नाका गल्लीतील वसंतराव घटवाईच्या वाड्यात राहात असताना झाला तसेच माझी आई सौ रेवती माधव हरदास हिचे १९८७ मध्ये मी केवळ सात वर्षांचा असताना याच वाड्यात अकस्मात निधन झाले त्यामुळे जलालपुरा नाका गल्ली हा माझ्यासाठी अत्यंत भावनिक विषय आहे. ©️®️
ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे प्रवतर्क वरिष्ठ वजनमापे निरीक्षक पुरुषोत्तमराव चन्ने हे याच नाका गल्लीत अजूनही राहतात. समसामायिक विषयांना घेऊन वृत्तपत्रात लेखन करून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी चन्ने काका आजही सतत कार्यरत असतात. सौ चन्ने काकू साधूंच्या मंदिरातील भजन मंडळात सक्रिय आहेत.
अशोकराव सिंगरू, किरण बेलुरकर ,गडेकर, देशपांडे काकु, अतकर, कोनेर, फाये, मधुकरराव तल्हार, देवसंत ,शिंदेचा वाडा, धमाले, गोतमारे,शेंद्रे ,अशोकराव नंदनपवार वाडा, ऍड देशपांडे, तालेवार अश्या अनेक कुटुंबियांशी माझा नाका गल्लीत रहिवासी म्हणून संबंध आला आणि आजही कायम आहे. संजय घटवाई, संतोष घटवाई , सुनीता आणि©️®️ संगीताताई , विजुताई देशपांडे, संजय देशपांडे , भाऊ देशपांडे, डॉ अंजली नंदनपवार , सुवर्णा डबीर , आनंद चन्ने , छोटू चन्ने, स्वाती ताई चन्ने, वर्षाताई तल्हार, सौ नीलिमा तल्हार -दामले , समीर आणि सौ मंजिरी देवसंत , धनंजय नंदनपवार , सौ संजीवनी टिकेकर , अमोल, आशिष आणि अमित सिंगरु , पंकज शेंद्रे , मुकुंदा बापट , सर्वेश घाडगे , सागर वेळेकर, स्वप्नील डांगे, तालेवार , गोतमारे यांच्या सहवासातील नाका गल्लीतील ८०/९० च्या दशकातील काळ म्हणजे सुवर्णकाळ होता. नाका गल्लीच्या शेवटच्या टोकावर जलालपुरा पोलीस चौकी आणि नाका आजही कायम आहेत. याच भागात गोपालक बंधु नंदवंशी लोक पिढ्यांनपिढ्या राहात आहेत.जलालपुरा मनपा शाळा इथे होती आज©️®️ याठिकाणी मनपाचे विरंगुळा केंद्र चालते.काँग्रेसचे नेते स्वातंत्र्यसंग्राम सैनिक चिलाटे हे देखील नाका गल्लीतील मोठं नाव. संयुक्त कुटुंब पद्धतीने हे कुटुंब अनेक वर्षे राहात असे. ©️®️
नाका गल्लीवर तासनतास बोलता येईल आणि खूप काही लिहिता येईल मात्र तूर्तास इतकेच. उद्या पुढे याच नाका मार्गाजवळील बेनिगिरी वाडा , चित्रा सिनेमा आणि मुकुंदराज पथावर भ्रमंती करूया. नमस्कार ! ©️®️
✍️ डॉ भालचंद्र माधव हरदास
नागपूर /९६५७७२०२४२
#नागपूर #भोसले #संस्थानातील #महालचा #बुधवार #बाजार
मित्र हो ! नमस्कार मागच्या आठवड्यापासून सुरु केलेल्या महाल भ्रमंतीला आज सात दिवस झाले. अनेकांना वाटलं किती गल्ल्या फिरवत आहेत हे हरदास सर ! सात दिवस झाले आता संपली का भ्रमंती? असेही काहींनी विचारले. महालाच्या भाषेत सांगायचं झालं तर ही तर सुरुवात आहे बावाsss अजून अर्धा महाल देखील आपण अनुभवला नाही. ©️®️
आज बुधवार ! तर चला जाऊया भोसलेकालीन बुधवार बाजारात ! नागपूर प्रांत हे
सुरुवातीला गोंड आणि नंतर भोसले राजेंचे संस्थान. नागपुरात विविध आठवडी
बाजार लागायचे जसे सोमवार बाजार , मंगळवार बाजार , बस्तरवार बाजार ( बर्डी )
, महालात बुधवार बाजार , शनिचरा बाजार आणि इतवारा बाजार. ©️®️आज
आपण आलोय महाल राजवाड्याजवळील बुधवार बाजारात ! काल परवाच आपण बघितलेल्या
केळीबाग मार्गापासून प्रारंभ होऊन आज जिथे बुधवार बाजार आहे तो परिसर ते
नगारखाना कल्याण दरवाजापर्यंत बुधवार बाजार लागत होता. द्वितीय रघुजी राजे
भोसले महाराज यांनी केळीबाग लगतच्या दीड एकर परिसरात आठवडी बाजार /गुजरी
भरविण्यासाठी जागा दिली. आज जिथे राजविलास सिनेमा आहे त्या जागी श्रीमंत
राजेसाहेबांची घोडपागा होती. याच ठिकाणी जनावरांसाठी लागणारा चारा बाजार
देखील भरत असे. पहाटे ४/५ वाजेपासून नागपूर प्रांतातील उमरेड , पवनी ,
भिवापूर ,पारशिवनी , भंडारा, वायगाव आदी ठिकाणाहून ताजा भाजीपाला,
दूध-दही, तूप, धान्य , गूळ, मिरची , हळकंड , फूलं , विड्याची पानं ,
शिंगाडे आदी जीवनावश्यक वस्तू घेऊन शेतकरी आणि बारा बलुतेदार नागपुरात येत.
बैलबंड्या, टांगा ही सुरुवातीची साधने होती पुढे ब्रिटिश काळात रेल्वे आणि
यांत्रिकी वाहनाने ही मंडळी येत असत. बुधवार बाजाराला चार दिशांनी
प्रवेशद्वारे आहेत. पहीला केळीबाग रस्ता , महालकडून , दुसरा कल्याण
दरवाज्याकडून , तिसरा घोडपागेकडून ( सध्याचे राजविलास सिनेमागृह ) आणि चौथा
वाईकर गल्लीकडे जाणाऱ्या मार्गावरून. ©️®️आज वाईकर गल्लीचा मार्ग वगळता इतर तीन मार्ग सुरु आहेत.
शास्त्री किराणा भांडार हे केळीबागेकडून बुधवार बाजारात जाणाऱ्या मार्गावर
डाव्या बाजूला होते तर उजव्या बाजूस आगरा मिष्ठान्न भांडार. गोविंद दिनकर
गोखले ( स्थापना १९२६ ) हे शताब्दीकडे वाटचाल करणारे ऐतिहासिक दुकान महाल
चौकात बुधवार बाजारातच होते नुकतेच रस्ता रुंदीकरणामुळे गोखलेंचे दुकान
गोपाल स्मृती कॉम्प्लेक्स , मॉडेल मिल चौकात गेले आहे. बुधवार बाजार
केळीबाग रस्त्यावरील हिंदू महासभेचे वीरेंद्र लक्ष्मणराव देशपांडे यांचे
समर्थ किराणा भांडार हे देखील प्रसिद्ध आहे. बुधवार बाजारातील केळीबागचे
आंबेकर घी शॉप हे देखील अनेक घरांचे कुळाचारी दुकान. इसवी सन १९११ पासून
शुद्ध तुपाचा सचोटीने व्यवहार करणारे आंबेकर म्हणजे अनेक घरांची
सणासुदीच्या प्रत्येक कार्यातील पहीली पसंती आहे. लक्ष्मणराव आंबेकर यांनी
हे दुकान प्रारंभ केले. वामनराव आंबेकर, दिलीप , सुनील आणि किरण आंबेकर
यांनी या प्रतिष्ठानाचा व्याप विस्तारित केला. याच घराण्यातील कै
प्रल्हादपंत आंबेकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मध्य भारत प्रांतात
प्रचारक होते. ©️®️केळीबाग
रस्ता रुंदीकरणात आंबेकरांचे दुकान आता रुईकर पथावरील विवेकानंद सोसायटीत
स्थानांतरित झाले आहे. युवा पिढीचे भूषण , रोहित आणि संकेत आंबेकर आता हा
शतकोत्तर व्यवसाय सांभाळत आहेत.
बुधवार बाजारात शिरताच उजव्या भागास
नानासाहेब वाघमारे यांचे किराणा दुकान आहे. डावीकडे फुलवाल्यांची दुकाने
आहेत. गणपती, महालक्ष्म्या , विवाह , वरात ,मुंज आदी उत्सव समारंभात
लागणारे हार , पुष्पगुच्छ , मुंडावळ्या यासाठी इथले कारागीर प्रसिद्ध आहेत.
केळीबाग मार्गावरील प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस बाराही महिने शिंगाडे,
बोरं , आवळे , करवंद, जांभळं, काकडी , कणीस विकणाऱ्या माताभगिनी आपणास
बसलेल्या दिसतील. आणि त्या चिंचोळ्या मार्गातून व्यवस्थितपणे दुचाकी घेऊन
जाणारे महाभाग ही तर महाल बुधवार बाजाराची खास ओळख. यापुढे दिसतील मुरमुरे ,
फुटाणे विक्रेते. पूर्वी गावोगावचे भडभुंजे लोक इथेच भट्ट्या लावून वाटाणे
, फुटाणे , लाह्या भाजत असताना अनेक लोकांनी बघितले आहेत. घरातल्या महिला
ज्वारी भाजायला देखील या भडभुंज्यांकडे येत असत. ©️®️
आंबे मोहोराच्या दिवसात बुधवार बाजारात दिसतील ती कैऱ्या/आंबे विकणारी आणि लोणच्यासाठी आंबे फोडणीच्या साह्यायाने आंबे फोडणारी मंडळी. बुधवार बाजारातील आतील मुख्य भागात लागतात ती भाजी विक्रेत्यांची दुकाने. जुन्या काळी देवरावजी ( मामा ) इंगळे यांचे भाजीचे दुकान प्रसिद्ध होते. भाजी घेतली की ढगेंच्या दुकानात जाऊन चिवडा व दुधाचा आस्वाद अनेक मंडळी घेत असत . आज तिथे मधुर महल हे दुकान दिसते. बनोदे बंधूंची दुकाने , विठ्ठल तेल केंद्र ही बुधवार बाजारातील काही जुनी प्रतिष्ठाने आहेत. ©️®️ बुधवार बाजारातील कल्याण दरवाजा मार्गावर मुख्यतः पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यांची दुकाने आहेत. ज्यात देवीची ओटी, सत्यनारायण , होम हवन आदी साठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध असते. सिध्दीविनायक मंदीर ही देखील बुधवार बाजारची जुनी ओळख. नागपुरी विड्याची पाने, कपूरी पाने यासाठी बुधवार बाजारात स्वतंत्र ओटे आहेत. चौरसिया मंडळी तिथे वर्षानुवर्षे हा पारंपरिक व्यवसाय करतात. ©️®️ बुधवार बाजाराच्या मध्यभागी एक जुने कारंजे आता आतापर्यंत अस्तित्वात होते. मात्र सरकारी यंत्रणेची अनास्था आणि जनतेचा निष्काळजीपणा यामुळे आज ते अस्तित्वात नाही. संक्रांत , आठवी , अक्षय तृतीया , दिवाळी आदी सणांना लागणारी मातीची बोळकी , माठ , पणत्या याचा मोठा बाजार पूर्वी येथे होता. आजही दसरा, दिवाळी , रामनवमी , जन्माष्टमी आणि इतर प्रासंगिक उत्सवांच्या काळात बुधवार बाजाराच्या बाहेर गुजरी लागते.
पत्राळेचे दुकान !
नावातच पत्राळे असणाऱ्या या परिवाराची पाचवी पिढी बुधवार बाजारात पत्रावळी ,
केळीच्या पानांची विक्री करीत आहे. भाऊराव रामाजी पत्राळे यांनी
सुरुवातीला इतवारीत हे दुकान सुरु केले मात्र महालातील त्यांचे मित्र
अप्पाजी गांधी , शंकरराव पाध्ये यांनी महालाच्या लोकांना इतवारीत येणे
सोयीचे नसल्याने महालावर दुकान सुरु करण्याची भाऊरावांना गळ घातली. बुधवार
बाजाराच्या घोडपागा रस्त्यावर ( राजविलास सिनेमा ) १९०५ मध्ये सुरु झालेले
हे दुकान आज ११६ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. ©️®️पत्राळे
परिवार तसा मूळ तेलंगणचा! करंगीवार हे त्यांचे मूळ आडनाव होते. नागपुरात
ओडिशा मधील बालासोरच्या पत्रावळी आणण्याचे कार्य हे पत्राळे गुरुजीनींच
प्रारंभ केले. महालक्ष्मी , गणपतीच्या भोजनावळी असो की श्राध्दपक्षातील
कार्य आजही जुनी मंडळी केळीच्या पानांसाठी येतात ती महालच्या बुधवार
बाजारातील पत्राळे यांचेकडेच. अनेक घराण्यातील कुळ कुळाचार , श्राद्धपक्ष
तिथी ही त्या घरातल्या मंडळींना माहित असणे यात नवल नाहीच पण ही सर्व
माहिती पत्राळेना मुखोद्गत आहे आता बोला ! अनंतव्रताच्या दिवशी दर्भाचा
अनंत तयार करून वैदिक मंडळींना देणे ही कला पत्राळे मंडळींनी देवळे गुरुजी
यांच्याकडून शिकून घेतली होती. पत्राळे गुरुजींनी तयार केलेले ५/७/१४
फण्यांचे दर्भाचे अनंत आजही आर्वीकर आदी वैदिक घराण्यात आहेत. भाऊराव
यांच्यानंतर त्यांची मुले कै बाबासाहेब पत्राळे , वसंतराव पत्राळे आणि श्री
सुरेश पत्राळे यांनी ही परंपरा वहन केली. ©️®️आज
प्रदीप पत्राळे ही परंपरा नेटाने पुढे नेत आहेत. खरं तर आता पत्रावळी ,
केळीची पाने, द्रोण ही नवलाई कोण्या एका भागाची मक्तेदारी राहीली नाही
तरीही ज्यांनी महाल सोडले अशी मंडळी १२ /१५ किमीवरून पत्राळेकडे येऊन
साहित्य घेऊन जातात आणि बुधवार बाजारात येण्याचा हा वार्षिक कुळाचार करतात
त्या मंडळींच्या मनात महालविषयी असणारी आत्मीयता आणि ओढ यालाच तर आम्ही
महाली संस्कृती म्हणतो ! गजबजलेल्या बुधवार बाजारात राजविलास सिनेमा हे (
जुने नाव पारस ) चित्रपटगृह अनेक पिढ्यांचा साक्षिदार आहे. आज महालातील इतर
सिनेमागृहे काळाच्या पडद्याआड गेली असली तरी राजविलास नोवा सिनेमाज या
नव्या रूपात राजविलास टॉकीज अजूनही सुरु आहे. राजविलास सिनेमागृहाजवळच भरतो
तो विदर्भातील सर्वात जुना किंबहुना एकमेव असा जुन्या पुस्तकांचा बाजार.
शालेय स्तरापासून पदव्युत्तर पुस्तकांची खरेदी विक्री इथे गेली कित्येक
पिढ्यांपासून होते आहे. १ रुपया ठेव ठेवून पुस्तक घेऊन जाणे आणि
आठवड्याभरानंतर पुस्तक परत करणे ही देखील व्यवस्था पूर्वी या बाजारात असे.
©️®️ हा बाजाराचा
भाग असला तरी या ठिकाणी देखील जुने वाडे आहेत. वेदमूर्ती गोविंदराव
दहासहस्त्र , विद्वतवरेण्य रामभाऊ देशकर ,वेदमूर्ती बाबाजी दहासहस्त्र ,
बाबा आमटे यांचे नातेवाईक राजाभाऊ आमटे , सामाजिक कार्यकर्ते प्रभाकरराव
उपाख्य भाऊसाहेब वाशीमकर, मिलन मंडप हे नागपूर विदर्भातील पहीले बिछायत
केंद्र (१९५७) स्थापन करणारे गंगाधरराव बापट , दत्तात्रेय वेखंडे यांचे
वास्तव्य याच भागातील. सहकारमहर्षी मनोहरराव खोलकुटे यांचा देखील वाडा
बुधवार बाजार भागात होता. आज चिटणिसपूरा सहकारी बँक , बँक ऑफ इंडिया आणि
नागपूर महानगरपालिकचे संकुल ही आधुनिक केंद्रे बुधवार बाजारात आहेत.
खरं तर महालातील बुधवार बाजारात जाणे हे केवळ भाजीपाला किराणा सामान आणायचे
म्हणून नव्हे तर ती एक आनंददायी यात्रा असे. भाजीविक्रेते बंधू -भगिनी
यांना आजोबा ,काका, मामा , दादा ,मावशी, ताई असे संबोधन करून जणू काही ते
महालातील प्रत्येकाच्या घरातील एक सदस्यच होते. बुधवार बाजारात शाळेतील
शिक्षक, मित्र, नातेवाईक , स्नेही यांची भेट हमखास घडतच असे. त्याअर्थाने
बुधवार बाजारात अनौपचारिक एकत्रीकरणच होई. घरातील लहान मुले किंवा युवकांना
बाजारात घेऊन जाताना त्यांनाही नकळतपणे सामाजिक व्यवहारज्ञान देण्याचे एक
महत्कार्य या बुधवार बाजाराने कित्येक पिढ्या केले आहे जे आजच्या तथाकथित
पर्सनॅलिटी डेव्हपलमेंट क्लासेस मध्ये पैसे देऊनही मिळेलच याची शाश्वती
नाही. ©️®️ असो..उशीर
फार झाला असल्याने आता बुधवार बाजारातील ही भ्रमंती आटोपती घेऊन आपण
पुन्हा भेटूया महालच्या नव्या मार्गावर.. तोवर नमस्कार 🙏 जय श्रीराम...! 🙏
✍️ डॉ भालचंद्र माधव हरदास
नागपूर /९६५७७२०२४२
#संघगंगेच्या #भगीरथाचे #जन्मस्थान- #महालातील #जोग #गल्ली- #शिर्के #रोड
मित्र हो! नमस्कार...☺️
महालातील आपली आजची भ्रमंती आपण ज्या मार्गावरून करणार आहोत ती अत्यंत
अरुंद अशी बोळ असली तरी या मार्गावर जन्म घेतलेल्या एका महामानवाने
नागपूरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवलं आहे. आपण जाणले असालच...
आपण आलोय भोसल्यांच्या महालातील शिर्के रोड- जोग गल्लीत. शुक्रवार पेठेतील (
नवी शुक्रवारी) शुक्रवार दरवाज्यातून बाहेर पडल्यास डावीकडे काशीबाई
देवळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर साधारण दोनशे मीटर अंतरावर डावीकडे एक अरुंद
अशी गल्ली आहे तीच जोग गल्ली. ©️®️
महाल आणि शुक्रवारी यांना जोडणारी गल्ली म्हणजे शिर्के रोड-जोग गल्ली होय.
याच गल्लीत ' होय,मी म्हणतो हे हिंदुराष्ट्र आहे' असे छातीठोकपणे म्हणणारे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आद्य सरसंघचालक डॉ केशव बळीराम
हेडगेवार यांचे जन्मस्थान आहे. ©️®️
हेडगेवार घराणे हे मूळचे आंध्रप्रदेशातील कंदकूर्ती या गावाचे. केशवराज ही
हेडगेवारांची कुलदेवता. हेडगेवार घराणे हे वैदीक अग्निहोत्री घराणे होते.
श्रीमंत रघुजी महाराज भोसले यांच्या काळात आंध्रप्रदेश तेलंगणमधून अनेक
वैदीक, पुरोहित घराणी नागपूर प्रांतात राजाश्रयाला आलीत त्यात डॉ हेडगेवार
यांचे आजोबा नरहरशास्त्री( दीक्षित) हेडगेवार हे देखील होते. ©️®️
याच नरहरशास्त्रींच्या मुलाला म्हणजेच महादेवपंतांना दोन मुले एक
बळीरामपंत आणि दुसरे रामचंद्रपंत. बळीरामपंत आणि सौ रेवतीबाई हेडगेवार
यांच्या पोटी वर्षप्रतिपदेच्या साडे तीन शुभमुहूर्तावर शके १८११ म्हणजेच १
एप्रिल १८८९ रोजी केशव बळीराम हेडगेवार या जन्मजात देशभक्ताचा जन्म झाला.©️®️
महादेवपंत आणि सीतारामपंत हे केशवचे वडीलबंधु तर राजूताई, शरयूताई आणि
रंगूताई या तीन भगिनी होत. बळीरामबुवांच्या या तीन कन्या अनुक्रमे विंचुरे,
देव आणि पट्टलवार यांचेकडे दिल्या होत्या. हेडगेवार हे आडनाव तेलंगी असले
तरी ते घराणे ऋग्वेदी आश्वलायन सूत्राच्या शाकलशाखीय काश्यप गोत्री देशस्थ
अग्निहोत्री ब्राह्मण आहे. १९०३ मधील प्लेगच्या भयंकर साथीत एकाच दिवशी
बळीरामबुवा आणि सौ रेवतीबाई यांचे त्यांची कन्या सौ राजू विंचुरे हिचे बडकस
चौकातील घरी देहावसान झाले. ©️®️संघाची
पहिली शाखा जरी साळूबाई मोहिते वाडा (आजचे डॉ हेडगेवार भवन) हे जरी खरे
असले तरी १९२५ च्या विजयादशमीला डॉक्टर हेडगेवार यांच्या शुक्रवारीतील या
राहत्या घरीच संघाची स्थापना झाली आहे. या पहिल्या बैठकीत डॉ ल वा
परांजपे, रघुनाथराव बांडे, भाऊजी कावरे, अण्णा सोहोनी, विश्वनाथराव केळकर,
बाळाजी हुद्दार, बापूराव भेदी ,अण्णा वैद्य, देवघरे, कृष्णराव मोहरील ,नरहर
पालेकर ,अण्णाजी गायकवाड आदी मंडळी उपस्थित होती , त्या अर्थाने हे स्थान
संघगंगोत्री आहे. संघस्थापनेपासूनच श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज यांनी
डॉ हेडगेवार यांना संघवृद्धीसाठी सहकार्य केले. संघाच्या शस्त्रपूजन
उत्सवात नागपूरचे संस्थानिक म्हणून श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज यांना
विशेष मानवंदना दिली जात असे. तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गातील अखिल
भारतातील स्वयंसेवक जेव्हा या ठिकाणी येतात तेव्हा त्यांच्या डोळ्यातील
आनंद हा बघण्यासारखा असतो. डॉक्टरजींचे वडीलबंधु सीतारामपंत यांची कन्या व
जावई सौ वेणूताई व नानासाहेब देशकर हे याठिकाणी बरीच वर्षे वास्तव्यास
होते अलिकडच्या काळात हे जन्मस्थान डॉ हेडगेवार स्मारक समितीने खरेदी करून
आता संघ संस्थापकांचे स्मारक करण्यात आले आहे. देशविदेशातील स्वयंसेवक ,
सामाजिक कार्यकर्ते या स्थानाला भेट देत असतात. दोन वर्षांपूर्वी संघ
शिक्षा वर्गात अतिथी म्हणून आलेले भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
यांनी देखील या स्थानास भेट दिली होती. नारायण हरी पालकर यांनी लिहिलेलं
डॉक्टर हेडगेवार चरित्र आपण सर्वांनी एकदा तरी वाचायला हवं. नागपुर
महानगरपालिकेने नगरीच्या या सुपुत्राला मानवंदना म्हणून हेडगेवार निवासाजवळ
एक मानवंदना फलक लावला आहे. आत्मविस्मृत हिंदू समाजाला संघटनेचा महामंत्र
देणाऱ्या या हिंदूभाग्यभूषण लोकोत्तर महामानवास वंदन करून आपण पुढे जाऊया.
जोग गल्ली हे नाव पडण्याचे कारण इथे गल्लीच्या सुरुवातीला १८९९ मध्ये जन्म
झालेल्या मार्तंडराव जोग यांचा ऐतिहासिक वाडा आहे. मार्तंडराव हे
डॉक्टरांचे विश्वासु सहकारी. मार्तंडराव जोगांनी पहिल्या विश्वयुध्दात भाग
घेतला होता त्यामुळे लष्करी शिस्तीचे कडक भोक्ते असलेले मार्तंडराव यांनी
संघात अनेक लष्करी कवायतीचा अंतर्भाव केला. जोग हे त्याकाळातील उद्योगपती
घराणे होते. काँग्रेस आणि संघाच्या कार्यक्रमात ते समान न्यायाने सहभागी
होत. संघाच्या कार्यक्रमात काळी टोपी , काँग्रेसच्या कार्यक्रमात पांढरी
खादी टोपी आणि एरव्ही भगवा फेटा असा त्यांचा त्रिसूत्री बाणा होता. १९२९
साली नागपुरच्या डोके बुवांच्या मठात संपन्न झालेल्या संघाच्या बैठकीत डॉ
हेडगेवार यांना सरसंघचालक , बाळाजी हुद्दार यांना सरकार्यवाह तसेच
मार्तंडराव जोगांना सरसेनापती घोषित करण्यात आले होते. मार्तंडराव हे
संघाचे प्रथम आणि एकमेव सरसेनापती होते. संघाच्या पथसंचलनात पूर्ण गणवेष
आणि भगवा फेटा धारण करून एक हाती तलवार आणि दुसऱ्या हाती भगवा ध्वज घेऊन
घोड्यावर बसलेले सरसेनापती मार्तंडराव जोग हे अग्रभागी असत. गांधीहत्येनंतर
जोगांचा कारखाना जाळण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केला मात्र स्वतः
मार्तंडराव आपली बंदूक घेऊन तिथे पोहोचल्याने तो अयशस्वी ठरला. १९७५ च्या
आणीबाणीत डॉक्टर हेडगेवार यांच्या समाधीची दुरवस्था बघून व्यथित झालेल्या
मार्तंडराव जोग यांनी विनोबा भावे आणि मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची
भेट घेऊन समाधीची नीट व्यवस्था लावली. ४ मे १९८१ रोजी सरसेनापती मार्तंडराव
जोग यांचे देहावसान झाले. पुरातन पिंपळ वृक्ष आणि मारुतीचे मंदिर असलेला
मार्तंडराव जोग वाडा आजही इतिहासाच्या खुणा घेऊन उभा आहे. डॉ हेडगेवार
यांचे घराण्यासह तेलंगणामधून आलेले आणखी एक घराणे म्हणजे टोंगलवार. पुढे
अपभ्रंश होऊन टोंगो हे उपनाम झाले. गोपाळराव टोंगो हे रघुजी महाराज भोसले
दरबारी अधिकारी होते. यांचा वाडा हा हेडगेवार वाड्याला लागूनच आजही कायम
आहे. अलीकडच्या काळातील पिढीला न्यू इंग्लिश हायस्कूल महालचे मुख्याध्यापक
राहीलेले शिस्तप्रिय मधुकरराव टोंगो आठवत असतीलच. ©️®️
डॉ हेडगेवार यांच्या वाड्यासमोर भुगावकर वाडा आपल्याला जोग गल्लीत दिसेल. कृष्णा बालाजीपंत उपाख्य राजाभाऊ भुगावकर हे याठिकाणी राहात. १७ सप्टेंबर १९३९ रोजी राजाभाऊंचा जन्म झाला. ©️®️ पूजनीय डॉक्टर हेडगेवार हे राजाभाऊंच्या नामकरण सोहोळ्यात उपस्थित होते. राजाभाऊंचे पिता एम्प्रेस मिलमध्ये नोकरीला होते. आई सौ लक्ष्मीबाई ह्या अत्यंत धार्मिक , सुशील आणि उत्साही असत. राजाभाऊ बालपणीपासूनच संघशाखेत जायला लागले. संघाच्या घोषातील वंशी , नागांग आणि स्वरद ही वाद्य म्हणजे राजाभाऊंचा हातखंडा. पुढे १९५८ साली राजाभाऊंना नागपूर विद्यापीठात नोकरी लागली. नोकरीत असतानाच त्यांनी १९७५ मध्ये बीए आणि भोसला संस्कृत महाविद्यालयातून प्राज्ञ परीक्षा उत्तीर्ण केली. राजाभाऊंचे हस्ताक्षर म्हणजे मोत्यांचे दाणे ! त्यामुळेच त्याकाळातील नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात दिल्या जाणाऱ्या पदव्या राजाभाऊंच्याच हस्ताक्षरातील असत. राजाभाऊ घोष प्रशिक्षणाच्या निमित्ताने अखिल भारतात प्रवास करून आलेले आहेत. राजाभाऊंनी आजवर हजारो संस्कृत, मराठी , हिंदी रचना केलेल्या आहेत. जीवन विकास, सज्जनगड-भालचंद्र आणि दैनिक तरुण भारतातून त्या प्रसिद्ध आल्या आहेत. १९९६ ला राजाभाऊ भूगावकर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून सहायक कुलसचिव ( सामान्य प्रशासन ) पदावरून निवृत्त झालेत. सध्या त्यांचे वास्तव्य त्यांच्या मुलीकडे मानेवाडा नागपूर येथे आहे. ©️®️
वंडलकर वाडा ! १९०५ साली बांधलेला ११६ वर्ष जुना हा वाडा म्हणजे शंकरराव वंडलकर यांचा वाडा होय. शंकरराव वंडलकर हे पोस्ट खात्यात नोकरीस होते. नागपूर विभागाचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल म्हणून ते निवृत्त झालेत. निवृत्तीनंतर शंकरराव यांनी होमियोपॅथीची प्रॅक्टिस केली. नागपूर मध्ये होमिओपॅथी असोसिएशनचे ते संस्थापक अध्यक्ष होत. इंग्रज प्रशासनात नौकरी असल्याने त्यांनी संघकार्यात डॉक्टर हेडगेवार यांना पडद्यामागुन सतत सहकार्य केले. ©️®️ चित्रकूटचे माधवनाथ महाराज यांचे ते परमशिष्य होते. माधवनाथ महाराज यांचे अनेकदा या वाड्यात वास्तव्य झाले आहे. हिंगणघाटमधील शिंगरूंच्या वाड्यात माधवनाथ महाराज ब्रह्मलीन झाले त्याआधी माधवनाथांनी वंडलकर वाड्यातूनच हिंगणघाटकडे प्रस्थान केले होते. शंकरराव वंडलकर यांचे पुत्र पुरुषोत्तमराव हे शिक्षण खात्यात शिक्षणाधिकारी होते. त्यांच्या सुविद्य पत्नी सौ पदमाताई ( पुष्पा मावशी ) या राष्ट्र सेविका समितीचे कार्य करीत. ©️®️समितीच्या नागपूर महानगर कार्यवाहीका पुढे जिल्हा कार्यवाहीका असे दायित्व त्यांनी सांभाळले . समितीच्या कामानिमित्ताने त्यांचा श्रीमंत भोसले यांच्या राजवाड्याशी नित्य संपर्क होता. भोसले राजघराण्यातील श्रीमंत शालिनीराजे भोसले यांना त्यांनी समितीच्या कार्याजवळ आणले . वंदनीय तृतीय प्रमुख संचालिका उषाताई चाटी यांच्यासमवेत त्यांनी अनेकदा प्रवास केला. आसाम आणि लुधियाना भागात त्यांनी समिती कार्य वृद्धिंगत केले. १९४२ च्या स्वातंत्र्य संग्रामातील चिमूर लढ्यात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले पुढे जन्मठेप भोगलेले पद्माताईंचे वडील बाबुराव बेगडे तसेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पुतणे विक्रमराव सावरकर यांनी वंडलकर वाड्यात वास्तव्य केले आहे. कोठी रोड आणि जोग गल्ली यांना जोडणारा खुष्कीचा मार्ग म्हणजे वंडलकर वाडा. आपत्कालीन परिस्थतीत पूजनीय डॉ हेडगेवार , पूजनीय श्रीगुरुजी , विक्रम सावरकर यांचेसह अनेक क्रांतिकारक व संघ कार्यकर्ते यांनी खुष्कीचा मार्ग असलेल्या या वाड्याचा उपयोग करून घेतला आहे. या परिवारातील पद्मभूषण , दिनेश , राजेश आणि श्रीवल्लभ वंडलकर आजही विविध सामाजिक कार्यात सक्रीय आहेत. ©️®️
काणे वाडा ! इसवी सन १९०० पासून या भागात काणे घराण्याचे वास्तव्य या भागात आहे. बळवंत काणे आणि निर्मलाबाई काणे यांना ४ मुले आणि २ मुली. विजय, भाऊ, धनंजय, अजय हे चार भाऊ, अरुणा आणि अलका या बहिणी. विजय काणे हे इंजीनियर होते आणि नंतर वयाच्या तिसाव्या वर्षी म्हणजे १९७४ मध्ये त्यांनी घराचा त्याग केला. संन्यासी जीवन भूमचैतन्य महाराज म्हणून व्यतीत करणाऱ्या त्यांचा आश्रम नर्मदेच्या काठावर मध्यप्रदेशात मंडलापासून २८ किमी अंतरावर आहे. या आश्रमाला २०० वर्ष जूनी परंपरा आहे. त्यानी पूर्ण जीवन आदिवासी क्षेत्रात काम केले. २००९ मध्ये भूमचैतन्य ब्रह्मलीन झाले. संजय उर्फ भाऊ काणे हे सुवर्णपदकांसह एक कॉम आहेत. शिक्षण चालू असताना त्यानी मोठ्या प्रमाणात कॉमर्स शिकवणी वर्ग घेतले. पुढे स्टेट बँकेत नोकरी ला होते. नोकरी करत असताना क्रीड़ा क्षेत्रात (एथलेटिक्स) प्रशिक्षण द्यायचे. त्यांच्या प्रशिक्षणात नागपुरातून अंतराष्ट्रीय स्तरावर पदक आणणारे ११ खेळाडू होऊन गेले. त्याना महाराष्ट्र सरकारचा दादोजी कोंडदेव हा पुरस्कार १९९२-९३ या साली मिळाला. या व्यतिरिक्त टाइम्स ऑफ इंडिया चा Nagpur Heros (२०१५), खासदार महोत्सवात (२०२०) 'क्रीड़ा महर्षि' असे पुरस्कार मिळाले आहेत. या सोबतच ते मोठ्या बंधूंच्या देहत्यागानन्तर आश्रमाची व्यवस्था बघत आहे.धनंजय काणे मोहता विज्ञान महाविद्यालयातून आणि अजय काणे विद्युत मंडळातून निवृत्त झाले.©️®️
शिर्के रोडच्या टोकाला म्हणजेच भुत्या दरवाजा-दसरा मार्गाकडे १२५ वर्षे जुना अवसरे यांचा वाडा आहे. या वाड्याचे मूळपुरुष रामरावजी अवसरे हे श्रीमंत रघुजी महाराज भोसले यांच्या काळात सावकार होते. समाजातील अनेक लोकांना रामरावजींनी अर्थसाहाय्य करून त्याकाळी आत्मनिर्भर केले ज्याची आठवण आजही अनेक लोक काढतात. याच अवसरे घराण्यातील डॉ विवेक अवसरे आज नाशिकराव तिरपुडे शारीरिक शिक्षण महाविद्यालयात कार्यरत असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध प्राधिकारिणी सदस्यपदी राहिले आहेत. ©️®️
ऍड अळेकर , मार्कंडवार, आनंदराव शिंदे, सरदार घोरपडे, तात्यासाहेब भोयर , अलोणी ,गाडगीळ, फडणवीस आणि पाचपोर यांचे वाडे जोग गल्ली शिर्के रोडचे वैभव आहेत. रामटेकहुन नागपूरात आल्यावर नागोबा गल्लीतील वास्तव्याआधी जोग गल्लीतील पाचपोर वाड्यात परमपूजनीय श्रीगोळवलकर गुरुजी निवासी असत अशी माहिती जुनीजाणती मंडळी सांगतात. ©️®️
श्रीमंत भोसले राजवाड्याच्या परकोटात असलेल्या शुक्रवार पेठेत ( नवी शुक्रवारी ) जन्मास आलेल्या संघगंगेच्या भगीरथाला हिंदुभाग्यभूषण डॉ केशव बळीरामपंत हेडगेवार यांना मानवंदना देऊन आजची ही भ्रमंती थांबवूया !
✍️ डॉ भालचंद्र माधव हरदास
नागपूर /९६५७७२०२४२
#महालातील #चितार #ओळ -#नागोबा #गल्ली
मित्र हो ! केळीबाग मार्गावरील भ्रमंतीनंतर आज जाऊया नागोबा गल्ली आणि
जगप्रसिद्ध चितार ओळीत ! केळीबाग मार्गावरून सरळ बडकस चौकाकडे आल्यास एक
मोठा रस्ता इतवारीकडे आणि डावीकडे एक लहान रस्ता जातो ती गल्लीवजा बोळ अथवा
ओळ म्हणजेच चितार ओळ ! श्रीमंत रघुजी महाराज भोसले यांनी समस्त भारतातुन
मुर्तीकार, चित्रकार, काष्टकार, शिल्पकार, रंगारी (पेंटर) यांना नागपुरात
आणले व या भागात त्यांना राहण्यासाठी घरे बांधुन दिली. चितार काम
करणाऱ्यांची वसाहत म्हणून या गल्लीला चितार ओळ हे नाव पडले. ©️®️
इथे सर्व प्रकारच्या सुंदर व उत्तम मुर्त्या बनविल्या जातात. त्यात
प्रामुख्याने श्रीगणपतीच्या हजारो मुर्त्या दरवर्षी तयार केल्या जातात.
मोठ्या राजवाड्यातील श्रीगणपती ९ ते १० पिढ्यांपासून चितारओळीत तयार होतो.
इथे वर्षोनवर्ष मातीच्या मुर्त्या घडविण्याचे काम चालु आहे. गणपती व
मोहर्रम मध्ये माणसांना वाघ म्हणुन इथुनच रंगविण्याला सुरुवात झाली.
बाबुराव देशमुख पेंटर, गायकवाड, सूर्यवंशी ,इंगळे , दारलिंगे या घराण्यातील
कारागिरांनी गेल्या कित्येक पिढ्यांपासून केवळ नागपूर विदर्भचं नव्हे तर
संपूर्ण भारतात चितार ओळी हे नाव कलाकुसरीची ओळ म्हणून प्रसिद्ध केलं आहे.©️®️
गणपती, शारदा, दुर्गा , महालक्ष्मी, कान्होबा, भुलाबाई , पोळ्याचे मातीचे
बैल, तसेच विविध सण उत्सवांच्या निमित्ताने लागणारे कलाकुसरीचे साहित्य ,
पूजेचा कागद, रुखवंत यानिमित्ताने चितार ओळ बाराही महिने कार्यरत असते. आज
२१ व्या शतकात आपण कौशल विकास ( स्किल डेव्हलपमेंट ) च्या गोष्टी करतो पण
श्रीमंत रघुजी महाराज यांनी ३०० वर्षांपूर्वीच हे कौशल्य ओळखून चितार ओळीचा
विकास केला ही त्या द्रष्ट्या राजाची दूरदृष्टी नव्हे काय ? मागच्या एका
लेखात सांगितल्याप्रमाणे महाल राजवाड्यास चारही दिशांनी मोठमोठे
प्रवेशद्वार होते त्यातीलच एक प्रवेशद्वार म्हणजे आदितवार दरवाजा हा चितार
ओळीत होता. ©️®️हा
दरवाजा इतवारीच्या दिशेने उघडत असे त्यामुळे यास आदितवार ( आदित्य =सूर्य =
इतवार ) दरवाजा हे नाव पडले. इतिहास आणि आपला वारसा याकडे बघण्याचा आपला
निराशाजनक दृष्टिकोन यामुळे हा ऐतिहासिक आदितवार दरवाजा आज अस्तित्वात
नाही हे खेदाने नमूद करावेसे वाटते. परंतु या दरवाज्याच्या नावाने आदितवार
दरवाजा व्यायाम शाळा आखाडा याठिकाणी आहे. पैलवान हरिश्चंद्र माकुमे या
आखाड्याचे विश्वस्त आहेत. सध्या या आखाड्याचे नूतन बांधकाम सुरु आहे.
चितार ओळीच्या सुरुवातीलाच डावीकडे©️®️श्रीमंत
बाबासाहेब घटाटे वाडा ( आता घटाटे बिल्डिंग आहे ) होता. या ठिकाणी गोपाळ
प्रिंटिंग प्रेस होती. शंकरराव उपाख्य मामा वैद्य हे इथे राहात असत. मामा
वैद्य हे श्रीमंत बाबासाहेब घटाटे यांचे इस्टेट मॅनेजर. मामा इतवारी शाखेचे
कार्यवाह होते. संघ शिक्षा वर्गातील मेसची ( पाकखाना ) जवाबदारी
मामांकडेच असे. याच मामांचे चिरंजीव पुढे गोविंदराव रिसालदार यांचेकडे
दत्तक गेले ते म्हणजे ज्येष्ठ संघ स्वयंसेवक आणि जनसंघ -भाजपचे नेते
श्रीपादजी रिसालदार. याच घटाटे सदनात डॉ परांडे यांची पॅथॉलॉजी लॅब होती.
१९ मार्च
१९०० मध्ये जन्मलेले पुरुषोत्तम भाऊसाहेब उपाख्य तात्याजी बरडे हे तर चितार
ओळीचे वैभव ! वैद्यराज ,वैद्यचुडामणी या उपाध्यांनी विभूषित तात्याजी हे
निष्णात आयुर्वेदाचार्य होते. ©️®️
१९०७ मध्ये सीताबर्डीवरील बुटींच्या वाड्यात शेगावचे संत गजानन महाराज
मुक्कामी असताना तात्याजी म्हणजे लहान वयातील पुरुषोत्तम ( वय वर्षे सात )
आईसोबत दर्शनाला गेला असताना त्यांच्या डोक्यावरून संत गजानन महाराज यांनी
हात फिरवला होता. आपणासारिखे करिती तात्काळ या संत वचनाप्रमाणे या
प्रसंगानंतर पुढे लहान पुरुषोत्तम व्रतबंधांनंतर सप्तशती पाठ , ज्योतिष ,
आयुर्वेदाकडे वळला आणि दुबे नावाच्या आयुर्वेदाचार्याकडून दीक्षा घेऊन
तात्याजी बरडे हे नाडी परीक्षणात पारंगत झाले. तात्याजी हे इंदूरच्या
सद्गुरू माधवनाथांचे परमशिष्य होते. सकाळच्या सूर्यप्रकाशात रुग्णांनी
आणलेल्या पारदर्शक बाटलीतील मूत्रपरिक्षण ही तर तात्याजी बरडे यांची
खासियत होती. काल रात्री रुग्णाने काय खाल्ले असेल हे तात्याजी क्षणाचाही
विलंब न लावता ओळखत असत त्यामुळे कोणताही रुग्ण तात्याजींसमोर खोटे बोलूच
शकत नसे. कसोटीच्या दगडापासून तयार©️®️
झालेल्या खलात स्वतः औषधी तयार करून तात्याजी रुग्णांना देत. कुष्मांडपाक
, च्यवनप्राश , मेंदूब्राह्मी तेल आणि बिल्व फळापासून बिल्वाटोन सिरप ही
तात्याजींची खास ब्रँड औषधं त्याकाळी प्रसिद्ध होती. सर्व प्रकारचे
आयुर्वेदिक काढे , रस , रसायने ,आसव आणि भस्म ते स्वतः तयार करीत असत.
त्यासाठी भिवापूर जवळील भवरी येथे ते नित्य जात येत. अत्यंत गमतीदार
स्वभावाचे आयुर्वेदाचार्य तात्याजी बरडे हे ४ मार्च १९८५ रोजी कालवश झाले. ©️®️
पुढे श्रीमदनमोहन लालजी की हवेली हे देवालय चितार ओळीत दिसेल. जवळच
चंद्रशेखरजी त्रिवेदी यांचा वाडा आहे. सामाजिक कार्यकर्ते विलास त्रिवेदी
यांचे तेथे वास्तव्य असते. याच ठिकाणी विश्वकर्मा यांचे अगदी लहानसे मात्र
अत्यंत कामाचे चाकू, सुरी,कैची यांना धार लावण्याचे दुकान आहे. पुढे डॉ
इंदापवार यांचा दवाखाना आणि ऍड आदमने यांचा वाडा होता. दशोत्तर यांचा वाडा
ही इथे आहे. चितार ओळीच्या सुरुवातीला आज जिथे देवीचे मंदिर आहे तिथे
मोकळी जागा आणि टांगा स्टॅन्ड होता. ठाकूर मंडळी झाडाखाली दुर्गा उत्सव
करायचे. ©️®️
दुर्गोत्सवाच्या पानसुपारीला परमपूजनीय श्रीगुरुजी स्वतः येत असत तेव्हा
ठाकूर मंडळी श्रीगुरुजींना साष्टांग नमस्कार करीत असे जुने जाणते लोक
सांगतात. याच चितार ओळीला पुढे जाऊन डावीकडे दोन पोटगल्ल्या आहेत. त्या
नागोबा गल्ली नंबर १ आणि नंबर २ म्हणून प्रसिद्ध आहेत.नागमोडी वळणाच्या या
गल्लीत नागोबाचे मंदिर आहे. ©️®️
चितार ओळ जशी मूर्ती आणि कला यासाठी प्रसिद्ध आहे त्याचप्रकारे देशभरातील
संघ परिवारासाठी नागोबा गल्ली हे ठिकाण म्हणजे द्वितीय सरसंघचालक परमपूजनीय
श्रीगुरुजी माधव सदाशिवराव गोळवलकर यांचे निवासस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.
मुळात हे घर श्रीमंत बाबासाहेब घटाटे यांचे होते मात्र श्रीगुरुजी त्या
घरात राहात असल्याने देशभरात नागोबा गल्ली आणि श्रीगुरुजींचे घर हे समीकरण
कायम झाले आहे. आज हे जुने घर अस्तित्वात नसून संघाचे स्वयंसेवक असलेले
पुनियानी परिवार तिथे राहतात.विजया एकादशी १९ फेब्रुवारी १९०६ ला भाऊजी आणि
ताई (सदाशिवराव आणि सौ लक्ष्मीबाई ) यांच्या घरी श्रीगुरुजींचा जन्म झाला.
भाऊजी हे हाडाचे शिक्षक आणि ज्ञानमार्गी तर सौ ताई या मधुराद्वैत
संप्रदायाचार्य प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज यांचे परमशिष्य सद्गुरू
बाबाजी महाराज पंडीत यांच्या शिष्या होत्या. ©️®️चंद्रपुरात
गुरुजींचे प्राथमिक शिक्षण झाले आणि उच्च शिक्षणासाठी ते नागपुरात हिस्लॉप
कॉलेजमधे दाखल झाले. मात्र श्रीगुरुजींचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघात
प्रत्यक्ष प्रवेश झाला तो काशी हिंदू विद्यापीठात आणि तो ही प्रभाकर बळवंत
उपाख्य भय्याजी दाणी यांच्यामुळे. पुढे डॉक्टरजींनी श्रीगुरुजींना नागपूर
कार्यवाह आणि १३ ऑगस्ट १९३९ ला रक्षाबंधन उत्सवात सरकार्यवाह म्हणून
नियुक्त केले. संघ मुख्यालय डॉ हेडगेवार भवन ( संघ बिल्डिंग ) या इमारतीचे
बांधकाम होण्याआधी श्रीगुरुजींचे नागोबा गल्लीतील घर हेच संघाचे अधिकृत
कार्यालय आणि सरसंघचालकांचे निवासस्थान होते असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू
नये. अटलबिहारी वाजपेयी , लालकृष्ण अडवाणी , दीनदयाळ उपाध्याय यासह संघ
आणि समाजातील अन्य महनीय मंडळी नागोबा गल्लीत श्रीगुरुजींच्या या घरात येऊन
गेली आहेत. संघाच्या इतिहासातील कितीतरी चढउतार आणि संघर्ष नागोबा
गल्लीच्या या घराने बघितले असतील हे काळालाच ठाऊक.©️®️
पुढे संघ कार्यालय निर्माण झाल्यावर श्रीगुरुजी , डॉ हेडगेवार भवनातच
राहात मात्र दिवसातून एकदा ते सौ ताई आणि भाऊजींच्या दर्शनास इथे येत असत.
श्रीगुरुजी जेव्हा जेव्हा नागोबा गल्लीत येत तेव्हा, कट्टर काँग्रेसी
विचारांचे बाबुराव देशमुख पेंटर आपल्या घरातून खाली उतरून श्रीगुरुजींना
साष्टांग प्रणाम करीत असत. जगातील सर्वात मोठ्या संघटनेचे प्रमुख द्वितीय
सरसंघचालक परमपूजनीय श्रीगुरुजी नागोबा गल्लीत राहत असत या भावनेनेच इथल्या
मंडळींचा उर आजही दाटून येतो.
नागोबा गल्लीत पुढे ठेमदेव , टोळ, रुद्र ,अडकिने बंधू , हुद्दार, देशपांडे, ऍड कुकडे, ऍड बक्षी , वाघमारे यांचे वाडे दिसतील. काळाच्या ओघात काही वाडे अस्तित्वात आहेत तर काही नाहीत. प्रसिद्ध तुंबडी गायक नारायणराव निचकवडे , डेकोरेशन करणारे सुधाकरराव काळे ,बांगड्यांचा मोठा व्यवसाय असणारे आप्पाजी कासार हे देखील नागोबा गल्लीचे भूषण होते. नागोबा गल्लीतील प्रसिद्ध चोरघडे वाडा हा देखील विख्यात होता. जे जे स्कुल ऑफ आर्टमधून शिक्षण घेतलेले त्रिंबकराव उपाख्य बापूसाहेब चोरघडे इथे राहात. त्यांचे चिरंजीव श्रीपाद चोरघडे हे देखील प्रसिद्ध चित्रकार होते. दादासाहेब धनवटे नगर विद्यालयात शिक्षक असलेले चोरघडे मास्तर यांच्या घरी चलचित्रावर आधारित गणपती देखावा त्याकाळी सुप्रसिद्ध होता. ©️®️
मातीच्या मूर्त्यांना घडवून त्यात प्राण फुंकणारे चितार ओळीतील कलाकार ते अगणित युवकांच्या मनात राष्ट्रभक्तीचे स्फुलिंग चेतवून त्यांना राष्ट्रकार्य हाच प्राण हा संघमंत्र देणारे नागोबा गल्लीतील परमपूजनीय श्रीगुरुजी या सर्वाना मनोभावे प्रणाम करून आजची ही महालातील भ्रमंती इथे थांबवूया. ©️®️
✍️ डॉ भालचंद्र माधव हरदास
नागपूर /९६५७७२०२४२
#नागपूरचं #सांस्कृतिक #वैभव -#केळीबाग #रोड , #महाल
मित्र हो ... काल महालच्या दसरा मार्गावरून आपली भ्रमंती झाली. आज जाऊया
देवदर्शनाला आणि नागपूरच्या सांस्कृतिक वैभवाचा शोध घ्यायला. आज आपला
प्रवास ऐतिहासिक अश्या केळीबाग मार्गावरून होणार आहे. आज या मार्गावर
आपल्याला अनेक व्यक्ती आणि वास्तुंचे दर्शन करून देण्याचा प्रयत्न करतो.
चला तर मग सुरु करूया भ्रमंती. महाल राजवाड्याशेजारी भोसल्यांनी वसवलेली ,
देवालयांनी नटलेली व्यापारपेठ म्हणजे केळीबाग. अनेक सुंदर देवालय या
मार्गाच्या दोन्ही बाजूस आपणास दिसतील. आजच्या महाल चौकापासून बडकस
चौकापर्यंत असलेला रस्ता म्हणजेच केळीबाग मार्ग होय. श्रीमंत राजे रघुजी
महाराज भोसले (द्वितीय) अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते. त्यांनीच नागपूरात
९८ विविध देवालयांची निर्मिती केली. राजवाड्यात सतत यज्ञ-याग होत
असल्यामुळे पुजा आणि भोजन पंक्तीसाठी साधारणपणे केळीच्या पानांचा उपयोग
होत असे. दररोज शेकडो लोक राजवाड्यात भोजन करीत असत. त्यासाठीच मुद्दाम
केळीची बाग इथे वसविण्यात आली आणि या मार्गाला केळीबाग हे नाव पडले. मुळात
केळीबाग म्हटलं की आठवतो या रस्त्यालगत असलेला श्रीमंत राजे रघुजी महाराज
(द्वितीय) यांच्या धर्मपत्नी श्रीमंत महाराणी बाकाबाईसाहेब भोसले यांचा
राजवाडा ! पूर्वीचे निलसिटी आणि सध्याचे दादासाहेब धनवटे नगर विद्यालय आणि
सध्याचे नागपूर शहर कोतवाली पोलीस ठाणे हा संपूर्ण परिसर म्हणजेच श्रीमंत
महाराणी बाकाबाईसाहेब यांचा वाडा. इसवी सन १७५५ साली हा वाडा बांधण्यात
आला. बाकाबाईसाहेब यांची कारकीर्द ४० वर्षांची. त्यांचा जन्म २ मार्च १७८१
रोजी चांदुर तालुक्यातील शंकरपूर येथे झाला. वडिलांचे नाव विठुजी व आईचे
नाव राजकुवर तसेच माहेरचे आडनाव महाडिक होय. बाकाबाईंचा विवाह दुसऱ्या
रघुजी महाराजांसोबत १७९० साली झाला. दुसऱ्या रघुजीराजांनंतर आप्पासाहेब
उर्फ मुधोजी भोसले यांच्या गादीवर बसण्याच्या महत्त्वाकांक्षेच्या आड
बाकाबाईसाहेब भिंत म्हणून उभ्या होत्या. परंतु बाकाबाईसाहेबांना शह
देण्यासाठी आप्पासाहेब व त्यांच्या दरबाऱ्यांनी तैनाती फौज स्वीकारली व
नागपूर राज्य खालसा होण्याच्या पायरीवर नेऊन ठेवले. यावेळी श्रीमंत महाराणी
बाकाबाईसाहेबांनी तत्कालीन परिस्थितीशी मिळते-जुळते घेऊन राज्य वाचवले व
त्यांच्यामुळेच तिसरे रघुजीराजे इंग्रजांच्या मदतीने गादीवर येऊ शकले. राजा
अल्पवयीन असल्याने श्रीमंत महाराणी बाकाबाईसाहेबांना अंतर्गत कारभार
सांभाळण्याची मुभा मिळाली व त्यांनी उत्कृष्टपणे सांभाळला. इंग्रजांना साथ
देणारी आणि भोसल्याचे राज्य बुडविणारी खलस्त्री म्हणून महाराणी बाकाबाई
यांचे चित्र आजवर रंगविले गेले आहे. मात्र, स्वतःच्या जोरावर राज्य
चालविणारी ती कर्तृत्ववान स्त्री होती. अनेक राजघराण्यांची संस्थाने खालसा
झाल्यानंतर त्यांच्या वंशजांचे हाल झाले. मात्र, नागपूरकर भोसल्यांचे वंशज
आजही सुस्थितीत आहे, याचे श्रेय श्रीमंत बाकाबाईलाच द्यावे लागेल. काही लोक
मात्र इंग्रजांना शरण गेल्याने श्रीमंत बाकाबाईना विरोध म्हणून जनतेने
मारबत उत्सव सुरु केला असेही म्हणतात मात्र इतिहास संशोधक त्यास दुजोरा देत
नाहीत. एक मात्र खरे , की तह स्वीकारल्यांनंतर इंग्रजांनी श्रीमंत
बाकाबाईना वाड्याबाहेर काढले आणि नागपूर संस्थानच्या महाराणी अतिथी निवासात
( आजचे कोतवाली ) आणि नंतर केळीबाग मंदिरात राहू लागल्या. केळीबाग मंदिरात
त्या अखेरपर्यंत वास्तव्यास होत्या असे जुने जाणकार लोक सांगतात. केळीबाग
मंदीरातील बुढीचं खाटलं ही श्रीमंत महाराणी बाकाबाईंची अखेरची निशाणी होय.
श्रीमंत बाकाबाईच्या वाड्यातीलच एक भाग म्हटल्या जाणाऱ्या कोतवालीचे
बांधकामासाठी उदयपूर आणि जोधपूरहून दगड आणल्या गेल्या होता. श्रीमंत रघुजी
महाराज्यांचे न्यायालय इथे भरत असे, त्यासाठी कोतवाल पदनाम देऊन अधिकारी
नियुक्त केल्या गेला म्हणून यास कोतवाली म्हणायला प्रारंभ झाला. कोतवाल
पदनामाच्या मंडळींचे पुढे कोतवालीवाले असे उपनाम झाले. हेरिटेज वास्तु
असलेली कोतवाली १९३७ मध्ये शासनास हस्तांतरित करून इथे कायमस्वरूपी
कोतवाली पोलीस ठाणे प्रारंभ झाले.
केळीबागेतील हिरव्याकंच बागेत
भोसल्यांची प्राचीन आणि सुरेख देवालये आजही सुस्थितीत आहे. केळीबाग मंदिर,
रिद्धी सिध्दीसह विराजमान श्रीगणेश मंदीर , लक्ष्मीनारायण मन्दिर,
कालाग्नीरुद्र हनुमंत, श्रीकेळीबाग महादेव मंदिर, मुरलीधर मंदिर ही श्रीमंत
राजे रघुजी महाराज भोसलें यांच्या काळातील प्राचीन मंदिरे आहेत. श्रीमंत
रघुजी महाराजांचे गुरु आबाजी महाराज यांच्या पादुका देखील केळीबाग मंदीरात
आहेत. अजुनही श्रीरामनवमीला मोठ्या राजवाड्यातील श्रीराम पंचायतनाचे वहन
(मिरवणूक) करून केळीबागेत येण्याची परंपरा कायम आहे. याच केळीबाग
रस्त्यावर जुन्या पुस्तक बाजारातील कालभैरव मंदीर , तसेच बडकस चौकाकडे
श्रीमाळी ब्राह्मण ट्रस्टचे श्रीमहालक्ष्मी मंदिर , दिगंबर जैन समाजाचे
अजितनाथ जैन मंदिर आणि शिरपूरकर ( इंजिनियर ) यांचे श्रीराम मंदीर ही
देवस्थाने आहेत. केळीबाग रस्त्यावर अनेक चिंचोळ्या पोटगल्ल्या आहेत मात्र
या गल्लीबोळ वाटणाऱ्या भागात राष्ट्रीय स्तरावरची आभाळाएवढी माणसं राहात
होती हे ऐकून आपणास आश्चर्य वाटेल.
केळीबाग मार्गावरील एक
प्रसिद्ध गल्ली म्हणजेच पंचांग गल्ली ! गल्लीचे नाव पंचांग ? आहे की नाही
गंमत ? पण ही गंमत नसून त्यामागे फार मोठा इतिहास आहे. इथल्या एका गल्लीत
थोर गणितज्ञ, ज्योतिषाचार्य, नागपूर टिळक पंचांगकर्ते स्व गंगाधरपंत
रामकृष्ण देव उर्फ देवजी महाराज वास्तव्य करायचे. १९०१ साली जन्म आणि १८
सप्टेंबर १९७९ मध्ये देवजी निधन पावले. देवजी ,भारत महिला महाविद्यालयात
गणिताचे शिक्षक होते. सेवानिवृत्तीनंतर देवजी बुवा हे भीमजीभाई भट, ऍड
शंकरराव पाध्ये, यांचेसह भारत महीला शाळेच्या आणि बडकस चौकातील कायंदे
शाळेच्या व्यवस्थापन समितीत होते. देवजी प्रख्यात गणितज्ञ असल्याने त्या
काळात त्यांचे गणिताचे क्रमिक पुस्तक अभ्यासक्रमात होते. संघ संस्थापक आद्य
सरसंघचालक परमपूजनीय डॉ हेडगेवार हे देवजींचे मामा होते. त्यांचे
हस्ताक्षर मोत्याच्या दाण्यासारखे असे. ओगलेवाड्यातून प्रकशित होणाऱ्या
महाराष्ट्र आणि अजून एका वर्तमानपत्रात ते राशिभविष्य लिहायचे. राशिभविष्य ,
जन्मलग्नपत्रिका , सुतकमृतक वेळ काढून देणे यासाठी पंचक्रोशीत त्यांची
ख्याती असल्यानेच श्रीमंत भोसले महाराजांनी देवजींना राज्याचे धर्माधिकारी
म्हणून वर्षासन दिले होते. देवजींकडे पंचांग आणि पत्रिका यासाठी असंख्य लोक
येत असल्यानेच या गल्लीला पंचाग गल्ली हे नामाभिधान प्राप्त झाले. या
घराण्यातील देवजीबुवांचे पणतू आमचे स्नेही आणि सामाजिक कार्यकर्ते अनिलजी
देव हे नीटनेटकेपणा आणि वेळेची शिस्त सांभाळणे , जुने रेकॉर्ड जपून ठेवणे
आणि सर्वच सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घेणे या माध्यमातून
देवजींचा वारसा पुढे नेत आहेत हे मात्र नक्की.
याच पंचाग गल्लीत आणखी एक धर्माधिकारी घराणे आहे. जगदंब
देवस्थान म्हणून हे घराणे ग्रामजोशी नावाने प्रसिद्ध आहेत. हे घराणे मूळचे
आंध्रप्रदेश मधील देवलग्रामचे. १५८१ मध्ये गवळी राजांच्या म्हणण्यानुसार
हे नागपुरात स्थायिक झाले. या घराण्याचे कुलपुरुष सद्गुरू नारायणपंत
धुंडिराजशास्त्री ग्रामजोशी आणि सद्गुरू चिंतामणपंत धुंडिराजशात्री
ग्रामजोशी यांना गवळी राजे, गोंड राजे आणि पुढे नागपूर भोसले संस्थान
यांच्याकडून जोशीपणाच्या सनद प्राप्त आहेत. सद्गुरू नारायणपंत धुंडिराज
शास्त्री ग्रामजोशी यांना शृंगेरीच्या शारदापीठ शंकराचार्यपीठाकडून देवी
ललिताम्बिका विग्रह प्राप्त असून आजही ग्रामजोशी परिवार या देवतेचे
नित्यपूजन उपासना करतात. राजा आणि राज्याच्या समृद्धीसाठी देवीसमोर वर्ते
करणे म्हणजेच जपजाप्य करणे हे मुळात ग्रामजोशी लोकांचे कार्य असे.
फणीद्रपूर( नागपुर) संस्थानातील वेद विद्या संवर्धन आणि नव्या पिढीला वैदिक
ज्ञान ग्रहण करण्यासाठी विविध ठिकाणी पाठवून तिथे त्यांची व्यवस्था लावणे
हे महत्कार्य अनेक शतके ग्रामजोश्यांनी केले.
पंचांग गल्लीतील तिसरे आणि राजस व्यक्तिमत्व म्हणजे
राजाराम निळकंठ बढे अर्थातच कविवर्य राजा बढे! नावाप्रमाणं खरोखरच राजा
माणूस, राजस व्यक्तीमत्वाचे धनी. सामान्यांना कवि राजा बढे म्हणून
सुपरिचीत. नागपूरच्या केळीबाग भागात १ फेब्रुवारी १९१२ ला त्यांचा जन्म
झाला. आई गोदावरी यांची त्यांच्यावर फार माया पण लवकरच मातृ छत्र हरपलं आणि
व्यथित झालेल्या राजाभाऊंनी कवितांमध्ये स्वतःला गुंतवून घेतलं. उंच
शरीरयष्टी, भव्य कपाळ, केवडयासारखी अंगकांती, सरळ नाक, पाणीदार डोळे, सारचं
कसं प्रेक्षणीय. राहणीमान अत्यंत साधं. चेहऱ्यावर मृदू मुलायम हास्य अशी
त्यांच्या व्यक्तीमत्वाची काही वैशिष्ट्ये होती. प्रतिभासंपन्न कवि, लेखक,
उत्कृष्ठ नाटककार, संगीतकार, अभिनेते, चित्रपट निर्माते, चित्रकार आदी
गुणांनी परिपूर्ण होते. राजाभाऊ हिंदुत्वनिष्ठ आणि स्वा. सावरकरांचे अनन्य
भक्त होते. उल्लेखनीय बाब म्हणजे त्याकाळी रेडीयोवर प्रसिद्ध ठरलेल्या
‘‘श्रृतिका’’ आणि ‘संगितीका’ या प्रकाराचे जनक देखील राजा बढेच आहेत.एकुण
१४ चित्रपटांकरीता गीतं लिहिली. धाकटे बंधू बबनच्या सहकार्यानं स्वानंद
चित्र ही संस्था उभारून ‘‘रायगडाचा राजबंदी’’ या चित्रपटाची निर्मिती केली.
त्रैमासिक ‘‘महाराष्ट्र - साहित्य पत्रिका’’, ‘‘अभिरूची’’, ‘‘नांदी’’ या
पाक्षिकांचीही निर्मिती केली. कविवर्य राजा बढे यांच्या नावे एकंदर १८
काव्यसंग्रह, ४ नाटके, ९ संगितीका, ५ एकांकिका, १ कादंबरी, विविध प्रसिद्ध
साहित्यांचं अनेक भाषांच मराठी भावानुवाद, अनेक रसानुवाद आदी साहित्य आहे.
राजाभाऊ अस्सल वैदर्भीय पानाचे ( विड्याचे ) शौकीन , त्यांचे कळीदार कपूरी
पान हे गीत , त्यासह चांदणे शिंपीत जाशी आणि जय जय महाराष्ट्र माझा हे
महाराष्ट्र गीत लोकप्रिय आहे. नागपूर महानगरपालिकेने केळीबागेवरील या
सुपुत्राचा गौरव म्हणून सी पी अँड बेरार महाविद्यालयासमोरील तुळशीबाग टी
पॉईंटला कविवर्य राजा बढे यांचे नाव दिले. ग्रुप कॅप्टन श्रीराम बढे हे याच
घराण्यातील होत. पुढे केळीबाग रस्त्यावर दिसेल
ती कोठीवान गल्ली ! विदर्भातील आद्य नकलाकार दादा कोठीवान इथे राहात असत.
दादांच्या नकलांची टांगेवाला आणि इतर नकला (१९६९) ही पुस्तिका प्रसिद्ध
आहे. ‘एच्. एम्. व्ही. कंपनीने त्यांच्या काही नकलांच्या ध्वनिमुद्रिका
केल्या आहेत. याच घराण्यातील सुपुत्र मोहन कोठीवान हे तर प्रसिद्ध
सिनेनाट्य कलावंत. नेहमी काळा गॉगल घालणारे मोहन कोठीवान बहुतेक चित्रपटात
खलनायकाची भूमिका साकारत. नवरा माझा ब्रम्हचारी , चांडाळ चौकडी , ओवाळीते
भाऊराया, मुका घ्या मुका , माणुसकी, मला घेऊन चला, राम राम गंगाराम ही मोहन
कोठीवान यांनी भूमिका साकारलेल्या काही चित्रपटांची प्रातिनिधिक उदाहरणे
होत.
केळीबाग मागार्वरील अजून एक प्रसिद्ध गल्ली म्हणजेच पेटकर
गल्ली. या गल्लीनेही समाजाला आभाळाएवढी माणसं दिली. वीर बाबुराव हरकरे हे
संघ कार्यासाठी म्हणेल ते करणारा युवक याच पेटकर गल्लीतले व्यक्तिमत्व .
संघ संस्थापक डॉ हेडगेवार एका पत्रात लिहितात , बाबूराव हरकरे ने, जो सही
अर्थ में वीर पुरुष कहने योग्य हैं। चालीस फीट गहरे कुएं में कूदकर यह
परीक्षा दी है.
पेटकर गल्ली म्हटलं की आणखी एक नाव येतं नकलाकार
नाना रेटर ! सरकारी कागदपत्रे लिहीणारे रायटर म्हणून पुढे अपभ्रंश होऊन
रेटर हे उपनाम या घराण्याला चिकटले ते कायमचेच. राजकीय , सामाजिक
व्यक्तिमत्त्वांच्या नकला नानासाहेब इतक्या हुबेहूब करीत की, ती
व्यक्तिमत्व जणू रंगमंचावर प्रत्यक्ष उभी आहेत की काय असा भास होई. पेटकर
गल्लीतील सुप्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक आबा कावरे म्हणजे क्रिकेट विश्वातील
एक अजरामर नाव. न्यू इंग्लिश हायस्कुलमध्ये शिक्षक असलेले आबासाहेब यांनी
हजारो युवकांना क्रिकेटचे प्रशिक्षण दिले. जीवनातील ५० वर्षे तर कावरे
गुरुजी मैदानावरच होते असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. कावरे गुरुजी
स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट या नावाने आबांचे कार्य अजूनही राजू कावरे पुढे नेत
आहेत. पेटकर गल्लीत ज्यांचे मोठे घर होते ते रुईकर पथावर दवाखाना असलेले
डॉ बळवंतराव पांडे ( बी जी पांडे ) म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे
अधिकृत डॉक्टर ! डॉ बी जी पांडे धरमपेठेतील बंगल्यात राहात आणि रोज महालात
येत. दवाखाना झाला की संघ कार्यालयात जाणे हा नित्यक्रम कायम होता.
परमपूजनीय श्रीगोळवलकर गुरुजी आणि पूजनीय बाळासाहेब देवरस यांच्यासोबत
दररोज भेट घेत असत. डॉ पांडे हे धरमपेठ शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि
बाबासाहेब आपटे स्मारक समितीचे अध्यक्ष देखील राहिले आहेत . पूजनीय
श्रीगुरुजी सुरुवातीच्या काळात डॉ पांडे यांच्या मोटारीनेच प्रवास करीत.
वैद्य बाईंची नवप्रतिभा हायस्कुल , स्वातंत्र्यसंग्राम सैनिक मोतीलाल छल्लाणी, सुधीर फडके स्वतः आले आहेत असे मांडविया बंधूंचे सुप्रसिद्ध रमेश ग्रामोफोन हाऊस , मालगुजर शिरपूरकरांचा वाडा , चिंचमलातपुरे वाडा , सुलाखे वाडा , वाशिमकर वाडा, ज्यांच्याकडील लक्ष्मीनृसिंह नवरात्र प्रसिद्ध होते असा दीक्षितांचा वाडा , ज्योती मंगल कार्यालय , महाल मराठी शाळा , चतुर संगीत विद्यालय आणि त्याकाळी सुप्रसिद्ध अशोका कुल्फी ही देखील केळीबागेतील काही ठिकाणं. कालौघात काही आहेत काही नाहीत ! 😢
ज्येष्ठ संघ प्रचारक भाऊराव देवरस यांनी प्रारंभ केलेली संघाची मोहिते शाखेनंतरची जगातील बहुधा दुसरी शाखा याच केळीबाग मार्गावर बडकस चौकाकडे प्रारंभ केली म्हणून तिचे नाव आजतागायत चौक शाखा असेच आहे. नागपुरातील जगप्रसिद्ध श्रीरामनवमी शोभायात्रा आणि मारबत मिरवणूक केळीबाग मार्गावरून पाहणे यासारखा दुसरा आनंद नाही.☺️ २००६ पासून मातृशक्तीजागरणार्थ प्रारंभ केलेला सामूहिक श्रीरामरक्षा पठन कार्यक्रम हे देखील अलीकडच्या काळातील केळीबाग रस्त्याचे वैशिष्ट्य झाले आहे .
नुकताच केळीबाग मार्ग रुंदीकरणाचा जुना तिढा न्यायालयीन आदेशाने निकाली निघाला असुन आता केळीबाग रस्ता आणखी रुंद होऊन एक नवे रूप घेईल. मात्र देव, देश, धर्म, गणित, ज्योतिष, शिक्षण ,संगीत, नाट्य, वैदिक, चित्रपट , समाजकारण, राजकारण , कला , क्रीडा यासारख्या अनेकविध क्षेत्रात मोठमोठी माणसं देणारा हा मार्ग त्याअर्थाने आधीपासूनच कितीतरी मोठा आहे. आपल्यालाच त्या व्यक्ती, विचार आणि वास्तूंना न्याय देता आला नाही हे मात्र खरेच ! असो... नागपूरचं सांस्कृतिक वैभव असलेल्या ऐतिहासिक केळीबाग मार्गावरील समस्त पीठस्थ देवतांना मनोभावे वंदन करून आजची केळीबागेतील ही जरा लांबलेली भ्रमंती इथेच थांबवूया.
✍️ डॉ भालचंद्र माधव हरदास
नागपुर /९६५७७२०२४२
#नागपूरकर #भोसल्यांचा #राजपथ-#दसरा #रोड
मित्र हो ! आज आपली महाल भ्रमंती भोसल्यांच्या राजपथावर म्हणजेच दसरा
मार्गावर आली आहे. स्वतःच्या पराक्रमाने आणि लढवय्या बाण्याने ज्यांनी अटक
ते कटक असा नावलौकिक मिळविला ते नागपूरकर भोसले नृपती हे मूळचे
छत्रपतींच्या सातारा गादीशी नाते असलेले मराठा संस्थानिक आहे. नागपूरकर
भोसले संस्थानचे संस्थापक श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले ( प्रथम) हे
हिंदुभाग्यभूषण छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतणे होत. पुढे छत्रपती संभाजी
महाराजांंच्या मृत्यूनंतर रघुजी महाराज मध्यप्रांत आणि वऱ्हाडात दाखल झाले ,
त्यानंतर देवगड येथे बस्तान बसवून गोंड राणीच्या पत्रामुळे रघुजी भोसले
नागपुरात आले. गोंड संस्थानचा सत्तासंघर्ष मिटवल्याने गोंड राणीने , रघुजी
राजेंना भाऊ मानले आणि आपले अर्धे राज्य देऊन नागपुरातच राहण्याची विनंती
केली. "एक म्यान में दो तलवार नही रह सकती" , हे वचन खोटे ठरवत एकाच नगरात
दोन राजे ( गोंड आणि भोसले ) गुण्यागोविंदाने राहू शकतात हे नागपूरने
दाखवून दिले.
राज्यकारभारासाठी राजमहाल , वाडे ,कचेरी , देवस्थानं ,
विविध बागा, तलाव , हत्तीखाना , गाडीखाना , उंटखाना , नगारखाना इत्यादी
आवश्यकतेनुसार बांधण्यात आले. नागपूरच्या भोसलेकालीन वास्तु ,बांधकाम आणि
नामाभिधान यावर सातारा आणि पुण्याची छाप आहे .
विजयादशमी -दसरा हा
विजयाचा उत्सव आपल्या हिंदू संस्कृतीत आणि सर्वच राजघराण्यात पूर्वीपासून
पारंपारिक पद्धतीने साजरा करण्याची रीत आहे. विजयादशमीशी थेट नाते
सांगणाऱ्या अशा दसरा मार्गाने चला तर आजचा फेरफटका मारायला😊
नागपूरकर भोसल्यांची थोरली आणि धाकटी पाती ( सिनियर भोसला आणि ज्युनियर
भोसला ) असे दोन राजवाडे नागपुरातील महाल भागात आहेत. श्रीमंत राजे
लक्ष्मणराव महाराज यांच्या लहान राजवाड्याजवळून जाणारा मार्ग म्हणजेच दसरा
रोड. पूर्वी नागपूर शहर बस वाहतुकीचा राजवाडा या नावाने बस थांबा या लहान
राजवाड्याजवळच होता हे जुन्या जाणत्या लोकांनां माहिती असेलच.
दसरा
मार्गावर अगदी प्रारंभीच हुजूरपागा म्हणजे सेवेकऱ्यांसाठी (कामगार)
राहण्याचे ठिकाण होते. आजच्या भाषेत स्टाफ काँटर्स. या हुजुरपागेतच
राजवाड्यात काम करणारी मंडळी राहात असत. त्यामध्ये स्त्री, पुरुष, कामगार,
कोठीवान , भालदार, चौपदार, रखवालदार, पालखीचे भोई आपापल्या कुटूंबासह राहत
असत. सर्वांच्या राहण्याची व खाण्यापिण्याची व्यवस्था हुजुरपागेतच होती.
आजारी पडल्यास वैद्यराज देखील आठवडयाला येत असत. हुजूरपागेमध्ये
सद्यस्थितीत होंडा मॅस्कॉटचे शोरुम आहे.
दसरा मार्गावर शिर्के वाडा, मोहिते वाडा, दामले वाडा ,गुर्जलवार वाडा , पोफळी वाडा , देव वाडा चौगंजकरांचा वाडा आणि दत्त मंदिर, काँग्रेस नेते बाबा शेळके यांचा वाडा आजही विद्यमान आहेत.
दुसऱ्या रघुजी महाराजांच्या काळात दसरा रोडच्या
लागूनच बुरड आणि गोंधळी या समाजाची वस्ती इथे वसविण्यात आली. राजवाड्यातील
आणि शहरातील विविध सण,उत्सव प्रसंगी देवीचा गोंधळ करण्यात येत असे. आज
गोंधळीपुऱ्यातील परंपरेने चालत असलेली ही सेवा करणारे बोटावर मोजता येतील
एवढे शिल्लक आहेत.
विजयादशमीला सीमोल्लंघन करण्यासाठी श्रीमंत रघुजी
महाराज भोसले ज्या मार्गावरून जात तो हाच मार्ग होय म्हणूनच यांस दसरा
मार्ग हे नाव पडले. दसऱ्याच्या सायंकाळी मोठ्या राजवाड्यातून राजे मंडळी
आपल्या सरदार वतनदारांसह लवाजमा घेऊन सीमोल्लंघनी निघत. यावेळी
राजवाड्याबाहेरील खिडकीच्या मारोतीचे दर्शन राजेसाहेब घेत असत . एरवी
राजवाड्याच्या खिडकीतूनच श्रीमंत रघुजी महाराज या हनुमंताचे दर्शन
घ्यायचे, त्यामुळे या मारोतीस खिडकीचा मारोती हे नाव पडले. विजयादशमीची
मिरवणूक कल्याण दरवाजातून दसरा मार्गाने पुढे सरकत असे. पुढे ही दसरा
मिरवणूक भुत्या दरवाजातून आत जाई. यावेळी भुत्या दरवाजाच्या जवळ भुत्या
देवाच्या दारात बोकडाचा बळी दिल्या जात असे. श्रीमंत रघुजी महाराज हत्तीवर
अंबारीत संपूर्ण राजेशाही थाटात बसलेले असत , यावेळी भोसल्यांचे राम
पंचायतन आणि राजेशाही शस्त्रे पालखीतून नाग नदीवर नेली जाई. त्यावेळी
नागनदीचे पात्र स्वच्छ आणि निर्मळ असे होते. नागनदीवर शस्त्रांचे स्नान
घालून पूजा केली जात असे. हा भाग श्रीमंत रघुजींच्या राजवाड्याचा शेवट
म्हणून इथे सीमोल्लंघन होई. या शस्त्रपूजेनंतर पुन्हा पालखीत शस्त्रे ठवून
नव्या शुक्रवारी फवारा ( कारंजा चौक ) चौकामार्गे शुक्रवार दरवाज्यातून
पुन्हा राजवाड्यात मिरवणूक दाखल होत असे. शुक्रवार दरवाज्यात आतषबाजी आणि
श्रीमंत रघुजीराजे भोसले महाराजांकडून सोने लुटण्याचा कार्यक्रम होई.
श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले ( प्रथम ) यांच्यापासून श्रीमंत राजे
बहादूर रघुजी महाराज भोसले ( चतुर्थ ) यांच्यापर्यंत असाच मिरवणुकीचा थाट
कायम होता. कालौघात हत्तीवरील मिरवणुकीला बंदी आली. आता शस्त्रपूजादेखील
राजवाड्याच्या आंत संपन्न होते.
दसरा मार्गावर वर्षातून एकदा श्रीमंत
भोसले महाराज राजेशाही थाटात यायचे त्यामुळे या मार्गास राजपथ देखील
म्हणतात. नागपूरकर भोसले घराण्यातील सदस्य मृत झाल्यास त्यांचा अंतिमविधी
नाग नदीशेजारी असलेल्या श्रीमंत काशीबाई भोसले राजघाटावरच होतो तेव्हा
त्यांची अंतिमयात्रा पालखीतून याच दसरा मार्गाने जाते. त्या अर्थाने
आजवरच्या प्रत्येक राजाला अथवा राजपरिवारातील सदस्यांना या दसरा मार्गाने
अंतिम प्रणाम देतांना किती हुंदके दिले असतील हे काळालाच ठाऊक ! 😢
जीवनाचा आनंद (विजयादशमी) आणि अंतिम सत्य (मृत्यु) हे दोन्ही ज्या
मार्गावर नित्य भेटत असतात त्या राजवाड्यावरील राजपथ-दसरा मार्गाची भ्रमंती
आज इथे थांबवुया...!
✍️ डॉ भालचंद्र माधव हरदास
नागपुर/९६५७७२०२४२
#नागपूरकर #भोसल्यांचा #खजिना #कोठी #रोड #महाल
मित्र हो! गेले दोन दिवस आपण नागपूरच्या जुन्या शहराची म्हणजेच आपल्या
महालची भ्रमंती करतोय. चला तर मग आज आपण भ्रमन्ती करूया ऐतिहासिक कोठी
रोडवर !कोठी रोड ! नावावरूनच लक्षात आलं असेल की इथे कोठी घर अथवा
त्यासंबंधी काहीतरी असावं . थांबा..😊सांगतो
सांगतो. नागपुरातील भोसल्यांच्या राजवाड्याला संपूर्ण परकोट /अभेद्य
तटबंदी होती. आजही काही ठिकाणी ही तटबंदी अथवा दरवाजे आपल्याला ऐतिहासिक
पाऊलखुणा दर्शवतात. शुक्रवार दरवाजा, कल्याण दरवाजा , रुख्मिणी दरवाजा
,बुधवार दरवाजा, पत्थरफोड दरवाजा, आदितवार दरवाजा , भुत्या दरवाजा अशी
मोठमोठी प्रवेशद्वारं भोसल्यांच्या महालास होती. त्यापैकी आदितवार आणि
भुत्या दरवाजा सोडल्यास इतर दरवाजे आजही शाबूत आणि सुस्थितीत आहे. आपण आज
ज्या मार्गावर फेरफटका मारणार आहोत तिथे जायला आपल्याला महालातील छत्रपती
शिवाजी महाराज चौकाजवळील शुक्रवार दरवाज्यातून ( नव्या पिढीसाठी
गांधीगेटमधून😢 ) प्रवेश करावा लागेल. अंबारीसह
हत्ती जाईल एवढा महाकाय दरवाजा ११३ फूट उंची आणि ३२ फूट रुंदीचा आहे. हा
शुक्रवार दरवाजा इतिहासाच्या कटुगोड आठवणीं घेऊन शतकानुशतके मूकनायकासारखा
उभा आहे. डाव्या व उजव्या दोन्ही बाजूस वीर हनुमंताच्या प्रतिमा आणि
कमलपुष्पांकीत चक्र असलेले राजवाड्याचे हे महाद्वार पश्चिमाभिमुख आहे.
नागपूरकर भोसले आणि इंग्रज यांच्यात झालेल्या तुंबळ आणि घनघोर युद्धात
देखील ज्याला साधा धक्का लागला नाही असा हा ऐतिहासिक दरवाजा आहे. शुक्रवार
दरवाज्यातून आंत प्रवेश केल्यास उजवीकडे एक बोळ अथवा गल्ली दिसते हाच कोठी
रोडला जाण्याचा चिंचोळा प्रवेशमार्ग. इकडे वसंत पेंटिंग पासून तिकडे मातृ
सेवा संघ , महाल असा साधारण कोठी रोडचा विस्तार म्हणता येईल. कोठी रोड हे
नाव पडण्याचे कारण इथे इसवी सन १७६० मध्ये श्रीमंत राजे भोसले महाराज
यांनी बांधलेली कोठी आजही सुस्थितीत आहे. कोठी म्हणजे आजच्या भाषेत खजिना
साठवण्याची जागा अथवा कोषागार. भोसल्यांचे दागदागिने , सोने , चांदी ,
हिरे, मोती , उंची वस्त्रे या कोठी घरातच ठेवत असत. राजवाड्यात होणाऱ्या
पूजा अर्चा , राज्याभिषेक , लग्न, मुंज , युद्ध , प्रवास , सैनिकाचे मानधन,
भत्ते, पगार याच कोषागारातून केले जात. शुक्रवार दरवाज्याच्या दक्षिण
बाजूस आजही विद्यमान असलेल्या भोसल्यांच्या कोठी या वास्तूत पूर्वी धान्य
साठा, कापडचोपड, सैन्याला आणि राजवाड्याला लागणारी सगळी शिधा सामग्री
राहायची. कोठी घर असल्याने साहजिकच बैलबंड्या, घोडपाग जवळच होती.
ब्रिटिश आणि भोसले यांच्यातील युद्धात या कोठीघराला धक्का लावण्याचा
प्रयत्न झाला पण कोठीघराचे तसूभरही नुकसान झाले नाही. १९६४ मध्ये श्रीमंत
राजे जयसिंगराव महाराज भोंसले यांनी ही कोठी बाबासाहेब नाहातकर यांना
विकली आणि तेव्हापासून या कोठीचे राजेंद्र हायस्कुल या शाळेत रूपांतर झाले.
आजही कोठीघराच्या प्रवेशद्वारी दोन्ही बाजूस बाहेर मोठे आणि उंच असे दगडी
ओटे आहेत. या ओट्यांना हत्तीचे ओटे म्हणतात , इथे दोन्ही बाजूस हत्ती
बांधून ठेवत असत असे जुने जुनेजाणते लोकं सांगतात.
या कोठी घराजवळच
विलोभनीय विग्रह असलेले लक्ष्मीनारायण मंदिर आहे. मुख्य सभामंडप, अंतराळ
आणि गर्भगृह अशी त्रिस्तरीय रचना असलेले हे प्राचीन मंदिर असून
श्रीलक्ष्मीनारायण मूर्ती अत्यंत देखणी आणि विलोभनीय आहे. अत्यंत
आश्चर्यकारक बाब म्हणजे या लक्ष्मीनारायण मंदिरात समर्थ रामदास स्वामी
महाराज मुक्कामी येऊन गेल्याची नोंद असून त्यांच्या स्वहस्ते स्थापित
मारुती देखील आपणास दर्शनासाठी उभा आहे. बाराव्या शतकातील एक प्राचीन
प्रतिमा या मंदिरात असून संशोधनांती ती कीर्तीमुख मूर्ती आहे असे म्हणतात.
खरं सांगायचे झाल्यास कोठी रोड हा राजवाड्याच्या परकोटाच्या आतील
भोसल्यांचे सरदार , चिटणीस , अमीर उमराव अधिकारी यांच्या वसाहतीचा रहिवासी
भाग. या मार्गावर भोसल्यांच्या अंतर्गत वर्तुळातील लोकांचे वाडे होते.
त्यातील काही वाडे आजही आधुनिक साज चढवून अस्तित्वात आहेत.
कोठी
रोडवर आपणास श्रीमंत आप्पासाहेब महाराज भोसले यांचे सेनापती मनघट उपाध्ये
यांचा वाडा दिसेल. इंग्रज व नागपूरकर भोसले यांच्या युद्धात सेनापती मनघट
उपाध्ये यांनी शर्थ केली. याच मार्गावर भोसल्यांचे चिटणीस असलेले दिवाण
यांचाही वाडा आहे. डॉ हेडगेवार यांचे मित्र असलेले वकीलसाहेब नारायणराव
दिवाण यांचे चिरंजीव मनोहर दिवाण पुढे १९६० मध्ये अंजनगाव सुर्जीच्या
देवनाथ मठाचे मनोहरनाथ महाराज म्हणून पीठाधीश झाले ते याच कोठी रोडचे
रहिवासी होते. आजही रामदास दिवाण -कल्याण दिवाण ही मंडळी जुन्या दिवाण
वाड्यात राहतात. पुढे आपल्याला सरदार शिर्के यांचे वाडे दिसतील. काळाच्या
ओघात वा परिस्थितीवश आज काही मंडळीनी वाडे विकले किंवा इमारती बांधल्या
आहेत. कोठी रोडवर पूर्वी जुना सरकारी दवाखाना होता पुढे त्याचे भोसला
मराठीशाळेत रूपांतर झाले. आज सद्यस्थितीत या जागी भारतीय शिक्षण मंडळ
संचालीत नागपूर महानगर पालिकेचे अत्याधुनिक असे डॉ हेडगेवार ई वाचनालय आहे.
पोफळी वाडा , गोमकाळे वाडा , दामले वाडा आणि गोविंद दिनकर गोखले (
किराणावाले ) यांचा वाडा ही देखील कोठी रोडवरच दिसतील. सरदार नवलोजी गुजर
यांचा वाडा काळाघोडा नावाने प्रचलित होता. गुजरांचे आणि भोसल्यांचे अशी
दोन लक्ष्मीनारायण मंदीरे आपल्याला कोठी रोडवर पाहावयास मिळतील. सरदार
पालकर यांचा देखील वाडा कोठी रोडवर आहे. गुजरांच्या वाड्याच्या ठिकाणी आज
नवयुग विद्यालय महाल उभे आहे. भाऊजी दप्तरी इंग्रजी शाळा हे देखील नवे
उदयोन्मुख शैक्षिणक केंद्र आज कोठी रोडवर आहे.
Last but not the least म्हणतात त्याप्रमाणे हा सर्व इतिहास ज्यांनी आम्हाला संघाच्या शाखेत, कार्यक्रमात आणि जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे सांगण्याचा खटाटोप केला ते विदर्भभूषण आणि जिजामाता विद्वत गौरव पुरस्कारप्राप्त इतिहास संशोधक कै.श्रीपादजी चितळे हा चालत बोलता विश्वकोश याच कोठी रोडचे भूषण ! मागच्या वर्षीच श्रीपादजींचे अकस्मात निधन झाले 😢 आणि एकूणच या क्षेत्रातील पोकळी म्हणजे काय हे तेव्हा कळलं. मी तर अगदी शिशु स्वयंसेवक असल्यापासून श्रीपादजींना ऐकत /पाहात आलो. नागपूरच्या महालपासून तिकडे थेट सुएझ कालव्यापर्यंत जगातील कोणतेही स्थान श्रीपादजींना नकाशावर माहिती होते. इतिहासातील नोंदी. दिनांक, सन , वार हे तर मुखोद्गत आणि ते लक्षात कसे ठेवायचे याच्या टिप्स ते आम्हाला नेहमी देत. नागपूरकर भोसले आणि डॉ हेडगेवार हे दोन विषय श्रीपादजींचे वीक पॉईंट असायचे. श्रीपादजींच्या रूपाने कोठी रोडच्या खजिन्यातील हिरा काळाने फारच लवकर हिरावून नेला हे मात्र शल्य बोचत राहील. आजची कोठी रोडची सफर इथेच थांबवून उद्या पुन्हा भेटूया महालातील आणखी एका मार्गावर !
जय श्रीराम !
✍️ डॉ भालचंद्र माधव हरदास
नागपूर /९६५७७२०२४२
महाल! नागपूरच्या तीन अक्षरी जुन्या उपनगरावर जितकं बोलावं आणि जितकं
लिहावं तितकं कमीच आहे. आणि हो मुळात नागपूरचा महाल भाग म्हणजे बोलण्या-
लिहिण्यापेक्षा अनुभवण्याचा विषय आहे. एकदा महालात राहिलेला माणूस जगात
कुठेही नेऊन त्याला फेका , तो आजन्म महालची आठवण काढत राहील ही गॅरंटी!
महालातील वॉकर रोडचं वर्णन काल इथे केलं तेव्हा अनेकांना आपण महालात
प्रत्यक्ष फिरत असल्याचा भास झाला.अनेक जुने जाणते लोकं यांना आठवणींचा पूर
दाटून आला. कै बापूसाहेब महाशब्दे यांच्या नाशिक आणि अमेरिकेतील
कुटुंबियांनी आपला हृद्य भावना कळविल्या आणि लेखात उल्लेख केलेले स्व. डॉ
एस एस भागवत यांच्या पत्नी श्रीमती शकुन आज्जी भागवत यांनी पुण्याहून फोन
करून आम्ही जे काही आज आहोत ते वॉकर रोड मुळेच या शब्दांत भावना व्यक्त
केल्या. आठवणीचं गाव मुळात असंच असतं काहीसं... जे मनाचा ठाव घेत ,हृदयातील
भाव जागवतं... असो..
आज या महालातील आणखी एका रस्त्याने आपण जाऊ. आज
२७ मे विकासपुरुष नितीनजी गडकरी यांचा वाढदिवस. चला तर मग, नितीनजींची
जन्मभूमी आणि कर्मभूमी राहीलेल्या उपाध्ये रोडचा फेरफटका मारायला.
उपाध्ये मार्ग! गडकऱ्यांचा वडिलोपार्जित वाड्यामुळे जगप्रसिद्ध झालेला
मार्ग. जयराम रामचंद्र गडकरी आणि सौ भानुताई जयराम गडकरी या सुशील
दाम्पत्याच्या पोटी २७ में १९५७ रोजी पुत्ररत्न जन्मास आले-जे आज केंद्रीय
मंत्री, विकासपुरुष नितीन जयराम गडकरी म्हणून जगात प्रसिद्ध आहेत. जयरामजी
गडकरी मुळात हाडाचे शेतकरी. धापेवाड्याला शेती करायचे. आई सौ भानुताई या
समिती ,भजन मंडळ आदींमध्ये सक्रीय. भजन,कीर्तनात नितीनला सोबत नेत. उपाध्ये
रोड परिसरातील नवयुग शाळेत प्राथमिक आणि पुढे दादासाहेब धनवटे नगर
विद्यालयात नितीनचे शिक्षण झाले. नवयुग मधील बाबासाहेब नंदनपवार सर, डीडी
नगर मधील जामकर सर, किरण देशपांडे सर,हुद्दार मॅडम यांनी नितीजींमधील उपजत
गुणांना ओळखून प्रोत्साहन दिले. नवयुग व डी डी नगर मधील संस्कार
नितीनजींच्या आयुष्यात शिदोरी म्हणून कामी आले. कर्तृत्व, वक्तृत्व आणि
नेतृत्व याचा संगम नितीनजींच्या ठायी आला तो महालातील याच उपाध्ये
मार्गामुळे. या परिसरातील मातृ सेवा संघात नितीनजींचा जन्म झाला. भारतातील
पहिल्या हिंदू परिचारीका कमलाताई होस्पेट यांनी भानुताईचे बाळंतपण सुखरूप
केले. भानुताईकडे कमलाताई होस्पेट, नेने आजी, सुमतीताई सुकळीकर नेहमी येत
जात. महाल शाखा नंतर तुलशीबाग शाखेचे स्वयंसेवक असलेले नितीनजी अनेकदा संघ
बैठकी,कोजागिरी , गंगाजळी यात सहज आलेले मी स्वतः अनुभवले आहे. अर्थात
कार्यबाहुल्यांमुळे त्यांनाही सगळंच शक्य होत नाही परंतु दसऱ्याला मात्र
नितीनजी पूर्ण गणवेषात असतात.
गोविंद दिनकर गोखले हे प्रसिद्ध किराणा
दुकान, कल्याणेश्वर शिव मन्दिर, श्रीमंत भोसल्यांचा नगारखाना, मनोहरराव
ओकांचा वाडा, महाजनांची वखार आणि आठवडी बुधवार बाजार ही तर या परिसरातील
iconic ठिकाणं!
नितीनजींच्या कानावर समाजसेवा, राष्ट्र हे संस्कारांचे अमृतवचन अगदी लहानपणीच पडले . गडकरी वाड्यासमोरच जागृत असे गणेश मन्दिर कण्वाश्रम आहे. भानुताई लहानग्या नितीनला कण्वाश्रमात दर्शनाला ,कीर्तनाला घेऊन जात. अंजनगाव सुर्जीचे परमपूज्य मनोहरनाथ महाराज वार्षिकोत्सवाच्या निमित्ताने जेव्हा जेव्हा कण्वाश्रमात येत तेव्हा तेव्हा नितीनजी त्यांच्या दर्शनासाठी न चुकता येत असत. पूढे जीएस कॉमर्स कॉलेजमध्ये असताना नागपूर विद्यापीठ विद्यार्थी संघात नितीनजी सक्रिय झाले. पुढे भाजपचे विधानपरिषद सदस्य म्हणून सलग चार वेळा ते पदवीधर मधून निवडून गेले. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी केलेलं अफाट कार्य हे तर आपण अनुभवलेच आहेच पण आता सलग दोनवेळा नागपुर लोकसभा जिंकून केंद्रीय रस्ते विकास मंत्री म्हणून नितीनजींच्या कामाचा अनुभव संपूर्ण भारताला येत आहे.
स्व. एकनाथराव जोग, स्व. कृष्णराव भागडीकर, स्व. श्रीमंत राजे तेजसिंहराव महाराज भोसले यांचा वावर या परिसरातीलच. नितीनजींच्या जीवनावर या व्यक्तिमत्त्वांचा ही प्रभाव आहेच. युवा नितीनजींनी सर्व प्रकारचे व्यवसाय ( पक्क्या महाली भाषेत धंदे) केले. यश अपयश आले पण त्यांनी ते स्वीकारले. मी नोकरी करणारा नाही तर देणारा होईल असे म्हणणाऱ्या नितीनजींनी हे वचन अक्षरशः सत्यात उतरवले.
पुडाची वडी, पाटोडी, भजे, आलूबोंडे, नागपुरी भेळ यांचे चाहते आणि गल्ली गल्लीतील अस्सल पदार्थांची ठिकाणे माहिती असलेले नितीनजी म्हणजे अघळपघळ, रोखठोक माणूस. पुढे रामटेकच्या कांचन तोतडे यांच्याशी नितीनजी विवाहबद्ध झाले. आज सौ कांचन ताई, निखिल, सारंग, सौ केतकी ,सुना, जावई, नातवंडे आणि असंख्य चाहते असा बृहत परीवार नितीनजींचा आहे. नितीनजींच्या जुन्या वाड्यात देवीचे ठाणे होते (आज घर बदलल्याने ते तात्पुरते हलवले आहे). ही कुलदेवता अंबाबाईच गडकऱ्यांच्या वाड्यातील स्थित्यंतराची साक्षी आहे. नितीनजी नेहमी म्हणतात त्याप्रमाणे जगात ते कुठेही गेले तरी त्यांचे लक्ष मात्र महालातच असते.खरंय..
देशाचे कितीही मोठे महामार्ग नितीनजी बनवोत पण ज्या महालातील उपाध्ये मार्गाने देशाचा विकास करण्याची शक्ती आणि दिशा दिली त्या आपल्या जन्मभूमी आणि कर्मभूमी उपाध्ये मार्गाचं स्थान त्यांच्यासाठी नेहमीच अग्रस्थानी असेल. महालच्या उपाध्ये मार्गावरील आमच्या या महाली पठ्ठ्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
✍️ डॉ भालचंद्र माधव हरदास
नागपुर/9657720242
#महालातील #रुईकर #पथ(#वॉकर #रोड)
महाल! नागपुरातील प्राचीन आणि मध्यवर्ती वस्ती. वाडे, मंदीरं आणि
इतिहासातील पाउलखुणांना अंगाखांद्यावर खेळवत हा परिसर आजही दिमाखात उभा
आहे.जुने लोकं महालात जाताना अजूनही शहरात जातो असे म्हणतात ते यासाठीच.
अरुंद गल्लीबोळ आणि दाटीवाटीच्या महालातील सर्वात लांब आणि सलगपणे दिसणारा
एकमेव रस्ता किंवा मार्ग म्हणजे स्व. रामभाऊ रुईकर मार्ग. जुने जाणते लोकं
मात्र या रस्त्याचा ( walkar Street) वॉकर रोड असा हमखास उल्लेख करतात.
आमचे एक स्नेही दिवाकरराव पाठक काका गमतीने म्हणायचे अरे माझ्याच नांवे हा
मार्ग आहे दि-वाकर रोड!😊 असो.. सरकार दप्तरात
१९६६ मध्ये या मार्गावर कामगार केसरी रामभाऊ रुईकर यांचा पूर्णाकृती पुतळा
उभारला गेला तेव्हापासून मात्र हा अधिकृतपणे रुईकर मार्ग आहे.
रुईकर
पथ! इतिहासातील कितीतरी स्थित्यंतरे अनुभवलेला हा ऐतिहासिक मार्ग. साधारण
शुक्रवार तलावापासून सुरू होऊन बडकस चौकापर्यंत हा मार्ग आहे. बापूराव
महाशब्दे, काका पुराणिक आणि ऍड. शंकरराव पाध्ये या महान विभूतींचे वास्तव्य
याच मार्गावरचे. या मार्गावर भालदारपुऱ्याच्या बाजूने प्रख्यात डॉ
लक्ष्मणराव परांजपे हे राहात असत. जंगल सत्याग्रहाच्या काळात जेव्हा डॉ
हेडगेवार सत्याग्रह करण्यास निघाले तेव्हा डॉ हेडगेवार यांनी सरसंघचालक
पदाची सूत्रे डॉ लक्ष्मणराव परांजपे यांना दिली होती. डॉ. ल वा यांचे
सुपुत्र डॉ रामदास परांजपे.
याच मार्गावर ऐतिहासिक चिटणीस उद्यान (रा
पै समर्थ स्टेडियम चिटणीस पार्क) स्थित आहे. लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस
, स्वा सावरकर , डॉ हेडगेवार ,गुरुजी गोळवलकर या आणि अश्या महनीय
नेत्यांच्या गाजलेल्या ऐतिहासिक सभा याच मैदानावर झाल्या. स्वातंत्र्यपूर्व
काळातील भारत व्यायाम शाळा ही देखील वास्तू याच मैदानात आजही कायम आहे.
रुईकर पथावरील ज्या हेरीटेज वास्तूचा माझ्या जीवनात सर्वात जास्त प्रभाव
पडला ती म्हणजे माझी शाळा-न्यू इंग्लीश हायस्कुल. इयत्ता पाचवी ते
बारावीपर्यंत या शाळेने शिक्षणासह व्यक्तिमत्त्व विकास आणि समाजाभिमुख
होण्याचे संस्कार दिले त्यामुळेच आज कुठेतरी टिकून आहोत हे निर्विवाद. न्यू
इंग्लिश म्हणजे घर अंगण होतं. शाळेची घंटा घरी ऐकू यायची इतकं हे अंतर
होत!
रुईकर मार्गाने बडकस चौकाकडे गेल्यास दोन्ही बाजूने अनेक
पोटगल्ल्या/रस्ते आहेत. नाका गल्ली किंवा विद्या प्रकाशन गल्ली म्हणून ती
प्रसिद्ध आहे. नाका गल्लीत हिंदू महासभेचे नेते आणि स्वातंत्र्यवीर
सावरकरांचे सहकारी कमलाकर तांबेकर ( क मु तांबेकर ) यांचा वाडा आहे. कट्टर
हिंदुत्ववादी असलेले कमलाकर तांबेकर यांच्यामागे सतत गुप्तहेरांचा ससेमिरा
लागत असे. आज त्यांचे सुपुत्र पदमश्री दादा तांबेकर हिंदुत्वाचा वसा चालवत
आहेत.
याच्या उलट दिशेने दक्षिणामूर्ती चौकाकडे जाणारी वाट आहे.
महामहोपाध्याय साहित्याचार्य बाळशास्त्री हरदास यांची कीर्तने /व्याख्याने
या चौकाने ऐकली आहेत. संघ- जनसंघ आणि भाजपचे नेते स्व. छोटूभय्या धाक्रस
आणि स्व प्रभाकरराव दटके यांची ही निवासस्थानं याच परिसरातील.
वॉकर
रोडवरील जुने दुकान म्हणजे बेदरकरांचे किराणा भांडार. गांधीहत्येनंतर
स्वयंसेवकांच्या कुटूंबाची वाताहात झाली पण त्याही परिस्थितीत बेदरकरांनी
बेडर पणे हा व्यवसाय सुरू करून आज तिसऱ्या पिढीपर्यंत यशस्वीपणे तो नेला
आहे. द्वितीय सरसंघचालक पूजनीय श्रीगुरुजी यांच्या प्रेरणेने १९६९ साली
स्वयंसेवकांनी एकत्र येऊन मध्यमवर्गीय आणि दुर्बल घटकांना आर्थिक सहयोग
देण्याच्या उद्देशाने विवेकानंद नागरी सहकारी संस्था रुईकर पथावरील घाडगे
यांच्या वाड्यातील एका खोलीत प्रारंभ केली त्या बीजांकुराचे आज त्याच रुईकर
पथावर टोलेजंग इमारत, प्रशस्त सभागृह व अन्य ठिकाणी शाखा असे वटवृक्षात
रुपांतर झाले आहे.
संघसृष्टीच्या इतिहासातील पितामह असे ज्यांचे वर्णन
करता येईल ते तत्कालीन नागपुर प्रांत संघचालक स्व बापूरावजी वराडपांडे याच
रुईकर पथावरील रहिवासी होते. बापूरावांच्या अंत्ययात्रेत तत्कालीन
सरसंघचालक पूजनीय सुदर्शनजी पायीच निघाले..बापूरावजी को अंतिम बिदाई देने
मै तो महायात्रा में पैदल ही गंगाबाई घाट चलुंगा असे दस्तुरखुद्द
सुदर्शनजींनी म्हटलेले याच रुईकर पथाने ऐकले.
डॉ स्पृहा कपले, डॉ
आष्टीकर , प्रज्ञालोकचे डॉ ब स येरकुंटवार, डॉ ब ग पांडे, डॉ विश्वेश्वर
डांगे, डॉ गरीबे, डॉ एस एस भागवत , डॉ परांडे यांची पॅथॉलॉजी आणि धन्वंतरी
आयुर्वेदिक धर्मार्थ औषधालय ही प्रतिष्ठाने रुईकर मार्गाने अनुभवली. 80/90
च्या दशकात डॉ भागवत यांच्या दवाखान्यातील शिशीतले लाल औषध आणि इंजेक्शन
याचा लाभ बहुतेकांनी घेतला आहे.
पेटकर गल्लीत ज्यांचे मोठे घर होते ते रुईकर पथावर दवाखाना असलेले डॉ बळवंतराव पांडे ( बी जी पांडे ) म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिकृत डॉक्टर ! डॉ बी जी पांडे धरमपेठेतील बंगल्यात राहात आणि रोज महालात येत. दवाखाना झाला की संघ कार्यालयात जाणे हा नित्यक्रम कायम होता. परमपूजनीय श्रीगोळवलकर गुरुजी आणि पूजनीय बाळासाहेब देवरस यांच्यासोबत दररोज भेट घेत असत. डॉ पांडे हे धरमपेठ शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि बाबासाहेब आपटे स्मारक समितीचे अध्यक्ष देखील राहिले आहेत . पूजनीय श्रीगुरुजी सुरुवातीच्या काळात डॉ पांडे यांच्या मोटारीनेच प्रवास करीत.
डॉक्टर म्हटले की औषधी दुकान आलेच. तेव्हा वॉकर रोडवर एकमात्र औषध दुकान होते ते म्हणजे डांगे मेडिकल. बाबुराव डांगे ,दिलीप डांगे आणि स्वप्नील डांगे अश्या तीन पिढ्या हे दुकान चालले. बाबुराव डांगे यांच्या काळात आबाजी थत्ते, मामा मुठाळ आदी डांगेंच्या दुकानात येऊन बसायचे असे बाबुरावजी आम्हाला सांगत.
रुईकर पथावर आणखी पूढे गेल्यास मुकुंदराज गल्ली आणि त्यातील साधू यांचे गोपालकृष्ण मन्दिर आपणास दिसेल.सतत उत्सव, कीर्तन, भजन यांची रेलचेल असलेले हे मुकुंदराज महाराज ,कृष्णानंद महाराज यांच्या समाधी असलेले मनोहारी स्थळ आजही कुलपरंपरेप्रमाणे साधू कुटुंबिय व प्रा रवींद्र साधू यांच्या नेतृत्वात वारसा जपून आहे. याच साधू मंदिरासमोर ज्येष्ठ व्हायोलिन वादक विष्णुपंत कावळे काकांचे वाड्यातील वास्तव्य परिसराला स्वरमय करीत असे.
1990 मधील श्रीरामजन्मभूमी मुक्ती संग्रामातील श्रद्धेय लालकृष्ण अडवाणी यांची ऐतिहासिक रथयात्रा देखील रुईकर पथाने अनुभवली. 1973 मधे परमपूज्य श्रीगोळवलकर गुरुजी यांची अंतीम यात्रा न भूतो न भविष्यति ही पण या रुईकर मार्गाने अनुभवली आणि द्वितीय सरसंघचालकांच्या स्मृतीना नमन केले .1996 मध्ये तृतीय सरसंघचालक परमपूजनीय बाळासाहेब देवरस यांच्या अंतिम महायात्रेचा साक्षी रुईकर पथ राहीला आहे.😢
पुढे याच रस्त्यावर रिसालदार गल्ली आणि विरुद्ध बाजूस आबदेव गल्ली येते. कान्हे वाडा, नाग मुद्रणालय अश्या वास्तू आजही कायम आहेत.
पुढे, फुले वकिलांचा वाडा आणि आशा टायपिंग असलेली फुले गल्ली आणि विरुद्ध बाजूस पाताळेश्वर मार्ग आहेत. पाताळेश्वर मार्गावर मधुराद्वैत संप्रदायाचार्य प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज यांचे शिष्य समर्थ सद्गुरू बाबाजी महाराज पंडीत यांचा मठ आहे. पाताळेश्वर मार्गावरचं जोशी टेलर्स म्हणजे संघ गणवेषातील हाफ पँट शिवण्याचे त्याकाळातील हमखास ठिकाण होते. वासुदेवराव उपाख्य अण्णाजी देशपांडे यांचे देखील संघ गणवेष शिवण्याचे दुकान रुईकर पथावर होते असे जुने स्वयंसेवक सांगतात.
रुईकर पथावर शेवटच्या टोकाला बडकस चौकानजीक राम भांडार हे प्रसिध्द मिष्टान्न भांडार आहे. सण,उत्सव, साक्षगंध, विवाह,मुंज किंवा दहावी बारावीचा निकाल असला की राम भंडारचा केशरी पेढा हमखास महालातील घराघरात येणारच. आजकाल मसाला दूध, लस्सी आणि कुल्फी यामुळें तरुणाईचा माहोल राम भांडारवर लोटतो. राम भांडार मागेच कायंदे प्राथमिक शाळा आणि पुढे जिल्हा परिषद मुलींची शाळा होती.
याच मार्गावर विजय फोटो स्टुडिओ आणि अन्य फोटो स्टुडिओ देखील होते. शाळा कॉलेज ला लागणारे पासपोर्ट फ़ोटो काढायला जाणे हे किती अप्रुप होते त्याकाळी!😊
ऍड परशुरामपंत बढिये, ऍड मधुकरराव बढिये, बबनराव बढिये यांचा वाडा रुईकर रोडच्या अखेरच्या टोकाला राम भांडार जवळ आहे.
अनेक पिढ्यांच्या सुखदुःखाचा सोबती राहीलेल्या रुईकर पथाने अनेक संघर्ष, आणिबाणीचे प्रसंग अनुभवले असतील. इथल्या वाटा, गल्लीबोळ अरुंद होत्या /आहेत मात्र अडीअडचणी आल्या तर क्षणार्धात माणसे देवासारखी मोठ्या रुंदीने धावत यायची. कोण जाणे पण शांत असलेला रुईकर पथ आता अत्यंत गजबजलेला असतो. रस्ता ओलांडता ओलांडता नाकी नऊ येतात अशी परिस्थिती आहे. जुनी दुकाने बंद होऊन आता रुईकर पथ जवळजवळ क्लाथ मार्केट आणि मॉल यामध्ये रूपांतरित झाला आहे.
कालाय तस्मै नमः म्हणतात तेच खरे..परंतु रुईकर पथाशी भावनिक ऋणानुबंध असलेल्या प्रत्येकाला त्या काळात जाणे शक्य नसले तरी त्याकाळातील आठवणीत रमणे तरी सहज शक्य आहेच..नाही का??
✍️डॉ भालचंद्र माधव हरदास
नागपुर/9657720242




































































































No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.