मध्यप्रदेश
राज्यामधील हे दोन गाव दतिया आणि ओरछा. पण त्यासाठी तुम्हाला उत्तरप्रदेश
मधील झांसी रेल्वे स्थानक जवळ आहे. कारण झांसी ते दतिया हे अंतर ३० किमी
आहे. दतियासाठी काही मेल एक्सप्रेस आणि पॅसेंजर ट्रेन पण जातात पण खूपच
ठराविक आहेत आणि त्या वेळेत येतील कि नाही त्याचा भरवसा नाही. त्यापेक्षा
बसने गेलेलं बरं. इथे राज्य परिवहनचा बसेस नाहीत म्हणून खाजगी बसेस चालतात.
झाशी बस आगर मधून तुम्हाला दतिया साठी दर तासाला एक बस आहे. ह्याच बस
आगारचा बाहेरून ओरछाला जायला सुद्धा शेअर रिक्षा मिळतात. ओरछासाठी पण बस
आहेत, पण बस तुम्हाला ८ते १० किमी बाहेर फाट्यावर सोडतात. त्यामुळे ओरछाला
बहुतेक सगळेजण हे टमटम/वडाप रिक्षाने प्रवास करतात. झांसी ते ओरछा अंतर १९
किमी आहे.
दतिया
दतिया,
हे ओरछासारखे पर्यटकांमध्ये किती प्रसिद्ध आहे. हे माहित नाही, कारण इथे
आम्हाला स्थानिक पर्यटकच जास्त दिसले. झासीला हॉटेल मधील एका कर्मचारी ने
आम्हाला दतियाबद्दल सांगितले तसे आम्ही दतियाला जाऊन आलो.
दतियाला बघण्यासारखं बरच आहे पण मुख्य करून राजा वीर सिंग महाल (बीर सिंग
पॅलेस) आणि राजांचा छत्री बघण्यासारखी आहे. दोन्ही एकमेकांचा विरुद्ध
दिशेला आहे. इथे लोक वीर नाही तर बीर सिंग महाल म्हणतात
आम्ही दतिया बस आगारला पोहचल्यावर राजांचा छत्री बघायला गेलो. बस आगार
पासून छत्री चालत १० ते १५ मिनटं अंतरावर आहेत. दतियाचे राजे आणि
राजघराण्यातील इतर व्यक्तीच्या हि छोट्या समाधी आपल्याला दिसतात. ह्या
छत्री करण सागर तलावाच्या काठावर आहेत. काही छोट्या समाधी पाण्यात
अर्धंबुडलेल्या दिसतात. ह्या छत्रीच्या समूहात पाच छत्री मोठ्या आहेत.
त्यातील दरवाजाने आत आल्यावर उजवीकडील तीन छत्र्या मुख्य दिसतात. ते पुढील
प्रमाणे सांगतो.
मुख्य दरवाजाने आत आल्यावर उजवीकडे राजा भवानी सिंग, परीक्षित, विजय
बहादूर ह्यांच्या छत्री एका रेषेत लागून आहेत. ह्या तीन छत्रीच बांधकाम
सुंदर आहे. छत्रीच्या घुमटाच्या आतील छताच्या भागावर सुंदर चित्र काढली
आहेत. विशेष करून श्रीकृष्णची ती हि गोपिका बरोबर नृत्य करताना दिसतात.
त्यामुळे ह्या तीन छत्री मुख्य करून पाहण्यासारख्या आहेत.
तर डावीकडे राजा इंद्रजित आणि शुभराज ह्यांची समाधी आहेत. ह्यात इंद्रजित
ह्याची समाधी छोटी आहे. शुभराज ह्याची छत्री मोठी आहे पण हि समाधी बाकी
तीन समाधी सारखी नाही. आणि काही ठिकाणी पडायला आल्यासारखी वाटते.
छत्री बघून आम्ही पुन्हा बस आगार जवळ गेलो. बस आगारमधून वीर सिंग महालला
जाण्यासाठी किलाचौकला जाणारी शेअर टमटम रिक्षा/ वडाप आहेत. त्यासाठी
प्रत्येकी १० रुपये घेतात आणि हे अंतर अंदाजे २ किमी आहे. त्यांना बाजार
सांगितले कि ते आपल्याला त्या बाजारात सोडतात किंवा रिक्षावाल्याला बीर
सिंग महालला जायचा सांगा, मग तो आपल्याला बरोबर त्या बाजारात त्या वाटेवर
सोडतो.
तिथून ५ मिनटात तुम्ही महालाजवळ पोहचतात. ह्या वाटेवरच बाजार आहे. इथून
किल्ला चौक चालत ५ मिनिटावर आहे. किल्ला चौकात एक दरवाजा आहे, या दरवाजाचा
समोरच एका राजाचा पुतळा आहे. त्याकाळी हा दरवाजा किल्ल्यात येण्याचा एक
प्रवेशद्वार असावा. मला असे वाटते, बहुतेक गावात अजून हि एक-दोन दरवाजे
कुठे तरी असतील.
गुगल नकाशा बघितलं तर आपल्याला महालाच्या पाठीमागे तलावाच्या बाजूने तटबंदी
दिसते. ह्याचा वरून अंदाज येतो. पूर्ण महाल आणि गाव त्याकाळी तटबंदीच्या
आत असावी. आणि त्याला काही दरवाजे अजून असतील. पण कालांतराने आता गावाचा
वाढत्या अतिक्रमणाने तटबंदी नष्ट झाली असावी.
पण महालाचा वरती गेल्यावर पूर्ण दतिया गावाचं दृश्य दिसते. त्या वेळी
आपल्याला अजून छोटे मोठे वाडे / हवेली हि दिसतात. समोरच आपल्याला दूरवर
राजगड महाल दिसतो.
आम्ही जरा उशिरा म्हणजे सकाळी ११ पर्यंत दातियाला पोहचलो, त्यामुळे आम्हाला
जास्त फिरता आल नाही. पण छत्री आणि महाल बघण्यात जास्त वेळ गेला. त्यामुळे
आम्हाला अजून कुठे जास्त फिरता आले नाही. तलावात आणि त्याचा काठावर पण
झुडपात काही तरी मोडक्या वाड्यासारखे दिसते. त्यासाठी बहुतेक राजगड महालचा
इथून खाली गावात वाट जायत असावी. पण तेथे कोणी जात नसावे कारण तेथे झाडे
झुडपे खूप दिसत होती. ह्याच राजगड महालाच्या बाजूला खाली गावात एक प्राचीन
चीन मंदिर हि आहे. आम्ही वेळे अभावी तेथे गेलो नाही.
महाल
६/७ मजली आहे.बाहेरून आपल्याला ४ मजले दिसतात आणि चौथ्या मजल्यावर मध्य
भागी अजून ३ मजले आहेत. बाकी महालाच जास्त वर्णन करत नाही त्यासाठी मी फोटो
टाकले आहेत.
आम्ही महाल बघून राजगड महाल बघायला गेलो. आम्हाला बीर सिंग महालचा तिकिट
देणाऱ्याने सांगितले होते, तो राजगड महाल आता कायमचा बंद केला आहे. तो महाल
आता खाजगी मालमत्ता आहे आणि त्याचा उपयोग बहुतेक हॉटेल साठी करणार आहेत.
तरी पण आम्ही बघायला गेलो. किल्ला चौक मधून दतिया स्टेशनला जाणारी शेअर
रिक्षा पकडावी. आणि त्यांना पितांबरी माता मंदिर सांगावे. त्यासाठी
रिक्षावाले प्रत्येकी १० रुपये घेतात. पितांबरी देवीच्या मंदिरा समोरच
रस्त्या पलीकडे एका टेकाड वर महाल आहे.
श्री पितांबरी माता मंदिर हे तेथील प्रसिद्द तीर्थपीठ आहे. पण ते प्राचीन न
दिसल्यामुळे आणि सामान हि बाहेर जमा करायला लागत असल्यामुळे, आम्ही फक्त
महाल बघायला गेलो. राज महालाच्या सुरक्षा रक्षकाला सांगून महालाचे फक्त
दरवाजावरून फोटो काढून, आम्ही पुन्हा झांसीला जायायला निघालो. ह्या महाला
कडून वीर सिंग महालाच पूर्ण दृश्य सुंदर दिसते.
दातियाला
पूर्ण एक दिवस किंवा जास्तीत जास्त दीड दिवस काढून फिरलो, तर अजून बरेच
काही छोट्या मोठया हवेली, तटबंदी बघायला भेटतील. पण ह्यातील काही खाजगी
संपत्ती असावेत तर काही पडीक दिसतात. पण वेळे अभावी आम्ही फक्त मुख्य ठिकाण
बघून निघालो. आम्हाला झाशीला पोहचेपर्यंत ७ वाजले त्यामुळे बाकी जास्त
फिरता आले नाही.

 |
तीन मुख्य छत्रीच्या बाहेरील भिंतीवर असे चित्र आहेत
|
 |
वीर सिंग महाल ( राज महाल कडून काढलेला फोटो)
|
 |
| वीर सिंग महालचा मुख्य दरवाजा |

 |
महालाचा आतील छतावरील चित्र
|



 |
महालाच्या चौथ्या मजल्यावरून दिसणारे दतिया शहराचं दृश्य. दूरवर आपल्याला राजमहाल दिसत आहे
|
 |
महालाच्या बाजूला असलेल्या तलावाचं दृश आणि त्यामध्ये अवशेष आहेत.
|
 |
| हा वाडा, किल्ला चौकात आहे. आणि महालाचा बाजूला आहे. पण बहुतेक इथे आत जाण्यास परवानगी नाही. |
|
 |
राजमहाल
|
 |
राजमहालचा दरवाजा वरून काढलेला फोटो
|
 |
| | | | | | | | | | राजमहालचा इथून ह्या मंदिराजवळ जायला रस्ता आहे. | | | | |
|
झांसीचा किल्ला
तो
दिवस आमचा तिथेच संपला. दुसऱ्या दिवशी आम्हाला सचिन भेटणार होता.
त्याची ट्रेन सकाळी १० वाजेपर्यंत पोहचणार होती. तो पर्यत आमच्या कडे वेळ
होता. त्यामुळे आम्ही सकाळी लवकर उठून त्यावेळेत झाशी किल्ला पाहायचा
ठरवलं. आणि मग सचिन आल्यावर ओरछाला जाणार होतो.
आम्ही सकाळी ८ वाजता झाशी किल्ल्यात पोहचलो. किल्ला बहुतेक सकाळी ७/८ ला
उघडतो आणि संध्याकाळी ५/६ ला बंद होतो. हॉटेल पासून आम्हाला प्रत्येकी १०
रुपयात शेअर रिक्षा भेटली. किल्ला म्हणून सांगितलं कि, रिक्षा वाले तेथे
बरोबर सोडतात.
किल्ला एक छोट्या डोंगरावर आहे. किल्ल्याची तटबंदी सुंदर आहे. पुरातत्व
विभागाने व्ययस्थित निगराणी केली आहे. किल्ल्यात पूर्ण बघायला ३ तास पुरे
होतील. किल्यात मोजून काही ठिकाणे बघण्यासारखी आहेत. त्याची माहिती
किल्याचा दरवाजातून आत गेल्यावर, नकाशावर दिली आहे.
पंच महाल, कुदान कि जगह (राणीने घोड्यावरून उडी मारली ती जागा), बिजली
तोफ, फाशीची जागा, शंकराचं मंदिर (जिथे राणी नित्यनियमाने पूजा करत असे),
गणपती मंदिर आणि भवानी तोफ. किल्ल्याला एका बाजूला खंदक पण दिसतो. दरवाजावर
लावलेल्या नकाशामुळे किल्ला पिंजुन काढायला मदत होते. तरी आमचं
गणपती मंदिरचा तेथील थोडी बाजू वेळे अभावी राहून गेली.
झांसी मध्ये किल्ला व्यतिरिक्त अजून हि राणी महाल आणि झांसी संग्रहालय (म्युझियम) आहे. पण त्यासाठी पूर्ण एक दिवस पाहिजे.
ओरछा
झांसीचा किल्ला पाहून आम्ही ओरछा साठी निघालो. किल्ल्याचा खाली चौकात
येऊन आम्ही शेअर रिक्षाने बस स्थानकात पोहचलो. तिथे आम्हाला सचिन भेटला. बस
स्थानकातून ओरछाला जायला बस आहेत. पण ह्या बसेस, बहुतेक आत ओरछाला न
जाता बाहेर झांसी- मऊराणीपुर महामार्गावर फाट्याला सोडतात. तेथून
झांसी-टिकमगड मार्ग लागतो, हा रस्ता ओरछाला जातो. ह्या मार्गावर ओरछा ९
किमी वर आहे.
त्यामुळे बसने जाण्यापेक्षा बहुतेक लोक बस स्थानकाच्या बाहेर टमटम रिक्षा /
वडापने जातात. ती टमटम पूर्ण खचाखच भरत नाही तो पर्यंत जात
नाही. टमटम वाले प्रत्येकी १५ रुपये घेतात. टमटम ने पोहचायला आम्हाला १ तास
लागला .
ओरछा पर्यटकांमध्ये खूप
प्रसिद्ध आहे. येथील सुप्रसिद्ध चतुर्भुज मंदिर, महाल, लक्ष्मी मंदिर,
नदीकाठी असलेल्या छत्री आणि नदीच्या सेतूवरून दिसणारा सूर्यास्त. तसेच
अजून चतुर्भुज मंदिराच्या बाजूला राम मंदिर आहे. सावन भादो स्तंभ, त्याचा
बाजूलाच एक छोटा
दरबार आहे. ह्या दरबारच्या समोरच लागून एक मोठा कटोरा आहे. ह्याला चंदन
कटोरा किंवा जहारीला कटोरा ( हे गुगल वर नाव आहे) असे पण म्हणतात.
आम्हाला
ओरछाला पोहचेपर्यंत ११ वाजले. त्यामुळे आम्ही पोहचल्यावर सरळ जेवून घेतल , कारण नंतर पुन्हा जेवण्यात वेळ नको जायला.
चतुर्भूज मंदिर
त्यानंतर
आम्ही पहिल चतुर्भुज मंदिर
बघायला गेलो. मंदिर बघायला आत गेल्यावर कळलं कि पहिलं महाल बघायला पाहिजे,
कारण तेथे दोघांची तिकीट भेटते. ते तिकीट मंदिरात एक माणूस बघायला माघतो. खास करून मंदिराच्या
प्रत्येक मजल्यावर किंवा छतावर जायचा असेल तर तिकीट लागते. त्याशिवाय छतावर
सोडत नाही, आम्हाला हि सोडत नव्हता. त्याला आम्ही सांगितलं, आम्ही नंतर
तेथे गेल्यावर तिकीट काढतो. तरी पण तो
आम्हाला वर छतावर जायला सोडत नव्हता. मग त्याला आम्ही तिघांचे ३० रुपये
दिले, त्यानंतर त्यांनी आम्हाला तो दरवाजा उघडून दिला. पण त्यामुळे आम्हाला
पूर्ण मंदिराच्या कळसापर्यंत पोहचता आले.
मंदिर चार मजल्याच आहे. त्याचा
प्रत्येक मजल्यावर जाता येते. अगदी कळसाच्या टोकापर्यंत. प्रत्येक मजल्याला पूर्ण फिरता येते. आम्ही
सगळे मजले बघत बघत मंदिराच्या छतावर पोहचलो. मंदिराच्या मुख्य कळसापर्यंत जायला पण
आतून पायऱ्या होत्या पण त्या डागडुजी नसल्यामुळे जाण्यास योग्य
वाटत नव्हत्या.
मंदिर आणि देवाचं दर्शन घेऊन
आम्ही खाली आलो. बाजूलाच तेथे राम
मंदिर आहे, आम्हाला मंदिर बघायचं होत पण गर्दी असल्यामुळे आम्ही टाळलं.
त्या मंदिराचा बाजूलाच दोन टोलेजंग सावन भादो स्तंभ बघितले. त्याचा बाजूलाच
छोटा दरबार आहे, दरबाराचा समोर लागून चंदन कटोरा (प्याला) किंवा जहरीला
कटोरा आहे.
ते
पाहून आम्ही महाल बघायला गेलो. महाल मंदिराच्या समोरच नदीच्या पलिकडे आहे.
चालत पाच मिनटात आम्ही तेथे पोहचलो. इथे महाल आणि मंदिर
दोंघाची तिकीट भेटते
महाल
आम्ही महालात गेल्यावर ६०० रुपये देऊन गाईड
घेतला. एक मुलगा एकटाच महाल बघायला आला होता, तो ही आमच्या सोबत मिळाला. त्यामुळे आम्हाला
चौघात मिळून गाईड करता आला. त्या गाईड ने आम्हाला दोन्ही महाल,
लक्ष्मी मंदिर, आणि छत्री दाखविल्या पण विशेष करून त्यांनी महाल बद्दलची
चांगली माहिती सांगितली. बाकीच्या ठिकाणी त्यांनी काही जास्त माहिती
सांगितली नाही.
महाला बद्दल
बोलायचं तर पहिला पुढे बुंदेल राजाचं महाल आहे, आणि त्याला लागूनच बाजूला
जहागीर महाल आहे. ह्या महालाची गोष्ट अशी आहे, बुंदेल राजाने मुघलांच्या
राजा जहांगीर साठी भेट म्हणून हा महाल बांधला. त्यामुळे त्याला जहांगीर
महाल
म्हणतात. ह्या महालात जहांगीर फक्त एक दिवसच राहिला त्यानंतर तो महाल कधी
कोणीच वापरला
नाही. तो महाल बुंदेल राजाने मुगलांसाठीच ठेवला.
बुंदेल
राजाच्या महाल पेक्षा जहांगीर महाल बघायला सुंदर वाटतो. पण बुंदेल
राजाच्या महालात भिंतीवरती, आतील छतावर सुंदर चित्र काढलेली दिसतात. खास
करून राजा आणि राणीच्या खोलीत सुंदर चित्र आहेत.राजा राणीचा खोलीत श्रीराम
आणि सीतामाता, श्रीकृष्णा, गणपती, पौराणिक कथा तसेच अन्य चित्र हि
दिसतात. आणि बाकी महालाच्या छतावर फुलवेल्यांची नक्षी काढलेली दिसतात.
राजाचा खोलीतून इतर राणीच्या खोलीत जायला मुख्य दरवाजा व्यतिरिक्त दुसरा
छोटा दरवाजा पण आहे. गाईडने सांगितले राजा राणीच्या खोलीत जायला, हा
दरवाजा वापरत असे.
जहाँगीर महाल
बुंदेल
राजाचा महाल बघून आम्ही जहाँगीर महाल बघायला गेलो. ह्या महाल मध्ये मला
चित्र दिसली नाही. पण महालाचा बाहेरील भिंतींना मिनाकारी नक्षी आहे. पण
कालांतराने ती आता दिसत नाही. काही ठिकाणी त्याचा निळा रंग दिसतो. महालाला
बहुतेक एकच मुख्य दरवाजा आहे आणि तो पाठी मागे आहे. कारण बुंदेल राजाचा
महाल बघून, पाठी मागून ह्या महालात प्रवेश करायला लागतो. मुख्य दरवाजाचा
समोरून तटबंदी असल्यामुळे वाट दिसत नाही. बहुतेक त्याकाळी फिरून वाट असावी.
महालाचा मुख्य दरवाजा समोर उंटखाना आहे.
ह्या
महालाचा खाली सैनिकांसाठी खाली खोल्या होत्या. दरवाजाचा खाली आल्यावर त्या
दिसतात. त्याचा उपयोग बहुतेक सैनिकांना ठेवण्यासाठी, गुप्त सैनिक किंवा
लडाई साठी सज्य ठेवण्यासाठी पण होत असावा असे वाटते.
लक्ष्मी मंदिर
महाल
बघून आम्ही लक्ष्मी मंदिर बघायला गेलो. लक्ष्मी मंदिरासाठी टमटम रिक्षा
करून जायला लागते. त्यासाठी आम्ही येऊन जाऊन १५० रुपये दिले. लक्ष्मी
मंदिर खूप सुंदरआहे. मंदिर त्रिकोणी आकार मध्ये आहे. मंदिरातील लक्ष्मी
देवीची पंच धातूची ४/६ फुटाची मूर्ती इंग्रज घेऊन गेल्यामुळे, त्याजागी
छोटी मूर्ती ठेवून दिवाबत्ती करतात. मंदिराच्या आतील छतावर आणि भिंतीवर सुंदर अश्या
देवीदेवतांची चित्र आहे. तसेच मंदिराला प्रदक्षिणा घालून
मंदिराच्या बाहेर भिंतीवर वरती किनाऱ्यावर लाल पट्टी मध्ये लहान चित्र
आहेत. ती पाहून आम्ही छत्री बघायला गेलो.
छत्री समूह
इथे
बुंदेल
राजांच्या ७/८ छत्री आहेत. ज्याची छत्री जेवढी मोठी तेवढी
त्या राजाची किर्ती होती, असे आम्हाला गाईडने सांगितले. त्त्यानुसार एक
मुख्य आणि मोठी छत्री नदीच्या बाजूला लागूनच आहे. छत्रीच्या कळसावर
आपल्याला खूप सारे गरुड दिसतात. गाईडने सांगितल्या प्रमाणे तिथे जवळच
गरुडाच्या सरंक्षणासाठी प्रकल्प आहे. तेथे त्यांना खायला वगैरे देतात.
म्हणून इथे गरुड जास्त दिसतात.
छत्री नंदीच्या तीरावर असल्याने सुंदर दृष दिसते. पण आम्हाला सूर्यास्त ही
बघायचं होता. पण ढगाळ वातवरणामुळे आम्हाला सूर्यास्त दिसला नाही.
छत्री बघून आम्ही संध्याकाळी ७ वाजता पुन्हा झासी साठी निघालो. दुसऱ्या दिवशी आम्हाला खजुराओ आणि कलिंगरला जायचे होते
ओरछा फोटो
 |
चतुर्भुज मंदिर
|
 |
| चतुर्भुज मंदिर |
 |
चतुर्भुज मंदिरातील छतावरील नक्षी
|
 |
| चतुर्भुज मंदिर |
 |
| चतुर्भुज मंदिर |
 |
चतुर्भुज मंदिर
|
 |
| मंदिराचा छतावर जाण्यासाठी पायऱ्या, चतुर्भुज मंदिर |
 |
पायऱ्याने वर आल्यावर प्रत्येक मजल्यावर फिरायला अशी वाट आहे
|
 |
छतावर पोहचल्यावर
|
 |
कळस
|
 |
कळसाचा शेवटपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या दिसत होत्या. पण डागडुजी झाली नसल्यामुळे धोकादायक वाटत होत्या.
|
 |
राम मंदिर
|
 |
राम मंदिराचा बाजूला असलेला दरबार
|
 |
मंदिराच्या छतावरून काढलेला महालाचा फोटो
|
 |
दरबार
|
 |
बुंदेल राजाचा महाल आणि पाठी त्याला लागून असलेला जहाँगीर महाल
|
 |
बुंदेल राजाच्या महालातील चित्र
|
 |
हि बहुतेक राजा अथवा राणीची खोली होती
|
 |
महालाचा पहिल्या मजल्यावरील खोलीतील दृश्य
|
 |
जहाँगीर महालचा हा दरवाजा पाठी मागे आहे. पण हा बहुतेक मुख्य दरवाजा असावा
|
 |
जहांगिर महाल आतील फोटो
|
 |
जहाँगीर महालाचा वरचा मजल्यावरून काढलेला, बुंदेल राज्याचा महालाचा फोटो. त्याचा पाठी दूर चतुर्भुज मंदिर दिसत आहे.
|
 |
लक्ष्मी मंदिर
|
 |
| लक्ष्मी मंदिर |
 |
लक्ष्मी मंदिराचा मुख्य गाभारा
|
 |
मंदिराला बाहेर प्रदक्षिणा घालते वेळी, वरती किनाऱ्याला वेगवेगळी छोटी छोटी चित्र आहेत.
|
 |
राजाची छत्री समूह, मधली छत्री सगळ्यात मोठी आहे.
|
 |
नदीच्या काठावरून दिसणारे छत्रीचे सुंदर दृश्य
|
 |
छत्रीच्या छतावर आपल्याला खूप गरुड दिसतात
|
 |
| डावीकडून सचिन, सागर आणि मी |
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.