Wednesday, October 21, 2020

हैदराबाद

 

हैदराबाद : हैदराबाद ला ५०० वर्षांचा ईतिहास आहे. हैदराबाद मुहम्मद कुतुब शहा ह्याने १५ व्या शतकात मुसी नदिच्या किनारी वसविले. हैदराबाद चे दोन विभाग पडतात. जुने हैदराबाद व नवे हैदराबाद. जुन्या हैदराबाद मधे चारमिनार, गोलकोंडा किल्ला, सालारजंग म्युझियम अशी ठिकाणे येतात तर नविन हैदराबाद मध्ये हाय्-टेक सिटी, हुसेनसागर तलाव, बिर्ला मंदिर अशी ठिकाणे येतात.
हैदराबाद-सिकंदराबाद पुर्ण पहायचे म्हणजे कमीत-कमी ३ दिवस पाहिजेत.
पहिल्या दिवशी गोलकोंडा किल्ला, हुसेनसागर तलाव व बुध्दमूर्ति, हुसेनसागर तलावाजवळील लेसर शो, बिर्ला मंदिर असे पाहता येईल.
दुसर्‍या दिवशी चारमिनार व सालारजंग म्युझियम पाहता येईल. चारमिनारला लागुनच ईथला "प्रसिद्ध चूडी" बाजार आहे. हैदराबाद मोत्यांसाठीही प्रसिद्ध आहे.
तिसर्‍या दिवशी रामोजी फिल्म सिटी पाहता येईल.

चारमिनार
प्रचि १

-
-
-
हुसेनसागर तलावामधील बुद्धमुर्ती
प्रचि २

-
-
-
टँकबंड रोड
प्रचि ३

-
-
-
प्रचि ४

-
-
-

गोलकोंडा किल्ला :
सध्या अस्तित्वात असलेला गोलकोंडा किल्ला ईब्राहीम कुतुबशहा वली ह्याने १५ व्या शतकात बांधला. हा किल्ला ग्रॅनाईट च्या टेकडीवर बांधलेला आहे. ह्या किल्ल्याला १० किमी ची तटबंदी असुन ८७ बुरुज, ८ मुख्य दरवाजे, सभागृहे, मंदिर, मशिद, तबेले, पागा, असे आहेत.
प्रचि ५

-
-
-
प्रचि ६

-
-
-
गोलकोंड्याचा परिसर व हैदराबाद.
प्रचि ७

-
-
-
प्रचि ८

-
-
-
प्रचि ९

-
-
-
रामोजी फिल्म सिटी:
रामोजी फिल्म सिटी हैदराबाद पासुन ६० किमी वर आहे. हा जगातील सर्वात मोठा फिल्म स्टूडिओ आहे. रामोजी फिल्म सिटी २००० एकरांवर पसरली आहे. हा परिसर पहायला कमीत-कमी १ दिवस पाहिजे. रामोजी फिल्म सिटी दाखवायला हैदराबादवरुन विशेष बस सेवा आहे. ह्या फिल्म सिटीतील सर्वच देखावे पहाण्यासारखे आहेत. ईथे बागा, धबधबे, उपहारगृहे, हॉस्पिटल, विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, गाव अशा सर्व ठिकाणांचे देखावे आहेत. ईथे रोज संध्या़काळी नृत्ये, कॉमेडी, मिमीक्री, स्टंट्स असे विवीध खेळ होतात.
प्रचि १०

-
-
-
प्रचि ११

-
-
-
प्रचि १२

-
-
-
प्रचि १३

-
-
-
प्रचि १४

-
-
-
वेस्टर्न कंट्री सेट
प्रचि १५

-
-
-
प्रचि १६

-
-
-
प्रचि १७

-
-
-
प्रचि १८

-
-
-
प्रचि १९

-
-
-
प्रचि २०

-
-
-
प्रचि २१

-
-
-
प्रचि २२

-
-
-
प्रचि २३

-
-
-
प्रचि २४

-
-
-
भुलभुलैया.
प्रचि २५

-
-
-
प्रचि २६

-
-
-
प्रचि २७

-
-
-
प्रचि २८

-
-
-
प्रचि २९

-
-
-
प्रचि ३०

-
-
-
प्रचि ३१

-
-
-
प्रचि ३२

-
-
-
प्रचि ३३

-
-
-
प्रचि ३४

-
-
-
के बी आर पार्कः
हे एक भले मोठे उद्यान शहराच्या मधोमध वसले आहे. लोक ईथे रोज जॉगिंग, पक्षी-निरीक्षण यासाठी येतात. ह्या उद्यानात बरेच मोर आहेत.
प्रचि ३५

-
-
-
प्रचि ३६

-
-
-
श्रीशैलम : श्रीशैलम हैदराबादपासुन २३८ किमी वर आहे. ईथले शंकराचे मंदिर १२ ज्योतिर्लिंगापैकी एक मानले जाते. ईथे महाशिवरात्रीला व गुढीपाडव्याला मोठी यात्रा भरते.

प्रचि ३७

-
-
-
मंदिरातील एका खांबांवरील नक्षी.
प्रचि ३८

-
-
-
श्रीशैलमचे धरण.
प्रचि ३९

-
-
-
श्रीशैलमचा परिसर.
प्रचि ४०

 

 

 पुण्यात फ़िरणे नेहेमीच होते पण या वेळच्या India trip मधे ' हैदराबाद ' ने अक्षरश : वेड लावले ... Happy
जुन्या मुस्लीम culture पासून hi tech NRI crwod परयंत सर्वांना shopping ला प्रचंड scope .....!! Confluence of old and ultra modern life!....
सर्व प्रथम अर्थातच हैदराबादच्या Pearl आणि खड्याच्या दागिन्यांच्या मार्केट विषायी !
हैदराबाद आके अगर चार मिनार और वहांका अगर चुडी बझार नही देखा तो हैदराबाद क्या देखा ....
हैदराबाद चा चुडी बझार (किंवा लाल बझार) म्हणजे साक्षात अलिबाबाची गुहा च ..!!
आपल्या तुळशीबागे सारखीच एक गल्ली आणि दोन्ही बाजुला छोटी छोटी दुकानं !
रस्त्यावर fancy jewelry हातात घेउन फ़िरणारी आणि ते खपवण्या साठी क्षरश : हात धुवुन मागे लागणारी असंख्य पोर आणि अनेक फ़ेरीवाले !
एक पोर्‍या असाच भयानक irritate करत मागे लागला होता , तो भाव कमी करत होता तरी मी त्याच्याकडे लक्ष देत नव्हते , आणि तो तरीही आशेनी मागे येत होता , शेवटी त्याला कटवण्या साठी मी म्हंटलं ,' फ़ोकट मे देता है तो दे ' तर तो येडा , ठिक है म्हणून पुन्हा मागे लागला !
असो , पण या चुडी बझार गल्लीत शिरण्या आधी
,Please update your bargain skills and then enter!!
इथल्या दुकानदारांची marketing style मोठी अजीब आहे !
त्या गल्लीत शिरताच सगळे दुकानदार जोरा जोरात टाळ्या वजवून , शुक शुक करून किंवा आमच्या दुकानात या अशा लांबूनच खुणा करायला सुरवात करतात !
ते पाहून दोन मिनिटे अगदी गोंधळून जायला होतं ,( आपल्या तुळाशीबागेतले किंवा hongkong lane मधले दुकानदार पहा कसे एका जागी बसतात )
पण धीट पणानी इथल्या प्रत्येक दुकानात शिरून तिथे काय काय आहे आणि काय rate ला आहे हे पहाणे फ़ार गरजेचे आहे .
इथे जर bargain केले नाही तर लुटले गेलात अस समजा !
प्रत्येक दुकानात खड्याच्या बांगड्या हे main attraction!
शंभर रुपरां पासून तीन चार हजारा पर्यंतच्या निरनिराळ्या रंगाच्या खड्याच्या बांगड्या , bracelets चा इथे जबरदस्त stalk आहे .
dress किंवा साडीची वट्टेल ती shade घेउन जा , त्यावर matching बांदगड्या दुकानदार शोधून देइलच !
मी अगदे कांद्याच्या सालाच्या रंगाचे fancy diamonds मिळवण्यात पण यशस्वी झाले:-)
खद्याच्या बांगड्या मेटल आणि लाखेच्या असतात .
पांढर्‍या खड्यांच्या नाजुक बांगड्या अगदी real diamonds वाटतील अशा भरपूर variety मधे प्रत्येक दुकानात दिसतात .
त्यावर match होणारी इतर fancy jewelry पण चुडी बझार मधे सही आहे फ़क्त दुकानदार जी किंमत सांगेल त्याच्या निम्म्या किमती पेक्षा कमी पासून सुरवात करणे अतिशय जरुरी आहे .
चांगले deal मिळवण्यात यशस्वी झालात तर इतर शहरांपेक्षा बरीच variety असलेली आणि त्या मानाने स्वस्त खड्याची jewelry चुडी बझार मधे best मिळेल .
या चुडी बझार मधे Must visit असे एक designer lace चे दुकान आहे ,' ख़सत '!
या दुकानात अगदी छोट्या patch work lace पासून ते अतिशय सुंदर designer साड्या खास आपल्या choice ने तयार करून घ्याव्यात इतक्या सुंदर laces आहेत . त्या सहा वार ते सात वार च्या bundle मधेच येतात .
इथली एक झलक पाहिली की designer saris कश बनत असतील याचा अंदाज येतो !
साड्यांची lace आठशे ते हजार रुपयांपासून सुरु होतात .
या दुकानात मात्र अजिबात bargain ला scope नाही , त्या दुकानाच्या मालकाला बहुदा त्याच्या unique collection ची पूर्ण कल्पना असावी .
साडी शिवाय इतर असंख्य variety च्या lace आहेत , short kurtis, सलवार कमीझ अशा lace वापरून मस्त बनवून घेता येतात आणि एकदम unique दिसतात !
मी Raw silk वर ही lace लवून काही कुर्ते करून घेतले , भारतात आणि इथे US मधले लोक तर वेडेच होतात अशी designs पाहून .
सलवार कमीझ ला lace लावायची असेल तर शिफ़ाॅन सुरेख दिसते तर साड्यांसाठी इटालियन क्रेप ,nated fabric किंवा शिफ़ाॅन सही दिसते .
शिवाय या दुकानात छोट्या योक सारखे काही जर्दोझी patches मिळतात ते पण वापरून मस्त tops तयार करून घेता येतील .
शिवाय छोटे बुंदके type पॅच वापरून साड्यांची जरीबुट्टी करून घेतली तर फ़ार च सुंदर दिसते !
या छोट्या छोट्या बुंदक्यांची किंमत अगदी दहा रुपयां पासून सुरु होते .
काही coin type lace वापरून कुर्ता border किंवा capri border, decorative belts, pillow cover border, decorative bag belts सुध्द तयार केले तर सुरेख दिसतात .
इथे cut border च्या lace पण सही मिळतात .
साड्यांना तर सहीच दिसतात पण one shoulder dress ची neck border किंवा फ़क्त cut border lace वापरून spagetti type string sleves शिवल्या तरी जबरी दिसते Happy
चुडी बझार आणि चार मिनार च्या आजुबाजुला असलेल्या दुकानां मधे मोती पण बरेच स्वस्त आणि मस्त मिळतात .
single मोत्यांची एक एक लड सुध्दा सुटी विकत घेता येते .
एक पदरी माळा शंभर ते सव्वशे rs. पासून मिळतात तर design प्रमाणे इतर ही बरीच designs पहायल मिळतात .
चार मिनार च्या जवळ एक मिनार pearls म्हणून दुकान आहे , तो बर्‍या पैकी deals देतो .
मोत्यां मधे light violet, light pink आणि black peral पण सुरेख दिसतात .
चुडी बझार मधे केसांना आणि हातांना लावायची मेंदीही , अत्तर चांगले मिळते .
मेंदीचा ' कराची ' brand चांगला आहे .....
असो , तर आज झालं चुडी बझार पुरण इतर ठिकाणां विषायी नंतर Happy
पण पुन्हा एकदा Don't go if you can't bargain..

 तर अजुन थोडे हैदराबाद विषयी ..
चुडी बझार च्या visit नंतर त्या जितेंद्र जयाप्रदाच्या movies सारख्या जागो जागी मांडलेल्या बांगड्या स्वप्नात आल्या तर नवल नाही ! Happy
पण या मोती वाल्यांशिवाय मोती , stones साठी काही Classy showrooms पण आहेत .
मला त्यातली ' मंगतराय ' ची showroom आवडली , मस्त classy collection आहे त्याच्याकडे .
चुडी बझार पेक्षा जरा महाग आहे अर्थातच ,
पण तिथेही माझ्या हैदराबादी वहिनीने bargain करून price कमी केली .
नाही तर मी काही अशा hi-fi दुकानात धजले नसते price कमी करायला:-)
पण मोत्याची खरेदी फ़क्त gifts देण्या साठी केली , मला स्वत : ला fancy diamonds इतका मोत्याचा शौक नाही .
पण ज्यांना interest आहे त्यांच्या साठे भरपूर वाव आहे मोत्याच्या shopping ला .
पंजागुट्टा area मधे असणि सोमजीगुडा circle च्या आस पास बरेच मोतीवाले आहेत .
शिवाय real diamonds साठी याच area मधला त्रिभुवन्दास भिमजी famous आहे .
साड्यांसाठी :
खास classy-pure कांचीपूरम , पोचंपल्ली आणि इतर south च्या famous साड्यां साठी ' कलांजली '( पोलिस कंट्रोल रुम जवळचे )
इथे किमती अर्थातच दणकून असतात .
चांगल्या सिल्क च्या साड्यांच्या किमती सहा हजारा पासून सुरु होतात .
तसे साड्यांसाठी अमिर पेठ area मधली चंदना bothers, R.S. brothers, Cherma's पण खूप famous आहेत .
या साड्यांच्या दुकाना बाहेर corn chat सही मिळते:-)
पण party wear हवे असेल तर साड्यांसाठी कलांजली चे collection जास्त rich आहे .
कलांजली जवळच ' लेपाक्षी handicrafts' नावचं दुकान फ़ारच मस्त आहे .
खास भारतीय handicrafts च्या अनेक वस्तू सुरेख मिळतात,, इथे अमेरिकन लोकांना gift द्यायला छान आहेत .
पंजागुट्टा arrea मधे ' कलानिकेतन wedding mall' नुकताच निघाला आहे .
Mall दोन विभागत divide केलाय , एका बाजुला दूल्हा दुसर्‍या बाजुला दूल्हन shopping!
इथे complete wedding shopping करायला भरपूर scope आहे .
North Indian style brides साठी लेहेंगा , घागरा चोली ची designer saris ची जबरी दुकानं आहेत शिवाय costume jewelry, real gold, fancy shoes ची पण दुकानं या mall मधे आहेत .
मी तरी भारतात Wedding mall concept प्रथमच पाहिली हैदराबाद ला !
बेगमपेट आणि Abids area मधे असलेले ' मीना बाझार ' हे खास designer saris साठी famous!
इथे fabric पण इतकी सुरेख आहेत कि आपल्याला हव्या तशा साड्या या fabric मधून करून घ्याव्याशा वाततात .
शिवाय या दुकानात पण matching jewelry सही आहे . पण prices are high!
साडी आणि बुटिक साठी Abids area is very famous!
इथले Neeru's बुटिक सही आहे .
पंजागुट्टा चौकात shoes ची पण बरीच दुकानं आहेत,.
त्यात Loft हा shoes mall जबरी आहे .
Loft- india's largest shoe mall अशी ad करतात , माहित नाही इतर शहरां मधे या पेक्षा मोठी show room असेल तर पण loft ची तीन मजली show room मस्त आहे .
इथे 3 rd floor वर pedicure spa पण आहे:-)
सगळ्या प्रकारचे ladies-Gents shoes इथे मिळतात ,ladies party wear shoes सही आहेत इथले

श्रीशैलम एका दिवसात कारने होत पण खूप दमायला होत. नागार्जुन सागर म्युझिअम नाही करता येत.
APSRTC ची तीन दिवसाची ट्रिप आहे, त्यात हे सर्व कव्हर होत आहे. बस भाड + हॉटेल स्टे + क्रुजवर जेवण + रोपवे include आहे. हैदराबादवरून अंदाजे प्रत्येकी ३००० ते ३५०० खर्च आहे.

रामोजी फिल्म सिटी कोणत्याही ट्रॅव्हल एजंटतर्फे नका करु. स्वतः कारने किंवा लोकल बसने जा. कोटी आणि सिंकदराबाद बस डेपोमधून डायरेक्ट बसेस आहेत.
सकाळी ९.०० वाजता उघडते पण ट्रॅव्हल एजंट १०.३० पर्यंत नेतात आणि ४ ला तिकडून बाहेर काढतात. त्यामूळे जास्त फिरता येत नाही.

चिलकूर बालाजी मंदिर, शिल्पारामम वेळ असेल तर नक्की जा.

 http://sudhacars.com/ >> हो मस्त आहे हे कार म्युझियम:) नेहरु झुलॉजीकल पार्क पासुन ५-१० मि. च्या अंतरावर आहे फक्त नि बघण्यास १-२ तास पुरेसे आहेत.

 

चटनीज मधला एम एल ए पसार अट्टू , बंबई इडली आणि स्टीम डोसा एक नंबर ..
पॅरेडाइज मधली बिर्याणी..
ओहरीज चे आइस क्रीम ..
व्हाईट हाउस शेजारी असलेल्या हवेली मधील बटर चिकन आणि जिरा राईस..
चारमिनारच्या मागच्या साईड्ला असलेले पिस्ता हाऊस मधले मट्ण , पत्थर का गोश्त..आणि खुबानी का मिठा ..
कराची बेकरीची बिस्कीट ...गोकुळ चाट, ईट स्ट्रीटला मिळणार्या फ्रँकीज...आणि इराणी चहा ..

बावर्ची ला पण बिर्याणी जेवण चांगला मिळता ( पण बरेच डुप्लीकेट बावर्ची आहेत ..सो फेमस कोणता ते विचारून पहा )

आणि चिकन चेट्टीनाड / वेज चेट्टीनाड , मिक्स भाज्यांचे लोणचे हे ही पदार्थ खास आहेत..
बिर्ला सायन्स म्युजीयम मधे डायनॉसोर चा सांगाडा आहे ..बघायला मजा येते !

लहान मुले असतील तर प्रसाद मधे ४ डी चित्रपट , आय मॅक्स चा अनुभव घेता येइल ..

सालारजंग म्युझिअमला अकरा वाजता आत जाऊन 'घडयाळा' समोरची जागा पकडून बसल्यास बाराचे ठोके पडतांना पाहाता येईल .नंतर इतर दालने पाहावीत त्यात २६चे महत्वाचे .यात हिरे माणिकांच्या वस्तु आहेत .चायनिज रेशिमकामाचे दालन आणि तो झिरझिरित वस्त्र असलेला पुतळा पाहा.

मी तिथे असते तर तुम्हास होस्ट केले असते. कलांजली जवळच एपी टुरीझमचे ऑफिस आहे.
तिथे सर्व पत्रके व अरेंजमेंटस अस्तात. हैद्राबाद पुणे एसी बस तिकेट एपी टुरिझम चे ५७५ च्या आसपास होते १ वरशा पूर्वी.

गोलकोंडा, लाइट शो असतो संध्याकाळी, सालारजंग शुक्रवारी बंद असते. रामोजीची माहिती बरोबर आहे . खूप चालायची तयारी ठेवा.

बिर्ला मंदिर एका टेकडीवर आहे व समोर हुसेन सागर आहे. हे संध्याकाळी बघा. फार सुरेख दिसते.

चारमिनार जामा मसजिद एकातच करता येइल. तिथे टॅक्सी घेउन जा. चूडी बाजारात फार बार्गेनिन्ग करावे लागते. टिपिकल खड्याच्या बांगड्या व दागिने मिळतात.

बहार अ‍ॅबिडस किंवा पॅराडाइज बिर्यानी जरूर खा. चिकन ६५ खा. मिठाई मध्ये पुल्ला रेडी शुद्ध तुपातील मिठाई घ्या. मलाई सँडविच मस्त आहे. श्रिशैलम एका दिवसात होत नाही हे ही बरोबर आहे.

मोत्याचे दागिने जगदंबा पर्ल्स सिकंदराबाद येथून घेता येतील. त्यांची साइट पण आहे. लुंबिनी पार्क व बुद्ध्हाचा पुतळा आहे तिथे बोटिंग करता येते व एका बाजूस इट स्ट्रीट आहे बारक्याला मजा येइल.

वहिनिंना पोचमपल्ली सिल्क साडी नैतर गदवाल नक्की घ्या पाडव्याची.

हाय टेक सिटी भागात शिल्पारामम आहे तिथे जाता येइल. लवकर काहीही उघडत नाही. पण दुपारी बंद पण होत नाही. इडली डोसे सर्वत्र मिळतात. मीठा पान घ्या. 

पुणेला राहता तर एक वेळचा प्रवास शताबदी एक्सप्रेसने करा. पुण्यावरून सकाळि ६ला सुटते आणि दुपारी ३ ला ईकडे पोचते आणि परत जाताना दुपारी २.३० ला सुटते आणि रात्री ११ ला पुण्यात. जेवण, ब्रे.फा. (व्हेज / नॉन व्हेज ) include आहे.

बाकीच्या ट्रेनने तुम्ही कमी खर्चात प्रवास कराल.

Maharastra Mandal मध्ये रहायची सोय होईल.
4-1-8, Opp Sariji Naidu Hall, Tilak Road, Ramkote X Raods Chowrasta, Ramkote, Hyderabad - 500001
Mr Gowri Shankar Panditkar(president),Mr Mahesh(Manager. 91)-(40)-24754029, 24758983, 65534051

सर्व ठिकाण तुम्ही लोकल बसने फिरू शकता.

अ‍ॅबिडस वर ताजमहाल होटेल आहे तसेच पंचरत्न म्हणून काचिगुडा येत्थे ही आहे ति थे मराठी प्रवासी नेहमी उतरतात. शताब्दी ची माहीती चां गली मिळाली. नाहीतर बाँबे एक्स्प्रेस आहे ७०३१ डाउन. साडेपाचला पुण्याहून निघते व सकाळी ६.२० बेगम्पेठ. रात्री ८.४० है द्राबाद हून निघते व सकाळी ९.३० पुणे.

आपलाच देश पाहायला गाईड कशाला ?त्यांच्या बसेस छान असतात .कंडक्टर आणि प्रवासी फार मदत करतात .त्यानेच फिरावे .तिकडे कार ठरवल्यास मात्र कमिशनच्याच जागी नेण्याचा लुबाडण्याचा नैशनल उदयोग अनुभवायला मिळतो . हैद्राबादला ( नायमपल्ली स्टेशन) उतरल्यावर 'कोटि ' भागात जाणे (तिकडचे 'दादर') चांगले हॉटेल मिळेल .अगोदर बुकिंगची गरज नाही .तीन दिवस पुरेसे आहेत(श्रीशैलम सोडून) .लहान मुलांना सालारजंगला नेऊ नका त्याऐवजी झू ,हुसेनसागरला अधिकवेळ द्या .

वेळ असल्यास सकाळी झू मुलांसोबत. बरोबर खाणे घेऊण जावे. आत कार व कॅमेरा नेता येतो. मुलांच्या कलाने फिरून तिथे आराम गवतात प हुडून लंच करावे. एक बोटींग पण करता येते. व मग रूम वर येऊन

संध्याकाळी गोलकोंड्याच शो बघता येइल.

मिरची बजी, मैसूर भज्जी हे पदा र्थ टिफिनचा वेळ दुपारी ४ - ७ मध्ये मिळ तात. एकेक दा खाउन बघा.

सर्वात महत्त्वाचे. ते लंगणा सीमांध्रा परिस्थिती काय आहे ते खात्री करून मगच जा नाहीतर आंदोलन, बंद सुरू झाले की अडकायला होईल.

बि रला सायन्स म्युझीअम व तारांगन पण छान आहे. मंदिरा शेजारीच आहे. तो एक प्लॅन करता येइल.

 राजेंद्र, Maharastra Mandal मध्ये अगोदर फोन करून राहयची व्यवस्था करा. खूप कमी दरात राहयची सोय होईल. तिथून कोटी बस डेपो जवळ आहे.

एक दिवशी सालारजंग म्युझियम आणि चारमिनारला जा. कोटीवरून रि़क्षाने सालारजंग म्युझियमला ३० -४० रु. लागतील. सकाळी १० ला म्युझियमला जा आणि सर्व म्युझियम फिरून ११ -११.३० पर्यंत तळमजल्यावर घड्याळाच्या बरोबर समोरच्या खुर्चीत पहिल्या रांगेत जाऊन बसा. १२ वाजताचा घड्याळाचा शो बघून नंतर चारमिनारला निघा. बाहेर रिक्षा असतील पण ते खूपच रेट सांगतात. जवळच अफजलगंज बस डेपो आहे तिथून डायरेक्ट चारमिनारसाठी बस मिळेल आणि तिथून शेअर ऑटोपण पुष्कळ मिळतील. ५ ते ७ रु शेअर ऑटोने चारमिनारला पोहचाल. चारमिनार सं. ५ पर्यंतच उघड असत. चारमिनारला लागूनच लक्ष्मी मंदिर आहे ते जरुर बघा खूप जून मंदिर आहे. त्यानंतर बाजूलाच असलेल्या लाड बाजार, गुलझार हाऊस (मोत्यांसाठी) , पटेल मार्केटमध्ये फिरा. पटेल मार्केटच्या मेन गेटच्या कमानी खाली एक चाटवाले काका आहेत. खूप गर्दी असते त्यांच्याकडे पाणीपुरीसाठी.

एक दिवस सकाळिच गोलकोंडा फोर्ट ( सोमवारी बंद असत) ला जा. आणि तिथून बिर्ला मंदिर ( दु. १२ ते २ बंद असत), Birla Science Museum, NTR garden, Lumbini Park ( सोमवारी बंद असत). NTR garden किंवा Lumbini Park च्या गेटवर प्रत्येकी १०० रु. च तिकीट मिळत त्यात लेझर शो, बोटींग आणि एन्ट्री फि include आहे. NTR garden दुपारी २.३० ला उघडत आणि Lumbini Park सकाळी ९ ला उघडत.
पहिल NTR garden ला जा नंतर ५ वाजेपर्यंत Lumbini Park ला जा तिथे प्रथम बोटींग आणि लेझर शो बघा मग टॉय ट्रेनमध्ये बसून Park बघा. आणि मग राईडस खेळा.

रामोजी फिल्मसाठी सकाळि ६.३० पर्यंत कोटी बस डेपोला पोहचण्याचा प्रयत्न करा. कोटीपासून दोन ते अडिच तास लागतात तिथे पोहचायला. ९ च्या आधी रामोजी फिल्मला पोहचा. आणि पूर्ण दिवस मजा करा.

श्रीशैलम, नागार्जून सागर ही टूर APTDC बरोबर करावी. प्रत्येक सोमवारी आणि गुरुवारी ही टूर असते.
ऑनलाईन बुकिंग करू शकता. www. aptdc.in, फोन नं. ०४०- २३२६२१५१ / २३२६२१५२

 सालारजंग म्युझियम शुक्रवारी बंद असते.
प्रवासी कंपन्या नऊ हजार प्रत्येकी सांगतील तर तुम्हाला तिघांचा खर्च अकरा हजाराच्या आत येईल .शक्यतो आणखी एक नातेवाईकाला बरोबर नेऊ नका चर्चा आणि काथ्याकूट होत राहातो .कोणत्याही ठिकाणी सकाळी अकरापर्यंत पोहोचणारी रेल्वेने गेल्यास (आणि कुटुंब असल्यास) हॉटेलची खोली घेण्यास अडचण पडत नाही ,रेट कमी करता येतो .अर्धा दिवसाचे स्थळदर्शनही होते .संध्याकाळी मात्र हॉटेलवाले अडून बसतात नी वाटेल ते दर सांगतात हा अनुभव आहे .परतताना मात्र संधयाकाळनंतरची रेल्वे असल्यास त्या दिवशीचे रुम भाडे (चेक आउट टाईम बघा)वाया जाते .शुभयात्रा !

चारमिनार भागात चांदीचा वर्खही [गोड पदार्थावर लावायचा] मिळतो मात्र विश्वासार्ह दुकानातून घ्या.
राईसपर्लची दुकाने वर सांगितलीच आहेत अनेकांनी त्यात माझी भर - बिर्ला मंदीराच्या पायर्‍या चढताना शेवटी शेवटी उजव्या हाताला एक सरकारी की शासनमान्य असं काहीतरी ज्वेलरीच दुकान आहे [तिथे हैद्राबादी खड्याचे घेतलेले दागीने २००४ सालापासून अखंड वापरात असूनही जसेच्या तसे आहेत] तिथे नकी काहीतरी घ्या.
अ‍ॅबिडसला [ड चा पाय मोडायचाय ] राहाणार असाल तर जॉन \डॉन बेकरीचे डोनस्टस आणि मोझमजाई मार्केटमधील फेमस आईस्क्रीमची चव नक्की घ्या. कोठी \ कोटी एरीयात गोकुळ चाट भांडार ला भेट द्या.

आंध्रा टुरीझमतर्फे हैद्राबादहून दोन दिवसाची [ एक रात्र] सहल श्रीशैलम्ला जाते त्याचे बुकिंग करा .

तरीही आमच्याकडे जे नातेवाईक्/मित्र-परीवार फिरायला येता त्यांची ३-४ दीवसाची ट्रीप आम्ही आशी आखुन देतो ति इथे शेअर करते ..
दिवस १ -
सुरुवात - सालारजंग म्युझियम (दुपारी १२ घड्याळाचे ठोके मस्ट, लहान मुल लवकर बोर होतात त्यामुळे २-३ तास पुरे )
चारमिनार - (सालारजंग म्युझियम पासुन ३० मि च्या अंतरावर, शेअर ऑटो सहज मिळता) तिथे दुपारी १२.३०- ३.३० थांबा..
बिर्ला मंदिर - ( चारमिनार पासुन ३० मि च्या अंतरावर) , दुपारी गर्दी कमी असते. १ तास पुरेसा होतो.
NTR Garden - (बिर्ला मंदिर पासुन १०-१५ मि च्या अंतरावर). संध्याकाळी ६ पर्यंत थांबा
Lumbini Park - इथे ७ ला लेझर शो असतो. तो बघन मस्ट आहे Happy .. ६ वाजे नंतर टिकीट विक्री सुरु होते. हुसेन सागर मध्ये बोटींग करा..

दिवस २- सकळी झु - ५-६ तास (९ ते ३)
सुधाज कार म्यझियम (झु पासुन ५ मि च्या अंतरावर ) बघा १ तास पुरे
गोलकोंडा फोर्ट -(झु पासुन शेअर ऑटो मिळन अवघड, सेपरेट करा) . रात्री मुझीक शो असतो तो पहा.

दिवस ३-
रामोजी.. इथे प्रचंड चालाव लागत. कितीही फिरलो तरी कमीच वाटत..दुसर्यादिवशी पायांची वाट लागते. म्हणुन शेवटी.

एक टिप माझीही .....रामोजीला जाल तेंव्हा त्यांच भारीवालंच टिकीट घ्या.. फुल्ल पैसा वसूल तसेच त्रास जास्त जाणवत नाही त्यात वेलकम ड्रिंक पासून फिरायला एसी बस ,बिसलरी वॉटर तसेच कोल्ड्रींकचे कुपन, दुपारच जेवण न संध्याकाळचा नाश्ता इन्कलुड आहे तसेच त्यांचे सगळे शो पहाताना फस्ट प्रायोरीटी मिळते. दोन प्रकारची टिकीट्स असतात तिथे.

एक प्रायवेट ट्रिप असते त्यात आपल्याला कारने सर्वत्र नेतात आणि जास्त फेवर्ड ट्रीटमेंट मिळते. फॉर अ फी. लहान मुलांचा खेळण्याचा भाग आहे फंडुस्थान, तिथे बारका भिजेल. तरी एक बदलायचा कपडा जोड, पातळ टॉ॑वेल जवळ असूद्या. जमिनीतून कारंजे यायचे असा एक भाग आहे तो मला पण फार आवडतो. मुलं मुलं म्हणत मी मस्त भिजले आहे त्या कारंज्यात. लै मजा येते.

http://www.ramojifilmcity.com ऑन लाईन बुकिंगसाठी ही साईट उपयोगी पडेल.

हैदराबाद मध्ये पाहण्यासारखे बरेच काही आहे.

जर सोबत लहान मुले असतील तर रामोजी फिल्म सिटी ला नक्की भेट द्यावी. रामोजी साठी एक दिवस राखून ठेवावा. रामोजीमध्ये राहण्यासाठी दोन हॉटेल आहेत तारा आणी सितारा पण ती पंचतारांकीत आहेत त्यामुळे ती महाग असावीत असा अंदाज आहे.

शाकाहारी जेवणासाठी "बिकानेर" अप्रतिम आहे (बंजारा हिल्स रोड क्र. १) याच्या बाजूला कराची बेकरी आहे तेथील बिस्किट्स अप्रतिम आहेत. तसेच दादुज झरोकाचे जेवणही सुंदर आहे (हिमायतनगर आणी जुबिली हिल्स)
सालारजंग म्युझियम आणी फ़लकनुमा म्युझियम पाहण्यासारखे आहेत.

नेहरू झू जवळ सुधा कार म्युझियम सुद्धा अप्रतिम आहे.

आणी श्रीसैलमचे मंदीर सुंदर आहे त्यायातिरिक्त तिथे रोपवे चा आनंदही लुटता येइल. पण राहण्याची व्यवस्था अगोदर करून घ्यावी लागते अन्यथा त्रास होतो. हरिता रेसोर्ट हा तिथे राहण्यासाठी एक चांगला पर्याय आहे.

तसेच तेथील चिलकुर बालाजी मंदिर फार प्रसिद्ध आहे. तिथेही अवश्य भेट द्या.

 

श्रीसैलमला जायचे असेल तर दोन दिवस पूर्ण जातात. काही लोक एका दिवसात taxi ने करतात, पण ते खूप hectic तर होतेच, शिवाय इतर काही पाहणं होत नाही.
रामोजी फिल्म सिटीला एक पूर्ण दिवस जातो.
हैद्राबाद लोकल किमान एक दिवस : असे तुमचे चार दिवस झाले.
हैद्राबादला तुम्ही ५ दिवस थांबणार की ४ दिवस?

बसने वरिल सगळे होऊ शकते, ही साईट पहा:
http://www.telanganatourism.gov.in/tour-packages.html

हे बसचे टुर्स सिकंदराबादला यात्री निवास मधुन सुरु होतात. यात्री निवासला रहायला किमान २५०० रुपये प्रतिदिन आहे, तिथे ३ रेस्टॉरंट्स आहे, त्यातील एक व्हेजी. पॅराडाइज या एरियात इतर बरीच हॉटेल्स आहेत, जी स्वस्त असतील आणि तिथुन यात्री निवास अगदी जवळ पायी जाण्यासारखे आहे (२५० मिटर). पॅराडाईज हॉटेल ज्याची बिरयाणी फेमस आहे ते सुद्धा तिथेच आहे. जवळ कामत आहे.

तिथे रु. १५०० च्या आसपास काही हॉटेल्स:
Hotel Ambassador : https://sites.google.com/a/hotelambassador.in/index/amenities-and-tariff
Hotel Aditya Deluxe: http://www.hoteladityadeluxe.chobs.in/#Contact

 http://yellowpages.fullhyderabad.com/hotel-kakatiya/nampally/directions-...

इथे फोन करुन रेट्स विचारा. तेव्हा तरी अगदी रिझनेबल रेट्स होते. इथूनच बुकिंग केलं होतं. १८ वर्षांपुर्वी गेले होते तिथे. आता हॉटेल कसं आहे माहित नाही. नाश्ता करायला / जेवायला आम्ही रस्ता क्रॉस करुन कामत कडे जात होतो. तुम्हीही तसे करु शकता. हॉटेलच्या रिसेप्शनमध्ये साईट सीइंगसाठी चौकशी करा. त्यांनी तेही बुकिंग करुन दिले होते. हॉटेलच्या दारातूनच आपल्याला बसमध्ये घेऊन परत आणून सोडत.

स्टेशनच्या अगदी जवळ असल्याने नामपल्ली (हैद्राबाद) स्टेशन गाठणे सोयीचे पडते. जवळच महत्वाचे सगळे बस स्टॉप आहेत त्यामुळे कुठेही फिरता येईल. एक दिवस आई बाबांनी हॉटेलमध्येच आराम केला होता त्या दिवशी मी आणि भाऊ बस पकडून झू परत पाहून आलो होतो. चारमिनारलाही खरेदीसाठी बसनेच परत जाऊन आलो.

झू अवश्य बघा.

जर सोबत लहान मुले असतील तर रामोजी फिल्म सिटी ला नक्की भेट द्यावी. रामोजी साठी एक दिवस राखून ठेवावा. रामोजीमध्ये राहण्यासाठी दोन हॉटेल आहेत तारा आणी सितारा पण ती पंचतारांकीत आहेत त्यामुळे ती महाग असावीत असा अंदाज आहे.

शाकाहारी जेवणासाठी "बिकानेर" अप्रतिम आहे (बंजारा हिल्स रोड क्र. १) याच्या बाजूला कराची बेकरी आहे तेथील बिस्किट्स अप्रतिम आहेत. तसेच दादुज झरोकाचे जेवणही सुंदर आहे (हिमायतनगर आणी जुबिली हिल्स)
सालारजंग म्युझियम आणी फ़लकनुमा म्युझियम पाहण्यासारखे आहेत.

बिर्यानी चे चाहते असाल तर "बावर्ची" च्या बिर्यानीचा आस्वाद नक्की घ्या...paradise च्या बिर्यानीपेक्शा अप्रतीम आहे. (RTC क्रॉस रोड जवळ)

नेहरू झू जवळ सुधा कार म्युझियम सुद्धा अप्रतिम आहे.

आणी श्रीसैलमचे मंदीर सुंदर आहे त्यायातिरिक्त तिथे रोपवे चा आनंदही लुटता येइल. पण राहण्याची व्यवस्था अगोदर करून घ्यावी लागते अन्यथा त्रास होतो. हरिता रेसोर्ट हा तिथे राहण्यासाठी एक चांगला पर्याय आहे.

तसेच तेथील चिलकुर बालाजी मंदिर फार प्रसिद्ध आहे. तिथेही अवश्य भेट द्या.

शिल्पारामम हे देखील एक प्रेक्शनीय स्थळ आहे. (हाई टेक सिटी जवळ)

 इथला झू सुद्धा प्रसिद्ध आहे: पिंजर्‍यात कोंबलेले प्राणी नाही, तर मोठे आयलंड्स आहेत प्राण्यांसाठी. लहानांनीच नव्हे तर मोठ्यांनीही पहाण्यासारखा आहे. बराच मोठा आहे. त्या व्यतिरिक्त वेगळी सफारी सुद्धा आहे, प्रोटेक्टेड एरियात, जिथे प्राणी खुले आणि आपण जीप मध्ये असतो. याचे तिकीट वेगळे असते, झूचे एन्ट्री तिकीट घेतानाच सफारीची चौकशी करुन घ्यावी, त्याचे टाइमिंग्स आणि तिकीट कुठे घ्यायचे ते.

झूमध्ये एकदा टॉय ट्रेन ने चक्कर मारुन मग पायी आत फिरणे चांगले, ट्रेन मधुन कुठे काय आहे याचा अंदाज येतो.

चिलकुर बालाजी: यात अर्धा दिवस जातो: श्रद्धेखातर बघायचे असल्यास जावे जागृत म्हणुन प्रसिद्ध आहे.

APTDC आता TTDC (Telangana) झालेय.
त्यांचे सगळे टूर्स यात्रीनिवास पासुन आहेत. इतर बोर्डिंग पॉइंट्स आहेत, पण काही टूर्सना जसे श्रीसैलम, यात्री निवासच बोर्डिंग पॉइंट आहे.

त्याच्या जवळील हॉटेल्सची काही नावे व लिंक्स वरच्या पोस्ट मध्ये दिल्या आहेत.
अजुन एक हॉटेल:
Shyam Hotel
+(91)-40-66174294
+(91)-7799658814
Door No.1-7-228, 2nd Floor, S D Road, Secunderabad, Hyderabad - 500003, Paradise Circle
या सगळ्यांसाठी सिकंदराबाद स्टेशनच जवळ आहे.
आणि या हॉटेल्स पासून यात्री निवास चालत जाउ शकता ५ मिनिट.

सिकंदराबाद स्टेशनजवळ सुध्दा बरीच हॉटेल्स आहेत. पण तिथुन यात्री निवासला जायला ऑटो रिक्षाने जावे लागेल.

श्रीसैलमचे ऑनलाइन बुकिंग करावेच कारण की वेळॆवर बरेचदा मिळत नाही. त्यात श्रीसैलम हॉटेल बुकिंग included असते. इतर बुकींग सुद्धा ऑनलाइन केल्यास उत्तम, बसचे सिट नंबर हवे ते बुक करता येतात. बुकींग करताना बोर्डिंग पॉइंट यात्री निवास द्यावा.
हैद्राबाद लोकल / रामोजीफिल्म साठी बुकींग करताना, From: Hyderabad, To: Hyderabad असे सिलेक्ट करावे.

 

मानव सांगत असलेल्या पॅराडाईज सर्कल(चौक) भागात बरीच हॉटेल्स आहेत. वर्दळीचा भाग आहे, त्यामुळे रात्री उशीरा पर्यंत गेलात तरी भिती नाही वाटत.

शिवाय खायला टिफिन सेंटर (स्नॅक्स ला तिथे टिफिन म्हणतात.), प्रसिद्ध पॅराडाईज बिर्याणीचे हॉटेल आहे.

अनेक ट्रॅवेल एजंटस ची ऑफिसेस आहेत, तिथुन तुम्ही हैद्राबाद सिटी टुरसाठी कार बुक करु शकता, पण बुकिंग करताना काय काय दाखवणार ते आधीच ठरवा.

शुक्रवारी नमाजाच्या वेळी चार मिनार आणि त्याजवळची मशिद बंद असते. सालारजंग म्युझियम पूर्ण दिवस शुक्रवारी बंद असते.
जर वेळ कमी असेल तर चिलकुर बालाजी मंदिर नाही बघितले तरी चालेल. एकतर ते सिटी पासुन बरेच लांब आहे (आउटर रिंग रोडच्या बाहेर) आणि गर्दीपण भरपूर असते.

पॅराडाईज जवळच सिंधी कॉलनी रोड (P. G. Road) आहे, तिथे संध्याकाळी खाण्याचे ठेले लागतात.
तिथे एक चाचाजी की मामाजी वडापाववाला आहे. त्यांच्या कडे अप्रतिम दाबेली मिळते. शिवाय पॅराडाईजच्या पाठी पिझ्झा डेन म्हणुन पिझाचे दुकान आहे, तिथे स्वस्त नि मस्त असा अगदी दॉमिनोझच्या तोडीचा पिझा मिळतो.

पॅराडाईज पासुन सिकंदराबाद स्टेशनदेखील जवळच आहे. रिक्षाने ५ मिनीटांच्या अंतरावर! 

बहुतेक बसेस या पॅराडाइज वरुन जातात. तुम्हाला पॅराडाइजला उतरता येईल. अन्यथा बसवाल्याला अथवा ड्राव्हयरलाच विचारावे लागेल.
दुपारी पोचल्यावर, तुम्ही स्नो वर्ल्ड करु शकता. पॅराडाइज पासून ते फार लांब नाही - ३-४ कि.मी आहे.
तिथे दर दीड तासाला सेशन सुरु होते. ते तासभर असते. दुपारी ३.३० चे अथवा ५:०० चे सेशन तुम्हाला मिळु शकते. हॉटेल मधुन किमान अर्धा तास आधी निघावे.
स्नो वर्ल्ड लोअर टॅंकबंड रोड ला आहे. ते झाले की तुम्ही वर अप्पर टॅंकबंड रोड ला फिरु शकता तिथे हुसेन सागर आहे. मध्ये बुद्धाची मूर्ती आहे. तिथे बोटिंग तुम्ही लुंबिनी पार्क मध्ये जाल तेव्हा करु शकता.

स्नो वर्ल्डला जायचे नसेल तर NTR Garden ला जाउ शकता. ते लुम्बिनी पार्क जवळ आहे पण ज्या दिवशी तुम्ही टुर कराल त्या दिवशी NTR Garden ला जाणे होणार नाही. त्यापेक्षा लुम्न्बिनी पार्क मधुन बोटिंग करता येइल.

तुम्ही कोणती टुर सिलेक्ट करावी हे कशा बद्दल लिहिले आहे ते कळाले नाही.

हैद्राबादला ऑटो रिक्षा मिटर ने जातातच असे नाही. मिटर पेक्षा २० रु. जास्त असे काही मागतात, तर काही सरळ पूर्ण एवढे असे पैसे मागतात. त्याला इलाज नाही. पोलीस विशेष लक्ष घालत नाहीत. आपणच त्यायला ता जरा घासघीस करावी.

 आम्ही ९/११/२०१५ ला State Transport (S.T.) च्या बसने (रेल्वे च confirmation नाही म्हणून) गेलो. रात्री 1.०० वाजता येणारी बस रात्री २.३० वाजता आली त्यामुळे हैदराबाद ला पोहचायला दुपारी ३.०० वाजले. त्यामुळे त्या दिवशी snow world बघायचं cancel कराव लागल.
Telangana State Transport Corporation www.tsrtconline.in ची पुणे ते हैदराबाद अशी बस सेवा आहे. ते मला तेथे जायच्या दिवशी कळाल त्या मूळ त्या बस ने जाता आलं नाही. त्या बस पुणे स्टेशन वरून सुटतात.

आम्ही Paradise हॉटेल (Secunderabad) समोर
Hotel Aditya Deluxe: http://www.hoteladityadeluxe.chobs.in/#Contact मध्ये राहिलो. हॉटेल चांगल आहे. (Room Rent 1500/- per day)
हॉटेल पासून तेलंगणा Toursim च ऑफिस ५ मिनिटाच्या अंतरावर आहे. (Yatri Nivas जवळ) http://www.telanganatourism.gov.in/tour-packages.html
आम्ही तीथल्या सगळया tour Telangana tourism मध्ये online book केल्या होत्या.
दिवस 1 (११/११/२०१५)
हैदराबाद city Tour (सकाळी ७.३० वाजता) मध्ये :- Birla Mandir, चारमिनार, chowmahalla palace, sudha Cars, गोलकोंडा, नेहरु झुलॉजीकल पार्क बघितल. सालारजंग musium ला त्या दिवशी सुट्टी असल्या मुळे बंद होत, ते बाकीच्या tour ठरवलेल्या असल्या मुळे बघायचं राहून गेलं.
दिवस २ (१२/११/२०१५)
(सकाळी ७.३० वाजता) Ramoji फिल्म City ला गेलो. Ramoji फिल्म City खरच बघण्यासारख आहे. Telangana tourism च्या बसच्या driver मूळ जरा गोंधळ झाला. Telangana tourism च्या बस मधून उतरून आम्ही Ramoji फिल्म City च्या बस मध्ये बसलो. Telangana tourism च्या बस मधून उतरताना
बसच्या driver ने सांगायला पाहिजे होत कि Telangana tourism ची बस तुम्हाला आत पर्यंत सोडणार आहे. त्यामुळे ऐक तास वाया गेला. पण नंतर सगळी ठिकाण बघता आली.

दिवस ३ व ४(१३-१४/११/२०१५)
(सकाळी ९.३०) वाजता
श्रीसैलमला गेलो व दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ६.३० ला परत आलो. परत येताना रोप way ला गेलो पण वेळ नसल्या मुळे boating करता आलं नाही.

दिवस ५ (१५/११/२०१५)
(सकाळी ९.३०) वाजता snow world ला गेलो पण ११ वाजता आत सोडतात. snow world मध्ये 1 ते 1.३० तास लागतो. तेथून आम्ही सालारजंग musium ला जाणार होतो पण ते १२.०० ते ३.०० बंद असते म्हणून तेथून lumbini park ला गेलो व तेथे बोटिंग केलं. lumbini park वरून सालारजंग musium ला पोहचायला ४५ मिनिट लागतात व ४.०० नंतर सालारजंग musium मध्ये सोडत नाहीत असे रिक्षावाल्या ने सांगितले त्यामुळे सालारजंग musium बघता आलं नाही.

Paradise ची Veg बिर्याणी चांगली होती. Paradise जवळ vegetarian Hotel बरीच आहेत.

दोन मोत्याचे व ऐक खड्याचा सेट खरेदी केला.

 आम्ही पण मागच्या आठवड्यात हैदराबाद ला जाउन आलो. इथल्या माहितीचा खूप उपयोग झाला Happy

आम्ही शताब्दीने गेलो आणि आलो. EC चं तिकिट काढलं होतं. सर्विस, स्वच्छता खूपच चांगली होती. पेपर, पाणी, चहा, सूप, नाष्ता, जेवण सर्व गाडीत पुरवले जाते.

आम्ही नामपल्ली मधे हॉटेल फिडाल्गो मधे राहिलो होतो. ते ३ स्टार हॉटेल आहे. एकदम सेंट्रल लोकेशन आहे.

इथे आरती यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही रामोजीला आम्ही कोटिहून बसने गेलो. हैदराबादची बस सर्विस खूप चांगली आहे. कोटिहून रामोजीला दर अर्ध्या तासाने बस आहे. (२०५/२०६) आणि तिघांचे मिळून ४५/- झाले. रामोजीचे तिकिट ऑनलाईन काढले असल्यामुळे तिथेही रांगेत थांबावे लागले नाही. रामोजीत लेकिनी खूप मजा केली. त्यांचे नवीन बर्ड पार्क पण अतिशय बघण्यासारखे आहे.

बाकी गोलकोंडा, सालरजंग, चाऊमहाल पॅलेस, चारमिनार, नेहेरू झू, NTR Garden, Prasad's IMAX (specially mirror maze) , सुधा कार म्युझियम पाहिले. कार म्युझियम पण खूप आवडले. विशेष म्हणजे तिथल्या वेगवेगळ्या आकाराच्या सर्व कार चालू स्थितीत आहेत. गोलकोंड्याचा साउंड आणि लाएट शो आम्हाला खूप आवडला. झू मधील बाकीचे प्राणी आवडलेच पण nocturnal प्राण्यांचा विभाग विशेष आवडला. तसा दुसर्या कुठल्या झू मधे अजून पाहिला नव्हता.

बिर्याणी म्हणाल, तर मी नॉनव्हेज खात नाही, पण नवर्‍याला अ‍ॅबिड्स मधे असलेल्या हॉटेल ग्रँडची आणि बावर्ची ची आवडली. पॅराडाइजची आवडली नाही.

Lat but not least, हैदराबादचं traffic आणि तिथले रिक्शावाले. तिकडे जाउन आल्यावर पुण्याचं traffic आणि पुण्याचे रिक्षावाले एकदम सोबर वाटायला लागलेत Happy तिथले रिक्षावाले खूपच डेंजर रिक्षा चालवतात. (रामोजीत काही शो आणि राइड्सला सांगतात की हार्ट पेशंट आणि प्रेग्नंट बायकांनी बसू नये. ती सूचना रिक्षेसाठी पण सांगायला हवी :ड ) ट्रॅफिक पण खूप जास्त वाटले (कदाचित आम्ही अगदीच मध्यवर्ती ठिकाणी राहिलो त्यामुळे असेल.)

 श्रीशैलमला जाण्यासाठी http://www.telanganatourism.gov.in/tour-packages.html ची हैदराबाद ते श्रीशैलम अशी tour दोन दिवसासाठी आहे. १५००/- रु. प्रती व्यक्ती (A.C. Bus व A.C. Hotel) Telangana Tourism ची नॉन A.C. tour आहे पण त्याला demand नसल्या मुळे आम्हाला ती cancel करून A.C. tour घ्यावी लागली. तेथे हॉटेल खूप चांगल होत. मंदिरा जवळ vegetarian हॉटेल आहेत. Tour package मध्ये जेवण, नाश्ता, चहा include नाही त्याची सोय आपल्यालाच करावी लागते.

 धन्यवाद सर्व महिती देणार्यांना, आम्हीही गेल्या आठवड्यात हैद्राबादला गेलो होतो. इथल्या माहितीचा खूप् उपयोग झाला. आम्ही गोलकोंडाचा लाईट शो, सालारजंग म्युझियम, चारमिनार, चौमहल्ला पॅलेस, लुंबिनी पार्क ह्या ठिकाणी गेलो होतो. आम्ही तिथे चार दिवस होतो. लोअर टँक बंड रोडवरच्यअ एका हॉटेल मधे राहिलो होतो. मस्त आहे शहर, एथले लोक सर्वच... रीक्शावालेही चांगले भेटले. टॅक्सी वाल्या एकाचा अनुभव मात्र बरा नाही, बाकी मेरु कॅबची सर्विस चांगली होती. पॅराडाईस बिर्यानी, खुबानी का मिठा, डबल का मिठा, अंगीठीचा बुफे, चटनीज चे साउथ ईंडीयन फुड... अहाहा... अत्ता लिहीताना परत जावे वाटु लागलयं. मंगतराय मधुन मोती ब्रेसलेट आणि टॉप्स घेतले आणि गणपतीबाप्पासाठी तुरा घेतला. कराची बिस्कीट , चुडीबाजारातून बांगड्या खरेदी करून ट्रिप संपन्न झाली.

रिक्षावाल्याने सालारजंग बद्दल आम्हाला खोटच सांगितल, पण त्याच्यावर विश्वास ठेवण्या शिवाय पर्याय नव्हता. पुण्यात आल्यावर वेबसाईट वर त्याची वेळ बघितली ती १० ते ५ आहे. तेथून lumbini park ला गेलो व तेथे बोटिंग केलं. ३ ते ५ वाजेपर्यंत २ तास तरी सालारजंग बघायला मिळेल अस वाटल होत. lumbini park वरून सालारजंग musium ला पोहचायला ४५ मिनिट लागतात व ४.०० नंतर सालारजंग musium मध्ये सोडत नाहीत म्हणून खरेदी केली व हॉटेल वर गेलो.

Chillys restaurant आहे, व्हेजी.
Dadu's Mithai Vatika आहे तिथे, भेळ, चाट वगैरे मिळते.
ताजमहाल हॉटेल आहे, शुद्ध शाकाहारी, चेन्नई शॉपिंग मॉल जवळ (पॅरॅडाइज पासून अर्धा कि.मी.),
आणि ताजमहाल हॉटेलच्या समोरील लेन मध्ये Taj Tristar हॉटेल आहे. तिथे व्हेज बुफे असतो दुपारी.

रहायला चांगला आहे, गर्दी भरपूर असते. (ती सगळीकडेच असणार म्हणा).

 थोडे पुढे गेले तर सूर्या टॉवर्स च्या गल्लीत एक चांगले चायनीज रेस्टॉ आहे. डे. क्रोनिकल च्या ऑफिसच्या अलिकडे सवेरा म्हणून हॉटेल आहे तिथे व्हेज बुफे असते. तिथूनच पुढे गेले तर एक ताजमहाल ( ट्राय स्टार) हॉटेल आहे गल्लीत. तिथे इडली डोसा मील्स सेटप परत आहेच.

राहायच्या ऑप्शन मला तितक्या माहीत नाहीत. सवेरा व ताज ट्राय स्टार एक आहे. हॉटेल करण मध्ये राहू नका शेडी प्रकरन आहे.

मी हैद्राबादी असल्याने सिकंद्राबाद मध्ये फक्त कामापुरती चक्कर टाकून परत. झू, चारमिनार म मुझी अम करायचे असेल तर ते दूर पडेल. हैद्राबादेत अ‍ॅबिड्स भागात किंवा काचि गुडा साइडला हॉटेले आहेत ती बरी पडतील. मध्यवर्ती आहे. प्यारेडाइज पासून फक्त जगदंबा पर्ल्स व इतर शॉपिन्ग जवळ आहे
बशीर बागला ओहरीज आहेकिंवा अ‍ॅबिड्स ला ताज महाल आहे. दोन हॉटेले आहेत. व त्यांची उप हार गृहे पण आहेत.

 दादुजमध्ये निसत्या २ कचोरी किंवा समोस्याचे १००० रू. होऊ शकतात. खिसा सांभाळून.
चौकात बरीच रेस्टॉरंट्स आहेत. सकाळी सकाळी रोडसाईडची इडलीदेखील इथे डोळे मिटून खाऊ शकता. चटणी न सांबार मात्र तिखट खायची सवय असेल तरच ओरपा.

२९/०९ ते ३/१० हैद्राबाद ट्रिप केली. जाताना आणि येताना शताब्दीचे बुकिंग केले होते (अनुभूती कोचचे) २५००/- एका वेळचे भाडे आहे. गाडी मस्त आहे. फार कमी थांबे आहेत. खानपान ठीक ठाक आहे. हैद्राबाद पुणे प्रवासात कमी खानपान सोयी आहेत. गाडी पुण्यातून सकाळी ५.५० ला सुटते आणि हैद्राबादला दुपारी २.३० पोचते. हैद्राबादेतून २. ४५ ला सुटते आणि पुण्यात रात्री ११.१५ ला पोचते.

राहायला ताज डेक्कन, बंजारा हिल्सचे बुकिंग केले होते. सर्व ठिकाणी ओला कॅबचा वापर केला. ऑटोवाले पुण्यातल्या ऑटोवाल्यांच्या तुलनेत १०० पटीने जास्त माजोरे आणि प्रचंड फसवेगिरी करतात.

२९/०९ (शनिवार) ला संध्याकाळी लुम्बिनी पार्कला लेझर शो बघितला. शनिवार व रविवार ७.१५ आणि ८. ३० असे दोन खेळ असतात. ईतर दिवशी फक्त ७.१५ ला. आम्ही ७.१५ चा शो बघितला जो ७.४५ ला संपला. हैदराबादेत सॅक बॅग कुठेच आत न्यायला अलाऊड नाही लेडीज पर्स अलाऊ करतात. तेंव्हा हि काळजी नक्की घ्या नाहीतर सॅक बॅग साठी २०/- द्यावे लागतील सर्व ठिकाणी. लेझर शो नंन्तर मिनर्व्हा कॅफे, हिमायतनगर ला खादाडी केली. प्रचंड गर्दी होती पण फूड अप्रतिम होते. मसाला डोसा आणि पुरी भाजी एक नंबर.

३०/९ (रविवार) ला सकाळी १०.३० ला सालारजंग म्युझिअम बघायला गेलो. हे शुक्रवारी बंद असते. अप्रतिम आहे. केवळ अफाट. तिथे ४.३० पर्यंत होतो. तरीही काही काही गोष्टी राहिल्या बघायच्या. भव्य आहे म्युझिअम. आत कँटीन आहे. सो खाण्याची सोय आहे. ५.०० वाजता चारमिनारला गेलो. सालारजंग ते चारमिनार अंतर १० मिनिटे असेल. रविवार असल्याने पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. तिथे टाईमपास करून पॅराडाईज, हिमायतनगरला जाऊन बिर्याणी खाल्ली. हे फेमस आहे बिर्याणीसाठी. चांगली चव होती. बावर्चीची पण चांगली असते असे ऐकले होते. पण ह्या ट्रिपमध्ये नाही जमले.

१/१० ला रामोजी फिल्म सिटी बघितली. सकाळी १०.३० पोचलो. हे ठिकाण शहराबाहेर आहे. हॉटेलपासून ओला कॅब केली. ५००/- झाले. इथे स्टार एक्सपीरियन्स टूर घेतली होती (२,२५०/-). ह्याचे बरेच फायदे झाले. एक तर एसी बस होती आणि बरेच ठिकाणी वेगळी लाईन होती ह्या टूर मेम्बरसाठी. प्रचंड आवडले हे ठिकाण. इतके काही बघायला आहे. इथे सुद्धा पूर्ण दिवस कमी पडतो. ६.३० पर्यंत इथे वेळ घालवला. ७.१५ ला परत कॅब बुक केली (६५०/-) आणि हुसेनसागरला गेलो बोटिंग करायला आणि बुद्ध स्टॅच्यू बघायला. ठीक ठाक आहे हे. इथून चटनीज, हिमायतनगरला खादाडी करायला गेलो. मसाला डोसा, स्टीम डोसा, बाबाइ इडली आणि घी डोसा अशी खादाडी केली. मस्त ठिकाण आणि भारी फूड.

२/१० ला सकाळी १०.०० वाजता सुधा कार म्युझिअम बघायला गेलो. काही गर्दी नव्हती. तीस मिनिटात पूर्ण पाहून होते. ठीक आहे म्युझिअम. नंतर नेहरू झू बघायला गेलो. इथे सुट्टी असल्याने जत्रा भरली होती अक्षरशः आत टॉय ट्रेन (२०/-) आणि छोट्या गाड्या आहेत जर चालायचे नसेल तर. चांगले मेंटेन केले आहे. इथून ३ वाजता निघालो ते चॊमहाल पॅलेस बघायला. अप्रतिम पॅलेस. हा खरेतर चारमिनारच्या अगदीच जवळ आहे पण टायमिंगमुळे ३०/९ ला आम्हाला बघता आला नव्हता. हे ठिकाण पण शुक्रवारी बंद असते. सुंदर जागा आणि इथे जुन्या चारचाकी गाड्या पण आहेत ज्या निजामाने वापरल्या होत्या. कपडेपट पण बघण्यासारखा आहे. पूर्ण पैसावसूल आणि न चुकविण्यासारखी जागा. नंतर कलांजलीमध्ये साडी खरेदी झाली. आणि जगदंबा पर्ल मधून मोती सेट्स खरेदी. हि दोन्ही दुकाने एकमेकांपासून ५ मिनीटाच्या अंतरावर आहेत. कलांजली फारच भारी. इथून निघून बिर्ला मंदिरला गेलो (कलांजली पासून १० मी.) ८.१५ वाजले होते जरा कमी गर्दी होती. छान वाटले. खादाडीसाठी अबीड्स मधल्या ताज महाल हॉटेल मधली व्हेज थाळी खायला गेलो. मस्त चव. इथे पण गर्दी होती.

३/१० ला सकाळी फक्त खरेदी केली. सुभान बेकरीमधून ओस्मानिया बिस्कीट, रोट आणि चांद बिस्कीट घेतले. आणि कराची बेकरीतून वेगवेगळी फ्रुट बिस्कीट, पिस्ता बिस्कीट इ घेतले. दुपारी १.३० ला चेक आऊट केले आणि २.३० ला रेल्वेस्टेशनला पोचलो. गाडी १ नंबर फलाटावर लागलेलीच होती. पुण्यात ११.१५ ला पोचलो.

आम्ही गेलो तेंव्हा वातावरण फारच दमट होते आणि ऊनसुद्धा जाणवत होते. ट्राफिकला काहीच म्हणजे काहीच शिस्त नाहीये. खाण्याची मात्र चंगळ आहे. आम्ही बरेचदा हिमायतनगरम्ध्ये खादाडी केली कारण हे हॉटेलपासून जवळ होते आणि ईथे सार्‍या फेमस ईटरीज (चेन) आहेत. टुरिझम छान डेव्हलप केले आहे. एकंदर मजा आली.

 

कोणी चांगली राहण्याची व्यवस्था सुचवू शकेल काय? ३ लोक ३ रात्री बजेट १० ते १२ हजार (फक्त राहण्याचे). सुरक्षिततेला प्राधान्य. आणि शहरातील मुख्य पर्यटनस्थळांपासून जवळ असावे. >>
https://www.booking.com/hotel/in/taj-mahal-abids.html
इथे राहिलो होतो. हॉटेल मस्त आहे. बुकींग.कॉम वर चांगले डीलस मिळतात. इथे मस्त साउथ इंडीयन थाळी मिळते. ती नक्की चुकवु नका.

रामोजी व इतर प्रसिद्ध ठिकाणे पाहायची आहेत. तेंव्हा फिरण्यासाठी काय पर्याय असावा? ओला उबेर कि टूर टॅक्सी? >>
टॅक्सी चा पर्याय चांगला आहे रामोजी ला जाण्यासाठी. तिथुन परत येण्यासाठी पण आरामात टॅक्सी मिळाली. १ पूर्ण दिवस रामोजी ला द्या.

हैदराबादचे गोकुळ चाट…

हैदराबादमध्ये चाट भांडार भरपूर आहेत. शहरात जागोजागी छोट्या मोठ्या गाड्यांवर भेळपूरी, शेवपुरी, पॅटीस, पाणीपुरी मिळेतच..पण अनेक गाड्यांवर तेलुगु चव जास्त जाणवते. म्हणजे प्रत्येक पदार्थाला एक वेगळी चव असते तशी ती जाणवत नाही. त्यातच चाट आणि पाणीपुरी म्हटल्यावर जो काही चवीचा मुद्दा येतो तो वेगळाच असतो..त्यामुळे अनेकदा या चाटची फारशी मजा नाही येत…अलिकडे काही उत्तर भारतीय लोक पाणीपुरी बनवतात ती त्यातल्या त्यात चांगली वाटते.. पण बाकी सर्सास बेचवच असते. भेळ किंवा ओली भेळ, मिसळ ..छोट्या मिरचीची भजी किंवा कांदा भजी ही एकतर मिळत नाहीत आणि मिळाली तर आपल्याला आवश्यक ती चव मिळत नाही..बटाटे वडा म्हटल्यावर तर तोंडाला पाणी सुटणार नाही असा मराठी माणूस शोधून सापडणार नाही..पण हैदराबादमधले हे लोक ते कशापासून बनवतात माहित नाही पण चवीच्या बाबतीत मात्र एकदमच फालतु म्हणावं असाच तो प्रकार आहे. मी तर काही पदर्थांची मुळ चवच विसरून गेलोय. या सर्वांवर एक उपाय म्हणजे हैदराबादमध्ये कोटी भागात गोकुळ चाट हे हॉटेल आहे..इथं मिळणारे सर्वच पदार्थ खुपच चविष्ट असतात..अगदी दहीपुरी, रगडा पॅटीस किंवा मिसळ प्रत्येक पदार्थाला एक छान चव आहे..त्यामुळे या गोकुळमध्ये संध्याकाळी एखाद्या पदार्थावर ताव मारण्याची इच्छा होतेच..पण या गोकुळमध्ये काही खायचं म्हणजे मोठं दिव्यच असतं..गर्दी एवढी प्रचंड असते की त्यातून वाट काढत जायचं , आपली आर्डर द्याचयी आणि पाच सात मिनीटात त्या गरम प्लेट घेऊन त्याच गर्दीतूनच बाहेर पडण्याचं दिव्य करावं लागतं.. पण आपल्याला हवा असलेला पदार्थ खाताना ते दिव्य फारसं कठीण वाटत नाही..

गोकुळमध्ये नेहमी जायचा योग काही येत नाही..त्यातच आम्ही कोटीपासून फारच दूर राहत असल्यामुळे केवळ चाट खाण्यासाठी हैदराबादच्या ट्रॅफिकमधून वाट काढत जाणं सोप नाही.. त्यातच वेळे अभावीही तिकडं फारसं जाणं होत नाही..पण पूर्वी जेव्हा हैदराबादमध्ये नवीन आलेलो होतो तेव्हा आठवड्यातून एखादी चक्कर त्या भागात व्हायचीच..मग काय थोडंफार भडकणं झाल्यानंतर गोकुळला भेट ही आलीच..त्यामुळे या गोकुळशी थोडं जिव्हाळ्याचं नातं जडलय…पण मागच्या काही वर्षात तिथं जाण्यात खंड पडला होता..पण मागच्याच आठवड्यात त्या गोकुळमध्ये जाण्याचा योग पुन्हा आला..हो योगच म्हणायचं..माझ्या दोन सहका-यांबरोबर आम्ही अबीट्सला थोडी शॉपींग केली आणि नंतर गोकुळला जाण्याचा बेत ठरला.. ठरल्याप्रमाणं आम्ही तीघेजण गोकुळला गेलो..अबीट्स ते कोटीचे गोकुळ हा जेमतेच पाच मिनीटाचा बसचा प्रवास पार करायला आम्हाला तब्बल अर्धातास लागला…तेवढा टॅफिकचा त्रास संपवून आम्ही एकदाचे गोकुळमध्ये आलो. नेहमीप्रमाणं गर्दी होतीच..आम्ही तिघांच्या तीन वेगवेगळ्या आर्डर देऊन त्या येण्याची वाट पहात होतो.. शेवटी गर्दीतून आपली गरम प्लेट घेऊन आम्ही तिघांनी चांगलाच ताव मारला..खरं तर आणखी एक एक प्लेट घ्यायचा विचार होता..पण गर्दीचा अंदाज घेऊन आम्ही बाहेर पडलो…

गोकुळमध्ये आम्ही पंधरा वीस मिनीटीचं होतो…त्या पंधरा वीस मिनिटीत रगडा पॅटीस आणि दहीपुरीवर ताव मारताना माझं मन मात्र त्याचा आस्वाद घेताना वेगळात विचार करत होतं..याच गोकुळमध्ये आमच्यासारखे लोक दररोज गर्दी करतात. नेहमीच्या चवीत थोडा बदल करण्यासाठी लोक इथं येतात.. गर्दीतच एखाद्या विशेष प्लेटवर ताव मारत असतात…अशाच एका दिवशी म्हणजे २५ ऑगस्ट २००७ ला या गोकुळमध्ये अघटीत घडलं…..अनेकजण याच गर्दीत आपली ऑर्डर घेण्यात मग्न होते तर काही जण आपली प्लेच फस्त करण्यात मग्न होते…लहान थोर, मुलं-मुली आपापल्या विश्वात मग्न होते आणि त्याचवेळी गोकुळमध्ये मोठा स्फोट झाला…..कुणाला काही कळायच्या आताच सगळं चित्र बदलेलं होतं..सगळीकडे गोंधळ, आरडाओरड आणि रक्ताचा सडा सांडलेला होता..लोकांची बाहेर पडण्याची घाई होती तर काही जण मदतीसाठी याचना करत होते…गोकुळमध्ये ज्या गर्दीत हा सर्व पदार्थ बनवण्याचा आणि तिथंच खाण्याचा दररोजचा नित्यक्रम होता तिथं गॅस सिलेंडरवर कोण्या हरामखोरानं एका पिशवीत बॉम्ब ठेवला होता…आणि अपेक्षीत वेळी त्यांनी त्याचा स्फोट घडवून आणला होता..त्यात जवळपास २०-२५ लोकांचा बळी गेला तर काहीजण जखमी झाले..स्फोट एवढा भयानक होता की काही लोकांचे पाय तुटले. काहींचे हात तुटले… काहीजण भाजून काळे ठीक्कर पडले होते.. त्यावेळी मी माझ्या ऑफीसमध्ये रात्रीचं बातमीपत्र बनवण्यात व्यस्त होतो.. त्या घटनेची व्हिज्युअल्स पाहिल्यानंतर मला त्या गोकुळचा तिटकारा आला..गोकुळमध्ये लोक जिभेचे थोडे लाड पुरवायला जातात..त्यात त्यांची काहीही चूक नसताना त्यांना प्राण गमवावे लागले…पण काही हरामखोर लोक सामान्य लोकांचं जगणं कठीण करण्यातच धन्यता मानतात…मी ज्या दिलसुखनगरमध्ये रहात होतो. तिथचं शेजा-याचा एकुलता एक मुलगाही त्याच स्फोटात गेला…इंजिनिअरिंग करणारा तो मुलगा कॉलेजमधून येताना मित्रांबरोबर गोकुळमध्ये असाच एखाद्या प्लेटवर ताव मारण्यासाठी गेला तो पुन्हा परत आलाच नाही.. ह्या घटनांवर भरपूर लिहता येण्यासारखं आहे..आज खाण्याचा विषय होता. त्याचा उल्लेख होता म्हणून त्या संदर्भानं ह्या दुर्घटनेचा उल्लेख केला..कारण मी दहीपुरी संपवत असताना माझ्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा ते चित्र दिसत होतं..आणि आज पुन्हा तसा प्रसंग आला तर…अशा भितीनं मीसुद्धा थंड झालो होतो….नेहमीप्रमाणं मला आता त्या गोकुळच्या कोणत्याच पदार्थाटी चव लागत नाही.. सर्व कसं बेचव वाटतय…त्या जागेवर पाय ठेवताच कुठं बॉम्ब तर ठेवलेला नाही ना अशी शंका येते.. खातानासुद्धा आजूबाजूला तेचं भयान दृष्य आठवण करुन देत होतं….

गोकुळ चाटचा तो प्रसंग आठवला की आजही अंगावर शहारे येतात..जे गोकुळ त्याच्या चवीसाठी प्रसिद्ध होतं.. त्यांनं २०-२५ लोकांचा बळी घेतला…तिथली चव आजही बदललेली नाही..पण मला मात्र त्या चवीत फरक पडलाय असचं वाटतय.. का कोण जाणं त्या गोकुळमध्ये गेल्यानंतर मस्त ताव मारण्याचं मनच होत नाही….

 https://dhananjaykoshti.wordpress.com/2012/07/06/%e0%a4%b9%e0%a5%88%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%b3-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%9f/

 

 

 बुद्धवनम, तेलंगाना

तेलंगाना सरकार द्वारा बनाया गया बुद्धवनम एक विशाल थीम पार्क है जो 279 एकड़ में फैला हुआ है. यह पार्क कृष्णा नदी के उत्तरी किनारे पर नागार्जुन सागर के पास है. यह वन या वनम चार बड़े बड़े भागों में बना है - बुद्धचरितवनम, जातककथा वनम, ध्यानवनम और स्तूपवनम. चारों भागों में सुन्दर चित्रकारी, मूर्तियां, जातक कथाओं का चित्रण और बाग़ बगीचे हैं. घूमने के लिए समय और मज़बूत टांगें चाहिए! दिन में तीखी धूप होती है, अपना ख़याल रखें. नागार्जुन कोंडा बुद्धिस्ट म्यूजियम भी पास ही है वहां भी जा सकते हैं पर उसके लिए पूरा दिन चाहिए. वहां जाने के लिए फेरी लेनी होगी जो 45 मिनट जाने में और इतना ही समय आने में लेती है. नागार्जुन सागर के पास इसी नाम से एक क़स्बा भी है जहाँ रहने के लिए होटल वगैरह मिल जाएंगे. ऑटो और टैक्सी सुविधा भी आसानी से उपलब्ध है. सरकारी रिसोर्ट भी हैं जिनमें पहले बुकिंग करना ठीक रहेगा.अक्टूबर से मार्च तक काम गर्मी है इसलिए ये समय घूमने के लिए अच्छा है.

कुछ फोटो और 2 वीडियो प्रस्तुत हैं.

1. बुद्धवनम का मुख्य हॉल 

2. हॉल के अंदर 

3. आचार्य नागार्जुन की प्रतिमा 
                                                
4. पर्यटक 

5. ध्यानवनम में स्थापित आवुकन बुद्धा मूर्ति जो श्रीलंका द्वारा भेंट की गई है. मूल मूर्ति ग्रेनाइट पत्थर की है और आवुकन गांव उत्तरी श्री लंका में पांचवी शताब्दी में बनाई गई थी. 

6. वन में स्तूप 

7. धम्म चक्र 

8. कटहरी जातक कथा का चित्रण. संक्षेप में ये जातक कथा इस प्रकार है: एक राजा शिकार पर निकला तो जंगल में उसने एक सुन्दर स्त्री देखी जो सूखी लकड़ियां चुन रही थी. दोनों का मिलन हुआ. राजा ने उसे अपनी अंगूठी दी और कहा - अगर तुम गर्भवती हो जाओ और लड़की पैदा हो तो अंगूठी बेच कर लड़की पाल लेना. अगर लड़का हुआ तो मेरे पास ये अंगूठी ले कर आ जाना. स्त्री का ( बोधिसत्व ) लड़का पैदा हुआ. कुछ बड़ा होने पर वह बार बार पूछने लगा कि मेरा पिता कौन है? एक दिन वह उसे दरबार में ले गई. राजा ने शर्म के मारे उस बच्चे को अपनी सन्तान मानने से इनकार कर दिया. स्त्री ने कहा: सच जानने के लिए इस बच्चे को मैं हवा में उछाल देती हूँ. अगर ये लटका रहा तो तुम्हारा वर्ना गिर कर तो ये मर जाएगा. यह कह कर स्त्री ने बच्चे को उछाल दिया. राजा ने तुरंत छलांग लगाई और बच्चे को पकड़ लिया. बाद में बच्चा राजकुमार बना और स्त्री रानी. पिता की मृत्यु होने के बाद वह राजगद्दी पर विराजमान हुआ 

9. बोरोबुदुर, इंडोनेशिया में हस्ती जातक कथा का चित्रण जिसका पुनर्चित्रण जातकवनम में किया गया है. संक्षेप में कथा इस प्रकार है: 1. कुछ लोग जंगल की सीमा पर थके-मांदे और हताश एक पेड़ के नीचे बैठे थे. हाथी जो बोधिसत्व था( बुद्ध के मार्ग पर चलने वाला और दूसरों को बुद्ध का मार्ग दिखाने वाला बोधिसत्व कहलाता है ), ने पुछा - मैं आपकी क्या मदद कर सकता हूँ? उन्होंने बताया की राजा ने उन्हें शहर से निकाल दिया है और वो कई दिनों से भूखे प्यासे भटक रहे हैं. बोधिसत्व हाथी ने सोचा इन्हें जंगल में खाने के लिए कुछ भी नहीं मिलेगा और ये यूँ ही दम तोड़ देंगे. 2. हाथी ने उन लोगों से कहा कि पहाड़ी के दूसरी ओर चले जाएं वहां झील के पास एक हाथी मरा हुआ है. कुछ दिनों के लिए आपका खाना पीना हो जाएगा. 3. यह कहने के बाद हाथी ने पहाड़ी पर चढ़ कर छलांग लगा दी और झील किनारे गिर कर मर गया. 4. भूखे प्यासे लोगों ने उस हाथी को पहचान लिया और परोपकार के लिए धन्यवाद किया. बाद में हाथी की अस्थियों पर उन लोगों ने एक स्तूप बना दिया. कालांतर में उस परोपकारी हाथी के स्तूप की पूजा होने लगी

10. गौतम बुद्ध उपदेश देते हुए - भित्ति चित्र 

11. बौद्ध दर्शन के जाने माने आचार्य नागार्जुन का भित्ति चित्र. नागार्जुन ने लगभग पहली शताब्दी में 'मूलमाध्यमक-कारिका' की रचना की. उन्हें शून्यवाद का जनक कहा जाता है. आचार्य नागार्जुन के अनुसार वस्तुएं निःस्वभाव हैं और स्वतंत्र सत्ता से शून्य हैं. सभी वस्तुएं एक दूसरे पर निर्भर हैं  

12. गोलाकार दीर्घा से एक दृश्य 

13. हॉल के दरवाज़ों पर सुन्दर नक्काशी 

14. हैदराबाद से बुद्धवनम 140  किमी दूर है और गुंटूर से 150 किमी 


                                                                 15. स्तम्भों पर नक्काशी 


                                                               16. हाल का एक दृश्य 


और अधिक जानकारी इस साइट से भी ली जा सकती है: buddhavanam.telangana.gov.in 

                                                  मेरठ - बैंगलोर - कार यात्रा, भाग - 28 
 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...