जोधपुर ही पुर्वी मारवाड ची राजधानी होती. ह्या शहराला "निळे शहर" असेही
म्हणतात. ईथले लोक चुन्यात निळ मिसळून घराचा बाह्य भाग रंगवितात त्यामुळे
बरेचसे शहर निळे दिसते.
ह्या शहरातील पहाण्यासारख्या गोष्टी म्हणजे "मेहरानगढ किल्ला" व "जसवंत थडा".
मेहरानगढ : ह्या किल्ल्याचे बांधकाम राव जोधा
ह्याने १४५८ मध्ये सुरु केले. हा किल्ला शहारापासुन ४०० फूटांच्या ऊंचीवर
स्थित असुन चारही बाजूंनी ऊंच तटबंदिने सुरक्षित केलेला आहे. ह्या
किल्ल्यावर आजही तुम्हाला तोफगोळ्यांच्या खुणा दिसतात. ह्या किल्ल्याला
एकूण ७ दरवाजे आहेत. ह्या किल्ल्यातले संग्रहालय हे राजस्थानातील काही
प्रमुख संग्रहालयांपैकी एक मानले जाते.
प्रचि १
-
-
-
किरत सिंग सोधा ची छत्री...
प्रचि २
-
-
-
प्रचि ३
-
-
-
प्रचि ४
-
-
-
प्रचि ५
-
-
-
तोफगोळ्यांच्या खुणा
प्रचि ६
-
-
-
किल्ल्याची तटबंदी व आतील भाग
प्रचि ७
-
-
-
प्रचि ८
-
-
-
प्रचि ९
-
-
-
प्रचि १०
-
-
-
प्रचि ११
-
-
-
ईथे पर्यटकांचे स्वागत पारंपारीक राजस्थानी संगीत वाजवुन केले जाते.
प्रचि १२
-
-
-
अशाच संगीतावर थिरकणारा एक राजस्थानी मुलगा.
प्रचि १३
-
-
-
खिडक्यांवरील नक्षी. ह्या सर्व खिडक्यांवरील कोरीव काम/जाळीची नक्षी हे दगडामध्ये केलेले आहे.
प्रचि १४
-
-
-
प्रचि १५
-
-
-
प्रचि १६
-
-
-
प्रचि १७
-
-
-
प्रचि १८
-
-
-
प्रचि १९
-
-
-
तुमचे भविष्य तुमच्या हातात.
प्रचि २०
-
-
-
शाही महाल
प्रचि २१
-
-
-
प्रचि २२
-
-
-
प्रचि २३
-
-
-
प्रचि २४
-
-
-
प्रचि २५
-
-
-
प्रचि २६
-
-
-
किल्ल्यातील संग्रहालय
प्रचि २७
-
-
-
प्रचि २८
-
-
-
प्रचि २९
-
-
-
प्रचि ३०
-
-
-
प्रचि ३१
-
-
-
प्रचि ३२
-
-
-
जसवंत थडा : जसवंत थडा सरदार सिंग ह्याने १८९९
मध्ये महाराजा जसवंत सिंग दुसरा ह्याच्या स्मृतिप्रित्यर्थ बांधला. हा
पुर्णपणे संगमरवरात बांधला आहे.
प्रचि ४७
-
-
-
प्रचि ४८
-
-
-
प्रचि ४९
-
-
-
जोधपुर शहर
प्रचि ५०
-
-
-
मेहरानगढ किल्ला:
प्रचि ५१
-
जयपुर हे भारतातील पहिले वसविलेले शहर आहे. हे शहर महाराजा जयसिंग दुसरा
ह्याने १७२७ मध्ये वसविले. ह्या शहरातील पहाण्यासारख्या गोष्टी म्हणजे
"हवा महल", "अंबर किल्ला", "बिर्ला मंदिर", "जल महल", व "अल्बर्ट हॉल".
प्रचि १
-
-
-
जयपुर पॅलेस
प्रचि २
-
-
-
जयपुर पॅलेस
प्रचि ३
-
-
-
प्रचि ४
राजेशाही गाड्या
-
-
-
प्रचि ५
-
-
-
प्रचि ६
-
-
-
हवा महल: हवा महल महाराजा सवाई प्रताप सिंग ह्याने १७९९ मध्ये बांधला. हा ५ मजली असुन ह्यामध्ये ९५३ खिडक्या आहेत.
प्रचि ८
-
-
-
हवा महल च्या आतील भाग
प्रचि ९
-
-
-
हवा महल च्या आतील भाग व मागे जंतर मंतर
प्रचि १०
-
-
-
अंबर किल्ला
प्रचि ११
-
-
-
प्रचि १२
अंबर किल्ला वेगळ्या अँगलने
-
-
-
प्रचि १३
अंबर किल्ला वेगळ्या अँगलने
-
-
-
किल्ल्याच्या आतील मुख्य द्वार.
प्रचि १४
-
-
-
प्रचि १५
-
-
-
प्रचि १६
-
-रचि १६ मध्ये तो माणूस नसायला हवा होता. त्याला निघून जाऊ दिल्या नंतर फोटो
काढला असता तर अजून चांगले झाले असते. >>>>> ह फोटो बघा
आता...
-
प्रचि १७
-
-
-
प्रचि १८
-
-
-
प्रचि १९
-
-
-
प्रचि २०
-
-
-
प्रचि २१
-
-
-
प्रचि २२
-
-
-
प्रचि २३
-
-
-
प्रचि २४
-
-
-
ईथे म्हणे "रंग दे बसंती" चे तलावात ऊडी मारण्याचे चित्रीकरण झाले होते.
प्रचि २५
-
-
-
जयपुर शहर अंबर किल्ल्यावरुन
प्रचि २६
-
उदयपुर, चित्तौडगढ, माउंट अबू
केसरीया बालम आवोनी,
पधारोनी म्हारे देस रे,
पधारोनी म्हारे देस...
राजांची भूमि रा्जस्थान, विरांची भूमि रा्जस्थान, शिलरक्षणासाठी जोहार
करणार्या पतिव्रतांची भूमि राजस्थान, पृथ्वीराज चौहान, महाराणा प्रताप आणि
ईमानी चेतक ह्याच मातीतले...
चला आता ह्या राज्याचा थोडा फेरफटका मारू या...
अरावली पर्वतरांगांनी राजस्थानचे दोन भाग केले आहेत. पुर्वेला मेवाड आणि
पच्शिमेला मारवाड. मेवाडचे लोक लढवय्ये होते तर मारवाडचे लोक हे धंद्यात
अतिशय हुशार...
आपल्याला वाटतो तेव्हढा रा्जस्थान रूक्ष नाहिये. मेवाड पट्टा बर्यापैकी
हिरवा आहे. थर चे वाळवंट हे जैसलमेर आणि बिकानेर (मारवाड) च्या भागात आहे.
ईथे फार प्राचीन काळी समुद्र होता. आजही ह्या वाळवंटात समुद्रजिवांचे
जिवाश्म मिळतात.
भटकंतीस योग्य काळ : नोव्हेंबर ते जानेवारी. डिसेंबर-जानेवारी मध्ये
दिवसाचे तपमान अतिशय छान आणि आल्हाददायक असते. डिसेंबर मध्ये जैसलमेर भागात
रात्रि अतिशय कडाक्याची थंडी असते. ईथे ऊन्हाळा अतिशय तीव्र असतो.
आम्ही पाहिलेली स्थळे: उदयपुर, चित्तौडगढ, माऊंट अबू, जोधपुर, जैसलमेर, तनोट, अजमेर आणि जयपुर.
दिवसः १० ते १२
उदयपुर :
उदयपुर चे प्रमुख आकर्षण म्हणजे सिटी पॅलेस आणि लेक पॅलेस.सिटी पॅलेस उदय
मिर्झा सिंग ने १५५९ मध्ये पिचोला ह्या सरोवराच्या किनार्यावर बांधला.
ह्या महालात हॉटेल, म्युझियम, मंदिर, उपहारगृह असे बरेच काही आहे.
लेक पॅलेस हे हॉटेल पिचोला सरोवराच्या मध्ये एका लहान द्विपावर स्थित आहे.
हा महाल/हॉटेल महाराणा जगत सिंग दुसरा याने १६४६ - १७४३मध्ये बांधला. ईथे
बर्याच चित्रपटांचे चित्रिकरण होते. गाजलेला बाँडपट "ऑक्टोपसी" त्यातलाच
एक.
उदयपुर मध्ये महाराणा प्रताप यांचे एक स्मारक आहे. उदयपुरमध्ये "सहेलियो की
बाडी" म्हणून एक ऊद्यान आहे. ह्या ऊद्यानात बरीच कारंजी आहेत. हे ऊद्यान
महाराणा भुपाल सिंग ने त्याच्या राणी साठी बांधले. ह्या ऊद्यानाची एक
खासियत अशी कि ईथली सर्व कारंजी गुरुत्वाकर्षणाच्या बलावर चालतात.
प्रचि १
एका उद्यानातली मिनी ट्रेन
-
-
-
प्रचि २
सहेलियों कि बाडी
-
-
-
प्रचि ३
सिटि पॅलेस प्रवेशद्वार
-
-
-
प्रचि ४
सिटि पॅलेस
-
-
-
प्रचि ५
राजमुद्रा
-
-
-
प्रचि ६
लेक पॅलेस आणि पिचोला सरोवर
-
-
-
प्रचि ७
-
-
-
प्रचि ११
सिटि पॅलेस पिचोला सरोवरातुन
-
-
-
प्रचि १२
सिटि पॅलेस मध्ये रहाणार्या पाहुण्यांची बडदास्त ठेवण्यासाठी खास गाड्या. पहा ओळखता येता आहेत का ते.
-
-
-
प्रचि १३
-
-
-
प्रचि १५
महाराणा प्रताप
-
-
- चित्तौडगढ:
चित्तौडगढउदयपुर पासुन ६० किमी अंतरावर आहे. जाताना रस्त्याच्या दोन्ही
बाजुला सरसोंची समृद्ध शेती लागते. सरसों चे शेत पाहिल्यावर आम्हां
सर्वांतला "सारूख खान" जागा झाला आणि DDLJ effect सुरु
झाला. शेतात घुसुन मनसोक्त फोटोज् काढुन घेतले. आपल्या शेताचे फोटोज्
काढतायत म्हणुन तो शेतमालकही खुष झाला..
चित्तौडगढकिल्ल्याबद्दल माहिती प्रचि २० मध्ये दिलेली आहे.
ह्या किल्ल्यात सुंदर शिल्पकला असलेली बरीच देवळे आहेत. पण मुस्लिम
आक्रमणकर्त्यांनी ईथल्या मंदिरांची आणि मुर्त्यांची बरीच तोड्फोड केली आहे.
ह्या किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे "विजयस्तंभ" (प्रचि ६५).
प्रचि १७
सरसों के खेत
-
-
-
प्रचि १८
-
-
-
प्रचि १९
DDLJ effect
-
-
-
प्रचि २०
-
-
-
प्रचि २१
किल्ल्याची तटबंदी
-
-
-
प्रचि २३
-
-
-
प्रचि २४
-
-
-
प्रचि २७
-
-
-
प्रचि २९
-
-
-
प्रचि ३०
-
-
-
प्रचि ३१
-
-
-
प्रचि ३३
-
-
-
प्रचि ३६
-
-
-
प्रचि ३७
किल्ल्याचा परिसर
-
-
-
प्रचि ३८
-
-
-
प्रचि ४०
-
-
-
प्रचि ४१
-
-
-
-
-
-
प्रचि ५७
-
-
-
प्रचि ५८
-
-
-
प्रचि ५९
-
-
-
प्रचि ६०
-
-
-
प्रचि ६१
-
-
-
प्रचि ६३
-
-
-
प्रचि ६४
-
-
-
प्रचि ६५
विजयस्तंभ राणा कुंभा ह्याने ईसवीसन १४४२ - १४४९ मध्ये मालवा आणि मेहमुद
खिलजी ह्यांच्यावर मिळविलेल्या विजयाची आठवण म्हणुन बांधला. ह्याची उंची
३९.१९ मीटर असुन हा ९ मजली आहे.
-
-
-
प्रचि ६६
किल्ल्याचे मागील प्रवेशद्वार
-
-
-
प्रचि ६७
-
-
-
प्रचि ६८
किल्ल्यावरून दिसणारा भोवतालचा परिसर
-
-
-
माउंट अबू :
माउंट अबू उदयपुर पासुन ४-५ तासांच्या अंतरावर अरावली च्या पर्वतरांगामध्ये
वसलेले आहे. ईथे पहाण्यासारखी ठिकाणे म्हणजे गुरु शिखर, प्रजापिता
ब्रम्हकुमारी आश्रम व दिलवाडा मंदिरे.
गुरु शिखर हे अरावली पर्वतरांगांमधले सर्वोच्च शिखर आहे. ह्याची उंची १७२२
मीटर आहे. ईथे दत्तात्रेयांचे मंदिर आणि पाऊलखुणा आहेत. ईथे समोरच एक
ऑब्झरव्हेटरी आहे. ईथुन समोरच्या पर्वतरांगांचे विलोभनीय दॄष्य दिसते.
प्रचि ७०
दत्तात्रेयांच्या पाऊलखुणा
-
-
-
प्रचि ७१
ऑब्झरव्हेटरी
-
-
-
प्रचि ७२
-
-
-
प्रचि ७३
टोड रॉक
-
-
- दिलवाडा मंदिरे :
दिलवाडा मंदिरे हि जैनांची ११व्या ते १३ व्या शतकातली मंदिरे आहेत. हि
मंदिरे चालुक्य राजवटित बांधली गेली. ईथे एकूण पाच मंदिरे आहेत. ईथे
आपल्याला संगमरवरातले (बहुदा जगातील) अत्युच्य कोरीव काम पहायला मिळते.
माझ्या मते ईथले कोरीव काम हे ताज महाल पेक्षाही सरस आहे (माझ्या मते ताज
महाल फक्त भव्य आहे.). मी आजपर्यंत पाहिलेल्या शिल्पकलांमध्ये सर्वश्रेष्ठ
कोरीव काम मी ईथे पाहिले. दुर्दैवाने ईथे फोटो काढण्यास मनाई आहे. खाली जे
फोटोज् दिले आहेत ते मी काढलेले नाहियेत. ईथे मिळणार्या पुस्तकातुन स्कॅन
केलेले आहेत. हे फोटोज् फक्त आपणांस ईथल्या शिल्पकलेची कल्पना यावी म्हणुन
दिलेले आहेत.
प्रचि ७४
-
-
-
प्रचि ७५
-
-
-
२००९ च्या ३० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान आम्ही मेवाडदर्शन सहल सचिन
ट्रॅव्हल्सच्या सोबत केली. या पर्यटनाची पूर्वतयारी; प्रत्यक्ष
प्रवास-निवास, खानपान, कलास्वाद, खरेदी; आणि प्रवासा अखेरीस या सर्वांतून
झालेले मेवाडदर्शन; अशा स्वरूपात हे प्रवासवर्णन लिहीत आहे. यातील
इतिहासात्मक वेचे, बहुतेकदा, विकिपेडियावरून स्वैर अनुवाद करून घेतलेले
आहेत. ३० सप्टेंबर आणि १० ऑक्टोबर हे दोन दिवस रेल्वेच्या प्रवासातच खर्ची
पडले. तसेच ९ ऑक्टोबर जयपूरला खरेदीखातर खर्चलेला असल्याने, पर्यटनाचे
प्रत्यक्षात आठच दिवस पदरी पडलेले होते. यंदा गणपती ते दिवाळीच्या दरम्यान
मेवाड पाहायला जायचे असा निश्चय झाल्यावर तिथला उत्तम काळ कोणता (खरे तर
मेवाड दर्शनार्थ पक्ष पंधरवड्यासारखा काळ शोधूनही सापडणार नाही), आपल्याला
कधी वेळ उपलब्ध आहे, सुट्ट्या कधी काढता येतील या सगळ्याचा अंदाज घेऊन
सहलीच्या नियोजनास सुरूवात झाली. माझा आवडता समज असा आहे की पर्यटन सहल
८-१० दिवस तरी लांबीची असावी. कमी असल्यास, नुसता जाण्या-येण्यातच घालवलेला
वेळ, सहलीत प्रत्यक्ष दर्शनार्थ घालवलेल्या वेळापेक्षा जास्त ठरून,
सहलीकरता उपलब्ध असलेल्या वेळाचा अपव्यय होतो. तसेच जास्त असल्यास,
पर्यटनाचा उत्साह मावळत मावळत अखेरीस ते पर्यटन आनंदचे राहत नाही. म्हणून
सहल ८-१० दिवसांची असावी असाही निर्णय झाला. शिवाय रेल्वेचा प्रवास
रात्रभराहूनही जास्त असल्याने येणे-जाणे विमानानेही करता येईल काय याची
चाचपणी करायचे ठरले. मग काय काय पाहायचे आहे, काय पाहण्यासारखे आहे,
मेवाडचा इतिहास काय आहे, तिथे काय काय खाण्याचे अभिनव पदार्थ चाखता येतील,
कुठकुठल्या कलांचा प्रत्यक्ष आस्वाद घेता येईल, कोणकोणती निसर्गसौंदर्ये
आस्वादता येतील याची जंत्री सुरू झाली. प्रत्यक्ष सहल जरी ८-१० दिवसांचीच
होणार असली तरीही माझ्या प्रथेप्रमाणे तीन महिने आधीपासूनच माहिती काढणे,
आरक्षणे करणे, पर्यटनसाहित्याची जमवाजमव इत्यादीस जोमाने सुरूवात झाली.
यात्राकंपनीसोबत पर्यटन केल्यास अल्पावधीत नियोजन, आपत्कालीन व्यवस्था,
तसेच जुळवाजुळवीत जीव आटवणे कमी होते हे खरेच, पण पैशाच्या रूपात त्याचे
मूल्य चुकवावेच लागते. तरीही उपलब्ध वेळेचा जास्तीत जास्त सदुपयोग करायचा
तर हे करायलाच हवे, मग जास्त खर्च झाला तरी चालेल असा निर्णय झाला.
त्यानुसार इंडियन एअरलाईन्स, केसरी, सचिन इत्यादींच्या संचालित सहलींचा
तपास हाती घेतला. इंडियन एअरलाईन्सच्या देकारात विमानप्रवासाच्या खर्चाला
पहिली प्राथमिकता होती. स्थानिक पर्यटन स्थानिक हॉटेलांवर सोपवतात असा आमचा
मागचा अनुभव होताच. शिवाय संपूर्ण सहलीचा माणशी खर्च त्यांचाच सर्वाधिक
होता. केसरी आणि सचिनच्या संकेतस्थळांवर सहलींची माहिती व्यवस्थितपणे
दिलेली दिसत होती. मात्र केसरीच्या देकारात काय काय समाविष्ट होते ते
नीटपणे कळू शकत नव्हते. सगळ्यात माहितीतत्पर सहलविपणन सचिनचे होते. माहिती
विचारायचा अवकाश की हवी ती माहिती तत्काळ सादर होत होती. त्यांच्या सवलती
देण्याच्या पद्धती नीटपणे कळलेल्या असल्याने, प्रत्यक्षात किती खर्च होईल
याचा अदमास लगेचच आला. त्यांचाच दरमाणशी सहलखर्चही सर्वात कमी येत होता.
डोंबिवलीला त्यांचे कार्यालयही होते. म्हणून मग सचिनसोबत जाण्याचा निर्णय
झाला.
मात्र जरी ते रेल्वे आरक्षण करून देऊ म्हणत होते तरी प्रत्यक्षात
आम्हाला हव्या असलेल्या १०-१०-२००९ च्या गाडीचे आरक्षणच रेल्वेच्या
संकेतस्थळावर उपलब्ध नव्हते. शिवाय त्यांच्या सहलीची सुरूवात आबूरोडपासून
होत होती. म्हणजे विमानाने अहमदाबादपर्यंत जाऊन आबूला जाण्याचे सव्यापसव्य
करूनही त्याचा पुरेसा लाभ होणारच नव्हता. हे त्यांना सांगून, रेल्वे
आरक्षणाची त्यांची काही विशेष व्यवस्था आहे काय असे विचारता, ती तशी नाही
असेच उत्तर आले. मग रेल्वेचे आरक्षण झाल्याखेरीज सहलनोंदणी करायची नाही असे
ठरवले आणि त्यांच्या नक्की केलेल्या दुसर्या कुठल्या तारखेस जुळवून घेता
येईल का, ही चाचपणी सुरू केली. ३०-०९-२००९ लाच त्यांची पहिली सहल सुरू होत
होती. पण त्याकरताचे आरक्षण तर आता मिळणारच नाही असे वाटत होते. तरीही
रेल्वेचे संकेतस्थळ बघितले, आणि काय आश्चर्य, ३०-०९-२००९ चे आरक्षण उपलब्ध
होते. सचिनला विचारून घेतले की आमचे आरक्षण होईपर्यंत आमच्या जागा राखून
ठेवता येतील का? ते हो म्हणाले. मग जाण्या-येण्याचे आरक्षण लगेचच करून
घेतले आणि सचिनसोबत सहलनोंदणी केली.
मेवाडः एक बहुचर्चित पर्यटनवर्तुळ
मग तपासादरम्यान असे लक्षात आले की मेवाड पर्यटन हा काही साधासुधा
प्रकार नाही, तर तो भारतातला सर्वात जास्त पर्यटकांच्या आवडीचा पर्यटन
मार्ग आहे. आनंददायी, प्रेरणादायी आणि सुखाचा. मेवाडास मिळालेले निसर्गाचे
वरदान म्हणजे अरावली पर्वत. अर्बुद आवली म्हणजे अरावली. अर्बुद म्हणजे गळू,
टेंगूळ, टेकाड, शिखर, कळस. हरियाणा, राजस्थान तसेच गुजरातच्या भूभागांवर
ईशान्येकडून नैऋत्येकडे पसरत गेलेल्या टेकड्यांच्या रांगा हेच अरावली
पर्वताचे स्वरूप आहे. हिमालय, सह्याद्री, सातपुडा इत्यादी पर्वतांचे स्वरूप
भिंतींसारखे आहे. मात्र अरावली पर्वत सुट्ट्या टेकड्या टेकड्यांचा मिळून
घडलेला आहे. पश्चिमेकडल्या थरच्या वाळवंटास रोखून धरण्याचे महत्त्वाचे
कार्य अरावली पार पाडतो आहे. याच कारणाने इथे अर्बुदादेवीची पूजाही सर्वत्र
केली जाते. अरावली पर्वतातून बनास, लुनी, गंभीरा, चंबळ, (सर्व
पूर्ववाहिनी) तसेच साबरमती (पश्चिमवाहिनी) इत्यादी नद्या उगम पावतात.
हल्लीच्या राजस्थानाचे सर्वसाधारणपणे दोन भाग पडतात. थरच्या रुक्ष
वाळवंटाची मरूभूमी असलेला मारवाड आणि तलाव-अरण्यांनी जिवंत झालेला, अरवली
पर्वताच्या कुशीत वसलेला मेवाड.
भारतातले सर्वात बहुचर्चित पर्यटनवर्तुळ मेवाडात आहे. दिल्लीचे तख्तनशिन
बादशाहसुद्धा भरतभूमीच्या वैभवाचे उपभोग घेऊ शकले नसतील, एवढे वैभव
राजपुतान्यातील राजांनी अनुभवले आहे. आज दिल्लीत म्हणण्यासारखा राजवाडा
नाही. मात्र राजस्थानात सारेच राजेशाही. मेवाडातील अंबरचे राजे कच्छवाह.
यांनीच जयपूर वसवले. तिथे राज्य केले. दिल्लीतील प्रचलित राजसत्तेशी कायमच
जुळवून घेतले आणि सार्या भरतवर्षाची राजसत्ता पर्यायाने आपल्या हातात
ठेवली. तिचा उपभोग घेतला. चित्तौडचा इतिहास महाभारतापासूनचा आहे. इथे
बाप्पा रावळांच्या गहलोत वंशाने राज्य केले. पुढे ते शिसोदिया म्हणून ओळखले
जाऊ लागले. त्यांनी उदयपूर नगर वसवले. हे कायमच दिल्लीच्या सत्तेविरुद्ध
संघर्षरत राहिले. तरीही जयपूर असो की चित्तौड, दोन्हीही ठिकाणी जे
राजप्रासाद आज पाहायला मिळतात ते भरतवर्षातील संपत्तीच्या साठ्याचे निदर्शक
आहेत. मात्र अंबर व चित्तौड यांच्यात एक मुख्य फरक आहे. भरतवर्षाच्या
रक्षणार्थ आणि स्वाभिमानार्थ अंबरकरांनी तडजोडीचा मार्ग स्वीकारला, तर
चित्तौडकरांनी संघर्षाचा मार्ग पत्करलेला दिसून येतो. सार्या भरतवर्षातील
संपत्तीचा राजपुतान्यात संचय करण्यात मात्र दोन्ही घराण्यांनी कोणतीच कसर
ठेवलेली दिसत नाही. वायव्येस असल्याने अंबरकरांना कायमच आक्रमकांचा त्रास
सहन करावा लागे. तर चित्तौडकर बव्हंशी सुरक्षिततेच्या नैसर्गिक आवरणात
राहिल्याने तडजोडीस धार्जिणे राहिले नाहीत.
आपल्या बुद्धिवैभवाने मातृभूमीस परम वैभवाप्रत नेण्याकरता राजपुतांनी
जयपूर, उदयपूरसारखी नयनमनोहर शहरे वसवली; यंत्रमंदिरा (जंतरमंतर) सारख्या
वेधशाळा निर्माण करून अवकाश निरीक्षणास, संशोधनास प्रतिष्ठा दिली;
दिलवाडासारखी मंदिरे, कुंभलगड, चित्तौडगड, अंबर, रणथंभोर यांसारखे
कोटकिल्ले व त्यावरील गढ्या-प्रासादांनी कलेचे स्वर्गच भुईवर आणले आणि
राजस्थानच्या मरुभूमीत "सहेलियों की बाडी", जलमहल यांसारखी मानवी उपभोगाची
चिरंतन रम्य स्थळे साकार केली. निसर्गाचे दान सढळ हस्ते मिळालेले असतांना,
ते मानवनिर्मित लेण्यामंदिरांनी विभूषित करून पृथ्वीवर स्वर्ग निर्माण
करण्यात राजपुतांनी कोणतीही कमी ठेवलेली नाही. स्वातंत्र्योत्तर काळातही
रस्ते, वीज, प्रवासीनिवास यांबाबत हे राज्य कायमच पर्यटनानुकूल राहत आलेले
आहे. त्यामुळे आज तो राजपुताना पर्यटनाचा स्वर्गच मानला जातो. तोच स्वर्ग
आज जगभरातील पर्यटकांना इथे खेचून आणत असतो. आणि म्हणूनच भारतातले सर्वात
बहुचर्चित पर्यटनवर्तुळ मेवाडात आहे.
पहिला दिवसः माऊंट अबू
ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी म्हणजे आमच्या प्रवासाच्या पहिल्या दिवशी
आम्ही अरावली एक्सप्रेसने 'आबूरोड'ला जाऊन पोहोचलो. तिथे सचिन ट्रॅव्हल्सचे
प्रतिनिधी आम्हाला उतरवून घेण्याकरता एस-४ बोगीसमोर सज्ज असणार होते.
आम्ही झपाट्याने तिथे जाऊन पोहोचलो. आता फक्त वाटच पाहायची होती.
बाहेरून, आबूरोड स्टेशनचे घुमट प्रेक्षणीयच दिसत होते.
तेवढ्यात स्टेशनवर 'आबू की रबडी' बोर्ड पाहिला. मेवाडदर्शन सहलीच्या
पूर्वतयारीतच रबडी, घेवर, गजक, राजकचोरी इत्यादी फर्मास पदार्थांच्या
आस्वादाची अपेक्षा तयार झालेली होती. म्हणून जेव्हा आम्ही आबूरोड स्टेशनवर
'आबू की रबडी' बोर्ड पाहिला, तेव्हा लगेचच 'आबू की रबडी' चाखून पाहण्याचा
मोह झाला. पेल्याच्या आकाराच्या मातीच्या कुल्हडीतून 'आबू की रबडी' घेतली.
दर कुल्हडीस फक्त पंधरा रुपये फक्त. मात्र कुल्हडीत पाणी शोषल्या
गेल्यामुळे की काय, पण रबडी अपूर्व लागत होती. मधुर, गोड आणि लच्छेदार. मन
खूश झाले.
दरम्यान, सचिन ट्रॅव्हल्सचे प्रतिनिधी श्री.सुशांत जोशी आणि श्री.शैलेश
दोंदे, त्यांच्या टोप्यांसह तिथे हजर झाले. त्यांनी सर्व प्रवाशांना एकत्र
आणले, त्यांचे सामान ताब्यात घेतले, आणि आम्ही ३५ आसनांच्या, २ x २,
वातानुकूलित बसकडे वाट चालू लागलो. सगळे २१ प्रवासी आणि सहलप्रणेते बसमधे
बसले, ड्रायव्हर किन्नरांचे इशारे झाले आणि बस माऊंट अबूची रमणीय वाट चालू
लागली.
जेवणखाण आटोपून थोडीशी विश्रांती घेतली. संध्याकाळी सूर्यास्त
बघण्याकरता आम्ही सूर्यास्तदर्शनस्थळाकडे निघालो. जिथे बस थांबली तिथून पाच
मिनिटांवर ते आहे. मात्र तिथे एक अभिनव वाहन आम्हाला दिसले. ते म्हणजे
बाबागाडी. मग एक खडक जणू हात जोडून स्वागत करतांना आढळला.
आणि तिथवर पोहोचलो तेव्हा आढळली ती माऊंट अबूची सर्वोत्कृष्ट मिठाई.
सोहन पापडी. ती मुळीच पापडी वाटत नव्हती. पांढुरक्या पिवळ्या रंगाची
कापसागत किंवा 'बुढ्ढी के बाल' वाटावी अशी साखरेची, अगदी तरलपणे तोंडात
विरघळून जाणारी मिठाई. अतिशय हलकी. तिच्या, वाटीच्या आकाराच्या मुदी बनवून
ठेवल्या होत्या आणि प्रत्येकी पाच रुपयांना एक अशा विकत होते.
मग सूर्यास्त पाहण्याकरता मोक्याची जागा हुडकण्यासाठी धावपळ सुरू झाली.
सूर्यास्ताला आणखी अर्धा तास तरी असावा. मग तिथे आसपासच्या दृश्यांवरच
चर्चा सुरू झाली. तिथे खूप घाणेरीची झुडुपे इतस्ततः विखुरलेली होती. सुंदर
फुलांचे घोस होते. शिवाय मिर्याच्या आकाराची काळी काळी फळेही गुच्छांनी
लगडलेली होती. तिथल्या गप्पांतून, घाणेरीला फळे येतात ही नवीनच माहिती
मिळाली. ही फळे खायला गोड लागतात. आरोग्यवर्धक असतात. शिवाय मूळव्याधीवरचा
उत्तम उपायही ठरतात, असेही समजले. लगेचच स्वतः खाऊन खात्री पटवली. इथे
तत्काळ मेहंदी काढण्याकरता लाकडाचे साचे विकतही होते आणि तत्काळ मेहंदी
काढूनही देत होते. अनेक महिलांनी सूर्यास्तापर्यंतच्या वेळाचा सदुपयोग
तत्काळ मेहंदी रंगवून घेण्याकरता करून घेतला. निरनिराळे खाद्यपदार्थ
हिरीरीने विकले जात होते. त्यामधे, द्रोणांत सोलून ठेवलेले डाळिंबाचे दाणे
हा नवा पदार्थही विकायला होता.
मग सावकाश सूर्यास्त झाला. मात्र तो क्षितिजाआड सूर्य दडून नव्हे. कारण
आकाश ढगाळ तर होतेच शिवाय धुकेही होते थोडेसे. त्यामुळे सूर्यास्त
पाहण्याचा काहीसा विरसच झाला. त्यानंतर 'नक्की' तलावावर जायचे होते. नखाने
निर्माण केलेला म्हणून 'नखकी ताल' असे नावही कळले. पण अंधार आधीच पडू
लागलेला असल्याने काही प्रवाशांना खरेदीत रस वाढू लागला होता, तर
आमच्यासारखे काही प्रवासी अजूनही बोटिंगचा हुरूप बाळगून होते. म्हणून
शिस्तीत वाटणी झाली आणि आम्ही बोटिंगला निघालो. सहा जणांची वल्हवायची बोट
मिळाली, नावाड्यासकट. अर्धा-पाऊण तास पाण्यात विहरून मग आम्हीही खरेदीच्या
सत्रात रुजू झालो. बांधणीच्या साड्या, सूट, कलात्मक शोभेच्या वस्तू,
मोजड्या, परतल्यावर इतरांना वाटता येतील अशी स्मृती-चिन्हे, काय अन काय.
प्रवासी खरेदीदारांचा माऊंट अबूमधील माल रोड, हा तर स्वर्गच आहे.
दुसरा दिवसः माऊंट अबू
आधी हॉटेलातच परस्पर परिचयाचा कार्यक्रम झाला. मग 'श्री अर्बुद विश्वनाथ
महादेव मंदिर' दर्शनाचा कार्यक्रम पार पडला. मंदिराच्या इमारतीसच पिंडीचा
आकार दिलेला असल्याने, गेरूच्या रंगाने रंगवलेली
ती इमारत दुरूनच नजरेत भरत होती. त्यानंतर प्रजापिता ब्रह्मकुमारी
ईश्वरीय विश्वविद्यापीठाचे मुख्यालय 'युनिव्हर्सल पीस हॉल' ऊर्फ
विश्वशांतीदालन बघितले. पुढल्या चित्रपट्टीतले मधले चित्र त्याचेच आहे.
त्यांच्या आचारपद्धतीबाबत प्राथमिक माहितीही दिली गेली, मात्र ती पुरेशी
वाटली नाही. आम्हाला अधिक वेळही नसल्याने इतर प्रवाशांप्रमाणेच आम्हीही
पुढच्या स्थळाकरता सिद्ध झालो. ते होते अर्बुदा माता मंदिर. ३६५ पायर्या
चढून डोंगरावरच्या मंदिरात जायचे होते.
अर्बुदादेवी किंवा अधरदेवी चे मंदिर माऊंट अबूच्या उत्तरेला ३ किलोमीटर
अंतरावरील एका गुहेत आहे. मंदिरापर्यंत पोहोचण्यास ३६५ पायर्या चढाव्या
लागतात. मंदिरात वाकूनच प्रवेश करावा लागतो. मोबाईल, बॅगा वगैरे वस्तू
गाभार्यात नेऊ देत नाहीत. मंदिराच्या वाटेवर काटेरी झुडूपांची दाट हिरवळ
असल्याने चढतांना थकवा जाणवत नाही. आजूबाजूचे निसर्गसौंदर्यही
वाखाणण्यासारखे आहे.
महाराष्ट्रात पदोपदी दिसणारे अश्वत्थ वृक्ष वड, पिंपळ आणि औदुंबर इथे
क्वचितच दर्शन देतात. आंबा, फणस, काजू, चिक्कू, संत्री, पेरू, सिताफळे
यांसारख्या झाडांनी जणू मेवाडवर बहिष्कारच टाकला आहे की काय असे वाटते.
महाराष्ट्रात आढळणार्या केळी, ऊस इत्यादींच्या बागा तर विसरायलाच हव्यात.
मात्र खेजडी (खजूर), बाभूळ, आवळे यांच्या बागा होत असल्याचे अनोखे दृश्य
यानंतर अनेकदा नजरेस पडले. या अशाप्रकारच्या वृक्षसंपदेमुळे इथल्या
कुठल्याही युद्धात गनिमी कावा शक्य होत असेल असे मला वाटे ना. मात्र
महाराणा प्रतापांनी गनिमी काव्यानेच अकबराला हैराण करून सोडल्याची, तसेच
चित्तौड वगळता सार्या मेवाडवर पुन्हा ताबा मिळवल्याची कहाणी पुढे समजणारच
होती.
अर्बुदादेवीचा डोंगर उतरतांना ताक, दही, उसाचा रस आणि भरपूर इतर
खाद्यपेये उपलब्ध होती. खरे तर गार वार्यांतून केलेल्या उल्हासदायक
चढ-उतारानंतर श्रमपरिहाराची तशी फारशी आवश्यकताही जाणवत नव्हती. तरीही
आम्ही सगळ्यांनी उत्तम ताकाचा (छाछ) आस्वाद घेतलाच. इथे टेकडीवर माकडे खूप
आहेत. आम्ही जे चणे प्रसादाकरता म्हणून घेतले होते, खाली उतरल्यावर, ते चणे
माकडांना खाऊ घालण्याकरता विकत होते असे लक्षात आले. चणे खाऊन पाहिले असता
त्याची खात्रीच पटली. ते कडक कुडकुडीत होते. (आमच्याकडे हळदीकुंकवाला
म्हणून काही बोरे विकत असत. ती अजिबात खाण्याच्या दर्जाची नसत. तसलाच हा
प्रकार वाटला.) मात्र माकडे ते चणे आवडीने खातांना दिसली.
सरतेशेवटी मात्र आम्हाला, उन्हाचा त्रास टाळण्याकरता, स्थलदर्शनाच्या
कार्यक्रमाचे नियोजन थोडे उलटे करायला हवे होते असे वाटले. म्हणजे
अर्बुदादेवीचा डोंगर आधी आणि नंतर अर्बुद विश्वनाथ महादेव व मग
विश्वशांतीदालन पाहिले असते तर जास्त बरे झाले असते, असे.
जेवण व थोड्याशा विश्रांतीनंतर दिलवारा जैन मंदिर पाहायला गेलो.
संगमरवरी मूर्तीकलेचे माहेरघरच आहे ते. मात्र कॅमेरा, मोबाईल, बॅगा वगैरेला
आत परवानगी नाही. त्यामुळे फोटो काढलेले नाहीत.
या ठिकाणी पाच मंदिरे आहेत.
त्यातले पहिले मंदीर, चालुक्य महाराज भीमदेव(प्रथम) यांचे मंत्री व
सेनापती असलेले विमलशहा यांनी, इसवी सन १०३१ साली बांधून पूर्ण केले.
म्हणून त्यास विमलवसाही म्हणतात. त्यात प्रथम जैन तीर्थंकर आदिनाथ ऋषभदेवजी
यांची मूर्ती प्रतिष्ठित आहे.
दुसरे मंदीर गुजरातचे सोळंकी राजा भीमदेव (द्वितीय) यांचे मंत्री
वस्तुपाल आणि त्यांचे लहान बंधू तेजपाल यांनी आबूचे राजा सोमसिंह यांच्या
अनुमतीने, विमलवसाही मंदिराजवळच त्याचेचप्रमाणे सफेद संगमरवरातून इसवी
सनाच्या १२८७ मधे बांधून प्रतिष्ठित केले. तेजपाल यांचे पुत्र लावण्यसिंह
यांचे नावाने ते मंदीर लूणवसाही म्हणवले जाते. त्यात जैनांचे २२ वे
तीर्थंकर श्री नेमीनाथ यांची कसौटीच्या दगडातील अत्यंत रमणीय मूर्ती
प्रतिष्ठित आहे. लूणवसाहीची हत्तीशाळाही संगमरवरात संजीवित करण्यात आलेली
आहे.
तिसरे मंदीर आहे पीतलहर मंदीर. हे गुजरातच्या भीमाशाह यांनी घडवले
असल्याने यास 'भीमाशाह यांचे मंदीर' असेही संबोधले जाते. याचे निर्माण इसवी
सनाच्या १४३३ मधे पूर्ण झाले. १४६८ मधे जीर्णोद्धारात जैनांचे प्रथम
आचार्य ऋषभदेवजी यांची पंचधातूंची मूर्ती स्थापित करण्यात आली.
चौथे मंदीर नववे तीर्थंकर श्री सुविधिनाथ यांचे आहे.
पाचवे मंदीर तीन मजली चिंतामणी पार्श्वनाथ मंदीर आहे. हे श्वेतांबर
जैनांच्या खरतरगच्छ समुदायाचे अनुयायी 'मंडलिक' यांनी इसवी सन १४५८ मधे
बांधून पूर्ण केले. याच्या चारही बाजूंना भगवान पार्श्वनाथ यांच्या मूर्ती
प्रतिष्ठित असल्याने या मंदिरास 'चौमुखा पार्श्वनाथ मंदीर' असेही म्हणतात.
संगमरवरी शिल्पकलेचा स्वर्गच वाटावा अशा या मंदिरांचे रूप केवळ अवर्णनीय
आहे. शिवाय, रंग फक्त शुभ्रधवलच असल्याने, ते सौंदर्य, कुठल्याही
प्रकारच्या फोटोग्राफीत सापडणारे नाही. म्हणून प्रत्यक्षच पाहावे. आयुष्यात
एकदा तरी.
नंतरचा उर्वरित दिवस सचिनने मोकळाच सोडलेला होता. त्यांचाच मार्गदर्शक
मग सांगू लागला, की तुम्हाला पाहायचे असेल तर, गुरूशिखर आपल्याला पाहता
येईल. मी वाहनव्यवस्था करू शकेन. मात्र १०० रुपये माणशी इतका खर्च येईल.
सचिनतर्फेच ही व्यवस्था का केली जात नाही? याचे उत्तर, आमची बस तिथे
नेण्याची अनुमती नाही असे आले. तरीही ही निराळी वाहनव्यवस्था
सहलकार्यक्रमातच अंतर्भूत करायला हवी होती, यावर सर्व प्रवाशांचे एकमत
झाले. असो. मग मार्गदर्शकाच्या सल्ल्यानुसारच वाहनव्यवस्था करून आम्ही
स्वखर्चाने गुरूशिखर पाहण्याकरता गेलो. गेलो नसतो तर एका अद्वितीय अनुभवास
मुकलो असतो.
गुरूशिखर
दिलवारा अचलगढ रस्त्यावर ३ किलोमीटर पासून, एक ७ किलोमीटर लांबीची
डांबरी सडक उंच पर्वतावरील गुरूशिखरापर्यंत घेऊन जाते. गुरूशिखर हे अरवली
पर्वताचे सर्वोच्च शिखर आहे. त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची आहे १,७२२
मीटर (म्हणजेच ५,६७६ फूट), तर त्याचे ठिकाण माऊंट अबू पासून १५ किलोमीटर
अंतरावर आहे. गुरूशिखरावर दत्तात्रयाचे मंदिर आहे. मंदिरात दत्तात्रयाची
सुरेख मूर्ती आहे. इथेच एक भव्य, पुरातन, पितळी घंटा होती, जिच्यावर
ख्रिस्तपूर्व १,४११ मधील कोरीव काम होते. आता मात्र तिच्या जागी नवी घंटा
बसवलेली आहे. मंदिरापासून आणखी थोड्या उंचीवरील सर्वोच्च ठिकाणी चरण
पादुकांचे एक छोटेसे मंदिर आहे. इथून सभोवतालचे विहंगम दृश्य पाहता येते.
इथे वेगवान वारे सदा सर्वकाळ वाहत असतात. गोरक्षनाथांनी म्हटलेच आहे की
'पवन ही योग, पवन ही भोग, पवन ही हरे छत्तीसो रोग'. इथल्या प्रवाही
वार्यांमुळे इथे कायमच आरोग्यदायी वातावरण निर्माण झालेले आहे.
गुरूशिखरावर वरच्या भागी दत्तात्रयांच्या चरण पादुकांचे देऊळ आहे, तर
खालच्या बाजूला दिसतंय ते आहे दत्तमंदिर.
दुसर्या चित्रात वरच्या बाजूला एक शंखाकृती आणि खालच्या बाजूला एक भव्य
खोबण असलेला खडक, गुरूमंदिराच्या वाटेवर उठून दिसतात. खालच्या
चित्रपट्टीतील पहिले चित्र शंखाकृती खडकाचे आहे तर दुसरे खोबणीच्या खडकाचे.
संपूर्ण छत असलेल्या, मात्र तळाशी सपाट बूडच नसलेल्या या खोबणी, राहण्यास
गुहा म्हणून मुळीच वापरता येण्यायोग्य नाहीत. हा खोबण असलेला खडक,
गुरूशिखराच्या वाटेवर सहजच नजरेत भरतो. याच चित्रपट्टीतील तिसर्या चित्रात
दत्तात्रयांच्या चरण पादुकांचे मंदिर दिसत आहे. मंदिरावर जे काही लिहिलेले
दिसत आहे ते आहे 'गुरू दत्तात्रेय की चरण पादुका. दर्शन करके घण्टा बजाये,
मनोकामना पुरी होती है।'. शेवटले चित्र आहे त्याच घंटेचे, जिचा उल्लेख चरण
पादुकांच्या मंदिरावरल्या लिखाणात केलेला आहे.
मंदिराजवळ 'फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी'ने चालवलेली 'माऊंट अबू वेधशाळा'
आहे. या वेधशाळेत १.२ मीटर अवरक्त दुर्बीण आहे. इथे अवकाशीय वस्तूंच्या
अवरक्त किरणांचे भूमीवरून निरीक्षण करण्या करताची भारतातील पहिलीच प्रमुख
सुविधा आहे. इथे उंचीवरच्या वातावरणाच्या विज्ञानाचा अभ्यास केला जातो
(एरोनॉमी). ज्यात विघटन आणि मूलकीकरण महत्त्वाचे असते. या विषयावरचे अनेक
प्रयोगही येथे केले जातात. http://www.prl.res.in/. या प्रयोगशाळेचा फोटो चरणपादुकांच्या मंदिराजवळून उत्तम प्रकारे काढता येतो. हा फोटो मात्र आंतरजालावरून साभार उचललेला आहे.
तिसरा दिवसः हल्दीघाटी व नाथद्वार
चितौडचा इतिहास
इसवी सनाच्या ७ व्या शतकात मौर्य घराण्याने चितौड वसवले. पौराणिक मेवाडी
नाण्यांवर आढळणार्या चित्रांगद मोरी यांचे नावावरून त्याचे नाव चित्रकूट
असे ठेवलेले होते. बाप्पा रावल यांनी इसवी सन ७३४ मधे चितौड जिंकून
घेतल्यावर त्यास मेवाडची राजधानी केले. त्यानंतर अकबराने १५६८ मधे जिंकून
घेपर्यंत चितौडच मेवाडची राजधानी राहिले. त्यानंतर मग मेवाडची राजधानी
उदयपूरला हलवण्यात आली.
बाप्पा रावल यांच्या पश्चात त्यांच्याच गहलोत घराण्यातच सत्ता राहिली.
इसवी सन १३०३ मधे दिल्लीच्या अल्लाउद्दिन खिलजी याने पद्मिनीकरता चित्तौडवर
हल्ला केला. तत्कालीन राजे, रावल रतनसिंग युद्धात मारले गेले. त्यांची
पत्नी पद्मिनी हिने जौहार केला. चित्तौडवर अल्लाउद्दिन खिलजीची सत्ता
स्थापन झाली. इसवीसन १३२७ मधे गेहलोत घराण्यातीलच हमीरसिंग यांनी पुन्हा
सत्ता परत मिळवली. हमीरसिंग यांचा जन्म ज्या शिसोदा गावात झाला होता,
त्यावरून मग या राजघराण्यास शिसोदिया असेही म्हणू लागले.
राणा हमीरसिंग यांचे पणतू महाराणा कुंभकर्ण ऊर्फ कुंभा १४३३ चे सुमारास
गादीवर बसले. १४४२ मधे माळव्याचा सुलतान महमूद खिलजी याने चित्तौडगढवर
आक्रमण करून मच्छिंद्रगढ, पाणगढ आणि चौमुखा ताब्यात घेतले. या अनिर्णायक
लढाईत गुजरात व माळव्याच्या संयुक्त फौजांचा पराभव झाल्याने सुलतान मांडूस
परतला. पुढे दहा वर्षेपर्यंत मग चित्तौडवर आक्रमण होऊ शकले नाही. या
विजयाची आठवण म्हणून १४४८ मधे महाराणा कुंभा यांनी चित्तौडमधे एक विजयस्तंभ
उभारण्यास सुरूवात केली. तो १४५८ मधे बांधून पूर्ण झाला. ३७ मीटर उंचीच्या
या स्तंभास नऊ मजले असून १५७ पायर्या आहेत. दगडातून शिल्पे साकारून
सजवलेले, एकातून एक उमलणारे, शंखाप्रमाणे उलगडत जाणारे जिने आणि हवेशीर
कलात्मक खिडक्यांनी विभूषित, भरभक्कम बांधणीच्या या स्तंभाचा सर्वात वरचा
मजला तर शिल्पकलेने अप्रतिम सजलेला आहे. इसवीसनाच्या पंधराव्या शतकातील
भारतीय तंत्रज्ञानाचे दैदिप्यमान उदाहरण म्हणून या विजयस्तंभाचा उल्लेख
अभिमानानेच करावा लागेल.
महाराणा कुंभा यांनी १४५८ पर्यंत राज्य केले. १४५८ मधे त्यांचेच पुत्र
उदयसिंग (प्रथम) यांनी सत्तासंपादनार्थ, त्यांचा वध केला. महाराणा
कुंभांच्या कारकीर्दीत सर्वप्रकारच्या कलागुणांना ऊर्जितावस्था प्राप्त
झाली. मेवाडमधील ८४ किल्ल्यांपैकी ३२ किल्ले बांधले गेले. यांच्यातच
मेवाडमधील, चित्तौडनंतरचा सर्वात अभेद्य किल्ला, कुंभलमेर किंवा कुंभलगढचा
समावेश होतो. महाराणा प्रताप यांचा जन्मही कुंभलगढचाच. महाराष्ट्रात शिवाजी
महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरी आहे. तसेच राजस्थानात महाराणा प्रतापांचे
जन्मस्थळ कुंभलगढ आहे. कुंभलगढची तटबंदी ३६ किलोमीटर लांबीची आहे. चीनच्या
भिंतीनंतर, जगातील दुसर्या क्रमांकाची सर्वात लांब तटबंदी आहे ही. महाराणा
कुंभांच्याच कारकीर्दीत राणकपूरचे त्रैलोक्य-दीपक जैन मंदिर, चित्तौडची
कुंभास्वामी आणि आदिवर्ष तसेच शांतिनाथ जैन मंदिरे बांधली गेली. स्वतः
महाराणा कुंभांनी 'संगीत-राजा', गीतगोविंदावरची 'रसिक-प्रिय' ही टीका,
'सूडप्रबंध' आणि 'कामराज-रतिसार' या ग्रंथांचे लेखन केले आहे. त्यांच्याच
कार्यकाळात विद्वान अत्रींनी 'चित्तौडच्या कीर्तीस्तंभाची प्रशस्ती' लिहीली
आणि कहना व्यास यांनी 'एकलिंग-महात्म्य' लिहीले.
१५२७ मधे राणा संग्रामसिंग (राणा संगा) यांनी खानवा येथे बाबराशी
निकराची लढाई केली. त्यात बाबराचा जय झाला. पुढे जखमी झालेले राणा
संग्रामसिंग थोड्याच वर्षांत मृत्यू पावले. १५३५ मधे गुजरातचा राजा
बहादुरशहा चित्तौडवर चालून आला असता संग्रामसिंगाची पत्नी राणी कर्मवती
हिच्याकडे चित्तौडची सूत्रे होती. तिने यावेळी बाबराचा मुलगा हुमायूनची मदत
मागितली. त्याने होकारही दिला. मात्र हुमायून पोहोचण्यापूर्वीच
बहादुरशाहने चित्तौड काबीज केल्यामुळे राणी कर्मवतीसह सर्व स्त्रियांनी
जौहार केला तर गडावरील सर्वच्या सर्व ३२,००० लोक धारातीर्थी पडले.
वरील चित्रपट्टीत पहिले चित्र कुंभलगढाचे आहे तर दुसर्या चित्रात
बनवीर, उदयसिंग समजून चंदनचा वध करत असतांनाचे चित्र दिसत आहे. बनवीर,
राजपुत्र उदय याचा शिरच्छेद करण्याकरता आला असता, पन्नाधायने आपला स्वतःचा
पुत्र चंदन याला राजपुत्राचे जागी झोपवले आणि उदयला आधीच दूर पाठवून त्याचे
प्राण वाचवले. त्या अत्युच्च त्यागाची ही स्मृती.
१५२८ मधे राणा संग्रामसिंग यांचा मृत्यू झाला. त्यांच्यापश्चात त्यांचा
सर्वात मोठा हयात असलेला मुलगा रतनसिंग राणा झाला. १५३१ मधे रतनसिंग मारला
गेला व त्याचाच भाऊ विक्रमादित्यसिंग गादीवर बसला. विक्रमादित्याच्याच
राज्यकाळात बहादुरशाहने चित्तौडवर कब्जा मिळवला. उदयसिंग यास सुरक्षेच्या
कारणास्तव बुंदीस रवाना करण्यात आले. पुढे १५३७ मधे विक्रमादित्यास मारून
बनवीर गादीवर बसला. तेव्हाच तो उदयसिंगासही मारणार होता. पण पन्नाधायने
त्याचे जागी आपल्या चंदन नावाच्या मुलास बळी देऊन त्याचे प्राण वाचवले.
पन्नाधाई स्वतः उदयसिंगासोबत कुंभलगढ इथे आश्रयार्थ जाऊन राहिली.
कुंभलगढाचा तत्कालीन शास्ता आशाशाह व इतर सरदारांच्या मदतीने १५४० मधे
बनवीरचा पराभव करून उदयसिंग राजा झाला.
महाराणा उदयसिंग (जन्मः ऑगस्ट ४,१५२२, मृत्यूः फेब्रुवारी २८, १५७२)
त्यानंतर महाराणा उदयसिंग यांनी चित्तौडवर राज्य केले. ते राणा
संग्रामसिंग व राणी कर्मवती यांचे चौथे पुत्र होते व त्यांचा जन्म झाला
तेव्हा राणा संग्रामसिंग हयात नव्हते. मेवाडच्या राजघराण्यातील ते ५३ वे
शासक होते. महाराणा उदयसिंगांनी राजपूत राज्यव्यवस्थेचे एकचालकानुवर्तित्व
घातक ठरत असल्याचे जाणून जाणत्यांच्या सामूहिक प्रशासनास जन्म दिला. या
राज्यव्यवस्थेचा उपयोग पुढे अकबराच्या आक्रमणाचे काळी झाला. तेव्हा
सर्वांच्या सल्ल्याने उदयसिंग चित्तौड सोडून निघून गेले होते. तरीही
चित्तौडने चार महिनेपर्यंत शर्थीची झुंज दिली. २५ फेब्रुवारी १५६८ रोजी
पुन्हा एकदा चित्तौड पडले आणि सर्व स्त्रियांना पुन्हा एकदा जौहार करावा
लागला. चित्तौड राज्य करण्यास सुरक्षित राहिलेले नाही हे पाहून महाराणा
उदयसिंग यांनी उदयपूर शहराची निर्मिती केली. त्यांच्या पश्चात महाराणा
उदयसिंगांनी आपल्या आवडत्या जगमल्ल नावाच्या पुत्रास राज्याची सूत्रे
सुपूर्त केली. मात्र त्यांनीच घडवलेल्या सामूहिक प्रशासनास हे रुचले नाही.
महाराणा प्रताप हे महाराणा उदयसिंगांचे थोरले पुत्र होते. ते पराक्रमी आणि
राज्यकर्ते म्हणून सर्वमान्य होते. म्हणून, त्या सामूहिक प्रशासनाने त्यांस
गादीवर बसवले. महाराणा प्रतापांनी अकबराच्या आक्रमणाविरुद्ध हल्दीघाटीत
निकराची लढाई केली. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. त्यांचा आवडता घोडा
चेतकही मारला गेला. महाराणा प्रताप वाचले. त्यांनी चित्तौड वगळता सारे
मेवाड पुन्हा ताब्यात घेतले. चित्तौड ताब्यात येईपर्यंत सारे राजभोग सोडून
दिले. पत्रावळीत जेवण्याची शपथ घेतली. पण अखेरपर्यंत ते चित्तौडवर ताबा
मिळवू शकले नाहीत.
हल्दीघाटी
अशा तीव्र संघर्षाचा आणि प्रखर स्वाभिमानाचा इतिहास असलेल्या
चित्तौडगढाकडे आम्ही आता अग्रसर होत होतो. मग जगप्रसिद्ध हल्दीघाटी लागली.
खरोखरीच तिथे आजही हळदीसारखे खडक दिसून येतात. ही एक खूपच अरुंद खिंड आहे.
जेमतेम एक वाहन जाऊ शकेल असा डांबरी रस्ता त्यातून पलीकडे घेऊन जातो. बाहेर
पडल्यावर एक खासगी वस्तुसंग्रहालय आहे. त्यात हल्दीघाटीचा इतिहास
शिल्परूपाने अंकित करण्यात आलेला आहे. एक ग्रंथालयही आहे. तसेच तत्कालीन
चित्तौड साकार करणारे देखावेही आहेत. सोबतच स्थानिक पद्धतीच्या जेवणाचीही
सोय आहे. तिथे आम्हाला दाल-चुर्मा, बाजरीची भाकरी-ताडाचा गूळ-साजुक तूप,
छाछ इत्यादींसहित सुग्रास जेवण घेता आले.
महाराणा प्रताप यांचा घोडा चेतक, याला हत्तीची खोटीच सोंड जोडलेली असे.
हत्ती आपल्या पिल्लावर हल्ला करत नाही म्हणून हत्तीच्या हल्ल्यातून
वाचण्याकरता या युक्तीचा उपयोग होत असे. मानसिंगाच्या हत्तीवर चेतक चाल
करून गेला तेव्हा मात्र, मानसिंगाच्या हत्तीने, सोंडेत दिलेल्या तरवारीने
चेतकाच्या मागल्या पायावर गंभीर हल्ला केला. हेच वरील चित्रपट्टीतील
पहिल्या चित्रात दर्शवण्यात आलेले आहे. दुसर्या चित्रात महाराणा प्रताप
यांचे सेनापती हकीमखान सूरी, आदिवासींचे राजे राणा पुंजा आणि महाराणा
प्रताप यांचाच वेष घेऊन लढून शहीद झालेले झाला मान (हे महाराणा प्रताप
यांच्या प्रमाणे दिसत होते म्हणून त्यांच्यामुळे महाराणांचा प्राण वाचू
शकला होता.), हे महाराणा प्रताप यांचे तारक त्रिकूट दर्शवलेले आहे.
निशस्त्रावर हल्ला करायचा नाही हे महाराणा प्रतापाच्या स्वभावात एवढे
बिनलेले होते की, महाराणा प्रतापाच्या तरवारींची जेवढी काही म्याने मी
पाहिली तेवढी सगळी, दोन दोन तरवारींसाठी तयार केलेली आहेत असे आढळून आले.
प्रताप निशस्त्र शत्रूला एक तरवार लढण्यासाठी देत असत, आणि मगच त्याच्याशी
लढाई करत असत. त्यामुळे एका म्यानात दोन तरवारी नांदत नाहीत हा समजही
महाराणा प्रतापांच्या म्यानाने खोटा ठरवलेला आहे.
हल्दीघाटीच्या ग्रामीण वस्तुसंग्रहालयात जेवण करून मग आम्ही
नाथद्वारच्या श्रीनाथजी मंदिराकडे निघालो. नाथद्वारच्या मंदिरात बॅगा,
कॅमेरे, मोबाईल्स यांना परवानगी नसल्याने हे सर्व सामान बसमधेच ठेवलेले
होते. तिथल्या अफाट गर्दीत चटकन ओळखता यावे म्हणून सगळ्यांनी डोक्यांवर
सचिनच्या टोप्या घातलेल्या होत्या. नाथद्वार गावात खूपच अरुंद गल्ल्याबोळ
असल्याने बस दूरच उभी करावी लागली. श्रीनाथजी मंदिरात बाळकृष्णाची मूर्ती
असल्याने, देवाला दिवसात अनेकदा निरनिराळे भोग चढवण्यात येत असतात. भोग
चढवणे म्हणजे देवासमोर तर्हतर्हेचे नैवेद्य सुबक रचनेने मांडून ते देवास
अर्पण करणे. ही प्रक्रिया बराच काळ चालत असल्याने, सगळ्यांकरता खुल्या
दर्शनाच्या वेळा मर्यादित होतात. अशा दैनंदिन भोग चढवण्याच्या आणि दर्शनास
मंदीर खुले असण्याच्या वेळा आधीच नक्की केलेल्या असतात. सचिनच्या
प्रतिनिधींनी त्या आधीच माहीत करून घेतलेल्या होत्या.
आम्ही पोहोचलो त्या वेळी मंदीर पंधरा मिनिटे खुले राहणार होते. आम्ही
चालत चालत मंदिराजवळ पोहोचलो. सगळ्यांनी एकाच जागी पादत्राणे काढली. तिथे
सचिनचे प्रतिनिधी उभे होते. मंदिराच्या दरवाज्यासमोरच्या गर्दीत जाऊन उभे
राहिलो. स्त्रिया व पुरूषांचे प्रवेश निरनिराळ्या दरवाजाने होणार होते. या
मंदिरात दर्शन झाले तर झुंबडीनेच साध्य होते. नाहीतर भोग चढण्याची वेळ सुरू
होऊन दरवाजे बंद होतात व मग ते पुन्हा उघडण्याची वाट पाहत राहावे लागते.
अशी माहिती आम्हाला आधीच पुरवलेली असल्याने आम्ही डोंबिवलीकर गाडीत शिरतो,
त्या आवेशाने दरवाजा उघडताच समोर झेपावलो. दर्शन झाले. स्त्रिया व पुरूष
एकाच दरवाजातून बाहेर पडत होते. तिथून बाहेर आलो. मग सचिनतर्फे कुल्हडीतून
चहा पाजण्यात आला. तो खूपच चवदार आणि मधुर लागला. आजूबाजूच्या दुकानांतून
दुधातुपाच्या मिठायांचा वास येत होता. तो आसमंतात भरून राहिला होता. आम्ही
पुन्हा तसेच दहा पंधरा मिनिटे चालत बसमधे जाऊन पोहोचलो.
इथून आम्ही एकलिंगजी मंदिराकडे गेलो. हे मंदिर महाराजांच्या खासगी
मालकीच्या जागेवर असल्याने इथे निराळ्या प्रकारची सुरक्षा व्यवस्था आहे.
मंदिराचा बराचसा भाग पर्यटकांसाठी खुला नाही. दर्शनार्थ एक लांबच लांब रांग
होती. इतरही अनेक मंदिरे या मंदिराजवळच्या मंदिरसमूहात आहेत.
मार्गदर्शकाने त्यातील काही मंदिरे व्यवस्थित दाखवली. नंतर पुन्हा बसमधे
बसून आम्ही उदयपूरच्या मुख्य रस्त्यावरील सुभाषनगरातील “ओरिएंटल पॅलेस” या
हॉटेलात जाऊन राहिलो.
चौथा दिवसः उदयपूर
सहेलियों की बाडी
हल्लीच्या स्वरूपातील 'सख्यांचे घर' बाग, फतेहसागर तलावाच्या
बंधार्याच्या पूर्वेस, महाराजा फतेहसिंग यांनी इसवीसन १८८८ मधे बांधली
आहे. पूर्वी १६६८ मधे मिर्झाराजे जयसिंग यांनी जो मातीचा बंधारा इथे
बांधलेला होता, तो २०० वर्षांनंतर वाहून गेल्यामुळे हा बंधारा महाराज
फतेहसिंग यांना पुन्हा बांधून घ्यावा लागलेला होता. प्रफुल्लित कमळ
पुष्करण्या, लांब रूंद हिरवळींच्या विस्तीर्ण बागा, तर्हतर्हेच्या
रंगीबेरंगी फुलांचे ताटवे यांनी ही बाग सदा बहरलेली दिसते. पुष्करण्यांच्या
तीरांवर चहुबाजूंना संगमरवरी हत्ती आपल्या वळवलेल्या सोंडांतून
पुष्करणीतील कमळांवर कारंजी उडवत असतात. पक्षांच्या चोचींतून, हत्तींच्या
सोंडांतून आणि निरनिराळ्या सूप्त मुखांतून उत्साहाने उसळणारी कारंजी;
फतेहसागर तलावाच्या बंधार्यातून नैसर्गिक गुरूत्वीय शक्तीने संचालित
केलेली आहेत.
त्या कारंजांना उडवण्याकरता पंप वापरलेले नाहीत. कारंजी इथे इतक्या
मोठ्या संख्येने आहेत की या बागेस “कारंजांचा बाग” असेही म्हटले जाते. या
कारंजांच्या तुषारांनी सारी बागच भारित झालेली असते. पर्यटकास परी-राज्यातच
फेरफटका करतो आहोत असा आभास होतो. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण इथेच
झाल्याचे मार्गदर्शक सांगतात. इथेच पारंपारिक राजस्थानी पेहरावात फोटो
काढवून घेण्याचीही सोय आहे. इथले सारे वातावरणच भारून टाकणारे, अविस्मरणीय
आणि आनंदित करणारे आहे.
वरील चित्रपट्टीत डाव्या बाजूची छत्री काळसर संगमरमराची बनवलेली असली
तरीही धातूचीच वाटते. एवढे कौशल्य तिच्या घडणीत सामावलेले आहे. शिवाय
इतक्या नाजूक, काटकुळ्या खांबांवर टनावारी वजनाची छत्री शतकानुशतके कशी
तोलून धरली आहे हेही एक आश्चर्यच. उजव्या बाजूस दगडी हत्तीच्या सोंडेतून
उसळणारे कारंजे दिसत आहे तर त्याचे खाली पक्षाच्या चोचीतून कारंजाचे तोंड
घडवलेले दिसत आहे.
फतेहसागर तलावात तीन बेटे आहेत. चार वर्ग किलोमीटर क्षेत्रफळाच्या
मोठ्या बेटावर नेहरूपार्क आहे. त्यावर लोकप्रिय उद्यान, उपाहारगृह तसेच
प्राणीसंग्रहालयही आहे. तिथे जाण्याकरता मोतीमगरीच्या पायथ्यापासून मोटार
बोटींची सोय आहे. दुसर्या ०.०६ वर्ग किलोमीटर क्षेत्रफळाच्या लहान बेटावर
सार्वजनिक उद्यान आहे. तिसर्या १.२ वर्ग किलोमीटर क्षेत्रफळाच्या बेटावर
'उदयपूर सौर वेधशाळा (Udaipur Solar Observatory-USO)' वसवलेली आहे.
नगरमहाल (सिटीपॅलेस)
उदयपूर नगर, महाराज उदयसिंगांनी वसवले. चित्तौड अकबराचे हाती गेल्यानंतर
मेवाडची राजधानी उदयपूरच राहिली. या नात्याने इथे राजमहाल असणे साहजिकच
आहे. मात्र मी भारतात इतरत्र पाहिलेल्या राजप्रासादांचे मानाने उदयपूरचा
राजप्रासाद भव्य, दिव्य आणि वैभवशाली ठरला. इथल्या राजवाड्याचे वैशिष्ट्य
म्हणजे इथली कलाकुसरींनी नटलेली दालने आणि इथली भव्यता. स्फटिकसज्जा
(crystal galary) हे इथले आणखी एक आकर्षण. राजवाड्याच्या फतेह पोल मधून
बाहेर पडल्यावर समोरच्या तलावात दिसणारा जलमहालही इथले आकर्षणच ठरावा.
प्रथम आम्ही वरच्या मजल्यापर्यंत फिरून राजवाडा पाहिला. तिथे एका दर्शनीय
प्रवेशद्वारावर बसवलेले स्फटिकतुरे सोन्यासारखे पिवळेधमक झळकत होते.
राजप्रासादाच्या भिंती काचा व निरनिराळ्या रंगछटांचे दगड जडवून सुशोभित
केलेल्या होत्या. कित्येक ठिकाणी तर त्या त्या दालनाची प्रवेशद्वारे
ऋतुमानानुसार रंगछटांनी सजवण्याकरता विशिष्ट रंगाच्या संगमरवराचा सुबकतेने
वापर दिसत होता. काचा जडवून तयार केलेले मोर तर अद्वितीयच होते. शुभ्र
संगमरवराचे सुंदर हत्ती प्रवेशद्वाराशी झुलत होते.
या चित्रपट्टीत वरच्या बाजूला प्रवेशद्वारावरील संगमरमरी हत्ती,
दारावरले स्फटिकतुरे, ऋतूनिदर्शक सज्जासजावट दिसत असून खालच्या बाजूला
लाकडी चौकटीच्या सजावटीचे दार, काचा जडवलेली सालंकृत भिंत आणि रत्नजडित
कलाकुसरीने घडवलेले मोराचे चित्र दिसत आहेत.
उदयपूरच्या नगरप्रासादातील दरबार दालन. इथेच आमचे चहापान झाले. नंतर
श्राव्यसहल यंत्र सोबत घेऊन आम्ही दरबार दालन तसेच स्फटिक सज्जेची
(क्रिस्टल गॅलरीची) प्रदक्षिणा केली.
दरम्यान दरबार दालनात आमचे चहापानाने स्वागत करण्यात आले. मात्र इथे
कॅमेरा नेण्यास परवानगी नसल्याने चित्रे दाखवता येणार नाहीत. त्यांच्याच
माहितीपत्रकावरचे एक चित्र इथे देत आहे त्यावरून दरबार दालनाची कल्पना करता
येईल. दालनाच्या भवताली पत्रकारसज्जा असते तशी दीर्घा, पहिल्या मजल्यावर
होती.
तिच्या प्रदक्षिणामार्गात जागोजाग स्फटिककाचेची तसेच पैलू पाडलेल्या
काचेची (कट ग्लास) विविध भांडी (चहापानाची भांडी, अत्तरदाण्या,
गुलाबदाण्या, हळदीकुंकवाची भांडी, कप, बशा, पेले, दारूचे प्याले, बाटल्या
इत्यादी अनेकविध वस्तू), उपकरणे, बैठकीचे सामान (मेज, खुर्च्या, घडवंच्या,
दिवाण, चौरंग, पाट, पायदाने, तिवया व इतर अनेक ज्यांची नावेही आठवत नाहीत)
अशा नानाविध वस्तू काचेच्या कपाटांतून बैजवार मांडून प्रदर्शित केलेल्या
होत्या. त्या त्या जागांवर लिहिलेले क्रमांक आपापल्या श्राव्य उपकरणांच्या
कळांवर दाबले असता कानाला लावलेल्या श्रवणसंचातून त्या त्या विभागाची
माहिती इंग्रजीतून ऐकू येण्याची सोय होती. आजूबाजूच्या ऐश्वर्याने दिपून
जात आणि भवतालच्या गर्भश्रीमंती थाटाने भारावून जातच आम्ही तिथून बाहेर
पडलो.
उदयपूरचा जलमहाल. याचेबाबत इतकेच सांगता येईल की याची वर्णने करतांना
मार्गदर्शक थकत नाहीत, कित्येक चित्रपटांची चित्रीकरणे इथेच झालेली आहेत,
आणि श्रीमंतातले श्रीमंत चित्रपट अभिनेते, अभिनेत्या इथे राहण्यास कायमच
उत्सुक असतात.
बाहेर संध्याकाळ व्हायला आलेली होती. जलमहालावर संध्याकाळचे ऊन पडून
अवर्णनीय शोभा उदयास आलेली होती. आता आमच्या हातात आमचे कॅमेरेही आलेले
होते. मग काय विचारता. आतापर्यंत दाबून ठेवलेली प्रकाशचित्रणाची हौस
प्रत्येकाने असंख्य चित्रे काढूनच भागवून घेतली. तर कित्येकांनी मनःपूत
चलतचित्रणही करून घेतले.
संध्याकाळी आम्ही उदयपूरच्या सूरजपोल ते हाथीपोल दरम्यानच्या बाजारात
खरेदीप्रीत्यर्थ गेलो खरे. मात्र रविवारचा दिवस असल्याने बराचसा बाजार बंद
होता. त्यामुळे काहीसा हिरमोड झाला. दुसर्या दिवशी सकाळी चित्तौडगढ पाहून
संध्याकाळी अजमेरपर्यंतचा प्रवास करून ख्वाजा मुईनुद्दीन चिस्तीचा दर्गा
पाहायचा व शेवटास पुष्करच्या हॉटेलात जाऊन मुक्काम करायचा होता. म्हणून
आम्ही जरा लवकरच बिछाने गाठण्याचा बेत निष्ठेने अंमलात आणला. आमच्या
सार्या एकवीस प्रवाशांपैकी सारेच्या सारेच अतिशय वक्तशीर असल्यामुळे कधी
कुणामुळे पाच मिनिटे उशीर झाला असे झालेच नाही. हे एक सुखद आश्चर्य होते.
याचकरता आमचा हा गट आमच्याकरता अविस्मरणीय ठरला आहे. शिवाय उत्साहही एवढा
की प्रत्येकजण गुरूशिखरावरही चढून गेलेला होता. इथे हेही नमूद करणे गरजेचे
आहे की विशीतले फक्त तीन जण होते. इतर सर्व पन्नाशी-साठीच्या घरातले.
पाचवा दिवसः चित्तौडगढ, अजमेर
सकाळीसच बाहेर पडून आम्ही चित्तौडगढाची वाट चालू लागलो. चित्तौडगढला
पोहोचल्यावर हॉटेल मीरामधे आम्ही ताजेतवाने झालो. तिथे पोहोचून सहा सीटर
रिक्षा केल्या. कारण बसला चित्तौडगढात फिरण्याची परवानगी नव्हती. या रिक्षा
आपल्याकडच्या तीन सीटर रिक्षांप्रमाणेच असून आपल्याकडे जी सामानाकरता जागा
असते ती पाठीमागून उघडी ठेवून पाठीकडे तोंड करून बसण्याची आणखी तीन
व्यक्तींची सोय केलेली असते. चित्तौडगढात अशाच रिक्षा सर्वत्र फिरतांना
दिसत होत्या. सर्वात प्रथम आम्ही कुंभा महालाकडे गेलो. त्याच्या ओवरीतच
मार्गदर्शकाने इथल्या भागाचा इतिहास सांगितला. राणा कुंभा हे सूर्यवंशी
होते. सूर्योदय पाहण्याची त्यांची प्रथा होती. याकरता खास जागा तयार केलेली
असे. तिला सूरज-गोखरा म्हणत. ओवरीतूनच तो कुंभा महालचा सूरज गोखरा दिसत
होता. मग दिसला तो कुंभा महालाचा चबुतरा. इथून खाली गावाकडे जाण्याकरता
भुयार आहे, असे मार्गदर्शक सांगत होता. आता मात्र ते बंद करून ठेवलेले आहे.
त्यानंतर आम्ही पट्टा हवेली पाहिली. वाटेत एका जागी एक कमळपुष्पासारखा
घडवलेला दगड दिसला. तो बहुधा कुठल्याशा पुष्करणीतील कारंजाकरता घडवलेला
कारंजमुखाचा दगड असावा. इथेच आम्हाला एक मुंगूस ऐटीत फिरतांना दिसले होते.
विजयस्तंभाच्या सर्वोच्च कक्षातील छतावरील नेत्रदीपक कला कुसर.
मग पुन्हा रिक्षांमधे बसून आम्ही विजयस्तंभाकडे गेलो. इथेच सतीचे मैदान
दिसले जिथे इतिहासात तीन वेळा जौहार करण्यात आलेला होता. गोमुखातून शिवास
अभिषेक होतो ते मंदिर. त्याचे शेजारचा जलाशय, चित्तौडगढाची तटबंदी इत्यादी
पाहून मग आम्ही विजयस्तंभावर चढून गेलो. स्तंभावरून संपूर्ण चित्तौडगढाचे
विहंगम दृश्य नजरेत येते.
नंतर पुन्हा एकदा रिक्षात बसून आम्ही पोहोचलो पद्मिनी महालाजवळ. तिथल्या
एका महालाच्या प्रवेशद्वारावरही स्फटिकतुरा बसवलेला दिसला. हा मात्र
काचेसारखाच पारदर्शक दिसत होता. तिथला राजप्रासाद पाहिला. मार्गदर्शकाने,
अल्लाऊद्दीन खिलजीला पद्मिनीचे दर्शन आरशातून कसे घडवण्यात आले त्याचे
कृतीसह निरूपण केले.
अखेरीस रिक्षात बसून आम्ही कुंभास्वामी मंदिराचे प्रवेशद्वाराशी
पोहोचलो. या संकुलात दोन मंदिरे आहेत. मीराबाईंचे आणि कुंभास्वामींचे.
मीराबाईंच्या मंदिरासमोर मीराबाईंच्या गुरूंचे स्मारक बांधलेले आहे. समोरच
मीराबाईंचे मंदिर आहे. मीराबाईंची मूर्ती छान सजवून ठेवलेली दिसत होती.
कुंभास्वामी मंदिराच्या डाव्या भिंतीवरची गणेशाची मूर्ती छान दिसत होती,
तिचा फोटो काढला. कुंभास्वामी मंदिरासमोर गरुडाची मूर्ती आहे, ती बघितली.
कुंभास्वामी मंदिराचे विशाल स्तंभ पाहत मग आत शिरलो. कुंभास्वामी मंदिरात
मूर्ती तीन आहेत. बलराम, कृष्ण आणि राधा. परततांना 'हॉटेल मीरा' पाशी
पुन्हा बसमधे बसलो आणि पुष्कर मार्गावरील हॉटेल वूडलँडमधे जाऊन जेवण घेतले,
आणि अजमेरचे रस्त्याला लागलो.
रात्री आठचे सुमारास अजमेरमधे पोहोचलो. शहरात अरुंद रस्ते आणि वाहतुकीचे
गुंतागुंतीचे नियम असल्यामुळे बस दूरवरच सोडावी लागली. तिथून एका लहान
मेटॅडोरमधे बसून पंधरा मिनिटे प्रवास केल्यावर आम्ही ख्वाजा मुईनुद्दिन
चिस्ती यांच्या दर्ग्याच्या जवळपास जाऊन पोहोचलो. आजूबाजूच्या दुकानांतून
कधी न पाहिलेले खाण्यापिण्याचे पदार्थ, पूजेचे साहित्य, जूती-मोजड्या
इत्यादींची दुकाने दिसत होती. दर्ग्यात बॅगा, कॅमेरे, मोबाईल्स यांना
परवानगी नसल्याने हे सर्व सामान बसमधेच ठेवलेले होते. दर्ग्यात जातांना
डोके झाकलेले असावे लागते म्हणून आणि तिथल्या अफाट गर्दीत चटकन ओळखता यावे
म्हणून सगळ्यांनी डोक्यांवर सचिनच्या टोप्या घातलेल्या होत्या. आपल्या
मंदिरांतून पंडे असतात तसेच इथेही असतात. त्यांना 'खादिम' म्हणतात.
सचिनतर्फेही एक खादिम नेमण्यात आलेला होता. मग ज्या कुणाला फुले, चादर
इत्यादी चढवायचे होते त्यांनी ते खादिमाच्या सल्ल्याने विकत घेतले.
दर्ग्यात जाण्याकरता तिकीट नाही. मात्र गर्दी खूपच असते. म्हणून
काळजीपूर्वक निवडलेल्या रात्री साडेआठच्या वेळीही खूपच गर्दी होती. दर्गा
चौरस खोलीत असून सभोवती स्टेनलेस स्टीलचे कठडे बांधलेले आहेत. कठड्यांच्या
आत खादिम उभे असतात. बाहेरून प्रदक्षिणा घालत समोर समोर सरकत चालावे लागते.
कठड्यास लगटून दर्ग्याकडे तोंड करून खूपशा स्त्रिया ख्वाजांना आपले
गार्हाणे घालत होत्या व म्हणूनच तिथून हलायला तयारच नव्हत्या. तसेच
भिंतींशी खेटून मुसलमानी क्रोशाच्या टोप्या घातलेले भक्तगण दर्ग्याकडे तोंड
करून, निरनिराळी स्तोत्रे पुटपुटत होते, तर काही अनिमिष नेत्रांनी
दर्ग्यास पाहत होते. या दोन ओळींमधून प्रवेश करणार्या भक्तांना कशीबशी वाट
काढावी लागत होती. तिरुपतीच्या मंदिरात असतात तसे भक्तांना पुढे पुढे
ढकलणारे पुजारीही कुठे दिसत नव्हते. त्यामुळे दर्ग्यास गार्हाणे घालत
जागीच खिळून राहणार्या भक्तांचे पाठी सारीच गर्दी अडून राही.
त्यातच आम्हाला असे सांगण्यात आलेले होते की मुद्दाम गर्दी करून
पाकीट-पर्स पळवण्याचे प्रकारही इथे घडत असतात. म्हणून आम्ही सगळेच सतर्क
होतो. स्त्री-पुरूषांना एकाच चिरटोळीतून मार्ग काढावा लागत असल्याने खूपच
लोटालोटी होत होती. हळूहळू पुढे सरकत आम्ही चाललो होतो. आम्ही गर्दीच्या
रेट्याने सावकाश पुढे सरकत दर्ग्यातून बाहेर पडलो. बाहेर आमचा खादिम आमची
वाटच पाहत होता. त्याने मंत्र पुटपुटत, प्रत्येकाचे गळ्यात गंडा बांधला.
ऊर्दूत म्हटलेल्या त्या मंत्राचा अर्थ 'आम्ही तुझ्या दरबारात लावलेली हजेरी
कबूल करून घे' असा असावा, असा माझा समज झाला. मात्र सर्व धर्मी लोकांच्या
श्रद्धेस पात्र ठरलेल्या बाबांच्या दर्ग्यास प्रत्यक्ष भेट दिल्याचे समाधान
मनात होते. दर्ग्याबाबत अधिक माहिती त्यांच्या http://khwajagharibnawaz.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. रात्री नऊचे सुमारास आम्ही 'हॉटेल मास्टर्स पॅराडाईज' या पुष्करच्या हॉटेलात पोहोचलो.
सहावा दिवसः पुष्कर, रणथम्भोर
पुष्करचे आमचे 'हॉटेल मास्टर्स पॅराडाईज' कलाकुसरीने परिपूर्ण होते.
ब्रह्मदेवाच्या मंदिरात कॅमेरा नेता येत नसल्याने, आम्ही पुष्करला
काढलेल्या फोटोंपैकी बहुतेक फोटो या हॉटेलातीलच आहेत. तिथे तरण तलाव होता.
कलापूर्ण बैठका, दिवे, स्तंभ, शिल्पे इत्यादींनी सजवलेले, हिरव्यागार
हिरवळींनी परिपूर्ण, असे उद्यान होते. आवळ्या, पपयांनी लगडलेली झाडे होती.
सकाळी उठून फेरफटका करतांना आवळ्यांच्या झाडांखाली हिरव्या-पोपटी, ताज्या
आवळ्यांचा सडाच पडलेला होता. आवळे खाण्याची परवानगी विचारल्यावर, हवे तेवढे
आवळे घ्या असे सांगण्यात आले होते. म्हणून प्रत्येकाने शक्य तेवढे आवळे
चाखले, जमतील तेवढे सोबत घेतले. तरीही जमिनीवर सडा पडलेला दिसतच होता. धन्य
ते आवळे आणि धन्य त्या बागेचे करविते. माळीकाका सर्वप्रकारची फुले खुडून
हार तयार करत बसलेले होते. दवबिंदूंनी ओल्या झालेल्या हिरवळीवर मोठमोठी
कासवे मजेत विहरत होती. वातावरणात प्रसन्नता कशी आणता येते याचा जणू
जिताजागता वस्तुपाठच होता तो. मी अनेक हॉटेलांत आजवर राहिलेलो आहे, तरीही
बाहेर पडतांना "तुमचे हॉटेल चांगले आहे हो!" असा अभिप्राय व्यक्त
करण्यापासून मी स्वतःला रोखू शकलो नाही.
या चित्रात हॉटेलातील खोलीच्या भिंतीवरील, सळईच्या जोडकामातून
घडवलेली युवती, आवळ्यांनी लगडलेले झाड, दगडातून कोरून तयार केलेला बाक आणि
हिरवळीवर विहरणारे कासव दिसत आहे.
नंतर आम्ही पुष्कर सरोवरावर गेलो. सावित्री घाटावर सचिनने नेमलेल्या
पुजार्याकरवी इच्छुकांनी पूजा केली. मात्र पुष्कर तलावात पाणीच नव्हते.
साफसफाईचे काम सुरू असल्याने पाणी दूरवर अडवून ठेवलेले होते. जे.सी.बी.
यंत्रे दगड-माती-गाळाची उठाठेव करत होती. आम्हाला वेळ कमी असल्याने पुष्कर
सरोवराच्या पाण्यात डुबकी घेणे, किमान पाय बुडवणे हे काही साधले नाही. मग
आम्ही ब्रह्मदेवाच्या मंदिरात गेलो. दर्शन घेतले. उंटगाड्या बघितल्या. उंट
पाहिले. उंटावर बसून घेतले. ऊंटांच्या कातड्याच्या जूती, मोजड्या पाहिल्या,
विकत घेतल्या. आज रणथंभोरपर्यंतचा मोठा प्रवास करायचा असल्याने मग आम्ही
बसमधे बसून रणथंभोरकडे कूच केले.
रणथंभोरला पोहोचता पोहोचता रात्र झाली. आम्ही हमीर रिसॉर्ट ह्या
प्रसिद्ध हॉटेलात उतरलेलो होतो. दुसर्या दिवशी सकाळी रणथंभोरच्या
अभयारण्यात कँटरने फेरफटका करायचा असल्याने आज लवकरच निजायला लागणार होते.
सातवा दिवसः रणथम्भोर, चोखी धानी (जयपूर)
सकाळी सकाळी उठून तयार होऊन आम्ही सगळे बाहेर उभे होतो. मग वीस सीटर
कँटर गाड्या आल्या. स्थानापन्न होऊन आम्ही अभयारण्याकडे निघालो. दवबिंदूंनी
ओलसर झालेले गवत, धूसर प्राचीतून अलगद डोकावत असणारे सूर्यबिंब, मंद गार
वारा अशा उत्साहवर्ध वातावरणात कॅमेरे सज्ज करून आम्ही हळूहळू अरण्यात
शिरलो. समोरच रणथंभोरचा किल्ला सारखा दर्शन देत होता. तो चढून जाणे सहलीत
अंतर्भूत असायला हवे होते असे वाटू लागले. खूप मज्जा आली असती. असो.
सध्यातरी त्याच्या सान्निध्यातूनच आम्ही वाट चालत होतो. अचानक हिरवळीत,
झाडाझुडूपांत मोर दिसू लागले. झाडावर बसलेले एक घुबडही दिसले. एका नैसर्गिक
जलाशयाच्या तीरावर उगवत्या हिवाळ्याची प्रसन्न सकाळ अलगद अवतरत होती. इथे
नक्कीच काहीतरी पाहायला मिळणार म्हणून कँटर थांबले. मार्गदर्शकाने हातावर
बिस्किटाचे तुकडे धरले. आणि काय आश्चर्य, सोनचिडिया म्हणून ओळखला जाणारा एक
कावळ्याहून किंचित लहान आकाराचा दिमाखदार पक्षी हातावर बसून ते तुकडे टिपू
लागला. त्याच सोनचिडीयाचा हा फोटो.
सारे दृश्यच भारलेले होते. सकाळच्या अरण्यातले तर्हतर्हेचे आवाज,
किलबिल अनोखी वातावरणनिर्मिती करत होते. आम्ही पुढे निघालो. वाघ दिसेल अशी
अपेक्षा होती. मात्र वाघ दिसला नाही. काळतोंडी माकडे भरपूर दिसली. तसेच
अस्ताव्यस्त पसरलेले वटवृक्षही इतस्ततः विखुरलेले दिसत होते. आतापर्यंत
पाहिलेल्या मेवाडातील भूमीवर एवढे विशालकाय वृक्षच आम्ही बघितलेले नव्हते.
इथे मात्र भव्य वडाची झाडे सर्वत्र दिसून येत होती. दोन तासांनी आम्ही
परतलो.
जेवण झाल्यावर दुपारी जयपूरच्या "चोखी धानी"मधे जायचे होते. जेवणही
तिथेच होणार होते. हाही प्रवास तसा मोठाच होता. मात्र आता एखादा तास वेळ
होता. शेजारीच हस्तकलेच्या वस्तुंचे एक दुकान होते. तिथे जाऊन मनसोक्त
खरेदी केली. कोरीव लाकडाच्या वस्तू, कपडे, रणथंभोरच्या शिक्क्यांचे,
बोधचिह्नांचे रेशमी भरतकाम केलेले टी-शर्ट, बांधणीचे कापड इत्यादी.
मराठीत आपण राजाच्या गावाला "राजधानी" म्हणतो. हा शब्द मराठीला
राजस्थानी भाषेची मिळालेली देणगी आहे. धानी म्हणजे गाव. राजाचे गाव म्हणून
राजधानी. तसेच चोखीधानी म्हणजे चोख, खरेखुरे गाव. नमुनेदार राजस्थानी गाव.
मात्र "चोखीधानी" या नावाच्या हॉटेलांचा एक गटच आहे. आणि निरनिराळ्या
शहरांतून तो "चोखीधानी" हॉटेल चालवत असतो. हल्लीच पुण्याजवळच्या
"चोखीधानी"त जाऊन आल्याचे, आनंद घारे यांचे वर्णन वाचल्याचे आठवते. मागे मी
इंदौरजवळच्या "चोखीधानी"तही गेलो होतो त्याचीही आठवण जागवली गेली.
दक्षिणेकडून जयपूर शहरात शिरतांना, टोंक रस्त्यावर डाव्या बाजूला चोखीधानी
वसलेले आहे.
आठवा दिवसः जयपूर
जयपूरचा इतिहास
जोधाबाईः उर्फ मरिअम उझ-झमानी बेगम साहिबा, उर्फ राजकुमारी हिरा
कुमारी साहिबा, उर्फ हरखा बाई (जन्मः ऑक्टोंबर १, १५४२, मृत्यूः १६२२)
जोधाबाई उर्फ मरिअम उझ-झमानी बेगम साहिबा, उर्फ राजकुमारी हिरा कुमारी
साहिबा, उपाख्य हरखा बाई, ही एक राजपूत राजकन्या होती, जी मुघल सम्राज्ञी
झाली. कच्छ्वाह राजपूत, अंबरचे राजे, राजे भारमल यांची ती ज्येष्ठ कन्या
होती.
विक्रमादित्याच्या नवरत्न दरबारातील नवरत्ने होती धन्वंतरी, क्षपणक,
अमरसिंह, शंकू, वेताल भट्ट, घट कर्पर, वराह मिहीर, वररुची आणि कालिदास.
त्याचप्रमाणे अकबराच्या दरबारातही नवरत्ने असायची असा समज आहे. ती नवरत्ने
म्हणजे अकबरनामा, आईने-अकबरी या ग्रंथांचा रचयिता तसेच बायबलचा पर्शियन
अनुवादकार अबुल फजल; लीलावती या हिंदू गणितविषयक ग्रंथाचा अनुवादकर्ता, कवी
फैझी, जो अबुल फजल याचा भाऊही होता; मियाँ तानसेन उर्फ तन्ना मिश्रा;
महेशदास उर्फ राजा बिरबल, हा एक कवीही होता त्याच्या रचना भरतपूरच्या
वस्तुसंग्रहालयात सुरक्षित आहेत; राजा तोडरमल जो अकबराचा महसुली विभाग
सांभाळत असे व ज्याने प्रमाणित वजने व मापे सुरू केली; अंबरचा राजा
मानसिंग; अब्दुल रहीम खान-ए-खाना हा अकबराच्या कुमारवयातील पालनकर्त्या
बैरामखानाचा मुलगा होता; फकीर अझिआओ-दिन हा गूढवेत्ता आणि मुल्लाह दो पिआझा
हा विद्वान.
जोधाबाई या नवरत्नांतील राजा मानसिंग यांची आत्या. जोधाबाईचा अकबराशी
विवाह झालेला असल्याने अंबरच्या राजांना मुघल दरबारात मानाचे स्थान प्राप्त
झालेले होते. अकबर मानसिंगास "फर्जंद" म्हणजे पुत्र मानत असे. त्यास
त्याने ७ हजारी (सर्वोच्च) मनसबदारी दिलेली होती. अकबराचे वतीने महाराणा
प्रताप यांचा, हल्दीघाटीत, याच मानसिंगाने पराभव केला होता. मानसिंगाच्या
मृत्यूनंतर त्याचा पुत्र भाऊसिंग गादीवर बसला. भाऊसिंगांनंतर त्यांचे
पुतणे, मिर्जाराजे जयसिंग अंबरचे राजे झाले.
मिर्झा राजे जयसिंग (जन्मः जुलै १५, १६११, मृत्यूः ऑगस्ट २८, १६६७)
जयसिंग वयाच्या १० व्या वर्षी अंबरचे राजे झाले. पुढे १६२७ मधे
शहाजहानच्या राज्यारोहणप्रसंगी, जयसिंगांच्या दक्षिणेतील सुभेदाराने -खान
जलाल लोदी- याने बादशाही सत्ता झुगारून दिली असता जयसिंगांनी ते बंड शमवले.
याखातर त्यांस ४ हजारी सरदार करण्यात आले. त्यानंतर १६३६ मधे शहाजहानने
दक्षिणेतील सल्तनतींविरुद्ध उघडलेल्या अभियानांतर्गत गोंडांवरील लढाईत
गाजवलेल्या शौर्याखातर जयसिंगांस ५ हजारी सरदार करण्यात आले. १६३८ मधे
कंदाहारच्या किल्ल्यावर विजय मिळवतांना शहाजहानने ५०,००० फौज जमा केलेली
होती. या प्रसंगी जयसिंगांस "मिर्झाराजे" हा किताब देण्यात आला. १६५७ मधे
शहाजहान गंभीररीत्या आजारी पडल्यावर त्याच्या मुलांमधे सत्तासंघर्ष सुरू
झाला. गुजरातमधील पुत्र मुराद व बंगालातील पुत्र शुजा यांनी स्वतःच स्वतःस
सम्राट घोषित केले. आग्र्यातील सर्वात मोठा मुलगा दारा याने जयसिंगांस ६
हजारी सरदार करून, दिलेरखान पठाण सोबत आपला मुलगा सुलेमान याचेबरोबर
बंगालात शुजाचे बंड शमवण्याकरता पाठवले. दरम्यान औरंगजेबाने धर्मत आणि
समूगढच्या लढाया जिंकून आग्र्यावर ताबा मिळवला होता. हे पाहून जयसिंग व
दिलेरखान यांनी औरंगजेबाची सत्ता मान्य केली. तेव्हा औरंगजेबाने जयसिंगांस ७
हजारी (सर्वोच्च) सरदार नेमले. पुढे १६५९ मधे शिवाजीने अफजलखानाचा वध केला
आणि १६६३ मधे शाहिस्तेखानाची बोटे कापली. नंतर १९६४ मधे शिवाजी महाराजांनी
सूरतेची लूट केली. तेव्हा औरंगजेबाने जयसिंगांस ४४ हजाराची फौज देऊन
शिवाजीच्या बंदोबस्तास पाठवले. पुरंदरचा तह झाला आणि शिवाजी महाराजांना
आग्र्यास जावे लागले. मात्र विजापूरच्या मोहिमेस अपेक्षित यश न मिळाल्याचे
कारण देऊन औरंगजेबाने जयसिंगांस खूप अपमानित केले. पुढे औरंगजेबाच्या
आज्ञेने जयसिंगांस विषप्रयोग करण्यात आला असा प्रवाद आहे. या सार्या
प्रकारामुळे जयसिंगांच्या मुलांच्या उन्नतीसही खीळ बसली. जयसिंगांनंतर
त्यांचे पुत्र रामसिंग (पहिला) मिर्जाराजे झाले, तर त्यांच्यानंतर त्यांचे
पुत्र बिशनसिंग. बिशनसिंगांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र सवाई जयसिंग राजे
झाले.
महाराजा सवाई जयसिंग (द्वितीय) (जन्मः नोव्हेंबर ३, १६८८, मृत्यूः सप्टेंबर २१, १७४३)
उंच अवकाशातून राजस्थान पाहत पाहत खाली येत गेल्यास, सर्वात वयस्कर अशा
अरवली पर्वतांच्या बेलाग कड्यावर वसलेले अंबर (amber, आम्बेर, आमेर) व जयगड
किल्ले दृष्टीत भरू लागतात. तत्कालीन आसपासच्या परिसरावर राज्य करण्यास
योग्य अशा प्रकारे उंचावर, अंबरात वसवलेला डोंगरी किल्ला तो "अंबर". तीच
तत्कालीन अंबर साम्राज्याची राजधानी होती. अंबर राज्यात सूर्यवंशी राजपूत
असलेल्या कच्छवाह घराण्याचे राज्य होते. १६९९ मधे महाराज बिशनसिंग यांचा
देहांत झाला त्यावेळी त्यांचे पुत्र महाराज जयसिंग, जे त्यावेळी केवळ ११
वर्षे वयाचे होते, ते अंबरच्या गादीवर बसले. "खेलना" इथली लढाई
जिंकल्याखातर बक्षिसी म्हणून औरंगजेबाने त्यांना "सवाई" हा किताब दिला
म्हणून ते सवाई जयसिंग म्हणूनही ओळखले जातात. हेच महाराजा जयसिंग
(द्वितीय), मिर्जाराजे जयसिंग यांचे पणतू होत. १७४३ मधे ५४ व्या वर्षी
त्यांचा मृत्यू झाल्यावर त्यांचा अंत्यसंस्कार जयपूरच्या उत्तरेस असणार्या
गायतोड येथील राजेशाही घाटावर करण्यात आला. त्यांचे नंतर त्यांचे पुत्र
ईश्वरीसिंग गादीवर बसले.
१६७९ मधे औरंगजेबाने बसलेला जिझिया कर १७२० मधे सम्राट महंमद शाह
यांचेकरवी रद्द करवून घेण्यात सवाई जयसिंग द्वितीय, यांनी महत्त्वाची
भूमिका बजावली. गयेत हिंदू यात्रेकरूंवर बसवलेला करही यांचे शब्दाखातरच
हटवण्यात आला. यांनीच अनेक शतकांनंतर पुन्हा अश्वमेध (१७१७) आणि वाजपेय
(१७३४) यज्ञ केले. ते निंबार्क संप्रदायाचे अनुयायी होते. सतीची प्रथा बंद
करणे, लग्नांतील खर्चिकतेस आळा घालणे इत्यादी समाजोद्धारक कार्यांमुळे ते
लोकप्रिय झाले.
सम्राट महंमद शाह रंगीला यांच्या दरबारातील, शाही प्रस्थानास मुहूर्त
शोधण्याकरता झालेल्या कालनिश्चितीबाबतच्या चर्चेस साक्षी राहिल्यानंतर
महाराज जयसिंग यांना अवकाशवेधांच्या अभ्यासाची गरज भासली. अशा प्रकारच्या
अभ्यासास प्रोत्साहन देऊन त्यांनी पाच अवकाशनिरीक्षण वेधशाळा प्रस्थापित
केल्या. दिल्ली, मथुरा (त्यांच्या आग्रा प्रांताची राजधानी), बनारस, उज्जैन
(त्यांच्या माळवा प्रांताची राजधानी) आणि जयपूर येथे त्या वेधशाळा स्थापन
केलेल्या होत्या. त्यांना "यंत्रमंदिर" म्हणून ओळखले जात असे. त्याचा
अपभ्रंश होत होत त्यांना हल्ली "जंतर-मंतर" म्हणून ओळखले जाते. त्यापैकी
फक्त जयपूरची वेधशाळा अजूनही पूर्णपणे कार्यरत आहे. हिदू व मुस्लीम
अवकाशवेध शास्त्रांवर आधारित बांधलेल्या या वेधशाळा ग्रहणे व तत्सम अवकाशीय
घटनांचे पूर्वभाकीत करू शकत. त्यांत "रामयंत्र" (मध्यभागी गोलाकार स्तंभ
असलेली आकाशास खुली दंडगोलाकृती इमारत), "जयप्रकाशयंत्र" (अंतर्वक्र,
अर्धगोलाकृती इमारत), "सम्राटयंत्र" (प्रचंड संपातदर्शी अर्धवर्तुळाकृती
इमारत), "दिगांशयंत्र" (एका गोल स्तंभाभोवती उभारलेल्या दोन वर्तुळाकार
भिंती असलेली इमारत) आणि "नारीवलययंत्र" (दंडगोलाकृती भिंतीच्या आकाराची
इमारत) या यंत्रांचा समावेश होतो. त्यांनी युरोपातून पाचारण केलेले
ख्रिस्ती अवकाशशास्त्रज्ञ वापरत असत त्यांपेक्षाही, या वेधशाळांतील उपकरणे व
तंत्रे जास्त प्रगत आणि उच्च प्रतीची होती.
जयनगर (जयपूर) नगर वसवणे ही जयसिंगांची सर्वात महत्त्वाची कामगिरी होती.
विद्याधर भट्टाचार्य नावाच्या बंगाली स्थापत्यकलानिपूण
शिल्पशास्त्र्याच्या नियोजनाखाली १७२७ मधे पायाभरणी करून नव्या राजधानीचे
काम सुरू झाले. १७३३ मधे संपूर्ण नगर सज्ज होऊन, कच्छवाहांची राजधानी अंबर
मधून जयनगरात स्थलांतरित करण्यात आली. केवळ सहा वर्षांत जयपूरसारखे
नियोजनबद्ध नगर राहण्यायोग्य तयार करणे, ही आजच्या निकषांनीही अतुलनीय
कामगिरीच ठरावी. ३,००० वर्षांपूर्वीच्या पौराणिक संस्कृतींच्या शोधात
सापडलेल्या शहरांप्रमाणे, संस्कृत शिल्पसूत्रांबरहुकूम, नगरनियोजन केलेल्या
औरस-चौरस संरचनेत जयपूर नगर वसवलेले आहे.
वरील नकाशा पाहा. हा नकाशा राजस्थान सरकारच्या पर्यटनविभागाने २००४-२००५
मधे प्रसिद्ध केलेल्या नकाशातील जुन्या शहराचा केवळ तटबंदीतील भाग कापून,
१६ अंश घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवून तयार केलेला आहे. नजरेत भरणारी
नगररचना, भौमितिक विभागणी आणि शिस्तबद्ध रीतीने केलेली रस्त्यांची आखणी ही
याची वैशिष्ट्ये आहेत. सुरजपोल ते चॉंदपोल रस्ता पूर्व-पश्चिम नसून १६ अंश
दक्षिणेकडे कललेला आहे. याचे काय कारण असावे? जे असेल ते निश्चितस्वरूपाने
खगोलशास्त्रीय असावे असे मला वाटते.
हल्ली महाराज भवानीसिंग हे जयपूरचे महाराज आहेत. ते जयपूरच्या नगर
महालात राहत असतात. महालावर दोन झेंडे फडकत असलेले पाहून मी मार्गदर्शकास
त्याचे कारण विचारले असता त्याने महाराजांच्या "सवाई" या बिरुदाचा निर्वाळा
दिला. एक पूर्ण, आणि त्याचेच वर, एक चतुर्थांश आकाराचा दुसरा, असे दोन
ध्वज राजप्रासादावर फडकत असतात. १९७१ मधे संस्थानिकांचे तनखे बंद झाल्यावर
ही बिरुदे नावाचीच काय ती उरलेली आहेत. मात्र महाराज भवानीसिंग यांनी १९७१
च्या भारत-पाक युद्धात गाजवलेल्या शौर्याखातर त्यांना भारत सरकारने
"महावीरचक्र" देऊन सन्मानित केले आहे. पुढे १९९४ ते १९९८ दरम्यान ते
भारताचे ब्रुनेईतले उच्चायुक्तही राहिलेले होते.
इथले रेल्वेस्टेशन पश्चिम टोकाला आहे, तर हवाई अड्डा टोंक रोडवर दक्षिण
टोकाला आहे. जयपूर नगर दोन भागांत वसलेले आहे. तटबंदीच्या आतील ’गुलाबी
नगर’ आणि तटबंदीच्या दक्षिणेला वसलेले नवे जयपूर नगर. जयपूर शहराच्या
उत्तरेला ’अंबर’/’आंबेर’/’आमेर’ आणि ’जयगड’ किल्ल्यांना अंगाखांद्यांवर
घेऊन उभा आहे अरवली पर्वताचा बेलाग कडा. गुलाबी शहरातील सर्व इमारती, मग
त्या गुलाबी दगडांनी बांधलेल्या असोत वा नसोत, त्यांना गुलाबी रंग देणे
कायद्याने बंधनकारक केलेले असल्याने, शहराचा गुलाबी (खरे तर गेरुआ म्हणजे
गेरूचा) रंग सर्वदूर भरून राहिलेला दिसतो. राजस्थानात दरवाज्याला ’पोल’
म्हणतात. गुलाबी शहराच्या पश्चिमेकडील तटबंदीतील मुख्य दरवाज्याला
’चांद’पोल म्हणतात, तर पूर्वेकडील तटबंदीतील मुख्य दरवाज्याला ’सूरज’पोल
म्हणतात. दोन्ही दरवाजांना जोडणारा आडवा रस्ता गुलाबी शहरातला मुख्य रस्ता
होय. या रस्त्याच्या दोन्ही बाजूस गुलाबी नगर उभ्या-आडव्या रस्त्यांवर
प्रशस्तपणे वसलेले आहे. या रस्त्याच्या मध्यभागी ’इशारलट’ नावाचा उंच
जयस्तंभ आहे. महाराज ईश्वरीसिंग यांनी मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून तो
जयपूर शहराच्या मध्यभागी उभारण्यात आलेला आहे. गुलाबी शहराच्या
अतिपूर्वेला एक उंचसा डोंगर आहे. त्यावर एक प्रेक्षणीय स्थळ आहे, ते म्हणजे
’गलताजी’ उर्फ गालव मुनींचे मंदिर. इथून, चौरस सुनियोजित रस्त्यांतून
वसलेले जयपूर नगर अतिशय रमणीय दिसते. गुलाबी शहराच्या दक्षिणेकडील
तटबंदीतून मुख्य शहराकडे जाणारे तीन प्रमुख रस्ते आहेत. अजमेर रस्ता
’अजमेरी गेट’ मधून बाहेर पडतो. ’मोतीडुंगरी' उर्फ ’एमडी’ रोड मोतीडुंगरी
राजप्रासादाकडे घेऊन जातो. डुंगरी म्हणजेच टेकडी. हा राजप्रासाद उंच
टेकडीवर बांधलेला आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी तो पर्यटकांना पाहण्यासाठी
खुला असतो.
सकाळीसच आम्ही जयपूर मधील नगरप्रासाद पाहण्याकरता जाऊन पोहोचलो. राजमहाल
चौसोपी; प्रशस्त; पत्थरातील कोरीव काम, रंगकाम, नक्षीकाम आणि मीनाकाम
(काच, आरसे, निरनिराळ्या रंगच्छटांचे दगड तसेच रत्ने यांचे शुभ्र
संगमरवरावर केलेले जडावकाम) यांनी अलंकृत आणि सर्व सुखसुविधांनी परिपूर्ण
असाच आहे. पिढ्यानुपिढ्यांच्या समृद्धतेने सतत संपन्न होत राहिलेल्या अनेक
राजप्रासादांचा तो समूह आहे.
राजवाडा कळस-कमानींनी ठायी ठायी अलंकृत केलेला आहे. पुष्पवाटिकांनी
प्रफुल्लित केलेला आहे. विस्तीर्ण अंगणांनी प्रासादाच्या भव्यतेत भर
घातलेली आहे.
मोठमोठ्या भिंतीवर बहारदार नक्षिकाम करून, महिरपी, कमानींनी सजवून
महालास कलात्मकता आणलेली आहे. देवड्या, ओसर्या, दिवाणखाने, दालने, कक्ष,
इत्यादी सारा परिसर पाहता पाहता आपण आणखीही बराचसा भाग पाहिलेलाच नाही हेही
लक्षात येऊ लागले. सारा राजवाडा इतमामाने पाहायचा तर आवश्यक असणारा वेळ
आमच्याकडे नव्हता. (खरे तर कुठल्याच पर्यटकाकडे इतका वेळ नसतो की,
शतकानुशतके समृद्ध होत राहिलेला नगरप्रासाद भेटीच्या तुटपुंज्या वेळात,
मनाचे समाधान होईस्तोवर पाहता येईल.)
राजप्रासादाच्या समोरच आहे जंतरमंतर म्हणजेच "यंत्रमंदीर". आत प्रवेश
करताच मार्गदर्शकाने लघुसम्राटयंत्रावर तत्कालीन वेळ, सूर्यकिरणांमुळे
मधल्या भिंतीच्या वक्राकार-संगमरवरी-उताण्या-कमानींवर पडणार्या सावलीच्या
स्थानावरून, कशी सांगता येते ते कृतीसह दाखवून दिले. कमानींवर खोदलेल्या
मापनरेषा, २० सेकंदापर्यंतच्या कमीतकमी फरकाने, वेळ वर्तवू शकत होत्या.
तिथली अनेकविध यंत्रे कशी वापरायची ते शिकण्याकरता तिथे राहून संशोधन
करणारे विद्यार्थी आम्ही पाहिले. त्यांच्या पासंगास पुरेल एवढाही वेळ
आमच्यापाशी नव्हता. तरीही आपल्या संस्कृतिक समृद्धतेच्या वारशाचे भरभक्कम
पुरावे पाहून मन भरून आले. असलेच काहीतरी दैदिप्यमान आपल्यालाही करता यावे
अशी उमेद जागली. याच्यासारख्या स्थळांच्या पर्यटनाने साधण्यासारखे यापरता
जास्त काय असू शकेल.
जंतरमंतर नंतर जेवण उरकून आम्ही जयपूरच्या जलमहाच्या दिशेने कूच केले.
ऊन तापू लागले होते. जलमहालापर्यंत जाता येणारच नव्हते. मात्र तळ्याच्या
पाळीवरूनच जलमहालाचा फोटो काढता आला.
मग आम्ही अंबरच्या किल्ल्याकडे गेलो. बस जाऊ शकत होती तोपर्यंत बसने आणि
मग पुढे जीपने. मग खाली पायउतार होऊन किल्याच्या दिशेने चालू लागलो.
तटबंदीच्या काठाशी एक युवक पारंपारिक राजस्थानी पोशाखात एक स्थानिक वाद्य,
तालीन होऊन वाजवत असलेला दिसला. गाणेही ओळखीचे होते. नागीण सिनेमातले "मेरा
तन डोले, मेरा मन डोले, मेरे दिल का गया करार". आम्हीही ऐकू लागलो. त्याचे
चलचित्रणच केले. मग त्याला विचारले की ह्या वाद्याला काय म्हणतात? तो
म्हणाला "रावणहट्टा!".
माझा मावसभाऊ अजित डोंगरे आमच्या सोबत होता. तो बासरी-पावा खूप छान
वाजवतो. त्याला संगीतातली बर्यापैकी जाण आहे. मागे तो म्हणाला होता की अशा
प्रकारचे काही वाद्य अस्तित्वातच नसावे. म्हणून मी त्याला पुराव्यानिशी
"रावणहट्टा" दाखवले. त्याने ते विकत मिळू शकेल का विचारले. तो विकत आणून
द्यायलाही तयार झाला. आम्ही किल्ला पाहून येईपर्यंत त्याने एक वाद्य आणून
ठेवले होते. पण त्याच्या तारा, तुंबा आणि धनुष्य यांचा मेळ योग्य प्रकारे
बसत नव्हता म्हणून तो प्रयास मग तसाच सोडून द्यावा लागला. आमेर किल्ल्याचे
तपशीलवार वर्णन मी माझ्या यापूर्वीच्या जयपूरच्या प्रवासवर्णनात आधीच करून
ठेवलेले असल्याने इथे पुनरावृत्ती करत नाही.
--------- संपूर्ण ----------
जैसलमेर व तनोट
जैसलमेर जयपुरपासुन सुमारे ५८० किमी वर आहे.
राजस्थानचे वाळवंट (थर) हे जैसलमेर पासुन पुढे सुरु होते.
जैसलमेर चा किल्ला हा जगातील काही सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक मानला
जातो. हा किल्ला राजा रावल जैसवाल ह्याने ११५६ मध्ये बांधला. हा किल्ला थर
वाळवंटात त्रिकुट टेकडि वर स्थित आहे. हा किल्ला "yellow sandstone" मध्ये
बांधला असुन दिवसा हा किल्ला करडा तर संध्याकाळी सोनेरी दिसतो म्हणुन
ह्याला "Golden Fort" असेही म्हणतात.
(source: http://en.wikipedia.org/wiki/Jaisalmer_Fort)
प्रचि १
जैसलमेर चा किल्ला
-
-
-
प्रचि २
-
-
-
प्रचि ३
मुख्य सभागृहातील नक्षी
-
-
-
प्रचि ४
-
-
-
प्रचि ५
जैसलमेर शहर किल्ल्यावरुन
-
-
-
प्रचि ६
-
-
-
प्रचि ७
एका हवेली चा दर्शनी भाग.
-
-
-
प्रचि ८
जैन मंदिर. हे १२ व्या शतकातील मंदिर आहे.
-
-
-
प्रचि ९
मंदिराचे प्रवेशद्वार
-
-
-
प्रचि १०
-
-
-
प्रचि ११
-
-
-
प्रचि १२
खांबांवरील कोरीव काम
-
-
-
प्रचि १३
-
-
-
प्रचि १४
-
-
-
प्रचि १५
-
-
-
प्रचि १६
-
-
-
प्रचि १७
-
-
-
प्रचि १८
-
-
-
प्रचि १९
-
-
-
प्रचि २०
-
-
-
प्रचि २१
-
-
-
प्रचि २२
-
-
-
प्रचि २३
मंदिराचे प्रवेशद्वार. पॅनोरामा.
-
-
-
प्रचि २४
बडा बाग.
-
-
-
पवनचक्क्या
प्रचि २५
-
-
-
प्रचि २६
बडा बाग.
-
-
-
प्रचि २७
-
-
-
प्रचि २८
-
-
-
प्रचि २९
-
-
-
प्रचि ३०
थर चे वाळवंट. साम ला जाताना.
-
-
-
प्रचि ३१
वाळवंटातली संध्याकाळ.
-
-
-
प्रचि ३२
सुर्यास्त
-
-
-
प्रचि ३३
-
-
-
प्रचि ३४
-
-
-
प्रचि ३५
-
-
-
प्रचि ३६
-
-
-
प्रचि ३७
-
-
-
तनोट :
तनोट जैसलमेर पासुन १८० किमी वर येते. हि जागा बरिचशी थर वाळवंटाच्या मधे आहे.
ईथुन पुढे सामान्य नागरीकांना जाण्यास मनाई आहे. ईथुन पुढे २० किमी वर भारत
- पाकिस्तान ची सरहद्द आहे. तिथे जाण्यासाठी लष्कराचा खास परवाना मिळवावा
लागतो. आमच्या बरोबरच्या एका मित्राचे जिजाजी तिथे लश्करासाठी वेटेरिनरी
डॉक्टर म्हणुन काम करतात. त्यांच्या ओळखीने आम्हाला तो परवाना मिळाला व
सरहद्द पहायला मिळाली. पण फोटो काढण्यास मनाई असल्यामुळे फोटो नाही काढता
आले.
तनोट ला मातेश्वरी तनोटरायचे मंदिर आहे. १९६५ च्या लढाईत, हे मंदिर उध्वस्त
करण्यासाठी पाक सैन्याने दारुगोळ्याचा खुप भडिमार केला पण त्यातला एकही
बाँब मंदिरावर पडला नाही. जे काही बाँब आजु बाजुला पडले ते फुटले नाही. हिच
माहिती तुम्हाला विकिपेडिया वर पण मिळेल.
आजही तुम्हाला ह्या मंदिरात पाकड्यांनी युध्धात वापरलेला दारूगोळा पहायला मिळतो.
प्रचि ४१
घंटियाली माता मंदिर
-
-
-
पाकड्यांनी उध्वस्त केलेल्या मुर्त्या.
प्रचि ४२
काही दिवसांपूर्वी बिकानेरला गेलो होतो. तिथल्या राजवाड्याची ही छायाचित्र.
संपूर्ण राजवाडा पाहायला किमान दोन तास तरी लागतात. जर भेट द्यायची झाली
तर सकाळची वेळ चांगली (संध्याकाळी गाइड लोक पळवतात, त्यामुळ नीट बघता येत
नाही आणि त्यांच्याकडून फार माहीतीची देखील अपेक्षा नको.)
छायाचित्र जरा गडबडीत काढली आहेत त्यामुळ यथातथाच आहेत पण तरी त्यावरून राजवाड्याच्या वैभवाची कल्पना यावी.
बिकानेर चा राजवाडा
फोटो छान आलेत, वास्तू भव्य , कलाकुसरही सुन्दर. आपल्या भारतातील
वास्तुकलेचा प्रेक्षणीय नमुना म्हणून बघाल तर छान आहे. महाराष्ट्रातील
ऐतिहसिक वास्तुंच्या वाईट अवस्थेबद्द्ल एका परप्रान्तीय मित्राने विचारले
होते.त्याला मी सांगीतले, राणाप्रताप/छत्रसाल सारखे अपवाद वगळले तर
राजस्थान माळव्यातील राजे मुगलांचे मांडलीक झाले, माझ्या महाराष्ट्रात
मात्र शिवरायांची प्रेरणा/ महानता अशी कि शिवाजी महाराजां नंतरही मराठे लढत
आपल्या स्वराज्यासाठी लढत राहिले. साहजिकच लढायांमधे वास्तूंचा विध्वंस
झाला. आणि नंतरच्या काळात आमची अनास्था!!
सुंदर महाल आहेत. प्रियालीसारखेच प्रश्न मलाही पडले आहेत.
शनिवारवाड्याबद्दल विकीवर
लिहीलेलं आहे की बांधल्यानंतर जवळजवळ १०० वर्षांनी तिथे प्रचंड आग लागली.
ही आग विझवायला १५ दिवस लागले. या आगीमधे एकेकाळी असलेली सातमजली इमारत आता
आहे तेवढीच उरली.
@ आनंदयात्री,
ह्या वेळेस वेळ कमी असल्याकारणाने आणि उपलब्ध वेळात गाइड न माहीती नीट न
दिल्यान जास्त माहीती आत्ता माझ्याकडे नाही. पण परत जाणेचे आहे तेंव्हा
नक्की.
@ शहाणे
ऐतिहासिक वास्तूंबद्दलची उदासिनता ही बहुधा भारतीय समाजाच्या
व्यक्तीमत्वाचा भाग असावी (अपवाद दक्षिणेचा). राजस्थानात परिस्थीती
महाराष्ट्रापेक्षा वेगळी असावी असा माझा समज होता. पण असं काही नाही,
याबाबतीत हम सब एक है. इथे आतमध्ये तर संगमरवरावरती पान खाउन रंगरंगोटी
केली आहे. गाइड लोक आपण परिक्षेला अभ्यास करतो तशा पद्धतीन पाठ केलेली
माहीती देतात, देशी पर्यटकांना.
राजपूतांची मात्रूभाषा (हे कस लिहायच?) इंग्रजी होती की काय अशी शंका यावी इतका हिंदीला फाटा दिलेला आहे.
आता इंग्रजांना आपला इतिहास कळावा म्हणून इतक्या कळकळीन प्रयत्न
केल्यावर ५०० वर्षांनंतरच्या पुस्तकातले देशी इतिहास सिद्ध करण्यासाठीचे
पुरावे पुन्हा इंग्रजी असल्यावर आश्चर्य वाटायला नको.
असो, महाराष्ट्राबाहेर थोडस फिरल्यावर आता मला अस वाटायला लागल आहे की
आपल्याला एकमेकांच्या प्रांताविषयीच्या इतिहासाची अजिबात माहीती नाही.
_____________________________________________________________________________________ सुतो वा सूतपुत्रोवा यो वा को वा भवाम्यहम् |
दैवायत्ते कुले जन्म मदायत्तं तु पौरूषम्॥
चित्रे पाहून राजवाड्याच्या भव्यतेची कल्पना येते. ऐतिहासिक
वास्तूंबद्दल अनास्था आपल्याकडे सर्वत्रच आहे. पर्यटन अर्थार्जनाचा एक मोठा
मार्ग असू शकतो हे आपल्या शासनाला कळले नसावे किंवा वळले नसावे.
पाश्चिमात्य देश पर्यंटनावर धो-धो पैसे कमावत असताना आपण त्याकडे इतके
दुर्लक्ष का करावे कळत नाही.
---
"बोले तो.. जंगल मे मंगल और अंधेरी मे दंगल. क्या?"--- पैचान कोन?
राजवाड्याचे फोटो आवडले. एवढा मोठा राजवाडा साफ करायला किती वेळ
लागत असावा आणि किती नोकर लागत असावे आणि छतांवरची कोळीष्टके कशी साफ केली
जात असावीत असे प्रश्नही पडले.
माहि मरातिबचे फोटो काही दिसले नाहीत परंतु माहिती रोचक आहे. मुसलमानी पद्धतीतही राशींची चिन्हे (का मूर्ती?) वापरली जात याविषयी विशेष माहिती नव्हती.
केवलादेव अभयारण्य, भरतपूर म्हणजे पक्षीनिरीक्षकांसाठी स्वर्ग. यावर्षी आम्हाला ऐन जानेवारीमध्ये भरतपूर सहल करण्याची सुवर्णसंधी मिळाली. एक सेशन सायंकाळी आणि एक सकाळी करता आले. सीझनदेखील या वर्षी उत्तम होता. पत्नीची भरतपूरला जाण्याची ही पहिलीच खेप होती. शिवाय नवा महागडा कॅमेरा होता (हे वाक्य आवर्जून लिहिण्याची प्रेरणा 'मुक्तपीठ'पासून घेतलेली आहे!). त्यामुळे तिने दे धमाल फोटो घेतले. त्यातल्या काहींचा कोलाज इथे टाकत आहे.
पूर्वी हे अभयारण्य नव्हते. राजेमहाराजे आणि इतर उच्चपदस्थ इथे येऊन शिकार करीत. त्यांपैकी काही "विक्रमवीर":
इतर काही इकडम तिकडम फोटो:
कसे जावे, काय करावे:
१. जयपूर - भरतपूर सुमारे २०० किमी. २. आग्रा - भरतपूर सुमारे ७० किमी. ३. रस्त्याने तसेच रेल्वेने सुलभरीत्या पोचता येते. चारमार्गी टोल रस्ता. ४. राहण्यासाठी सर्व अर्थगटांतील पर्याय उपलब्ध. ५. अभयारण्यात जाण्यासाठी सायकल (बाहेर भाड्याने मिळतात) आणि सायकल रिक्षा यांचा वापर करता येतो. किंवा मग पायीपायी. यांत्रिक वाहने नेता येत नाहीत. बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटीने प्रशिक्षित केलेले गाइड उपलब्ध आहेत. ६. भेट देण्यासाठी योग्य काळ - नोव्हेंबर ते मार्च. या काळात बेसुमार थंडी असते हे ध्यानात ठेवणे. फार धुके असल्यास मात्र पक्षी दिसत नाहीत आणि अभयारण्यात जाणे विफल ठरते. काही दिवस असेही येतात की धुके चांगले मध्यान्हपर्यंत उठत नाही. ७. जवळ इतर पाहण्याजोगे: आग्रा, फतेहपूर सिक्री, अलवर, सरिस्का व्याघ्र प्रकल्प, भानगड आणि अजबगड किल्ले, आभानेरी विहीर इ. ८. सीरियस पक्षीनिरीक्षण करायचे असेल, तर किमान दोन दिवस राहणे आवश्यक. चांगल्या प्रतीचे दुर्बीण, कॅमेरा इ. असल्यास उत्तम. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पाणथळ जागा आणि घरटी असल्यामुळे पक्षी सहजपणे दिसतात. ९. जाताना पाणी आणि च्याऊम्याऊ बरोबर नेणे योग्य. प्लास्टिकच्या पिशव्या नेऊ नयेत. नेल्यास इतरत्र टाकू नयेत, आपल्याबरोबर परत घेऊन याव्यात.
चलत मुसाफिर यांचा धागा बघून दोन वर्षापूर्वी केलेल्या सहलीची आठवण झाली. इतर माहिती त्यांनी दिलीच असल्यामुळे मला फक्त छायाचित्र टाकायचे काम बाकी आहे....:-)
पण हरियानात भिंडावास नावाचा एक मस्त ठिकाण आहे ज्यात पाण्याभोवती १२ कि.मीचा चालण्याचा मातीचा रस्ता आहे. मधे पक्षी व आपण रस्त्यावरुन ते बघायचे असा कार्यक्रम फारच छान असतो. हे पाणे कृत्रीमरित्या साठवले आहे. तेथे काढलेली छायाचित्रे टाकत आहे......
घुबड :
कॉमन शेलडक - बदक
निलगाय -
थापट्या ?
इबिस...
मराल....
काळी पाणकोंबडी
हरीण....
चित्रबलाक....
जांभळी पाणकोंबडी......
हनीबी कॅचर......
हरियाल- महाराष्ट्राचा राज्यपक्षी.......
टकाचोर.......
सांगायची गरज नाही.........
निलगाय......
जयंत कुलकर्णी. जरा जास्त चित्रे आहेत पण परत परत तेच करायचा कंटाळा आला म्हणून एकदमच टाकली आहेत.
भानगड किल्ला
भुताटकी म्हटले की कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला आकर्षण वाटतेच. कदाचित त्यामुळेच राजस्थानमधील "झपाटलेला" भानगड किल्ला पाहायची सुप्त इच्छा फार दिवसांपासून होती.
आंतरजालावर भानगडबद्दल अनेक चर्चा होत असतात. 'सनसनी' टाईपचे टीव्ही शो सुद्धा इथे कॅमेरे घेऊन येऊन गेलेले आहेत. दिव्य आंतरजालीय प्रथेनुसार दोन्ही बाजूंचे प्रवक्ते (भूत आहे / भूत नाही) हमरीतुमरीवर येऊन भांडतात.
भानगड हा दौसा शहरापासून २५ कि.मी. वर आहे. जयपूर-आग्रा महामार्गावरून आत वळावे लागते. कुठेही दिशादर्शक पाटी नसल्यामुळे योग्य रस्ता शोधणे हीदेखील एक भानगडच होऊन बसते.
आम्हाला निघायला थोडा (बराच!) उशीर झाल्यामुळे किल्ल्याच्या दरवाजाशी पोचेपर्यंत जवळजवळ सहा वाजले. पुरातत्व खात्याच्या पहारेदाराला त्यामुळे थोडा वैताग-कम-राग आल्यासारखा वाटला. "लवकर आटपा" अशी सूचनावजा धमकी देत त्याने आम्हाला आत जाऊ दिले. किल्ला साडेसहा वाजता बंद होत असल्यामुळे आमच्या हातात एक तासाहून कमी वेळ होता.
भानगड या नावाची कीर्ती काहीही असली, तरी पुरातत्व खात्याने लावलेल्या फलकांवर मात्र भूत, प्रेत, आत्मा, सैतान या सर्वांचा उल्लेख पूर्णपणे टाळलेला आहे, हे पाहून थोडे हसू आले.
किल्ल्यात शिरताच एका गोष्टीची मात्र पुरेपूर खात्री झाली: जर भुतेखेते खरेच असली तर त्यांना भानगडसारखी दुसरी जागा शोधून सापडणार नाही. एकदम प्राईम प्रॉपर्टी! स्विश अॅड्रेस! म्हणजे काय, की "भुताळी किल्ला" हे शब्द उच्चारताच जे चित्र डोळ्यासमोर येते, ते भानगडच्या रूपाने हुबेहूब प्रकट झाले आहे की काय असे वाटावे. याची कारणे खालीलप्रमाणे:
१. किल्ला जरी भुईकोट असला, तरी त्याच्या तिन्ही बाजूंनी कराल कडे उंच उठलेले आहेत. शिखरांच्या पलीकडे सरिस्का व्याघ्र अभयारण्य पसरलेले आहे. त्यामुळे त्याबाजूने यायला रस्ता नाही.
२. किल्ला जवळच्या गावापासून मैलभर दूर आहे. आसपास घरे, दुकाने, रस्ते असे काहीही नाही. केवळ निबिड जंगल आहे.
३. आडबाजूला असल्याकारणाने पर्यटकही कमी असतात.
४. माकडे आणि मोर मुबल़क संख्येने आढळतात. माणसांची त्यांना फारशी भीती वाटताना दिसत नाही.
५. आश्चर्याची गोष्ट म्हणजे किल्ला बराचसा सुस्थितीत आहे. आत तीन मंदिरे, एक तलाव आणि एक उंच बालेकिल्ला आहे.
या बालेकिल्ल्याचा समोरचा भागात पूर्वी तुरुंग होता. त्याच्या कोठड्यांचे दरवाजे एखादा विक्राळ जबडा उघडल्यासारखे भासतात.
काही भागाची मात्र पडझड झालेली आहे.
किल्ल्याच्या भिंतींजवळ रान माजलेले आहे. भानगड हे एक संरक्षित स्मारक असले, तरी कोणत्याही बाजूने उडी मारून आत प्रवेश करणे कठीण नाही.
किल्ल्यात एक लांबच लांब बाजारपेठ आहे. यामधील एकूण एक दुकानांची छपरे उडालेली आहेत. असे म्हणतात की प्राचीन शापाच्या प्रभावामुळे नवे छप्पर टाकले तरी ते टिकत नाही.
किल्ल्याबद्दल अनेक वदंता प्रचलित आहेत. त्यामध्ये राजे, राजकुमारी, साधू, वासंनांध जादूगार, काळी जादू, रक्तपात, कत्तली, युद्धे, दगाबाजी अशा सुरस, चमत्कारिक गोष्टींची रेलचेल आहे. (इच्छुकांनी विकिपीडिया पहावा).
भुताखेतांची खिल्ली उडवणारे बेडर कंपूदेखील मागे नाहीत. त्यांनीही या कथा खोडून काढलेल्या आहेत (इच्छुकांनी गूगल करून पहावे).
एका उंच कड्यावर, दूर, एकाकी अशी एक राजस्थानी छत्री उभी आहे. असे म्हणतात की शापवाणी उच्चारणारा तो सैतानी जादूगार इथे बसत असे.
किल्ल्याच्या मुख्य द्वाराजवळ एक नवीन हनुमान मंदिर आहे.त्याचा पुजारी भुताखेतांची कल्पना उडवून लावतो. "माणसापेक्षा भयंकर भूत दुसरे नसतेच," हा त्याचा दावा आहे.
पण रात्री तो देवळाला कुलूप ठोकून झोपायला घरी जातो!
असा हा भानगड. आता मला जर विचाराल की "बाबा, एक रात्र या किल्ल्यात राहून दाखवशील का?", तर उत्तर द्यायला जरा कठीण जाईल.
आहेत का कुणी बहाद्दर?
******
हे ब्लॉग पोस्ट इंग्रजीमध्ये थोड्या वेगळ्या स्वरूपात इथे वाचायला मिळेल.
भानगडः
जयपूरपासून साधारणपणे ९० कि.मी. (सकाळी निघून संध्याकाळी परत येता येते) जवळचे शहर/ रेल्वेस्थानकः दौसा. रस्त्याची परिस्थिती: जयपूर ते दौसा उत्तम चारपदरी महामार्ग. दौसानंतर साधा राज्यमार्ग. जवळपास इतर पाहण्याजोगे: सरिस्का अभयारण्य, आभानेरी विहीर, अजबगड किल्ला.
Aimless, unprepared wanderings have one lucky spin-off. There come times when the sights one stumbles upon in course of a detour make the experience really worthwhile. In fact, the joy that accrues is directly proportional to the remoteness and prior ignorance.
We were pleasantly reminded of this during our trip to Abhaneri.
We were driving to Bharatpurfor a bird “shooting” holiday when this name appeared in the google-d list of places en route. A little bit of asking around and we learnt that it involves a ten-km diversion from the highway at Sikandara.
The other option was the supposedly cursed fort-town of Bhangarh. But we had overshot the place. So Abhaneriit was. We lost no time in changing our direction by a few degrees and heading forward.
The road winded through green farmlands, with an occasional school of peacocks gracing the landscape. Quite pleasant it was.
All this changes as one reaches the village. The entry into garbage-stuffed, sewage-spewing Abhanerivillage would cause abject dismay to a visitor. But we are used to the state of affairs that prevails without exception in all villages around heritage sites.
The step well or “Chand Bawdi” as it is known, is easy to spot. ASI staff guards the gate but there is no entry ticket.
The step well is sheer joy to watch. The scale, aesthetic and sense of proportion holds one spellbound.
The chaos of the crowded roads and village wards around the walls mercifully does not spill inside. It is quite serene. The ASI guys seemed to be well-behaved and helpful. They were also firm in dealing with unruly visitors.
The entire well is not of a single vintage. A kind of viewing gallery-cum-residential quarter was added to it by one of the recent kings. The alteration is distinctly visible.
The place was a favourite summer retreat of the royals and one can see why. In those ages, the well was fed by a natural spring. Its water was lifted and poured continuously over the roof of the royal residence that ens-cons itself into the side.
Now of course, due to reckless pumping of groundwater through tubewells, the water table in the area has dropped by 200 ft and the well only collects meagre amounts of rain water.
A colony of bats is a permanent resident. A cute-ish baby bat had somehow landed on the floor and we had the pleasure of observing it closely, even touching it. It wasn’t injured contrary to what we believed and flew away once its curiocity about humans had abated.
The precincts of the step well are full of wonderfully sculpted statues with obvious Hindu mythological origins. However, as I dreaded, it turned out that these belonged to the temple next door and had been vandalised by the “secular” Mughals during their pillaging raids.
A visit to the said temple was in order. It is located right next door.
The temple remains consecrated and has a priest.
But the depressing signs of hate-motivated destruction continue to survive. The holidaying royals seem to have done little to restore the community honour.
The “information” board put up by ASI is expectedly silent about all that.
One is forced to painfully pull one’s eyes away and find some solace in the green farms in the immediate vicinity. Perhaps the entire village was serene like this when the temple flourished and the Chand Bawdi was full of water. Small consolation, that.
जोधपूरची
खाद्य भ्रमंती
राजस्थान मधील जोधपूर हे वाळवंटाच्या काठावरच
महत्वाच ऐतिहासिक शहर आहे. उष्णते पासून दिलासा मिळावा यासाठी य शहरातली घर निळ्या
रंगाने रंगवली जात असत. त्यामुळे मेहरानगड या किल्ल्यावरुन पाहिले असता निळ्या रंगाची
घर दूरवर पसरलेली दिसतात. त्यामुळे या शहराला ब्ल्यू सिटी या नावानेही ओळखले जाते.
या शहराचा इतिहास आणि पर्यटन हे मेहरानगड या किल्ल्याशी जोडलेले आहे. राठोड राजघराण्यातील
राव जोधा यांनी इसवीसन १४५९ मध्ये मेहरानगड किल्ला बांधला आणि मंदोर दुर्गावरुन आपली
राजधानी जोधपूरला हालवली. त्याबरोबर जोधपूर शहराची भरभराट सुरु झाली, बाजारपेठ वसली त्यात इतर दुकानांबरोबर खाण्या-पिण्याची दुकाने होती. त्यामुळे
एक खाद्य संस्कृती तयार झाली. दुध आणि दुग्धजन्य पदार्थांची इथे रेलचेल आहे. मिठाई
खाण्याकडे स्थानिक जनतेचा अधिक ओढा आहे.
जोधपूर शहरात मेहरानगड किल्ल्याकडे चालत जाण्यासाठी
जो रस्ता आहे त्याच नाव आहे "नई सडक". हा रस्ता क्लॉक टॉवर मार्गे थेट मेहरानगड
किल्ल्यापर्यंत जातो. या रस्त्यावर गेली १०० वर्ष जोधपूरची खाद्य संस्कृती जपणारी काही
दुकाने आहेत. क्लॉक टॉवर महाराजा सरदारसिंहच्या काळात (इसवीसन १८८०-१९११) बांधला गेला.
याच्या आसपास बाजार, हवेल्या आणि दाटीवाटीने वसलेली जुनी वस्ती आहे. क्लॉक टॉवरच्या
गेटला लागुन "मिशरीलाल" हे मिठाईचे दुकान आहे. १९२७ साली स्थापन झालेल्या
या दुकानात काळानुसार थोडे बदल करुन नवा साज चढवलेला आहे. या दुकानातली "माखनीया
लस्सी" फ़ेमस आहे. अप्रतिम चवीच्या लस्सीवर मलईचा जो जाड तुकडा टाकलेला असतो त्यामुळे
याची चव जीभेवर रेंगाळतच राहाते. एक ग्लास लस्सी पिउन समाधान होत नाही. लस्सीचा दुसरा
ग्लास प्यायल्यावर इतर गोड पदार्थ चाखण्यासाठी जीभेवरची गोड चव घालवणे भाग असते. त्यासाठी
या ठिकाणी तिखट पदार्थही (नमकीन) मिळतात. बेसनची वडी, गाजर हलवा, कलाकंद, मावा कचोरी
हे गोड पदार्थ आणि तळलेले काजू ,शेव -चिवड्याचे विविध प्रकार, नमकीन कचोरी आणि मिरची
वडा यातील आवडणारे पदार्थ खाऊन जड पोटाने आणि (अंतकरणाने) या जुन्या जाणत्या मिठाईवाल्याला
निरोप देऊन किल्ल्याचा रस्ता पकडावा. किल्ला व्यवस्थित पाहून चालत किल्ल्यापासून १०
मिनिटाच्या अंतरावर असलेल्या जसवंत थाडा या प्रेक्षणीय स्थळा पर्यंत यावे. किल्ला आणि
जसवंत थाडा बघण्यात ३ तास खर्च झालेले असतात आणि चालत फ़िरल्याने सकाळचा हेवी नाश्ताही
जिरलेला असतो. जसवंत थाडाला रिक्षा पकडून नई सडक गाठावी. नई सडक वरचे प्रिती रेस्टॉरंट
हे व्हेज खाणार्यांसाठी चांगला पर्याय आहे. कैर सांग्री ही इथली स्थानिक भाजी , वाळवंटात
उगवेणार्या खुरट्या काटेरी झुडूपांवर येणार्या शेंगा खुडून त्यापासून भाजी आणि लोणचे
बनवले जाते. हि भाजी गोळा करण्यासाठी लागणार्या कष्टांमुळे ती अतिशय महाग आहे. प्रिया
रेस्टॉरंट मध्ये ही भाजी खायला मिळते. प्रिया रेस्टॉरंटच्या समोर जनता स्वीट होम आहे.
याच्या बर्याच शाखा जोधपूर मध्ये आहेत. इथे बंगाली मिठाईचे वेगवेगळे प्रकार अप्रतिम
मिळतात. याशिवाय मावा कचोरी, इमरती, मावा लाडू हे प्रकार चांगले मिळतात. याठिकाणी सॉफ़्ट
आईस्क्रीम हा वगवेगळ्या फ़्लेवरमध्ये स्मुदी सारखा घट्ट पदार्थ मिळतो. सकाळचा हेवी नाश्ता,
त्यानंतरचे फ़िरणे, जेवण, आईस्क्रीम यानंतर वामकुक्षी आवश्यक आहे.
वामकुक्षी नंतर उमेद भवन पॅलेस पाहाण्यासाठी
बाहेर पडावे. संध्याकाळी फ़िरायला बाहेर पडतांना थंडीची चाहूल लागायला सुरुवात होते.
गरमागरम चहा पिण्याची इच्छा होते. पण चहा न पिता गरमागरम दुध घ्यावे. त्यावर मलईचा
पातळ स्लॅब घालून मिळ्तो. जोधपूर मध्ये अनेक ठिकाणी गरमागरम दुध विकणारी दुकान आहेत.
चुलीवर दुध रटरटत असत, त्याच्या बाजूला कढईत मंद आचेवर गरम होणार्या दुधावरची मलई
काढून त्याची व्यवस्थित घडी करुन बाजूच्या ट्रे मध्ये मांडून ठेवलेली पाहायला मिळते.
दुध मागितल्यावर गरमागरम दुध ग्लासात भरुन वरुन ही मलईची घडी टाकली जाते.
उमेद भवन पाहून झाल्यावर क्लॉक टॉवरकडे मोर्चा
वळवावा. नई सडक आणि क्लॉक टॉवर जवळील बाजारात अनेक स्थानिक कलाकुसरीच्या वस्तू, मोजडी
इत्यादी मिळतात.त्यामुळे देशी, विदेशी पर्यटकांची येथे गर्दी असते. या नई सडकच्या टोकाला
शाही समोसा नावाचे जोधपूर मधले समोसा आणि मसाला मिरचीचे फ़ेमस दुकान आहे . येथे दिवसरात्र
गर्दी होती. गर्दीत शिरुन सामोसा आणि मिरची घेतली. त्या बरोबर चटणी नव्हती. आपल्या
सवयी प्रमाणे चटणी मागितल्यावर दुकानदार म्हणाला,"उसकी जरुरत नही अंदरही है"
मोठ्या अपेक्षेने सामोस खायला सुरुवात केली आणि पहिल्याच घासाला अपेक्षाभंग झाला. सामोश्याच्या
सारणात चिंचेचा कोळ घातला होता. त्यामुळे सामोसा आम्बट लागत होता म्हणून त्याला चटणीची
गरज नाही असे दुकानदाराने सांगितले असावे. सामोश्याने अपेक्षाभंग झाल्यावर मिरची खायला
सुरुवात केली त्यातही ते आंबट सारण भरलेल होते. आम्हाला जरी हे पदार्थ आवडले नाहीत
तरी स्थानिक लोक गर्दी करुन खात होते. रात्रीच्या दिव्यांनी उजळलेला क्लॉक टॉवर पार
करुन पुढे गेल्यावर उजव्या बाजूला एका दुकानासमोर बरीच गर्दी दिसली. आमलेट शॉप अस नाव
असलेल्या दुकानात एक म्हातारे गृहस्थ आमलेट बनवत होते आणि बाहेर खायला विदेशी पर्यटकांची
गर्दी होती. दुकानात जागा नसल्यामुळे सर्वजण रस्त्यावर बसूनच खात होते. लोन्ली प्लॅनेटसह
अनेक परदेशी पुस्तकांनी गौरवलेल्या या दुकानात अंड्याचे विविध प्रकार मिळतात. उकडलेल्या
अंड्या पासून, फ़्लपी आमलेट, टोस्ट आमलेट, पोटॅटो आमलेट पर्यंत असंख्य प्रकार इथे खायला
मिळतात. किमान दोन प्रकार खाऊन पूढे जाणे म्हणजे फ़ाऊल आहे. शाही सामोसा खातांना झालेल्या
अपेक्षाभंगाचे दु;ख आमलेट शॉपमुळे कमी झाले.
दुसर्या दिवशी जोधपूरच्या
पावटा सर्कलपासून सुटणार्या बसने ६० किमी वरील ओसिया गाठावे. ओसिया हे थर वाळवंटाच्या
काठावर असलेले गाव प्राचीन काळापासून व्यापारी मार्गावरचे महत्वाचे स्थान होते. ८ व्या
शतकात याठिकाणी प्रतिहार घराण्याची सत्ता होती. त्यांनी ८ ते १२ शतकाच्या दरम्यान याठिकाणी
अनेक हिंदु आणि जैन मंदिरे बांधली. ओसवाल जैनांचे हे महत्वाचे धार्मिक क्षेत्र आहे.
रस्त्याच्या दुसर्या बाजूला सूर्य मंदिर आहे. त्यावरील कोरीवकामही सुंदर आहे. हि तीन
मंदिर पाहून छोट्या टेकडीवर असलेल्या सचिया माता मंदिराकडे जातांना आजुबाजूला हाराची,
प्रसादाची दुकान हॉटेल्स दिसतात. सचिया माता म्हणजे इंद्राची पत्नी इंद्राणी. याठिकाणी
मुख्य मंदिरात सचिया माता व त्याच्या बाजूला चंडी देवी आणि अंबा मातेची मंदिरे आहेत.
ही मुळ मदिरे ८ व्या शतकात बांधली असली तरी आज असलेली मंदिरे १२ व्या शतकात बांधलेली
आहेत. मंदिराच्या सभामंडपात आणि अंतराळाच्या छतावर केलेले कोरीवकाम सुंदर आहे. मंदिराच्या
बाहेरच्या बाजूस दशावतारातले काही अवतार कोरलेले आहेत. येथे अनेक रुपात कोरलेले व्याल
ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ८ व्या शतकात
बांधलेले महावीर मंदिर हे सुध्दा शिल्पकलेचा अप्रतिम नमुना आहे. ही दोन्ही मंदिरात
सध्या पूजा होते.
ओसियातील मंदिरी पाहायला २ तास लागतात. त्यानंतर
जीप भाड्याने घेऊन आपण १० किमीवर असलेल्या वाळूंच्या टेकड्यांवर जीपने जाऊ शकतो. मुख्य
रस्ता सोडून जीप वाळूच्या रस्त्याला लागते आणि उंच सखल टेकड्यांवरून जातांना रोलर कोस्टरचे
थ्रील अनुभवता येते. या ठिकाणी असलेल्या वाळूच्या सर्वात उंच टेकडीवर पोहोचल्यावर उंट
सफ़ारीही करता येते. या भागात काही रिसॉर्ट आहेत. डेझर्ट सफ़ारी, तंबूतील निवास, स्थानिक
कलाकारांचे कार्यक्रम अशी पॅकेजेस ते देतात, पण ती खूपच महागडी आहेत. अशा मुद्दाम
(आर्टीफ़िशियली) तयार केलेल्या रिसॉर्ट मध्ये राहाण्यापेक्षा येथील गावात टिपिकल राजस्थानी
घरात राहाण्याची आणि जेवणाची सोय केली जाते. टेकड्यांपासून ५ किमीवर असलेल्या खेमसरगावातील
सिवरों की ढाणी या वस्तीवर आमच्या जीपवाल्याचे घर होते. तेथे त्याने जेवणाची व्यवस्था
केली होती. या वस्तीवर जाण्यासाठी रस्ता नव्हता. पुन्हा वाळूच्या टेकड्यांवरुन उड्या
मारत जीप वस्तीत पोहोचली. रस्त्यात एक फ़ोर व्हील ड्राईव्ह जीप मुलांना घेऊन शाळेत जातांना
दिसली, हिच येथल्या मुलांची स्कुल बस. पाच सहा घरांची वस्ती असलेल्या सीवरों की धानी
वस्तीजवळ मोर, नीलगाय आणि हरणांनी दर्शन दिले. मातीच्या कंपाऊंडच्या आत तीन गोलकार,
गवताने शाकारलेली घर होती. त्यातील एक स्वयंपाक घर, दुसरी राहाण्याची खोली आणि एक पाहूण्यांसाठी
जेवणाची खोली होती. मध्यभागी अंगण होते. बाहेर काही उंट झाडाखाली बांधलेले होते. जीप
नसल्यास प्रवासाचे हे दुसरे साधन होते. राजस्थानी पध्दतीचे गरमागरम जेवण जेऊन परत ओसिया
गाठले. ओसियाहून जोधपूरला जाणारी गाडी पकडून जोधपूरच्या ९ किलोमीटर अलिकडे असलेल्या
मंदोर गार्डनला जाता येते. ६ व्या शतकातला मंदोर दुर्ग ,जोधपूरच्या राजांची समाधी मंदिर
आणि म्युझियम पाहून संध्याकाळी जोधपूरला परतता येते.
सकाळी व्हेज जेवण झाल्यामुळे संध्याकाळी नॉनव्हेज
खाऊया या उद्देशाने स्थानिक लोकांकडे चौकशी केली. त्यावेळी कलिंगा हॉटेलचे नाव कळले.
स्टेशन जवळ असल्याने रिक्षा करुन कलिंगा गाठले. कलिंगा हे जरा महाग पण मुंबई सारख पॉश
एसी रेस्टॉरंट आहे. जोधपूर रेल्वे स्टेशन पासून
हाकेच्या अंतरावर असलेल्या या हॉटेलात व्हेज आणि नॉनव्हेज खायला मिळते.राजस्थानी स्पेशल
काय आहे विचारल्यावर लाल मास (म्हणजे बकर्याचे लाल मसाल्यात केलेले मटण) आहे असे सांगण्यात
आले. रोटी बरोबर मटण खाल्ल्यावर जोधपूरकरांच्या सवयी प्रमाणे गोड खाणे आवश्यक होते.
रिक्षा पकडून शाही सामोसाच्या मागच्या गल्लीत असलेले चतुर्भुजचे दुकान गाठले. एका चिंचोळ्या
गल्लीत हे पुरातन दुकान आहे. दुकानात कुठल्याही प्रकारचा बडेजाव नाही. पण इथल्या माव्याच्या
पदार्थांना तोड नाही. गुलाबजाम, कलाकंद तर तोंडात ठेवल्या ठेवल्या विरघळतात. जमिनीवर
बसलेला मॅनेजर कम कॅशिअर आणि त्याच्या बाजूला बसलेला वजन करुन देणारा माणूस एवढाच स्टाफ़,
गुलाबजाम आणि कलाकंद येथे थेट वर्तमान पत्राच्या तुकड्यावर देतात. खवय्ये गिर्हाईक
रस्त्यावर उभ राहून रिक्षा चुकवत गुलाबजाम रिचवत असतात. गुलाबजाम खाऊन थोडे दुसर्या
दिवशीच्या प्रवासासाठी बांधून घेऊन जोधपूरची खाद्य भ्रमंती आटोपती घेतली.
अमित सामंत
राणाप्रतापांच्या
पाऊलखुणांवर.....
राजस्थान म्हटल की आपल्या
डोळ्यासमोर येते ते दुरवर पसरलेल वाळवंट, कलात्मक आणि सुंदर
हवेल्या, महाल आणि सुस्थितीत असलेले किल्ले. राजस्थानला फ़िरायला
जायचे म्हटले अनेक जण जोधपूर, जैसलमेर, बिकानेर, जयपूर आणि उदयपूर या परिचित शहरांना भेट देतात.
या व्यतिरिक्त राजस्थानात अनेक ठिकाणे पाहाण्या सारखी आहेत. राजस्थान म्हणजे अकबराच्या बलाढ्य फ़ौजेशी सामना करणारे वीर महाराणा
प्रताप. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज पुजनीय आहेत,त्याप्रमाणेच
राजस्थानात महाराणा प्रताप पुजनीय आहेत. ज्यावेळी राजस्थानचे इतर राजे मोघलांना शरण
गेले होते. आपल्या मुली, बहिणी मोघलांच्या जनानखान्यात पाठवून
त्यांचे मनसबदार बनले होते. त्यावेळी महाराणा प्रताप आपल्या छोट्याश्या मेवाड राज्याच्या
स्वातंत्र्यासाठी मुठभर फ़ौजेसह लढत होते. त्यासाठी त्यांनी आपल्या आरामदायी आणि विलासी
जिवनाचा त्याग केला होता. मेवाडचे राजा असूनही त्यांचे जीवन आपल्या कुटुंबियांसह राना-वनात,
डोंगर दर्यात भटकण्यात गेले. स्वधर्म आणि स्वातंत्र्यासाठी लढणारे महाराणा
प्रताप अनेकांचे प्रेरणा स्थान आहेत. महाराणा प्रताप, त्यांचा बलिदान देणारा घोडा चेतक,
हल्दीघाटीची लढाई यावर शेकडो काव्य रचलेली आहेत. महाराणा प्रतापांनी
ज्या किल्ल्यात जन्मले तो कुंभलगड किल्ला, ज्या किल्ल्यात त्यांचा
सर्वाधिक काळ गेला तो चित्तोडगड आणि ज्या भागात अकबराची सेना आणि महाराणा प्रतापांची
सेना यांचे युध्द झाले ती हल्दीघाटी ही सर्व ठिकाणे उदयपूर पासून जवळ आहेत. उदयपूरला
दोन दिवस मुक्काम करुन आपल्याला ही सर्व प्रेरणादायी ऐतिहासिक ठिकाणे पाहाता येतात.
त्याबरोबर नाथव्दाराचे श्रीनाथजींचे मंदिर आणि रणकपूरचे जैन मंदिर संकुल पाहाता येते.
चितोडगड (Chittorgad Fort)
उदयपुर हे राजस्थानातले महत्वाचे शहर आहे. याला
तलावांचे शहर असेही म्हणतात. सिटी पॅलेस, जगदिश्वर मंदिर, पिचोला लेक, फ़तेह सागर लेक
ही उदयपूर शहरतली महत्वाची ठिकाण एका दिवसात पाहून होतात. उदयपूर पाहून झाल्यावर दुसऱ्या
दिवशी सकाळी चितोडगड पाहाण्यासाठी सकाळीच निघावे. उदयपुरहून चितोडगड १०९ किमीवर आहे.
ट्रेन, बस किंवा खाजगी गाडीने चितोडगडला जाता येते
. चितोडगड किल्ला प्रचंड मोठा आहे. संपूर्ण किल्ला पाहायचा असेल तर किल्ल्याच्या आतमध्ये
१३ किलोमीटर फिरावे लागते. त्यामुळे गाडी घेउनच फिरण योग्य ठरते. मेवाडच्या इतिहासात
चितोडगड किल्ल्याला अनन्यसाधारण महत्व आहे . मेवाडच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या अनेक
घटना या किल्ल्यात घडल्या. अल्लाउद्दीन खिलजीच्या हाती पडू नये यासाठी राणी पद्मिनीने
केलेला जोहार सर्वाना माहिती आहे. पण याकिल्ल्यावर एकूण ३ वेळा जोहार झाले आहेत. पन्नादाई
या राजा उदयसिंहच्या दाईने स्वत:च्या मुलाचा बळी देउन भावी राजाला म्हणजे उदयसिंहाला
याच किल्ल्यातून वाचवून कुंभलगडावर नेऊन ठेवले होते. या उदयसिंहाच्या पुत्राने म्हणजेच
राणा प्रतापने अकबराशी लढा देऊन इतिहास घडवला. चितोडगड परत जिंकून घेता आला नाही हे
शल्य उराशी घेउन राणाप्रतापने प्राण सोडले होते. असा हा चितोडगड नीट पाहाण्यासाठी अर्धा
दिवस लागतो. मैदानी भागात आडवा पसरलेला चितोडगडचा एकुलता एक डोंगर दुरवरुनच नजरेस पडतो.
नैसर्गिक संरक्षण फ़ारसे नसल्यामुळे किल्ल्याला एकामागोमाग एक सात दरवाजे आहेत,
दुहेरी तटबंदी आहे. या दतवाजांना पोल म्हणतात. पाडन पोल, भैरव पोल, हनुमान पोल, गणेश पोल,
लक्श्मण पोल, राम पोल ७ ही दार पार करुन आपण किल्ल्यावर
पोहोचल्यावर अनेक सुंदर मंदिरे, महाल, विजयस्तंभ,
किर्तीस्तंभ हे मनोरे यांच्या साहाय्याने किल्ला आपल्या समोर उलगड जातो.
चंद्रगुप्त मौर्याचा नातू अशोक उजैनचा प्रशासक
होता त्याच्या क्षेत्रात चितोड येत असे. अषोकाच्या काळात ग्रीकांनी पश्चिम
भारतावर आक्रमण केले त्यावेळी चितोड शहांच्या अधिपत्या खाली गेले. जवळजवळ ३
शतके चितोड शकांकडे
होता. त्यानंतर आलेल्या गुलोहितांनी हा भाग जिंकून घेतला. त्यांनी स्वत:चे
संवत सुरु
केले, नाणी पाडली. पाचव्या शतकापासून ८ व्या शतका
पर्यंत गुहील घराण्याच्या ताब्यात हा गड होता. इसवीसन ७३५ मध्ये मुहमद बीन कासिमने
चितोडवर आक्रमण केले त्यावेळी बाप्पा रावळ यांनी त्याला पळवून लावले आणि गुहील राजा
मानमौर्यापासून चितोड हिरावून घेतला.बाप्पांनी काबूल, कंधाहार,
इराण, उजबेकीस्थान येथील राजांवर विजय मिळवला.
शिवपूजक असलेले बाप्पा रावळ यांचे एकलिंगजी हे आराध्य दैवत होते. एकलिंगजी हे राजे
आणि आपण त्याचे दिवाण असे ते मानत असत. बाप्पा रावळ आणि त्याच्या वंशजांनी पुढील काळात
परकीय आक्रमकां विरुध्द कायम लढा दिला. बाप्पा रावळाचा वंश पुढील काळात भारतभर पसरला.
बाराव्या शतकात राणा कर्णसिंहानंतर रावळा घराण्याचे दोन भाग झाले. त्याच्या दोन पुत्रांपासून
रावळ घराणे आणि सिसोदिया घराणे अशा दोन शाखा तयार झाल्या. छत्रपती शिवाजी महाराज हे
याच सिसोदिया वंशाचे होते. १३ व्या शतकात राणा
रावक सिंह यांचा पुत्र कुंभकर्ण हा नेपाळला गेला. नेपाळच्या राजवंशाचा हा मुळ पुरुष
आहे असे मानले जाते.
किल्ल्यावरील मंदिरे, फ़तेह प्रकाश महाल, राणा कुंभ महाल, पाहात आपण मीरा मंदिरापाशी पोहोचतो. अप्रतिम कोरीवकाम असलेले भव्य कुंभशाम
मंदिर आहे. मंदिरावर आतील आणि बाहेरील बाजूंनी दशवतारतील मुर्ती आहेत. मंदिराच्या आवारात
मीरबाईचे मंदिर आहे. मीराबाई ही जोधपूरची राजकन्या होती. तिचा विवाह राणा संगाचा जेष्ठ
पुत्र भोजराज ह्याच्याशी झाला होता. मीरा मंदिराच्या बाजूला विजय स्तंभ आहे. चितोडगडावरील
हा विजयस्तंभ दुरवरुनही आपल्या नजरेस पडतो. इसवीसन १४४८ मध्ये राणा कुंभाने माळव्याचा
सुभेदार मुहम्मद शहा खिलजी याचा पराभव केला. या विजया प्रित्यर्थ हा १२२ फ़ूट उंच
आणि ३० फ़ूट रुंद विजयस्तंभ उभारण्यात आला. त्यावर आत आनि बाहेर दशवतार, रामायण , महाभारतातील प्रसंग दाखवणार्या अनेक मुर्ती
कोरलेल्या आहेत. या विजय स्तंभाच्या बाजूला जी मोकळी जागा आहे तिला जोहार स्थळी म्हणतात.
चितोडगडावर ३ जोहार झालेले आहेत. इसवीसन १३०२ मध्ये चितोडवर अल्लाउद्दीन खिलजीने आक्रमण
केले. त्यावेळी किल्ला शत्रूच्या ताब्यात जाण्याची शक्यता निर्माण झाल्यावर राजा रतनसिंहाची
पत्नी राणी पद्मिनीसह दुर्गातल्या स्त्रियांनी जोहार केला आणि रतनसिंहाने केसरीया करुन
प्राणार्पण केले."गढोमे गढ चितोडगढ बाकी सब गढीया, राणी
मे राणी पद्मिनी महाराणी बाकी सब रणैय्या". इसवीसन १५३५ मध्ये बहादुरशहाने चितोडगडावर
आक्रमण केले तेंव्हा राणी कर्णावतींने गडावरील स्त्रियांसह जोहार केला. इसवीसन १५६७
मध्ये अकबराने चितोडगडावर हल्ला केला तेंव्हा गडावरील स्त्रियांनी जोहार केला होता.
विजयस्तंभाजवळ असलेले जोहर स्थान पाहून गलबलून येते.
Rani Padmini Mahal, Chittorgad Fort,
चितोडगडा वरील राणी पद्मिनीचा
पाण्यातील महाल आहे. त्याच्या
पायऱ्यांवर बसलेल्या राणी पद्मिनीचे दर्शन तलावाच्या काठावर असलेल्या महालातील आरशातून
अल्लाउद्दीन खिलजी झाले होते. आजही या ठिकाणी महालात आरसे लावलेले
आहेत. त्यातुन राणी पद्मिनीच्या तलावातील महालाच्या पायर्या
दिसतात. गडावर ठिकठिकाणी पाण्याचे तलाव आहेत. राजस्थाना सारख्या कमी पावसाच्या प्रदेशात गडावरील वस्तीला पाणी पुरावे यासाठी
गडावर तलाव, कुंड खोदलेले होते. गडावरील दुसरा मनोरा म्हणजे किर्ती स्तंभ हा ७५ फ़ूट
उंच आहे. त्यावरही अप्रतिम कोरीव काम असून चारही बाजूला भगवान
आदिनाथाच्या मुर्ती आहेत. या जैन स्तंभाच्या बाजूला जैन मंदिर
आहे. किल्ल्यावर फ़तेह प्रकाश पॅलेस जवळ असलेले सतबीस देवी हे जैन मंदिर १२व्या
दगडात बांधलेले हे मंदिर शिल्पकलेचा अजोड नमुना आहे. या मंदिरात आणि रणकपूरच्या जैन
मंदिरात अनेक साम्य स्थळे आहेत. . चितोडगड वरील मंदिरे आणि त्यावरील कोरीवकाम हा वेगळ्या
लेखाचा विषय होऊ शकतो इतकी वैविध्यता मंदिरांमध्ये आहे.
आहार म्युझियम (Ahar Museum)
Ahar Museum
दिवसभर किल्ला पाहून झाल्यावर
चितोडगड किल्ल्या खाली असलेल्या हॉटेलात पोटपूजा करुन १५ किमी वरील सावरीया गाठावे. येथे श्रीकृष्णाचे काळया पाषाणातील मंदिर आहे. मंदिर
पाहून उदयपूरमध्ये शिरतांनाच आहार/अहाड म्युझियम दिसते.
या ठिकाणी धुळाकोट नावाची टेकडी होती तिथे पूरातत्व खात्याने उत्खनन
केल्यावर अंदाजे ४००० वर्षापूर्वी या ठिकाणी असलेल्या वस्तीचे (तांबावती नगरी) अवषेश मिळाले. त्याकाळी
जी संस्कृती नांदत होती ती आता आहार/अहाड सभ्यता या नावाने ओळखली
जाते. या ठिकाणी केलेल्या उत्खननात सापडलेल्या ताम्रपाषाण युगातील दैनंदिन वापराच्या
वस्तू, लघु अश्म अस्त्रे (microliths) ,विविध भांडी, चुली,
तांब्यांच्या कुर्हाडी, मासेमारीचे गळ,
इत्यादी वस्तू, ऐतिहासिक, इतिहासपूर्व आणि ऐतिहासिक
काळातील मुर्ती यांचे याठिकाणी कायम स्वरुपी प्रदर्शन पुरातत्त्व विभागाने मांडलेले
आहे. म्युझियमच्या मागे धुळकोट ही टेकडी आहे. म्युझियमच्या रक्षकांना विनंती केल्यास ते कुलूपबंद असलेली ही उत्खनन केलेली
जागा पाहायला देतात. येथे घरांच्या भिंती, सोक पिट इत्यादी गोष्टी पाहाता येतात.
अशाप्रकारे पहिला संपूर्ण
दिवस इतिहासाच्या सानिध्यात घालवल्यावर दुसर्या दिवशी सकाळी हल्दीघाटी, नाथव्दारा आणि कुंभलगडासाठी निघावे. हि तीनही ठिकाणे
एकाच दिवसात पाहायची असल्याने गाडी करणे आवश्यक आहे. रणकपूरचे
जैन मंदिरही पाहायचे असल्यास अजून एक दिवस लागतो. त्यासाठी कुंभलगड
येथे मुक्काम करावा लागतो. आपल्या लोणावळा खंडाळा सारखे कुंभलगड
हे उदयपूरच्या लोकांचे थंड हवेचे ठिकाण आहे. त्यामुळे येथे अनेक हॉटेल्स आहेत.
उदयपूरहून पुढे जोधपूरला जायचे असल्यास दुसर्या दिवशी रणकपूर पाहून
राणी या गावामार्गे ४ तासात जोधपूरला जाता येते.
हल्दीघाटी मेमोरीयल आणि
चेतक स्मारक (Haldighati Memorial & Chetak Smarak)
Chetak Samadhi
१८ जुन १५७६ ला हल्दीघाटी येथे राणाप्रताप आणि अकबरच्या सैन्यात (जयपुरचा राजपुत्र
मानसिंह याच्या नेतृत्वाखाली) एक दिवसाचे घनघोर युध्द झाल. जरी हे युध्द हल्दी घाटीचे
युध्द म्हणून प्रसिध्द असले तरी ते युध्द हल्दीघाटाच्या जवळ असणार्या खणमोर गावा जवळील
मैदानावर झाले. या युध्दात १८००० जणांचा मृत्यू झाला. त्यावेळी तिथे पडलेल्या पावसामुळे
तेथे रक्ताचे तळे तयार झाले तो भाग रक्ततलाई या नावाने ओळखला जातो. तिथे युध्दात कामी
आलेल्या सैनिकांचे स्मारक बनवलेले आहे. खमणोर गावाजवळ मानसिंहाचा तळ होता तो भाग शाही
बगीचा या नावाने ओळखला जातो. या ठिकाणी सुंदर बाग बनवलेली आहे. दिवस मावळतांना युध्दाचे
पारडे फिरल्याने राणाप्रताप आपल्या जखमी चेतक घोड्यावरून हल्दीघाटीत आला. तेथे पावसामुळे
वाहाणार ओढा ओलांडताना अतिश्रमाने चेतक घोड्याचा मृत्यू झाला. ज्या ठिकाणी चेतक घोड्याने
प्राण सोडला तेथे राणाप्रताप यांनी चेतक स्मारक आणि शिवमंदिर उभारले आहे.उदयपूर पासून ५० किमीवर चेतक स्मारक आणि हल्दीघाटी म्युझियम आहे. चेतक स्मारकात छत्री आणि त्यात असलेली घोडेगळ पाहाता येते. हा परिसर सुंदर
ठेवलेला आहे. चेतक स्मारकाच्या जवळ डॉं. श्रीमाली या माणसाने आयुष्यभर खपून,
स्वतःचा पैसा खर्च करुन, देणग्या मिळवून हल्दीघाटी
म्युझियम उभारलय. त्यात असलेल्या मिनी थेटर
मध्ये हल्दीघाटीच्या लढाईवर दोन ध्वनीचित्रफिती दाखवण्यात येतात. चित्रफ़िती पाहून झाल्यावर
एका गुहे सदृश्य भागातून आपल्याला पुढे नेत राणाप्रतापांच्या आयुष्यातले महत्वाचे प्रसंग,
चितोड्गड आणि कुंभलगड या किल्ल्यांची माहीती प्रतिकृतींच्या व्दारे
दिली जाते. त्याला निवेदनाची आणि छायाप्रकाशाची जोड देऊन प्रसंग उठावदार केले आहेत.
Ranapratap Memorial
एकेकाळी रक्ताच्या रंगाने लाल झालेली
हल्दीघाटी आजकाल गुलाबाच्या रंगाने लाल झालेली आहे. या भागात मोठ्याप्रमाणावर गुलाबाची
शेती होते. हि गुलाब एक्सपोर्ट होतातच पण गुलाबापासून बनवलेल्या वस्तू गुलकंद, गुलाबपाणी
इत्यादी वस्तू हल्दीघाटीत सगळीकडे तसेच म्युझियम मध्ये विकत मिळतात.हल्दीघाटी म्युझियमच्या मागच्या बाजूस एका टेकडीवर राणाप्रतापांचा भव्य पुतळा
उभारलेला आहे. याठिकाणाहून हल्दीघाटी परीसर दिसतो. त्याची दुर्गमता ध्यानात येते. हल्दीघाटी म्युझियम पासून
नाथव्दारा २० किमीवर आहे. नाथव्दाराला जातांना रस्त्यात एक छोटासा
घाट आणि खिंड लागते. या खिंडीतली माती हळदी सारख्या पिवळ्या रंगाची
आहे. त्यामुळेच या घाटीला हल्दीघाटी या नावाने ओळखले जाते.
या रस्त्याने पुढे जातांना शाही बगिचा, खमणोर आणि
रक्त तलाई ही ठिकाणे लागतात. नाथव्दाराला श्रीनाजींचे दर्शन घेऊन
आणि पोटपूजा करून ५० किमी वरील कुंभलगड किल्ला गाठावा. किल्ल्याच्या
थेट दारपर्यंत गाडी जाते.
कुंभलगड (Kumbhalgad)
Kumbhalgad
भारतातल्या सर्वात जुन्या अरवली पर्वतरांगेतला सर्वात उंच किल्ला (३७६६ फूट) म्हणजे
कुंभलगड, चीनच्या भिंती
नंतर सर्वात लांब मानव निर्मित तटबंदी ४४ किलोमीटर म्हणजे कुंभलगड. कुंभलगडाची अशी
अनेक वैशिष्ट्य आपण ऐकलेली असतात. त्यामुळे किल्ला पाहाण्याची उत्सुकता वाढते. किल्ल्याचे
भव्य बुरुज आणि दुहेरी तटबंदी आपले स्वागत करतात. कुंभलगडाचे प्राचीन काळी नाव होते
मच्छिंद्रगड. ८०० वर्ष अंधारत राहीलेल्या या
किल्ल्याचे भाग्य राणा हमीरच्या काळात परत उदयाला आले. हमीरचे बालपण या किल्ल्यावर
गेले होते. इसवीसन १४३३ मध्ये महाराणा कुंभाने हा किल्ला नव्याने बांधला. मेवाड मधल्या
८४ किंल्ल्यांपैकी ३२ किल्ले एकट्या राणा कुंभने बांधले आहेत. राणा कुंभाने कुंभलगडाला
आपली दुसरी राजधानी बनवले. इसवीसन १५९७ ला जेष्ठ शुक्ल तृतीयेला (९ मे १५४०) महाराणा
प्रतापसिंहाचा जन्म कुंभलगडावर झाला.
Kumbhalgad
किल्ल्याच्या मुख्य डोंगरावर चढण्यासाठी व्यवस्थित
मार्ग बनवलेला आहे. राम पोल, भैरव पोल, निंबू पोल, पगडा पोल हे दरवाजे ओलांडत आपला बाले किल्ल्यावर
प्रवेश होतो. किल्ल्याला याशिवाय आरेट पोल, हल्ला पोल,
हनुमान पोल इत्यादी दरवाजे तटबंदीत आहेत. बालेकिल्ल्यावर
राणाकुंभ महाल आहे. त्याच्या वरच्या बाजूला चढून गेल्यावर महाराणा प्रतापांचे जन्मस्थान
आहे. किल्ल्याच्या सर्वोच्च भागात फ़तेह प्रकाश नावाचा राजवाडा आहे. या राजवाड्याच्या
गच्चीवरून संपूर्ण किल्ला, दूरवर पसरलेली तटबंदी आणि आजूबाजूचा
दुर्गम परिसर दिसतो. किल्ल्यावर अनेक मंदिर आहेत. किल्ला उतरुन परत पहिल्या प्रवेशव्दारापाशी
येऊन मंदिर पाहायला जाता येते. किल्ला आणि मंदिर पाहून होईपर्यंत दिवस मावळायला लागलेला
असतो. याठिकाणी दररोज संध्याकाळी लाईट आणि साऊंड शो असतो. यात किल्ल्याचा आणि मेवाडचा
इतिहास सांगितला जातो. लाईट आणि साउंड शो संपल्यावर आपल्याला उदयपूरला जाता येते किंवा
कुंभलगडला मुक्काम करुन दुसर्या दिवशी रणकपूरचे जैन मंदिर पाहाण्यासाठी जाता येते.
ऱणकपूरचे जैन मंदिर संकुल (Ranakpur Temple)
Jain Temple Ranakpur
कुंभलगड ते रणकपूर हे अंतर ३३ किमी आहे. पण घाट रस्ता असल्यामुळे पोहोचायला साधारणपणे
२ तास लागतात. रणकपूरचे जैन मंदिर पर्यटकांसाठी दुपारी १२ वाजता उघडते. घाट रस्त्याने निसर्गाची शोभा पाहात आपण रणकपूरच्या सूर्य मंदिरापाशी
पोहोचतो. रणकपूरच्या जैन मंदिर संकुला बाहेर हे मंदिर आहे. मंदिरावर अप्रतिम कोरीवकाम
आहे. या मंदिराच्या बाहेरच्या बाजूस गजपट्टी बरोबर अश्वपट्टी पण आहे. सूर्याच्या रथाचे
घोडे यावर कोरलेले आहेत. सूर्यमंदिर पाहील्यावर आपली उत्सुकता वाढलेली असते तशात हिरव्यागार
डोंगराच्या पार्श्वभूमीवर भव्य मंदिर आणि अनेक कळसांची रांग दिसायला लागते. मेवाडचा
राजा कुंभ याच्या प्रधान संघवी धारनाथ पोरवाल याने १५ व्या शतकात हे सुंदर जैन मंदिर
बांधले. अरवली पर्वत
रांगेत मघई नदी काठी असलेले हे जैन मंदिर म्हणजे संगमरवराला पडलेल अप्रतिम स्वप्न आहे.
या मंदिराच्या गर्भगृहाला चार प्रवेशव्दार असून या मंदिरात भगवान आदिनाथांच्या
चार मुर्ती आहेत. त्यामुळे मंदिराला चतुर्मुख मंदिर या नावाने ओळाखले जाते. याशिवाय
मंदिरात सर्व तिर्थंकरांच्या मुर्ती आहेत. मंदिराला मुख्य कळस आणि इतर ७६ छोटे कळस
आहेत. मंदिराच्या आतल्या बाजूला संगमरावरावर जे कोरीव काम केले आहे त्याला तोड नाही.
८४ कोरीव खांब, ४ महामंडप, २० रंग मंडप यांच्या छतावर आतल्या बाजूने केलेले कोरीवकाम नाजूक आणि सुंदर
आहे. रणकपूरचे मंदिर कलाकुसरीत ताजमहालापेक्षा काकणभर सरसच आहे.
मुख्य मंदिरा बरोबर याठिकाणी पार्श्वनाथांचे मंदिर आहे. मंदिर पाहून
आपण १७० किमीवरील जोधपूर गाठू शकता किंवा १६० किमीवरील उदयपूरला परत येऊ शकता.
तीन दिवसाची ही सहल आपल्याला राजस्थानचे एक वेगळे रुप दाखवते. या परिसरात फ़िरल्यावर
अरवली पर्वत रांगा, त्यातील निबीड अरण्य यांच्या सहाय्याने महाराणा प्रताप यांनी कशाप्रकारे
अकबराच्या बलाढ्य सैन्याशी आयुष्यभर सामना केला, हल्दीघाटीचे युध्द लढले याची आपल्याला
कल्पना येते आणि त्यांच्या बद्दलचा आदर दुणावतो.
जाण्यासाठी :- उदयपूर हे शहर रस्ता, रेल्वे आणि हवाईमार्गाने देशातील सर्व शहरांशी
जोडलेले आहे. उदयपूरला राहाणाची आणि खाण्याची व्यवस्था आहे. उदयपूरला राहून ३ दिवसात
अशाप्रकारे कार्यक्रम बनवता येईल.
दिवस १ :- उदयपूर दर्शन, मुक्काम उदयपूर
दिवस २ :- उदयपूर- चितोडगड -सावरीया - आहार/अहाड म्युझियम - उदयपूर (मुक्काम उदयपूर)
दिवस ३ :- उदयपूर- हल्दीघाटी- नाथव्दारा- कुंभलगड (मुक्काम कुंभलगड)
दिवस ४ :- कुंभलगड - रणकपूर - उदयपूर किंवा जोधपूरला मुक्काम
अमित सामंत
ओसियॉ (Temples of Osian) आणि मंदोर दुर्ग (Mandore Fort) Offbeat Places near Jodhpur,Rajasthan
ओसिया
राजस्थानातील जोधपूरला पाहण्याच्या यादीत क्लॉक टॉवर, मेहरानगढ किल्ला,
जसवंतथाडा, मंडोर इत्यादी ठिकाण होती. स्थानिक रिक्षावाले, हॉटेलवाल्यांशी
गप्पा मारतंना ओसिया गावाच नाव समजले. त्या ठिकाणी सचिया मातेच मंदिर आहे
आणि ओसिया पासून जवळच वाळूच्या टेकड्या आहेत आणि उंटावरुन किंवा जीप मधून
तुम्ही त्यावर फ़िरु शकता असेही कळले. जोधपूर पासून ६० किमीवर अंतरावर ओसियॉ
गाव आहे. बसने गावात पोहोचल्यावर गावाच्या बाहेरच रस्त्यालगत दगडात
बांधलेली अप्रतिम मंदिर दिसली. बस मधून उतरुन थेट मंदिरे गाठली. नेहमी
प्रमाणे पूरातत्व खात्याच्या निळ्या फ़लकाने स्वागत केले. स्मारक संरक्षित
असले तरी त्याला काहीही संरक्षण नव्हते. शेळ्या मेंढ्यांचा मंदिरात मुक्त
वावर होता आणि गावाची कचराकुंडीही तेथेच होती. रस्ताच्या एका बाजूला ३ आणि
दुसर्या बाजूला एक मंदिर होते. रस्त्या लगत असलेल्या मंदिराचा कळस तुटलेला
होता. पण त्याचा गजपृष्ठाकृती सभा मंडप वैशिष्ट्यपूर्ण आहे. दगडात केलेले
हे काम पाहाण्यासारखे आहे. छतावर आणि खांबांवर कोरीवकाम आहे. गर्भगृहात
मुर्ती नाही. त्याच्या बाजूचे हरीहरचे मंदिर हे शिल्पकामाचा अप्रतिम नमुना
आहे. शेव आणि वैष्णव पंथातील वाद पराकोटीला पोहोचला होता तेंव्हा तो
मिटवण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या पातळीवर केला गेला. त्यातूनच
मुर्तीशास्त्रात हरीहर या कल्पनेचा उदय झाला. यात एकाच मुर्तीत उजव्या
बाजूला शिव आणि डाव्या बाजूला विष्णू त्याच्या आयुध, अलंकार आणि वाहानांसह
कोरलेला असतो.उजवीकडे शंकराच्या जटा, गळ्यातील रुंडमाळा, हातात डमरु,
त्रिशुळ, पायाषी गण आणि नंदी दाखवलेले असतात, तर डाव्या बाजूला विष्णूचा
मुकुट, गळ्यात वैजयंती माळा, हातात शंख, चक्र आणि पायाशी गरुड दाखवलेला
असतो. या मंदिराच्याही गर्भगृहात मुर्ती नाही. पण मंदिराच्या सभा मंडपातील
खांब, छत यावर केलेले कोरीवकाम अप्रतिम आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला
हरीहर, त्रिविक्रम अवतार, नरसिंहावतार, शंकराची केवलमुर्ती, गणपती,
महिषासुर मर्दीनीची मुर्ती आणि इतर मुर्ती कोरलेल्या आहेत. मुर्तींच्या
वरच्या शिल्प पटावर रामायण , महाभारत, पुराणातील कथा आणि काही मैथुन शिल्प
कोरलेली आहेत. तिसरे मंदिर शंकराचे आहे ते सध्या पुजेत आहे. या मंदिराच्या
पुढे एक सुंदर पुष्कर्णी बांधलेली आहे. सध्या मात्र ती कचर्याच्या
विळख्यात सापडलेली आहे.
ओसिया हे थर वाळवंटाच्या काठावर असलेले गाव प्राचीन काळापासून व्यापारी
मार्गावरचे महत्वाचे स्थान होते. ८ व्या शतकात याठिकाणी प्रतिहार घराण्याची
सत्ता होती. त्यांनी ८ ते १२ शतकाच्या दरम्यान याठिकाणी अनेक हिंदु आणि
जैन मंदिरे बांधली. ओसवाल जैनांचे हे महत्वाचे धार्मिक क्षेत्र आहे.
रस्त्याच्या दुसर्या बाजूला सूर्य मंदिर आहे. त्यावरील कोरीवकामही सुंदर
आहे. हि तीन मंदिर पाहून छोट्या टेकडीवर असलेल्या सचिया माता मंदिराकडे
जातांना आजुबाजूला हाराची, प्रसादाची दुकान हॉटेल्स दिसतात. सचिया माता
म्हणजे इंद्राची पत्नी इंद्राणी. याठिकाणी मुख्य मंदिरात सचिया माता व
त्याच्या बाजूला चंडी देवी आणि अंबा मातेची मंदिरे आहेत. ही मुळ मंदिरे ८
व्या शतकात बांधली असली तरी आज असलेली मंदिरे १२ व्या शतकात बांधलेली आहेत.
मंदिराच्या सभामंडपात आणि अंतराळाच्या छतावर केलेले कोरीवकाम सुंदर आहे.
मंदिराच्या बाहेरच्या बाजूस दशावतारातले काही अवतार कोरलेले आहेत. येथे
अनेक रुपात कोरलेले व्याल ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ८ व्या शतकात
बांधलेले महावीर मंदिर हे सुध्दा शिल्पकलेचा अप्रतिम नमुना आहे. ही दोन्ही
मंदिरात सध्या पूजा होते.
\
या
भागात काही रिसॉर्ट आहेत. डेझर्ट सफ़ारी, तंबूतील निवास, स्थानिक
कलाकारांचे कार्यक्रम अशी पॅकेजेस ते देतात, पण ती खूपच महागडी आहेत. अशा
मुद्दाम (आर्टीफ़िशियली) तयार केलेल्या रिसॉर्ट मध्ये राहाण्यापेक्षा येथील
गावात टिपिकल राजस्थानी घरात राहाण्याची आणि जेवणाची सोय केली जाते.
टेकड्यांपासून ५ किमीवर असलेल्या खेमसरगावातील सिवरों की ढाणी या वस्तीवर
आमच्या जीपवाल्याचे घर होते. तेथे त्याने जेवणाची व्यवस्था केली होती. या
वस्तीवर जाण्यासाठी रस्ता नव्हता. पुन्हा वाळूच्या टेकड्यांवरुन उड्या मारत
जीप वस्तीत पोहोचली. रस्त्यात एक फ़ोर व्हील ड्राईव्ह जीप मुलांना घेऊन
शाळेत जातांना दिसली, हिच येथल्या मुलांची स्कुल बस. पाच सहा घरांची वस्ती
असलेल्या सीवरों की धानी वस्तीजवळ मोर, नीलगाय आणि हरणांनी दर्शन दिले.
मातीच्या कंपाऊंडच्या आत तीन गोलकार, गवताने शाकारलेली घर होती. त्यातील एक
स्वयंपाक घर, दुसरी राहाण्याची खोली आणि एक पाहूण्यांसाठी जेवणाची खोली
होती. मध्यभागी अंगण होते. बाहेर काही उंट झाडाखाली बांधलेले होते. जीप
नसल्यास प्रवासाचे हे दुसरे साधन होते. राजस्थानी पध्दतीचे गरमागरम जेवण
जेऊन परत ओसिया गाठले. ओसियाहून जोधपूरला जाणारी गाडी पकडून जोधपूरच्या ९
किलोमीटर अलिकडे असलेल्या मंदोर गार्डनला जाता येते.
मंदोर दुर्ग (Mandore Fort)
जेवण झाल्यावर परत ओसियाला येऊन जोधपूरला जाणारी गाडी पकडून जोधपूरच्या ९
किलोमीटर अलिकडे असलेल्या मंदोर गार्डनला उतरावे. या ठिकाणी ६ व्या शतकातला
मंदोर दुर्ग, जोधपूरच्या राजांची समाधी मंदिरे आणि म्युझियम आहे. मांडव्य
ऋषींच्या वास्तव्यामुळे टेकड्यांच्या सानिध्यात असलेल्या नगराला
मांडिव्यपूर असे नाव पडले. या नगरात मंदोदरी राहात होती. तीचे रावणाशी
लग्न झाल्यामुळे मंदोर शहरातील लोक रावणाला आपला जावई मानतात. त्यांनी
मंदोर मध्ये रावणाचे मंदिर बांधलेले आहे, दसर्याला देशभर रावणाला
जाळण्याची प्रथा आहे, पण मंडोर मध्ये तो दिवस रावणाच्या श्राध्दाचा दिवस
म्हणून पाळला जातो.
मंदोर दुर्ग दोन टेकड्यांवर वसलेला आहे. त्यामधील दरीतून जाणारा
पाण्याचा प्रवाह वापरुन सुंदर जोधपूरच्या राजांनी सुंदर उद्यान बनवलेले
आहे. स्थानिकांच्या अनास्थेमुळे या ठिकाणी अस्वच्छता आहे. जोधपूरच्या
राजघराण्यातील राजांची येथे लाल दगडात बांधलेली समाधी मंदिरे आहेत. मंदोर
गार्डन मधील समाधी मंदिरे पाहून व्यवस्थित बनवलेल्या पायर्यांच्या
मार्गाने मंदोर दुर्गावर जाता येते. इसवीसनाच्या सहाव्या शतकापूर्वी या
ठिकाणी दुर्ग होतो. ही प्रतिहार राजवंशाची राजधानी होती. इसवीसनाच्या १४
व्या शतकात प्रतिहारांनी हा किल्ला राठोडांना दिला. १३९५ मध्ये गुजरातच्या
सुतलानाने या किल्ल्याला वेढा घातला पण त्याला किल्ला जिंकता आला नाही.
इसवीसन १४५३ मध्ये राव जोधा याने किल्ला जिंकून घेतला. त्याने आपली राजधानी
मंदोर दुर्गावरुन जोधपूरच्या किल्ल्यावर हालवली. तेंव्हा पासून
याकिल्ल्याचे महत्व कमी झाले. आज किल्ल्यावर एक मंदिर सोडल्यास बाकी सर्व
वास्तू उध्वस्त झालेल्या आहेत. किल्या वरील वास्तूंच्या अवशेषांवरुन या
किल्ल्यावर मोठ्या प्रमाणावर वस्ती होती. मंदोर दुर्ग पाहून जोधपूर सिटी
बसने संध्याकाळी जोधपूरला परतता येते.
अमित सामंत
आभानेरीची चांद बावली
1 Vote
Chand Baoli, Abhaneri
विहीर म्हणजे पाण्याचा साठा करण्यासाठी जमीन खोदून बांधून काढलेली सोय.
पण भारतीय स्थापत्य परंपरेत विहीर बांधत असताना उपयुक्ततेच्या पलीकडे जाऊन
केलेला व्यापक विचार हा बारव स्थापत्य रूपात विकसित झालेला दिसतो. खोलवर
केलेलं दगडी बांधकाम, विविध आकारात रचना केलेला तलविन्यास आणि पाण्याच्या
पातळीपर्यंत जाता यावं यासाठी केलेली पायऱ्यांची रचना. या सगळ्याचं भौमितीय
सौंदर्य अनुभवायचं असेल तर बारव पाहायला हवी. इंग्लिशमध्ये या रचनेला step
well तर हिंदीत बावली असं म्हंटलं जातं. गुजरातमध्ये पाटण येथे राणी की
वाव या नावाने प्रसिद्ध असलेल्या विहिरीतील नाजूक नक्षीकाम आणि शिल्प
सौंदर्याने या रचनेला विश्व वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. अशाच बारवांची
मालिका राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र राज्यात दिसते. राजस्थानमध्ये
माझी फिल्म शूट करत असताना मी पाहिलेली एक सुंदर बारव म्हणजे आभानेरी येथील
चांद बावली …
निकुंभ घराण्यातील राजा चांद किंवा चंद्र याने ८-९ व्या शतकात आभानेरी
किंवा आभानगरी येथील आपल्या राज्यात ही विहीर बांधली. या विहिरीची खोली
सुमारे १९.५ मीटर आहे. या आयताकृती विहिरीच्या तीन बाजूंना पायऱ्यांची
सुंदर रचना आहे तर चौथ्या बाजूला जणू महालच बांधावा त्याप्रमाणे छज्जे आणि
दरवाजे आहेत. विहिरीच्या चारही बाजूंना संरक्षक भिंत असून उत्तर दिशेला
दरवाजा आहे.
या रचनेत सुमारे 3500 पायऱ्या आहेत आणि १३ मजली बांधकाम केले गेलेले
दिसते. राजा चांद हा गुर्जर प्रतिहार घराण्यातील शासक असावा आणि या
घराण्याच्या उत्कर्ष काळात या बारवेची बांधणी झाली असे इतिहासकार सांगतात.
3500 steps at Abhaneri
या परिसरात एक प्राचीन मंदिरही आहे जे हर्षत माता मंदिर म्हणून ओळखले
जाते आणि सुमारे १२ वर्षे जुने बांधकाम मानले जाते. स्थानिकांच्या मते
गझनीच्या महंमदाच्या हल्ल्यात या मंदिराचे बरेच नुकसान केले गेले.
Harshal Mata temple
या मंदिराची जुने अवशेष वापरून पुनर्बांधणी केली असावी असं वाटतं. इथलं कोरीवकाम आणि शिल्पेही आवर्जून पाहावीत अशीच आहेत.
Carvings at Harshal Mata Temple
या मंदिराची जुने अवशेष वापरून पुनर्बांधणी केली असावी असं वाटतं. इथलं
कोरीवकाम आणि शिल्पेही आवर्जून पाहावीत अशीच आहेत. दिल्ली-आग्रा-जयपूर या
पर्यटन त्रिकोणात असलेलं हे ठिकाण जयपूर आणि आग्रा महामार्गाजवळच आहे. आमेर
किल्ला, हवामहल, आग्रा किल्ला, ताजमहाल अशी भटकंती करत असताना आभानेरी
सारखी अद्भुत ठिकाणे सुद्धा नक्कीच पाहिली गेली पाहिजेत.
अनवट वाटा – वैशिष्टय़पूर्ण ‘बूंदी’
सामना ऑनलाईन
5-6 minutes
>> डॉ. सरिता विनय भावे
‘छोटी काशी’ नावाने ओळखले जाणारे बूंदी अश्मयुगीन हत्यारे व
प्रागैतिहासिक भित्तिचित्रे यांचे माहेरघर आहे. आलिशान महाल, भव्य किल्ले,
सरोवरे याद्वारे आपली निराळी ओळख निर्माण करण्यात ते यशस्वी ठरत आहे. असे
असले तरी ‘सिटी ऑफ स्टेपवेल्स’ म्हणून नावाजल्या जाणाऱ्या बूंदीचे खरे
वैशिष्टय़ आहे इथल्या पायविहिरी अथवा पुंडे!
बुंदी’ म्हटलं की सर्वसामान्य मराठी व मध्य/उत्तर हिंदुस्थानी जनतेच्या
डोळय़ांसमोर खायची बुंदी उभी राहून मुखकमलावर स्मितहास्य विलसते! परंतु आज
आपण ज्या ‘बूंदी’बद्दल जाणून घेणार आहोत ते आहे राजस्थान राज्यातील एक शहर!
राजस्थान राज्याची मेवाड, मारवाड, शेखावती वगैरे प्रांतवार विभागणी केली
आहे त्यातील ‘हाडा’ या राजपूत राजांनी निर्मिलेल्या ‘हाडोती’ प्रभागात
बूंदी, बरन, कोटा आणि झालावाड जिह्यांचा समावेश होतो. मुंबईहून बूंदीला
पोचण्यासाठी कोटा रेल्वे जंक्शन महत्त्वाचे मध्यवर्ती स्थानक आहे.
कोटापासून साधारण 40 कि. मी. अंतरावर आणि जयपूर सर्वात जवळचे विमानतळ
(साधारण 200 कि. मी.) असलेल्या बूंदीला चारचाकी वाहनाने पोहोचणे सोपे आहे.
तीन बाजूंनी अरावली पर्वतरांगांच्या कुशीत, चिंचोळय़ा दरीत वसलेल्या,
देखणा ‘व्हय़ू’ लाभलेल्या बूंदी शहराला पूर्व राजस्थानची ‘ब्ल्यू सिटी’
असेही संबोधतात. मीणा जमातीतील ‘बूंदा नाला’ राजाच्या नावावरून या गावाला
‘बूंदी’ हे नामाभिधान मिळाले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ‘राजपुताना’
क्षेत्रात ‘प्रिन्सली स्टेट’ म्हणून मिरवणारे बूंदी शहर वर्तमानकाळात
‘ऑफबीट’ पर्यटन स्थळ म्हणून हौशी पर्यटकांच्या ‘बकेटलिस्ट’ मध्ये वरच्या
क्रमांकावर आले आहे. ‘छोटी काशी’ नावाने ओळखले जाणारे बूंदी अश्मयुगीन
हत्यारे व प्रागैतिहासिक भित्तिचित्रे यांचे माहेरघर आहे. आलिशान महाल,
भव्य किल्ले, सरोवरे याद्वारे आपली निराळी ओळख निर्माण करण्यात ते यशस्वी
ठरत आहे. असे असले तरी ‘सिटी ऑफ स्टेपवेल्स’ म्हणून नावाजल्या जाणाऱ्या
बूंदीचे खरे वैशिष्टय़ आहे इथल्या पायविहिरी अथवा पुंडे! पायविहिरींना बारव,
बाव, बावली, बावडी, वाव अशी विविध नावांनी आपल्याकडे ओळखले जाते.
धार्मिक कल असणाऱ्या समाजात ‘पुत्रधर्मा’चे पालन अन्नदान, विहिरी खणणे,
पाण्याचे हौद बांधणे, झाडे लावणे, वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे
यांसारख्या पुण्यकर्मांतून साधले जाते. म्हणूनच राजस्थान, गुजरातसारख्या
दुष्काळग्रस्त, पाण्याचे दुर्भिक्ष असणाऱ्या रेताड राज्यांत राजे-महाराजे,
धनाढय़ सावकार यांनी प्रजेला, प्राण्यांना, शेतीला वर्षभर पुरेल असे पाणी
पुरवणाऱ्या विहिरी, पुंडे जागोजागी बांधणे महत्त्वाचे कार्य मानले.
जमिनीतील झिरपणाऱ्या पाण्याचा साठा करणाऱ्या आणि आपल्या विशिष्ट
स्थापत्यामुळे भूगर्भ-धरा-स्वर्ग या तिन्ही ‘लोकांना’ जोडणाऱ्या या
जीवनदायी पायविहिरींना साहजिकच पवित्रतेचे प्रतीक मानले गेले. या विहिरी
नेहमीच स्त्र्ायांचे हक्काचे स्थान राहिल्या आहेत. गुजरात राज्यातील
पायविहिरींचा अभ्यास केलेल्या लेखिका पुर्णिमा मेहता भट्ट यांच्या मते
पायविहिरी बांधण्यामागच्या ‘स्फूर्तिस्थान’ ग्रामदेवता, दयाळू आई, सद्गुणी
पत्नी तर कधी विशेष लाडकी प्रेयसी असायच्या. स्वतःची चटणी-भाकरी घेऊन
प्रवासाला निघालेल्या वाटसरूंची पिण्याच्या पाण्यासाठी वाटेवरल्या या
विहिरींवरतीच भिस्त असायची. प्रवाशांना खाली उतरून पाणी घेणे तसेच
विहिरींची देखभाल करणेही सोपे जावे यासाठी वैशिष्टय़पूर्ण
पायऱ्या-पायऱ्यांची रचना केली जायची.
विहिरी बांधण्यामागचा मुख्य उद्देश जलसंवर्धन आणि पुनर्भरण (रिचार्जिंग)
असतो. भौगोलिक रचनेचा फायदा मिळालेल्या तसेच भूपृष्ठाखालील जलाचा स्तर
चांगला असलेल्या बूंदी शहरात म्हणूनच अशा विहिरी जोपासल्या गेल्या. या
विहिरी/पुंडे चौरस अथवा इंग्रजी भाषेतील आय, एल, टी, यू, व्ही, झेड या
आकारात असत. विहिरींच्या बाजूंवर भक्तीचे प्रतीक म्हणून कोरलेल्या
देव-देवतांमुळे त्यांचे स्थापत्यसौंदर्य वाढायचे. पूर्वी बूंदी शहरात
पायविहिरींची संख्या शंभरावर होती. आता साधारण पन्नास विहिरी अस्तित्वात
असून त्यातील काही मोडकळीस आल्या आहेत. पायविहिरींतील पाणी अस्वच्छ/दूषित
असून रोगराई फैलावण्यास कारणीभूत ठरेल या अनाठायी भीतीने बऱ्याच विहिरी
इंग्रजांनी भराव घालून झाकून टाकल्या आहेत. संरक्षित स्मारक असलेल्या काही
विहिरींच्या पायऱ्यांवर असलेला केरकचरा, देखभालीतील हयगय मन खट्टू करते.
‘नगर सागर’ ही जोडपुंडे भरचौकात असल्याने गर्दीत मिसळून गेली आहेत. अस्वच्छ
असूनही त्यांचे मूळ सौंदर्य लपत नाही. दुसऱ्या एका बावडीची रचना बघून
‘हम्पी’च्या ‘पुष्करिणी’ची आठवण होते. ‘धाभाई का पुंड’ बूंदीतील सर्वात
प्रेक्षणीय पुंड मानले जाते. 18 व्या शतकात दोन व्यापारी बंधूंनी
बांधलेल्या या पुंडाच्या दोन बाजूंना गणेश आणि कार्तिकेय यांच्या मूर्ती
कोरलेल्या आहेत. हे पुंड सर्वात मोठे तर आहेच ढखोली 53 मीटर (173 फूट)ल
शिवाय त्याचा उलटय़ा पिरॅमिडसारखा आकारसुद्धा विशेष वाटतो. पुंडाची तीन
बाजूंची पायऱ्या-पायऱ्यांची (साधारण 700) भौमितीय रचना तर नजर अक्षरशः
खिळवून ठेवते. त्या ‘लाटांवरून’ चढता-उतरताना एका गूढ विश्वातून मार्गक्रमण
करत आहोत असा ‘फील’ येतो! या पुंडाच्या एका बाजूला विश्रांतीसाठीचे अलंकृत
बांधकाम केलेले दिसते. पुंडाजवळ उंच चौथऱ्यावर उभारलेली दोन विशाल
छत्रीवजा स्मारके अफलातून आहेत. त्यांच्या मधोमध असलेली भव्य शिवलिंगे तसेच
घुमटाच्या आतील कोरीवकाम लक्षवेधक आहेत. दुष्काळग्रस्त राजस्थानी जनतेच्या
हितासाठी बांधलेले हे पुंड हेतू, स्थापत्य, भव्यता, सुंदरतेमुळे ‘हाडोतीची
राणी’ असलेल्या बूंदीची ‘गोड’ आठवण आपल्या हृदयात कायम जागृत ठेवते!
२००९ च्या ३० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान आम्ही मेवाडदर्शन सहल सचिन
ट्रॅव्हल्सच्या सोबत केली. या पर्यटनाची पूर्वतयारी; प्रत्यक्ष
प्रवास-निवास, खानपान, कलास्वाद, खरेदी; आणि प्रवासा अखेरीस या सर्वांतून
झालेले मेवाडदर्शन; अशा स्वरूपात हे प्रवासवर्णन लिहीत आहे. यातील
इतिहासात्मक वेचे, बहुतेकदा, विकिपेडियावरून स्वैर अनुवाद करून घेतलेले
आहेत. ३० सप्टेंबर आणि १० ऑक्टोबर हे दोन दिवस रेल्वेच्या प्रवासातच खर्ची
पडले. तसेच ९ ऑक्टोबर जयपूरला खरेदीखातर खर्चलेला असल्याने, पर्यटनाचे
प्रत्यक्षात आठच दिवस पदरी पडलेले होते. म्हणून, प्रस्तावनेचा हा पहिला भाग
आणि दर दिवशीच्या पर्यटनाचा प्रत्येकी एक, अशा एकूण नऊ भागात हे
प्रवासवर्णन लिहीलेले आहे.
यंदा गणपती ते दिवाळीच्या दरम्यान मेवाड
पाहायला जायचे असा निश्चय झाल्यावर तिथला उत्तम काळ कोणता (खरे तर मेवाड
दर्शनार्थ पक्ष पंधरवड्यासारखा काळ शोधूनही सापडणार नाही), आपल्याला कधी
वेळ उपलब्ध आहे, सुट्ट्या कधी काढता येतील या सगळ्याचा अंदाज घेऊन सहलीच्या
नियोजनास सुरूवात झाली. माझा आवडता समज असा आहे की पर्यटन सहल ८-१० दिवस
तरी लांबीची असावी. कमी असल्यास, नुसता जाण्या-येण्यातच घालवलेला वेळ,
सहलीत प्रत्यक्ष दर्शनार्थ घालवलेल्या वेळापेक्षा जास्त ठरून, सहलीकरता
उपलब्ध असलेल्या वेळाचा अपव्यय होतो. तसेच जास्त असल्यास, पर्यटनाचा उत्साह
मावळत मावळत अखेरीस ते पर्यटन आनंदचे राहत नाही. म्हणून सहल ८-१० दिवसांची
असावी असाही निर्णय झाला. शिवाय रेल्वेचा प्रवास रात्रभराहूनही जास्त
असल्याने येणे-जाणे विमानानेही करता येईल काय याची चाचपणी करायचे ठरले. मग
काय काय पाहायचे आहे, काय पाहण्यासारखे आहे, मेवाडचा इतिहास काय आहे, तिथे
काय काय खाण्याचे अभिनव पदार्थ चाखता येतील, कुठकुठल्या कलांचा प्रत्यक्ष
आस्वाद घेता येईल, कोणकोणती निसर्गसौंदर्ये आस्वादता येतील याची जंत्री
सुरू झाली. प्रत्यक्ष सहल जरी ८-१० दिवसांचीच होणार असली तरीही माझ्या
प्रथेप्रमाणे तीन महिने आधीपासूनच माहिती काढणे, आरक्षणे करणे,
पर्यटनसाहित्याची जमवाजमव इत्यादीस जोमाने सुरूवात झाली.
यात्राकंपनीसोबत
पर्यटन केल्यास अल्पावधीत नियोजन, आपत्कालीन व्यवस्था, तसेच जुळवाजुळवीत
जीव आटवणे कमी होते हे खरेच, पण पैशाच्या रूपात त्याचे मूल्य चुकवावेच
लागते. तरीही उपलब्ध वेळेचा जास्तीत जास्त सदुपयोग करायचा तर हे करायलाच
हवे, मग जास्त खर्च झाला तरी चालेल असा निर्णय झाला. त्यानुसार इंडियन
एअरलाईन्स, केसरी, सचिन इत्यादींच्या संचालित सहलींचा तपास हाती घेतला.
इंडियन एअरलाईन्सच्या देकारात विमानप्रवासाच्या खर्चाला पहिली प्राथमिकता
होती. स्थानिक पर्यटन स्थानिक हॉटेलांवर सोपवतात असा आमचा मागचा अनुभव
होताच. शिवाय संपूर्ण सहलीचा माणशी खर्च त्यांचाच सर्वाधिक होता. केसरी आणि
सचिनच्या संकेतस्थळांवर सहलींची माहिती व्यवस्थितपणे दिलेली दिसत होती.
मात्र केसरीच्या देकारात काय काय समाविष्ट होते ते नीटपणे कळू शकत नव्हते.
सगळ्यात माहितीतत्पर सहलविपणन सचिनचे होते. माहिती विचारायचा अवकाश की हवी
ती माहिती तत्काळ सादर होत होती. त्यांच्या सवलती देण्याच्या पद्धती नीटपणे
कळलेल्या असल्याने, प्रत्यक्षात किती खर्च होईल याचा अदमास लगेचच आला.
त्यांचाच दरमाणशी सहलखर्चही सर्वात कमी येत होता. डोंबिवलीला त्यांचे
कार्यालयही होते. म्हणून मग सचिनसोबत जाण्याचा निर्णय झाला.
मात्र
जरी ते रेल्वे आरक्षण करून देऊ म्हणत होते तरी प्रत्यक्षात आम्हाला हव्या
असलेल्या १०-१०-२००९ च्या गाडीचे आरक्षणच रेल्वेच्या संकेतस्थळावर उपलब्ध
नव्हते. शिवाय त्यांच्या सहलीची सुरूवात आबूरोडपासून होत होती. म्हणजे
विमानाने अहमदाबादपर्यंत जाऊन आबूला जाण्याचे सव्यापसव्य करूनही त्याचा
पुरेसा लाभ होणारच नव्हता. हे त्यांना सांगून, रेल्वे आरक्षणाची त्यांची
काही विशेष व्यवस्था आहे काय असे विचारता, ती तशी नाही असेच उत्तर आले. मग
रेल्वेचे आरक्षण झाल्याखेरीज सहलनोंदणी करायची नाही असे ठरवले आणि
त्यांच्या नक्की केलेल्या दुसर्या कुठल्या तारखेस जुळवून घेता येईल का, ही
चाचपणी सुरू केली. ३०-०९-२००९ लाच त्यांची पहिली सहल सुरू होत होती. पण
त्याकरताचे आरक्षण तर आता मिळणारच नाही असे वाटत होते. तरीही रेल्वेचे
संकेतस्थळ बघितले, आणि काय आश्चर्य, ३०-०९-२००९ चे आरक्षण उपलब्ध होते.
सचिनला विचारून घेतले की आमचे आरक्षण होईपर्यंत आमच्या जागा राखून ठेवता
येतील का? ते हो म्हणाले. मग जाण्या-येण्याचे आरक्षण लगेचच करून घेतले आणि
सचिनसोबत सहलनोंदणी केली.
मेवाडः एक बहुचर्चित पर्यटनवर्तुळ
मग
तपासादरम्यान असे लक्षात आले की मेवाड पर्यटन हा काही साधासुधा प्रकार
नाही, तर तो भारतातला सर्वात जास्त पर्यटकांच्या आवडीचा पर्यटन मार्ग आहे.
आनंददायी, प्रेरणादायी आणि सुखाचा. मेवाडास मिळालेले निसर्गाचे वरदान
म्हणजे अरावली पर्वत.
अर्बुद आवली म्हणजे अरावली. अर्बुद म्हणजे
गळू, टेंगूळ, टेकाड, शिखर, कळस. हरियाणा, राजस्थान तसेच गुजरातच्या
भूभागांवर ईशान्येकडून नैऋत्येकडे पसरत गेलेल्या टेकड्यांच्या रांगा हेच
अरावली पर्वताचे स्वरूप आहे. हिमालय, सह्याद्री, सातपुडा इत्यादी पर्वतांचे
स्वरूप भिंतींसारखे आहे. मात्र अरावली पर्वत सुट्ट्या टेकड्या टेकड्यांचा
मिळून घडलेला आहे. पश्चिमेकडल्या थरच्या वाळवंटास रोखून धरण्याचे
महत्त्वाचे कार्य अरावली पार पाडतो आहे. याच कारणाने इथे अर्बुदादेवीची
पूजाही सर्वत्र केली जाते. अरावली पर्वतातून बनास, लुनी, गंभीरा, चंबळ,
(सर्व पूर्ववाहिनी) तसेच साबरमती (पश्चिमवाहिनी) इत्यादी नद्या उगम पावतात.
हल्लीच्या राजस्थानाचे सर्वसाधारणपणे दोन भाग पडतात. थरच्या रुक्ष
वाळवंटाची मरूभूमी असलेला मारवाड आणि तलाव-अरण्यांनी जिवंत झालेला, अरवली
पर्वताच्या कुशीत वसलेला मेवाड.
भारतातले सर्वात बहुचर्चित
पर्यटनवर्तुळ मेवाडात आहे. दिल्लीचे तख्तनशिन बादशाहसुद्धा भरतभूमीच्या
वैभवाचे उपभोग घेऊ शकले नसतील, एवढे वैभव राजपुतान्यातील राजांनी अनुभवले
आहे. आज दिल्लीत म्हणण्यासारखा राजवाडा नाही. मात्र राजस्थानात सारेच
राजेशाही. मेवाडातील अंबरचे राजे कच्छवाह. यांनीच जयपूर वसवले. तिथे राज्य
केले. दिल्लीतील प्रचलित राजसत्तेशी कायमच जुळवून घेतले आणि सार्या
भरतवर्षाची राजसत्ता पर्यायाने आपल्या हातात ठेवली. तिचा उपभोग घेतला.
चित्तौडचा इतिहास महाभारतापासूनचा आहे. इथे बाप्पा रावळांच्या गहलोत वंशाने
राज्य केले. पुढे ते शिसोदिया म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी उदयपूर नगर
वसवले. हे कायमच दिल्लीच्या सत्तेविरुद्ध संघर्षरत राहिले. तरीही जयपूर
असो की चित्तौड, दोन्हीही ठिकाणी जे राजप्रासाद आज पाहायला मिळतात ते
भरतवर्षातील संपत्तीच्या साठ्याचे निदर्शक आहेत. मात्र अंबर व चित्तौड
यांच्यात एक मुख्य फरक आहे. भरतवर्षाच्या रक्षणार्थ आणि स्वाभिमानार्थ
अंबरकरांनी तडजोडीचा मार्ग स्वीकारला, तर चित्तौडकरांनी संघर्षाचा मार्ग
पत्करलेला दिसून येतो. सार्या भरतवर्षातील संपत्तीचा राजपुतान्यात संचय
करण्यात मात्र दोन्ही घराण्यांनी कोणतीच कसर ठेवलेली दिसत नाही. वायव्येस
असल्याने अंबरकरांना कायमच आक्रमकांचा त्रास सहन करावा लागे. तर चित्तौडकर
बव्हंशी सुरक्षिततेच्या नैसर्गिक आवरणात राहिल्याने तडजोडीस धार्जिणे
राहिले नाहीत.
आपल्या बुद्धिवैभवाने मातृभूमीस परम वैभवाप्रत
नेण्याकरता राजपुतांनी जयपूर, उदयपूरसारखी नयनमनोहर शहरे वसवली;
यंत्रमंदिरा (जंतरमंतर) सारख्या वेधशाळा निर्माण करून अवकाश निरीक्षणास,
संशोधनास प्रतिष्ठा दिली; दिलवाडासारखी मंदिरे, कुंभलगड, चित्तौडगड, अंबर,
रणथंभोर यांसारखे कोटकिल्ले व त्यावरील गढ्या-प्रासादांनी कलेचे स्वर्गच
भुईवर आणले आणि राजस्थानच्या मरुभूमीत “सहेलियों की बाडी”, जलमहल यांसारखी
मानवी उपभोगाची चिरंतन रम्य स्थळे साकार केली.
निसर्गाचे दान सढळ
हस्ते मिळालेले असतांना, ते मानवनिर्मित लेण्यामंदिरांनी विभूषित करून
पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करण्यात राजपुतांनी कोणतीही कमी ठेवलेली नाही.
स्वातंत्र्योत्तर काळातही रस्ते, वीज, प्रवासीनिवास यांबाबत हे राज्य कायमच
पर्यटनानुकूल राहत आलेले आहे. त्यामुळे आज तो राजपुताना पर्यटनाचा स्वर्गच
मानला जातो. तोच स्वर्ग आज जगभरातील पर्यटकांना इथे खेचून आणत असतो. आणि
म्हणूनच भारतातले सर्वात बहुचर्चित पर्यटनवर्तुळ मेवाडात आहे.
मेवाडदर्शन-२: पहिला दिवसः माऊंट अबू
ऑक्टोबरच्या
पहिल्याच दिवशी म्हणजे आमच्या प्रवासाच्या पहिल्या दिवशी आम्ही अरावली
एक्सप्रेसने “आबूरोड”ला जाऊन पोहोचलो. तिथे सचिन ट्रॅव्हल्सचे प्रतिनिधी
आम्हाला उतरवून घेण्याकरता एस-४ बोगीसमोर सज्ज असणार होते. आम्ही झपाट्याने
तिथे जाऊन पोहोचलो. आता फक्त वाटच पाहायची होती.
बाहेरून, आबूरोड स्टेशनचे घुमट प्रेक्षणीयच दिसत होते.
तेवढ्यात
स्टेशनवर “आबू की रबडी” बोर्ड पाहिला. मेवाडदर्शन सहलीच्या पूर्वतयारीतच
रबडी, घेवर, गजक, राजकचोरी इत्यादी फर्मास पदार्थांच्या आस्वादाची अपेक्षा
तयार झालेली होती. म्हणून जेव्हा आम्ही आबूरोड स्टेशनवर “आबू की रबडी”
बोर्ड पाहिला, तेव्हा लगेचच “आबू की रबडी” चाखून पाहण्याचा मोह झाला.
पेल्याच्या आकाराच्या मातीच्या कुल्हडीतून “आबू की रबडी” घेतली. दर
कुल्हडीस फक्त पंधरा रुपये फक्त. मात्र कुल्हडीत पाणी शोषल्या गेल्यामुळे
की काय, पण रबडी अपूर्व लागत होती. मधुर, गोड आणि लच्छेदार. मन खूश झाले.
दरम्यान,
सचिन ट्रॅव्हल्सचे प्रतिनिधी श्री.सुशांत जोशी आणि श्री.शैलेश दोंदे,
त्यांच्या टोप्यांसह तिथे हजर झाले. त्यांनी सर्व प्रवाशांना एकत्र आणले,
त्यांचे सामान ताब्यात घेतले, आणि आम्ही ३५ आसनांच्या, २ x २, वातानुकूलित
बसकडे वाट चालू लागलो. सगळे २१ प्रवासी आणि सहलप्रणेते बसमधे बसले,
ड्रायव्हर किन्नरांचे इशारे झाले आणि बस माऊंट अबूची रमणीय वाट चालू लागली.
जेवणखाण
आटोपून थोडीशी विश्रांती घेतली. संध्याकाळी सूर्यास्त बघण्याकरता आम्ही
सूर्यास्तदर्शनस्थळाकडे निघालो. जिथे बस थांबली तिथून पाच मिनिटांवर ते
आहे. मात्र तिथे एक अभिनव वाहन आम्हाला दिसले. ते म्हणजे बाबागाडी. मग एक
खडक जणू हात जोडून स्वागत करतांना आढळला.
आणि
तिथवर पोहोचलो तेव्हा आढळली ती माऊंट अबूची सर्वोत्कृष्ट मिठाई. सोहन
पापडी. ती मुळीच पापडी वाटत नव्हती. पांढुरक्या पिवळ्या रंगाची कापसागत
किंवा “बुढ्ढी के बाल” वाटावी अशी साखरेची, अगदी तरलपणे तोंडात विरघळून
जाणारी मिठाई. अतिशय हलकी. तिच्या, वाटीच्या आकाराच्या मुदी बनवून ठेवल्या
होत्या आणि प्रत्येकी पाच रुपयांना एक अशा विकत होते.
मग
सूर्यास्त पाहण्याकरता मोक्याची जागा हुडकण्यासाठी धावपळ सुरू झाली.
सूर्यास्ताला आणखी अर्धा तास तरी असावा. मग तिथे आसपासच्या दृश्यांवरच
चर्चा सुरू झाली. तिथे खूप घाणेरीची झुडुपे इतस्ततः विखुरलेली होती. सुंदर
फुलांचे घोस होते. शिवाय मिर्याच्या आकाराची काळी काळी फळेही गुच्छांनी
लगडलेली होती. तिथल्या गप्पांतून, घाणेरीला फळे येतात ही नवीनच माहिती
मिळाली. ही फळे खायला गोड लागतात. आरोग्यवर्धक असतात. शिवाय मूळव्याधीवरचा
उत्तम उपायही ठरतात, असेही समजले. लगेचच स्वतः खाऊन खात्री पटवली. इथे
तत्काळ मेहंदी काढण्याकरता लाकडाचे साचे विकतही होते आणि तत्काळ मेहंदी
काढूनही देत होते. अनेक महिलांनी सूर्यास्तापर्यंतच्या वेळाचा सदुपयोग
तत्काळ मेहंदी रंगवून घेण्याकरता करून घेतला. निरनिराळे खाद्यपदार्थ
हिरीरीने विकले जात होते. त्यामधे, द्रोणांत सोलून ठेवलेले डाळिंबाचे दाणे
हा नवा पदार्थही विकायला होता.
मग सावकाश सूर्यास्त झाला. मात्र तो
क्षितिजाआड सूर्य दडून नव्हे. कारण आकाश ढगाळ तर होतेच शिवाय धुकेही होते
थोडेसे. त्यामुळे सूर्यास्त पाहण्याचा काहीसा विरसच झाला.
त्यानंतर
“नक्की” तलावावर जायचे होते. नखाने निर्माण केलेला म्हणून “नखकी ताल” असे
नावही कळले. पण अंधार आधीच पडू लागलेला असल्याने काही प्रवाशांना खरेदीत रस
वाढू लागला होता, तर आमच्यासारखे काही प्रवासी अजूनही बोटिंगचा हुरूप
बाळगून होते. म्हणून शिस्तीत वाटणी झाली आणि आम्ही बोटिंगला निघालो. सहा
जणांची वल्हवायची बोट मिळाली, नावाड्यासकट. अर्धा-पाऊण तास पाण्यात विहरून
मग आम्हीही खरेदीच्या सत्रात रुजू झालो. बांधणीच्या साड्या, सूट, कलात्मक
शोभेच्या वस्तू, मोजड्या, परतल्यावर इतरांना वाटता येतील अशी
स्मृती-चिन्हे, काय अन काय. प्रवासी खरेदीदारांचा माऊंट अबूमधील माल रोड,
हा तर स्वर्गच आहे.
मेवाडदर्शन-३: दुसरा दिवसः माऊंट अबू
आधी हॉटेलातच
परस्पर परिचयाचा कार्यक्रम झाला. मग “श्री अर्बुद विश्वनाथ महादेव मंदिर”
दर्शनाचा कार्यक्रम पार पडला. मंदिराच्या इमारतीसच पिंडीचा आकार दिलेला
असल्याने, गेरूच्या रंगाने रंगवलेली ती इमारत दुरूनच नजरेत भरत होती.
त्यानंतर प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यापीठाचे मुख्यालय
“युनिव्हर्सल पीस हॉल” ऊर्फ विश्वशांतीदालन बघितले. पुढल्या चित्रपट्टीतले
मधले चित्र त्याचेच आहे. त्यांच्या आचारपद्धतीबाबत प्राथमिक माहितीही दिली
गेली, मात्र ती पुरेशी वाटली नाही. आम्हाला अधिक वेळही नसल्याने इतर
प्रवाशांप्रमाणेच आम्हीही पुढच्या स्थळाकरता सिद्ध झालो. ते होते अर्बुदा
माता मंदिर. ३६५ पायर्या चढून डोंगरावरच्या मंदिरात जायचे होते.
अर्बुदादेवी
किंवा अधरदेवी चे मंदिर माऊंट अबूच्या उत्तरेला ३ किलोमीटर अंतरावरील एका
गुहेत आहे. मंदिरापर्यंत पोहोचण्यास ३६५ पायर्या चढाव्या लागतात. मंदिरात
वाकूनच प्रवेश करावा लागतो. मोबाईल, बॅगा वगैरे वस्तू गाभार्यात नेऊ देत
नाहीत. मंदिराच्या वाटेवर काटेरी झुडूपांची दाट हिरवळ असल्याने चढतांना
थकवा जाणवत नाही. आजूबाजूचे निसर्गसौंदर्यही वाखाणण्यासारखे आहे.
महाराष्ट्रात
पदोपदी दिसणारे अश्वत्थ वृक्ष वड, पिंपळ आणि औदुंबर इथे क्वचितच दर्शन
देतात. आंबा, फणस, काजू, चिक्कू, संत्री, पेरू, सिताफळे यांसारख्या झाडांनी
जणू मेवाडवर बहिष्कारच टाकला आहे की काय असे वाटते. महाराष्ट्रात
आढळणार्या केळी, ऊस इत्यादींच्या बागा तर विसरायलाच हव्यात. मात्र खेजडी
(खजूर), बाभूळ, आवळे यांच्या बागा होत असल्याचे अनोखे दृश्य यानंतर अनेकदा
नजरेस पडले. या अशाप्रकारच्या वृक्षसंपदेमुळे इथल्या कुठल्याही युद्धात
गनिमी कावा शक्य होत असेल असे मला वाटे ना. मात्र महाराणा प्रतापांनी गनिमी
काव्यानेच अकबराला हैराण करून सोडल्याची, तसेच चित्तौड वगळता सार्या
मेवाडवर पुन्हा ताबा मिळवल्याची कहाणी पुढे समजणारच होती.
अर्बुदादेवीचा
डोंगर उतरतांना ताक, दही, उसाचा रस आणि भरपूर इतर खाद्यपेये उपलब्ध होती.
खरे तर गार वार्यांतून केलेल्या उल्हासदायक चढ-उतारानंतर श्रमपरिहाराची
तशी फारशी आवश्यकताही जाणवत नव्हती. तरीही आम्ही सगळ्यांनी उत्तम ताकाचा
(छाछ) आस्वाद घेतलाच. इथे टेकडीवर माकडे खूप आहेत. आम्ही जे चणे
प्रसादाकरता म्हणून घेतले होते, खाली उतरल्यावर, ते चणे माकडांना खाऊ
घालण्याकरता विकत होते असे लक्षात आले. चणे खाऊन पाहिले असता त्याची
खात्रीच पटली. ते कडक कुडकुडीत होते. (आमच्याकडे हळदीकुंकवाला म्हणून काही
बोरे विकत असत. ती अजिबात खाण्याच्या दर्जाची नसत. तसलाच हा प्रकार वाटला.)
मात्र माकडे ते चणे आवडीने खातांना दिसली.
सरतेशेवटी मात्र
आम्हाला, उन्हाचा त्रास टाळण्याकरता, स्थलदर्शनाच्या कार्यक्रमाचे नियोजन
थोडे उलटे करायला हवे होते असे वाटले. म्हणजे अर्बुदादेवीचा डोंगर आधी आणि
नंतर अर्बुद विश्वनाथ महादेव व मग विश्वशांतीदालन पाहिले असते तर जास्त बरे
झाले असते, असे.
जेवण व थोड्याशा विश्रांतीनंतर दिलवारा जैन मंदिर
पाहायला गेलो. संगमरवरी मूर्तीकलेचे माहेरघरच आहे ते. मात्र कॅमेरा,
मोबाईल, बॅगा वगैरेला आत परवानगी नाही. त्यामुळे फोटो काढलेले नाहीत.
या
ठिकाणी पाच मंदिरे आहेत. त्यातले पहिले मंदीर, चालुक्य महाराज
भीमदेव(प्रथम) यांचे मंत्री व सेनापती असलेले विमलशहा यांनी, इसवी सन १०३१
साली बांधून पूर्ण केले. म्हणून त्यास विमलवसाही म्हणतात. त्यात प्रथम जैन
तीर्थंकर आदिनाथ ऋषभदेवजी यांची मूर्ती प्रतिष्ठित आहे.
दुसरे
मंदीर गुजरातचे सोळंकी राजा भीमदेव (द्वितीय) यांचे मंत्री वस्तुपाल आणि
त्यांचे लहान बंधू तेजपाल यांनी आबूचे राजा सोमसिंह यांच्या अनुमतीने,
विमलवसाही मंदिराजवळच त्याचेचप्रमाणे सफेद संगमरवरातून इसवी सनाच्या १२८७
मधे बांधून प्रतिष्ठित केले. तेजपाल यांचे पुत्र लावण्यसिंह यांचे नावाने
ते मंदीर लूणवसाही म्हणवले जाते. त्यात जैनांचे २२ वे तीर्थंकर श्री
नेमीनाथ यांची कसौटीच्या दगडातील अत्यंत रमणीय मूर्ती प्रतिष्ठित आहे.
लूणवसाहीची हत्तीशाळाही संगमरवरात संजीवित करण्यात आलेली आहे.
तिसरे
मंदीर आहे पीतलहर मंदीर. हे गुजरातच्या भीमाशाह यांनी घडवले असल्याने यास
“भीमाशाह यांचे मंदीर” असेही संबोधले जाते. याचे निर्माण इसवी सनाच्या १४३३
मधे पूर्ण झाले. १४६८ मधे जीर्णोद्धारात जैनांचे प्रथम आचार्य ऋषभदेवजी
यांची पंचधातूंची मूर्ती स्थापित करण्यात आली.
चौथे मंदीर नववे तीर्थंकर श्री सुविधिनाथ यांचे आहे.
पाचवे
मंदीर तीन मजली चिंतामणी पार्श्वनाथ मंदीर आहे. हे श्वेतांबर जैनांच्या
खरतरगच्छ समुदायाचे अनुयायी “मंडलिक” यांनी इसवी सन १४५८ मधे बांधून पूर्ण
केले. याच्या चारही बाजूंना भगवान पार्श्वनाथ यांच्या मूर्ती प्रतिष्ठित
असल्याने या मंदिरास “चौमुखा पार्श्वनाथ मंदीर” असेही म्हणतात. संगमरवरी
शिल्पकलेचा स्वर्गच वाटावा अशा या मंदिरांचे रूप केवळ अवर्णनीय आहे. शिवाय,
रंग फक्त शुभ्रधवलच असल्याने, ते सौंदर्य, कुठल्याही प्रकारच्या
फोटोग्राफीत सापडणारे नाही. म्हणून प्रत्यक्षच पाहावे. आयुष्यात एकदा तरी.
नंतरचा
उर्वरित दिवस सचिनने मोकळाच सोडलेला होता. त्यांचाच मार्गदर्शक मग सांगू
लागला, की तुम्हाला पाहायचे असेल तर, गुरूशिखर आपल्याला पाहता येईल. मी
वाहनव्यवस्था करू शकेन. मात्र १०० रुपये माणशी इतका खर्च येईल. सचिनतर्फेच
ही व्यवस्था का केली जात नाही? याचे उत्तर, आमची बस तिथे नेण्याची अनुमती
नाही असे आले. तरीही ही निराळी वाहनव्यवस्था सहलकार्यक्रमातच अंतर्भूत
करायला हवी होती, यावर सर्व प्रवाशांचे एकमत झाले. असो. मग मार्गदर्शकाच्या
सल्ल्यानुसारच वाहनव्यवस्था करून आम्ही स्वखर्चाने गुरूशिखर पाहण्याकरता
गेलो. गेलो नसतो तर एका अद्वितीय अनुभवास मुकलो असतो.
गुरूशिखर
दिलवारा
अचलगढ रस्त्यावर ३ किलोमीटर पासून, एक ७ किलोमीटर लांबीची डांबरी सडक उंच
पर्वतावरील गुरूशिखरापर्यंत घेऊन जाते. गुरूशिखर हे अरवली पर्वताचे
सर्वोच्च शिखर आहे. त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची आहे १,७२२ मीटर
(म्हणजेच ५,६७६ फूट), तर त्याचे ठिकाण माऊंट अबू पासून १५ किलोमीटर अंतरावर
आहे. गुरूशिखरावर दत्तात्रयाचे मंदिर आहे. मंदिरात दत्तात्रयाची सुरेख
मूर्ती आहे. इथेच एक भव्य, पुरातन, पितळी घंटा होती, जिच्यावर ख्रिस्तपूर्व
१,४११ मधील कोरीव काम होते. आता मात्र तिच्या जागी नवी घंटा बसवलेली आहे.
मंदिरापासून आणखी थोड्या उंचीवरील सर्वोच्च ठिकाणी चरण पादुकांचे एक छोटेसे
मंदिर आहे. इथून सभोवतालचे विहंगम दृश्य पाहता येते. इथे वेगवान वारे सदा
सर्वकाळ वाहत असतात. गोरक्षनाथांनी म्हटलेच आहे की “पवन ही योग, पवन ही
भोग, पवन ही हरे छत्तीसो रोग”. इथल्या प्रवाही वार्यांमुळे इथे कायमच
आरोग्यदायी वातावरण निर्माण झालेले आहे.
गुरूशिखरावर
वरच्या भागी दत्तात्रयांच्या चरण पादुकांचे देऊळ आहे, तर खालच्या बाजूला
दिसतंय ते आहे दत्तमंदिर. दुसर्या चित्रात वरच्या बाजूला एक शंखाकृती आणि
खालच्या बाजूला एक भव्य खोबण असलेला खडक, गुरूमंदिराच्या वाटेवर उठून
दिसतात. खालच्या चित्रपट्टीतील पहिले चित्र शंखाकृती खडकाचे आहे तर दुसरे
खोबणीच्या खडकाचे. संपूर्ण छत असलेल्या, मात्र तळाशी सपाट बूडच नसलेल्या या
खोबणी, राहण्यास गुहा म्हणून मुळीच वापरता येण्यायोग्य नाहीत. हा खोबण
असलेला खडक, गुरूशिखराच्या वाटेवर सहजच नजरेत भरतो. याच चित्रपट्टीतील
तिसर्या चित्रात दत्तात्रयांच्या चरण पादुकांचे मंदिर दिसत आहे. मंदिरावर
जे काही लिहिलेले दिसत आहे ते आहे “गुरू दत्तात्रेय की चरण पादुका. दर्शन
करके घण्टा बजाये, मनोकामना पुरी होती है।“. शेवटले चित्र आहे त्याच
घंटेचे, जिचा उल्लेख चरण पादुकांच्या मंदिरावरल्या लिखाणात केलेला आहे.
मंदिराजवळ
“फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी”ने चालवलेली“माऊंट अबू वेधशाळा” आहे. या
वेधशाळेत १.२ मीटर अवरक्त दुर्बीण आहे. इथे अवकाशीय वस्तूंच्या अवरक्त
किरणांचे भूमीवरून निरीक्षण करण्या करताची भारतातील पहिलीच प्रमुख सुविधा
आहे. इथे उंचीवरच्या वातावरणाच्या विज्ञानाचा अभ्यास केला जातो (एरोनॉमी).
ज्यात विघटन आणि मूलकीकरण महत्त्वाचे असते. या विषयावरचे अनेक प्रयोगही
येथे केले जातात. http://www.prl.res.in/. या प्रयोगशाळेचा फोटो
चरणपादुकांच्या मंदिराजवळून उत्तम प्रकारे काढता येतो. हा फोटो मात्र
आंतरजालावरून साभार उचललेला आहे.
तिसरा दिवसः हल्दीघाटी व नाथद्वार
चितौडचा इतिहास
इसवी
सनाच्या ७ व्या शतकात मौर्य घराण्याने चितौड वसवले. पौराणिक मेवाडी
नाण्यांवर आढळणार्या चित्रांगद मोरी यांचे नावावरून त्याचे नाव चित्रकूट
असे ठेवलेले होते. बाप्पा रावल यांनी इसवी सन ७३४ मधे चितौड जिंकून
घेतल्यावर त्यास मेवाडची राजधानी केले. त्यानंतर अकबराने १५६८ मधे जिंकून
घेपर्यंत चितौडच मेवाडची राजधानी राहिले. त्यानंतर मग मेवाडची राजधानी
उदयपूरला हलवण्यात आली.
बाप्पा रावल यांच्या पश्चात त्यांच्याच
गहलोत घराण्यातच सत्ता राहिली. इसवी सन १३०३ मधे दिल्लीच्या अल्लाउद्दिन
खिलजी याने पद्मिनीकरता चित्तौडवर हल्ला केला. तत्कालीन राजे, रावल रतनसिंग
युद्धात मारले गेले. त्यांची पत्नी पद्मिनी हिने जौहार केला. चित्तौडवर
अल्लाउद्दिन खिलजीची सत्ता स्थापन झाली. इसवीसन १३२७ मधे गेहलोत
घराण्यातीलच हमीरसिंग यांनी पुन्हा सत्ता परत मिळवली. हमीरसिंग यांचा जन्म
ज्या शिसोदा गावात झाला होता, त्यावरून मग या राजघराण्यास शिसोदिया असेही
म्हणू लागले. राणा
हमीरसिंग यांचे पणतू महाराणा कुंभकर्ण ऊर्फ कुंभा १४३३ चे सुमारास गादीवर
बसले. १४४२ मधे माळव्याचा सुलतान महमूद खिलजी याने चित्तौडगढवर आक्रमण करून
मच्छिंद्रगढ, पाणगढ आणि चौमुखा ताब्यात घेतले. या अनिर्णायक लढाईत गुजरात व
माळव्याच्या संयुक्त फौजांचा पराभव झाल्याने सुलतान मांडूस परतला. पुढे
दहा वर्षेपर्यंत मग चित्तौडवर आक्रमण होऊ शकले नाही. या विजयाची आठवण
म्हणून १४४८ मधे महाराणा कुंभा यांनी चित्तौडमधे एक विजयस्तंभ उभारण्यास
सुरूवात केली. तो १४५८ मधे बांधून पूर्ण झाला. ३७ मीटर उंचीच्या या स्तंभास
नऊ मजले असून १५७ पायर्या आहेत. दगडातून शिल्पे साकारून सजवलेले, एकातून
एक उमलणारे, शंखाप्रमाणे उलगडत जाणारे जिने आणि हवेशीर कलात्मक खिडक्यांनी
विभूषित, भरभक्कम बांधणीच्या या स्तंभाचा सर्वात वरचा मजला तर शिल्पकलेने
अप्रतिम सजलेला आहे. इसवीसनाच्या पंधराव्या शतकातील भारतीय तंत्रज्ञानाचे
दैदिप्यमान उदाहरण म्हणून या विजयस्तंभाचा उल्लेख अभिमानानेच करावा लागेल.
महाराणा
कुंभा यांनी १४५८ पर्यंत राज्य केले. १४५८ मधे त्यांचेच पुत्र उदयसिंग
(प्रथम) यांनी सत्तासंपादनार्थ, त्यांचा वध केला. महाराणा कुंभांच्या
कारकीर्दीत सर्वप्रकारच्या कलागुणांना ऊर्जितावस्था प्राप्त झाली.
मेवाडमधील ८४ किल्ल्यांपैकी ३२ किल्ले बांधले गेले. यांच्यातच मेवाडमधील,
चित्तौडनंतरचा सर्वात अभेद्य किल्ला, कुंभलमेर किंवा कुंभलगढचा समावेश
होतो. महाराणा प्रताप यांचा जन्मही कुंभलगढचाच. महाराष्ट्रात शिवाजी
महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरी आहे. तसेच राजस्थानात महाराणा प्रतापांचे
जन्मस्थळ कुंभलगढ आहे. कुंभलगढची तटबंदी ३६ किलोमीटर लांबीची आहे. चीनच्या
भिंतीनंतर, जगातील दुसर्या क्रमांकाची सर्वात लांब तटबंदी आहे ही. महाराणा
कुंभांच्याच कारकीर्दीत राणकपूरचे त्रैलोक्य-दीपक जैन मंदिर, चित्तौडची
कुंभास्वामी आणि आदिवर्ष तसेच शांतिनाथ जैन मंदिरे बांधली गेली. स्वतः
महाराणा कुंभांनी “संगीत-राजा”, गीतगोविंदावरची “रसिक-प्रिय” ही टीका,
“सूडप्रबंध” आणि “कामराज-रतिसार” या ग्रंथांचे लेखन केले आहे. त्यांच्याच
कार्यकाळात विद्वान अत्रींनी “चित्तौडच्या कीर्तीस्तंभाची प्रशस्ती” लिहीली
आणि कहना व्यास यांनी “एकलिंग-महात्म्य” लिहीले.
१५२७ मधे राणा
संग्रामसिंग (राणा संगा) यांनी खानवा येथे बाबराशी निकराची लढाई केली.
त्यात बाबराचा जय झाला. पुढे जखमी झालेले राणा संग्रामसिंग थोड्याच वर्षांत
मृत्यू पावले. १५३५ मधे गुजरातचा राजा बहादुरशहा चित्तौडवर चालून आला असता
संग्रामसिंगाची पत्नी राणी कर्मवती हिच्याकडे चित्तौडची सूत्रे होती. तिने
यावेळी बाबराचा मुलगा हुमायूनची मदत मागितली. त्याने होकारही दिला. मात्र
हुमायून पोहोचण्यापूर्वीच बहादुरशाहने चित्तौड काबीज केल्यामुळे राणी
कर्मवतीसह सर्व स्त्रियांनी जौहार केला तर गडावरील सर्वच्या सर्व ३२,०००
लोक धारातीर्थी पडले.
वरील चित्रपट्टीत पहिले चित्र कुंभलगढाचे आहे
तर दुसर्या चित्रात बनवीर, उदयसिंग समजून चंदनचा वध करत असतांनाचे चित्र
दिसत आहे. बनवीर, राजपुत्र उदय याचा शिरच्छेद करण्याकरता आला असता,
पन्नाधायने आपला स्वतःचा पुत्र चंदन याला राजपुत्राचे जागी झोपवले आणि
उदयला आधीच दूर पाठवून त्याचे प्राण वाचवले. त्या अत्युच्च त्यागाची ही
स्मृती.
१५२८
मधे राणा संग्रामसिंग यांचा मृत्यू झाला. त्यांच्यापश्चात त्यांचा सर्वात
मोठा हयात असलेला मुलगा रतनसिंग राणा झाला. १५३१ मधे रतनसिंग मारला गेला व
त्याचाच भाऊ विक्रमादित्यसिंग गादीवर बसला. विक्रमादित्याच्याच राज्यकाळात
बहादुरशाहने चित्तौडवर कब्जा मिळवला. उदयसिंग यास सुरक्षेच्या कारणास्तव
बुंदीस रवाना करण्यात आले. पुढे १५३७ मधे विक्रमादित्यास मारून बनवीर
गादीवर बसला. तेव्हाच तो उदयसिंगासही मारणार होता. पण पन्नाधायने त्याचे
जागी आपल्या चंदन नावाच्या मुलास बळी देऊन त्याचे प्राण वाचवले. पन्नाधाई
स्वतः उदयसिंगासोबत कुंभलगढ इथे आश्रयार्थ जाऊन राहिली. कुंभलगढाचा
तत्कालीन शास्ता आशाशाह व इतर सरदारांच्या मदतीने १५४० मधे बनवीरचा पराभव
करून उदयसिंग राजा झाला.
महाराणा उदयसिंग (जन्मः ऑगस्ट ४,१५२२, मृत्यूः फेब्रुवारी २८, १५७२)
त्यानंतर
महाराणा उदयसिंग यांनी चित्तौडवर राज्य केले. ते राणा संग्रामसिंग व राणी
कर्मवती यांचे चौथे पुत्र होते व त्यांचा जन्म झाला तेव्हा राणा
संग्रामसिंग हयात नव्हते. मेवाडच्या राजघराण्यातील ते ५३ वे शासक होते.
महाराणा उदयसिंगांनी राजपूत राज्यव्यवस्थेचे एकचालकानुवर्तित्व घातक ठरत
असल्याचे जाणून जाणत्यांच्या सामूहिक प्रशासनास जन्म दिला. या
राज्यव्यवस्थेचा उपयोग पुढे अकबराच्या आक्रमणाचे काळी झाला. तेव्हा
सर्वांच्या सल्ल्याने उदयसिंग चित्तौड सोडून निघून गेले होते. तरीही
चित्तौडने चार महिनेपर्यंत शर्थीची झुंज दिली. २५ फेब्रुवारी १५६८ रोजी
पुन्हा एकदा चित्तौड पडले आणि सर्व स्त्रियांना पुन्हा एकदा जौहार करावा
लागला. चित्तौड राज्य करण्यास सुरक्षित राहिलेले नाही हे पाहून महाराणा
उदयसिंग यांनी उदयपूर शहराची निर्मिती केली. त्यांच्या पश्चात महाराणा
उदयसिंगांनी आपल्या आवडत्या जगमल्ल नावाच्या पुत्रास राज्याची सूत्रे
सुपूर्त केली. मात्र त्यांनीच घडवलेल्या सामूहिक प्रशासनास हे रुचले नाही.
महाराणा प्रताप हे महाराणा उदयसिंगांचे थोरले पुत्र होते. ते पराक्रमी आणि
राज्यकर्ते म्हणून सर्वमान्य होते. म्हणून, त्या सामूहिक प्रशासनाने त्यांस
गादीवर बसवले. महाराणा प्रतापांनी अकबराच्या आक्रमणाविरुद्ध हल्दीघाटीत
निकराची लढाई केली. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. त्यांचा आवडता घोडा
चेतकही मारला गेला. महाराणा प्रताप वाचले. त्यांनी चित्तौड वगळता सारे
मेवाड पुन्हा ताब्यात घेतले. चित्तौड ताब्यात येईपर्यंत सारे राजभोग सोडून
दिले. पत्रावळीत जेवण्याची शपथ घेतली. पण अखेरपर्यंत ते चित्तौडवर ताबा
मिळवू शकले नाहीत.
हल्दीघाटी
अशा तीव्र संघर्षाचा
आणि प्रखर स्वाभिमानाचा इतिहास असलेल्या चित्तौडगढाकडे आम्ही आता अग्रसर
होत होतो. मग जगप्रसिद्ध हल्दीघाटी लागली. खरोखरीच तिथे आजही हळदीसारखे खडक
दिसून येतात. ही एक खूपच अरुंद खिंड आहे. जेमतेम एक वाहन जाऊ शकेल असा
डांबरी रस्ता त्यातून पलीकडे घेऊन जातो. बाहेर पडल्यावर एक खासगी
वस्तुसंग्रहालय आहे. त्यात हल्दीघाटीचा इतिहास शिल्परूपाने अंकित करण्यात
आलेला आहे. एक ग्रंथालयही आहे. तसेच तत्कालीन चित्तौड साकार करणारे
देखावेही आहेत. सोबतच स्थानिक पद्धतीच्या जेवणाचीही सोय आहे. तिथे आम्हाला
दाल-चुर्मा, बाजरीची भाकरी-ताडाचा गूळ-साजुक तूप, छाछ इत्यादींसहित सुग्रास
जेवण घेता आले.
महाराणा
प्रताप यांचा घोडा चेतक, याला हत्तीची खोटीच सोंड जोडलेली असे. हत्ती
आपल्या पिल्लावर हल्ला करत नाही म्हणून हत्तीच्या हल्ल्यातून वाचण्याकरता
या युक्तीचा उपयोग होत असे. मानसिंगाच्या हत्तीवर चेतक चाल करून गेला
तेव्हा मात्र, मानसिंगाच्या हत्तीने, सोंडेत दिलेल्या तरवारीने चेतकाच्या
मागल्या पायावर गंभीर हल्ला केला. हेच वरील चित्रपट्टीतील पहिल्या चित्रात
दर्शवण्यात आलेले आहे. दुसर्या चित्रात महाराणा प्रताप यांचे सेनापती
हकीमखान सूरी, आदिवासींचे राजे राणा पुंजा आणि महाराणा प्रताप यांचाच वेष
घेऊन लढून शहीद झालेले झाला मान (हे महाराणा प्रताप यांच्या प्रमाणे दिसत
होते म्हणून त्यांच्यामुळे महाराणांचा प्राण वाचू शकला होता.), हे महाराणा
प्रताप यांचे तारक त्रिकूट दर्शवलेले आहे.
हल्दीघाटीच्या ग्रामीण
वस्तुसंग्रहालयात जेवण करून मग आम्ही नाथद्वारच्या श्रीनाथजी मंदिराकडे
निघालो. नाथद्वारच्या मंदिरात बॅगा, कॅमेरे, मोबाईल्स यांना परवानगी
नसल्याने हे सर्व सामान बसमधेच ठेवलेले होते. तिथल्या अफाट गर्दीत चटकन
ओळखता यावे म्हणून सगळ्यांनी डोक्यांवर सचिनच्या टोप्या घातलेल्या होत्या.
नाथद्वार गावात खूपच अरुंद गल्ल्याबोळ असल्याने बस दूरच उभी करावी लागली.
श्रीनाथजी मंदिरात बाळकृष्णाची मूर्ती असल्याने, देवाला दिवसात अनेकदा
निरनिराळे भोग चढवण्यात येत असतात. भोग चढवणे म्हणजे देवासमोर
तर्हतर्हेचे नैवेद्य सुबक रचनेने मांडून ते देवास अर्पण करणे. ही
प्रक्रिया बराच काळ चालत असल्याने, सगळ्यांकरता खुल्या दर्शनाच्या वेळा
मर्यादित होतात. अशा दैनंदिन भोग चढवण्याच्या आणि दर्शनास मंदीर खुले
असण्याच्या वेळा आधीच नक्की केलेल्या असतात. सचिनच्या प्रतिनिधींनी त्या
आधीच माहीत करून घेतलेल्या होत्या.
आम्ही
पोहोचलो त्या वेळी मंदीर पंधरा मिनिटे खुले राहणार होते. आम्ही चालत चालत
मंदिराजवळ पोहोचलो. सगळ्यांनी एकाच जागी पादत्राणे काढली. तिथे सचिनचे
प्रतिनिधी उभे होते. मंदिराच्या दरवाज्यासमोरच्या गर्दीत जाऊन उभे राहिलो.
स्त्रिया व पुरूषांचे प्रवेश निरनिराळ्या दरवाजाने होणार होते. या मंदिरात
दर्शन झाले तर झुंबडीनेच साध्य होते. नाहीतर भोग चढण्याची वेळ सुरू होऊन
दरवाजे बंद होतात व मग ते पुन्हा उघडण्याची वाट पाहत राहावे लागते. अशी
माहिती आम्हाला आधीच पुरवलेली असल्याने आम्ही डोंबिवलीकर गाडीत शिरतो, त्या
आवेशाने दरवाजा उघडताच समोर झेपावलो. दर्शन झाले. स्त्रिया व पुरूष एकाच
दरवाजातून बाहेर पडत होते. तिथून बाहेर आलो. मग सचिनतर्फे कुल्हडीतून चहा
पाजण्यात आला. तो खूपच चवदार आणि मधुर लागला. आजूबाजूच्या दुकानांतून
दुधातुपाच्या मिठायांचा वास येत होता. तो आसमंतात भरून राहिला होता. आम्ही
पुन्हा तसेच दहा पंधरा मिनिटे चालत बसमधे जाऊन पोहोचलो.
इथून आम्ही
एकलिंगजी मंदिराकडे गेलो. हे मंदिर महाराजांच्या खासगी मालकीच्या जागेवर
असल्याने इथे निराळ्या प्रकारची सुरक्षा व्यवस्था आहे. मंदिराचा बराचसा भाग
पर्यटकांसाठी खुला नाही. दर्शनार्थ एक लांबच लांब रांग होती. इतरही अनेक
मंदिरे या मंदिराजवळच्या मंदिरसमूहात आहेत. मार्गदर्शकाने त्यातील काही
मंदिरे व्यवस्थित दाखवली. नंतर पुन्हा बसमधे बसून आम्ही उदयपूरच्या मुख्य
रस्त्यावरील सुभाषनगरातील “ओरिएंटल पॅलेस” या हॉटेलात जाऊन राहिलो.
चौथा दिवसः उदयपूर
सहेलियों की बाडी
हल्लीच्या
स्वरूपातील “सख्यांचे घर” बाग, फतेहसागर तलावाच्या बंधार्याच्या पूर्वेस,
महाराजा फतेहसिंग यांनी इसवीसन १८८८ मधे बांधली आहे. पूर्वी १६६८ मधे
मिर्झाराजे जयसिंग यांनी जो मातीचा बंधारा इथे बांधलेला होता, तो २००
वर्षांनंतर वाहून गेल्यामुळे हा बंधारा महाराज फतेहसिंग यांना पुन्हा
बांधून घ्यावा लागलेला होता. प्रफुल्लित कमळ पुष्करण्या, लांब रूंद
हिरवळींच्या विस्तीर्ण बागा, तर्हतर्हेच्या रंगीबेरंगी फुलांचे ताटवे
यांनी ही बाग सदा बहरलेली दिसते. पुष्करण्यांच्या तीरांवर चहुबाजूंना
संगमरवरी हत्ती आपल्या वळवलेल्या सोंडांतून पुष्करणीतील कमळांवर कारंजी
उडवत असतात. पक्षांच्या चोचींतून, हत्तींच्या सोंडांतून आणि निरनिराळ्या
सूप्त मुखांतून उत्साहाने उसळणारी कारंजी; फतेहसागर तलावाच्या बंधार्यातून
नैसर्गिक गुरूत्वीय शक्तीने संचालित केलेली आहेत.
त्या कारंजांना
उडवण्याकरता पंप वापरलेले नाहीत. कारंजी इथे इतक्या मोठ्या संख्येने आहेत
की या बागेस “कारंजांचा बाग” असेही म्हटले जाते. या कारंजांच्या तुषारांनी
सारी बागच भारित झालेली असते. पर्यटकास परी-राज्यातच फेरफटका करतो आहोत असा
आभास होतो. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण इथेच झाल्याचे मार्गदर्शक सांगतात.
इथेच पारंपारिक राजस्थानी पेहरावात फोटो काढवून घेण्याचीही सोय आहे. इथले
सारे वातावरणच भारून टाकणारे, अविस्मरणीय आणि आनंदित करणारे आहे.
चित्रपट्टीत
डाव्या बाजूची छत्री काळसर संगमरमराची बनवलेली असली तरीही धातूचीच वाटते.
एवढे कौशल्य तिच्या घडणीत सामावलेले आहे. शिवाय इतक्या नाजूक, काटकुळ्या
खांबांवर टनावारी वजनाची छत्री शतकानुशतके कशी तोलून धरली आहे हेही एक
आश्चर्यच. उजव्या बाजूस दगडी हत्तीच्या सोंडेतून उसळणारे कारंजे दिसत आहे
तर त्याचे खाली पक्षाच्या चोचीतून कारंजाचे तोंड घडवलेले दिसत आहे.
फतेहसागर
तलावात तीन बेटे आहेत. चार वर्ग किलोमीटर क्षेत्रफळाच्या मोठ्या बेटावर
नेहरूपार्क आहे. त्यावर लोकप्रिय उद्यान, उपाहारगृह तसेच प्राणीसंग्रहालयही
आहे. तिथे जाण्याकरता मोतीमगरीच्या पायथ्यापासून मोटार बोटींची सोय आहे.
दुसर्या ०.०६ वर्ग किलोमीटर क्षेत्रफळाच्या लहान बेटावर सार्वजनिक उद्यान
आहे. तिसर्या १.२ वर्ग किलोमीटर क्षेत्रफळाच्या बेटावर “उदयपूर सौर
वेधशाळा (Udaipur Solar Observatory-USO)” वसवलेली आहे.
नगरमहाल (सिटीपॅलेस)
उदयपूर
नगर, महाराज उदयसिंगांनी वसवले. चित्तौड अकबराचे हाती गेल्यानंतर मेवाडची
राजधानी उदयपूरच राहिली. या नात्याने इथे राजमहाल असणे साहजिकच आहे. मात्र
मी भारतात इतरत्र पाहिलेल्या राजप्रासादांचे मानाने उदयपूरचा राजप्रासाद
भव्य, दिव्य आणि वैभवशाली ठरला. इथल्या राजवाड्याचे वैशिष्ट्य म्हणजे इथली
कलाकुसरींनी नटलेली दालने आणि इथली भव्यता. स्फटिकसज्जा (crystal galary)
हे इथले आणखी एक आकर्षण. राजवाड्याच्या फतेह पोल मधून बाहेर पडल्यावर
समोरच्या तलावात दिसणारा जलमहालही इथले आकर्षणच ठरावा. प्रथम आम्ही वरच्या
मजल्यापर्यंत फिरून राजवाडा पाहिला. तिथे एका दर्शनीय प्रवेशद्वारावर
बसवलेले स्फटिकतुरे सोन्यासारखे पिवळेधमक झळकत होते.
राजप्रासादाच्या
भिंती काचा व निरनिराळ्या रंगछटांचे दगड जडवून सुशोभित केलेल्या होत्या.
कित्येक ठिकाणी तर त्या त्या दालनाची प्रवेशद्वारे ऋतुमानानुसार रंगछटांनी
सजवण्याकरता विशिष्ट रंगाच्या संगमरवराचा सुबकतेने वापर दिसत होता. काचा
जडवून तयार केलेले मोर तर अद्वितीयच होते. शुभ्र संगमरवराचे सुंदर हत्ती
प्रवेशद्वाराशी झुलत होते. या चित्रपट्टीत वरच्या बाजूला प्रवेशद्वारावरील
संगमरमरी हत्ती, दारावरले स्फटिकतुरे, ऋतूनिदर्शक सज्जासजावट दिसत असून
खालच्या बाजूला लाकडी चौकटीच्या सजावटीचे दार, काचा जडवलेली सालंकृत भिंत
आणि रत्नजडित कलाकुसरीने घडवलेले मोराचे चित्र दिसत आहेत.
उदयपूरच्या
नगरप्रासादातील दरबार दालन. इथेच आमचे चहापान झाले. नंतर श्राव्यसहल यंत्र
सोबत घेऊन आम्ही दरबार दालन तसेच स्फटिक सज्जेची (क्रिस्टल गॅलरीची)
प्रदक्षिणा केली.
मात्र
इथे कॅमेरा नेण्यास परवानगी नसल्याने चित्रे दाखवता येणार नाहीत.
त्यांच्याच माहितीपत्रकावरचे एक चित्र इथे देत आहे त्यावरून दरबार दालनाची
कल्पना करता येईल. दालनाच्या भवताली पत्रकारसज्जा असते तशी दीर्घा, पहिल्या
मजल्यावर होती.
तिच्या प्रदक्षिणामार्गात जागोजाग स्फटिककाचेची
तसेच पैलू पाडलेल्या काचेची (कट ग्लास) विविध भांडी (चहापानाची भांडी,
अत्तरदाण्या, गुलाबदाण्या, हळदीकुंकवाची भांडी, कप, बशा, पेले, दारूचे
प्याले, बाटल्या इत्यादी अनेकविध वस्तू), उपकरणे, बैठकीचे सामान (मेज,
खुर्च्या, घडवंच्या, दिवाण, चौरंग, पाट, पायदाने, तिवया व इतर अनेक ज्यांची
नावेही आठवत नाहीत) अशा नानाविध वस्तू काचेच्या कपाटांतून बैजवार मांडून
प्रदर्शित केलेल्या होत्या. त्या त्या जागांवर लिहिलेले क्रमांक आपापल्या
श्राव्य उपकरणांच्या कळांवर दाबले असता कानाला लावलेल्या श्रवणसंचातून त्या
त्या विभागाची माहिती इंग्रजीतून ऐकू येण्याची सोय होती. आजूबाजूच्या
ऐश्वर्याने दिपून जात आणि भवतालच्या गर्भश्रीमंती थाटाने भारावून जातच
आम्ही तिथून बाहेर पडलो.
उदयपूरचा जलमहाल. याचेबाबत इतकेच सांगता
येईल की याची वर्णने करतांना मार्गदर्शक थकत नाहीत, कित्येक चित्रपटांची
चित्रीकरणे इथेच झालेली आहेत, आणि श्रीमंतातले श्रीमंत चित्रपट अभिनेते,
अभिनेत्या इथे राहण्यास कायमच उत्सुक असतात.
बाहेर
संध्याकाळ व्हायला आलेली होती. जलमहालावर संध्याकाळचे ऊन पडून अवर्णनीय
शोभा उदयास आलेली होती. आता आमच्या हातात आमचे कॅमेरेही आलेले होते. मग काय
विचारता. आतापर्यंत दाबून ठेवलेली प्रकाशचित्रणाची हौस प्रत्येकाने असंख्य
चित्रे काढूनच भागवून घेतली. तर कित्येकांनी मनःपूत चलतचित्रणही करून
घेतले.
संध्याकाळी आम्ही उदयपूरच्या सूरजपोल ते हाथीपोल
दरम्यानच्या बाजारात खरेदीप्रीत्यर्थ गेलो खरे. मात्र रविवारचा दिवस
असल्याने बराचसा बाजार बंद होता. त्यामुळे काहीसा हिरमोड झाला. दुसर्या
दिवशी सकाळी चित्तौडगढ पाहून संध्याकाळी अजमेरपर्यंतचा प्रवास करून ख्वाजा
मुईनुद्दीन चिस्तीचा दर्गा पाहायचा व शेवटास पुष्करच्या हॉटेलात जाऊन
मुक्काम करायचा होता. म्हणून आम्ही जरा लवकरच बिछाने गाठण्याचा बेत
निष्ठेने अंमलात आणला. आमच्या सार्या एकवीस प्रवाशांपैकी सारेच्या सारेच
अतिशय वक्तशीर असल्यामुळे कधी कुणामुळे पाच मिनिटे उशीर झाला असे झालेच
नाही. हे एक सुखद आश्चर्य होते. याचकरता आमचा हा गट आमच्याकरता अविस्मरणीय
ठरला आहे. शिवाय उत्साहही एवढा की प्रत्येकजण गुरूशिखरावरही चढून गेलेला
होता. इथे हेही नमूद करणे गरजेचे आहे की विशीतले फक्त तीन जण होते. इतर
सर्व पन्नाशी-साठीच्या घरातले.
पाचवा दिवसः चित्तौडगढ, अजमेर
सकाळीसच बाहेर पडून
आम्ही चित्तौडगढाची वाट चालू लागलो. चित्तौडगढला पोहोचल्यावर हॉटेल मीरामधे
आम्ही ताजेतवाने झालो. तिथे पोहोचून सहा सीटर रिक्षा केल्या. कारण बसला
चित्तौडगढात फिरण्याची परवानगी नव्हती. या रिक्षा आपल्याकडच्या तीन सीटर
रिक्षांप्रमाणेच असून आपल्याकडे जी सामानाकरता जागा असते ती पाठीमागून उघडी
ठेवून पाठीकडे तोंड करून बसण्याची आणखी तीन व्यक्तींची सोय केलेली असते.
चित्तौडगढात अशाच रिक्षा सर्वत्र फिरतांना दिसत होत्या. सर्वात प्रथम आम्ही
कुंभा महालाकडे गेलो. त्याच्या ओवरीतच मार्गदर्शकाने इथल्या भागाचा इतिहास
सांगितला. राणा कुंभा हे सूर्यवंशी होते. सूर्योदय पाहण्याची त्यांची
प्रथा होती. याकरता खास जागा तयार केलेली असे. तिला सूरज-गोखरा म्हणत.
ओवरीतूनच तो कुंभा महालचा सूरज गोखरा दिसत होता. मग दिसला तो कुंभा महालाचा
चबुतरा. इथून खाली गावाकडे जाण्याकरता भुयार आहे, असे मार्गदर्शक सांगत
होता. आता मात्र ते बंद करून ठेवलेले आहे. त्यानंतर आम्ही पट्टा हवेली
पाहिली. वाटेत एका जागी एक कमळपुष्पासारखा घडवलेला दगड दिसला. तो बहुधा
कुठल्याशा पुष्करणीतील कारंजाकरता घडवलेला कारंजमुखाचा दगड असावा. इथेच
आम्हाला एक मुंगूस ऐटीत फिरतांना दिसले होते.
विजयस्तंभाच्या सर्वोच्च कक्षातील छतावरील नेत्रदीपक कला कुसर.
मग
पुन्हा रिक्षांमधे बसून आम्ही विजयस्तंभाकडे गेलो. इथेच सतीचे मैदान दिसले
जिथे इतिहासात तीन वेळा जौहार करण्यात आलेला होता. गोमुखातून शिवास अभिषेक
होतो ते मंदिर. त्याचे शेजारचा जलाशय, चित्तौडगढाची तटबंदी इत्यादी पाहून
मग आम्ही विजयस्तंभावर चढून गेलो. स्तंभावरून संपूर्ण चित्तौडगढाचे विहंगम
दृश्य नजरेत येते.
नंतर पुन्हा एकदा रिक्षात बसून आम्ही पोहोचलो
पद्मिनी महालाजवळ. तिथल्या एका महालाच्या प्रवेशद्वारावरही स्फटिकतुरा
बसवलेला दिसला. हा मात्र काचेसारखाच पारदर्शक दिसत होता. तिथला राजप्रासाद
पाहिला. मार्गदर्शकाने, अल्लाऊद्दीन खिलजीला पद्मिनीचे दर्शन आरशातून कसे
घडवण्यात आले त्याचे कृतीसह निरूपण केले.
अखेरीस
रिक्षात बसून आम्ही कुंभास्वामी मंदिराचे प्रवेशद्वाराशी पोहोचलो. या
संकुलात दोन मंदिरे आहेत. मीराबाईंचे आणि कुंभास्वामींचे. मीराबाईंच्या
मंदिरासमोर मीराबाईंच्या गुरूंचे स्मारक बांधलेले आहे. समोरच मीराबाईंचे
मंदिर आहे. मीराबाईंची मूर्ती छान सजवून ठेवलेली दिसत होती. कुंभास्वामी
मंदिराच्या डाव्या भिंतीवरची गणेशाची मूर्ती छान दिसत होती, तिचा फोटो
काढला. कुंभास्वामी मंदिरासमोर गरुडाची मूर्ती आहे, ती बघितली. कुंभास्वामी
मंदिराचे विशाल स्तंभ पाहत मग आत शिरलो. कुंभास्वामी मंदिरात मूर्ती तीन
आहेत. बलराम, कृष्ण आणि राधा. परततांना “हॉटेल मीरा”पाशी पुन्हा बसमधे बसलो
आणि पुष्कर मार्गावरील हॉटेल वूडलँडमधे जाऊन जेवण घेतले, आणि अजमेरचे
रस्त्याला लागलो.
रात्री आठचे सुमारास अजमेरमधे पोहोचलो. शहरात
अरुंद रस्ते आणि वाहतुकीचे गुंतागुंतीचे नियम असल्यामुळे बस दूरवरच सोडावी
लागली. तिथून एका लहान मेटॅडोरमधे बसून पंधरा मिनिटे प्रवास केल्यावर आम्ही
ख्वाजा मुईनुद्दिन चिस्ती यांच्या दर्ग्याच्या जवळपास जाऊन पोहोचलो.
आजूबाजूच्या दुकानांतून कधी न पाहिलेले खाण्यापिण्याचे पदार्थ, पूजेचे
साहित्य, जूती-मोजड्या इत्यादींची दुकाने दिसत होती. दर्ग्यात बॅगा,
कॅमेरे, मोबाईल्स यांना परवानगी नसल्याने हे सर्व सामान बसमधेच ठेवलेले
होते. दर्ग्यात जातांना डोके झाकलेले असावे लागते म्हणून आणि तिथल्या अफाट
गर्दीत चटकन ओळखता यावे म्हणून सगळ्यांनी डोक्यांवर सचिनच्या टोप्या
घातलेल्या होत्या. आपल्या मंदिरांतून पंडे असतात तसेच इथेही असतात. त्यांना
“खादिम” म्हणतात.
सचिनतर्फेही एक खादिम नेमण्यात आलेला होता. मग
ज्या कुणाला फुले, चादर इत्यादी चढवायचे होते त्यांनी ते खादिमाच्या
सल्ल्याने विकत घेतले. दर्ग्यात जाण्याकरता तिकीट नाही. मात्र गर्दी खूपच
असते. म्हणून काळजीपूर्वक निवडलेल्या रात्री साडेआठच्या वेळीही खूपच गर्दी
होती. दर्गा चौरस खोलीत असून सभोवती स्टेनलेस स्टीलचे कठडे बांधलेले आहेत.
कठड्यांच्या आत खादिम उभे असतात. बाहेरून प्रदक्षिणा घालत समोर समोर सरकत
चालावे लागते. कठड्यास लगटून दर्ग्याकडे तोंड करून खूपशा स्त्रिया
ख्वाजांना आपले गार्हाणे घालत होत्या व म्हणूनच तिथून हलायला तयारच
नव्हत्या. तसेच भिंतींशी खेटून मुसलमानी क्रोशाच्या टोप्या घातलेले भक्तगण
दर्ग्याकडे तोंड करून, निरनिराळी स्तोत्रे पुटपुटत होते, तर काही अनिमिष
नेत्रांनी दर्ग्यास पाहत होते. या दोन ओळींमधून प्रवेश करणार्या भक्तांना
कशीबशी वाट काढावी लागत होती. तिरुपतीच्या मंदिरात असतात तसे भक्तांना पुढे
पुढे ढकलणारे पुजारीही कुठे दिसत नव्हते. त्यामुळे दर्ग्यास गार्हाणे
घालत जागीच खिळून राहणार्या भक्तांचे पाठी सारीच गर्दी अडून राही.
त्यातच
आम्हाला असे सांगण्यात आलेले होते की मुद्दाम गर्दी करून पाकीट-पर्स
पळवण्याचे प्रकारही इथे घडत असतात. म्हणून आम्ही सगळेच सतर्क होतो.
स्त्री-पुरूषांना एकाच चिरटोळीतून मार्ग काढावा लागत असल्याने खूपच
लोटालोटी होत होती. हळूहळू पुढे सरकत आम्ही चाललो होतो. आम्ही गर्दीच्या
रेट्याने सावकाश पुढे सरकत दर्ग्यातून बाहेर पडलो. बाहेर आमचा खादिम आमची
वाटच पाहत होता. त्याने मंत्र पुटपुटत, प्रत्येकाचे गळ्यात गंडा बांधला.
ऊर्दूत म्हटलेल्या त्या मंत्राचा अर्थ “आम्ही तुझ्या दरबारात लावलेली हजेरी
कबूल करून घे” असा असावा, असा माझा समज झाला. मात्र सर्व धर्मी लोकांच्या
श्रद्धेस पात्र ठरलेल्या बाबांच्या दर्ग्यास प्रत्यक्ष भेट दिल्याचे समाधान
मनात होते. दर्ग्याबाबत अधिक माहिती त्यांच्या
http://khwajagharibnawaz.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. रात्री नऊचे
सुमारास आम्ही “हॉटेल मास्टर्स पॅराडाईज” या पुष्करच्या हॉटेलात पोहोचलो.
मेवाडदर्शन-७: सहावा दिवसः पुष्कर, रणथम्भोर
पुष्करचे
आमचे “हॉटेल मास्टर्स पॅराडाईज” कलाकुसरीने परिपूर्ण होते. ब्रह्मदेवाच्या
मंदिरात कॅमेरा नेता येत नसल्याने, आम्ही पुष्करला काढलेल्या फोटोंपैकी
बहुतेक फोटो या हॉटेलातीलच आहेत. तिथे तरण तलाव होता. कलापूर्ण बैठका,
दिवे, स्तंभ, शिल्पे इत्यादींनी सजवलेले, हिरव्यागार हिरवळींनी परिपूर्ण,
असे उद्यान होते. आवळ्या, पपयांनी लगडलेली झाडे होती. सकाळी उठून फेरफटका
करतांना आवळ्यांच्या झाडांखाली हिरव्या-पोपटी, ताज्या आवळ्यांचा सडाच
पडलेला होता. आवळे खाण्याची परवानगी विचारल्यावर, हवे तेवढे आवळे घ्या असे
सांगण्यात आले होते. म्हणून प्रत्येकाने शक्य तेवढे आवळे चाखले, जमतील
तेवढे सोबत घेतले. तरीही जमिनीवर सडा पडलेला दिसतच होता. धन्य ते आवळे आणि
धन्य त्या बागेचे करविते. माळीकाका सर्वप्रकारची फुले खुडून हार तयार करत
बसलेले होते. दवबिंदूंनी ओल्या झालेल्या हिरवळीवर मोठमोठी कासवे मजेत विहरत
होती. वातावरणात प्रसन्नता कशी आणता येते याचा जणू जिताजागता वस्तुपाठच
होता तो. मी अनेक हॉटेलांत आजवर राहिलेलो आहे, तरीही बाहेर पडतांना “तुमचे
हॉटेल चांगले आहे हो!” असा अभिप्राय व्यक्त करण्यापासून मी स्वतःला रोखू
शकलो नाही.
या
चित्रात हॉटेलातील खोलीच्या भिंतीवरील, सळईच्या जोडकामातून घडवलेली युवती,
आवळ्यांनी लगडलेले झाड, दगडातून कोरून तयार केलेला बाक आणि हिरवळीवर
विहरणारे कासव दिसत आहे.
नंतर आम्ही पुष्कर सरोवरावर गेलो.
सावित्री घाटावर सचिनने नेमलेल्या पुजार्याकरवी इच्छुकांनी पूजा केली.
मात्र पुष्कर तलावात पाणीच नव्हते. साफसफाईचे काम सुरू असल्याने पाणी दूरवर
अडवून ठेवलेले होते. जे.सी.बी. यंत्रे दगड-माती-गाळाची उठाठेव करत होती.
आम्हाला वेळ कमी असल्याने पुष्कर सरोवराच्या पाण्यात डुबकी घेणे, किमान पाय
बुडवणे हे काही साधले नाही. मग आम्ही ब्रह्मदेवाच्या मंदिरात गेलो. दर्शन
घेतले. उंटगाड्या बघितल्या. उंट पाहिले. उंटावर बसून घेतले. ऊंटांच्या
कातड्याच्या जूती, मोजड्या पाहिल्या, विकत घेतल्या. आज रणथंभोरपर्यंतचा
मोठा प्रवास करायचा असल्याने मग आम्ही बसमधे बसून रणथंभोरकडे कूच केले.
रणथंभोरला
पोहोचता पोहोचता रात्र झाली. आम्ही हमीर रिसॉर्ट ह्या प्रसिद्ध हॉटेलात
उतरलेलो होतो. दुसर्या दिवशी सकाळी रणथंभोरच्या अभयारण्यात कँटरने फेरफटका
करायचा असल्याने आज लवकरच निजायला लागणार होते.
सकाळी
सकाळी उठून तयार होऊन आम्ही सगळे बाहेर उभे होतो. मग वीस सीटर कँटर गाड्या
आल्या. स्थानापन्न होऊन आम्ही अभयारण्याकडे निघालो. दवबिंदूंनी ओलसर
झालेले गवत, धूसर प्राचीतून अलगद डोकावत असणारे सूर्यबिंब, मंद गार वारा
अशा उत्साहवर्ध वातावरणात कॅमेरे सज्ज करून आम्ही हळूहळू अरण्यात शिरलो.
समोरच रणथंभोरचा किल्ला सारखा दर्शन देत होता. तो चढून जाणे सहलीत अंतर्भूत
असायला हवे होते असे वाटू लागले. खूप मज्जा आली असती. असो. सध्यातरी
त्याच्या सान्निध्यातूनच आम्ही वाट चालत होतो. अचानक हिरवळीत, झाडाझुडूपांत
मोर दिसू लागले. झाडावर बसलेले एक घुबडही दिसले. एका नैसर्गिक जलाशयाच्या
तीरावर उगवत्या हिवाळ्याची प्रसन्न सकाळ अलगद अवतरत होती. इथे नक्कीच
काहीतरी पाहायला मिळणार म्हणून कँटर थांबले. मार्गदर्शकाने हातावर
बिस्किटाचे तुकडे धरले. आणि काय आश्चर्य, सोनचिडिया म्हणून ओळखला जाणारा एक
कावळ्याहून किंचित लहान आकाराचा दिमाखदार पक्षी हातावर बसून ते तुकडे टिपू
लागला. त्याच सोनचिडीयाचा हा फोटो.
सारे
दृश्यच भारलेले होते. सकाळच्या अरण्यातले तर्हतर्हेचे आवाज, किलबिल
अनोखी वातावरणनिर्मिती करत होते. आम्ही पुढे निघालो. वाघ दिसेल अशी अपेक्षा
होती. मात्र वाघ दिसला नाही. काळतोंडी माकडे भरपूर दिसली. तसेच
अस्ताव्यस्त पसरलेले वटवृक्षही इतस्ततः विखुरलेले दिसत होते. आतापर्यंत
पाहिलेल्या मेवाडातील भूमीवर एवढे विशालकाय वृक्षच आम्ही बघितलेले नव्हते.
इथे मात्र भव्य वडाची झाडे सर्वत्र दिसून येत होती. दोन तासांनी आम्ही
परतलो.
जेवण झाल्यावर दुपारी जयपूरच्या “चोखी धानी”मधे जायचे होते.
जेवणही तिथेच होणार होते. हाही प्रवास तसा मोठाच होता. मात्र आता एखादा तास
वेळ होता. शेजारीच हस्तकलेच्या वस्तुंचे एक दुकान होते. तिथे जाऊन मनसोक्त
खरेदी केली. कोरीव लाकडाच्या वस्तू, कपडे, रणथंभोरच्या शिक्क्यांचे,
बोधचिह्नांचे रेशमी भरतकाम केलेले टी-शर्ट, बांधणीचे कापड इत्यादी.
मराठीत
आपण राजाच्या गावाला “राजधानी” म्हणतो. हा शब्द मराठीला राजस्थानी भाषेची
मिळालेली देणगी आहे. धानी म्हणजे गाव. राजाचे गाव म्हणून राजधानी. तसेच
चोखीधानी म्हणजे चोख, खरेखुरे गाव. नमुनेदार राजस्थानी गाव. मात्र
“चोखीधानी” या नावाच्या हॉटेलांचा एक गटच आहे. आणि निरनिराळ्या शहरांतून तो
“चोखीधानी” हॉटेल चालवत असतो. हल्लीच पुण्याजवळच्या “चोखीधानी”त जाऊन
आल्याचे, आनंद घारे यांचे वर्णन वाचल्याचे आठवते. मागे मी इंदौरजवळच्या
“चोखीधानी”तही गेलो होतो त्याचीही आठवण जागवली गेली. दक्षिणेकडून जयपूर
शहरात शिरतांना, टोंक रस्त्यावर डाव्या बाजूला चोखीधानी वसलेले आहे.
मेवाडदर्शन-९: आठवा दिवसः जयपूर
जयपूरचा इतिहास
जोधाबाईः
उर्फ मरिअम उझ-झमानी बेगम साहिबा, उर्फ राजकुमारी हिरा कुमारी साहिबा,
उर्फ हरखा बाई (जन्मः ऑक्टोंबर १, १५४२, मृत्यूः १६२२)
जोधाबाई
उर्फ मरिअम उझ-झमानी बेगम साहिबा, उर्फ राजकुमारी हिरा कुमारी साहिबा,
उपाख्य हरखा बाई, ही एक राजपूत राजकन्या होती, जी मुघल सम्राज्ञी झाली.
कच्छ्वाह राजपूत, अंबरचे राजे राजे भारमल यांची ती ज्येष्ठ कन्या होती.
विक्रमादित्याच्या
नवरत्न दरबारातील नवरत्ने होती धन्वंतरी, क्षपणक, अमरसिंह, शंकू, वेताल
भट्ट, घट कर्पर, वराह मिहीर, वररुची आणि कालिदास. त्याचप्रमाणे अकबराच्या
दरबारातही नवरत्ने असायची असा समज आहे. ती नवरत्ने म्हणजे अकबरनामा,
आईने-अकबरी या ग्रंथांचा रचयिता तसेच बायबलचा पर्शियन अनुवादकार अबुल फजल;
लीलावती या हिंदू गणितविषयक ग्रंथाचा अनुवादकर्ता, कवी फैझी, जो अबुल फजल
याचा भाऊही होता; मियाँ तानसेन उर्फ तन्ना मिश्रा; महेशदास उर्फ राजा
बिरबल, हा एक कवीही होता त्याच्या रचना भरतपूरच्या वस्तुसंग्रहालयात
सुरक्षित आहेत; राजा तोडरमल जो अकबराचा महसुली विभाग सांभाळत असे व ज्याने
प्रमाणित वजने व मापे सुरू केली; अंबरचा राजा मानसिंग; अब्दुल रहीम
खान-ए-खाना हा अकबराच्या कुमारवयातील पालनकर्त्या बैरामखानाचा मुलगा होता;
फकीर अझिआओ-दिन हा गूढवेत्ता आणि मुल्लाह दो पिआझा हा विद्वान.
जोधाबाई
या नवरत्नांतील राजा मानसिंग यांची आत्या. जोधाबाईचा अकबराशी विवाह झालेला
असल्याने अंबरच्या राजांना मुघल दरबारात मानाचे स्थान प्राप्त झालेले
होते. अकबर मानसिंगास “फर्जंद” म्हणजे पुत्र मानत असे. त्यास त्याने ७
हजारी (सर्वोच्च) मनसबदारी दिलेली होती. अकबराचे वतीने महाराणा प्रताप
यांचा, हल्दीघाटीत, याच मानसिंगाने पराभव केला होता. मानसिंगाच्या
मृत्यूनंतर त्याचा पुत्र भाऊसिंग गादीवर बसला. भाऊसिंगांनंतर त्यांचे
पुतणे, मिर्जाराजे जयसिंग अंबरचे राजे झाले.
मिर्झा राजे जयसिंग (जन्मः जुलै १५, १६११, मृत्यूः ऑगस्ट २८, १६६७)
जयसिंग
वयाच्या १० व्या वर्षी अंबरचे राजे झाले. पुढे १६२७ मधे शहाजहानच्या
राज्यारोहणप्रसंगी, जयसिंगांच्या दक्षिणेतील सुभेदाराने -खान जलाल लोदी-
याने बादशाही सत्ता झुगारून दिली असता जयसिंगांनी ते बंड शमवले. याखातर
त्यांस ४ हजारी सरदार करण्यात आले. त्यानंतर १६३६ मधे शहाजहानने दक्षिणेतील
सल्तनतींविरुद्ध उघडलेल्या अभियानांतर्गत गोंडांवरील लढाईत गाजवलेल्या
शौर्याखातर जयसिंगांस ५ हजारी सरदार करण्यात आले. १६३८ मधे कंदाहारच्या
किल्ल्यावर विजय मिळवतांना शहाजहानने ५०,००० फौज जमा केलेली होती. या
प्रसंगी जयसिंगांस “मिर्झाराजे” हा किताब देण्यात आला. १६५७ मधे शहाजहान
गंभीररीत्या आजारी पडल्यावर त्याच्या मुलांमधे सत्तासंघर्ष सुरू झाला.
गुजरातमधील पुत्र मुराद व बंगालातील पुत्र शुजा यांनी स्वतःच स्वतःस सम्राट
घोषित केले. आग्र्यातील सर्वात मोठा मुलगा दारा याने जयसिंगांस ६ हजारी
सरदार करून, दिलेरखान पठाण सोबत आपला मुलगा सुलेमान याचेबरोबर बंगालात
शुजाचे बंड शमवण्याकरता पाठवले. दरम्यान औरंगजेबाने धर्मत आणि समूगढच्या
लढाया जिंकून आग्र्यावर ताबा मिळवला होता. हे पाहून जयसिंग व दिलेरखान
यांनी औरंगजेबाची सत्ता मान्य केली. तेव्हा औरंगजेबाने जयसिंगांस ७ हजारी
(सर्वोच्च) सरदार नेमले. पुढे १६५९ मधे शिवाजीने अफजलखानाचा वध केला आणि
१६६३ मधे शाहिस्तेखानाची बोटे कापली. नंतर १९६४ मधे शिवाजी महाराजांनी
सूरतेची लूट केली. तेव्हा औरंगजेबाने जयसिंगांस ४४ हजाराची फौज देऊन
शिवाजीच्या बंदोबस्तास पाठवले. पुरंदरचा तह झाला आणि शिवाजी महाराजांना
आग्र्यास जावे लागले. मात्र विजापूरच्या मोहिमेस अपेक्षित यश न मिळाल्याचे
कारण देऊन औरंगजेबाने जयसिंगांस खूप अपमानित केले. पुढे औरंगजेबाच्या
आज्ञेने जयसिंगांस विषप्रयोग करण्यात आला असा प्रवाद आहे. या सार्या
प्रकारामुळे जयसिंगांच्या मुलांच्या उन्नतीसही खीळ बसली. जयसिंगांनंतर
त्यांचे पुत्र रामसिंग (पहिला) मिर्जाराजे झाले, तर त्यांच्यानंतर त्यांचे
पुत्र बिशनसिंग. बिशनसिंगांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र सवाई जयसिंग राजे
झाले.
महाराजा सवाई जयसिंग (द्वितीय) (जन्मः नोव्हेंबर ३, १६८८, मृत्यूः सप्टेंबर २१, १७४३)
उंच
अवकाशातून राजस्थान पाहत पाहत खाली येत गेल्यास, सर्वात वयस्कर अशा अरवली
पर्वतांच्या बेलाग कड्यावर वसलेले अंबर (amber, आम्बेर, आमेर) व जयगड
किल्ले दृष्टीत भरू लागतात. तत्कालीन आसपासच्या परिसरावर राज्य करण्यास
योग्य अशा प्रकारे उंचावर, अंबरात वसवलेला डोंगरी किल्ला तो “अंबर”. तीच
तत्कालीन अंबर साम्राज्याची राजधानी होती. अंबर राज्यात सूर्यवंशी राजपूत
असलेल्या कच्छवाह घराण्याचे राज्य होते. १६९९ मधे महाराज बिशनसिंग यांचा
देहांत झाला त्यावेळी त्यांचे पुत्र महाराज जयसिंग, जे त्यावेळी केवळ ११
वर्षे वयाचे होते, ते अंबरच्या गादीवर बसले. “खेलना” इथली लढाई
जिंकल्याखातर बक्षिसी म्हणून औरंगजेबाने त्यांना “सवाई” हा किताब दिला
म्हणून ते सवाई जयसिंग म्हणूनही ओळखले जातात. हेच महाराजा जयसिंग
(द्वितीय), मिर्जाराजे जयसिंग यांचे पणतू होत. १७४३ मधे ५४ व्या वर्षी
त्यांचा मृत्यू झाल्यावर त्यांचा अंत्यसंस्कार जयपूरच्या उत्तरेस असणार्या
गायतोड येथील राजेशाही घाटावर करण्यात आला. त्यांचे नंतर त्यांचे पुत्र
ईश्वरीसिंग गादीवर बसले.
१६७९ मधे औरंगजेबाने बसलेला जिझिया कर
१७२० मधे सम्राट महंमद शाह यांचेकरवी रद्द करवून घेण्यात सवाई जयसिंग
द्वितीय, यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गयेत हिंदू यात्रेकरूंवर बसवलेला
करही यांचे शब्दाखातरच हटवण्यात आला. यांनीच अनेक शतकांनंतर पुन्हा
अश्वमेध (१७१७) आणि वाजपेय (१७३४) यज्ञ केले. ते निंबार्क संप्रदायाचे
अनुयायी होते. सतीची प्रथा बंद करणे, लग्नांतील खर्चिकतेस आळा घालणे
इत्यादी समाजोद्धारक कार्यांमुळे ते लोकप्रिय झाले.
सम्राट महंमद
शाह रंगीला यांच्या दरबारातील, शाही प्रस्थानास मुहूर्त शोधण्याकरता
झालेल्या कालनिश्चितीबाबतच्या चर्चेस साक्षी राहिल्यानंतर महाराज जयसिंग
यांना अवकाशवेधांच्या अभ्यासाची गरज भासली. अशा प्रकारच्या अभ्यासास
प्रोत्साहन देऊन त्यांनी पाच अवकाशनिरीक्षण वेधशाळा प्रस्थापित केल्या.
दिल्ली, मथुरा (त्यांच्या आग्रा प्रांताची राजधानी), बनारस, उज्जैन
(त्यांच्या माळवा प्रांताची राजधानी) आणि जयपूर येथे त्या वेधशाळा स्थापन
केलेल्या होत्या. त्यांना “यंत्रमंदिर” म्हणून ओळखले जात असे. त्याचा
अपभ्रंश होत होत त्यांना हल्ली “जंतर-मंतर” म्हणून ओळखले जाते. त्यापैकी
फक्त जयपूरची वेधशाळा अजूनही पूर्णपणे कार्यरत आहे. हिदू व मुस्लीम
अवकाशवेध शास्त्रांवर आधारित बांधलेल्या या वेधशाळा ग्रहणे व तत्सम अवकाशीय
घटनांचे पूर्वभाकीत करू शकत. त्यांत “रामयंत्र” (मध्यभागी गोलाकार स्तंभ
असलेली आकाशास खुली दंडगोलाकृती इमारत), “जयप्रकाशयंत्र” (अंतर्वक्र,
अर्धगोलाकृती इमारत), “सम्राटयंत्र” (प्रचंड संपातदर्शी अर्धवर्तुळाकृती
इमारत), “दिगांशयंत्र” (एका गोल स्तंभाभोवती उभारलेल्या दोन वर्तुळाकार
भिंती असलेली इमारत) आणि “नारीवलययंत्र” (दंडगोलाकृती भिंतीच्या आकाराची
इमारत) या यंत्रांचा समावेश होतो. त्यांनी युरोपातून पाचारण केलेले
ख्रिस्ती अवकाशशास्त्रज्ञ वापरत असत त्यांपेक्षाही, या वेधशाळांतील उपकरणे व
तंत्रे जास्त प्रगत आणि उच्च प्रतीची होती.
जयनगर
(जयपूर) नगर वसवणे ही जयसिंगांची सर्वात महत्त्वाची कामगिरी होती.
विद्याधर भट्टाचार्य नावाच्या बंगाली स्थापत्यकलानिपूण शिल्पशास्त्र्याच्या
नियोजनाखाली १७२७ मधे पायाभरणी करून नव्या राजधानीचे काम सुरू झाले. १७३३
मधे संपूर्ण नगर सज्ज होऊन, कच्छवाहांची राजधानी अंबर मधून जयनगरात
स्थलांतरित करण्यात आली. केवळ सहा वर्षांत जयपूरसारखे नियोजनबद्ध नगर
राहण्यायोग्य तयार करणे, ही आजच्या निकषांनीही अतुलनीय कामगिरीच ठरावी.
३,००० वर्षांपूर्वीच्या पौराणिक संस्कृतींच्या शोधात सापडलेल्या
शहरांप्रमाणे, संस्कृत शिल्पसूत्रांबरहुकूम, नगरनियोजन केलेल्या औरस-चौरस
संरचनेत जयपूर नगर वसवलेले आहे.
वरील नकाशा पाहा. हा नकाशा राजस्थान
सरकारच्या पर्यटनविभागाने २००४-२००५ मधे प्रसिद्ध केलेल्या नकाशातील
जुन्या शहराचा केवळ तटबंदीतील भाग कापून, १६ अंश घड्याळाच्या विरुद्ध
दिशेने फिरवून तयार केलेला आहे. नजरेत भरणारी नगररचना, भौमितिक विभागणी आणि
शिस्तबद्ध रीतीने केलेली रस्त्यांची आखणी ही याची वैशिष्ट्ये आहेत.
सुरजपोल ते चॉंदपोल रस्ता पूर्व-पश्चिम नसून १६ अंश दक्षिणेकडे कललेला आहे.
याचे काय कारण असावे? जे असेल ते निश्चितस्वरूपाने खगोलशास्त्रीय असावे
असे मला वाटते.
हल्ली
महाराज भवानीसिंग हे जयपूरचे महाराज आहेत. ते जयपूरच्या नगर महालात राहत
असतात. महालावर दोन झेंडे फडकत असलेले पाहून मी मार्गदर्शकास त्याचे कारण
विचारले असता त्याने महाराजांच्या “सवाई” या बिरुदाचा निर्वाळा दिला. एक
पूर्ण, आणि त्याचेच वर, एक चतुर्थांश आकाराचा दुसरा, असे दोन ध्वज
राजप्रासादावर फडकत असतात. १९७१ मधे संस्थानिकांचे तनखे बंद झाल्यावर ही
बिरुदे नावाचीच काय ती उरलेली आहेत. मात्र महाराज भवानीसिंग यांनी १९७१
च्या भारत-पाक युद्धात गाजवलेल्या शौर्याखातर त्यांना भारत सरकारने
“महावीरचक्र” देऊन सन्मानित केले आहे. पुढे १९९४ ते १९९८ दरम्यान ते
भारताचे ब्रुनेईतले उच्चायुक्तही राहिलेले होते.
इथले रेल्वेस्टेशन
पश्चिम टोकाला आहे, तर हवाई अड्डा टोंक रोडवर दक्षिण टोकाला आहे. जयपूर नगर
दोन भागांत वसलेले आहे. तटबंदीच्या आतील ’गुलाबी नगर’ आणि तटबंदीच्या
दक्षिणेला वसलेले नवे जयपूर नगर. जयपूर शहराच्या उत्तरेला
’अंबर’/’आंबेर’/’आमेर’ आणि ’जयगड’ किल्ल्यांना अंगाखांद्यांवर घेऊन उभा आहे
अरवली पर्वताचा बेलाग कडा. गुलाबी शहरातील सर्व इमारती, मग त्या गुलाबी
दगडांनी बांधलेल्या असोत वा नसोत, त्यांना गुलाबी रंग देणे कायद्याने
बंधनकारक केलेले असल्याने, शहराचा गुलाबी (खरे तर गेरुआ म्हणजे गेरूचा) रंग
सर्वदूर भरून राहिलेला दिसतो. राजस्थानात दरवाज्याला ’पोल’ म्हणतात.
गुलाबी शहराच्या पश्चिमेकडील तटबंदीतील मुख्य दरवाज्याला ’चांद’पोल
म्हणतात, तर पूर्वेकडील तटबंदीतील मुख्य दरवाज्याला ’सूरज’पोल म्हणतात.
दोन्ही दरवाजांना जोडणारा आडवा रस्ता गुलाबी शहरातला मुख्य रस्ता होय. या
रस्त्याच्या दोन्ही बाजूस गुलाबी नगर उभ्या-आडव्या रस्त्यांवर प्रशस्तपणे
वसलेले आहे. या रस्त्याच्या मध्यभागी ’इशारलट’ नावाचा उंच जयस्तंभ आहे.
महाराज ईश्वरीसिंग यांनी मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून तो जयपूर
शहराच्या मध्यभागी उभारण्यात आलेला आहे. गुलाबी शहराच्या अतिपूर्वेला एक
उंचसा डोंगर आहे. त्यावर एक प्रेक्षणीय स्थळ आहे, ते म्हणजे ’गलताजी’ उर्फ
गालव मुनींचे मंदिर. इथून, चौरस सुनियोजित रस्त्यांतून वसलेले जयपूर नगर
अतिशय रमणीय दिसते. गुलाबी शहराच्या दक्षिणेकडील तटबंदीतून मुख्य शहराकडे
जाणारे तीन प्रमुख रस्ते आहेत. अजमेर रस्ता ’अजमेरी गेट’ मधून बाहेर पडतो.
’मोतीडुंगरी” उर्फ ’एमडी’ रोड मोतीडुंगरी राजप्रासादाकडे घेऊन जातो. डुंगरी
म्हणजेच टेकडी. हा राजप्रासाद उंच टेकडीवर बांधलेला आहे. महाशिवरात्रीच्या
दिवशी तो पर्यटकांना पाहण्यासाठी खुला असतो.
सकाळीसच
आम्ही जयपूर मधील नगरप्रासाद पाहण्याकरता जाऊन पोहोचलो. राजमहाल चौसोपी;
प्रशस्त; पत्थरातील कोरीव काम, रंगकाम, नक्षीकाम आणि मीनाकाम (काच, आरसे,
निरनिराळ्या रंगच्छटांचे दगड तसेच रत्ने यांचे शुभ्र संगमरवरावर केलेले
जडावकाम) यांनी अलंकृत आणि सर्व सुखसुविधांनी परिपूर्ण असाच आहे.
पिढ्यानुपिढ्यांच्या समृद्धतेने सतत संपन्न होत राहिलेल्या अनेक
राजप्रासादांचा तो समूह आहे.
राजवाडा
कळस-कमानींनी ठायी ठायी अलंकृत केलेला आहे. पुष्पवाटिकांनी प्रफुल्लित
केलेला आहे. विस्तीर्ण अंगणांनी प्रासादाच्या भव्यतेत भर घातलेली आहे.
मोठमोठ्या
भिंतीवर बहारदार नक्षिकाम करून, महिरपी, कमानींनी सजवून महालास कलात्मकता
आणलेली आहे. देवड्या, ओसर्या, दिवाणखाने, दालने, कक्ष, इत्यादी सारा परिसर
पाहता पाहता आपण आणखीही बराचसा भाग पाहिलेलाच नाही हेही लक्षात येऊ लागले.
सारा राजवाडा इतमामाने पाहायचा तर आवश्यक असणारा वेळ आमच्याकडे नव्हता.
(खरे तर कुठल्याच पर्यटकाकडे इतका वेळ नसतो की, शतकानुशतके समृद्ध होत
राहिलेला नगरप्रासाद भेटीच्या तुटपुंज्या वेळात, मनाचे समाधान होईस्तोवर
पाहता येईल.)
राजप्रासादाच्या
समोरच आहे जंतरमंतर म्हणजेच “यंत्रमंदीर”. आत प्रवेश करताच मार्गदर्शकाने
लघुसम्राटयंत्रावर तत्कालीन वेळ, सूर्यकिरणांमुळे मधल्या भिंतीच्या
वक्राकार-संगमरवरी-उताण्या-कमानींवर पडणार्या सावलीच्या स्थानावरून, कशी
सांगता येते ते कृतीसह दाखवून दिले. कमानींवर खोदलेल्या मापनरेषा, २०
सेकंदापर्यंतच्या कमीतकमी फरकाने, वेळ वर्तवू शकत होत्या. तिथली अनेकविध
यंत्रे कशी वापरायची ते शिकण्याकरता तिथे राहून संशोधन करणारे विद्यार्थी
आम्ही पाहिले. त्यांच्या पासंगास पुरेल एवढाही वेळ आमच्यापाशी नव्हता.
तरीही आपल्या संस्कृतिक समृद्धतेच्या वारशाचे भरभक्कम पुरावे पाहून मन भरून
आले. असलेच काहीतरी दैदिप्यमान आपल्यालाही करता यावे अशी उमेद जागली.
याच्यासारख्या स्थळांच्या पर्यटनाने साधण्यासारखे यापरता जास्त काय असू
शकेल.
जंतरमंतर
नंतर जेवण उरकून आम्ही जयपूरच्या जलमहाच्या दिशेने कूच केले. ऊन तापू
लागले होते. जलमहालापर्यंत जाता येणारच नव्हते. मात्र तळ्याच्या पाळीवरूनच
जलमहालाचा फोटो काढता आला.
मग आम्ही अंबरच्या किल्ल्याकडे गेलो. बस
जाऊ शकत होती तोपर्यंत बसने आणि मग पुढे जीपने. मग खाली पायउतार होऊन
किल्याच्या दिशेने चालू लागलो. तटबंदीच्या काठाशी एक युवक पारंपारिक
राजस्थानी पोशाखात एक स्थानिक वाद्य, तालीन होऊन वाजवत असलेला दिसला.
गाणेही ओळखीचे होते. नागीण सिनेमातले “मेरा तन डोले, मेरा मन डोले, मेरे
दिल का गया करार”. आम्हीही ऐकू लागलो. त्याचे चलचित्रणच केले. मग त्याला
विचारले की ह्या वाद्याला काय म्हणतात? तो म्हणाला “रावणहट्टा!”.
माझा
मावसभाऊ अजित डोंगरे आमच्या सोबत होता. तो बासरी-पावा खूप छान वाजवतो.
त्याला संगीतातली बर्यापैकी जाण आहे. मागे तो म्हणाला होता की अशा
प्रकारचे काही वाद्य अस्तित्वातच नसावे. म्हणून मी त्याला पुराव्यानिशी
“रावणहट्टा” दाखवले. त्याने ते विकत मिळू शकेल का विचारले. तो विकत आणून
द्यायलाही तयार झाला. आम्ही किल्ला पाहून येईपर्यंत त्याने एक वाद्य आणून
ठेवले होते. पण त्याच्या तारा, तुंबा आणि धनुष्य यांचा मेळ योग्य प्रकारे
बसत नव्हता म्हणून तो प्रयास मग तसाच सोडून द्यावा लागला. आमेर किल्ल्याचे
तपशीलवार वर्णन मी माझ्या यापूर्वीच्या जयपूरच्या प्रवासवर्णनात आधीच करून
ठेवलेले असल्याने इथे पुनरावृत्ती करत नाही.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.