Sunday, October 18, 2020

वेणुगोपाल मंदिर, मैसूर

  मैसूर ला भेट दिलेल्या लोकांपैकी मला वाटतं फार कमी जणांना हे मंदिर माहित असेल. 
साधारण १२ व्या शतकातील होयसल पद्धतीने बांधलेलं हे मंदिर १९१० साली कृष्णसागर धरण बांधताना कन्नमबडी गावासोबत पाण्याखाली गेलं. त्यामुळे तिथल्या लोकांना जवळचं स्थलांतरित करण्यात आलं पण मंदिर मात्र त्याच जागेवर राहील.
असं म्हणतात की याची निर्मिती सोमनाथपूर च्या चेन्नकेशव मंदिराच्या सोबतच झाली होती. १२ व्या शतकातलं हे मंदिर पाण्याखाली गेलं याची कल्पना देखील करवत नाही ना.. ?? हे मंदिर पाण्याखाली जाण्यापूर्वी याच्या गाभाऱ्यातील मुख्य मूर्ती म्हणजेच वेणुगोपाल स्वामींची मूर्ती नवीन गावातलया मंदिरात हलवली गेली. २००० साली पाऊस कमी झाल्या कारणाने धरणातील पाण्याचा काही भाग आटल्यामुळे या मंदिराचा कळस ठळकपणे पुन्हा दिसू लागला. 

तेव्हा बेंगळुरू येथील प्रसिद्ध व्यावसायिक श्री हरी खोडाय यांनी या मंदिराच्या स्थलांतराची जबाबदारी घेतली आणि त्याच जागेपासून थोड्या अंतरावर जिथे पाणी नाही त्या जागेवर त्या मंदिराची पुनर्रचना केली. 
असं म्हणतात कि मंदिर आहे तस उभं करण्यासाठी जवळपास १६००० छायाचित्र घेतले गेले, आवश्यक त्या खुणा केल्या गेल्या आणि जवळपास अर्धा डझन तज्ञ मूर्तिकार आणि वास्तुविशारद यांच्या अथक प्रयत्नाने हे मंदिर होसा कन्नमबडी म्हणजेच नवीन कन्नमबडी या गावात परत स्थापन करण्यात आले. आता गेल्या डिसेंबर मधेच याच औपचारिकरित्या उदघाटन झालं आणि १२ व्या शतकातलं हे वैभव लोकांना पाहण्यासाठी खुलं करण्यात आलं.
              मंदिराचा गाभ्यां जवळ एका मोठा खांबांचा मंडप आहे. चारही बाजूला सगळे देवी देवता यांच्या प्रतिमा आहेत ,यात  डाव्या बाजूला वेंकटेश स्वामी,श्रीराम,मारुती, पद्मावती देवी आदींचे छोटे छोटे मंदिर आहेत. तर उजव्या बाजूला सर्व विष्णू अवतारांच्या मुर्त्या आहेत. आधी सांगितल्याप्रमाणे मंदिर हे होयसल पद्धतीने बांधण्यात आलाय. मुख्य मंडपाबाहेर तब्बल आठ छोटेखानी मंडप आहेत. बाहेरील बाजूस डाव्या हाताला हंपी येथील विठ्ठल मंदिराच्या रथाप्रमाणेच एक रथ दिसून येतो. 

मुख्य म्हणजे हे सगळं अजूनही भक्कम आणि सुस्थितीत आहे.  पुढे मैसूर ला गेलात कि एकदा नक्की आवर्जून भेट द्या. शक्यतो संध्याकाळच्या वेळेस गेल्यास दूरवर पसरलेल्या कृष्णराजसागर बॅकवॉटर्स च्या पलीकडे मावळतीच्या सूर्याच्या केशरी रंगछटा पाहण्याचा योग म्हणजे पर्वणीच ठरेल.

टीप- मंदिराच्या आत छायाचित्रण करण्यास आता मनाई केली आहे. 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...