Monday, October 26, 2020

सौदि अरेबिया

 

२५ फेब्रुवारी २०१२ ला रियाध परिसरात झालेल्या वाळूच्या वादळाची (?? पावसाची ;) ) काही चित्रे...

.

.

.

.

.

.

.

.

 .

वाळूचे वादळ हा खरंच भयानक प्रकार असतो. अगदी पुळणीसारख्या बारीक ते गोट्यांएवढ्या मोठ्या वालुकणांचा (गारांसारखा) सपाटून मारा चालू असतो. असल्या मोठ्या वादळात चारचाकी अडकली म्हणजे तिचे केवळ भंगारात रुपांतर होते. गाड्या पाईल-अप होतात त्याचे कमी दिसणे हे जेवढे कारण असते तेवढेच (किंवा किंचीत जास्तच) पुळणीसारखी अतीबारीक कोरडी वाळू रस्त्यावर पसरणे हेही असते... ही वाळू अगदी चिकणमातीच्या चिखलाइतकी निसरडी असते.

वातावरण धुसर करण्या इतकी वाळू हवेत पसरवून देण्याएवढी मोठी वादळे सतत होत असतात... वर्षातून १५-२० वेळा तरी. चित्रातल्या प्रमाणे मोठे वादळ वर्षा दोन वर्षातून एकाद्या किंवा कमी वेळा होते. वादळाची काहिशी पूर्वसूचना सॅटेलाईट पिक्चरवरून मिळू शकते पण त्याच्या ताकदीचा अंदाज घेणे कठीण असते. वादळाचा परिणाम म्हणजे वातावरणाचे प्रदुषण वाढते आणि श्वसनाचे विकार असणार्‍या लोकांना फार काळजी घ्यावी लागते... शक्यतो बाहेर जाणे टाळणे अथवा जरूर असल्यास मास्क घालून जाणे वगैरे. पण एक बरे आहे की वार्‍याचा वेग कमी झाला की वाळू पटकन खाली बसते... मात्र हे कधी कधी दिवस दोन दिवस होत नाही.

वाळवंटातल्या तापलेल्या वाळूमुळे गरम झालेली हवा वर जाते आणि तेथे कमी दाबाचा पट्टा तयार होतो. त्यामुळे समुद्रावरची त्यामानाने थंड असलेली हवा त्या पट्ट्यात वेगाने घुसते आणि तिच्या प्रबळ प्रवाहाबरोबर वाळवंटातली वाळू उडू लागते. हे या वादळांचे मुख्य कारण.

आता पाळी आहे सौदी अरेबियातल्या गारपिटीची. कधितरी पण सणकून होणारी ही गारपीट म्हणावी की गारबाँब वर्षाव म्हणावा ??? असा प्रश्न पडतो. बघा तुम्हाला तसं वाटतं का? ...

.

असल्या गारपिटीनंतर चारचाकीच्या कंपन्यांचा खप वाढतो म्हणतात ;) ...

.

.

.

गारा घ्याहो गारा... लई स्वत लावल्यात... टपोर्‍या गारा... आताच घ्या नाहीतर दहा मिनीटात वितळून जातीला आणि मग पस्तावाल... गारा घ्याहो गारा... ;)

.

 ही पहा सौदि अरेबियातली बर्फवृष्टी...

.

.

.

.

.

दर वर्षी नाही, पण गेल्या सात वर्षांत चारदा तरी सौदी अरेबियाच्या उत्तर भागात बर्फवृष्टी झाली आहे.

मी टाकलेल्या फोटोंतल्या वाळूच्या वादळाच्या आणि बर्फवृष्टीच्या जागांत साधारण ८०० किमी अंतर आहे.

पण दक्षिण सौदितल्या (फोटोतल्या वाळूच्या वादळाच्या जागेपासून १००-१५० किमी दक्षिणेस) ताईफ या समुद्रसपाटीपेक्षा १८८० मीटर ऊंच असलेल्या डोंगरावरच्या शहरात अत्युच्च ४० अंश सेल्सियस व अतीनीच -१ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे. सरासरी तापमान उच्च ३५ अंश व नीच ८ अंश सेल्सियस असते. तेथे बहुतेक दर वर्षी थोडेसे तरी बर्फ पडते असे 'ऐकून' आहे.

हे ठिकाण पृथ्वीगोलावर अक्षांश बघितले तर अहमदाबाद आणि मुंबईच्यामधे येते !

 आपल्या देशात राजस्थानात काही ठिकाणी बर्फ पडते असे ऐकून आहे. ती दोन ठिकाणे म्हण्जे माउंट अबू व गुरूशिखर ( प भारतातील सरवोच्च जागा ) 
आबूशिखरावरच्या नखी(नाक्की) तलावात पृष्ठभागावर पाव सेन्टिमीटर जाडीचा बर्फाचा पातळ थर पाहिला आहे. हिवाळ्यात राजस्थानात काही ठिकाणी काही वेळा शून्याखाली तीन अंश से. इतके तापमान असते. पण प्रत्येक वेळी बर्फवृष्टी किंवा पाणी गोठणे होतेच असे नाही. बर्फवृष्टी बहुधा होत नाही. सीमेवरच्या वाळवंटात (साम वगैरे) कडाक्याची थंडी असते.
सल्तनत ऑफ ओमान मधे मस्कतपासून १५० किमी वर जबल अख्दर (हरित पर्वत) नावाची पर्वतराजी आहे त्यांतील जबल शेख नावाच्या मुख्य गावांत बर्‍याचदा हिवाळ्यात चारचाकीच्या काचांवर रात्री पडलेल्या दवाचे सकाळपर्यंत बर्फ झालेले असते. तेथील हवामान वर्षभर थंड / खूप थंड असते आणि तेथे थंड प्रदेशातील फळांच्या (सफरचंद, पीच, प्लम, द्राक्षे, ई) व केशराच्या बागा आहेत. प्रसिद्ध मस्कती डाळिंबे तेथेच पिकतात... एका प्रजातीचे डाळींब एक ते दीड किलो वजन भरेल इतके मोठे असू शकते.

दुबईच्या सुरस कहाण्या तुम्ही ऐकल्या असतीलच. आता पहा हा दुबईतला खास एक निसर्गचमत्कार, जो जगात इतर कोठेही होऊ शकत नाही... निदान बुर्ज दुबई (आताचे नामकरण बुर्ज खलिफा) जगातील सर्वात ऊंच इमारत असेपर्यंत तरी नक्कीच नाही.

हा विजेचा नाच नक्कीच चित्तथरारक असतो... त्याची काही चित्रे...

.

.

.

.

.

ही सर्व चित्रे जालावरून आणि मित्रमंडळींकडून संग्रहीत केलेली आहेत.

जगातल्या इतर उंच इमारतींवर झालेले विद्युल्लतेचे हल्ले तुम्ही www.environmentalgraffiti.com/nature/news-7-most-iconic-skyscrapers-eart... येथे पाहू शकाल.

असे वीज पडणे आम्ही वरळीच्या दूर्दर्शन मनोर्यावर पडताना बघीतले आहे त्यावेळी मनोर्याच्या टोकावर थोडा धूर दिसला होता,ईथे तसे कही झाले नसेल तर उत्तम.

उंच इमारतींकडे वीज आकर्षीत होणे सहाजीक आहे... त्यांमुळेच सर्व ऊंच इमारतीना वीजरोधक बसविलेले असतात. बुर्ज खलिफासारखे अफाट उंच मनोरे तर अगदी ढगांच्या खालच्या थराच्या उंचीपेक्षा जास्त वर असतात... त्यामुळे त्यांच्या बाजूचीच (वरची नव्हे ;) वीज त्यांच्याकडे आकर्षीत होणे हे नेहमीचेच आहे. त्यामुळे अशी चित्रे दुर्मिळ नाहीत पण आकर्षक नक्कीच आसतात.

बुर्ज खलिफावर अत्यंत प्रबळ अगदी आता माहित असलेल्या वीजेच्या मार्‍यापेक्षा जास्त आघात सहन करू शकेल एवढी प्रबळ संरचना स्थापीत केली आहे असे ऐकून आहे... अर्थात अश्या जगावेगळ्या उंच इमारतीची तेवढी काळजी घेतलि नसती तरच नवल होते म्हणा !

 वीज पडणे हा केवळ एक मराठी वाक्प्रचार आहे. हवेच्या चलनवलनाने, वातावरणातील उष्णतेच्या फरकाने आणि इतर काही कारणांनी वातावरणाच्या दोन भागांच्या विद्युतभारात फरक निर्माण होतो. याबरोबर जर तो विद्युतभार वाहून नेण्यास मदत करणारी सोय असली (जी बहुदा पावसाळी दमट ढग पुरवतात) की मग वीजेचा स्रोत धन-ते-ऋण असा वाहू लागतो (किंवा खरे म्हणजे इलेक्ट्रॉन्स उलट्या दिशेने वाहू लागतात !). हा प्रकार धन भारीत व ऋण भारीत ढगांमधे झाला की आपल्याला आकाशात चमकणारी वीज दिसते. पण हा प्रकार धन भारीत ढग आणि ऋण भारीत पृथ्वी अथवा पृथ्वीवरील इमारत / झाड यामधे झाला की आपण वीज पडली असे म्हणतो.

या सर्व प्रकारात उंच इमारतींना त्या ढगांच्या जवळ असल्याने नेहमीच जास्त धोका असतो. विद्युतप्रवाहाच्या स्त्रोताचा इमारतीवर परिणाम होऊ नये यासाठी उंचइमारतींवर ती वीज आकर्षीत करून जमिनीत वाहून नेण्यासाठी (किंवा खरे तर जमिनीतील ऋणभार / इलेक्ट्रॉन्स वर ढगांत सहज वाहून जावे अशी) यंत्रणा उभारलेली असते. हे सगळे होताना इलेक्ट्रॉन्सच्या प्रवाहाने "आयोनाइज्ड एअर अथवा प्लाझ्मा" तयार होतो आणि त्यामुळे प्रकाश उत्सर्जीत होतो, जो आपल्याला दिसतो.... हुश्य... हे झाले आकाशातल्या क्षणभरच चमकणार्‍या विद्युल्लतेचे फार सोपे केलेले दीर्घ वर्णन. प्रत्यक्षात ही प्रक्रिया खूप गुंतागुंतीची आहे आणि अजूनही पूर्णपणे समजलेली नाही.

 

 

 

 
 

 



























No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...