Sunday, October 18, 2020

जुन्नर निसर्ग पर्यटन

 

विमान अपघात, निमगिरी डोंगर (दौनड्या डोंगर) जुन्नर ( ५१ वर्ष )

सह्याद्रीच्या उपपर्वत रांगे मध्ये दौनड्या डोंगर (निमगिरी डोंगर) माळशेज घाटाला लागून आहे. या डोंगराच्या एका बाजूला "तळमाची" गाव तर दुसऱ्या बाजूला "देवळे" गाव आहे.
हा डोंगर आजवर अनेक घटनेचा साक्षीदार राहिला आहे. यात काही चांगल्या तर काही वाईट घटनांचा समावेश आहे. अशीच एक वाईट घटना ५१ वर्षा पूर्वी या डोंगरावर घडली होती.

५१ वर्षा पूर्वी निमगिरी तळमाची येथील दौनड्या डोंगरावर जुलै ०७, १९६२ रोजी रात्री ११:५९ वाजता Alitalia Flight 771 (McDonnell Douglas DC-8-43) हे सिडनीचे विमान कोसळले होते. या विमानात ९४ प्रवाशी होते, ते Bangkok - Bombay या मार्गावरील होते. Navigation error आणि अजून इतर कारणांमुळे या विमानाचा अपघता झाला. या अपघाताची तीव्रता इतकी भयानक होती की या अपघाता मधून एकही प्रवाशी वाचू शकला नाही. विमाना स्पोट होऊन उसळलेल्या ज्वाळा दूरवरून दिसत होत्या. रात्रीची वेळ असल्या मुळे नक्की काय झाले आहे याचा स्थानिक लोकांला अंदाज न आल्यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले होते.
दौनड्या डोंगराचा ऊंच पण, सगळीकडे असलेले घनदाट जंगल आणि जाण्यास असलेला अवघड मार्ग या मुळे मदत कार्य मिळण्यास खूप अडथला आला.

आज त्या घटनेला ५१ वर्ष पूर्ण झाले आहे, परंतु तेथील नागरिकांच्या मनात त्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. तेथील स्थानिक वयस्कर नागरिक या घटनेची माहिती सांगताना जुन्या आठवणीत रमतात. स्थानिक वयस्कर नागरिकांच्या तोंडून या घटने बद्दल ऐकताना अंगावर काटा येतो.
अपघाता नंतर सर्व काही जळून गेले होते, तिथे पडलेला एक Gas सिलेंडर आणि विमानाचा पत्रा आजही तळमाची गावा मधील जि.प. शाळे मध्ये जपून ठेवला आहे.

स्थानिक आदिवासी लोकांनी या घटनेवर बोली भाषेत गाणी तयार केली होती, ती गाणी आजही स्थानिक लग्न समारंभात ऐकायला मिळतात.
आजही त्या आठवणी तश्याच आहेत, अंगावर काटा आणणाऱ्या, डोळ्यात पाणी आणणाऱ्या....

- प्रतिक साबळे (तुषार), तळमाची जुन्नर, पुणे.


Alitalia Flight was crashed into a Nimgiri hill On July 7, 1962

Alitalia Flight 771 was a multi-leg Douglas DC-8-43 international scheduled flight from Sydney via Darwin , Bangkok , Bombay , Karachi and Tehran to Rome with 94 on board. On July 7, 1962 18:40 UTC (July8, 1962, 00:10 local) it crashed into a hill about 84 km north-east of Bombay while on approach.

The accident was attributed to several potential causes, including a navigation error which led the pilot to believe that he was nearer to his destination than he actually was; failure to maintain the recommendedsafe altitude; and pilot unfamiliarity with the flight route. [ 1 ] This was the first time a flight recorder was used to solve an accident.

- Pratik Sabale (Tushar), Talmachi Junnar, Pune.

 

अंबा-अंबिका लेणीसमूह (Amba-Ambika Caves)



लेणी पाहायला फारसे कुणी येत नसल्याने गवत वाढल्याने वा सागाच्या पानगळीने ही वाट बुजून गेलेली असते. जंगल-झाडीतला हा अनुभव घेत अर्धा-एक तासात आपण अंबा-अंबिका लेणीगटापुढे पोचतो. एक मोठे पटांगण पुढय़ात असलेला कातळावरचा देखावा अचानक समोर येतो. विहार, चैत्यगृह, पाण्याची कुंडे अशी ही ३३ खोदकामे आहेत. बरीचशी जमिनीलगत ओळीने, तर काही कातळावरच्या भागात आहेत. ‘भीमाशंकर’च्या सतरा लेण्यांनंतर इथे १८ ते ३४ असे क्रमांक लेण्यांना दिले आहेत. पूर्वेकडून क्रमाने सुरुवातीची दालने साध्या खोल्या आहेत. त्यांच्यासमोर पाण्याची काही कुंडे खोदली आहेत. यातील काही जमिनीखाली दोन टप्प्यांत आहेत. २१ क्रमांकाच्या लेण्यात पाच खोल्या आहेत. आतले खोदकाम खडक ठिसूळ लागल्याने सोडून दिले आहे. लेणे अपूर्ण राहिले, पण बाहेर प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस एक खंडित शिलालेख या लेण्यामागील कुणा भावांच्या दानधर्माची माहिती मिळते.
यानंतर पुन्हा काही खोल्या वजा लेणी आणि पाण्याची कुंडे लागतात. त्याच्या डोक्यावरही एक मजला खोदला आहे. तिथे जाण्यासाठी बाहेरच्या बाजूने एक जिना आहे. पुरातत्व विभागाने जतन-संवर्धन कामांतर्गत हा जिना दुरुस्त केला. पण हे करताना सौंदर्यदृष्टी न ठेवल्याने लेण्यांच्या प्राचीन देखाव्यात नवे बांधकाम नजरेत खुपते.

वरच्या मजल्यावरील या सलग पाच खोल्यांच्या लेण्यास ३० क्रमांक दिला आहे. या खोल्यांसमोर पूर्वी गच्ची असावी. आज मात्र तिचा बराचसा भाग तुटला आहे. पहिल्या खोलीच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूस मूळ खोदकामात कोनाडे करत मागाहून दोन शिल्पे कोरली आहेत. डावीकडे जैनांचा क्षेत्रपाल, तर उजवीकडे जैन देवी चक्रेश्वरी! चौथ्या खोलीतही जैन शिल्पकाम दिसते. जैनांचे प्रथम र्तीथकर, बावीसावे र्तीथकर नेमिनाथ आणि जैन देवता अंबिकेची मूर्ती इथे आहे. यातील अंबिका आंब्याच्या झाडाखाली बसलेली दाखवली आहे. या देवीवरूनच या गटाला अंबा-अंबिका असे नाव मिळाले.
मूळ लेणे बौद्धकालीन. दोन हजार वर्षांपूर्वी खोदलेले! त्यात आठव्या-नवव्या शतकात ही जैन कला अवतरली आणि त्याहीनंतर केव्हातरी या देवांना हिंदूंनीही आपलेसे केले. कुठल्याही स्थापत्याविष्काराच्या भल्यामोठय़ा कालखंडात असे बदल स्वाभाविक असतात.
हा सारा इतिहास आहे. कुठल्याही धर्म-जाती-पंथाच्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहण्यापेक्षा देशाचा वारसा म्हणून पाहिले पाहिजे. या वास्तू राष्ट्रीय संपत्ती समजून त्यांचे जतन व्हायला हवे. पण अनेकदा या वारशामागील देश-राष्ट्र ही भावना नाहीशी होऊन फक्त धर्म-पंथ तेवढे उरतात. या स्थळांना देवत्व बहाल केले जाते आणि मग त्यातून खऱ्या इतिहासाला धोका निर्माण होतो. अंबा-अंबिका लेण्यातील शिल्पांनाही देवत्व बहाल झाल्याने त्यामागील राष्ट्रीय वारशाचा विसर पडून, या मूर्ती-शिल्पांवर हळद-कुंकवाचे थर जमा झाले आहेत. त्यातील अनेकांची झीज झाली आहे.
या दुमजली लेण्यांच्या पुढे या गटातील चैत्यगृह आहे. त्याच्या दारातील भारदस्त खांब इथे पाऊल ठेवल्यापासून खुणावत राहतात. बेडसे लेण्याची आठवण करून देणारे हे खांब! दोन पूर्ण, तर बाजूचे दोन अर्धव्यक्त! तब्बल पावणेसात मीटर उंचीचे! एका चौथऱ्यावर घट, त्यातून बाहेर आलेले हे अष्टकोनी खांब, त्यावर पुन्हा उपडा कलश! जणू या लेण्याचे सौष्ठवच या स्तंभांतून डोकावते. या खांबांच्या आत ओसरी, त्यानंतर चैत्यगवाक्षाची भिंत आणि त्यापुढे प्रत्यक्ष चैत्यगृह! पण आतील स्तूप कोरत असताना तो खडक ठिसूळ असल्याचे कलाकारांच्या लक्षात आले आणि त्यांनी काम थांबवले.

या चैत्यगृहात शिरण्यापूर्वी डाव्या हाताला एक छोटेसे लेणे दिसते. आत एक सुंदर स्तूप कोरलेला आहे. चैत्यगृहाच्या शेजारी हा स्तूप का बरे खोदला असावा, असा प्रश्न आत शिरताना पडतो. चैत्यगृहातील अर्धवट काम पाहिले की मग त्यामागचे उत्तर कळते. आतील ही उणीव भरून काढण्यासाठी बाहेर हा स्तूप कोरला असावा.
दुसरीकडे स्तूपाविना रिकाम्या चैत्यगृहाचाही इथे आगळा-वेगळा उपयोग करून घेतला आहे. त्याची दर्शनी भिंत, गवाक्ष कमान, खांब या साऱ्यांवर दहा मोठे ब्राह्मी लिपीतील लेख कोरले आहेत. त्यांतून ही लेणी, त्यात निवास करणारा संघ, त्याला झालेला दानधर्म आदींची विस्तृत माहिती देण्यात आली आहे. या सर्व लेखांचे वाचन झालेले आहे. पण आज मात्र यातले आठच लेख दिसतात. नष्ट झालेले लेख चैत्यगृहातील खांबांवर होते. फार वर्षांपूर्वी या खांबांच्या जतन-संवर्धन प्रक्रियेत त्यांना सिमेंटचा गिलावा चढवला गेला आणि त्यात हे लेख बुजले. नशीब, की हे कृत्य घडण्यापूर्वी ज्येष्ठ पुरातत्त्व अभ्यासक व ब्राह्मी लिपीच्या तज्ज्ञ डॉ. शोभना गोखले यांनी या लेखांचे वाचन नोंदवून ठेवले होते. इतिहासाच्या अभ्यासात अशा नोंदी किती महत्त्वाच्या ठरतात, याचे हे उदाहरण!
या शिलालेखांतून हा डोंगर, इथली लेणी व इथे राहणाऱ्या भिक्षूंच्या संघाविषयी बरीच माहिती मिळते. या डोंगराचे मूळ नाव ‘मानमुकुड’ (संस्कृत- ‘मानमुकुट’) या लेखावरूनच कळते. आज दोन हजार वर्षांनंतरही हे नाव ‘मानमोडी’ या अपभ्रंश रूपात वापरात आहे. या लेण्यास किंवा इथे निवास करणाऱ्या संघास ‘गिध विहार’ असेही म्हटले जाई, त्याचाही उल्लेख येतो. यातील काही लेखांतून जमिनीच्या दानधर्माचे उल्लेख आहेत. ही जमीन मोजण्यासाठी त्याकाळी ‘निवर्तन’ हे परिमाण वापरले जात असे. आता निवर्तन म्हणजे किती क्षेत्र, हे समजत नाही. या जमिनीवर काही वृक्षलागवडीचे उल्लेखही लेखांत आले आहेत..

‘गामे वलाहकेसुकर
जभति उदेसेण निवत
णानि बारस।। गामसे
उरकेसु निवनणानि’

हे शिलालेख करंज, आंबा, जांभूळ आदी वृक्षांच्या लागवडीबद्दल सांगतात. या वृक्षलागवडीमागेही काही उद्देश असल्याचा अभ्यासकांचा कयास आहे. करंज हा औषधी गुणधर्म असलेला वृक्ष! त्याच्या तेलाचा उपयोग तेव्हा ‘अॅकन्टिसेप्टिक’ म्हणून केला जाई. आंबा-जांभळाच्या लागवडीमागे व्यापारी उद्देश ठेवून इथे राहणारा संघ स्वयंपूर्ण होण्याच्या प्रयत्नात असावा. या जमिनीचे भाग, दिशा, गावांची नोंदही लेखात आहे. जमिनींशिवाय काही पैशांच्या स्वरूपातील देणग्याही यात नोंदवल्या आहेत. त्यांना ‘कार्षांपण’ असे म्हटले जाई. या देणग्या देणाऱ्यांमध्ये बांबूकार म्हणजे बुरूड, कास्यकार म्हणजे तांबट आणि सुवर्णकार म्हणजे सोनार असे विविध थरातील लोक आहेत. यातून या लेणीनिर्माणाला असलेला सामान्य जनतेचा पाठिंबाही दिसतो. तत्कालीन महाराष्ट्रात ही अन्यधर्मीय वास्तुकला कोरली, रुजली व बहरली त्यामागे या सहभागाची मोठी भूमिका आहे. सहिष्णू आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या या खऱ्याखुऱ्या पाऊलखुणा आहेत.

चैत्यगृहातील या ब्राह्मी शिलालेखांच्या मांदियाळीत एक फारसी लेखही आहे. महम्मद अली नावाच्या कुणा व्यक्तीने हिजरी ९८८ (इ. स. १५८०) या दिवशी या स्थळाला भेट दिल्याचा उल्लेख आहे. आपण एखाद्या स्थळी जाऊन आलो, हे स्वत:चे नाव तिथे लिहून ठेवण्याचे जे ‘फॅड’ हल्ली प्रचलित आहे, ते असे बरेच जुने आहे तर!
या चैत्यगृहानंतर ओळीने २७, २८ आणि २९ क्रमांकाच्या लेण्या (विहार) येतात. प्रत्येकी दोन खोल्यांचे हे विहार. पुढय़ात ओसरी. पण कालौघात तिचे खांब नष्ट झालेले. नाही म्हणायला तिसऱ्याच्या ओसरीतील या सालंकृत खांबांचे कलावशेष आणि भिंतीत एक भंगलेला स्मारक-स्तूप कसाबसा आपले अस्तित्व टिकवून आहे. पण या खोदकामापेक्षाही इथे लक्ष जाते ते त्यांच्या भिंतीवरील शिलालेखांकडे! त्यातही लेणे क्रमांक २७ वरचा लेख तर पाहण्यासारखाच! दोन्ही खोल्यांच्या मधोमध भिंतीवर एक घासून सपाट जागा केलेली आहे. या आडव्या पट्टीतच कुणा अज्ञात सुलेखनकाराने सुंदर अक्षरांत हा लेख कोरला आहे. सुरुवातीस स्वस्तिक, तर शेवटी श्रीवत्स ही शुभचिन्हे असलेला हा लेख असा-

‘भारुकछकानं लंकुडियानं भातूणं
अससमस पुताण
बुधमितस बुधरखितस च बिगभं देयधंमं’

अर्थ- भरुकच्छ म्हणजे आजच्या गुजरातमधील भडोच येथील अससमचे पुत्र बुधमित व बुधरखित या बंधूंनी या शैलगृहासाठी देणगी दिली आहे. हे दोघे लाकडाचे व्यापारी होते. भडोच हे तत्कालीन व्यापारी बंदर. तिथून निघालेले हे दोघे प्राचीन बाजारपेठ असलेल्या जुन्नरमध्ये आले आणि त्यांनी इथल्या लेण्यांसाठी हा दानधर्म केला आहे. म्हटले तर हा फक्त दानधर्माचा लेख; पण त्यातून तत्कालीन समाज, लोक, त्यांचे व्यवसाय, स्थळ, प्रवास, दळणवळण अशा कितीतरी गोष्टींची माहिती मिळते. म्हणूनच हे शिलालेख इतिहासाची साधने आहेत. एकूणात- लेणी काय किंवा कुठलीही ऐतिहासिक वास्तू काय, ते फक्त इतिहास सांगत नाहीत, तर त्यांच्या अभ्यासातून इतिहास, भूगोल, तत्कालीन समाज, लोक, भाषा, लिपी, चालीरीती, परंपरा अशा कितीतरी गोष्टी उलगडत जातात. शिलालेखांची ही परिभाषा हे न उलगडलेले जग दाखवतात.

शिवनेरी ( Shivneri )



शिवनेरी

किल्ल्याची उंची – 3500 फूट
श्रेणी - मध्यम
किल्ल्याचा प्रकार - गिरीदुर्ग
डोंगररांग - नाणेघाट
जिल्हा – पुणे

शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर गावाजवळ, पुण्यापासून अंदाजे १०५ किलोमीटरवर आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.[१]

शिवनेरी हे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे.

एस.टी स्टॅण्डच्या मागे शिवनेरी किल्ला दिसतो. येथून हा किल्ला चार किलोमीटर आहे.
या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे. शिवनेरी अगदी जुन्नर गावात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. किल्ला तसा फार मोठा नाही.

अंतरावर एका डोंगरमाथ्यावर हा किल्ला बांधलेला असून डोंगराच्या मध्यभागी जवळपास ५० बौद्ध लेणी कोरलेली आहेत. किल्ला आणि लेणी एकत्रित असलेला हा एकमेव डोंगर .

नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग. या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मिती करण्यात आली. सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर त्यांनी येथे अनेक ठिकाणी लेणी खोदवून घेतली.


कसे जाल ?

गडावर जाण्याचे दोन प्रमुख मार्ग जुन्नर गावातूनच जातात.

साखळीची वाट :
या वाटेने गडावर यायचे झाल्यास जुन्नर शहरात शिरल्यानंतर नव्या बसस्टॅंड समोरील रस्त्याने शिवपुतळ्यापाशी यावे.येथे चार रस्ते एकत्र मिळतात . डाव्या बाजूस जाणा-या रस्त्याने साधारणत: एक किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या कडेला एक मंदिरलागते. मंदिरासमोरून जाणारी मळलेली पायवाट थेट शिवनेरी किल्ल्याच्या एका कातळभिंतीपाशी घेऊन जाते.भिंतीला लावलेल्यासाखळीच्या साह्याने आणि कातळात खोदलेल्या पाय-यांच्या साह्याने वर पोहचता येते. ही वाट थोडी अवघड असून गडावर पोहचण्यास पाऊण तास लागतो.

सात दरवाज्यांची वाट :
शिवपुतळ्यापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत सुटल्यास डांबरी रस्ता आपणास गडाच्या पाय-यांपाशी घेऊनजातो. या वाटेने गडावर येतांना सात दरवाजे लागतात. पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा या मार्गे किल्ल्यावर पोहचण्यासाठी दीड तास लागतो.

इतिहास -
'जीर्णनगर', 'जुन्नेर' म्हणजेच जुन्नर हे शहर इसवीसनापूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. जुन्नर ही शकराजा नहपानाची राजधानी होती. इ. स 1170 ते 1308 च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले. आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. इ. स 1595 मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. जिजामाता गरोदर असताना जाधारावांनी 500 स्वार त्यांच्या सोबत देऊन त्यांना रातोरात शिवनेरीवर घेऊन गेले. "शिवनेरी गडावर श्रीभवानी सिवाई, तीस नवस जिजाऊने केला जे आपल्याला पुत्र झाला तर तुझें नांव ठेवीन. त्याऊपर शिवाजीराजे यांचा जन्म जाला शके 1556 क्षये नाम संवत्सरे वैशाख शुद्ध पंचमी चंद्रवार.' इ. स. 1632 मध्ये शिवरायांनी गड सोडला आणि 1637 मध्येमोगलांच्या ताब्यात गेला. 1650 मध्ये मोगलांविरूद्ध येथील कोळ्यांनी बंड केले. यात मोगलांचा विजय झाला. इ. स. 1673 मध्ये शिवरायांनी शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. इ. स. 1678 मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला मात्र अपयश पदरात पडले. पुढे 40 वर्षांनंतर 1716 मध्ये शाहुमहाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरीत करण्यात आला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे -


• शिवाई देवी मंदिर-

सात दरवाज्यांच्या वाटेने गडावर येतांना पाचवा म्हणजे शिपाई दरवाजा पार केल्यावर मुख्य वाट सोडून उजव्या बाजूने पुढे गेल्यावर ‘शिवाई देवीचे ‘ मंदिर लागते. मंदिराच्या मागे असणाऱ्या कड्यात ६ ते ७ गुहा आहेत. या गुहा मुक्कामासाठी अयोग्य आहेत. मंदिरात शिवाई देवीची मूर्ती आहे.

• अंबरखाना-

शेवटच्या दरवाज्यातून गडावर प्रवेश केल्यावर समोरच अंबरखाना आहे. आजमितीस या अंबरखान्याची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. मात्र पूर्वी या अंबरखान्याचा उपयोग धान्य साठविण्यासाठी केला जात असे. अंबरखान्यापासून दोन वाटा निघतात. एक वाट समोरच असणाऱ्या टेकाडावर जाते. या टेकाडावर एक कोळी चौथरा आणि एक इदगा आहे. दुसरी वाट शिवकुंजापाशी घेऊन जाते.

• पाण्याची टाकी-

वाटेत गंगा, जमुना व याशिवाय पाण्याची अनेक टाकी लागतात.

• शिवकुंज -

हे शिवनेरी किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचे स्मारक आहे. याची स्थापना व उद्‌घाटन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केले. जिजाबाईच्या पुढ्यात असलेला बालशिवाजी, हातातील छोटी तलवार फिरवीत आईला आपली भव्य स्वप्ने सांगत आहे, अशा आविर्भावातील मायलेकरांचा पुतळा ‘शिवकुंजा’मध्ये बसविला आहे. शिवकुंजासमोरच कमानी मशीद आहे आणि समोरच खाली पाण्याचे एक टाके आहे. येथून समोर चालत गेल्यास हमामखाना लागतो.

• कोळी चौथरा –

मुघलांची दहशत बसावी म्हणून नाईकाच्या रक्तसंबंधातले तान्ह्या बाळापासून तर वृद्धांपर्यंत तमाम लोक पकडून आणून कापले गेले आणि नाईकास निर्वंश केले. त्याचबरोबर सगळ्या दीड हजार बंदी केलेल्यांची शीरेदेखील कापली गेली. त्या शीरांच्या ढीगावरच एक चबुतरा बांधण्यात आला. हाच तो कोळी चौथरा जो आजही शिवनेरीवर पाहायला मिळतो.

• शिवजन्मस्थान इमारत-

शिवकुंजापासूनच पुढे शिवजन्मस्थानाची इमारत आहे. ही इमारत दुमजली असून खालच्या खोलीत जिथे शिवाजीचा जन्म झाला तेथे त्याचा एक पुतळा बसविण्यात आला आहे. इमारतीच्या समोरच ‘बदामी’नामक पाण्याचे टाके आहे.

• कडेलोट कडा-

येथून पुढे जाणारा रस्ता कडेलोट टोकावर घेऊन जातो. सुमारे दीड हजार फूट उंचीचा ह्या सरळसोट कड्याचा उपयोग हा गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी होत असे.

गड फिरण्यास 2 तास पुरतात.

वर किल्ल्यावरून चावंड, नाणेघाट आणि जीवधन तसेच समोर असणारा वडूज धरणाचा जलाशय लक्ष्य वेधून घेतो.

 

सौदागर घुमट किंवा हबशी मुंबज, जुन्नर

सतराव्या शतकातील निजामशहाच्या राजवटीत मुघलकालीन स्थापत्यशैलीचा अनोखा नजारा आहे. आफ्रिकेतील हाबासना प्रांतातून आलेल्या निजामशहाचा वजीर मलिकअंबर यांच्याशी संबंधीत ही वास्तू आहे. हबशीबाग सध्याचे हापूसबाग येथे त्यांचे वास्तव होते.
६० फूट लांब, ५५ फुट रुंदीची घडीव चौरसाकृती वास्तू लक्ष वेधून घेते.
५० फूट उंचीच्या भिंतीमधील नक्षीदार कमानींवर ३० फुट उंचीचे आकर्षक घुमट तोलून धरले आहे. आतील भिंतीवर कुराणातील आयते कोरले आहेत. मलिकअंबरशी संबंधीत कोण्या मोठ्या असामीचे हे स्मारक असण्याची शक्यता वर्तविली जाते. पुरातत्व विभागाने आता या वास्तूचे मजबुतीकरण केले आहे. 








अंबा-अंबिका लेणीसमूह १८ ते ३४ (Amba Ambika Caves Junnar)
लेणी पाहायला फारसे कुणी येत नसल्याने गवत वाढल्याने वा सागाच्या पानगळीने ही वाट बुजून गेलेली असते. जंगल-झाडीतला हा अनुभव घेत अर्धा-एक तासात आपण अंबा-अंबिका लेणीगटापुढे पोचतो. एक मोठे पटांगण पुढय़ात असलेला कातळावरचा देखावा अचानक समोर येतो. विहार, चैत्यगृह, पाण्याची कुंडे अशी ही ३३ खोदकामे आहेत. बरीचशी जमिनीलगत ओळीने, तर काही कातळावरच्या भागात आहेत. ‘भीमाशंकर’च्या सतरा लेण्यांनंतर इथे १८ ते ३४ असे क्रमांक लेण्यांना दिले आहेत. 

पूर्वेकडून क्रमाने सुरुवातीची दालने साध्या खोल्या आहेत. त्यांच्यासमोर पाण्याची काही कुंडे खोदली आहेत. यातील काही जमिनीखाली दोन टप्प्यांत आहेत. २१ क्रमांकाच्या लेण्यात पाच खोल्या आहेत.
डोक्यावरही एक मजला खोदला आहे. तिथे जाण्यासाठी बाहेरच्या बाजूने एक जिना आहे. पुरातत्व विभागाने जतन-संवर्धन कामांतर्गत हा जिना दुरुस्त केला. पण हे करताना सौंदर्यदृष्टी न ठेवल्याने लेण्यांच्या प्राचीन देखाव्यात नवे बांधकाम नजरेत खुपते.


दारातील भारदस्त खांब इथे पाऊल ठेवल्यापासून खुणावत राहतात. बेडसे लेण्याची आठवण करून देणारे हे खांब! दोन पूर्ण, तर बाजूचे दोन अर्धव्यक्त! तब्बल पावणेसात मीटर उंचीचे! एका चौथऱ्यावर घट, त्यातून बाहेर आलेले हे अष्टकोनी खांब, त्यावर पुन्हा उपडा कलश! जणू या लेण्याचे सौष्ठवच या स्तंभांतून डोकावते. या खांबांच्या आत ओसरी, त्यानंतर चैत्यगवाक्षाची भिंत आणि त्यापुढे प्रत्यक्ष चैत्यगृह!

.

पण आतील स्तूप कोरत असताना तो खडक ठिसूळ असल्याचे कलाकारांच्या लक्षात आले आणि त्यांनी काम थांबवले. या चैत्यगृहात शिरण्यापूर्वी डाव्या हाताला एक छोटेसे लेणे दिसते. आत एक सुंदर स्तूप कोरलेला आहे. चैत्यगृहाच्या शेजारी हा स्तूप का बरे खोदला असावा, असा प्रश्न आत शिरताना पडतो. चैत्यगृहातील अर्धवट काम पाहिले की मग त्यामागचे उत्तर कळते. आतील ही उणीव भरून काढण्यासाठी बाहेर हा स्तूप कोरला असावा.
  
 
वरच्या मजल्यावरील या सलग पाच खोल्यांच्या लेण्यास ३० क्रमांक दिला आहे. या खोल्यांसमोर पूर्वी गच्ची असावी. आज मात्र तिचा बराचसा भाग तुटला आहे. पहिल्या खोलीच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूस मूळ खोदकामात कोनाडे करत मागाहून दोन शिल्पे कोरली आहेत. डावीकडे जैनांचा क्षेत्रपाल, तर उजवीकडे जैन देवी चक्रेश्वरी! चौथ्या खोलीतही जैन शिल्पकाम दिसते. जैनांचे प्रथम र्तीथकर, बावीसावे र्तीथकर नेमिनाथ आणि जैन देवता अंबिकेची मूर्ती इथे आहे. यातील अंबिका आंब्याच्या झाडाखाली बसलेली दाखवली आहे. या देवीवरूनच या गटाला अंबा-अंबिका असे नाव मिळाले.
मूळ लेणे बौद्धकालीन. दोन हजार वर्षांपूर्वी खोदलेले! त्यात आठव्या-नवव्या शतकात ही जैन कला अवतरली आणि त्याहीनंतर केव्हातरी या देवांना हिंदूंनीही आपलेसे केले. कुठल्याही स्थापत्याविष्काराच्या भल्यामोठय़ा कालखंडात असे बदल स्वाभाविक असतात.
हा सारा इतिहास आहे. कुठल्याही धर्म-जाती-पंथाच्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहण्यापेक्षा देशाचा वारसा म्हणून पाहिले पाहिजे. या वास्तू राष्ट्रीय संपत्ती समजून त्यांचे जतन व्हायला हवे. पण अनेकदा या वारशामागील देश-राष्ट्र ही भावना नाहीशी होऊन फक्त धर्म-पंथ तेवढे उरतात.



या स्थळांना देवत्व बहाल केले जाते आणि मग त्यातून खऱ्या इतिहासाला धोका निर्माण होतो. अंबा-अंबिका लेण्यातील शिल्पांनाही देवत्व बहाल झाल्याने त्यामागील राष्ट्रीय वारशाचा विसर पडून, या मूर्ती-शिल्पांवर हळद-कुंकवाचे थर जमा झाले आहेत. त्यातील अनेकांची झीज झाली आहे.

दुसरीकडे स्तूपाविना रिकाम्या चैत्यगृहाचाही इथे आगळा-वेगळा उपयोग करून घेतला आहे. त्याची दर्शनी भिंत, गवाक्ष कमान, खांब या साऱ्यांवर दहा मोठे ब्राह्मी लिपीतील लेख कोरले आहेत. त्यांतून ही लेणी, त्यात निवास करणारा संघ, त्याला झालेला दानधर्म आदींची विस्तृत माहिती देण्यात आली आहे. या सर्व लेखांचे वाचन झालेले आहे. पण आज मात्र यातले आठच लेख दिसतात. नष्ट झालेले लेख चैत्यगृहातील खांबांवर होते. फार वर्षांपूर्वी या खांबांच्या जतन-संवर्धन प्रक्रियेत त्यांना सिमेंटचा गिलावा चढवला गेला आणि त्यात हे लेख बुजले. नशीब, की हे कृत्य घडण्यापूर्वी ज्येष्ठ पुरातत्त्व अभ्यासक व ब्राह्मी लिपीच्या तज्ज्ञ डॉ. शोभना गोखले यांनी या लेखांचे वाचन नोंदवून ठेवले होते. इतिहासाच्या अभ्यासात अशा नोंदी किती महत्त्वाच्या ठरतात, याचे हे उदाहरण!
या शिलालेखांतून हा डोंगर, इथली लेणी व इथे राहणाऱ्या भिक्षूंच्या संघाविषयी बरीच माहिती मिळते. या डोंगराचे मूळ नाव ‘मानमुकुड’ (संस्कृत- ‘मानमुकुट’) या लेखावरूनच कळते. आज दोन हजार वर्षांनंतरही हे नाव ‘मानमोडी’ या अपभ्रंश रूपात वापरात आहे. या लेण्यास किंवा इथे निवास करणाऱ्या संघास ‘गिध विहार’ असेही म्हटले जाई, त्याचाही उल्लेख येतो. यातील काही लेखांतून जमिनीच्या दानधर्माचे उल्लेख आहेत. ही जमीन मोजण्यासाठी त्याकाळी ‘निवर्तन’ हे परिमाण वापरले जात असे. आता निवर्तन म्हणजे किती क्षेत्र, हे समजत नाही. या जमिनीवर काही वृक्षलागवडीचे उल्लेखही लेखांत आले आहेत..

‘गामे वलाहकेसुकर
जभति उदेसेण निवत
णानि बारस।। गामसे
उरकेसु निवनणानि’

हे शिलालेख करंज, आंबा, जांभूळ आदी वृक्षांच्या लागवडीबद्दल सांगतात. या वृक्षलागवडीमागेही काही उद्देश असल्याचा अभ्यासकांचा कयास आहे. करंज हा औषधी गुणधर्म असलेला वृक्ष! त्याच्या तेलाचा उपयोग तेव्हा ‘अॅकन्टिसेप्टिक’ म्हणून केला जाई. आंबा-जांभळाच्या लागवडीमागे व्यापारी उद्देश ठेवून इथे राहणारा संघ स्वयंपूर्ण होण्याच्या प्रयत्नात असावा. या जमिनीचे भाग, दिशा, गावांची नोंदही लेखात आहे. जमिनींशिवाय काही पैशांच्या स्वरूपातील देणग्याही यात नोंदवल्या आहेत. त्यांना ‘कार्षांपण’ असे म्हटले जाई. या देणग्या देणाऱ्यांमध्ये बांबूकार म्हणजे बुरूड, कास्यकार म्हणजे तांबट आणि सुवर्णकार म्हणजे सोनार असे विविध थरातील लोक आहेत. यातून या लेणीनिर्माणाला असलेला सामान्य जनतेचा पाठिंबाही दिसतो. तत्कालीन महाराष्ट्रात ही अन्यधर्मीय वास्तुकला कोरली, रुजली व बहरली त्यामागे या सहभागाची मोठी भूमिका आहे. सहिष्णू आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या या खऱ्याखुऱ्या पाऊलखुणा आहेत.

चैत्यगृहातील या ब्राह्मी शिलालेखांच्या मांदियाळीत एक फारसी लेखही आहे. महम्मद अली नावाच्या कुणा व्यक्तीने हिजरी ९८८ (इ. स. १५८०) या दिवशी या स्थळाला भेट दिल्याचा उल्लेख आहे. आपण एखाद्या स्थळी जाऊन आलो, हे स्वत:चे नाव तिथे लिहून ठेवण्याचे जे ‘फॅड’ हल्ली प्रचलित आहे, ते असे बरेच जुने आहे तर!
या चैत्यगृहानंतर ओळीने २७, २८ आणि २९ क्रमांकाच्या लेण्या (विहार) येतात. प्रत्येकी दोन खोल्यांचे हे विहार. पुढय़ात ओसरी. पण कालौघात तिचे खांब नष्ट झालेले. नाही म्हणायला तिसऱ्याच्या ओसरीतील या सालंकृत खांबांचे कलावशेष आणि भिंतीत एक भंगलेला स्मारक-स्तूप कसाबसा आपले अस्तित्व टिकवून आहे. पण या खोदकामापेक्षाही इथे लक्ष जाते ते त्यांच्या भिंतीवरील शिलालेखांकडे! त्यातही लेणे क्रमांक २७ वरचा लेख तर पाहण्यासारखाच! दोन्ही खोल्यांच्या मधोमध भिंतीवर एक घासून सपाट जागा केलेली आहे. या आडव्या पट्टीतच कुणा अज्ञात सुलेखनकाराने सुंदर अक्षरांत हा लेख कोरला आहे. सुरुवातीस स्वस्तिक, तर शेवटी श्रीवत्स ही शुभचिन्हे असलेला हा लेख असा-

‘भारुकछकानं लंकुडियानं भातूणं
अससमस पुताण
बुधमितस बुधरखितस च बिगभं देयधंमं’

अर्थ- भरुकच्छ म्हणजे आजच्या गुजरातमधील भडोच येथील अससमचे पुत्र बुधमित व बुधरखित या बंधूंनी या शैलगृहासाठी देणगी दिली आहे. हे दोघे लाकडाचे व्यापारी होते. भडोच हे तत्कालीन व्यापारी बंदर. तिथून निघालेले हे दोघे प्राचीन बाजारपेठ असलेल्या जुन्नरमध्ये आले आणि त्यांनी इथल्या लेण्यांसाठी हा दानधर्म केला आहे. म्हटले तर हा फक्त दानधर्माचा लेख; पण त्यातून तत्कालीन समाज, लोक, त्यांचे व्यवसाय, स्थळ, प्रवास, दळणवळण अशा कितीतरी गोष्टींची माहिती मिळते. म्हणूनच हे शिलालेख इतिहासाची साधने आहेत. एकूणात- लेणी काय किंवा कुठलीही ऐतिहासिक वास्तू काय, ते फक्त इतिहास सांगत नाहीत, तर त्यांच्या अभ्यासातून इतिहास, भूगोल, तत्कालीन समाज, लोक, भाषा, लिपी, चालीरीती, परंपरा अशा कितीतरी गोष्टी उलगडत जातात. शिलालेखांची ही परिभाषा हे न उलगडलेले जग दाखवतात.
 


डाव्या बाजूने गौरव कांबळे , प्रतिक साबळे , उपेंद्र लोखंडे आणि विष्णू रोंगटे. (जुन्नर निसर्ग पर्यटन टीम) 






 जुन्नर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याचा एक तालुका आहे. जुन्‍नर शहर हे तालुक्याचे मुख्यालय आहे. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका म्हणून हा तालुका प्रसिद्ध आहे दंडकारण्य असलेला भूभाग जेव्हा नागरी वस्तीखाली येऊ लागला, तेव्हा महाराष्ट्र नावाचा प्रदेश भौगोलिक दृष्ट्या अस्तित्वात आला.

सातवाहन राजे हे महाराष्ट्राचे पहिले राजे. साधारण इसवी सनापूर्वी ५०० सालातल्या कालखंडात महाराष्ट्र समृद्धीच्या शिखरावर होता. प्रतिष्ठान [आताचे पैठण] ही सातवाहन राजांची राजधानी आणि जीर्णनगर [आताचे जुन्नर] ही उपराजधानी होती.

त्या काळी जगभरातील व्यापारी कल्याण बंदरावर आपला माल घेऊन उतरत असत. मग नाणे घाट मार्गे ते घाटमाथ्यावर येऊन जुन्नर मार्गे पैठणला व्यापार करत करत जात असत. तेव्हाचे कर आकारणीचे दगडी रांजण आजही नाणे घाटात आहेत. कल्याण-नाणे घाट-जुन्नर-नगर-पैठण हा महाराष्ट्रातील प्राचीन व्यापारी मार्ग होता. त्यामुळे या मार्गावरील जुन्नरची बाजारपेठ तेव्हापासूनच प्रसिद्ध होती..

हा व्यापार उदीम वाढत जावा, आपल्या प्रदेशाची अशीच भरभराट होत राहावी आणि नाणे घाट मार्गे जुन्नरच्या डोंगराळ भागातून येणाऱ्या या व्यापारीमार्गाचे संरक्षण व्हावे आणि लूटमारीपासून बचाव व्हावा म्हणून त्या त्या वेळच्या राजवटींमध्ये भैरवगड, जीवधन, चावंड, हडसर, निमगिरी, ढाकोबा, शिवनेरी, नारायणगड, शिंदोला, रांजण गड, कोंबडकिल्ला यासारख्या किल्ल्यांची निर्मिती झाली.

 टिकाऊ खडकाचा प्रदेश म्हणून भारतातील सर्वात जास्त गिरिदुर्ग जुन्नरमध्ये निर्माण झाले. देशविदेशातून येणारे व्यापारी त्यांची संस्कृती पण सोबत घेऊन यायचे. जुन्नरमध्ये डेक्कन कॉलेजचे विद्यार्थी उत्खनन करत असताना त्यांना ग्रीक लोकांची देवता "युरोस"ची मूर्ती सापडली. चिनी भांडी, जुनी नाणी, सोन्याच्या मोहरा, शिलालेख असे खूप काही या भागात सापडते. येणारे व्यापारी मुक्त हस्ताने दान करत असत.त्यामुळे जुन्नर परिसरात प्रत्येक धर्माची, धर्मपीठाची भरभराट झाली.

  भौगोलिक अनुकूलतेबरोबर राजाश्रय व लोकाश्रयही जुन्नर परिसराला मिळत गेला. आणि म्हणूनच लेण्याद्रीला बौद्ध लेणीसमूह निर्माण झाला, मानमोडी डोंगरात जैन देवी देवता अंबा अंबिकांच्या गुहा कोरल्या गेल्या. जुन्नर शहरात प्राचीन जैन मंदिर उभारले गेले.

  मध्ययुगीन काळात लेण्याद्रीच्या बौद्ध लेण्यांमध्ये गिरिजात्मक गणपतीची स्थापना झाली, पेशवे काळात जुन्‍नरजवळच्या ओझरच्या विघ्नहराचा जीर्णोद्धार झाला. जवळच्याच ओतूर येथे गुरु चैतन्य महाराजांनी वैष्णव पंथाचा ’रामकृष्ण हर” हा मंत्र संत तुकारामांना दिला. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या रेड्याला जुन्नर तालुक्यातल्या आळे गावी समाधी दिली, पिंपळगाव धरणाजवळ खुबी गावात खिरेश्वर या पांडव कालीन मंदिराची निर्मिती झाली, खिरेश्वराच्या उत्तरेला हरिश्चंद्रगडाची अभेद्य वास्तू उभी राहिली.

फेब्रुवारी १६३०मध्ये जुन्‍नरच्या शिवनेरी किल्ल्यावर शिवाजीमहाराजांचा जन्म झाला.

पेशवे कालीन महालक्ष्मी मंदिर उंब्रज येथे आहे.कोल्हापूर महालक्ष्मीचे ते उपपीठ मानले जाते

जुन्‍नरचा भूगोल व आधुनिक इतिहास

    जुन्नरला आधी जीर्ण नगर मग जुन्नेर आणि नंतर जुन्नर असे नाव बदलत गेले. जुन्नर शहरापर्यंतचा प्रदेश हा पश्चिमेकडून डोंगराळ आहे आणि पूर्वेकडील प्रदेश हा मैदानी भूभाग आहे. त्यामुळे इथल्या डोंगर कड्यात माळशेज घाट, नाणे घाट व दाऱ्या घाट आहेत.

अणे घाटातील नैसर्गिक पूल, बोरी गावात कुकडी नदीच्या पात्रात आढळणारी १४ लाख वर्ष जुनी गुंफा ही सारे जुन्नरचे भौगोलिक महत्त्वाची ठिकाणे.आहेत.

जुन्नरमध्ये माणिक डोह धरणाच्या पायथ्याला बिबट निवारा केंद्र उभारण्यात आले असून आजमितीला जवळपास ३० बिबटे वाघ त्या ठिकाणी उपचार घेत आहेत.

समुद्र सपाटीपासून २२६० फूट उंचीवर असणाऱ्या या जुन्नरच्या पठाराला वनरक्षक डॉ. अलेक्झांडर गिब्सन यांनी भारताचे आरोग्य केंद्र म्हटले आहे. इथल्या स्वच्छ आणि मोकळ्या हवेत श्वसनाचे आजार बरे होतात हे त्यांचे निरीक्षण होते. म्हणूनच ब्रिटिश काळात ते ब्रिटिशांना जुन्नरला जाऊन आराम करायचा सल्ला देत असत. त्यांनी जुन्नरमध्ये हिवरे बुद्रुक या ठिकणी १८३९ साली वनस्पती उद्यान उभारले होते.

१९९५साली जगातील सर्वात मोठी रेडिओ इलेक्ट्रॉनिक दुर्बीण जुन्नर तालुक्यात खोडद या गावी उभारण्यात आली. जवळच आर्वीचे उपग्रह भूकेंद्रही आहे.

जुन्‍नर तालुक्यातील शेती

आंबा, केळी या फळांचे मूळ ठिकाण परदेशात इंडो-बर्मा भागात आहे, त्याचे मूळ बीज तिथे सापडते. अगदी तेच मूळ बीज माळशेज घाटातसुद्धा सापडते.

भाजीपाला, फळफळावळ, दुध दुभते, तांदूळ, ज्वारी, द्राक्षे, डाळिंबे, ऊस आणि फुले अशी विविध प्रकारची शेती जुन्नरमध्ये केली जाते. मांडवी,पुष्पावती,काळू, कुकडी,आणि मिना या नद्यांचा याच तालुक्यात उगम होतो. जुन्‍नर हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त धरणे असलेला तालुका आहे. पिंपळगाव जोगा, माणिक डोह, येडगाव, चिल्हेवाडी-पाचघर, आणि वडज ही ५ धरणे जुन्नरमध्ये आहेत, संततधार पडणाऱ्या पावसापासून ते अवर्षणग्रस्त भागापर्यतचे भूभाग जुन्नर तालुक्यामध्ये आहेत. जुन्नरमध्ये असणारी खोडदची दुर्बीण, बिबट्या चे क्षेत्र व डोंगराळ भाग यामुळे जुन्नरला आरक्षित हरीत पट्टा म्हणून घोषित केले आहे. याचा फायदा असा झाला की जुन्नर मधली मोकळी हवा अशीच शुद्ध राहिली आहे. आणि राहण्यासाठी, फिरण्यासाठी, आरामासाठी आणि पर्यटनसाठी जुन्नर हे अतिशय उपयुक्त ठिकाण बनले आहे. तसेच जुन्नरमध्ये मिळणारी मटण भाकरी आणि मसाला वडी [मासवडी] प्रसिद्ध आहेत.

महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या “शेतकऱ्याचा आसूडमध्ये जुन्नर कोर्टाच्या निकालाचा उल्लेख आहे.

चित्रकार सुभाष अवचट, मुक्तांगण, कवी, लेखक, विचारवंत, अनिल अवचट, मराठी बाणा’वाले अशोक हांडे, नाटक-सिनेमात शिवाजीची भूमिका करणारे डॉ. अमोल कोल्हे, तमाशाची लोककला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणा्ऱ्या विठाबाई नारायणगावकर ही मंडळी मूळ जुन्‍नरचीच होत. दत्ता महाडिक, “टिंग्या” चित्रपटातून कीर्ती मिळवणारे मंगेश हाडवळे, मराठी मालिका क्षेत्रात स्वतचे स्थान निर्माण करणारी नम्रता आवटे ही जुन्‍नरची आणखी प्रसिद्ध माणसे. शेखर शेटे यांचाही जन्म याच जुन्नरला झाला.

पर्यटन


क] निसर्गाने नटलेले आठ किल्ले :

किल्ले चावंड (चावंड गाव)

किल्ले जीवधन (घाटघर)

किल्ले नारायणगड (नारायणगाव, खोडद)

किल्ले निमगिरीव हनुमंतगड (निमगिरी गाव)

किल्ले शिवनेरी (जुन्नर)

किल्ले सिंदोळा (मढ, पारगाव)

किल्ले हडसर (हडसर गाव)

किल्ले ढाकोबा (आंबोली/ ढाकोबा)

किल्ले हरिचंद्रगड (खिरेश्वर)


ख] लेणी समूह :

भारतात जुन्नर तालुका हा भारतातील एकमेव असा तालुका आहे की जेथे सर्वाधिक ३६० लेणी आहेत. त्यांमधे हिंदू, बौद्ध, जैन लेण्यांचा समावेश आहे. लेण्यांची यादी :-

अंबा-अंबिका लेणी (खोरे वस्ती-जुन्नर)

खिरेश्वर लेणी समूह (खिरेश्वर)

चावंड लेणी (चावंड गाव)

जीवधन लेणी समूह (घाटघर)

तुळजा भवानी लेणी (पाडळी)

नाणेघाट लेणी (घाटघर)

निमगिरी लेणी (निमगिरी गाव)

भूत लेणी (जुन्नर)

लेण्याद्री विनायक लेणी (लेण्याद्री)

शिवाई लेणी (शिवनेरी किल्ला-जुन्नर)

सुलेमान लेणी (लेण्याद्री)

हडसर लेणी (हडसर गाव)


ग] प्रसिद्ध मंदिरे :

अष्टविनायक मंदिर:

गिरिजात्मक (लेण्याद्री)

विघ्नेश्वर (ओझर)


ग़-२ ] हेमाडपंथी बांधणीतील प्राचीन मंदिरे :

कुकडेश्वर मंदिर (कुकडेश्वर)

नागेश्वर मंदिर (खिरेश्वर)

अर्धपीठ काशी ब्रम्हनाथ मंदिर(पारुंडे)

हरिश्चंद्रेश्वर मंदिर (हरिश्चंद्रगड)


ग-३] अन्य प्राचीन मंदिरे :

उत्तरेश्वर मंदिर (जुन्नर)

कपर्दिकेश्वर मंदिर (ओतूर)

खंडोबा मंदिर (धामनखेल)

खंडोबा मंदिर (नळावणे)

खंडोबा मंदिर (वडज)

गुप्त विठोबा-प्रतिपंढरपूर मंदिर (बांगरवाडी)

जगदंबा माता मंदिर (खोडद)

दुर्गादेवी मंदिर (दुर्गावाडी)

पंचलिंगेश्वर मंदिर(जुन्नर)

पातालेश्वर मंदिर (जुन्नर)

महालक्ष्मी मंदिर (उंब्रज)

रेणुका माता मंदिर (निमदरी)

वरसूबाई माता मंदिर (सुकाळवेढे)

शनी मंदिर-प्रतिशिंगणापूर (हिवरे-बुद्रुक)

हाटकेश्वर मंदिर (हाटकेश्वर डोंगर)


ग-४] संत समाधिमंदिरे :

संत जगदगुरू तुकाराम महाराजांचे गुरू - केशव तथा बाबाजी चैतन्य महाराज यांची समाधी (ओतूर)

संत मनाजीबाबा पवार(निमगावसावा)

संत रंगदासस्वामी समाधी (अणे)

संत ज्ञानेश्वर वेद प्रणीत रेड्याची समाधी (आळे)


घ] निसर्गरम्य घाट :

अणे घाट

इंगळून घाट

कोपरे-मांडवे घाट

दार्या घाट

नाणेघाट-पुरातन व्यापारी मार्ग

माळशेज घाट

म्हसवंडी घाट

लागाचा घाट

हिवरे-मिन्हेरे घाट


च] प्रसिद्घ धबधबे :

1)आंबोली 2)नाणेघाट 3)माळशेज घाट 4)इंगळुज 5)हातवित 6)दुर्गादेवी 7)मुंजाबा डोंगर(धुरनळी) 


छ] नद्या व उगम :

1)मांडवी नदी-उगम-फोपसंडी(अ.नगर) 2)पुष्पावती नदी-उगम-हरिचंद्रगड 3)काळू नदी-उगम-हरिचंद्रगड 4)कुकडी नदी-उगम-कुकडेश्वर 5)मीना नदी-उगम-आंबोली 


ज] धरणे :


1)चिल्हेवाडी धरण-मांडवी नदी 2)पिंपळगाव जोगा धरण-पुष्पावती नदी 3)माणिकडोह धरण- कुकडी नदी 4)येडगाव धरण-कुकडी नदी 5)वडज धरण-मीना नदी 


झ] खिंडी :


1)गणेश खिंड 2)मढ खिंड 3)आळे खिंड 4)टोलार खिंड 


ट] उंच शिखरे :


1) हरिचंद्रगड(1424 मीटर) पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर 2) जीवधन 


ठ] पठारे :


1)अंबे-हातवित पठार 2)नळावणे पठार 3)कोपरे-मांडवे पठार 4)आणे पठार 


ड] गिर्यारोहकांना आव्हान देनारे उंच कोकणकडे :


1) नाणेघाट 2) माळशेजघाट 3) दार्याघाट 4) ढाकोबा 5) दुर्गादेवी 6) हरिचंद्रगड 


ढ] नैसर्गिक पुल


1) आणे घाटातिल नैसर्गिक पुल 2) हटकेश्वर डोंगरावरील नैसर्गिक पुल 


ण] प्रसिद्ध विहीर:


1) बाराव बावडी-जुन्नर 2) पुंदल बावडी-जुन्नर 3) आमडेकर विहीर-पाडळी 


त] ऐतिहासीक वास्तु


1) सैदागर हाबणी घुमट-हापुसबाग 2) 300 वर्षे जुनी मलिकांबर बाराबावडी पाणीपुरवठा योजना-जुन्नर शहर 3) नवाब गढी-बेल्हे 4)गिब्सन निवास व समाधी 


थ] जुन्नर तालुक्यातील दगड घंटेसारखे वाजतात.


1)आंबे गावच्या पश्चिमेस 200 मीटरवर 2)दुर्गादेवी किल्ले टॉप वर 


द] रांजणखळगे :


1) माणिकडोह गाव-कुकडी नदी 2) निघोज-कुकडी नदी 


ध] दहा लाख वर्षांपुर्वीची ज्वालामुखीय राख


डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व संशोधन विभागाने केलेल्या उत्खननात बोरी बुद्रुक व खुर्द या गावांत कुकडी नदीच्या किनाऱ्यावर इंडोनेशियामध्ये 10 लाख वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीच्या राखेचे साठे आढळून आले आहेत. याच ठिकाणी झालेल्या अन्य उत्खननांमध्ये अश्मयुनिक हत्यारे, हस्तीदंत आदी महत्वपूर्ण पुरातत्वावशेष सापडले आहेत. डेक्कन कॉलेज व बोरी ग्रामपंचायत या सर्व पुरातत्विय ठेव्याचे संरक्षण व संग्रहालय करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 


न] जागतिक केंद्रे:


1)जागतिक महादुर्बिन-खोडद 2)विक्रम दळणवळण उपग्रह केंद्र-आर्वी 


प] कारखाने:


1)कागद कारखाने-जुन्नर 2)विघ्नहर साखर कारखाना-ओझर 3)नवर्निमीत कारखाने-जुन्नर तालुका 


फ] आशियातील पहिली वायनरी-चाटो इंडेज-चौदानंबर


(पुणे-नाशिक हायवे)श्री.शामराव चौघुले 


ब] बिबट्या निवारण केंद्र:


1) माणिकडोह 


भ] 350 वर्षे परंपरा / इतिहास असलेले आठवडे बाजार


1) सोमवार-बेल्हा 2) गुरूवार-ओतुर 3) शनिवार-मढ 4) शनिवार-नारयणगाव 5) रविवार-जुन्नर 


म] खाद्य संस्कृती:


1) आण्याची आमटी-भाकरी 2) राजुरचा पेढा 3) नारायणगावचा कढीवडा, मिसळ 4) जुन्नरची मासवडी, मटकीभेळ 


य] तमाशा पंढरी:नारायणगाव(जुन्नर तालुका)


तमाशा केंद्र म्हणुन नारायणगाव मान मिळाला. 1) भाऊ बापू मांग नारायणगावकर 2) सौ.विठाबाई नारायणगावकर(राष्ट्रपती पारीतोषीत) 3) दत्ता महाडीक पुणेकर - मंगरुळ पारगाव / बेल्हा 4) मंगला बनसोडे - नारायनगाव 5) मालती इनामदार - नारायऩगाव 6) पाडुरंग मुळे मांजरवाडीकर- मांजरवाडी/नारायणगाव 7) दत्तोबा तांबे शिरोलीकर - बोरी शिरोली 8) दगडू पारगावकर - पारगाव तर्फे आळे 



र] पुणे जिल्हातील प्रथम सिनेमागृह:


1)शिवाजी थिएटर-जुन्नर 2)आर्यन थिएटर-पुणे 


ल] कलाकार / लेखक:


1) अशोक हांडे - उंब्रज 2) डॉ. अमोल कोल्हे- नारायनगाव 3) नम्रता आवटे/संभेराव 4) शरद जोयेकर-राजुरी 5) मंगेश हाडवळे-राजुरी 6) सुभाष अवचट-ओतुर 7) अनिल अवचट-ओतुर 8) राजन खान-ओतुर 9) दत्ता पाडेकर-आळे 10) शुभांगी लाटकर-राजुरी 11) अंकुश चौधरी-खोडद 12) संजय ढेरंगे - पारगाव तर्फे आळे 13) मनोज हाडवळे - राजुरी 14) लहु गायकवाड - नारायणगाव 15) सुरेश काळे - मंगरुळ 


जुन्नरचे ऐतिहासिक, भौगोलिक, नैसर्गिक, धार्मिक, जीवन शैली, खानपान लोकांना कळावे म्हणून येथील “जुन्नर पर्यटन विकास संस्था” कार्यरत आहे. जुन्नरमधील संस्कृती जतनाचे, किल्ले संवर्धनाचे काम “शिवाजी ट्रेल” च्या माध्यमातून सुरू आहे. हचिको टूरिझम ही संस्था तेच काम करत आहे. पराशर कृषी पर्यटन हा त्याचाच एक भाग आहे. "निसर्गरम्य जुन्नर तालुका" या फेसबुक पेजच्या माध्यमातून जुन्नर तालुक्याचा इतिहास व निसर्ग सौंदर्याचे आपण दर्शन घेऊ शकता. जुन्नर तालुक्यातील विविध पर्यटन ठिकाणे कोठे व कोणती आहे याबाबत सविस्तर माहिती पेजवर मांडण्यात आली आहे.


तात्कालिन आमदार शरद सोनवणे यांच्या प्रयत्नातून २१ मार्च २०१८ रोजी महाराष्ट्र शासनाने जुन्नर तालुक्याला महाराष्ट्रातील पहिला "पर्यटन तालुका" घोषित केले.,,,,,,.,.,,सदैव आपला  विलास डावखर आळेफाटा ....👍🏻

 

आयुका वेधशाळा - गिरवली

आयुकाचे श्री चैतन्य राजर्षी आणि श्री उमेश वाघेला यांच्यासोबत या शनिवारी गिरवली गावाजवळ असलेल्या आयुकाच्या वेधशाळेला भेट देण्याची संधी मिळाली.

आयुकाचा टेलीस्कोप बघणे हे या भेटीचे मुख्य आकर्षण होते.

रिफ्लेक्टींग प्रकारच्या या टेलीस्कोपच्या आरशाचा व्यास २ मीटर आहे. आरशाच्या व्यासाच्या आकारावरून, कावलूर टेलीस्कोप (२.६ मीटर) आणि लडाख मधील एका टेलीस्कोपनंतर याचा नंबर लागतो. भारतातील तीन नंबरचा टेलीस्कोप.

टेलीस्कोप टेक्नॉलॉजीज लिमीटेड (लिव्हरपूल, UK) या कंपनीने हा टेलीस्कोप तयार केला व २००६ मध्ये आयुकाला हस्तांतरीत केला. या टेलीस्कोपसाठी अंदाजे २५ कोटी रूपये खर्च आला.

गिरवली गावाजवळील डोंगर निवडण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पुण्यापासून जवळ असल्याने सर्व प्रकारच्या दळणवळाच्या साधनांची सहज उपलब्धता. आयुका पुणे केंद्राच्या शास्त्रज्ञांना सोयीचे असणारे ठिकाण आणि सर्वात महत्वाचे कारण म्हणजे समुद्रसपाटीपासून जसजसे उंचावर जावे तसे वातावरणातील अडथळे कमी होत जातात व ग्रह तार्‍यांची आणखी स्पष्ट प्रतिमा मिळते. ही वेधशाळा समुद्रसपाटीपासून १००० मीटर उंचावर आहे.

भीमाशंकरला निवांत भेट देवून सर्वजण दुपारी गिरवलीच्या डोंगरावर दाखल झालो.

टुमदार गिरवली गावापासून वेधशाळा सहा किमी दूर आहे.

.

पूर्वीपासून गिरवलीच्या डोंगरावर एक BSNL चा टॉवर आहे.. पूर्वी तेथपर्यंत रस्ता होता. वेधशाळा त्याच्याही वरच्या बाजूला आहे. वेधशाळेचा रस्ता हा एक प्रचंड मोठा कातळ फोडून केला आहे.

.

.

वेधशाळेचे आवार सुनियोजीत व आवश्यक त्या सर्व सोयींनी सुसज्ज आहे. सिक्युरीटी हाऊस, जनरेटर्स, गेस्ट हाऊस आणि टेलीस्कोप बिल्डींग विस्तीर्ण आवारात वसवले आहेत.

आत गेल्यानंतर या टेलीस्कोपची थोडक्यात माहिती, आयुकाची पार्श्वभूमी, टेलीस्कोपसाठी गिरवली गावाची निवड का केली अशी माहिती दिली गेली व सर्वांनी टेलीस्कोप बिल्डींगमध्ये प्रवेश केला.

टेलीस्कोप बिल्डींग

.

टेलीस्कोप डोम

.

तळमजल्यावर कंट्रोल रूम आहे, एका प्रेझेंटेशनच्या सहाय्याने आणखी विस्तृत माहिती दिली गेली.

वेगवेगळ्या ठिकाणी डिस्प्ले केलेले जुने फोटो व कात्रणे नक्की काय काय व कसे कसे घडत गेले ते सांगत होतेच!

कंट्रोल रूममध्ये टेलीस्कोपमधून दिसणार्‍या फोटोची एक झलकही दाखवण्यात आली.

.

वरच्या मजल्यावर टेलीस्कोप आणि डोम आहे.

टेलीस्क्प २२ अंश ते ९० अंशात व उभा फिरतो आणि स्वत: भोवती ३६० अंशात फिरतो त्यामुळे या मोजमापांमध्ये दिसणार्‍या सर्व ग्रहतार्‍यांचा अभ्यास करता येतो. एखादा ग्रह २२ अंशापेक्षा खाली असेल तर तो वर येण्याची वाट पहावी लागते.

या फोटोमध्ये छताला दिसणारा प्रकाशमान भाग म्हणजे आकाश आहे. डोमच्या वरून व एका बाजूने डोममध्ये असणारी स्लिट बाजूला होते व टेलीस्कोप आकाश पाहू शकतो.
वरच्या डोमच्या फोटोमध्ये जो उजवीकडे बाहेर आलेला उलटा L चा आकार दिसतो आहे तीच ही स्लिट

.

तसेच या फोटोमध्ये एक सलग पिवळी आडवी पट्टी दिसत आहे.. त्याच्या वरचा डोम ३६० अंशात फिरतो व टेलीस्कोपला हव्या त्या दिशेचे आकाश दिसते.

संपूर्ण डोम व टेलीस्कोप यांच्यामध्ये अत्यंत कमी अंतर होते त्यामुळे एका फोटोमध्ये टेलीस्कोप कव्हर करता आला नाही.

.

.

.

.

.

टेलीस्कोप बिल्डींगवरून दिसणारे सूर्यास्ताचे विहंगम दृष्य पाहिले.

.

दिवसभरात भीमाशंकर भेट झाली होती. सुदैवाने एका शेकरूने बराचवेळ दर्शन दिले होते आणि अनेक दिवसांपासून ठरवलेल्या टेलीस्कोपचीही व्यवस्थीत माहिती मिळाली होती. :)

******************
१) मी या ठिकाणी एक पर्यटक म्हणून भेट दिली होती. वरील तपशीलांमध्ये काही चुकीचे असल्यास अवश्य प्रतिसादावे.
२) मला खगोलशास्त्र व टेलीस्कोपची फारशी माहिती नाहीये. टेक्नीकल तर नाहीच नाही. मात्र आपल्या काही शंका असल्या तर त्याची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न जरूर करेन
३) येथे दिलेली माहिती कमी / त्रोटक आहे याची कल्पना आहे. आलेल्या शंकांमधून व श्री चैतन्य यांच्याकडून मिळालेल्या उत्तरातून माहितीची भर पडेल असा विश्वास आहे.
४) श्री चैतन्य राजर्षी आणि उमेश वाघेला यांचे विशेष आभार!

 जाण्याची वेळ, ग्रुपच्या संख्येचे वगैरे काही बंधन आहे का? तिकीट आहे का?

नाही.

आधी परवानगी घ्यावी लागते का? प्रेझेंटेशन सगळ्यांना देतात का?

हो.

आणि महत्वाचे आपल्याला दुर्बिणीतुन बघायला देतात का?

या टेलीस्कोपच्या प्रकारामध्ये इमेजेस सिस्टीमवर घेवून त्याचे अ‍ॅनालिसीस करतात. त्यामुळे प्रत्यक्षात मायक्रोस्कोप सारखा आयपीस बहुदा नसावा. जर असलाच तर आपण त्याची चौकशी करूया.

सरकारी आहे. GMRT मधे जायलाही नाही. GMRT ला जाण्यासाठी आधी परवानगी काढावी लागते, पण तिथे काम करणारे कोणी ओळखीचे असतील तर त्याचीही गरज नाही. दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी स्वतःचं वाहन असलेलं बरं. गिरवलीला, टेकडीवर एस्टी जात नाही. GMRT च्या दारातून एस्टी जाते.

या दुर्बिणीतून बघायला काय मिळेल, हे कधी जाताय त्यावर अवलंबून आहे. रात्री गेलात तर गिरवलीच्या दुर्बिणीतून काही दिसेल. संशोधक किंवा विद्यार्थी डोळ्यांनी काही बघत नाहीत, त्यामुळे तशी सोय आहे का नाही हे पहावं लागेल. दुर्बिणीच्या मागे CCD कॅमेरा लावणं तसं जिकीरीचं असतं. त्यामुळे कदाचित डोळ्यांनी संगणकावरच्या प्रतिमाच बघाव्या लागतील. तशाही प्रोसेस केलेल्या प्रतिमा जास्त चांगल्या (माझं मत) आणि उपयुक्त दिसतात.

बाकी काही प्रश्न असतील तर प्रतिसाद देऊन ठेवा. माझ्या सवडीने उत्तरं किंवा लेख लिहेन.


जायंट मीटरवेव्ह रेडीओ टेलिस्कोप

वाचायला सुरूवात करण्यापूर्वी: या लेखातली भाषा बोजड असू शकते आणि विज्ञानाची आवड नसणाय्रांसाठी हा लेखच कंटाळवाणा असेल. तर या प्रमादांबद्दल आधीच क्षमा मागते.

पुणे-नाशिक रस्त्यावर कधी गेला असाल तर जुन्नर किंवा नारायणगावच्या जवळ मोठमोठाल्या डिश अँटेना दिसतात. बय्राचदा त्या आर्वीच्या सैनिकी किंवा व्ही.एस.एन.एल.च्या संपर्क दुर्बिणी असतात पण कधीमधी आमच्या संशोधनाच्या दुर्बिणीही दिसतात. तर या दुर्बिणी दिसतात आपल्या डीश अँटेनासारख्याच (आणि त्यांचं कामही साधारण सारखंच असतं). या एकूण मिळून ३० दुर्बिणी आहेत; एकत्रितपणे त्या दुर्बिणीचं नाव आहे जायंट मीटरवेव्ह रेडीओ टेलिस्कोप, जी.एम.आर.टी.! साधारणतः दुर्बिणी/टेलिस्कोप म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो दृश्य किरण दाखवणारी दुर्बिणी, आपण त्याला डोळा लावून पहायचं; चंद्रावरचे खड्डे, शनीची कडी, गुरूचे उपग्रह, (योग्य काळजी घेऊन पाहिलं तर) सूर्यावरचे डागही, एका गुच्छाच्या जागी ताय्रांचे समूहही दिसतात. पण या दुर्बिणी जरा वेगळ्या असतात.

आपल्याला डोळ्याला जी किरणं दिसतात, एक्स-रे साठी जे किरण वापरतात, टी.व्ही च्या अँटेना जे किरण शोषून घेतात किंवा मायक्रोवेव्हमधे जी ऊर्जा असते ते सगळी भावंडं म्हणायला हरकत नाही. त्यांची ऊर्जा कमी-जास्त केली की हे वेगवेगळे किरण मिळतात. आपल्या सूर्याच्या आणि इतर ताय्रांच्या पोटात जी ऊर्जा तयार होते ती असते गामा किरणांच्या रूपात, सर्वात शक्तीशाली! मग वाटेत हायड्रोजनच्या अणूंवर आपटून त्यांचे होतात एक्स-रे, आणि या उतरत्या भाजणीने जेव्हा हे किरण सूर्याचा पृष्ठभाग सोडतात तेव्हा बनतात दृश्य किरण. पृथ्वीवर आपटून परत जातात तेव्हा त्यांचे बनतात अवरक्त (इन्फ्रारेड) किरण! तर या प्रारणांच्या समूहातला सगळ्यात अशक्त सदस्य आहे रेडीओ लहरी. यांच्या उर्जेमधे खूप विविधता आढळते, रेडीओचे वेगळे, टी.व्ही. चे वेगळे, पेजरसाठी वेगळे, कृत्रिम उपग्रहासाठी वेगळे आणि खगोलसंशोधनासाठीही वेगळे ... आणि यातही आरक्षण असतं. खगोलसंशोधनासाठी जो भाग ठेवला आहे तो इतर कोणालाही वापरता येत नाही आणि संशोधकांना उपग्रहांचा मागोवा घेता येत नाही इत्यादी.

दृश्य दुर्बिणींपेक्षा काही बाबतीत या दुर्बिणी काही प्रकारांनी वेगळ्या असतात. दोन योग्य आरसे घेऊन आणि एक फिल्मवाला किंवा डिजीटल कॅमेरा घेऊन तुम्हाला आकाशाचे फोटो काढता येतील, पण या रेडीओ दुर्बिणी वापरायच्या तर कॅमेय्राच्या जागी किचकट इलेक्ट्रॉनिक्सची गरज पडते. शिवाय खूप मोठी दुर्बिणी वापरली तर दृश्य दुर्बिणीशी तुल्यबळ माहिती मिळते. आता इलेक्ट्रॉनिक्सला पर्याय नाही, पण ते काही फार महाग किंवा अगम्यही नाही. पण आकाराचं काय? तर यासाठी उपाय असा आहे की छोट्या-छोट्या बय्राच दुर्बिणी बांधायच्या आणि पुन्हा जास्तीचं इलेक्ट्रॉनिक्स वापरून माहिती एकत्र करायची. याच कल्पनेचा आणि तंत्राचा वापर करून जी.एम.आर.टी. मधे ४५ मीटर व्यासाच्या ३० दुर्बिणी वापरल्या आहेत. दोन दुर्बिणींमधलं जास्तीत जास्त अंतर ३० किमी आहे. त्यामुळे एक सलग ३० किमी व्यासाची दुर्बिण बांधली असता जेवढं रेझोल्यूशन मिळेल तेवढं मिळतं; अर्थात यासाठी किंमत मोजावी लागते ती वेळाची! सलग पृष्ठभाग असता तर जर १ मिनटात एखाद्या वस्तूबद्दल पुरेशी माहिती मिळाली असती पण आता त्यासाठी त्याच्या कितीतरी पट जास्त वेळ लागतो.

ज्यांनी कोणी या दुर्बिणी नीट पाहिल्या असतील तर लक्षात आलं असेल तर त्यांना एक सलग पृष्ठभाग नाही आहे. या दुर्बिणी पॅराबोलिक आकाराचं तारांचं जाळं आहेत. या जाळ्यांमुळे एक सलग पृष्ठभाग बनवण्यापेक्षा खूप कमी खर्च आला, वजन कमी झाल्यामुळे त्यासाठी लागणारे "पाय" हलके आणि स्वस्त झाले आणि कमी पॉवरच्या मोटर्स वापरून या दुर्बिणी हलवता येतात. या रचनेचं पेटंट आहे, या संपूर्ण दुर्बिणीचे जनक डॉ. गोविंद स्वरूप यांचे! डॉ. स्वरूप यांच्याविषयी सामान्यतः खगोलशास्त्रज्ञ सोडून फारसं कोणाला माहित नाही. (दुर्दैवाने, त्यांच्याबद्दल लिहिणारा विसोबा खेचर अजून त्यांना भेटलेला नाही असं दिसतंय. स्वतः कामात व्य्रग्र असल्यामुळे त्यांना कधी लोकांसमोर जायला वेळच नसतो.) या दुर्बिणीबद्दल आपल्या सर्वांना अभिमान वाटण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे फक्त या डिश अँटेनाच नाही तर संपूर्ण इलेकक्ट्रॉनिक्सही भारतात, भारतीय अभियंत्यांनीच तयार केले आहे. आणि याच्याच अनुभवातून अरेसिबो या पोर्टो रिको मधल्या रेडिओ दुर्बिणीचं इलेकक्ट्रॉनिक्स थोड्या प्रमाणात बदललं गेलं.

तर या रेडिओ दुर्बिणी वापरून काय काय पाहिलं जातं? सर्वसाधारणपणे (प्लँकच्या नियमानुसार) ज्या वस्तू दृष्य लहरी प्रक्षेपित करतात त्या वस्तू रेडिओ लहरीही प्रक्षेपित करतात; अगदी आपल्या घरातल्या साध्या बल्बपासून ते दीर्घिकांपर्यंत. काही वस्तू दृष्य प्रकाशात जास्त तेजस्वी असतात तर काही रेडिओ लहरींमधे; ते त्यांच्या तापमानावरून (आणि इतर काही गोष्टींवरून) ठरतं. रेडीओ लहरींचा जो प्रचंड मोठा स्पेक्ट्रम आहे त्यात आपण ज्या लहरी पहात आहोत त्यावरून ठरतं आपल्याला कोणत्या गोष्टींचा अभ्यास करता येईल ते! प्रत्यक्ष आयुष्यात मात्र ज्या अवकाशस्थ वस्तूंचा अभ्यास करायचा आहे त्यांच्याबद्दलच्या उपलब्ध माहितीमधून ठरवलं जातं रेडीओ दुर्बिणी कोणत्या तरंगलांबीला (किंवा ऊर्जेसाठी) सगळ्यात चांगले निकाल देईल. जी.एम.आर.टी. मुख्यतः कमी ऊर्जेच्या लहरींसाठी बनवली आहे. लहरींचे गुणधर्म ठरतात ते त्यांच्या ऊर्जेवरून. आणि त्यावरूनच त्यांची तरंगलांबी (वेव्हलेंग्थ) आणि वारंवारता (फ्रिक्वन्सी) ठरते. जी.एम.आर.टी. मधे ५० मेगाहर्टझ ते १४२० मेगाहर्टझ (हे वारंवारतेचं (फ्रिक्वन्सी) मापक (युनिट) आहे.) या स्पेक्ट्रममधल्या लहरींचा अभ्यास होतो.

आपल्या विश्वात अदमासे ७५% हायड्रोजन आहे आणि २४% हेलियम. साधारण १% इतर मूलद्रव्य आहेत. या बाकीच्या सर्व मूलद्रव्यांना खगोलशास्त्रात धातू (मेटल्स) म्हणतात. यात कार्बन, ऑक्सिजन, सोनं, सुरेनियम असे सगळेच मोडतात. तर विश्वाचा अभ्यास करायचा असेल तर हायड्रोजनचा अभ्यास सगळ्यात महत्वाचा आहे. आणि हा हायड्रोजन बघण्यासाठी जी.एम.आर.टी. सारख्या कमी वारंवारतेमधली प्रारणं पाहू शकणाय्रा दुर्बिणींना महत्त्व आहे. अतिशय जवळचा म्हणजे आपल्या आकाशगंगेलला आणि अतिशय लांबचा म्हणजे आत्तापर्यंत आपण जेवढं लांबचं पाहू शकतो तिथला हायड्रोजन बघण्यासाठी जी.एम.आर.टी. ही एकदम सुंदर दुर्बिण आहे. याशिवाय तिथून गुरूचाही अभ्यास होतो. मगाशी मी जसं म्हटलं की वस्तूच्या तापमानावरून ठरतं की ती वस्तू आपल्याला कोणत्या फ्रिक्वन्सीला दिसेल. आपला हा जो दादा ग्रह आहे त्यातपण भरपूर हायड्रोजन भरला आहे. आणि त्याच्या तापमानामुळे तो रेडिओ लहरींमधे प्रकाशमान आहे. जी.एम.आर.टी. मधून गुरूचाही अभ्यास होतो.

तारे जेव्हा मरतात ... हो तारे मरतात. त्यांच्या गाभ्यात हायड्रोजनचं रुपांतर हेलियममधे होतं आणि या प्रक्रियेमधे ऊर्जा बाहेर पडते. जेव्हा ही ऊर्जा बनवण्याची क्रिया थांबते तेव्हा तारा मरतो. आणि मरतो तेव्हा त्याच्या गाभ्याच्या वस्तूमानावरून ठरतं की त्याचं मरण कसं असेल ते! मध्यम आकाराच्या ताय्रांसाठी मरणपण मस्त असतं. त्यांचा फक्त गाभा शिल्लक राहतो, तो खूप वेगात स्वतःभोवती फिरतो (एका सेकंदाला ३० आवर्तनं हा साधारण मध्यम वेग आहे). आणि हा फिरणारा मृतवत तारा त्याच्या धृवीय भागामधून प्रारणं बाहेर टाकतो. ही प्रारणं आपल्याला पल्सेसच्या रुपात दिसतात. त्यांची वारंवारता ताय्राच्या स्वतःभोवती फिरण्याच्या वेगावरून ठरते. या ताय्रांना पल्सार (pulsar) म्हणतात. या पल्सार्सचाही अभ्यास जी.एम.आर.टी. मधून होतो.

जी.एम.आर.टी. ही आंतरराष्ट्रीय दुर्बिण आहे. (या वाक्याला तसा म्हटलं तर काही अर्थ नाही आहे.) ज्याला कोणाला जी.एम.आर.टी. वापरायची असेल त्याला (/तिला) "प्रपोजल" लिहावं लागतं. त्यात आपल्याला काय बघायचं आहे, का बघायचं आहे, त्यातून काय शिकता येईल (हो हे पान आधीच लिहायचं!), किती वेळ वापरायची आहे अशा गोष्टी लिहाव्या लागतात. एक कमिटी, ज्यात जी.एम.आर.टी. आणि इतर संस्थांमधले तज्ञ आहेत, ते ठरवतात कोणत्या प्रपोजलला किती वेळ द्यायचा. आणि हे प्रपोजल कोणालाही लिहिता येतं, तुम्ही भारतीय आहात का, खगोलशास्त्रात काही पदवी आहे का असे प्रश्न त्यात विचारले जात नाहीत.

जी.एम.आर.टी.चं स्थान मी लेखाच्या सुरुवातीला उडत उडत दिलेलं होतंच. पुणा-नाशिक रस्त्यावर जुन्नर/नारायणगावच्या जवळ खोडदमधे जी.एम.आर.टी. आहे. पण सर्व शैक्षणिक कामं पुण्यात होतात. पुणे विद्यापीठाच्या आवारात एन.सी.आर.ए. (नॅशनल सेंटर फॉर रेडीओ ऍस्ट्रोफिजीक्स) ही संस्था आहे. हे मुंबईच्या टी.आय.एफ.आर. (टाटा मूलभूत संशोधन संस्थानचं) पुण्यातलं बाळ! एन.सी.आर.ए. मधूनच उटीच्या रेडीओ दुर्बिणीचाही कारभार हाकला जातो. खगोलशास्त्रज्ञेतर लोकांना तिथे जायचं असेल तर शुक्रवारी पूर्वपरवानगी घेऊन जाता येतं. पण
रेडीओ दुर्बिण असल्यामुळे तिथे मोबाईल फोन वापरायला सक्त बंदी आहे. आणखी माहितीसाठी इथे टिचकी मारा.

अवांतरः मी या लेखात खूप इंग्लिश शब्द वापरले आहेत. आणि काही ठिकाणी इंग्रजी वाक्यांचं मराठी भाषांतर झालं आहे. तेव्हा प्रतिशब्द /सूचनांचं स्वागतच आहे. अर्थात कोणत्याही वैज्ञानिक भाषण्/लेक्चरनंतर प्रश्नांचंही स्वागतच आहे.

०१. एन.सी.ए.आर. चे कार्यालय पुणे विद्यापीठात आहे का?
हो! विद्यापीठाच्या खडकीच्या बाजूला जे फाटक आहे, तिथून २ मिनीटांवर एन.सी.आर.ए. आहे (आयुकाच्या समोर, रस्त्याच्या दुसय्रा बाजूला).

०२. जर लहान मुलांना न्यायचे असेल तर शक्य आहे का? साधारण १२ वर्ष वयातील मुलं.
जी.एम.आर.टी. मधे त्यांना जरूर न्या. एन.सी.आर.ए. मधे त्यांना फक्त लेक्चर देता येईल; पण प्रत्यक्ष बघण्याचा आनंद नाही. साधारण ८ वीच्या पुढच्या मुलांना (आणि बाकी सर्वांनाच) जनरल खगोलशास्त्राबद्दलही काही सांगता येईल.
तुम्हाला जर तिथे मुलांना घेऊन जायचं असेल आणि इतरही मागणी असेल तर काही स्पेशल सहल काढता येईल का याची मी चौकशी करू शकते. आणि तुम्हाला मराठीतून माहिती हवी असेल तर आपल्या सर्वांच्या सोयीने आपण काहीतरी करू शकतो.

०३. तिथे मुलांना समजेल अश्या भाषेत काही माहिती मिळेल असा काही उपक्रम आहे का?
सध्यातरी नाही; पण शाळेची सहल काढली तर थोडे प्रयत्न करून काहीतरी नक्कीच मॅनेज करता येईल.
पुढचं वर्ष आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र वर्ष जाहिर झालं आहे. त्यामुळे आता काही दिवसात (किंवा महिन्यात) एन.सी.आर.ए. प्लॅनींग सुरू होईल, लोकांपर्यंत खगोलशास्त्र आणि विषेशतः जी.एम.आर.टी. पोहोचवण्यासाठी काय करता येईल ते ... त्यामुळे आपले सर्वांचे प्रतिसाद, मतं आले तर आम्हाला त्याचा फायदा होईल.


जीर्णनगरी मुशाफिरी : चावंड किल्ला

बरेच दिवस जुन्नरच्या मुलखात भटकंती झाली नव्हती. नाशिक जिल्हा आता जवळपास संपवून मोर्चा वळवला तो जुन्नर कडे. एकंदर जुन्नर चा इतिहास बघता, सुमारे २००० वर्ष जुना हा प्रदेश म्हणजे 'भौगोलिकदृष्ट्या' आणि 'ऐतिहासिकदृष्ट्या' महाराष्ट्राचा शिरेटोप म्हणता येईल.
सातवाहन राजांच्या कालापासून हा प्रदेश प्रसिद्ध तर आहेच, पण महाराष्ट्रातील प्रदेश नागरी वस्तीखाली यायला, व्यापारदृष्ट्या येथून सुरुवात झाली असे कळते. तेव्हा हा प्रदेश सातवाहनांची उपराजधानी होती.
या परिसरात नाणेघाट व दाऱ्याघाट हे प्राचीन व्यापारी मार्ग, ९ तीर्थक्षेत्रे, भैरवगड, जीवधन, चावंड, हडसर, निमगिरी, ढाकोबा, शिवनेरी, नारायणगड, हरिश्चंद्रगड असे अभेद्य किल्ले, अष्टविनायक गणपती पैकी एक ओझरचा गणपती, लेण्याद्री,मानमोडी डोंगरातील बौद्ध लेणी, ५ धरणे आणि वाघ्र प्रकल्प आहेत. याजोडीला माळशेज घाट म्हणजे पावसाळ्यात स्वर्ग आहे.
यावेळी प्लान ठरला तो माणिकडोह धरणाचा परिसर. दोन दिवसात 'चावंड-कुकडेश्वर-जीवधन-नाणेघाट' आरामात करून दुसऱ्या दिवशी सातच्या आत घरात.

जायचे कसे?
पुण्यापासून : पुणे ते जुन्नर ST ने नवीन जुन्नर स्थानकावर उतरावे. जवळपास अडीच तास लागतात. तिकीट ९८रु. शिवाजीनगर पासून दर अर्ध्या तासाला बस असते. नवीन जुन्नर ST स्थानकापासून १६ किमी अंतरावर असलेल्या ह्या गडाच्या पायथ्याशी चावंड गाव वसलेले आहे. जुन्नर स्थानकापासून अंजानावळ वा घाटघर ST पकडून चावंड फाट्यावर उतरावे.
चावंड फाट्यापासून १५ मिनिटे चालत गेल्यावर चावंड गाव लागते. त्याच्या अलीकडेच किल्ल्याच्या पायऱ्या चालू होतात.

बघायचे काय ?

किल्ल्यावर जाताना लागणारा दगडात खोदलेल्या वाटा, पुष्करणी तलाव, २१ पाण्याची टाकी, सप्ततलाव, प्राचीन असे महादेव मंदिर, चावंडा देवी मंदिर, महादेव मंदिरावरील शिल्पे.,किल्ल्यावरून दिसणारे माणिकडोह धरण व आजूबाजूचा प्रदेश, वऱ्हाडी डोंगर, हडसर किल्ला.
किल्ला चढून पूर्ण फिरायला ४-५ तास पुरतात.

आम्ही दोनच टाळकी ट्रेक ला असल्याने काही ठरवावे लागले नाही. शनिवारी मी पुण्याहून सकाळच्या निवांत गाडीने साडे दहाला जुन्नर पोहोचलो. आणि मित्र कल्याणवरून साडे आठ च्या गाडीने जुन्नरला आला. तिथून लगेच अंजानावळ गाडी पकडून उतरलो चावंड किल्ल्याच्या पायथ्याशी.
.
पायथ्या पासून किल्ला फारच साधा वाटत होता. कॅमेरे बाहेर काढले, सामान तिथल्या एका घरात ठेवले आणी पायपीट चालू झाली.
रस्ता फारच सोपा असल्याने चुकणे झाले नाही. जाताना एक ग्रुप भेटला तो नुकताच वर जाऊन आला होता. त्यांच्याकडून टिप्स घेऊन आम्ही पुढे निघालो.
.
पायथ्यापासूनच काही उंचीपर्यंत सिमेंट च्या पायऱ्या बांधलेल्या आहेत. त्यामुळे रस्ता वैगरे चुकत नाही आणी सरळ जाऊन आपण एका मोठ्या रॉक पॅचला लागतो. पण खरेतर या पायऱ्यांनीच अर्धा जीव जातो.
जसे आपण थोडे वर वर जाऊ लागतो तसे चावंड गाव आणि माणिकडोह धरणाचे विहंगम दृश्य दिसू लागते. या धरणामुळे येथे पीक पाणी चांगले असून हा प्रदेश बऱ्यापैकी सधन आहे. दूरवर पसरलेला माणिकडोह धरणामुळे आजूबाजूचा परिसर अजूनही हिरवा होता. तसेच भर उन्हात हलकी थंडीही वाजत होती.
.
सुमारे अर्धा-पाऊण तासात आपण या रेलिंग पर्यंत येतो. जुन्या रेलिंग काढून येथे नवीन रेलिंग लावलेल्या आहेत. चक्क पर्यटन खात्यातील पैसे या कामासाठी वापरलेले आहेत ( म्हणजे त्यांनी मिळवले आहेत) असे सरपंचांकडून कळले.
एकावेळी एकच माणूस जाऊ शकेल अश्या या पायऱ्या कातळात खोदल्या आहेत. आता नवीन रेलिंग असल्याने त्या पूर्ण सुरक्षित आहेत. लावलेल्या रोपची हि गरज पडत नाही.
.
.
अवघड असा टप्पा ओलांडून गेलो आणि लगेच प्रशस्त अश्या मोठ्या पायऱ्या लागल्या. अत्यंत विचारपूर्वक खोदलेल्या त्या पायऱ्या आपल्याला थेट प्रवेशद्वाराशीच नेऊन ठेवतात.पहिले प्रवेशद्वार त्या पायऱ्यांच्या काटकोनात बांधलेले आहे. त्यामुळे खालून वा अगदी पायऱ्या चढून आले तरीही प्रवेशद्वार दृष्टीस पडत नाही. हा बुरूज प्रवेशद्वाराचे रक्षण करतो.
.
प्रवेशद्वारावर दगडी कमानीतच गणपती कोरलेला आहे. ह्या किल्ल्याच्या सर्वच द्वारांवर कोरलेले गणपती अजूनही तसेच सुबक आहेत. हे काम पेशव्यांचे असावे असे वाटते.
.
इथे मस्त जागा पाहून जरा वेळ निवांत बसलो. मग येथेच समान ठेवून फक्त कॅमेरे घेतले आणी पुढे निघालो.थोडे पुढे येताच घोड्यांसाठी पाण्याची सोय दिसली. याचा अर्थ एखादे तरी पाण्याचे तळे जवळपास असणार असा अंदाज लावताच समोर पुष्करणी तलाव नजरेस पडला.
येथून गडाला प्रदक्षिणा मारत आम्ही निघालो. तलावाच्या मागून बाजूने जाताना अजून दोन मोठी टाकी दिसली. या किल्ल्यावर तब्बल २१ पाण्याची टाकी असल्याने पाण्याचा नो प्रॉब्लेम.
आता इथूनच वरती दिसणाऱ्या छोट्याश्या टेकडीवर आम्ही निघालो. याच टेकडीवर चावंडादेवीचे मंदिर आहे.
.
.
सुमारे पंधरा मिनिटात आम्ही वरती पोहोचलो.देवीचे दर्शन घेऊन जरा वेळ टेकलो. मस्त सावली पडली होती आणि गार वारा वाहत होता. मंदिरासमोरील दगडावर हे महाशय निवांत पडले होते.
.
गडाच्या सर्वोच्च असलेल्या चावंडा देवीच्या मंदिरापासून समोरच हडसर किल्ला दिसत होता. किल्ल्यावरच खाली बघितले तर सप्ततलाव दृष्टीस पडले.
.
ऊन सावलीचा खेळ चालूच होता.
.
आता इथून उतरून खाली आलो. थोडेसे पुढे जाऊन लगेचच महादेव मंदिर लागले. याची पूर्णतः पडझड झाली असली तरी पडलेल्या दगडांच्या आकारावरून त्यावरचे सुरेख कोरीवकाम लक्षात येते. हे मंदिर हि खूप जुने असले पाहिजे. जुन्या काळचे कोरीवकाम आणि दगडांची रचना केवळ अद्भुत.
.
हरिश्चंद्र किल्ल्यावरील मंदिरासमोरील तलाव आणी ह्या महादेव मंदिरासमोरील तलाव जवळपास सारखेच आहेत. दोन्ही मंदिरे ही एकाच 'शिलाहार' राजघराण्याच्या झांजराजाच्या कारकीर्दीत बांधली गेली असल्याने त्यांची सप्त-देवतांची रचना सारखी असावी. खाली फोटोत असल्याप्रमाणेच सप्तदेवता असलेले दगडात आत खोदून केलेली छोटी मंदिरे जुन्नर मधील बऱ्याच किल्ल्यावर आढळतात.
साधारण इस. ७५० च्या आसपास शिलाहारांनी वंशाच्या राजांनी हे मंदिर बांधले असावे. महादेव मंदिरात ही एकाच दगडात कोरून तयार केलेली पिंड दिसते.
.
मंदिरासमोरच एक डोकं नसलेला नंदी आहे त्यावरून हे महादेव मंदिर ओळखता येते.
.
मंदिराची पूर्ण पडझड झाली असली तरी आजूबाजूस पडलेले पुरातन अवशेष आणि दगडावर केलेले नक्षीकाम केवळ पाहत राहावे असे आहे. ते पाहून मनात प्रश्न पडतो की त्या वेळचे कारागीर सुद्धा किती लॉयल, प्रामाणिक असतील राजाशी. एवढ्या उंचावर चढत येऊन असे काही कोरीवकाम करायचे यावरून त्यांची राजावर किती निष्ठा असावी हे कळते.
.
आणखी खोलात जाऊन त्या नक्षीकामाची महानता लक्षात येते. एवढे डिटेल काम करायला किती वेळ लागत असेल? पण "आपल्या राजाचे काम करायचेय" अश्या भावनेनेच अशी कामे होत असावीत. केवळ अद्भुत !
येथे जोडूनच जवळपास १० तळी आहेत. बहुतांश तळ्यात पाणी शेवाळामुळे हिरवट झाले आहे. ( दामले मास्तरांची आठवण झाली. :) )
.
येथून म्हणजे महादेव मंदिरापासून खाली गेले की सप्ततलाव दिसतात. किल्ल्यावर जाऊन हे तलाव अजिबात चुकवू नये असे आहेत.या सप्त-तलावाच्या सुरवातीला पहिल्या तलावास प्रवेशद्वार खोदलेले असून त्यावरही एकदम सुबक असा गणपती कोरला आहे. प्रवेशद्वाराला हडसर किल्ल्याच्या प्रवेशद्वारा सारखीच नक्षीकाम केले आहे. एक मात्र जाणवले की, जुन्नर मधले जवळपास सर्वच किल्ल्यांच्या प्रवेशद्वाराची ठेवण आणि स्थापत्यकला सारखीच आहे.
.
पडक्या कोठाराच्या अवशेष पाहून थोडे पुढे गेल्यास हे एकाला एक जोडलेले सप्ततलाव दिसतात. वर्षभर किल्ल्यावर पाण्याची अजिबात टंचाई होत नसावी. यातले पाणी बरेच चांगले आहे. पिण्यासाठी वापरण्याजोगे आहे.
सप्ततलाव:
.
.

जीर्णनगरी मुशाफिरी : जीवधन, नानाचा अंगठा, नाणेघाट

जीवधन आणि नाणेघाट यांचा इतिहास आणि माहिती सर्वश्रुत आहेच. यावर बरेच धागे आधीच उपस्थित असल्याने अजून एकाची भर न टाकता फक्त माझा अनुभव मांडतो.
कोणाला इंटरेस्ट असेल तर इतिहास, जायचे कसे वैगरे आणि आधीचे लेख या ब्लॉग लिंक वर वाचू शकता.

कुकडेश्वर मंदिरापासून ST पकडून रात्री घाटघरला उतरलो आणि काळोखात चालत निघालो. हळूहळू ST च्या यंत्रांचा आवाज आणी प्रकाश अंधारात विरळ -विरळ होत गेला.रात्री अंधारात बस मधून उतरलेले गावकरी आणि सगळ्यात पुढे सरपंच पोपटराव. त्यांच्या मागून चालत आम्ही डायरेक्ट त्यांच्या घरी.
आमचे जेवण झाले होते पण त्यांचे व्हायचे होते. आम्ही त्यांच्या अंगणात आमची पथारी मांडली. त्यांनी जेवायचा आणि आत खोलीत झोपायचा फार आग्रह केला. पण आम्ही नाही गेलो. आता शरीर इतके दमले होते की कुठेही झोप आली असती.
शेणाने सारवलेल्या अंगणात एक सोलर दिवा लावलेला होता. बाकी गर्द अंधार आणि फुल टू थंडी. फार मजा आली.

सकाळी सकाळी जाग आली ती गावातील बायकांच्या पाण्याच्या गडबडीने. प्रत्येक घरातून बायका आणि पोर -टोर डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणायला जात होती. आम्ही आवरून पाणी भरायला त्यांच्या बरोबर गेलो.
तळ्यावर पोहोचलो तेवढ्यात सूर्य नारायण ही नुकतेच ड्यूटी वर आले होते.
.
पाणी भरून जरा फ्रेश झालो.
.
आता खरी चढाई सुरू झाली. यावेळी खायचे कमी घेतले होते आणि पाणी जास्त होते. गावात कुठेही खायचे मिळेल असा समज करून खायचे सामान आम्ही आधीच खाल्ले होते. आता फक्त एक चिवडा पाकीट आणि कालच्या डब्यातल्या उरलेल्या पोळ्या शिल्लक होत्या.
सकाळी आम्ही निघालो तेव्हा ज्यांच्या घरापाशी आम्ही राहिलो ते नुकतेच उठले होते. त्यामुळे त्यांना काही मागावे आणि पैसे देतो म्हणावे योग्य वाटले नाही. म्हणून सकाळी चहा हि न पिता चढाई चालू झाली.पहिल्या तासाभरातच कळले की आता वाट लागणार आहे. खायला काही नाही, पोटात काही नाही आणि एवढा डेंजर किल्ला. ओह्ह!
या पठारावरून समोरच 'नवरा ( मोठा पहिला त्रिकोणी डोंगर) , नवरी (त्या पुढचे डोंगर) आणि भटोबा सुळके दिसत होते.
.
खायचे वांदे आणि यात अजून भरीस भर की रस्ता हि माहीत नव्हता. घाटघर पासून चढून आम्ही दुसऱ्या वाटेने उतरून नाणेघाटात जाणार होतो. गावातून पुढे एक पठार लागते तेथून वरती बघितल्यास किल्ल्याचा थोडा भाग पोखरल्यासारखा वाटतो तेथून वाट आहे. आम्ही पठारावरून एका वाटेने वर चढून गेलो. वर गेल्यावर काही वाटच मिळेना. सगळे मोठे कडेच लागले. मग तेथून खाली उतरून परत पठारावर आलो. मग दुसरी पायवाट पकडून परत तेवढेच वरती गेलो तर तिथे फारच घनदाट कारवीचे जंगल लागले. झाडे तोडत, मार्ग काढत कसेतरी वर पोहोचलो तर तिथेही रस्ता नाही. परत खाली पठारावर.
असे वर -खाली करत तब्बल सात वेळा रस्ता चुकून झाल्यानंतर मात्र आमचा स्टामिना संपला. मग ठरवले की इथून परत मागे घाटघर गावात जाऊ आणि तिथून नाणेघाटला जाऊ. काही नको जीवधन.
असे म्हणून मी परत निघालो. परतताना हि वाट असावी, इथून तिथे जात असावी अशी चर्चा चालूच होती.

एका झाडे तोडल्याच्या आवाजाने थांबलो तर एक गावकरी दिसला. त्याला सांगितल्यावर त्याने परत आम्हाला वाट समजावली आणि आम्ही आता शेवटचा चान्स म्हणून परत किल्ल्यावर चढाई केली. आठ वेळा कारवीतून मारामारी करून जाऊन हात पायावर ओरखडे उठले होते. चेहरा घामेघूम आणि पोट रिकामे. अश्या अवस्थेत "काही झाले तरी आता जायचेच" असा विचार केला आणि परत सुटलो. कॅमेरे केव्हाच ठेवून दिले होते.
पुन्हा अर्धा तास अंदाजे चढून गेलो तर समोर एक गुहा दिसली. आता खात्री पटली की तब्बल ४ तासाने का होईना आपण बरोबर मार्गाला आहोत.
.
कोलंबसाला जहाजावर किनाऱ्यावरचे पक्षी बसलेले पाहून आनंद झाला असेल तसा आनंद आम्हाला झाला. आता कॅमेरे बाहेर आले. मस्त गार वारा वाहत होता.
या दगडात खोदलेल्या पायऱ्या इंग्रजांनी तोफगोळे मारून तोडून टाकल्या. आता फारच गुळगुळीत आहेत. पण चढून जाण्या इतपत आहेत. पावसाळ्यात मात्र ह्या डेंजर असतील.
.
त्यानंतर पुढचे संकट म्हणजे १५ फुटी रॉक पॅच. दोरी वैगरे काही प्रकार नसल्याने आम्हाला फार अवघड झाले. शेवटी सगळे सामान खाली ठेवून भूषण वर गेला. मग माझ्याकडे असलेली एकमेव नॉयलोनची दोरीला आम्ही दगड बांधला आणि वर फेकला. तो दगड पकडण्याचे ७-८ प्रयत्न झाल्यावर शेवटी दोरी त्याच्याकडे पोहोचली. मग सॅक, कॅमेरे बांधून दोरीने वर पाठवले. आणि मग शेवटी मी वर चढलो.
.
नुसते चढायला थोडे अवघड आहे. पण सामान घेऊन चढताना पाठीवर वजन असल्याने उलटा झोक जायची शक्यता आहे. तेथे बोल्ट पण मारलेले आहेत. रोप लावता येत असेल तर मग सोपे आहे.
या पायऱ्या चढून आल्यावर लगेचच एक उद्ध्वस्त दरवाजा लागतो. तेथून डावीकडे पाण्याचे टाकी आहेत. हे पाणी पिण्यायोग्य नाही. दुसऱ्या रस्त्यावरून उतरताना लागणारे टाकीतले पाणी बरे आहे.
.
येथून किल्ला सुरू होतो. सुरवातीलाच २ बुरूज दिसतात.
.
येथून अजून सुमारे अर्धा तास चालून गेल्यावर हे धान्य कोठार लागले. एवढ्या वरती येऊन कोण धान्य साठवण करत असावा?
.
आता सकाळपासून पोटात काहीच नसल्याने खूप दम तर लागलाच पण पुढे चालणेही अशक्य झाले. चिवडा वैगरे थोडा खाल्ला पण त्याने अजून त्रास व्हायला लागला. आता पोटात काहीतरी ढकलणे गरजेचे होते. शेवटी असह्य झाल्यावर कालचा उरलेला डबा उघडला. काल पहाटे केलेल्या पोळ्या शिळ्या झाल्याने अशक्य वास येत होता. भाजी तर नव्हतीच मग नाईलाजाने एक एक पोळीचा तुकडा आणि घोटभर पाणी पिऊन वेळ काढली. कालची शिळी पोळी खाऊन अजून त्रास होईल म्हणून पाणी जास्त पिले. थोडा गार वारा पिऊन परत निघालो.
झेंडा दिसल्यावर तेथून चढून किल्ल्याच्या पश्चिम बाजूस गेलो.समोर बघतो तर काय ? कमाल ! नानाचा अंगठ्याचे विहंगम दर्शन घडले. निसर्ग कोणाचा कसा हिशोब लावेल काही लिमिटच नाहीये राव ! काय दिसत होता तो. असे रौद्र रूप पाहिले की सह्याद्री पार वेड लावतो.
.
येथून उतरायला चालू केले. पोटात काही नसल्याने फार काही फिरण्यात इंटरेस्ट नव्हता. पण जे काही पुढात येत होते खरंच भारी होते.हा पश्चिम महा-दरवाजा. अखंड कातळात बेमालूमपणे उभा ठाकलेला. एकावेळी एक घोडा येऊ शकेल एवढीच त्या कातळानंमध्ये जागा होती. त्याची उंची तर बघा. वाह ! मान गये उस्ताद !शत्रू अगदी येथपर्यंत चढून आला तरी त्याला येथे पोहोचेपर्यंत दरवाज्याचा अंदाज येणार नाही. या उपर वरतीही बुरूज बांधले आहेत. घोरपड आणा वा कोरफड आणा, येथे चढाई करणे अशक्यच. याची स्थापत्यकला करणारा माणूस कोणत्या विद्यापीठातून डिग्री घेऊन आला असावा?
.
जुन्नर मधल्या जवळपास सर्व किल्ल्यांची अशीच स्थापत्यकला दिसते. शिलाहार राजांनी हे किल्ले वा प्रवेशद्वारे बांधली होती. हे अर्ध गोलाकार घुमट प्रवेशद्वार अजूनही तेवढेच सुस्थितीत आहे.चार लेयर मध्ये कोरलेली नक्षी केवळ अद्भुत. त्यावर चंद्र, सूर्य आणि तोरणा कृती आकृती कोरलेली आहे.
.
पण आता येथून कसोटीची दुसरी इनिंग चालू झाली. येथेही एक १० फुटी रॉक पॅच आहे. तो उतरायला फारच अवघड वाटला मला. मला २० मिनिटे लागली तो उतरायला सगळे समान खाली फेकून दिल्यावर. तेथेच भूषण २ मिनिटात उतरला.
.
थोडे हळू उतरत, सुमारे २ तासात आम्ही उतरणीला लागलो. तेथून वर तो रॉक पॅच कहर दिसत होता. 'हॅरी पॉटर' वा 'लॉर्ड ऑफ द रिंग' पिक्चर मधला सीन वाटतो की नाही?
.
येथून उतरताना मागे पहिले तर अजून एक आश्चर्य. वानरलिंगी सुळका मस्त ऊन खात बसला होता.हे पाहून खरंच "लॉर्ड ऑफ द रिंग" मधला तो सुळक्या वरचा डोळा आठवला.
.
.
जसे आम्ही उतरत होतो तसे नानांचा अंगठा आम्हाला जास्तच खुणावत होता.कसला अंगावर येतोय असे वाटतेय की नाही?मुरबाड कडून जुन्नर ला येताना माळशेज मधून ST येते तेव्हा हा कडा दिसतो एका स्पॉट ला. फारच भयानक वाटतो तो त्या पुढच्या बाजूने.
.

येथून एक पठार लागले. मग फुल टू पायपीट. आता संपूर्ण जीवधन दृष्टिक्षेपात येत होता.
.
एका स्थळावर वाचले होते की जीवधन आणि नाणेघाट हाकेच्या अंतरावर आहे. 'कोणाच्या हाकेच्या' हा तपशील मात्र आम्हाला कळला नाही. बरेच अंतर होते.
आता अंगठ्याच्या एकदम समोर आलो. एखादे ग्लायडर असते तर वा काय मजा आली असती. सरळ पळत जाऊन बुंग sssssssss !
.
अर्धा तासात नाणेघाटात पोहोचलो. याचा इतिहास तर सर्वश्रुत आहेच. त्यामुळे तो सांगत बसत नाही. नाणेघाटात सगळ्यात बघण्यासारखी गोष्ट म्हणजे पुरातन कालीन आणि दगडाचे जकातीचे रांजण आणि येथून होणारे दळणवळण, सातवाहन राजवंश यांची महती सांगणारे गुहेतील शिलालेख.त्या काळी हे मोठाले रांजण दिवसातून ७-८ वेळा रिकामे केले जायचे. यावरून नाणेघाटाची उपयुक्तता लक्षात येईल.
.
नाणेघाटातील गुहा. याला नुकतेच ग्रिल बसवले आहे. ऐतिहासिक गोष्टींची वाट लावण्यात आपले सरकार हुशार आहे.
.
सातवाहन राजवंश यांची महती सांगणारे गुहेतील शिलालेख.
.
नाणेघाटातील गुहेमधील ब्राह्मी लिपीत लिहिलेले सुमारे दोन हजार वर्षापूर्वीचे शिलालेख आजही संशोधनाचाच विषय आहेत. शिलालेखात नमूद केलेल्या काही सातवाहन राजांची, त्यांच्या वंशाची आणि त्यांनी केलेल्या यज्ञांची माहिती या लिंक वर जयंत कुलकर्णी यांनी लिहिलेल्या लेखातून मिळेल.

हि नाणेघाटाची घळ. अखंड आणि सर्वात कठीण असे दगड फोडून तयार केलेला ऐतिहासिक राजमार्ग. हे कातळ जसे प्याटर्न मध्ये कातरले आहेत त्यावरूनच त्यांची कठिणता लक्षात येईल. पश्चिम घाट हा जसा निसर्ग सौंदर्या साठी ओळखला जातो तसेच इथल्या किल्ल्यांची अभेद्यता आणि दगडांची कठिणता यासाठीही साठी ओळखला जात.
.
.
पश्चिम घाटात जीवसृष्टीत हि खूप वैविध्य आढळते. जीवधन किल्ल्याच्या जंगलात रानडुकरांचा मुक्त संचार असतो. तेथील स्थानिक मंडळी मोठ्या ग्रुपने रानडुक्कर पकडायला जातात.
आम्ही उतरत असताना एक ग्रुप वरती जात होता. त्यातला एक माणूस म्हणाला की "जंगलातून सांभाळून जा, मला काहीतरी हालताना दिसले." खालून लोकांच्या आरडा ओरडा ऐकू येत होता. मग थोडी धाकधूक वाटली. वाटले की जवळपास असलेले जनावर लांब जावे म्हणून ते ग्रुप ने ओरडत होते. पण त्यांच्यापासून लांब जाऊन ते आपल्या अंगावर आले तर?
मग खाली गेल्यावर कळले की ती लोक सगळीकडे विखुरली होती आणि ओरडत ती रान-डुकराचा पाठलाग करत होते. बराच वेळ म्हणजे ४-५ तास हा प्रकार चालला होता. शेवटी त्यांनी त्याची शिकार केलीच आणि खायला गावात आणले.

एक ग्रुप रात्री गुहेत राहिला होता. ते साप पकडून त्यांचे फोटो काढून त्यांना सोडून देत होते. इथे पश्चिम घाटात सापांचेही विविध प्रकार आढळतात. त्यांनी रात्रीपासून ८ साप पकडले होते. आम्हाला तर एकही दिसला नाही.किल्ल्यावर कबुतर मी कधी पहिले नव्हते. ते इथे पाहिले.

असो.आम्ही जातो आमच्या गावा, सातवाहन कालीन ऐश्वर्याचा राम राम घ्यावा.
.
नाणेघाटात थोडी विश्रांती घेऊन मुंबईकर नाणेघाट उतरून मुरबाड वरून कल्याण ला आणि आम्ही परत मागे फिरून घाटघरला जाऊन बस पकडून जुन्नर आणि मग पुणे.

या सगळ्यात कौतुक वाटले ते MSEB वाल्याचे. कुठे कुठे जाऊन हे टॉवर बांधत असतात. नाणेघाटातून वैशाखरे गावात जाणाऱ्या वीजतारा कश्या जोडल्या असतील असा प्रश्न पडतो.का हे टॉवर हि सातवाहनानी बांधले असावेत? :)
.
२ दिवसात मस्त भटकंती तर झालीच पण जुन्नरसारख्या, महाराष्ट्राचा शिरेटोप असणाऱ्या, सातवाहन कालीन इतिहास लाभलेल्या संपन्न प्रदेशाविषयी खूप काही कळले. कुकडेश्वर मंदिराचा इतिहास आणि स्थापत्यकला यावर अधिक अभ्यासाची गरज आहे.

जीर्णनगरी मुशाफिरी : पांडवकालीन कुकडेश्वर मंदिर

कुकडेश्वर शिवालय हे महाराष्ट्रातील पुरातन काळी बांधलेल्या दगडी मंदिरापैकी एक. अखंड दगडात केलेलं अप्रतिम असे कोरीवकाम आणि स्थापत्य कलेचे उत्कृष्ट उदाहरण असलेले हे मंदिर तसे फारसे प्रसिद्ध नाही. दुर्लक्षित अश्या या पांडवकालीन मंदिरापासून कुकडी नदीचा उगम होतो. पुढे याच नदीवर माणिकडोह धरण आहे ज्यामुळे जुन्नर परिसर संपन्न बनला आहे.

इतिहास :
शिलाहार वंशातील/ घराण्यातील असंख्य राजे जुन्नर प्रदेशात राज्य करून गेले. त्यापैकी कपर्दिन, पुलशक्ती, झंझ, वज्जड, चित्तराजा, मुन्मुणी, अनंतदेव , अपरादित्य, केशीदेव व शेवटचा सोमेश्वर हे राजे प्रमुख होते.ह्या शिलाहारांनी असंख्य मंदिरे बांधली. अंबरनाथचे कोरीव शिवमंदिर, ठाण्याचे कौपिनेश्वर मुन्मुणी राजाच्या कारकीर्दीत बांधले गेले, तर झंझ राजाने पूरचे कुकडेश्वर, हरिश्चंद्रगडावरचे हरिश्चंद्रेश्वर, खिरेश्वरचे नागेश्वर, रतनवाडीचे अमृतेश्वर अशी शिवालये बांधली.

साधारण इ. स. ७५० ते ८५० च्या आसपास शिलाहारांनी हे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो मग यास पांडवकालीन का म्हणत असावेत हे उलगडले नाही. बहुतेक पांडवकालीन वा पुरातन मंदिरांची या राजांनी आपल्या स्थापत्य कलेच्या आधारे पुनर्बांधणी केली असावी.

जायचे कसे :
जुन्नर पासून १७ किमी अंतरावर वा चावंड किल्ल्यापासून ८-९ किमी अंतरावर हे मंदिर आहे. चावंड वरून घाटघर ला जाणाऱ्या मार्गातून चावंड किल्ल्याच्या पुढे ६ किमी एक फाटा फुटतो. तेथून पुढे ३ किमी वर हे मंदिर आहे. चावंड किल्ल्यापासून चालत गेल्यास अंदाजे २ तास लागतात. पण ते २ तास चालणेही वर्थ आहे असे ते पांडवकालीन मंदिर पाहिल्यावर वाटते.
गावाचे नाव 'पुर ' असून कुकडेश्वर हेच नाव प्रचलित आहे.
जुन्नर स्थानकावरून बस व्यवस्था आहे पण वारंवारता कमी आहे.

बसच्या वेळा : जुन्नर ते कुकडेश्वर
१. जुन्नर ते घाटघर/अंजनावळ : सकाळी १०, दुपारी- १२:३०, २, ५, ७:३० (शेवटची गाडी मुक्कामी अंजनावळ)
२. जुन्नर ते कुकडेश्वर : सकाळी ११, दुपारी ३:३०
नाणेघाट ते जुन्नर जाण्यासाठी :
१. अंजनावळ (घाटघर फाटा) ते जुन्नर (कुकडेश्वर वरून) : सकाळी -११, दुपारी -३:३०, ५:३०

सद्यस्थिती :
मंदिराची उंची साधारण १५ फूट असावी. प्रत्येक भिंतीवर आतून, बाहेरून पूर्णतः कोरीवकाम केलेलं आढळते. मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिमाभिमुख असल्याने मंदिरात पुरेसा प्रकाश नाही. पुढील बाजूस उजवीकडे गणपती कोरलेला आहे. दारासमोरच एका अखंड दगडात नंदी कोरून काढला आहे. संपूर्ण मंदिरावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. दारावरील कोरीव गणेशपट्टी, उंबरठ्याजवळील दोन किर्तीमुखे, दारासमोरचा नंदी आणि गणेश, वेलबुट्टी आणि अलंकारणे, शिवपिंडीची पूजा करणारी पार्वती अशी अनेक शिल्पे लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या आतील भागातही खूपच भारी नक्षीकाम केलेले आढळते. मंदिराच्या पश्चिमेस एका गोमुखातून पाणी पडत आहे. त्या भागातही शिल्पखंड आणि नागशिळा मांडून ठेवल्या आहेत.

हे शिव मंदिर फार पुरातन असले तरी त्यावरील शिल्पे आजही सुस्थितीत आहेत. मंदिराचा कळस पडला असून त्याची डागडुजी करण्याचे काम चालू आहे. केवळ दगडात केलेले कोरीवकाम तसेच शाबूत ठेवून सिमेंटने कळस न बांधायचा गावात निर्णय झालाय. त्यानुसार मोठे दगड येथे आणून त्यावर कोरीवकाम करून कळस उभारण्यात येणार आहे. या खर्चिक कामासाठी सरकारी निधी मंजूर झाला आहे.

आमची मुशाफिरी :
कुकडेश्वर मंदिरात पोहोचायला जवळपास ७ वाजले होते. जवळपास अंधार पडत आला होता त्यामुळे तिथे पोहोचूनही काही बघायला मिळेल की नाही असे वाटले.
सूर्य नारायण जाता जाता काही राहिले तर नाही ना? म्हणून टॉर्च मारून बघत असावा असे वाटले.
.
आणि जाताना आकाशाला गिफ्ट म्हणून मावळतीचे रंग देऊन जात असावा.
.
पश्चिमाभिमुख शिवमंदिर :
.
मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार :
उंबरठा आणि प्रवेशद्वारावरील नक्षीकाम हे वेगळ्याच धाटणीचे वाटले. असे नक्षीकाम पूर्वी कधी पहिले नव्हते.
.

प्रवेशद्वारावरील शिल्पे :
.
मंदिरासमोरच दगडात खोदून तयार केलेला नंदी आहे. याच्या डाव्या बाजूस अजून एक छोटेसे मंदिर असून त्यात काय आहे ते कळू शकले नाही. त्याच्या दर्शनी भागावर वृद्ध स्त्रियांची शिल्पे आहेत.(अंधार असल्याने आणि ट्राय पॉड नसल्याने याचे फोटो काही धड आले नाहीत. )

मंदिराला आधार देणारे खांब पूर्णतः नक्षीकाम केलेले होते. थोडीही जागा रिकामी अशी सोडलेली नव्हती. येथे सर्वात वरती गणपती कोरलेला दिसतो आहे. असेच सेम शिल्प खांबाच्या इतर दोन्ही बाजूस आहे. त्याखाली ढोल वाजवतानाचे शिल्प आहे. त्याखाली तोरणासदृश्य काहीतरी असावे. यालाच वेलबुट्टी म्हणत असावेत कदाचित.
.
त्याच्या पुढच्याच/समोरच्या खांबावर नृत्य शिल्प कोरलेले आहे आणि त्याखाली शंकरपाळी सदृश काहीतरी. हे काय कोरले आहे याची कुठेतरी माहिती असावयास पाहिजे होती. गावात काही जुनी लोक आहेत त्यांना बऱ्यापैकी याचा इतिहास माहीत आहे.
.
.
.
हि शिल्पे पार्वतीची असावीत असे वाटते.
.
उशिरा तेथे पोहोचल्याचा एक मात्र फायदा झाला की कॅमेराचे काही गोष्टी ज्या आजपर्यंत प्रयत्न केला नव्हत्या त्या कळल्या. अंधारात लॉग एक्स्पोजर / शटर स्पीड कमी करून काही फोटो काढले.
.

एव्हाना आठ वाजत आले होते. जुन्नर पासून साडेसातला सुटणारी आणि अंजानावळ येथे मुक्कामी जाणारी शेवटची गाडी आम्हाला घाटघरला, जीवधन किल्ल्याच्या पायथ्याशी सोडणार होती. ती पकडण्यासाठी परत ३ किमी चालत जाऊन फाट्यावर उभे राहायचे होते.

आमच्या सुदैवाने आम्ही उभे होतो तेथे एक दुधाची गाडी आली. गाडीतली माणसे आजूबाजूच्या गावातील गावकऱ्याकडून त्यांच्या गाई-म्हशींचे दूध घेतात, त्याचा हिशेब ठेवतात. मग ते दूध एकत्र करून घरी येऊन मोठ्या फ्रीज मध्ये ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी डेअरी ला विकतात आणि हिशेबानुसार लोकांना पैसे देतात. हेच दूध डेअरी मधून प्रक्रिया होऊन ( घट्ट दुधात पाणी घालूनही ) पुणे आणि आजूबाजूच्या गावास जाते. ओह्ह मला वाटायचे की, चितळ्यांच्या गायीच्या दुधाच्या पिशवीत चितळ्यांनीच पाळलेल्या गायीचे दूध असेल. असो. गाय कोणाचीही असो, शहरात गायीच्या दुधाच्या पिशवीत गायीचेच दूध येतेय हे हि नसे थोडके !

तर त्या दुधाच्या गाडीने आम्ही ५ मिनिटात फाट्यावर आलो. आता एकदम गडद अंधार पडला होता. आजूबाजूला वस्ती नसल्याने आणि पर्यायाने एकही दिवा नसल्याने सारे नभांगण तारकांनी भरून व्यापले होते. या आधी मान वर करून आकाशात तारे कधी पाहिले हे आठवण्यात काही क्षण गेले. मग आठवले की २ वर्षापूर्वी हरिश्चंद्राला गेलो होतो तेव्हा असेच तारे पाहत बसलो होतो.
मधल्या काळात ताऱ्यांनी खुणावलेच नाही का ? का ते बघण्याएवढी मान कधी वरच आली नाही ?
हॉल च्या छताला लावलेले रेडियम चे तारे जास्त जवळचे वाटले? का हातात अख्खी 'गॅलेक्सी' आल्यामुळे ताऱ्यांचे वेडच नाहीसे झालेय? असो.

पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांनी हे विचार एकदम तोडले. एकमेव असलेला विजेरी दिवा पेटवला आणि त्या प्रकाशात डबा उघडून जेवण चालू केले. आजूबाजूला गर्द अंधार, निरव शांतता, दूरवर मिणमिण करणारे दिवे, जोडीला हा कंदील आणि डब्यात गोड शिरा. अहाहा ! त्या दिवशी 'कॅण्डल लाईट डिनर' चा खरा अर्थ कळला.

जेवण होऊन थोडावेळ एका गावकऱ्याशी गप्पा टाकल्या. थोडा वेळात दोन पिवळे दिवे भयंकर आवाज करत, अंधारातून माग काढत आमच्या दिशेने आले आणि थांबले. मग कळले की ती ST होती. गाडीत बसलो आणी गाडी घाटघर दिशेने पळू लागली. त्यानंतर घाटघरपर्यंत जो काही रस्ता आहे, त्याला 'कच्चा रस्ता' म्हणणे म्हणजे कुत्र्याला गेंडा म्हणणे आहे. फक्त आणि फक्त 'हमर' घेऊन जाण्यासाठीच तो रस्ता असून हा ड्रायवर उगाच त्यावर ST चालवतो आहे का काय अशी शंका येते. येथे ST मधून उतरताना ड्रायवर, कंडक्टर आणि ST महामंडळ तिघांनाही सलाम ठोकावासा वाटतो. आम्ही ठोकलाही!

घाटघरला उतरलो आणि काळोखात चालत निघालो. हळूहळू ST च्या यंत्रांचा आवाज आणी प्रकाश अंधारात विरळ -विरळ होत गेला.

राहायची व्यवस्था :
गावात कोणाकडे तरी जेवणाची व्यवस्था होऊ शकते. राहायचे असेल तर मंदिरासमोर पुजारी काकांचे घर आहे त्याच्या समोर मोठी ओसरी आहे. १५-२० लोक तेथे झोपू शकतात.

अजून काही :
१. महाराष्ट्र सरकारने हे शिवालय तीर्थक्षेत्रे बनवून त्याचा विकासकाम (?) हाती घेतले आहे.
२. कुकडेश्वर मंदिर हे 'क- वर्गीय' मंदिर असून त्या मंदिरामागील डोंगरामधून कुकडी नदीचा उगम आहे. गावातील काही लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'पूर' गावातील डोंगर व दाऱ्या घाटातील डोंगरामध्ये शिखरावर कुकडी नदीचा उगम असून त्यानंतर तेथून नदीचा प्रवाह लुप्त झालेला आहे. तो लुप्त झालेला प्रवाह कुकडेश्वर मंदिरापासून चालू होतो. जेथे प्रवाह चालू होतो (नदीचा उगम होतो) तेथे छोटेसे मंदिर बांधले आहे. कितीही पाणी टंचाई आली तरी येथे बारमाही पाणी असते.
३. पुढे कुकडी नदीवरच माणिकडोह धरण बांधलेले आहे.
४. कुकडेश्वर मंदिरापासून पुढे डोंगर चढून गेल्यास आपण डायरेक्ट दाऱ्या घाटात पोहोचतो. तेथूनच दुर्ग ढाकोबाला हि जाऊ शकतो.


मग यास पांडवकालीन का म्हणत असावेत हे उलगडले नाही

अशा प्रकारची प्राचीन मंदिरे मुख्यतः चालुक्य, शिलाहार, यादवकालात बांधली गेली. मंदिराची शैली भूमिज पद्धतीची आहे. अशा प्रकारच्या बर्‍याच मंदिरांचे कळस आजमितीस अस्तित्वात नाहीत. यादवराजवटीच्या अस्तानंतरच्या इस्लामिक राजवटीत अशा प्रकारची मंदिररचनेची शैली पूर्णतः लयाला गेली व अत्यंत साधी मंदिरे निर्माण होऊ लागली.
ह्या विस्मृतीत गेलेल्या अद्भूत मंदिरांकडे बघून ही पांडवांनीच बांधलेली आहेत असा समज इकडे निर्माण झाला.

त्याच्या दर्शनी भागावर वृद्ध स्त्रियांची शिल्पे आहेत.

ह्या स्त्रिया नसून वेताळ आहेत. कोकणातल्या प्राचीन मंदिरांत असे वेताळ अथवा भूतगण आढळतात. हे मंदिर शिलाहारांनीच बांधलेले आहे हा कयास पण यामुळेच करता येतो.

उंबरठा आणि प्रवेशद्वारावरील नक्षीकाम हे वेगळ्याच धाटणीचे वाटले. असे नक्षीकाम पूर्वी कधी पहिले नव्हते.

अगदी टिपीकल शैली. गणपती अजून मुख्य देवतांत स्थानापन्न झालेला नव्हता. त्यामुळे गणेशपट्टीका नाही. तर देवी अथवा शिवमूर्ती द्वारपट्टीवर कोरलेल्या आढळतात.

त्याखाली शंकरपाळी सदृश काहीतरी.

ती फुलांची नक्षी आहे. बर्‍याच ठिकाणी आढळते.

हि शिल्पे पार्वतीची असावीत असे वाटते.

ते (पुरुष) प्रतिहारी आहेत.
डावीकडच्या प्रतिहाराच्या हातात एक लांबट पिशवी दिसेल. याचा अर्थ मंदिराच्या उभारणीसाठी हे धन घेऊन आलेत. उजवीकडचा शैव प्रतिहारी आहे. डमरू आणि (बहुधा) त्रिशूळ अशी साधने हातात आहेत.

बाकी अंधारामुळे तुमची बरीच शिल्पे बघायची हुकली म्हणायची.
मंदिरांच्या आत स्तंभांवर भारवाहक यक्ष आहेत. तर बाह्यभिंतींवर नरवराह, भैरव, सरस्वती, हरिती अशा दैवतांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत.

aa

a





No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...