Monday, October 26, 2020

जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया

 

कंबोडियातील वेदिक शिल्पवैभव






कंबोडियाच्या सियाम रीप आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरून बसने हॉटेलवर आलो. येथून जवळच असलेल्या अंगकोर येथे ८०० वर्षांपूर्वी बांधलेल्या हिंदू देवालयांचा शिल्पसमूह तब्बल ७७ चौरस कि. मी. एवढय़ा प्रचंड परिसरात पसरलेला आहे. सॅण्डस्टोन, विटा व लाल-पिवळा कोबा वापरून उभारलेले हे शिल्पांचे महाकाव्य जगातील सर्वात मोठे धार्मिक शिल्पकाम समजले जाते. येथील अद्वितीय शिल्पकलेवर तामिळनाडूतील चोला शैली तसेच ओरिसा शैलीचा प्रभाव जाणवतो. प्राचीन काळापासून इथे खमेर संस्कृती नांदते आहे. आजही येथे ९० टक्के लोक खमेर वंशाचेच आहेत. त्यांची लिपी आणि भाषाही खमेर आहे. अंगकोर ही कंबोडियाची राजधानी होती. सोळाव्या शतकात साहसी युरोपियन प्रवाशांना येथील घनदाट जंगलात भ्रमंती करताना या मंदिरशिल्पांचा अकस्मात शोध लागला. अंगकोर वाट (वाट म्हणजे मंदिर) हे बरेचसे सुस्थितीत असलेले प्रमुख देवालय राजा सूर्यवर्मन (द्वितीय) याच्या कारकीर्दीमध्ये १२ व्या शतकाच्या पूर्वार्धात बांधण्यात आले. या अतिशय भव्य, देखण्या मंदिराला पाच गोपुरे आहेत. यातील मधले उंच गोपूर हे मेरू पर्वताचे प्रतीक मानले जाते. ही मेरू पर्वताची पाच शिखरे (गोपुरे) मध्यवर्ती मानून साऱ्या विश्वाची प्रतीकात्मक स्वरूपात उभारणी होईल अशा पद्धतीने पुढील प्रत्येक राजाने इथले बांधकाम केले आहे. मंदिराभोवतालचे तळे हे क्षीरसागराचे प्रतीक मानले जाते. गुलाबी कमळांनी भरलेल्या तळ्यात मंदिराचे देखणे प्रतिबिंब पाहून मंदिर प्रांगणातील उंच दगडी पायऱ्या चढायला सुरुवात केली. जगातील सर्वात मोठी श्री विष्णूंची आठ हात असलेली भव्य मूर्ती येथे आहे. शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेल्या, खांद्यावरून सिल्कचे सोवळे पांघरलेल्या या मूर्तीची आजही पूजा केली जाते; परंतु या मूर्तीचे मस्तक आता भगवान बुद्धाचे आहे. खमेर संस्कृतीमध्ये हिंदू व बौद्ध या दोन्ही धर्माचा प्रभाव होता. श्री विष्णूचे मूळ मस्तक आता म्युझियममध्ये आहे.
या मंदिराच्या दोन्ही बाजूंच्या लांबलचक ओवऱ्या, त्यावरील सलग, उठावदार, प्रमाणबद्ध कोरीवकामामुळे जगप्रसिद्ध आहेत. सलग ६०० मीटर लांब व दोन मीटर उंच असलेल्या या
पॅनेलवर रामायण व महाभारत यांतील अनेक प्रसंग अत्यंत बारकाईने कोरलेले आहेत. कुरुक्षेत्रावर लढणारे कौरव-पांडवांचे प्रचंड सैन्य, हत्ती, घोडे, रथ व त्यावरील योद्धे, बाणाच्या शय्येवर झोपलेले भीष्म, बाणाने वेध घेणारे द्रोणाचार्य, भूमीत रुतलेले रथाचे चाक वर काढणारा कर्ण, अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करणारा श्रीकृष्ण, हत्तीवरून लढणारा भीम व त्याच्या ढालीवरील राहूचे तोंड असे अनेकानेक प्रसंग कोरले आहेत. पायाला बांधलेल्या उखळीसकट रांगणारा कृष्ण, कृष्णाने करंगळीवर उचललेल्या गोवर्धन पर्वताखाली आश्रय घेणारे गुराखी व गायी, आपल्या २० हातांनी कैलास पर्वत हलविणारा रावण, पार्वतीच्या विनंतीवरून शंकराला बाण मारणारा कामदेव, त्याच्या मृत्यूनंतर रडणारी रती, वाली व सुग्रीव युद्ध, वासुकी सापाची दोरी करून समुद्रमंथन करणारे देव-दानव, त्या समुद्रातून वर आलेले मासे, मगरी, कासवे, आकाशातील सूर्य-चंद्र, कुर्मावतारातील विष्णूने तोलून धरलेला मंदार पर्वत अशा अनेक शिल्पाकृती पाहून आपण विस्मयचकित होतो.
दुसऱ्या बाजूच्या पॅनेलवर सूर्यवर्मन राजाची शाही मिरवणूक आहे. यात प्रधान, सेनापती, प्रजाजन, हत्ती, घोडे, रथ व बासरी, ढोलकी, गाँग वाजविणारे वादक दाखविले आहेत. त्यापुढील पॅनलवर हिंदू पुराणांतील स्वर्ग, नरक, देवदेवता, रेडय़ावरील यमराज दाखविले आहेत. या सबंध मंदिरात मिळून जवळजवळ १८०० अप्सरांची पूर्णाकृती शिल्पे आहेत.  विविध ठिकाणी शंकर, मारुती, गणपती यांच्या छोटय़ा मूर्ती आहेत. हे गणपती दोन हातांचे, सडपातळ व सोंड पुढे वाकलेली असे आहेत. जिथे गणपतीला चार हात आहेत, तिथे मागील दोन हातांत कमल व चक्र आहे.
वास्तुशास्त्राचा अजोड नमुना म्हणून वाखाणलेल्या या देवालयाचे एकावर एक तीन मजले आहेत. लांबलचक कॉरिडॉर्स नि उंच जिन्यांनी ते एकमेकांना जोडलेले आहेत. दुसऱ्या मजल्यावर जाताना भगवान बुद्धाचे उभे व बसलेले वेगवेगळ्या मुद्रांमधील अनेक पुतळे आहेत. गॅलरीच्या दोन्ही बाजूंच्या खांबांवर नागाची शिल्पे आहेत. तिसऱ्या मजल्यावर जाण्याकरता पाच मजली उंच शिडी चढून जावे लागते. तेथील गच्चीवरून या मंदिराची रचना व आजूबाजूचा भव्य परिसर न्याहाळता येतो. मंदिराच्या गॅलऱ्यांचे दगडी खांब एखाद्या लेथवर केल्यासारखे सुरेख वळणावळणांचे आहेत.
अंगकोर थोम (शहर) येथील गुलाबी कमळांच्या तळ्यावरील छोटा पूल ओलांडला की रस्त्याच्या एका बाजूला देव, तर दुसऱ्या बाजूला दानव सात फण्यांच्या नागाचे लांबलचक जाड अंग धरून समुद्रमंथन करताना दिसतात. या नगरीचे प्रवेशद्वार २३ मीटर म्हणजे जवळजवळ सात मजले उंच आहे. त्यावर चारी दिशांना चार तोंडे असलेली भव्य मूर्ती आहे. पायथ्याशी दोन्ही बाजूंना तीन मस्तके असलेला सोंडेने कमळे तोडणारा इंद्राचा ऐरावत आहे. त्यांच्या सोंडा प्रवेशद्वाराचे खांब झाल्या आहेत. अशी पाच प्रवेशद्वारे असलेल्या या शहराचा बराचसा भाग आज जंगलांनी व्यापला आहे.
आठ मीटर उंच व प्रत्येक बाजू तीन किलोमीटर लांब अशी भक्कम लाल कोब्याची संरक्षक भिंत या शहराभोवती उभारण्यात आली होती. त्यापैकी फक्त दक्षिणेकडील भाग आज सुस्थितीत आहे. प्रत्येक कोपऱ्यात उंच देवालय तसेच लोकेश्वर बुद्धाची देवळे आहेत. मुख्य बेयॉन देवालय तीन पातळ्यांवर असून त्यावर ५४ उंच मनोरे आहेत. प्रत्येक मनोऱ्यावर राजाशी साम्य असलेले चार हसरे चेहरे आहेत. फणा उभारलेले नाग, गर्जना करणारे सिंह आहेत. सहा दरवाजे असलेल्या लायब्ररीसारख्या इमारती बऱ्याच ठिकाणी आहेत. त्यावरील पट्टिकांवर कमळे, देवता कोरल्या आहेत. एक आरोग्यशाळा (हॉस्पिटल) आहे. एके ठिकाणी नागाच्या वेटोळ्यावर बसलेली, चेहऱ्याभोवती नागाचा फणा असलेली १२ फूट उंचीची भगवान बुद्धाची पद्मासनात बसलेली मूर्ती आहे. उंच चौथऱ्याच्या खालील बाजूला अप्सरा, चायनीज व खमेर सैनिक, वादक, प्राण्यांची शिकार, शिवलिंग, आई व मूल, बाळाचा जन्म, मार्केटमध्ये भाजी-फळे विकणाऱ्या स्त्रिया, माकडे, कोंबडय़ांची झुंज, मोठा मासा, गरुडावरील विष्णू, नौकाविहार करणाऱ्या स्त्रिया अशी शिल्पे आहेत. एका चौथऱ्याखाली हत्तींची रांग, तर एके ठिकाणी मनुष्यधडाला एकदा गरुडाचे व एकदा सिंहाचे तोंड असलेली अनेक शिल्पे आहेत. पोलोसारखा खेळ खेळताना ते दाखविले आहेत. अगदी खालच्या पातळीवर पाताळातील नागदेवता, जलचर आहेत. नाक तुटलेला, हाताचा अंगठा नसलेला व लिंग नसलेला एक राजा कोरलेला आहे. त्याला ‘लेपर किंग’ असे म्हणतात. जयवर्मन सातवा व जयवर्मन आठवा यांच्या कारकीर्दीत हे शहर उभारले गेले आहे.
दा फ्राम येथील शिल्पकाम जयवर्मन सातवा याच्या काळात बाराव्या-तेराव्या शतकात झाले. येथे त्याने आपल्या आईसाठी यज्ञगृह व ध्यानगृह उभारले होते. भगवान बुद्धाच्या आयुष्यातील विविध प्रसंग इथे कोरलेले आहेत. द्वारपाल, भूमिदेवता, लायब्ररी, नृत्यालय, घोडेस्वारांची मिरवणूक, पुराणातील प्राणी असे सगळे शिल्पकाम गाइडने दाखविल्यावरच आपल्याला दिसते. कारण प्रचंड वृक्षांनी आपल्या मगरमिठीत हे शिल्पकाम जणू गिळून टाकले आहे. सावरीच्या कापसाची झाडे व एक प्रकारच्या अंजिराच्या जातीच्या झाडांनी या बांधकामातील भेगा रुंद करून आपली पाळेमुळे त्यात घुसवून शिल्पांवर कब्जा केला आहे.
बान्ते सरायचा शोध १९३६ साली लागला. गुलाबी सॅण्डस्टोनमधील येथील शिल्पकाम अत्यंत सुबक, शोभिवंत आहे. मूर्तीभोवतीच्या महिरपीवरील नक्षी, कमळे, पाने, फुले, फळे, पक्षी यांनी सुशोभित आहे. नंदीवर बसलेले उमा-महेश्वर, हिरण्यकश्यपूचा वध करणारा नृसिंह, इंद्राचा ऐरावत, सीताहरण, सुंद-उपसुंद यांची लढाई, भीम-दुर्योधन गदायुद्ध, शिवाचे तांडवनृत्य, सिंहरूपातील दैत्यावर नर्तन करणारी दुर्गा, शिवावर बाण मारणारा कामदेव, खांडववनाला लागलेल्या आगीवर पाऊस पाडणारा इंद्र आणि त्या पावसाला अडविण्यासाठी अर्जुनाने उभारलेले बाणांचे छप्पर, कृष्णाने केलेला कंसवध, कुबेर, हंसावरील देवता अशा अनेक देखण्या शिल्पांनी सजलेले छोटे असे हे मंदिर म्हणजे खमेर कलाकुसरीचा उत्कृष्ट नमुना आहे. माकड, गरुड, सिंह, अप्सरा, शंकराच्या मांडीवर बसलेली पार्वती, सज्जे, दरवाजांवरील छज्जे (लिंटल) असे सारे सुंदर उठावदार नक्षीकाम आणि शिल्पकामाने इंच न् इंच भरलेले आहे.
युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून जाहीर केलेल्या इथल्या शिल्पांचे संरक्षण व पुनर्बाधणी करण्यासाठी जपान, चीन, फ्रान्स असे अनेक देश मदत करीत आहेत. भारताच्या पुरातत्त्व खात्यातर्फे येथील दोन मंदिरांत पुनर्निर्माणाचे काम करण्यात येत आहे. परंतु येथील अनेक मूर्ती चोरून विकण्यात आल्या आहेत, तसेच पॉल पॉटच्या कारकीर्दीत त्यांचा विद्ध्वंसही करण्यात आला आहे. अनेक शतके पिचत पडलेल्या कंबोडियाच्या राजवटीने गेल्या दहा वर्षांत आपली दारे जगासाठी उघडली आहेत. या दहा वर्षांत पर्यटनाच्या दृष्टीने अनेक सोयी-सुधारणाही करण्यात आल्या आहेत. सांस्कृतिक आणि आध्यात्मिक समृद्धी असलेल्या कंबोडियाला आपले पूर्ववैभव लवकरच प्राप्त करता येईल अशी आशा करूया.



-------------- लोकसत्ता

 

 

 

 कांभोज देश अर्थात कंबोडिया याबद्दल संदीप कुलकर्णी यांनी दैनिक सकाळ मधल्या पैलतीर सदरात दोन लेख लिहिले होते. सकाळ वर्तमानपत्राचे सदर दुवे कालबाह्य झाले आहेत. म्हणून ते दोन लेख इथे डकवतो आहे.

अशी डकवणी मिपाच्या नियमाविरुद्ध आहे. परंतु नोंद ठेवण्यासाठी या लेखाचा व चर्चेचा उपयोग होईल. तसंच सदर घटनेचा भारताच्या सुरक्षेशी व दीर्घकालीन आंतरराष्ट्रीय धोरणांशी अप्रत्यक्ष संबंध आहे. त्यामुळे सदर डकवणीचा अपवाद करावा ही संपादकमंडळास विनंती. __/\__

----x----x----

लेख क्रमांक १ / २

लेखाचा कालबाह्य मूळ दुवा : http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5285922805981958652&Sectio...(%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B0)

लेखाचा कालबाह्य दुवा जिथे सापडला ती जागा : https://www.misalpav.com/comment/861515#comment-861515

लेख जिथनं उचलला तो स्रोत : https://www.facebook.com/mahadevkoliyuva/posts/359580317563769

कंबोडिया.. एक भयानक सत्य! (पैलतीर)
- संदीप कुलकर्णी

बुधवार, 8 एप्रिल 2015 - 05:15 AM IST
Tags: Pailteer, Cambodia, Pol Pot, Sandeep Kulkarni

मला मुळातच प्रवासाची आवड असल्याने संधी मिळेल तेव्हा पर्यटनाला जातच असतो. व्हिएतनाममध्ये येऊन मला दोन वर्षे होत आली होती. या दोन वर्षांत मी संपूर्ण व्हिएतनाम पिंजून काढला; पण शेजारचा कंबोडिया हा देश मात्र बघायचा राहून गेला होता. पेशाने शिक्षक असल्याच्या अनेक फायद्यांपैकी महत्त्वाचा फायदा हा, की भरपूर फिरता येऊ शकते. कारण, शिक्षक हा वर्षातून साधरणत: 200 दिवसच काम करत असतो. एका आठवड्याचा ‘स्प्रिंग ब्रेक‘ मिळाल्यानंतर मी कंबोडियाचा बेत आखला. ‘गुगल‘वरून माहिती घेतली. त्यावेळी अंगकोरवट येथील विष्णूचे पुरातन मंदिर पाहण्यासारखे आहे, असे समजले. सीम रिप या शहरातील अंगकोरवट मंदिर पाहून पुन्हा व्हिएतनामच्या प्रवासाला निघालो. व्हिएतनाम ते कंबोडिया हा प्रवास बसनेही करता येतो. या प्रवासामध्ये आमची बस एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबली. तिथे एक छोटी मुलगी पुस्तकांचा संच विकण्यासाठी आली होती. ‘एकतरी पुस्तक घ्या‘ अशी विनंती ती करू लागली. त्यामुळे फारसा उत्सुक नसतानाही मी तिच्याकडून एक पुस्तक घेतले. ‘फर्स्ट दे किल्ड माय फादर‘ हे त्या पुस्तकाचे नाव.

सहज म्हणून पुस्तकाचे पहिले पान वाचले आणि चक्रावूनच गेलो. प्रवासातील पुढच्या चार तासांमध्ये ते 240 पानांचे पुस्तक मी वाचून संपवले. कंबोडियामध्ये 1975 ते 79 या कालावधीमध्ये प्रचंड नरसंहार झाला. त्या संहारातून बचावलेल्या एका मुलीची आत्मकथा म्हणजे ते पुस्तक. कंबोडिया म्हटले, की बहुतेकांचे आकर्षण अंगकोरवट हेच असते. माणुसकीला लाजवेल, अशा नरसंहाराकडे मात्र साहजिकच दुर्लक्षच होते. व्हिएतनामला परतल्यानंतर एकाच आठवड्यानंतर मी पुन्हा एकदा कंबोडियाला गेलो. त्या नरसंहाराशी निगडीत असलेल्या ठिकाणांना भेट देऊन त्या भयानक सत्याचा जवळून अनुभव घेतला. त्या भीषण संहारामध्ये चार वर्षांतच 20 लाख नागरिक मारले गेले. त्यातील दहा लाख नागरिकांची तर अमानुष कत्तल झाली आणि उर्वरित लोक भूकबळी किंवा रोगांचे शिकार झाले. त्यावेळी कंबोडियावर खमेर रूज लोकांचे राज्य होते. ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ कंबोडिया‘च्या सदस्यांना ‘खमेर रूज‘ म्हटले जात असे. अंदाजे दहा लाख लोकांची जिथे हत्या झाली, त्यांना आता ‘किलिंग फिल्ड्‌स‘ म्हणतात. येथे ट्रकमध्ये कोंबून माणसांना आणले जात असे आणि त्यांची हत्या करून पुरले जात असे. अशा जवळपास 300 जागा कंबोडियात आहेत आणि त्यापैकी केवळ 85 ‘किलिंग फिल्ड्‌स‘चे उत्खनन झाले आहे. आजही हे काम सुरूच असून मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सतत वाढतच आहे. या 300 ‘किलिंग फिल्ड्‌स‘पैकी सर्वांत मोठी जागा कंबोडियाच्या राजधानीमध्येच आहे. या देशाची राजधानी फुनाम पेन्ह ही आहे. इथे आतापर्यंत दोन हजारांहून अधिक मृतांचे अवशेष सापडले आहेत. या सर्वांत मोठ्या ‘किलिंग फिल्ड्‌स‘ला भेट देण्याचे ठरविले. तत्पूर्वी, ‘खमेर रूज‘ अस्तित्वात आले कसे आणि त्यांनी या हे सर्व का केले, याची थोडक्‍यात माहिती घेऊ.

1953 मध्ये फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कंबोडिया हा देश म्हणून उभा राहत होता. 1970 च्या दशकाच्या सुरवातीस देशात प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला होता. 1970 मध्ये सिंहौक या पंतप्रधानास पायउतार व्हावे लागले. अमेरिकेच्या मध्यस्थीने लॉन नूल या लष्करी अधिकाऱ्याकडे देशाची सूत्रे सोपविण्यात आली. पण तोदेखील या भ्रष्टाचाराला आळा घालू शकला नाही. सामान्य जनतेचा, विशेषत: ग्रामीण भागातील गरीब कंबोडियन जनतेचा सरकारवर आणि सरकारी कर्मचाऱ्यांवरील राग वाढतच होता. भरीस भर म्हणून व्हिएतनाम-कंबोडियाच्या सीमेवर होणाऱ्या अमेरिकी सैन्याच्या बॉम्बहल्ल्यांमुळे तेथील जनता अधिकच संतापली. या सगळ्याचा फायदा घेत ‘कम्युनिस्ट पार्टी‘ने आपले बस्तान बसवले. त्यांचा प्रमुख होता पॉल पॉट. या पक्षाच्या सैनिकांना ‘खमेर रूज‘ म्हणून ओळखले जात असे.

17 एप्रिल 1975 रोजी पॉल पॉटच्या सैन्याने कंबोडियाच्या राजधानीवर सशस्त्र हल्ला करत ताबा मिळवला. यामुळे सुरवातीला अनेकजण आनंदी झाले. पण त्यांचा हा आनंद अगदी काही तासांपुरताच टिकला. कारण, त्या दिवसापासून कंबोडियन जनतेच्या आयुष्यातील सर्वांत भीषण काळाला सुरवात झाली होती. त्या काळात 30 लाख लोकसंख्या असलेले फुनाम पेन्ह हे शहर 48 तासांत रिकामे करण्यात आले. या सर्व शहरवासीयांना बळजबरीने खेड्यांकडे नेण्यात आले. ज्यांनी विरोध केला, त्यांना सरळ ठार केले जात होते. पॉल पॉटने त्याच्या स्वप्नातला कंबोडिया प्रत्यक्षात आणायला सुरवात केली. पॉल पॉटच्या ‘खमेर रूज‘कडे जेमतेम 15,000 सैनिक होते. त्यातही प्रामुख्याने अशिक्षित आणि ग्रामीण भागातील तरुण होते. ‘शहरात राहणारा, शिकलेला, लॉन नूलच्या काळात कोणत्या ना कोणत्या प्रकारे शासनात काम करणारे, शिक्षक, वकील, डॉक्‍टर, इंजिनिअर हे आपले शत्रू आहेत,‘ अशी पॉल पॉटची ‘थिअरी‘ होती. या सर्वांची हत्या करण्याचे पॉटने आदेश दिले. त्यानंतर कोणतीही चौकशी न करता सर्व शिक्षितांच्या हत्या करण्याचे धोरण ‘खमेर रूज‘ने स्वीकारले. त्यामुळे सर्वसामान्य जनता आपली ओळख लपवायला लागली. पण त्याचा फार काही फायदा झाला नाही. एखाद्याकडे पुस्तक सापडणे, हादेखील त्याच्या शिक्षित असण्याचा पुरावा गृहीत धरला जात असे. त्यामुळे लोकांनी आपापली पुस्तके लपवली, जाळली. चष्मे असणाऱ्यांनी आपले चष्मेही फेकून दिले. पण त्यानंतर चष्मा घातल्याने नाकावर उमटणाऱ्या खुणांद्वारे शिक्षित असल्याचा निष्कर्ष काढून लोकांना ठार करण्यास ‘खमेर रूज‘ने सुरवात केली. 1975 ते 1976 या एका वर्षात शहरांत राहणारे जवळपास दोन लाख नागरिक मारले गेले. ‘खमेर रूज‘ने देशाच्या सर्व सीमा बंद केल्याने या कालावधीत कुणीही देशातून बाहेर पळून जाऊ शकत नव्हता. विमानतळ, बस, रेल्वे या सगळ्या सेवा पूर्णपणे बंद केल्या होत्या. मारल्या गेलेल्यांचा दोष एकच.. त्यांना लिहिता-वाचता येत होते किंवा ते शहरात राहत होते.

‘खमेर रूज‘च्या काळात पॉल पॉटने सर्व प्रकारच्या उत्सवांवर बंदी घातली होती. प्रेम, भावना आणि धर्माच्या कुठल्याही गोष्टीवर त्याच्या राज्यात बंदी होती. सर्वांना सारखेच कपडे घालण्याची सक्ती होती. हा ‘गणवेश‘ म्हणजे काळा शर्ट, काळी पॅंट आणि लाल मफलर. ‘शिक्षण घेतल्याने आपली विचारसरणी लोकशाही व स्वातंत्र्यास अनुकूल होते,‘ असे सांगत पॉटने शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ बंद केले. ‘कंबोडियामध्ये सर्वजण फक्त तांदुळाचीच शेती करतील आणि प्रत्येकाला दिवसभरात दोन वाटी भात असाच आहार मिळेल,‘ असाही आदेश लागू करण्यात आला. ‘खमेर रूज‘च्या राज्यात सर्वजण सकाळी 7 ते सायंकाळी 7 शेतात काम करतील, हा नियम होता. या दिनक्रमात दुपारी एका तासाची सुटी असे. ‘दिवसभरात मिळणारे अन्न खाऊन काम करण्याची ताकद आपल्यात असलीच पाहिजे; अन्यथा मरायला तयार राहा‘ असा वटहुकूमच पॉल पॉटने काढला होता. या व्यवस्थेला विरोध करणाऱ्याची हत्या निश्‍चित होती. सर्वांनी एकत्रच राहायचे, असाही आदेश होता. त्यामुळे वैयक्तिक घर, मालकी हक्क वगैरे गोष्टी पूर्णपणे नामशेष झाल्या होत्या. कंबोडियाचे चलनही पूर्णपणे नष्ट झाले होते. पुरुष आणि स्त्रिया वेगवेगळ्या झोपड्यांमध्ये राहायच्या. अशा प्रकारचे अत्याचार सतत चार वर्षे सुरू होते. त्यातच शिक्षित लोक सापडले, की त्यांच्या हत्या करण्याचे सत्रही सुरूच होते. पण या हत्या करण्यासाठी बंदुकीच्या गोळ्या ‘खर्च‘ होत होत्या. त्यावेळी पिकवलेल्या तांदुळाचा मोबदला म्हणून चीनकडून कंबोडियाला शस्त्रास्त्रे मिळत असत. बंदुकीच्या गोळ्या महाग असल्याने ‘मिळेल त्या हत्याराने हत्या करा‘ असा आदेश पॉल पॉटने ‘खमेर रूज‘ला दिला. त्यामुळे ‘खमेर रूज‘च्या सैनिकांनी कुदळ, फावडे, सुरे यांनीही हत्या करण्यास सुरवात केली. ही हत्यारे आजही फुनाम पेन्हमधील वंशसंहाराच्या संग्राहलयात पाहता येतात. यातील बहुतांश हत्या ‘किलिंग फिल्ड्‌स‘मध्ये केल्या जात असत.

फुनाम पेन्हमधील एक एकराच्या ‘किलिंग फिल्ड‘मध्ये गेल्यावर प्रथम मी घाबरलोच. एरवी स्मशानभूमीत जातानाही आपण थोडा विचार करतो. ही स्मशानभूमी तर 20 हजार प्रेतांची आहे आणि या सर्वांना केवळ चार वर्षांतच ठार मारण्यात आले आहे! या ‘किलिंग फिल्ड‘मध्ये एकूण 13 ‘विशेष जागा‘ आहेत. इथे फिरताना आपल्याकडे एक रिमोट दिला जातो. प्रत्येक ‘स्पॉट‘वर गेल्यानंतर या रिमोटने त्या जागेचा क्रमांक दाबला, की ‘रनिंग कॉमेंट्री‘ सुरू होते. प्रत्येक ठिकाणी काय व्हायचे, याचे वर्णन त्यात केले जात असे. तिथे असलेले ‘स्पॉट‘
खालीलप्रमाणे :

ट्रक स्पॉट : ज्यांची हत्या करायची आहे, त्यांना ट्रकमध्ये भरून आणायचे आणि या ‘स्पॉट‘वर उतरवायचे.

डार्क अँड ग्लूमी डिटेन्शन : सहसा येथे दिवसा उजेडी कैद्यांना आणले जात असे. त्यांना रात्री ठार मारले जायचे. दिवसभर त्यांना या अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवले जात असे.

वर्किंग ऑफिस : ज्यांची हत्या होणार आहे, त्यांच्या नोंदी इथे ठेवल्या जात असत.

केमिकल सब्स्टन्स स्ट्रॉंग रूम : मृतदेहांचा वास येऊ नये म्हणून त्यांच्यावर डीडीटी फवारले जात असे. त्याचा साठा या खोलीत असे.

मास ग्रेव्ह 1 : या खड्ड्यात 450 मृतदेह सापडले.
मास ग्रेव्ह 2 : या खड्ड्यात 166 मृतदेह सापडले.
मास ग्रेव्ह 3 : या खड्ड्यात 200 मृतदेह सापडले.
वॉक ऑन द हॉरर लेक : या तळ्यात अनेक मृतदेह फेकले गेले. त्यातील 200 हून अधिक मृतदेह तरंगत होते. तळ्यात असलेले असंख्य मृतदेह अद्यापही बाहेर काढण्यात आलेले नाहीत.
आणि 10 ग्लास बॉक्‍स 1 आणि 2 : येथे ठार मारण्यात आलेल्यांचे कपडे होते.
चायनीज सेरेमोनियल किओस्क

सर्व्हायव्हर स्टोरी
मास ग्रेव्ह 4 : या खड्ड्यात डोके उडवलेले 150 मृतदेह सापडले

या ‘किलिंग फिल्ड‘मधील हृदय हेलावणारी जागा म्हणजे ‘किलिंग ट्री‘! : माणूस किती नीच पातळीपर्यंत जाऊ शकतो, याचा अनुभव इथे उभे राहिल्यानंतर येतो. तान्ही बाळं, एक-दोन वर्षांच्या मुला-मुलींना मारण्यासाठी या झाडाच्या खोडाचा उपयोग केला गेला. लहान मुलांना मारण्याचेही पॉल पॉटने विचित्र समर्थन केले होते. ‘एखाद्या कुटुंबातील एका व्यक्तीला मारले, तर ते संपूर्ण कुटुंब संपवलेच पाहिजे. ही लहान मुले सोडून दिली, तर भविष्यात ते बदला घेऊ शकतील,‘ अशी त्याची धारणा होती. या झाडासमोरील ‘कॉमेंट्री‘ ऐकताना मी नकळतच रडू लागलो होतो. आतापर्यंत शंभराहून अधिक लहान मुलांचे सांगाडे येथे सापडले आहेत. ‘खमेर रूज‘च्या एका अधिकाऱ्याने 2009 मध्ये न्यायालयात या हत्यांची जबाबदारी स्वीकारली. त्याची कबुली या ‘कॉमेंट्री‘मध्ये ऐकता येते. ते ऐकल्यानंतर ‘तो अधिकारी माणूस तरी असेल का‘ हाच प्रश्‍न मनात येतो. माझे अश्रू थांबतच नव्हते. तिथल्या एका पर्यटकाने मला सावरले.

येथील एका झाडाचे नाव ‘मॅजिक ट्री‘ आहे. याला असे का म्हटले जाते, हे समजले नाही. ‘खमेर रूज‘चे सैन्य रात्री हत्या करत असे, तेव्हा ‘ग्लूमी डार्क रूम‘मध्ये डांबून ठेवलेल्यांना किंचाळण्याचा आवाज ऐकू जाऊ नये, म्हणून या झाडावर ध्वनिवर्धक टांगून ‘खमेर रूज‘च्या ‘वैभवशाली‘ परंपरेचे गीत मोठ्या आवाजात लावले जात असे. ‘कॉमेंट्री‘मध्ये ते गीत सुरू झाले, तेव्हा छातीत धडकीच भरली.

शेवटचा ‘स्पॉट‘ म्हणजे ‘मेमोरियल स्तूप‘! उत्खननामध्ये सापडलेले मानवी सांगडे, कवट्या, हाडे हे सर्व काचेच्या एका उंच कपाटात ठेवण्यात आले आहे. त्यात पुरुष, स्त्रिया, लहान मुले, त्यांना कोणत्या पद्धतीने ठार करण्यात आले अशा विविध प्रकारे वर्गीकरण करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वेक्षणानुसार, त्या चार वर्षांमध्ये दर चार कंबोडियन नागरिकांपैकी दोघे मारले गेले.

ही भयानक ‘किलिंग स्पॉट्‌स‘ बघितल्यानंतर मी पॉल पॉटचा खासगी तुरुंग पाहण्यास गेलो. इथे कैद्यांचा अमानुष छळ केला जात असे आणि तेथून ‘किलिंग फिल्ड्‌स‘मध्ये पाठविले जात असे. इथे एक विचार सतत मनात येतो.. आपल्याच देशातील नागरिकांचा बळी घेणाऱ्या ‘खमेर रूज‘च्या सैनिकांची माणुसकी चार वर्षांसाठी इतक्‍या खालच्या थरास कशी गेली? आतापर्यंतच्या वाचनानुसार, माझे मत असे होते की जर्मनीत हिटलरने केलेला नरसंहार हा ठाऊक असलेल्या सर्वांत मोठा आणि भयानक होता. पण कंबोडियात पॉल पॉटने केलेला संहार हिटलरपेक्षा कैकपटीने मोठा आणि भीषण होता. या संहारामध्ये ज्यांनी मारले आणि मेले ते एकाच देशाचे नागरिक होते. त्यांचा धर्म, भाषा, त्वचेचा रंग, संस्कृतीही वेगळी नव्हती. फरक एवढाच, की मारले गेले ते शिकलेले होते आणि ज्यांनी मारले ते अशिक्षित. मी स्वत: व्यवसायाने शिक्षक असूनही पहिल्यांदाच असे वाटले, की शिक्षणानेही आपला जीव जाऊ शकतो. त्या काळात कंबोडियातील जनता शिकली नसती, तर कदाचित त्यांचे जीव वाचलेही असते, हा विचारही तरळून गेला. आयुष्यात प्रथमच मला अशिक्षित असण्याचा ‘फायदा‘ जाणवत होता.

(क्रमश:)

----x----x----

लेख क्रमांक २ / २

लेखाचा कालबाह्य मूळ दुवा : http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5542758527589600251&Sectio...(%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%202)%20(%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B0)

लेखाचा कालबाह्य दुवा जिथे सापडला ती जागा : https://www.misalpav.com/comment/862389#comment-862389

लेख जिथनं उचलला तो स्रोत : http://granthalayat.blogspot.com/2015/04/blog-post_29.html

कंबोडिया.. एक भयानक सत्य (भाग २) - संदीप कुलकर्णी
------------------------------------------
कंबोडिया.. काहीसा दुर्लक्षित आणि बराचसा अनोळखी देश.. सध्या व्हिएतनाममध्ये वास्तव्यास असलेले ‘सकाळ‘चे वाचक संदीप कुलकर्णी यांनी पर्यटनाच्या निमित्ताने कंबोडियाला भेट दिली. अंगकोरवट येथील पुरातन मंदिर पाहून परतताना एका लहानग्या विक्रेत्या मुलीने त्यांना एकतरी पुस्तक विकत घेण्याची विनंती केली.. तिचं मन राखण्यासाठी संदीप यांनी एक पुस्तक घेतलं.. ‘फर्स्ट दे किल्ड माय फादर‘ हे ते पुस्तक..! कंबोडियात १९७५ ते १९७९ या चार वर्षांच्या कालावधीत २० लाख नागरिकांची कत्तल झाली.. त्या नरसंहारातून बचावलेल्या एका मुलीची ती आत्मकथा वाचून संदीप कुलकर्णी यांनी मग कंबोडियाचा ‘तो‘ काळा इतिहास वाचून काढला, संबंधित ठिकाणांना भेट दिली आणि त्यातील अनुभव ‘पैलतीर‘साठी शब्दबद्ध केले. हा या मालिकेतील दुसरा आणि अखेरचा भाग.
------------------------------------------

'किलिंग फील्ड‘ बघून मी ‘एस-२१‘कडे निघालो.. ‘एस-२१‘ हा प्रत्यक्षात तुरुंग नसून ती एक शाळा होती. ही त्या काळातील सर्वांत मोठी सरकारी शाळा होती. यात तीन मोठे ब्लॉक आणि प्रत्येक ब्लॉकमध्ये तीन मजले आहेत. प्रत्येक मजल्यावर पाच वर्गखोल्या आहेत. पहिल्या मजल्यावरील वर्गांत साधारणत: ६० ते ७० कैद्यांना दिवसभर डांबून ठेवले जात असे. दिवसभरात सर्व कैद्यांना फक्त मारहारणच केली जात असे. हे वर्ग जसेच्या तसे ठेवण्यात आले आहेत. अजूनही त्या वर्गांमध्ये भीषण अत्याचाराच्या खुणा आढळून येतात. या तुरुंगात चार वर्षांत ३०,००० कैद्यांना डांबून ठेवल्याची नोंद आहे. एकदा ‘एस-२१‘मध्ये रवानगी झाली, की मृत्यू अटळच! या तुरुंगात रवानगी होऊनही केवळ नशीब बलवत्तर असल्याने सात जण वाचले. यापैकी दोघांना पाहण्याचा योग आला होता. योगायोगाने, मी गेलो त्याच दिवशी ‘हिस्टरी चॅनेल‘तर्फे तिथे चित्रिकरण सुरू होते. ‘एस-२१‘मधून बचावलेल्यांपैकी दोघे जण त्या चित्रिकरणासाठी आले होते. ‘क्रूर अत्याचार होणारी जागा‘ म्हणूनच या तुरुंगाची ओळख आहे. वर्गातील फळ्यांचा उपयोग कैद्यांची नावे लिहिण्यासाठी केला गेला होता. मी शिक्षक आहे. ‘भावी नागरिक घडविणारी‘ शाळा हीच नागरिक संपविण्यासाठी वापरली गेली, हे बघून मी पुन्हा हताश झालो. सकाळपासून ‘किलिंग फील्ड्‌स‘ आणि ‘एस-२१‘ तुरुंग पाहिल्यानंतर एक प्रश्‍न सतत मनात येत होता. तो म्हणजे, त्या चार वर्षांत कंबोडियामध्ये सुरू असलेल्या या विचित्र गोष्टींचे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर काय पडसाद उमटत होते?

या प्रश्‍नाचं उत्तर ‘एस-२१‘मधील दोन नंबरच्या ब्लॉकमध्ये मिळाले. हा ब्लॉक म्हणजे त्या काळातील छायाचित्रांचा संग्रह आहे. लेखाच्या पहिल्या भागात नमूद केल्याप्रमाणे, पोल पोटने कंबोडियाच्या सर्व सीमा बंद केल्या होत्या. त्यामुळे बाह्य जगाशी कंबोडियाचा संपर्क पूर्णपणे तुटला होता. कुणीही देशाबाहेर जाऊ शकत नव्हता. अशा पद्धतीने देश चालविणे अवघड जाईल, हे कालांतराने पोल पोटच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने स्वीडनमधील कम्युनिस्ट पक्षाशी संपर्क साधून त्यांच्या नेत्याला कंबोडियामध्ये येण्याचे निमंत्रण दिले. १९७८ मध्ये तब्बल चार वर्षांनंतर कंबोडियामध्ये बाहेरील देशातून पहिली व्यक्ती आली. ही व्यक्ती म्हणजे गर्नर बर्गस्त्रोम.. हा नेता दोन दिवस नोम पेनमध्ये थांबला. त्याच्यासाठी ‘खमेर रूज‘च्या अधिकाऱ्यांनी खास मेजवानीचा बेत आखला होता. सर्वत्र ‘शेतात काम करणारे‘ नागरिक त्याला दाखविण्यात आले. ‘कंबोडियाची वाटचाल एका शेतीप्रधान समाजाकडे सुरू असून सर्वजण आनंदी आहेत,‘ असे ‘खमेर रूज‘कडून भासविण्यात येत होते. या समाजबांधणीच्या नव्या प्रयोगात थोडेफार विरोधक असतीलच, त्यांची हत्या झाली; पण ती संख्या थोडीशीच होती आणि देशात सर्व आलबेल आहे, अशी त्याची खोटी समजूत काढण्यात आली. युरोपमध्ये परतल्यानंतर बर्गस्त्रोमने पोल पोट आणि ‘खमेर रूज‘चे कौतुक केले आणि संयुक्त राष्ट्रसंघामध्ये ‘कंबोडियाचा नेता‘ म्हणून पोल पोटचे स्थान पक्के झाले. हे सर्व वाचल्यानंतर मी राग येण्याच्या पलीकडच्या अवस्थेत जाऊन पोचलो.

अक्षरश: जड पावलांनी ‘एस-२१‘च्या बाहेर येऊन टॅक्‍सीने मी हॉटेलवर पोचलो. रात्रीच्या जेवणासाठी भारतीय रेस्टॉरंटचा शोध घेतला आणि पटकन जेवण आटोपून ‘पोल पोटचा शेवट कसा झाला‘ याचे वाचन करण्याचे ठरवले. पलीकडच्या टेबलवर असलेल्या दोन भारतीयांकडे बघून स्मित हास्य केले. त्यांनीही प्रतिसाद दिला आणि आमची चर्चा सुरू झाली. ते पुण्याचे आहेत हे समजल्यावर इंग्रजीतून सुरू झालेले संभाषण पटकन मराठीत आले. त्या भेटीमुळे स्वत:ला खूपच नशीबवान समजतो. कारण, त्या रेस्टॉरंटमध्ये ज्यांच्याशी ओळख झाली, ते भागवत कंबोडियामध्ये गेली दहा वर्षे एका स्वयंसेवी संस्थेतर्फे अहिंसा प्रसाराचे काम करतात. कंबोडियाच्या इतिहासातील माझी गोडी जाणून त्यांनी ‘खमेर रूज‘मध्ये काम केलेल्या सैनिकाची मुलाखत घ्यायला आवडेल का, असे विचारून माझा आनंद त्यांनी द्विगुणित केला. मला तर हे हवेच होते. मी लगेच होकार दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता पुन्हा भेटण्याचे ठरले. ‘त्या व्यक्तीला काय विचारावे‘ अशा अनेक प्रश्‍नांनी रात्रभर मनात गोंधळ चालू होता. त्या भेटीच्या उत्सुकतेपोटी मला नीट झोप लागलीच नाही.

सकाळी ११ वाजता ठरलेल्या ठिकाणी आम्ही भेटलो. ती व्यक्ती तशी वयस्करच होती. मेंग उन हे त्यांचे नाव. आता भागवत हे अस्सल कंबोडियन भाषेत बोलू शकतात. ते आणि त्यांचे सहकारी मनोज यांनी आमच्या मुलाखतीमध्ये द्विभाषिकाची भूमिका पार पाडली. मेंग उन ‘खमेर रूज‘मध्ये काम करत होते, तरीही त्यांना कधीच कुणाला ठार मारण्याचे काम आले नव्हते. केवळ बळजबरीमुळे त्यांना ‘खमेर रूज‘मध्ये सामील व्हावे लागले. पोल पोट तसा त्यांच्या कामावर खुश होता. कारण, त्या काळात प्रामुख्याने मासे मिळण्याचे ठिकाण हे मेंग उन यांचे गाव असल्याने त्या गावातील खूपच कमी लोक मारले गेले होते. पण त्यांच्यासमोर होणाऱ्या हत्या मेंग उन कधीच रोखू शकले नाहीत. केवळ दु:ख व्यक्त करण्यापलीकडे त्यांच्या हाती काहीच नव्हते. ते स्वत: शिक्षित होते. तरीही चार वर्षे त्यांनी ओळख लपवून ठेवली. त्यांनी आपले बायबलदेखील एक वर्ष लपवून ठेवले. पण ‘खमेर रूज‘च्या सैनिकांना संशय आला, तेव्हा मेंग उन यांनी सगळ्यात आधी ते बायबल फाडून फेकून दिले. त्यांची दोनदा चौकशीही झाली. त्यांच्या गावातील ‘खमेर रूज‘चा अधिकारी थोडा माणुसकी जपणारा असल्याने ते थोडक्‍यात बचावले. दुसऱ्या चौकशीदरम्यान त्यांना आपला मृत्यू अटळ आहे, असेच वाटले होते. १९७७ नंतर प्रत्येक दिवस हा शेवटचाच, असे म्हणत ते जगले. आपली खरी ओळख कधीही ‘खमेर रूज‘ला कळेल, अशी त्यांची खात्री होती. त्या दरम्यान त्यांनी आपल्या कुटुंबालाही याची जाणीव करून दिली होती. हा प्रसंग ऐकताना नकळत माझ्या अंगावर शहारे आले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, ‘धर्मग्रंथ आपला जीव घेऊ शकतो‘ हे मानणे मला तर फारच जड गेले.

‘खमेर रूज‘चा अस्त!

१९७८ च्या डिसेंबरमध्ये पोल पोटने पारंपरिक शेजारी आणि शत्रू असलेल्या व्हिएतनामला विनाकारण डिवचण्यास सुरवात केली. ही पोल पोटची सर्वांत मोठी चूक होती. पण ही चूक कंबोडियन जनतेच्या पथ्यावर पडली. खऱ्या अर्थाने, पोल पोटच्या साम्राज्याचा अस्त व्हिएतनाममुळेच झाला, असे म्हणावे लागेल. डिवचल्याने चिडलेल्या बलाढ्य व्हिएतनामच्या सैन्याने कंबोडियावर आक्रमण केले. व्हिएतनामच्या सशस्र आणि शक्तिशाली सैन्यासमोर ‘खमेर रूज‘च्या निभाव लागलाच नाही. १५ ते २० दिवसांत ‘खमेर रूज‘मध्ये फूट पडली. येथील काही अधिकारी व्हिएतनामच्या सैन्यास जाऊन मिळाले. पोल पोटसह त्याचे काही निष्ठावंत थायलंड सीमेजवळील जंगलात पळून गेले.
अशा प्रकारे ७ जानेवारी, १९७९ रोजी व्हिएतनामचे सैन्य नोम पेनमध्ये घुसले आणि कंबोडियामधील भीषण अवस्था जगासमोर आली. ‘एस-21‘मधील सडलेल्या मृतदेहांची छायाचित्रे व्हिएतनामच्या सैनिकांनी प्रसिद्ध केली. आजही ही छायाचित्रे ‘एस-21‘मध्ये आहेत. पुढील एक-दोन वर्षांत संपूर्ण जगाला याची ओळख होऊ लागली. बळजबरीने खेडेगावात पाठवलेले नागरिक पुन्हा शहरात दाखल होऊ लागले. आता संपूर्ण कंबोडिया व्हिएतनामच्या अधिपत्याखाली होता. ‘खमेर रूज‘कडून फुटलेल्या काही अधिकाऱ्यांकडेच देशाची सूत्रे सोपविण्यात आली. याचा परिणाम व्हायचा तोच झाला..

पोल पोटला कधीच शिक्षा झाली नाही..

संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये पोल पोटविरुद्ध खटला सुरू झाला. ‘खमेर रूज‘च्याच अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या कंबोडिया सरकारने पोल पोटच्या विरोधात कधीच सशक्त पुरावे दिले नाहीत. १९९८ पर्यंत पोल पोट थायलंड जवळील जंगलात पत्नी, एक मुलगी आणि त्याच्या काही निष्ठावंतांसोबत राहत होता. १९९० पर्यंत पश्‍चिम कंबोडियाच्या जंगलात लपून त्याच्या कारवाया सुरू होत्या. कंबोडियाच्या नव्या सरकारने पोल पोटवर कधीच सरळ खटला भरला नाही. त्यामुळे हा क्रूरकर्मा व्यवस्थित आपले जीवन जगत होता. १५ एप्रिल, १९९८ रोजी वयाच्या ८५ व्या वर्षी हृदयविकाराने पोल पोटचा झोपेतच मृत्यू झाला. आज त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या चार अधिकाऱ्यांवर नावापुरता खटला चालू असून आता फक्त दोषारोपाचा खेळ सुरू आहे.
या सर्वांनंतर माझ्या मनातून दोन विचार जातच नव्हते. एक म्हणजे, लहानपणी शाळेत आणि घरीही मोठ्यांकडून शिकवली गेलेली म्हण.. ‘जैसी करनी, वैसी भरनी‘ ही म्हण पोल पोटच्या बाबतीत पूर्णपणे खोटी ठरली. त्याला त्याच्या कर्माची फळे मुळीच भोगावी लागली नाहीत. त्याला साधे तुरुंगातही जावे लागले नाही. १९९० पासून त्याला त्याच्या राहत्या घरातच नजरकैदेत ठेवण्यात आले. यापेक्षा कंबोडियाचे दुर्दैव ते कुठले!

दुसरे म्हणजे, केवळ हिंसेच्या बळावर मिळविलेले ‘पोल पोट‘चे साम्राज्य केवळ चारच वर्षे टिकले. केवळ हिंसेच्या बळावर मिळालेली सत्ता किंवा यश हे कधीच कायमस्वरूपी नसते, याची प्रखर जाणीव झाली. अर्थपूर्ण यश मिळवायचे असेल, तर अहिंसा हा महत्त्वाचा मार्ग असतो आणि हिंसेचा मार्ग चुकीचाच असतो, हे कंबोडियाचा भयानक इतिहास समजल्यानंतर अधिकच प्रकर्षाने जाणवू लागले. नकळतच, भारताला अहिंसेच्या मार्गाने मिळालेल्या स्वातंत्र्याचे महत्त्व वाटू लागले. आपल्या प्रगल्भ लोकशाहीचे गुपित निश्‍चितच गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गात आहे, याची मला प्रकर्षाने जाणीव होऊ लागली. एका सशक्त आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व किती महत्त्वाची भूमिका बजावू शकते, याचाही प्रत्यय आला. त्या काळात दुर्दैवाने कंबोडियामध्ये सशक्त नेतृत्वाचा अभाव असल्याने तो देश अमानवीय काळाकडे लोटला गेला, असा माझा निष्कर्ष होता. शेवटी ‘दे दी हमें आझादी बिना खडक बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमाल‘ हे बोल नकळत ओठांवर आले आणि कंबोडियाच्या अद्‌भूत भेटीमुळे एका नव्या प्रेरणेने मी ‘अहिंसा‘ या विषयाकडे पाहण्यास सज्ज झालो...

- सकाळ (पैलतीर)
दि. २९/०४/२०१५, बुधवार

पॉल पॉट विषयी एक लेख वाचनात आला : https://www.misalpav.com/node/36734

त्यातनं पुढे विचारचक्र सुरु झालं. थोडी माहिती मिळवली. पूर्वी इथे म्हंटल्याप्रमाणे पॉल पॉटने ही हत्याकांडं घडवलेली नाहीत. हे अमेरिकी हल्ल्यांमुळे झालेले मृत्यू आहेत. कुठल्याशा शाळेत म्हणे फळ्यावर नावं लिहून २०००० ( वीसहजार ) लोकांना ठार मारलं. काय बकवास आहे? इथे त्या शाळेत २००० ( दोन हजार ) तरी लोकं मावतील का ? मग २०००० कुठून कोंबायची? आणि त्यांतल्या काहींना ठार मारण्यासाठी फळ्यांवर नावं लिहायचा द्राविडी प्राणायाम कशासाठी?

एक साधा विचार करून पहा. पॉल पॉट आपल्याच लोकांना कशासाठी ठार मारेल? त्याचा काय फायदा त्यात? की अमेरिका कांभोजांना ठार मारेल? तिची निरपराध्यांचा जनोच्छेद ( = genocide ) करायची खाज हिरोशिमा, नागासाकी, कोरिया युद्ध, व्हियेतनामवरील आक्रमण इत्यादिंतनं पुरेशी स्पष्ट झालेली आहे ना ? काय खरं वाटतं ?

इथे कंबोडियाविषयी दोन लेख नोंदवले आहेत : https://www.misalpav.com/node/49427

तर उपरोक्त तीनही लेखांत पॉल पॉट क्रूरकर्मा म्हणून रंगवलाय. प्रत्यक्षात तसं अजिबात नाहीये. कसं ते पाहूया.

पहिल्याप्रथम मला माहित असलेला घटनाक्रम व तदनुषंगिक मतं देतो.

०१.
१९६२ / ६३ पासनं ख्मेर रूज नावाच्या लहानशा क्रांतीवादी गटाची स्थापना होऊन छोटीशी चळवळ सुरू झाली. पॉल पॉट हिचा कम्युनिस्ट नेता होता. ही चळवळ कंबोडियाचे राजे नरोत्तम सिंहनौक यांच्या विरोधात होती.

०२.
१९६५ साली अमेरिकेने व्हियेतनाममध्ये भूदल सैन्य घुसवलं. ज्याला ग्राउंड वॉर म्हणतात ते सुरु झालं. अमेरिकी सैनिक व्हियेतनामच्या जमिनीवर प्रत्यक्षांत उतरले.

०३.
सुमारे ३ वर्षं मनाजोगती प्रगती झाली नाही म्हणून तटस्थ कंबोडियात सैन्य घुसवायची परवानगी सिंहनौक यांच्याकडे मागितली. ती राजाने नाकारली. परिणामी अमेरिकेने लोन नोल या सेनानीस हाताशी धरून सिंहनौक यांना पदच्युत केलं. पुढे कंबोडियाच्या भूमीवर जबरदस्त बॉम्बफेक सुरू केली. सोबत मनसोक्त एजंट ऑरेंज फवारला. भरीस भर म्हणून अगणित भूसुरुंग पेरले. या हल्ल्यांची राजे सिंहनौकना कल्पना दिली होती. पण ते बलहीन असल्याने काही करू शकले नाहीत.

किसिंजरने या भीषण हल्ल्याचं समर्थन केलं. व्हियेतनामी सैन्य कंबोडियाचा आसरा घेत होतं, म्हणून अमेरिकेस हस्तक्षेप करावा लागला.

हे महाभयानक हल्ले १९७३ पर्यंत म्हणजे सुमारे ४ वर्षं चालू राहिले.

०४.
या हल्ल्यांमुळे ख्मेर रूज घाबरून गेले नाहीत. त्यांनी चिवटपणे कार्य चालू ठेवलं. तिहेरी अमेरिकी हल्ल्यांमुळे जनता उद्ध्वस्त झाली. खायला दाणा मिळेना व आसमंतात एजंट ऑरेंजचं विष भिनून राहिलं होतं. सर्वत्र भूसुरुंग पेरलेले होते. तरीपण खेर रूजने मिळेल तिथे धान्य पिकवणं चालूच ठेवलं.

परिणामी एका चिमुकल्या गटाचं विशाल लोकचळवळीत रुपांतर झालं. खेर रूज ने १९७५ साली राजधानी नोम पेन वर ताबा मिळवला. लोन नोल ची व त्याच्या पाठीराख्यांची हाकलपट्टी झाली. अमेरिकी हल्ले १९७३ सालीच थांबले होते ( निक्सनच्या सौजन्याने ).

०५.
या प्रयत्नांनी प्रभावित होऊन राजे सिंहनौक यांनी ख्मेर रूजला १९७५ साली पाठिंबा जाहीर केला. कम्युनिस्ट चळवळीस राजाचा पाठिंबा मिळाल्याची घटना जगात कुठेही घडली नाहीये. म्हणजेच पॉल पॉट हा राजमान्य व लोकमान्य नेता होता. पण अमेरीकामान्य नव्हता. हाच त्याचा गुन्हा. पुढे १९७६ साली लोकतांत्रिक कांभोजाची ( Democratic Kampuchea ) स्थापना झाली.

०६.
अमेरिकेच्या सततच्या हल्ल्यांमुळे ग्रामीण भाग पूर्णपणे बेचीराग झाला होता. त्यामुळे अन्न गिळायला प्रत्येकजण शहराकडे धावंत होता. शहरे प्रमाणाबाहेर फुगली. त्यातंच शहरांवर बॉम्बफेक होणार अशी आवई उठली. म्हणून सुरक्षेसाठी पॉल पॉट ने लोकांना ग्रामीत भागाकडे हलवायचं धोरण राबवलं. ग्रामीण भागात जिथे विषमुक्त जमीन मिळेल तिथे भातशेती सुरु केली. कंबोडियाने कुणाकडेही मदतीसाठी हात पसरले नाहीत.

अशीच सुमारे तीनेक वर्षं गेली.

०७.
१९७८ साली ख्मेर रूज यांच्या व्हियेतनामच्या सैन्याशी चकमकी झडल्या ( बहुधा सीमावादावरनं ). त्यातनं व्हियेतनामने कंबोडियावर आक्रमण केलं. क्षेत्रफळाने छोटा देश असला तरी व्हियेतनामी सैनिक अतिशय कडवे लढवय्ये होते. ख्मेर रूज त्या मानाने लढाईत यथातथाच होते. परिणामी त्यांना कंबोडिया सोडून सयामच्या जंगलात आसरा घ्यावा लागला.नोम पेन मध्ये परत एकदा सत्तापालट झाला व १९७९ साली कांभोज लोकप्रजासत्ताकाची ( People's Republic of Kampuchea ) स्थापना झाली. याच्या मागे व्हियेतनामी कम्युनिस्ट होते, व त्यांच्या मागे चिनी कम्युनिस्ट होते.

आज युरोप अमेरिकेत निर्वासितांचं अमाप पीक फोफावलं आहे. पण १९७८ च्या आधी 'कंबोडियन निर्वासित' हा पदार्थ कधी कोणी बघितलाय वा ऐकलाय तरी का ? नाही ना ? याला म्हणतात राष्ट्रीय स्वाभिमान. तो पॉल पॉट ने जोपासला. त्याला हुसकावून लागल्यावर कांभोजी निर्वासितांची रीघ लागली.

०८.
हा प्रयोग फारकाळ चालला नाही. कांभोज लोकप्रजासत्ताक कंबोडियात घुसलेल्या व्हियेतनामी सैन्याच्या जोरावर टिकून होतं. नाही म्हणायला ख्मेर रूजचा एक ( फुटीर ? ) गटही सरकारात सामील होता. या नाममात्र सहभागास सोव्हियेत संघ, अमेरिका, चीन व संयुक्त राष्ट्रासंघातल्या इतर काही देशांचा पाठिंबा होता. या देशांच्या जोरावर संयुक्त राष्ट्रसंघातली ख्मेर रूज ची जागा राखून ठेवण्यात आली.

सगळ्या आक्रमणांचं होतं तेच व्हियेतनामी आक्रमणाचं झालं. त्यांना १९८९ साली कम्युनिझम कोसळल्याचं निमित्त होऊन त्यांना परत जावं लागलं. पुढे १९९१ साली सोव्हियेत साम्यवाद पूर्णपणे मोडीत निघाला. नंतर हे आघाडी सरकारही संपलं. १९९३ साली कांभोजची नवीन घटना तयार केली गेली. तीत शासन लोकशाही असून राजा नामधारी राहणार होता.

०९.
त्याआधीच १९८१ साली पॉल पॉट ने कंबोडिया कम्युनिस्ट पक्ष विसर्जित केला होता. त्याच वेळी ख्मेर रूजचं नेतृत्वही सोडलं. यापुढे तो फक्त मार्गदर्शक ( = mentor ) म्हणून राहणार होता. ख्मेर रूज मध्येही अनेकदा फाटाफूट झाली. आंतरराष्ट्रीय पाठिंबा १९९३ च्या नव्या घटनेच्या मार्गाने सत्तेत आलेल्या सरकारास होता. नव्या घटनेनुसार राजा आणि प्रजा एक झाले होते. साहजिकंच ख्मेर रूज ही दखलपात्र शक्ती उरली नाही.

१०.
पुढे १९९८ साली प्रकृती बिघडल्याने व हृत्शूल झटक्याने पॉल पॉट निधन पावला. काही जण म्हणतात की त्यास विष घातलं. काही म्हणतात की कुणी फितूर त्याला अमेरिकेकडे सुपूर्द करणार होते, म्हणून त्याआधीच स्वत:च विषप्राशन करून जीवन संपवलं.

असो.

पॉल पॉट व ख्मेर रूज यांचं खरं योगदान अमेरिकी हल्ल्यातनं कांभोज जनतेस परत स्वावलंबी बनवण्यात आहे.

---------x---------x---------

घटनाक्रम समाप्त. आता माझी मतं लिहितो.

---------x---------x---------

०१.

अमेरिकी हल्ल्यांची भीषण तीव्रता

एजंट ऑरेंजच्या परिणामांची नयनरम्य चित्रे खरंतर इथेच डकवणार होतो, पण धागा उडायचा. मात्र दुवा द्यायला हरकत नाही : https://www.google.co.uk/search?q=agent+orange+deformities&source=lnms&tbm=isch&sa=X

आवडल्या सुंदरसुंदर प्रतिमा ? आता अमेरिकेने टाकलेल्या नापाम बॉम्बमुळे भाजलेल्या शरीराची चित्रे पहा : https://www.google.co.uk/search?q=napalm+burns++&tbm=isch

झालं की नाही मन प्रसन्न ?

आता अमेरिकेची पुढची भेट पाहूया. कंबोडिया हे अज्ञात भूसुरुंगांचं जगातलं सर्वात मोठं क्षेत्र आहे. हे सुरुंग काय पॉल पॉट ने हा#न मिळवले का? नाही बरं. ही किनई अमेरिकेची कृपा आहे. इथे माणशी ३००+ भूसुरुंग आहेत. जायचं का भात लावायला शेतात ? लावला भात अन गमावला हात. कसं वाटतंय ?

किसिंजरचा ३०००००० ( अक्षरी तीस लाख ) टनांचा बॉम्बवर्षाव, ९५००० ( अक्षरी पंच्याण्णव हजार ) टनांचा एजंट ऑरेंज चा लोटलेला महापूर आणि ७००००००+ ( अक्षरी सत्तराधिक लाख ) भूसुरुंग उघड व्हायची वेळ आली. मग काय द्या सगळ्या हत्या पॉल पॉट च्या नावावर लोटून. कंबोडियाचा अधिकृत इतिहास हा शुद्धतम बकवास आहे.

मार्गारेट थाचरच्या सरकारने अमेरिका ख्मेर रूजला पाठिंबा देत असल्याचं स्वीकृत केलं. पण अमेरिका पॉल पॉट च्या ख्मेर रूज ला का प्रशिक्षण देत होती? कारण की व्हियेतनामी सैन्याने अमेरिकेच्या नाकी नऊ आणले होते. व्हियेतनाम तर १९७६ साली हातनं गेलाच होता. नंतर कंबोडियाही गेला असता. म्हणजेच जोवर कामाचे आहेत, तोवर ख्मेर रूज ला मदत करायची आणि युद्धगुन्हे उघडकीस येऊ लागले की पॉल पॉट वर ढकलून द्यायचे.

कंबोडियावर अत्याचार करणारे खरे गुन्हेगार कोण आहेत ते कळलं ना ? त्याच्या म्होरक्याचं नाव हेनरी किसिंजर. या माणसाला १९७३ साली शांततेचं नोबेल मिळालं.

---------x---------x---------

०२.

किसिंजर काकांची भेटवस्तू

कंबोडियातल्या लोकांनी किसिंजरचं वा अमेरिकेचं काय वाकडं केलं होतं? काहीच नाही. अशांवर निर्घृण अत्याचार करतांना किसिंजरास काय वाटलं? काहीही नाही. हा माणूस नव्हे नरपशू आहे.

कल्पना करा तुमचा लहानगा खेळंत खेळंत घराबाहेर अंगणात गेलाय. तिथे त्याला किसिंजर काकांनी आकाशातनं टाकलेली भेटवस्तू मिळते. वस्तू रंगीबेरंगी व आकर्षक असते. मिकी माऊस किंवा डोनाल्ड डक सारखी दिसणारी असते. म्हणून तुमचं बालक ती वस्तू खेळायला घेतं. तेव्हा त्यावर एक बटण दिसतं. तुमचं बालक ते बटण मोठ्या उत्सुकतेने दाबतं. कसलासा आवाज येतो आणि आतमधून उकळतं तांबं तुमच्या बाळाच्या अंगावर फस्सकन पसरतं. बाळ भयाण किंकाळी मारतं. आईस तोवर त्याचा पत्ताही नसतो. कुठूनतरी ती येते तोच तिला मांसाचा लालबुंद गोळा तडफडत पडलेला दिसतो. किती रम्य दृश्य नाही? आवडलं तुम्हांस? तुमचं बाळ भाग्यवान असेल तर ते मरेल.

अन्यथा तुमच्या मुलाला मांस चरचरत गेलेले व्रण किंवा तुटलेले वेडेवाकडे अवयव किंवा फुटलेला डोळा वगैरे परम सौख्य लाभेल. रम्य ते बालपण नाहीका ? मग बालपणाची आठवण आयुष्यभर राहायला हवी किनई ! इतक्या रम्य बालपणासाठी थोडीशी रडारड झाली तर इतका गहजब कशापायी ? किसिंजर काका किती दयाळू आहेत ते कळलं ना ? केव्हढ्या प्रेमाने त्यांनी ही खास भेटवस्तू पाठवली होती तुमच्या लाडक्या बाळासाठी. फक्त तिच्यावर नाव नव्हतं लिहिलेलं तुमच्या बाळाचं.

कंबोडियातल्या दर २३६ पैकी एकाचा डोळा वा हातपाय नष्ट झालाय ( इंग्रजी लेख ) : https://www.deseret.com/1995/9/7/19195945/cambodia-land-of-mines-and-amputees
४० ते ६० लाख भूसुरुंग अज्ञातावस्थेत ( = undetected ) आहेत.

दोन्ही प्रमाणं जगातली सर्वोच्च बरं का.

---------x---------x---------

०३.

एजंट ऑरेंज व त्याचे धागेदोरे

एजंट ऑरेंज मुळे विकृत बालकं जन्माला येतात. वर प्रतिमांसाठी दुवा दिला आहे. परत देतो : https://www.google.co.uk/search?q=agent+orange+deformities&source=lnms&tbm=isch&sa=X

वाचकहो, एक गोष्ट जाणवली असेल. ती म्हणजे यातल्या जवळजवळ सर्व प्रतिमा हिंदचिनी ( = indo-chinese ) चेहऱ्यांच्या आहेत. म्हणजेच जगात इतरत्र कुठे झाली नसेल इतकी भीषण हानी अमेरिकेने कंबोडिया, व्हियेतनाम व लाओस ची केलीये. त्याची पावती मात्र पॉल पॉट च्या नावे फाडायची. खासा न्याय आहे !

एजंट ऑरेंज मुळे वनस्पतींचा सर्वनाश होतो. अशा ठिकाणी गिळायचं काय ? ४ वर्षांत तब्बल ९५००० टन ( अक्षरी पंच्याण्णव हजार टन ) फवारल्यावर जमिनीचं काय खोकडं होईल ? तरीही पॉल पॉट ने भीक मागितली नाही. उरल्या सुरल्या जमिनीत भात लावला व कंबोडियास स्वयंपूर्ण केलं.

मोन्सांतो आस्थापन एजंट ऑरेंजचं उत्पादन करतं. तेच ते जनुकविचलित कृत्रिम बियाणं ( = genetically modified seeds ) निर्मिती करणारं आस्थापन. हे अस्थापन डाऊ ने विकत घेतलं. भोपाळ वायुकांड ( साल १९८४ ) घडवणारं युनियन कार्बाईड हे अस्थापनही डाऊ ने विकत घेतलं. हे डाऊ आस्थापन चाकणजवळ संयंत्र उभारणार होतं. त्यासाठी त्याला संत तुकाराम महाराज जिथे ध्यानासाठी जायचे तो भामाचा डोंगर फोडून नष्ट करायचा होता. याविरुद्ध संतवीर बंडातात्या कऱ्हाडकरांनी डाऊच्या सणसणीत कानाखाली वाजवली. परिणामी डाऊला गाशा गुंडाळावा लागला.

आता कळलं जगात का व कसे व्यवहार होतात ते ?

जाताजाता : ठाणे बेलापूर पट्टीतल्या अनेक मोठ्या कंपन्या ( सिमेन्स, बास्फ, फायझर, बेयर ) मूळच्या आय.जी.फार्बेन या बदनाम नाझी कंपनीतनं फुटून निर्माण झालेल्या आहेत. आज ठाणे-बेलापूत पट्टीस नवी मुंबई म्हंटलं जातं. मग तिला नाझी मुंबई म्हणावं का?

---------x---------x---------

०४.

निक्सनच्या वॉटरगेटाची गोष्ट

१९६९ साली कंबोडियात जनसंहाराची जी मोहीम सुरू केली ती अत्यंत गुप्त होती. अन्यथा जागतिक समुदायाने निषेध केले असते. मात्र तरीही विलियम बीचर नावाच्या कुण्या पत्रकारास कुणकुण लागलीच. त्याने न्यूयॉर्क टाईम्स मध्ये एक सविस्तर लेख लिहिला. संक्षिप्त माहिती ( इंग्रजी दुवा ) : https://www.history.com/this-day-in-history/reporter-breaks-the-news-of-secret-bombing-in-cambodia

निक्सन पिसाळला. हे असलं काही उघड झालं तर त्याच्यावर महाभियोग दाखल व्हायचा. म्हणून किसिंजरने यानंतर टेलिफोन संभाषणं गुप्तमुद्रित करावयास सुरुवात केली. त्यातनं पुढे वॉटरगेट प्रकरण उद्भवलं. यावर श्रीगुरुजींनी एक लेखमाला लिहिली आहे : https://misalpav.com/node/48766

मात्र निक्सनने १९७३ साली कंबोडियातले हल्ले थांबवले. त्याची शिक्षा म्हणून वॉटरगेटाच्या नावाखाली त्यास राष्ट्राध्यक्ष पदावरून राजीनामा देण्यास भाग पाडलं. जवळजवळ हाकलपट्टीच म्हणा ना.

---------x---------x---------

०५.

एप्रिल फूल व हायवे ८० वरील नरसंहार

१९९० सालची गोष्ट आहे. कुवेतने तिरप्या तेलविहिरी खोदून इराकचं तेल चोरायला सुरुवात केली. सद्दामने केलेल्या रीतसर तक्रारींना कुवेतने केराची टोपली दाखवली. सद्दाम वैतागला. त्याने अमेरिकेशी बोलणी सुरु केली. एप्रिल ग्लास्पी ही बाई तेव्हा अमेरिकेची इराकमधली राजदूत होती. सद्दामने तिला बोलावलं. तिच्याशी झालेल्या चर्चेत तिने 'अमेरिकेस अरब - अरब भांडणात रस नाही' असं सूचित केलं. यांस हिरवा कंदील समजून त्यावर विसंबून सद्दामने कुवेतात सैन्य घुसवलं.

नंतर अमेरिकेने राष्ट्रसंघात इराकविरुद्ध बराच आरडाओरडा केला. परिणामी राष्ट्रसंघाच्या संयुक्त सैन्याने इराकवर आक्रमण केलं. हे सैन्य नावाला संयुक्त जरी असलं तरी प्रामुख्याने अमेरिकी होतं. अशा रीतीने पहिल्या आखाती युद्धास सुरुवात झाली. युद्धाचं उद्दिष्ट कुवेत मुक्त करणं होतं (चूभूदेघे). अपेक्षेप्रमाणे तो हेतू साध्य झाला. यथावकाश शस्त्रसंधी झाली. आता इराकी सैन्य माघारी जायला सुरुवात झाली. राष्ट्रसंघाच्या संधीच्या नियमानुसार सद्दामने काफिला बनवला. हा सुमारे १०० किमी लांब होता. तो कुवेतहून बाहेर पडला व बगदादच्या दिशेने हायवे ८० वरुन हळुहळू सरकू लागला. तो मोक्याच्या जागी येताच अमेरिकी वायुदलाने भीषण आक्रमण केलं. काफिला सैनिकांचा असला तरी ते सैनिक लढाऊ अवस्थेतले नव्हते. सोबत नागरिक व त्यांची बायकामुलेही होती. या कशाचाही विचार न करता नजीकच्या उंचीवरून त्यांच्यावर बॉम्ब टाकण्यात आले. रस्त्यावर तुटक्याफुटक्या व वितळलेल्या वाहनांचा खच पडला. जिवंत माणूस नावालाही उरला नाही. कल्पना करा १०० किलोमीटर केवळ लोखंडी डबर ( = मलबा ) पडलाय आणि त्यात अर्धवट जळलेळी प्रेतं आडवीतिडवी पडलीत. १०० किमित इति भयाण शांतता पसरलीये की जणू काही झालंच नाहीये. कण्हायचाही आवाज येत नाहीये कारण कुणी जिवंतच नाहीये.

हा हल्ला अमेरिकेने राष्ट्रसंघास अंधारात ठेवून केला. बघा, अमेरिकेने इराकला युद्धात कसं गोवलं ते पहा. एप्रिलबाईने सद्दामचा कसा एप्रिल फूल केला ते पहा. भारतासाठी अमेरिकेचा हाच बेत आहे. हे टाळण्यासाठी म्हणून हिंदुराष्ट्र हवंच.

राष्ट्रसंघ ( = युनो ) ही अमेरिकेने ठेवलेली जीवघेणी रक्षापत्नी आहे. ही रखेल व तिचा जार दोघांचेही तुकडे तुकडे व्हायला पाहिजेत. कंबोडियात अमेरिकेने गुपचूप हल्ले केले. पुढे राष्ट्रसंघाने ख्मेर रूज साठी जागा राखून अमेरिकी हल्ल्यांवर पांघरून घालायचा प्रयत्न केला. हेच रखेलजार प्रारूप परत इराक मध्ये वापरलं गेलं.

भारताने काय भूमिका घ्यायला पाहिजे? चर्चा व्हावी.

---------x---------x---------

०६.

कांभोजी कोण आहेत ?

कंबोडिया उपाख्य कांभोज प्रांतीचे लोकं हिंदू आहेत. जगातलं सर्वात मोठं विष्णूमंदिर अंकोरवट हे कंबोडियात आहे.

प्रश्न असाय की तिथे अमेरिका इतके नृशंस अत्याचार करीत होती तेव्हा भारतीय शासन काय करीत होतं ? १९६९ नंतर जनता पक्षाची १९७७ ते १९८० ही अडीच तीन वर्षं सोडता सत्ता इंदिरा गांधीच्या हाती होती. मग तिने काहीच आवाज का उठवला नाही? १९६९ नंतर ती पाकिस्तानच्या फाळणीत गुंतली होती, असं आपण म्हणू शकतो. मग कंबोडियातल्या घटनांचा दबाव टाकून पूर्व पाकिस्तान भारतात सामील करून घेता आला असता. फार काय, पश्चिम पाकिस्तान देखील आक्रमण करून जिंकता आला असता. हे करायचं राहून गेलं खरं.

कांभोजी हिंदूंनी किसिंजरचं काय वाकडं केलं होतं? तो पक्का हिंदुद्वेष्टा आहे. भारतीय हिंदूंच्यासाठी अमेरिकेचे हेच बेत आहेत. फक्त थेट आक्रमण करता येत नसल्याने मिशनरी, नक्षली, खलिस्तानी, बॉलीवूडी इत्यादिंच्या मार्गाने आक्रमण केलं जातंय. भरीत भर म्हणून प्रेम जिहाद, भूमी जिहाद, नशा जिहाद, हलाल जिहाद, वगैरे जिहादं आपापल्या भूमिका बजावताहेत. शिवाय बांगला, रोहिंग्या घुसखोरही उरावर येऊन बसलेत. अंतिमत: हिंदूंच्या नशिबी काय वाढून ठेवलंय ते कंबोडियात दिसलं ना ?

गडचिंचले ( पालघर ) येथे हिंदू साधू व त्यांच्या गाडीचा चालक यांची पोलिसांसमोर निर्घृण हत्या झाली. ही मिशनरी आणि नक्षल्यांनी हिंदूंना दिलेली प्रेमळ भेट आहे. किसिंजर काकांची उणीव हे दोघे भरून काढताहेत. कमाल म्हणजे हत्या झालेल्या साधूंच्या बाजूने दिग्विजय त्रिवेदी नामे जो वकील उभा राहिला होता त्याचाही अपघाती मृत्यू झाला आहे. हीसुद्धा हत्याच असावी असा संशय आहे.

हे टाळायचं असेल तर हिंदू राष्ट्र हवंच हवं.

---------x---------x---------

असो.

पॉल पॉट हा एक बळीचा बकरा आहे. आपलाही तसाच बकरा व्हायला नको असेल तर आपणंच आपली लायकी वाढवून घ्यायला हवी. लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणे शासन मिळतं म्हणतात. पण लोकांनी स्वत:ची लायकी वाढवायची कशी याविषयी कोणीच काही सांगंत नाही. पण काही हरकत नाही. आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी सांगून ठेवलंय की राज्यकर्त्यांवर नैतिक दबाव टाकायचा असतो. त्यासाठी लोकांची साधना पक्की असावी लागते. आजच्या युगात नामजप ही सर्वोत्तम साधना आहे. तो करून आपणंच आपली लायकी वाढवून घेऊया.




हो ची मिन् शहराच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मला फार काळापासून बघावे अशी इच्छा असलेल्या कंबोडिया या देशाच्या दिशेने विमानाने भरारी घेतली. हो ची मिन् शहर ते नॉम् पेन् (Phnom Penh) हा जेमतेम २०४ किलोमीटरचा प्रवास चाळीस-पंचेचाळीस मिनिटात संपवून आमचे विमान कंबोडियाच्या राजधानीवर येऊन ठेपले...


......
विमान उतरताना दिसलेले नॉम् पेन् चे विहंगम दृश्य

भारतीय संस्कृतीचा प्रबळ ठसा असलेल्या या देशाबद्दल मला खूपच कुतूहल आहे. हा देश केवळ तेथील संस्कृती आणि शिल्प-बांधकाम कलेच्या दर्शनानेही भारावून सोडतो. पण त्यांच्या मागील इतिहासाची पार्श्वभूमी माहीत असेल तर तो आनंद व्दिगुणित होतो. म्हणून या देशाचा इतिहास थोडक्यात तरी पाहून मगच त्याची सफर सुरू करणे योग्य होईल.

कंबोडियाचा संक्षिप्त इतिहास

कंबोडियात मानववस्ती केव्हापासून आहे याचे सबळ शास्त्रीय पुरावे तसे अभावानेच मिळाले आहेत. तेथील गुहांमध्ये सापडलेल्या मानवी अवशेषांचे वय इ स पूर्व ४,००० वर्षांचे असल्याचे आणि तेथे इ स च्या पहिल्या शतकापूर्वीपासून भातशेती होत असल्याचे पुरावे सापडले आहेत. मानववस्ती बहुदा याच्याही फार पूर्वीपासून असावी. इ स च्या पहिल्या शतकापासून चिनी व्यापाऱ्यांच्या अहवालांत त्या भागातल्या राज्यांबद्दल आलेल्या उल्लेखांवरून आणि प्राचीन स्थानिक पुराव्यांवरून तेथील संस्कृती, भाषा, लिपी, कला, वास्तू-शिल्पकला, धर्म आणि वर्णव्यवस्था असलेली सामाजिक प्रणाली मोठ्या प्रमाणात भारतीय प्रभावाखाली होती.

कंबोडियाच्या इतिहासातील पर्वे साधारणपणे खालीलप्रमाणे आहेत

१. फुनानच्या ख्मेर राज्याचा कालखंड :

इ स च्या पहिल्या शतकापासून सहाव्या शतकापर्यंत त्या वेळेच्या कंबोडियामध्ये (आताच्या दक्षिण व्हिएतनामच्या मेकाँग खोऱ्यामध्ये असलेल्या) चेनला / फुनान आणि (आताच्या दक्षिण-मध्य व्हिएतनाममध्ये असलेल्या) चंपा राज्यांची माहिती व्हिएतनामच्या सफरीत आली आहेच. या किनारपट्टीवरच्या राज्यांबरोबर अंतर्गत भूमीवरही इतर काही विस्कळीत राज्येही होती. ह्या सर्व भागांतील लोकांना ख्मेर (Khmer) असे संबोधले जाते. त्यांच्या भाषेत अजूनही संस्कृतचा प्रभाव जाणवण्याएवढा आहे. तेथे असलेल्या बंदरांतून होत असलेल्या भारत व चीनमधला व्यापारामुळे हे देश भरभराटीला आले होते. आतापर्यंत सापडलेला ख्मेर भाषेतला सर्वात जुना शिलालेख आणि दगड-वीटेने बांधलेले पहिले हिंदू मंदिर चेनला राज्यांच्या कारकीर्दीतल्या ६ / ७ व्या शतकातले आहे. चेनला राज्य मोडकळीला आल्यानंतर लहान राजे अथवा सरदारांच्या आधिपत्याखाली असलेल्या भागांमध्ये सतत चालू असलेल्या लढाया-चढाओढींमध्ये दोनएक शतके गेली. या अंदाधुंदीच्या काळात जावा-सुमात्रा (आताचे इंडोनेशिया) मधल्या राजांनी कंबोडियाच्या बर्‍याच भूभागांवर आधिपत्य स्थापन केले होते.

या काळातल्या काही राजांची कौडिण्य, श्रीइंद्रवर्मन, जयवर्मन (पहिला), नोरोदोम (नरोत्तम), रुद्रवर्मन, सार्वभौम, भाववर्मन, महेंद्रवर्मन अशी संस्कृतप्रचुर नावे होती. एक खास गोष्ट म्हणजे इ स ६८१ ते ७१३ या कालखंडात चेनला राज्यावर जयवेदी नावाच्या राणीने राज्य केले.

२. अंगकोर कालखंड :

जावा-सुमात्रा राज्यांत बंदिवासात असणारा एक ख्मेर राजपुत्र नवव्या शतकाच्या सुरुवातीला कंबोडियात परतला आणि त्याने ख्मेर प्रदेश एकत्रित करून त्यावर आपले आधिपत्य स्थापन करायला सुरुवात केली. इ स ८०२ मध्ये त्याने राज्याभिषेक करवून घेऊन राजा दुसरा जयवर्मन या नावाने स्वतःला ख्मेर साम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट असे जाहीर केले. त्याच्या राजधानीचे नाव अंगकोर असे होते. त्या जागेला आता "सियाम रीप" असे नाव आहे... या नावाचा अर्थ "सियाम (थायलंडचे जुने नाव) चा पाडाव" असा आहे. दुसरा जयवर्मन आणि पुढच्या २६ सम्राटांनी १५ व्या शतकापर्यंत "आताचा थायलंड, कंबोडिया, लाओस, ब्रह्मदेशाचा काही भाग, मलेशियाचा काही भाग आणि व्हिएतनामचा दक्षिण भाग" एवढ्या विस्तृत प्रदेशावर राज्य केले आणि सर्व दक्षिणपूर्व आशियावर आपला प्रभाव पाडला...


......
ख्मेर साम्राज्य (तांबड्या रंगात) .................................................... सम्राट दुसरा जयवर्मन
(दोन्ही चित्रे जालावरून साभार)

हा कालखंड कंबोडियाचे सुवर्णयुग होते. दुसर्‍या जयवर्मनने शैव परंपरा सुरू करून ख्मेर राजे शिवाचा अंश असल्याचे जाहीर केले आणि देवराजा ही पदवी धारण केली. कंबोडियात या शैव परंपरेचा प्रभाव दोनशे वर्षांपेक्षा जास्त काळ चालू होता. नंतरच्या काळात बौद्ध धर्माचा पगडा वाढत गेला. याच काळात कंबोडियात एक हजारापेक्षा जास्त हिंदू आणि बौद्ध मंदिरे बांधली गेली. यातील बायोन मंदिर (Bayon Temple), अंगकोर थोम (Angkor Thom) आणि अंगकोर वट (Angkor Wat) सारखी अनेक जगप्रसिद्ध आणि युनेस्को वर्ल्ड हेरिटेज असलेली मंदिरे आपण पाहणार आहोतच. ह्या मंदिरांना धार्मिक महत्त्व होतेच पण ती सामाजिक सेवा पुरवणारी केंद्रे आणि राजकीय वर्चस्वाची द्योतकही होती. यातले अंगकोर वट हे मंदिर तर कंबोडियाच्या राष्ट्रध्वजावर मानाचे स्थान मिळवून आहे. कंबोडिया संबद्धिच्या महत्त्वाच्या लिखाणात त्याचे चित्र हमखास दिसते. या सर्व मंदिरांसंबद्धी अधिक माहिती आपण त्यांना भेट देऊ तेव्हा येईलच.


अंगकोर वट (जालावरून साभार)

.



कंबोडियाचा राष्ट्रध्वज (जालावरून साभार)

शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी या सम्राटांनी अनेक मानवनिर्मित तलाव व कालव्यांचे जाळे बांधले होते. याच शेतीमुळे आलेली समृद्धी सम्राटांना मोठमोठी मंदिरे बांधण्यासाठी आणि युद्धे करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ जमवायला उपयोगी पडली. वाहतूक व व्यापारासाठी या सर्व साम्राज्यभर रस्त्यांचे जाळे होते. जरी असे असले तरी शिलालेखांतील उल्लेखांतून या साम्राज्याला अनेक बाह्य आक्रमणे आणि अंतर्गत बंडाळ्यांना तोंड द्यावे लागले असेही दिसते.

या साम्राज्याचा अंत का आणि कसा झाला याबाबत अजूनही नीट माहिती झालेली नाही. मांडलिक असलेली थाई राज्ये प्रबळ झाल्याने आणि त्यांच्याबरोबर वारंवार होणार्‍या युद्धांमध्ये खूप मनुष्यबळ खर्ची पडल्याने हे साम्राज्य मोडकळीला आले असावे. १३-१४ व्या शतकात थेरवद बौद्ध धर्माचा प्रभावही या भागात सुरू झाला होता. त्याच्या प्रत्येकाला माणसाला उत्तम आचार आणि घ्यानधारणेने प्रबोधन (enlightenment) शक्य असते या शिकवणुकीमुळे तेथील सामाजिक उतरंड कोलमडली आणि राजघराणे व सरदार यांचे महत्त्व कमी झाले. सद्या कंबोडियामधले ९६% लोक बौद्ध धर्मीय आहेत.

इ स १४३१ मधले थाई आक्रमण हा या साम्राज्यावर शेवटचा प्रहार ठरला आणि उरलेल्या सर्व उच्चभ्रू घराण्यांनी अंगकोरच्या दक्षिणपूर्वेस आजची राजधानी नॉम् पेन् जवळील लोवेक येथे स्थलांतर केले आणि तेथूनच ख्मेर साम्राज्याच्या उरल्यासुरल्या अवषेशावर राज्य चालू ठेवले.

३. कंबोडियाचे अंधारयुग :

ख्मेर साम्राज्याची शकले होऊन निर्माण झालेल्या अनेक छोट्या राज्यांत सोळाव्या शतकाच्या मध्यापर्यंत सतत लढाया होत राहिल्या. आधुनिक थायलंडच्या अयोध्या (Ayutthaya) राजघराण्याने ख्मेर साम्राज्याचा बराच मोठा भाग काबीज करून आपल्या राज्याला जोडला, व्हिएतनामचे साम्राज्य दक्षिणेस पसरून त्याने चंपा राज्ये आणि मेकाँगचे सुपीक खोरे व्यापले, तर पूर्वेला ब्रह्मदेशात स्वतंत्र सत्ता उदयाला आली.

पराजित आणि लुटले गेलेली राजधानी, अंगकोर, चार शतके अंधारात बुडून गेली. मात्र या काळातही उरलेला दक्षिणेकडील (सद्याचा कंबोडिया) प्रदेश त्याच्या व्यापारी महत्त्वामुळे बर्‍यापैकी सधन राहिला. याच काळात तेथे रामायणावर आधारीत रीमकर (Reamker) नावाचा कंबोडियाचा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ लिहिला गेला.

४. फ्रेंच वसाहतीचा कालखंड :

थाई व व्हिएतनामी आक्रमकांपासून बचाव व फ्रेंच वसाहतवादाचा रेटा यामुळे १८६३ मध्ये कंबोडियाच्या राजाने फ्रेंच राजसत्तेचे संरक्षित राज्य (protectorate) होणे मान्य केले. कंबोडियाला जरी वसाहत म्हणून जाहीर केले नसले तरी पुढची ९० वर्षे तेथे सर्व बाबतीत फ्रेंचांचा शब्द शेवटचा होता. या काळात फ्रेंचांनी कंबोडियन जनतेच्या शिक्षणाकडे पूर्ण दुर्लक्ष केले. मात्र रबर आणि भाताच्या शेतीत केलेल्या सुधारणांमुळे कंबोडिया ती उत्पादने निर्यात करणारा देश बनला.

फ्रेंचांनी केलेले एक उत्तम काम म्हणजे अंगकोर येथील मंदिरांचे पुनरुत्थान सुरू केले आणि तेथील शिलालेखांचे अर्थ उलगडले. त्यामुळे कंबोडियन जनतेला स्वइतिहासाचे ज्ञान होऊन त्यांचा देशाभिमान जागा झाला आणि जगाला एका प्रगल्भ प्राचीन संस्कृतीची ओळख झाली. राजघराणे, बौद्ध धर्म आणि सामाजिक बाबतीत ढवळाढवळ टाळल्याने सर्वसामान्य जनतेत फ्रेंचांविरुद्धचे लोकमत तितकेसे तीव्र नव्हते. १९५३ मध्ये राजा नोरोदोम सिंहनूक (King Norodom Sihanouk) यांनी राजनैतिक कौशल्य वापरून शांततेने देश स्वतंत्र केला आणि तो कम्युनिस्ट प्रभावापासून दूर ठेवला.

५. आधुनिक कालखंड :

इ स १९५५ मध्ये राजा नोरोदोम सिंहनूक यांनी आपले वडील नोरोदोम सुरमरीत (Norodom Suramarit) यांना राजसिंहासनावर बसवून पूर्णकाळ राजकारणात उडी घेतली. १९५५ मध्ये झालेल्या निवडणूकीत सिंहनूक यांच्या पक्षाने लोकसभेच्या सर्व जागा जिंकल्या. सिंहनूक हे त्यांच्या वडिलांचा इ स १९६० मध्ये मृत्यू होईपर्यंत कंबोडियाचे पंतप्रधान होते, त्यानंतर ते परत सिंहासनावर विराजमान झाले.

इ स १९५० पासून अमेरिकेचे साथीदार असलेल्या सिंहनूक यांनी १९६५ मध्ये अमेरिकेशी संबंध तोडून व्हिएतनाम युद्धात मदत म्हणून उत्तर व्हिएतनामला कंबोडियाच्या भूमीवर लष्करी तळ उभारू दिले. पुढे दक्षिणपूर्व आशियातील युद्धांच्या परिणामाने खिळखिळे झालेल्या अर्थव्यवस्थेमुळे अस्थिरता वाढली, सिंहनूक-विरोध वाढीस लागला आणि त्या देशातील भूमीगत कम्युनिस्ट चळवळीने परत डोके वर काढले. आर्थिक आणि सैनिकी मदतीच्या बदल्यात सिंहनूक यांनी अमेरिकेशी परत राजकीय संबद्ध स्थापित केले. त्यांचा उपयोग अमेरिकेने १९६९ मध्ये कंबोडियातील व्हिएतनामी सैनिकी तळांवर बाँबवर्षाव करण्यास केला.

६. ख्मेर गणराज्याचा कालखंड :

इ स १९७० मध्ये राजा सिंहनूक देशाबाहेर असताना कंबोडियाच्या लोकसभेतील व्हिएतनाम-विरोधी पाश्चिमात्य-धार्जिण्या गटाने त्यांना पायउतार केले आणि जनरल लोन नोल यांना ख्मेर गणराज्याचे पंतप्रधान नियुक्त केले. चीनमध्ये शरणागती घेतलेल्या सिंहनूकना त्यांच्या अनुपस्थितीत देहदंड सुनावला गेला. लोन नोल सरकारला अपेक्षित असलेली मदत करण्याऐवजी उलट पुढची तीन वर्षे अमेरिकेने दक्षिण व्हिएतनाम सैन्यासह कंबोडियात खोलवर घुसून तेथील उत्तर व्हिएतनामी तळांवर हल्ले केले. याचा बदला म्हणून उत्तर व्हिएतनामने आक्रमण करून लोन नोलच्या सैन्याची उरली सुरली आक्रमणक्षमताही नष्ट केली.

याच काळात चीन व उत्तर व्हिएतनामने सिंहनूक यांना "देशापार शासन" (government in exile) स्थापण्यास प्रवृत्त केले. या शासनात नंतर ख्मेर रूज (रक्त ख्मेर) या नावाने कुप्रसिद्ध झालेल्या Communist Party of Kampuchea उर्फ CPK चे प्राबल्य होते.

अमेरिकेची मदत असूनही १९७५ मध्ये सततचे यादवी युद्ध आणि त्यावर कंबोडियाच्या भूमीवरील अमेरिकन बाँबवर्षाव यामुळे ख्मेर गणराज्य खिळखिळे झाले आणि ख्मेर रूजने नॉम् पेन् काबीज केले. त्याच्या तीन आठवड्यांतच उत्तर व्हिएतनामने दक्षिण व्हिएतनामचा पराभव केला. या वेळेपर्यंत काही दशके चाललेल्या युद्धाने कंबोडियाचे नागरी व ग्रामीण भाग बेचिराख झाले होते, हजारो लोकांनी जीव गमावला होता आणि लाखोंच्या संख्येच्या विस्थापितांच्या लोंढ्यांनी उरलेसुरले शहरी भाग भरून गेले होत.

७. कंबोडियन (तथाकथित) लोकशाहीचा कालखंड :

१९७५ ला स्थापन झालेली ख्मेर रूजची (तथाकथित) लोकशाही कारकीर्द १९७९ पर्यंत चालू होती. या गनिमी सेनेचा नेता सालोथ सार (Saloth Sar) हा त्याच्या मूळ नावापेक्षा पोल पॉट (Pol Pot) या टोपण नावानेच जास्त कुप्रसिद्ध आहे. ख्मेर रूजने शहरी, शिक्षित लोकांना आपले मुख्य शत्रू समजून त्यांना ग्रामीण भागात हलवून शेतीच्या कामाला लावले. केवळ युद्धात मदत केली म्हणून अनेक अशिक्षित आणि अननुभवी लोकांना शासनात महत्त्वाच्या जागा दिल्या. विचारस्वातंत्र्य, संघटना आणि धार्मिक व्यवहारांवर कडक बंधने लादली. खास करून विचारवंत, व्यापारी, जुने शासकीय अधिकारी, धार्मिक नेते आणि विरोधाचा संशय असणार्‍या लोकांची कत्तल केली. इतर अनेक लोकांना खास छावण्यांत हलवून त्यांचे अनन्वित हाल केले, उपासमार केली आणि त्यांच्याकडून सक्तमजुरी करवून घेतली. ख्मेर रूजने बाजूच्या देशांच्या भूमीवर आपला जुना हक्क परत घोषित करून त्यांच्यावर हल्ले करणे सुरू केले. चिनी आणि व्हिएतनामी वंशांच्या आणि इतर अल्पसंख्य कंबोडियन नागरिकांवर हल्ले करून त्यांना पळवून लावले अथवा त्यांची हत्या केली. या कांडात पोल पॉट राजवटीने १७ लाख लोकांचा म्हणजे कंबोडियाच्या एक पंचमांश लोकसंख्येचा बळी घेतला. एकीकडे परराष्ट्रांपासून संपूर्ण स्वतंत्र म्हणवणार्‍या या शासनाने चीन आणि उत्तर कोरिया या मुख्य दोस्त राष्ट्रांकडून भरघोस मदत स्वीकारली.

८. व्हिएतनामी ताबा आणि लोकशाहीकडे पुनर्संक्रमण :

ख्मेर रूजच्या सीमाभागात होणार्‍या सतत हल्ल्यांना कंटाळून १९७८ मध्ये व्हिएतनामने कंबोडियावर हल्ला केला आणि ख्मेर रूजचा पराभव करून तिच्या विरोधी असलेल्या कंबोडियन गटांचे संयुक्त सरकार सत्तेत आणले. मात्र या सरकारवर व्हिएतनामचे पूर्ण नियंत्रण होते. या सरकारला राष्ट्रसंघाची मान्यता असलेल्या सिंहनूक यांच्या देशापार शासनाचा विरोध होता. या युद्धानंतर कंबोडियातून ताबडतोप सेना मागे घेण्यास नकार दिल्यामुळे व्हिएतनामवर अमेरिका व तिच्या दोस्त राष्ट्रांनी आर्थिक निर्बंध लादले. त्यांना न जुमानता तेथे स्थिर सरकार सत्तेवर येईपर्यंत पुढची दोन वर्षे व्हिएतनामने आपली सेना कंबोडियातून हलवली नाही. १९८१ मध्ये अनेक एकमेकविरोधी गटांचे सरकार सत्तेवर आले. पुढचा बराच काळ अस्थिर आणि यादवीयुद्धसदृश्य परिस्थिती कायम राहिली.

९. सद्यस्थिती :

१९८९ मध्ये पॅरिसमध्ये सुरू झालेल्या शांतता प्रयत्नांना यश येऊन राष्ट्रसंघाच्या मध्यस्तीने सर्व गटांमध्ये शस्त्रसंधी होऊन सर्वसमावेशक शांतता करार झाला. त्या कराराप्रमाणे United Nations Transitional Authority in Cambodia (UNTAC) आणि नोरोदम सिंहनूक यांच्या अध्यक्षतेखालील कंबोडियन गटांचे Supreme National Council (SNC) यांच्यात सत्ताविभाजन केले गेले. १९९३ मध्ये झालेल्या निवडणूकीत लोकांनी लष्करी गटांना झुगारले. सिंहनूक यांच्या राजावादी पक्षाला सर्वात जास्त जागा मिळाल्या परंतू त्यांना बहुमताचा कौल मिळाला नाही. तीन गटांच्या युतीचे सरकार स्थापन होऊन सिंहनूक याचा मुलगा राजपुत्र नोरोदम रणरिद्ध पहिला पंतप्रधान आणि हून सेन दुसरा पंतप्रधान झाले. १९९३ मध्येच कंबोडियात राजेशाहीची पुनर्स्थापना होऊन नोरोदम सिंहनूक यांना दुसर्‍यांदा राजा म्हणून घोषित केले गेले.

नोरोदम रणरिद्ध आणि हून सेन यांची व्दिपंतप्रधान राजवट तीन वर्षे टिकली. १९९७ मध्ये नोरोदम रणरिद्ध परदेशात असताना हून सेनने राज्यक्रांतीने पूर्ण सत्ता हस्तगत करून जगाला धक्का दिला. मात्र १९९८ मध्ये पूर्वी ठरल्याप्रमाणे परदेशी निरीक्षकांच्या देखरेखीखाली मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका झाल्या. नोरोदम रणरिद्ध आणि इतर विरोधकांनी परदेशात राहून त्या निवडणूकीला विरोध केला. शेवटी हून सेन पंतप्रधान, नोरोदम रणरिद्ध विधानसभेचे अध्यक्ष आणि महत्त्वाची खाती दोन पक्षात विभागून अशा तोडग्यावर संयुक्त सरकार स्थापन झाले. यामुळे लवकरच कंबोडियाला ASEAN चे सदस्यत्व मिळायला मदत झाली.

पोल पॉट्चा १९९८ मध्ये मृत्यू झाला. ख्मेर रूजच्या अनेक अधिकार्‍यांना जातीसंहाराच्या आणि इतर गुन्ह्याखाली शिक्षा झाल्या.

एके काळी दक्षिणपूर्व आशियाई महासत्ता असलेला आणि आता त्या काळाच्या केवळ एक चतुर्थांशापेक्षा कमी भूमी ताब्यात असलेला कंबोडिया दरवर्षी कमी होत जाणार्‍या परदेशी मदतीवर अवलंबून आहे. त्याच्या प्राचीन कालच्या स्थापत्य वैभवाचा जीर्णोद्धार करण्याचे प्रयत्न चालू आहेत. आनंदाची गोष्ट अशी की या कामाला भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचा (ASI) हातभार लागतो आहे.

असो. भारतीय संस्कृतीशी नाळ जोडलेल्या ६०० वर्षे प्रदीर्घ सत्तेत असलेल्या साम्राज्याची भूमी आणि कोणत्याही धर्मातल्या जगातल्या सर्वात मोठ्या मंदिर संकुलाचा देश म्हणून कंबोडियाबद्दल मला खूप कुतूहल होते आणि आहे. ताकदवान आणि संपन्न देशाची बदलत्या कालगतीबरोबर कशी फरपट आणि दुर्दशा होऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणूनही कंबोडियाच्या इतिहासात मला रस वाटला. हे सर्व आपल्या सर्वांबरोबर वाटून घ्यावेसे वाटले म्हणूनच जरा विस्ताराने त्याबद्दल लिहिले आहे. या पार्श्वभूमीचा कंबोडियाच्या भटकंतीत आपल्याला तो देश अधिक चांगला समजून घेण्यास मदत होईल.

(क्रमशः )

 कंबोडियाचा इतिहास आणि संस्कृती जागतीक पुरातत्व संशोधनात एक महत्वाचा अध्याय समजला जातो. अंगकोर (आजचे सियाम रीप) च्या १०० किलोमीटर व्यासाच्या वर्तुळाकार परिसरात सुमारे हजार मंदिरे आहेत. त्यातली सुमारे ८० आकारमान, स्थापत्यकला, कलाकुसर इ साठी पुरातत्व संशोधनदृष्ट्या महत्वाची आहेत आणि त्यांच्यातल्या युनेस्को वर्ड हेरिटेज म्हणून मान्यता मिळालेल्यां स्थानांची यादी वाचताना धाप लागेल. आजही तेथील उत्खनन संपलेले नाही आणि पुरातत्व संशोधनाच्या दृष्टीने महत्वाची नवीन स्थाने अजूनही सापडत आहेत. (सर्वसाधारणपणे कोणत्याही दोन युनेस्को वर्ल्ड हेरिटेज स्थानांमध्ये शंभर किलोमीटरपेक्षा कमी अंतर फारच अभावाने दिसते.) 

 थाई राज्यांबरोबर युद्धे, थेरवादाचा उदय यांजबरोबर प्रचंड मंदिरे बांधत गेल्याने होणारा प्रचंड खर्च हे पण एक कारण असावे. इतक्या मोठ्या खर्चामुळे साहजिकच ही राजवट आर्थिकदृष्ट्या मोडकळीस आलेली असणार.

त्या काळात मंदिरे ही पैसा जमवण्याचे साधन नव्हते. किंबहुना बहुतेक मंदिरे युद्धात मिळालेला विजय अथवा राज्यारोहण याप्रसंगांची आठवण व राजाच्या मोठेपणाची जनमनावर आणि शत्रूंवर छाप पाडण्यासाठी बांधलेली आहेत. ती बांधताना पराजीत राजाकडच्या खंडणीबरोबरच स्वतः राजाचा खजीनाही रिकामा केला जात असे.

देवळे बांधून देवाच्या नावाने संपत्ती जमवायच्या रोगाची लागण त्या काळी नव्हती असे दिसते... हा रोग अलिकडच्या काळाचा आहे ;)

 
या सर्वांबरोबर महापूर / दुष्काळ या नैसर्गीक आपत्तीने नष्ट झालेले मुख्य उत्पन्न (भाताचे पीक) आणि प्लेग ही कारणेही दिली जातात. मात्र त्यापैकी नेमके कोणते एक अथवा अनेक कारणे अंगकोरची सर्व लोकसंख्या स्थलांतरीत होण्यास कारण ठरली आणि ते शहर पुढची चार शतके लोकांच्या स्मृतीतून कसे निघून गेले हे नक्की नाही. फ्रेंचांनी ही मंदिरे परत शोधून काढेपर्यंत कंबोडियातील लोक अंगकोरचे आणि तेथील शिलालेखांवरील लिपीसुद्धा विसरून गेले होते.  
इतकं काय काय होत होतं कंबोडीया मधे.. आणि तिथल्या महत्वाच्या राजकारणात भारताचा साधा उल्लेख नाहि :( साला आपले पब्लीक तेच ते तामिलनाडु, महाराष्ट्र, गुजराथ, युपी आणि काश्मीरच्या पलिकडे जातच नाहि.
केवळ ख्मेर साम्राज्यच नव्हे तर, १२९३ ते १५०० या काळात जावाच्या महापहीत हिंदू-बौद्ध साम्राज्याने "आताचा मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया, पूर्व टिमोर, ब्रुनेई, दक्षिण थायलंड आणि दक्षिण फिलिपाईन्स" इतका प्रदेश व्यापलेला होता.

या साम्राज्यात बांधल्या गेलेल्या जगप्रसिद्ध बोरोबुदूर स्तुपाचे नाव आपण इतिहासाच्या पुस्तकातून वाचले असेलच. त्या ११८ मीटर X ११८ मीटर आकाराच्या स्थापत्यशास्त्रातल्या आश्चर्याबद्दल अघिक माहिती इथे सापडेल.

(जालावरून साभार)

वरचा फोटो पाहुन क्रिस्टलच्या श्री यंत्राची तुलना करावीशी वाटली.{म्हणजे मंडलाकॄती रचना पाहुन}
एकंदर तंत्र आणि यंत्र या प्रकारात मंडलाकॄती रचनेला विशेष महत्व आहे हे समजुन येत आहे.

हा योगायोग नाही !

बोरोबुदूरच्या स्तूपाची रचना हेतूपुर्स्सर "तांत्रीक मंडल यंत्रा"वरच बेतलेली आहे !

.

(दोन्ही चित्रे जालावरून साभार)

 विमानतळावर आलेल्या मार्गदर्शिकेने हॉटेलवर जाऊन चेकईन करण्यात वेळ घालविण्याऐवजी शहराची सफर तडक सुरू करण्याचा सल्ला दिला. विमानतळातून बाहेर पडेपर्यंत दुपारचा दीड वाजला होता त्यामुळे तिचे म्हणणे मानण्यातच शहाणपण होते. गाडीत सामान टाकून आमची मेकाँग, बसाक् आणि तोन्ले साप या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेल्या कंबोडियाची राजधानी नॉम् पेन् ची सफर सुरू झाली.

नॉम् पेन् ह्या या शहराच्या नावामागे एक दंतकथा आहे ती अशी. चौदाव्या शतकाच्या शेवटी ख्मेर साम्राज्याच्या अखेरच्या काळात चाक्तोमुक नावाच्या (Chaktomuk) खेड्यात राहणार्‍या दुआन पेन् (Duan Penh) नावाच्या एका वृद्ध स्त्रीला सरपण गोळा करत असता नदीतून एक ओंडका वाहत जाताना दिसला. तो ओंडका पकडून काठावर आणल्यावर तिला त्याच्या पोकळीत बुद्धाच्या चार आणि विष्णूची एक अशा पाच मूर्ती सापडल्या. ही घटना त्यावेळेपर्यंत अंगकोरला असलेली कंबोडियाची राजधानी त्या जागी स्थलांतरित होण्याचा दैवी संकेत समजला गेला. दुआन पेन् ने मूर्ती सापडलेल्या जागेजवळच्या एका टेकडीवर मंदिर बांधून मूर्तींची स्थापना केली. या घटनेवरून चाक्तोमुक गावाचे नाव बदलून नॉम् पेन् (पेन् ची टेकडी) असे झाले आणि त्या मंदिराला वट नॉम् (टेकडीवरचे देऊळ) असे नाव पडले (Phnom = टेकडी; Wat = देऊळ, मोनॅस्टरी). पुढे त्या भविष्यवाणीप्रमाणे राजधानी खरोखरच नॉम् पेन् ला स्थलांतरित झाली.

राजवाडा

राजधानीत आल्यावर आमचा पहिला थांबा होता राजवाड्याचा. गेल्या शतकभरापेक्षा जास्त कालखंडात मूळ लाकडी बांतिय केव (Banteay Kev) नावाच्या जुन्या राजवाड्याच्या मूळ इमारतींचे वेळोवेळी नूतनीकरण केले जाऊन थाइ-कंबोडियन-पाश्चिमात्य अश्या शैलींच्या संगमाच्या नवीन इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. तोन्ले साप नदीच्या किनार्‍यापासून जवळच असलेल्या या राजवाड्याच्या विस्तीर्ण प्रांगणात मुख्य राजभवन आणि राजाच्या नेहमीच्या वापराच्या इमारती सोडता इतर ठिकाणी फिरता येते.

सर्वप्रथम राजसिंहासनाची इमारत आपले लक्ष वेधून घेते...

राजसिंहासनाचा प्रासाद (जालावरून साभार)

नावाप्रमाणेच ही इमारत राज्याभिषेक, राजाला भेटायला येणार्‍या महत्त्वाच्या परदेशी राजकीय व्यक्तींचे स्वागत आणि पारंपरिक राजसमारंभांना वापरली जाते. या इमारतीच्या आत फोटो काढता येत नाही. कंबूज कोरीवकामाचा उत्तम नमुना असलेले सिंहासन अनेक स्तरांचे आहे. त्यातले खालच्या दोन स्तरांत दोन गरूडांनी मुख्य चौथरा उचलून धरलेला आहे. त्यावरचे तीन स्तर नरक, पृथ्वी आणि स्वर्ग यांचे प्रतिनिधित्व करतात. मुख्य आसनाभोवती सोन्याच्या प्रत्येकी नऊ स्तरांच्या चार सुवर्णछत्र्या आहेत आणि त्याचे छत एका नऊ स्तरांच्या पांढर्‍या छत्रीच्या रूपात आहे. (नऊ हा आकडा सर्व दक्षिणपूर्व व अतिपूर्वेत सर्वात मोठा एकक म्हणूनच सामर्थ्याचे प्रतीक म्हणून राजचिन्हांमध्ये नेहमी कोणत्या ना कोणत्या प्रकारे सतत येत असतो. ) सिंहासनाशेजारी एक सोन्याचा चहापानाचा संच आणि त्याबरोबर विड्याची पाने आणि सुपारी असलेला तांबूल-संच राजसिंहासनाच्या व्यवस्थेचा अविभाज्य भाग म्हणून ठेवलेले असतात. राजाच्या मुख्य आसनामागे पण जरा अधिक उंचीवर राणीने बसायचे आसन आहे. राज्याभिषेकानंतर राजा आणि राणीची एका खास पालखीतून राजधानीतून मिरवणूक काढली जाते...

मिरवणुकीची पालखी

चंद्रप्रकाश प्रासाद (Preah Thineang Chan Chhaya)

ही इमारत राजाच्या मनोरंजनासाठी आणि त्याच्याप्रती आदर दर्शविण्यासाठी केल्या जाणार्‍या नृत्यांसाठी वापरली जाते. ही इमारत राजवाड्याजवळून जाणार्‍या एका मोठ्या रस्त्याला (Sothearos Boulevard) लागून असलेल्या भिंतीजवळ आहे. त्या बाजूला असलेल्या सज्जाचा उपयोग राजा त्या रस्त्यावरून जाणार्‍या संचलनांचे व मिरवणुकीचे निरीक्षण करण्यासाठी करतो.

चंद्रप्रकाश प्रासाद

रौप्यमंदिर (Silver Pagoda)

राजवाड्याच्या आवारात असलेल्या या बुद्धमंदिराच्या जमिनीवर लावलेल्या चांदीच्या ५,००० फारशांमुळे याचे हे नाव पडले आहे. या मंदिरात उंचावर ठेवलेली बुद्धाची १७व्या शतकातील मुख्य पाचूची मूर्ती आहे. तिच्यासमोर असलेल्या ७५ किलोग्रॅम वजनाच्या पुर्णाकृती मैत्रेय बुद्धमूर्तीच्या अंगावर ९,५८४ हिरेमाणकांनी जडवलेला राजपोशाख आहे. त्यातला सर्वात मोठा हिरा २५ कॅरट वजनाचा आहे. या मंदिराच्या भिंतीच्या बाहेरील भागांवर ख्मेर रामायणातील (रीमकर) प्रसंगांची चित्रे रंगवली आहेत. या मंदिरात चित्रे काढण्यास मनाई आहे. त्यामुळे त्याचे हे फक्त बाह्यदर्शन...

रौप्यमंदिर

आणि हे बाह्य भिंतींवरील एक चित्र...

रौप्यमंदिराच्या भिंतीवरचे चित्र

खेमारीन मोहा प्रसात (Khemarin Moha Prasat)

खेमारीन मोहा प्रसात {Khemarin = Khmer + Indra; Moha = महा; Prasat = प्रासाद / मंदिर} म्हणजे ख्मेरेंद्राचा राजप्रासाद / मंदिर. राजप्रासादाच्या प्रांगणात प्रवेश मिळत नाही कारण ते राजाचे अधिकृत वास्तव्याचे ठिकाण असून तेथे बर्‍याचदा राजाचे वास्तव्य असते. तेथे राजाचे वास्तव्य असले की महालासमोरच्या ध्वजस्तंभावर ध्वज फडकत असतो, अन्यथा तो ध्वजविरहित असतो. राजप्रासादाचे दुरून घेतलेले हे एक चित्र...

खेमारीन मोहा प्रसात

राजवाड्याच्या आवारातल्या छोट्याश्या संग्रहालयातील दोन गोष्टींनी लक्ष वेधून घेतले...


राणीचा सुवर्णजडीत पोशाख (? साडी)

.


राजवाड्यातील सेविकांचे पोषाख... आठवड्याच्या सात वारांना सात वेगळे रंग!

अजून काही चित्रे...

राजवाड्याच्या प्रांगणाचे एक दृश्य

.

तोन्ले साप नदीच्या बाजूने दिसणारे राजवाड्याचे समग्र-दृश्य (पॅनोरॅमिक व्ह्यू) (जालावरून साभार)

राष्ट्रीय संग्रहालय

राजवाड्यातून बाहेर पडून आम्ही जवळच असलेले कंबोडियाचे राष्ट्रीय संग्रहालय पहायला गेलो...


कंबोडियाचे राष्ट्रीय संग्रहालय

तेथे दरवाज्यात भव्य विष्णूवाहन गरूडराजाने आमचे स्वागत केले...


गरूडराज आणि आम्ही

या संग्रहालयात कंबोडियाच्या प्राचीन इतिहासाचा आणि त्यावरच्या भारतीय संस्कृतीच्या प्रभावांचा खजिना होता. मात्र संग्रहालयात फोटो काढण्यास मनाई असल्याने (प्रत्येक गटाला स्वतंत्र मार्गदर्शक असतो आणि तो/ती कोणीही फोटो काढणार नाही याची खबरदारी घेतो/घेते. ) माझ्याकडे संग्रहालयातले फोटो नाहीत :(

जालावर काही चित्रे सापडली ती खाली देत आहे...


पहुडलेल्या विष्णूचा ब्राँझचा पुतळा

.


उभा विष्णू

.


मिशीवाला विष्णू

आतापर्यंत विष्णूच्या इतक्या मूर्ती / प्रतिमा पाहिल्या होत्या, पण मिशीवाला विष्णू येथेच प्रथम पाहिला !

.


भीम आणि दुर्योधनाचे युद्ध

.


शिवलिंगे

.


नंदी

.


गणेश

संग्रहालयाचे प्रांगण इतके सुंदर होते की तेथे मात्र कॅमेरा गप्प बसू शकला नाही...


कंबोडिया राष्ट्रीय संग्रहालयाचे आवार

वट नॉम् बुद्धमंदिर

या बुद्धमंदिराच्या स्थापनेसंबद्धीची गोष्ट अगोदरच आली आहेच. १३७३ मध्ये स्थापन केलेल्या या मंदिराचा अनेकदा जीर्णोद्धार केला गेला आहे. १४३८ मध्ये राजघराणे नॉम् पेन् मध्ये स्थलांतरित होऊन पोन्हिया यत नावाच्या राजाने तेथे नवा राजवाडा बांधल्यावर त्याने या मंदिराच्या टेकडीची उंचीही वाढवून घेतली. मंदिराच्या बाजूला असलेल्या स्तूपात त्या राजाच्या आणि राजघराण्यातील इतर लोकांची रक्षा ठेवलेली आहे...


वट नॉम् कडे नेणार्‍या पाहिर्‍या आणि त्यांच्या बाजूचा राजघराण्यातील व्यक्तींची रक्षा असलेला स्तूप

मंदिरात एक मोठी बुद्धमूर्तीच्या आजूबाजूला अनेक छोट्या बुद्धमूर्ती, फुले आणि इतर अर्पण केलेल्या वस्तूंची गर्दी होती...


वट नॉम् चे गर्भगृह

मंदिराच्या एका भिंतीवर हे कोरीवकाम होते. मार्गदर्शिका ते रामायणातले असावे असे म्हणाली. एवढे रथ आणि घोडे असल्याने मला तर ते महाभारतातले दृश्य वाटले...


वट नॉम् च्या भिंतीवरचे दृश्य

मुख्य मंदिराच्या एका बाजूला दुआन पेन् बाईंचे मंदिर होते...


दुआन पेन् ची मूर्ती

मंदिराच्या टेकडीभोवती एक सार्वजनिक बाग आहे. तिच्यात संध्याकाळी फिरायला आलेल्या नॉम् पेन् करांची गर्दी होऊ लागली होती...


वट नॉम् भोवतीच्या बागेतील घड्याळ

आजचा शेवटचा थांबा बघून झाल्याची मार्गदर्शिकेने घोषणा केली आणि दिवसभराचा शीण उसळून आला. कधी एकदा हॉटेलवर परततो आणि गरम गरम शॉवर घेतो असे झाले.

(क्रमशः )

सहलिचा पुढचा दिवस मोठ्या म्हणजे अगदी फार मोठ्या उत्सुकतेने उजाडला. कारण त्या दिवशी सहललितल्या सर्वोत्तम आकर्षणाकडे जायचे होते. ही सगळी सहल ज्याला मध्यवर्ती ठेऊन आखली होती असे ते ठिकाण होते... ख्मेर साम्राज्याची राजधानी "अंगकोर".

अंगकोरचे अवशेष आताचे कंबूज शहर सिएम रीपच्या जवळ आहेत. अंगकोरच्या जागतीक प्रसिद्धीमुळे सिएम रीप नावारुपाला येऊन एक आघुनिक शहर बनले आहे. तेथे प्रवाश्यांच्या सोईकरता अनेक सुविधा, अनेक प्रकारची तारांकित हॉटेल्स आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

विमानाने आकाशात भरारी घेतली आणि नॉम् पेन् चा निरोप घेऊन आम्ही पुढे निघालो... आणि थोड्याच वेळात कंबोडियाचा भातशेतीचा भाग दिसू लागला..


......

पण ते दृश्य फार काळ टिकले नाही. कारण आमच्या सहली अगोदर दोन महिने कंबोडियात पावसाने हाहा:कार माजवून जलप्रलय केला होता. त्याच्या अजूनही न मिटलेल्या खाणाखूणा आणि शेतजमिनीची झालेली दुर्दशा दिसू लागली. दोन महिने झाल्यानंतही शेतातले पाणी कायमच होते आणि शेते पाण्याच्या ओघाबरोबर वाहून आलेल्या दगड-मातीने भरलेली होती...


.....
कंबोडियातील महापूराने केलेली शेतीची अवस्था

अंगकोरची, त्याच्या आजूबाजूच्या शेतीची आणि पर्यायाने ख्मेर साम्राज्याची वाताहात होण्यास तेथील बदललेले हवामान आणि त्यामुळे आलेले ओल्या-सुक्या दुष्काळांचे दुष्टचक्र कारणीभूत झाले असा एक सिद्धांत आहे. त्याची एक झलक पहायला मिळाली.

अंगकोरमधील प्राचीन देवळांत पाणी भरण्याचा अंदाज वर्तवला गेला होता आणि त्यामुळे जगभरच्या पुरातत्वसंशोधकांत खळबळ माजल्याचे बातम्यांत वाचले होते. सुदैवाने अंगकोरला त्या वादळी हवामानाचा व महापुराचा फटका अपेक्षेपेक्षा बराच कमी बसला होता आणि तो अंदाज खरा झाला नाही. हे एक दु:खात सुख होते.

२५० किलोमीटरचे अंतर ४५ मिनीटात कापून विमान सिएम रीपवर पोहोचले आणि सुस्थितीतल्या मानवी वस्तीच्या खाणाखूणा दिसू लागल्या. सिएम रीपच्या छोटेखानी विमानतळाची इमारत साध्या पारंपारीक शैलीत बांधलेली आहे...


सिएम रीप आंतरराष्ट्रिय विमानतळ

जरी इमारत लहान होती तरी अनेक देशांची विमाने तिथे उडता-उतरताना दिसत होती आणि प्रवाश्यांची संख्याही लक्षणीय होती.

येथेही मार्गदर्शकाने गाडीत बसल्या बसल्या हॉटेलवर जाण्याऐवजी तडक सहल सुरू करायचा सल्ला दिला. विमानाचा प्रवास फक्त ४५ मिनीटांचा होता, त्याअगोदर सज्जड न्याहरी झालेली होती आणि मुख्य म्हणजे अंगकोर भेटीची आस लागलेली होती त्यामुळे त्या सूचनेला नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता ! सामान गाडीत टाकले आणि तसेच निघालो. अर्ध्या तासातच गाडी जगप्रसिद्ध अंगकोर वट जवळून जाऊ लागली...


अंगकोर वट सभोवती असलेल्या मोटेचे आणि तटबंदीचे प्रथम दर्शन

गाईडने त्याच्याकडे निर्देश करून आपण तेथे नंतर जाणार आहोत, त्याअगोदर इतर महत्वाची ठिकाणे पाहणे जास्त सोईस्कर होईल असे सांगीतले. तेव्हा जरा रागानेच इटिनेररी परत चाललि आणि घ्यानात आले की अंगकोर वट जरी सर्वात जास्त जगप्रसिद्धी मिळालेले आकर्षण असले तरी अंगकोरमध्ये युनेस्को वर्ल्ड हेरिटेज दर्जाची अजून अनेक आकर्षणे आहेत. हे जरी अगोदर वाचलेले असले तरी इतर देवळांची इतकी कमी प्रसिद्धी झाली आहे की त्यांना भेट दिल्यावर आणि वारंवार थक्क झाल्यावरच त्या गोष्टीवर विश्वास बसतो... आणि आपण संपूर्ण अंगकोरच्या चक्क प्रेमात पडतो !

अंगकोर

अंगकोर हे काही एक मंदिर किंवा प्राचीन अवशेषांचे एक आवार नाही. ही आहे सतत ६०० वर्षे दक्षिणपूर्व आशियावर सत्ता असलेल्या आणि दक्षिणपूर्व आशियामार्गे होणार्‍या भारत-युरोप-चीन यांच्यातील व्यापारावर नियंत्रण असलेल्या साम्राज्याची राजधानी. अंगकोर हा शब्द संस्कृत शब्द नगर यावरून ख्मेर भाषेत येता येता "नगर --> नोगोर --> नोकोर --> अंगकोर" असा झाला आहे. इ स ८०२ मध्ये कौडिण्य नावाच्या राजपुत्राने दुसरा जयवर्मन या नावाने राज्याभिषेक करवून स्वतःला ख्मेर साम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट घोषित केले आणि राजा हा शिवाचा अंश म्हणून त्याला "देवराजा" असे संबोधण्याची प्रथा सुरू केली हे आपण अगोदरच्या भागांत पाहिले आहेच. नवव्या शतकापासून थायलंडच्या (त्याकाळचा सयाम) आयुथ्थाया (आयोध्या) राज्याने पाडाव करेपर्यंत अंगकोर ही ख्मेर साम्राज्याची राजधानी होती.

या काळात येथे एक हजारापेक्षा जास्त देवळे बांधली गेली... त्यांची आताची अवस्था "शेती आणि माळरानांवर पसरलेले असंख्य विस्कळीत दगड" ते "आकारमानामुळे, स्थापत्यशैलीमुळे आणि कोरीवकामामुळे जगप्रसिद्ध झालेल्या अंगकोर वट सारखे अजून बर्‍याच सुस्थितीत असलेले मंदिर" अशी आहे. त्यातली काही देवळे ते पाषाण मूळ स्थानी बसवून पुनर्स्थापित केली गेली आहेत तर अजून बर्‍याच मंदिरांच्या पुनर्स्थापनेचे काम चालू आहे. आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने आधुनिक पद्धतीने उपग्रहचित्रणाव्दारे इ स २००७ मध्ये केलेल्या पाहणीत असे आढळून आले आहे की अंगकोर औद्योगिक क्रांती होण्याअगोदरच्या काळातील सर्वात मोठे शहर होते. सुमारे १,००० चौरस किमीपेक्षा जास्त क्षेत्रफळावर पसरलेल्या या शहरात पाणी, सांडपाणी, रस्ते, इ सर्व मूलभूत गरजांची उत्तम संरचना (elaborate infrastructure system) होती. (या बाबतीत दोन क्रमांकावरचे शहर माया संस्कृतीतले आताच्या ग्वाटेमाला देशातले "तिकाल" हे आहे. त्याचे क्षेत्रफळ १०० ते १५० चौ किमी होते. आजच्या पुणे शहराचे क्षेत्रफळ ७०० चौ किमी आणि नवी मुंबईचे ३४४ चौ किमी आहे. यावरून अंगकोरच्या भव्यतेची कल्पना यावी.) एवढ्या मोठ्या शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी दर देवळासभोवताच्या खंदकांत, मोठमोठ्या तलावांत आणि काही घरांच्या जवळच्या मध्यम ते लहान आकाराच्या तळ्यांत पाणी साठवून ते सर्व पाण्याचे साठे कालव्यांनी एकमेकाला जोडलेले होते. मेकाँग आणि तोन्ले साप नद्यांतील पाणी खास बांधलेल्या कालव्यांतून त्या साठ्यांत सोडले जात असे. याशिवाय या नद्यांच्या तोडीचीच पावसाचे पाणी अडवून कालव्यांत सोडण्याची तिसरी मानवनिर्मित जलप्रणाली त्याकाळच्या ख्मेर अभियंत्यांनी बांधली होती.

अंगकोर शहराच्या चार दिशांना असलेल्या मुख्य चार तलावांपैकी (Baray) सगळ्यात मोठ्या पश्चिमेकडच्या तलावाचा आकार ८ किमी X २ किमी होता. ११ व्या शतकाच्या मध्यात बांधलेला पश्चिम दिशेचा तलाव आजही आस्तित्वात आहे आणि त्यात अजूनही मासेमारीही केली जाते. पूर्ण भरल्यावर या तलावात सद्या ५३० लक्ष घनमीटर पाणी साठते. अंगकोरच्या एकूण लोकवस्तीबद्दल संशोघकात पूर्णपणे एकमत नाही. पण, शहरातील मूलभूत व्यवस्था आणि नैसर्गीक-मानवनिर्मित तळी व कालवे बांधून रचलेल्या शेतीच्या प्रणालींवरून तेथे १०,००,००० (दहा लाख) लोक राहू शकत असावे असा अंदाज आहे ! (२०११ च्या जनगणने प्रमाणे नवी मुंबईची लोकसंख्या साधारण ११ लाख होती.)

देवळांच्या भोवतीचे खंदक हे दुग्धसागराचे प्रतिक, मधले विशाल आणि उंच मंदीर म्हणजे देवनिवास मेरू पर्वत आणि त्याच्या टोकावर असलेल्या गर्भागृहात देवराजाचे शिवलिंगाच्या स्वरूपातले आस्तित्व अशी बर्‍याच देवळांची मांडणी आहे. येथिल अंगकोर वट मंदिर हे जगातील आतापर्यंतचे सर्वकाळचे सर्वात मोठे धार्मिक बांधकाम आहे. दरवर्षी अंगकोरला वीस लाखापेक्षा जास्त प्रवासी भेट देतात आणि त्या संख्येत दरवर्षी भर पडत आहे.

बांधकामाचा वारसा अनेक राजांनाही मिळाला होता. इ स ८८९ मध्ये सत्तेवर आलेला सम्राट यशोवर्मन हा स्वतः नावाजलेला अभियंता होता आणि त्याने यशोधरापुरा नावाची ख्मेर साम्राज्याची जुनी राजधानी वसवली.

अंगकोरच्या मध्यभागाच्या २४ किमी X ८ किमी इतक्या क्षेत्रफळात ७२ मोठी मंदिरे आणि इतर प्राचीन महत्वाच्या इमारती आहेत. याखेरीज याच भागात असलेल्या इतर प्राचीन अवशेषांची संख्या अनेक शेकड्यांत जाते. अंगकोरच्या मध्यवर्ती भागाच्या नकाशावर नजर टाकली तर त्याच्या आवाक्याची थोडीबहूत कल्पना येईल...


अंगकोरच्या मध्यवर्ती भागाचा नकाशा (जालावरून साभार)

हा नकाशा पाहून, सात दिवसांचा प्रवासी पास घेऊन अंगकोर बघायला जाणारे प्रवासीही "अंगकोर काय नीटसं पाहिलं नाही बुवा. परत एकदा यायलाच पाहिजे." असं मनात घोळवीत का परत जातात, हे कळायला सोपं जाईल !

चारशे वर्षांच्या खरोखरच्या वनवासानंतर (तेथे इतके जंगल वाढले होते की अंगकोर जनमानसातून विस्मरणात गेले होते !) १९०१ साली या परिसराचा अभ्यास करण्यासाठी French School of the Far East ने अनुदान देऊन संशोधकांची तुकडी पाठवली... आणि जगाला एका प्राचीन आकारमान, स्थापत्यशास्त्र आणि शिल्पसमृद्धी या सर्व दृष्टीने आश्चर्यकारक असा नजराणा मिळाला!

केवळ "अंगकोर वट" या एका मदिराच्या प्रसिद्धीने आणि वाचनाने खेचून नेलेल्या मलाही तेथे प्रत्यक्ष पोहोचल्यानंतर दुसर्‍या दिवशीच हा सर्व प्राचीन खजीना अपेक्षेपेक्षा कितीतरी पटींनी मोठा आणि जास्त आश्चर्यकारक आहे हे उमजायला लागले होते. त्यामुळे अंगकोर पूर्ण पाहून होण्याअगोदरच "जर कुठली मोठी सफर परत करणे शक्य झाले तर अंगकोरचा क्रमांक पहिला असणार" असे मी जाहीर केले !

चला, आता निघूया हा सगळा खजीना पहायला. अर्थातच सर्व जागा पाहणे तेथे बराच काळ ठिय्या मारून बसल्याशिवाय बघणे शक्यच नाही. तसेच तेथे खरंच काय आहे याची पूर्ण कल्पना स्वतः भेट देऊन डोळ्यानी पाहिल्याशिवाय येणे शक्य नाही. मात्र आमच्या चार दिवसांच्या धावत्या भेटीत बघितलेल्या मुख्य ठिकाणांना एक एक करत माझ्या तुटपुंजा शब्दसंपत्तीतून आणि कॅमेर्‍याच्या डोळ्यातून जेवढे जमेल तेवढे पहायला पुढच्या भागापासून सुरूवात करूया.

(क्रमशः )

अंगकोर वट वरून पुढे जाता जराशी नाराजी वाटलीच. पण जास्तित जास्त आकर्षणे कमीत कमी वेळात बघण्यासाठी योग्य तोच आराखडा केला आहे ह्या मार्गदर्शकाच्या आश्वासनाने जरा बरे वाटले.

अंगकोर थोम

सर्वात प्रथम आम्ही अंगकोर थोमला भेट दिली. ख्मेर भाषेत अंगकोर थोम म्हणजे महानगर (Great City). बाराव्या शतकाच्या शेवटाला सातव्या जयवर्मनने वसवलेले हे शहर खेर साम्राज्याचे शेवटचे आणि सर्वात जास्त काळ राजधानीचे ठिकाण होते. ह्याचे अवशेष एकूण नऊ चौ किमी क्षेत्रफळावर आहेत. अंगकोर थोम, तिच्या पूर्वीची राजधानी यशोधरापूर आणि तिच्या नंतरच्या राजधान्यां यांची क्षेत्रे एकमेकात मिसळलेली आहेत. त्यामुळे, अंगकोर थोममध्ये सातव्या जयवर्मनने बांधलेल्या इमारतींबरोबर त्याच्या पूर्वजांनी आणि वंशजांनी बांधलेल्या अनेक इमारतीही आहेत. यातील बायोन (Bayon) राजमंदिर सर्वात महत्वाचे मानले गेले असले तरी बाफून (Baphuon) राजमंदिर, फिमिनाकास (Phimeanakas) राजमंदिरासारखी स्थळेही आपले वेगळेपण आणि महत्व राखून आहेत.


अंगकोर थोमच्या मध्यवर्ती भागाचा नकाशा (जालावरून साभार)

या चौरस आकाराच्या शहरासभोवती ३ किमी X ३ किमी लांबीरूंदीची ८ मीटर ऊंच तटबंदी आहे. तटबंदीभोवती पाण्याने भरलेली मोट आहे. मोट ओलांडून शहरात जाण्यासाठी मोटेवर बांधलेल्या पूलांच्या कठड्यांवर डाव्या बाजूला देव आणि उजव्या बाजूला दानव वासूकीची दोरी ओढून समुद्रमंथन करत आहेत असे दर्शवणारे शिल्प आहे. आम्ही सर्वात जास्त वापरात असलेल्या दक्षिण व्दाराने आम्ही शहरात प्रवेश केला...

...
अंगकोरच्या दक्षिण व्दारासमोरील समुद्रमंथन शिल्प

२३ मीटर उंच व्दाराच्या शिखराच्या चार बाजूस बायोन शैलीतली चार विशाल मुखे आहेत...


अंगकोर थोमचे दक्षिण व्दार

ही चार मुखे कोणाची आहेत याबाबत एकमत नाही. ती मुखे राजाचे चहुकडे लक्ष असल्याचे प्रतिक, बोधिसत्व अखिलेश्वराचे प्रतिक, साम्राज्याचे रक्षण करणार्‍या देवतांचे प्रतिक, इ असल्याची वेगवेगळी मते आहेत. पण या शहरात ही मुखे अजून भव्य आकारात आणि संख्येत दिसणार आहेत.

बायोन राजमंदिर

बायोन हे सम्राट सातव्या जयवर्मनने (इ स १२६५ - १३१५) नागफण्याखाली बसलेल्या जयबुद्धमहानाथ या बुद्धाच्या नावे बांधलेले महायान बौद्धमंदिर आहे. हे अंगकोर साम्राज्यातले शेवटचे आणि महायान बौद्ध संप्रदायाचे एकुलते एक राजमंदिर आहे. मंदिराच्या खोल्यांत व भिंतींवर ख्मेर साम्राज्यातील विविध भागातल्या स्थानीक देवदेवतांच्या मूर्ती आणि कोरिवकामे आहेत. त्याबरोबरच मंदिराच्या भिंतींवर पौराणिक, ऐतिहासिक आणि सर्वसामान्य जीवनातल्या प्रसंगांची कोरीवकामे आहेत. मात्र बायोन मंदिर त्याच्या विशाल चतुर्मुखी शिखरांमुळे जगप्रसिद्ध आहे...


बायोन राजमंदिर ०१

.


बायोन राजमंदिर ०२

.


बायोन राजमंदिर ०३

.


बायोन राजमंदिर ०४

.


बायोन राजमंदिर ०५

.


बायोन राजमंदिर ०६

.


बायोन राजमंदिर ०७ : नृत्यांगना

मंदिरातील इतर कोरीवकाम...


ख्मेर भूदल
.

चंपा आणि ख्मेर नौदलाचे युद्ध
.

अंगकोरचा बाजार
(वरची तीन चित्रे जालावरून साभार)

या मंदिराच्या शिखरांवर एकूण २१६ मुखे आहेत. इतक्या संख्येने असलेली आणि दूरवरून दिसू शकणारी भव्य मुखे एक प्रकारचा गुढ मानसिक परिणाम करतात. तेराव्या-चौदाव्या शतकांत त्यांचा जनमानसावर आणि ख्मेर साम्राज्याच्या शत्रूंवर मानसिक प्रभाव नक्कीच पडला असणार.

हे मंदिर बरोक प्रकारच्या ख्मेर स्थापत्यशैलीचा नमुना म्हणून ओळखले जाते. ही शैली पारंपारिक ख्मेर शैलीपेक्षा वेगळी आहे. जपानी सरकारच्या मदतिने या मंदिराचे पुनस्थापन चालू आहे.

या मंदिरावरचे चेहरे अनेक चित्रपटांत आलेले आहेत. त्यातले काही...
१. Lara Croft: Tomb Raider
२. Patlabor the Movie 2
३. Civilization IV: Beyond the Sword
४. Eternal Darkness: Sanity's Requiem, इ.
तसेच ते काही कादंबर्‍यांतही आलेले आहेत. त्यातल्या काही...
१. The Judas Strain (James Rollins)
२. The Golden Pagans (Peter Bourne c.1956), इ.

सुरुवात तर छान झाली होती. अंगकोर वटचे चित्र डोळ्यासमोर होतेच. पण आता तेथे जाण्याअगोदर अजून काय काय अनपेक्षित बघायला मिळते आहे याचीही उत्सुकता वाटू लागली होती !

बाफून राजमंदिर

बायोन पासून चालत थोड्याच अंतरावर असलेल्या बाफून राजमंदिराकडे गेलो. हे मंदिर सम्राट उदयादित्यवर्मनने (इ स १०५० - १०६६) अकराव्या शतकाच्या मध्यात बांधले. हे तीन स्तरांच्या पर्वताकारात (पिरॅमिडसारखे) बांधलेले शिवमंदिर आहे. मंदिराला लागूनच राजप्रासाद आहे. ही १२० मीटर X १०० मीटर आकाराची इमारत पारंपारिक बाफून ख्मेर शैलीत बांधलेली आहे. तिची सद्याची उंची ३४ मीटर आहे आणि तिच्या (आता नष्ट झालेल्या) शिखरासकट अंदाजे ५० मीटर ऊंच असावी. ख्मेर दरबारातल्या चीन सम्राटाच्या वकिलाने त्या आता नष्ट झालेल्या कासे (ब्राँझ) वापरून बनवलेल्या चित्ताकर्षक शिखराचे वर्णन लिहून ठेवले आहे. शिखराच्या बुंध्यात दहा खोल्या होत्या, इतका तो मोठा होता. पंधराव्या शतकाच्या शेवटी हे मंदिर बुद्धमंदिरात रुपांतरीत करण्यात आले, पहुडलेल्या बुद्धाची मुर्ती बसविण्याकरिता ते शिखर तोडले असावा असा अंदाज आहे.


बाफून राजमंदिराच्या आवारात ०१

.


बाफून राजमंदिराच्या आवारात ०२

.


बाफून मंदिराच्या अर्ध्या उंचीवरून दिसणारे मदिराचे आवार आणि पूर्वे दिशेचे गोपूर

हे मंदिर रेतीने भरलेल्या जमीनीवर बांधलेले होते. त्यामुळे आणि त्या प्रचंड इमारतीच्या वजनाने तिची वारंवार बरीच पडझड झाली. शिवाय ख्मेर रूजच्या कालावधित झालेल्या लूटालूटीने १९९५ पर्यंत तिची अवस्था १० हेक्टर जमिनीवर विखुरलेले कोरीवकामाने भरलेले ३ लाख दगड अशी झाली होती. पण पुरातत्व शास्त्रज्ञांनी ते आव्हान स्विकारले आणि अपरिमित श्रम, ख्मेर स्थापत्यशैलीचा आधार आणि बर्‍या अवस्थेत असलेला इमारतीचा एक कोपरा यांच्या मदतिने हे प्राचीन मंदिर परत उभे करण्याचा चमत्कार करून दाखविला !


जानेवारी २०११ पर्यंत पुनस्थापित झालेले बाफून मंदिर ०१

.


जानेवारी २०११ पर्यंत पुनस्थापित झालेले बाफून मंदिर ०२

.


जानेवारी २०११ पर्यंत पुनस्थापित झालेले बाफून मंदिर ०३

एप्रिल २०११ पर्यंत पुनस्थापनेचे काम पुरे झाले आणि राजे नोरोदोम सिंहनूक यांनी फ्रेंच पंतप्रधान फ्रांस्वा फिलाँ यांच्याबरोबर ३ जुलै २०११ ला मंदिराचे उद्घाटन करून त्याची सफर केली.

मंदिराबाहेर पडलो आणि आजूबाजूला असलेल्या शेकडो वर्षे वयाच्या अनेक वृक्षराजांपैकी काहींच्या बरोबर फोटो काढून घेण्याचा मोह आवरला नाही...

...
वृक्षराजांबरोबर फोटोसंधी

सुमारे हजार वर्षांपूर्वी बांधलेला प्राचीन स्थापत्यचमत्कार व त्याच्या विखुररेल्या ३ लाख दगडांतून तो परत उभा करण्याचा अर्वाचीन चमत्कार म्हणजे एकावर एक फुकट असे दोन चमत्कार पाहून आणि त्यांचे साक्षीदार असलेल्या दोन वयोवृद्ध वृक्षराजांशी संवाद करून आम्ही पुढच्या आकर्षणाकडे चालू लागलो.

(क्रमशः )

 अंगकोर मधे एक डायनोसोर चे शिल्प आहे, असे वाचले आहे. ते बघितलेत का?
असे जर खरेच असेल, तर हा एक चमत्कारच ठरावा.
.
n

 

मी हि सफर २०११ मध्ये केली. आता तिथले दर खूप बदलले असतील. मात्र त्या भागांतील कंबोडिया आणि व्हिएतनाम हे मलेशिया आणि बालीपेक्षा बरेच स्वस्त आहेत. सियाम रीप पर्यटनाच्या दृष्टीने सुधारलेले आहे. पण अंगकोरचा आवाका इतका मोठा आहे की मार्गदर्शकाशिवाय जाणे योग्य नाही... गडबडीत बरेच काही बघायचे राहून जाईल.

आंतरजालावर अनेक चांगल्या पॅकेज टूर कंपन्या आहेत. तारांकित पासून साध्या (पण स्वच्छ आणि निटनेटक्या) हॉटेल, सहल आणि मार्गदर्शकासकट ३-५-७ दिवसांचे बुकींग करू शकता. फक्त विमानाचे तिकीट आपण काढून इतर सर्व सहल (मार्गदर्शकासह) पॅकेजमध्ये घेणे जास्त सोईचे होईल.

त्या काळी सामान्य मंदिरांच्या, राहण्याचा आणि व्यावसायिक उपयोगाच्या इमारती लाकडी असत. विशाल आकाराच्या आणि त्यातही सुंदर कोरीवकामाने सजलेल्या दगडी इमारती उभारणे हे अमाप संपत्ती आणि सत्ता असणार्‍या सम्राटांनाच परवडण्यासारखे होते. अंगकोर थोमच्या केवळ मध्य आवारातच एका आकर्षणाकडून दुसर्‍याकडे जाताना इतक्या मोठ्या दगडी इमारती दिसतात की हे त्यावेळचे फारच मोठे आणि फारच वैभवशाली शहर होते याची खात्री पटते. असेच हे दाट झाडीत लपलेले मंदिराचे गोपुर...


दाट वृक्षराजीमध्ये दडलेले मंदिराचे गोपुर

हस्तीवेदिका

नंतर आम्ही अंगकोर थोमच्या राजमंदिरवेदिका पहायला निघालो. या वेदिका मुख्यतः फौजेची मानवंदना स्विकारताना आणि जनतेला खुल्या असणार्‍या राजसमारंभांच्या वेळेस सम्राटांच्या आणि राजदरबारातील महत्वाच्या लोकांच्या बैठकीचे स्थान म्हणून वापरल्या जात असत...


नकाश्यात वर्तुळातील 4 या इंग्लिश आकड्याच्या डाविकडे असलेली उभी लांब हिरवी रेषा हस्तिवेदिका दर्शवित आहे

आता त्याकाळचा चक्रवर्ती सम्राट म्हणजे त्याच्या दरबाराची वेदिका तशीच असायला पाहिजे ना. सातव्या जयवर्मनने बंधलेली सगळ्यात प्रसिद्ध हस्तिवेदिकेची लांबी आहे तब्बल ३५० मीटर! तिची उंची सर्वसाधारणपणे ३ मीटर आणि रुंदी साधारण ८ -१० मीटर तर काही ठिकाणी १५-२० मीटर आहे. आता या वेदिकेचा केवळ दगडी चौथरा बाकी आहे. छप्पर आणि त्याचा भार उचलणारे खांब लाकडाचे असल्याने काळाबरोबर नष्ट झाले आहेत आणि इतर मौल्यवान साजशृंगार अर्थातच लुटला गेला आहे. वेदिकेच्या विरुद्ध बाजूला संपूर्ण मैदानाच्या कडेला अनेक उंच बुरूज आहेत...


हस्तिवेदिका ०१

.


हस्तिवेदिका ०२

या वेदिकेवरून मैदानात प्रवेश करण्यासाठी पाहिर्‍या असलेले एकूण पाच चौथरे आहेत. वेदिकेला आणि पाहिर्‍यांकडे नेणार्‍या चौथर्‍यांना सिंह, गरूड आणि नाग यांच्या मूर्तींनी सुशोभित केलेले आहे..


हस्तिवेदिका ०३

सम्राटाच्या खास प्रशस्त मध्यचौथर्‍याच्या कडांवर विशाल नागराजांबरोबर सिंहाच्या विशाल पूर्णाकृती मूर्तीही आहेत..


हस्तिवेदिका ०४ : सम्राटाच्या पाहिर्‍यांकडे जाणारा चौथरा

विजयी सैन्य अंगकोर थोमच्या पूर्वेकडील दरवाज्याने प्रवेश करून विजयमार्गावरून या वेदिकेसमोरच्या मैदानात प्रवेश करत असे. प्रशस्त वेदिकेवरुन चालताना तिचे आकारमान आणि समोरचे संचलनाचे भव्य मैदान पाहूनच मन भारावून जाते. मग तिला पूर्णपणे सजवलेले असताना आणि तेथे विजय प्राप्त करून आलेल्या सैन्याच्या भव्य संचलनाचा जल्लोश चालू असताना वातावरण कसे भारून जात असेल याची काहिशी कल्पना येते... आणि हे सर्व हजारभर वर्षांपूर्वी खरेच घडले आहे हे जेव्हा ध्यानात येते तेव्हा केवळ थक्क व्हायला होते...

या वेदिकेच्या मध्यभागी हत्तींची शिल्पे आहेत. या हत्तिंच्या शिल्पांवरूनच या वेदिकेचे नाव हस्तिवेदिका (Terrace of the Elephants) असे पडले आहे. हत्तींच्या सोंडेतून पाणी वाहताना दाखवले आहे. ही शिल्पे जलदेवता इंद्राला वंदना म्हणून स्थापित केली गेली आहेत. त्यांच्या बाजूला असलेल्या पाहिर्‍या तीन-साडेतीन मीटर उंचीवर असलेल्या कमलासनाकडे जातात...


हस्तिवेदिका ०५

मूळ हस्तिशिल्पांबरोबर भिंतींवर हत्तींची अनेक कोरीवकामे (उठावचित्रे) आहेत...


हस्तिवेदिका ०६

भिंतीवर एका ठिकाणी नागाला पायात पकडलेला गरूड आणि त्याच्या दोन्ही बाजूला सिंह यांनी वरचा भाग तोलून धरला आहे असे उठावचित्र आहे...


हस्तिवेदिका ०७

कुष्ठरोगी राजाची वेदिका (Terrace of Leper King)

हस्तीवेदिकेच्या उत्तरेकडे कुष्ठरोगी राजाची २५ मीटर लांबीची इंग्लिश 'U' अक्षराच्या आकाराची वेदिका आहे. या वेदिकेवर बसलेल्या अवस्थेतल्या मनुष्याकृती पुतळ्यावरून या वेदिकेचे नाव पडले आहे. ही मूर्ती कुष्ठरोगी राजाची असल्याची कल्पना तिच्यावर अनेक शतके साचलेल्या नेचे आणि दगडफुलांच्या थरांमुळे केलेली असावी. त्याचबरोबर पाश्चिमात्य अज्ञान आणि वंशव्देष त्यामागे असावेत.

उघड्यावर असलेली मूळ मूर्ती ऊनपावसापासून सुरक्षित ठेवण्यासाठी राष्ट्रीय संग्रहालयात ठेवलेली आहे. येथील आताची मूर्ती मूळ मूर्तीची हुबेहूब प्रतिमा आहे. ..


कुष्ठरोगी राजाची वेदिकेवरील मूर्ती

नग्नावस्थेत असलेली ह्या मूर्तीवर जावा शैलीचा प्रभाव आहे. काही पुरातत्त्व संशोधकांच्या मते ही वेदिका राजदहनस्थान असून ती मूर्ती यमाची आहे. या वेदिकेच्या चौथर्‍याच्या भिंतींवर असलेल्या पाताळवासी व्यक्ती आणि प्राण्यांची उठावचित्रे याच सिद्धान्ताचे समर्थन करतात...


कुष्ठरोगी राजाच्या वेदिकेवरील पाताळवासी व्यक्ती आणि प्राण्यांची चित्रे ०१

.


कुष्ठरोगी राजाच्या वेदिकेवरील तरवारधारी पाताळवासी ०२

मनातल्या मनात ख्मेर सम्राट बनून विजयी सैन्याची राजवंदना स्विकारून भारावलेल्या अवस्थेत असताना मार्गदर्शकाने... "चला, आता अंगकोर वट बघायला जाउया" असं म्हणून भानावर आणले. उत्सुकतेची परिसीमा कशीबशी सांभाळत आम्ही जगातले सर्वात मोठी धार्मिक इमारत असलेल्या जगप्रसिद्ध राजमंदिराकडे निघालो.

(क्रमशः )

 वेदीका ह्या शब्दाचा नेमका अर्थ लागला नाही , कृपया सांगाल का ? 

वेदिका म्हणजे कोणत्यातरी समारंभासाठी तयार केलेला उंच चौथरा. मलाही हा शब्द नविनच होता. शब्दकोषातून शोधावा लागला. म्हणून लेखाच्या शिर्षकांत त्याचे इंग्लिश भाषांतर (terrace) दिले आहे.

वेदिकांबद्दल अजून थोडे...

स्थापत्यशास्त्रातले उंच चौथरे ही भारतिय द्रविड संस्कृतीने दिलेली आणि ख्मेर संस्कृतीने पूर्णपणे अंगभूत केलेली ठेव आहे. केवळ समारंभासाठी अथवा देवळासाठीच नाही तर संपूर्ण शहरे मानवनिर्मीत उंच चौथर्‍यांवर वसवणे ही प्रथा सिंधू नदीच्या खोर्‍यातल्या (हराप्पा-मोहेंजोदरो) संस्कृतीपासूनच सुरू झाली. या रचनेचे अनेक उपयोग होत असत त्यापैकी महत्वाचे खालीलप्रमाणे आहेत :

१. या प्रदेशांतल्या सतत येणार्‍या पुरांपासून संरक्षण

२. उच्चासनावर असलेल्या राजा, देवूळ, शहर यांचा आपल्या नागरिकांवर आदर/अभिमान वाढवणारा मानसिक प्रभाव आणि शत्रूंवर भितीदायक प्रभाव.

 

अंगकोर वट आकारमान, शिल्पकला आणि कोरीवकामाच्या दृष्टीने खरोखरच महामंदिर आहे. हे मंदिर कंबोज स्थापत्यशैलीचा अत्युच्च नमुना समजला जातो. त्याच्या या शैलीला कंबोडियन अंगकोर वट शैली हे नाव दिले गेले आहे. हे मंदिर आधुनिक कंबोडियाची ओळख बनलेले आहे. त्यामुळेच केवळ कंबोडियाच्या पर्यटनातच नव्हे तर त्याच्या राष्ट्रध्वजावर आणि चलनाच्या नोटांवरही या मंदिराच्या चित्राने मानाचे स्थान पटकावले आहे. १९९२ पासून ते युनेस्को मान्यताप्राप्त जागतिक वारसा स्थान झालेले आहे.

या राजमंदिराची उभारणी सम्राट दुसरा सूर्यवर्मन (इ स १११३ - ११५०) याने बाराव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात केली. हे विष्णूमंदिर "वराह विष्णुलोक" या नावाने बांधले गेले. सोळाव्या शतकात बदलत्या राजधर्माबरोबर तेथे बुद्ध उपासना सुरू झाली. जगातील सर्वात मोठी धार्मिक इमारत असलेल्या या बांधकामावर अंदाजे ५०,००० लोकांनी ३० वर्षे काम केले. याच्या सर्वात बाहेर १५०० मी X १३०० मी आकाराची चौकोनी संरक्षक भिंत आहे. त्या भिंतीबाहेर सर्व बाजूंनी २०० मीटर रुंदीचा खंदक आहे. परिघाकडून केंद्राकडे जाताना उंच होत जाणार्‍या तीन समकेंद्रीत चौकोनी सज्जा (galleries) आहेत. त्या सज्जांना जोडणार्‍या पूर्वपश्चिम आणि उत्तरदक्षिण अश्या अक्षाकृती सज्जा आहेत. जेथे सज्जे एकमेकाला छेदतात त्या दर ठिकाणी गोपुरे आहेत. द्रविड शैलीचा प्रभाव असलेल्या उंच मध्यावर चार टोकांना चार आणि मध्यभागी एक अशी पाच शिखरे आहेत. मधले शिखर ६५ मीटर (साधारण २२ मजली इमारतीइतके) उंच आहे. शिखरे कमळाच्या कळ्यांच्या आकाराची आहेत. सर्वात मध्यभागी ख्मेरमध्ये बाकान (Bakan) या नावाचा चौरस आकाराचा मंदिराचा केंद्रीय भाग आहे. तेथे जाण्यासाठी उभ्या चढाच्या पाहिर्‍या आहेत.

संरक्षक भिंतीबाहेरचा खंदक म्हणजे दुग्धसागर, मध्यभागाचा बाकान म्हणजे पाच शिखरे असलेला पौराणिक मेरू पर्वत आणि त्यावरच्या देवलोकात विष्णू व देवतास्वरूप सम्राटाचे वास्तव्य अशी ही ख्मेर परंपरेप्रमाणे असलेली वास्तुरचना आहे.

या मंदिराचे एकूण क्षेत्रफळ ८२०,००० चौ मीटर (२०३ एकर) आहे. अंगकोर पद्धतीप्रमाणे देऊळ सोडून इतर इमारती लाकडाच्या असत त्यामुळे अर्थातच त्या आतापर्यंत नष्ट झाल्या आहेत. तसेच मंदिरातील सुवर्ण, रौप्य, हिरे-माणके इ मध्यकाळात झालेल्या लुटालुटीत नाहीसे झालेले आहे. केवळ उरलेल्या दगडी इमारतीच्या स्थापत्याने आणि त्यातील कोरीवकामाने अंगकोर वटचे इतके नाव झाले आहे तर मग सर्व वैभवासह असलेले हे मंदिर कसे असेल त्याची कल्पना करणेही कठीण आहे.


अंगकोर वट : विहंगम दृश्य (जालावरून साभार)

.


अंगकोर वट : मंदिरमध्याचे स्थापत्यचित्र (जालावरून साभार)

.


अंगकोर वट : मंदिरमध्याची प्रतिकृती (जालावरून साभार)

या मंदिराची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यातली काही महत्वाची खालील प्रमाणे:

१. या अगोदरच्या शैव राजमंदिरांच्या ख्मेर परंपरेला छेद देऊन बांधलेले हे पाहिले वैष्णव राजमंदिर आहे.

२. त्याच्या खंदकाचे, भिंतींचे आणि सज्जांचे मोठे आकारमान.

३. पूर्वाभिमुख मंदिरांच्या ख्मेर परंपरेला सोडून हे मंदिर पश्चिमाभिमुख आहे. याचे कारण बहुदा याच्या पश्चिम गोपुराचा सूर्याच्या पृथ्वीसापेक्ष खगोलशास्त्रिय उच्चतम आणि नीचतम अवस्थेशी असलेला संबंध आहे (western gopura brackets the rising sun's position between the summer and winter solstices).

४. सज्जांच्या भिंतींवर असलेली उठावचित्रांची (bas-reliefs) रचना घड्याळाच्या विरुद्ध दिशेने पहावी अश्या रितीने केलेली आहे. याचे कारण खगोलशास्त्रिय आहे असे एलेनॉर मनिक्का (Eleanor Mannikka) या शास्त्रज्ञाचे मत आहे. या सिद्धान्ताप्रमाणे:
अ) वसंत ऋतूतील समदिवसरात्रकाल (spring equinox) होणार्‍या पूर्व दिशेला समुद्रमंथनाची चित्रे म्हणजे सर्व जगाची सुरुवात;
आ) त्यानंतर सूर्य उच्चतम अवस्थेत (summer solistice) जातो त्या उत्तर दिशेला मेरुपर्वत आणि देवदानवांची युद्धे;
इ) त्यानंतर शरद ऋतूतील समदिवसरात्रकाल (autumn equinox) होणार्‍या पश्चिम दिशेला कुरुक्षेत्रावरचे महाभारत युद्ध आणि त्याने सुरू केलेला युग-बद्दल;
ई) आणि शेवटी सूर्य नीचतम अवस्थेत (winter solistice) जातो त्या दक्षिण दिशेला यमलोक आणि नरक, वगैरे;
हा सिद्धांत सर्व पुरातत्व संशोधकांना मान्य नसला तरी अंगकोर वटच्या रचनेत अनेक खगोलशास्त्रिय रहस्ये दडलेली आहेत याबाबत सर्वांचे एकमत आहे.

सज्जांवरच्या पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक, राजकीय आणि रोजच्या जीवनाची दृश्ये असलेल्या उठावचित्रांमध्ये एकही पुनरावृत्ती नाही. येथे खास कंबोडियन असलेल्या अप्सरांची २,००० पेक्षा जास्त चित्रे आहेत, त्यांच्या आकारमान अथवा भावदर्शनामध्येही अजिबात पुनरावृत्ती नाही ! बहुतेक सगळी उठावचित्रे सुर्यवर्मनच्या कारकीर्दीत बनविली गेली. मात्र त्यात नंतर, मुख्यतः सोळाव्या शतकात राजा आंग चानच्या कारकीर्दीत थोडी भर घातली गेली.


अंगकोर वट : सज्जांवरील उठावचित्रांच्या मालिकांचे स्थान दाखवणारा नकाशा
(http://www.art-and-archaeology.com/ वरून साभार)

चला तर या मंदिरात आपण अर्थातच पश्चिमेकडून प्रवेश करू या. यासाठी आपल्याला मंदिरासभोवतालचा खंदक पार करण्यासाठी असलेल्या २०० मीटर लांबीच्या आणि पाच-सहा लेनचा रस्ता होईल इतक्या रुंद बंधार्‍यावरून चालत जावे लागते...


अंगकोर वट : खंदक ओलांडून पश्चिम गोपुराकडे नेणारा बंधारा

बाहेरच्या भिंतीच्या गोपुराच्या मनोर्‍यांची पडझड झालेली आहे. पण तरीही त्यांच्या अवशेषांची भव्यता मन मोहून घेते...


अंगकोर वट : पश्चिम गोपुर ०१

.


अंगकोर वट : पश्चिम गोपुर ०२

गोपुरापर्यंत पोचेपर्यंत मुख्य मंदिर पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. पण गोपुरापासून दोन्ही बाजूंच्या गोपुराला जोडणारे सज्जे पावलांना थबकवतात. न संपणार्‍या लहान लहान होत जाण्यार्‍या दरवाज्यांच्या मालिकेसारख्या दिसणार्‍या सज्जातून पूर्ण परिक्रमा करणे पुरेश्या वेळेच्या अभावामुळे शक्य नव्हते. तरीसुद्धा दोन्ही बाजूला काही पावले गेल्याशिवाय राहवत नाही...


अंगकोर वट : पश्चिम गोपुराला इतर गोपुराशी जोडणार्‍या सज्जाचा एक भाग

गोपुर ओलांडून आत गेल्यावर ध्यानात येते की "दिल्ली अजून बरीच दूर आहे." कारण पुढे गोपुराला मुख्य मंदिराशी जोडणारा ३५० मीटर लांबीचा, काही मीटर उंचीचा बंधारा (causeway) समोर येतो...


अंगकोर वट : पश्चिम गोपुराला मुख्य मंदिराशी जोडणारा बंधारा

सगळ्यात बाहेरची संरक्षक भिंत आणि मुख्य मंदिराच्या इमारतीच्या मधल्या भागात प्राचीन काळी लाकडी घरांची वस्ती होती. आता तेथे थोडी मोकळी जागा आणि इतर ठिकाणी जंगल वाढलेले आहे. बंधार्‍यावरून काही अंतर चालल्यावर परत मागे वळून गोपुराकडे पाहण्याचा मोह होतोच...


अंगकोर वट : मदिराच्या बाजूने पश्चिम गोपुर

बंधार्‍याच्या प्रत्येक बाजूला एक अश्या दोन विशाल प्राचीन वाचनालयाच्या इमारती आहेत. त्या इमारतींचा आकार आणि बांधणी पाहून ख्मेर साम्राज्यात ज्ञानाची किती आदर केला जात असावा याचा अंदाज येतो...


अंगकोर वट : डावीकडचे वाचनालय

.


अंगकोर वट : उजवीकडचे वाचनालय

जसजसे आपण अंगकोर वटचे प्रतीक म्हणून वापरलेल्या देखाव्याच्या जवळ येऊ लागलो तसे इमारतीच्या खर्‍या भव्यतेची कल्पना येऊ लागते आणि ध्यानात येते की प्रतिकचिन्ह संपूर्ण मंदिराला पुरेसा न्याय देउ शकलेले नाही. मूळ इमारत अधिक भव्य, अधिक आकर्षक वाटते...


अंगकोर वट : प्रतिकचिन्ह दर्शन ०१

आम्ही भेट दिली तेव्हा दुसर्‍या पश्चिम गोपूराच्या मुख्य व्दाराच्या पुनस्थापनेचे काम चालू होते. त्यामुळे आम्हाला त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या उपदरवाज्यांपैकी एकाने आत जावे लागले. मध्यमार्गापेक्षा लहान असलेल्या पुर्णाकृती सिंहमूर्तींनी सजवलेल्या या उपमार्गालाही लहान म्हणणे कठीण आहे...


अंगकोर वट : दुसरे पश्चिम गोपुर ०२

.


अंगकोर वट : दुसरे पश्चिम गोपुर ०३

.


अंगकोर वट : दुसरे पश्चिम गोपुर ०४

मध्यमार्गाच्या पाहिर्‍या चढून आल्यावर एक प्रशस्त स्वागतक आहे. तो स्वागतकक्ष मंदिराच्या सज्जात उघडतो तर उपमार्गांच्या पाहिर्‍या आपल्याला तडक सज्जात नेवून सोडतात...


अंगकोर वट : दुसर्‍या पश्चिम गोपुराच्या डाव्या उपव्दारातून झालेले मुख्यव्दाराचे दर्शन

.


अंगकोर वट : दुसरे पश्चिम गोपुर आणि इतर गोपूरांना जोडणारा सज्जा

हे गोपुर ओलांडून आत गेल्यावर आपण मंदिराच्या मुख्य इमारतीत प्रवेश करतो. दुसर्‍या आणि तिसर्‍या सज्जाला जोडणार्‍या मार्गाच्या प्रत्येक बाजूला दोन अशी दगडी बांधकाम असलेली एकूण चार चौरस आकाराची कुंडे आहेत. आता कोरडी असली तरी देऊळ वापरात असताना ती सतत पाण्याने भरलेली असत...


अंगकोर वट : पाण्याचे कुंड

कुंडांच्या आजूबाजूचे आणि इतर सर्व सज्जे कोरीवकामाने सजलेले आहेत. आतापर्यंत सज्जांची भव्यता, सज्जातील कोरीव उठावचित्रे, एकूण इमारतीची लांबी-रुंदी-भव्यता व सज्जांचे जाळे यांच्यात काय बघू आणि काय नको होउन प्रचंड गडबड होत होती. सर्वच भिंती आणि खांबांचे पृष्ठभाग उठावचित्रांनी सजवलेले आहेत. काहीच मनासारखे बघितले जात नाही असे वारंवार वाटत होते...


अंगकोर वट : अप्सरा

.

अंगकोर वट : उठावचित्रे

पण उठावचित्रे शांतपणे बघण्याअगोदर प्रथम बाकान म्हणजे मंदिराचा सर्वोच्च मध्यभाग बघून घेऊ असे मार्गदर्शक म्हणाला म्हणून आम्ही पुढे निघालो. बाकानला मध्यभाग म्हणत असले तरी केवळ हा भाग म्हणजे मानवनिर्मित दगडी टेकडीवरचे एक पूर्ण मंदिरच आहे...

अंगकोर वट : बाकान (मंदिरमध्य) ०१

.

अंगकोर वट : बाकान (मंदिरमध्य) ०२

.

...

अंगकोर वट : बाकान (मंदिरमध्य) ०३ व ०४

.

अंगकोर वट : बाकान (मंदिरमध्य) वरील अप्सरा

.

अंगकोर वट : बाकान (मंदिरमध्य) वरचे कोरीवकाम

.


अंगकोर वट : बाकानचे प्रवेशव्दार

.

अंगकोर वट : बाकानच्या प्रवेशव्दारावरील नक्षी

मंदिराच्या इमारतींच्या खिडक्या आणि छपरे दगडी आहेत. खिडक्यांना कोरीव दगडाच्या सळया आहेत. छपरांची रचना आणि कोरीवकाम जणू ते छप्पर झाडांच्या फांद्यांनी शाकारलेले दिसावे असे आहे...

अंगकोर वट : सज्जाचे बाहेरच्या बाजूने घेतलेले चित्र

.

अंगकोर वट : छप्पर

सर्व भिंती कोरीवकामाने भरलेल्या आहेत...

अंगकोर वट : बाकानच्या भिंतींवरचे कोरीवकाम ०१

.

...

अंगकोर वट : बाकानच्या भिंतींवरचे कोरीवकाम ०२ व ०३

मंदिरातून फिरताना एका सज्जातून दुसर्‍या सज्जात फिरताना चारी बाजूला असलेल्या भीती, खांब आणि खिडक्यांमुळे बरेच चाललो आहे हे कळत असले तरीसुद्धा बाकानच्या उंचीवरून मंदिराच्या मध्य आवाराच्या चारी बाजूंचे दर्शन घेतल्यावरच त्याच्या भव्यतेची खरी ओळख पटते...


अंगकोर वट : बाकानमधून दिसणारे मंदिराचे मध्य आवार ०१

.


अंगकोर वट : बाकानमधून दिसणारे मंदिराचे मध्य आवार ०२

.


अंगकोर वट : बाकानमधून दिसणारे मंदिराचे मध्य आवार ०३

.


अंगकोर वट : बाकानमधून दिसणारे मंदिराचे मध्य आवार ०४

.


अंगकोर वट : बाकानमधून दिसणारे मंदिराचे मध्य आवार ०५

.


अंगकोर वट : बाकानचा मध्यभाग

.


अंगकोर वट : बाकानच्या वरच्या मजल्यावरून दिसणारे बाकानचे मध्यशिखर

तेथून खाली उतरून आम्ही परत सज्जांच्या जाळ्यात गुरफटून घ्यायला सुरुवात केली आणि आता जरा भानावर येउन त्यांच्या भव्यतेची नीट कल्पना येऊ लागली...


अंगकोर वट : सज्जा ०१

.

...
अंगकोर वट : सज्जा ०२ व ०३

.

...
अंगकोर वट : सज्जा ०४ व ०५

.

अंगकोर वट : सज्जा ०६

बाहेर येत येत सरतेशेवटी आम्ही खास उठावचित्रांकरता जगप्रसिद्ध असलेल्या सज्जात आलो. तेथे आल्यावर ध्यानात आले की ह्या १८७ मी X २१५ मी आकाराच्या सज्जाच्या एकूण ८०४ मीटर परिघातली सगळी उठावचित्रे नीट पहायची तर दोन पूर्ण दिवसही कमी पडतील, धावत धावत बघायला सहा तास तरी सहज लागतील...

अंगकोर वट : उठावचित्रांसाठी प्रसिद्ध असलेल्या सज्जाच्या एका दिशेच्या अर्ध्या भागाची झलक

या वरच्या चित्रात दिसणार्‍या संपूर्ण भागात साधारण ९० मी X ३ मी आकाराचे महाभारत युद्धाचे एकच उठावचित्र आहे ! या सज्जात तशीच प्रचंड आकाराची इतर अनेक उठावचित्रे आहेत. त्या चित्रांच्या जागा दाखवणारा नकाशा सुरुवातीसच दिला आहेच.

उठावचित्रे पाहण्यात गुंतलेले डोळे पायांना त्या सज्जाबाहेर जाउ देण्यास तयार नव्हते. पण "सूर्यास्ताकरता प्रसिद्ध असलेल्या एका मंदिरावर जायचे आहे" असे सांगून आमचा मार्गदर्शक घाई करत होता. नाईलाजाने जेवढी मिळतील तेवढी उठावचित्रे धावत धावत बघितली आणि जमतील तेवढी चित्रे काढून घेतली...

.

.

.

.

.

.

.

अंगकोर वट : सहस्त्रबाहू रावण

.

.

.

शेवटी मार्गदर्शकाने "सुरक्षेसाठी पुरातत्वखात्याने केलेल्या नियमाप्रमाणे सुर्यास्त सोहळा बघण्याच्या मंदिरावर एका वेळेस ३०० माणसे जमा झाली की प्रवेश बंद होतो" असा निर्वाणीचा दिला तेव्हा चडफडत का होईना पण तेथून निघणे भाग पडले.

अंगकोर वटसाठी केवळ अर्धा दिवस राखून ठेवणार्‍या आमच्या टूर कंपनीचा किती राग आला असेल ते सांगणे कठीण आहे. त्याचबरोबर, सहल कंपनीने दिलेल्या अपुर्‍या माहितीमुळे या ठिकाणाची हेलिकॉप्टरची सहल करता आली नाही ही रुखरुख मनात राहिली ते वेगळेच. बाकानच्या उंचीवरून ह्या मंदिराचा परिसर इतका आश्चर्यकारक वाटला तर अधिक उंचीवरून तो एका नजरेच्या टप्प्यात आल्यावर कसा दिसला असता याची केवळ कल्पना करावी लागली. परत केव्हातरी तेथे जायला पाहिजेच अशी प्रबळ इच्छा मनात घेउनच पुढे निघालो.

अंगकोरमधली बरीच चित्रे या दुव्यावर पहायला मिळतिल.

खालच्या दुव्यातील अंगकोर वटची चित्रफीत पाहता येईल...

(क्रमशः )

 गजारूढ इन्द्र ओळखू आला. रावणकैलासउत्थापन मूर्तीची शैली थोडी वेगळी आहे. आपल्याकडील शैलीत नेहमीच रावणाच्या पाठीचा भाग दर्शकाच्या समोर असतो. तर इकडे मात्र रावण दर्शकाच्या समोरच तोंड करून म्हणजे उलट्या दिशेने कैलास उचलण्याच्या प्रयत्न करतोय.

त्या सिंहाच्या मधून जाणार्‍या पायर्‍या लाकडी दिसताहेत. त्या पूर्वीच्याच आहेत का हल्लीच बसवल्यात?

आमच्या सहल कंपनीच्या अज्ञानामुळे म्हणा किंवा निष्काळजीपणामुळे म्हणा पण ह्या मंदिरातील सगळी चित्रं बघता आली नाही ही रुखरूख आहेच. हिंदू संस्कृतीचा प्रबळ प्रभाव असला तरी ख्मेर साम्राज्याचा मोठा आवाका आणि राजकिय व आर्थिक ताकद बघता त्यांच्या चालिरिती, स्थापत्य आणि कलाकृतींमध्ये स्थानिक प्रभाव असणे सहाजिकच होते. मात्र मूळ पौराणीक कथांना फारसा धक्का लागलेला दिसत नाही. शिवाय १३ व्या शतकापासून बौद्ध धर्माचा प्रभाव सुरू होऊन आणि १५व्या शतकापासून जवळ जवळ १००% बौद्ध जनता असूनही सर्वसामान्य लोकांची हिंदू धर्माबद्दल आस्थाच दिसली. मुख्य म्हणजे हिंदू (विशेषतः महाभारत आणि रामायण) आणि बौद्ध प्रथा एकमेकात नैसर्गिकपणे मिसळून गेल्या आहेत, त्यांत सर्वसामान्य कंबोडियन माणसाला काही विशेष वाटत नाही.

त्या सिंहाच्या मधून जाणार्‍या पायर्‍या लाकडी दिसताहेत. त्या पूर्वीच्याच आहेत का हल्लीच बसवल्यात? काही ठिकाणी तुटलेल्या दगडी पायर्‍यांचे अधिक नुकसान टाळण्यासाठी आणि / किंवा पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लाकडी पायर्‍या बसवल्या आहेत. चित्रातल्या पायर्‍या अशा प्रकारे डागडूजी केलेल्या आहेत.

 

आता ते बुद्धमंदिर झालेले असल्याने विष्णू किंवा इतर हिंदू देवतांच्या पूजेसाठी ठेवलेल्या मूर्ती नाहीत. काही सज्जांमध्ये साध्या बुद्धमूर्ती आहेत. मंदिरमध्यात ही मूर्ती होती पण ती प्राचीन नसावी असे समजते...

जालावर खालच्या चित्रातली विष्णूची मूर्ती अंगकोर वट मधिल असल्याचे वाचले. पण सद्या ती कोठे आहे ते माहित नाही...

 ती आडवी झोपलेली बुद्ध मूर्ती टिपिकल अनंतशयनी विष्णूच्या शैलीत कोरलेली दिसतेय.

त्या पोजमध्ये पैल्यांदा विष्णूची मूर्ती कोरली जात असे की बुद्धाची? की एकावरून दुसरा असे कै नै? हा प्रश्न फक्त या अंगकोर वटबद्दल नाही, इन जण्रल आहे.

माझ्या माहितीप्रमाणे तरी विष्णूची.
बुद्धाची तशा प्रकारची मूर्ती माझ्या पाहण्यात नाही. बुद्धमूर्ती कायम उभ्या अथवा ध्यानमग्न अवस्थेत बसलेल्या आढळतात. अपवाद म्हणजे अजिंठा आणि नाशिकलेणीतील महायानकालीन महापरिनिर्वाण मूर्तीचा पण हे महापरिनिर्वाण असल्याने शैली अत्यंत भिन्न आहे याउलट अनंतशयनी मूर्ती अगदी निवांतपणे डोके उंचावून झोपलेल्या अवस्थेत दिसते. ह्या अजिंठ्याच्या महायानमूर्तीच्या आधीच्या गुप्त काळातील कित्येक मूर्ती अनंतशयनी विष्णूच्या आहेत.

पहुडलेला बुद्ध (reclining Buddha) ही कल्पना पहुडलेल्या विष्णूवरून आली असावी.

पहुडलेल्या बुद्धाचे डोळे बंद असले तर त्याच्या पायांच्या अवस्थेप्रमाणे दोन अर्थ होऊ शकतात:

(अ) पाय पुढेमागे असल्यास ती निद्रावस्थेतील मूर्ती...

(आ) पाय एकमेकाला समांतर असले तर ती निर्वाणावस्थेतील मूर्ती...

 या बुद्धमूर्ती ब्रम्हदेशातल्या आहेत... अजून बघायच्या राहिल्या आहेत (पण सहलिंच्या यादीतल्या आहेत ;) ).

भाग १ मधे तुम्ही दिलेला बोरोबुदूर स्तुपाचा फोटो, आणि त्यामुळे आलेला मंडलाचा संदर्भ मग भाग ३ मधे तुम्ही दिलेला अंगकोरच्या मध्यवर्ती भागाचा नकाशा त्यातच माझ्या प्रतिसादातली सॅटेलाईट इमेज आणि आजच्या या धाग्यातले संदर्भासाठी दिलेले फोटो यांचा विचार केला.
या धाग्यातले पहिले ४ फोटो यावरुन मंडल रचनेतील Square Grid लक्षात आली आहे,खरं तर पाण्याच्या चौकोनाच्या बाजुला भुपुराचे काही संदर्भ दिसत आहेत का ते मला या वरील सर्व फोटोतुन पहायचे आणि समजुन घ्यायचे होते, कारण एकंदर रचना ही एखाद्या यंत्राप्रमाणेच भासत / दिसत आहे,एकंदर यंत्रांमधे मध्य बिंदुला फार महत्व असते.परंतु याच्या फक्त दोनच बाजुला बाहेरच्या बाजुस जाणारे मार्ग दिसतात {म्हणजे पाण्यातुन बाहेरच्या बाजुला जाणारे, परंतु मंदिरमध्याचे स्थापत्यचित्र जे चित्र आहे ते बरेचसे भूपुराच्या जवळपास जाणारे प्रथमदर्शनी वाटते. ४ दिशांना ४ दारे असे भूपुराचे डिझाइन असते. { मला यातली नक्की आणि संपूर्ण माहिती नाही. }
असो... या संदर्भात एक दुवा देतो :- Maṇḍalas and Yantras यात navapadmamanḍ ̣चे डिझाइन पहा मग भाग ३ मधली सॅटेलाइट इमेज पहा पाण्यात {जास्त करुन उजवीकडेच} काही रेषा दिसतात,परंतु त्या कमळाकॄती नसुन वेगळ्याच दिसत आहेत. { हा माझा एकंदर अंदाजच आहे, जो या डिझाइच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न करतो.}  

मंडल आणि यंत्र याबाबत माझा स्वतःचा काहीच अभ्यास नाही. जे काही लिहीले आहे ते संदर्भांतून वाचले तसे लिहिले आहे. अंगकोर वट बद्दल वाचताना त्याच्या स्थापत्यात खगोलशास्त्राचा संबद्ध असल्याचे उल्लेख येतात. मात्र मंडल / मंत्र याबाबतचे खास संदर्भ दिसले नाहीत. पण काही विश्वासू संदर्भ सापडले तर वाचायला आवडतील.

अंगकोर वट हे राजधानीचे ठिकाण असल्याने पाण्याच्या संरक्षक खंदकावर दोनापेक्षा जास्त बंधारे नसणे ही संरक्षणाच्या दृष्टीने केलेली व्यवस्था असावी असे वाटते.

 

अंगकोर वट मधून मोठ्या नाराजीने बाहेर पडून आम्ही तेथून १.५ किमी दूर असलेले नॉम् बाखेंग (Phnom Bakheng) मंदिर पहायला निघालो. नवव्या शतकाच्या शेवटीसम्राट सूर्यवर्मन (इ स ८८९ - ९१०) याने हे शिवमंदिर एका टेकडीच्या माथ्यावर बांधले. अंगकोर वटच्या दोन शतके अगोदर बांधलेले हे मंदिर त्या काळची ख्मेर राजधानी यशोधरापूर मधले मुख्य मंदिर होते. आतापर्यंत टेकडी म्हणजे मेरुपर्वत आणि तिच्या भोवती खंदक म्हणजे दुग्धसागर हे ओळखण्याइतके ख्मेर स्थापत्यतज्ञ तुम्ही झाले असालच ! देवळाची मूळ रचना पिरॅमिडसारख्या उंच होत जाणार्‍या सहा स्तरांची होती आणि त्यांत एकूण १०८ मनोरे होते. सर्वात उंच टोकावर सभोवती चार आणि मध्यभागी सर्वोच्च मनोरा अशी रचना होती. मनोर्‍यांची रचना अशी आहे की सर्वोच्च शिखरावरून कोणत्याही दिशेस बघितले तर एका वेळेस फक्त ३३ मनोरे दिसत असत. ही संख्या ख्मेर परंपरेप्रमाणे मेरू पर्वतावर वस्ती असणार्‍या ३३ देवांचे रूपक आहे; सर्वोच्च मनोर्‍याभोवतीचे १०८ मनोरे प्रत्येकी २७ दिवसांचे चार चंद्रकलासंच दाखवतात; पिरॅमिडचे सहा स्तर आणि टेकडीचा तळ म्हणजे सात स्वर्गांचे रूपक आहे; स्तरांवरचे १२ मनोरे गुरुची १२ वर्षांचे भ्रमण दाखवतात; इ अनेक सिद्धांत पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी मांडलेले आहेत. University of Chicago च्या Paul Wheatley या शात्रज्ञाने नोम् बाखेंग मंदिराचे वर्णन "दगडाने बांधलेली खगोलशास्त्रिय (किंवा प्रचंड) दिनदर्शिका" ("an astronomical calendar in stone") असे केले आहे.

ह्या धर्म, खगोलशास्त्र आणि स्थापत्यशास्त्र यांच्या दृष्टीने कठीण असलेल्या कोड्याचा अर्थ समजून त्याचे महत्त्व ध्यानात येण्यास बराच वेळ लागला. त्यातच या मंदिराचे बहुतेक मनोरे आता कमी अधिक प्रमाणात ढासळलेले आहेत. आता आधुनिक थायलंडमध्ये असलेल्या Sdok Kak Thom मंदिरात सापडलेल्या संस्कृत शिलालेखामध्ये नोम् बाखेंगचा "When Sri Yasovardhana became king under the name of Yasovarman, the able Vamasiva continued as his guru. By the king's order, he set up a linga on Sri Yasodharagiri, a mountain equal in beauty to the king of mountains." या अर्थाचा उल्लेख आहे.

या मंदिराची बरीच पडझड झाली आहे आणि २००४ पासून World Monuments Fund चे कंबोडियाच्या APSARA या पुरातत्वशास्त्र संस्थेच्या सहकार्याने तेथे पुनस्थापनाचे प्रयत्न चालू आहेत. सद्या हे मंदिर अंगकोरच्या परिसराचे उंचीवरून दर्शन घेण्यासाठी आणि सूर्योदय-सूर्यास्त पाहण्यासाठी जास्त प्रसिद्ध आहे. पर्यटकांच्या गर्दीमुळे आधीच नाजूक अवस्थेत असलेल्या मंदिराला धोका पोहोचू नये यासाठी टेकडीवर एका वेळेस ३०० पेक्षा जास्त पर्यटक जाऊ देत नाही.

असो. चला तर आता या विशेष मंदिराचे उरलेले अवशेष आणि त्यावरून दिसणारा सूर्यास्त बघायला...

अंगकोर वटमधून बाहेर पडताना

दहा पंधरा मिनिटातच गाडीतून पायउतार होऊन आम्ही टेकडी चढू लागलो आणि नोम् बाखेंग मंदिराचे प्रथमदर्शन झाले...

नोम् बाखेंग मंदिर : प्रथमदर्शन

टेकडीवर नेणार्‍या पाहिर्‍यांचे बरेच नुकसान झालेले आहे त्यामुळे अश्या आधुनिक पाहिर्‍यांची मदत घ्यावी लागली. पण त्यांच्या बाजूचे मंदिराची राखण करणारे जंगलचे राजे प्राचीनच आहेत...

नोम् बाखेंग मंदिर : प्रथमदर्शन

बरीच पडझड झालेली असली तरी इमारतींचे जे काही भाग शिल्लक आहेत त्यावरून देवळाच्या भव्यतेची बर्‍यापैकी कल्पना येते...

नोम् बाखेंग मंदिर : टेकडीच्या तळाकडील चौथर्‍याचा एक भाग

.

नोम् बाखेंग मंदिर : टेकडीच्या माथ्यावरील मंदिरमध्याकडे नेणारा रस्ता

.

नोम् बाखेंग मंदिर : टेकडीच्या माथ्यावरील मंदिरमध्याकडे नेणारी इमारत

.

नोम् बाखेंग मंदिर : टेकडीच्या माथ्यावरील चौथर्‍याचा एक भाग

.


नोम् बाखेंग मंदिर : एक मनोरा

.


नोम् बाखेंग मंदिर : एका मनोर्‍याचे अवशेष

जे काही कोरीवकाम उरलेले आहे त्यावरून मंदिराच्या उत्तम कलाकुसरीचीही कल्पना येते...

नोम् बाखेंग मंदिर : कलाकुसर ०१

.


नोम् बाखेंग मंदिर : कलाकुसर ०२

.

नोम् बाखेंग मंदिर : कलाकुसर ०३

.

नोम् बाखेंग मंदिर : कलाकुसर ०४

मंदिरमध्याच्या चौथर्‍यावरून फिरून चारी बाजूचे मनोरे आणि इतर परिसराचे दर्शन घेता येते...

नोम् बाखेंग मंदिर : मंदिरावरून दिसणारा परिसर ०१

.

नोम् बाखेंग मंदिर : मंदिरावरून दिसणारा परिसर ०२

.

नोम् बाखेंग मंदिर : मंदिरावरून दिसणारा परिसर ०३

त्यातच दूरवर दिसणारे अंगकोर वट सर्वत्र पसरलेल्या जंगलातूनही आपले अस्तित्व दिमाखाने दाखवताना दिसत होते...

नोम् बाखेंग टेकडीवरून दिसणारे अंगकोर वट

पर्यटक वर सोडणारी व्दारे केव्हाचीच बंद झाली होती आणि आतापर्यंत मंदिरमध्याच्या चौथर्‍यावर बरच मोठा जनसमुदाय जमा झालेला होता...

नोम् बाखेंग टेकडीवर सूर्यास्त बघायला जमलेले पर्यटक

पलीकडे काही पर्यटक गरम हवेचा फुगा (hot air balloon) वापरून सर्व परिसर बघत सूर्यास्ताची मजा बघायला आलेले होते...

गरम हवेचा फुगा (hot air balloon) वापरून सूर्यास्तदर्शन

दाटून आलेल्या ढगांतून सूर्यास्त दिसेल की नाही हीच चिंता सर्वांच्या मनात होती...

नोम् बाखेंग टेकडीवरचा सूर्यास्त ०१

.

नोम् बाखेंग टेकडीवरचा सूर्यास्त ०२

टेकडीवर प्रवेश मर्यादित असल्याने आपला नंबर लागावा म्हणून सूर्यास्ताच्या बरेच अगोदर तिथे आम्ही पोचलो होतो. त्यामुळे मंदिराच्या आवारात सावकाशपणे फिरूनही नंतर इतर करामती करायला वेळ मिळाला...

नोम् बाखेंग टेकडीवरचा सूर्यास्त ०३

इथल्या पुरातत्त्व विभागाचा दुसरा नियम म्हणजे साडेसहाला टेकडी रिकामी करणे जरूरीचे असते. त्या दिवशी सूर्य ढगांनी झाकलेला असतानाच खाली उतरण्याचा भोंगा वाजला आणि आम्हाला खाली उतरणे सुरू करणे भाग पडले...

नोम् बाखेंग मंदिर : उतारावरून मागे वळून ०१ : शिडीच्या दोन्ही बाजूला बऱ्याचश्या चांगल्या अवस्थेतले मनोरे दिसत आहेत

.

नोम् बाखेंग मंदिर : उतारावरून मागे वळून ०२

टेकडी उतरताना मार्गदर्शकाने खालच्या चित्रात दिसणार्‍या मंदिराच्या भागाकडे लक्ष वेधले. तुम्हाला तेथे काही विशेष दिसत आहे का ?...

नोम् बाखेंग मंदिर : उतारावरून मागे वळून ०२ : पहुडलेल्या बुद्धाच्या भव्य मूर्तीचे अवशेष

ती पहुडलेल्या बुद्धाची प्रचंड मूर्ती (डावीकडचा चेहर्‍याचा भाग दिसला ना?) या मंदिराच्या स्थापत्यात बुद्धकाळात टाकलेली भर होती. ती मूर्ती पूर्ण होण्याअगोदरच तिचे काम थांबले असावे असे मार्गदर्शक म्हणाला.

शेवटी अर्धी टेकडी उतरून आल्यावर सुर्यराजाने क्षितिजापलीकडे जाण्यापूर्वी ढग थोडेसे दूर सारून डोकावत रंगांची उधळण करत दर्शन दिले...

नोम् बाखेंग मंदिर : सूर्यास्त ०१

.

नोम् बाखेंग मंदिर : सूर्यास्त ०२

आणि लगेच परत ढगाआड गेला...

नोम् बाखेंग मंदिर : सूर्यास्त ०३

पूर्ण सूर्यास्त दिसला नाही तरी टेकडीवरचे देवळावरचे अवशेष त्या भेटीत समाधान देण्याला पुरेसे ठरले होते. अंगकोर वट आणि नोम् बाखेंग या मंदिरांची मनावर ठसलेली चित्रे घोळवित भारावलेल्या मन:स्थितीत आम्ही हॉटेलकडे निघालो.

(क्रमशः )

पहिल्या दिवसाच्या अनुभवाने अंगकोरमध्ये अंगकोर वट सोडूनही बरेच काही बघण्यासारखे आहे ह्याची खात्री झाली होती. त्यामुळे केवळ मार्केटिंगसाठी इतर अनेक मंदिरांची नावे इटिनेररीत टाकली असावी ह्या समजाला मोठा धक्का बसला होता. सकाळी लवकर उठून न्याहरी करून इटिनेररीतल्या इतर मंदिरांच्या नावांची उजळणी केली. सागरने आंतरजालावरून त्यांची काढलेली माहिती वाचून उत्सुकता अजूनच ताणली जात होती. आता त्या भल्यामोठ्या यादीतील एकही मंदिर नजरचुकीने (अथवा मार्गदर्शकाच्या चलाखीने) बघायचे राहून जाऊ नये असेच वाटत होते.

बाहेर पडलो आणि हे खास ख्मेर आणि आधुनिक शैलींच्या मिश्रणाने बांधलेले घर समोर आले...


ख्मेर शैली आणि आधुनिक शैलींच्या संगमाने बांधलेले एक घर

आज सकाळी रुलो गटातली (Rolous Group) देवळे बघायची होती. रुलो या आधुनिक गावाजवळ असलेल्या हरिहरालय किंवा इंद्रपूर या प्राचीन राजधानीत ही देवळे असल्याने त्या देवळांच्या गटाला हे नाव पडले आहे. ही ख्मेर सम्राटांची नवव्या शतकात बांधलेली ख्मेर संस्कृतीच्या अगदी सुरुवातीच्या काळातली मोठी बांधकामे आहेत. या बांधकामात दगडांबरोबर विटांचाही भरपूर उपयोग केलेला आहे. या गटात बाकोंग, लोलेई आणि प्रीह् कोर ही तीन मुख्य मंदिरे येतात.

बाकोंग मंदिर

पहिला थांबा होता बाकोंग मंदिर. या मंदिराभोवतालचा खंदक अजूनही सुस्थितीत आहे आणि त्याचे सौंदर्य आपले स्वागत करते...


बाकोंग मंदिराचा खंदक

.

कंबोडियाच्या पर्यटन व्यवस्थेत इतर काही देशांसारखा आर्थिक समृद्धीचा भपका नसला तरी सौदर्यदृष्टी, स्वच्छता आणि नीटनेटकेपण मात्र नक्कीच होता...


बाकोंग मंदिराचे आवार

.

आवारातले स्वागतगृहसुद्धा त्या गोष्टीची साक्ष देत होते...


बाकोंग मंदिराचे स्वागतगृह

तेथून थोडे पुढे गेले की बाकोंगचे पूर्ण रूप पुढे येते आणि त्याची भव्यता पाहून हे नवव्या शतकातले (म्हणजे ११०० वर्षांपेक्षा जास्त जुने) बांधकाम आहे यावर विश्वास बसणे कठीण जाते. पंधरा मीटर (साधारण पाच मजली इमारतीइतके) उंच असलेले हे मंदिर ६५० मी X ८५० मी इतक्या क्षेत्रफळांवर बांधलेले आहे. हे मंदिर ख्मेर संस्कृतीतील देवपर्वत रुपी मंदिर या कल्पनेचा पहिला आविष्कार समजला जातो. हे मंदिर पहिल्या इंद्रवर्मनने (इ स ८७७ - ८८९) बांधले असले तरी यात बाराव्या शतकापर्यंत अनेक सम्राटांनी भर घातली आहे. या मंदिरपर्वताला नाग, गरूड, राक्षस, यक्ष आणि सगळ्यात वरचा राजाचा असे एकूण पाच स्तर आहेत. मंदिरासभोवती आठ उपमनोरे आहेत.


बाकोंग मंदिर

मंदिरासमोरचा भग्न नंदी हे शिवमंदिर असल्याची साक्ष देतो. आपण या मंदिरपर्वतावर वर वर जाऊ लागतो तसा जरासा दम लागतो पण मंदिराचे कोरीवकाम दम विसरायला लावते.

तर चला करूया या मंदिराची एक चित्रमय सफर...

...
बाकोंग मंदिरातले कोरीवकाम ०१ व ०२

.


बाकोंग मंदिरातले कोरीवकाम ०३

.

दक्षिणेकडील दरवाज्याच्या तोरणावर दक्षिणाधिपती यम आहे...


बाकोंग मंदिरातले कोरीवकाम ०४ : यम असलेले दक्षिण दरवाज्यावरील तोरण

.

पश्चिमेकडील दरवाज्याच्या तोरणावर पश्चिमाधिपती वरूण आहे आणि त्याच्या खाली नाग आहेत...


बाकोंग मंदिरातले कोरीवकाम ०५ : वरूण असलेले पश्चिम दरवाज्यावरील तोरण

.


मंदिराचे सर्वोच्च मध्यशिखर

.


मंदिरातून दिसणारे मागचे आवार

.


मंदिरातून दिसणारे पुढचे आवार

.

बाकोंगमधून बाहेर पडलो आणि इतिहासातील काळ्या कालखंडाचा कंबोडियाच्या वर्तमानावर अजूनही कायम असलेला ठसा असा समोर आला...


भूसुरूंगाने पाय गमावलेले कंबोज नागरिक

भूसुरूंगाने सर्वात जास्त जीवितहानी आणि अपंगत्व झालेल्या देशांत कंबोडियाचा जगात पहिला क्रमांक आहे. तिसहून अधिक वर्षांच्या अंतर्गत यादवीच्या काळात ख्मेर रूज, हेंग सामारिन आणि हून सेन यांच्या कारकीर्दीत कंबोडियामध्ये पेरल्या गेलेल्या भूसुरुंगांपैकी ४० ते ६०,००,००० (चाळीस ते साठ लाख) भूसुरूंग अजूनही भूमीतच आहेत. मुख्य म्हणजे ते इतक्या विस्कळीतपणे पेरले गेले की त्यांची स्थाने कोणालाच नक्की माहीत नाहीत. त्यांच्या स्फोटांमुळे अपंगत्व आलेल्यांची सर्वसामान्य नागरिकांची संख्या ४०,००० पेक्षा जास्त मोठी झाली आहे. ती संख्या इ स २००५ पर्यंत दरवर्षी ८५० ने वाढत होती. हे भूसुरुंग निकामी करण्यासाठी दर वर्षाला तीन कोटी अमेरिकन डॉलर्स खर्च करूनही अजूनही जखमींची वार्षिक संख्या दोनशेच्या आसपास आहे. त्यातच अधिक दु:खदायक गोष्ट अशी की यातली एक त्रितियांश संख्या लहान मुलांची आहे. भूसुरुंगांमुळे दळणवळणावर व शेतकामावर आलेल्या बंधनांमुळे आणि मोठ्या मृत / जखमी लोकसंखेमुळे पडणार्‍या ताणामुळे कंबोडियाच्या आधीच नाजूक असणार्‍या अर्थव्यवस्थेवर बराच ताण पडत आहे.

कंबोडियाच्या आणि इतर देशांच्या अनुभवांवरून बोध घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने १९९९ मध्ये Ottawa Treaty उर्फ Mine Ban Treaty पास केली आहे. त्यानुसार भूसुरूंग आणि विशेषतः मानवविरोधी भूसुरूंग (Anti-Personnel Mines) तयार करणे, साठवणे, वाहून नेणे आणि दुसर्‍या देशाला देणे यावर कडक निर्बंध लावलेले आहेत.

.

लोलेई मंदिर

तिथून पुढे निघून आम्ही लोलेई मंदिराकडे निघालो. इंद्रवर्मनचा मुलगा यशोवर्मनने (इ स ८८९ - ९१५) हे मंदिर एका मानवनिर्मित तळ्यात (baray) सहा मनोर्‍यांच्या स्वरूपात बांधायला सुरुवात केली गेली पण काही कारणाने फक्त चारच मनोरेच बांधले गेले...


चार मनोर्‍यांचे लोलेई मंदिर

.

आता तळे मातीने भरल्याने तेथे पाणी नाही. मंदिर जरी ख्मेर परंपरेप्रमाणे भव्य नसले तरी त्यावरील कोरीव काम बघितल्याशिवाय पुढे जाऊ नये असेच आहे...


लोलेई मंदिर : कोरीवकाम ०१ : हत्तीवर आरूढ इंद्र असलेले तोरण

.

......
लोलेई मंदिर : कोरीवकाम ०२ (स्त्रीरक्षक) आणि ०३ (आभासी दरवाजा)

वरचा आभासी दरवाजा म्हणजे खरा दरवाजा नसून मनोर्‍याच्या एका बाजूच्या भिंतीवर एकाच शिलेवर केलेले दरवाज्याचा आभास निर्माण करणारे कोरीवकाम आहे.

या मंदिराच्या भिंतीवर एक संस्कृत व पाली भाषेतला शिलालेख आहे. त्याची लिपी ख्मेर आहे. आम्ही भारतीय आहोत म्हणजे संस्कृत आणि पाली फाड फाड वाचणार अशी आमच्या मार्गदर्शकाची (गैर)समजूत होती. आमच्या ती दूर करण्याच्या प्रयत्नाचे त्याला बरेच आश्चर्य वाटले!...


लोलेई मंदिर : संस्कृत आणि पाली भाषेतला ख्मेर लिपीत लिहीलेला शिलालेख

.

प्रीह् कोर मंदिर

इ स ८८० मध्ये बांधलेले हे मंदिर इंद्रवर्मनने बांधलेले पहिले मंदिर आहे. हे मंदिर राजाने त्याच्या देवस्वरूप पूर्वजांच्या स्मरणार्थ बांधले आहे. त्यातला मंदिरमध्य ख्मेर साम्राज्याचा संस्थापक दुसरा जयवर्मन याच्या शिव-परमेश्वर या नावे उभारला आहे. मागचे तीन मनोरे मुख्य तीन राण्यांच्या नावे आहेत.

या मंदिराची बरीच पडझड झालेली आहे. त्याच्या काही शिल्पांची चित्रे....


प्रीह् कोर मंदिर : कोरीवकाम ०१ : मंदिराचे रक्षण करणारे सिंह

.


प्रीह् कोर मंदिर : कोरीवकाम ०२ : व्दारपाल

.


प्रीह् कोर मंदिर : कोरीवकाम ०३ : तोरण

या तोरणावर वरच्या भागात घोडेस्वार आहेत. तर खालच्या भागात नागांवर आरूढ सैनिक आहेत. दोन्ही बाजूस मगरीवरच्या स्वाराला हत्तीचे डोके आणि सिंहाचे शरीर व आयाळ आहेत.

इतकी भटकंती होईपर्यंत पोटात कावळे ओरडू लागले होते. त्वरित रेस्तराँच्या दिशेने कूच केले. अजून मंदिरांची बरीच मोठी यादी बाकी होती. त्यासाठी पळापळ करायला बर्‍याच ऊर्जेची सोय करणेही भाग होते.

(क्रमशः )

 

पोटोबा केल्यावर आम्ही बांतीय श्री मंदिराकडे निघालो. वाटेत ताडगोळे विकणारी बाई दिसली आणि थांबून कंबोडियन ताडगोळ्यांचा स्वाद घेण्याचा मोह आवरला नाही...


ताडगोळे विकणारी कंबोडियन महिला

रस्त्याच्या बाजूला मधूनच कंबोडियाच्या ग्रामीण भागात असणारी खांबांवरची घरे दिसत होती. ह्या प्रकारची घरे तेथे दर पावसाळ्यात येणार्‍या पुरांपासून रक्षण करण्यासाठी प्राचीन काळापासून बांधली जात आहेत...


लाकडी खांबांवरचे कंबोडियन ग्रामीण घर

.

बांतीय श्री मंदिर

हे शिवमंदिर दहाव्या शतकाच्या शेवटाला नोम् देई नावाच्या टेकडीवर बांधलेले आहे. याच्या बांधकामात मुख्यतः कोरीवकामासाठी उपयुक्त असणार्‍या तांबड्या वालुकाश्माचा उपयोग केलेला आहे. इतर अंगकोरीयन स्थापत्याच्या तुलनेत लहान असलेले हे मंदिर त्याच्या आजही उत्तम अवस्थेत असलेल्या अत्युच्च प्रतीच्या कोरीवकामामुळे पर्यटकांचे लाडके आहे. हे मंदिर ख्मेर शिल्पकलेचा शिरोमणी समजले जाते. राजधानीच्या ईश्वरपूर नावाच्या भागात असलेल्या या मंदिराचा आकार विशाल नसण्याचे एक कारण म्हणजे ते सम्राटाने बांधलेले नाही तर सम्राट दुसरा राजेंद्रवर्मन (इ स ९४४ -९६८) याच्या यज्ञवराह नावाच्या सल्लागाराने बांधलेले आहे. तेथे असलेल्या शिलालेखात "सम्राट पहिला हर्षवर्मन याचा नातू यज्ञवराह हा एक लोकहितबुद्धी असणारा विद्याव्यासंगी होता आणि त्याने रुग्ण, अन्यायाने पिडीत आणि गरीब लोकांना मदत केली." असा उल्लेख आहे. दुसरा राजेंद्रवर्मननंतर सम्राट झालेला पाचवा जयवर्मन (इ स ९६८ - १०००) यज्ञवराहाचा शिष्य होता.

विखुरलेल्या प्राचीन अवशेषांपासून वास्तू परत पूर्वीसारखी उभी करण्याच्या पुनस्थापन (anastylosis) तंत्राचा अंगकोरमधला पहिला उपयोग या मंदिरामध्ये केला गेला. उच्च प्रतीच्या कलाकृतींमुळे हे मंदिर अनेकदा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चोर्‍यांना बळी पडले आहे. काही महत्त्वाच्या कलाकृतींना चोरण्याचे प्रयत्न तर त्यांना नॉम् पेन् येथील राष्ट्रीय संग्रहालयात हालवल्यानंतरही झालेले आहेत (मंदिरात आता काही खास कलाकृतींच्या जागी त्यांच्या हुबेहूब प्रतिकृती आहेत).

या शिवमंदिराचे मूळ नाव "त्रिभुवनमहेश्वर मंदिर" असे होते. असे असले तरी, या मंदिराच्या दक्षिणभागात शिवासंबंधी आणि उत्तरभागात विष्णूसंबंधी कोरीवकाम आहे. मंदिरमध्यात शिवलिंग आहे. या मंदिराचा प्रत्येक चौरस सेंटिमीटर कोरलेला आहे. सर्व भिंती, दारांच्या चौकटी, आभासी व्दारे, दारांवरील रुंद तुळया, तुळयांवरील त्रिकोण, इ सर्व एकमेकाला पूरक अश्या कोरीवकामाने भरलेले आहेत. येथील कोरीवकाम पाहून एका पुरातत्वशास्त्रज्ञाने "हे कोरीवकाम दगडावरच्या कलाकृतींपेक्षा सोन्याच्या किंवा लाकडावरच्या कुशल कोरीवकामाला जास्त जवळ आहे." असे म्हटले आहे. या मंदिराचे सद्याचे बांतीय श्री (citadel of the women`किंवा citadel of beauty) हे नाव बहुतेक त्या मंदिरातील देवतांच्या खूप बारकाव्यांसह कोरलेल्या अनेक सुंदर छोट्या मूर्तींमुळे पडले असावे असे समजले जाते.

तर चला पाहूया हा प्राचीन शिल्पकलेचा चमत्कार...

सर्वात बाहेरची संरक्षक भिंत ओलांडून आत आल्यावर खंदकाच्या आत असलेल्या दुसर्‍या भिंतीमध्ये असलेले गोपुर समोर येते...


बांतीय श्री चे पहिले दर्शन ०१

.


बांतीय श्री चे पहिले दर्शन ०२

.

...

गोपुर ०१ व ०२

.


गोपुर ०३

.

गोपुर ०४

.


गोपुरापासून मंडपाकडे नेणारा रस्ता

.


मंडप ०१

.


मंडप ०२

.


मंडप ०३

.

...

खांब ०१ व ०२

.

...

खांब ०३ व ०४

.


देवता

.

तोरण ०१ : ऐरावतावरचा इंद्र

.

तोरण ०२

.

तोरण ०३

.

तुळईवरचा त्रिकोण ०१ : हिरण्यकश्यपूचा वध करताना नृसिंह

.

तुळईवरचा त्रिकोण ०२ : खाली तोरण आणि त्यावर लक्ष्मी

.

तुळईवरचा त्रिकोण ०३ : तांडवनृत्य करणारा शिव

.

तुळईवरचा त्रिकोण ०४ : वाली-सुग्रीव युद्ध

.

तुळईवरचा त्रिकोण ०५ : कैलास पर्वत हलवणार्‍या रावणाचे गर्वहरण

.

तुळईवरचा त्रिकोण ०६ : ऐरावतावर बसून पर्जन्यवृष्टी करणारा इंद्र

.

तुळईवरचा त्रिकोण ०६ : नंदीवर आरूढ शिवपार्वती

.

अजून काही... तसेच शब्दापलीकडचे...

.


आभासी दरवाजा असलेली भिंत आणि तिच्यावरचे शिखर

.

.

.

.

.


.

.

.

कोरीवकामाचे वर्णन करायचा प्रयत्न मुद्दामच केला नाही... दगडांनी लिहिलेले हे काव्य शब्दात पकडणे केवळ अशक्य आहे. नि:शब्द होऊन ते डोळ्यांनी मनात साठवणेच शहाणपणाचे आहे.

(क्रमशः )

 
 इकडील शिल्पांप्रमाणे एकाच दगडात आख्खे शिल्प न कोरता दगडांचे ठोकळे बनवून त्यांवर शिल्पांचे विविध भाग कोरवून तद्नंतर ती एकांवर एक रचून शिल्पे एकसंध केली असल्याचे दिसते.
तोरणांवरील दिक्पाल अप्रतिम आहेत. 

एका मंदिरातील शिल्पपटामध्ये मंदिरे बनवायची कृती दाखवली आहे. त्याप्रमाणे प्रथम केवळ तासलेले दगड एकमेकावर रचून मंदिर बनवले जात असे आणि नंतर कोरीवकाम केले जायचे असे दिसते. मोठे दगड खूप उंचीवर कसे चढवायचे, त्यांचे जोड असणारे पृष्ठभाग एकमेकावर घासून कसे गुळगुळीत करायचे, इ सर्व कृती या शिल्पपटात आहेत.

याचा एक मुख्य फायदा असा झाला की (Anastylosis तंत्राने) हे दगड परत जुळवून मंदिरे जवळ जवळ मूळ स्वरूपात उभी करणे शक्य झाले.

शिवाय इथे नुसतेच तासलेले दगड आहेत का हेमाडपंती शैलिप्रमाणे मेल फिमेल जोड आहेत? छायाचित्रांनुसार तरी जोड असल्याचे दिसत नाही. त्यापरिस्थितीत ही मंदिरे टिकून राहिली हे आश्चर्यच.

सहाव्या भागाच्या शेवटी (अंगकोर वट) ज्या व्हिडिओचा दुवा दिला आहे, त्यात हे प्रात्यक्षिकासह दाखवले आहे. मूळातून बघण्यासारखे आहे.

ती कृती दाखवणारे उठावचित्र शोधतो आहे. मिळाले की चिकटवतो.

 हे एक उठावचित्र सापडलं.

व्हिडिओमध्ये काही गोष्टी कृतीसह बघायला मिळतील.

दगड रचण्याच्या मुख्यतः दोन पद्धती वापरल्या होत्या:

१. वजनदार दगडांचे पृष्ठभाग अगदी गुळगुळीत करून ते एकमेकावर रचून गुरुत्वकर्षणाचा फायदा घेणे.

२. खालच्या चित्रात दाखलेले Mortise and tenon प्रकारचे सांधे...

.

(सर्व चित्रे जालावरून साभार)

 

यानंतर आम्ही काही मंदिरांना धावती भेट दिली. त्याचा हा धावता आलेख...

बांतीय साम्रे मंदिर

हे सम्राट दुसरा सूर्यवर्मनने (इ स १११३ - ११५०) वाराव्या शतकाच्या मध्यात बांधलेले विष्णूमंदिर आहे. पुनस्थापनेचे अनास्टायलोसिस तंत्र वापरून त्याला जवळ जवळ पूर्णावस्थेत उभे केलेले आहे. ख्मेर मंदिरे बांधण्यासाठी लागणारे दगड मिळणार्‍या कुलेन पर्वतराजीतील खाणींच्या परिसरात राहणार्‍या साम्रे जमातिच्या नावावरून या मंदिराचे नाव पडले आहे.

चला तर चक्कर मारू या मंदिरामध्ये...


बांतीय साम्रे परिसरातले स्वागतालय

.


बांतीय साम्रे : ०१ : गोपुर

.


बांतीय साम्रे : ०२

.


बांतीय साम्रे : ०३

.


बांतीय साम्रे : ०४

.

......
बांतीय साम्रे : ०५ व ०६

.


बांतीय साम्रे : ०७

.


बांतीय साम्रे : ०८

.


बांतीय साम्रे : ०९

.


बांतीय साम्रे : १० : मंदिर त्याच्या संपूर्णावस्थेत कसे दिसत होते याचे कल्पनाचित्र

.

प्रे रूप मंदिर

हे शिवमंदिर सम्राट दुसरा राजेंद्रवर्मन याने दहाव्या शतकाच्या दुसर्‍या भागात बांधले. याच्या बांधकामाच्या खास शैलीला त्याचेच म्हणजे प्रे रूप शैली असे नाव दिले गेले आहे.


प्रे रूप : ०१

.


प्रे रूप : ०२

.


प्रे रूप : ०३ : ह्या मंदिराच्या मध्यभागातिल पायर्‍यांचा चढ इतका तीव्र आहे की केवळ पर्यटकांनाच नाही तर येथे नेहमी येणार्‍या कंबोडियन लोकांनाही तिरके राहूनच चढ-उतर करावे लागते !

.


प्रे रूप : ०४

.


प्रे रूप : ०५

.


प्रे रूप : ०६ : मंदिराच्या मध्यशिखराच्या आतून शिवपिंडीच्या वरच्या भागाचा फोटो. वरचा मोकळा भाग बहुतेक सोन्याचे शिखर चोरीला गेल्यामुळे उघडा झालेला आहे

.

प्रसात क्रावन मंदिर

सम्राट हर्षवर्धनच्या कालात (इ स ९१५ -९२३) बांधले गेलेले हे शिवमंदिर सम्राटाने बांधलेले नसून बहुतेक त्याच्या दरबार्‍यांपैकी कोणीतरी बांधले असे समजले जाते. याच्या बांधणीचा विशेष म्हणजे या मंदिराची रचना नेहमीच्या ख्मेर परंपरेप्रमाणे चार मनोर्‍यात मध्यभागी मुख्य मनोरा अशी नसून एका रांगेत पाच मनोरे अशी आहे.


प्रसात क्रावन : ०१

.


प्रसात क्रावन : ०२ : शिलालेख

.


प्रसात क्रावन : ०३ : मध्य मनोर्‍यातल्या शिवपिंडी भोवतालच्या भिंतीवरील तांडवनृत्य करणार्‍या शिवाचे उठावचित्र

.


प्रसात क्रावन : ०४ : मध्य मनोर्‍यातल्या शिवपिंडी भोवतालच्या भिंतीवरील गरूडावर आरूढ झालेल्या विष्णूचे उठावचित्र

.


प्रसात क्रावन : ०५ : मंदिर त्याच्या संपूर्णावस्थेत कसे दिसत होते याचे कल्पनाचित्र

.

थकलेल्या शरीराने आता तक्रार करायला सुरुवात केली होती. संध्याकाळ होऊ लागली होती. शिवाय आज रात्री कंबोज संगीत-नृत्य कार्यक्रम बघायला जायचे होते. त्यामुळे तेथे पूर्ण ताकदीनिशी पोहोचण्यासाठी हॉटेलवर परतून गरम गरम शॉवर घेणे भाग होते. नाईलाजाने परत फिरलो.

कंबोज नृत्य-संगीत-रजनी

पारंपरिक कंबोज नृत्याला "अप्सरा नृत्य" असे म्हटले जाते. अनेक देवळांच्या उठावचित्रांत या अप्सरांना मानाचे स्थान आहे. अंगकोर वट मध्ये तर अप्सरांची वेगवेगळी जवळ जवळ २,००० उठावचित्रे आहेत हे आपण पूर्वीच पाहिले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाबाबत बरीच उत्सुकता होती.

तर बघूया त्या कार्यक्रमाची क्षणचित्रे...


अप्सरा नृत्य : ०१

.


अप्सरा नृत्य : ०२

.


अप्सरा नृत्य : ०३

.


अप्सरा नृत्य : ०४ : राम आणि सीता

.


अप्सरा नृत्य : ०५

.


अप्सरा नृत्य : ०६

.


अप्सरा नृत्य : ०७

.

अप्सरा नृत्याचे काही क्षणांची चित्रफीत...

.

अप्सरा नृत्यांबरोबर मधून मधून लोकसंगीतनृत्याचाही कार्यक्रम होता...


कंबोज लोककला : ०१

.


कंबोज लोककला : ०२

.


कंबोज लोककला : ०३

.

कंबोज लोककलेच्या नृत्याच्या काही क्षणांच्या दोन चित्रफिती...

.

.

कंबोज कला आणि कंबोज-आंतरराष्ट्रीय जेवणाचा आनंद घेत संध्याकाळ कशी संपली ते कललेच नाही. उद्याच्या दिवसात अजून काय सुखद आश्चर्याचे धक्के बसणार आहेत असा विचार करत बिछान्याला पाठ टेकवली.

(क्रमशः )

 

ता प्रोम

ता प्रोम हे आधुनिक नाव असलेल्या या महायान बौद्धमंदिर आणि विश्वविद्यालयाचे मूळ नाव "राजविहार" असे आहे. ह्याची बांधणी बाराव्या शतकच्या शेवटात आणि तेराव्या शतकाच्या सुरुवातीला सम्राट सातवा जयवर्मनने त्याच्या आईच्या स्मरणार्थ केली.

इथल्या भग्नावशेषांना शेकडो वर्षे वयाच्या प्रचंड आकाराच्या वृक्षराजांनी विळख्यात बंदिस्त केलेले आहे. त्यांची तोड अथवा सफाई न करता ती निसर्गाची करणी तशीच कायम ठेवल्यामुळे या जागेचे दर्शन अधिकच विस्मयचकित करून जाते. याच कारणामुळे हे स्थान जास्त प्रसिद्ध झाले आहे ! या जगावेगळ्या भग्नावशेषांना भेट दिल्याशिवाय अंगकोरची भेट पूर्ण होऊच शकत नाही.

अँजेलिना जोलीने काम केलेल्या लोकप्रिय Lara Croft: Tomb Raider ह्या चित्रपटाचे चित्रीकरण या ठिकाणी केले गेले. त्या चित्रपटाने आणि त्याच नावाच्या व्हिडिओ गेमने या मंदिराची प्रसिद्धी जगात घरोघरी पसरवली. १९९२ पासून ही जागा युनेस्को मान्य जागतिक वारसा स्थान आहे.

या जागेचे संरक्षण आणि पुनस्थापन करण्यात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (Archaeological Survey of India) अप्सराला (APSARA, Authority for the Protection and Management of Angkor) मदत करत आहे, हे पाहून आनंद झाला...


ता प्रोम च्या पुनस्थापनात भारताचा सहभाग

तर चला या जगावेगळ्या आकर्षणाचा फेरफटका मारूया...


ता प्रोम : गोपुर

.


ता प्रोमच्या आवारात या वृक्षसम्राटाने स्वागत केले

.


ता प्रोमच्या मुख्य इमारतीकडे नेणार्‍या वाटेवरचा प्रचंड नागराज

.


ता प्रोम : एका गोपुरावरचे युद्ध करणारे सैनिक

.

......

ता प्रोम : इमारतीवर विराजमान वृक्षसम्राट ०१

.


ता प्रोम : इमारतीवर विराजमान वृक्षसम्राट०२

.

......

ता प्रोम : इमारतीवर विराजमान वृक्षसम्राट०३ आणि ०४

.


ता प्रोम : इमारतीवर विराजमान वृक्षसम्राट ०५

.


ता प्रोम : इमारतीवर विराजमान वृक्षसम्राट ०६

.


ता प्रोम : इमारतीवर विराजमान वृक्षसम्राट ०७

.

......

ता प्रोम : कोरीवकाम ०१ व ०२

.

......

ता प्रोम : कोरीवकाम ०३ व ०४

.


ता प्रोम : कोरीवकाम ०५

.


ता प्रोम : कोरीवकाम ०६

.


ता प्रोम : कोरीवकाम ०७

.


ता प्रोम : आपल्या मूळ जागेवर पुनस्थापना होण्याची वाट पाहणार्‍या शिला

बाहेर पडलो आणि कंबोडियाच्या भूतकाळाच्या वर्तमानातील परिणामांनी परत दर्शन दिले...

ता प्रोम जवळचा भूसुरूंगांच्या स्फोटांनी अपंग बनलेल्या वादकांचा संघ

पण तो भूतकाळ मागे टाकून आपला वर्तमानकाळ बनवण्याच्या धडपडीत असलेल्या कंबोज नागरिकांना पाहून जरा बरे वाटले...

जरा पुढे गेलो आणि नयनरम्य कंबोज निसर्गाने मन मोहायला सुरुवात केली...

(क्रमशः )

 वृक्षराजींनी कवेत घेतलेलं मंदिर अतिशय आवडलं. निसर्गाची किमया अद्भूत आहे.
जरी हे मंदिर वृक्षविळख्यांमुळे अतिशय अद्भूत दिसत असलं तरी तरी यापासून मंदिराला हानी निर्माण होऊ नये म्हणून नेमकी कशा प्रकारची उपाययोजना केली आहे? कृत्रिम उपायांनी पारंब्यांची वाढ आता थांबवली आहे का?
 
हे वृक्ष आता इतक्या प्रचंड आकाराचे झालेले आहेत की तेच जास्त प्रवासी खेचतात... सुंदर मंदिरे काय अंगकोर मध्ये पेशाला पासरी आहेत. त्यामुळे ता प्रोममध्ये पुरातत्व खाते प्रथम झाडांची काळजी घेते आणि मग त्याअनुषंगाने मंदिर कसे जास्तित जास्त सुरक्षीत राहील असे बघते !

आजचा कंबोडियातला शेवटचा दिवस. पण मंदिरांची मालिका काही संपत नव्हती. शिवाय परत तेच बघायला लागले म्हणून एखादे ठिकाण चुकवले असते असेही नव्हते. दर ठिकाण आपल्या विशेषाने उठून दिसत होते. अंगकोरमध्ये अजून काही दिवस रहा असा आग्रहाचा तर सोडाच पण साधा सल्ला न देणार्‍या आमच्या तथाकथित नामवंत सहल कंपनीबद्दलचा राग मनामध्ये खदखदत होता. त्याला कसेबसे आवरून लवकरच आटपून बाहेर पडलो.

आतापर्यंत देवळांची इतकी अपरिचित नावे जमा झाली होती की पुढची नावे लक्षात ठेवण्याचे निष्फळ प्रयत्न सोडून देऊन केवळ नेत्रसुखावर भर देणे पसंत केले. त्यामुळे आता पुढच्या चित्र सफरीत काही चित्रांच्या तळाला मंदिराच्या नावाचा उल्लेख नाही...


प्रीह् खान ०१ : प्रवेशमार्गाच्या दुतर्फा असलेल्या पुतळ्यांच्या लांबच लांब रांगा

.


प्रीह् खान ०२ : राम-रावण युद्ध

.


प्रीह् खान ०३ : तपस्या करणारे ऋषी आणि इतर कोरीवकाम

.


प्रीह् खान ०४

.


पूर्व मेबॉन ०१

.


पूर्व मेबॉन ०२ : स्वतःच्या सोंडेवर विराजमान गणेश

.


पूर्व मेबॉन ०३ : लक्ष्मी

.


पूर्व मेबॉन ०४ : तोरण

.


बांतीय कदेई ०१

.


बांतीय कदेई ०२

.


बांतीय कदेई ०३

.

.

.

.

.

.

.

.

.

.


रेस्तराँ

.

अपेक्षेपेक्षा बरेच काही पदरात पडले होते त्याचा आनंद मानायचा की हे सगळे नीट बघायला अजून काही दिवस राहता येणार नव्हते याचे दुःख करायचे याचा निर्णय होत नव्हता. पण, एकाद्या ठिकाणची सफर परत करणे शक्य झाल्यास पहिला क्रमांक कुठल्या ठिकाणाचा असेल या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले होते. संध्याछाया पसरू लागल्या आणि जड पावलांनी हॉटेलकडे परतावे लागले. दुसर्‍या दिवशी सहलीच्या पुढच्या स्थानाकडे जाणारे विमान पकडायचे होते.

(समाप्त)

 नॅशनल जिओग्राफिक चॅनेलवर ३-४ वर्षापूर्वी एक सेरीज पहिली होती, त्यात सांगितलं होत की अंगकोर वटच्या महामंदिराची जमीन काहीही वास्तूनिर्माणासाठी अयोग्य समजली जायची कारण पावसाळ्यात नदीला आलेल्या पुराने जमीन फुगायची आणि उन्हाळा आला की जमिनीची सखलता नष्ट होऊन भेगा पडायच्या आणि ती उंचसखल व्हायची. त्यावर उपाय म्हणून वास्तुविशारदांनी प्रस्तावित मंदिराच्या जागेभोवती चारी दिशेने मानवनिर्मित कालवे/खंदक तयार केले. आणि त्यातून पाणी फिरवले. त्यामुळे जमीन उंच सखल होण्याची समस्या पूर्णतः नाहीशी झाली.

तुमची महिती बरोबर आहे. अंगकोरची जमीन वालुकामिश्रित आहे त्यामुळे जर त्या जमिनीची आर्द्रता कमी झाली तर तिच्यावरच्या वजनदार मंदिरांचा तोल केवळ स्वतःच्या वजनाने ढळेल.

सद्याही सतत वाढणार्‍या पर्यटकांच्या लोंढ्याना सुविधा देण्यासाठी होणार्‍या विकास कामांसाठी होणार्‍या जमिनीतल्या पाण्याच्या उपश्याने (यात तलावांतल्या पाण्याची चोरीही आली) कमी होत जाणार्‍या जमिनीतल्या पाण्याची पातळी हा मोठा काळजीचा विषय झालेला आहे.

जमिनीतिल आर्द्रता राखून ठेवण्याइतकाच या मंदिरांच्या सभोवतीच्या तलावांइतक्या मोठ्या खंदकांतिल पाण्याचा उपयोग नेहमीच्या वापराला आणि शेतीच्या वापराला होत होता. याच शेतीच्या बळावर ख्मेर सम्राट त्याकाळातल्या जगातिल सर्वात मोठी फौज बाळगून होते. या पाण्याकरिता त्यांनी उभारलेले दोन नदीजोडांचे प्रकल्प आणि नदीइतकाच मोठा एक मानवनिर्मीत प्रकल्प ही आजही स्थापत्यशास्त्रिय आश्चर्ये मानली जातात.

 

सांबोर प्री कुकचे वैभव

सामना ऑनलाईन

>> डॉ. मंजिरी भालेराव

 कंबोडिया या देशात यांच्या वंशजांनी पुढे बौद्ध आणि हिंदू या दोन्ही धर्मांना राजाश्रय दिला. त्याचा परिणाम म्हणून बयोन, ता फ्रोम, बांते श्राय आणि अतिशय  भव्य असे जगातले सर्वात मोठे मंदिर अंकोरवाट निर्माण झाले. बुद्ध, विष्णू, शिव, दुर्गा, लक्ष्मी, गणपती, नाग, इंद्र  आणि अजून अनेक हिंदुस्थानी देवदेवतांची उपासना कंबोडियात लोकप्रिय होती असे आजच्या अवशेषांवरून सहज समजते. हिंदुस्थानी कला, स्थापत्य, सामाजिक रूढी, परंपरा यांचा खूप मोठा प्रभाव या देशात पाहायला मिळतो.

हिंदुस्थानातील व्यापारी, प्रवासी हे हिंदुस्थानच्या सीमा ओलांडून आशियातील विविध देशांत खूप प्राचीन काळीच पोचले होते हे आपण पूर्वी पहिले होते. अनेक देशांतील स्थानिक संस्कृतीवर हिंदुस्थानी धर्माची आणि संस्कृतीची छाप पडलेली स्पष्ट दिसते. यात आशिया खंडातील विविध देशांचा समावेश होतो. हिंदुस्थानी धर्म, पुराकथा, कला, स्थापत्य, भाषा,  लिपी अशा अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश होतो.  आग्नेय आशियातील कंबोडिया हा देशसुद्धा याला अपवाद नाही. खरे म्हटले तर या देशात हिंदुस्थानी संस्कृतीचा प्रभाव असलेले स्थापत्य, कला आणि इतर पुरातत्त्वीय अवशेष यांचा खच आहे.

 

खरे तर फुनान म्हणजे इंडोचीनच्या भागात हिंदुस्थानी संस्कृतीचा पहिला आविष्कार झाला असे आपल्याला चिनी इतिहासकार सांगतात. आजच्या कंबोडिया या देशातील हा भाग आहे. ‘बीऊ-नाम्’चा आजचा चिनी उच्चार फुनान असा होतो. हे एक हिंदू राज्य होते आणि ते मेकोंग या नदीच्या खोऱयात वसले होते. इसवी सनाच्या पहिल्या शतकात कौन्डिण्य  नावाच्या ब्राह्मणाने हे राज्य स्थापन केले, असे चिनी नोंदीवरून समजते. कंबोडिया या देशात यांच्या वंशजांनी पुढे बौद्ध आणि हिंदू या दोन्ही धर्मांना राजाश्रय दिला. त्याचा परिणाम म्हणून बयोन, ता फ्रोम, बांते श्राय आणि अतिशय  भव्य असे जगातले सर्वात मोठे मंदिर अंकोरवाट निर्माण झाले. बुद्ध, विष्णू, शिव, दुर्गा, लक्ष्मी, गणपती, नाग, इंद्र  आणि अजून अनेक हिंदुस्थानी देवदेवतांची उपासना कंबोडियात लोकप्रिय होती असे आजच्या अवशेषांवरून सहज समजते. हिंदुस्थानी कला, स्थापत्य, सामाजिक रूढी, परंपरा यांचा खूप मोठा प्रभाव या देशात पाहायला मिळतो.

इथे असलेल्या अनेक स्थळांपैकी जागतिक वारशाचा दर्जा असलेल्या सांबोर प्री कुक या ठिकाणी अनेक प्राचीन मंदिरांचे अवशेष आढळून येतात. हे स्थळ काम्पॉन्ग थॉम या प्रांतात आहे. नॉम पेन्हच्या उत्तरेला 206 कि.मी. अंतरावर हे स्थळ आहे. इथे असलेल्या स्थापत्याची निर्मिती इ.स.च्या 6व्या ते 9व्या शतकात चेनला राजवटीत केली गेली. कंबोडियात पुढे जे ख्मेर साम्राज्य निर्माण झाले, त्याच्या आधीच्या काळातले हे स्थापत्य आहे. येथे चेनला राज्याच्या राजधानीची आणि येथील मंदिरांची निर्मिती राजा ईशानवर्मन (1) या राजाच्या काळात झाली. त्याने या परिसराला ईशानपूर असे नाव दिले होते. इथे असलेले मोठे मंदिर त्याने स्वतःच बांधून घेतले होते. इथे झालेले बहुतेक सर्व बांधकाम विटांचे केलेले होते, तर काही वेळेस वालुकाश्म दगडाचा वापर करूनही हे बांधकाम केलेले होते.

कंबोडियामध्ये असलेल्या स्थापत्याच्या नावांमध्ये ‘प्रसात’ किंवा ‘प्रासात’ (प्रासाद) हा शब्द खूप वेळा दिसतो. हिंदुस्थानमध्येही  मंदिर स्थापत्याच्या नावांमध्ये हा शब्द आढळून येतो. हिंदुस्थानातील सुरुवातीची मंदिरे ही फक्त देवाचे घर या स्वरूपातील असल्यामुळे त्यामध्ये देवाच्या मूर्तीसाठी केलेली खोली मोठी आणि भक्तासाठी छोटा व्हरांडा असे त्यांचे स्वरूप होते. पुढे काळाच्या ओघात पूजाविधीत भर पडली आणि त्यांची संख्या वाढली तसेच पूजा करणाऱयांचेही महत्त्व वाढले. देवाच्या घरापेक्षा देवाचा ‘प्रासाद’ म्हणजे राजवाडा ही कल्पना डोळ्यासमोर ठेवून मंदिर बांधणीला सुरुवात झाली. त्यातून ओघानेच देवाच्या प्रासादाचे स्वरूप हे बहुमजली असावे अशी कल्पना पुढे आली. अनेक मजले सूचित करणाऱया उंच उंच  शिखरांचेही रूप हळूहळू साकार होऊ लागले. अगदी हीच संकल्पना हिंदुस्थानबाहेरही पोचली आणि त्यामुळे त्या देशांमध्येही ‘प्रासाद’ हा शब्द मंदिरासाठी देवाचे घर (खरे तर राजवाडाच) आणि राजाच्या महालासाठी वापरलेला आढळतो.

सांबोर प्री कुक येथील मंदिराचे नावही ‘प्रासात सांबोर प्री कुक’ असे आहे. संस्कृत आणि ख्मेर भाषेतील शब्दांनी हे नाव बनले आहे. या परिसरात असलेल्या स्मारकांची आज बरीच वाईट स्थिती आहे. कारण मूळ विटांची असलेली ही भव्य मंदिरे आता हळूहळू खराब होत आहेत. हिंदुस्थानातील मंदिर स्थापत्याच्या नागर शैलीसारखी यांची शैली आहे. गुप्त काळातील देवगढ, भितरगाव येथील मंदिरांची आठवण व्हावी अशी या सांबोर प्री कुक येथील मंदिरांची रचना आहे. या परिसरातील स्थापत्याचे अवशेष पाहता इथे साधारणपणे 186 मंदिरे होती असे म्हणता येईल. बरीचशी या परिसरातील अरण्यात लपली आहेत, तर काहींवर प्रचंड मोठय़ा वेली आणि वृक्ष यांनी कब्जा केला आहे. झाडाची मुळे मंदिरांच्या भिंतीत शिरली आहेत. तरीही या परिसरातील अवशेषांची विभागणी तीन भागांत केली आहे. प्रसात सांबोर, प्रसात ये पून आणि प्रसात बोरम असे ते भाग आहेत. प्रसात सांबोर हे यामधील मुख्य मंदिर मानले जाते. ते इ.स.च्या 7व्या शतकात बांधले होते. ते शिवाचे गंभीरेश्वर नावाचे मंदिर आहे. प्रसात ये पूनमध्ये शिवाच्या 22 मंदिरांचे अवशेष आहेत. ती सर्व मंदिरे राजा ईशानवर्मन (1) या राजाच्या काळात इ.स.च्या 7व्या शतकात बांधली गेली. प्रसात बोरम येथे असलेली मंदिरे थोडी उशिराची म्हणजे इ.स.च्या 9 व्या शतकातील आहेत. प्रसात सांबोर येथील मंदिर राजा ईशानवर्मन (1) याच्या काळात बांधले असल्याचा संस्कृत आणि जुन्या ख्मेरमधला एक शिलालेख तिथे सापडला आहे. त्यात 13 सप्टेंबर 627 या दिवसाचा उल्लेख आहे. या मंदिरामध्ये शिल्पकाम काही प्रमाणात शिल्लक आहे. जरी विटांनी बांधलेली मंदिरे असली तरी त्यावर चुन्यात आणि काही वेळेस दगडातील शिल्पं लावलेली दिसतात. त्यामध्ये अतिशय सुंदर अशा मकर तोरणाचाही समावेश होतो.

ईशानवर्मन (1) या राजाने चीनमध्ये आपले राजदूतसुद्धा पाठवले होते. चीनच्या अधिपत्याखाली असलेला वायव्य कंबोडियाचा भागही या राजाने जिंकून घेतला. इ.स.च्या 9व्या शतकात या नगराचा ऱहास सुरू झाला. जयवर्मन (1) हा इथला शेवटचा महत्त्वाचा राजा म्हणता येईल. त्याच्या मृत्यूनंतर कंबोडियातील राजकारणात बरीच उलथापालथ झाली. अनेक लहान लहान प्रांत वेगळे झाले. सांबोर प्री कुकचे वैभव हळूहळू कमी व्हायला लागले. पुढे 1975 ते 1979 या काळातील कंबोडियातील साम्यवादी सत्तेला शह देण्यासाठी अमेरिकेने या परिसरात बॉम्ब टाकले होते. त्यामुळे या मंदिरांचे काही प्रमाणात नुकसान झाले. नंतर युनेस्कोने 8 जुलै 2017 मध्ये या संकुलाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला. आजही या परिसरात गेल्यावर त्याच्या प्राचीन काळातील वैभवाच्या खुणा स्पष्टपणे दिसून येतात.

(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे असोसिएट प्रोफेसर ऑफ इन्डोलॉजी आहेत)

  • manjirib24@gmail.com

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...