कुतुब मिनार, लोह स्तंभ, ईंडिया गेट. दिल्ली
कुतुब मिनार दिल्ली मध्ये स्थित असुन ह्याची ऊंची २३७.८ फूट आहे.
विटांपासुन बनलेला हा जगातील सर्वात ऊंच मिनार आहे. ह्याच्या बांधकामाची
सुरुवात ईसवी सन ११९३ मध्ये कुतुबुद्दिन ऐबक ह्याने सुरु केली. पण तो कुतुब
मिनार चा फक्त पाया पुर्ण करू शकला.त्याचा ऊत्तराधिकारी ईल्तुतमिश ह्याने
आणखिन ३ मजले चढविले. सर्वात शेवटचा पाचवा मजला फिरोझ शाह तुघलक ह्याने
ईसवी सन १३८६ मध्ये पूर्ण केला. कुतुब मिनार वर सर्व बाजुंनी कुराणातिल
वचने कोरलेली आहेत.
कुतुब मिनारच्या निर्मिती आधी ह्या परिसरात लाल कोट ही दिल्ली (त्यावेळी
धिल्लीका) चे शेवटचे हिंदू राजे तोमर आणी चौहान ह्यांची राजधानी होती. ह्या
परिसरात आधी २७ हिंदू आणी जैन मंदिरे होती.
ही मंदिरे उध्वस्त करून त्यांच्या दगड - विटांपासुन कुतुब मिनार ची
निर्मिती केली गेली. कुतुब मिनारावर एका ठिकाणी "श्री विश्वकर्मा प्रसादे
रचिता" असे कोरलेले आढळते. आजही ह्या मंदिरांचे भग्नावशेष ह्या परिसरात
पहायला मिळतात. कुतुब मिनार ह्या मंदिरांच्या भग्नावशेषांवर आज ऊभा आहे.
(स्त्रोत : http://wikipedia.org/)
कुतुब मिनार. vertical panorama
--
--
--
--
--
--
कुतुब मिनार परिसर
--
--
--
--
--
--
लोह स्तंभ : लोह स्तंभाची ऊंची २२ फूट असुन हा कुतुब मिनार च्या
परिसरात स्थित आहे. ह्याचे वजन ६ टनांपेक्षा जास्त असुन हा चंद्रगुप्त
विक्रमादित्य (ईसवीसन ३७५-४१३) च्या काळातिल आहे असे मानण्यात येते. काही
जाणकारांच्या मते हा स्तंभ ख्रिस्तपूर्व ९१२ काळातील आहे. हा स्तंभ ९८%
शुद्ध ओतिव लोखंडाने बनलेला असुन १६०० वर्षे ऊन - पाण्याला तोंड देत न
गंजता ऊभा आहे.
हा लोह स्तंभ आधी विष्णूपादगिरी (सध्याच्या भोपाळच्या पूर्वेला ५० किमी)
येथे स्थित होता. ह्याची ऊभारणी अशी होती की फक्त वर्षातील सर्वात मोठ्या
दिवशी (२१ जुन, summer solstice) ह्याची सावली अचुकपणे विष्णु च्या
मुर्तिच्या पायावर पडावित. हा स्तंभ १६०० वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या
प्रगत धातुकलेची आणी खगोलशास्त्राची साक्ष देतो.
(स्त्रोत : http://wikipedia.org/)
--
--
कुतुब मिनार आणी लोह स्तंभ एका वेगळ्या अँगल ने...
ईंडिया गेट :
ईंडिया गेट चे डिजाईन सर एडविन ल्यूटेन ह्यांनी केले. ईंडिया गेट वर ज्या
७०,०० सैनिकांनी ब्रिटिशांसाठी पहिल्या महायुध्धात व १३५१६ सैनिकांनी १९१९
मध्ये अफगाणिस्तान च्या युध्धात प्राणाहुति दिली त्यांची नावे कोरलेली
आहेत.
(स्त्रोत : http://wikipedia.org/)
--
--
गेल्या तीन वर्षातील वास्तव्यामुळे दिल्ली आणि चंडीगढ ह्या परिसराशी चांगलीच ओळख झाली. महाराष्ट्रात असताना दिल्लीच्या खाद्यसंस्कृती विषयी असलेले काही गैरसमज दूर झाले तर काही समज दृढ झाले. देहली बेलीचाही अनुभव घेवून झाला. नवर्याला बाहेर जेवण्याची प्रचंड आवड असल्याने जवळ जवळ संपूर्ण दिल्ली पालथी घालून झालीये. त्यापैकी काही ठिकाणांची माहिती देते आहे.
१. महाचर्चित 'पराठेवाली गली' - इथे पराठे मिळत नाहीत. स्टफ केलेली पूरी मिळते. वाटेल ती भाजी घालून पराठा अक्षरशः तळून काढतात. तेही कदाचित सहन झालं असत जर चव जबरदस्त असती तर..पण चव अगदीच सुमार वाटली. आणि घाणीचे साम्राज्य आहे त्यामुळे खाण्याची मुळीच इच्छा होत नाहीत. त्या गल्लीत साड्यांची दुकाने मात्र छान आहेत.
२. हल्दिराम - हे जागोजागी आहेत. तिथे जेवणाची चव तर चांगली आहे पण पोर्शन खूपच कमी केला आहे. प्रचंड गर्दी आणि सेल्फ सर्विसमुळे हे ठिकाण मला फारसं आवडत नाही.
३. गुरुद्वारा मधील लंगर : खूप स्वछ सात्विक आणि पवित्र वाटते. बंगला साहिब गुरुद्वारा तर नक्की जा.
४. परिक्रमा, कोनोट प्लेस - हे एक अप्रतिम रेस्टोरंट आहे. रेवोल्विंग रेस्टोरंट आहे. इथे बसून राष्ट्रपति भवन कुतुबमिनार, संसद अश्या बर्याच गोष्टी बघता येतात. मुख्य म्हणजे जेवण खूप छान आहे. थोडे महाग आहे पण पूर्ण पैसा वसूल.
५. पिंड बलूची : हे एक पारंपरिक पंजाबी रेस्टोरंट आहे. इथे पंजाबी डीशेस चांगल्या मिळतात. ambiance उत्तम असतो.
६. सुरुचि, करोल बाग - अप्रतिम गुजराथी / राजस्थानी थाली. पावभाजी कॉम्बो पण मस्त आहे.
७. रोशन डी कुल्फी, करोल बाग - फालूदा कुल्फी नक्की खा.
८. पेशवारी चिकन, पीतमपुरा - नोन-व्हेज चांगलं आहे.
९. करीम, जामा मशिदीजवळ - ठीक ठीक वाटलं.
१०. झिलमिल ढाबा, दिल्ली चंडीगढ हायवे, कर्नाल - चिकन करी बर्याच अंशी घरच्या सारखी. सगळे पराठे तंदूरी. आलू प्याज पराठा माझा खास आवडता. चहा एक मोठा ग्लास भरून देतात पण मस्त असतो. पूर्ण दुधाचा एकदम कडक..
११. हवेली - हे पण पारंपारिक पंजाबी रेस्टोरंट आहेत. दिल्ली चंडीगढ हायवे वर 3 (मुर्थल , कर्नाल, अंबाला) आणि बाकीची पंजाब मध्ये आहेत. मुर्थल म्हणून पानीपत जवळ एक गाव आहे. तिथे हे रेस्टोरंट चांगलं आहे. पंजाबी जेवण अप्रतिम.
१२. सुखदेव ढाबा, दिल्ली चंडीगढ हायवे, मुर्थल - ओव्हरहाइप्ड आहे. पराठा छोटा आणि लोणयाचा गोला मोठा. चव पण विशेष नाही. गर्दी अबबं.
१३. सरवण भवन, जनपथ - अप्रतिम दाक्षिणात्य जेवण
दिल्लीमध्ये खास करून चव घ्यावीत अश्या गोष्टी:
1. रताळ्याचे चाट : शक्यतो हिवाळ्यात मिळते जागोजागी. मेट्रो स्टेशन जवळ, एखाद्या मार्केट मध्ये ई.
2. तंदूरी मोमोस : अमर कॉलनी / लाजपत नगर
3. पनीर टिक्का : पंजाब स्वीट कोर्नर, करोल बाग. पनीर अगदी विरघळते जीभेवर.
4. डोडा : ओम स्वीट्स, गुरगाव हा एक मिठाईचा प्रकार आहे. ही मिठाई गव्हापासून बनवतात.
5. पेठा : बंगला स्वीट्स, गोल मार्केट जवळ.
राजिंदर दा ढाबा - सफदरजंग अॅव्हेन्यु
चिकन मलई टिक्का अप्रतिम!!
डिफेन्स कॉलनीत एक सौथ इंडियन आहे - खूप छान
- सांझा चुल्हा- करोल बाग
- चंदिगद सेक्ट्र १८ मध्ये साई स्वीट्स-- चोले भटुरे फॅब
- कॅनॉट प्लेस- निरुला-- ग्रेट आईस क्रीम
- चोर बिजार- ओल्ड दिल्ली आणि नॉयडा
- दौलत राम-- फ्रेंड्स कॉलनी
- अपना घर- करोल बाग
-- हौज खास व्हिलेजमधील सगळी रेस्टॉरंट्स टॉप
- अरबिंदो मार्ग वरील कर्नटक भवन
-करोल बाग सर्वना भवन
- फ्रेंड्स कॉलनी- लोटस पाँड- ग्रेट चायनीज
- मौर्या शेरेटन-- दम पख्त
दिल्ली हाटमध्ये साबुदाणा वडा छान आहे, पण सोबत लसणीची चटणी देतात.
बटाटेवडा पण ओके. बाकी थालपीठ, भाकरी, झुणका वैगरे तिथे खावं वाटलं नाही.
कोकम सरबत मिळतं तिथे, ते मात्र ब्येस्ट.
नैवेद्यम बर्याच ठिकाणी आहे, साउथ इंडियन जेवण, काही आउटलेटस मध्ये पुपो पण असते.
मी सांगितलेल्या बाई साकेत अन डीएलेफ गुडगाव ह्या भागात पाठवतात पुपो.
साउथ इंडीयनसाठी आमच्या भागात बालाजी म्हणुन आहे, पण त्याचे अजुन कुठे
ब्रँच आहे की नाही माहित नाही. बाकी आंध्राभवन मधले जेवण छान असते. व्हेज
थाली मस्त आहे तिथली.. सोबत मेतकुटाचा भाऊ शोभेल असा एक पदार्थ आतो, त्याला
माझ्या मैत्रिणी अन दिल्लीतले बरेच जण गनपावडर म्हणतात.
नॉन व्हेज खात असाल तर तिथली चिकन चेट्टिनाड ही डीश खाच. जेवण झाल्यावर मस्त पान वैगरे मिळतं.
गुजराथी थाळीसाठी राजधानी, कॅनॉट प्लेस अन गुडगावमध्ये आहे.. बहुतेक नोयडा
मध्ये पण असेल. चांगलं जेवण अन चांगली सर्विस... अशीच एक सुरुची नावाची
जागा आहे करोलबागमध्ये, तिथे गुजराथी अन राजस्थानी जेवण मिळतं... एक्दम छान
चव..
याव्यतिरिक्त रात्री बेरात्री उशिरा जेवायचं असेल तर पंडारा रोड चांगली
जागा आहे. कढी चावल / राजमा चावल साठी कॅनॉट प्लेसवर रोडवर काके का ढाबा
टाइपच्या एक्-दोन जागा आहेत. त्या पण चांगल्या...
आणी हो बिट्टु की टीक्की खाल्ली आहे ना?
दिल्ली हाट दक्षिण दिल्लीत आहे... आयएनए मार्केटजवळ.. साउथ एक्स च्या
जवळ... तिथे कायमस्वरुपी मेळावा आहे...वेगवेगळ्या राज्यातले स्टॉल्स आहेत (
कपडे, विविध प्रकारच्या हस्तकला.. शोभेच्या वस्तु आणि बहुतेक सगळ्या
राज्यांचे खाण्याचे स्टॉल्स).. तिथेच एक महाराष्ट्राचा पण स्टॉल आहे.
पिठलं-भाकरी, झुणका भाकरी, पुरणपोळी, थालपीठ, साबुदाणा वडा, बटाटेवडा, भेळ,
कोकम सरबत वैगरे पदार्थ मिळतात. एकदा तिथे सोलकढी पण मिळाली होती..
खाण्याची एकगठ्ठा ठि़काणं आहेत ना... कॅनॉट प्लेस वर बरीच रेस्टॉरंट्स
(थोडीशी महागडी) आहेत, तिथेच रस्त्याच्या एका बाजुला रोडसाइड ढाबा टाइप
कढी-चावल, राजमा चावल, छोले कुलचे वैगरे मिळणारी स्वस्त ठिकाणंही आहेत.
साउथ एक्समध्ये, डिफेन्स कॉलनीमध्ये पण भरपुर महागडी आणि वेगवेगळ्या प्रकारचे जेवण देणारी रेस्टॉरंट्स आहेत.
मागे लिहिल्या प्रमाणे इंडिया गेटजवळचं पंडारा रोड हे पण एक प्रसिद्ध
ठिकाण.. इथे छोट्याश्या जागेत ४-५ रेस्टॉरंट्स आहेत. यांचे वैशिष्ट्य
म्हणजे ही जागा रात्री ११ नंतर पण उघडी असते.. या पंडारा रोडवर पार्कींगला
जागा मिळत नाही. पार्कींगच्या समोरच रस्त्यावर एक कबाबचा स्टॉल आहे.. खुप
छान कबाब मिळतात.. गाड्यांची गर्दी असते याच्याकडे पॅक करुन घेवुन जायला.
अजुन माझ्या माहितीतल्या जागा म्हणजे प्रितमपुरा मार्केट (पश्चिम दिल्ली),
चांदनी चौक, आय आय टी समोर ( जेएनयु परिसर).. वैगरे.. तसे दिल्लीत प्रत्येक
मार्केटमध्ये खाण्या-पिण्यासाठी मार्केटच्या आकाराप्रमाणे जागा असतातच..
त्यामुळे करोलबाग, लाजपतनगर मेन मार्केट, सरोजनीनगर मार्केट, कमलानगर
मार्केट, इस्ट पटेलनगर मार्केट, राजेंद्रनगर मार्केट, रजौरी गार्डन या
ठिकाणी पण बर्यापै़की रेस्टॉरंट्स वैगरे आहेत. अजुनही ठि़काणच्या मार्केटस
मध्ये अश्या जागा असतिल.. मी ज्या ज्या ठिकाणी गेलेय तिथलीच नावं लिहिलित
(अपवाद चांदनी चौकचा. इथली पराठेंवाली गली अन गोलगप्पे फक्त ऐकुन माहित)
शँकी, मंदार कधी करोलबाग, सीपी वैगरे भागात येणार असाल तर सांगा.. माझे घर तिथुन बर्यापैकी जवळ आहे.
चांदनी चौकातली साजुक तुपातली जिलबी तर अप्रतिमच!
दिल्ली हाट मधे पावभाजी छान मिळते...! आणि मला आठवते आम्ही आय आय टी कॅम्पस
मधील कॅन्टीन ला जायचो ...थंडीच्या दिवसात तिथे मिळणारे अंडाकरी, सरसो दा
साग अन मक्के दी रोटी...आहाहा! तेही रिझनेबल रेट मधे! करोलबाग मधे
बिकानेरवाल्याकडे मिळणारे पनिर पकोडे एकदा तरी चाखावेच असे...!
बाकी दिल्लीमधे खाण्यापिण्याची एकंदरीत चंगळच असते...क्वालिटी अन क्वांटीटी दोन्ही मस्त! चौकाचौकात मिळणारे छोले भटुरे असो नाहीतर चाउमेन! छोलेभटुरे सिटीमधे खाण्यापेक्षा गुडगाव रोडवरील ढाब्यांवर खावे!
चांदणी चौका वरुन आठवले..
तिथे करिम हॉटेल्स प्रा लि म्हणुन एक प्रसिद्ध हॉटेल आहे. हिंदुस्थान चे शेवटचे बादशाह, बहादुरशाह जफर ह्यांचा खानसाम्या चे वंशज हे हॉटेल चालवतात! चांदणी चौकातील स्वच्छता वादातीत असली तरी, हे हॉटेल साफ सुथरे आहे. जामा मशिदीला वळसा घालुण पायी किंवा सायकल रिक्षा ने जावे लागते. टॅक्शी/ रिक्षा नेण्याचा रस्ता दिसला नाही!
सुंदर जेवण, अन बर्यापैकी अदबशीर वेटर. बहुतांश वेळेस परदेशी लोक असतात.
गोल मार्केट, संसदे जवळ, एक लस्सी चे दुकाण आहे. नाव आठवत नाही. पण जबरी
लस्सी द्यायचा! एक मोट्ठे गाडगे/मडके भरुण लस्सी! एकच प्याला अन गपच झाला
असे करुन टाकतो! 
हॉटेल सरवण भवन, म्हणुन कॅनॉट प्लेस ला एक मस्त हॉटेल आहे. गर्दी खुप असते.
व्हेपर - एम जी रोड
पायरेट्स - एम जी रोड
पंजाबी बाय नेचर - सायबर सिटी
कासाब्लॅन्का - डबल ट्री - गोल्फ कोर्स रोड
डिफेन्स कॉलनीतील स्वागत फार आवडते. चेट्टिनाड, मंगलोरीयन, चायनीज, गोवन, कोकणी जबरदस्त व्हरायटी! आणि प्रत्येक डिश ऑथेंटिक म्हणावी अशी. पहिल्या मजल्यावरील कॅप्टन मराठी आहे त्यामुळे बरेचदा स्पेशल अटेंशन मिळाले आहे :). तंदूर प्रॉन्स, तंगडी कबाब, केरळी अप्पम, प्रॉन्स गस्सी एकदम फेवरीट. बार पण मस्तच!
गोवा सदन नाही मग, मी म्हणतेय ते चाणक्यपुरीमधलं गोवा निवासच. मी मागे तिथे फक्त कॉफी प्यायले होते. पण तिथेच उतरलेल्या माबोकर मैत्रिणीने जेवण छान असल्याचं संगितलं होतं. तिथला अॅम्बियंस छान आहे. सुरेख इमारत आणि सुंदर पेंटीग्ज आहेत सुबोध केरकर यांच्या.
आंध्रा भवनमध्ये बर्याचदा जेवलेय. गर्दी फारच असते. तिथलं सुकं चिकन खूप मस्त असतं.
जुन्या महाराष्ट्र सदनातलं जेवण भयानक आहे. नव्यामध्ये चांगलं आहे असं ऐकलं होतं गणपतीच्या वेळी. पण अजून जाणं नाही झालंय.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.