या वेळी भारतात गेल्यावर माउंट अबू व उदयपूर अशी ६ दिवसांची ट्रीप केली.
जाताना तिथली टेंपरेचर्स बघितली होती.(मार्च १ला आठवडा) २८-३० डि सेंटि
असल्याने जायचे ठरवले. पुणे-अहमदाबाद-माउंट अबू-उदयपूर- अहमदाबाद अशी ट्रीप
प्लॅन केली होती. जाण्यापूर्वी नेहेमीप्रमाणे नेट च्या आधारे रिसर्च करून
काय बघायचे याची साधारण आखणी केली. तेव्हा असे लक्षात आले की या भागात
बघण्यासारखे इतके आहे की काय बघावे न आय सोडावे ते कळत नव्हते शेवटी नेहेमी
प्रमाणे ’सिग्नेचर’ गोष्टींवर भर दिला आणि निघालो. आमचा ५ जणांचा ग्रुप
होता. अहमदाबादपासून पुढचे ६ दिवस गाडी दिमतीला होती.
अहमदाबाद-अडलज-अक्षरधाम-अंबाजी-माउंट अबू- दिलवाडा टेंपल- रानकपूर-
हल्दीघाटी- उदयपूर- चितोडगड - अहमदाबाद असे साधारण फिरलो.
click on the pictures to see enlarged view.
अहमदाबादला उतरल्यावर ड्रायव्हवर गाडी घेउन हजर होता त्याला सांगितले
अक्षरधाम व बावडी बघायची आहे. बावडी बद्द्ल महेंद्र यांच्या साईट वर वाचले
होते. (महेंद्र ह्या माहिती बद्दल धन्यवाद) आमच्या ड्रायव्हरला या बद्द्ल
माहित नव्हते पण मी वाचलेल्य़ा माहितीवर अडलज ला ही बावडी आहे आणि ती
बघायचीच आहे असे ठरवले होते. २-३ जणांना विचारून शेवटी ती जागा सापडली.
आमचा ड्रायव्हर उदयपूर चा लोकल असून त्याला ही जागा माहित नव्हती हे
आश्चर्य. एका उसाच्या रसाच्या दुकानाने आमचे लक्ष वेधले आणि विहिर सोडून
सगळ्यांनी रस प्यायला प्राधान्य दिले.. बाहेर उन तापले असल्याने त्याची गरज
भासत होती. नंतर विहिर बघायला गेलो.
जमिनीखाली ५ मजली अशी चान बांधलेली विहिर आहे आणि त्यावर अतिशय सुंदर
कोरीव काम आहे. या भागात गेलात तर नक्की बघा. हा स्पॉट अजून खूप जणांना
माहित नाही. खरोखर बघण्यासारखा आहे. पावसाळ्यात पाणी थोडे वर येते. सर्व
बाजूने सुंदर कोरीव काम आहे. फोटोग्राफीला तिथून जी सुरूवात झाली ती पुढचे ६
दिवस चालूच होती.. सॅंड स्टोन वर कार्व्हिंग केलेले आहे. विहीर अष्ट्कोनी
आहे. बाजूला देवतांची चित्रे आहेत. साधारण १५०० मधले बांधकाम आहे.
स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना. लोकांनी वर चढू नये म्हणू बाजूला टोकदार
भाले लावले आहेत. गुजरातच्या टूरिझम मध्ये ही विहीर दुर्लक्षित का हे मात्र
कळले नाही.
अडलज नंतर अक्षरधाम येथे गेलो. मी व माझ्या मुलीने ते पूर्वॊ बघितले
असल्याने (आणि स्वामी नारायण बद्दल विशेष प्रेम नसल्याने) आम्ही बाहेर लॉन
वर बसून लोकांचे निरीक्षण करत होतो. बाहेर मॊठे लॉन व खेळायला भरपूर जागा
आहे त्यामुळे बच्चे कंपनी भरपूर दिसत होती. खाण्याची सोय होती. एक गोष्ट
जाणवली म्हणजे तिथे येणार्यात लोअर क्लास चे लोक जास्त होते. अगदी मजूर
कामगार ..त्या लोकांसाठी ही एक मोठी सोय आहे..मुलांना छान बाग आहे व भरपूर
मोकळी जागा. आत जाताना मात्र भरपूर चेकिंग झाले. पर्स, कॅमेरा सगळे बाहेर.
आत जाताना बॉडी चेकींग....त्या अतिरेक्यांनी आपल्या सगळ्या चांगल्या
ठिकाणांची अशी वाट लावली आहे. देवळा सारख्या जागेत सुद्धा आता भिती शिरली
आहे.
अक्षरधामनंतर माउंट अबूच्या रस्त्यावर थोडेसे बाजूला अंबाजीचे देउळ आहे.
पोचण्यापूर्वी एकदम पिक्चर परफेक्ट सनसेट पाहिला. लहानपणी चित्रात काढतो
तसे त्रिकोणी डोंगर आणि त्यामागे पिवळे लाल बिंब खूपच छान सूर्यास्त दिसला.
सूर्यास्त ही गोष्ट अशी
आहे कि वाट पहावी तेव्हा चांगला दिसत नाही पण कधी
कधी
एकदम सुंदर दिसून जातो. आजूबाजूचे डोंगर खूप छान होते बरेच दगड खाली आले
होते. काही सुटले होते आणि कधी खाली पडतील असे वाटत होते. या सगळ्या
गोष्टींमुळे रस्ता कंटाळवाणा झाला नाही. अंबाजीचे हे देउळ राजस्थान गुजरात
च्या बॉर्डरवर आहे. १२ शक्तीपीठापॆकी हे एक मानले जाते. आत देवीची एक
मूर्ती आहे पण पूजा शक्तीचक्राची केली जाते. तिथे थोडा वेळ थांबलो.
अंबाजीच्या देवळात जाताना पण भरपूर चेकिंग. आत जाताना दारात ए के ४७ वाला
गार्ड दिसला. बिचारे आपले देव, एवढे शक्तिमान, त्यांना पण पहार्यात रहावे
लागते. हे देउळ खूप छान आहे आतून आणि बाहेरून. रात्री लाइटस टाकतात. वरचे
कोरीव काम सुंदर आहे आणि आतली देवीची मूर्ती पण छान आहे. बाहेर स्त्री
वर्गासाठी मस्त बाजार आहे. बराच वेळ जाउ शकतो.
अहमदाबाद्पासून रस्ते अतिशय सुंदर आहेत. हाय वेज एकदम मस्त. ही सगळी
नरेंद्र मोदींची किमया. आम्ही परतेपर्यंत ’रेंट अ मोदी’ स्कीम असली तर
महाराष्ट्रात त्यांना नेउन सुधारणा केली पाहिजे असे सगळ्यांचे मत झाले.
आमचा ड्रायव्हर अधून मधून किस्से सांगत होता. पण खरोखर.. राज्यकर्ता
करायच्या तर चांगल्या गोष्टी करू शकतो हे इथे पहायला मिळते. रस्त्यावर
सगळीकडे भरपूर बोगन वेल आणि कण्हेर. इतके रंग बघितले या दोन फुलांचे की बस.
वाटॆत अफूची शेती पण दिसली. ऑफिशिअल शेती आहे.
आपल्याकडे न दिसणारी पांगार्याची झाडे पण भरपूर पाहिली. मला फॉल कलर्सची आठवण झाली.
जंगल व घाटाचा रस्ता पार करून माउंट अबूला रात्री पोचलो. वाटेत मस्त चांदणे
दिसत होते. व्याध अगदी स्पष्ट दिसत होता. पायथ्याशी एक गाव लागले तिथे
बरीच एक सारखी अपार्ट्मेंटस दिसली हि सगळी ब्रम्हकुमारीच्या शिष्यांची
रहायची जागा. आम्हाला दोघांना नाटकातल्या (कार्टी प्रेमात पडली)
ब्रम्हकुमारीची आठवण झाली. आमचा ड्रायव्हर सांगत होता ’’ये बहुत देशोमे
फॆली हुई हॆ...इसके बहुत शिष्य हॆ”..वगॆरे. रात्री चेक इन करून बाहेर
थंडीत गरम जेवणावर ताव मारला. बाजूला राजस्थानी संगीत चालू होते.
गाणार्याचा आवाज हाय पीच आणि छान होता. प्रसन्नने त्याचे म्युझिक एंजॉय
केले व त्याला बरीच बक्षिसी दिली. आम्ही चाचा इन मध्ये राहिलो होतो
नावावरून शंका येत होती पण हॉटेल ठिकठाक होते. इथे बर्याच घरांची हॉटेल्स
केलेली आहेत. तिथली बाग मस्त होती. रोज ब्रेकफास्ट बरोबर गुलाबाची फुले
मिळत असत. खाण्यापेक्षा त्याचा आनंद जास्त.
दुसर्या दिवशी सकाळी एक महादेवाचे देउळ बघितले. इथे देवळे अनेक आणि अख्यायिकाही तेवढ्याच.
माउंट अबू ही देवांची वस्ती समजली जाते. या शंकराच्या देवळाबाहेर एक माणूस
संगमरवरावर कोरीव काम करत होता. एका दिवसात एक फूल तो करत होता. त्याच्या
बाजूला जे देवळाचे खांब होते ते सगळे त्याने कोरलेले होते. काय अचिव्हमेंट
आहे ना अजून थोड्याच दिवसात तो सांगेल की हे देउळ मी
बनवलेल्या
खांबापासून बनले आहे. परत कुठे ’मी’ पणा नाही. इथल्या सगळ्या कोरीव कामात
तळाशी ग्रास नावाचा प्राणी दिसतो तो पाण्यात असे. त्याच्यावर पाय देउन लोक
आत गेले की त्याचा मी पणा कमी होत असे. कमळ लाटा अशी पाण्याशी संबंधित
नक्षी सगळीकडे दिसते.
त्या नंतर प्रजापिता ब्रम्हकुमारी पीस पार्क बघितले. पार्क खूप छान आहे. पण
ते बघण्यासाठी आधी १० मि. भाषण ऎकावे लागते ते फार बोअर आणि नंतर ते
तुमच्या मागे लागतात. कसे काय लोक या पंथांच्या मागे लागतात हे मला न
समजलेले कोडे आहे. इथे तर देशो देशीचे लोक येतात. असो आपण दूर रहावे हे
खरे. तेवढेच आपल्या हातात. मार्केटिंगचा जमाना आहे हा.........
नंतर गुरू शिखर ला गेलो.हा अरवलीचा हाय्येस्ट पॉइंट. इथे दताचे देउळ आहे.
महाराष्ट्राबाहेर दत्ताचे दउळ म्हणून आश्चर्य वाटले. एका दगडाच्या गुहेत हे
मंदिर आहे त्याच्या वर अजून बर्याच पायर्या गेल्यावर शिखराशी पोहोचतो.
हवा छान असल्याने आम्ही वरपर्य़ंत गेलो. वरून व्ह्यू मस्त दिसतो. जाताना
वाटेत बरीच दुकानेही होती त्यामुळे चढ जरा कमी जाणवला. इ्थे एक
ऑब्झरव्हेटरी आहे. बाजूला ऍटेना दिसतात..पाकिस्तानी रेडिऒ इंटरसेप्ट करायला
ते वापरतात. तिथे एअर बेस पण आहे. वरती बसून गार हवा खाउन खाली आलो.
जाताना कणीस चहा अशी खादाडी चालूच होती. त्यानंतर अगदी खानावळ टाइप जागेत
जेवलो आणि दिलवाडा टेंपल मध्ये शिरलो.
इथे बर्यापॆकी गर्दी होती. आत कुणाची स्पेशल पूजा चालली होती म्हणून थोडावेळ थांबलो. फोटो काढता येत
नाहीत
म्हणून एक पुस्तक विकत घेतले. बाहेरून ही देवळे ( ४-५ ) इतकी साधी दिसतात
काही कल्पना येत नाही आत काय असेल याची. आत गेल्यावर २५-३० लोकांच्या
ग्रुपला एक गाईड(पुजारी) दिला. तो माहिती सांगत होता व वेगवेगळ्या देवळात
हिंडवत होता. पहिल्याच देवळात इतके अप्रतिम कोरीव काम होते ्की तिथून
हलावेसे वाटेना. साधारण १००० वर्षापूर्वीचे बांधकाम अजून खूप चांगल्या
स्थितीत आहे. कमानी, कोरीव मूर्ती सभामंड्प.... हे पहावे का ते कळत नाही.
इथे ५ मंदिरे आहेत. एकात पंचधातूची मूर्ती आहे. एकात जेठाणी देवराणी गोष्ट
आहे. देवाच्या ठिकाणी तीर्थंकरांच्या मूर्ती पाहून हात जोडताना मात्र आपले
देव डोळ्यासमोर येत होते...हे बरोबर नाही, तरीही...सवईचा परिणाम. त्या
दिवशी काही स्पेशल पूजा होती म्हणून वरती रंगीत कागद वगॆरे लावून काही
ठिकाणी डेकोरेशन केले होते त्याने कोरीव कामाची शोभा कमी होत होती
वाढण्याऎवजी.
संगमरवरावरचे ते काम पाहून डोळे दिपले. जमिनी वर झोपून, तिरके सगळ्या
बाजूनी लोक ते काम बघत होती. गोरे लोक भरपूर होते. कोरीव काम बघून डोळे
दमले शेवटी. इतक्या वर्षापूर्वी केलेले ते कोरीव काम पाहून त्या कारागि
रांचे,
ते बनवणार्या राजाचे, धनिकांचे कॊतुक वाटते. त्यांच्या कल्पकतेला दाद
द्यावी तेवढी थोडी. अशा ठिकाणी संगमरवर आणणे, कारगिर मिळवणे, कोरीव काम
करून ते नीट ठेवणे... मुस्लीम आक्रमणापासून वाचवण्यासाठी बाहेरून अगदि
सामान्य डिझाइन केले आहे. काय त्रास ना, आधी छान कारागिरी करा आणि ती
मुस्लीमांपासून वाचवण्यासाठी प्रयत्न करा. इतके सुंदर काम, मूर्ति तोडा असे
एखादा धर्म कसा सांगतो ते कळत नाही. दिलवाडा टेंपल्स ला त्यामानाने
प्रसिद्धी नाही असे वाटले..कदाचित मुद्दामही असेल कदाचित राजकारण असेल.

संध्याकाळी शॉपिंग झाले. ते आवश्यक असते. त्यानंतर थाळी खाउन सगळे आडवे झाले. दुसर्या दिवशी उदयपूरला निघायचे होते.

अनंतहस्ते.... भाग २ - (राणकपूर-हल्दीघाटी-उदयपूर)
(फोटोवर क्लिक केल्यास मॊठे दिसतील)
दुसर्या दिवशी सकाळी माउंट अबू सोडले. घाट उतरताना रस्ता खूप छान होता. वाटेत बरीच वानरसेना काही खाद्य मिळेल या आशेने रस्त्याच्या कडेला बसली होती. एका ठिकाणी पाटी होती ’माकडांना खायला घालू नका’ आणि त्याशेजारीच ३-४ माकडे बसली होती. कोणीतरी म्हटले, ’काय पाटीशेजारीच बसली आहेत’, (काय करणार अजून माकडांना वाचता येत नाही ना..) लोकांना कितीही सांगितले कि माकडांना खायला घालू नका तरी लोक ऎकत नाहीत त्यामुळे ही सगळी सेना अशी खाण्याची वाट बघत बसते. घाट उतरल्यावर हवा बदललेली जाणवली.
पुढचा मुक्काम राणकपूर येथे होता. हे ५००-६०० वर्षापूर्वी बांधलेले मंदिर आहे. त्यात १४४४ खांब आहेत. प्रत्येक खांब दुसर्याहून वेगळा आहे. असे म्हणतात कि हे खांब मोजता येत नाहीत. बहुतेक जिथे जिथे खांब असतात तिथे असेच सांगतात कि हे खांब मोजता येत नाहीत...कारण काही
आत गेल्यावर एक गाइड घेतला..एक १३-१४ वर्षाची मुलगी होती. चांगली माहिती दिली. तिथे ३ कुटुंब आहेत. वर्मा, शर्मा व पुरोहित. त्यातलेच लोक गाईड चे काम पिढ्यानपिढ्या करत आहेत. बघा टूरिझम मुळे निदान काही लोकांची उपजिविकेची सोय झाली आहे. या देवळाच्या आर्किटेक्ट्चा पुतळा एका खांबावर आहे. हे त्या गाईडने सांगितले म्हणून कळले. कोरीव काम अतिशय सुंदर आहे. प्रत्येक खांब, छतावरचे ३ डी काम, मधले चॊक फारच सुंदर ...हे बघू का ते असे चालले होते. आतमध्ये मार्बल मुळे गार वाटत होते. आपल्याला एक फूल काढायचे म्हटले तर सिमेट्रीकल काढता येत नाही, इथली डिझाईन्स कशी केली असतील हा प्रश्न पडतो. या लोकांनी इतक्या पूर्वी ते मार्बल नेले, कोरीव काम केले आणि मुसलमानांपासून जपले......ग्रेट. पूर्वीच्या राजे लोकांच्या मध्ये स्पर्धा असेल
शेपट्या....एका ठिकाणी ५ धडे व एकच चेहेरा त्याला आहे..हे पुन्हा जोडताना त्याचा ऍंगल चुकला आहे. पूर्वी कुठुनही पाहिले तरी तो चेहेरा त्या शरीराचा वाटे. कारागिरांनी इथे बर्याच करामती केल्या आहेत.... बरे त्या
मनाने गाजावाजा कमी...लोकांची प्रसिद्धी साठी केवढे ्प्रयत्न चालतात त्यामानाने इथे साधेपणा जाणवला. लोक इथे दान देतात. पुण्यातून आम्ही आलो म्हटल्यावर रांका जुवेलर्स चे खूप कॊतुक करत होते त्यांची इथे बरीच मदत आहे. पण आश्चर्य म्हणजे गवगवा नाही (आजकालच्या मी पणाच्या काळात.) आमची बरीच फोटॊग्राफी झाली. अर्थात प्रत्यक्ष आणि फोटॊ यात खूप फरक पडतो.
नंतर पोट्पूजेसाठी बाहेरील खानावळ गाठली. इथे जेवण फुकट पण स्वच्छ्तेचे २५ रू चार्ज करतात. साधे पण चांगले जेवण होते. शिस्त होती. पानात टाकू नका असा आग्रह होता. तिथून बाहेर पडल्यावर dari काम बघण्यासाठी थांबलो. सरकार या लोकांना ही कला चालू ठेवण्यासाठी मदत करते. एका खेड्यात ८०-९० घरात हे का चालते.
आम्ही गेलो ते होळी नंतरचे दिवस. राजस्थानात महिनाभर हा उत्सव चालतो. आपल्याकडे जशी गणपतीची वर्गणी गोळा करतात तशी इथे होळीची. इथले आदिवासी लोक दगड, काटेरी झुडुपे लावॊन रस्ते अडवतात. आणि १०-२० रू. मागून घेतात. सुरूवातीला मजा वाटली पण नंतर कटकट वाटायला लागली. या गोष्टी कडे पोलिस पूर्ण दुर्लक्ष करतात. आपण गाडी दगडांपासून वाचवण्यासाठी पॆसे देत जातो....हा सिझन सोडून जाणे हा सोपा उपाय, कारण ते काही बदलणार नाहीत. इथे नव्यानेच डोंगर खोदून रस्ते केले आहेत त्यामुळे रस्ते अडवायला दगड
या पुढचा मुक्कम होता प्रसिद्ध हल्दी घाटीचा. या बद्दल आपण सगळ्यांनी इतिहासात वाचलेले असते त्यामुळे प्रत्येक जण रिलेट करू शकत होता. महाराणा प्रताप ची लढाई , चेतक घोडा या सगळ्याबद्द्ल एक फिल्म दाखवतात. तिथे एक म्युझिअम आहे - बघण्यासारखे आहे. प्रत्यक्ष युद्धाचे चित्र मॉडेल रूपात मांडले आहे.
इथे एक डोंगरात घाटी दाखवतात. तिथली माती पिवळी दिसते ज्यामुळे हे नाव पडले पण खरी घाटी जरा वेगळी कडेच आहे. आमच्यापॆकी एकाने पूर्वी ही जागा बघितली असल्याने त्यांच्या हे लक्षात आले. तिथे जवळच जुना रस्ता व घाटी दिसते. लोकांना काहीतरी बघायला मिळावे म्हणून ही नवीन घाटी दाखवतात...हा खोटेपणा करण्याचे खरे म्हणजे काहीच कारण नाही. असो.
हल्दी घाटीचे अजून एक वॆशिश्ट्य म्हणजे इथे गुलाबाची खूप लागवड होते. हा प्रदेश इतका रुक्ष दिसतो कि इथे गुलाब होत असतील हे वाटत नाही. आम्ही गुलकंद व सरबताची खरेदी केली. तिथेच त्यांची साधी मशिनरी होती (एक मोठा रांजण , गॅस इ) या गोष्टी नेट वर असल्याने माहित होत्या. आमचा ड्रायव्हर म्हणायचा आपको तो सब पहलेसे पता हॆ..(थॅंक्स टू ट्रिप ऍडव्हायझर रिव्ह्यूज...)
हल्दी घाटीतून निघून उदयपूरला पोचेपर्यंत रात्र झाली. तिथे रामप्रसाद व्हिला त चेक इन केले. हॉटेल छान आहे फक्त लिफ्ट नाही. आमच्या रूम्स ३र्या मजल्यावर होत्या. बाजूला टेरेस व समोर लेक आणि त्यामागे टेकडी...छान सिट्यूएशन होती. कुणाचे तरी घर कन्व्हर्ट केले आहे हॉटेल्मध्ये. सगळीकडे मार्बल, कमानी, डेकोरेशन छान होते. रात्री समोरच्या टेकडीचा रस्ता लाईटेड दिसे. एकंदर रात्री दमून आल्यावर गच्चीत थांबले की छान देखावा दिसायचा.
सिटी पॅलेस हा इथला मुख्य अजेंडा होता. त्याच कॅंपस मध्ये लेक पिचोळा, लेक पॅलेस, जगदीश मंदिर व क्रिस्ट्ल गॅलरी बघता येते. सकाळी सकाळी तिथे पोचलो. तिकीटे काढून गाईड मिळवण्यात बराच वेळ घातला. आम्हाला डिटेल बघायचे होते. इथले बरेच गाडीवाले, गाईड्स गोर्यांच्या मागे असतात. मला वाटले त्यापेक्षा गाईडस कमी होते.
सिटी पॅलेस हा महाराजा उदयसिंग ने बांधला व नंतर त्यात अनेक राजांनी भर घातली. ते बघताना जाणवते. पण
खालच्या चॊकात काही दुकाने आहेत अर्थात आमचा मोर्चा तिकडे वळला. यातील गोष्टी थोड्या महाग आहेत पण क्वालिटी छान आहे. आमची थोडीफार खरेदी झाली.
हा पॅलेस लेक पिचोलाच्या काठावर आहे. रात्री लाईट्स मध्ये हे सगळे पॅलेस छान दिसतात आम्ही ते मिस केले, तुम्ही करू नका. नंतर बोट राईड ने लेक मध्ये फिरून आलो. मध्ये जगदीश्वर मंदिर ला उतरलो ती जागाही हॉटेल मध्ये बदलली आहे. तिथली बाग आणि बाथरूम्स अप्रतिम. लेक पॅलेसही बाहेरून बघितला. आजकाल फक्त चेक
बाहेर फिरताना सध्याच्या राजाचे दर्शन झाले. एखादा साधारण तरूण असावा असा तो वाटला. त्याने सॊर उर्जेवर बरेच काम केले आहे व त्याबद्द्ल त्याला जर्मनीत ऍवॉर्ड दिले आहे. हे कुटुंब मागच्या बाजूला रहाते. आणि हॉटेल व म्युझिअम मधून भरपूर पॆसा कमावते. त्यांचे जुन्या गाड्यांचे म्युझिअम जवळच आहे. या सगळ्या विंटेज कार्स
त्यानंतर रात्री ’अपणी ढाणी’ चा प्रोग्रॅम होता. गावाबाहेर एका टेकडीवर खेड्यातले वातावरण , घरे, जादूचे प्रयोग, नाच, कठपुतली दुकाने करून ठेवली आहेत ज्यायोगे सर्व वयाच्या लोकांना काहीतरी करमणूक मिळेल. गेल्यावर वेलकम ड्रिंक व पापड दिला. मग राजस्थानी स्टाईल नाच पहिला. नाचणारी साधीच होती पण छान नाचत होती. तिथेच एक बर्थ डे पार्टी चालली होती त्यांचा जरा दंगा चालला होता. हवा एकदम मस्त होती. नंतर जेवणासाठी जमिनीवर सोय केली होती. साधेपणा आणि स्वच्छता लक्षात येत होती. खास राजस्थानी पदार्थ पत्रावळीवर वाढत होते. बाजरीचा खिचडा व तूप, चुट्टा चुरमा, बाजरी भाकरी मका भाकरी, दाळ बाटी आणि तूप, सॅलड, गट्टेकी सब्जी, कढी, शेवेची भाजी ....किती खाल तुम्ही...सगळे पदार्थ छान होते. एक संपेपर्यंत दुसरा हजर. शेवटी जिलबी आणली व सगळ्यांना आग्रहाची भरवली गेली. १०-१० जिलब्या भरवत होते --- समोरचा खाणारा वाटला तर. तिथे वाढायला २च लोक होत पण इतके छान मॅनेज करत होते की बस. एकंदर पोटाची वाट लागली. पण मजा आली. आजकाल पुण्याच्या बाहेर पण असे एक ठिकाण चालू झाले आहे. रात्री हॉटेलच्या गच्चीत बसून थोड्या गप्पा मारल्या. मस्त चांदणे होते. एकंदर राजस्थानी लोककला व खानपान याचा चांगला नमुना बघायला मिळाला.
दुसर्या दिवशी सकाळी जगदीश मंदिर बघायला गेलो. हे सिटी पॅलेसच्या अगदी जवळ आहे.
दुपारी चेंज म्हणून इडली सांबार चा समाचार घेउन चितोड्गड ला निघालो. रस्ता ठीक होता. गडावर पोचण्यापूर्वी
याच गडावर किर्ती स्तंभ आहे जो विजयस्तंभाहून जुना आहे. त्यावर जॆन तीर्थंकरांच्या मूर्ती आहेत व जॆन
सगळ्यात शेवटी पद्मिनी महाल पहायला गेलो. ही राणी काश्मिरहून आणलेली होती. दिसायला अतिशय सुंदर. तिला गर्मीचा त्रास होऊ नये म्हणून एक जलमहाल बांधला आहे. पूर्वी आजूबाजूला खूप पाणी होते तळ्यात आता अगदीच कमी आहे. अशी एक कथा सांगतात , या राणीला बघण्याची अल्लाउद्दीन खिलजी ने गळ घातली तेव्हा दुसर्या महालाच्या आरशातून त्याला राणी दा्खवली. ती तिथे पायर्यांवर बसली होती. मागे वळून पाहिले तर ती पायरी दिसत नाही. (फिजिक्स्च्या तत्वाचा वापर करून). यात खरे किती माहित नाही पण गाईडस अगदी रंगवून ही गोष्ट सांगतात. ही सगळी स्टोरी गाईड च्या या गाण्यात शेवट्च्या २ कडव्यात दाखवली आहे. अर्थात स्टोरी माहित नसेल तर काही कळणार नाही. http://www.youtube.com/watch?v=1odcNKyfZJU
रात्री हा सगळा इतिहास डोक्यात घोळवत परत आलो. दुसर्या दिवशी सकाळी आमच्या एका मित्राकडे भेटायला गेलो. त्याच्या मते उदयपूर मध्ये इतरही अनेक जागा बघण्यासारख्या आहेत. गप्पा, छान ब्रेकफास्ट खाल्ला व अहमदाबादला निघालो. ६-७ दिवस कसे गेले कळलेच नाही. इतके कोरीव काम पाहिले की झोपल्यावर छतावर कोरीव कामच दिसे. खूप चाललो, चढ उतार ही खूप झाले एकंद्रीत ट्रीप मस्त झाली. या उदयपूर मध्ये ऒपन ड्रेनेज हा प्रकार मात्र सगळीकडे खटकत होता. त्यावर काहीतरी उपाय करायला हवा. अजून एक गोष्ट मनात आली महाराष्ट्रात इतके गड किल्ले आहेत पण एकही धड अवस्थेत नाही. एकतर मुस्लीमांना ते कधी शरण जात नसत त्यामुळॆ सतत लूट तॊडफॊड होऊन किल्ल्यांवर काही शिल्लक राहिले नाही. आता जसे आहेत त्याच्यावर टूरिझम च्यासाठी काही तरी केले पाहिजे. राजस्थान च्या लोकांनी मात्र आपले किल्ले शिल्लक ठेवले आणि आतले सामानही. आता यातले चांगले काय व वाईट काय हा प्रश्न वेगळा आहे.
दास्तान ए हिंदुस्तान भाग १ ( सिटी ऑफ लेक , द वेनिस ऑफ इस्ट ,उदयपूर )
भारत दौरा करून आता ४ महिन्याहून जास्त काळ लोटला पण अजून दोन आठवडे केलेल्या मनोसोक्त भटकंतीच्या रम्य आठवणी मनात रुंजी घालत आहेत. प्रत्येक वेळी भारतात येणे हे मी सहसा एखाद्या चुलत, मावस भावांचे लग्न ठरले की ठरवतो. ह्यामुळे बहुसंख्य नातेवाईकांना एकाच वेळी भेटता येते. एरवी अश्या अनेक आप्त स्वकीयांच्या लग्नात येणे जमत नाही. मग फेसबुक वर त्यांच्या फोटोवर आपल्या प्रतिक्रिया देणे व आपण मुकलेले क्षण ह्या आभासी जगतातील आभासी दुनियेत पहाणे, उपभोगणे एवढेच माझ्या हाती उरते. दुसरा प्रमुख हेतू म्हणजे भारत दर्शन.
परदेशात पंचतारांकीत हॉटेलात माझ्या कामानिम्मित मला अनेक पर्यटन
मी भारतीय आहे हे कळल्यावर त्यांच्या भारत सहलीची रसभरीत गाथा ऐकवत. व मी
अजून भारतीय असून ताजमहाल पहिला नाही.ह्या बद्दल कुहुतल वजा कीव करत.
. वयाची २३ वर्षे भारतात होतो तेव्हा आमचे पर्यटन हे शाळेच्या सहली किंवा
नातेवाईकांची लग्ने किंवा महराष्ट्रातील जवळपासच्या राज्यापर्यंत मर्यादित
होते. त्यामुळे ठरवून समग्र भारत दर्शन करायचे मी ठरवले होते.. लग्नानंतर
मधुचंद्रासाठी आम्ही देवाची भूमी केरळात जाऊन आलो. तेथील रम्य समुद्र
किनारे ,निसर्ग ,हाउस बोट ,खाद्य संस्कृती ,आयुर्वेद व त्यांचा पर्यटनात
सुयोग्य वापर ह्यामुळे माझी पत्नी भारताच्या प्रेमात पडली. जर्मनीत
गेल्यावर आपल्या मुठभर नातेवाईकात ह्या सफरीचे रसभरीत वर्णन केले.म्हणून
ह्यावेळी तिची धाकटी बहिण सुद्धा आमच्यासोबत येणार होती.
. ह्या मोहिमचे पडघम मोहिमेच्या सहा महिन्यापूर्वी वाजायला सुरवत झाली. सरत शेवटी एखाद्या टूर चे पेकेज घेण्यापेक्षा आपण स्वतः ची खाजगी टूर आखायची व एखाद्या टूर कंपनीला ती व्यवस्थित आखायला द्यायची असे ठरले. ठाण्यातील मराठी टूर कंपनी क्रोस वल्ड ह्यांच्याशी अनेक सल्लामसलत झाल्यावर उदयपुर ,जोधपुर कनकपुर , मनवर केम्प ,जयपूर , अजमेर व पुष्कर , रणथंबोर , आग्रा व मग दिल्ली ते मुंबई असा भरगच्च कार्यक्रम आखला.मुंबई ते उदयपुर विमान प्रवास मग चारचाकी वाहनाने भटकंती करत दिल्ली व तेथून मुंबई विमानाने गाठायची असा बेत होता. सोबत आईबाबा सुद्धा होते. ह्या दोन आठवड्यांच्या भटकंतीत भारताच्या विराट व अर्वाचीन संस्कृतीचे दर्शन घडले. आम्ही सारेच इतिहासाचा भव्य कालखंडाचे ओझरते दर्शन पाहून मंत्रमुग्ध झालो. तोच अनुभव मोजक्या शब्दात सचित्र मांडायचे ठरवले आहे.
मुंबई ते उदयपुर हा विमान प्रवास किंगफिशर ने पार पडला. एम विटामिन
अभावी कर्मचारी वर्ग पार खंगला होता. पूर्वीची शान ,आब कुठेस दिसला नाही.
पण तरीही अपुरे संख्याबळ असूनदेखील किंगफिशर च्या पंचतारांकीत सेवेचा
डोलारा त्यांनी उभारला होता. छोट्या पण नीटनेटक्या विमानतळावर आमचे आगमन
झाले. बाहेर आमच्या नावाची पाटी घेऊन नरहर सिंग उभा होता. गाडीत बसल्यावर
प्रथम आम्ही आमच्या हॉटेलात जगदीश महल मध्ये पोहोचलो. २०० वर्ष जुनी ही
प्रशस्त हवेली आता हॉटेलात रुपांतरीत झाली होती. तिला पाहून मला विरासत
मधील अनिल कपूर च्या हवेलीची आठवण झाली
.
उदयपुर ची ओळख सिटी ऑफ लेक किंवा पूर्वेचे वेनिस अशी आहे.( वेनिस हे
तरंगते शहर आहे तर उद्यापुरात काही तलाव आहेत पण इंग्रजांच्या काळात
अतिशयोक्ती ने परिपूर्ण अशी उपमा ह्या शहराला चिकटली)
. उदयपुर शहराचे प्रमुख आकर्षण कुठल्याही टिपिकल राजस्थानी शहराप्रमाणे
तेथील राज्यकर्त्यांचे राजवाडे आहे.. आणि बहुतेक राजवाड्यांमध्ये राजा
त्याच्या परिवारासमवेत राहतो. मात्र राजवाड्यांचा त्यांच्या वास्तव्याचा
भाग वगळता उर्वरित भाग आपली राजेशाही थाट टिकवण्यासाठी
पर्यटकांसाठी गलेलठ्ठ तिकीट आकारून दर्शनास उपलब्ध करून दिला जातो.

उदयपुर चा सिटी पेलेस ची मुहूर्तपेढ १५५९ साली झाली. आणि सलग ३०० वर्ष
अवरीत बांधकामानंतर हा भव्य दिव्य महाल पूर्ण झाला. ह्या दरम्यान अनेक
महाराजांची संपूर्ण हयात ह्या राजवाड्याच्या निर्मितीस गेली.
उदयपूरच्या अवतीभवती अरवली पर्वताच्या रांगा हिरवळीने समृद्ध झालेल्या
दिसल्या. राजस्थान म्हणजे वाळवंट अशी आपली समजूत भूगोलाचे पुस्तक आणि
बॉलीवूड मूळे निर्माण झाली आहे. मात्र राजस्थानचा काही निवडक टप्पा वगळता (
जैसरमेर ) आम्ही हिवाळ्यात गेल्यामुळे मला सर्वत्र वनराई दिसली.
उदयपुरच्या इतिहासातील प्रमुख टप्पे म्हणजे महाराणा राणाप्रताप ची हळदी
घाटची लढाई आणि मग मोगलांचा अरवली रांगावर पर्यायाने संपूर्ण मेवाडवर
कब्जा. झाला. आजही शहराच्या मध्यवर्ती चौकात चेतक चा भव्य पुतळा
दिसतो.१७व्य शतकात राऊ आपल्या मराठा फौजेसह येथे दाखल झाला. आणि ह्या
शहराच्या इतिहासातील सर्वात जबर खंडणी वसूल केली. आज आंजा वर हीच बाब
विशेतः अधोरेखित केलेली आहेत. म्हणजे मराठे म्हणजे खंडणी बहाद्दर आणि मुघल
म्हणजे जणू ......
सिटी पेलेस मध्ये जातांना अनेक सरकारी अधिकृत व खाजगी गाईड आपल्यामागे
लागतात.पण कटू अनुभव असा येतो कि हि लोक दीड तासात ह्या भव्य दिव्या
राजवाडा मनात येईन तसे वर्णन करून तुमच्या शंका ,कुशंका असल्यागत
दुर्लक्षित करून तुमची बोळवण करतात. त्यांचे प्रमुख लक्ष्य पर्यटकाला येथील
प्रसिद्ध चित्रकलेचे पेंटिंग आणि पश्मीना शाली विकण्यात असते. म्हणजे हे
दुकानात पर्यटकांचे सावज घेऊन जातात. व त्याबद्ल्यास ह्यांना बिदागी म्हणजे
ह्यांच्या धंद्यांच्या भाषेत प्रत्येक दुकानात ह्यांचा खाचा असतो.( आम्ही
हॉटेल व पर्यटन शेत्रातले असल्याने ह्यातील सर्व खाचखळगे आम्हाला माहित
होते. म्हणून आम्ही चोरावर मोर व्हायचे ठरवले..म्हणजे एका गाईड समोर आम्ही
फार मोठी आसामी असल्याचा डौल उभा केला. व परदेशातून भारतात पर्यटनासाठी आलो
आहोत. माझा जर्मनीत मोठा व्यवसाय असून मी भारतात नेहमीच येत असतो. आज
माझ्या पत्नी व परिवारा समवेत भारत दर्शन करायला आलो आहोत. तस्मात आम्हाला
भरपूर खरेदी कपडे ,सोने ,चांदी करायची आहे. हे सर्व पाहून त्यांच्या
तोंडाला पाणी सुटले. आज किमान १५ हजाराचा खाचा कुठेही गेला नाही अशी त्याला
खात्री पटली.( उदयपुर सोनारांसाठी प्रसिद्ध आहे. )त्याने जीव तोडून
आम्हाला राजवाड्याचे सुरेख वर्णन करायला सुरवात केली.
हे अंगण त्या पेलेस चा मध्यवर्ती भाग.तो राजवाड्याच्या तिसरया मजल्यावर
आहे. व तेथे जाण्यास जुन्या धाटणीचे गोलाकार अरुंद जिने आहेत.सदर राजवाडा
हा अरवलीच्या पर्वतरांगेवर बांधला असल्याने हा मध्यवर्ती भाग म्हणजे
डोंगराचे पठार आहे. म्हणून येथे मोठे वृक्ष दिसून येतात.
ह्या महालातील सर्वात विहंगम दृश म्हणजे मोर चौक. येथील भिंतीवर ५०००
निळ्या, हिरव्या. सोनेरी,चंदेरी मोसेक चे छोट्या तुकड्यांनी मोरांची चित्रे
चौकाच्या भिंतीवर आढळून येतात.
हा वानगीदाखल नमुना ,अश्या चित्रांनी संपूर्ण चौकाच्या भिंती सजल्या आहेत.
भान हरपून आम्ही दुष्टीसुख अनुभवत होतो. सदर मोसेक चे छोटे तुकडे इटली व
जगभरातून मागवले केले होते.
राजवाड्याच्या सज्जातून टिपलेले उदयपुर

पिकॉक कोर्ट यार्ड अर्थात मोर चौक
महालातील
आतील दालने त्यात सोन्याने मढवलेली अनेक कलाकुसरीचे सामान पाहता १५व्य
शतकात ऐश्वर्याच्या बाबतीत युरोप आगदिच पानीकम होता ह्याची नकळत कबुली
दोन्ही बहिणींनी दिली. युरोपातील कोणत्याही महालाला ह्या महालाची नखाची
सुद्धा सर नाही. ह्यावर दुमत नव्हते.


ह्या राजवाड्यातील जगप्रसिद्ध आदिदितीय व भारतीय चित्रकलेचा अविष्कार
असलेले चित्र पाहिल्याशिवाय हि यात्रा सफल होऊ शकत नाही. १५व्य शतकात
थ्रीडी इफेक्ट्स असणारे हे चित्र जगभरात प्रदर्शनात मांडले जाते.
नुकतेच ते आमच्या शहरात म्युनिक मध्ये आले होते. हे चित्र जवळून
पाहिल्यावर प्रथमदर्शनी असे दिसते कि राजवाड्यातील चौकाचे हे चित्र आहे. .
पण जरासे मागे जाऊन पहिले तर असे अधून येते कि हे चित्र पहिल्या मजल्यावरून
काढले आहे. सदर फोटो आम्ही लांबून घेतला असल्याने हे चित्र पहिल्या
मजल्यावरून चौकाचे काढलेले दिसते. मात्र जवळ गेल्यावर हेच चित्र भर चौकात
उभे राहून काढल्याचे दिसते.
अर्थात हा दृष्टीभ्रमाचे वर्णन करायला माझी लेखणी तोकडी आहे. ते अनुभवण्यात खरा आनंद आहे.
http://www.misalpav.com/node/21196
पिचोलीया लेक, जग मंदिर पेलेस, जगदीश टेंपल , सहेली कि बाडी
तलावांचे शहर म्हणून विख्यात असलेले उदयपुर मधील सर्वात प्रसिद्ध तलाव
म्हणजे लेक पिचोलीया. मानवनिर्मित हा तलाव सुरक्षेच्या दृष्टीकोनातून
महाराणा उदय सिंह द्विदीय ह्यांनी बांधला होता. तलावाच्या दुतर्फा टेकड्या,
मंदिर, हवेल्या आणि आपला सिटी पेलेस आहे. तलावाची खोली जास्त नसून त्यातील
दोन बेटांवर त्यावरील असलेल्या दोन मोठ्या महालांचे मोठ्या हॉटेलात
रुपांतर झाले आहे .
१) जगनिवास म्हणजेच लेक पेलेस २) जग मंदिर
लेक पेलेस-
१७व्या शतकात महाराणा जगत सिंह द्वितीय हे आपल्या राण्या, मैत्रिणी अगर
अंगवस्त्रे ( ह्याबाबत नक्की माहित नाही.) अश्या लवाजमा घेउन जग मंदिर
च्या महालात म्हणजे त्या बेटावर विहार करत असत. त्यांच्या वडलांना हे कळले
आणि तेथे जायची वाट बंद झाल्याने कालांतराने त्यांनी ह्याच तलावातील
दुसर्या बेटावर आग्र्याच्या तत्कालीन शुभ्र संगमरवरी बांधकाम शैलीवर आधारित
एक अवर्णीय महाल बांधला. जगनिवास महाल म्हणून ख्याती पावलेला हा महाल
कालांतराने लेक पेलेस म्हणून ओळखला जाऊ लागला. ८० च्या दशकात ऑक्टोपसी
ह्या बॉंड पटाचे बहुतांशी चित्रीकरण येथे झाले होते. प्रोतिमा बेदी
ह्यांच्या आत्मचरित्रात ह्या सिनेमाच्या निमित्ताने परवीन बाबी पासून
दुरावलेला कबीर आणि त्या कसे परत एकदा जवळ आल्या. आणि ह्या महालातील
चित्रीकरणाच्या सुखद आठवणी शब्दबध्द केल्या आहेत.
१९५९ साली ह्या महालाचे रिसोर्ट मध्ये रुपांतर करण्यात आले. आणि ७० च्या
दशकात ताज ग्रुप ने येथे जगातील खर्या अर्थाने राजेशाही हॉटेल बांधले. ताज
मध्ये कॉलेज जीवनात उमेदवारी करतांना त्यांच्या बुक लेट मध्ये ह्या
रिसोर्ट चा समग्र सचित्र इतिहास पाहून आयुष्यात एकदा तरी ह्या वास्तूत
जायला मिळावे अशी मनशा होती. सहा महिन्यापूर्वी बुकिंग केल्यामुळे तेथील
उपहारगृहात दोघांसाठी एक संध्याकाळ आरक्षित करण्यात आली. दोघांचा कवर चार्ज
फक्त २७०० रुपये. आणि रक्त वारुणी आणि इतर पेय, बक्षिशी असे सर्व मिळून हा
आकडा ५ हजारापर्यंत गेला. त्या वास्तूच्या सानिध्यात चंद्रप्रकाशात सैचल
स्नान करत अवीट गोडीचे जेवण आणि त्यास साजेसे आदरातिथ्य ह्या गोष्टी जमा
धरल्यास ५००० हजाराचे ते कागद आयुष्यभर गाठीशी राहीन अश्या अनुभावापुढे
अगदीच तोकडे वाटतात. महालाचे दर्शन घेण्याचा योग आमच्या नशिबी नव्हता.
आयुष्यात कधी बक्कल पैका गाठीशी आला तर ७० खोल्यांच्या ह्या महालात जो अनेक
कोर्ट यार्ड, तलावा चे मनोरम दृश्य दाखवण्यार्या गच्च्या व राजेशाही
दालनांनी समृध्द आहे तेथे काही दिवस श्रमपरीहारासाठी उतरणे मी पसंद करेन.
लेक पेलेस
दुसर्या बेटावर १५५१ साली बांधायला घेतलेल्या जगजग मंदिर महालाचे
काम १६५२ मध्ये पूर्णत्वास गेले.सध्या तेथे सुद्धा लीला ग्रुप चे मोठे
रिसोर्ट आहे. पण मुळात ह्या महालाची रचना राज परिवाराच्या उन्हाळ्यातील
सुट्या आणि मोठ्या मेजवान्या आयोजित करण्यासाठी बांधल्याने मूळ संकल्पनेला
तडा न जाऊ देता लीला रिसोर्ट येथे भव्य जलसे आणि लग्नाचे राजेशाही सोहळे
पार पडते. एक महिन्यापूर्वी शकिरा येथे एक खाजगी जलसा करून गेली. तर रविना
टंडन ला ती पूर्वाश्रमी राजपूत राजकन्या असल्याचे स्वप्न पडले म्हणून
थडानी ह्या सिनेवितरक असलेल्या तिच्या नवर्याच्या खिशाला भुर्दंड बसला नि
त्यांच्या लग्नाचे सूप येथे वाजले.
जगजग मंदिर पेलेस
..दुसर्या दिवशी न्याहारी साठी अस्सल राजस्थानी धाब्यावर गेलो. तेथे मिसळी ला महाराष्ट्रात जे स्थान आहे तेच स्थान राजस्थान असलेल्या शेव कचोरी चटणी सोबत खाऊन तृप्त झालो. राजस्थानी भटाचा चहा आणि त्याची चव जरी नवी नसली , तरी शर्करेचा सढळ हस्ते वापर हि नवीन गोष्ट त्या चवीत अंतर्भूत झाली. ह्या बहिणींसाठी महत्प्रयासाने सी सी डी शोधून काढले. पण तेथील अप्रशिक्षित कर्मचार्यांमुळे प्रचंड विलंबा नंतर अत्यंत बेचव कॉफी पियुन त्या बहिणींचा मूड गेला. मात्र तेथून सिटी पेलेस जवळील प्राचीन जगदीश मंदिर व तेथील अर्वाचीन शिल्पकला पाहून त्या तृप्त झाल्या. महाराणा जगत सिंह ह्यांनी सोळाव्या शतकात तीन मजली हे लक्ष्मी नारायणाचे मंदिर बांधले. ह्याचे मुळनाव जगन्नाथ पुरी होते पण आता जगदीश जी चे मंदिर असे म्हणतात.


मंदिराच्या सुरवातीला दोन अजस्त्र गजराजाचे मुर्तीखांब आपले लक्ष वेधून
घेतात. थोडे पिरेमिड सारखे दिसणारे हे मंदिर आपल्या वास्तृशास्त्रांच्या
नियमानुसार बांधले आहेत.पायर्या चढून वर गेल्यावर पहिले लक्ष विष्णूचे वाहन
असलेल्या गरुडाची ब्रास च्या अत्यंत देखण्या मूर्तीकडे गेले. अर्धा
मनुष्य व अर्धा गरुड असलेली हि मूर्ती आपला एक आब राखून होती. मंदिराची
रचना इंडो आर्यन पद्धतीच्या नुसार केली आहे. येथे संपूर्ण राजस्थान दौर्यात
मंदिर पाहत असतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आणि भावली की ह्या
मंदिरातील पुजारी विदेशी पर्यटक आले कि त्यांच्याशी इंग्रजीत संवाद साधून
त्यांना रसाळ वाणीत मंदिराविषयी माहिती देतात. त्यांच्या शंकांचे निरसन
करतात. अर्थात त्यांना भरपूर बिदागी देखील मिळते. विदेशी प्रवासी आपल्या
सारखे भक्तीभाव ठेवून मंदिर पाहत नाही. त्यांना उत्सुकता मंदिराची बांधणी
त्यामागील इतिहास व त्याजोगे आपल्या संस्कृतीची सखोल माहिती जाणून
घेण्याची जिज्ञासा असते. म्हणुनच कि काय मंदिराच्या भव्य मंडपात माझे
आईवडील व मी आरती चालू असतांना तल्लीन झालो होतो. तर ह्या बहिणी मात्र
मंदिराच्या गाभ्याची रचना न्याहाळत होत्या. त्यांच्या मनातील शंकांचे
तेथील पुजार्याने अत्यंत सुरेख निरसन केले.त्याने सागितले कि ह्या
मंदिराकडे तुम्ही निरखून पहिले तर असे वाटेल कि कोणी पद्मासन घालून
ध्यानाला बसले आहे.
त्यांच्या
म्हण्यानुसार कोणत्याही इंडो आर्यन धाटणीच्या शिल्पकलेत भारतीय संस्कृती व
त्यांची मुल्ये दिसून येतात. आणि त्यांच्या नक्षी कामात एक सुसूत्रता
आढळून येते. उदा वरील चित्रात पहा. सगळ्यात तळाशी राक्षस ,डिमोन आढळून
येतात कारण त्यांचे वास्तव्य पाताळात असते. दुसर्या लेवल मध्ये प्राणी
त्यातही अश्व आणि हत्ती आढळून येतात. कारण प्राण्यांशी आमच्या संस्कृतीची
नाळ जोडल्या गेली आहे. तिसर्या लेवल मध्ये प्राणी आणि मनुष्य एकत्र दाखवले
आहेत. तर चौथ्या लेवल वर गंधर्व ,अप्सरा ,यक्ष ,किन्नर ह्यांना स्थान दिले
असून देवांचे मनोरंजन हे त्यांचे कार्य असते. सरत शेवटी मंदिराच्या कळसावर
देवाची प्रतिमा असते.
ह्या मंदिराच्या कळसाच्या येथे ब्रम्हा ,विष्णू , महेश ह्यां त्रीमुर्तींची शिल्पे आहेत.
भारावलेल्या अवस्थेत आम्ही जवळील एका स्थानिक उपहारगृहात जाऊन जेवण केले. येथील छोले भटुरे राजस्थानी मसाल्यात एका वेगळ्याच चवीचे बनले होते. पण ह्या बहिणीं भारतीय जेवणाचा हेंग ओवर वर उतारा म्हणून युस पिझा ह्या उपहारगृहात गेल्या व संतुष्ट जाहल्या. बेंगळूर येथे सुरु झालेल्या व भारतातील नंबर १ पिझ्झा अशी जाहिरात करणारी हि साखळी दक्षिण भारतासोबत आता उर्वरित भारतात सुद्धा प्रवेश करत आहे. डॉमिनोज ला येत्या काळात कडवी टक्कर मिळणार अशी खात्री पिझ्झाचा एक तुकडा तोंडात टाकल्या सरशी झाली.
आता आम्ही सहेली कि बाडी कडे कूच केले .
उदयपुर मधील प्रसिद्ध फतेहपुर लेक जवळ हि बाडी आहे. राणा ह्यांचा अर्थ
राजा , नृप ,भूपती हा आहे. म्हणून जसे आपण महाराजा म्हणतो तसे हे राजपूत
महाराणा म्हणतात.
तर अश्याच एका महाराणाच्या लग्नात राजकन्ये सोबत ४८ दास्या हुंडा म्हणून आल्या. त्या काळी दासी हि राणीची अर्धवेळ मैत्रीण समजली जायची. तर राणी आणि तिच्या दास्या ह्या त्या काळात त्यांच्यावर असलेल्या सामाजिक बंधनामुळे व राजेशाही संकेतानुसार सार्वजनिक उद्यानात फिरू शक्त नव्हत्या. म्हणून राजाने त्यांच्या मनोरंजन , आणि फिरण्यासाठी मोठ्या हौसेने हि सहेली कि बाडी बनवली.


एकेकाळी आपण किती प्रगत होतो. ह्याची जाणीव येथे मला झाली. त्या बहिणी तर काय बरे लॉजिक असेल ह्या मागे ह्यावर मंथन करत होत्या. नंतर मोर्चा फतेहसागर लेक कडे निघाला. प्रत्यक्ष लेक एवढा काही प्रेक्षणीय आम्हाला वाटले नाही. आणि उन्हामुळे अंगाची लाही लाही झाल्यामुळे आम्ही गाडीतूनच त्याचे दर्शन घेतले. मुळात गेल्या दोन दिवसात प्रेक्षणीय ह्या शब्दाचा अर्थ व तो वापरण्यासाठी आमचे निकष कमालीचे बदलले होते. प्रत्यक्षात हा लेक उदयपुर मधील सर्वात दर्शनिय असल्याचे आमच्या वाहन चालकाने सांगितले.
आम्ही आता अल्पोपहार करावा ह्या हेतूने मूळ शहरच्या बाजारात आलो. नि एका मिठाई च्या दुकानात शिरलो. येथे शेकड्याने मिठाई ची दुकाने होती. आम्ही चहा आणि मग गरम गरम गुलाब जाम च्या प्रत्येकी दोन वाट्या फस्त केल्या. ह्या तोडीचा गुलाबजाम मुंबईत फक्त सायनच्या गुरुकृपात मिळतो. आजही तोंडात टाकताच विरघळणारा आणि आमची रसना असीम आनंदाने तृप्त करणर्या त्या गुलाबजामच्या आठवणीने मन व्याकूळ होतो. बहुदा कातरवेळी तो खाल्ला म्हणून ओघाने मन व्याकूळ होणे आले.
आता संध्याकाळी प्रसिद्ध सन सेट पाहून दुसर्या दिवशी पुढचा थांबा म्हणजे रणक पूर येथील जैनांचे मंदिर पाहणे हा होता. हे मंदिर पाहून आमचाकडे वर्णन करायला शब्द नव्हते. ह्याहून सुंदर मंदिर आम्ही आमच्या आयुष्यात पहिले नव्हते. कोणतीही कंजुषी न करता हे सौंदर्य आम्ही चित्र बध्द केले.
दूर डोंगरावरून टिपलेला पिचोदिया तलाव आणि त्यातील दोन रिसोर्ट
http://www.misalpav.com/node/21265
आम्हाला ५ जणांना राजस्थान टूर करायची होती. वाजवी दरात जास्तीजास्त पर्यटन करायचा मनसुबा होता. म्हणून आम्ही सहा महिन्या अगोदर ह्या प्रवासाची आखणी केली होती.
विमान प्रवास स्वस्त हवा असेल तर आगाऊ बुकिंग करणे गरजेचे होते. आमचे भारतातील वास्तव्य दोन आठवड्यांचे होते. तेव्हा एखाद्या प्रख्यात प्रवासी कंपन्याकडून आधीच आयोजित केलेली टूर करणे आम्हाला जमणे शक्य नव्हते. तेव्हा आमच्या साठी सर्वोत्तम पर्याय स्वतः साठी खाजगी टूर स्वतः आयोजित करणे हा होता.
त्या नंतर आंजा वर विपुल संशोधन करून अनेक टूर कंपन्यांतून काही कंपन्या शोर्ट लिस्ट केल्या. ज्यांच्या कडे ४ दिवस ते १ आठवडा ते दोन आठवडे अश्या कालखंडात तुम्हाला तुमच्या सोयीने टूर आखून देतात.
ह्या टूर चा फोर्मेट हा त्यांच्या साईट वर आधीच दिला असतो. म्हणजे उदा आमची टूर १० दिवसांची होती. ह्यात कोणत्या शहरात कोणती स्थळे पाहणार व कोणत्या हॉटेलात उतरणार ह्याची पूर्व कल्पना असते.
आमची टूर मुंबई ते दिल्ली हा विमान प्रवास त्यांच्या नंतर इनोवा गाडीतून त्यांचा ड्रायवर आम्हाला हिंडवून शेवटचा टप्पा उदयपुर येथे सोडून तेथून विमानाने मुंबई गाठायचा होता.
आम्हाला मुंबईत ते दिल्ली आणि मग उदयपूर ते मुंबई असा विमानप्रवास होता. पण आजांवर शोधल्यावर उदयपुर ते मुंबई प्रवास महाग पडत होता, म्हणून आम्ही टूर कंपनीला विनंती करून आमची टूर उदयपुर येथे सुरु करून शेवटी दिल्ली ते मुंबई असा प्रवास केला. म्हणजे उलट प्रवास केला.
एकूण टूर चे बजेट हे तुम्ही कोणत्या सिझन ला जाणार ह्यावर अवलंबून असते. आम्ही हिवाळा हा ऑफ सिझन निवडल्याने आणि ६ महिने आधी बुकिंग केल्याने आम्हाला हॉटेलचे रेट व पर्यायाने टूर अत्यंत स्वस्तात पडली.
ह्या टूर चे वैशिष्ट्य म्हणजे गाडी आणि वाहनचालक २४ तास आमच्या सोबत होता. त्यांची खायची आणि प्यायची सोय केल्याने तो आम्हाला सहलीचा कार्यक्रम फिरवून आणायचा पण शहरात जर बाजारहाट किंवा उदरभरण करायचे असेल तरी फिरवून आणायचा. दिवस भर एखाद्या शहरात काय काय पहायचे हे आधीच ठरले होते. त्यामुळे ते कधी आणि कितीवेळ पहायचे हे आम्ही ठरवू शकत होतो.
नियोजित सहलींमध्ये टूर लीडर च्या मर्जीवर सगळे अवलंबून असते.
हॉटेलात सकाळची न्याहारी मोफत होती. मात्र नंतरचे जेवण स्वखर्चाने होते. ह्यामुळे आम्हाला स्थानिक शहरातील प्रसिद्ध खाद्य पदार्थ त्या ठिकाणच्या प्रसिद्ध ठिकाणी खाण्याचे भाग्य लाभले.
मात्र दोन ´शहरामधील अंतर किमान ५ तास ते १० तास होते. तेव्हा दिवसाआड एवढा प्रवास घडायचा. पण राजस्थान चे महामार्ग सुस्थित असल्याने तो बर्यापिकी घडला. येथे १० तासाच्या प्रवासात खुपदा मुश्किलीने काही चांगली हॉटेल दिसायची. आम्हाला मग कळले कि आमच्या वाहन चालकाचा एखाद्या विशिष्ट हॉटेलात खाचा असल्याने तो आम्हाला ते स्थान सुचवायचा. मात्र एकदा सुमार चवीचे महागडे अन्न खाऊन आम्ही धडा शिकलो. व आम्हाला हवे तेच हॉटेल आम्ही निवडू लागलो.
पण प्रवासात कोरडा खाऊ किंवा टिकणाऱ्या पुरण पोळ्या किंवा चिवडा असे बरोबर जरूर न्यावे. असा सल्ला देऊ इच्छितो.
कोणतीही प्रसिद्ध टूर कंपनी अश्या प्रकारच्या खाजगी टूर आयोजित करते.
तेव्हा आपल्याला हवी ती आपण निवडायची त्यात हवे ते बदल करून घ्यायचे.
सरत शेवटी आम्ही ठाण्यातील घाणेकर ह्यांच्या टूर कंपनीची जी टूर निवडली ती हि
http://www.crossworldholidays.com/web/indian_package_tours_royal_rajasth...
टूरटूर करणारे आम्ही ५ जण सिटी पेलेस मध्ये
शहाजहान हा बादशहा होण्यापूर्वी राजकुमार खुर्रम म्हणून ओळखल्या जायचा. त्याने युद्धात राणा करण सिंह ह्यांच्या वडिलांचा पराभव केला होता. ह्यामुळे करण सिंह मुघल दरबारी रुजू झाले. तेव्हा खुर्रम च्या आदराप्रीत्यार्थ त्यांनी जग मंदिर पेलेस बांधला. मुघल परंपरेनुसार बादशहा जहांगीर विरुध्ध खुर्रम ह्याने बगावत केली. आणि करण सिंह ह्याने राजकुमार खुर्रम ह्याची माता रजपूत असल्याने त्याची बाजू घेतली व राजकुमार आपली पत्नी मुमताज आणि दोन लहान अपत्ये दारा., औरंगजेब ह्यांच्यासह ह्या महालात काहीकाळ राहिले पुढे खुर्रम बादशहा झाल्यावर म्हणजे शहेजाहान झाल्यावर त्याने उपकाराची परतफेड म्हणून मेवाड राज्याची पुनर्रचना करत उदयपुर चे गतवैभव परत मिळवले.
सदर माहिती वाचून डोक्यात एकच विचार आला
थोडक्यात राणाप्रतम ने जे युध्धात गमावले ते अश्य्यारीतीने कमावले.
दारा आणि औरंगजेब दोन भिन्न प्रवृत्तीचे भाऊ लहानपणी ह्या महालात एकत्र राहिले. पुढे औरंगजेब ने दारा मारून त्यांच्या मुलीला आपली सून करून घेतले. आणि संगीत आणि कलेचा तिटकारा असलेल्या औरंग जेब जेव्हा सत्तेवर आला तेव्हा जीझाया कर ह्या उदयपुर वर लादून त्याने लहानपणी झालेल्या उपकारांची परतफेड केली.
मात्र आंजा वर ठळक रीत्या म्हटले आहे की मराठ्यांनी मेवाड राज्यात जबर खंडणी सत्र आरंभले. आणि इंग्रजांनी येऊन त्यांची सुटका केली. व इंग्रज कालखंडात मेवाड राज्याची प्रगती झाली.
माझ्या मनात नेहमीच हा प्रश्न येतो. कि मुघल व इंग्रजांना राजपुताण्यात आपले पाय रोवता आले. मराठ्यांची प्रतिमा मात्र लुटारू म्हणूनच येथे का राहिली.?
पानिपत च्या वेळी उभा उत्तर हिंदुस्थान मराठ्यांची कशी जिरते म्हणून तटस्थ गंमत का पहात राहिला.? कूटनीतीत आपण कोठे कमी पडलो.? शत्रूचा प्रदेश जिंकल्यावर त्यांची मने का बरे जिंकू शकलो नाही.
मात्र सर्व भारतात शूर वीर म्हणून ख्याती मिळवलेल्या राजपुतांना मराठ्यांकडून पेशवाई च्या काळात धूळ चारल्या गेली. हा इतिहास आपल्या महाराष्ट्रात का सांगितला जात नाही. राऊ म्हटले कि मस्तानी आठवते आणि आज आज पुण्यात मस्तानी मिळते. मात्र राऊ चा पुतळा किंवा स्मारक दिसत नाही. निदान ह्या राज्यात मराठ्यांच्या नावाने बोट मोडली तरी त्या निमित्ताने पेशव्यांनी दाखवलेले शौर्य व कर्तुत्व तरी कोणी नाकारू शकत नाहीत.
उदयपुरी मनोरम सूर्यास्त आणि भव्य रेणकपूर जैन मंदीर )
संध्याकाळी प्रसिद्ध सनसेट पोइंत कडे आम्ही निघालो. प्रसिद्ध दुध तलाई लेक जवळ हे ठिकाण आहे. तेथून रोपवे ने डोंगरावर पोहोचलो. तेथे करणी मातेचे मंदिर आहे. मंदिरात श्वेत मूषक पिंजर्यात बंदिस्त होते. आम्ही मात्र डोळे विस्फारून सूर्यास्त , आणि आकाशातील रंगाची उधळण व त्यात न्हाहून निघालेले उदयपुर पाहत होतो. तेथून ,सिटी पेलेस ..जगमंदिर सारेच गोजिरवाणे दिसत होते.

सिटी पेलेस
चंद्रोदय व चंद्रप्रकाशात न्हाऊन निघालेले उदयपुर


सकाळी आम्ही उदय पूर सोडले आणि गाडी रानकपूरच्या दिशेने जाऊ निघाली.रानकपूर हे अरवलीच्या पर्वत रांगामध्ये वसले असून जैनच्या पा
च पवित्र तीर्थशेत्रांपैकी एक आहे: येथील प्रमुख आकर्षण रानकपूर जैन मंदिर
आहे: राणा कुंभाच्या कारकिर्दीत त्यांच्या मदतीने त्याकाळातील सर्वात
श्रीमंत भारतीय जो एक जैन व्यापारी होता सेठ धरणा साह ह्याने पंधराव्या
शतकात जैनांचे सर्वात मोठे जगप्रसिध्ध मंदिर उभारण्यात आले:म्हणूनच राणा कुंभाच्या आदराप्रीत्यार्थ ह्या जागेचे नाव रानकपुर पडले. व आजही त्यांच्या पवित्र दिवशी ह्या धारणा साह च्या परिवारातील वंशज ह्या मंदिरात येऊन पूजा करतात. :
त्या काळात मंदिर निर्मितीला पन्नास वर्ष लागली: व खर्च त्या काळात एक
कोटी रुपये आला:मंदिराच्या आजूबाजूला जंगल असून सर्वत्र घनदाट वनराई आहे.
चार मुखी मंदिर भगवान ऋषभदेवाला समर्पित असून मंदिर्याच्या मुख्य मंडपात
जैनांचे पहिले तीर्थकर आदिनाथ ह्यांच्या संगमरावराच्या चार भव्य अश्य७२
इंची मुर्त्या मंदिराच्या चारही बाजूंना आहेत: म्हणूनच ह्या मंदिराला
चतुर्मुख जैन मंदिर व रिषभदेव जैन मंदिर म्हणतात: मंदिर्याच्या चार भव्य
प्रवेश दारांपैकी पुढील दारातून आम्ही आता प्रवेश केला: ह्या मंदिराचे
वैशिष्ट्य म्हणजे येथे १४४४ संगमरवरी नक्षीदार खांब आहेत.जेथे पाहावे
थेथे खांबच खांब दिसत होते.आणि त्यांची रचन अश्या खुबीने केली आहे कि
कुठंही मंदिराचे मुख्य प्रार्थना स्थळ दिसते. आणि प्रत्येक खांबावर वेगळे
नक्षीकाम केले आहे. मंदिरात २४ मोठ्या खोल्या आहेत.मंदिराच्या मंडपात
जैनच्या २४ तीर्थकरांची शिल्पे कोरली आहेत. मंदिरात चार मोठे प्रार्थनेसाठी
मंडप आणि चार पूजाअर्चा करण्याचे मंडप आहेत. मंदिराच्या भव्य आवारात
नेमीनाथ आणि पारसनाथ ,सूर्य , आणि आंबा मातेचे अशी अन्य मंदिरे सुद्धा
आहेत. ज्यावरील नक्षीकाम खाजुरावो च्या शैलीत केले आहे. आणि ८ व्या शतकात
बांधलेल्या सूर्य मंदिरात योद्धे आणि घोड्याची शिल्पे साकारली आहेत.


हे चित्र पाहुन मान काही केल्या खाली करवत नव्हती .

येथील मुख्य पुजार्याने अजून एक महत्वाची माहिती दिली कि मुघल आक्रमणात
मंदिरातील प्रमुख मुर्त्या तळघरात लपवून ठेवल्या. पुढे अनेक वर्षानंतर
ह्यातील काही मुर्त्या शोधून वर परत प्रस्थपित करण्यात आल्या.
मात्र अनेक मूर्त्यांचा अजून शोध लागला नाही आहे. ह्या तळघरात मुख्य
पुजारी ध्यान करतात. त्यांनी पुढे मंदिराच्या उत्तरेला स्थित रायन झाड
दाखवले. अत्यंत प्राचीन . ह्या झाडाच्या बुंध्याशी नैसर्गिक अवस्थेत
गणेशाचे शिल्प आहे. ते पाहतच माझे हात आपसुकच जोडल्या गेले. ह्या शिवाय
संगमरवरी तुकड्यावर ऋषभ देवाचे पायाची चिन्हे दिसून येतात. ह्या दोन मजली
मंदिरात अनेक तळघरे आहेत. ती त्याकाळातील भावी परकीय आक्रमणांचा विचार करून
हि तळघरे बांधण्यात आली. 
गणपती बाप्पा मोरया .( नैसर्गिक स्वरुपात प्रकटलेला गणराया )


रणकपुरात आम्ही रमलो होतो. पण आम्हाला मनावर केम्पात जायचे होते. हा केंम्प
भर वाळवंटात उभारला होता. आणि एक राजेशाही अनुभव घेण्य आम्ही आतुर झालो
होतो. येथे जवळच रणकपूर चे अभयारण्य होते. पण लवकरच भारतातील प्रसिद्ध
रंथांभोर ह्या वाघांच्या गुहेत आम्ही जंगल सफारी करणार होतो. म्हणून तो मोह
टाळून मानवर केंपाकडे मार्गस्थ झालो.
http://www.misalpav.com/node/21360
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.