https://www.facebook.com/KolhapuriJagatBhari
http://www.mykolhapur.net/index.php/en/shop/jilhyatil-teerthkshetre/27-2017-05-16-11-56-57.html
साडेतिन शक्तीपीठांपैकी संपुर्ण शक्तीपीठ असलेल्या अंबाबाईचा कोल्हापुर जिल्हा!
ज्या मातीत घडुन गेलेल्या इतिहासाच्या पाउलखुणा आजही पहायला मिळतात तो कोल्हापुर जिल्हा!
शाहु महाराजांचा कोल्हापुर जिल्हा! छत्रपती शाहु महाराजांच्या काळात (1874- 1922) या जिल्हयाचा मोठया प्रमाणात कायापालट झाला.
कोल्हापुर त्याच्या रांगडेपणामुळे, खवय्येगिरीने, कुस्तीमुळे, पेहेरावावरून, परंपरांमुळे, ऐतिहासिक वास्तुंमुळे प्रसिध्द आहे.
आपुलकीच्या भाषेमुळे, प्रेमळ माणसांमुळे सुध्दा कोल्हापुर ओळखले जाते.

एका आख्यायिकेनुसार कोल्हासुर नावाच्या राक्षसामुळे येथील लोक फार त्रस्त झाले होते, त्याच्या अराजकतेला कंटाळुन देवतांनी देवीला विनंती केली त्यामुळे देवी महालक्ष्मीने त्या कोल्हासुरा सोबत युध्द केले. हे युध्द नऊ दिवस चालले त्यानंतर अश्विन शुध्द पंचमीला देवी महालक्ष्मीने कोल्हासुराचा वध केला त्यावेळी त्याने देवीला विनंती केली की या नगरीचे नाव कोल्हापुर आणि करवीर अशी आहेत ती यानंतरही न बदलता अशीच राहु दयावी. देवीने त्याची विनंती मान्य केली आणि आजही हे शहर कोल्हापुर आणि करविर या नावाने ओळखले जाते.
हे शहर इतिहासात घडुन गेलेल्या अनेक घटनांचे साक्षीदार आहे.
पन्हाळगडाला वेढा देउन सिध्दी जोहरने याच ठिकाणी शिवाजीराजांना कोंडीत पकडले शिवा काशीद आणि बाजीप्रभु देशपांडे यांच्या बलिदानाला या शहराने पाहिले आहे मोगलांच्या तावडीतुन सुटल्यानंतर संभाजी राजे आणि शिवाजी महाराजांची भेट येथेच झाली.
प्रकृती, इतिहास, संस्कृति आणि आध्यात्माची योग्य सांगड असलेला हा जिल्हा प्रत्येक वयोगटातल्या व्यक्ति ला काही ना काही तरी देतोच!

कोल्हापूर जिल्हा : महाराष्ट्राचा अगदी दक्षिणेकडील जिल्हा. क्षेत्रफळ ८,१३५ चौ. किमी. लोकसंख्या २०,४८,०४९ (१९७१). १५० ४३’ उ. ते १७० १०’ उ. आणि ७३० ४०’ पू. ते ७४० ४२’ पू. यांदरम्यानच्या या जिल्ह्याची दक्षिणोत्तर लांबी सु. १६० किमी. व पूर्व-पश्चिम रुंदी सरासरी सु. ६० किमी. आहे. याच्या पश्चिमेस रत्नागिरी, उत्तरेस सांगली आणि पूर्व व दक्षिण बाजूंस कर्नाटक राज्यातील बेळगाव हे जिल्हे आहेत. महाराष्ट्राच्या २·६% क्षेत्रफळ व ४·०६% लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्याचे बारा तालुके आहेत. शाहूवाडी, पन्हाळा, करवीर, हातकणंगले आणि शिरोळ हे तालुके उत्तरेस गगनबावडा, राधानगरी, भुदरगड व कागल मध्यभागी आणि आजरा, गडहिंग्लज व चंदगड हे तालुके दक्षिणेस आहेत. पूर्वीचे ⇨ कोल्हापूर संस्थान विलीन झाले, तेव्हा त्याचा रायबाग विभाग हल्लीच्या कर्नाटक राज्यात व बेळगाव जिल्ह्याचा चंदगड तालुका या जिल्ह्यात समाविष्ट करून आणि इतर किरकोळ प्रादेशिक बदल करून कोल्हापूर जिल्हा निर्माण करण्यात आला.
गगनबावडा तालुक्यातील तळकोकणात मोडणारी ३९ गावे सोडली, तर हा सर्व जिल्हा दख्खन पठाराच्या पश्चिम भागात सु. ३९० ते ५५० मी. उंचीवर आहे. जास्तीत जास्त उंची ९०० मी. पर्यंत आहे. सह्याद्रीची मुख्य रांग जिल्ह्याच्या पश्चिम भागात दक्षिणोत्तर गेलेली असून तिचा एक प्रमुख फाटा उत्तर भागात पूर्वेस गेलेला आहे. इतर फाटे लहान असून नैर्ऋत्य-ईशान्य गेलेले आहेत. जिल्ह्याचा पूर्वभाग त्या मानाने सखल व सपाट आहे. या जिल्ह्यातून कोकणात उतरण्याच्या अनेक वाटा आहेत त्यांपैकी आंबा, फोंडा व आंबोली हे घाट प्रमुख आहेत. जिल्ह्यात सर्वत्र बेसाल्ट हा अग्निजन्य खडक आढळतो. चंदगड, राधानगरी वगैरे काही भागांत मात्र कुरुंदाचा दगड मिळतो. शाहूवाडी, पन्हाळा व आजरा या तालुक्यांत बॉक्साइटाचे मोठे साठे आहेत. कर्नाटक व महाराष्ट्र येथे निघणाऱ्या ॲल्युमिनियमच्या कारखान्यांस त्यांचा पुरवठा होईल. भुदरगड तालुक्यात जिप्सम सापडते.
कृष्णा आणि तिच्या उपनद्या वारणा, पंचगंगा, दूधगंगा, हिरण्यकेशी व घटप्रभा या येथील प्रमुख नद्या होत. घटप्रभेला मिळणारी मलप्रभा व ताम्रपर्णी याही या जिल्ह्यातून वाहतात. कृष्णा ईशान्य सरहद्दीवरून ६० किमी. वाहते. वारणा उत्तर सरहद्दीवरून वाहते. कुंभी, कासारी, तुळशी व भोगावती या चार नद्या व सरस्वती ही पाचवी गुप्त नदी मिळून झालेली पंचगंगा नरसोबाच्या वाडीजवळ कृष्णेला मिळते. तिचे खोरे संपूर्णपणे या जिल्ह्यात आहे. बाकीच्या नद्यांच्या खोऱ्यांचा फक्त काही भागच या जिल्ह्यात आहे.
चतुःसीमाकोल्हापूर जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील शेवटचा जिल्हा आहे.
त्याच्या पश्चिम-नैर्ऋत्येला सिंधुदुर्ग जिल्हा,
पश्चिम-वायव्येला रत्नागिरी जिल्हा,
उत्तर-ईशान्येला सांगली जिल्हा
तर दक्षिणेला कर्नाटकमधील बेळगाव जिल्हा आहे.
जिल्ह्याच्या पश्चिमेला सह्याद्रीची रांग असून तेथील भाग डोंगराळ आहे.
भौगोलिकदृष्ट्या जिल्ह्याचे पश्चिम रांग , मध्य रांग आणि पूर्व रांग असे तीन विभाग मानले जातात.
मध्य आणि पूर्व भागातील माती अग्निजन्य खडकापासून बनली असल्याने काळ्या रंगाची आहे तर पश्चिम भागात घाटातील डोंगराळ भागातील जांभ्या खडकापासून बनलेली लाल माती आहे. या भागातील बहुतेक जमीन जंगलाने व्यापली आहे.
जिल्ह्यात पंचगंगा, वारणा, दुधगंगा, वेदगंगा, भोगावती,हिरण्यकेशी नदी आणि घटप्रभा या प्रमुख नद्या आहेत. या नद्या पश्चिम घाटात उगम पावून पूर्वेकडे वाहतात. पंचगंगा नदी कासारी, कुंभी, तुळशी आणि भोगावती या उपनद्यांपासून बनली आहे. कृष्णा नदी जिल्ह्याच्या पूर्व सीमेवरुन वाहते तर तिल्लारी नदी पश्चिम सीमेवरून वाहते.
कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील शेवटचा जिल्हा आहे.
त्याच्या पश्चिम-नैर्ऋत्येला सिंधुदुर्ग जिल्हा,
पश्चिम-वायव्येला रत्नागिरी जिल्हा,
उत्तर-ईशान्येला सांगली जिल्हा
तर दक्षिणेला कर्नाटकमधील बेळगाव जिल्हा आहे.
जिल्ह्याच्या पश्चिमेला सह्याद्रीची रांग असून तेथील भाग डोंगराळ आहे.
भौगोलिकदृष्ट्या जिल्ह्याचे पश्चिम रांग , मध्य रांग आणि पूर्व रांग असे तीन विभाग मानले जातात.
मध्य आणि पूर्व भागातील माती अग्निजन्य खडकापासून बनली असल्याने काळ्या रंगाची आहे तर पश्चिम भागात घाटातील डोंगराळ भागातील जांभ्या खडकापासून बनलेली लाल माती आहे. या भागातील बहुतेक जमीन जंगलाने व्यापली आहे.
जिल्ह्यात पंचगंगा, वारणा, दुधगंगा, वेदगंगा, भोगावती,हिरण्यकेशी नदी आणि घटप्रभा या प्रमुख नद्या आहेत. या नद्या पश्चिम घाटात उगम पावून पूर्वेकडे वाहतात. पंचगंगा नदी कासारी, कुंभी, तुळशी आणि भोगावती या उपनद्यांपासून बनली आहे. कृष्णा नदी जिल्ह्याच्या पूर्व सीमेवरुन वाहते तर तिल्लारी नदी पश्चिम सीमेवरून वाहते.
कोल्हापुर जिल्हयातील तालुके – Kolhapur District Taluka List
कोल्हापुर जिल्हयात एकुण 12 तालुके आहेत
- करवीर
- आजरा
- कागल
- गगनबावडा
- गडहिंग्लज
- चंदगड
- पन्हाळा
- भुदरगड
- राधानगरी
- शाहुवाडी
- शिरोळ
- हातकणंगले
कोल्हापूर जिल्ह्यातील दळणवळण सोयी
मुंबई-पुणे-बंगळूर-चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ कोल्हापूर जिल्ह्यातून जातो. अलीकडेच पुणे-कोल्हापूर हा महामार्ग चौपदरी करण्यात आल्यामुळे प्रवासाचा वेळ वाचून प्रवाशांना अनेक फायदे होत आहेत. कोल्हापूर व रत्नागिरीला जोडणारा आंबा घाट, सावंतवाडीला जोडणारा फोंडा घाट, तसेच सिंधुदूर्ग जिल्ह्याला जोडणारा अंबोली घाट हे पश्र्चिम महाराष्ट्र व कोकणाला जोडणारे प्रमुख घाट या जिल्ह्यात आहेत. या घाटांचा फक्त घाटमाथाच कोल्हापूर जिल्ह्यात आहे. कोल्हापूर -मिरज हा एकमेव लोहमार्ग जिल्ह्यातून जातो. पुणे, मुंबई ही राज्यातील महत्त्वाची शहरे लोहमार्गाद्वारे कोल्हापूरला जोडली गेली आहेत.
कोल्हापुर परिवहन विभागाचे संपर्क क्रमांक
१) डिव्हीजनल कंट्रोलर, कोल्हापुर- (0231) 2654474 Email_id -dcstklp@gmail.com
अ.क्र. हुद्दा टेलिफोन नंबर
1 डिव्हीज्ञनल ट्रॅफीक ऑफिसर कोल्हापुर विभाग ( 023१) 2650971
2 डिव्हीज्ञनल अकाउंट ऑफिसर कोल्हापुर विभाग ( 023१) 2650974
3 डिव्हीज्ञनल पर्सनल ऑफिसर कोल्हापुर विभाग ( 023१) 2650975
4 लेबर ऑफिसर , कोल्हापुर विभाग ( 023१) 2650972
1 डेपो मॅनेजर , कोल्हापुर बस स्थानक (023१) 2651447
2 डेपो मॅनेजर, संभाजी नगर बसस्थानक ( 023१) 2651431
3 डेपो मॅनेजर , इचलकरंजी ( 023१) 2432496
4 डेपो मॅनेजर ,गडहिंग्लज ( 02327) 222306
5 डेपो मॅनेजर, गारगोटी ( 02324 ) 220035
6 डेपो मॅनेजर, मलकापुर ( 02329) 224153
7 डेपो मॅनेजर, चंदगड ( 02320) 224132
8 डेपो मॅनेजर, कुरुंदवाड ( 02322 ) 244203
9 डेपो मॅनेजर, कागल ( 02325)244076
10 डेपो मॅनेजर, राधानागरी ( 02321) 234038
11 डेपो मॅनेजर, गगनबावडा- ( 02326) 222017
12 डेपो मॅनेजर, आजरा ( 02323) 246396 
कोल्हापूर शहर हे एक प्राचीन, धार्मिक व सांस्कृतिक केंद्र आहे. कोल्हापूरजवळील उत्खननात ब्रह्मगिरी येथे दुसऱ्या शतकापूर्वीचे अवशेष मिळाले आहेत. सु. दहाव्या-बाराव्या शतकांत कोल्हापूर शिलाहारांची राजधानी होती व कोल्हापूर जिल्ह्याचा प्रदेश जैनांचा बालेकिल्ला समजला जाई. आजचे महालक्ष्मीचे मंदिर आणि खिद्रापूर येथील जैन मंदिर हे त्यांचे अवशेष प्रसिद्ध आहेत. जैनांच्या ऱ्हासकालात हे हिंदू धर्माचे केंद्र व एक शक्तिपीठ बनले शंकराचार्यांचा कडाप्पाचा मठ हा जुन्यापैकी एक समजला जातो. संस्थानी राजवटीत कोल्हापूरला वेगळेच महत्त्व चढले हाेते, त्याचे आधुनिक स्वरूपही विलोभनीय आहे. देवालये , तलाव, राजवाडे, चित्रपटगृहे, शैक्षणिक व इतर संस्था, नाट्यगृहे, कुस्तीचा आखाडा, पुतळे इत्यादींमुळे ते आकर्षक झाले आहे. पन्हाळा किल्ला जवळच आहे तेथे काही जुन्या इमारती व नवीन तबक उद्यान प्रेक्षणीय आहे. तेथे प्रवाशांसाठी राहण्याची सोयही केलेली आहे. विशाळगड किल्ल्यावर महादेवाचे देऊळ आहे. रांगणा व गगनगड हे अवघड किल्ले धाडसी प्रवाशांस आव्हान देतात व चढून गेल्यावर अपूर्व समाधान देतात. पंचगंगेवरील प्रयाग, सांगवड्याचे नृसिंहमंदिर, वाडीचा नरसोबा व त्याजवळील रम्य नदीघाट, डोंगरावरील जोतिबाचे देवालय, कुंभोजचे जैन तीर्थक्षेत्र व तेथील बाहुबलीचा अतिभव्य पुतळा ही भाविकांस आवाहन करतात. कोकणात जाणाऱ्या घाटातील वनश्री निसर्गरम्य आहे.
ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुरी चपला, कुस्ती,मांसाहारी जेवण आणि कोल्हापुरी गूळ या गोष्टींसाठी कोल्हापूर प्रसिद्ध आहे. येथील मसालेदार पाककृतीही तिखटपणासाठी भारतभर प्रसिद्ध आहेत. कोल्हापूर हे महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचे माहेरघरच मानले जाते. या जिल्ह्यात पाण्याचा मुबलक पुरवठा असल्यामुळे १२ महिने विविध पिके घेतली जातात. कोल्हापुरातील मुख्य उद्योग शेती आणि शेतीशी संबंधित इतर व्यवसाय होत. कोल्हापूर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेली कोल्हापूर नगरी करवीर नगरी किंवा दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठे आहेत. त्यातील कोल्हापूरची श्रीमहालक्ष्मी हे पूर्णपीठ. अनेक कलांच्या विकासामुळे कोल्हापूरला ’कलापूर’ ही म्हटले जाते. राज्याच्या सर्वांगीण विकासाचे सर्वोत्तम उदाहरण घालून देणारे आदर्श शासनकर्ते आणि बहुजनांमध्ये प्रचंड आत्मविश्र्वास निर्माण करणारे द्रष्टे समाजसुधारक म्हणजे राजर्षी शाहू महाराज. कोल्हापूर संस्थानला राजर्षी शाहूंसारखा ‘रयतेचा राजा’ लाभला. समाजसुधारणा, शिक्षण, उद्योग, शेती, पाणी नियोजन, कला-क्रीडा आणि लोकशाही या सर्वच क्षेत्रांमध्ये अभूतपूर्व अशी पायाभरणी राजर्षी शाहू महाराजांनी करून ठेवली आहे. राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्कार्य केले.
कोल्हापूरचा प्राचीन ईतीहास
प्राचीन काल -
हा
काल श्री महालक्ष्मीच्या स्थापनेपूर्वीचा म्हणजे इसवीसनाच्या सुमारे ९व्या
शतकापर्यंतचा मानला जातो. या काळात नदीकाठावरील टेकडीवर ब्रह्मपुरी हे
वसाहतीचे केंद्र होते.
एका आख्यायिकेनुसार, प्राचीन काळी केशी राक्षसाचा मुलगा कोल्हासुर हा इथं राज्य करत होता. त्यानं सगळ्यांना त्रस्त करून सोडलं होतं म्हणून देवांच्या प्रार्थनेवरून महालक्ष्मीनं त्याच्याशी युद्ध केलं. हे युद्ध नऊ दिवस चाललं होतं.अश्विन शुद्ध पंचमीला महालक्ष्मीनं कोल्हासुराचा वध केला. कोल्हासुर महालक्ष्मीला शरण गेला आणि त्यानं तिच्याकडं, आपल्या नगराची कोल्हापूर व करवीर ही जी नावं आहेत ती तशीच पुढंही राहावीत, असा वर मागितला. त्यानुसार या नगरीला कोल्हापूर वा करवीर या नावानं ओळखलं जातं. कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी मंदिर महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती पीठांपैकी एक आहे.प्राचीन भारतातील विभिन्न पुराणांनी १०८ शक्तीपीठांची सूची तयार केली आहे कि जिथे शक्तीची देवी प्रकट झाली आहे.यामध्ये करवीर क्षेत्राची श्री महालक्ष्मी (जेथे आजचे वर्तमान कोल्हापूर शहर आहे) चे विशेष महत्त्व आहे.श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूरच्या सहा शक्तीपैकी एक आहे कि जिथे कोणतीही इच्छा पुरी होण्याबरोबर मुक्तीही मिळू शकते.यासाठी या स्थळाला काशीच्या तुलनेत अधिक महत्त्व प्राप्त होते. ही ती जागा आहे कि जिथे विष्णू ची पत्नी श्री महालक्ष्मी ला मोक्ष मिळण्यासाठी प्रार्थना करते.
श्री महालक्ष्मी आणि श्री विष्णू दोघेही नेहमी करवीर क्षेत्रामध्ये राहतात असे म्हंटले जाते आणि ते दोघेही हे करवीर निवास महाप्रकाश्याच्या वेळेस पण सोडणार नाहीत.करवीर क्षेत्र नेहमीच धन्य आहे असे मानले जाते कारण महालक्ष्मी आपल्या उजव्या हाताने आई जगदंबेच्या रुपात प्रकट होते यासाठी हे क्षेत्र सर्वच प्रकारच्या विनाशापासून सुरक्षित आहे.भगवान विष्णू स्वतः या क्षेत्राला वैकुंठ आणि क्षीरसागर या दोन स्थानांपेक्षाही अधिक पसंत करतात.कारण इथे त्यांची पत्नी लक्ष्मी चे निवासस्थान आहे.म्हणूनच या क्षेत्राच्या महानतेने अनेक संताना व कवींना आपल्याकडे आकर्षित केले आहे. या करवीर क्षेत्राने आपल्या भक्तांवर केलेले प्रेमानी दिलेले आशीर्वाद हे अतुलनीय आहे.असेही मानले जाते कि श्री दत्तात्रेय अजून पण या ठिकाणी दान करण्यासाठी दुपारच्या वेळेस येतात.
महालक्ष्मी मंदिर वास्तुकला रचनेवर जे नक्षी कामाचे संकेत आहेत त्यावरून असे सांगण्यात येईल कि हे मंदिर चालुक्य शासन काळातील म्हणजेच ६०० ते ७०० काळातील असावे.मंदिराची बाहेरची संरचना आणि स्तंभांची कलाकृती हा कलेचा एक अद्भूत नमुना आहे. देवीची मूर्ती रात्नापासून बनवली आहे ही जवळ जवळ ५००० ते ६००० वर्षापूर्वीची असावी असे मानले जाते.महालक्ष्मी ची मूर्ती ही ४० किलो वजनाची आहे.कोल्हापूर पर्यटनामध्ये महालक्ष्मी मंदिर हे प्रमुख स्थान आहे.यासाठीच देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक भेट देतात
कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर असून प्राचीन काळापासून दक्षिण काशी या नावाने ते प्रसिद्ध आहे.महालक्ष्मी मंदिर आणि जोतिबाचे मंदिर यामुळे हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणूनही ओळखले जाते. तसेच ऐतिहासिकदृष्ट्या कोल्हापूर महत्त्वाचे शहर असून प्राचीन काळापासून ते विविध राजघराण्याचे राजधानीचे ठिकाण होते.
हिंदू धर्मशास्त्रानुसार, प्राचीन काळी केशी राक्षसाचा मुलगा कोल्हासुर हा इथे राज्य करीत होता. याने राज्यात अनाचार व सर्वाना त्रस्त करून सोडले होते. म्हणून देवांच्या प्रार्थनेवरून महालक्ष्मीने त्याच्याशी युद्ध केले. हे युद्ध नऊ दिवस चालले होते . आणि अश्विन शुद्ध पंचमीस महालक्ष्मीने कोल्हासूर या राक्षसाचा वध केला होता. त्यावेळेस कोल्हासूर महालक्ष्मीला शरण गेला आणि त्याने तिच्याकडे आपल्या नगराची कोल्हापूर व करवीर ही नावे आहेत तशीच चालू ठेवावीत असा वर मागितला. त्याप्रमाणे या नगरीला कोल्हापूर वा करवीर या नावाने ओळखले जाते. ["श्री करवीर निवासिनी"]
इ.स.६३४ मध्ये या घराण्यातील राजा कर्णदेव याने महालक्ष्मी मंदिराच्या उभारणीस प्रारंभ केला. बहुतेक सर्व चालुक्य सम्राट कोल्हापूरास ‘दक्षिण काशी' व ‘महातीर्थ' संबोधितात. इ.स.७53 ते ८5० या कालखंडात दक्षिणेस राष्ट्रकूटाची सत्ता प्रस्थापित झाली. तेव्हा कोल्हापूरसुध्दा त्यांच्या सत्ताक्षेत्रात आले. पुढे इ.स. १२१० पर्यत शिलाहारांनी येथे राज्य चालविले. अशा प्रकारे ऐतिहासिक काळात शिलाहारांचे एक प्रमुख सत्ताकेंद्र या नात्याने कोल्हापूर शहराने मोलाची कामिगरी बजावली आहे. या घराण्यातील राजा गंदरादिव्य याच्या काळातील शिलालेखात या नगरीचा उल्लेख ‘महातीर्थ' असा आढळतो. त्याने महालक्ष्मी मंदिराचे बांधकाम पू्र्ण केले. या सम्राटाची बहिण चंद्रिकादेवी हिचा विवाह चालुक्य नरेश दुसरा विक्रमादित्य याच्याशी झाला व परिणामी कोल्हापूरचे वैभव वाढीस लागले.
ब्रह्यपुरी, उत्तरेश्वर, खोलखंडोबा, रंकाळा, पद्माळा, रावणेश्वर ही प्राचीन काळातील कोल्हापूरची नैसर्गिक केंद्रस्थाने होती. म्हणजे कोल्हापूर शहराचा हा परिसर प्राचीन काळातील ओळखला जातो. उपरिक्त सर्व केंद्रांचे स्वरूप छोटया खेड्यासारखे होते. इ.स.च्या ९ व्या शतकात महालक्ष्मी मंदिराची स्थापना झाली. त्यामुळे ही सर्व ग्रामस्थाने एका प्रबळ सांस्कृतिक व आर्थिक केंद्रबिंदूत बांधली गेली. शिलालेख, वाड्मयीन साधने वास्तुकला या प्रमुख निकषांच्या आधारे महालक्ष्मी देवालायाचा कालखंड हा ९ व्या शतकाच्या (राष्ट्रकूटांचे युग) मागे नेता येत नाही, असे पुरातत्वज्ञ मानतात.
कोल्हापूर या स्थल नामाचा भौगोलिक व सांस्कृतिक बंध तपासणे हेसुध्दा तेवढेच महत्वाचे आहे.दक्षिण काशी म्हणून करवीर पीठाचा उल्लेख वाड्मयात आढळतो. महालक्ष्मीने आपल्या शुभदायक करांनी या नगरीला प्रलयकाळाच्या संकटातून सुरक्षित उचलेले म्हणून त्यांस‘ करवीर ’असे सार्थपणे संबोधिले जाते. असे व्युत्पत्ती मेजर ग्रॅहॅम यांनी सूचित केलेली आहे, तर महालक्ष्मी देवीने आपल्या हाताने उचलून धरले ते ‘करवीरनगर’ असा उल्लेख ‘करवीर महात्म्या’ त आढलते. हरि पुराणातही ‘करवीर’ असेच नामभिधान आढळते.
मध्ययुग
श्री महालक्ष्मी देवालयाच्या
स्थापनेपासून रेसिडन्सीची स्थापना होईपर्यंतच्या म्हणजे इंग्रजी राजवटीच्या
सुरूवातीच्या कालापर्यंतच्या दुसऱ्या कालखंडाला शहराच्या इतिहासातील
मध्ययुग असे म्हटले जाते. या कालात श्री महालक्ष्मी देवालय हेच धार्मिक व
राजकीय असे मुख्य केंद्र होते.
अर्वाचीन काल -
कोल्हापूर
इ.स.१८४४-४८ साली रेसिडेंसी स्थापन झाल्यापासून शहराच्या आधुनिक युगाला
सुरूवात होते. हा काल स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंतचाच धरून स्वातंत्र्योत्तर
काल त्यापासून वेगळा धरण्यास हरकत नाही.
मानव हा आपल्या वसाहती
पाण्याची सोय असलेल्या ठिकाणी म्हणजेच नदी वा तलावांकाठी वसवीत आला आहे.
कोल्हापूर शहराची प्रथम वसाहत पंचगंगा (अर्वाचीन कालातील नाव) नदीच्या
काठावर एका टेकडीवर वसविली गेली. ही टेकडी म्हणजेच ब्रह्मपुरी होय. या
जागेची निवड पाण्याची सोय, शेती त्याचबरोबर शत्रूच्या चालीची टेहाळणी करता
यावी या तिन्ही उद्देशाने केलेेली होती. पुराच्या पाण्यापासून संरक्षण हा
महत्त्वाचा मुद्दा ही वसाहत टेकडीवर वसविताना त्यांनी विचारात घेतलेला
दिसतो. ब्रह्मपुरी हे नाव सुरूवातीपासून नव्हते. आर्यांच्या आगमनानंतर हे
नाव मिळाले असावे. या विभागात प्राचीनकाळी मुख्यत: ब्राह्मण वस्ती जास्त
असल्यामुळे याला ब्रह्मपुरी असे नाव पडले असावे. या नावाविषयी अशी एक
दंतकथा आहे की हे गाव कसे वसविले गेले याची माहिती नसल्यामुळे स्वत:
ब्रह्मदेवाने ते निर्माण केले अशी आख्यायिका प्रसृत होऊन त्याला ब्रह्मपुरी
हे नाव रूढ झालेे.
सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी ब्रह्मपुरी ही एक
राजधानी अगर मोठे शहर होते. इ.स.१०६ ते १३० च्या दरम्यान हे शहर नदीच्या
काठावर विटांच्या सुंदर घरांनी परिपूर्ण होते. त्या काळात दक्षिणेला सम्राट
गौतमीपुत्र शातकर्णी वा शातवाहनांचे राज्य होते. व्यापार व संस्कृतीच्या
दृष्टीने या शहराचा रोमन जगाशी चांगला संबंध होता. रोमहून आणलेल्या वस्तू,
नाणी, व ब्रंाझ धातूची भांडी इत्यादीचे अनुकरण मातीमध्ये केलेल्याचे आढळते.
हे शहर बहुधा श्री यज्ञ शातकर्णी याच्या कारकीर्दीत आगीने उध्वस्त झाले
असावे. बह्मपुरीच्या ऐश्वर्याला इसवीसनाच्या दुसऱ्या शतकानंतर ओहोटी लागली
आणि दुदैवाने ब्रम्हपुरीचे गेलेले ऐश्वर्य पुन्हा परत आलेच नाही. कारण
ब्रम्हपुरीच्या नाशानंतर काही कालांतराने श्री महालक्ष्मीचे देवालय स्थापन
झाले आणि कोल्हापूर शहराची वाढ श्री महालक्ष्मीचे देवालय केंद्र बनून
त्याच्या सभोवताली झाली.
कालानुक्रमे विचार करता ब्रम्हपुरीनंतर
उत्तरेश्वराच्या विचार केला जातो. ब्रम्हपुरी ही अधिक सोयीची जागा वसाहतीने
व्यापल्यानंतर कमी सोयीच्या ठिकाणी म्हणजे नदीपासून थोड्या अंतरावर
ब्रम्हपुरीपेक्षा कमी उंचीच्या टेकडीवर वसाहत झाली. हीच उत्तरेश्वराची
वसाहत. ब्रम्हपुरी प्रमाणेच इथेही उत्खननात जुने अवशेष सापडतात. परंतु
सध्या तिथे लोकवस्ती खूपच दाट झाल्यामुळे उत्खनन अशक्य झाले. उत्तरेश्वर या
नावासंबंधी काही माहिती उपलब्ध नाही. ज्या देवालयाला हल्ली उत्तरेश्वर
म्हणून दाखविले जाते ते शंकराचे देवालय आहे. त्यामधील शंकराची पिंड सुमारे
चार माणसांच्या कवेत मावेल इतकी मोठी आहे. हे देवालय केव्हा बांधले गेले य
संबंधी देखील काही माहिती उपलब्ध नाही. उत्तरेश्वराच्या दक्षिणेला श्री
महालक्ष्मीचे देवालय वगैरे भागात लोकवस्ती झाल्यानंतर त्यांनी उत्तरेकडील
देव यावरून उत्तरेश्वर हे नाव रूढ केले असावे.
ब्रम्हपुरी व उत्तरेश्वर
या प्रमाणेच खोल खंडोबा ही देखील एक टेकडीच आहे. ब्रम्हपुरीपेक्षाही तिची
उंची थोडी अधिक आहे. येथील वसाहत वरील दोन्ही वसाहतीनंतर झाली असावी कारण
येथे सोयी कमी असून हे ठिकाण नदीपासून दूर आहे. खोल खंडोबा हे एक जुने देऊळ
आहे. त्याचा आकार बाहेरून मशिदीसारखा दिसतो, कारण त्यावर मुसलमानी
पद्धतीचर घुमट आहे. शिवाय हा देव बसविलेली जागा जमिनीच्या पातळीच्या खाली
आहे. म्हणूनच याला खोल खंडोबा असे म्हणतात. या देवालयाचा आकार मशिदीसारखा
का असावा या संबंधी विचार करता दोन अंदाज बांधता येतील. एक म्हणजे
मुसलमानंाच्या स्वाऱ्या झाल्यास त्यांच्या हिंदू देवांच्या मूर्तिभंजक
प्रवृत्तीपासून संरक्षण म्हणून देवालयाचा बाहेरचा आकार मशिदीसारखा
केल्याल्यास ते तिकडे फिरकणार नाहीत. परंतु असे आढळून येते की या भागात
इतरही अनेक देवालये असून त्यांचा बाह्य आकार मशिदीसारखा नाही फक्त एकच
देवालय तसे बांधण्याचे काहीच प्रयोजन नाही. म्हणून हा अंदाज तितकासा योग्य
वाटत नाही. दुसरा अंदाज असा की या देवालयाचे बांधकाम कुणीतरी मुसलमान
कारागीराने केले असावे, आणि हिंदू-मुस्लिमांच्या ऐक्यामुळे याला कुणीही
विरोध दर्शविला नसावा आणि हा अंदाज पटण्यास काही हरकत नाही. कारण याच्या
पुष्ट्यर्थ आणखी दोन उदाहरणे पहावयास मिळतात. ती म्हणजे बाबूजमाल या
मशिदीच्या चौकटीवर श्री गणेशाचे चित्र व पन्हाळगडावरील एका द्वाराच्या
चौकटीवर कोरलेल्या गणेशाच्या डोक्यावरील मुसलमानी पद्धतीची टोपी. यावरून
कोल्हापूरात हिंदू मुसलमान ऐक्य फार पूर्वीपासून आहे असे म्हटल्यास चूक
ठरणार नाही.
खोल खंडोबा हे नाव देण्याचे कारण प्राचीन वस्ती नाश
झाल्यामुळे आजूबाजूची घरे पडून उंचवटे निर्माण झाले आणि एकेकाळी जमिनीवर
असलेला देव जमिनीच्या पातळीखाली गेला व लोकांनी त्याला न हलविता तसेच देऊळ
बांधले आणि आजूबाजूची जमीन न उकरता उंचवटयावर पुन्हा वस्ती केली. या ठिकाणी
देखील जुने अवशेष सापडतात पण उत्तरेश्वराप्रमाणेच इथेही सध्या दाट
लोकवस्ती झाल्याने उत्खनन करणे अशक्य झाले आहे. जुन्या कागदपत्रात या
भागाला केसापूर असे संबोधिलेले आढळते. परंतू हे नाव रूढ झालेले दिसत नाही.
ब्रम्हपुरीची
वाढ होऊन ती नाश झाली तरी उत्तरेश्वर व खोल खंडोबा यांची वाढ मंदगतीने
सुरू होती. त्यांची फार मोठी वाढ झाली नाही व नाशही झाला नाही. वरील तीनही
नैसर्गिक केंद्रे स्थापन झाली व त्यांनतर रंकाळा, पद्माळा व रावणेश्वर ही
तळयाजवळील केंद्रे निर्माण झाली. रंकाळा केंद्र हे यापैकी सर्वांत जुने
असावे. या ठिकाणी संध्यामठ ही सुंदर इमारत व नंदीचे देवालय प्राचीन काळी
बांधले गेले. हा नंदी प्रतीवर्षी एक गहू पुढे सरकतो व तो सरकत सरकत
रंकाळयात पडल्यावर प्रलय होणार अशी एक दंतकथा आहे. या देवालयातील नंदी
सुमारे ५.५ फूट उंचीचा आहे. वरील दंतकथेची वस्तुस्थिती अशी की, आठव्या
किंवा नवव्या शतकात जो मोठा भूकंप झाला व ज्यामुळे रंकाळा तलाव निर्माण
झाला त्याचवेळी या देवालयातील नंदी(ज्याला पाय नाहीत असा) धरणीकंपामुळे
पुढे सरकला असावा. ही गोष्ट लवकर लक्षात न आल्यामुळे कालांतराने वर
लिहिलेली दंतकथा प्रसृत झाली असावी. या मंदिराचा अलिकडेच म्हणजे सन १९६९
मध्ये जिर्णोद्धार करण्यात आला आहे. मुख्य नंदीचे देवालय पुन्हा बांधले
असून देवळासमोर असलेल्या पुरातन शिवपिंडीवर मंडप बांधण्यात आला आहे.
पूर्वी
प्रत्येक गावात एक महारवाडा असे. या महारवाड्यावर गावाचे स्वतंत्र
आस्तित्व दिसून येत असे रंकाळा केंद्र हे ब्रम्हपुरीशी संबंध नसलेले एक
स्वतंंत्र गाव होते. हे इथे असलेल्या महारवाड्यावरून सिद्ध होते. हा
महारवाडा अद्यापी फिरंगाईजवळ आहे. कोल्हापूर शहर वाढल्यावर या भागाला नवा
बुधवार हे नाव देण्यात आले होते. म्हणून हा नवा बुधवार व खोल खंडोबा हा
जुना बुधवार म्हणून काही काळ ओळखला जात होता. सध्या रंकाळा म्हणजेच नवा
बुधवार भागाला शिवाजी पेठ नावाने ओळखले जाते.
पद्माळा केंद्र
हे
एक समकालीन खेडे होते. जुन्या कागदपत्रात याचा उल्लेख नवे जिजापूर असा
आढळतो. या खेडयाला स्वतंत्र महारवाडा नव्हता. फिरंगाईच्याच महारवाड्याचा या
वस्तीला उपयोग होत असावा. येथे जुने अवशेष सापडत नाहीत. असा महारवाडा
हलविला गेला आणि जवळील महार तळे बुजविले जाऊन सध्या तेथे राजाराम कॉलेज
(सायन्स विभाग), राजाराम (अयोध्या) टॉकिज, आईसाहेब महाराज यांचा पुतळा,
शाहू टॉकीज, सध्याची स्टेट बँक इमारत अशा इमारती उठल्या आहेत. या भागाला
रविवार पेठ असे नाव आहे. तत्पूर्वी त्याचे नाव हिरापूर असे होते.
पद्माळयाप्रमाणे येथेही जुने अवशेष सापडत नाहीत. पद्माळा व रावणेश्वर हे
दोन तलाव होते. ते बुजवून अनुक्रमे सध्या गंाधी मैदान (किंवा वरूणतीर्थ वेस
मैदान) व श्री शाहू स्टेडियममध्ये रूपांतर करण्यात आले.
ज्याप्रमाणे
नदीकाठाच्या तीन केंद्रांचा एक विभाग मानणे शक्य आहे त्याचप्रमाणे
तळयाकाठच्या या तीनही केंद्रांचा स्वतंत्र विभाग मानला जातो. इसवीसनाच्या
९व्या शतकाच्या सुमारास ही सहाही केंद्रे लहान खेड्यांच्या स्वरूपात
स्वतंत्रपणे अस्तित्वात होती.
आजचे कोल्हापूर हे पूर्वीच्या सहा खेड्यांनी बनलेले असून त्यातील एका खेड्याचे नाव रावणेश्वर. करवीर महत्म्यात देखील याच काराणाने याला राक्षसालय असे नाव मिळाले असावे. या खेड्याची ग्रामदेवता मुक्ताबिका तर भेरव आणि कालभैरव हे क्षेञपाल असून रावणेश्वर हा गावचा महादेव होता. या तळ्यातीलच अनेक भाग सीता, मारुती व प्रीजाटा यांच्या नावाने ओळखले जात. शहर सुधारणेच्या काळात हे तळे मुजवून तेथे खेळाचे मैदान झाले. पण देव रामेश्वर माञ रावणेश्वर या नावान तसाच राहिला. आरंभी साध्या लोखंडी छञी खाली असणार्या देवालयाचा जिणौधार १९९४ साली झाला. आणि त्या ठिकाणी शिवलिंगाच्या आकारचे नवे मंदिर बाधण्यात आले. सन २०१३ मध्ये याला शिखर चढवण्याचे नियोजन करण्यात आले. व कर्नाटकातील कसबी कारागीरांच्या हातून एक एक शिल्पकुती साकरली गेली आहे.
ब्रम्हपुरी
शहराचा दुसऱ्या शतकात नाश झाल्यावर या भागाचे महत्व कमी झाले इ.स. ५००
पर्यंतच्या शिलालेखात कोल्हापूरचा स्वतंत्र उल्लेख आढळत नाही. इसवी सन २००
ते ८०० पर्यंतच्या काळात कोल्हापूरला राजकीय किंवा धार्मिक महत्त्व नव्हते.
म्हणून या सहा शतकांना कोल्हापूरच्या इतिहासाची रात्र असे मानले जाते.
श्री महालक्ष्मीच्या देवालयाने या रात्रीचा शेवट केला इसवी सन ९ व्या
शतकाच्या दरम्यान या देवालयाची पूर्तता झाली चालुक्य राजवंशातील राजा
कर्णदेव यांनी इसवी सन ६३४ मध्ये श्री महालक्ष्मीचे देवालय बांधले. परंतु
या देवालयाचे बांधकाम बरेच दिवस चालू होते. हे देवालय एकाचवेळी व एकाच
राजाने न बांधता वेळोवेळी अनेकांनी त्यांची वाढ केली किवा त्यात सुधारणा
केली. देवालयाच्या पूर्णतेनंतरच कोल्हापूरच्या इतिहासाची रात्र संपून
उत्कर्षास सुरूवात झाली.
श्री महालक्ष्मीच्या देवालयाबाबत एक दंतकथा
प्रसिद्ध आहे की हे देवालय एका रात्रीत बांधले गेले. खोल विचार करता हे
अर्धसत्य असल्याचे आपणास पटते. या दंतकथेतील सत्य इतकेच की ती रात्र
नेहमीची १२ तासाची नसून सुमारे २०० वर्षापेक्षा जास्त काळाची आहे. ही रात्र
म्हणजेच करवीरच्या इतिहासाची रात्र होय. इ.स.२०० ते ८०० वर्षाचा काल हा
कोल्हापूरच्या इतिहासाची रात्र असे मानले जाते हे वर उधृत केले आहे. आणि
याच ऐतिहासिक रात्रीच्या शेेवटच्या दोन शतकात हे महालक्ष्मीचे देऊळ बांधले
गेले आहे. तेव्हा आपण हेे लक्षात घेतले पाहिजे की एखादी दंतकथा जेव्हा तयार
होते ती कोणत्या ना कोणत्या तरी अल्पशा का होईना सत्यावर आधारीत असते. एक
लहान बिंदू मध्याभोवती हवे तेवढे मोठे वर्तुळ निर्माण करता येते, तसेच
अल्पशा सत्यांशावर अतिशयोक्तीपूर्ण दंतकथा निर्माण हेात असते.
श्री
महालक्ष्मी देवालयाशी संबधित एक वैशिष्ट्य वा वैचित्र्य दिसून येते.
सर्वसाधारणपणे उंचवट्याच्या जागा किंवा टेकड्यावर देवालये बांधली जातात.
परंतु या देवालयाच्या बाबतीत पाहिले असता, हे देवालय अगदी सखल भागात बांधले
आहे. या देवालयामध्ये प्रवेश करण्यासाठी कोणत्याही दिशेने आले तरी खाली
उतरावे आगते. सध्या देवळाभोवती दाट वस्ती असल्यामुळे पूर्वीच्या
परिस्थितीची स्पष्ट कल्पना येत नाही. ही जागा सखल, दलदलीची व जवळूनच ओढा
वाहणारी होती. अशा जागेत देऊळ का बांधले गेले हे जरी सांगता येत नसले तरी
एवढे मात्र सत्य की अशा घाणेरड्या व दलदलीच्या जागेवर देऊळ बांधल्यामुळे
तिचे नंदनवन झाले. मेजर ग्रॅहमने कोल्हापूरला करवीर असे का म्हणतात याचे
कारण सांगितले आहे. महालक्ष्मीने आपल्या कराने हा प्रदेश प्रलय काळाच्या
पाण्यामधून वर उचलला (वीर) म्हणून त्याला करवीर असे म्हणतात. करवीर
महात्मामध्येही अशाच अर्थाचा उल्लेख आहे. याचा भौगोलिक अर्थ एवढाच की, हा
भाग प्रथम सखल व दलदलीचा होता, आणि या देवालयामुळे तो वर उचलला जाऊन स्वच्छ
व सुंदर झाला. (याच सारखे अगदी अलिकडे म्हणजे दहा वर्षातील छोटेसे उदाहरण
म्हणजे जयंतीच्या नाल्याजवळील गणेश मंदिरासमोरील जागाही अशीच घाणेरडी होती.
परंतु तेथे महादेवाचे देवालय उभारल्यावर तीच जागा स्वच्छ, पवित्र व
प्रसन्न वाटू लागली.)
श्री महालक्ष्मी देवालय स्थापन झाल्यांनतर प्रथमच
करवीर हा शब्द वापरलेला आढळतो. तत्पूर्वी या शहराचा उल्लेख करताना
कोल्हापूर, कोल्लपूर, कोलगिरी, कोल्लादिगिरी पट्टण इत्यादी नावे वापरलेली
दिसून येतात. महालक्ष्मीचे देवालय स्थापन होण्यापूर्वी व त्यानंतर अनेक
शतकांपर्यंत या शहराचे जुने व सार्वसंमत असे नाव म्हणजे कोल्लापूर म्हणजे
दरीतील गाव. कोल्लादिगिरीपट्टण याचा अर्थ थोडासा विस्तारित पण तसाच आहे.
कोल्ला म्हणले सखल भाग, गिरी म्हणजे डोंगर वा पर्वत, ददिगिरी(द-दि+गिरी)
म्हणजे पर्वताने व डोंगराने वेढलेले शहर वा गांव. भौगोलिक दृष्टीने हे नाव
सार्थ आहे. पंडित वा पुजारी वर्गाने कोल्लापूर याचा अर्थ अडाणी लोकांना
पटवून सांगण्याकरिता अक्कल हुषारी वापरून, घाणेरड्या जागेचा महालक्ष्मी
देवालयामुळे नाश झाला असे सांगण्याऐवजी कोला नावाच्या राक्षसाचा (घाणेरड्या
जागेचे रूपक) महालक्ष्मीने वध केला, अशी दंतकथा निर्माण केली. अडाण्यांना
पटवून सांगण्याचा हा एक प्रामाणिक उपाय किंवा प्रयत्न आहे. कालांतराने
शब्दाचा मूळ अर्थ विसरला गेल्यामुळे शहाण्या सुशिक्षित लोकांना ती दंतकथा
वाटू लागली इतकेच आणि आजही कोणी शब्दाचा मूळ अर्थ व कथेचा उद्देश लक्षात
घेत नसल्यामुळे तिला दंतकथाच मानले. एकोणिसाव्या शतकापर्यंम्त कोल्लापूर
अगर कोलापूर असेच शब्द वापरले जात होते. कोला या शब्दावरून व्युत्पती रूढ
झाल्यावर त्या शब्दाचा उच्चार कोल्हा असा झाला असावा. किंवा कोल्लापूर या
शब्दाचे कानडी वळण टाकून त्याला शुद्ध मराठी स्वरूप देताना या ह कराचा
प्रवेश झाला असण्याची शक्यता अधिक आहे.
धार्मिक कंेद्र
श्री
महालक्ष्मी देवालयानंतर कोल्हापूरचे साध्या गावामधून प्रथम तीर्थामध्ये व
नंतर महातीर्थामध्ये रूपांतर झाले आणि पंडित पुजाऱ्यांनी तर धार्मिक
दृष्ट्या फारच महत्त्व मिळवून दिले.
राजकीय केंद्र
अल्पावधीतच
कोल्हापूर हे केवळ धार्मिक क्षत्रे न राहता, राजकीय केंद्रही बनले.
राष्ट्न्कूटानंतर इ.स. १२ व्या शतकात कोल्हापूर व परिसरात वंशाच्या राजांचे
राज्य होते. त्यानंतर या भागात देवगिरीच्या यादवांचे राज्य स्थापन झाले व
त्यंाच्या एका प्रांताची राजधानी कोल्हापूर ही होती. याचा अर्थ कोल्हापूरला
११ व्या शतकानंतर पुन्हा राजधानीचे स्वरूप आले. परंतु यावेळी ही राजधानी
ब्रम्हपुरीवर न होता महालक्ष्मीच्या देवालयाजवळ ठेवली गेली. इ.सन. १३०६ ते
१३०७ मध्ये देवगिरीच्या यादवांचा मुसलमानांनी पाडाव केला. तेव्हापासून ते
इ.स. १६५९ साली थोरल्या शिवाजी महाराजांनी पन्हाळा जिंकेपर्यंत या भागात
मुसलमानांचा अंमल होता. त्यांनी श्री महालक्ष्मी देवालय हेच केंद्र समजून
आपली वसाहत केली. त्यांचा राजवाडा हल्लीच्या जुन्या राजवाड्याच्या जवळच
कुठेतरी असावा. त्यांनी तीन मोठ्या मशिदी देवालयाच्या जवळच व सभोवती
बांधल्या. आश्यर्य म्हणजे एकाही मुसलमान राजाने महालक्ष्मी देवालयाची
मोडतोड करण्याचा प्रयत्न केला नाही. (खुद्द औरंगजेबही कोल्हापूरला येऊन
गेला होता) याचे कारण म्हणजे इथल्या हिंदूंना त्यांनी सहिष्णूतेची वागणूक
दिली असावी. १७ व्या शतकात छ. शिवाजी महाराजांनी मराठी राज्याची स्थापना
केली व कोल्हापूरास छत्रपतींचे राज्य सुरू झाले. त्यानंतर ताराबाईने करवीर
राज्यांची स्थापना केल्यामुळे कोल्हापूराचे महत्व त्याला प्राप्त झाले.
इ.स. १० व्या व ११ व्या शतकापासून चालत आलेल्या या परंपरेला अनुसरून
छत्रपतींनीसुद्धा श्री महालक्ष्मीचे देवालय केंद्र मानून कुलस्वामिनी
भवानीचे देवालय व राजवाडा श्री महालक्ष्मीचे देवालयाशेजारीच बांधला.
श्री महालक्ष्मी देवालयाचा परिसर
महालक्ष्मीचे
देवालय हे धार्मिक केंद्र बनल्यावर पुजारी वर्ग, भक्तगणांच्या
व्यवस्थेसाठी जरूर असणारे व्यापार, उद्योगधंदा, नोकरी वगैरे करणारी माणसे
हळूहळू वाढू लागली. काही भक्तगण तिथेच कायम वास्तव्य करून राहिले.
अशारितीने वस्ती वाढत असतानाच मुसलमानांनी देखील आपल्या वसाहती तिथे
केल्या. त्यांनी त्या भोवताली मातीचा कोट बांधला व खंदक खणून किल्ल्याचे
स्वरूप आणले. पुढे-पुढे मराठा अमलदारामध्ये इथे राजधानी आल्यावर वसाहतीत
मोठीच वाढ झाली. राजवाडा झाल्यामुळे तर इतर सर्व जहागिरदार व मानकरी
मंडळींनी देखील आपापले वाडे इथेच बांधले. मग इतर इनामदार आले. सर्वांची
इच्छा ही की आपण किल्ल्यातच राहावे. यामुळे किल्ला भागात गर्दी झाली. पुढे
राजधानीच्या संरक्षणासाठी मातीचा तट पाडून दगडी तट बांधला गेला.
श्री महालक्ष्मी देवालयाचा पूर्वीच्या सहा नैसर्गिक केंद्रावर झालेला परिणाम:
श्री
महालक्ष्मीचे देवालय हे ब्रम्हपूरी, उत्तरेश्वर, खोलखंडोबा, रंकाळा,
पद्माळा, व रावणेश्वर या सहाही केंद्राच्या मध्यभागी स्थापिले गेले आणि
देवालयाभोवती वसाहती होऊन त्यांना धार्मिक व राजकीय महत्व प्राप्त
झाल्यामुळे ही सहाही केंद्राकडून मध्यवर्ती केंद्राकडे वसाहत वाढू लागली.
सर्व सहा नैसर्गिक केंद्र व महालक्ष्मी देवालयाची वसाहत पूर्णपणे एक
होण्यास जवळ जवळ एक हजार वर्षाचा कालावधी लागला. मध्यवर्ती केंद्रात अनेक
कारणांमुळे जागा न मिळाल्यामुळे इतर सहाही केंद्राची वस्ती वाढू लागली व
काही काळाने शहर व उपनगरे अशी स्थिती निर्माण झाली. पुढे उपनगरे विस्तृत
पावून ती शहरात मिसळून गेली. त्यामधून १९ व्या शतकातील मोठ्या कोल्हापूर
शहराचा जन्म झाला.
ही सर्व जागा एकत्र जोडली जाऊनही नवीन वसाहतीची गरज
भासू लागली. त्यातूनच काही नवीन वसाहती निर्माण झाल्या. प्रामुख्याने
त्यामध्ये शनिवार पेठ व सोमवार पेठ या दोन पेठांचा उल्लेख केला जातो.
कुंभार व लोणारी यांचेकरिता किल्ल्याबाहेर खंदकापलिकडे (सध्याची पापाची
तिकटीजवळ) सखल भागातील जागा देण्यात आली. शहरानजीक उत्तम शेती असलेली जमीन व
तलावांनी व्यापलेली जागा सोडून इतर सर्व जागेवर वसाहतींची स्थापना झाली व
जुन्या वसाहतीमध्ये वाढ झाली.
इ.स. १८६२ मधील कोल्हापूर.
१८६२
मधील कोल्हापूरचा नकाशा उपलब्ध आहे. या नकाशावरून त्यावेळीच्या कोल्हापूरची
स्पष्ट कल्पना येते. शहरात मुख्यत: दोन उल्लेखनीय गोष्टी त्या काळात
आढळतात. त्या म्हणजे कोल्हापूरानजीक असलेल्या अनेक सुंदर बागा व तलाव.
याखेरीज नकाशात कल्पना न येणाऱ्या गोष्टी म्हणजे आरोग्य व स्वच्छता.
तत्कालीन दोन इंग्रजी अधिकाऱ्यांच्या लिखाणावरून या बाबतीत त्यावेळच्या
कोल्हापूरची स्थिती अत्यंत निरााशाजनक होती, असे दिसून येते. शहराची रचना
वाकडी तिकडी, रस्ते अरूंद व चिंचोळे, स्वच्छता व आरोग्य अनियमित,
गैरसोईच्या इमारती, घाण व दुर्गंधी इत्यादी गोष्टी शहरात आढळून येतात. अशा
प्रकारे मध्ययुगातील कोल्हापूर शहराचे अवलोकन केल्यानंतर अर्चाचीन काळातील
या शहराची स्थिती, वाढ विकास इत्यादींचे निरीक्षण पुढे केले आहे.
अर्वाचीन काळातील कोल्हापूर शहर
अर्वाचीन
काळातील कोल्हापूराची सुरूवात इ.स. १८४४-४८ पासून झाली. इ.स. १८४४ मध्ये
ब्रिटीश सरकारने कोल्हापूर शहराच्या संस्थानचा कारभार आपल्या हाती घेतला
आणि तो पाहण्याकरिता मेजर ग्रॅहम यांची नेमणूक केली. इ.स. १८४५-८ च्या
दरम्यान रेसिडेंसीच्या इमारती बांधल्या गेल्या. कोल्हापूरला ब्रिटीश
सरकारचा जो प्रतिनिधी असे त्याला सुरूवातीस पोलिटिकल सुपरिटेंडेंट असे नाव
देण्यात आले व शेवटी रेसिडेंट असे नामाधिकरण करण्यात आले. अशा रीतीने
कोल्हापूर शहराच्या इतिहासात एक नवीन राजकीय केंद्र निर्माण झाले.
रेसिडेंसीकरिता निवडलेल्या जागेवर ब्रिटिशांचा प्रत्यक्ष अंमल होता. या
जागेत कलेक्टर, जिल्हा न्यायाधिश व पोलिस अधिकारी यांचे बंगले, पोलिस हेड
पॅटर, रेसिडेंसी क्लब, जिल्हा इंजिनियर यांची कचेरी इत्यादी इमारती व
त्यालगतच्या ताराबाई पार्क पर्यंतचा सर्व भाग यांचा समावेश होता. प्रथमत:
कोल्हापूरला लष्कर होते आणि त्यामुळे त्यावेळची रेसिडेंसी हद्द फारच मोठी
होती. नंतर लष्कर हालविल्यावर हद्द थोडी कमी करण्यात आली. रेसिडेंन्सी
स्थापनेनंतर अंदाजे शंभर वर्षानंतर १५ ऑगस्ट १९४७ साली ह्या सर्व हद्दीवर
पुन्हा संस्थानांचा अधिकार निर्माण झाला.
रेसिडेंसीमुळे १८४४ नंतर
कोल्हापूरचे राजकीय केंद्र महालक्ष्मी देवालयापासून दूर असे एक स्वतंत्र
केंद्र निर्माण झाले. तत्पूर्वी असलेली धार्मिक व राजकीय युती
रेसिडेंसीमुळे मोडली गेली. इ.स. १८७७-८४ च्या काळात रेसिडेंसीजवळच नवा
राजवाडा बांधला गेला व महाराज तेथे राहू लागले. तेव्हापासून तर ते
संपूर्णतया राजकीय के्रंद्र व देवालय हे फक्त धार्मिक केंद्र अशी परिस्थिती
निर्माण झाली तेव्हा महाराजांना वाटले की राजवाडा देवालयाशेजारीच असावा.
१८७७ साली नवा राजवाडा बांधण्याचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी लोकांना
वाटले की छत्रपतींचा वाडा रेसिडेंसीच्या वाड्याजवळ असावा.
रेसिडेंसीच्या
परिणाम म्हणून सभोवताली विशिष्ट प्रकारची वसाहत निर्माण झाली. इतर सरकारी
कचेऱ्या अधिकाऱ्यांचे बंगले, मिशनऱ्यांच्या संस्था, श्रीमंत व्यापारी व
जमीनदार, पेन्शनर अधिकारी इत्यदींच्या या वसाहतीत समावेश होत असे.
त्याचबरोबर नव्या राजवाड्यात महाराज रहायला आल्याबरोबर इतर जहागिरदार,
उमराव मंडळीही आली. एक चर्चही उभारले गेले. पुढे ताराबाईर् पार्क स्थापन
झाले आणि लवकरच रेसिडेंसीच्या सभोवती एक सुंदर उपनगर स्थापन झाले.
रेसिडेंसीचा
आणखी एक परिणाम म्हणजे कोल्हापूर हे दळणवळणाचे मोठे केंद्र बनले. पुणे व
बेंगलोर ही मुख्य लष्करी ठिकाणे जोडताना इतर लहान लष्करी केंद्राबरोबरच
कोल्हापूरवरून हा रस्ता केला गेला. या प्रमाणे समुद्राकडे जाण्यासाठी आंबा
घाट फोडून कोल्हापूर रत्नागिरी हा रस्ता केला गेला. या रेसिडेंसीचा संबंध
असलेली सांगली व मिरज ही शहरे जोडणारा रस्ताही झाला. कोल्हापूर हे प्रत्येक
पेठेला व जहागिरीला जोडलेले असल्यामुळे पन्हाळा, बावडा, राधानगरी,
गारगोटी, इचलकरंजी, गडहिंग्लज, आजरा इत्यादी गावांशी रस्त्याने जोडले गेले.
अनेक पूल बांधण्यात आले. चिकोडी रोड-फोंडा रस्त्यामुळे कोल्हापूर हे
सावंतवाडी, विजयदुर्ग व मालवण या भागास जोडले गेले. शेवटी १८९१-९२ ला
मिरजेहून कोल्हापूर रेल्वे लाईन टाकण्यात आली. त्यामुळे कोल्हापूर हे एक
मोठे दळणवळाचे केंद्र बनले. आंबा फोंडा घाट फोडल्यामुळे कोल्हापूरला
जवळ-जवळ कोकणाचे दार म्हणण्याइतपत महत्व आले.
इ.स. १८४४ मध्ये
छत्रपती शाहू महाराजांनी अधिकार सूत्रे धारण केली त्यावेळी त्यंाच्या
लक्षात आले की स्टेशनजवळ एक व्यापारी पेठ करता येणे शक्य आहेे, म्हणून
त्यांनी इ.स. १८९५ मध्ये शाहूपुरी वसाहत स्थापन करण्याची आज्ञा केली. १९२०
पर्यत त्या वेळचे संस्थानचे इंजिनियर रावसाहेब विचारे व नगरपालिकेचे
सुपरिटेंडेंट श्री भास्करराव जाधव यांनी ती आज्ञा पार पाडली. कोल्हापूरच्या
आसपास ऊसाची लागवड करून गूळ तयार करण्याची पद्धत फार पूर्वीपासून होती
शाहू महाराज
कोल्हापूर देशाच्या सर्वात जुन्या नागरी संस्कृतींपैकी एक आहे. कोल्हापूरचा सांस्कृतिक इतिहास 17 व्या शतकापासून प्रसिद्ध आहे. पंचगंगा नदीच्या काठावर वसल्यामुळे, कोल्हापुरास दक्षिण काशी असे म्हणतात. कोल्हापूर शहराने विविध राजवटी पहिल्या आहेत आणि मराठ्यांच्या उदयापासून हे स्थान अजून ऐतिहासिक व सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले.
१८९४ मध्ये छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरचे राज्यकर्ते झाले आणि ५० वर्षांच्या जुन्या प्रशासकीय सेवेचा शेवट केला. १८९४ ते १९२२ पर्यंतच्या 28 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक सुधारणांचा एक नवीन युग घडवला ज्यासाठी त्यांना महाराष्ट्रातील महान शासकांपैकी एक म्हणून ओळखले जाते. १८९४ ते १९२२ पर्यंत राजर्षींच्या केवळ 28 वर्षांच्या सर्वांत उत्कंठित आणि प्रगतशील राजवटीमुळे कोल्हापूरचे छत्रपती शाहु महाराज हे आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाचे एक वैशिष्ट्यपूर्ण युगचिन्ह आणि एक महत्त्वपूर्ण राज्यकर्ते बनले कारण त्यांनी वेदोक्त आंदोलन, सत्यशोधक चळवळीसारख्या क्रांतिकारी स्वभावाच्या अनेक सामाजिक-धार्मिक चळवळींना मदत केली. या हालचाली मुख्यत्वे मोठ्या प्रमाणावर सामाजिक बदल घडवण्यासाठी आणि महाराष्ट्रातील नवीन सामाजिक नेतृत्वाच्या उदयप्रसारास मदत करण्याकरिता जबाबदार होत्या. हे लक्षात घेणे उचित आहे की छत्रपती शाहु महाराज हे या चळवळीचे व हालचालींचे सामर्थ्यवान व प्रमुख केंद्र होते. त्यांनी सामाजिक पुनरुज्जीवन आणि महाराष्ट्रातील सामाजिक इतिहासाचा मार्ग बदलण्यावर प्रचंड प्रभाव पाडला. छत्रपती शाहूंच्या राजवटीनंतर, भोसले राजवंश घराणे हे कोल्हापूरच्या सिंहासनावर विराजमान आहेत. स्वातंत्र्योत्तर काळानंतर कोल्हापूर संस्थान प्रामुख्याने भारतीय राष्ट्रात विलीन होऊन एक अविभाज्य अंग बनले आहे. कोल्हापूरच्या लोकांमध्ये राजघराण्याबद्दलचा आदर सन्मान अजूनही अबाधित आहे. ९ मे १९८३ रोजी श्रीमंत शाहु छत्रपती महाराज दुसरे हे राजेशाही सिंहासनावर बसले असून सध्याच्या रॉयल हाउसचे प्रमुख आहेत.
कोल्हापूरचे छत्रपती भोसले आडनाव का लावत नाहीत ?
शाहू कालीन सिंचन व्यवस्था
कोल्हापूर हे स्वतंत्र संस्थान असल्यामुळे या संस्थानयानासाठी स्वतची एक वेगळ्या प्रकारची व पर्यावरण पूर्वक सिंचन व्यवस्था वापरात होती व आज हि सिंचन व्यवस्था शहराच्या जुन्या भागात चालू असून त्याचा वापर खूप कमी प्रमाणात चालू आहे.या सिंचन व्येव्स्तेसाठी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर शहराच्या दक्षिण भागात कात्यायनी देवाच्या मंदिरात कुंड आहे तीतून नेसर्गिक पाण्याच्य झरा ला सुरवात होते तीतून ते कळंबा तलाव येथे आणले.तलावाचा व्यास मोठा असल्यामुळे तेथील पाण्याचा वापर जवळपासच्या शेतीसाठी केला जात होता व अजूनही होतो. तिथे महाराजांनी बंधारा बांधला जो जमिनीपासून पाच ते सहा फूट उंच ठेवला जेणेकरून त्या पाण्यामधे पाला पाचोळा केवा इतर काही जाऊन दुषित होऊ नये कळंब तलावातील पाणी त्या बंधाऱ्या द्वारे पाण्याचा खजिना या ठिकाणी आणले या साठी भौगोलिक परीस्थिती व गुरुत्वाकर्षण या गोष्टींचा विचार केला होता. पाण्याचा खजिना या ठिकाणी पाण्याचा साठा करून ते पूर्ण शहरात पुरवले जात होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला कोल्हापूरचा ऐतिहासिक 'शिवाजी पूल'
संस्कृती
कोल्हापूरच्या संस्कृतीत येथील मराठी चित्रपटांची निर्मिती आणि येथील पहिलवानांची कुस्ती या दोनच गोष्टी प्रामुख्याने आहेत.
कुस्ती
कुस्ती’ मर्दानी कुस्ती हा कोल्हापूरातील लोकप्रिय खेळ आहे. काही राजे हे
स्वतः एक चांगले पैलवान आहेत. जवळजवळ प्रत्येक आठवड्याला येथे जंगी
कुस्त्यांचे नियोजन केले जाते. अशावेळी खुल्या मैदानात कुस्त्या खेळवल्या
जातात. येथील राजे शाहु महाराज हे एक पैलवान होते आणि त्यांनी स्वतः खासबाग
मैदानाची कुस्ती खेळासाठी बांधणी केली. जेव्हा ते युरोप सहलीला गेले होते
त्यावेळी त्यांनी तेथे रोम येथील प्रसिद्ध ‘कॅलोशिअम’ मैदान पाहिले आणि
त्यावेळी त्यांनी अशा प्रकारचे मैदान कोल्हापूरात उभारायचे ठरवले आणि
त्यांनी सहलीवरून परत आल्यानंतर ‘कॅलोशिओ’ सारखे खासबाग मैदान
उभारले.खासबाग हे एकमेवच भारतातील कुस्तीचे मैदान आहे. मैदानाच्या मध्यभागी
असलेल्या हौद्यातील कुस्ती कोणत्याही अडथळ्याशिवाय जवळजवळ 60,000 लोक पाहू
शकतात. राजकीय लोकांकरीता एक वेगळा भाग ईशान्य बाजुला ऊभारला आहे.
एकेकाळी कोल्हापुरात कुस्ती खेळणार्या पहिलवानांच्या सुमारे ३००
तालीमसंस्था होत्या. अन्य राज्यातील मल्ल येथे कुस्ती शिकायला येत, आजही
येतात. मात्र आज या ३०० तालीमसंस्थांपैकी जेमतेम ६० तालमी शिल्लक राहिल्या
आहेत. त्यांपैकी सुमारे ५२ तालमीच्या जागेचा उपयोग नाच-गाणी रस्सा-मंडळे,
राजकीय बैठका, हळदी-कुंकू आदी कार्यक्रम चालतात. उरलेल्या आठ आखाड्यांमध्ये
आजही कुस्ती जोशात चालते. ते आखाडे असे :-
१. कसबा बावडा कुस्ती केंद्र
२. खासबाग
३. नवी मोतीबाग तालीम
४. पंत बावडेकर आखाडा
५. मोतीबाग तालीम
६. शाहू आखाडा, चंबूखडी
७. शाहू आखाडा, मार्केट यार्ड
८. शाहूपुरी आखाडा
९. शाहू विजयी गंगावेस
10.कालाईमाम तालिम
कोल्हापूरची कुस्ती परंपरा
विविध क्षेत्रांत अग्रेसर असणार्या कोल्हापूरची क्रीडा परंपरा अतिशय उल्लेखनीय आहे. कुस्ती पंढरी म्हणून ओळखलं जाणारं कोल्हापूर सार्या
भारतात प्रसिध्द आहे. पुरातन काळापासून चालत आलेली एक विद्या म्हणजे
मल्लविद्या! `यथा राजा तथा प्रजा' या उक्तीप्रमाणे राजश्री छत्रपती शाहू
महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांनी मल्लविद्या जोपासण्याचे कार्य
करवीर नगरीत केलं! तळमळीनं केलं! भीमकाय, निरोगी शरीरयष्टी शाहू महाराजांना
निसर्गत:च लाभली होती. स्वत:प्रमाणे आपली प्रजाही बलदंड व निरोगी शरीराची
व्हावी म्हणून राजर्षींनी कोल्हापूरात अनेक तालमींची निर्मिती केली.
या
तालमीतून पैलवानांच्या राहण्याची आणि दैनंदिन खुराकाची महाराजांनी
व्यवस्था केली. पैलवानांना मार्गदर्शन करण्यासाठी अनेक नामवंत वस्तादांची
नेमणूक केली. साहित्य पुरविले आणि बघता बघता राज्याच्या आश्रयाखालील या
तालमीत शड्डूचे आवाज घुमू लागले. तरुण पैलवानांची शरीर आकारु लागली.
कोल्हापूरच्या विविध भागातील तालमीत व्यायाम घेऊन बलदंड शरीराचे पैलवान
निर्माण होऊ लागले.
प्रत्येक तालमीत तयार होणार्या
पैलवानांच्यात ईर्षा, स्पर्धा निर्माण व्हावी म्हणून कुस्त्यांची मैदाने
महाराजांच्या मार्गदर्शनाखाली भरु लागली. स्पर्धेशिवाय प्रगती होत नाही हे
त्यामागचे सूत्र होते. सुरुवातीची मैदाने मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी
बाबूजमाल दर्गा आणि मंगळवार पेठेतील शिवाजी थिएटरच्या प्रांगणात भरत. शिवाय
महत्त्वाच्या सणासुदीलाही कुस्त्यांची मैदाने भरविली जात. नव्या
राजवाड्याच्या मागच्या पटांगणात सभोवती कनात लावून मैदाने होत. ही सारी
मोफत असल्याने प्रेक्षकांची प्रचंड गर्दी होई! कुस्त्यांच्या मैदानांचे हे
लोण अल्पावधीतच खेडोपाडी पोहोचले. मैदान भरविताना होणार्या गैरसोयी महाराजांना जाणवत होत्या.
जेव्हा
महाराज १९०२साली विलायतेला गेले तेव्हा त्यांनी रोमला भेट दिली. तिथली
ऑलिंपिक नगरी आणि ओपन एअर थिएटर नजरेसमोरुन घातले. महाराजांचे विचार चक्र
सुरु झाले. कोल्हापूरला येताच लाखभर प्रेक्षकांसाठी कुस्त्यांचे मैदान
बांधण्याचे ठरले. आणि १९१२ साली खासबाग मैदानाच्या बांधकामाला सुरवात झाली.
साठ फूट व्यासाचा व जमिनीपासून २ ।। फूट उंच असणारा आखाडा, प्रेक्षकांसाठी
बसण्याची उत्तम व्यवस्था, प्रवेशासाठी चारी बाजूला व्दार, नैसर्गिक
लाभलेली उतरणी यामुळे कोल्हापूरचे खासबाग मैदान म्हणजे आशिया खंडात शोधून
सापडणार नाही असे एकमेव मैदान. पुढे राजर्षी शाहू खासबाग कुस्त्यांचे मैदान
या नावाने ओळखलं जाणारे! हजारो कामगार सहा वर्षे राबत होते.
अशा या
मैदानाचे उद्घाटन अफलातून कुस्तीने झाले. कुस्ती होती गामा पैलवानचा भाऊ
इमामबक्ष व गुलाब मोहिद्दीन यांच्यात. ही चित्तथरारक लढत इमामबक्षने
जिंकली. कुस्ती शौकिनांनी फेटे उडवून दाद दिली. राजर्षींनी जोपासलेली ही
कुस्ती परंपरा छत्रपती राजाराम महाराज व छत्रपती शाहू महाराज यांनी पुढे
सुरु ठेवण्याचे काम मनापासून केले. या मैदानात राजर्षीच्या काळापासून
म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपावेतो गामा-गुंगपासून युवराज सत्पाल
अशा अनेक नामवंत मल्लांच्या लढती झाल्या. पंजाबातून आलेल्या मल्लावर इथल्या
कुस्तीगिरांनी मात केली. श्रीपत चव्हाण, मल्लाप्पा तडाखे, शिवगौंडा
मुत्नाळे, शामराव मुळीक, श्रीपती खंचनाळे, श्रीरंग जाधव, गणपतराव आंदळकर,
महमंद हनीफ, दादू चौगुले, गणपत खेडकर, हरिश्चंद्र बिराजदार, युवराज पाटील
इ. अनेकांची नावे घेता येतील.
ऑलिपिंक किंवा आतंरराष्ट्रीय
स्तरावरील कुस्तीत कोल्हापूरच्या मल्लांनी महाराष्ट्राचे व देशाचे नाव
उज्ज्वल केले. ज्यात दिनकरराव शिंदे, बी. टी. भोसले, ब्रॉन्झपदक विजेते
खाशाबा जाधव, माणगावे मास्तर यांचा अग्रक्रमाने उल्लेख करावा लागेल. आशियाई
कुस्ती स्पर्धातून कोल्हापूरच्या अनेक मल्लांनी सुवर्णपदके मिळविली.
विष्णू जोशीलकर सारखे अनेक तरुण कुस्तीपटू निर्माण झाले. १ मे १९७९ रोजी
खासबाग मैदान कोल्हापूर महापालिकेकडे सुपूर्त करण्यात आल्यानंतर बर्याच सुधारणा झाल्या.
सध्या
कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ, शिवाजी विद्यापीठ आणि निरनिराळया
तालमी ही परपंरा जोपासण्याचे कार्य करीत आहेत. जुन्या नामवंत मल्लांचे
नव्या मल्लांना मार्गदर्शन मिळत आहे.
शाहू महाराजांना कुस्तीचे मोठे व्यसन ..!!
कोल्हापूरचा गादीवर राज्याभिषेक झाला तेव्हापासून ते ३ ला पहाटे उठून २-३ तास लढती करत असत ..!!
महिन्यातून
२ वेळा ते शिकारीला जात असत...तत्कालीन ब्रिटीश कलेक्टर यांना त्यांचा हा
छन्द खूप आवडत असे,तेसुद्धा त्यांच्याबरोबर शिकारीला जात असत.
शाहू महाराज शिकार करत ती फक्त माजलेल्या वाघांची किंवा अपवाद वगळता कधीकधी जीवावर बेतले कि सांबर किंवा काळवीट याची..!!
एके दिवस रोजचा सराव संपवून राजे व ब्रिटीश कलेक्टर जंगलात शिकारीला गेले...आजचा सावज होता एक वाघ..!!
सकाळचा प्रहर टळून दुपार होत आली..शिकारी मंडळी दबा धरूनच होती..!!
मात्र पुढे त्यांना वेगळेच पाहायला मिळाले..एक पिसाळलेला गहू रेडा सैरावैरा धावत होता...त्याने जंगलात नुसता हैदोस मांडला होता .
राजे व अधिकारी घोड्यावर स्वार झाले व त्याचा पाठलाग करू लागले..
त्या
गहू रेड्याने त्या माजलेल्या वाघाला आपल्या शिंगणे मारून टाकले होते..हे
पाहून ब्रिटीश अधिकारी घोड्या वरून पाय उतार होऊन झाडावर चढायला धावले!!
नेमका हाच फायदा उठवत तो धुंद रेडा त्या ब्रिटीश अधिकारयाकडे आपला मोर्चा वळवत तुफान वेगाने धावत सुटला...
हे
पाहून जातिवंत पैलवान असलेले शाहूराजे स्वत घोड्यावर पायउतार झाले व त्या
घोड्याच्या आडवे गेले..ते ब्रिटीश अधिकारी सुसाट धावत पळत सुटले..,
राजांनी
मोठ्या हिमतीने त्या रेड्याचे शिंग आपल्या दोन्ही हातात धरून त्याला
रेटायचा प्रयत्न केला..रेडा व राजे दोन्हीही चवताळलेले ..!!
राजेंना
मात्र आता राग अनावर झाला..त्यांनी हाताची मुठ आवळली व एक जबरदस्त ठोका
रेड्याच्या डोक्यात मारला..२-३-५-६ असे सलग ठोके बसल्यावर रेडा जागीच चित
पडला.मग राजांनी जवळ पडलेली बंदूक काढून ३ बार त्या रेड्यात उतरवले..!!

हे पाहून तो ब्रिटीश अधिकारी अक्षरश राजेंच्या पाया पडू लागला..!!!
आजही
भवानी मंडप कोल्हापूर येथे हया रेड्याची भुसा भरलेली प्रतिकृती आहे.व
कोणालाही विचारा कि हा रेडा राजांनी कसा मारला? ... उत्तर येईल बुक्कीने
मारला.
चित्रपट
मराठी चित्रपट सृष्टीचे माहेरघर म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. अनेक अजरामर
चित्रपटांची कोल्हापूर मध्ये स्वातंत्र्यानंतरच्या काळात निर्मिती
झाली.चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी प्रभात स्टुडिओ आणि कोल्हापूर चीत्रनगरी
सारखी उत्तम ठिकाणे उपलब्ध आहेत.
कोल्हापूर मराठी चित्रपटांचे माहेरघर
महाराष्ट्रातील
काही शहरे आज कित्येक वर्षे आपल्या खास वैशिष्ट्यामुळे ओळखली जातात.
राजर्षी शाहूरायांची ही करवीरनगरी! आपल्या विविध क्षेत्रातल्या कर्तृत्वानं
केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारताचं भूषण ठरली आहे.
व्यापार,
यंत्रउद्योग, शिक्षण आणि कला कौशल्य इत्यादी उद्योग व्यवसायाप्रमाणेच
चित्रपट व्यवसायालासुध्दा कोल्हापुरात पाऊणशे वर्षाहूनही अधिक परंपरा आहे.
कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी जसा पहिला क्रॅमेरा कोल्हापुरात तयार केला
त्याचप्रमाणे प्रभात फिल्म कंपनी या नामवंत संस्थेने `अयोध्येचा राजा' हा
पहिला दैदिप्यमान बोलपट कोल्हापुरातच तयार केला. पुढे नावारुपाला आलेल्या
पृथ्वीराज, राजकपूर यासारख्या बुजुर्गांनी भालजी पेंढारकर यांच्या
चित्रपटात भूमिका केल्या. कितीतरी कलावंत, तंत्रज्ञ या मातीने
चित्रपटसृष्टीला दिले. त्यातले बरेचजण कोल्हापूरच्या बाहेर आज चित्रपट
सृष्टीत मोलाची भर घालत आहेत. आपल्या प्रतिभा सामर्थ्याने येथील कलावंतांनी
अलौकिक चित्रपट महाराष्ट्राला दिले. `नेताजी पालकर', `थोरातांची कमळा',
`मायभवानी', `नायकिणीचा सज्जा' असे एकापेक्षा एक ऐतिहासिक चित्रपट रसिकांना
सादर करताना शिवरायांचा बालपणापासून ते अखेरपर्यंत त्यांच्या समग्र
जीवनावर छत्रपती शिवाजी हा ऐतिहासिक चित्रपट काढून भालजी पेंढारकरांनी
मराठी चित्रपटसृष्टीतील एक इतिहासच निर्माण केला. त्यांच्या ऐतिहासिक
चित्रपटांप्रमाणेच त्यांची सामजिक चित्रेही रसिकांच्या दीर्घकाळ लक्षात
राहतील अशीच आहेत. `सूनबाई', `मीठ-भाकर', `साधी-माणसं', ही अस्सल मराठी
मातीतील चित्रे मराठी रसिकांच्या काळजाला जाऊन भिडली. बाबूराव पेंटर किंवा
भालजी पेंढारकर काय या कला महर्षींच्या कर्तृत्वाचा आढावा असा सहजासहजी
घेणे म्हणजे कंदिलानं सूर्य दाखवण्यासारखा प्रकार होईल. हे कलामहर्षी
म्हणजे जणू पुढच्या कलावंतांना मार्ग दाखवणारे दीपस्तंभ आहेत. त्यांच्या
चित्रपटात भूमिका करणारी माणसंसुध्दा भूमिका जगणारी माणसं होती.
नानासाहेब
फाटक हे वास्तविक रंगमंचावरचे कलाकार. पण `थोरातांची कमळा' चित्रपटातील
त्यांचा शिवाजी न भूतो न भविष्यति ठरला. चंद्रकांत, मास्टर विठ्ठल,
झुंजारराव पवार, जयशंकर दानवे, ललिता पवार, सुलोचना, सूर्यकांत, जयश्री
गडकर, वसंतराव पहेलवान, बाबूराव पेंढारकर अशी किती नावे सांगावीत? या आणि
त्यांच्याबरोबर कामे करणाऱ्या दुय्यम कलाकारांनी आणि तंत्रज्ञांनी मराठी
चित्रपटसृष्टीत एक युगच निर्माण केले, अशीच नोंद इतिहासाला घ्यावी लागेल.
चित्रतपस्वी
शांतारामबापू यांनी आपला चित्रसंसार जरी मुंबईला थाटला असला तरी
कोल्हापूरचा विसर त्यांना पडला नव्हता. ज्या मातीत आपण सुरुवातीला चित्र
निर्मितीचे धडे गिरवले त्या मातीचे आपण काहीतरी ऋण लागतो याची जाणीव
त्यांना होती आणि म्हणूनच `पिंजरा' या भव्य चित्रपटासाठी त्यांनी
कोल्हापूरचीच निवड केली. डॉ. लागू सारखा एक गुणी कलाकार त्यांनी
चित्रसृष्टीला दिला.
निर्मिती दिग्दर्शनाबाबत दिग्दर्शक किती जागरुक
असावा लागतो याची प्रचिती आम्हा लहान थोर कलाकारांना चित्रीकरणाच्या वेळेस
नेहमीच येत असे. माझी त्यात फौजदारांची तशी छोटी भूमिका, पण माझा मेकअप
विशेषत: मिशा व्यवस्थित लागलेल्या आहेत की नाहीत हे शांतारामबापू स्वत:
मेकअप रुममध्ये येऊन पहात असत. बऱ्याच वेळेला त्यांनी माझ्या मिशा स्वत:
लावून मेकअपमनची चूक त्याला समजावून दिली आहे. मला तर मनापासून असे वाटते,
शांतारामबापूंच्याकडे काम केलेला कलाकार पृथ्वीतलावर कुठेही गेला तरी
अभिनयात ते तसूभरही कमी पडणार नाही.
भालजींच्या प्रमाणे अनंत माने,
गोविंद कुलकर्णी हे निर्माते - दिग्दर्शकही कोल्हापूरात स्थिर झाले आणि
त्यांनी उत्कृष्ट चित्रपट निर्मितीची परंपरा जोपासली. तमाशापट काढणारे अनंत
माने असा शिक्का त्यांच्या माथी उगीचच बसला. त्यांनी उत्कृष्ट तमाशापट तर
दिलेच पण मराठमोळा तमाशा रजतपटावर आणून त्यांनी या अस्सल मराठी मनोरंजनाला
एक दर्जा प्राप्त करुन दिला.
`काय हो चमत्कार' यासारखा चित्रपट मराठी
प्रेक्षकांना ग्रामीण वातावरणात घेऊन जातो. चंद्रशेखर यांचं काव्यच त्यांनी
रुपेरी पडद्यावर मूर्तिमंत साकार केले आहे.
`सांगू कशी मी', `असला नवरा
नको गं बाई', `तोतया आमदार', `बंधन', `झेड. पी.', अशी समस्याप्रधान चित्रे
देऊन माने यांनी स्वत:च्या प्रतिभेचा एक खास ठसा उमटवला. `एक गांव बारा
भानगडी', `सवाल माझा ऐका', `केला इशारा जाता जाता' हे तर त्यांचे
अविस्मरणीय महोत्सवी चित्रपट. अरुण सरनाईक सारखा एक उमदा नायक त्यांनीच
चित्रपटसृष्टीला दिला. लीला गांधी, उषा चव्हाण, उषा नाईक यांना नायिका
त्यांनीच बनविले आणि माझ्यासह कोल्हापूरातील कितीतरी दुय्यम कलाकार
नावारुपास आणले. वयाच्या ऎंशी वर्षापर्यंत तब्बल साठ चित्रपट दिग्दर्शन
करणारे अनंत माने हे ऐकमेव दिग्दर्शक असावेत असे धाडसाचे विधान मी केले तर
ते चुकीचे ठरु नये.
`बारा वर्षे सहा महिने तीन दिवस', `वारणेचा वाघ',
`सुगंधी कट्टा', `पाच नाजूक बोटे', `दगा' इत्यादी दर्जेदार चित्रपट
पेंटरांनी दिले. यशवंत दत्त सारखा एक प्रतिभाशाली कलाकार त्यांनीच प्रकाशात
आणला. उत्कृष्ट चित्रकार आणि उत्तम तंत्रज्ञान यांचा संयोग वसंत पेंटर
यांच्यात असल्याने त्यांची सर्वच चित्रे लोकप्रिय ठरली. शांतारामबापूंपासून
ते कमलाकर तोरणे यांच्यापर्यंत सहदिग्दर्शक म्हणून उमेदवारी करीत असलेले
गोविंद कुलकर्णी हे आणखी एक कर्तबगार निर्माते दिग्दर्शक. त्या
दिग्दर्शकाला हाताशी धरुन दादा कोंडके यांनी सुरुवातीचे `सोंगाड्या', `एकटा
जीव सदाशिव' हे चित्रपट निर्माण केले. त्याशिवाय `चुडा तुझा सावित्रीचा',
`बन्या बापू', `मुरळी मल्हारी रायाची', `दैवत', `मर्दानी', `शपथ तुला
बाळाची' इत्यादी अनेक चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन गोविंद कुलकर्णी
यांनी केले.
`बाई मी भोळी', `औंदा लगीन करायचं', `बोला दाजिबा' अशा काही
ग्रामीण चित्रपटांची निर्मिती कृष्णा पाटील या अनुभवी दिग्दर्शकाने केली.
पण नंतर मात्र त्यांची चित्रनिर्मिती खंडित झाली. आघाडीचे चित्रपटकवी असा
नावलौकीक मिळविलेल्या जगदीश खेबुडकरांचे देखील हेच घडले. `देवघर' या
कौटुंबिक चित्रपटाची निर्मिती करुन त्यांनी निर्मिती क्षेत्रात धाडसाने
पाऊल टाकले खरे, पण चित्रपट चांगला असूनही आर्थिक अपयश आल्यामुळे त्यांच्या
चित्रपट निर्मितीची वाट अजून तरी बंद आहे.
सुधीर ससे, शांताराम चौगुले,
पितांबर काळे, रविंद्र पन्हाळकर, भास्कर जाधव, सतिश रणदिवे, यशवंत भालकर
यासारखी मंडळी आपापल्या परीने चित्रपट निर्मितीचा प्रयत्न करीत आहेत. सर्व
नामावलीत आणखी एका बुजुर्ग व्यक्तीचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे आणि ती
व्यक्ती म्हणजे दिनकर द. पाटील. मास्टर विनायकांचे हे शिष्य लेखक आणि
दिग्दर्शक म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत अजूनही आपला खास ठसा उमटवीत आहेत.
`रामराम पाव्हणं' पासून अलिकडच्या `शिवरायांची सून' पर्यंत त्यांनी मराठी
चित्रपटसृष्टीला अनामोल चित्रांची भेट दिली आहे.
चित्रपटगृहे
- INOX* सिनेमा रिलायन्स मॉल
- पीव्हीआर सिनेमा DYP city Mall
- अयोध्या
अयोध्या चित्रपटगृहाचे पूर्वीचे नाव राजाराम.. याचे बांधकाम छत्रपती राजाराम महाराजांच्या सूचनेनुसार श्री. भोजराज दादासाहेब निंबाळकर यांनी १९३७ साली केले. त्याचे नामकरण १२ एप्रिल १९८६ साली अयोध्या असे करण्यात आले. सध्या या चित्रपटगृहाची क्षमता, बाल्कनी २५४, स्टॉल ३९४ आणि फर्स्ट १०० अशी एकूण ७४८ आहे. येथील ध्वनियंत्रणा ही अत्याधुनिक डॉल्बी तंत्रज्ञानाने युक्त अशी आहे.
- ऊर्मिला
ऊर्मिला चित्रपटगृहाचे पूर्वीचे नाव लक्ष्मी. आणि त्याच्याच शेजारी सरस्वती हे चित्रपटगृह. कोल्हापुरातील ताराबाई रोडवर असणारी ही दोन चित्रपटगृहे. ऊर्मिला अर्थात जुन्या लक्ष्मी सिनेगृहाचे बांधकाम नाना बेरी यांनी केले. याचे पूर्वीचे मालक श्री नितीन रेड्डी. त्यांच्याकडून १९९९ साली ’अयोध्या’ चित्रपटगृहाचे मालक दादासाहेब निंबाळकर यांनी ते विकत घेतले आणि त्याचे नाव ऊर्मिला केले. ऊर्मिला आणि सरस्वती ह्या चित्रपटगृहांचा बाहेर जाण्याचा रस्ता एकच आहे.
- सरस्वती
- व्हीनस
६ जून १९३१ साली तय्यब अली बोहरा यांनी याचे बांधकाम केले. कोल्हापुरात बांधले गेलेले हे पहिलेच चित्रपटगृह. ह्याच तय्यब अली यांनी व्हीनसच्याच शेजारी अप्सरा हेही सिनेगृह बांधले. आजतागायत दोन्ही चित्रपटगृहांची मालकी बोहरा कुटुंबीयांकडेच आहे. व्हीनसमध्ये ७८३ प्रेक्षक आरामात चित्रपट पाहू शकतात. जिथे व्हीनस उभे आहे तिथे पूर्वी दलदलीची जागा होती. आणि आजही जेव्हा पंचगंगा नदीला जोरदार पूर येतो तेव्हा इथे जाणारा मार्ग बंद पडतो. गेले ५ वर्षे येथे केवळ दक्षिणी भारतीय भाषांतील चित्रपट प्रदर्शित केले जातात. "आर्या" हा इथे आलेला पहिला तेलुगू सिनेमा. ह्या सिनेमाने या चित्रपटगृहात सिल्व्हर ज्युबिली करण्याइतके यश मिळवले. कोल्हापुरात २५ आठवडे चाललेला हा एकमेव तेलुगू सिनेमा. कोल्हापुरात राहणार्या दाक्षिणात्य भारतीय लोकांना तिकडचे सिनेमे पाहण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजेच व्हीनस.
- अप्सरा
. कोल्हापुरात लक्ष्मीपुरीत शेजारी शेजारी ५ चित्रपटगृहे आहेत आणि स्टेशन रोड वर ५. त्यातीलच एक "अप्सरा".. अप्सरा आणि व्हीनस ह्या दोन्हीचे मालक एकच. श्री. तय्यब अली बोहरा. १९४८ च्या सुमारास हे चित्रपटगृह बांधले गेले. याचे पूर्वीचे नाव होते अन्वर. कारण तय्यबअलींच्या तिसर्या मुलाचे नाव होते अन्वर. नंतर याचे नाव झाले लिबर्टी आणि आता याचे नाव आहे अप्सरा..अप्सराची प्रेक्षकक्षमता आहे ६७३.
- उषा
१४ जानेवारी १९४७ रोजी नगीनदास शहा यांनी हे चित्रपटगृह सुरू केले. नागीनदास यांच्या दुसर्या मुलीच्या नावानेच (उषा) हे चित्रपटगृह ओळखले जाते. सर्वाधिक हिट चित्रपट देणार्या कोल्हापुरातील काही मोजक्या चित्रपटगृहापैकी एक म्हणजे उषा. "हम आपके है कौन" इथे ६० आठवड्याहून अधिक चालला. इथे लागलेले काही सुपरहिट चित्रपट म्हणजे.. लावारीस, बर्निंग ट्रेन, शोले, लगान, सत्या, तेजाब इत्यादी. या चित्रपटगृहाची प्रेक्षकक्षमता आहे ७८६.
- प्रभात
लक्ष्मीपुरीत असणार्या ५ चित्रपटगृहापैकी एक म्हणजे प्रभात. दादासाहेब रुईकर यांनी १९४० साली प्रभात बांधले. याचे प्रेक्षकक्षमता आहे ५३१. २००३ साली प्रभातचे नूतनीकरण झाले. चित्रपटगृह संपूर्णपणे वातानुकूलित करण्यात आले. पारंपरिक फर्स्ट, स्टॉल आणि बाल्कनी अशी आसनव्यवस्था बदलून फर्स्ट, स्टॉल, ड्रेस सर्कल आणि बाल्कनी अशी करण्यात आली. मराठीचे सुपरस्टार दादा कोंडके यांचे ७ सिल्वर ज्युबिली चित्रपट रुईकर यांच्या प्रभात आणि रॉयल मध्येच लागले.
- रॉयल
दादासाहेब रुईकर यांचे आणखी एक चित्रपटगृह म्हणजे रॉयल. प्रभातच्या पाठीमागच्या बाजूला वसलेले हे चित्रपटगृह. रॉयलचा बाहेर जायचा मार्ग प्रभातमधूनच आहे. रॉयलची आसनक्षमता ५१३ आहे. याची बांधकाम १९३० चे आहे. २००५ साली या चित्रपटगृहाचे नूतनीकरण करण्यात आले.
- शाहू
कोल्हापुरातील मराठी चित्रपटांचे माहेरघर म्हणजे शाहू. गेली कित्येक वर्षाची मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याची परंपरा आजही तेवढ्याच दिमाखात सुरू आहे. १५ मे १९४७ साली या चित्रपटगृहाचे ओपनिंग झाले. शाहू महाराज व्हीनसमध्ये चित्रपट पाहायला जात असत. पण काहीतरी कारणाने खटका उडाला आणि महाराजांनी स्वतःचे एक चित्रपटगृह बांधले. आणि त्यांच्याच नावावरून याला शाहू नाव पडले.
- पद्मा
कोल्हापूरच्या राजकुमारी पद्माराजे यांच्यावरून ह्या चित्रपटगृहाचे नाव " पद्मा" असे पडले. १९४० साली श्री. इंगळे यांनी या चित्रपटगृहाची उभारणी केली. फर्स्ट, स्टॉल, एक्झिक्युटीव आणि बाल्कनी अशी आसनव्यवस्था इथे आहे. इथे एकूण ६९६ प्रेक्षक चित्रपट पाहू शकतात. इथे सॅटेलाईट प्रोजेक्टर आहे.
- पार्वती (मल्टिप्लेक्स) - तीन पडदे असलेले गांधीनगरातील चित्रपटगृह
- (गणेशसह)
- संगम
अन्य
कोल्हापूरची शुद्ध चामड्याची चप्पल तिच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारासाठी आणि टिकाऊपणासाठी जगप्रसिद्ध आहे. ही चप्पल बनवताना खिळे वापरले जात नाहीत.हि चप्पल पूर्णपणे चामड्या पासून बनवली जाते.कोल्हापुरी चपलाला GI मानांकन मिळाले.(२०१९) कोल्हापूरी साज, चपला हार इत्यादी दागिने प्रसिद्ध आहेत.
रंगभूमी
- कोल्हापूरमध्ये संगीतसूर्य केशवराव भोसले नावाचे नाट्यगृुह आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या इचलकरंजी मध्ये घोरपडे नाट्यगृह देखील आहे.
कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यक्ती
राजर्षी छत्रपती शाहू महाराज
भालजी पेंढारकर, भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक
बाबुराव पेंटर, (बाबुराव कृष्णराव मेस्त्री), प्रसिद्ध दिग्दर्शक)
व्ही. शांताराम, मराठी आणि हिंदी चित्रपट निर्माता आणि संचालक
सूर्यकांत मांडरा, मराठी चित्रपट अभिनेता
चंद्रकांत मंदारे, मराठी चित्रपट अभिनेता
लता मंगेशकर, सुप्रसिद्ध भारतीय गायक
आशा भोंसले, प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांची बहीण
सुरेश वाडकर, सुप्रसिद्ध भारतीय गायक
अरुण सरनाईक, मराठी चित्रपट अभिनेता
खाशाबा जाधव, 1 9 52 हेलसिंकी गेम्समध्ये भारताचे प्रथम वैयक्तिक ऑलिंपिक सुवर्णपदक विजेते कास्य पदक जिंकले.
श्रीमती खंननळे, पहिले हिंद केसरी
दादू चौगुले, हिंद केसर
विनोद चौगुले, महाराष्ट्र सीझर
जयंत नारळीकर, अॅस्ट्रोफिजिकल
डॉ वसंत गोवारीकर, वैज्ञानिक
रणजित देसाई, मराठी लेखक (श्रीमंत योगी, स्वामी)
शिवाजी सावंत, मराठी लेखक (मिथूनानं)
कोल्हापूर
हे पंचगंगा नदीच्या काठावर महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण-पश्चिमेस वसलेले
आहे. कोल्हापूर हे रस्ता, ट्रेन आणि विमानतळाद्वारे चांगले जोडलेले आहे.
खाली कोल्हापूर शहरासाठी प्रवासी मार्गदर्शक आहे.
कोल्हापूर रेल्वेने:
"छत्रपती
शाहू महाराज टर्मिनस" नावाचे कोल्हापूरचे मोठे रेल्वे स्टेशन आहे. या
रेल्वे स्थानकातून मुंबई, बेंगळुरू आणि नवी दिल्लीकडे जाणारे आणि येणाऱ्या
अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत. 
कोल्हापुरात येणाऱ्या सर्व गाड्यांचे वेळापत्रक तुम्हाला खालील लिंकवर मिळू शकेल.
https://indiarailinfo.com/arrivals/kolhapur-scsmt-kop/77
Express Railway:
S.No
Arrival Train no. Express Railway Express
Railway Train no. Departure
1. 21-40 1029 Mumbai-Kolhapur- Mumbai Koyana Express 1030 7-50
2. 8-50 1011 Mumbai-Kolhapur-Mumbai Mahalaxmi Express 1012 19-05
3. 14-05 7384 Kolhapur-Gondia- Kolhapur Maharashtra Express 7383 14-10
4.
6-35 7303 Mumbai-Kolhapur-Mumbai Sahyadri
Express 7304 22-30
5.
22-30 2479 Miraj-Nijamuddin-Miraj From Miraj
junction 2489 22-25
6.
21-40 1017 Kurla-Bangalore-Kurla From Miraj
junction 1018 9-45
Passenger Railways:
S.No
Arrival Train no. Passenger
Railway Train no. Departure
1.
20-05 315 Pune - Kolhapur - Sasvad
road 316 4-45
2.
13-10 313 Miraj- Kolhapur -
Miraj 314 15-30
3.
09-55 317 Satara - Kolhapur -
Pune 318 16-15
4.
18-00 309 Miraj - Kolhapur -
Sangli 320 18-40
Railway General inquiry Phone No - 131, Reservation Inquiry Phone No - 651489
Time of reservation
Monday to Saturday
8:00 to 14:00 and 14:30 to 20:00
Sunday 8:00 to 14:00
कोल्हापूर रोड मार्गे:
कोल्हापूर
हे मुंबई-बेंगळूरू महामार्गाद्वारे (एनएच ४) चांगले जोडलेले आहे.
कोल्हापुरात सेंट्रल बस स्टँड (सीबीएस) आहे जिथे राज्य परिवहन (एसटी) बसेस
येत आहेत आणि मुंबई, पुणे आणि बेंगलुरुसह महाराष्ट्राच्या विविध शहरांमध्ये
सोडत आहेत. 
कोल्हापुरात एसटी बसची टाइम टेबल खालील अधिकृत एमएसआरटीसी साइटवर मिळू शकेल.
https://msrtc.maharashtra.gov.in/
एसटी
स्टँड आणि रेल्वे स्थानक हे कोल्हापूर शहराच्या मध्यभागी आहे आणि
एकमेकांपासून 10-15 मिनिटांच्या अंतरावर आहे. मध्यरात्री आणि पहाटे 12
पर्यंत आपल्याला दोन्ही ठिकाणाहून ऑटो रिक्षा मिळेल.
कोल्हापूर हवाई मार्ग:
कोल्हापुरात "छत्रपती राजाराम महाराज विमानतळ" नावाचे विमानतळ आहे जे
मुख्य शहरापासून काही अंतरावर आहे (कोल्हापूर शहरापासून 10 किमी).
कोल्हापूर विमानतळ आता कार्यरत आहे. नुकतीच मुंबई, बेंगळुरू आणि तिरुपती
बालाजीला दररोज सुरू झालेल्या काही उड्डाणे आहेत. पण त्या खूप जास्त नाहीत
आणि त्यामुळे तुम्हाला उड्डाण प्रवास करण्याचा अनुभव घ्यायचा नसेल तर आज
तरी त्यावर न अवलंबून राहणे चांगले.
भविष्यात कोल्हापूर विमानतळावरून नियमित उड्डाणे होतील आणि यामुळे स्थानिक व्यवसायात देखील वाढ होईल.
मुंबईहून कोल्हापूरला कसे पोहोचाल:
कोल्हापूर
हे मुंबईपासून 395 किमी अंतरावर आहे. साधारणत: जर मी मुंबईहून
कोल्हापूरकडे जाण्याचा विचार करायचा असेल तर वेळ वाचवण्यासाठी मी रात्री
प्रवास करणे पसंत करतो. मी बहुधा महालक्ष्मी एक्स्प्रेस (ट्रेन नंबर १
१७४११) पसंत करतो जी दादरहून रात्री ८.३० वाजता निघते , ठाणे ला ९ वाजता
येते आणि कोल्हापूर ला सकाळी ७.३० वाजता पोहचते.. ही एक स्लीपर कोच
ट्रेन आहे म्हणून आपला प्रवास खूप सोयीस्कर होईल.
जर आपणास रेल्वेचे
आरक्षण मिळाले नाही तर स्लीपर ट्रॅव्हल बस देखील एक सोयीचा पर्याय आहे जो
रात्रीच्या वेळी मुंबईच्या विविध ठिकाणांहून (दादर / पुणे / वाशी) प्रारंभ
होतो आणि पहाटे ५-६ च्या दरम्यान कोल्हापुरात पोहोचेल. तिथून आपण आपल्या
इच्छित ठिकाणी पोहोचण्यासाठी स्थानिक ऑटो रिक्षा घेऊ शकता.
पुण्याहून कोल्हापूरला कसे जावे:
कोल्हापूर हे पुण्यापासून 225 कि.मी. अंतरावर आहे. पुण्यापासून
कोल्हापूरला रेल्वेने जाणा-या मार्गावरुन जाण्यासाठी थोडासा वेळ लागेल. मी
साधारणपणे एसटी बस पर्यायाला प्राधान्य देतो ज्यासाठी पुण्याहून
कोल्हापूरकडे ५ तासात पोहोचता येते. स्वारगेट स्थानकापासून एसटी बसची
कोल्हापुरात जाण्याची चांगली वारंवारता आहे आणि दर अर्ध्या तासाने तुम्हाला
कोल्हापूरला जाणारी बस मिळेल.
तसेच आयटी लोकांसाठी एसटी विभागाने
थेट हिंजवडी ते कोल्हापूरला जाण्यासाठी बस सुरू केल्या आहेत. ही बस हिंजवडी
फेज -3 कार्यालयाकडून दर शुक्रवारी संध्याकाळी 4 ते 5 या दरम्यान सुटतात
आणि कोल्हापूरला रात्री 10 ते 10.30 वाजता पोहोचतात.
सोमवारी पहाटे
कोल्हापूरहून त्याच बसेस सुटतात आणि सकाळी 10 ते 10.30 वाजेपर्यंत
हिंजवडीला पोहोचेल ज्यायोगे लोक थेट कार्यालयात जाऊ शकतील. पुणे आयटी
क्षेत्रात काम करणारे कोल्हापुरातील बरेच लोक हा सोयीस्कर पर्याय पसंत
करतात.
कोल्हापूर शहरात प्रवास:
शहरातील रिक्षा ही
स्थानिक वाहतुकीसाठी सर्वात सामान्य आणि आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या आहेत.
तसेच, कोल्हापूर महानगरपालिका (केएमसी) चालवणा बस देखील पर्यटक पकडू शकतात
परंतु आपल्याला अचूक जागा व बस क्रमांक माहित असणे आवश्यक आहे.
टॅक्सी काही ठिकाणी उपलब्ध आहेत पण सर्वत्र नाहीत. अलीकडे कोल्हापुरात ओला
कंपनी त्यांची सेवा सुरू केली आहे परंतु अद्याप ती लोकप्रिय नाही.
कोठे रहाल » हाँटेल्स आणि उपहारगृह |
S.No Name Telephone No.
1. Shalini Palace, Ashoka 2630401 Vo 04
2. Pearl 2650451 Vo 56
3. Opel 2536969, 2537044
4. Ashni 2680040
5. Panchashil 2537517, 2537760
6. Tourist 2650421, 2650422
7. International 2536641 Vo 44
8. Ayodhya 2652293
9. Woodland 2650941
10. Lisha 2651411, 2650991
11. Elegant 2653766, 2651641
12. Vrushali 2664631, 2651337
13. Ashoka prestige 2537232
14. Cassel 2520343
15. Samrat 2651301
16. Triveni 2657947, 2656120
17. Anugraha 2666976, 2653451
18. Victor Palace 2537001 Vo 8
19. Aishwarya 2661144
20. Padma, Tarabai Park 5689435
21. Pavilion 2654742, 2652751
22. Vijayraj 2651124
23. Rajat 2648393, 2658080
24. Meera 2652666
25. Maharaja 2650829
26. Hindusthan 2640851
27. Avanti 1644841
खाद्यसंस्कृती
कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध शहर आहे कि ज्याला एक सांस्कृतिक वारसा आहे.कोल्हापूर आपल्या रंगबेरंगी पोशाख आणि कोल्हापुरी चप्पल यासोबतच आणखीन काही गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. येथील खाण्या पिण्यापासून फिरण्यापर्यंतच्या सर्वच गोष्टी खास आहेत.येथे येणाऱ्या पर्यटकांचे येथील संस्कृतीची सुंदरता पाहून मनच भरत नाही.महाराष्ट्रातील या सुंदर शहरामध्ये अशा बरयाच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आकर्षक वाटतील.कोल्हापूर एक प्राचीन शहर आहे कि ज्याच्यावर काही काळापूर्वी छत्रपती भोसले घराण्याचे शासन होते. स्थळ कोणतीही असो पण त्या ठिकाणची ट्रीप स्मरणात राहील अशी मजेदार होण्यासाठी त्या ठिकाणचे सर्वात प्रसिद्ध आणि रुचकर खाद्य पदार्थ खाण्यास कधीच विसरायचे नाही.आणि विषय जेव्हा कोल्हापुर चा होतो तर त्याठीकाव्ची मिसळ कोण विसरेल .महाराष्ट्रातील ही प्रसिद्ध मिसळ कोल्हापुर मध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे मिळते जसे की बावडा मिसळ, फडतरे मिसळ , चोरगे मिसळ , हॉटेल साकोलीमिसळ ,खासबाग मिसळ आणखीन अशा भरपूर आहेत. ही गोष्ट झाली शाकाहारी पदार्थांच्या खाण्यासंदर्भात आता आपण मांसाहारी खाद्य पदार्थांच्या संदर्भात पाहू तांबडा रस्सा (मटणाचे सूप ),पांढरा रस्सा (मटणाचे सूप फक्त पांढऱ्या रंगाचे ),मटणाचे लोणचे ,खिमा राईस बॉल्स कोल्हापुरात आलेली प्रत्येक व्यक्ती या पदार्थांची चव घेतल्याशिवाय राहत नाही.
कोल्हापूर ठिकाण तांबडा आणि पांढरा रस्सा, मिसळपाव, वडापाव या खाद्यपदार्थांसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. तसेच, कोल्हापूरची 'कोल्हापूरी चप्पल' ही खुप प्रसिद्ध आहे त्याला कोल्हापुरी चप्पल असे म्हंटले जाते .आपुलकीची भावना ही इथल्या माणसांच्याकडे आहे. येथे मिसळपाव हा प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे. तसेच खाऊ गल्लीत राजाभाऊंची भेळ प्रसिद्ध आहे.तसेच बावडा मिसळ, फडतरे, चोरगे, हॉटेल साकोली अशी अनेक मिसळपावची ठिकाणे प्रसिद्ध आहेत.मिरजकर तिकटी,गंगावेस येथे दुध कट्ट्यावर उत्तम प्रकारचे ताजे दुध मिळते.कोल्हापूरची खाद्यसंस्कृती म्हटलं की डोळ्यांपुढं सर्वप्रथम येतो तो तांबडा रस्सा-पांढरा रस्सा. नंतर आठवते ती झणझणीत कोल्हापुरी मिसळ. कोल्हापुरी खाद्यजीवनाचं ठळक वैशिष्ट्य म्हणजे मांसाहार. इथल्या आहारात वेगवेगळ्या मांसाहारी पदार्थांची रेलचेल असते. याच खाद्यसंस्कृतीचा हा परिचय, काही शाकाहारी पदार्थांसह.कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिण भागातलं मोठं शहर. इथलं महालक्ष्मी अंबाबाईचं मंदिर हे देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक. पंचगंगा इथली प्रमुख नदी. शहराच्या आसपास पन्हाळा, गगनबावडा, नृसिंहवाडी, खिद्रापूर, विशाळगड, राधानगरी, दाजीपूर अभयारण्य आदी ठिकाणं आहेत.लवंगी मिरची आणि तमाशा यासाठी विख्यात असलेल्या कोल्हापुरातला तांबडा रस्सा व पांढरा रस्साही प्रसिद्ध आहे.
कोल्हापूर = मांसाहारी जेवण प्रकारचे गाव असे जे समीकरण तयार झाले आहे
त्याला हल्ली बर्याच शाकाहारी हॉटेल्सनी चांगलाच छेद दिला आहे. केवळ
शाकाहारी [कोल्हापूरी भाषेत "शुद्ध शाकाहारी"] जेवण देणार्या हॉटेल्सची
संख्या लक्षणीय झाली आहे.
कोल्हापुरातली खादाडी
प्रसिद्ध हॉटेल्स / रेस्टॉरंटस
1. हॉटेल राजपुरुष
त्यांच्याकडे मुक्काम / लॉज सुविधा तसेच रेस्टॉरंट देखील आहे. इथली अमर्यादित थाळी खूप चवदार असते आणि कर्मचारी वर्ग तुम्हाला अमर्यादित भोजन वढताना हात आखडता घेत नाहीत.
"राजपुरुष" चे नाव चांगलेच प्रसिद्ध झाले आहे, ते त्यांच्या शाकाहारी ताटातील वाट्यांच्या संख्येमुळे. ताट समोर आल्यानंतर गिर्हाईक "देवा, आता यातील काय आणि किती खायचे ?" असाच विचार करतो. दुर्दैवाची गोष्ट अशी की त्यातील निम्म्याहून जेवण ताटात तसेच राहते. विशेषतः चार सदस्यांचे एक कुटुंब तिथे जेवायला आले आणि त्यानी चार ताटे मागविली तर दोन मुलांसाठी आलेल्या ताटातील जवळपास ७५% पदार्थ स्पर्श न लागता पडून राहतात.व्यवस्थापन काही करत नाही हे तर दिसल्येच कारण या हॉटेलची ख्याती पदार्थांमुळेच झाली आहे.
• गुलाबजामुन, हलवा, बासुंदी वगैरे या गोड पदार्थासाठी अतिरिक्त शुल्क आहे. आपण शाकाहारी असाल तर एकंदरीत हा चांगला पर्याय आहे.
• अमर्यादित शाकाहारी थाळीची किंमत 200 रुपये होती. (गोड समाविष्ट नाही).
• कार पार्किंगची जागा मर्यादित आहे परंतु दुचाकी वाहन पार्किंगसाठी जागा उपलब्ध आहे.
२. हॉटेल निलेश
५. हॉटेल ओम गणेश (पन्हाळा)
जर तुम्ही पन्हाळा गडाला भेट देणार असाल तर ह्या हॉटेलला नक्की जावा. उत्तम पांढरा, तांबडा रस्सा , मटण थाळी आणि ते पण वाजवी दरात !
हॉटेल एकदम साधे आहे पण फॅमिली ला घेऊन जाऊ शकता. हॉटेल हे वीर शिव काशीद पुतळापासून जवळच आहे
माझ्या माहितीतील कोल्हापूरातील काही हॉटेल्स:-
व्हिक्टर
पॅलेस, रुईकर कॉलनी, हॉटेल वृशाली,कदमवाडी, हॉटेल पेवेलीयन , शाहुपुरी;
आमराई, महावीर गार्डन जवळ, कावळा नाक्याचे हॉटेल पर्ल ,राजारामपुरीमध्ये
जनता बझार समोरचे 'निसर्ग' हि हॉटेल दर्जा राखून आहेत. ताराबाई पार्क हा
कॉलेज कुमारांचाचा अड्डा. इथे खट्टा-मीठा तर आहेच..पण त्याच्या समोरच
ला-कर्टा म्हणुन होटेल आहे..पंजाबी डिशेस छान...तिथूनच स्टँडकडे जाताना,
वाटेत वुडहाउस लागते.भाकरी-भाजी, वांग्याचे भरीत वैगेरे मेनू असतो.एकदम
झकास. याशिवाय ओशो (मंगळवार पेठ), साहिबा ( स्टेशन रोड), अयोध्या (
ताराबाई पार्क), वुड्लँड (नागाळा पार्क ), साई प्रसाद (कावळा नाका ) .कामत
होटेल मधे स्पेशल काही नाही. आगदीच पर्याय नसेल तरच जावे. "गोकुळ" साऊथ
इंडियन आहे.तेथील गर्दी अंगावर येते.केवळ प्रवाशांसाठी ते उपयुक्त आहे. खास
प्लेट वा डिशसाठी ते ओळखले जात नाही.स्टँडसमोर शालीमार आणि सम्राटमधे थाळी
बरी मिळते. टाकाळ्यातील रामकृष्णमध्ये उत्तम शाकाहारी जेवण मिळते.याशिवाय
पार्वती टॉकीजच्या जवळ तसेच दसरा चौकात बासुरी हॉटेल
मांसाहारासाठी :
१ )महादेवप्रसाद , दौलत - मंगळवार पेठ (कुणालाबी ईचारा..)
२ ) पऱख , रसिका गार्डन- मार्केट यार्ड जवळ.
३) वामन गेस्ट हाऊस (मासे)- शाहुपुरी.
४ ) शेतकरी- फुलेवाडी. रन्काळ्याकडून फुलेवाडीला जाताना वाटेत आहे.
५
) राजारामपुरी ३ री गल्ली इथल्या सायबा इथल्या सुरमई थाळीमध्ये सुरमई
फ्राय, गोलमा,(गोलमा हा खास कोल्हापुरी शब्द आहे असं मी गृहित धरलंय) मच्छी
करी, तिसर्याचं कालवण, आणि वडे यांच्याबरोबर भात आणि सोलकढी बरोबर सुकट
चटणी असा सॉल्लिड मेनु असतो!
६ ) हॉटेल आनंद भवन- शाहूपुरीत चौथ्या गल्लीत आहे हे. मांसाहारी विभाग रात्री सुरु असतो. दिवसा फक्त शाकाहारी.
७
) मटण खायचे असेल तर "कृष्णा" ला जा एकदा. आदित्य कॉर्नरकडून दाभोळकर
कॉर्नरला जाताना उजव्या हाताला वाटेत लागते. किंवा मग शिवाजी पेठेतल्या
कुठल्याही घरगुती खानावळीत जा.
८) कोल्हापुरात जर मटण आणि तांबडा
पांढरा खायचा असेल, तर मंगळवार पेठेला पर्याय नाही. दौलत, रामदूत, मेघदूत,
आनंद प्रसाद, महादेव प्रसाद, समाधान, आणि असंख्य घरगुती खानावळी. मटण खाव
तर इथच.ओपलच मटण चांगले आहे.पण तांबडा- पांढरा अनलिमिटेड नाही. मंगळवार पेठ
सोडून जर कुठे चांगली हॉटेल्स असतील तर ती शनिवार पेठेत खासकरून निलेश.
९
) कोल्हापुरात टाकाळा चौकात नवीन हॉटेल झाले आहे. Lava Rocks Inn नावाचे.
इथे चिकनचे भरपूर प्रकार मिळतात जे कोल्हापुरात कोठेही मिळत नाहीत. असे
बरेच पदार्थ आहेत की जे कोल्हापुरात कोठेही मिळत नाहीत. उदा. चिकन
shawarma, veg shawarma, चिकन सबमरीन, veg सबमरीन. तुम्ही एकदा भेट द्याच.
तसेच फुल्ल चिकनचे बरेच प्रकार उपलब्ध आहेत.
१०. हॉटेल कृष्णा, रविवार पेठ
११. हॉटेल मालन, रविवार पेठ
१२. हॉटेल रेवती, बालिंगा रोड
१३. हॉटेल सम्राट, फुलेवाडी
१४. हॉटेल गंधार , शिवाजी चौक
१५. हॉटेल रामदूत, न्यू महाद्वार रोड
१६. हॉटेल बाळदूत, मंगळवार पेठ
१७. हॉटेल माणिक, साकोली कोरनर
१८. हॉटेल मनीष, अप्सरा चित्रपटगृहाजवळ, शाहूपुरी
१९. साळोखे'ज हॉटेल तांबडा-पांढरा, शिवाजी पार्क
२०. हॉटेल राजधानी, मुक्त सैनिक वसाहत
२१. हॉटेल परख, मुक्त सैनिक वसाहत
२२. हॉटेल करवीर किचन, मंगळवार पेठ
२३. हॉटेल राहुल, NH-४ ,टोप संभापूर
२४ ) हॉटेल राहूल , मिनी वसंत , तांबडा पांढरा रस्सा, ताराबाई रोड, रंकाळा ,वेळ सयंकाळी 7 ते 10
प्रसिद्ध नाश्ता सेंटर
खाद्यपदार्थ
१. राजा भाऊ भेळ
कोल्हापुरातील सर्वात जुन्या व प्रसिध्द भेळेपैकी एक. भवानी म॑डपातील राजा भाऊ भेळ बद्द्ल मी पामराने काय सा॑गावे ? जावे आणी खावुन यावे. आता म॑डपातील जागा बदललेली आहे पण भेळ तीच आहे. हे हॉटेल खासबाग मैदानाजवळील खाऊ गल्लीत आहे.
जर
आपण कोल्हापूरातून भेळ घेउन बाहेर-गावी जाणार असाल आणि पार्सल घ्यायचे
असेल तर ते 8 ते 15 दिवस व्यवस्थित राहणारी भेळेची पॅकेजेस देतात. आपण त्या
भेळेला हवे तेव्हा कसे तयार करू शकतो याबद्दल मालक स्वतःच माहिती देतात.
इतके फ्लेवर्स आहेत त्यांच्याकडे कि
रोज एक फ्लेवर खावा म्हटला तरी एक महिना निवांत निघून जाईल आणि रात्री
१.३० वाजता जरी गेल तरी भेल मिळते..
राजाभाऊ नंतरची आवडती भेळ म्हणजे राजकमल.
कोल्हापूरातल्या मिसळी हा समस्त कोल्हापुर करांच्या जिव्हाळ्याचा विषय हे घ्या त्यांचे पत्ते..
२.फडतरे मिसळ
हे हॉटेल उदयम नगर मध्ये आहे. हॉटेलची सजावट फारशी नाही आणि स्वयंपाकघर खुल असलेले रेस्टॉरंट. हे कोल्हापुरी मिसळसाठी प्रसिद्ध आहे, मिसळ जरा तिखट आहे याचा विचार करून ते सोल कढी देखील देतात. ही एक चांगली कल्पना आहे.
हे हाउस वैगेरे नसुन एक झोपडी वजा टपरी सारखे हॉटेल आहे... त्यांच्या मिसळीच्या चवी बरोबरच, जर तुम्ही मिसळ घरी नेणार असाल तर ते जे पॅकिंग करुन देतात ते निव्वळ अफलातून असते..उद्यमनगर, हुतात्मा पार्क जवळ आहे..(नविन लोकाना पटकन गावनार नाही.. रिक्षा करुन जाणे...घाबरु नये..कोल्हापुरातले रिक्षा वाले पुण्यासारखे नाहित.. ;))... सोमवार बंद असते. सकळी लाइन लागलेली असते..मिसळीसाठी.
2. चोरगे मिसळ
हे ठिकाण महालक्ष्मी मंदिराच्या जवळच आहे (महाद्वार रोडजवळ) आणि तेवढेच प्रसिद्ध आहे. इथली मिसळ थोडी कमी मसालेदार आहे. तिचे वैशिष्ट्य म्हणजे मिसळ कट. कोल्ड ड्रिंक्स, सोलकढी ही इथे दिली जाते.
याशिवाय
आणखी काही मिसळीची ठिकाणे प्रसिध्द आहेत.तसं पहायला गेलं तर कोल्हापूरात
कोठेही मिसळ खा, चांगलीच मिळणार याची शाश्वती! सगळीकडेच
मस्त-खतरनाक-चरचरीत-झणझणीत-तर्रीदार मिसळ मिळते. पण तरीही प्रत्येकाच्या
चवीला पटणारी अशी काही ठिकाणं नक्कीच असतात, जी प्रत्येकासाठी SOMEWHAT
SPECIAL असतात. मग प्रत्येकासाठी त्या SOMEWHAT SPECIAL ची कारणं वेगवेगळी
असू शकतात. काहींनी आयुष्यात पहिल्यांदा तिथेच मिसळ खाल्ली असेल किंवा
काहींसाठी ती जागा GO-TO PLACE/अड्डा असेल किंवा आणखी काहीतरी!
३. खासबाग मिसळ - खासबाग मैदान, KMT बस स्टॉप जवळ..आता दर्जा एवढा राहिला नाही
४.
मोहन मिसळ हाउस -मिसळ बघताच चेहेर्याला घाम फुटतो...महाद्वार रोड वर
आहे..अजुन एक आहे महाद्वार रोड जवळ्..आतल्या गल्लीत् नाव विसरलो.
५. बावडा मिसळ - कसबा बावडा कोल्हापुर
६. आहार - मंगळवार पेठ
७. महाद्वार जवळची शिवपार्वतीची मिसळ पण झणझणीत मस्त असते.
८. पन्हाळ्याला तबक उद्यान बाहेरची मिसळ.
९) रमेश भगत मिसळ
अगदी माफक दरात (₹३०/-) झणका देणारी गाड्यावरची मिसळ" असंच काहीसं वर्णन
या मिसळीचं करता येईल. मालक, रमेश एक हसतमुख व्यक्तिमत्व आणि तितक्याच
मोकळेपणाने मिसळ खायला घालणारा अवलिया! एकट्याने मिसळीच्या धंद्याचा गाडा
ओढणारा मनुष्य!
एकदम कडक-चरचरीत पातळ भाजी-कट, चांगल्या चवीचा आणि
QUALITY चा शेव-चिवडा आणि एकदम FRESH असा मऊसूत BREAD, असं SERVING असलेला
हा खतरनाक विषय!
HALF मिसळ चा OPTION देखील AVAILABLE. पण मिसळ, आणि
तीही HALF, हे बुद्धिला न पटणारं गणित. शक्यतो मालकांना PHONE करून जावं
लागतं, MANPOWER कमी असल्याने काही वेळा मिसळ बंद असते.
रमेश भगत मिसळ,
OPP. KOLHAPUR ENGINEERING ASSOCIATION,
छ. शिवाजी उद्यमनगर
प्रोप्रा. रमेश भगत - 9049678089
१०) ठोंबरे मिसळ
ज्यांनी अगदी मिसळ मंडणीपासून ते SERVE करण्यापर्यंत आपलं वेगळेपण जपलंय,
ती म्हणजे "ठोंबरे मिसळ"प्लेटमधे एका बाजूला बटाटा-मटकी-शेव-चिवडा यांची
रास, दुसऱ्या बाजूला AUTHENTIC कोल्हापूरी पातळ भाजी आणि सोबतीला कापून
दिलेला पाव, निव्वळ स्वर्गसुख. दर पण अगदी परवडेबल ₹४०/-
ठोंबरे मिसळ,
भोई गल्ली, बिंदू चौक
१०) नादखुळा मिसळ
बहुधा
कोल्हापूरातील एकमेव अशी मिसळ जी UNLIMITED मिसळ (UNLIMITED शेव-चिवडा आणि
पाव) serve करते आणि तीही अगदी नगण्य अशा ₹५०/- मध्ये!
QUANTITY ला भरपूर आणि QUALITY ला १ नं. आणि सोबतीला मालवणी सोलकढी आहेच. फक्त पातळ भाजी-कटचा रंग बघून मन तृप्त होईल असा नजारा.
नादखुळा मिसळ,
OPPOSITE IDBI BANK, खरी कॉर्नर
११) कोल्हापूर मिसळ
अल्पावधीतच
लोकप्रिय झालेली ही मिसळ चरचरीत-झणझणीत अशा प्रकारात मोडते. पाहताक्षणी
भुलवणारी पातळ भाजी-कट मन जिंकून जाते. ही मिसळ बाहेरगावच्या मिसळ
महोत्सवामध्ये इतकी का नावाजली गेली आहे हे पाहिला घास घेतल्या-घेतल्या
कळते. मिसळ संपेपर्यंत घाम फुटला नाही तरच नवल अशी या मिसळीची खासियत.
प्रत्येक घासाला मिसळीमागच्या अफाट प्रयत्नांची जाणीव झाल्याशिवाय रहात
नाही. हे झालं मिसळीचं! चहा तर त्याहून फक्कड. प्रत्येक घोटाला आकडी दुधाची
चव किमया करून जाते. एकवेळ अवश्य भेट द्यावी अशी चव.
दर : मिसळ - ₹४०/-
चहा - ₹१०/-
कोल्हापूर मिसळ,
TULSI GAS AGENCY नजीक, यल्लम्मा ओढा चौक
१२) शिव मिसळ
या जागेबद्दल कौतुक करावं तितकं कमीच आहे. आदबीने मिसळ खायला घालणाऱ्या
व्यक्तींमध्ये या दोन्ही मालक-बंधूंचे नाव आवर्जून घ्यावे लागेल.
दोघांच्याही स्वभावाला पर्याय नाही असं म्हणालो तरी काही वावगं ठरणार नाही.
इथे गेल्या-गेल्या ज्या २ गोष्टी जाणवतात, मिसळीचा येणार कडक सुवास आणि
मालक बंधूंची आपुलकी. कधी कधी असं वाटतं की या दोघांच्या बोलण्यानेच
CUSTOMERS ची पोटं भरत असणार. इथली बाहेरगावच्या मंडळींची रेलचेल ही एक
उल्लेखनीय बाब.
झणझणीत चवीसोबत आपुलकीच्या सेवेसाठी या ठिकाणाला महिन्यातून एकदा तरी नक्कीच भेट द्यावी लागते. दरही परवडेबल ₹३५/-
शिव मिसळ,
दसरा चौक
१३) गावरान मिसळ
सकाळी सहसा १०:३०-११ नंतर न मिळणारी अशी ही मिसळ.
गावरान
STYLE INTERIOR, त्याच पेहरावातील SERVE करणारी माणसं आणि चुलीवर शिजणारी
मिसळ, इतकं बस्स आहे एखाद्या मिसळ प्रेमीला वेडं करण्यासाठी. सोबत दिला
जाणारा गावरान मसाला तर या सगळ्याहून लाजवाब. एका पातळ भाजी SERVING सोबत
एक-दीड चमचाभर गावरान मसाला जादू करतो. Family साठी बसायला पुरेशी जागा
असल्याने FAMILIES मध्ये HOT FAVORITE अशी ही मिसळ खायला गर्दी असते.
दर : ₹४०/-
गावरान मिसळ,
राजारामपुरी ९ वी गल्ली
१४) यश मिसळ
या
मिसळ center मध्ये गेल्या-गेल्या नजरेला प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे
"पितळी CUTLERY" पाण्याचा जग, पेले, ताट, वाट्या, चमचे, अगदी सगळं पितळी.
एकदम चरचरीत मिसळ आणि ती खाताना येणारा एकदम ROYAL FEEL, अवर्णनीय. इथला कट
म्हणजे "NOT FOR FAINT HEARTED" असंच काहीसं म्हणता येईल. मस्त, मजा आली!
दर : ₹४०/-
यश मिसळ,
राजारामपुरी २ री गल्ली,
V. T. PATIL CONVENTION HALL ची BACK SIDE
तळटीप
: प्रत्येकाच्या मिसळीचा TYPE हा वेगळा असू शकतो. वरील LIST ही माझ्या
आकलनीय बहुतेक सर्व मिसळींची चव चाखल्यानंतर आणि माझ्या चवीला मंत्रमुग्ध
करणार्या मिसळींची आहे. प्रत्येकाच्या चवीनुसार ही LIST बदलू शकते. तरी
वरील मिसळी सोडून बाकीच्या वाईट आहेत, असा अर्थ यावरून काढू नये.
आणि कोल्हापुरात कुठ्ल्याही हॉटेल मधे गेलात तरी मिसळ ही चांगलीच मिळते.डोळ्यातील पाणी आणी डिश मधली मिसळ या॑चा स॑गम झाला म्हणजे मिसळ साठी दिलेले पैसे फिटले असे समजायला हरकत नाही.
दीपक वडा सेंटर

हे
दुकान दसरा चौकात आहे आणि शहरातील वडा पावसाठी हे सर्वात जुने प्रसिध्द
हॉटेल. अलीकडेच जागेचे नूतनीकरण करण्यात आले आहे. वडा मोठा आणि चवदार असतो,
जर तुम्ही वडा पाव ऑर्डर केला तर ते त्याबरोबर पावा ऐवजी ब्रेड देतात.
आपण मुंबईकर किंवा पुणेकर असाल तर हे आपणास वेगळेच वाटू शकते .
कोल्हापुरातील प्रसिध्द बटाटेवडेवाले:-
१) न्यू पॅलेस जवळ बटाटेवडेवाला
२) राजाराम कॉलेजमागे मिळणारा शामचा वडा ,मस्त तिखट
३ )पॉलिटेक्नीक कॉलेजचा कट वडा
४
) चारुदत्त वडा प्रसिध्द होता, अर्ध्या-शिवाजी पुतळ्या जवळचा.वडा एकदम
मस्त. पण उशिरा गेलात तर हात हालवत परत यावे लागणार. मालक बोलायला एकदम
उर्मट पण वडा एकदम मस्त म्हणुन सहन करायचे.
५ ) प्रकाश : शिवाजी पुतळा
६ ) इंडिया हॉटेल - महानगरपालिके समोर
७ ) तुकाराम वडा - महानगरपालिके कडून सम्राट चौकाकडे जाताना
८ ) प्रियदर्शनी वडा - रंकाळा
९ ) गंगावेशेतील छकुली वडा
१० ) शिंगोशी मार्केट जवळ अनेगा वडा
११) स्टेट बँक जवळ, उद्यमनगर येथील वडा
१२) सिद्धाळा गार्डन मागे मिळणारा वडा
१३ ) जाधव वडासेंटर ,ताराबाई रोड, यळगुड डेरीजवळ, वेळ संयंकाळी ५ ते 8
कोल्हापुरात इतर खादाडीची ठिकाणे:-
१. महाद्वार रोड- हॉटेल कामत आणी तिथला डोसा.
२. अंबाबाई मंदिराच्या दक्षिण दरवाजाला लागून उसाचे रसवंती गृह..अजुनही चव चांगली आहे..
३. एकेकाळी प्रार्थना हॉटेलची पावभाजी आणि गोकुळ (बसंत बहार समोरचे) हॉटेलची इडली फेमस होती.
४. रंकाळ्याजवळच्या बागेत माईणकरच्या भेळेच्या गाडीवर बेवडा मिक्श्चर
५. विद्यापीठ हायस्कूल दावणगिरी लोणी डोसा.एक खावुन समाधान होत नाही. गर्दी असते पण इ॑तजार का फल चा॑गला डोसा होता है.
६. वा॑गी बोळातला प्रकाशरावा॑चा चहा एकदम अफलातुन. कुठेही खावे पण चहासाठी वा॑गी बोळात यावे. प्रकाशराव बोलायला चहा पेक्षा गोड.
७. विद्यापीठ हायस्कूल जवळील चाटचे गाडे.
८.
तेथेच जवळ असणारा हेन्द्रेचा पाचक सोडा. पहिल्या घोटालाच मे॑दुला
झिणझिण्या येतात आणि सोडा पोटात कसा जातो ते बाहेरुन सुद्धा जाणवते.
९. सँडविच खायचं असेल तर राजारामपुरी शुन्यावी गल्ली किंवा खासबाग मध्ये किशोर.
१०. हल्ली न्यू पॅलेस जवळ संध्याकाळी रस्त्यालगत भाकर्या भाजुन मिळतात. तुम्ही ऑर्डर दिलीत की तुमच्या समोर खमंग भाजुन देतात
११. पातळ भाजी - (हॉटेल इंडिया, महानगर पालिके मागे), ( हॉटेल मिलन, बिंदू चौक)
१२. कांदा भजी, मस्का पाव - हॉटेल मिलन, बिंदू चौक
३३. भेळ - विलास काकांची भेळ ( खासबाग जवळ)
१४.
आईस क्रीम (कॉकटेल आईस क्रीम ) - (राजमंदिर, माळी कॉलनी), (इम्पिरिअल आईस
क्रीम, शिवाजी चौक), (एम्पायर आईस क्रीम, शिवाजी चौक), (पाटील आईस क्रीम,
शिवाजी चौक)
१५. खांडोळी - हॉटेल नितीन्स कॅन्टीन, शिवाजी उद्यमनगर
१६.
चहा - (परशुराम चहा सेंटर, रविवार पेठ),(सावली चहा सेंटर, रविवार पेठ),
(टी म्याजीक, बी टी कॉलेज जवळ, शाहूपुरी), (बासुंदी चहा, लेटेस्ट तरुण मंडळ
जवळ, मंगळवार पेठ) (कंट्री चहा, हॉटेल आहार, मंगळवार पेठ)
१७. लस्सी - (तृशाशांती, महाद्वार रोड), (मोहक लस्सी, मराठा बँक जवळ), (श्री लस्सी, रंकाळा बस स्थानक जवळ, रंकाळावेश)
१८. कोल्हापुरी गुळ, काकवी, उसाचा रस -(कोल्हापूर जिल्हातील सर्व गुर्हाळ घरांमध्ये ताजा खायला, प्यायला मिलेल.)
१९. दुधसार - (होटेल पाटील मळा, ३ री गल्ली, शाहूपुरी), (राधानगरी गाव)
२०. झुणका भाकरी - (पन्हाळा किल्ला)
२१. कोल्हापुरी मसाले, लोणचे - (मराठा दरबार मसाले), (महालक्ष्मी सुरेश मसाले), (श्रीकांत मसाले)
इतर खाद्यपदार्थ
1. राजमंदिर आईस्क्रीमकोल्हापुरातील हा आईस्क्रीमचा प्रसिद्ध ब्रँड आहे. मिरची पावडर असलेली लाल पेरू ही त्यांची अनोखी चव आहे. परंतु आपण आंबा, पान मसाला किंवा सिझलिंग ब्राउन आईस्क्रीम देखील खाऊन पाहू शकता.इथले पान फ्लेवर आईस्क्रीम निव्वळ झक्कास.

सर्व ठिकाणी तुम्हाला एकच चव खाण्यास मिळते हे विशेष. राजमंदिर मधले केशर पिस्ता आईसक्रीम पण एकदम जबरदस्त आहे. आणि तिथल फ्रुट श्रीखंड पण छान आहे एकदम.
आईस्क्रीम करीता माझ फेव्हरीट सोळंकी. तिथलं कॉकटेल आईस्क्रीम आज जवळपास शंभर रुपये झाल आहे. पण त्याची टेस्तच वेगळी आहे. त्यांचे फ्रुट कॉकटेल आणि जिंजर (सोडा घालुन करतात ते) सहीच असते.
२. हिंदुस्थान बेकरी

त्यादिवशी तयार केलेली सर्व उत्पादने विकली जातात तेव्हा ते नवीन पदार्थ न बनवता दुकान बंद करतील हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

भारत बेकर्स
कोल्हापूर पुरातील जूनी बेकरी , जोतीबा रोड, छत्रपती शिवाजी रोड, उद्यम नगर,
३ . कोल्हापुरी दूध कट्टा
कोल्हापूर शहरात दूध कट्टा हा खूप प्रसिद्ध आहे. गंगावेश नावाच्या सार्वजनिक ठिकाणी ग्राहकांच्या उपस्थितीत म्हशीला दूध देण्यास येते. कोल्हापूरच्या ताज्या दूध देणाऱ्या या सुविधेचा पर्यटकांना आनंद घेता येतो. कोल्हापुरातील पैलवानांना या दुधाची खास पसंती आहे .
धारोष्ण दुधासाठी या कोल्हापूरच्या दूध कट्ट्यावर...
आज शहरातील विविध भागांत बॅंकांची "एटीएम' केंद्रे आहेत, त्याच पद्धतीने कोल्हापुरातील विविध पेठांमध्ये दूध कट्टे दिसतात. प्रत्येक पेठेतील दूध कट्ट्यांची जागा आणि वैशिष्ट्य ठरलेले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून कोल्हापूरचे दूध कट्टे ही खासियत झाली आहे. महिन्याला पैसे देऊन दररोज दुधाचा "रतीब' लावणारे नामवंत पैलवानही या कट्ट्यावर हमखास दिसतात.
...असे आहेत दूध कट्टे
आज जशी शहरात "एटीएम' केंद्रे आहेत तसेच हे दूध कट्टे कोल्हापुरातील ग्राहकाला जागच्या जागी धारोष्ण दूधपुरवठा करतात. प्रत्यक्ष कट्टा नसला तरी एका विशिष्ट ठिकाणी म्हशी उभ्या करून तिथे धारोष्ण दूध देण्याच्या ठिकाणाला कट्टा म्हटले जाते. कोल्हापूर शहर विविध पेठांमध्ये विभागले आहे. प्रत्येक पेठेची जशी खासियत आहे, तशी तेथील दूध कट्ट्यांची जागा आणि वैशिष्ट्यही ठरलेले आहे. शिवाजी पेठ, उत्तरेश्वर, पंचगंगा तालीम, बुधवार पेठ या पेठांमध्ये सकाळ-संध्याकाळ कधीही जा, तुम्हाला धारोष्ण दूध मिळणारच. सकाळ- संध्याकाळी या कट्ट्यावर म्हैसपालक आपली म्हैस घेऊन येतात. साधारणत: सकाळी दहापर्यंत आणि संध्याकाळी सात ते रात्री एकपर्यंत या कट्ट्यावर ग्राहकांना धारोष्ण दूध मिळू शकते.
सध्या कोल्हापुरातील दूध कट्ट्यांचा विचार केला तर सुमारे तीन ते चार हजार म्हशी आहेत. पारंपरिक शेती व्यवसाय नसला तरी गवळी काम करणारी बहुतांशी कुटुंबे या व्यवसायात आहेत. विकतचा चारा घेऊन म्हैसपालन केले जाते. मंडई, उत्तरेश्वर पेठ या भागांत चारा विक्रीला येतो. तेथूनच ही गवळी मंडळी जितका चारा लागेल तितकाच खरेदी करून म्हैसपालन करतात. प्रत्येक कुटुंबाकडे सरासरी पाचपासून पंधरा म्हशी आहेत. म्हशीला वैरण घरात दिली जाते, तर पशुखाद्य ठिकठिकाणच्या कट्ट्यावर दिले जाते. म्हशीची धार काढल्यानंतर दूध थेट ग्लासमध्ये भरून ग्राहकाला दिले जाते. साधारणत: वीस रुपयांना एक ग्लास (सुमारे चारशे मि.लि.) या दराने दुधाची विक्री होते. कोणतीही भेसळ न होता धारोष्ण दूध प्यायची मजा काही औरच आहे. कोल्हापूर ही पैलवानांची नगरी. साहजिकच धारोष्ण दुधाकडे अनेक पैलवानांचा ओढा आहे. यामुळे महिन्याला पैसे देऊन दररोज दुधाचा "रतीब' लावणारे पैलवानही या कट्ट्यावर हमखास दिसतात. याशिवाय अनेक ग्राहक गेल्या कित्येक वर्षांपासून धारोष्ण दुधाचा आस्वाद घेत आहे. धारोष्ण दूध पिणे ही आता त्यांची सवयच बनली आहे.
अडचण नाही... अभिमान...
कोल्हापूर शहर झपाट्याने सुधारत आहे. पारंपरिक पद्धती कालबाह्य होत आहेत. धारोष्ण दूध पिण्याची पद्धत मात्र तशीच टिकून आहे आणि ती बदलणारही नाही. शहरात जनावरे असणे म्हणजे इतर शहरांसाठी ती अडचण झाली असती. ट्रॅफिक जॅम, शेणामुताचा वास अशा अनेक कारणांमुळे जनावरांना बाजूला करता आले असते; पण कोल्हापूर हे वेगळं शहर आहे. शहर जरी असले तरी त्याचा ढंग ग्रामीण आहे. शहरालागत असणाऱ्या ग्रामीण भागाचा प्रभाव या शहरावर आहे. खेड्यातील संस्कृती या दूध कट्ट्यावरही दिसते. कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ, वारणा दूध संघ देशभरात प्रसिद्ध आहेत. येथील दूधप्रक्रिया पदार्थ देशातील बाजारपेठेत पोचले आहेत. याचबरोबर "इथले दूध इथेच' ही परंपराही या शहराने मनापासून जपली आहे. आज ग्रामीण व्यवस्था शहरीकरणाकडे झुकली असली तरीही या जमान्यात कोल्हापुरातील दूध कट्टे अद्यापही धारोष्ण दुधासाठी प्रसिद्ध आहेच, हीच आमच्या अभिमानाची बाब असल्याचे शहरवासीय सांगतात.
धार काढण्याची खास लकब
गळ्यात तांबडा रुमाल बांधलेला आणि खास पोषाखातील गवळी लगेच ओळखू येतो. डोक्यावर कोंड्याचे घमेले, म्हशींना खाद्य म्हणून कोंडा, खपरी पेंडची पाटी, पितळेची कासंडी, पितळेचा पेला असे साहित्य घेऊन म्हैस मालक कट्ट्यावर येतात. म्हशीची धार काढायला बसण्याची लकबही विशिष्ट असते. धार पिळता-पिळता "हाय या!'ची आरोळी कट्टाभर घुमत असते.
व्यवसाय अडचणीत... पण चालविणारच
आमच्या भागातील अनेक शेतकऱ्यांचा हा पारंपरिक व्यवसाय आहे. सध्या चारा आणि पशुखाद्याच्या वाढलेल्या दरामुळे हा व्यवसाय परवडत नाही. परंतु पूर्वीपासून आमचा हाच व्यवसाय असल्याने काटकसरीने दूध कट्टा सुरूच ठेवणार, कारण हीच कोल्हापूरची खासियत आहे.
कोल्हापूर मध्ये काय खरेदी कराल ?
१ . कोल्हापुरी साज
यामध्ये मंगळसूत्र, एक ठुशी (पारंपारिक हार), नथ (नाकाची अंगठी) इत्यादींचा समावेश आहे. आपण पारंपारिक मोहन माला, लक्ष्मी हार, राणी हार, अंबाडा (केसांची पिन) आणि वाकी (हातचे दागिने) देखील खरेदी करू शकता.
कोल्हापुरी साज एक प्रकारचे महिलांनी गळ्यात घालावायचे आभूषण आहे.हा एक पारंपारिक अलंकार आहे कि ज्याची वापरण्याची सुरुवात कित्येक वर्षापासून कोल्हापुरातून झालेली आहे आणि आता तर महाराष्ट्राबाहेर अनेक राज्यांमध्येही याला खूप पसंती आहे.पारंपारिक पद्धतीने या साजामध्ये २१ गोल आकाराची पाने असतात पण कोल्हापूर मधील महिला मात्र दररोजच्या दगदगीच्या जीवनात वापरण्यासाठी १० किंवा १२ पानांचा साज बनवून घेतात.हा अलंकार खूपच सुंदर दिसतो.याचे डिज़ाईन पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते म्हणून पर्यटक या डिज़ाईनमध्ये नकली नेकलेस बनवून घेतात.
कोल्हापुरी साज -
काठपदराची भरजरी साडी (लुगडे), कपाळावर भव्य कुंकू, बुचड्यावरील (अंबाडा) वेणीत खोचलेला केवडा, कानातील नक्षीदार फुले, गळ्यातील टीक, मंगळसूत्र आणि त्यापुढे झेपावणारा भारदस्त असा कोल्हापुरी साज स्त्रीचे सौंदर्य आणखीनच खुलवतो. कोल्हापुरी साजाच्या या कारागिरीने विविध प्रांतांतील स्त्रियांना जशी भुरळ घातली, तशी त्याने देशाच्या सीमाही ओलांडल्या.
कोल्हापूर म्हटले की, येथील रांगडा आणि कणखर माणूस समोर येतो. येथील तांबड्या मातीने त्याच्या मनगटाची जशी मशागत केली, तशीच रवाळ कोल्हापुरी गुळाचा गोडवाही त्याच्यात पेरला आहे. या समृद्ध मातीने अनेक कलागुणांना जन्म दिला तशी विविध व्यवसायांतील प्रायोगिकताही वारंवार सिद्ध केली आहे. कालगतीत हे प्रयोग केवळ टिकूनच राहिले असे नाही, तर त्यात वैविध्यही येत गेले. त्यात गुळाबरोबरच कोल्हापुरी चप्पल आणि कोल्हापुरी साजाचे उदाहरण ठळकपणे सांगता येईल. गुळाचा गोडवा सर्वदूर पसरला, कोल्हापुरी चपलेने बाहेरच्या देशातील नागरिकांचा माथा शांत ठेवला, नजर निर्मळ केली, तसा कोल्हापुरी साजाने प्रांतोप्रांतीच्या स्त्रियांना सौंदर्य आणि खानदानीपणा बहाल केला. म्हणूनच शालीनता आणि घरंदाजपणा अधिक भारदस्त करणारा हा दागिना आपल्याकडेही असावा, असे प्रत्येक स्त्रीला वाटणे स्वाभाविक आहे.
कोल्हापूर हा घाटमाथ्यावरचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात तिन्ही ऋतू समान असतात. त्यामुळे येथील पीकपाणीही कायम चांगले राहिले आहे. खूप आधीच्या काळापासून या समृद्धीमुळे येथे सर्व क्षेत्रांतील उलाढाल चांगली राहिली आहे. त्यामुळे येथील लोकांच्या हातात पैसाही कायम खुळखुळत राहिला. सामाजिक वातावरण शांत. त्यामुळे अनेक उद्योग-व्यवसाय येथे स्थिरावले आणि वाढले. सराफ व्यवसायही (कोल्हापुरात त्याला गुजरी म्हणतात.) भरभराटीला आला. विशेषतः राजर्षी शाहू महाराजांनी बाहेरच्या राज्यातील सराफ व्यवसायिकांनाही येथे आणून संरक्षण दिले.
सुवासिनीचे लेणे समजला जाणारा हा साज फक्त येथेच तयार होतो. म्हणून त्याला ' कोल्हापुरी साज ' असे नाव पडले. त्याचा पत्रा पातळ आणि नाजूक असतो. येथील प्राचीन श्रम आणि कृषिसंस्कृतीचे प्रतिबिंबही या साजात पडलेले दिसते. साजाच्या रचनेतील मणी आणि पानांवरील नक्षीकाम समजून घेतले तर ते लक्षात येईल. सुवासिणीचे लेणे असलेल्या या साजाच्या सुरुवातीला चाफेकळी नंतर पाचपानाडी (विविध औषधी वनस्पतींची पाने आणि विड्याचे पान), बेलपान, दोडका, कारले, सूर्य, माणिक पानाडी, मत्स्य, कूकर्म, नृसिंह (अवतार), फूल, भ्रमर, चंद्र, पाचू पानाडक्ष, गंडभैरी, मोरचेल, मयूरपंख, शंख, वाघनख, नाग आणि शेवटी ताईत असे नक्षीकाम प्रत्येक पानावर केलेले असते. नक्षीकामानंतर पाने जवमण्यांमध्ये गुंफली जातात. प्रत्येक दोन पानांत एक पान गुंफले जाते. हे मणी डमरूसारखे असतात. पानाला घागऱ्यांचे घोस लावतात. ते तीन ते पाचदरम्यान असतात. घागर जसे जलकुंभाचे प्रतीक, तसेच प्रेमाचेही प्रतीक आहे. शिव-शक्ती आणि सृष्टीच्या सर्जनशीलतेचा मिलाफ साजाच्या कारागिरीत बेमालूमपणे केलेला असतो. शेवटी साज हिरव्या रेशमी सुतात गुंफून त्याला लाल रेशमी भरजरी गोंडा लावला जातो. घागऱ्यांकडची बाजू सोन्याच्या अखंड बारीक तारेत गुंफलेली असते.
जुन्या काळात १२ पानांचा साज असायचा. आता तो बजेटप्रमाणे कितीही पानांत केला जातो. पोकळ पानांचा साज करण्यासाठी किमान ३० ग्रॅम सोने लागते. आता भरीव पानांचा साजही केला जातो. हॉलमार्किंग आणि सोन्याच्या प्युरिटीसाठी भरीव पानांचा साज चांगला समजला जातो. आवटी काढण्यापासून मणी गुंफण्यापर्यंतची कारागिरी वेळखाऊ आणि त्रासदायक असली, तरी साज पूर्ण झाल्यानंतर कारागिरांना एकप्रकारचे वेगळे समाधान देऊन जाते.
आजच्या ' ईएमआय ' च्या जीवनशैलीत सामान्य आणि मध्यमवर्गीय स्त्रियांना सोन्याची हौस परवडणारी नसते. त्यावर उपाय म्हणून येथील सराफ व्यवसायिकांनी उपाय शोधला. सर्वसामान्य स्त्रियांची साजाची हौस भागावी, यासाठी तांबे आणि चांदीमध्येही साज बनवायला सुरुवात केली. त्यावर सोन्याचा मुलामा दिलेला असतो. कालांतराने मुलामा गेला, तरी परत चढवता येतो. त्यामुळे सोन्याचा नसला तरी तांब्या-चांदीत बनविलेल्या साजामुळे हौस भागविली जाते.
काठपदराची भरजरी साडी (लुगडे), कपाळावर भव्य कुंकू, बुचड्यावरील (अंबाडा) वेणीत खोचलेला केवडा, कानातील नक्षीदार फुले, गळ्यातील टीक, मंगळसूत्र आणि त्यापुढे झेपावणारा भारदस्त असा कोल्हापुरी साज स्त्रीचे सौंदर्य आणखीनच खुलवतो. कोल्हापुरी साजाच्या या कारागिरीने विविध प्रांतांतील स्त्रियांना जशी भुरळ घातली, तशी त्याने देशाच्या सीमाही ओलांडल्या. कोल्हापूरच्या लोकसंस्कृतीचा अविभाज्य भाग बनलेल्या या साजाच्या भारदस्तपणाला उठाव मिळाला तो ' गदिमां ' च्या लावणीने. ' एक हौस पुरवा महाराज। मला आणा कोल्हापुरी साज... ' ज्येष्ठ संगीतकार राम कदम यांनी या लावणीवर चढविलेल्या स्वरसाजाने कोल्हापुरी साज मराठी जनांच्या ओठांवर आजातागायत रुळला आहे.
२ . कोल्हापुरी चप्पल:-

जिल्ह्यातील २०,००० हून अधिक हस्तकलांना नोकरीसाठी हा एक हस्तकला उद्योग आहे.
आधुनिकीकरणामुळे हे कोल्हापुरी चप्पल वेगवेगळ्या आकारात, नमुन्यांमध्ये आणि रंगांमध्ये देखील उपलब्ध आहेत.
ते पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठी उपलब्ध आहेत. ही चप्पल खरेदी करण्यासाठी तुम्हाला बरीच पादत्राणेची दुकाने कोल्हापूर मध्ये सापडतील पण कोल्हापुरी चप्पल महाद्वार रोडवर जास्त प्रमाणात विकल्या जातात आणि त्या ओरिजिनल असतात.
परंतु प्रसिध्दीपासून दूर राहिलेली तरीही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्वत:चा लौकिक टिकवून राहिलेलं पादत्राण म्हणजे आपली कोल्हापुरी चप्पल!
माणसानं जे काही शोध लावलं त्यातला पादत्राणाचा शोधही महत्त्वाचा. पायाला बोचणाऱ्या दगडांचा, काट्यांचा त्रास चुकविण्यासाठी आदिमानवाच्या काळात पायाला पाला किंवा झाडाची साल बांधण्याची पध्दत होती. ग्रीस, इजिप्त या देशातील उत्खननात त्यावेळची पादत्राणे मिळाल्याचा उल्लेख आढळतो. इ. स. पूर्व काळात पादत्राणे वापरली जात. नंतरच्या काळात मेलेल्या किंवा मारलेल्या प्राण्यांच्या चामड्याला योग्य आकार देऊन ते पायाला बांधले जाई.
भारतातील पादत्राणासंबंधी वैदिक वाड्:मयात उल्लेख आढळतो. रोमनकालीन पादत्राणांशी त्याचं साम्य आढळतं. पुणेरी जोडा, जयपुरी चढाव याबरोबरच कोल्हापुरी चपलांची निर्मिती झाली. पुणेरी जोडा जरी जवळ जवळ नाहीसा झाला तरी जयपुरी चढाव आणि कोल्हापुरी चप्पल मात्र टिकून आहेत. कोल्हापुरी चपलांची जुनी नावं म्हणजे खास कोल्हापुरी, खास कुरुंदवाडी, खास कापशी! गावांच्या नावावरुन दिलेली. शिवाय पुडा मोरकी, पुडा पॅचिंक, पुडा अथणी, गांधीवादी अशी नावे अलिकडच्या बदलत्या काळात म्हणजे चित्रपटांच्या जमान्यात कोल्हापुरी चपलेने सुरक्षा, सिलसिला, सुहाग, जंजीर, नाचे मयूरी, दिल, मेरी आवाज सुनो, महाभारत अशीही नावे धारण केली असली तरी आपला मूळचा दर्जा व वैशिष्ट्ये कधीच सोडली नाहीत.
कोल्हापूरी चप्पल पूर्णत: कातड्याची असल्याने उन्हाळयातसुध्दा थंडपणा जाणवतो. शिवाय चालताना त्रास होत नाही. कारण त्या पूर्णत: हाताने बनविलेल्या असतात. त्या बनविण्याचे ९० ते ९५ टक्के काम महिला कामगार करतात. कोल्हापूर जिल्ह्यात या चपला तयार करुन उपजीविका करणारी साधारणत: सात हजारावर कुटुंबे आहेत. चपलांची किंमत वापरलेल्या कातड्याच्या दर्जाप्रमाणे असते.
सध्या मात्र या व्यवसायात चामड्यांची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे कोल्हापुरी चपलांच्या निर्मितीच्या प्रमाणात घट होत आहे. चामड्याच्या वाढत्या किंमती हेही कारण आहे. याही परिस्थितीत कोल्हापुरी पुडा, कोल्हापुरी फ्लॅट, वेणी चपलांना शहरी भागात तर कापशी चपलांना ग्रामीण भागात मागणी आहे. घडीच्या कोल्हापुरी चपलांना परदेशी खूपच मागणी आहे.
स्वित्झर्लंड, अमेरिका, युरोप, इजिप्त,
इटली या देशात कोल्हापुरी चपलांची प्रदर्शने भरविली जातात. त्यासाठी
इथल्या उद्योजकांना निमंत्रणे येतात. कातडी कमावण्याच्या व्यवसायात
कोरियाचा पहिला तर भारताचा दुसरा क्रमांक लागतो.
कोल्हापूरला आलेली
पाहुणे मंडळी कोल्हापुरी चप्पल खरेदी केल्याशिवाय परतत नाहीत हे जरी खरे
असले तरी सद्य परिस्थितीत कातड्याची टंचाई जाणवत असल्याने कामगार वर्गावर
कठीण परिस्थिती आल्याचे जाणवते. जिल्हा चर्मोद्योग संघाचे कार्यकर्ते या
परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. चर्मोद्योग महामंडळाने
प्रयत्न करणे जरुरीचे आहे. त्यामुळे कोल्हापुरी चपलेच्या निर्मितीला पुन्हा
चांगले दिवस येतील.
कोल्हापूरी फेटा
फेटा म्हणजेच पगडी हे कोल्हापुरातील वैशिष्ट्य आहे. फेटा घालणे हा प्रतिष्टेचा समजला जातो आणि जो पारंपारिक फेटा घालून पाहुण्यांचे स्वागत करतो तो एक सन्मान आणि पाहुणचार समजला जातो.कोल्हापूर मधून तुम्ही फेट्याचे कापड किंवा तयार फेटा पण विकत घेऊ शकता.
कोल्हापूरी नऊवारी साडी
साधी साडी हि सहावारी असते पण कोल्हापुरी साडी हि नऊवारी असते. प्रत्येक महाराष्ट्रातील महिलेची नऊवारी साडी नेसण्याची तीव्र इच्छा असते, परंतु ती परिधान करणे फारच अवघड असल्याने ही इच्छा अपूर्ण राहिली आहे.कोल्हापूर मध्ये तुम्हाला अमर्यादित प्रकारच्या नऊवारी साडया खरेदी करण्यास मिळतील.
५ . कोल्हापुरी गुळ
कोल्हापुरात ऊस उत्पादन होते आणि साखर व गूळ उत्पादनामध्ये अनेक कारखाने आहेत. कोल्हापूरचा पांढरा गूळ खरेदी करायला विसरू नका. तो निरोगी आणि रुचकर आहे.
कोल्हापूर गूळ हा एक गोड पदार्थ आहे जो उसाच्या रसाचे केंद्रित उत्पादन आहे आणि त्याचा रंग सोनेरी तपकिरी ते गडद तपकिरी रंगात बदलू शकतो. कोल्हापुरी गूळ महाराष्ट्रामध्ये खूप लोकप्रिय आहे, म्हणून पर्यटक कोल्हापूरला येतात तेव्हा बहुतेकदा गूळ खरेदी करतात.
भारतातील महाराष्ट्र राज्य हे गुळाचे सर्वात मोठे उत्पादक आणि ग्राहक आहे. कोल्हापूर जिल्ह्या मध्ये ऊसाचे ऊत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते त्यामुळे हा जिल्हा गुळ ऊत्पादनामध्ये अग्रेसर आहे तसेच येथील गुळ ईतर गुळापेक्षा कमी रंगीत आहे. रंगातील अशुध्दता सहजरित्या कमी केली जाते. जुने गुळ बांधणी करणारे हे त्यांच्या बांधणीमध्ये कमी लाल – तांबुस रंग बनवण्यामध्ये निपुण असतात. हा कमी रंगीत आणि जास्त गोड असलेला हा गुळ प्रसिद्ध आहे. जिथ गुळ बनवला जातो त्या ठिकाणाला गुर्हाळ म्हणतात. ह्या गुर्हाळा मध्ये पुर्वापार कालाप्रमाणे कोल्हापूरी मटण व रस्सा ह्यांचा आहार असतो.
देखणं केशरी रूप ...
एक मधुर गंध ....
खाताना येणारी एक अनोखी चव .....
यामुळे हा गुळ साता समुद्राच्या पलीकडे पण भलताच प्रसिद्ध आहे...
साखर कारखान्यांमुळे उसाचे उत्पन्न कारखान्यात जास्त प्रमाणात जात असले तरी दहा बारा गुंठ्यातला उस तरी गुळासाठी गाळून घेणारा शेतकरी वर्ग कोल्हापुरात भरपूर आहे ....
आता उसाची गुऱ्हाळे चालू आहेत आलात तर एखाद्या गुऱ्हाळाला नक्की भेट द्या ...
गरमागरम आणि अवीट चवीचा ताजा गुळ चाखून तर बघा राव...
६ . कोल्हापुरी भडंग
भडंग हा चिरमुर्यापासून बनलेला पदार्थ आहे. त्यात जो मसाला आहे ती कोल्हापुरची खासियत आहे. कोल्हापुरी भडंग हा मसालेदार, रुचकर आणि तोंडाला पाणी आणणारा पदार्थ आहे.
७ . कोल्हापुरी कांदा आणि लसूण चटणी
कोल्हापूरमधील खरेदीची ठिकाणे
कोल्हापूर मध्ये तुम्ही खाली दिलेल्या ठिकाणी भेट देऊन खरेदी करू शकता.1. महाद्वार रोड :-
• किती महाग आहे? - मध्यम बजेट
• वैशिष्ट्य - लेदर वस्तू, फॅशन
पत्ता: 73, महाद्वार रोड, डी वॉर्ड, पापाची तिकटी, कोल्हापूर, महाराष्ट्र
वेळः 10:00 सकाळी - रात्री 8:00 वाजता
2. शिवाजी रोड :-
• किती महाग आहे ? - मध्यम बजेट
• वैशिष्ट्य - कॉटन टेक्सटाईल, कोल्हापुरी साडी
पत्ता: शिवाजी रोड, कोल्हापूर, महाराष्ट्र
वेळः 10:00 सकाळी - रात्री 8:00 वाजता
3. D Y P सिटी मॉल
कोल्हापुरातील अगदी मोक्याच्या ठिकाणी डीवायपी सिटी मॉल उभा आहे. येथे संपूर्ण दिवस घालवा.इथे चित्रपटगृह आहे, आपण आपल्या कुटुंबासह नवीन चित्रपट देखील पाहू शकता. आरामदायक जागा, गरम पॉपकॉर्न आणि जंबो आकाराचा सोडा हे सर्व तुम्ही नवीन चित्रपट बघत एन्जॉय करू शकता. हया मॉलमध्ये अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्समध्ये नवं-नवीन वस्तू उपलब्ध आहेत.• किती महाग आहे ? - मध्यम ते उच्च प्रतीचे
• वैशिष्ट्य - फॅशन, इलेक्ट्रॉनिक वस्तू
पत्ता: बी-504, जुना पुणे - बेंगलोर हायवे, निंबाळकर कॉलनी, रुईकर कॉलनी, कोल्हापूर, महाराष्ट्र
वेळः 11:00 सकाळी – रात्री 10:00 वाजता
कोल्हापुर जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे:-
ऐतिहासिक गड-कोटांनी आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी सुजलाम झालेल्या कोल्हापूरचे पर्यटन विश्व विलक्षण आहे. दुर्ग, थंड हवेची ठिकाणे, अभयारण्ये, हेरिटेज वास्तू, धरणे, जंगल सफारीची ठिकाणे असे वैविध्य कोल्हापूरच्या दीडशे किलोमीटरच्या परिसरात आहे. वस्तूत: साडेतीन पीठांपैकी एक शक्तिपीठ श्री अंबाबाई मंदिर, दख्खनचा राजा जोतिबा मंदिर, नृसिंहवाडी, शिलाहार राजांच्या कालखंडातील प्राचीन खिद्रापूर मंदिरासह अन्य पर्यटनस्थळे म्हणजे धार्मिक पर्यटनाचा गोफच. छत्रपती राजर्षी शाहूंची नगरी, मराठी चित्रपटसृष्टीचे माहेरघर, कुस्तीपंढरी, गुळाची आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ, जगप्रसिद्ध कोल्हापूरी चप्पल, रंकाळा तलाव, आणि तांबडा-पांढरा रस्सा चाखायचा असेल तर कोल्हापुरला पर्यटकांनी नक्की भेट द्यायला हवी. आता उन्हाळ्याच्या कालावधीत शाळा, कॉलेजला सुट्टी पडल्यानंतर पर्यटनासाठी सहकुटूंब बाहेर पडण्याचा ट्रेंड रुळला आहे. याच काळात पर्यटकांना कोल्हापूर हे डेस्टिनेशनही खुणावते आहे. शहर परिसरातील, जिल्ह्यातील निसर्ग सर्वांना मोहात पाडतो. श्री अंबाबाई मंदिर, भवानी मंडप, रंकाळा तलाव, न्यू पॅलेस, पंचगंगा नदीघाट ही नेहमीची ठिकाणे. इथल्या प्रेक्षणीय स्थळांपैकी एक असलेला रंकाळा तलाव. तलावाच्या मध्यभागी रंगभैरवाचे मंदिर. एका बाजूला संध्यामठ. पश्चिमेस असलेली शालिनी पॅलेसची वास्तू म्हणजे शिल्पकलेचा अद्वितीय नमुना आहे. मग कलासक्त पर्यटकांना खुणावतात काही अनोखी ठिकाणे. राजारामपुरीतील मांडरे चित्रदालन, ऐतिहासिक शाहू खासबाग कुस्त्यांचे मैदान, दूध कट्टे पहायलाच हवेत. कोल्हापुरातून बाहेर पडलं की जोतिबाचं तीर्थक्षेत्र. डोंगरावर भिरभिरणारा वारा आणि सुखद गारवा देणारा किल्ले पन्हाळा. ग्रामीण जीवनाचे दर्शन घडविणारा कणेरी मठ, श्री क्षेत्र नृसिंहवाडी, खिद्रापूरचे पुरातन मंदिर, गगनबावडा येथील रामलिंग हेही पर्यटकांना खुणावतात. निसर्ग पर्यटनाला बाहेर पडलं तर मग कोल्हापूरपासून जवळचं गव्यांसाठी आरक्षित असलेले दाजीपूर अभयारण्य आणि भारतातील पहिले मातीचे धरण राधानगरीतले. चांदोली, आंबा, देवराई, मानोली, येळवण जुगाई, उदगिरी, दाजीपूर, बोरबेट, वाकीघोल, पेरणोलीचा सडा असं सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांत फिरता येतं. पारगड, सामानगड, रांगणा, शिवगड, गगनबावडा, पावनगड, विशाळगड हे किल्ले इतिहासाच्या पाऊलखुणा दाखवत स्फुल्लींग चेतवतात.
माणसाच्या जीवनातील धावपळ जसजसी वाढत जाईल, तसतसे ताणतणावाला फाटे देवून चैतन्याच्या वाटाही शोधण्याची वृत्ती वाढली आहे. त्यामुळे विविध निमित्तांनी, उद्देशाने, मार्गाने पर्यटनाचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी केवळ धार्मिक उद्देशाने होणाऱ्या पर्यटनाचे स्वरुप आज नक्कीच बदलले आहे. निखळ आनंद, मौजमजा यापासून अगदी सामाजिक विषयावरील जनजागृतीपर्यंतच्या साऱ्या उद्देशांना पर्यटन या विषयाने स्वत:मध्ये सामावून घेतले आहे. धार्मिक, सामाजिक, गडकिल्ले पाहणी असो, वन्यजीवांना विविध वनस्पतींना भेटणे असो, पर्यटनाच्या साऱ्या वाटा, सारे रस्ते आपसूकच कोल्हापुरला आल्याशिवाय राहत नाहीत हेच खरं... आणि एकदा कोल्हापूरात आलं म्हटलं की, कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा, कोल्हापुरी मिसळ, कोल्हापुरची भेळ, कोल्हापुरी साज, करकरीत वाजणारी कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी गुळाचा गोडवा, कोल्हापूरची चंदेरीनगरी, हुपरी येथील चांदीचे कलाकुसरीचे दागिने, कोल्हापुरी फेटा या साऱ्या गोष्टींबरोबरच ‘या पाव्हणं’ असं म्हणणारी कोल्हापुरी माणसं आहेतच आपल्या स्वागताला ...तर आपण आज जाणून घेऊयात कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनाविषयी...दक्षिण काशी...महालक्ष्मी रंक असो वा राव साऱ्यांचे हात निस्सीम भक्तीनं जिथं जोडले जातात ती सर्व महाराष्ट्रासाठी आराध्य दैवतं असणारी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी. हेमाडपंथी वास्तूरचनेचे काळ्या दगडातील हे कोरीव मंदीर म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचे वैभव आहे. सकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले असते. नगारखाना, प्रवेशद्वारे, दरवाजावरील घंटा, दगडी चौथरे आणि त्यावरील कोरीव काम ही प्रेक्षणीय आहेत. याठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. नवरात्रातील रोषणाई या मुळातच अप्रतिम सुंदर असणाऱ्या मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलविते. किरणोत्सव हे या मंदिराचे वैशिष्ट्य मानले जाते. जुना राजवाडा आणि भवानी मंडप हे याठिकाणचे आकर्षण आहे. कोल्हापूर एस. टी. स्टँडपासून केवळ दोन कि.मी. अंतर आहे. बस, रिक्षा, आदि सर्व माध्यमातून या ठिकाणी पोहोचता येते. दख्खनचा राजा ज्योतिबा दख्खनचा राजा असा लौकिक असणारे सर्व महाराष्ट्राचे श्रद्धास्थान म्हणजे ज्योतिबा. लगतच्या अन्य राज्यांमधूनही भाविक याठिकाणी येतात. वाडी रत्नागिरी येथे हे हेमाडपंथी मंदिर काळ्या दगडात असून केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंग या तीन मंदिरांचा समूह आहे. ज्योतिबाला घातले जाणारे खेटे हे या ठिकाणचे वैशिष्ट्य आहे. ज्योतिबाच्या सासन काठ्या प्रसिद्ध आहेत. ज्योतिबावर 12 ज्योतिर्लिंगांची मंदिरे आहेत. पहाटे 4 ते रात्री 11 वाजेपर्यंत मंदिर खुले असते. यात्रेच्यावेळी कित्येक टन गुलाल, खोबरे उधळले जाते. जवळच यमाई मंदिर आहे. यात्रेत ज्योतिबाची पालखी यमाई मंदिरास भेट देते.कसे जाल- कोल्हापूरपासूनचे अंतर 20 कि. मी.चे आहे. त्यासाठी सुमारे 40 मिनिटे लागतात. बसस्थानकापासून एस. टी. महामंडळाच्या बसेस अथवा खाजगी वाहने उपलब्ध आहेत. न्यू पॅलेस म्युझियम कोल्हापूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी न्यू पॅलेस दिमाखात उभा आहे. काळ्या कातीव दगडांनी बांधलेली ही वास्तू कोल्हापुरचे वैभव आहे. येथील छत्रपती शहाजी म्युझियम हे खास आकर्षण आहे. राजघराण्यातील वापरातील वस्तू, शाहू महाराजांची दुर्मिळ छायाचित्रे, युद्धात वापरली जाणारी शस्त्रे, शिकार केलेले प्राणी, दुर्मिळ पत्रव्यवहार, राजप्रासाद घड्याळाचा मनोरा हे या वास्तूचे वैशिष्ट्य आहे. मध्यवर्ती बसस्थानकापासून 3 मि.मी. अंतरावर हे ठिकाण असून बससह सर्व प्रकारच्या वाहनांची सुविधा उपलब्ध आहे. टाऊन हॉल म्युझियम कोल्हापूर शहरात नवगॉथिक वास्तूकलेचा उत्कृष्ठ नमुना असलेले टाऊन हॉल हे वस्तूसंग्रहालय असून याठिकाणी सातवाहनकालिन अनेक वस्तू आहेत. ग्रीक देवता, योद्धे, जुनी शस्त्रास्त्रे, दुर्मिळ शिल्पाकृती, चंदन आणि हस्तीदंताच्या कोरीव कलाकृती येथे पाहता येतात. बोटॅनिकल गार्डन, अनेक दुर्मिळ वृक्ष येथे आहेत. बसस्थानकापासून 2 कि.मी. व 15 मिनिटांच्या अंतरावर असून बससह सर्व प्रकारच्या वाहनांची सुविधा उपलब्ध आहे.
खासबाग मैदान कुस्ती म्हटले की कोल्हापूर ही संज्ञाच ठरलेली. खासबाग मैदान म्हणजे देशोदेशीच्या मल्लांच्या शिक्षणाचे माहेरघर, राजर्षि शाहू महाराजांनी दिलेली अनमोल भेट. 20 ते 30 हजार लोक कुस्ती पाहू शकतील इतके प्रशस्त मैदान. कुस्ती परंपरेत अजूनही या मैदानाला मानाचे स्थान आहे. कोल्हापूर बसस्थानकापासून 2 कि.मी. व 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. बसेसच्या सुविधा आहेत. रिक्षानेही जाता येते राजर्षि शाहू जन्मस्थळ- लक्ष्मीविलास पॅलेस रष्टा राजा म्हणून ज्या राजाकडे पाहिजे जाते ते राजर्षि शाहू महाराज यांचे जन्मस्थळ लक्ष्मीविलास पॅलेस, आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून शासन विकसित करीत आहे. शाहूकालिन कागदपत्रे, आरक्षणाचा जाहीरनामा, महाराजांच्या वापरातील वस्तू याठिकाणी आहेत. कोल्हापूर बसस्थानकापासून 3 कि.मी. व 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. बस व रिक्षानेही जाता येते. कणेरी येथील सिद्धगिरी मठ करवीर तालुक्यात कणेरी येथील सिद्धगिरी मठ हे धार्मिक तसेच पर्यटन केंद्र आहे. ग्रामजीवन समृद्धी, शिल्पे पाहण्यासाठी पर्यटकांची याठिकाणी गर्दी असते. उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा असणारे हॉस्पिटल येथे आहे. प्राचिन विद्वानांची शिल्पे आहेत. कोल्हापूर बसस्थानकातून 15 कि.मी. व 40 मिनिटांच्या अंतरावर हे ठिकाण आहे. कोल्हापूर बसस्थानकापासून एस. टी. ची सुविधा आहे. तसेच बस व अन्य खाजगी वाहनांचीही सोय आहे. दत्ताची वाडी अर्थात नृसिंहवाडी शिरोळ तालुक्यात कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या संगमावर श्री दत्ताचे 500 ते 800 वर्षांची परंपरा असलेले पुरातन व प्रशस्त देवस्थान आहे. महाराष्ट्र व कर्नाटकातील हजारो भाविकांची याठिकाणी उपस्थिती असते. श्री नृसिंह सरस्वती यांचे याठिकाणी 13 व्या शतकाच्या उत्तरार्धात वास्तव्य होते. त्यांना दत्ताचा अवतार मानले जाते. देशभरातून भाविक दत्त पादुकांच्या दर्शनासाठी येतात. याठिकाणी मंदिराच्या पायऱ्या नदीपात्रापर्यंत आहेत. कोल्हापूरपासून 55 ते 60 कि. मी. अंतर असून तेथपर्यंत जाण्यासाठी 1.30 ते 2 तास असा कालावधी लागतो. नजिकच्या शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड याठिकाणी राहण्याची व जेवणाची स्वस्त दरात सोय होऊ शकते. याठिकाणी कोल्हापूर, जयसिंगपूर, सांगली, मिरज आदी स्थानकांपासून बसची सुविधा उपलब्ध आहे. जैन धर्मियांचे पवित्र स्थळ श्री क्षेत्र बाहुबली पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचे जैन तीर्थक्षेत्र म्हणून याचा उल्लेख केला जातो. गुरुकुल पद्धतीचे शिक्षण ही या ठिकाणाने दिलेली देणगी आहे. कमालीची स्वच्छता व निसर्ग सौंदर्य आणि भगवान श्री बाहुबलींची 28 फुटी संगमरवरी देखणी आणि भव्य मूर्ती हे या ठिकाणचे वैशिष्ट्य आहे. सभोवताली 24 तीर्थकरांची लहान-लहान मंदिरे आहेत. दर बारा वर्षांनी याठिकाणी महामस्तकाभिषेक होतो. या ठिकाणी दुर्गामातेचे पठार व त्यावर दुर्गामातेचे पुरातन मंदिर आहे. जवळच नव्याने बांधण्यात आलेले जहाज मंदिर असून म्हैसूरच्या वृंदावन गार्डनच्या धर्तीवर संग्रहालय, कारंजे, रंगसंगतीचा नाविन्यपूर्ण अविष्कार, उद्यान, धबधबे यामुळे येथे मोठ्या प्रमाणात लोक पर्यटनासाठी येतात. श्री आदिश्वर स्वामींची विशाल प्रतिमा परिवारासह आहे. श्री क्षेत्र बाहुबली हे आध्यात्मिक, धार्मिक, शैक्षणिकदृष्ट्याही महत्वाचा परिसर आहे. कोल्हापूरपासून 27 कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. सुमारे एक तास लागतो. कोल्हापूर, हातकणंगले स्थानकापासून बसच्या सुविधा आहेत. रिक्षानेही जाता येते.
शाहू तलाव व पुरातन शिव मंदीर आणि जागृत हनुमान मंदीर (अतिग्रे) ता. हातकणंगले, जि.कोल्हापूर. श्री व्यंकटेश मंदिर, रूई,ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर
- रंकाळा तलाव: महालक्ष्मी मंदिराच्या पश्चिम दिशेला,रंकाळा तलाव आहे.हे सकाळी फिरण्यासाठी व करमणुकीचे लोकप्रिय ठिकाण आहे. हा तलाव राजा छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेला आहे.या तलावाच्या सभोवताली चौपाटी व बाग आहे. रंकाळ्याच्या मागील बाजूलाच शालिनी पॅलेस आहे.हे महाराष्ट्रातील तारांकित हॉटेल आहे. भूतकाळातील कोल्हापूर शहर हे चित्रीकरणातील प्रसिद्द ठिकाण आहे. पुष्कळ मराठी व हिंदी चित्रपट कोल्हापुरातील चित्र गृहामध्ये प्रदर्शित झाले आहेत. रंकाळा तलावाजवळ शांतकिरणचित्र गृहामध्ये बरेचसे चित्रपट चित्रित झाले आहेत. भूतकाळातील सर्वात मोठे नांदी असलेले संध्यामठ मंदिर बांधिले आहे.
- पन्हाळगड
कोल्हापूरच्या सभोवताली पन्हाळा, विशाळगड, महिपळगड आणि कलंदिगड ह्या गडांच्या जोड्या आहेत. येथे तुम्ही तीन मोठ्या ईमारती पाहू शकता त्याला ‘अंबरखाना’ म्हणतात, हे एक धान्याचे कोठार आहे त्याची धान्य साठवुण ठेवण्याची क्षमता 50,000 पाऊंड आहे, आत्ता हे एक प्रेक्षनिय स्थळ आहे. पन्हाळा हे ठिकाण कोल्हापूर पासुन 20 कि.मी. अंतरावर आहे.समुद्रसपाटी पासुन 977.2 मी. ऊंचीवर असलेले, पन्हाळा हे मोहक प्रेक्षनिय स्थळ आहे जेथे आपण आपली सुट्टी घालवण्यासाठी जाऊ शकतो. पन्हाळा किल्ल्यामुळे व ईतर डोंगरामुळे करड्या किंवा पांढर्याी रंगाचा वारसा येथे जपला आहे.हा किल्ला राजा भोज यांनी 1178-1209 मध्ये बांधला आहे आणि डेक्कन किल्ल्यांमध्ये सर्वात मोठा किल्ला आहे.हा किल्ला रक्षन करणार्याठ 7 कि.मी. ऊंचीच्या भक्कम भिंतींच्या आतील भागामध्ये आहे.शिवाजी महाराजांची आठवण करूण देणारा पन्हाळा हा एक ऐतिहासीक किल्ला आहे, सिध्दी जोहारने शिवाजी महाराजांच्या पन्हाळ गडाला चार महिने वेढा दिला होता, एका पावसाळ्या रात्री ह्या वेढ्यातुन सुटुन शिवाजी महाराज विशाळगडला गेले, सिध्दी जोहारने त्यांचा पाठलाग केला तेंव्हा बाजीप्रभु देशपांडे ह्यांनी पावनखिंड येथे त्याला आढवले, त्यामुळे शिवाजी महाराज सुरक्षित विशाळगडावर पोहचु शकले, परंतु बाजीप्रभु देशपांडे येथे धारातिर्थ पडले व मरण पावले.किल्ल्या मध्ये अशाच प्रकारची आणखी एक ईमारत आहे तिला सज्जाकोटी म्हणतात, 1500 ए. डी. मध्ये ही ईमारत ईब्राहिम अदिल-शाह यांनी बांधली आहे. शिवाजी महाराज व त्यांचा पुत्र संभाजी महाराज यांना ह्या कैदेत घातले होते जे योग्य संधीचा फायदा घेऊन येथुन फरार झाले.
येथे आजही शिवाजी महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव होते. आश्चर्याची गोष्ट नाही आहे की, त्यांनी आपल्या स्वराज्याची राजधानी असलेल्या राजगड, रायगड आणि शिवनेरी जेथे त्यांनी आपल लहानपण घालवले, पन्हाळा हा असा गड आहे की, जेथे शिवाजी महाराजांनी 500 रहिवासी होते. ब्रिटीशांच्या काळात 1782 ते 1827 पर्यंत राजधानी असलेले हे एक मराठ्यांचे राज्य आहे. ह्या गडाच्या आत मध्ये संभाजी मंदीर, सोमेश्वर मंदीर, तीन दरवाजा, राज दिंडी ई. आहेत.हा किल्ला कोल्हापूर च्या ऊत्तरेला 20 कि.मी. अंतरावर आहे, हा गड सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये येतो, हा किल्ला जमीन सपाटीपासून 400 मी. ऊंचीवर येतो.युध्दकलेच्या दृष्टीने महत्त्वाचा असा पन्हाळा गड आहे, त्याच्यातील एक जो महत्त्वाची भुमिका निभावतो तो पश्चिम घाट आहे, जो मोठा व ईतिहासकालीन आहे. शिलहारा मुख्य राज्यकर्ता भोज II (1178 – 1209) यांच्या नंतर ही कारकिर्द यादवांच्याकडे सुफुर्त करण्यात आली. हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे, बिदारचे बहामनिस; महमुद गवान जे एक हुशार सेनापती होते त्यांनी छावनीपासुन दुर सैन्य ठेवुन पावसाळ्याच्या कालावधीत 1469 मध्ये ह्या गडावर हल्ला केला. पुढे जाऊन 16 व्या शतकात हा किल्ला बिजापुर ह्यांनी काबीज केला. अदिल शाहा यांनी ह्या गडाचे काही चबुतरे व दरवाजे करून घेतले.त्यानंतर 1659 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला काबीज केला, व पुर्णपणे प्रस्थापित होईसतोपर्यंत गडाच्या दुरूस्तीचे काम थांबवले.
1701 मध्ये औरंगजेबाने हा गड काबीज केला, आणि येथुन मग मुघल बादशाह यांच्याकडुन ईंग्रज राज्यकर्ता, सर विल्ल्यमनरिस यांच्या हाती हा गड सुफुर्त करण्यात आला. काही महिने पंत अमात्य रामचंद्र ह्यांच्या सेनांनी हा किल्ला काबीज केला, ज्यांचे स्पष्टीकरण स्वराज्य दंतपुस्तकांमध्ये आहे. 1782 मध्ये ह्याचा राज्यकारभार कोल्हापुर मुख्यालयाकडे सोपवण्यात आला. 1844 मध्ये स्थायिक राज्यकर्त्यांकडुन ब्रिटीशांनी हा किल्ला काबीज केला.गडाच्या मुख्यालया पासून 7 कि.मी. पेक्षा जास्त त्रिकोणी लांबीपर्यंत ह्या गडाची लांबी वाढवण्यात आली. ऊतरण असलेल्या मोठ्या भींती गडाच्या संरक्षणासाठी बांधण्यात आल्या, ह्या भिंतीमध्ये पाहणीकरिता काही ठिकाणी गोल रिकाम्या जागा ठेवल्या आहेत. राहिलेल्या भागामध्ये 5 – 9 मी. मोठी तटबंदी, लांबीचे मोठे गोल बुरूज बांधले. पुर्वेकडील दरवजाला चार दरवजा म्हणतात, ज्याच्या मधुन गडामध्ये येण्यास मार्ग आहे, ह्याचा नाश ब्रिटीशांनी केला.
प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजुला टाकीसारखे हिरवे आणि पांढरे दरगे पहायला मिळतात. तीन दरवजा पर्यंत हा मार्ग पश्चिमेला सरळ 400 मी. जातो.अदिल शाही पध्दतीचे हे एक लष्कराचे कौशल्यपूर्ण ऊदाहरण आहे. प्रवेशद्वारा आतील त्रिज्या खंड गोलाकार खंड दर्शवते. नऊ खंडांच्या रिकाम्या जागांमध्ये चौकोनी खंडाच्या रेषेंची ऊपखंडे आहेत.ह्याच्या वरती गणपती व ईतर देवांच्या मुर्त्या आहेत.बाजुच्या जागेमध्ये क्लिष्टपणे कोरीव भाग एकमेकांशी दुव्याने जोडलेली मार्या ची तटावरील भिंत आहे आणि सुधारीत पाने व फांद्या असलेली नक्षी आहे. सर्वात समोरची मार्यातची तटावरील भिंत वरती दिसते. पश्चिम बाजुच्या आंगणाच्या बाहेरील बाजुला एक सुरक्षा खोली आहे जिच्यामध्ये त्रिकोणी कडा असलेले खांब आहेत. दोनभिंतीच्या मधल्या भागांमध्ये बाहेरच्या बाजुने प्रवेश द्वार आहे. इब्राहीम अदिल शहा यांची आतील त्रिकोणी जागांमध्ये इराणची कोरलेली नाणी आहेत. पश्चिमेला थोड्या अंतरावर तीन दरवजा आहे जो किल्ल्याच्या आतील भागामध्ये बांधला आहे.पन्हाळा टेकडीच्या मध्यावरती बालेकिल्ला येत नाही तोपर्यंत ऊत्तरेला जवळजवळ 1 कि.मी. पर्यंत हा मार्ग सलग्न आहे. हा किल्ला मोठमोठ्या भिंत्यांनी घेरला आहे, आत्ता जास्तीत जास्त भाग पडत आला आहे व काही पडला आहे. येथे तीन मोठ्या चौकोनी ग्यालरी आहेत,ह्यांच्या मध्ये संपुर्ण भुदलाची संरक्षण करण्याची क्षमता आहे व ते मोकळेणाने येथे ऊभा राहु शकतात. मोठ्या, काही 40m by 10m चे 16 रिकाम्या जागा आहेत ज्या छताने झाकल्या आहेत ज्याच्यामध्ये वरती 8 मी. पर्यंत चौकोनी जागा आहेत.काही पायर्यां वरून बाहेरील छतावर जाता येते.
- महालक्ष्मी मंदिर
- भवानी मंडप :छोटे वस्तुसंग्रहालय
- ज्योतिबा मंदिर
- न्यू पॅलेस : शाहू महाराजांचा राजवाडा व वस्तुसंग्रहालय
- टाउन हॉल : छोटे वस्तुसंग्रहालय
- दाजीपूर : दाजीपुर कोल्हापूरच्या वन्य जीवांची ओळख करून देणारे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. जेंव्हा दिवसभर शहरातील प्रदूषित वातावरणात श्वास घेणे मुश्कील होते तेंव्हा या ठिकाणी येऊन आपण खुल्या वातावरणामध्ये फक्त श्वासच नाही तर येथील वन्य जीवांना जवळून पाहण्याची संधी मिळवाल.हे अभयारण्य सकाळी १०:०० ते संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत खुले असते. अभयारण्यात प्रवेश करण्यासाठी तुम्हाला प्रत्येकी ३० रुपये तिकीट आहे त्याचबरोबर आतमध्ये फिरण्यासाठी तुम्हाला जीप हवी असल्यास प्रत्येकी १०० रुपये तिकीट दर आहे.
- गगनबावडा :गगनबावडा हे तालुक्याचे ठिकाण आहे.गगनबावडा हे गाव कोल्हापूर जिल्ह्याच्या व रत्नागिरी जिल्ह्याच्या मध्ये येते हिरवीगार झाडी आणि एक छान धबधबा,गगनगिरी मंदिर,बावडेकर वाडा
- पावनखिंड आणि विशाळगड : सुप्रसिद्ध ऐैतिहासीक ठिकाणे
- धबधबे - राऊतवाडी, बर्की, मानोली (आंबा)
- भुदरगड (गारगोटी)
- गडहिंग्लज: सामानगड
- शालिनी पॅलेस
- शिवाजी विद्यापीठ परिसर
- राधानगरी धरण
कोल्हापुरची भटकंती अशी करा:-
ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिकदृष्टय़ा महत्त्वाचं असलेलं कोल्हापूर एरवी चटकदार मिसळीसाठी आणि मटणाबरोबरच्या पांढऱ्या-तांबडय़ा रश्शासाठीही प्रसिद्ध आहे. खवय्ये कोल्हापूरला जातात ते खाण्यापिण्याच्या चैनी करण्यासाठीच..कोल्हापूरच्या नावातच एक प्रकारचा रांगडेपणा दडलेला आहे. त्यामुळे उगा कुचकुचत जेवणाऱ्यांनी कोल्हापूरच्या वाटेलाच जाऊ नये. मुंबईच्या आणि पुणेकरांच्या हिशेबी वृत्तीनुसार वाटीभर 'एक्स्ट्रा' रस्सा आणि एक्स्ट्रा चटणीचा हिशेब येथे केला जात नाही. 'अजून घे की रं मर्दा' म्हणत बादलीनंच रस्सा वाढणारेदेखील आहेत या शहरात. त्यामुळे कोल्हापुरात जायचं तर भरपूर खावं-प्यावं आणि भरपूर फिरावं. भले आपण पैलवान नसू पण पैलवानांच्या गावात गेल्यावर शहरी कोतेपणा बाजूलाच ठेवावा. अर्थात त्याआधी आणखी एक ध्यानात घ्यावं. महाराष्ट्रातच नाही तर देशभरात उडपी हॉटेल अथवा अन्यांनी कोल्हापुरी जेवण म्हणून मिरची पावडर आणि गरममसाला टाकून जे काही लालभडक पदार्थ खायला लावले आहेत ते म्हणजे कोल्हापुरी नाही. कोल्हापुरी म्हणजे चमचमीत, पण उचकी लावणारं नाही. त्याची चव न्यारीच.स्वातंत्र्यलढय़ातील योगदान ते सामाजिक चळवळीचा भलामोठा वारसा या शहरास लाभला आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या रुपाने एक प्रचंड मोठा सामाजिक बदल त्यांनी अनुभवला आहे. भालजी पेंढारकर, बाबूराव पेंटर अशा अनेक चित्रतपस्वींनी येथे कलेचा वारसा निर्माण केला आहे. सहकाराच्या क्षेत्राने सर्वात मोठी झेप घेतली ती याच जिल्ह्य़ात. संपूर्ण महाराष्ट्राची कुलदेवता महालक्ष्मी आणि कुलदैवत जोतिबा असा कायमचा वरदहस्त लाभलेलं हे कोल्हापूर. आणि पंचगंगेच्या पाण्यावर पोसलेली येथील खाद्यसंस्कृती.किमान दोन ते तीन दिवस तरी हातात ठेवून कोल्हापुरी प्रस्थान करावं. मुंबई-बंगळुरू महामार्गावरील हे शहर रेल्वे आणि रस्तामार्गाने व्यवस्थित जोडलेलं आहे. सकाळी सकाळी शहरात प्रवेश करते व्हावे. साताठशे रुपयांपासून ते दोन-तीन हजारांपर्यंत आपल्या खिशाला परवडेल असं लॉज/हॉटेल स्टेशन आणि एसटी स्टॅण्ड परिसरात सहज मिळून जातील. लांबून येणार असाल तर रेल्वे उत्तम. शहरात दोन-चार दिवसांसाठी गाडी मिळू शकते. रस्तामार्गे गाडी करून आलात तरी हरकत नाही. स्नानादी आन्हिकं उरकून महालक्ष्मीचं दर्शन घ्यावं आणि खाद्य-भटकंतीचा श्रीगणेशा करावा तो कोल्हापुरी मिसळने. (आधी पोटोबा करून मग दर्शनाला जायचं असेल तरी हरकत नाही.)अस्सल कोल्हापुरी मिसळ. बारीक फरसाण, त्यात गरजेनुसार पोह्य़ाचा वगैरे चिवडा, एखादा महाभाग गोल भजी चुरूनदेखील घालतो. वर मटकीची उसळ. हो मटकीचीच. मुंबईसारखी वाटाण्याची नाही. कट हवा असेल मारून, नको असेल तर नुसतीच उसळ, डबल कट हवा तर तोदेखील मिळेल. उसळ करतानाच त्यात पाण्याचं प्रमाण अधिक ठेवून तो कट म्हणून वापरला जातो, तर काही ठिकाणी कट वेगळा करायचीदेखील पद्धत आहे. येथे पाव म्हणजे जाडा स्लाइस असतो. त्याला पेटी पाव म्हणतात. मुंबईच्या वडापावच्या गोल पावाला येथे किंमत नाही. पेटी पाव त्यातही साइडच्या पावचा (हा जरा जाड असतो) आग्रह धरणारा तो म्हणजे कोल्हापुरी.कोल्हापुरी मिसळ मिळणारी ठिकाणं अनेक आहेत. पण उद्यमनगरातली फडतरे आणि महालक्ष्मी मंदिराजवळचे चोरगे ही दोन ठिकाणं आवर्जून भेट देण्यासारखी. येथे शुद्ध मिसळ मिळते. म्हणजे पोस्टाच्या स्टॅम्पपासून शाम्पूच्या सॅशेपर्यंत सारं काही मिळणाऱ्या जनरल स्टोअरसारखं येथे नाही. फक्त आणि फक्त मिसळच, पोट आणि मन भरेपर्यंत. हवा तेवढा रस्सा मागून घ्या. फडतरेंचं अख्खं कुटुंबंच मिसळीत गर्क असतं. सुट्टीचा दिवस असेल तर तुम्हाला रांगेतदेखील उभं राहवं लागू शकेल याची नोंद घ्यावी.तर हे मिसळपुराण आवरतं घेऊन, तुडुंब भरलेल्या पोटाने गाडी जोतिबाकडे वळवावी. हा खरा रांगडा देव. त्याचं स्थान डोंगरातच. वपर्यंत गाडी जाते. पुन्हा काही पायऱ्या उतरून देवळात जाता येतं. सुट्टी सोडून गेलात तर शांतता असते. आरामात दर्शन घ्यावं, भंडारा माथी लावावा आणि त्या डोंगरावरून उतरून दुसऱ्या डोंगराच्या चढावर म्हणजे पन्हाळ्याला गाडी न्यावी. इसवी सनाच्या तिसऱ्या शतकापासून शिलाहारांच्या काळापासून ते थेट आताआतापर्यंतचा ताजा इतिहास. चार हजार फूट उंचीचा हा गिरिदुर्ग अत्यंत प्रशस्त आहे आणि वपर्यंत गाडी जाते. गाडीने संपूर्ण गड फिरता येतोच, पण पायी फिरलात तर इतिहासाची चार अधिक पानं वाचता येतील. पण आता येथील गाइडनाच गाडीतून किल्ला फिरवायची सवय झाली आहे. तुमच्या सुदैवाने एखादा जुना जाणता अथवा नवा हौशी तयार झाला तर पायी फिरता येईल. फार काही कष्ट पडत नाहीत.वेशीवरच शिवा काशिद यांचा भव्य पुतळा तुमचे स्वागत करतो. सिद्दी जौहारच्या वेढय़ाच्या वेळी हे प्रतिशिवाजी बनून सिद्दीला भेटायला गेले आणि गुंगवत ठेवलं. त्या संधीचा फायदा घेऊन महाराज वेढा तोडून निसटले. शिवा काशिदना वीरमरण आलं. त्याच्या समाधीकडे जाण्यासाठी पुतळ्यापासून थोडं खाली उतरून जावं लागेल. जाणकार असेल तर लगेच पाहता येईल. तीन दरवाजा, सज्जा कोठी, पुसाटीचा बुरूज, अंबरखाना, अंधारबाव, बाजीप्रभूचा पुतळा, सज्जा कोठी, चार दरवाजा असं सारं पाहवं, ऐकावं (दुर्गावरचं एखादं पुस्तक सोबत असेल छानच). दमून भागून मग मध्येच कधी तरी तीन दरवाजापाशी मस्त चुलीवरची भाकरी, झुणका आणि खर्डा (म्हणजे ठेचा) मनसोक्त खावी. ही इथली खासियत. आता पन्हाळ्याची पार दुदर्शाच झाली आहे. पर्यटनासाठी साऱ्या सोयी करण्याच्या नावाखाली अनेक गोष्टी येथे चालतात. अनेक दुर्गप्रेमी त्यावर प्रतिबंधात्मक उपाय करत असतात. असो.पुनश्च कोल्हापूर गाठावं. एव्हाना सायंकाळ दाटून आलेलीच असते. मग रंकाळ्यासारखं दुसरं ठिकाण नाही. त्यापूर्वी केशवराव भोसले नाटय़गृहाजवळच्या राजाभाऊंची भेळ बांधून घ्यावी, किंवा खाऊन परत बांधून घेतली तरी चालेल. अस्सल कोल्हापुरी चुरमुरे वापरून केलेली चटकदार भेळ ही राजाभाऊंची तीस वर्षांची परंपरा आहे. भेळेची रेडीमेडी पाकिटंदेखील मिळतात.कोल्हापुरी मटण हा दिवसाचा उत्कर्षबिंदू. आता तुम्ही म्हणाला दिवसभर तर चरतोच आहोत. म्हणूनच सांगतो की, कोल्हापूरच्या पर्यटनासाठी मस्त हिवाळाच निवडा. त्या आल्हाददायक हवेत कितीही खाल्लं तरी पचतं. तर मटणासाठी अक्षरश: असंख्य पर्याय तुमच्यापुढे आहेत. पण अस्सल मटण खायचं असेल तर मात्र शहरातील काही नामवंतांकडेच जावे लागेल. त्यामध्ये पहिला नंबर लागतो तो मंगळवार पेठेचा. मटणाचं जेवण ही या पेठेची परंपराच आहे म्हणा ना. अनेक घरी मटणाची खानावळ असाच प्रकार आहे. पेठेच्या मेन रोडला तब्बल ७२ हॉटेल्स असल्याचं जाणकार सांगतात. त्यातदेखील स्पेशलायझेशन आहे. पाण्याच्या खजिन्याजवळचं महादेव प्रसाद म्हणजे एकदम ऑथेंटिक मटन. पण येथे गर्दीच एवढी असते की साडेआठ - पावणे नऊलाच जेवण संपतं. आधीच नंबर लावावा लागतो. दिवसभराच्या दमणुकीमुळे इतक्या लवकर शक्य नसेल तर मग बुधवार पेठेतलं हॉटेल नीलेश, पद्मा टॉकीजजवळचं पद्मा गेस्ट हाऊस आहेच. किंवा जरा लांब जात आवर्जून खाल्लंच पाहिजे असं रुईकर कॉलनीसमोरचं परख.आपण अट्टल मांसाहारी असाल तर येथे येऊन उगाच चिकन खाण्याचा करंटेपणा करू नये आणि तसंही इतर फालतू पर्याय येथे नसतातच. मटण फ्राय, मटण रस्सा, चिकन, अंडाकरी थाळी आणि व्हेज थाळी इतपतच मेन्यू कार्ड असतं. काही ठिकाणी तर मेन्यू कार्डदेखील ठेवायची गरज नसते. ऐसपैस बसावं. थाळी लावायला घेतली की भाकरी थापायला सुरुवात होते, मस्त टम्म फुगलेली भाकरी, सुकं मटण, तांबडय़ा-पांढऱ्या रश्शाच्या वाटय़ा आणि सोबतीला कांदा-दही मिक्श्चर. रश्शाच्या वाटय़ावर वाटय़ा रिचवणं हा अस्सल कोल्हापुरी रिवाज. आपणपण रिचवाव्या. किती वाटय़ा प्यालात याचा कोणी हिशेब मागणार नाही. (तुमचा तुम्हाला ठेवायचा असेल तर ठेवा बापडे). भाकरी नको असेल तर पोळीचा पर्यायदेखील असतो. पण तीदेखील घडीची आणि थाळीभर मोठी. जे पचेल ते घ्यावं. फुकटचे शहरी रीतिरिवाज न बाळगता मटणाची नळी चाटून पुसून चोखावी. भाकरी संपली की येतो तो मसालाभात. लग्नाच्या पंगतीतला नाही. पण साधारण तसाच. त्यावर मस्त परतलेला चुरचुरीत कांदा भुरभुरलेला असतो. वेटरशी सलगी करून तो आणखी मागून घ्यावा. तट्ट भरलेल्या पोटाने निवासाचं ठिकाण गाठावं आणि झकास ताणून द्यावी.जरा वेगळं काही ट्राय करायचं असेल तर अट्टल खवय्यांसाठी रक्ती-मुंडी हा प्रकार आहे. शाहुपुरी सहावी गल्लीतलं हॉटेल केशव हा त्यासाठी सर्वोत्तम पर्याय. कोल्हापुरातील जुनेजाणते खाद्यप्रेमी येथे आवर्जून येत असतात. बोकड कापतानाचं पहिलं रक्त गोठून जातं ते आणि भेजा असं एकत्र शिजवलं जातं. हवं असेल तर वेगवेगळंदेखील मिळतं.कोल्हापूरच्या मटणाचं इतकं काय ते अप्रूप असं तुम्ही म्हणत असाल. मुळातच कसंय की, मुंबईसारखं अथवा इतर शहरांसारखं इथलं जनावर कृत्रिम अन्न खाऊन वाढत नाही. बोकड, मेंढय़ा ही हिरवा पाला खाऊन मोठी झालेली असतात. त्यात येथील हवामान आणि पाणी हे दोन घटकदेखील महत्त्वाचे. दुसरं अस की मुंबईतल्या मटणात कोथळा आणि आतडी वेगळी काढून विकली जाते. येथे तसं नाही. हे सारं काही एकत्रच शिजवलं जातं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मसाला हा मर्यादित असतो. खरा फरक आहे तो करण्यातला. या जेवणाला घरगुती चव असते. पाककला या शब्दाला न्याय देणारा. बहुतांश ठिकाणी बायकाच कामावर असतात. भाकऱ्या तर बायकाच करतात. अर्थात हे झालं वर नाव घेतलेल्या हॉटेलांसाठी.तुम्हाला जर हाय फाय स्टायलिश जेवायची सवय असेल तर मात्र मग हीच चव मिळेल याची खात्री देता येणार नाही. पर्याय आहेत. स्टेशन आणि एस.टी. स्टॅण्ड परिसरात अनेक हॉटेल्स आहेत, त्यात कॉन्टिनेंटलपासून सारं काही मिळेल. अर्थात ते सारं काही एटीकेट्सवाल्यांसाठी. पण कोल्हापुरात आल्यावर जरा एटिकेट्स बाजूला ठेवणंच उत्तम.आता इतकं वर्णन मांसाहाराचंच केल्यावर शाकाहारींनी कोठे जायचं हा प्रश्न खरं तर तुमच्यापेक्षा मलाच पडला आहे. पण कसंय की कोल्हापुरी जेवण म्हटलं की मांसाहारीच असा एक गृहीतक इतकं पक्कं रुजलंय की मी तरी काय करणार. असो, शाकाहारींसाठी मंडईतलं जोरबा हॉटेल आणि लक्ष्मीपुरीतलं खवय्या ही शाकाहारी थाळी मिळणारी ठिकाणं.दुसरा दिवस केवळ कोल्हापूर दर्शनासाठी राखून ठेवावा. कोल्हापूरचा ऐतिहासिक आणि कला वारसा समजून घेण्यासाठी.काल मिसळ खाऊन तृप्त झाला असाल तर आज कटवडय़ाकडे वळू या. नसेल तर पुन्हा एकदा मिसळीचा राऊंड करायला हरकत नाही. कटवडा मिळणारी ठिकाणं अनेक आहेत पण राजाराम पुरीतल्या दहाव्या गल्लीत अंबिकाचा कटवडा म्हणजे एकदम जाऊं दे झाडून या कोल्हापुरी स्टाइलनं जाणारा आहे. मिसळीचाच कट किंवा वेगळा केलेला नुसता कट मारलेला वडा आणि पाव. अर्थातच पेटी पाव, जाडा स्लाइस. हा वडा म्हणजे बटाटावडाच असतो पण मुंबईच्या वडापावसारखा नाही. मुळात त्याचा आकारच एकदम सणसणीत. गरम गरम वडा आणि बाजूला पाव. पावात वडा घालायची पद्धत येथे नाही. शाहू स्मारकाजवळचा दीपकचा वडा, नाही तर राजाराम कॉलेजच्या कंपाऊंडला लागूनच असलेला श्यामचा वडा. शहरात कोणालाही विचारा. अगदी थेट नेऊन सोडणार. कायम गरम वडा. समोरासमोर वडा सोडून मिळणारी अशीच अनेक ठिकाणं फक्त याच शहरात सापडतील.पण आज फार काही मसालेदार नको असेल तर मग थेट शिवाजी पेठेतील शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याजवळ जाऊन दावणगिरी लोणी डोसा चाखू शकता. कोल्हापुरातील दावणगिरीचा हा आद्य प्रवर्तक म्हणावं लागेल. अगदी हलकाफुलका प्रकार. स्पंजसारखे छोटे छोटे डोसे. वर लोणी सोडून केलेले. हा पदार्थ कर्नाटकातला. पण कोल्हापुरात अगदी फेमस झाला आहे. त्याच जोडीला गरमागरम अप्पे विकणारे अनेक गाडे महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात दिसतील. दोन्ही पदार्थ पचायला एकदम हलके असल्यामुळे दोन्ही ठिकाणी गेलात तरी हरकत नाही.पोटोबा व्यवस्थित झाला की कोल्हापूर दर्शनाला बाहेर पडावं. सुरुवात टाऊन हॉल म्युझियमपासून करावी. ब्रह्मपुरी ते कोल्हापूर हा प्रवास उलगडून दाखविणारं हे म्युझियम पाहिलं की कोल्हापूरच्या अथपासून इतिपर्यंतचा इतिहासाचं आकलन होतं.कोल्हापूर म्हटलं की, शाहू महाराजांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या कार्याच्या अनेक खुणा आजदेखील त्यांचा वारसा सांगताना दिसतात. अर्थातच महाराजांच्या जन्मस्थानाला आवर्जून भेट द्यावी. साधारण चार किलोमीटरवर बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस हे त्यांचं जन्मस्थान. शाहू महाराजांच्या जीवनाशी निगडीत अनेक गोष्टींच येथे जतन करण्यात आला आहे.त्यानंतर जवळच्या कण्हेरी मठाला भेट द्यावी. वाटेवरच गोकुळ शिरगाव एमआयडीसी लागते. येथील गोकुळ दूध प्रकल्प आहे. रीतसर परवानगी घेऊन हा सारा व्याप पाहता येतो. कण्हेरी मठात बारा बलुतेदार, अनेक थोर भारतीय ॠषी मुनी यांची म्युरल्स आहेत. हे सारं पाहावं आणि पुन्हा कोल्हापुरात येऊन पोटोबाच्या मागे लागावं. काल सांगितलेल्या हॉटेलपैकी जेथे जाता आलं नाही तिकडे जावं. काल सुकं मटन खाल्लं असेल तर आज रश्श्यातलं खावं. मटण खर्डा नावाचा आणखी एक प्रकार सध्या खूप फेमस आहे. तो खावा आणि थोडा वेळ आराम करून पुनश्च बाहेर पडावं. दुपारी शालिनी पॅलेस, न्यू पॅलेस, कैलासगडची स्वारी मंदिर, चंद्रकांत मांडरे कलादालन असे पर्याय आहेत.खासबाग मैदानजवळ असणारं कैलासगडची स्वारी मंदिरात कलायोगी जी. कांबळे यांची अनेक चित्रं जपलेली आहेत. त्यातील महत्त्वाचं चित्र म्हणजे जॉर्ज व्हॅलेंटाइन यांनी डच चित्रकाराकडून तयार करून घेतलेल्या रेखाचित्रावरून जी. कांबळे यांनी तयार केलेलं शिवाजी महाराजांचं तैलचित्र येथे आहे. १९७० साली राज्य शासन प्रमाणित केलेल्या या चित्रावरून पुढे सर्वत्र प्रती काढण्यात आल्या. कांबळे यांनी चितारलेली राज्याभिषेक, गंगावतरण, विश्वरूप दर्शन अशी चित्रं आहेत. हे मंदिर सकाळी पाच ते नऊ या काळात खुलं असतं.असाच एक दुसरा वारसा म्हणजे चंद्रकांत मांडरे यांचं चित्रदालन. मांडरे यांची शे-दोनशेहून अधिक चित्रं आणि त्यांनी काढलेली छायाचित्रं त्यांच्या राहत्या घरी प्रदर्शित केलेली आहेत. त्यांचं घरच त्यांनी या संग्रहालयासाठी दिलेलं आहे.त्यानंतर आता शाहू महाराजांचे निवासस्थान असणारे न्यू पॅलेस पाहायला जावं. कसबा बावडा रस्त्यावरील ही इमारत १८८४ साली बांधण्यात आली. स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असणाऱ्या या इमारतीत उत्तम संग्रहालय आहे. नाना प्रकारची शस्त्रे, तैलचित्रं, छायचित्रे अशा प्रकारे ही वास्तू सजलेली आहे. मराठेशाहीचं वैभव असणारी वास्तू आवर्जून पाहावी अशीच आहे.कोल्हापूर म्हटल्यावर पैलवानांचा शड्डू आपोआपच कानात घुमू लागतो. कोल्हापुरात आलो आणि मिसळ, मटण खाल्लं नाही तर उणीव राहते. तसंच तालिमीत किमान डोकावावं तरी लागेलच. शाहुपुरी गंगावेस तालीम मंडळ, मोतीबाग तालीम मंडळ अशा काही तालमी आजदेखील कार्यरत आहेत. सायंकाळच्या वेळी गेलात तर आजदेखील तेथे अनेक पैलवान घुमत असतात. कुस्ती खेळणार नसलो तरी इकडे जाऊन लाल माती आणि कोल्हापूरच्या रांगडेपणाचं मूळ नक्कीच पाहावं. खासबाग मैदानाच्या आसपासच आहे, हे सर्व काही.अर्थात तालमी पाहल्यानंतर आपणासदेखील चार जोर बैठका काढाव्याशा वाटल्या तर काढून घ्याव्यात आणि मग एक भन्नाट प्रकार अनुभवण्यासाठी दूधकट्टय़ावर जावं. केवळ कोल्हापुरातच पाहायला मिळेल असा हा प्रकार. गंगावेस, मिरजकर तिकटी आणि खासबाग मैदानाजवळ हे दूध कट्टे आजदेखील अस्तित्वात आहेत. 'दूधकट्टा गंगावेशी काळ्याभोर उभ्या म्हशी', असं शाहीर कुंतीनाथ करके यांनी कोल्हापूरच्या पोवाडय़ात याचं वर्णन केलं आहे. रात्री सात ते अकरा या वेळेत येथे म्हशी बांधलेल्या असतात. त्यांचे मालक त्यांना चारा-वैरण देत असतात. तुमच्या मागणीप्रमाणे अर्धा लिटर, लिटर असं धारोष्ण दूध तुम्हाला प्यायला मिळते. अर्थात हे पचवायची ताकद हवी हे मात्र नक्की.दुसरा पर्याय आहे तो जोतिबाच्या वाटेवरचा, उसाच्या गुऱ्हाळांचा. कालपरत्वे इतर ठिकाणची गुऱ्हाळं बंद झाली असली तरी येथे तुम्हाला ती पाहता येतील. उसाचा रस आटवून, त्यापासून गूळ तयार करण्याची सारी प्रक्रिया येथे पाहता येईल. चवदेखील चाखता येईल. मात्र डिसेंबर-जानेवारी या गुऱ्हाळाच्या मोसमात गेलात तरच.काल आणि आज भरपूर मटण खाऊन झालं असल्यामुळे आता आजच्या रात्री शाकाहाराचा प्रयोग करायला हरकत नाही. सध्या कोल्हापुरात गल्लीबोळात अख्खा मसूर आणि तंदूर रोटीचं पेव फुटलं आहे. पण याची सुरुवात करणारा आद्य पुरुष म्हणजे इस्लामपूर रोडवरचा पाटील धाबा. कोल्हापूरपासून सुमारे २५ किलोमीटरवरचे हे ठिकाण. मात्र उशिरा म्हणजे नऊनंतर गेलात तर रिकामं बॅरल - पिंप पाहावं लागेल. येथे अक्षरश: बॅरल भरून मसूर शिजवले जातात आणि सारे फस्त होतात. याची ख्यातीच इतकी की कोल्हापुरातील अट्टल मांसाहारी माणूसदेखील येथे जेवायला येतो.अशा खाण्या-पिण्यात भटकण्यात दोन दिवस भुर्रकन उडून जातात. आता परतीच्या प्रवासासाठी तिसरा दिवस आपण कोठे जाणार, कोणत्या मार्गाने कसे जाणार यावर ठरवावा. म्हणजे कोकणात उतरायचे असेल तर आंबा घाट, गगनबावडा घाट, भुईबावडा घाट असे पर्याय आहेत. हे तीनही घाट म्हणजे निसर्गसौंदर्याची मुक्त उधळणच म्हणावे असे आहेत. गोव्यात जायचे असेल तर अंबोली घाटाने उतरण्याचा पर्याय आहे. कर्नाटकात जायचे तर हायवे आहेच. आंबा घाटाने जात असाल तर वाटेत मलकापुरजवळील लव्हाळे गावातील नागराज हॉटेलमधील चुलीवरच्या मटणाचा आनंद घेता येईल.देशावरच जायचे असेल तर मग पुण्याच्या दिशेने हायवे पकडा, जयसिंगपूर-सांगलीवरुन पुढे सोलापूर, उस्मानाबाद, बारामतीला जाता येईल. सांगलीला जाताना थोडी वाट वाकडी करून इचलकरंजी मार्गे खिद्रापूर गाठावं किंवा कोल्हापुरातूनच येथे जाऊन परत यावं असंदेखील करता येईल. कृष्णेच्या तीरावरील खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर पाहावं. शिलाहारांच्या काळात साधारण ११ व्या शतकातील हे पुरातन असं हे शंकराचे मंदिर पाहून मग पुढे २० किलोमीटरवरील नृसिंहवाडी या दत्त स्थानाला भेट देता येतील. वाटेत इचलकरंजीमध्ये पुन्हा मांसाहारींसाठी अनेक घरगुती खानावळी आहेत. अख्खीच्या अख्खी एक गल्लीच या खानावळींनी व्यापली आहे. घोडके आणि बुगड या दोन प्रसिद्ध खानावळी. पण त्या रात्रीच सुरू असतात.खिद्रापूर नृसिंहवाडी वाटेवर कुरुंदवाडला भेट द्यायची ती केवळ तेथील पेढय़ांसाठी. कंदी पेढय़ांसाठी आज जरी साताऱ्याचं नाव प्रसिद्ध असलं तरी एकदा कुरुंदवाडचे कंदी पेढे एकदा खाऊन पाहाच. दूध घोटून बासुंदी, ती घोटून खवा, तो घोटून कुंदा आणि तो आणखी घोटून घोटून त्यातील पाण्याचा संपूर्ण अंश नाहीसा झाल्यावर त्यापासून तयार केलेला पेढा. दोन-चार खाल्ले की शहरी माणसाचा नाश्ताच व्हायचा. या पेढय़ात वरून एक चमचाभरदेखील साखर मिसळली जात नाही. फ्रिजमध्ये न ठेवतादेखील किमान आठवडाभर तरी टिकतो. मार्केटिंगच कसलंच तंत्र नसल्यामुळे हा केवळ कुरुंदवाडपुरताच मर्यादित राहिलेला. नृसिंहवाडी आणि कुरुंदवाडची बासुंदीदेखील प्रसिद्ध. ग्लासभर बासुंदी प्यावी किंवा जेवणात घ्यावी आणि दत्तदर्शन करून तृप्त होत घरच्या वाटेला लागावं
करवीरवासिनी महालक्ष्मी :
महालक्ष्मीच्या प्रतिष्ठापनेनंतर शहराचा उल्लेख करवीर असा आढळतो.तत्पुर्वी कोल्लापुर,कोल्लपुर,कोल्लगिरी,कोल्लादिगिरीपट्टण अशी नावे प्रचिलत होती. कोल्ल म्हणजे दरी व द-यांचे गाव म्हणजे कोल्हापुर,अशी ही व्युत्पत्ती मानली जाते. सारांश काय तर ब्रम्हपुरी,करवीर व कोल्हापुर अशी स्थल नामांची बहुविध रुपे उपलब्ध होतात.महालक्ष्मी देवालयाच्या स्थापनेमुळे कोल्हापुरात धार्मिक केंद्राचे स्वरुप प्राप्त झाले त्यातुनच सांस्कृतिक व आर्थिक क्रांतीची नानाविध रुपे प्रकट झाली.
इ.स.१२ व्या शतकाच्या कोल्हापुरात शिलाहारांचे राज्य होते. इ.स.१२१0 मध्ये देवगिरीचा राजा सिंधणदेव याने कोल्हापुराच्या शिलाहार सम्राट भोजराजाचा पराभव केला.त्यानंतर देवगिरीच्या यादवांच्या एका प्रांताची राजधानी म्हणुन कोल्हापुर अग्रेसर राहिले.१२९८ मध्ये देवगिरीच्या यादवांचा पराभव झाल्यानंतर 1306-1307 मध्ये कोल्हापुर शहरात मुस्लिम सत्तेचा अम्मल स्थापन झाला. श्रीछत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगड जिंकल्यानंतर (१६६९) पुनश्च कोल्हापुर परिसर स्वराज्यात समाविष्ठ झाला.पुढे स्वातंत्र्य युध्दाच्या व कोल्हापुर शहराने मोलाचा इतिहास घडविला आहे.महाराणी ताराबाईच
महालक्ष्मी मंदिर संकुल...
महालक्ष्मी मंदिराचे गर्भगृह आधी बांधले व पुढील राजवटींमध्ये हे मंदिर पूर्ण झाले, पण मंदिरस्थापत्य व मूर्ती प्रतिष्ठापन शास्त्रांचा आधार घेता वरील विधान तितकेसे संयुक्तिक वाटत नाही. शिवाय याला पुष्टी देणारे सबळ पुरावेही उपलब्ध नाहीत. त्यामुळे मंदिर निर्माण कर्ता अजूनही अंधारातच आहे, असे म्हणण्यास हरकत नाही.
महालक्ष्मी मंदिर समूह व त्याची एकंदर स्थिती विचारात घेता असे आढळून येईल की, हा त्रिकूट प्रासाद टेकडीवर वसलेला असावा. मंदिरापासून पश्चिमेकडे रंकाळा तलावापर्यंत जाणवण्याइतपत उतार आहे. शिवाय मुख्य त्रिकूट प्रासादाभोवतीची मंदिरे ही त्या मानाने खूपच खालच्या पातळीवर आहेत. महालक्ष्मी मंदिर हे पश्चिमाभिमुख आहे. (पूर्णत: पश्चिमेकडे नसून 50 ने वायव्येकडे तोंड करून आहे) नोव्हेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांमध्ये सूर्यास्तावेळी सूर्याची किरणे महालक्ष्मीच्या विग्रहावर काही काळ स्थिरावतात.
कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती सुप्रसिद्ध असे महालक्ष्मी मंदिर आहे. किंबहुना, आपण असे म्हणू शकतो की, कालांतराने महालक्ष्मी मंदिराभोवती वस्ती वाढल्याने हे मंदिर शहराच्या मध्यवर्ती आले. प्राचीन कोल्हापूरसंबंधी विस्तृत माहिती देणारा एकमेव ग्रंथ म्हणजे 'करवीरमाहात्म्य' कोल्हापूर आणि परिसरातील जवळजवळ सर्व देवता व त्यांच्या स्थानांची माहिती या ग्रंथात मिळते. या ग्रंथात प्रमुख वर्णन आढळते ते महालक्ष्मी व तिच्या विजयगाथांचे! करवीर महात्म्यानुसार महालक्ष्मीच सर्वाची जननी असल्याचे घोषित केलेले आहे. करवीरमाहात्म्य ग्रंथाच्या रचनेचा काळ मात्र अद्यापि वादाचा मुद्दा आहे. याच्या रचनेच्या काळासंदर्भात एकमत नाही. कोल्हापूरला 'कोल्हापूर' (मूळ नाव : कोल्लापूर) हे नाव कशामुळे मिळाले याची कथा 'करवीर माहात्म्यात' पाहायला मिळते. महालक्ष्मीने कोल्लासुराचा वध केला व त्याच्या प्रार्थनेवरून या क्षेत्राला 'कोल्लापूर' असे नाव प्राप्त झाले. भारतातील प्रमुख शक्तिपीठांमध्ये महालक्ष्मीचे पीठ म्हणजेच कोल्हापूर किंवा करवीरक्षेत्र हे प्रमुख आणि पूर्ण पीठ आहे. इथे महालक्ष्मीचे स्थानिक नाव 'अंबाबाई' आहे. कोणे एके काळी हे क्षेत्र तीर्थयात्रेचे प्रमुख केंद्र होते आणि त्यामुळेच याला 'दक्षिण काशी' असे नाव प्राप्त झाले. (या क्षेत्राची तुलना 'काशी' बरोबर केली जाते.)
महालक्ष्मी मंदिर कोणी बांधले, हा संशोधकांसमोर अद्यापि एक प्रश्नच आहे. या अनुषंगाने अनेक संशोधकांनी इतिहास व त्याच्या ताम्रपट, दस्तऐवज, शिलालेख यांसारख्या पुराव्यांच्या आधारे महालक्ष्मी मंदिर बांधणीच्या कालखंडाचा अभ्यास करून अनेक आडाखे बांधले आहेत. तसे पाहता, चालुक्या (बदामीचे) राजांनी महालक्ष्मी मंदिर बांधले अथवा बांधकामाला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांच्या पुढील राजवटींनी हे बांधकाम पुढे वाढवले असा एक समज सर्वमान्य झाला आहे. इतिहास सांगतो की, शालिवाहन, बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार (कल्याणी चालुक्यांचे मांडलिक व नंतर स्वतंत्र राजवट घोषित) यादव, बहामनी, मराठेशाही यांसारख्या सत्ता कोल्हापूरवर राज्य करून गेल्या; पण बदामीचे चालुक्य ते देवगिरीच्या यादवांपर्यंतच्या कोणत्या राजवटीत महालक्ष्मी मंदिर बांधले गेले याचा अजून मागमूस लागलेला नाही वा कोणताही सबळ पुरावा उपलब्ध नाही.
कोल्हापुरातच सापडलेल्या एका भग्न शिलालेखानुसार अशी माहिती मिळते की, परकीय आक्रमणे होण्याआधी महालक्ष्मी मंदिरावर स्वकियांनी हल्ला केला. दक्षिणेतील चोल राजांनी कल्याणी चालुक्यांच्या विरोधी मोहीम राबवून त्यांचे राज्य कोल्हापूरपर्यंत जिंकून घेतले. या विजयोन्मादात त्यांनी महालक्ष्मी मंदिर जाळण्याचा प्रयत्न केला. या नुकसानीतून मंदिराचे रक्षण व्हावे यासाठी कोणी मुथ्थैय्या नामक लढवय्याने आपले प्राण गमावले. कालगणनेनुसार ही घटना अकराव्या शतकात घडली, असा अनुमान निघतो. या सर्व वर्णनातून एक गोष्ट स्पष्टच प्रतीत होते की, जर महालक्ष्मी मंदिर जाळण्याचा प्रयत्न झाला होता, त्या अर्थी ते त्या काळी लाकडाचे (पूर्णत: वा अंशत:) होते. म्हणून आपल्याला असा अंदाज बांधण्यास काही हरकत नाही की, सध्या दृश्यमान असलेले महालक्ष्मी मंदिर हे कल्याणी चालुक्यांच्या राजवटीत बांधले गेले असावे.
डॉ. मिराशी जे शिलाहार राजवंशाच्या इतिहासाचे तज्ज्ञ मानले जातात. त्यांच्या मते, महालक्ष्मीचे मंदिर हे शिलाहार राजवटीच्याही आधीचे असून कदाचित ते 'िंसद' राजवटीत बांधले गेले असावे. या सिंद राजांनी (करहाटपुराधीश्वर) कोल्हापूर-कराड या भागावर काही काळ राज्य केले) आणि शिलाहारांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला असावा. कोल्हापूरचे शिलाहार हे जरी 'महालक्ष्मीलब्धवरप्रसाद' असे बिरुद धारण करणारे असले तरी बहुतकरून या राजवटीत स्यादवादाला (जैनमत) प्राधान्य होते.
महालक्ष्मी मंदिर प्रकारात चार जैन द्वारपालांच्या मूर्ती आढळतात. त्यातील दोन मूर्ती महाकाली मंदिराच्या उपमंदिरामध्ये 'भरत' आणि 'शत्रुघ्न' या नावाने विराजमान आहेत, तर उर्वरित दोन सभामंडपाच्या प्रवेशिकेच्या दोन्ही अंगास कोनाडय़ांमध्ये स्थित आहेत.
तर अश्या या कोल्हापुरातील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या ठिकाणापासून म्हणजे महालक्ष्मी मंदिरापासून भटकंतीची सुरवात करुया. महालक्ष्मीलाच अंबाबाई हे नाव आहे. देवी अंबाबाईच्या महालक्ष्मी मंदिराला करवीर निवासिनी देखील म्हटले जाते. कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर (अंबाबाईचे देऊळ) हे पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक व महाराष्ट्रात असलेल्यादेवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे.
कोल्हापुरात
सर्वोच्च स्थान कुणाला असेल तर या मातेला, महालक्ष्मीला व देवालयाला आहे.
हे श्रीमहालक्ष्मीचे देवालया न उभारले जाते तर आज कोल्हापुर शहरच दिसले
नसते. श्रीमहालक्ष्मीची आर्शीवादानेच श्री.शाहू छत्रपती व श्री.राजाराम
महारांज्यांसारखे सुपुत्र जन्माला येऊन या शहराची वाढ व विकासाकरिता
त्यांनी प्रयत्न केले.आजच्या शहराच्या सद्यस्थितीचा पाया श्री
महालक्ष्मीच्या देवालयाने घातला.त्यांच्या वाढीस महारांजांचे प्रयत्न
कारणाभुत झाले.श्रीमहालक्ष्मीचे देवालय शहराच्या मध्यवस्तीत,जुन्या
राजवाडयानजीक आहे. भव्य व सुंदर हेमाडपंथी पद्तीचे हे देवालय प्राचीन शिल्प
कौशल्याचा उत्कृष्ट नमुना आहे या देवालयाचा आकार ता-यासारखा असून ते दोन
मजली आहे देवालयात श्रीमहालक्ष्मीखेरिज दक्षिणेला महासरस्वती, उत्तरेला
महाकाली वरच्या मजल्यावर गणतीच्या मुर्ती आहेत या देवालयाला असंख्य खांब
असून ते मोजता येत नाही असा भाविकांचा समज आहे.
मुख्य देवालयालासमोर एक
प्रवेश मंडप आहे याला गरुड मंडप असे म्हणतात.नवरात्रात येथे उस्तव साजरा
केला जातो इतर वेळी र्कीतन,प्रवचन,भजन,ग्रंथवाचन वा प्रदर्शनासाठी देखील
याचा उपभोग केला जातो महालक्ष्मीच्या भोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी असलेला
मार्ग मंदिराच्या आतल्या बाजुसच असून अगदी वैशिष्टपुर्ण आहे.
मुख्य
देवालयालाच्या सुरवातीस प्रवेश करताना मुख्य मंडप लागतो. त्यांच्या दोन्ही
बाजुला भिंतीवर भरत आणि शत्रुघ्ह यांच्या सुंदर मुर्ती कोरलेल्या आहेत.
पुढे गेल्यावर मणिमंडप लागतो.कलात्मक कोरीव काम आणि जय विजय द्वारपालांच्या
मुर्ती मनमोहक आहेत.मुळ स्थान म्हणजे देवीची स्थापना केलेली जागा सन १७२२
पर्यंत श्रीमहालक्ष्मी मुर्ती मुस्लिम हल्ल्यापासून बचाव करण्याकरिता
म्हणून सुमारे दोनशे वर्षे झाकून न ठेवण्यात आली होती.मुख्य देवालयालाच्या
बाहेरिल बाजुस चौसष्ट नृत्य करणा-या योगिनी व इतर कोरीवकाम केलेले
दिसते.श्री महालक्ष्मीच्या देवालयाच्या भोवती आवारामध्ये सर्व बाजुंना अनेक
देवदेवतांच्चा मुर्ती आहेत. त्यामध्ये शेपशायी व नवगृह किंवा अष्टदिवाळ
मंडप यांचा समावेश आहे.शेपशायीची मुर्ती तितकीशी आकर्षक नसली तरी त्या
समोरिल मंडपातील नाजुक व सुंदर कोरीव काम आणि जैन तीथॅकर पाहण्यासारखे आहे.
नवग्रह मंडप म्हणजे प्राचीन भारतीय शिल्लपकलेचा उत्कृष्ट नमुना या
व्यतिरिक्त देवालयालाच्या आवारातील लहान लहान मंदिरापैकी मुख्य म्हणजे
दतात्रय, हरिहरेश्नर, मुक्तेश्री, विठोबा, काशीविश्वेर, राम,
राधाकृष्ण,शनी, तुळजाभवानी, महादेव इ.मंदिरे
श्रीमहालक्ष्मी देवालयालात
येण्यासाठी चार प्रवेशद्वारे आहेत. त्यापैकी मुख्य प्रवेशद्वार महाद्वार
पश्चिमेला असून त्याच्यावर नगारखाना आहे. देवालयाच्या उत्तरेला काशी व
मणिकार्णिका ही दोन तीर्थे आहेत. आवारात बाजुला दीपमाळांचा छोटा समुह असून
दोन अधुनिक प्रकाराची पाण्याची कारंजी आहेत. उत्तरेकडील प्रवेश द्वारावर एक
मोठी घंटा वाजवलि जाते. महाराष्ट्रातील काही महत्तवाच्या व मोठ्या
घंटांमध्ये या घंटेचा समावेश होतो या घंटेचा निनाद चार पाच मैलाच्या
परिसरात घुमतो.
दर पौष महिन्यामध्ये सायं सुर्यकिरणोत्सव साजरा केला
जातो या तीन दिवसाच्या उत्सवाचे वैशिष्टय म्हणजे सायंकाळी ठराविक वेळ
सुर्यकिरण हे मंदिरात शिरून श्रीमहालक्ष्मीचे मुखावर पडतात व काही वेळातच
नाहीसे होतात.आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुख्य देवालय व त्या समोरील गरूड
मंडप दोन्ही मिळून महालक्ष्मीच्या मुर्तीसमोर सुमारे १५० आच्छादित बांधकाम
आहे. मंदिरासभोवती व पश्चिमेला अनेक घरे आहेत.या तीन दिवसाखेरीज वर्षात
केव्हाही देवीच्या मुखावर सुर्यकिरणे पडत नाहीत.
महालक्ष्मी मंदिराचा जुना फोटो
आठवड्याच्या शेवटी शनिवार्,रविवार व सुट्टीच्या दिवशी विशेष दर्शनासाठी लांबच लांब रांगा असल्याने सकाळी लवकर मंदिरात गेलेले चांगले. महालक्ष्मी मंदिरापासून रेल्वे स्टेशन आणि बसस्थानक सुमारे २-. कि.मी. अंतरावर आहे. तेथून मंदिरापर्यंत आपणास ६० किंवा ७० रुपयात पोहोचता येते.
मुख्य शहराच्या मध्यभागी मंदिर आहे. मात्र इथे पार्किंगची जागा उपलब्ध नसल्याने येथे कार पार्किंगचा खूप प्रॉब्लेम आहे. जर तुम्ही लवकर येथे येत असाल तर तुम्हाला मंदिराजवळ पार्किंग मिळू शकेल. अन्यथा तुम्हाला वाहन मंदिरापासून खूपच दूर उभे केले पाहिजे आणि तेथून थोडेसे चालणे आवश्यक आहे.

मंदिराच्या प्रवेशद्वाराला ४ दरवाजे आहेत, प्रत्येक प्रवेशद्वाराचे वेगळे
नाव आहे आणि मुख्यद्वार “महाद्वार” म्हणून ओळखले जाते. परिसरातील रस्ते
एकमार्गी आहेत ( वन वे ) म्हणून आपण वाहन चालवत असाल आणि जर आपल्याला
रस्त्यांविषयी निश्चित माहिती नसेल तर स्थानिक लोकांना विचारा . आपल्याला
मदत करण्यात आणि मार्गदर्शन करण्यात स्थानिक लोकांना आनंदच होईल.
मंदिराच्या बाहेर आणि आत बरेच पूजा थाळी स्टॉल दिसतात.
बहुतेकदा मंदिरात अगदी सकाळीही लांब रांग लागलेली असते. ही रांग वेळ जसजशी पुढे जाईल तशी अधिक लांब होत जते आणि संध्याकाळी तर प्रचंड गर्दी असते. सुरुवातीला सर्वांसाठी एकच रांग असते परंतु एकदा आपण मंदिरात प्रवेश केला तर तेथे स्त्री व पुरुष साठी स्वतंत्र रांग असते.
आपण रांगेत असतानाच आणि मंदिराच्या आत जात असताना फोटोमध्ये दाखविले आहे त्या प्रमाणे मुख्य मंदिराच्या भिंतीच्या वरच्या बाजूला खडकात कोरलेली छोटी गणेश मूर्ती तुम्हाला दिसेल. येथील स्थानिक लोक महालक्ष्मी देवीचे दर्शन घेण्यापूर्वी प्रथम या गणेश मूर्तीचे दर्शन घेतात.
रांगेत उभारलेल्या भाविकांना उन्हाचा त्रास होउ नये यासाठी मंदिर व्यवस्थापनाने कपड्यांच्या शेडद्वारे रांग उभा रहाण्याच्या जागेवर सावली केली आहे.
रांगेत
उभा राहून आपण अखेरीस महालक्ष्मीच्या मुर्तीसमोर लीन होतो. महालक्ष्मीची
मुर्ती खुप देखणी आणि शांत भाव दाखवणारी आहे. करवीर हे महाराष्ट्रातील
साडेतीन शक्ती-पीठांपैकी एक आहे. मंदिराच्या पश्चिमेस उघडा असलेला भाग आहे,
जिथून प्रत्येक मार्च आणि सप्टेंबरच्या 21 तारखेच्या आसपास सूर्याचा
प्रकाश मूर्तीच्या तोंडावर पडतो. या कार्यक्रमास “किरणोत्सव” असे म्हणतात.
देवी महालक्ष्मी मूर्तीचे वजन साधारणत: 40 किलो आहे. महाराष्ट्रातील अनेक
नवीन विवाहित जोडपे देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी विधीनुसार येथे
येतात.
कधी काळी मोगलांनी या देवळाचा विध्वंस केला तेव्हा
देवीची मूर्ती पुजार्याने अनेक वर्षे लपवून ठेवली होती, असे म्हणतात. पुढे
संभाजी महाराज यांच्या कारकीर्दीत इ.स. १७१५ ते १७२२ या कालखंडात मंदिराचे
पुनरुज्जीवन करण्यात आले. उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे
वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा.

जेव्हा
तुम्ही मंदिरात जाल तेव्हा तुम्हाला दगडांच्या आत खोदलेल्या विविध मूर्ती
दिसतील ज्या तुम्हाला त्या काळाच्या स्थापत्यकलेची कल्पना देतील.
मंदिरात
छायाचित्रणास परवानगी नाही. दररोज देवी भिन्न रंगांची साडी परिधान करतात
जी येथे येणाया भक्तांनी दिलेली असते.देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन ४०
किलोग्रॅम आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे. डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर
नागमुद्राआहे.अकराव्या शतकातील शिलालेखात 'लिंगशैषाघौषहारिणी' असा देवीचा
उल्लेख आहे. देवीच्या संस्कृत आरतीमध्येही तिच्या मस्तकावरील नागाचे वर्णन
केले जाते. करवीर माहात्म्य ग्रंथात १३ व्या अध्यायातील सातव्या श्लोकात
असे म्हटले आहे की, पन्नागांकित मस्तकाम म्हणजे नागांनी आपला फणा देवीच्या
मस्तकावर पाहिला आहे असा उल्लेख आहे.
हेमाडपंथी मंदिर प्रणालीचा
प्रणेता हेमाद्री यांनी रचलेल्या हेमाद्री वीरचित चतुर्वर्गचिंतामणी या
व्रतखंडात मस्तकावर नाग असे वर्णन असलेली मूर्ती करवीरनिवासिनीच आहे असे
नमूद केले आहे.
नाग, लिंगयोनी, पानपात्र आणि म्हाळुंग अशी महत्त्वाची चिन्हे हीच ज्या देवीची महत्त्वाची ओळख आहे.
तसेच, जर तुम्हाला रांगेत उभे रहायचे नसेल तर तेथे मुख दर्शन सुविधा देखील उपलब्ध आहे जिथून तुम्हाला थोड्या अंतरावरुन देवीची मूर्ती दिसते. तर आपल्याकडे वेळ नसेल तर आपण हा पर्याय वापरू शकता. येथे सशुल्क रांगेची सुविधा उपलब्ध नाही.
मंदिर आणि मंदिराच्या सभोवतालचा परिसर खूपच स्वच्छ आहे आणि सुरक्षा देखील चांगली आहे. मंदिरातील प्राचीन कोरीवकाम पहाण्यासारखे आहे, खांब आणि भिंतींवरील दगडी कोरीवकाम बारकाईने पहावे.
मंदिराच्या आवारात बऱ्याच दीपमाळा आहेत. विशेष काळात जसे नवरात्र त्यांच्यावर दिवे प्रज्वलित करुन त्या पाजळल्या जातात.त्या काळात रात्रीच्या वेळी ह्या दीपमाळांचे सौदंर्य पहाण्यासारखे असते.
नवरात्री अश्विन प्रतिपदाच्या काळात दररोज महालक्ष्मी देवीची पालखी काढली जाते जी दसऱ्यापर्यंत चालू असते. ही पालखी सोन्यापासून बनविली गेली आहे आणि वापरात नसताना ती बाजूच्या आरशाच्या भिंतीमध्ये ठेवली आहे. मंदिरात आपण ती पाहू शकतो.
मंदिराच्या आजूबाजूला मोठ्या संख्येने दुकान आहेत जिथे खास कोल्हापुरचे वैशिष्ट्य असलेल्या वस्तूंची विक्री केली जाते. येथे विकल्या जाणा या काही गोष्टी अतिशय खास आहेत आणि त्या तुम्हाला महाराष्ट्रात कोठेही मिळणार नाहीत.
उपयुक्त सूचना -
कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराची वेळः सकाळी 6 वाजता उघडते आणि रात्री १०
वाजता बंद होते (मंदिर दरवाजे सकाळी ४ वाजता उघडले तरी त्यानंतर पूजा आणि
आरती होते.)
कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर प्रवेश शुल्क - विनामूल्य
पार्किंग - कोणतेही पेड कार पार्किंग नाही. रस्त्यावर पार्क करावे लागेल.
कार पार्किंग स्पेस क्रंच. त्याऐवजी स्थानिक सार्वजनिक वाहतूक वापरा.
मंदिरात छायाचित्रण करण्यास मनाई आहे परंतु आपण मंदिर परिसरात फोटो घेऊ शकता. मंदिरात मोबाइल नेण्याची परवानगी आहे.
शनिवार व रविवार, मंगळवार आणि शुक्रवारी येथे खूप गर्दी असते जेणेकरून
आपल्याला कधीकधी 3 तासांपेक्षा जास्त रांगेत थांबावे लागेल. म्हणून तयार
रहा आणि शक्य तितक्या लवकर या किंवा शक्य असल्यास गर्दी नसलेल्या दिवसांवर
येण्यास प्राधान्य द्या.
मंदिराच्या अगदी जवळ असलेल्या भवानी मंडप पॅलेसला भेट नक्की द्या.
येथे स्थानिक फेरीवाले आणि दुकानदारांनकडून खास कोल्हापुरचे वैशिष्ट्य असलेल्या गोष्टी खरेदी करण्यास विसरू नका.
भवानी मंडप
| कोल्हापूर शहराची शान म्हणजे, भवानी मंडप. हया सर्वात जुन्या व सर्वात जास्त विशाल इमारतीस ऐतिहासिक महत्त्व आहे.या जागेच्या मध्यभागी कुलस्वामिनी तुळजा भवानीचे मंदिर आहे आणि म्हणून त्या जागेचे नाव भवानी मंडप म्हणून ओळखले जाते. |
कोल्हापूर स्वयंशासित झाल्यानंतर ही इमारत बांधण्यात आली. या इमारतीचे बांधकाम चौदा चौकांचे, भक्कम आणि मजबूत आहे.
कोल्हापूर गादीची स्थापना ताराबाईंनी १७०७ मध्ये केली. कोल्हापुरात अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. त्यापैकी एक म्हणजे भवानी मंडप. भवानी मंडप ही कोल्हापूरची प्रतिष्ठा आहे. याची अद्भुत आणि जुनी रचना इतिहासाचे प्रतीक आहे. १८१३ साली मुस्लीम सरदार सदाखान याने या महालावर
आक्रमण केले, व त्याचा काही भाग जाळला.
महालाची डागडुजी केल्यानंतर सात चौक
बचावले. महालाच्या मध्यवर्ती भागात, कुलस्वामीनी तुळजा भवानीचे मंदिर आहे.
शंभू उर्फ आबासाहेब महाराजांचा वध, या मंडपामधे झाला, अशी ग्वाही इतिहास
देतो. 
मंडपाच्या जवळच शाहू महाराजांच्या स्मरणार्थ, छत्रपती शाहूंचा
हुबेहूब पुतळा आहे.
शिकारीची त्यांची आवड चिरकाल लक्षात राहावी यासाठी, शिकार केलेले, पेंढा भरलेले वाघ व रेडा तिथे ठेवले आहेत. रंगीत माश्यांनी सजविलेली उजव्या बाजूची बखर, शिवाचे छोटेखानी मंदिर, – या साऱ्यामुळे इतिहास जणू इथे जिवंत होतो. शाहू महाराजांची कन्या, श्रीमंत अक्कासाहेब महाराज यांच्या विवाह सोहळयाच्या काळात, इ. सन. १९१८ मधे या देवळासमोरच भव्य मंडप बांधण्यात आला. नंतर १९२६ ते ३० च्या दरम्यान, छत्रपती राजाराम महाराजांनी सदर मंडपाला नवे रूप प्राप्त करून दिले. मूळच्या लाकडी कमानी बाजूला काढून, हया मंडपाचे एका भव्य आणि मोकळया सभागृहात रूपांतर केले. मंडपाच्या आवाराच्या विस्तृत रक्षक भिंतींच्या मोठमोठया चौकांमधे, मोतीबाग व्यायामशाळा, राजवाडा पोलिस स्टेशन, तसेच महाराष्ट्र बटालियन यांचे कामकाज सुरळीतपणे चालते.
कसे जावे :
रंकाळा तलाव


न्यू पॅलेस ( नवा राजवाडा )
पंचगंगेच्या तीरावर वसलेले कोल्हापूर हे प्राचीन काळापासून दक्षिण काशी या नावाने प्रसिध्द आहे. करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर आणि दख्खनचा राजा जोतिबाचे मंदिर यामुळे हे एक प्रसिध्द तीर्थक्षेत्र म्हणूनही ओळखले जाते.राजश्री शाहू महाराजांच्या सामाजिक सुधारणांमुळे कोल्हापूरने नवा आदर्श निर्माण केला आहे. सामाजिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या कोल्हापूरला पन्हाळा गड, रंकाळा तलाव, राधानगरी धरण,खासबाग मैदान, शालिनी पॅलेस या ठिकाणांनी वैभवसंपन्न बनविले आहे. या सर्व ऐतिहासिक ठिकाणांसोबत कोल्हापूरच्या वैभवात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे तो शाहू महाराजांच्या न्यू पॅलेसने!कोल्हापूर सेंट्रल एसटी स्टँडपासून ३ किमी अंतरावर न्यू पॅलेस संग्रहालय आहे. आपण एकतर रिक्षा किंवा सिटी बसने येथे जाऊ शकता. या ठिकाणी प्रामुख्याने तीन गोष्टी प्रेक्षणीय आहेत, पहिली पॅलेस, दुसरी पॅलेसमधील संग्रहालय आणि शेवटी पॅलेसच्या बाहेर गार्डन आणि प्राणीसंग्रहालय.
कोल्हापूर शहराच्या उत्त्तरेकडे साधारणत: तीन किलोमीटर अंतरावर नवा राजवाडा प्राचिन संस्थान काळाची शान दाखवत उभा आहे. करवीर संस्थानचे ४ थे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या कालखंडामध्ये हा नवा राजवाडा उभारणीस १८७७ साली सुरवात झाली व न्यू पॅलेस इ.स. १८८४ मध्ये बांधून पूर्ण झाले. अहिल्याबाई राणीसाहेबांनी ही इमारत बांधून घेतली. प्रसिध्द ब्रिटीश वास्तुशिल्पकार चार्ल्स मान्ड यांनी न्यू पॅलेसची रचना केली होती. युरोपीयन आणि भारतीय वास्तूशास्त्राचे मिश्रण असलेली ही वास्तू शिल्पकलेचा उत्कृष्ट नमूना आहे. राजवाडा परिसरात तलाव, तलावाकाठी राखीव जंगल व जंगलात हरिण, मोर यांसह इतर प्राणी आहेत. न्यू पॅलेसमध्ये आजही राजपरिवाराचे वास्तव्य आहे. मेजर मँटला हिंदू शैलीची माहिती होती. तरीही हिंदू धर्मांतील शूभ- अशुभ या सर्व गोष्टींना तिलांजली देत त्याने न्यू पॅलेसची उभारणी केली. न्यू पॅलेसचे प्रवेशव्दार दक्षिणाभिमुख ठेवले. न्यू पॅलेसची रचना आयताकृती असून प्रवेशव्दाराच्या दोन्ही बाजूला समप्रमाणात इमारत उभी केली. इमारतीच्या मध्यभागी १३५ फूट उंचीचा क्लॉक टॉवर उभारण्यात आला. मनो-यावरील घडयाळ १८८७ साली बसविले आहे. इतर दोन मनोरे निराळया अंतरावर आहेत. प्रत्येक काचेवर शिवरायांच्या जीवनातील प्रसंग चितारले आहेत. पॅलेसच्या चारही कोपऱ्याला, पुढील-मागील बाजूस अष्टकोनी दालने आहेत. मध्यभागी दरबार असून बाजूस बिलियर्ड्सचे दालन आहे. इमारतीच्या मागील बाजूस मध्यवर्ती चौक आहे. चौकाच्या मधोमध कारंजा आहे. भाऊसिंगजी मार्गापासून आणखी उत्तरेकडे, १.५ किमी. अंतरावर नवा राजवाडा, किंवा हा न्यू पॅलेस आहे. बॅझाल्ट आणि सँड स्टोन हया विभिन्न प्रकृतीच्या खडकांचा वापर करून, रचनेतील वैधर्म्य तसेच नाविन्य साधून, बांधलेली ही अभिनव इमारत ज्या वर्षी इस्पीतळ बांधून पूर्ण झाले, त्याच वर्षी बांधली. दक्षिणेकडील प्रवेशद्वार किंवा मुखांग हे दुमजली आहे. दुहेरी कक्षाची धाटणी असलेल्या दरवाजाच्या वरच्या बाजूला मंदिर शैलीचे कॉलम्स व ब्रॅकेट्स तर खालच्या बाजूला, नव्य-मुघल शैलीची उतरती (लोब्ड) कमान आहे.
मधूनच उठाव देणाऱ्या, तिपानी आकृतीच्या कमानी, त्यावर बाकदार कार्निस, व छोटे घुमट यांनी हया इमारतीचे सौंदर्य खुलविले आहे. इमारतीच्या कोपऱ्यावरील अष्टकोनी मनोऱ्यांची शोभा याच वैशिष्टयांचा वापर केल्यामुळे वाढते. ठळक, बाकदार कार्निस लावून, मधला द्वारमंडप सजविला आहे. राजवाडय़ाच्या गच्चीवर थोडय़ा अंतरावर अतिशय सुंदर मनोरे व घुमट आहेत. राजवाडय़ाच्या शिल्पामध्ये निरनिराळ्या कालखंडातील हिंदू शिल्पशैलीचे उत्कृष्ठ मिश्रण आहे

३० जून १९७४ रोजी राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या जन्म शताब्दी दिनी राजवाडयातील तळमजला हा करवीर संस्थानचे शेवटचे छत्रपती मेजर जनरल शहाजी छत्रपती महाराज यांच्या नावाने शहाजी छत्रपती म्युझिअम म्हणून सूरू करण्यात आला. यामध्ये वेगवेगळी प्रेक्षणीय दालने आहेत. या प्रत्येक दालनामध्ये प्राचिन काळातील महाराजांच्या कालखंडात वापरलेल्या सर्व वस्तूंचे जतन करण्यात आले आहे.
म्युझिअमच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर समोर प्रथमत: दृष्टीस पडते ते म्हणजे छत्रपती राजाराम महाराज (दुसरे) यांचे घोडयावर आरूढ असलेले भव्य रंगचित्र, यानंतर आपण म्युझिअममधील वेगवेगळया दालनात प्रवेश करतो. या म्युझिअममध्ये हत्तीचे दालन, फर्निचरचे दालन,राजश्री छत्रपती शाहू दालन,शस्त्रास्त्र दालन, दरबार हॉल, प्राणी संग्रहालय अशी विविध दालने आहेत.
हत्तीच्या दालनामध्ये आपणस प्रथम दर्शनी दिसतो तो विविध आभूषणाने सजलेला बैठक स्वरूपातील हत्ती. हत्तीला सजविण्यासाठी असणाऱ्या विविध आभूषणामध्ये हत्तीवरील भरजरी झूल (घाशा), जरी पटका तसेच चांदीची लहान तोफ, प्राचीन काळातील दुमिर्ळ नाणी आपणास या दालनामध्ये पहावयास मिळतात.
त्यानंतर येते ते फर्निचर दालन, या दालनात आपणास शाहू महाराजांच्या कालखंडामध्ये वापरत असलेले विविध साहित्य पाहता येते.विशेष म्हणजे छत्रपती घराण्याचा वंशपरंपरागत आकर्षक पाळणा, छत्रपती घराण्यातील सर्व महाराजाचे फोटो या दालनात आपणास पाहावयास मिळतात.यानंतर आपण प्रवेश करतो राजश्री शाहू हॉल मध्ये छत्रपती शाहू महाराजांची संक्षिप्त ओळख करून देणारे हे दालन खऱ्या अर्थाने आपणास छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनातील महत्वाच्या घटना व जीवनपट छायाचित्राच्या स्वरूपात याठिकाणी पहावयास मिळतात.
महाराजांच्या बालपणीची छायाचित्रे, छत्रपती शाहू महाराज यांचे अधिकार ग्रहण केलेल्या प्रसंगाचे छायाचित्र, ऑफिसमधील तसेच दिल्ली दरबारात वापरत असलेली खुर्ची , पुर्वीच्या काळातील पितळी खलबत्ता, गिडी जग, तोटी असलेला पितळी तांब्या ठेवण्यात आलेला आहे. शाहू महाराज (पहिले) यांच्या वापरातील कपडे, महाराणी व्हिक्टोरिया यांनी छत्रपती शिवाजी (४ थे) यांना दिलेला करवीर 'राजचिन्हाचा ध्वज' ठेवण्यात आलेला आहे.शाहू कुस्ती मैदान येथे भरवण्यात आलेले कुस्ती मैदान पाहण्यासाठी झालेल्या गर्दीचे छायाचित्र तसेच शिकारीचे विविध प्रकार पहावयास मिळतात.
जसजसे आपण पुढे पाहत जातो तसे इतिहासातील अनेक गोष्टींना उजाळा मिळतो. याच दालनामध्ये इतिहास प्रसिध्द घराण्याच्या वंशावळींची ओळख करुन देणारा माहिती फलक पहावयास मिळतो. त्यामध्ये करवीर छत्रपती घराण्याचा वंशवृक्ष, पवार छत्रपती घराण्याची वंशावळ, भोसले घराणे शाखेची वंशावळ, कागलकर घाटगे सर्जेराव घराण्यांची वंशावळ अधोरेखीत करण्यात आली आहे.
या दालनातील आणखी एक वैशिष्टये म्हणजे शिकारलेल्या निरनिराळ्या प्राण्यांच्या अवशेषापासून बनविलेल्या नाविन्यपूर्ण व विविध उपयोगी वस्तू पाहताना आपण भारावून जातो. सांबराचे शिंग व गेंड्याच्या पायापासून तयार केलेले टी पॉय,गव्याच्या पायापासून तयार करण्यात आलेले पेटी स्टँड, वाघाच्या शेपटीतील मणक्यापासून बनविलेली छडी, वाघाच्या व गव्याच्या पायापासून बनविलेला ऍ़श ट्रे, डुकराच्या दातापासून तयार केलेली फुलदाणी, शहामृगाच्या पायापासून बनविलेले मेणबत्तीचे स्टँड, वाघाच्या कवटीपासून तयार केलेली सिगारेट केस व ऍ़श ट्रे हे सर्व पाहताना डोळ्याचे पारणे फिटल्याशिवाय राहत नाही.
शस्त्रास्त्र दालनामध्ये विविध प्रकारच्या शिकारीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे या ठिकाणी पहावयास मिळतात. छत्रपती शाहू महाराजांनी साठमारी करण्यासाठी तयार करुन घेतलेली विविध प्रकारची हत्त्यारे, इ. स. १८७० मध्ये श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज (पहिले) इंग्लंडला गेले असता त्यांनी खास ऑर्डर देऊन मागितलेली सोन्याचा मुलामा चढवलेली बंदुक, विविध नमुन्यातील बंदुका तसेच दहा फुटी आकर्षक पुनी गन या ठिकाणी सर्वाचे लक्ष वेधून घेते. जुन्या काळातील ढंका, नौबत, नगारे, चौघडे तसेच डुकराची शिकार करणेसाठी वापरण्यात येणाऱ्या भाल्याची ओळख या शस्त्रास्त्र दालनात होते.

यानंतर आपण प्रवेश करतो ते न्यू पॅलेसचा मुख्य भाग असलेला दरबार हॉल. अतिशय प्रशस्त व कलात्मकतेचा एक उत्कृष्ट नमुना आपणास पहावयास मिळतो. दरबार हॉलचे हे भव्य विलोभणीय दृश्य पाहताना पूर्वीच्या काळातील राजे महाराजांचे वैभव आवाक् करुन टाकते. दरबार हॉलमध्ये महाराजांसाठी असलेले कलाकुसरीने भरगच्च सजलेले 'राजसिंहासन' सर्वांचे लक्ष वेधून घेते.

तसेच या हॉलमध्ये पुूर्वी जसा दरबार भरायचा तशीच मांडणी अजून ठेवलेली आहे. हॉलमधील छताकडे नजर टाकली असता त्याकाळी कलाकारांनी केलेले नक्षीदार कोरीव काम पाहीले की डोळयाचे पारणे फिटते. हॉलच्या दोन्ही बाजूस खिडकीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील उत्कट प्रसंग इटालियन चित्रकाराने बेल्जीअम ग्लासवर अतिशय दुर्मिळ आकर्षक रंगचित्राव्दारे चित्तारलेली आहेत.
वेगाने धावणारे चित्त्तळ ( रायबाग), पाहताना त्याच्या नजरेतील धार लक्षात येते हॉलच्या मध्यभागी सर्वाचे लक्ष वेधून घेतो तो वाघांचा कळप, सांबर, चौसिंगा, दुर्मिळ असे कस्तुरी मांजर व खवल्या मांजर, तसेच बुलबुल, बदक,लाव्हऱ्या, कोकीळ, मलबारी खार, हरिचल, ब्लड फेजंन्ट असे विविध प्रकारचे पशू , पक्षी व प्राणी पाहून त्याकाळी महाराजांनी केलेल्या शिकारी डोळयासमोर येऊन उभे राहतात.
आपण म्युझिअमच्या बाहेर येतो बाहेरील सर्व भाग निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. म्युझिअमच्या समोर हिरवेगार लॉन आहे. विविध प्रकारच्या वृक्षांमुळे सर्व परिसर निर्सगरम्य वाटतो. बाहेरील आवारामध्ये छत्रपती राजश्री शाहू महाराज तसेच इतर महाराजाचे पुतळे पहावयास मिळतात.

या प्राणी संग्रहालयातील खास वैशिष्टय म्हणजे मध्य भारत येथून प्रत्येक वर्षी साधारणत: जानेवारी महिन्यामध्ये या जलाशयामध्ये स्थलांतरीत होणारा पक्षी म्हणजे चित्रबलाक. हा दुर्मिळ पक्षी इतर कोणत्याही ठिकाणी आपणास पाहावयास मिळत नाही.
टाऊन हॉल
टाऊन हॉलच्या आवारात शासनाची कार्यालये, न्यायालय, शासकीय रूग्णालय, निम-शासकीय कार्यालये, दूरध्वनी कार्यालय, ‘पुढारी’ दैनिकाचे कार्यालय इ. असल्यामुळे, हा परिसर कायम गर्दीचा गजबजलेला असतो. टाऊन हॉलच्या बागेमध्ये महादेवाचे मंदिर, मोठे कारंजे, तलाव, झाडे, वेली व पुष्कळशी फुलझाडे आहेत.
इथे ऐतिहासिक वस्तूंचे एक संग्रहालय असून, हा भाग महाराष्ट्र शासनाचा आहे. इमारतीच्या मध्यभागी एक गॅलरी असलेले सभागृह असून दोन्ही बाजूस खोल्या आहेत. येथे 500 माणसे एकावेळेला बसू शकतील असे प्रशस्त सभागृह असून सभागृहाच्या दोन्ही बाजूस दोन-दोन खोल्या, प्रशस्त व्हरांडय़ाने जोडलेल्या आहेत. समोर व्हरांडा आहे. या इमारतीचा उपयोग संस्थानकाळात कार्यालयासाठी व इतर कामासाठी केला जात असे. काही वर्षाच्या दिवाण ऑफिस व त्यानंतर टेलिफोन एक्स्चेंज या इमारतीत होते. सध्या या इमारतीचा उपयोग पुरातत्व विभाग, महाराष्ट्न् शासन यांच्या कोल्हापूर वस्तु-संग्रहालय या करिता केला जातो. या इमारतीभोवती एक सुदंर बाग आहे. या बागेत. दक्षिणेला काही विशिष्ट प्रकारच्या वनस्पतीकरिता कांच महाल बांधलेला आहे. इमारतीच्या समोरच छ. शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा उभारलेला आहे. संस्थानकाळात या बागेकरिता दरबारकडून वर्षाला चार हजार रुपये मिळत असत. टाऊन हॉलमधील वस्तुसंग्रहालय उद्घाटन दिनांक ३० जानेवारी १९४६ रोजी झाले. ब्रह्मपूरीजवळ उत्खननामधे सापडलेल्या सातवाहनकालीन वस्तू, संग्रहालयामधे आहेत. गजारूढ सरदार, पोसायडन हया ग्रीक देवतेची छोटी प्रतिमा, मेडॅलियन्स सह हेलेनिस्टिकच्या प्रतिकृती त्यात आहेत. महालक्ष्मी मंदिरातून आणलेल्या गायक वादकांच्या आकर्षक स्त्री-शिल्पाकृती येथे आहेत. पन्हाळा येथून आणलेले चामरधारी स्त्री मदतनीस वा परिचारिकेचे शिल्प केवळ अप्रतिम आणि सर्वोत्कृष्ट आहे. महालक्ष्मी मंदिरात बसविण्याकरिता १७३९ मधे, वसईवरून आणलेली तांब्याची घंटा या संग्रहालयामधे पाहायला मिळते. संग्रहालयाच्या एका बाजूला उंचावर बांधलेल्या सज्जामधे सर्व प्रकारची शस्त्र-अस्त्रे ठेवली आहेत. हे संग्रहालय शुक्रवार पेठेतील जैन स्वामींच्या मठात मांडण्यात आले होते. सध्या या वस्तुसंग्रहालयात एकूण सात विभाग आहेत. त्यात शस्त्रास्त्रे, संकीर्ण कलाकृती, उत्खनन वस्तू, नाणी, शिल्पाकृती, शिलालेख व ताम्रपट, चित्रकला कृती यांचा समावेश होतो. चित्रकलाकृती विभागात आबालाल रहमान, बाबुराव पेंटर आदी कोल्हापुरच्या आणि अन्य प्रसिद्ध चित्रकारांच्या कलाकृती येथे आहेत.या सात दालनाखेरीज आणखी एक दालन प्रदर्शन दालन म्हणून राखून ठेवण्यात आले आहे. या दालनाचा उपयोग वस्तूसंग्रहालयामार्फत वेळोवेळी आयोजित केल्या जाणाऱ्या विशेष प्रदर्शनासाठी केला जातो. तसेच स्थानिक कलाकारांच्या कलाकृतींची वैयक्तिक प्रदर्शने भरविण्यासाठी या दालनाचा उपयोग केला जातो. संग्रहालयाच्या समोरच असलेले छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालय हे मँन्ट याने, १८८१-८४ या कालावधीमधे बांधले.
संग्रहालयाची वेळ १०.३० ते ५.३० असून प्रवेश शुल्क आहे. संग्रहालय रविवारी बंद असते.
कोल्हापुरचे ऐतिहासिक चौक
कोल्हापूर शहरात अनेक चौक आहेत. पण त्यापैकी काही चौक ऐतिहासिकदृष्टय़ा
महत्त्वाचे असून आजही कोल्हापुरच्या दैनंदिन जीवनात ते आपले स्थान टिकवून
आहेत. यामध्ये सर्वात आघाडीवर आहे तो बिंदू चौक. पूर्वी कोल्हापूर शहराचे
संरक्षण करण्यासाठी शहराभोवती रूंद असा दगडी कोट होता. कोटाच्या भिंतीला
समान अंतरावर 45 बुरूज व बाहेरच्या बाजूस खोल खंदक होता. बुरूजास ठिकठिकाणी
प्रवेशद्वारे होती. यापैकी रविवार पेइ बुरूजाच्या प्रवेशद्वाराजवळचा चौक
मिरची बाजार म्हणून प्रसिद्ध होता. 
या चौकात ब्रिटिशांविरूद्धच्या स्वातंर्त्यासाठीच्या लढय़ामध्ये भारत छोडो चळवळ जोरात असताना 15 ऑगस्ट, 1942 मध्ये एका सभेचे आयोजन झाले होते. ब्रिटिशांनी ही सभा उधळून लावण्यासाठी करवलेल्या लाठीहल्ल्यात सभेसाठी आलेला बिंदू नारायण कुलकर्णी हा युवक हुतात्मा झाला. त्याच्या स्मरणार्थ मिरची बाजार म्हणून ओळखल्या जाणार्या या चौकाचे बिंदू चौक असे नामकरण उत्स्फूर्तपणे झाले.
कोल्हापूरचे एकेकाळी गावचे टोक म्हणून ओळखला जाणारा भाग आता विस्ताराने शहरात मध्यभागी आला आहे. त्याकाळी शहराच्या टोकाला पिंपळाचे झाड आणि त्याखाली मारुतीचे मंदिर ही वेशीची हद्द होती. कोल्हापूरचा बिंदू चौक ही मूळची रविवार वेस. याठिकाणी दगडी तटबंदी आणि त्या पुढे गाव नव्हते. याठिकाणी दोन मारुतीची मंदिरे होती. त्यातील एक मंदिर आणि पिंपळाचा पार अजूनही बिंदू चौकात आहे. दुसरा मारुती कमानीलगत होता. त्या मारुतीचे मंदिर जेलच्या आतील भागात आहे.
सुमारे १२ हजार खर्च करून १८४७-४८ मध्ये तुरुंग बांधण्यात आला. नंतर १८७३ मध्ये तुरुंगाच्या उत्तर बाजूचे नवीन बांधकाम करण्यात आले. या मंदिरासमोरच जुने फाशी गेट आहे. संस्थानकाळ, स्वातंत्र्य चळवळीपासून अनेक लढ्यांचा साक्षीदार असलेले हे कारागृह कोल्हापूरचे मुख्य कारागृह होते. आता ‘बिंदू चौक’ असे नाव असले तरीही पूर्वी बाराईमाम म्हणून ओळख होती. तत्पूर्वी कोल्हापूरचे कारागृह गुजरीत निंबाळकर वाड्याजवळ होते, तर बिनखांबी गणेश मंदिराजवळ रंकभैरव मंदिराच्या परिसरात अंधार कोठड्या होत्या.नंतर या ठिकाणी दगडी बांधकाम करून हे फाशीगेट बंदिस्त करण्यात आले. नंतरच्या काळात या ठिकाणी एमएसईबीचा ट्रान्स्फॉर्मर बसविण्यात आला. बारकाईने निरीक्षण केल्यास या जुन्या फाशी गेटचे अवशेष अजूनही लक्षात येतात.
दृष्टीक्षेप :-
संस्थान काळात फाशी गेट अस्तित्वात
बिंदू चौक तुरुंग बांधकामास १२ हजार रुपये खर्च
१८७३ मध्ये तुरुंगाच्या उत्तर बाजूस नवीब बांधकाम
रंकभैरव मंदिराच्या परिसरात अंधार कोठड्या
जुने कारागृह गुजरीत निंबाळकर वाड्याजवळ होते
चंद्रकांत मांडरे कला संग्रहालय
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते चंद्रकांत मांडरे एक उत्कृष्ट चित्रकार होते. आपली चित्रे रसिकांना पाहता यावीत या उद्देशाने त्यांनी आपला चित्रसंग्रह घरासहित महाराष्ट्र शासनाला दिला. त्याचे शासनाने चंद्रकांत मांडरे कला संग्रहालय रूपांतर केले आहे. या संग्रहालयात सध्या तीन दालने असून त्यात आबालाल रहमान, बाबुराव पेंटर आणि इतर कलावंतांच्या कलाकृतींची मांडणी केली आहे.
साठमारी हा शब्द शहरात येणाऱ्या पाहुण्यांना अपरिचित आहे. साठमारी हा एक खेळ आहे. भारतात स्वातंत्र्यापूर्वी फारच थोड्या ठिकाणी हा खेळ खेळला जात असावा. कोल्हापूरात संस्थानकाळात हा खेळ खेळला जात असावा. परदेशात हल्ली देखील खेळल्या जाणाऱ्या बुल फाईट या खेळासारखाच पण त्याहूनही रोमांचकारी खेळ असून या खेळाचे स्वरूप असे की एक मोठा बंदिस्त आखाडा असे, या आखाड्यात काही अतंरावर संरक्षणाच्या दृष्टीने गोलाकार बुरुज (तटबंदी) असे. प्रत्येक तटबंदीला चार लहान दरवाजे असत. सर्व तटबंदीच्या भोवती खेळण्याला पुरेशी जागा असे.
साठमारी हा जुना खेळ आहे. तो भारतात फारच थोड्या ठिकाणी खेळला जात असावा. त्यातील एक होते कोल्हापूर संस्थान. साठमारी हा खेळ परदेशात खेळल्या जाणाऱ्या ‘बुल फाईट’सारखाच, पण त्याहून रोमांचकारी! खेळात एक मोठा बंदिस्त आखाडा असे, आखाड्यात काही अंतरावर संरक्षणाच्या दृष्टीने गोलाकार बुरुज (तटबंदी) असे. प्रत्येक तटबंदीला चार लहान दरवाजे असत. सर्व तटबंदीच्या भोवती खेळण्याला पुरेशी जागा असे.
खेळणारे वीर खेळाडू आखाड्यात उतरल्यानंतर तेथे मुख्य प्रवेशद्वारातून एक हत्ती सोडण्यात येई व ते दार बंद केले जाई. खेळाडू व हत्ती यांचा खेळ बंदिस्त आखाड्यामध्ये सुरू होई. खेळाडू हातातील भाल्याने हत्तीला टोचत व त्याला डिवचत. खेळाडूने त्याच्या अंगावर हत्ती धावून आल्यावर जवळच्या संरक्षित तटबंदीमध्ये घुसून दुसऱ्या बाजूने बाहेर पडायचे. हत्ती संरक्षित तटबंदीचे दार लहान असल्यामुळे आत जाऊ शकत नसे. दुस-या खेळाडूने तेवढ्या वेळेत हत्तीला दुसऱ्या बाजूने भाल्याने टोचायचे. हत्ती पहिल्याचा नाद सोडून देऊन दुसऱ्या खेळाडूच्या मागे धावे. जर का हत्तीने यदाकदाचित एखाद्या खेळाडूला पकडलेच तर त्याच्या सुटकेकरता, बाण व आपटबार (दारुकाम) घेऊन तयार असलेले लोक आपटबार उडवत व बाण हत्तीच्या अंगावर सोडत. त्यामुळे हत्ती घाबरून जाऊन पकडलेल्या व्यक्तीस सोडून देत असे. तरीदेखील काही वीरांना त्यांचे प्राण हत्तीच्या तावडीतून सुटू न शकल्यामुळे गमावावे लागले आहेत!
हजारो प्रेक्षक आखाड्यासभोवताली उंचावर बसून, हत्तीला हैराण करून त्याच्याबरोबर खेळण्याचा हा अत्यंत धाडसी खेळ पाहत असत. खेळातील वीरांचे कौतुक औत्सुक्याने केले जात असे. त्यांना इनामे देण्यात येत.
खेळाला साठमार, साठमाऱ्या किंवा साठ्य असेही म्हणतात. खेळ भूतपूर्व कोल्हापूर व बडोदे संस्थानांत एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात लोकप्रिय होता आणि तो खास पाहुण्यांसाठी विशेषतः इंग्रज गव्हर्नर वगैरेंसाठी प्रदर्शित केला जाई. त्या खेळातच डागदारी, हत्तींच्या टकरा इत्यादी प्रकारांचाही समावेश केला जाई. खेळासाठी भारी खुराक देऊन हत्ती तयार करत. त्यांना साठमारीच्या खेळाच्या वेळी दारू पाजून व ‘माजूम’ (साखर, बदाम, पिस्ते इत्यादी घालून बनवलेल्या भांगेच्या वड्या) खायला घालून बेफाम करत. हत्तीशी लढणारे धाडसी मल्ल त्या काळी होऊन गेले. छत्रपती शाहू महाराजांनी मस्तवाल हत्तीला खेळवणारी माणसे खास प्रशिक्षण देऊन तयार केली होती. मल्ल हत्तीचा मोहरा चुकवून त्याच्या पोटाखाली कधी कधी शिरत व त्याला जोरदार गुद्दे मारून हैराण करत.
हत्तीच्या झुंजीसाठी खास मैदान तयार केले जात असे, त्याला ‘अग्गड’ अशी संज्ञा होती. त्याला साठमारीचा आखाडा असेही म्हणत. अग्गड बडोदे येथे आहे. बडोदे येथील अग्गड सुमारे साडेतीनशे फूट (सुमारे. १०६.६८ मीटर) लांब व सुमारे दोनशेवीस फूट (६७ मीटर) रुंद अशा विस्तीर्ण जागेत असून त्याच्या मैदानाभोवती चारी बाजूंना पंचवीस फूट (७.६२ मीटर) उंचीचा तट बांधलेला होता. त्यात प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था केली होती. मस्त हत्तीस अग्गडात आणण्यासाठी उत्तर-दक्षिणेस दोन मोठे दरवाजे ठेवलेले होते. ते भिंतीत बसवलेले वजनदार अडसर हत्ती आत येताच सरकावून बंद करत. त्याशिवाय तटाच्या भिंतीत काही ठरावीक अंतरांवर एकेकटा मनुष्य आत-बाहेर ये-जा करू शकेल अशी लहान दारे [ सात फूट (२.१३ मीटर) उंचीच्या कमानी] ठेवलेली आहेत. मैदानाच्या मध्यभागी गोलाकार, पण आतून मोकळा असा चाळीस फूट (१२.१९ मीटर) व्यासाचा लहान बुरुज आहे. त्याच्या आत जाण्यासाठी लहान कमानी दरवाजे आहेत. मस्त हत्ती साठमाराच्या अगदी जवळ आल्यास बचावाचा आपत्कालीन मार्ग म्हणून साठमार त्या कमानीतून बुरुजात शिरू शकत व दुसऱ्या बाजूने बाहेर पडून स्वतःचा बचाव करत. तसेच, साठमाराचा बचाव अग्गडाच्या एका बाजूस पस्तीस फूट (१०.६६ मीटर) व्यासाचा गोल कट्टा केलेला असून त्याच्याभोवती गोल फिरण्यानेही हत्तीपुढे पळणाऱ्याचा बचाव होऊ शकतो; कारण हत्ती समोर व सरळ रेषेत वेगाने धावू शकतो; तथापी तो त्याच्या बोजड शरीरामुळे वक्र गोलाकार रेषेत धावू शकत नाही. साठमाराला वाकडेतिकडे धावून त्याचा फायदा घेता येतो. खंडेरावमहाराज गायकवाड यांनी बडोदे येथे त्या खेळासाठी खास अग्गड बांधवून घेतले होते व सयाजीराव गायकवाडांनी सभोवतीच्या भिंतीवर प्रेक्षकांसाठी गॅलरी बांधली होती. साठमारीचे आखाडे कोल्हापूरमध्ये व कोल्हापूर संस्थानात राधानगरी, सोनतळी, रूकडी आणि पन्हाळा येथे शाहू महाराजांनी बांधून घेतले होते.
कोल्हापुरातील खासबागेनजीकचा साठमारीचा आखाडा औरसचौरस असून दोनशे फूट (६०.९६ मीटर) लांब व दोनशे फूट (६०.९६ मीटर) रुंद असा आहे. सामान्यतः साठमारीचा आखाडा वर्तुळाकार असतो व त्याचा व्यास दोनशे फूट (६०.९६ मीटर) असतो. त्याच्या सभोवती पंधरा फूट (४.५७ मीटर) उंचीचा भक्कम दगडी कोट बांधलेला असतो. जुन्या वाड्यात ज्याप्रमाणे भिंतीतून जिने असतात, त्याप्रमाणे तटबंदीच्या ठरावीक अंतरावर एक माणूस शिरेल एवढीच दिंडी व आतून कोटावर जाता येईल असा कोटाच्या भिंतीतून जिना ठेवलेला असतो. ६०.९६ मीटर व्यासाचा जो आखाडा तयार होतो, त्यास खेळाचे ‘रंगण’ म्हणतात. रंगणामध्ये पोकळ व बळकट असे गोल बुरुज बांधलेले असतात. त्या बुरुजांना आरपार जाणाऱ्या दिंड्या असतात. खेळाचे सर्वसाधारण स्वरूप असे : मस्त हत्तीस रंगणात एका कमानीजवळ आणून उभे करतात. जवळच्या कमानीत उभे राहून साठमार हत्तीच्या मागच्या पायात बांधलेले साखळदंड सोडतात. त्याचवेळी साठमार हत्तीच्या पुढच्या पायांत असलेली काट्यांची पोची आकडीने काढतात. बिगुलाचा इशारा होताच हत्तीस मोकळे सोडण्यात येते. आजुबाजूस उभ्या असलेल्या साठमारांपैकी एक जण हत्तीच्या पुढे जातो व त्याच्या जवळचा भाला अगर डोक्यावरील रंगीत फेटा सोडून, तो हत्तीपुढे नाचवून त्याला डिवचतो. चिडलेला हत्ती त्या साठमारामागे धावू लागताच, दुसरा साठमार त्याला दुसरीकडून चिडवून त्याला त्याच्या स्वत:च्या अंगावर घेतो. तितक्यात तिसरा साठमार त्याच्याकडे हत्तीचे लक्ष वेधून घेत त्याला त्याच्यामागे धावण्यास भाग पाडतो. साठमाराने हत्तीला चिडवून त्यांच्या अंगावर घेणे व हत्तीला हुलकावण्या देऊन पळावयास लावणे ह्यात साठमाराचे साहस, कौशल्य व चपळपणा पणास लागतो. हत्तीही चिडून चिडवणाऱ्याच्या मागे सैरावैरा धावू लागतो. साठमाराने हत्तीला सर्व मैदानभर पळवण्यात व त्याच्यापासून स्वत:चा बचाव करण्यात खेळाची गंमत आहे.
हत्ती जरी स्थूल व अवाढव्य प्राणी असला तरी त्याची सरळ दौड मनुष्यापेक्षा जास्त वेगवान असते. म्हणून साठमार त्याला एकाच माणसाच्या मागे एकसारखे धावू देत नाहीत. दुसरा साठमार पहिल्याच्या बचावासाठी हत्तीचे लक्ष त्याच्याकडे वेधून घेऊन त्याला त्याच्या अंगावर घेतो. अशा संकटप्रसंगी कित्येकदा साठमारास त्याचा भाला व फेटा जागच्या जागीच टाकून पलायन करावे लागते आणि स्वतःचा बचाव करावा लागतो; तर काही प्रसंगी अग्गडात दारुचे बाण सोडून व धुराच्या साहाय्याने हत्तीस घाबरवून साठमारास वाचवावे लागते. एखाद्या साठमाराच्या अगदी जीवावर बेतल्यास हत्तीच्या मागच्या पायांत चिमटे टाकून त्याला जेरबंद केला जातो व खेळ थांबवतात. हत्तीच्या पायांत चिमटे टाकण्याचे काम जोखमीचे असते, कारण बिथरलेला हत्ती अचानक मागे वळून चिमटे टाकणाऱ्या साठमारावर हल्ला चढवण्याचा संभव असतो. बडोदे व कोल्हापूर येथील साठमारीमध्ये मैदानपरत्वे थोडा फरक आढळतो; कारण कोल्हापूरच्या साठमारीत मैदानाऐवजी बरेच बुरुज आहेत.
खेळणारे वीर खेळाडू आखाड्यात उतरल्यानंतर मुख्य
प्रवेशद्वारातून आत एक हत्ती सोडण्यात येई. व ते दार पुन्हा बंद केले जाई.
या बंदिस्त आखाड्यामध्ये खेळाडू व हत्ती यांचा खेळ सुरु होई. प्रत्येक
खेळाडू हातातील भाल्याने हत्तीला टोचत. हत्ती अंगावर धावून आल्यावर
खेळाडूने जवळच्या संरक्षित तटबंदीमध्ये घुसून दुसऱ्या बाजूने बाहेर पडायचे.
संरक्षित तटबंदीचे दार लहान असल्यामुळे हत्ती आत जाऊ शकत नसे. इतक्या
वेळेत दुसऱ्या बाजूने हत्तीला भाल्याने टोचायचे. हत्ती पहिल्याचा नाद सोडून
देऊन दुसऱ्या खेळाडूच्या मागे धावे आणि जर का यदा कदाचित हत्तीने एखाद्या
खेळाडूला पकडलेच तर त्याच्या सुटकेकरिता बाण व अप्पटबार (दारुकाम) घेऊन
तयार असलेले लोक अप्पटबार उडवीत व बाण हत्तीच्या अंगावर सोडत. त्यामुळे
हत्ती घाबरुन जाऊन पकडलेल्या व्यक्तीस सोडून देत असे. असा प्रयत्न होऊन
देखील हत्तीच्या तावडीतून सुटू न शकल्यामुळे अनेक वीरांना आपले प्राण
गमावले आहेत.
अशारीतीने स्वरक्षण करीत हत्तीला हैराण करून
त्याच्याबरोबर खेळण्याचा हा अत्यंत धाडशी खेळ हजारो प्रेक्षक बंदिस्त
आखाड्यासभोवताली उंचावर बसून पाहत असत. अशा वेळी या रोमांचकारी खेळातील
वीरांचे मोठ्या औत्सुक्याने कौतुक केले जात असे. त्यांना इनामे देण्यात येत
असत. अॅन्ड्न्युक्लिज अँड दि लायन या कथेतील वर्णनासारखे वातावरण निर्माण
होई. त्याच वर्णनाशी मिळतीजुळती रचना त्यावेळी असे, परंतू त्या कथेत
क्रुरता होती. पण येथे शूरता भरलेली असे.
हल्ली सुमारे गेल्या ७५
वर्षात असा खेळ कोल्हापूरात खेळला गेला नाही आणि यापुढेही खेळला जाणार
नाही. तरी मंगळवार पेठेमध्ये शाहू स्टेडियम जवळच्या या साठमारी जवळ
गेल्यावर त्या रोमांचकारी खेळाचे काल्पनिक चित्र डोळयासमोर उभे केले तरी
अंगावर काटा उभारल्याखेरीज नाही. तसा खेळ कोल्हापुरात गेल्या सुमारे पाऊणशे वर्षांत खेळला गेलेला नाही.
मंगळवार पेठेमधील शाहू स्टेडियमजवळ साठमारीचा खेळ होई. साठमारीचे नाममात्र
अवशेष पाहण्यासही मिळतात.
शाहू महाराजांचे प्राणीप्रेम : गजराज मोतीची शस्त्रक्रिया
छत्रपती
शाहू महाराजांकडे जवळपास अडीचशे हत्ती होते. पैकी "गजराज मोती" हा
महाराजांचा विशेष आवडता हत्ती होता. शिवाय तो अत्यंत भव्य व रुबाबदार होता,
त्याचे शुभ्र वळणार दात दिलखेचक होते त्यामुळे तो छत्रपतींचा मानाच्या
अंबारीचा हत्ती होता. गजराज मोती माजात आलेला असल्यामुळे राधानगरी येथे
त्याला साठमारीच्या मैदानात उतरविण्यात आले. साठमारांनी व्यूहरचना केली व
मोतीचा माज उतरविण्यासाठी ते पुढे सरसावले. खुद्द महाराज हा खेळ
पाहण्यासाठी उपस्थित होते. साठमार रुमाल नाचवित मदमस्त मोतीला छेडू लागले.
मोती प्रचंड चवताळला व एका साठमाराला हेरुन भयानक चित्कार करीत त्याच्या
मागे धावू लागला. उपस्थितांच्या पोटात भितीने गोळा उठला. काहीतरी विपरीत
घडणार असे महाराजांसह सर्वांनाच वाटू लागले. साठमार वायुवेगाने पुढे पळत
होता व जोराचा चित्कार करीत चवताळलेला मोती त्याच्या मागे धावत होता.
"मोतीने साठमाराला सोंडेत पकडले. गरगर फिरवून त्याला जमिनीवर आपटले आणि
पायाखाली एक तंगडी धरुन सोंडेने दुसरी तंगडी फासकटली." असे भेसूर चित्र
उपस्थितांच्या मनपटलावर तरळले तोच साठमार चपळाईने समोरच्या दिंडीत घुसला.
त्याचा मागून वायुवेगाने धावत येणारा मोती जोराने बुरुजावर आदळला त्यासरशी
कडाड् कड असा मोठा आवाज झाला. त्यातच काळीज चिरुन जाणारा मोतीचा आर्त
चित्कार पाठोपाठ उमटला. मोतीच्या तोंडातून रक्ताचा लोट वाहत होता. मोतीचा
एक दात मोडला होता. दाताच्या आतील मांसल गोळा लोंबकळत होता. ते भयानक दृश्य
पाहवत नव्हते. तोच गगनभेदी टाहो फुटला, "महाराज घात झाला. माझ्या मोतीचा
दात तुटला." असा आक्रोश करीत अंबादास माहूत मैदानात धावला. पिसाळलेल्या
हत्तीसमोर जात असलेला भावनाविवश अंबादास पाहून महाराजांना धोक्याची जाणीव
झाली. "अंबादास थांब. मोती पिसाळलाय, त्याच्यासमोर जाऊ नकोस." असे म्हणतच
महाराजांनीही मैदानात उडी ठोकली. तोपर्यंत अंबादास मोतीच्या सोंडेला बिलगून
अश्रू ढाळीत उभा होता. प्रचंड पिसाळलेला तो भव्य गजराज मोतीसुद्धा सोंडेने
अंबादासला वेढा घालून अश्रू ढाळीत शांतपणे उभा होता. तशाही स्थितीत
हत्ती-माहूताचे प्रेम पाहून व आपल्या आवडत्या मोतीची भेसूर जखम पाहून
महाराजांच्याही डोळ्यांत अश्रू तरळले. पण हत्ती पिसाळलेला होता. या स्थितीत
तो काहीही करु शकतो हे जाणून महाराजांनी अंबादासला बाजूला घेतले व हत्तीला
चिमटे लावून ठाणबंद केले. त्याच्या जखमेवर प्राथमिक उपचार केल्यानंतरच
महाराजांनी मैदान सोडले.
दुसऱ्या दिवशी पहाटे महाराज व्हेटर्नरी
सर्जन सावर्डेकर यांना घेऊन हत्तीठाणावर आले. डॉ. सावर्डेकरांनी मोतीला
तपासले. तुटक्या दाताच्या पोकळीतील लोंबकळणारे मांस त्यांनी कापून टाकले.
"तुटक्या दाताची वाढ होते काय?" महाराजांनी विचारले.
"नाही" डॉक्टरांनी सांगितले.
"दुसरा काही मार्ग?"
"दुसरा
कुठलाच मार्ग नाही. दात मोडल्यामुळे दात्र्या पडल्या आहेत. त्या भारी खूपत
असणार. तोंडातील जखम व खुपणाऱ्या दात्र्यांमुळे हत्ती सदा विव्हळत
राहणार."
"मग त्या दात्र्या तरी काढून टाका." महाराज म्हणाले. त्यावर
त्या काढता येणार नाहीत शिवाय यापुढे हत्तीवर इलाज करता येणार नाही असे
डॉक्टरांनी सांगितले.
दुसऱ्या दिवशी महाराज पिराजी मिस्त्रीला घेऊन
आले. तेव्हा जखमेची पाहणी करुन पिराजी म्हणाला,"उरलेल्या दाताला जिथून
दात्र्या पडल्या आहेत तेथून दात कापून टाकू." महाराजांनी पिराजीच्या योजनेस
संमती दिली. शस्त्रक्रियेसाठी हत्तीला सोनतळी कँपवर हलविण्यात आले.
लोखंडही कापू शकतील आशा धारदार करवती पिराजीने आणल्या. मोतीला शांत
ठेवण्याचे काम महाराजांनी अंबादास माहूताकडे सोपवले. मोतीचे पाय साखळदंडाने
जखडून टाकले. हत्ती ठाणबंद झाला खरा पण सोंड मोकळीच होती.
शस्त्रक्रियेसाठी जवळ जाणाऱ्याला तो सोंडेने उचलून फेकून देईल ही भीती
होती. सोंड कशात तरी गुंतवून ठेवली पाहिजे यासाठी महाराजांनी एका नवीन
साधनाचा शोध लावला. त्याचे तंत्र पिराजीस सांगितले व कुशल पिराजीने ते साधन
तयार केले. "गळसाज" असे नाव देऊन ती साखळी हत्तीच्या गळ्यात घातली.
लॉकेटप्रमाणे या साखळीत भक्कम काटेरी गोळा अडकविण्यात आला होता. हत्तीने
हालचाल केली कि त्या गोळ्याचे अनकुचीदार काटे हत्तीच्या सोंडेला व पायाला
टोचत. गोळ्याचे काटे टोचू नयेत म्हणून हत्ती साखळी सोंडेने उचलून धरी.
अशाप्रकारे मोतीच्या सोंडेला गोळा उचलून धरण्याचे काम लागले !
अशाप्रकारे
मोतीला ठाणबंद करुन पिराजी करवत घेऊन दात कापण्यासाठी मोतीच्या मानेखाली
गेला. अंबादास हत्तीला गोंजारुन शांत ठेवू लागला पण पिराजीने दाताला करवत
लावताच मोती बिथरला. हा माणूस आपल्याला इजा करणार असे वाटून तो पिराजीस
पकडण्याचा प्रयत्न करु लागला. सोंड गुंतली असल्याने तो इकडेतिकडे झुकू
लागला. त्यातूनही पिराजीने दाताला करवत लावली पण हत्तीने हिसडा दिल्यामुळे
ती तुटली. तो दुसरी करवत लावणार तोच महाराज ओरडले, "पिराजी निघ बाहेर. मोती
पायाखाली धरतोय तुला." पिराजी पटकन हत्तीपासून दूर झाला. यानंतर हत्तीला
झुलता येऊ नये म्हणून हत्तीच्या दोन्ही बाजूना बळकट दगडी भिंत बांधण्यात
आली आणि पुन्हा एकदा शस्त्रक्रियेस सुरुवात झाली. आता मोतीला हालचाल करता
येत नव्हती. पिराजीने दाताला करवत लावली. मोतीला राग आला व सोंडेला
टोचणाऱ्या काट्यांची पर्वा न करता मस्तक फिरवू लागला.एकापाठोपाठ एक करवती
मोडत होत्या. पिराजी आपल्या कामात मग्न होता. मोतीने दुसरीच युक्ती योजली.
तो पुढचे पाय पुढे व मागचे पाय मागे पसरु लागला. त्याचे पोट खाली येत
पिराजीला भिडले. पिराजी हत्तीखाली चेंगरणार तोच महाराजांनी पिराजीला ओढून
बाहेर काढले.
महाराजांनी डाकवे मेस्त्रींना बोलावून दोन्ही बाजूंस
हत्तीच्या पोटाला घासून भिंत बांधून घेतली. परत शस्त्रक्रिया सुरु झाली.
मोतीला किंचितही हालता येईना. पाय पसरु लागताच पोट भिंतीला घासू लागले.
त्यामुळे पायही पसरता येईनात. पिराजीने करवतीने काही दात्र्या कापल्या.
हत्तीलाही कळून चुकले की हि माणसे आपल्याला इजा करणार नाहीत, तर आपल्या
वेदना कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत. तोही समंजसपणे वागू लागला; मुळात
मोती होताच समंजस ! हत्तीने सहकार्य करताच आठ दिवसांत पिराजीने खुबीदारपणे
दात कापला. कापलेला दात तसाच राहू दिल्यास इन्फेक्शन होऊन हत्तीस इजा होईल
म्हणून, एक चांदीचे टोपण तयार केले व दाताला भोके पाडून स्क्रूने आवळून
गच्च बसविले. मोती यातनामुक्त झाला. शस्त्रक्रियेचा प्रयोग यशस्वी झाला. हा
प्रयोग यशस्वी करणाऱ्या पिराजी मेस्त्री, डाकवे मेस्त्री व अंबादास
माहूताला स्वतःच्या पंगतीला बसवून घेऊन महाराजांनी मेजवानी दिली.
मोतीने एक दात गमावला. त्याचबरोबर त्याच्या भोवती असलेले वैभवाचे वलयही विरुन गेले. अंबारीला, छबिना मिरवणुकीला आता तो घेतला जाणार नव्हता. हे शल्य अंबादास माहूताला बेचैन करत होते. मोतीला पूर्वीचे वैभव प्राप्त झाले पाहिजे, ही महाराजांची उत्कट इच्छा होती. मोती होताच तसा विलोभनीय शरीरयष्टीचा व समंजस वृत्तीचा. एकदा महाराज मोतीजवळ उभे असता पिराजीला म्हणाले, "पिराजी, मोतीला दात बसवला पाहिजे. त्याशिवाय त्याला अंबारीसाठी घेता येणार नाही की मिरवणूकीसाठी बाहेर काढता येणार नाही." तेव्हा पिराजी म्हणाला, " बसवूया की महाराज. त्यात काय अवघड हाय ! भेंडीच्या लाकडाचा दात करतो. ते वजनाला हलकं, हत्तीच्या दाताच्या रंगाचं आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला हिर नसतात. त्यामुळे दातासारखा दात करता येईल." पिराजी कामाला लागला. अगदी तुटलेल्या दातासारखा हूबेहूब दात त्याने केला. त्याला पॉलिश केले. पाहणाऱ्याला तो खरा हस्तीदंत वाटायचा. हा लाकडी दात पिराजीने मोठ्या कौशल्याने चांदीच्या विळीच्या सहाय्याने मूळच्या दातास बेमालूम जोडला. दुसऱ्या दाताभोवतीही चांदीची विळी अडकवली. त्यामुळे पाहणाऱ्यास चांदीची विळी म्हणजे हत्तीचा अलंकार वाटे. दोन दातांचा डौलदार मोती पाहून महाराजांना अपरिमित आनंद झाला. अंबादास आनंदाने नाचू लागला आणि मोडक्या दाताच्या ठिकाणी आलेला दात पाहून मोतीसुद्धा आनंदित झाला. पुढे मोतीचा छबिना मिरवणुकीचा मानही अबाधित राहिला
खासबाग
कोल्हापूर हे शहर कुस्ती या खेळाबद्दल अखिल भारतात प्रसिध्द आहे. श्री.
शाहू खासबाग मैदान हे या पेशातील लोकांचे मानाचे स्थान आहे. या खासबाग
कुस्ती मैदानात आजपर्यंत अगणित लहान मोठ्या कुस्त्या खेळल्या गेल्या,
असंख्य पैलवान या मातीत नावारुपाला आले आणि या मैदानाने करोडो लोकांच्या
डोळयांचे पारणे फेडले. हे मैदान मंगळवार पेठेत असून जुन्या राजवाड्यापासून
चालत पाचच मिनिटाच्या अंतरावर आहे. हे मैदान अगदी वैशिष्ट्यपूर्ण असून अशा
प्रकारचे मैदान पिचतच असेल. याचा आकार पूर्ण गोलाकृती असून मध्यभागी
कुस्ती खेळण्याचा मोठा आखाडा आहे. या आखाड्यात एकाच वेळी चार ते पाच कु
स्त्या केल्या जातात. सभोवताली प्रेक्षकांना बसण्यासाठी व व्यवस्थित कुस्ती
पाहता यावी म्हणून उतरण आहे. या मुळे सर्व मैदानाचा आकार एखाद्या खोलगट
तबकासारखा दिसतो. पूर्व व पश्चिम दिशांना प्रवेशाची सोय आहे. पूर्वेला
निमंत्रित व मान्यवर व्यक्तींना बसणेकरिता मोठा मंच असून त्यावर मंडप
उभारलेला आहे. या मंचाचा उपयोग रंगमंच म्हणून खुल्या नाट्यप्रयोगासाठी वा
इतर कार्यक्रमासाठीही केला जातो. आखाड्याभोवती व प्रेक्षकांनी ठराविक
अंतराच्या आत येऊ नये म्हणून दोन वर्तुळकार लोखंडी कठडे तयार केलेले आहेत.
या संपूर्ण मैदानात सुमारे २५ ते ३० हजार लोक भारतीय बैठकीमध्ये बसू शकतात.
मुख्य प्रवेशद्वार पूर्वेस असून त्यालगतच केशवराव भोसले नाट्यगृह आहे.
श्री शाहू महाराज सन 1902 साली विलायतेला गेले. त्यावेळी त्यांनी ग्रीस साम्राज्याची राजधानी रोम नगरीस भेट दिली. ऑलिंपिक स्टेडियम व ओपन एअर थिएटर पाहिले आणि त्याचवेळी त्यांना आपल्याकडील कुस्त्याच्या मैदानातील उणिवेचे उत्तर सापडले. विलायतेवरून आल्यानंतर त्यांनी कुस्ती मैदान, पॅलेस थिएटर, साठमारी या योजना आखून कामास सुरुवात केली. कुस्ती मैदानाच्या बांधकामास 1907 साली सुरुवात केली व फेब्रुवारी 1912 साली पूर्ण केले. या कुस्ती मैदानाची घडण अशी आहे की, मैदानात कोठेही बसले तरी कुस्ती आपल्यासमोर चालली आहे, असे प्रत्येकाला वाटते. कारण डोळ्याचा अँगल खाली असल्याने जवळ कुस्ती चालली आहे, असे वाटते.

राजर्षी शाहू महाराजांना
लहानपणापासून कुस्तीचा नाद होता. त्यांनी लहान वयातच कागल मुक्कामी कुस्ती
केली होती. राजांना निसर्गत:च भीमकाय देहयष्टी, निरोगी संपदा लाभली होती.
कोल्हापुरात अंबाबाईच्या दारी मंगळवार, शुक्रवार या दोन दिवशी कुस्ती
मैदाने भरावयाची. ही मैदाने जुन्या राजवाडय़ाच्या पश्चिमेच्या दरवाजाजवळ
आजचे बी डिव्हिन पोलीस चौकी, बाबू जमाल दर्गा, मंगळवार पेठेतील विठोबा
देवळ, शिवाजी थिएटर आताचे नवरे मंगल कार्यालय येथे होत होती. ही कुस्ती
मैदाने संक्रांत, महाशिवरात्र, ईद , धूलिवंदन, जोतिबा यात्रा, शिवजयंती,
नागपंचमी, माही, उरूस इत्यादी सणांना भरत असत. या मैदानाचे लोण प्रत्येक
खेडय़ात पोचले. अशातर्हेची मैदाने सणा दिवशी प्रत्येक गावात होऊ लागली असून, ही प्रथा आजही खेडोपाडी चालू आहे. वरील
कोल्हापुरातील कुस्ती मैदाने सपाट जागेवर माती टाकून केली जायची. त्यामुळे
प्रेक्षकांना कुस्ती नीट दिसायची नाही, त्यांना उभे राहून पाहावी लागायची.
ही गैरसोय महाराजांच्या सतत लक्षात यायची. महाराजांना शाळा, कॉलेज,
पिण्याच्या पाण्याचे तळे, रंकाळा जनतेच्या उपयोगी योजना करून त्या पूर्ण
करण्याची सवय होती. कुस्ती मैदानाला खासबाग हे नाव ठेवणेच कारण.. मिरजकर
तिकटीच्या राधाकृष्ण मंदिरानजीक एक बाग होती. तिचे नाव खासबाग. म्हणजे
राजांच्या परिवारातील लोकांसाठी फिरण्यासाठी खास राखून ठेवलेली जागा. ही
खासबाग सामाजिक बांधीलकी मानणार्या
शाहू राजांनी मोडीत काढून कुस्ती आखाडा बांधला. कुस्ती मैदान काम 1907 ला
सुरू करण्यात आले. प्रथम उत्तर, पश्चिम व दक्षिणेच्या बाजूने 20 फूट
उंचीच्या भिंती किल्ल्याच्या तटासारख्या भक्कम केल्या आहेत. मैदानाच्या
मध्यभागी कुस्तीचा 60 फूट व्यासाचा आखाडा, दोन फूट उंची गोलाकार आहे.
स्टेजच्या उत्तरेकडून मैदानात पैलवान, वस्ताद यांना प्रेक्षकात मैदानात
येण्यासाठी व दक्षिणेस राजे व मान्यवर मंडळी मैदानात येण्यासाठी, उत्तरेस
येण्यासाठी दोन मोठे दरवाजे आहेत. या मैदानाचे काम दगडी जिना व त्या दगडी
जिन्यावर पाण्याची टाकी व पाठीमागे टुमदार इमारत सदनाचे रेशनकार्ड कार्यालय
बांधले आहे. या इमारतीतून राजघराण्यातील स्त्रिया कुस्ती पाहण्यास बसत. या
मैदानाचे काम 1912 साली पूर्ण झाले आहे. खासबाग मैदानात प्रेक्षक
बसण्यासाठी उतरण असल्याने कुस्ती स्पष्ट दिसते.
श्री शाहू खासबाग
मैदानाचे उद्घाटन इमामबक्ष-मोहिदीन यांच्या चित्तथरारक कुस्तीने झाले.
मैदान पूर्ण एक लाख प्रेक्षकांनी भरले होते. या मैदानातील नं. 1 ची कुस्ती
इमामबक्ष यांनी जिंकली. शाहू महाराजांनी कोल्हापुरात खालील पैलवानांना
आणले.
पै. सादिक, रमजी, गुटा, किकर, गुलाम , यात्रा, गोबरबाबू,
जगज्जेता गामा, शहानवाझ तानीवाला, गुलाब भोईटदिन, गामा, गुलाम कादर,
हादिमा, जिजा, भोला.
महाराष्ट्रातील पैलवानाबरोबर किंवा त्यांना जोड
मिळाली नाहीतर पंजाबी विरुद्ध पंजाबी यांच्या कुस्त्या लावून कुस्तीचा शौक
वाढविला. या मैदानात गणपत शिंदे, बाळ पानारी, गोपाळ परीट, कमाल अथणे,
श्रीपती चव्हाण, बाबू बिटे, चंदर शिंदे, म्हादू हांडे, हरी पोवार, शंकर
हेर्ले, सदाशिव वास्कर, देवाप्पा हलंगडी, आण्णाप्पा पाडळकर, विष्णू
नागराळे, जिन्नाप्पा अकिवटे, दिनकर शिंदे यांच्या पंजाबी पैलवानाबरोबर
कुस्ती झाल्या आहेत. याच मैदानात माणगावे खेळले आहेत. माझ्या पाहण्यात
झालेल्या कुस्त्या पैलवान सादिक विरुद्ध केशव पाटील, सादिक विरुद्ध शिवा
आरेकर, महंमद हानिफ विरुद्ध बिल्ला, हानिफ विरुद्ध सादिक, आंदळकर विरुद्ध
सादिक, विष्णू सावर्डे विरुद्ध सादिक. यामध्ये सादिक यांनी सर्व कुस्ती
मारल्या आहेत तसेच सादिक विरुद्ध गोगा, गोगा विरुद्ध गणपत आंदळकर यामध्ये
गोगा विजयी, गणपत आंदळकर विरुद्ध नशीर पंजाबी ही कुस्ती चालू असताना
संध्याकाळी अंधार पडला म्हणून दुसर्या
दिवशी सकाळी 9 वाजता कुस्ती लावली. या कुस्तीत आंदळकर विजयी झाले.
मोतीबागचा चंबा मुत्नाळे विरुद्ध गणपत खेडकर यांची कुस्ती फार चांगली झाली.
चंबाने कुस्ती जिंकली, बंडा पाटील व चंबा ही कुस्ती प्रेक्षणीय झाली. दादू
चौगुले यांनी तर खासबाग गाजवून सोडले. त्यांनी 9 कुस्त्या या मैदानात
केल्या. सन 1975 मध्ये रुस्तम-ए- हिंद या अखिल भारतीय कुस्ती स्पर्धा
झाल्या. यामध्ये पैलवान सतपाल, मास्टर चंदगीराम, चंबा मुत्नाळ, गणपत खेळकर,
हरिशचंद्र बिराजदार, वडार, अॅग्झॅक निग्रो इत्यादी 75 पैलवानानी भाग घेतला.
होता. या स्पर्धामध्ये पैलवान सतपाल यांना 'रुस्तम -ए-हिंद' किताब मिळाला.
पॅलेस थिएटर
नावाप्रमाणेच राजेशाही थाट मिरवणार्या या वास्तूची बांधणी देखील स्वत:
छत्रपती शाहू महाराजांच्या पुढाकारानेच झाली. याच कालावधीत संगीत आणि
नाट्यकलेची बीजेदेखील कोल्हापूरात रूजली. याचं सारं श्रेय जातं पॅलेस
थिएटरला... अर्थात आजच्या केशवराव भोसले नाट्यगृहाला.
रोम भेटीवरून
परतल्यानंतर तिथे असलेले ऑलिंपिक मैदान व त्याला लागूनच असलेले नाट्यगृह
यांची प्रेरणा घेऊन छ. शाहूंनी या वास्तू उभारल्या. सन 1913 ते 1915 या
कालावधीत बांधल्या गेलेल्या या नाट्यगृहाचा रंगमंच 20 फूट बाय 34 फूट इतका
प्रशस्त असून रंगमंचाखाली आवाज घुमण्यासाठी पाण्याने भरलेला 10 फूट खोल
खड्डा आहे. पाणी खेळते राहण्यासाठी पक्की गटारे बांधली आहेत. नाट्यगृहास
कोठेही खांब नाहीत. कुठेही बसले तरी नाटक व्यवस्थित दिसावे व स्पष्ट आवाज
ऐकू यावा अशी रचना केलेली आहे. नाट्यगृह आखीव, रेखीव व राजेशाही थाटाचे
असून त्या काळी राजघराण्यातील स्त्रियांना नाटक पाहता यावे म्हणून
बाल्कनीमध्ये दोन बंदिस्त खोल्यांची विशेष रचना करण्यात आलेली आहे.
कैलासगडची स्वारी शिवालय
केशवराव भोसले नाटय़गृहाजवळील कैलासगडची स्वारी हे शिवमंदीर दक्षिण काशी
कोल्हापूर येथील एक जागृत व भाविकांचे श्रध्दास्थान म्हणून प्रसिध्द आहे.
या प्राचिन मंदिराचा जिर्णोध्दार वेळोवेळी झाला असून अलिकडे १९७२ मध्ये
मंदिराचा विस्तार वाढवून जिर्णोध्दार केलेला आहे. जिर्णोध्दार करताना मंदिर
कलात्मकतेने नटवल्याने सध्य स्थितीतील हे मंदिर म्हणजे ऐतिहासिक, पौराणीक
आणि आधुनिक कलेचा त्रिवेणी संगम म्हणावा लागेल. मंदिर उभारताना ज्योतिबा
डोंगर येथील काळा पाषाण वापरून कलाकुसर केलेली आहे. मंदिरासमोरील एक टन
वजनाचा पितळी नंदी व मंदिराच्या दोन्ही बाजूचे दीड टन वजनाचे व २२ फूट
उंचीचे पितळी दीपस्तंभ आकर्षक आहेत. मंदिराला आवर्जून भेट देण्याचे दुसरे
कारण म्हणजे मंदिरात असलेली कोल्हापूरचे प्रख्यात रंगकर्मी कलायोगी जी.
कांबळे यांची अप्रतिम तैलचित्रे छ. शिवाजी महाराजांचे शासन दरबारी मान्यता
पावलेले जी. कांबळे यांची अस्सल तैलचित्रे येथेच आहे.
बिनखांबी गणेश मंदीर किंवा जोशीरावचा गणपती म्हणून प्रसिध्द असलेले हे मंदीर महाद्वार रोडवर आहे. या मंदिराचे मुख्य दोन भाग म्हणजे आतील गाभारा व त्यापुढील मंडप. गाभारा किंवा मंडप यांचे छत हे खांबाच्या आधाराविना उभारलेले आहेत हेच या मंदिराचे वैशिष्ट्य होय. मंडप सुमारे २५ फूट लांब व रुंद २५ फूट रुंद आहे. कळस गाभाऱ्यावरच उभारलेला असून गणपतीची मूर्ती दगडी आहे.

काशी विश्वनाथ मंदिर-
श्रद्धाळू
भारतीय मनाची परिसीमा म्हणजे काशी दर्शन, प्रयाग येथील त्रिवेणी संगम व गया
येथील पिंडदान. पण करवीरच्या यात्रेकरूंना इतके कष्ट करण्याची काहीच गरज
नाही. कारण ही तीनही क्षेत्रे कोल्हापुरातच आहेत. महत्त्वाचे म्हणजे
प्रत्यक्षात काशी यात्रेपेक्षाही या 'दक्षिण काशी'चे महत्त्व अधिक मानतात.
महालक्ष्मी मंदिरात घाटी दरवाजाच्या बाजूला काशी विश्वनाथाचे मंदिर आहे. तेथे कालभैरव, दंडपाणी, गंगा, धुंडिराज, गणेश ही काशीतील सर्व दैवते आहेत. तर मंदिरासमोर जाळीआड काशीकुंडात गंगा आहे. समोरच्या दीपमाळेत अगस्ती व लोपामुद्रा यांच्या मुर्ती आहेत. महालक्ष्मी मंदिराच्या आवारात असलेल्या उद्यानात 1960 पूर्वी मणिकर्णिका तीर्थ होते. दुर्दैवाने हे मणिकर्णिका तीर्थ सध्या मुजवले गेले आहे. काशीकुंडात गंगा, मणिकर्णिका तीर्थाचे अस्तित्व व काशीविश्वनाथाचे मंदिर यामुळे कोल्हापूरला काशीचा मान आहे. करवीर माहात्म्यानुसार देवी या क्षेत्री आल्यावर पाठोपाठ शिव आले. त्यामुळे इतर सर्व देवता या ठिकाणी येवून राहिल्या.
वरुणतीथाजवळील फिरंगाई देवीचे मंदिर असून हे बहुजन समाजाचे दैवत मानले जाते. फिरंगाईस प्रत्यागिरादेवी म्हणूनही ओळखले
जाते. भाविक लोक देवीला पीठ, मीठ, हळद आणि तेल अर्पण करतात. पूर्वीच्या
काळी देवीसमोर रेडय़ाचा बळी दिला जात असे. आता ती प्रथा बंद झालेली असून आता
बोकडाचा बळी देतात. मंदिराची बांधणी साधी असून ओबडधोबड दगडात केलेली
शिल्परचना सामान्य आहे. मात्र हे देउळ महालक्ष्मी देवीच्या स्थापनेच्याही
पूर्वीपासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते. मंदिर साधे असले तरी
कोल्हापुरातील महालक्ष्मीच्या प्रभावापूर्वीच्या कोल्हापुरातील प्राचीन आणि बहुजन
समाजाच्या द्राविड संस्कृतीच्या प्रभावाचे प्रतीक म्हणून अभ्यासकांच्या
दृष्टीने या मंदिराचे स्थान अत्यंत महत्वाचे असे आहे. या मंदिराचे अलीकडेच
नूतनीकरण करण्यात आले आहे.
जगद्गुरू शंकराचार्य हयांनी स्थापन केलेल्या चार मठांपैकी, शृंगेरी हा एक मठ. तेराव्या शतकामधे त्यावेळचे अधिपती शंकराचार्य, श्री. विद्याशंकर भारती यांनी कोल्हापूर येथे हा मठ स्थापन केला.शुक्रवार पेठेत पंचगंगा नदीच्या घाटावर जाण्याच्या मार्गावर हा मठ आहे. हा मठ दुमजली असून त्याच्या बांधणीमध्ये भव्यता किंवा कलाकुसर आढळून येत नाही. कोल्हापूरच्या त्या काळातल्या धार्मिक महात्म्यामुळे, त्यांनी हा मठ स्थापन केला. महालक्ष्मी जगदंबेच्या पवित्र स्थानापाशी, दक्षिण काशीच्या पुण्य-भू पाशी, एक मठ असावा असे, स्वामींना वाटले असल्यास त्यात काहीच नवल नाही. ‘अभिनव पंचगंगा तीर्वास’, ‘कमल निकेतन करवीर सिंहासनाधिश्वर श्री. विद्या शंकर भारती स्वामी’ हया प्रस्तुत मठातील शंकराचार्यांच्या उपाधी आहेत. पंचगंगेचा काठ आणि महालक्ष्मी मंदिर हयांचे स्थान माहात्म्य शंकराचार्यांना, श्री. विद्या शंकर भारती यांना वाटत होते, हे यावरून समजते. मठासाठी जागा मुक्रर करताना सुध्दा, पंचगंगेचा काठच त्यांनी त्यामुळे पसंत केला. मठाची ही जागा निवडण्यामागे, दुसरे देखील एक कारण दाखवता येईल. मठ म्हणजे शेवटी समाधीची जागा, हे विसरणे शक्य नाही. समाधी स्थान हे नदीकिनारी असणे, खरे तर उचित ठरते. त्यामुळे शंकराचार्यांनी हया ठिकाणाची निवड केली. आद्य शंकराचार्यांनी हिंदू धर्माच्या उत्थानासाठी जे चार मठ स्थापन केले त्यापैकी एक कर्नाटकातील शृंगेरी मठ होय. या मठावर अधिष्ठित असलेल्या विद्याशंकर भारती या शंकराचार्यानी इ.स. 13 व्या शतकात कोल्हापुरात या मठाची स्थापना केली. प्रारंभी हा मठ संकेश्वर मठाबरोबर संलग्न होता पण आता हा मठ 'करवीर पीठ' या नावाने स्वतंत्र आहे. कोल्हापूर मठाधीश शंकराचार्यांच्या बिरूदावलीत 'अभिनव पंचगंगातीरवास कमलानिकेतन करवीर सिंहासनाधीश्वर श्री विद्याशंकरभारती स्वामी' असा उल्लेख केला जातो.
ब्रम्हेश्वराचे हे प्राचीन मंदिर वरुणतीर्थ वेशीत जनता बझारच्याजवळ आहे. या मंदिराची रचना महालक्ष्मी मंदिरासारखीच आहे. फक्त याला शिखर नाही व ते विस्ताराने लहान आहे. मंदिराचा बराचसा म्हणजे निम्म्याहून अधिक भाग पृष्ठभागापासून खाली खोलगट भागात आहे. मंदिराच्या गर्भगृहातील लिंग भूमिगत आहे. मंदिराच्या गर्भगृहासमोर छोटासा मंडप आहे. या प्राचीन मंडपाला लागून आता नव्याने दुसरा मोठा मंडप बांधण्यात आला आहे.
ब्रह्मेश्वर बागेतून उभा मारुती मंदिराकडून व नागोजीराव पाटणकर विद्यालयाच्या दिशेने ताराबाई रोडवरून महाकाली मंदिराकडे जाता येते. त्या मार्गावर नव्याने उभारलेल्या दगडी कमानी हे वारसास्थळ असल्याचे अधोरेखित करतात.
अंबाबाई मंदिरापासून पश्चिमेला रंकाळ्याकडे जाताना महाकालीचे मंदिर आहे. ‘करवीर माहात्म्या’मध्ये उल्लेख असलेले हे मंदिर वेशीबाहेर होते. रंकाळावेस व वरुणतीर्थ वेशीच्या दरम्यान ते रंकाळ्याच्या दिशेला आहे. आज ते शिवाजी पेठेच्या मध्यवर्ती भागात आले. अगस्ती मुनी आणि त्यांची पत्नी लोपामुद्रा यांनी करवीर यात्रा केली. त्या वेळी महाकालीचे दर्शन घेतल्याचा उल्लेख आढळतो. मंदिरात प्रवेश करताना पृष्ठभागावरील कासवाच्या प्रतिकृतीनंतर अगस्ती व लोपामुद्रा यांची प्रतिमा पायात दिसते.
तीन फूट उंचीची स्थानिक काळ्या दगडात कोरलेली सर्वांगसुंदर मूर्ती मंदिरात आहे. मंदिर परिसरात महाकाळ कुंड व नागेश्वराचे स्थान असल्याचे नमूद आहे. खांबांवर उभारलेले दगडांच्या अडक पद्धतीचे हे मंदिर फार मोठे नाही. गर्भगृह, सभामंडप, मुख मंडप अशी रचना असून, त्यापुढे चौक व पालखीचा चौथरा दिसतो. मंदिराचे शिखर इतर मंदिराप्रमाणेच दिसते. कोपऱ्यात एक छोट्या आकाराची, कमी उंचीची दीपमाळ दिसते. डाव्या बाजूला मारुती, महादेव, नागमूर्तीचे मंदिर आहे. मागील बाजूस एक छोटे मंदिर आहे. महाकाली ही युद्धदेवता असून, तिच्या मंदिरात होम, जागर, हवनाचा विधी होतो. अक्षय्य तृतीयेला होम, पालखी, मिरवणूक, प्रसाद, पशुबळी देण्याची परंपरा आहे.
नवरात्रोत्सवातील नवदुर्गा दर्शन घेताना महाकालीचे दर्शन घेतले जाते. चिंचेच्या झाडांच्या विस्तीर्ण सावलीच्या परिसरात असलेला हा मंदिर परिसर आज नागरी वस्तीत गुरफटलेला दिसतो. तरीही तो तसा शांत वाटतो. त्याच परिसरात नाथ संप्रदायाच्या काही समाधी आहेत. त्याच ठिकाणी आणखी एक मारुतीचे छोटेसे मंदिर असून, त्याच्या कळसाची बांधणी लक्ष वेधून घेते. ब्रह्मेश्वर बागेतून, उभा मारुती मंदिराकडून व नागोजीराव पाटणकर विद्यालयाच्या दिशेने ताराबाई रोडवरून मंदिराकडे जाता येते. त्या मार्गावर नव्याने उभारलेल्या दगडी कमानी हे वारसास्थळ असल्याचे अधोरेखित करतात.मात्र, ऑईलपेंट व फरशीतील नव्याने केलेले बदल हे त्यांचे प्राचीनत्व प्रश्नांकित करतात.
वैशिष्ट्ये...
अगस्ती मुनी व त्यांची पत्नी लोपामुद्रा यांनी करवीर यात्रेत महाकालीचे दर्शन घेतल्याचा उल्लेख
मंदिरात तीन फूट उंचीची स्थानिक काळ्या दगडात कोरलेली सर्वांगसुंदर मूर्ती
नवरात्रोत्सवातील नवदुर्गा दर्शनात महाकालीचे दर्शनही घेतले जाते
परिसरात मारुतीचे छोटेसे मंदिर असून, त्याच्या कळसाची बांधणी लक्षवेधी
करवीर माहात्म्य व लक्ष्मीविजय या गं्रथात शेषनारायण विष्णूच्या करवीरच्या सीमेच्या आतील चार म्हणजे अंतर्गृही शेषशायी रूपातील स्थानांची वर्णने आहेत. यातील एक विष्णू मूर्ती महालक्ष्मी मंदिरात पूर्वबाजूस आहे. त्यास न्यग्रोधतीर्थ म्हणतात. पालाशतीर्थ म्हणून ओळखली जाणारी दुसरी मूर्ती महालक्ष्मी मंदिराच्या प्रांगणातील अतिबलेश्वर महादेवाच्या मंदिराच्या प्रांगणातील अतिबलेश्वर महादेवाच्या मंदिरात उजव्या कोपर्यात आहे. पूर्वी ही मूर्ती प्रांगणातील राम मंदिरासमोरील पिंपळाच्या पारावर होती. तिसरी शेषशायी विष्णूची मूर्ती गंगावेश पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या मारूती मंदिरात आहे. याला अश्वत्थतीर्थ म्हणतात. चौथी औदुंबर तीर्थ म्हणून ओळखली जाणारी शेषशायी विष्णूची मूर्ती मिरजकर तिकटीत सुभाष चौकातील रिक्षा स्थानकाच्या समोर एका साध्या छोटय़ा मंदिरात आहे. ही प्राचीन मूर्ती पूर्वी रविवार पेठेतील बिंदू चौक जेलजवळील बुरूजावर होती. ही मूर्ती शेषशायी विष्णूच्या अंतर्गृही चार व बहिगृही असलेल्या चार मूर्तीच्यापेक्षा सर्वात मोठी आहे. भूदेवी, लक्ष्मी (श्री) देवी, नारद, ब्रह्म यांच्यासह ही मूर्ती साधारणपणे 5 फुट रूंदीची आहे. विष्णूच्या चेहर्यावरील शांत भाव मनोहर आहेत. मूर्ती काळ्य़ा पाषाणात कोरलेली असून तिची घडण अतिशय सुबक व चित्तवेधक आहे. ओंकारेश्वर, विठोबा मंदिराच्या दर्शनाबरोबरच मिरजकर तिकटीवरील या शेषशायी विष्णूचे दर्शन करता येते.
या परिसराला कोटीतीर्थ हे नाव का पडले याच्या अनेक दंतकथा आहेत. एका दंतकथेप्रमाणे असुरांनी देवांवर विजय मिळवला असताना महालक्ष्मीने देवांच्या मदतीस धावून जावून एक कोटी असुरांना येथे ठार मारल्याने या जागेला कोटीतीर्थ असे नाव मिळाले. महालक्ष्मीनेच येथे कोटीश्वर लिंगाची स्थापना केली. दुसर्या एका कथेप्रमाणे पुष्करेश्वराने करवीरात हे तीर्थ निर्माण केले. या ठिकाणी भानुराजाने आपल्या कोटीजन्मींची पातके घालविली म्हणून याला कोटीतीर्थ किंवा पुष्करतीर्थ असे नाव पडले.
हे तीर्थ पापनाशिनी असल्याचे कल्पून आणि ते सर्व तीर्थात श्रेष्ठ असल्याचे समजून काहीजण कोल्हापुरात आल्यावर प्रथम दर्शन कोटीतीर्थाचे घेतात. येथे पूर्वी महालक्ष्मीचे मंदिर होते पण ते भूकंपात गडप झाल्याचीही समजूत आहे. कोटीतीर्थाजवळील स्वामी समर्थ मंदिर शांत व रमणीय आहे.
ओंकारेश्वर मंदिर
विठोबा मंदिराच्या प्रांगणात
पूर्वेस असलेले हे मंदिर विठोबा मंदिरापेक्षा मोठे असून या मंदिरावर
तुलनेने कोरीव काम जास्त आहे. मंदिराला गर्भगृह, अंतराळ, नंदीमंडप अशी रचना
असून अतिशय कलात्मक व शिल्पवैभवाने नटलेली प्रवेशद्वारे हे या मंदिराचे
वैशिष्टय़ आहे.या मंदिराच्या नंदीमंडपाचे छत बाहेरून कलात्मक असे 16 खांब व
आतून 4 खांब अशा एकूण 20 खांबावर तोललेले आहे. छताच्या 16 खांब असलेल्या
भागावर बाहेरील बाजूंनी चोहोबाजूंनी जैन तीर्थकरांच्या मुर्तीची रांग आहे.
नंदीच्या वरील बाजूचे छतावर शिल्पकलेचा अत्युत्तम अविष्कार दाखवत फुललेले
कमळ खोदण्यात आले आहे. गर्भगृहात शिवपिंडी असून अंतराळगृहातील खांबाची रचना
महालक्ष्मी मंदिराच्या खांबरचनेशी मिळती-जुळती आहे. मंदिराच्या प्रांगणात
एकमुखी दत्त मंदिर, राम-सीता मंदिर व मारुती मंदिर आहे. मारुती मंदिर 20
व्या शतकातील आहे. पण एकमुखी दत्त मंदिरातील मूर्ती मात्र प्राचीनत्व
दर्शवते. दत्तमंदिरासमोर एक छोटे शिवमंदिर असून याच्या आजुबाजूला अनेक
विरगळ असलेल्या शिल्पशिला आहेत. हे विरगळ अन्यत्र आढळणार्या विरगळाच्या
तुलनेत मोठे असून शिल्पकामही जास्त आहे. त्यामुळे या शिल्पशिला महत्वाच्या
योद्ध्यांच्या असाव्यात असा तर्क आहे.
कोल्हापूर येथील अतीप्राचीन श्री एकमुखी दत्तमुर्ती
कोल्हापूर शहरातील एकमुखी दत्त मंदिरातील दत्ताची मूर्ती १८ व्या शतकात बनवलेली असून नृसिंह सरस्वती महाराज, गाणगापूर; श्रीपाद वल्लभ महाराज आणि नंतर स्वामी समर्थ यांनी या मूर्तीची पूजा केली आहे. मूळ मूर्ती उत्तर भारतातील असून तिची प्रतिष्ठापना कुणी केली ? याची माहिती उपलब्ध नाही. पू. मौनी महाराजांनी (पाटगाव, जि. कोल्हापूर) मंदिराचा जीर्णोद्धार केला. शके १८८६ मध्ये श्री. पांडुरंग गोविंदराव भोसले आणि वर्ष १९९७-९८ मध्ये श्री. अमोल जाधव यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला.
मूर्तीचे वर्णन
पूर्ण मूर्ती महादेव लिंगाच्या आकारात एकाच पाषाणात असून ५ फूट (पूर्ण पुरुष) अशी रचना आहे. मूर्ती पश्चिमाभिमुख असून उजव्या बाजूच्या एका हातात जपमाळ, दुसर्या हातात कमंडलू, तिसर्या हातात डमरू आणि डाव्या बाजूच्या एका हातात त्रिशूळ, दुसर्या हातात शंख अन् तिसर्या हातात योगदंड आहे. मूर्तीच्या मस्तकावर शिवपिंडी आहे. मूर्ती दगडी चबुतर्यावर उभी आहे. मंदिराबाहेरच समोर नंदीसह महादेव मंदिर आहे.
गुरुपीठ आणि मंदिर पंचायतन
या परिवारास मंदिर पंचायतन असे संबोधले जाते. श्रीविष्णु मंदिर, नरसिंह मंदिर, ओंकारेश्वर मंदिर, विठ्ठल मंदिर, श्रीराम मंदिर. (एकमुखी) श्री दत्त मंदिर हे पूर्ण गुरुपीठ असून अवधूतस्वरूप आहे, असे मानले जाते. मंदिराच्या शेजारी दक्षिण बाजूस १ सहस्र वर्षापूर्वीचा पिंपळ वृक्ष आहे. या पिंपळ वृक्षामध्ये वड, उंबर आणि अन्य दोन वृक्ष एकाच बुंध्यातून आले आहेत. वटवृक्ष हा दत्तमंदिराकडे झुकला आहे, तर पिंपळ वृक्ष हा दक्षिणेकडील हनुमान मंदिरावर झुकला असून त्याला पारंब्या नाहीत. पिंपळाला औदुंबराप्रमाणे फळे येतात.
शिलालेख
दत्तमंदिरातील दत्तमूर्तीमागील खांबावर एक शिलालेख आहे. सध्या तो बुजवण्यात आला आहे. ओंकारेश्वर मंदिरात एक, श्रीराम मंदिराच्या पायरीवर एक, नरसिंह मंदिराच्या खाली भूमीत जोडलेले २ आणि विष्णु मंदिराच्या छतावर एक असे एकूण सहा शिलालेख या मंदिर पंचायतन परिसरात आहेत.
दत्तयागाच्या ठिकाणी खोदकामाच्या वेळी सापडलेले ७०० वर्षांपूर्वीचे यज्ञकुंड
१५.१२.२०१४ या दिवशी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास दत्त महाराजांनी स्वप्नात आदेश दिला, माझी धुनी शाश्वत करा! त्या वेळी त्याचा अर्थ समजला नव्हता. अभ्यास करून ज्या ठिकाणी १६.११.२०१४ ते ६.१२.२०१४ या काळात दत्तयाग यज्ञ केला होता, त्या ठिकाणी १७.१२.२०१४ या दिवशी सकाळी खोदण्यास प्रारंभ केला. खोदकाम करतांना त्याच दिवशी सकाळी ११.४५ वाजता यज्ञकुंड दिसून आले. खोदकाम अडीच फूट करावे लागले. खोदकाम जसजसे खाली जात होते, तसतशी उष्णता वाढत होती. त्यामुळे तेथे धुनी असावी, हे खरे आहे. हे यज्ञकुंड ७०० वर्षांपूर्वीचे असावे, असे वाटते. या ठिकाणी दुर्वासऋषींनी साधना केली असून तेव्हापासूनच तेथे धुनी आहे.
जैन स्वामी मठ
हा मठ शुक्रवार पेठेत असून गंगावेशपासून थोड्याच अंतरावर आहे. या प्राचीन मठाचे प्रवेशव्दार (नगारखाना) जुन्या राजवाड्याच्या नगारखान्यासारखाच असून अतिभव्य व आकर्षक राजवाड्याच्या नगारखान्यासारखा असून अतिभव्य व आकर्षक आहे. या नगारखान्याच्या मोठ्या खांबावर आधारित मनोरे आहेत. नगारखान्याची मुख्य कमान भव्य व सुंदर नगारखान्यास शोभेल अशीच आहे. हा नगारखाना सुमारे ९० वर्षापूर्वी मठाधिपती लक्ष्मीसेन महाराज यांनी बांधला. संपूर्ण काळया पत्थरात बांधलेला हा नगारखाना ६५ फूट उंचीचा आहे.
मठाच्या मध्यभागी मोकळी जागा असून सभोवताली
नगारखान्याला जोडणाऱ्या इमारती आहेत. या इमारतींचा व नगारखान्याचा मठ
म्हणून वापर केला जातो.
या मठात अलिकडे काही वर्षापूर्वी सुमारे २० ते
२२ फूट उंचीची भगवान पार्श्वनाथ यांची संगमरवरी भव्य अशी मूर्ती स्थापन
केलेली असून ही मूर्ती तितकीच सुंदर व आकर्षक आहे.

लक्ष्मीसेन मठाला दोन हजार वर्षाचा इतिहास
जैन संस्कृतीचा मानबिंदू असलेल्या ऐतिहासिक लक्ष्मीसेन मठाने दोन हजार वर्षाची परंपरा जोपासली आहे. शुक्रवार पेठेतील लक्ष्मीसेन महास्वामींच्या मठातील आदिनाथ तीर्थकरांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा सुवर्णमहोत्सव वर्षभर विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. अशा मठाला दोन हजार वर्षाची गौरवशाली परंपरा लाभली आहे.
दोन हजार वषार्र्पूर्वीचे गौरवशाली प्रवेशद्वार ऐतिहासिक वास्तुशिल्पाचा सुंदर आविष्कार आहे. जोतिबा डोंगर भागातील पाषाणांचा वापर या प्रवेशद्वारासाठी करण्यात आला आहे. भवानी मंडप प्रवेशद्वाराशी साधम्र्य असलेल्या या प्रवेशद्वाराच्या आत दोन्ही बाजूंना नगारखाने आहेत. येथे हत्तींचे वास्तव्य असताना हत्तींचे मंगलमय स्वागत करून सलामी देण्यासाठी नगारे वाजवले जात होते. लक्ष्मीसेन मठाच्या मध्यभागी असणारा श्री चंद्रप्रभ तीर्थकरांचा मानस्तंभ कलेचा सुंदर नमुना आहे. या मानस्तंभाची अखंड 41 फुटांतील मूर्तीची उभी रचना करण्यात आली आहे. या दगडास आकार देण्याचे काम केसापूर पेठेचे मुस्लिम कारागीर याकूब मुल्ला यांनी केले आहे. या मानस्तंभाच्या चारी बाजूंना चतुमरुख मूलनायक श्री चंद्रप्रभ तीर्थकारांच्या मूर्ती विराजमान आहेत. आचार्य विद्यानंद महाराज यांच्या पावन उपस्थितीत या मानस्तंभाची 1983 मध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली. श्री चंद्रप्रभ दिगंबर जिनमठातील चंद्रप्रभ तीर्थकरांची तीन फुटी बैठी मूर्ती डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे. तसेच भगवान 1008 श्री आदिनाथ तीर्थकर यांची मठामधील 28 फुटी मूर्ती अखंड अमृतशिलापासून तयार करण्यात आली असून, मूर्ती बनवण्यासाठी लागणारा अमृतशिला 1958 मध्ये राजस्थान येथून आणण्यात आला होती. मूर्ती रेल्वेने कोल्हापुरात आणण्यात आली. मठात आणण्यासाठी खास लाकडी गाडा तयार करण्यात आला होता. या मूर्तीची स्थापना 1962 मध्ये लक्ष्मीसेन जैन मठात करण्यात आली.
अनेक दानशूर, जैन श्रवक यांच्या देणगीतून येथे प्रशस्त जैन भवन बांधण्यात आले आहे. येथे अनेक चांगले उपक्रम राबविण्यात येतात. येथे बाहेरगावाहून येणार्या जैन श्रवक-श्रविकांची राहण्याची सोय केली जाते. मठाच्या जुन्या इमारतीत स्वामीजींचे निवास्थान असून येथे धर्म आज्ञा दिल्या जातात. अकबर राजाच्या राज्यकारभारात मठात दिगंबर अवस्थाधारण साधूंची मठ संस्थान म्हणून नियुक्ती करण्यात आली होती; मात्र धर्मप्रसारासाठी करावा लागणारा प्रवास त्यांना शक्य नसल्याने भगवे वस्त्र परिधान केलेल्या श्री लक्ष्मीसेन महास्वामींची मठाधिपती म्हणून नियुक्ती करण्यात आली.
त्र्यंबोली अथवा टेंबलाई
शहराच्या पूर्वेला एका छोट्या टेकडीवर काही देवळांचा
समूह आहे. तिथेच त्र्यंबोलीचे मंदीर आहे. या टेकडालाही टेंबलाई नावानेच
ओळखले जाते. त्र्यंबोली किंवा टेंबलाई ही अंबाबाईची (श्री. महालक्ष्मी)
बहीण मानली जाते. त्र्यंबोली ही अंबाबाईशी भांडण झाल्यामुळे शहराबाहेरील
टेकडीवर जाऊन राहिली अशी समजूत आहे. त्याचप्रमाणे वर्षातून एकदा अंबाबाई ही
त्र्यंबोलीची समजूत काढण्याकरिता जात असते. त्या दिवशी(अश्विन शुक्ल
पंचमी, ललिता पंचमी - स्थानिक शब्द - कवाळ पंचमी) या घटनेचे प्रतीक म्हणून
यात्रा भरविली जाते. अंबाबाईची प्रतिमा पालखीतून मिरवणुकीने गाजत वाजत नेली
जाते. या मिरवणुकीत राजघराण्यातील व्यक्ती, अमीर उमराव, सरदार, मानकरी
इत्यादी लोक भाग घेत असत. ही मिरवणूक खास बघण्यासारखी असे. इतर लवाजम्यात
हत्ती, घोडे, वाघ, उंट इत्यादी प्राणी मोठ्या थाटात नेत असतात. त्यावेळी
म्हैसूरच्या दसऱ्याची आठवण निघत असे. सध्या काहीही पहावयास मिळत नाही.
नाममात्र छोटीशी मिरवणूक नेली जाते.

महालक्ष्मी मंदिरापासून काही अंतरावर ताराबाई रस्त्यावर असलेल्या पार्किगच्या जागेजवळ हा कोल्हापुरातील प्रसिद्ध दर्गा आहे. या दग्र्याचे बांधकाम कोल्हापुरात जेंव्हा प्रथम मुस्लीम आले त्या काळात झाल्याचा अंदाज आहे. हा दर्गा शहरातील सर्व हिंदू मुस्लीम समाजाचे श्रद्धास्थान आहे. मोठय़ा संख्येने मुस्लिमांबरोबरच हिंदू लोकही श्रद्धेने या दग्र्याच्या दर्शनासाठी येतात. मोहरम सणामध्ये येथील पीर व पंजे हे एक मोठे आकर्षण असते.
दग्र्यामध्ये जाण्यासाठी एक मोठे प्रवेशद्वार असून त्याचा वरील भाग काढून टाकण्यात आलेला आहे. दग्र्यासभोवती असलेल्या मोकळ्य़ा जागेत छोटय़ा छोटय़ा इमारती आहेत. येथे पूर्वी एखादे हिंदू मंदिरही असावे. मुख्य दर्गा मध्यभागी असून हा नेहमीच्या मुस्लीम पद्धतीचा आहे. मध्यभागी मोठा घुमट असून चारही बाजूला लहान घुमट आहेत. या दग्र्यास मुस्लीम रूढीप्रमाणे संपूर्ण पांढरा रंग देण्यात आला आहे. या दग्र्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे या दग्र्याच्या चौकटीवर कोरण्यात आलेली गणपतीची मूर्ती होय. या दग्र्याचा उरूस मोठय़ा उत्साहात साजरा होतो.
शिवाजी विद्यापीठ
महाराष्ट्राच्या संस्कृतीचे बोलके व्यासपीठ म्हणजे, कोल्हापूर! १९६३ या
सालात दिवंगत माननीय श्री. यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांनी
शिवाजी विद्यापीठ स्थापन करण्यामधे पुढाकार घेतला. हया विद्यापीठाच्या
सीमांतर्गत, सांगली, सातारा आणि सोलापूर यांचा समावेश होतो. 
१००० एकराच्या प्रशस्त वास्तुचे हे विद्यापीठ म्हणजे, महाराष्ट्राच्या शैक्षणिक आघाडीवरील एक लक्षणीय घोडदौड आहे. प्रमुख कार्यालयाच्या बरोबरीने बॅ. कर्देकर ग्रंथालय, मानव्यशाखा इमारत, जीवशास्त्र इमारत, सांस्कृतिक सभागृह तसेच महिला व पुरूष विद्यार्थ्यांकरिता हॉस्टेल हे सारे दिमाखदारपणे उभे आहे. पदवीदान समारंभाकरिता एक खास सभागृह आहे.
मुख्य इमारतीसमोर छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा हे नयनरम्य दृष्य होय. नानाविध झाडे, वेली, फुले, फळझाडे यांनी विद्यापीठाचे आवार हिरवेगार आहे. एस्. एस्. सी. परिक्षेसाठी दरवर्षी १,२५,००० विद्यार्थी इथे दाखल होतात. हया परिक्षा सुकर होण्यासाठी, लेखा विभाग, स्टोर कंट्रोल आणि निधी विभाग हे व्यवस्थापनातील भाग कार्यरत असतात. कुलपती, कुलगुरू, विद्यार्थी प्रतिनिधी, शासकीय प्रतिनिधी इ. हया व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवतात.
वि. स. खांडेकर कलादालन
ज्ञानपीठ पुरस्कारविजेते पहिले मराठी लेखक व थोर साहित्यीक श्री. वि. स. खांडेकर यांची स्मृती जपणारे एक भव्य कलादालन आपण आवर्जून पहावे असेच आहे.
कोल्हापुर जिल्हयाचे पर्यटन :-
उत्तर विभागः-
वारणा नदीने सांगली आणि कोल्हापुर जिल्ह्याची सीमारेषा आखली आहे.सहाजिकच उत्तरेकडे फार कमी परिसर येतो. यामध्ये समर्थस्थापित दोन मारुती तसेच रामलिंग डोंगर आणि नवीनच आकर्षण असलेला चिन्मय गणेश हे आहेतच शिवाय मन रिझवायला या परिसरात दोन वॉटर स्पोर्टसचा आनंद देणारे रिसॉर्ट देखील आहेत.ड्रिम वर्ल्ड वॉटर पार्क :-
ड्रिम
वर्ल्ड वॉटर पार्क हे २००० साली कोल्हापुरात कसबा बावड्याच्या परिसरात
सुरु झाले.सध्या हे रिसॉर्ट शेट्टी-नायडू ग्रुप चालवितो. कसबा बावड्याच्या
मेन रोडवर डि.एस.पी. ऑफीसजवळ हे रिसॉर्ट आहे. कोल्हापुरातील एतिहासिक आणि
धार्मिक ठिकाणांना भेट देउन झाली की धमाल करण्यासाठी हे ठिकाण उत्तम
आहे.तसेच कुटूंबीय आणि मित्रमंडळी यांच्यासोबत आउटींगसाठी देखील हा एक
उत्तम पर्याय आहे. ईथे फॅमिली राईड, स्पीड राईड,ड्रॅगॉन राईड, ट्युब राईड
आणि हॉर्स राईड असे पर्याय आहेत. लहान मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळे खेळ
आहेत. याशिवाय पाण्यात निवांत पहुडण्यासाठी जलतरण तलाव आहे. शिवाय
मस्तीच्या मुडमध्ये धमाल करायला रेन डान्स देखील आहे.
ईतके झाल्यावर भुक तर लागणारच. त्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. वॉटर
पार्कमध्येच जंगल ढाबा आहे.त्यात
चायनिज्,पंजाबी,महाराष्ट्रीयन्,दाक्षिणात्य अश्या सर्व तर्हेचे जेवण
मिळते.
पत्ता :- मेन रोड, एस.पी. ऑफिसजवळ, कसबा बावडा, कोल्हापुर, ४१६००३
भेट देण्याचा उत्तम कालावधी:- ऑक्टोबर ते मे
वेळः- सकाळी १० ते रात्री १०
दरपत्रकः-
650 per person Adult (Full day Package)
600 per person 8-12 years (Full day Package)
530 per person 4-8 years (Full day Package)
590 per person Adult (Morning Package)
540 per person 8-12 years (Morning Package)
470 per person 4-8 years (Morning Package)
590 per person Adult (Afternoon Package)
540 per person 8-12 years (Afternoon Package)
470 per person 4-8 years (Afternoon Package)
700 per person Adult (Evening Package -1 Time 02:00 Pm to 09:00 PM)
640 per person 8-12 Years (Evening Package -1 Time 02:00 Pm to 09:00 PM)
580 per person 4-8 Years (Evening Package -1 Time 02:00 Pm to 09:00 PM)
550 per person Adult (Evening Package -2 Time 04:00 Pm to 09:00 PM)
500 per person 8-12 Years (Evening Package -2 Time 04:00 Pm to 09:00 PM)
430 per person 4-8 Years (Evening Package -2 Time 04:00 Pm to 09:00 PM)
संपर्क क्रमांकः- 07947249425
वेबसाईटः- www.dreamworldkolhapur.co..
गंधर्व फार्म अँड रिसॉर्ट
गंधर्व फार्म अँड रिसॉर्ट हे १९९८ ला सुरु झाले. या ठिकाणी अम्युझमेंट पार्क्,कॉन्फरन्स हॉल ( २०० व्यक्तींसाठी )पार्टी लॉन आणि ५० व्यक्तींसाठी छोटा कॉन्फरन्स हॉल आहे.
टेलीफोन-( 0230) 2465005, 2465143
मोबाइल- 8605009725 / 26 / 27 / 28
इ-मेल- contact@gandharvresort.com
वेबसाईट- http://www.gandharvresort.com
चिन्मय गणाधिश टोप -संभापूर कोल्हापूर
कोल्हापूरला जाताना टोप गावाजवळ एक प्रचंड गणेशमूर्ती दिसते .
पुण्याहून
कोल्हापूरला जाताना टोप गावाजवळ हायवेपासून अंदाजे दिड किमी वर हा गणपती
आहे हायवेवरून तो दिसतोच. येथे पार्किंगची उत्तम सोय आहे. साधारण पन्नास
पायर्या
चढून जावे लागते परंतू बरोबर वयस्क किंवा अपंग असतील तर वरपर्यंत गाडी
नेता येते.चिन्मय मिशनने इथला परिसर अतिशय स्वच्छ ठेवला आहे.
साधारण
८०० टन वजनाची ही मूर्ती ६१ फूट उंच आहे आणि २५ फूट उंचिच्या "ध्याननिलयम"
सह जवळ जवळ ८५ फूट उंच आहे एवढा प्रचंड आकार असूनसुद्धा मूर्ती अतिशय सुबक
आहे. चिन्मय मिशनने कर्नाटकातून ५० कारागीरांकडून १८ महीन्यात ही मूर्ती
बनवून घेतली आहे.
मूर्ती डाव्या सोंडेची आहे पुढचा उजवा हात वरदहस्त आहे
.मागील उजव्या हातात अंकुश, मागील डाव्या हातात पाश व पुढील डाव्या हातात
मोदक आहे.
................संजय जोशी ब्लॉग स्पॉट
कामाख्या करवीरची !

कोल्हापूर च्या भोवतीने आदिशक्तीच्या ५१ शक्तीपीठाची प्रतिस्थाने आहेत असा केवळ अर्ध्या ओळीचा उल्लेख करवीर माहात्म्य ग्रंथात आहे हा वाचून २००५-१० साली मी आणि उमाकांत राणिंगा या शक्तीपीठांच्या शोधात निघालो (अजूनही केवळ ३५ च सापडली) काही देवींची नावे मूळ स्थानाशी जुळतात काहींची कथा काहींच्या मूर्ती ( अनेक निकष आहेत सगळे च सांगणं शक्य नाही) तर अशाच शोधात आम्ही पोचलो कसबा बीड पासून पुढे असलेल्या आरळे गावात. त्यावेळी गावात एक जुनं दगडी मंदिर होतं समोर बांधलेला मंडप अर्थात गावची अंगणवाडी. स्थानिक लोकांना देवीचं नाव विचारलं एकानं सांगितलं महालक्ष्मी म्हणतात पोरं पण आम्ही अंबाबाई च म्हणतो. तोवर एक आजी मध्ये च म्हणाल्या खरं नाव तिचं # *कामाबाई* आहे. हे नाव ऐकल्यावर आमचे कान हलले. अधिक शोध घेता देवीच्या मंडपात अनेक जुन्या घडणीच्या घंटा टांगल्या होत्या त्यावर नाव वाचलं ते होतं *कामाक्षी देवीस अर्पण* मनातल गृहितक तेव्हा नक्की झालं जेव्हा एक जीर्ण योनीपीठ मंदिराबाहेर दिसून आलं आजही ग्रामस्थ वैशाख अमावस्येला त्यापुढे भावई चा दिवा लावतात. आज गाभाऱ्यात खड्ग डमरू त्रिशूळ पानपात्र धारीणी चतुर्भुज मूर्ती विराजमान आहे. योनीपीठावर छोटी देवळी उभी केली आहे. आसाम ला जाऊन कामाख्या देवीच दर्शन कधी घडेल तेव्हा घडेल पण तोवर या करवीर कामाख्येच दर्शन घेऊया सोबत जोडलेली छायाचित्रे डॉ. निवास वरपे पत्रकार यांनी टिपली आहेत.

मनपाडळे आणि पारगाव ही दोन्ही गावे कोल्हापूर जिल्ह्य़ात पन्हाळगड-ज्योतिबाच्या परिसरात आहेत. पन्हाळगड म्हणजे जणू दक्खनचा दरवाजाच होता. विजापूरच्या आदिलशाहीवर वचक ठेवण्यासाठी पन्हाळा हे शिवकाळात अगदी मोक्याचे ठिकाण होते. या परिसराचे राजकीय महत्त्व लक्षात घेऊनच की काय समर्थानी या ठिकाणी ही दोन शक्तिकेंद्रे निर्माण केली असावीत असे दिसते. कोल्हापूर ते वडगाव वाठार हे अंतर २२ कि.मी. आहे. तर वडगाव वाठारवरून पुढे अंबपमार्गे मनपाडळे हे अंतर १४ कि.मी. आहे. ११ मारुतींपैकी सर्वात दक्षिणेकडे असलेल्या या मारुतीची स्थापना समर्थानी शके १५७७/इ.स.१६५२ मध्ये केली. अंदाजे पाच फूट उंचीची साधी सुबक अशी मारुतीची मूर्ती आणि मंदिर दोन्हीही उत्तराभिमुख आहेत. मूर्तीजवळ दीड फूट उंचीची कुबडी ठेवलेली दिसते. आसपास झाडी असलेल्या ओढय़ाकाठी एक सुंदर कौलारू मंदिर आहे. सात फूट औरसचौरस गाभारा असलेल्या या मंदिराचा नवीन बांधकाम केलेला सभामंडप चांगला मोठा आहे.
वारणेच्या खोऱ्यात असलेल्या मनपाडळे गावाच्या जवळच पाडळी नावाचे एक गाव आहे. इथेही एक मारुतीची मूर्ती आहे. कोल्हापूरपासून जेमतेम २० कि.मी.वर ज्योतिबाच्या ऐन पायथ्याशी मनपाडळे हे गाव वसलेले आहे. इथून जवळच सात कि.मी.वर असलेल्या पारगावला अजून एक समर्थ स्थापित मारुती आहे.
पारगावचा मारुती

यालाच बालमारुती किंवा समर्थाच्या झोळीतील मारुती असे म्हटले जाते. कराड-कोल्हापूर रस्त्यावर वाठार गाव आहे. इथून वारणा साखर कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवे पारगाव आहे. त्याच्या उत्तरेला जुने पारगाव आहे. या जुन्या पारगावात हे मारुती मंदिर आहे. शके १५७४ म्हणजे इ.स. १६५३ साली स्थापना केलेला हा मारुती, ११ मारुतींपैकी सर्वात शेवटी स्थापलेला आणि सर्वात लहान मूर्ती असलेला आहे. इथली मूर्ती सपाट दगडावर कोरलेली जेमतेम दीड फूट उंचीची आहे. यावर शेंदूर नाही. मारुतीच्या केसाची शेंडी बांधलेली दिसते. मारुतीराया जणू डावीकडे धावत निघाल्याच्या आविर्भावात ही मूर्ती कोरलेली आहे. आठ फूट लांबी-रुंदीचा मूळ गाभारा. १९७२ मध्ये इथे ४० फूट लांब आणि १६ फूट रुंदीचा सभामंडप बांधला. मनपाडळे ते पारगाव हे अंतर फक्त पाच कि.मी. पण सरळ रस्ता नाहीये. वळसा घेऊन इथे यावे लागते.
रामलिंग परिसर
कोल्हापूर जिल्ह्यातील धुळेश्वर व रामलिंग ही प्राचीन धार्मिक स्थळे प्रसिध्द आहेत. भाविकांचे श्रध्दास्थान असलेली ही स्थळे हल्ली पर्यटकांचीही आकर्षणे बनली आहेत. या रमणीय परिसराची माहिती . . .
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील आळते गावाजवळ धुळेश्वर व रामलिंग ही प्राचीन काळातील प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. हजारो वर्षापूर्वीची धार्मिक पार्श्वभूमी असलेली ही दोन्ही ठिकाणे आज पर्यटकांचे व भाविकांचे आकर्षण स्थळे म्हणून विकसित होत आहेत. धुळेश्वर, आलमप्रभू व रामलिगं ही तीन ठिकाणे जवळजवळ असल्याने खूप दूरवरून येणाऱ्या पर्यटकांना एकावेळी तीन पुरातन क्षेत्रे पाहण्याची संधी मिळते.
श्रावणसरी
अंगावर झेलत रामलिंगचा निसर्गरम्य परिसर पाहण्याची मजा काही वेगळीच आहे.
हा परिसर घनदाट वनराईने नटलेला आहे. निरव शांतता भेदत येणारा मोरांचा आवाज
पर्यटकांवर मोहिनी घालतो. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी येथे
शिवभक्तांची गर्दी असते. मात्र रामलिंग परिसरातील निसर्गाची अनुभूती
घ्यायची असेल तर श्रावणातला एखादा वीकेंड बेस्ट.
हातकणंगले
तालु्क्यात आळते येथे डोंगराच्या कुशीत रामलिंग देवस्थान वसलेलं आहे.
नागमोडी रस्त्यावरून रामलिंगकडे जाताना दुतर्फा असणाऱ्या वनराईमुळे
पर्यटकांना आनंद मिळतो. रामलिंग येथे अत्यंत प्राचीन गुहा मंदिर आहे.
मंदिरासमोरील सभामंडपात सर्वप्रथम विठ्ठल-रखुमाईची मूर्ती दिसते. याचबरोबर
गेली १०७ वर्षे अखंडपणे सुरू असणारे धुनी अग्नीकुंड येथे पहायला मिळते.
हेमाडपंथी सभामंडपात प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम गुहा मंदिरातील
विघ्नहर्त्या श्री गणरायाच्या मूर्तीचे दर्शन होते. विरभद्र, श्रीगणेश,
काळभैरव, पार्वतीमाता मूर्तींच्या दर्शनानंतर शिवलिंगाचे दर्शन होते. गुहा
मंदिरात वर्षभर ठिकठिकाणी झरे वाहतात. त्यामुळे येथे दर्शनासाठी गेल्यानंतर
वेगळी अनुभूती येते.
रामलिंग मंदिराच्या परिसरात कश्यप, अत्र,
भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वशिष्ठ या सप्तऋषींच्या नावाने
मंदिरे आहेत. तर मंदिरालगत भव्य पाण्याची टाकी व झरे आहेत. मंदिराबाहेर
अत्यंत प्राचीन मूर्तीही आढळतात. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवासात
असताना या ठिकाणी वास्तव्य केले तसेच शिवलिंगाची स्थापना केली अशी
आख्यायिका आहे पूजेसाठी त्यांनी बाण मारून गंगा, यमुना, सरस्वती या
त्रिवेणी धारा सुरू केल्याची अख्यायिकाही सांगितली जाते.
रामलिंगपासून २ किलोमीटर अंतरावर डोंगर माथ्यावर अलमप्रभूगिरी हे देवस्थान
आहे. घनदाट वनराईतून येथे वाहनासह जाता येते. ट्रेकिंगचा अनुभव घ्यायचा
असेल तर दाट झाडीतून पायवाटेने ‘शॉर्टकट’ आहे. याठिकाणी गेली साडेआठशे
वर्षे अखंडपणे तेवत असणारी ज्योत पहायला मिळते. रामलिंग मंदिरापासून जवळच
धुळोबा मंदिर तसेच जैन धर्मीयांचे कुंथूगिरी हे देवस्थान आहे.
बाहेर
कितीही उन्हाळा असो येथील गुहेत सतत पाणी पाझरत असतं आणि त्या पाण्याचा
गुहेतील शिवलिंगावर अभिषेक होत असतो. हातकणंगले बसस्थानकापासून उत्तरेला
जाणारा रस्ता म्हणजे कुंभोजगिरीसारख्या जैन तीर्थस्थानाकडे जाणारा रस्ता.
कुंभोजगिरी या तीर्थस्थानाला बाहुबली म्हणूनही ओळखतात. या ठिकाणी नव्याने
तीर्थस्थळही विकसित करण्यात आलं आहे. देवस्थानातील बारा महिने चोवीस तास
अखंड शिवलिंग हे १०८ पैकी एक आहे. ही भूमी दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते.
तेथे सप्तऋषी आहेत व कार्तिक स्वामींची मूर्तीही आहे. लोकांच्या सोयीकरिता
नवीन धर्मशाळा, राऊळे, देवळांच्या बाजूने प्रदक्षिणेच्या पाऱ्या व फरशी
दरवाजे समोरील पहार मूर्तीच्या स्थापना, पाण्याकरिता विहीर दुधाच्या
सोयीकरिता गो-शाळा आदी बाबी केल्या आहेत.
धुळेश्वराचे मंदीर
सुमारे पाच हजार वर्षापूर्वीचे आहे असे मानले जाते. पूर्वी या गावाचे नाव
ईश्वर होते. त्यावरून या गावाला धुळेश्वर असे संबोधले जाऊ लागले.
धुळेश्वराचे मूळ स्थान उज्जैनजवळ महांकाळेश्वर येथे आहे. धुळेश्वराचा परिसर
हा एकूण चाळीस एकरांचा आहे. धुळेश्वराच्या खालच्या बाजूस म्हसोबाचे मंदीर
असून तो धुळेश्वराचा राखणदार समजला जातो. चैत्र शुध्द पौर्णिमेनंतर तिसऱ्या
दिवशी अनुराधा नक्षत्रावर या ठिकाणी यात्रा असते. विजयादशमीच्या
कालावधीतही येथे मोठी यात्रा भरते. हातकणंगल्यापासून धुळेश्वरापर्यंत वाहन
रस्त्याची सोय आहे. मंदिराच्या परिसरात पाणीपुरवठ्यासाठी दोन विहिरी व दोन
कूपनलिका आहेत. मंदिराच्या शिखरानजीक बारमाही जिवंत पाण्याचा झरा आहे. जवळच
मल्लेया मंदीर आहे. दर अमावस्येला पालखीची प्रदक्षिणा मिरवणूक निघते.
मंदिरासमोर एक मोठा नगारखानाही आहे. रविवारी व गुरूवारी भाविकांची येथे
मोठी गर्दी होत असते.
कसे जाल?
सांगली-कोल्हापूर
रस्त्यावरील हातकणंगले पासून रामलिंग ६ किलोमीटर अंतरावर आहे. कोल्हापूरहून
आल्यास हातकणंगलेत जाण्यापूर्वी १ किलोमीटर अलीकडे डाव्याबाजूस रामलिंग
फाटा लागतो. स्वत:चे वाहन असेल तर मनसोक्त भटकंतीचा आनंद आपल्याला घेता
येतो.
काय पाहाल?
रामलिंग, अलमप्रभू, धुळेश्वर मंदिर, कुंथूगिरी
काय काळजी घ्याल?
रामलिंग
परिसरात जाताना जेवणाचा डबा अन् पिण्याचे पाणी सोबत घ्या. अंगावर किमती
दागिने घालणे टाळा. मोठी रक्कम शक्यतो सोबत घेऊ नका. परिसरातील शांततेचा
भंग न केल्यास मोरांनी घातलेली साद कानावर येईल.
पश्चिम भागः
पन्हाळा किल्ला (पन्हाळगड)
सन १६६०मध्ये सिद्दी जौहरने बरेच दिवस या किल्ल्याला वेढा घालून ठेवला होता. छत्रपती शिवाजी महाराज तेथून निसटल्यावर तो त्याच्या ताब्यात आला. १६७३मध्ये कोंडाजी फर्जंदबरोबर सैन्य पाठवून भेदनीतीचा उपयोग करून छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला परत ताब्यात घेतला. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर हा किल्ला औरंगजेबाकडे आला. सन १६९२मध्ये विशाळगडाचे काशी रंगनाथ सरपोतदार यांनी पन्हाळा परत घेतला. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर १७०१मध्ये याचा ताबा औरंगजेबाकडे गेला. या वेळी औरंगजेब पन्हाळ्यावर स्वतः उपस्थित होता.
त्या वेळी २८ एप्रिल रोजी इंग्रजांचा वकील सर विल्यम नॉरीस याने औरंगजेबाची गाठ घेतली. तेव्हा त्यांच्यात अत्यंत गुप्त वाटाघाटी झाल्या होत्या; पण त्यातून काही निष्पन्न झाले नाही. काही दिवसांतच रामचंद्रपंत अमात्य यांनी धनाजी व संताजी यांच्या साह्याने हा किल्ला पुन्हा छत्रपती ताराराणी बाईसाहेबांकडे आणला. १७०७ पासून कोल्हापूर संस्थानची राजवट येथून सुरू झाली. सन १७८२मध्ये राजधानी पन्हाळ्यावरून कोल्हापूरला हलविण्यात आली.
थंड हवेचे ठिकाण असणारा हा किल्ला निसर्गनिर्मित आहे. चार दरवाजामार्गे कोल्हापूर बाजूने शहरातून वाहनाने थेट किल्ल्यावर जाता येते. वारणानगर मार्गही याच रस्त्याला येऊन मिळतो. तीन दरवाजामार्गे गडावर जाण्यासाठीचा दुसरा मार्ग तीन दरवाजातून जातो. हा दरवाजा तीन मजली असून याचे बांधकाम शिसे ओतून केलेले आहे.
किल्ल्यावर खालील प्रमाणे प्रेक्षणीय स्थळे आहेत.
रामचंद्रपंत अमात्य यांची समाधी : सोमेश्वर तलावापासून थोडे पुढे गेल्यावर दोन समाध्या दिसतात. त्यातील उजवीकडची समाधी रामचंद्रपंत अमात्यांची व बाजूची त्यांच्या पत्नीची आहे.
रेडे महाल : समाधीच्या बाजूला एक आडवी इमारत दिसते. त्यास रेडे महाल म्हणतात. वस्तुतः ही घोड्यांची पागा होती; मात्र त्यात नंतर जनावरे बांधत. म्हणून त्याला रेडे महाल म्हणत.
महालक्ष्मी मंदिर : राजवाड्याजवळील नेहरू उद्यानाच्या खालच्या बाजूस महालक्ष्मी मंदिर आहे. हे गडावरील सर्वांत प्राचीन मंदिर आहे. ते साधारण १००० वर्षांपूर्वीचे असावे, असे त्याच्या बांधणीवरून वाटते. राजा गंडारित्य भोज याचे हे कुलदैवत होय.
संभाजी मंदिर : ही एक छोटी गढी असून, येथे संभाजी मंदिर आहे.
At Post Budhawar Peth, Panhala Road, Panhala - 416201, Near Narke School
मोबाईलः- ९५४५१३३३३३, ८८८८८४६४३८
२ ) रेनबो रिसॉर्ट
Plot No.13, Vaghbil Panhala Road, Panhala - 416201, Panhala
मोबाईलः- ७६२०६४४४३४, ८३७९९८२६२६
३ ) लोटस रेसिडेन्सी
Ambarkhana Road, Panhala - 416201, Near Mahalaxmi Temple
मोबाईलः ७९४७३१७९६१
Panhala H O, Panhala - 416201, Backside Baji Prabhu Statue Near Teen Darwaja
मोबाईल- २३२८२३५०५४, २३२८२३५३५४
५ ) व्हॅली व्ह्यु ग्रँड
Panhala H O, Panhala - 416201, Near Tabak Baug
मोबाईल- २३२८२३५३२५, २३२८२३५३२९
६ ) हॉटेल सप्तरंग रेसिडेन्सी
Panhala Road, Pimple T Satave, Panhala - 416201, Bambarwadi
मोबाईल:- ७३८७८७४०३३
७ ) Serenity Resort Panhala,
356 Budhawar Peth Panhala, Panhala H O, Panhala - 416201, Budhawar Peth Panhala
मोबाईल -९१५८१०२३३४, ९६८९९७९१५६
Near St Stand, Panhala H O, Panhala - 416201
मोबाईल- ९७६४२२२०१५, ९१५८९७९६४१
९ ) हॉटेल टर्निंग पॉईंट डिलक्स
९९५३३५०१४५, ७२१०१३३६००
१० ) राधानंद हॉटेल
600/A/4 Bhosale Galli, Panhala Fort, Panhala, Kolhapur, Panhala - 416201, Near MTDC RESORT
मोबाईल- २३२८२३५४४४, ९८६०७७२००६, ९८५०९७२००६
११ ) हॉटेल डायमंड व्हिला
G S No 473 Plot No 3 & 4, Pimple T Satave, Panhala - 416201, Behind Jain Temple Bambarwadi
मोबाईल- (०२३२८)२६३३५१, ९५११११६२०६, ९८२२२७७७३६
Panhala H O, Panhala - 416201, Opposite Shivtirtha Talav
मोबाईल- ९७६४२२२०१५, ९०४९०८०२७०
१३ ) महालक्ष्मी रिसॉर्ट
मोबाईल- ९४२२०४६६०९
१४ ) महाराजा होम स्टे
मोबाईल-८४५९५७१४५०
१५ ) आर.जे. फार्म
Danewadi, Panhala - 416201
मोबाइल- ९८९०६१८३००
१६) पन्हाळा फोर्ट रिसॉर्ट
Panhala H O, Panhala - 416201, Behind Nagar Palika Office
मोबाइल-
१७ ) राजधानी हॉटेल
Panhala Fort, Panhala - 416201
मोबाईल- ९७६६६७५३३३, ९९७५०१००८४
१८ ) हॉटेल शिवतेज
Gat No 358/3, Panhala Ghat, Panhala Fort, Vaghbil, Karveer Kolhapur, Panhala - 416201, Near Pazar Talav
मोबाईल- ९९७५९५६६७५
Panhala Fort, Panhala - 416201, Near Bus Stand
मोबाइल- ८४११९९२७४६
२०) हॉटेल नंदन लॉजिंग
Near S T Stand, Panhala H O, Panhala - 416201, Behind Someshwar Lake
मोबाइल- ९९७५२३२४१९, ९७६७३२३९८०
२१) ओम साई फन गेम्स
Panhala, Panhala Fort, Main Road, Panhala - 416201
मोबाइल- ७७४१८४०४९४
व्हर्टीकल अॅडव्हेंचर पार्क :-






SilverRs. 800





GoldRs. 1300Rs. 1100





PlatinumRs. 1500Rs. 1300






ज्योतिबा :-
स्थान माहात्म्य व पूर्वपीठिका :
![]() |
| जोतिबा मूर्ती |
श्री जोतिबा अथवा केदारेश्वर हे बद्रिकेदारचेचे रूप आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नी या सर्वाचा मिळून एक तेज:पुंज अवतार म्हणजेच जोतिबा किंवा केदारनाथ ! जोतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली असून ज्योत म्हणजे तेज, प्रकाश ! वायू, तेज, आप (पाणी) आकाश व पृथ्वी या पंचमहाभूतांपैकी तेजाचे शक्तीदैवत म्हणजेच वाडी रत्नगिरीचा जोतिबा !
पौगंड ऋषींच्या वंशाला दिवा नव्हता. त्यानी तपश्चर्या करून बद्रिनाथांना संतुष्ट केले. बद्रिनाथांनी पौगंड ऋषी व त्यांची पत्नी विमलांबुजा यांच्या पोटी जन्माला येण्याचे वचन दिले. त्याप्रमाणे चैत्र शुध्द षष्ठीच्या मुहूर्तावर स्वत: आठ वर्षाची बालमूर्ती होऊन बद्रिनाथ हे ऋषी दांपत्यासमोर अवतरले ही बालमूर्ती बद्रिनाथांची प्राणज्योती ! म्हणून त्यांचे नाव जोतिबा असे ठेवले. आपला पुत्र हा जगाचा तारणकर्ता व गरिबांचा कैवारी असावा अशी विमलांबुजाची तीव्र इच्छा होती, त्याप्रमाणे तिच्या आंजळीत केदारनाथांची प्राणज्योत प्रकट झाली, तेच जोतिबाचे रूप होय. श्री जोतिबाला गुलाल, दवणा, खोबरे व खारका प्रिय ! त्याच्या दवण्याला गंध हा सत्व, रज, तम गुणयुक्त आहे.ज्योतिबा हे दैवत शिव व सूर्याचे रूप मानण्यात येते
कथा
ज्योतिबासंदर्भात एक कथा आहे. प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्यांनी हाहाकार माजवला होता. येथील जनता त्यांच्या छळाला कंटाळून गेली होती. कोल्हापूरच्या अंबाबाईलाही या दैत्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. या राक्षसांच्या छळापासून लोकांची मुक्तता करण्याकरिता अंबाबाईने तपश्चर्या करून केदारेश्वराला या दैत्याचा संहार करण्याची विनंती केली. केदारेश्वराने राक्षसांशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला म्हणून या डोंगराचे नाव वाडी रत्नागिरी पडले. रत्नासुराच्या वधानंतर अंबाबाईने अशी प्रार्थना केली, की ‘पुन्हा असे संकट येऊ नये म्हणून तुझी दृष्टी सदोदित माझ्यावर असू दे’ म्हणून अंबाबाईच्या रक्षणाकरिता ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे.
मंदिराचा पूर्वेतिहास:
ज्योतिबा डोंगरावर तीन प्रमुख देवळे आहेत. ती ज्योतिबाचा अवतार असलेल्या केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंगाची आहेत.
श्री जोतिबाचे आज जे मोठे मंदीर दिसते आहे त्या ठिकाणी पूर्वी छोटेसे देवालय होते. मूळ मंदीर कराड जवळच्या किवळ येथील रावजी नामक भक्ताने बांधले व त्याचे नंतर आजचे जे देवालय आहे ते इ. स. १७३० मध्ये ग्वाल्हेरचे महाराज राणोजीराव शिंदे यांनी मूळच्या ठिकाणी भव्य स्वरूपात पुनर्रचित करून बांधले. मंदिराचे बांधकाम उत्तम प्रतीच्या बेसाल्ट दगडात करण्यात आले आहे.
दुसरे केदारेश्वराचे देवालय. विशेष म्हणचे ते खांबांच्या आधाराशिवाय उभे आहे. हे मंदीर इ,स. १८०८ मध्ये दौलतराव शिंदे यांनी बांधले. केदारलिंग व केदारेश्वर यामध्ये चर्पटांबा म्हणजेच चोपडाईचे देवालय आहे. इ.स. १७५० मध्ये प्रीतीराव चव्हाण (हिम्मतबहादूर) यांनी बांधले. या तीन देवळांचा एक गट होतो. चौथे सामाश्वरीचे देवालय. हे इ.स.१७८० मध्ये मालजी निकम, पन्हाळकर यांनी बांधले.

![]() |
| डोंगरावर जाणारा रस्ता |
कसे जाल ? :
कोल्हापूर एसटी स्टॅन्ड पासून जोतिबा ला जाणाऱ्या अनेक बस आहेत. या बस तुम्हाला डोंगरावर अगदी पायथाशी घेऊन जातात. स्टॅन्ड पासून सहा आसनी शेअर रिक्षा देखील आहेत. डोंगरावर मुबलक पार्किंगची सोय आहे.
![]() |
| पार्किंग पासून मंदिराकडे जाताना लागणारी दुकाने |
कर्नाटक , मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सर्व भागातून भक्त या ठिकाणी येत असतात.
पोहाळे लेणी
कोल्हापुरला आलेल्या प्रत्येक पर्यट्काचा उद्देश हा ज्याप्रमाणे आई अंबाबाईचे दर्शन हा असतो. त्यानंतर त्याची आपसुक पावले श्री श्रेत्र जोतिबाकडे वळतात. जोतिबा म्हणजेच वाडी रत्नागिरीला आपण वडणगे, कुशिरे मार्गाने जोतिबाकडे जाताना जोतिबाच्या पायथ्याशी पोहाळे गावाच्या माथ्याशी पोहाळे लेणी कोल्हापुर पासुन 15 कि.मी. अंतरावर आहेत. रस्तालगतच खाली काही अंतर चालुन गेल्यानंतर डोंगराच्या कुशीत पोहाळे लेण्याचे दर्शन होते.
पन्हाळ्याचे दुर्लक्षित अश्नीस्तंभ
आंबा घाट आणि परिसरातील पर्यटन स्थ़ळे :-
पाहावं तिथं धबधब्यांचं साम्राज्य. दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, वाऱ्याच्या झुळकीवर झुलणारं हिरवंगार गवत आणि विविध रानफुलं लक्ष वेधून घेतात. याच सह्याद्रीच्या कुशीत वसलाय आंबा घाट. कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या अगदी सीमेवर. पश्चिम घाटातलं जैववैविध्य इथंही ठायी-ठायी दिसतं. पावसाळ्यात आंबा घाटाचं सौंदर्य तर खुलतंच, पण उन्हाळ्यातही थंड हवेचं ठिकाण म्हणून पर्यटक इथं गर्दी करतात. ब्रिटिश राजवटीत कोल्हापूरहून कोकणात उतरण्यासाठी या परिसरातून रस्ता नव्हता. आंबा गावच्या एका गुराख्यानं तो ब्रिटिश अभियंत्याला दाखवला. कालांतरानं हा घाटरस्ता झाला. त्यानंतर त्याचं नाव पडलं आंबा घाट.
इतिहासाच्या पाऊलखुणा आजही या परिसरात आढळून येतात. कोल्हापूरपासून सुमारे ७६ किलोमीटरवरील किल्ले विशाळगड किंवा खेळणा हा इतिहासातील गतवैभवाचा ठळक दागिना. शिलाहारांच्या राजवटीत राजा मानसिंह यानं १०५८मध्ये हा किल्ला बांधला. त्यानंतरची काही शतकं तो हिंदू राजांच्या ताब्यातच होता. पुढं १४५३मध्ये बहामनी राज्याचा सरदार मलिक उत्तुजार, हा प्रदेश काबीज करण्यासाठी आला. सर्वांत प्रथम तो थडकला पन्हाळगडाच्या पायथ्याला. दीर्घकाळ त्याचा वेढा उठण्याचं लक्षण न दिसल्यानं, किल्लेदार शिर्के यांनी त्याला विशाळगडाचं आमिष दाखवलं.
या आमिषाला भुलून तो विशाळगडाच्या पायथ्याच्या निबिड अरण्यात तळ ठोकून बसला. विशाळगडाचे किल्लेदार मोरे यांनी वरून जोरदार हल्ला केला आणि दुसरीकडून शिर्क्यांनी हल्ला चढवला. दोन्ही सैन्याच्या कात्रीत सापडलेल्या उत्तुजारची दाणादाण उडाली. स्वराज्य स्थापनेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सन १६५९मध्ये खेळणा किल्ला जिंकला आणि त्याचं नाव विशाळगड असं ठेवलं. विजयपूरच्या आदिलशाहचा सरदार सिद्दी जोहर यानं पन्हाळगडाला वेढा घातल्यानंतर, त्याच्या हातावर तुरी देऊन महाराजांनी चोरवाटेनं विशाळगड गाठला. अवघ्या ३१२ मावळ्यांच्या साह्यानं जोहरच्या भल्या मोठ्या सैन्याला गजापूरच्या खिंडीत थोपवून धरणाऱ्या बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाचा हा प्रदेश साक्षीदार आहे.
वाहनतळावरून गडाकडं जाण्यासाठी एकच वाट आहे. प्रत्यक्ष गडाची चढाई सुरू करण्यापूर्वी एक लोखंडी पूल ओलांडावा लागतो. ही चढाई साधारणपणे अर्ध्या तासांची आहे. गडावर हजरत मलिक रिहान यांची कबर आहे. दरवर्षी हजारो भाविक इथं दर्शनासाठी येतात. तट आणि काही बुरूज यांशिवाय गडावर काहीच शिल्लक नाही. गडावर निवास आणि भोजनाची सोय होऊ शकते. हा गड समुद्रसपाटीपासून सुमारे दोन हजार फूट उंच आहे.
विशाळगडाच्या पूर्वेला सुमारे दहा किलोमीटरवर पावनखिंड आहे. बाजीप्रभूंच्या निधनानंतर शिवाजी महाराजांनी गजापूरच्या या खिंडीचं नाव पावनखिंड असं ठेवलं. गजापूर, पांढरपाणी आणि येळवण जुगाईच्या मध्येच ही खिंड आहे. खिंड आणि त्यापुढची दरी सुमारे सात किलोमीटर लांबीची आहे. दरीतून कासरी नदीचा उगम होतो. खिंडीशेजारी ध्वज उभारण्यात आला आहे. जवळच बाजीप्रभूंचं स्मारक उभारण्यात आलं आहे. ही खिंड समुद्रसपाटीपासून सुमारे १७०० फूट उंचीवर आहे.
ज्या गावामुळं घाटाचं नाव पडलं, त्या आंबा गावाला लागूनच जुनी देवराई आहे. संपूर्ण परिसर दाट जंगलानं व्यापलेला आहे. सदाहरित, मिश्र सदाहरित आणि पानझडी अशा तिन्ही प्रकारची जंगलं इथं अनुभवता येतात. आंबा गावाजवळच्या माणोली बंधाऱ्याच्या परिसरातील जंगलात दिवसा भटकता येतं. इथल्या जंगलात गवे रेडे विशेषत्त्वानं दिसतात. विशाळगडाच्या रस्त्यावर घाटमाथ्यावर सकाळी किंवा संध्याकाळी ते हमखास दिसतात.
त्याशिवाय विविध प्रकारचे पक्षी इथं वास्तव्य करून आहेत. शेकरू किंवा जायंट स्क्विरलही इथं दिसते. या जंगलात बिबटे, सांबर, भेकर आणि क्वचित पट्टेरी वाघही दिसतो. उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा अशा तीनही ऋतूंमध्ये आंबा घाट पर्यटकांना आकर्षित करतो. पावसाळ्यात सर्वत्र धुक्याची दाट दुलई पसरलेली असते. मात्र, पावसाळ्यात जळवांचा सुळसुळाट वाढतो. त्यासाठी योग्य सावधगिरी घ्यावी लागते.
पूर्ण एक दिवस असेल तर पावनखिंड, विशालगड व वाटेवरील अरण्यात भटकण्याची खूप संधी आहे. गाडीरस्त्याने पायी चालले तर काही वन्यजीवन दिसण्याची शक्यता अधिक आहे. पहिल्या खेपेला थंडीत आम्हाला येथील जंगलात निळ्या डोक्याचा कस्तूर (ब्लू-कॅप रॉक थ्रश) दिसला होता. अलीकडे चिंब पावसात दुसऱ्यांदा भटकताना चक्क शेकरू दिसलं! तांबूस तपकिरी रंगाची ही साधारण दोन फूट लांबीची खार पावसात अंग चोरून उजवीकडच्या झाडाच्या फांदीवरून टुणकन उडी मारून डाव्या बाजूच्या झाडावर सरसर गेली. याच खेपेत मलबार कस्तूरची (मलबार विस्लिंग थ्रश) स्वर्गीय सुंदर शीळ वेळोवेळी कानांना सुखावत होती. कुंद ढगाळ वातावरण, पावसाची रिपरिप, मधेच सुटणारा गार वारा आणि ही कर्णमधुर शीळ! केवळ अप्रतिम. जंगलात अनेक ठिकाणी पांढऱ्या गळ्याचा सातभाई (पफ-थ्रोटेड बॅबलर) पावसाने जरा उघडीप घेतली की आपलं ‘गोपी गोपी, तुझी काळी टोपी’ चं गाणं सुरू करायचा. सोबतीला नाचण पक्ष्याचा चिवचिवाट होताच.
अंजनी, हिरडा, हाडक्या जांभूळ, लेंडी जांभूळ, आंबा, चांदण व बांबूच्या या सदाहरित जंगलात कोणत्याही ऋतूत एक सुखद शांत अनुभव मिळतो. धीरगंभीर वृक्षराजीतून चालताना आपण कोकणदर्शन पॉईंटवर येतो आणि ढग आणि धुके नसेल तर एक नयनरम्य दृश्य आपली नजर खिळवून ठेवतं. आपण सह्य़ाद्री घाटमाथ्यावर उभे असतो आणि खाली खोलवर ताशीव कडे थेट कोकणातील संगमेश्वर तालुक्यातील साखरपा परिसरात उतरतात. घटामाथा इथे अर्धवर्तुळाकार असून समोर पश्चिमेला त्यावरील विशालगड दिसतो.
आंबा घाटावरील हे जंगल हा एक महत्त्वाचा जंगल कॉरीडोर (दोन मोठय़ा जंगलांना जोडणारा पट्टा) आहे, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे आणि इथे भटकंती केल्यावर आपल्याला हे लगेच लक्षात येते. दक्षिणेकडे बावडा मार्गे हे जंगल राधानगरी अभयारण्याला जोडलेले आहे, तर उत्तरेकडे चांदोली राष्ट्रीय उद्यान मार्गे थेट कोयना अभयारण्य व महाबळेश्वरला जोडलेले आहे. तसेच कोकणातील सह्य़ाद्री पायथ्याच्या साखरपा, मालेश्वर, गोठणे, लांजा यासारख्या ठिकाणच्या जंगलांनासुद्धा हे आंबाघाट मार्गे जोडलेले आहे.
नितळ तलाव आणि अनेक नद्यांचे उगमस्थानही येथेच आहे. समृद्ध निसर्गसंपदेची जाणीव स्थानिक लोकांतच व्हायला हवी, यासाठी हे तरुण अभ्यासक स्थानिक विद्यार्थ्यांच्या जंगल सहली घडवताहेत. शिवाय बाहेरील विद्यार्थी आले तर त्यांनाही येथील जैवविविधतेची माहिती दिली जाते. श्रमदानामुळे जंगलात भटकंतीचा आनंद आणि आपणही निसर्गासाठी काही केल्याचे समाधान मिळते, असा अनुभव माळी सांगतात.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या जंगलात बिबटय़ा, सांबर, भेकर, गवा यांच्याबरोबरच कधीकधी एखादा फिरस्ता वाघसुद्धा दिसतो! आज जंगल कॉरीडोर वाचवणे हे अभयारण्य वाचवण्याइतकेच महत्त्वाचे आहे, हे सरकारच्या लक्षात येऊ लागले आहे. आंबा घाटमाथा व त्यासारखी सह्य़ाद्रीतील अनेक जंगले वाचवणे ही काळाची गरज आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे असे अनेक जंगल पट्टे हे पूर्वापार खासगी मालकीचे आहेत व आपल्या प्राचिन वेदिक संस्कृतीला अनुसरून लोकांनी ते आजवर टिकवले आहेत. शाश्वत विकासाकडे नेणाऱ्या रोजगार संधी उपलब्ध झाल्या, तर झटपट पैशाकरिता अशी जंगले तुटण्याचे टळेल. अशा कामी कृषी पर्यटन, जंगल पर्यटन, सेंद्रिय शेती यासारख्या पर्यावरणपूरक व्यवसायांना खूप महत्त्व आहे. आंबा पुण्यापासून २५० किमीवर आहे, तर मुंबईपासून ३९०. चला तर मग आंबा घाटात आणि अनुभवा रौद्र सह्य़ाद्रीचे तितकेच लावण्यमयी रूप!
पावनखिंड एक वीरभूमी
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील पावनखिंड या ठिकाणाला ऐतिहासिक वारसा आहे. पन्हाळगडाला सिद्दी जौहरने वेडा घातला होता. शिवाजी महाराज किल्ल्यावर अडकलेले. अखेर एक योजना आखून राजे शरण येत असल्याचे सांगण्यात आले आणि सिद्दी जौहरने वेढा ढिला केला. इकडे शिवरायांनी पन्हाळा सोडण्याचे ठरविले आणि एका पालखीत ते स्वत: तर दुसऱ्या पालखीत शिवरायांसारखा दिसणारा, त्यांच्यासारखाच पेहराव केलेला प्रति शिवाजी (शिवा काशीद) बसला. महाराज एका आडमार्गाने विशाळगडावर जाण्यासाठी रवाना झाले. हेरांनी महाराजांच्या पलायनाची बातमी सिद्दी जौहरकडे पोहोचविली. जौहरने मसूदला पाठलाग करावयास सांगितले आणि अखेर शिवरायांना पकडले. पण ते खरे शिवाजी नाहीत हे कळताच शिवाजी म्हणून पकडून आणलेल्या शिवा काशीदचा शिरच्छेद करण्यात आला.
राजे विशाळगडच्या दिशेने निघाले आणि मसूद त्यांच्या पाठलागावर होता. घोडखिंडीत आम्ही शत्रूला थांबवितो आपण विशालगडाकडे रवाना व्हा असं बाजीप्रभू देशपांडेनी राजेंना सांगितलं त्याच घोडखिंडीत मसूद आणि मराठ्यांच्यात घमासान युद्ध झाले. अखेर सायंकाळी सहा वाजता तोफांचे आवाज आले. याचवेळी बाजींच्या वर्मी घाव बसला आणि ते कोसळले. बाजीप्रभू व इतर मराठा सैनिकांच्या बलिदानामुळे ही जागा पावन झाली म्हणून घोडखिंडीचे नाव पावनखिंड असे पडले असे म्हटले जाते. आजही या खिंडीत पोहोचताच १३ जुलै १६६० च्या रणसंग्रामाची आठवण होते. स्वामीनिष्ठेपायी, स्वराज्यासाठी बाजीने आपल्या प्राणांचे बलिदान दिले. अशा या इतिहासात अजरामर झालेल्या या ठिकाणी जाताना छाती अभिमानाने फुलून येते.
काय पहाल

पावनखिंडीजवळ मोठे स्मारक उभे आहे. मुख्य रस्त्यावरून खाली पन्नास एक पायऱ्या उतरून गेलं की एका छोट्याशा ओढ्यावर असलेला पूल ओलांडावा लागतो. पायऱ्या उतरताना खाली नजरेसमोर पसरलेली दाट झाडी.

सध्या खिंडीत उतरण्यासाठी लोखंडाच्या दोन शिड्या बनवल्या आहेत. २५-३० फूट खाली उतरताना आपली चांगलीच तारांबळ उडते. खिंडीमध्ये जागोजागी मोठमोठे खडक, शिळा पडलेल्या आढळतात. पुढे जाऊ तसं खिंडीची रुंदी आणि खोली वाढत जाते, पण तरीही जास्तीत जास्त रुंदी सुमारे पंधरा फुटापर्यंत असावी. खिंडीत जमीन अशी दिसतच नाही. सगळीकडे शिळांचा खच पडलेला. दीड-दोनशे मीटरनंतर खिंड काटकोनात वळून डावीकडे जाते. शेवटपर्यंत लांबी सुमारे पाचशे मीटरपर्यंत असावी. असं सांगतात की खिंड पूर्वी एवढी रुंद नव्हती. काळाच्या ओघात पाण्याच्या प्रवाहामुळे शिळा कोसळून ती अधिक रुंदावली आहे. आजही पावनखिंड जंगलांनी अशी आच्छादली आहे की भर दुपारीसुद्धा सूर्यकिरण जमिनीपर्यंत पोहोचतच नाहीत.
कसे जाल
कोल्हापूरहून मलकापूर मांजरे रोड, येळवण मार्गे तसेच पुण्याहून कराड, मलकापूर मांजरे रोड, येळवण मार्ग पावनखिंडीस जाता येते.
विशाळगडाच्या पूर्वेला ९ ते १० कि.मी. अंतरावर गजापूर, पांढरपाणी व येळवण जुगाईच्या मध्यावर उंची ठिकाणी पावनखिंड आहे.
अत्यावश्यक सेवा
प्राथमिक आरोग्य केंद्र आंबा (संपर्क -०२३२९२६४९१५), सरकारी ग्रामीण इस्पितळ मलकापूर (संपर्क- ०२३२९२२४१००), रुग्णवाहिका वाहक (संपर्क – ८९७५९४७६३३),
अत्यावश्यक रुग्णवाहिका टोल फ्री संपर्क – डायल १०८
माणोली बंधारा परिसर :-
बंधाऱ्याच्या एका बाजूस शेती असून, बाकी तिन्ही बाजूस घनदाट मिश्र सदाहरित जंगल आहे. तलावाच्या काठाकाठाने जाताना प्रथम थोडा मोकळा भाग लागतो. पूर्वी इथे सुद्धा जंगल असणार याचा अंदाज काही उरलेल्या झाडांवरून येतो.
वाघझरा

आंबा घाटात उभा राहिले कि खाली रत्नागिरी जिल्ह्याचे विहंगम दृष्य दिसते.तसेच लांबवर दरीत विशाळगड दिसतो.
१ ) सवाई मानसिंग रिसॉर्ट
At Post आंबा, शाहुवाडी , कोल्हापुर, 415101
मोबाईल : 9158446629 , 9527999000, 9145222552
Email: sawaimansing@yahoo.com
२ ) वनविसावा रिसॉर्ट
At Post आंबा, शाहुवाडी , कोल्हापुर, 415101
मोबाईल: +91-9423547192, +91-9423769192
Whatsapp No. :- +91-9421199192
info@vanvisavaresort.com
३) वनश्री हॉलिडे रिसॉर्ट
मोबाईल- +91 9822534679 / +91 9372234679/ +91 9325101502
Email us - vanashreeholidayresort@gmail.com
४ ) THE JUNGLE RESORT, AMBA
Plot No. 104, At & Post Vishalgad-Amba Kolhapur -
Ratnagiri Highway Taluka Shahuwadi - 415101
District Kolhapur,
मोबाईल -+91 9323 812 422
ईमेल - info@jungleresortamba.in
वेळ- 8 am to 8 pm IST (7 Days a Week)
५ ) अंबा रिसॉर्ट
Email- anil.gavare41@gmail.com
मोबाईल- 9423264762, 7875483735
कोल्हापुर बुकींग
Kolhapur Office
डॉ. अजित जोशी
23, दत्त कॉलनी, कावळा नाका, कोल्हापुर, 416003
Email - anil.gavare41@gmail.com
मोबाईल- 0231-2650268
६ ) पावनखिंड हॉलिडे रिसॉर्ट
मोबाईल-9404258087,9373513384, 9423076167
पुणे ऑफिस- 94230-76167, 020-25439860
Email : pawankhind@gmail.com
१.शांत सुंदर व स्वच्छ जागा.३ बेड , ४ बेड , ६ बेड अशा मोठ्या मोठ्या आणि एकमेकांना जोडलेल्या खोल्या आहेत.मोठ्या ग्रुपसाठी अतिशय मस्त.
२.पूर्ण रीसोर्ट सौर उर्जेवर चालते.रुम मधे पंखे, दिवे ई सौर उर्जेवर चालतात.रुमसमोर मोठी प्रशस्त जागा, झोपाळे, भरपुर खुर्च्या.गप्पा टाकत बसायला बेस्ट.
३.रीसॉर्ट वर एक छोटे स्टेज, कराओके सिस्टीम, बाके ईतर वाद्ये ई पण आहेत.स्विमिंग पूल मस्त आणी स्वच्छ होता.तिथे एक छोटीशी लायब्ररी पण आहे.
४. मालक शिरगावकर काका अस्सल पुणेकर आहेत आणि त्यामुळेच प्रत्येक व्यवस्था अतिशय चोख आहे.पुणेरी पाट्या जागोजागी दिसतील पण त्या गरजेच्या ठीकाणीच आहेत.रीसॉर्टचा सगळा स्टाफ खुप मस्त मदतीला सदैव तयार.
५.जेवण अत्यंत सुंदर आहे.तिथे खाल्लेले अनेक पदार्थ जसे की फणसाची भाजी, कैरीची कढी,खावापोळी विथ दाट मसाला दुध.,चिकन मिळते
धरणावरची सहल, पावनखिंड सहल, ओपन जिप्स वर बसुन केलेली जंगल सफारी, जंगलातले जेवण सगळाच अनुभव मस्त आणि व्यवस्था चोख असते.
विशाळगड किल्ला
विशाळगडाला प्राचीन नाव होते "खेलणा". विशाळगड किल्ला हा नावाप्रमाणेच विशाल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे नामकरण विशाळगड केले होते. कोकणातील बंदरांना कोल्हापूर मधील बाजार पेठेशी जोडण्याकरिता घाटमार्गावर लक्ष्य ठेवण्याकरिता आणि संरक्षणाकरिता हा किल्ला बांधला गेला. म्हणूनच या किल्ल्याला इतिहासामध्ये लष्करीदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले होते. विशालगड कोल्हापूराच्या वायव्येला ८० कि.मी. अंतरावर आहे.तर पन्हाळा किल्ल्याच्या पश्चिमेस अंदाजे 60 किमी वर आहे.कोल्हापूर रत्नागिरी रस्त्याच्या दक्षिणेस सुमारे २१ किलोमीटर अंतरावर आहे. याच परिसरात अणूस्कुरा घाट आणि अंबा घाट आहेत. शाहूवाडी तालुक्यात हा किल्ला असून गडाच्या चोहोबाजूने खोल दर्या आहेत.
विशाळगडला जाण्यासाठी कोल्हापूर बस स्थानकांवर सारख्या बस आहेत ज्या तुम्हाला पायथ्यापर्यंत पोहचवतात. विशालगडाला जाणारा रस्ता हा सुंदर आणि वळणा-वळणाचा आहे.

प्रेक्षणीय स्थळे -
गडावर जाण्यासाठी पायऱ्या केल्या आहेत. गडाच्या खाली पार्किंगची व्यवस्था आहे आणि काही दुकाने देखील आहेत.

गडावर चार दरवाजा, तळे, वृंदावने, टकमक कडा, रामचंद्र निळकंठ यांचा जुना राजवाडा, हजरत रेहान मलिक दर्गाह, पाताळदरी आदी ठिकाणे प्रेक्षणीय आहेत.

गडमाथ्यावरून खाली दरीत पहताना अफाट दृश्य दिसते. सभोवताली गर्द हिरवीगार झाडे दिसतात. निसर्गाने ह्या परिसरावर मुक्त हस्ते उधळण केली आहे हेच खरे !
इतिहास -
शिलाहरांनी उभारलेला हा किल्ला पुढे विजापूरच्या आदिलशहाच्या अख्यारीत होता.
कवी कलश यांचा वाडा।।
छत्रपती शंभुराजेंचा विश्वासु साथिदार म्हणजे कविकलश ज्याने मृत्यूपर्यंत आपले स्वामींची पाठ सोडली नाही. कवि कलश यांच्याविषयी सांगायचे तर“आज्ञापत्र धर्माभिमान कर्मकांडपरायण दैवलोकानिष्ठाग्रहताभिमान सत्यसंध समस्त राजकार्य धुरंधर विश्वासनिधी छंदोगामात्य”
ज्याची मुद्रा शंभूराजांच्या राजवटीतील त्याचे महत्त्व सांगून जाते -
“विधीरर्थीमनीषीणामवधीर्नयामवर्तमना। वैशधी: कार्यसिद्धीनाम मुद्रा कलशहस्तगा।।
अर्थात – “सर्व याचकांची इच्छा पूर्ण करणारी, राज्यव्यवहाराचे नियंत्रण करणारी व कार्यसिद्धीचा ठेवा असणारी ही मुद्रा आता कलशाच्या हातात आहे”
आज भीमा नदीच्या काठावर असलेल्या त्याच्या समाधी शिवाय त्याचं अस्तित्व कुठेच दिसत नाही. मात्र दक्षिण कोकणमध्ये राजकीय कारभारासाठी त्याचं वास्तव्याच ठिकाण होत मलकापूर शहर
दक्षिण कोकण मध्ये त्याच्या वाड्याचे ठिकाण आणि शेवटी परशुराम पंतप्रतिनिधी यांच्या जहागिरीचे ठिकाण म्हणजेच मलकापूर.! दक्षिण कोकणच्या सागरी किनाऱ्यावरून अनुस्कुरा या घाट मार्गाने कराड,सातारा व कोल्हापूर या प्रमुख शहरांकडे जाता येते.

आणि या अनुस्कुरा घाटातील शिवकालीन एक महत्त्वाचे नाक्याचे शहर म्हणजे मलकापूर होय.! मलकापूर हे सागरावरून देशावर येणाऱ्या प्रमुख व्यापारी घाट मार्गावर वसलेले प्राचीन शहर ! या घाट मार्गावर रक्षण व नियंत्रण करण्यासाठी मलकापूर शहर म्हणजे मध्ययुगीन कालखंडातील महत्त्वाचे नाके होय.

इतिहासातील सुप्रसिद्ध बंदर राजापूरकडे जाण्यासाठी मलकापूर मार्गे जावे लागते. पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज, अरब आणि इतर देशी व्यापाऱ्यांना अरबी समुद्रातील माल किनाऱ्यावरून देशावर नेण्यासाठी व देशावरील माल किनाऱ्यावर आणण्यासाठी हा एक प्रमुख घाट मार्ग होता.कवी कलश यांनी मलकापुरमध्ये एक विस्तीर्ण तटबंदीयुक्त गढी व राजवाडा निर्माण केला होता. कवी कलश हा येथील राजवाड्यात राहत असे. तिथे त्याच्या अखत्यारीतील अश्वदल असे. इकडील मुलखाचा कारभार करण्यासाठी तो बर्याचदा मलकापुरात थांबत असे. बादशहा औरंगजेबाचा बंडखोर पुत्र अकबर हा सुद्धा दुर्गादास सोबत कवी कलशाला भेटावयास मलकापुरात येत असे. आणि महत्त्वाचे म्हणजे कवी कलश या भागात असतानाच त्याचे शिर्क्यांशी भांडण उद्भवले. शिर्क्यांनी कशाला पराभूत केले व मलकापूरवर स्वारी करून कलशाची घोडे पागा आणि राजवाडा उध्वस्त केला. कवी कलश आश्रयासाठी जवळ असलेल्या विशाळगडावर गेला. शंभूराजेंना रायगडावर ही खबरबात मिळताच ते तातडीने निवडक सैन्यासह कवी कलशाच्या मदतीस धावले आणि त्यांनी शिर्क्यांना युद्धात परास्त केले. शिर्के बादशहाकडे गेले आणि शंभुराजे पन्हाळ्याच्या व्यवस्थेसाठी निघून गेले. कारण शेख निजाम मुकर्रबखान हा पन्हाळ्याकडे वेढा देण्यासाठी निघाला होता. मात्र झाले सारेच विपरीत.!!असो.

आज मलकापुरातील हा राजवाडा "पंतप्रतिनिधी विशाळगड सरकार" या नावाने मालकीचा आहे. पंतप्रतिनिधी अर्थात शाहूकालीन परशराम पंत प्रतिनिधी होत.
बर्की धबधबा,
धरणीमाता हिरावा शालू लेण्यासाठी पावसाची वाट पहात असते. डोंगरदर्यांमध्ये पडणारा धुवाँधार पाऊस, त्यामुळे डोंगरकपारीमधील छोटया-मोठया कपारीमध्ये निर्माण होणारे ओहोळ आणि हे ओहळ कोसळल्यामुळे त्याचे झालेले धबधब्यातील रुपांतर, त्याचा झुळझुळणारा खळाळत जाणारा आवाज आपल मन गुंतवून टाकतो. आणि हे पाणी सर्व डोंगरदर्यांना हिरवा शालू कधी लपेटून देतो, ते आपल्याला कळतच नाही.
कोल्हापूरनगरी महालक्ष्मीचे अधिष्ठान, शिवरायांची स्नुषा ताराराणी त्यांनी स्थापन केलेली मराठयाची ही नगरी म्हणजे कोकण आणि घाट माथा यांचा सुंदर संगम आहे. पर्यटकांना भुरळ घालतील अशा अनेक स्थळांचं आगर या जिल्ह्यात आपणाला येण्याचा आग्रह करीत आहे. अशाच एका पावसाळी पर्यटन स्थळा विषयी जाणून घेऊ.
निसर्गाची ओढ मानवी मनाला नेहमीच भुरळ घालत आलेली आहे. पावसाळ्यात तर निसर्गाचे सौंदर्य नेहमीच खुलते. हिरवाई, ऊन-पावसाचा लंपडाव, येणारी एखादी सर, गवताच्या पात्यावरचे दवबिंदू, त्यावर पडलेले सोनेरी किरण मनाला मोहवतात. शाहुवाडी जवळील बर्की या छोटयाश्या गावाजवळ सह्याद्रीच्या रांगामध्ये हा धबधबा निर्माण झालेला आहे. या परिसरात हा बर्की धबधबा म्हणून ओळखला जातो. पावसाळी पर्यटनाचे बेळगाव, सांगली, कोल्हापूर परीसरातील पर्यटकांचे हे आवडते ठिकाण आहे. हजारो पर्यटक दरवर्षी येथे स्नानाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत असतांना, धबधब्याखाली भिजणे, म्हणजे स्वर्गीय अनुभव आहे. निसर्गाचा मुक्त अविष्कार पाहून आपले मन प्रसन्न होते. आणि एक वेगळी ऊर्जा पुन्हा आपली नेहमीची दैनंदिन कामे करण्यास यामुळे प्राप्त होते.
कोल्हापूरपासून ५६ कि. मी. अंतरावर हा धबधबा आहे. या ठिकाणी बाजारभोगाव- करंजफेणमार्गे किंवा मलकापूर-येळवण यामार्गे येथे आपण पोहोचू शकतो. धबधबा पाहण्यासाठी मात्र ३ कि. मी. पायी जावे लागते. धबधब्याकडेही जात असताना हिरवे डोंगर, दर्या, ओढे-नाले, डोलणारी झाडे-फुले-पाखरे अशी निसर्गाची किमया आपल्या दृष्टीस पडते. दाट जंगलातून पायी जात असतांना छोट-छोटे ओढे पार करताना होणारा पाण्याचा स्पर्श; एक वेगळी अनुभूती देतो.
एका वेळी 5 धबधबे दिसतात, 3 धबधब्या जवळ जात येते. फक्त पावसाचा अंदाज घ्या, ओढ्या वरील पूल छोटा आहे, पुलावर पाणी आल्यास अडकून पडावे लागेल.अणुस्कुरा घाट :
पळसंब्याची एकपाषाण मंदिरे :-
सम्राट अशोकाच्या काळात भारतात बौद्ध धर्माचा प्रसार झपाटय़ाने होत असताना बौद्ध प्रचारक भिक्षूक कोल्हापूर परिसरात होते. इ.स. पूर्व 400 ते इ.स. 300 पर्यंतच्या कालखंडात मूर्तीपूजा नसलेल्या हिनयान बौद्धपंथीयांच्या काळात कोल्हापूर परिसरात बौद्ध भिक्षूंसाठी ठिकठिकाणी लेणी खोदली गेली. हा सांस्कृतिक वारसा आजही दुर्लक्षितच आहे.
कि.मी.
अंतरावर गगनगड या ऐतिहासिक किल्ल्याच्या अलीकडे 15 कि.मी. अंतरावर पळसंबा
गावाजवळ हे नितांत रमणीय ठिकाण आहे. दाजीपूर अभयारण्याच्या घनदाट जंगलाच्या
पाश्र्वभूमीवर बौद्ध गुंफा व एकपाषाणी तीन मंदिरे दुर्लक्षितपणे उभी आहेत.
बौद्ध गुंफेमध्ये आता शिवलिंगाची स्थापना झाली आहे. खळाळत्या ओढय़ाच्या
पात्रात दोन हजाराहून अधिक वर्षे ही मंदिरे एकटेपणाचे दु:ख भोगत आहेत.
पर्यटनवृध्दीसाठी हे ठिकाण अत्यंत महत्वाचे ठरू शकते.
पांडवकालीन
लेणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या रामलिंगमधील अखंड शिळेमध्ये असलेले मंदिर
वैशिष्ट्यपूर्ण असून, गुहा गारवाही देते. कोल्हापूर शहरापासून ४२ कि.मी.
अंतरावर गगनबावडा रोडवर पळसंबे गावापासून दक्षिणेकडे तीन कि.मी. अंतरावर हे
ठिकाण आहे. बाहेर थांबल्यानंतर या ठिकाणची कल्पनाही येत नाही. केवळ
हिरवीगार झाडे दिसतात. गावकऱ्यांनी मात्र या पर्यटनस्थळाला अद्याप
व्यावसाईक रूप दिलेले नाही हे विशेष, धार्मिक परंपरा असलेल्या या ठिकाणी एक
तर शालेय सहली किंवा कौंटुबिकच सहलीच भेट देत असतात. मंदिराकडे जाण्यासाठी
आता दगडी फरशा लावून वाट केली आहे. पण, कोणताही कृत्रिमपणा येथे येणार
नाही याचीही दक्षता येथे घेतली आहे. पावसाळ्यात सह्याद्रीच्या रांगांतून
कोसळणारे अनेक धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची पावले वळतात. रामलिंगचा धबधबा
सुरक्षित आणि पावित्र्य जपलेला असा आहे. हा धबधबा ८-१० फुटांवरून कोसळत
असल्याने पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे. पुरात्तत्व खात्याच्या
माहितीनुसार ही बुद्धकालीन लेणी असल्याचे बोलले जात आहे. पण, स्थानिक
नागरिकांनी मात्र याला पांडवकालीन गुहाचा दर्जा देत याला धार्मिकस्थळच
ठेवले आहे. अज्ञातवासात पांडवांनी या ठिकाणी तपश्चर्या केल्याचे सांगितले
जाते.
गगनबावडा
कोल्हापूर शहर सोडले की, कुडित्रे, वाकरे, मरळी, कळे व साळवण ओलांडले की, गगनबावड्याचे वेगळेपण जाणवू लागते. खुद्द गगनबावड्यात गेले की, या सौंदर्याला कोकणी वातावरणाची झालर लाभते.
गगनबावडा हे संस्थानकाळातील जहागिरीचे गाव. १८५७ च्या बंडापूर्वी इंग्रजांच्या विरोधात जे बंड झाले, गडकऱ्यांचे बंड अशी त्यांची इतिहासात ओळख आहे,तर असा गगनबावडा पर्यटनाच्या यादीत मात्र केवळ कागदावरच आहे. गगनबावड्यापासून कोकण इतका जवळ की, करूळ व भुईबावडा घाटातून खाली डोकावून पाहिले तर समोर क्षितिजापर्यंत पसरलेला कोकणच दिसतो. उन्हाळ्यात सारे कोल्हापूर घामाघूम झालेले असताना गगनबावडा मात्र गारेगार असतो.
गगनबावडा हे स्वातंत्र्यपूर्व काळातील क्रांतीचे एक छोटे गाव. करवंदवाडी अशीही त्याची ओळख. १८५७ च्या बंडापूर्वी जिल्ह्यातील वेगवेगळ्या गडकऱ्यांनी बंडाचा पवित्रा घेतला. हा पवित्रा इंग्रजांना मोठा धक्का देणारा होता. हे बंड यशस्वी झाले असते तर इंग्रजांच्या अस्तित्वालाच धोका होता. त्यामुळे इंग्रजांनी बळाचा पूर्ण वापर करून गडकऱ्यांचे हे बंड मोडून काढले. गगनगडाची तटबंदी, बुरूज, वाटा, तोफा लावून फोडून टाकल्या. जेणेकरून बंडाची ताकद कमी केली गेली. त्यामुळेच गगनगडावर असलेली वस्ती गडाच्या पायथ्याला आली. आजही मूळ गगनबावड्याच्या स्मृती अर्धवट वास्तू रूपाने गगनगडावर टिकून आहेत.
गगनबावड्यात निसर्गाबरोबरच गगनगिरी महाराजांचे आध्यात्मिक स्थान आहे. त्यामुळे धार्मिक पर्यटनही आहे. पावसाळ्यात गगनबावड्यात पडणारा पाऊस पर्यटकांना आकर्षित करतो. समोर पाच फुटांवरचे दिसू शकत नाही, इतका पाऊस व धुक्याचा लोट गगनबावड्यात असतो.
करूळ व भुईबावडा घाटातील वाहतूक पावसाळ्यात जवळ जवळ थांबलेली असते आणि या कोकणातून येणाऱ्या ढगांनी घाटाची वाट आपल्या ताब्यात घेतलेली असते. एका मागून एक येणारे ढग गगनबावड्यात येऊन कोसळत असतात आणि पावसाळ्याचा एक झिम्माड अनुभव पर्यटकांना देत असतात.
गगनबावड्यात चौफेर वनराई आहे. जंगल आहे. गेले आठ महिने हत्तीचेही वास्तव त्यामुळेच गगनबावड्यात आहे. लोणावळा, खंडाळा पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत; पण त्या तुलनेत त्याहून झिम्माड पाऊस गगनबावड्यात आहे. गगनबावड्याचा पर्यटन खर्चही कमी आहे;
उन्हाळ्याच्या दिवसांत पर्यटकांच्या दृष्टीने पाणी, डोंगर, हिरवाई, गारवा, प्रसन्न वातावरण यांना फार महत्त्व प्राप्त होते. या सर्व गोष्टींची अनुभूती उपलब्ध करून देणारा असा हा तालुका आहे. तलाव्यांमुळे गगनबावडा तालुक्याचे नैसर्गिक सौंदर्य आणखीनच खुलून येत आहे. तालुक्यातील लखमापूर-नरवेली येथील कुंभी मध्यम प्रकल्पाबरोबरच अणदूर, कोदे, वेसरफ येथील तलाव पर्यटकांना आकर्षित करून घेत आहे. तलाव आणि तलावाच्या सभोवतालच्या परिसरात पर्यटक इतके रममाण होतात की त्यांना तेथून माघारी फिरणे जड होऊन जाते.
कसे जाल:
अंतर व वेळ: कोल्हापूर ते गगनबावडा ६० किलोमीटर, पोहोचण्यास एक तास वेळ.
जेवण/ राहणे: राहण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ व खासगी हॉटेल्सकडून सुविधा.
उन्हाळी आकर्षण: गगनगड, कोकण पॉईंट, तालुक्यातील चार तलाव व अन्य एतिहासिक स्थळे.
दृष्टिक्षेपात गगनबावडा -
ऐतिहासिक गगनगड, गगनगिरी महाराज मठ
करूळ, भुईबावडा घाट व घाटात फेसाळणारे धबधबे
अणदूर, लखमापूर, कोदे, वेसरफ तलाव
पळसंबे येथील रामलिंग (पांडवकालीन एकपाषाणी मंदिरे)
पंत अमात्यांचा वाडा
मोरजाई पठार
पंत अमात्यांचा वाडा
आतल्या भव्य मोठमोठया पण अंधाऱ्या चार खोल्या सोडल्या की वर जाणारा एक उंच पायऱ्यांचा जीना लागतो. या जिन्याने वर पोहोचल्यावर हंडया-झुंबरे असलेला उठ-बस करण्याचा खास दिवाण आहे. त्याची शान, आजूबाजूची झाडे आणि भरपूर मोकळी जागा यामुळे मनातील सर्व प्रकारची किल्मिषं दूर होतात. या जागी असणाऱ्या दोनही भव्य दिवाणखान्यांना मोठया खिडक्या जशा आहेत, तसेच मोठे व्हरांडे देखील आहेत. एक कोठीची किंवा साठवणीची खोली बाजूलाच आहे. त्या पलीकडे निजायच्या खोल्या लागतात. शिसवी पलंग, जुन्या काळातील घडवंच्या यांनी ह्या खोल्या सजल्या आहेत. या हवेलीच्या आवारात दोन विहिरी आहेत.
जिन्यावरून पुन्हा खाली आल्यावर थोडं पुढे सरल्यानंतर डावीकडे दोन खोल्या व बाथरूम आहे. तिथून मागच्या मोकळया अंगणात पाऊल पडल्यावर बऱ्याच वेळानंतर प्रकाश दिसल्याची गंमत वाटते. तिथे समोरच पाटाचं खळखळ वाहणारं पाणी येतं. मनसोक्त पाण्यात डुंबण्यासाठी या पेक्षा मस्त जागा या परिसरात दुसरी नाही. हवेलीच्या चहुबाजूला बागा आहेत.
आपला परंपरागत इतिहास, पेशव्यांचा कालखंड, मराठयांचा उदय, सरंजामशाही, शाहू राजांचा कालखंड याच्या अस्तित्त्वाच्या खुणा या हवेलीच्या भव्यतेमध्ये सापडतात. अनेक मराठी मालिका व चित्रपटांचे शुटिंग या हवेलीमध्ये झाले आहे. विविध प्रसंगी, विविध प्रकारे इथल्या जागेचा उपयोग करता येतो. या हवेलीची शान, वैभव, शांत परिसर, झाडी, मागेच डोंगराळ अरण्य यामुळे निर्भरशील दिग्दर्शकांना प्रस्तुत लोकेशनचा वापर करावा असं वाटत राहीलं तर काहीच नवल नाही.
गगनबावडा या शब्दामध्ये आकाश व बावडी म्हणजे विहीर हे दोन शब्द आहेत. आकाश जेंव्हा विहिरीत पडतं, त्यावेळी आपल्या मनामध्ये पसरणारी निळाई ही याच बावडयात कशी?…, असं वाटत राहतं. एक असीम तन्मयता आपल्यात सामावते. या जागेची हीच तर मज्जा आहे. इथे नागर परिसरातील कोलाहल नाही. फॅशन नाही. गलबला नाही. गिचमिड नाही. म्हणूनच इथल्या ‘बावडयात गगन’ डोकावतं.
बोरबेट
मुडागड : -
बहिरेश्वर
भोगावती नदीवरचा दगडी पूल
सातेरी
हिरवे - हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे
बहिरेश्वर पासून सातेरी ९ कि. मी अंतरावर आहे साधारण पंचवीस मिनिटांचा छोटासा घाट रस्त्याचा प्रवास आहे. सातेरी डोंगराच्या माथ्यापर्यंत गाडी जाते. डोंगराच्या माथ्यावर महादेवाचे छोटस मंदिर आहे. मंदिराच्या थोडं खालच्या बाजूस पूर्वाभिमुख भला मोठा नंदी आहे. नंदीचे वैशिष्ट्य असं याच तोंड मंदिराकडे नाही आणि कोणत्याही सुशोभीकरणा शिवाय तो विलोभनीय दिसतो. डोंगर माथ्यावर मंदिराच्या शेजारी एक छोटी विहीर आहे. पूर्वीच्या काळी येथे घनदाट जंगल होतं.
डोंगर माथ्यावरील महादेवाचे मंदिर 
लोभस नंदी
सातेरी मंदिर
डोंगरापासून थोड्याच अंतरावर डाव्या बाजूला सातेरी देवीच मंदिर आहे. मंदिरात सात शिळा आहेत. ज्या सप्त मातांच्या नावाने पूजल्या जातात. गावातील कोणत्याही शुभ कार्यामध्ये त्यांची पूजा महत्त्वाची मानली जाते. याची एक आख्यायिका सांगितली जाते.या गावात एका गरीब व्यक्तीला सात मुली होत्या त्यांचा पालन-पोषण तो करू शकत नव्हता म्हणून मुलींना घेऊन तो या ठिकाणी आला आणि त्यांना, मी परत येईपर्यंत तुम्ही इथेच थांबा म्हणून सांगून गेला. तो परत फिरला नाही आणि त्या मुली पितृ आज्ञा नुसार तिथेच थांबल्या. महादेवाच्या कृपेने त्यांच्या या शिळा बनल्या आणि त्या सप्त माता म्हणून वंदनीय झाल्या.या मंदिराची एक विचित्र प्रथा आहे. इथे देवाला कोल्हापुरी बनावटीच्या कातड्याच्या चपलांचा जोड वाहिला जातो. या गोष्टीचा कोणताही खुलासा झाला नाही.
गाभाऱ्यातील सात शीळा
देवीला वाहिलेल्या कोल्हापुरी चपला
बीड
मंदिराच्या बाहेरच्या बाजूला छोट्याशा मंदिरात गणपतीची अवाढव्य मूर्ती आहे.
डाळीपेक्षा लहान आणि कागदा एवढी पातळ असलेली सोन्याची मुद्रा
( फोटो लार्ज करून बघितला तर त्याच्यावरच डिझाईन दिसते)
आणखीन एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे या गावात बऱ्याच ठिकाणी खोदकामात ' विरगळा ' मिळाल्या आहेत. वीरगळ म्हणजे युद्धात वीरमरण आलेल्या व्यक्तीच्या स्मृतीप्रित्यर्थ बनवलेलं शिल्प. यामध्ये खालच्या पट्टीत युद्ध दाखवले जात. त्याच्या वरच्या पट्टीत घोड्यावरून त्याला यक्ष घेऊन जातात. त्याच्या वरच्या पट्टीत शिवलिंगाची पूजा दाखवली जाते म्हणजेच त्याला स्वर्ग प्राप्ती होते. त्याच्यावर चंद्र आणि सूर्य कोरलेले असतात याचा अर्थ चंद्रसूर्य आकाशात असेपर्यंत त्या व्यक्तीचं नाव अजरामर राहील. गावकऱ्यांनी त्यांना मिळालेल्या विरगळा शिव मंदिराच्या प्रांगणात एकत्रित ठेवून एक संग्रहालय बनवल आहे.
मंदिराच्या प्रांगणात ठेवलेल्या विरगळा
इतिहास जाणकारांनी याचा अभ्यास करून तो सर्वसामान्यांसाठी आकलनीय केला पाहिजे. खरंतर अशा प्राचीन वास्तूंचे सुशोभीकरण न करता संवर्धन केले पाहिजे. जेवढे शक्य असेल तेवढे त्यांना त्यांच्या पूर्वीच्या रूपात जतन करून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. हे बनवताना त्या कारागिरांनी आपल्या रक्ताचा घाम सांडला असेल, आपलं आयुष्य त्याच्यासाठी वेचलं असेल याची कदर केली पाहिजे. इतिहास हे जगण्याची प्रेरणा असते. हा प्रेरणा स्त्रोत आपण आपल्या वारसांना भेसळ न करता दिला पाहिजे.
काही सूचना -:
१) हि ठिकाण पाहण्याचा क्रम आपण आपल्या सोयीनुसार बदलू शकता२) या ठिकाणांना ऑगस्ट ते जानेवारीपर्यंत भेट देणे उत्तम
२) कोल्हापूर सोडल्यानंतर या बाजूला जेवण किंवा नाश्त्याची हॉटेल्स नाहीत तेव्हा जाताना आपल्या सोयीनुसार जेवणाचा टिफिन किंवा नाश्त्याचे साहित्य घेऊन जाऊ शकता. वनभोजनाचा आनंद मिळतो.
राधानगरी अभयारण्य :
राधानगरी धरण
राधानगरी धरण
ऐतिहासिक बेनझिल व्हिला
अश्मयुगीन खजिना : चक्रेश्वर
निसर्गाने मुक्तहस्ताने ज्याचेवर सौंदर्याची उधळण केली, औदार्य दाखवलेला निसर्गाच्या संपन्नतेने नटलेला सुंदर मनोहारी अशी ओळख असणारा कोल्हापुर जिल्हा. कोल्हापुरच्या दक्षिणेस कोकणात फ़ोंडा घाटातुन जातानाच्या हमरस्त्यात राजर्षिंच्या दुरदृष्टीकोनातुन उभारलेल्या राधानगरी धरण परिसरापासुन सहा (६) कि. मी अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत चक्रेश्वरवाडी हे निवांत शांत टुमदार गाव डोंगरमाथ्यावर वसलेले आहे. चक्रेश्वरवाडी हे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील भोगावती साखर कारखान्यानजीकचे एक छोटे व दुर्लक्षित खेडेगाव. आज या गावात अश्मयुगीन संस्कृती, इ.पू. पहिले शतक ते इ.स. ८ वे शतक आणि १२ व्या ते १४ व्या शतकातील यादव काळ अशा मानवी इतिहासातील तीन महत्वपूर्ण टप्प्यांतील अवशेष आढळल्याने प्रसिध्दीस येत आहे. येथे पूजेसाठी वापरल्या जाणार्या शिवलिंगाच्या उत्क्रांतीतील सुरुवातीचे सयोनी शिवलिंग, मानुषलिंगयुक्त शिवलिंग, मुखलिंग असे सर्व प्रकार तसेच पंचसुत्री, त्रिसुत्री आणि सर्वतोभद्र असे परंपरेनुसार दिसणारे प्रकार आढळले आहेत. त्यामुळे हा परिसर म्हणजे तंत्रमार्गी शैव सांप्रदाय कापालीक काळातील असावा असे मत अभ्यासकांनी मांडले आहे.
चक्रेश्वरवाडी गाव, येथील शिलावतरुळाची टेकडी आणि तपसा हे क्षेत्र असा दोन अडीच कि.मी.चा परिसर म्हणजे अभ्यासकांसाठी आणि जिज्ञासू पर्यटकांसाठी मोठा खजिना आहे. शिला वतरुळाच्या टेकडीवर पश्चिम बाजूच्या परिसरात विशिष्ट टप्प्यावर शिलावतरुळे असलेले असंख्य पाषाण आहेत. टेकडीवरील शिलावतरुळे किंवा क्षितीजवतरुळ म्हणजे अश्मयुगीन सामुहिक दफनभूमी असण्याची शक्यता आहे. या शिलावतरुळातून अवकाशाच्या अद्भूत आणि विराट दर्शनाची अनुभूती घेण्यासारखीच आहे.
गावाच्या मध्यावर रस्त्याच्या डावीकडे चक्रेश्वराचे हेमाडपंथी मंदिर लागते. गावालगतच्या टेकडीवरील चक्राकार शिळांवरुनही या गावाचे नामकरण चक्रेश्वरवाडी झाले असावे. गावाच्या मुख्यरस्तावरुन येणारा रस्ता थेट मंदिरात पोहोचतो येथील मंदिर रचना मुखमंडप, सभामंडप,अंतराळ व गर्भगृह अशी असुन ते त्रिमुखी पुर्वाभिमुखी आहे. मंदिराच्या सभामंडपात दिपमाळेकडे मुख असणारी गणेशाची मुर्ती असुन त्याचे दर्शन आपण मंदिरात प्रवेश करताना होते. त्याच्या मागील तीन नंदी महादेवाचे पिंडीकडे तोंड करुन उभे आहेत. गर्भगृहात रेखीव पिंड आहे. सभागृहात भैरव, कार्तिक स्वामी. महिषासुरमर्दिनी,इ देवतांच्या मुर्ती आहेत. येथे टप्प्यांची रचना असलेले शिखर आढळुन येते. मंदिरासमोर सुबक अष्टकोनी हत्ती व घोड्याच्या मुखांनी अलंकृत गणेशाची मुर्ती असणारी दिपमाळ आहे.प्रतिवर्षी चार – पाच मे रोजी कोवळे सुर्यकिरण शिवलिंगास स्पर्श करते. याच दिवशी शुन्य सावलीचा अनुभव दुपारी १२.३० वाजता दिपमाळेशेजारी घेता येतो. मंदिराच्या स्थापनेच्या काळात मुखमंडप खुला असावा कालांतराने त्याचे बाजुस भिंत घातल्याचे दिसुन येते
या
मुखमंडपातील व्दाराजवळील अस्पष्ट शिलालेखावरुन मंदिराचा जिर्णोद्धार वा
बांधणी इ. स. १४९९ मध्ये झाली असण्याची शक्यता आहे, मंदिर पंचायतन आहे.
वाकोबा. विठठल-रुक्मीणी, महालक्ष्मी अशा देवतांची मंदिरे शेजारी आहेत. येथे
महालक्ष्मी मंदिरात महासरस्वती, वीरभद्र, महाकाली सोबत सप्तमातृका असुन
त्या वाहनांवर विराजित आहेत. मंदिराच्या डाव्या बाजुस वीरगळ, विविध पिंडी, जुना शिलालेख तसेच गधेगळ आहेत. तसेच उजवीकडे वीरगळ, नागशिळा आहे.
तेथुन पुढे गावाच्या उत्तरेस साधारणपणे दिड कि. मी अंतरावर तपस्या गुहा आहे, स्थानिक बोलीभाषेत ती तपशाची गुहा अशी तीची ओळख आहे. तपस्या महायान लेणी समुह या समुहात सुरवातीच्या लेण्यात शिवलिंग असुन पुढील लेणी समुहात सुरुवातीस तीन ध्यान मग्न बुद्ध मुर्ती शेजारी एका राजाची (सम्राट अशोक) यांची मुर्ती, शेवटच्या लेण्यात बुध्द मुर्ती आहे ती सुस्थितीत आहे. तेथील उभी बुद्ध मुर्ती मात्र झिजलेने ओळखता येत नाही. लेणी समुहाच्या समोर स्तुप सादृश्य रचना आहे. उजवीकडे शंकराचे मंदिर आहे ही जागा गंगासागर महाराज यांचे मालकिची असुन त्यांची ही सातवी पिढी आहे. तपस्या लेणी समुह ही पोहाळे प्रमाणे सम्राट अशोक कालीन असावी. या लेणी समुहात तपस्येकरिता खास दालन असुन तेथे वायुविजनाची सोय आहे मात्र या दालनात दोन्ही बाजुने येणारा प्रकाश आत येत नसल्याने ही ध्यान साधनेकरिताचे सुंदर वास्तुकलेचे उदाहरण आहे. लेणी पाहुन होईपर्यंत सुर्यमावळतीकडे झुकल्याने आम्ही परत गावातील आडापर्यंत आलॊ तेथुन पुर्वेस असणा-या टेकडीवर शिळावर्तुळ पाहण्यास जाउ शकतो.
शिवगड
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिध्द दाजीपूर अभयारण्याच्या वनक्षेत्रात हा फारसा कुणालाही ज्ञात नसलेला किल्ला आहे. शिवगडाचा माथा आटोपशीर असून गडाच्या चार कोपर्यावर बुरुज, मध्यभागी घरांच्या चौथर्याचे अवशेष, तट-बुरुजांचे अवशेष पाहावयास मिळतात. गडावर मनुष्यप्राण्यांचा वावर नसल्याने वन्य श्वापदांचा मुक्त वावर असतो. दाजीपूरच्या अभयारण्याच्या भटकंतीबरोबरच जिज्ञासू गडप्रेमी शिवगडाची भटकंती करु शकतात. शिवगडाचा वापर पूर्वीच्या काळी टेहळणीसाठी होत असावा.
राउतवाडी धबधबाकोल्हापुर शहरापासून साधारण ५० कि.मी.वर राधानगरी धरणाजवळ हा धबधबा आहे. पावसाळ्यात याठिकाणी जरुर भेट द्यावी. या बरोबरच परिसरातील राधानगरी धरणाचे बॅक वॉटर, दाजीपुर अभयारण्य अश्या बाकीच्या ठिकाणांना भेट देता येईल.
दक्षिण विभागः-
कणेरी मठ किंवा सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालय


ग्रामजीवनाचा अस्सल आनंद आणि लोप पावत चाललेल्या कला यांचे माहेरघर म्हणून कणेरी (ता. करवीर) या गावातील सिद्धगिरी मठाकडे पाहिले जाते. दोनशेहून अधिक एकर क्षेत्रावर हा मठ विस्तारला आहे. मठ म्हटले, की आपल्या डोळ्यांपुढे येतात ते धार्मिक विधी, पूजा-अर्चा आदी प्रकार. परंतु, कणेरी मठ हा मठाच्या प्रचलित व्याख्येपासून खूपच वेगळा आहे. विविध प्रकारच्या ग्रामजीवनाची झलक तर इथे पाहावयास मिळतेच; परंतु सेंद्रिय शेतीबाबत अनोख्या पद्धतींचे संशोधन येथे केले जाते. कोल्हापूरला गेल्यावर पन्हाळा, जोतिबा, अंबाबाई मंदिर याप्रमाणे आता कणेरीमठाचे स्थान पर्यटकांच्या यादीत अग्रस्थानी आले आहे. कणेरीमठाला प्राचीन धार्मिक परंपरा आहे. एका टेकडीवर दाट झाडीत हा रमणीय परिसर आहे.या ठिकाणचे सिद्धगिरी म्युझियम पाहण्यासारखे आहे.

कणेरी मठ किंवा सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालय हे कोल्हापूरला येणाऱ्या पर्यटकांचे एक महत्त्वाचे आकर्षण आहे. कुटुंबासमवेत संपूर्ण दिवस घालवण्यासाठी, खासकरुन मुलांसाठी हे ठिकाण आनंददायक आहे.

तिकीट काढून आत प्रवेश केला कि सुरवातीला गुहेसारखा भाग आहे. इथे आपलया प्राचीन संस्कृतीची ओळख करुन दिली जाते.सर्व देवांच्या कथा देखील दाखवल्या आहेत, तसेच अनेक ऋषी मुनींच्या कार्याची माहिती मिळते.

नंतरच्या भागात ग्रामीण भागातील जीवनशैली अनेक शिल्पातून दर्शविली गेली आहे. तसेच भारतातील विविध सण देखील दाखविले आहेत.आपण एका खेडेगावात उभे असल्याचा अनुभव येतो. बारा बलुतेदार ही समाजव्यवस्था आजही अनेक खेड्यांमध्ये पाहायला मिळते. या व्यवस्थेनुसार आज फारसे काम चालत नसले; तरी ही बलुतेदारी म्हणजे काय? तसेच त्यावर चालणारा उदरनिर्वाह याची ओळख करून देणारी शिल्पे इथे पाहायला मिळतात.
कणेरी मठात वर्कशॉप आहे जिथे आपण आपल्यासमोर ताजे बांबू, कलाकृती , भांडी आणि बरेच काही वस्तु तयार होताना पाहू आणि शिकू शकता. मठामध्ये 4डी, 7डी टेकनॉलॉजि च्या शॉर्ट फिल्म आणि हॉरर हाऊससारखे आधुनिक शो देखील आहेत. हॉल ऑफ मिररला भेट देणे आवश्यक आहे कारण ते खुपच मजेशीर आहे ईथे वेग-वेगळे आरसे आहेत ज्यात मजेशीर प्रतिबिंब दिसते. परिसरात अनेक लहान सभागृहे, खाण्याचे पदार्थ, कोल्ड्रिंक्स इ. विकणारी दुकाने आहेत. तसेच पुस्तकविक्रीही होती.
परिसरात स्वच्छतागृहाची चांगली सोय आहे तसेच रस्त्याच्या कडेलाही डस्टबिन (कचराकुंडी ) आहेत.
मठाने देशभरात आढळणाऱ्या दुर्मिळ देशी गायींचा संग्रह म्हणून सुमारे दोनशे देशी गायींचा गोठा उभारला आहे. देशभरातील दुर्मिळ असणाऱ्या, मानवी आरोग्यासाठी हितकारक ठरणाऱ्या अनेक प्रजातींच्या गायींची जोपासना मठाच्या वतीने करण्यात आली आहे.
• प्रवेशाचे तिकिट - मूल: 100 रुपये आणि प्रौढ: 200 रुपये
• कणेरी मठ वेळ - सकाळी 9 ते संध्याकाळी 6
• पत्ता - सिद्धगिरी मठ आणि गुरुकुल फाउंडेशन, कनेरी, कोल्हापूर
• पार्किंग - कार आणि बस पार्किंगसाठी बरीच जागा
उपयुक्त सूचना -
• हे सुंदर संग्रहालय फिरण्यासाठी आपल्याला बरेच चालणे आवश्यक आहे.
• एकदा आपण चालणे सुरू केल्यास, मध्ये परत येण्याचा कोणताही मार्ग नाही जेणेकरून आपल्याला संपूर्ण फेरी पूर्ण करावी लागते.
• संग्रहालय बघण्यात आपण किती रस घेत आहात यावर अवलंबून तुम्हला 1 ते 2 तास फिरण्यासाठी लागू शकतात.

कसे जाल?
कोल्हापूर गोकूळ-शिरगाव रस्त्यावर कणेरीमठाचा फाटा आहे. तिथून जाता येते.कोल्हापूर शहर येथून गाडीने साधारण अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे.सिटी बसने: सिद्धगिरी म्युझियम बस स्टॉप येथे उतरणे. कोल्हापूर बसस्थानक व कणेरी मठ दरम्यान अंदाजे १२ कि.मी. अंतर आहे
बाळूमामांचे आदमापूर
संत बाळूमामा हे धनगर समाजात जन्मलेले परंतु सर्व जाती धर्माचे संत म्हणून
ओळखले जातात. त्यांना लोक बाळूमामा म्हणून ओळखतात. बाळूमामांचा जन्म 3
ऑक्टोबर १८९२ मध्ये बेळगावनजीक चिक्कोडी तालुक्यातील ‘अक्कोळ’ या आडवळणी
खेडेगावातील मायाप्पा-सत्यवा या पती-पत्नीच्या पोटी झाला. मायाप्पा-सत्यवा
यांचे थोरला आणि धाकला लेक चारचौघांसारखे असले तरी मधला बाळू मात्र
त्याच्या विचित्र वर्तनाने कलागुणी म्हणून प्रसिद्ध होता. बाळू
ग्रामस्थांपासून फटकून असलेला, कुणाच्या आल्या-गेल्यात नसलेला, एकांतवास
प्रिय मानणारा आणि सदोदित स्वतःमध्येच मग्न राहणारा होता. पण, बाळूचे असे
वागणे आई वडिलांच्या जिव्हारी घोर लावण्यासारखे होते.
बाळूने
लहानपणापासून अनेक चमत्कार दाखवल्याच्या कथा आहेत. बाळूला कामाचं वळण
लागावं यासाठी मायाप्पांनी त्याला गावातील चंदूलाल शेटजी जैन यांच्याकडे
नोकरीस ठेवले. शेटजींच्या घरच्या बकऱ्या जंगलात चरावयास नेण्याचे काम
बाळूवर सोपवण्यात आले.
बाळू त्याचे काम व्यवस्थित करत होता. काम करत
असताना तो बाभळीच्या काटेरी झाडाची गादी करून त्यावर झोपत असे. बाभळीच्याच
काटेरी जाळीदार कुंपणाला तो खुशाल टेकून बसायचे अस सांगितलं जातं.
चंदूलाल शेटजींच्या गोठय़ातील एका कोपऱ्यात बाळू निवांत पडून राहत असे.
शेटजींनी दिलेल्या फुटक्या थाळीत जेवत असे आणि जेवून झाले की, थाळी घासून
पुसून स्वच्छ करीत असे.एकदा सहजच गोठय़ामध्ये गेलेल्या शेठजींच्या
म्हाताऱ्या आईला बाळूच्या थाळीतून तेजस्वी प्रकाश परावर्तित होत असल्याचे
दिसून आले. कुतूहलाने ती थाळी उचलती झाली तेव्हा थाळीच्या मध्यभागी त्यांना
बस्तीचे दर्शन घडले अशी कथा आहे.
मायाप्पा आणि सत्यवा यांनी
बाळूमामांचे लग्न लावून दिले. योग्य त्या वेळी बाळूमामांना श्री मुळे
महाराजांचा अनुग्रह झाला. आणि त्याच वेळी बाळूमामांच्या
अतर्क्य-अवधूतस्वरूपी वागण्याला सांप्रदायिक शिस्तीची झालर लाभली.
बाळूमामांची गुरुपरंपरा श्रीदत्त-श्रीनृसिंहसरस्वती-श्रीस्वामीनारायण
महाराज-श्रीमौनी महाराज (पाटगाव) आणि श्रीमुळे महाराज अशी होती. येथून पुढे
अनेक वर्षे ही गुरुशिष्यांची जोडी सर्वत्र संचार करती झाली. दरम्यान,
बाळूमामांचे सांसारिक जीवन संपुष्टात आले. तेव्हापासून पंचक्रोशीतील
गावांपासून दूर अंतरावर असलेल्या तीर्थक्षेत्र-भेटीला बाळूमामा जाऊ लागले.
बाळूमामांच्या सहज बोलण्यातून-वागण्यातून अनेक लीला घडत असत. त्यांच्या
हातून कळत-नकळत घडलेल्या अनेक चमत्कारांमुळे अनेकांचे जीवन धन्य झाले. पण,
जे काही चमत्कार घडत होते ते त्यांनी कोणत्याही यशाचे श्रेय स्वतःकडे घेतले
नाही.
‘स्वच्छ धोतर, पूर्ण बाह्यांचा शर्ट, डोक्यावर रुमाल,
पायात चामडी चपला, हातात धनगरी काठी, सडपातळ उंचपुरी देहयष्टी, सावळा वर्ण
असलेले बाळूमामा कानडी व मराठी भाषा अस्खलितपणे बोलत, तर खेडूत मंडळींशी
खेडवळ भाषेत बोलत असत. माणसाने माणसासारखं वागावं ही त्यांची शिकवण होती.
‘अखंड नामस्मरण’ आणि ‘रामकृष्णहरी’चा जप हा साधासोपा मूलमंत्र प्रत्येक
सश्रद्ध मनामध्ये रुजविणारे संतश्रेष्ठ बाळूमामा यांनी वयाच्या ७४ व्या
वर्षी ४ सप्टेंबर १९६६ रोजी आदमापूर येथे समाधी घेतली.
आदमापूर
समाधीनंतरही बाळूमामा आपल्या भक्तांना अनेक अनुभव देत असल्याच्या दंतकथा
प्रसिद्ध आहेत. त्यामुळे भक्तांची गर्दी वाढत आहे. आदमापूर हे दुसरे
पंढरपूर झाले आहे. या मंदिरात पहाटे ५ वाजता पुजा व आरती होते, ९ वाजता
नैवेद्य होतो, संध्याकाळी ७ ते ७.३० च्या दरम्यान सायंकाळची आरती
झाल्यानंतर नैवेद्य होतो. दर रविवारी व अमावस्येला नाचणीच्या आंबलीचा
प्रसाद दिला जातो.
या मंदिरात सदगुरू संत बाळूमामा यांच्या
समाधीमंदिराचे दक्षिणाभिमुख सुरेख कोरीव दगडी महाद्वार पाहून प्रत्येक
प्रवासी थांबतो. हात-पाय धुतो, प्रशस्त सभामंडपात येतो. पूर्ण आकाराची
बाळूमामांची प्रसन्न मूर्ती पाहून प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद अनुभवतो. नकळत
हात जोडले जातात.
बाळूमामांचे आदमापूर श्री क्षेत्र आदमापूर येथे भव्य मंदिर, धर्मशाळा, प्रसाद हॉल अशा वास्तू उभ्या राहिल्या आहेत. रविवार, अमावस्या, पौर्णिमेस येथे भाविकांची व पर्यटकांची मोठी गर्दी होवू लागली आहे. देवस्थानचे बकर्यांचे कळप देवमामांची बकरी म्हणून महाराष्ट्र-कर्नाटकात सर्वत्र फिरत आहेत. ही देवमामांची बकरी आपल्या शेतात बसावीत म्हणून लोक श्रध्देने आग्रह करत असतात.
अदमापुरातील श्री संत बाळूमामा मंदिरात कसे पोहोचाल--
श्री संत
बाळूमामा यांचे समाधी स्थान आदमापूर नावाच्या खेड्यात आहे .कोल्हापूर शहर
ते आदमापूर हे अंतर ५० कि.मी. आहे. जर आपण कर्नाटकहून येत असाल तर जवळचे
शहर म्हणजे निपाणी. निपाणी ते आदमापूर २५ कि.मी. अंतरावर आहे
गारगोटी : -
हे भुदरगड तालुक्याचे मुख्यालय आहे. गार्ग्य मुनींच्या नावामुळे या गावाला गारगोटी नाव पडले असेही समजले जाते. त्याच पद्धतीने या गावातील लोकांनी स्वातंत्र्यलढ्यातही भाग घेतला होता. ११ डिसेंबर १९४२ रोजी येथील खजिना लुटण्याच्या प्रयत्नावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सात जणांना हौतात्म्य आले. इंग्रज राजवटीत सैनिकांच्या घोड्यांसाठी या ठिकाणी एक पागा होती. ही पागा इमारत आजही इतिहासाची ठळक निशाणी आहे. या इमारतीत शाहू महाराजांच्या काळापासून शाळा भरते. तसेच इंग्रज राजवटीत येथे कारागृह होते. या कारागृहांतील कैद्यांसाठी वेदगंगा नदीवर एक घाट आहे. तो आजही ‘कैदी घाट’ म्हणून प्रसिद्ध आहे. गारगोटी हे गाव शैक्षणिक ठिकाण म्हणून प्रसिद्ध झाले आहे. गारगोटीच्या आसपास काही भागात बॉक्साइट ही खनिज संपत्ती आढळते. अलीकडच्या संशोधनात जिप्समचे साठेही डोंगररांगांत सापडले आहेत. याशिवाय शाडू, कौलांची - विटांची माती, काळे बेसॉल्ट व जांभा दगड येथे आढळतो. मौनी विद्यापीठ हे गारगोटीजवळील बहिरेवाडी गावाचे स्वातंत्र्यसैनिक डॉ. जे. पी. नाईक यांच्या प्रयत्नातून उभे राहिलेले शैक्षणिक संकुल. बालवाडी ते महाविद्यालयीन शिक्षण, तसेच पीएचडीपर्यंतचे शिक्षण एकाच ठिकाणी मिळणारे हे ग्रामीण भागातील एकमेव ठिकाण आहे. कला, वाणिज्य, अभियांत्रिकी, स्थापत्य, संगणक, व्यवस्थाप शास्त्र असे सर्व प्रकारचे शिक्षण एकाच ठिकाणी येथे मिळते.
तालुक्यात लक्षवेधी प्रेक्षणीय स्थळे
गारगोटी
येथील मुळे महाराज, आदमापूर येथील संत बाळूमामा, शेणगाव येथील फातिमा
चर्च, मडीलगे खुर्द येथील डोंगरावरील जोतिबा मंदिर ,पाल येथील गुहा, अशा
प्रकारच्या अनेक प्रेक्षणीयस्थळांना भेटी देता येतील. सुट्टीतील पर्यटनासाठी स्वस्त पर्यटन म्हणून या तालुक्याला पसंती दिल्यास
निश्चितच मनाला समाधान लाभेल. ठिकठिकाणी नव्याने सुरू झालेल्या फार्म
हाऊसवर आपण एकदिवस वस्ती करू शकता. याशिवाय तालुक्यातील बेडीव येथील
म्हातारीचा पठार, मिणचे येथील ८00 मीटर उंचीवरील बसुदेवाचे पठार, भटवाडी
आडे गावातील बुद्धकालीन सिद्धगुहा, नवले येथील राईचा झरा, अशी अनेक स्थळे
आपण पाहू शकता.
पाटगाव :
भुदरगड तालुक्यातील गारगोटी या तालुका मुख्यालयापासून ३४ कि.मी. तसेच
कोल्हापुरपासून ८४ कि.मी. अंतरावर असलेले पाटगाव छत्रपती शिवरायांचे गुरू
म्हणून प्रसिद्ध असलेल्या मौनी महाराजांच्या समाधीस्थानामुळे प्रसिद्ध आहे.
ब्राह्मण धर्मगुरूंकडून होणारी बहुजन समाजाची धार्मिक आणि आर्थिक पिळवणूक
कायमची थांबवण्यासाठी शाहू छत्रपतींनी मौनी महाराजांच्या गादीवर १९२० साली
सत्यशोधक विचारांचा अभ्यासक असणार्या सदाशिव लक्ष्मण पाटील-बेनाडीकर या
तरूणाची मराठय़ांचा 'छात्र जगदगुरू' म्हणून नेमणूक केली होती. मौनी
महाराजंची समाधी असलेल्या मठाची इमारत भव्य असून नगारखाना असलेल्या
महाद्वाराच्या आतील बाजूस भव्य सभामंडप आहे. मंडपात संपूर्ण दगडी फरशी असून
मोठे लाकडी खांब आहेत. समाधीच्या प्रवेशद्वारावर द्वारपाल असून तेथील
खांबावर कोरीव काम केलेले आहे.मौनी महाराजांच्या समाधीच्या प्रवेशद्वारावर
द्वारपाल असून तेथील खांबावर कोरीव काम केलेले आहे. मौनी महाराजांची समाधी व
मंदिराचे सर्व बांधकाम दगडी आहे. समाधी समोरील कोनाडय़ात मौनी महाराजांची
उत्सवमूर्ती असून ती चंदन उगाळून बनवलेली आहे. छत्रपती शिवरायांनी
राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजयासाठी निघताना येथे येवून मौनी महाराजांची
गुरुकृपा-संपादन केली होती. त्यांच्या भेटीच्या ठिकाणी स्मारक उभारलेले
आहे. शिवराय दक्षिण दिग्विजय मोहिमेवरून परत येईपर्यंत मौनी महाराज
समाधिस्त झाले होते. दिनांक तीन जून १६७८ रोजी महाराजांनी सहस्र भोजनासाठी
सनद दिली होती. मौनी महाराजांच्या समाधीवर मंदिर बांधण्यास महाराजांच्या
काळात सुरुवात झाली होती. महाद्वार, सभामंडप, कोरीव खांबांच्या सजावटीसह
ओवऱ्या, तसेच भद्रकालीचे मंदिर हे यथील वैशिष्ट्य.
जवळच मौनी
महाराजांचे प्रथम शिष्य तुर्तागिरीची जिवंत समाधी आहे. मौनी महाराजांनी
आयुष्यभर मौनव्रत धारण केले होते. मठात प्रतिवर्षी श्रवणात प्रतिपदेपासून
नवमीपर्यंत व माघ महिन्यात रथसप्तमीपासून त्रयोदशीपर्यंत दोन उत्सव साजरे
केले जातात. गावात यादवकालीन भद्रकालीचे मंदिर असून या मंदिरातच करवीर
संस्थापिका ताराबाई आणि पहिला छत्रपती शाहू यांचा समेट झाला होता. गावात
शिवलिंग, दत्तात्रय, शंकर आदी अन्य मंदिरे आहेत. वेदगंगा नदीमुळे पाटगावचे
दोन भाग झाले आहेत.
शिरसंगी येथील वटवृक्ष
शिरसंगी
:
या गावात लक्षवेधी महाकाय वटवृक्ष आहे. गडहिंग्लज-आजरा मार्गावर हे ठिकाण आहे. याचा विस्तार एक एकरापेक्षा जास्त जागेवर झाला आहे. महाकाय या शब्दाचा अनुभव देणारा हा वटवृक्ष आहे.
भुदरगड:-

ऐतिहासिक ‘भुदरगड’ची पर्यटकांना भुरळ -: निसर्गसौंदर्याची उधळण
शिलाहार राजा दुसरा राजा भोज यांनी पंधरा गडकोटांची निर्मिती केली. त्यातील रांगणा आणि भुदरगड हे दोन गडकोट भुदरगड तालुक्यात आहेत. तालुक्याच्या पश्चिमेला रांगणागड, तर पूवेर्ला भुदरगड असे दोन गड आहेत.
ज्या गडांच्या नावावरून तालुक्याला नामाभिधान लाभले तो भुदरगड किल्ला हा ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला गड आहे. त्यानंतर आदिलशाहीत बरीच वर्षे काढल्यानंतर १६६७मध्ये स्वराज्यात आला. इ. स. १६६७मध्ये शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून हा किल्ला घेतला व त्याची दुरुस्तीही केली आणि लष्करी ठाणे उभारले. मुघलांनी हे ठाणे परत ताब्यात घेतले. पुन्हा पाच वर्षांनी मराठ्यांनी भुदरगडावर अचानक हल्ला करून मुघलांच्या प्रमुख सरदारास ठार केले व किल्ला जिंकून घेतला. मुघलांची निशाणे त्यांनी भैरवनाथास देऊन टाकली. ती अजूनही देवळात पाहण्यास मिळतात. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात परशुरामभाऊ पटवर्धनांनी किल्ल्यातील शिबंदी वश करून, त्यावर ताबा मिळवला. दहा वर्षे तो त्यांच्या ताब्यात राहिला. त्यानंतर इंग्रजांच्या ताब्यात आला. इ. स. १८४४ मध्ये कोल्हापुरातील काहींनी बंड करून बरेचसे किल्ले ताब्यात मिळविले होते. त्यात सामानगड व भुदरगड हे प्रमुख होते. १३ ऑक्टोबर १८४४ रोजी इंग्रजांच्या सैन्याने भुदरगड पुन्हा ताब्यात घेतला.
मराठा शाही, मुघल, इंग्रज अशा अनेक राजांची कारकीर्द पाहिलेला हा गड इंग्रजांच्या विरोधात देशातील सर्वांत पहिला लढा म्हणजे तात्या टोपेंच्या लढ्याच्या १३ वर्षे अगोदर या गडावरील सामान्य गडकऱ्यांनी लढलेले लढा आहे. यामध्ये इंग्रजांना तीन महिने हा गड जिंकता आला नव्हता. सामान्य गडकºयांनी लढलेली ही लढाई इतिहासात प्रथमच वेगळी लढाई म्हणून नोंदली गेली.
समुद्रसपाटीपासून ९७८ मीटर उंचीवर बेसाल्ट जातीच्या एकाच खडकावर हा किल्ला बांधलेला आहे. हा किल्ला आठशे मीटर लांब व सातशे मीटर रुंदी़चा असून, सध्या सुस्थितीत आहे. या गडाच्या भिंती चिरा दगडात बांधलेल्या आहेत. जेथून चिरा काढला गेला येथे १४ हेक्टर क्षेत्रांत मोठे तलाव निर्माण झाले आहेत. सहसा गडावर एवढे मोठे तलाव कोठेही पाहावयास मिळत नाहीत. बेसाल्ट खडकावर कधीही पाणी साचून राहत नाही; पण या गडावरील या तलावात बारमाही पाणी असते.गडावर भैरवनाथ, महादेव मंदिर, दोन विहिरी, तर मुस्लिम राजवटीतील गोल घुमट असलेले मंदिर पाहता येते.
गडावर भैरवनाथाचे प्रसिद्ध जागृत देवस्थान असून, येथे दर वर्षी माघ कृष्ण प्रतिपदेपासून दशमीपर्यंत मोठी यात्रा भरते. भैरवनाथाच्या मंदिरासमोरील तटबंदीत असलेल्या बुरुजावर ध्वजस्तंभ व तोफ आहे. येथे जांभ्या दगडात बांधलेला भव्य वाडा दिसतो. वाड्यात गडसदरेचे अवशेष आहेत. वाड्याच्या पलीकडे करवीरकर छत्रपतींनी जीर्णोद्धार केलेले पुरातन शिवमंदिर आहे. सभामंडपात छत्रपती शिवरायांचा अर्धपुतळा स्थापन करण्यात आला आहे. जवळच दूधसागर तलाव आहे. हा तलाव भुदरगडचे वैभव मानले जाते. किल्ल्यावरून दूधगंगा, वेदगंगेचे वनश्रीने नटलेले खोरे दिसते.
ऐतिहासिक वारसा असलेल्या या गडाच्या सभोवताली दुर्मीळ वनौषधी सापडतात. हा किल्ला कोल्हापूरपासून सुमारे ५०-५५ किलोमीटरवर आहे.तर गारगोटी शहरापासून अवघ्या दहा कि.मी. अंतरावर हा गड आहे. या गडावर जाण्यासाठी पक्की सडक असल्याने वर्षातील बारा महिने कधीही येथे जाता येते. या गडावर पुष्पनगर मार्गे जाता येते. याखेरीज पाल मार्गे देखील जाता येते.
रांगणा किल्ला :
शिलाहार राजा भोज दुसरा याने साधारण इ. स. ११०० मध्ये हा किल्ला बांधला. समुद्रसपाटीपासून याची उंची २६०० फूट आहे. असून याच्या तीन बाजूंस तुटलेला कडा आहे. किल्ल्याची लांबी १६०० मीटर असून, रुंदी ९०० मीटर आहे.
इ.
स. १४७०मध्ये तो महंमद गावानने जिंकला. त्या वेळी ‘अल्लाच्या कृपेने
रांगणा ताब्यात आला’ असे उद्गार महंमद गावानने काढले होते. त्यानंतर किल्ला
विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. त्याने सावंतवाडीकरांच्या ताब्यात तो
सोपविला होता. छत्रपती शिवरायांनी कोकणातील हा किल्ला घेतला. आदिलशहाने परत
किल्ला घेतला, त्या वेळी महाराज आग्र्याला कैदेत होते. त्या वेळी स्वत:
जिजाबाईंनी खास मोहीम काढून १५ ऑगस्ट १६६६ रोजी रांगणा जिंकला. १४ एप्रिल
ते १२ मे १६६७ या काळात रांगण्याला बहलोलखान व व्यंकोजी भोसले यांनी वेढा
दिला होता. परंतु शिवरायांनी जातीने येऊन हा वेढा मोडून काढला. शिवरायांनी
या गडाच्या मजबुतीकरणासाठी सहा हजार होन खर्च केल्याचा पुरावा सापडतो. हा
किल्ला अतिशय दुर्गम आहे. औरंगजेबालाही दख्खन मोहिमेत हा किल्ला जिंकता आला
नाही. इतर किल्ले खालून वर चढून जाता येतात. हा किल्ला मात्र दरीच्या एका
टोकाकडून खाली उतरत यावे लागते. युद्धशास्त्रातील ‘रणमंडळ’ या
संज्ञेप्रमाणे प्रवेशद्वार परिसराची रचना आहे. ती घटकाभर थांबून समजून
घ्यावी अशी आहे. या किल्ल्यावर इमारतीचे अवशेष दिसून येतात. बारमाही पाणी
असलेला तलावही आहे. रांगणाई देवी, तसेच गणपतीचे मंदिरही येथे आहे. पदभ्रमण,
ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी हे उत्तम ठिकाण आहे. येथे कोल्हापूर, पाटगाव,
तांबडेवाडी, चिक्केवाडी या मार्गाने बसने जाता येते; पण पावसाळ्यात हा
मार्ग बंद असतो. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमार्गे नारुरला येउन
तिथून मस्त जंगलभ्रमंतीचा आनंद घेत गडावर जाता येते.मात्र गड विस्तृत
असल्याने एक मुक्काम आवश्यक आहे.
नेसरी :
पावनखिंडीप्रमाणेच जिल्ह्यातील आणखीन एक स्फुर्तीदायक स्मारक म्हणजे सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांचे स्मारक. गडहिंग्लजच्या सुप्रसिध्द सामानगडापासून सुमारे २० कि.मी. अंतरावर महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाच्या परंपरेचे मानकरी, स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या बलिदानाने पवित्र झालेले धारातीर्थ आणि त्या पावन भूमीवर प्रतापराव गुर्जर यांच्या शौर्याची साक्ष देणारे स्मारक उभे आहे.
‘म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात...’ हे कुसुमाग्रजांचे काव्य ऐकले, की अंगावर रोमांच उभे राहतात. त्या घटनेचे साक्षीदार असलेले हे गाव घटप्रभा नदीच्या काठी वसलेले आहे. सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या अपूर्व बलिदानाने पवित्र झालेले हे स्थान आहे. येथे प्रतापरावांचा अश्वारूढ, आवेशयुक्त पुतळा बसवला असून, सभोवताली छोटे उद्यान विकसित केले आहे. सात ढाली आणि सात तलवारी आणि या पराक्रमाचे यथार्थ वर्णन करणारी माहितीही येथे दिली आहे. तसेच शिवाजीमहाराजांचा सिंहासनारूढ पुतळाही येथे आहे.
प्रतापरावांनी खानाला नेसरीच्या मैदानात चारीमुंड्या चीत केले. खान शरण आला आणि तह केला. प्रतापरावांनी खानाला क्षमा करून सोडून दिले. परंतु खान पुन्हा मराठी मुलखात धुडगूस घालू लागला. तेव्हा महाराजांनी सेनापतीस खरमरीत पत्र लिहिले... ‘स्वराज्यावर चालून येणाऱ्या गनिमास नेस्तनाबूत केल्याशिवाय आम्हास रायगडावर तोंड दाखवू नका...’ प्रतापराव संधी शोधत होते. परंतु बेहलोलखान आता २० हजार सुसज्ज फौजेसह होता. परिस्थिती अत्यंत बिकट होती. कारण रायगडावर राज्याभिषेकासाठी तर सरसेनापतीस जावेच लागणार! परंतु राजांनी तर ‘तोंड दाखवू नका’ असा इशारा दिला होता. सरनोबत कात्रीत सापडले होते... हेच ते कुडतोजी गुजर ज्यांनी मिर्झाराजे जयसिंगाच्या छावणीत जाऊन त्यांच्यावर आत्मघातकी हल्ला केला होता. महाराजांनी त्यांना प्रतापराव हा किताब देऊन सेनापतीपद दिले. अखेर खान पुन्हा एकदा समोर आला आणि अवघ्या सात जणांनी खानाच्या छावणीवर हल्ला केला. या वेळी सात जणांना वीरगती आली. सात वीरांची नवे पुढीलप्रमाणे १) विसाजी बल्लाळ, २) दीपोजी राउतराव, ३) विठ्ठल पिलाजी अत्रे, ४) कृष्णाजी भास्कर, ५) सिद्धी हिलाल, ६) विठोजी शिंदे, ७) सरनोबत कुडतोजी उर्फ प्रतापराव गुजर.
धन्य ते वीर, धन्य त्यांची ती स्वामीनिष्ठा, असे छत्रपतींच्या शब्दाखातर जीव ओवाळून टाकणारे वीर होते म्हणूनच स्वराज्य उभे राहिले. सात ढाली व सात तलवारी यांच्या प्रतिकृती वापरून बांधलेले हे प्रेरणादायी स्मारक. 'म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात.. या कुसुमाग्रजांच्या वीररसातील कवितेचा प्रत्यय घेत प्रत्येक शिवप्रेमींनी आवर्जून पाहावे.
हिंगुळजा देवी
महाराष्ट्रामध्ये भटकंती करत असताना खरोखरच काही चमत्कारिक ठिकाणे, त्यांचे संदर्भ आपल्याला आश्चर्यचकित करतात. त्यांचे उगम शोधू गेलो तर एकतर मिळत नाहीत, आणि जे मिळतात ते थक्क करणारे असतात.
गडहिंग्लज हे गाव आणि तिथल्या हिंगुळजा देवीबद्दल असेच काहीसे म्हणावे
लागेल. पुराणातील प्रसिद्ध कथेनुसार राजा दक्ष याने आपल्या यज्ञात आपलाच
जावई शंकराला बोलावले नाही. शंकराच्या पत्नीला, सतीला हा अपमान सहन न
झाल्यामुळे तिने त्या यज्ञातच उडी घेतली. परंतु तिचे शरीर जळाले नाही.
उद्विग्न झालेल्या शंकराने ते शरीर पाठीवर टाकले आणि तो मार्गक्रमण करू
लागला. त्या शरीराचे विविध अवयव पृथ्वीवर अनेक ठिकाणी पडत गेले. ज्या ज्या
ठिकाणी ते अवयव पडले त्या त्या ठिकाणी शक्तिपीठे तयार झाली. त्या कथेनुसार
सतीचे शीर जिथे पडले ते स्थान आता पाकिस्तानातील बलुचिस्तान या प्रांतात
आहे. कराचीच्या वायव्येला सुमारे २५० कि.मी. वर बलुचिस्तान प्रांतातल्या
मकरान टेकड्यांच्या प्रदेशात हिंगोळ नदीच्या काठावर एका गुहेमध्ये नानी
बीबी किंवा हिंगुळजादेवी हे हिंदूंचे पवित्र क्षेत्र वसलेले आहे. हे जरी
हिंदूंचे तीर्थस्थान असले तरीदेखील इथली मुसलमान जनता नानी बीबी या नावाने
या देवीची पूजा करतात असे सांगितले जाते.
या हिंगुळजा देवीबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. अगदी पराशुरामापासून ते श्रीरामापर्यंत अनेकांशी या कथा निगडीत आहेत. परशुरामाच्या क्रोधाला याच हिंगुळा देवीने शांत केले. तसेच रावणवधानंतर काही प्रायश्चित्त घेण्यासाठी श्रीराम हे सीता, लक्ष्मण, आणि हनुमानासमवेत याच हिंगुळा देवीच्या दर्शनाला आले होते. अशा प्रकारच्या अनेक कथा प्रचलित आहेत. याठिकाणी असलेली देवीची मूर्ति शेंदूरचर्चित तांदळा स्वरुपात आहे. ती स्वयंभू असल्याचे सांगतात. पाकिस्तानात राहणाऱ्या हिंदूंसाठी एप्रिल महिन्यात येणारी हिंगुळा देवीची यात्रा म्हणजे मोठी पर्वणी असते. पूर्वी जवळजवळ ३०० कि.मी. ची रणरणत्या वाळवंटातून पायपीट करून तिथे जावे लागे. आता मात्र तिथपर्यंत उत्तम सडक झालेली आहे. नानी की हाज या नावाने पण ही यात्रा प्रसिद्ध आहे.
तीच हिंगुळा देवी गडहिंग्लज इथे गुड्डाई देवी म्हणून आली. गडहिंग्लज हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेला असलेले तालुक्याचे गाव. कर्नाटकच्या सीमेला लागून असलेले सुंदर असे शहर. हिंगुळा देवीचा गड म्हणून गडहिंग्लज अशी या गावाच्या नावाची व्युत्पत्ती सांगितली जाते. याच गडहिंग्लजमध्ये एका छोट्याशा टेकडीवर हिंगुळा देवीचे मंदिर वसलेले आहे. गुजरातमधील सोनारकाम करणाऱ्या पराजीया सोनी जातीची ती कुलदेवता आहे. याच जातीमधील एक पुरुष हुकुमीचंद याला देवीने सुवर्ण कारागिरी शिकवल्याची कथा सांगितली जाते. तर स्थानिक समजुतीनुसार हिंगाचा व्यापार करणाऱ्या बलुची व्यापारी मंडळींबरोबर त्यांची ही देवी गडहिंग्लज या ठिकाणी आल्याचे सांगतात. ही व्यापारी मंडळी ज्या मोठ्या व्यापारी पेठ असलेल्या ठिकाणी गेली तिथे त्यांनी त्यांची ही देवी प्रस्थापित केली.
मराठवाड्यात धाराशिव जिल्ह्यात असलेले तेर हे गाव अगदी प्राचीन म्हणजे सातवाहनांच्या काळापासून एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. या गावीसुद्धा हिंगुळा देवीचे मंदिर आहे. हिंगुळा देवीचे अजून एक मंदिर राजस्थानमध्ये हिंगलाजगढ या ठिकाणी आहे. तर कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यात देखील ही हिंगुळादेवी असून तिथे तिला चंदला परमेश्वरी अशा नावाने संबोधले जाते. गडहिंग्लज गावाला लागूनच असलेल्या छोट्या टेकडीवर हे मंदिर आहे. मंदिरामध्ये देवीची पाषाणरूपातली मूर्ती आहे. मंदिर परिसर अत्यंत शांत असून तिथून सगळ्या गावाचा परिसर न्याहाळता येतो. या डोंगराला गुड्डाईचा डोंगर या नावानेच ओळखले जाते. इथून आजूबाजूचा परिसर फार सुंदर दिसतो. या डोंगरावरून खाली आले की भडगाव मध्ये नाईक यांच्या घरात याच देवीचे ठाणे आहे. तिथे मात्र देवीची चार हाताची मूर्ती आहे. मूर्तीच्या हातात मशाल, कमळ अशी आयुधे असून डोंगरावर असलेली गुड्डाई चालत या ठिकाणी आली असे सांगतात. नाईक घराण्यामध्ये परंपरागत देवीची पूजा चालू आहे. गडहिंग्लज गाव आणि सारा परिसर अत्यंत निसर्गरम्य आहे. सुप्रसिद्ध गिरीस्थान आंबोलीच्या जवळच असलेला हा प्रदेश पर्यटनासाठी अत्यंत सुंदर आहे. मुळात हिंगुळा देवी आणि तिची मंदिरे भारतात अगदीच दुर्मिळ. त्यातही महाराष्ट्रात या देवीच्या नावावरून एका मोठ्या गावाचे नाव पडलेले आहे. अशा या गडहिंग्लज ठिकाणी येऊन मुद्दाम या आगळ्या वेगळ्या हिंगुळा देवीचे दर्शन आवर्जून घ्यावे. नवरात्रात देवीची उपासना करताना मुद्दाम वेगळ्या रुपात असलेल्या निरनिराळ्या देवींना भेट देऊन त्यांचे दर्शन घ्यावे. आणि आपली नवरात्राची उपासना सत्कारणी लावावी.
- आशुतोष बापट
किल्ले सामानगड
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज या तालुका मुख्यालयापासून आग्नेयेस १० कि.मी.अंतरावरील सह्याद्रीच्या एका अलग फाटय़ावरील दीर्घ वर्तुळाकार टेकडीच्या माथ्यावर शिलाहार राजा दुसरा भोज याने बांधलेला हा दक्षिणेचा राखणदार म्हणजे किल्ले सामानगड. समुद्र सपाटीपासून 792 मीटर उंचीवरील या किल्ल्याने स्वराज्याच्या उभारणीत आपल्या वैशिष्टय़पूर्ण भूरचनेमुळे फार मोठे योगदान दिले आहे. वाहतुकीस सुलभ पण तरीही सुरक्षित असलेल्या या किल्ल्यावरून इतर गडांना किंवा सैनिकांना लागणारे सर्व युध्द साहित्य व इतर आवश्यक साहित्यांचा पुरवठा केला जात असे. इ.स. १६७६ मध्ये छत्रपतींनी या किल्ल्याची दुरुस्ती केली होती. सामानगडाच्या सर्व बाजूंनी कातळ तासून काढला असून त्यावर १० ते १५ फूट उंचीची तटबंदी व जागोजागी बुरुज बांधले आहेत.
सामानगडावर जाण्यासाठी वरपर्यंत डांबरी रस्ता आहे. पर्यटकांनी सामानगड आवर्जून पाहण्याचे महत्वाचे कारण म्हणजे गडावरील वैशिष्टय़पूर्ण रचनेच्या जांभ्या दगडात कुशलतेने खोदून काढलेल्या विहिरी. अन्य कोणत्याही गडावर इतक्या संख्येने न आढळणारी विहीर संकुले म्हणजे सामानगडाची खरीखुरी आभुषणे आहेत. विहिरीत उतरण्यासाठी खोदलेल्या कातळकोरीव पायर्या, पायर्यांच्या वरच्या बाजूच्या सुंदर कमानी, विहिरीतील भुयारे, पाण्याची कुंडे सारेच काही अप्रतिम आहे. किल्ल्यातील सोंडय़ा बुरुजासमोर मुघल टेकडी आहे. किल्ल्यावर तोफ डागण्यासाठी मोघलांनी ती निर्माण केल्याचे सांगतात. गडभटकंतीबरोबरच हनुमान मंदिर, कातळ खोदून काढलेली लेणी, गडाच्या दक्षिणेकडील उतरणीवरील भीमशाप्पा नावाच्या सत्पुरुषाची समाधी व वनभोजनासाठी स्वच्छ पाण्याचे कुंड, 'भीमसासगिरी' हा मंदिर समूह यांच्या भटकंतीमुळे सामानगडाची सहल आनंददायी होते.
आजरा नगरीचा मूकनायक : राजाराम पॉईंट
गडहिंगलज
-आजरा रोडवर आजर्याच्या अलिकडे उजव्या हाताला रामतीर्थकडे जाणारा रस्ता
फुटतो. इथे हिरण्यकेशी नदीच्या तीरावर हे ठिकाण आहे.इथे रामतीर्थ हे
शिवमंदिर आहे.मंदिराजवळच धबधबा आहे.उंचीने फार नसला तरी रुंदी बर्यापैकी
आहे.जाता जाता आवर्जून भेट द्यावे असे हे स्थळ आहे.
गिजवणे-
येथे एतिहासिक पेशवेकालीन गणपती मंदिर आहे.गडहिंग्लज आजरा रोडवर गिजवणे हे गाव आहे.
चंदगड :
हे तालुक्याचं गाव आहे. तिलारीगड पॉइंट, ‘श्रीपादवाडी’ दत्तमंदिर ही येथील ठिकाणे. या ठिकाणी पावसाळी पर्यटन वाढू लागले आहे. इथे भातशेती, ऊस, नाचणी, तूर ही पिके आणि काजू, भुईमूग, नीलगिरी, फळभाज्या यांची लागवड केली जाते. आंबा, फणस, नारळ, सुपारी आदी परंपरागत झाडे आहेतच. काजूचे दहा-बारा कारखाने आहेत. येथील काजूला उत्तम चव आहे.
चंदगड परिसर ८ दिवस हिंडावा असा आहे. लाल माती, काजूची झाडे, कौलारू मंदिरे पाहून चंदगडला आल्यावर अगदी कोकणात आल्याचा भास होतो. रवळनाथाचे मंदिर बघून कलानंदीगडला जावे. तो पाहून आंबेवाडीपर्यंत मागे येऊन पारगडला जावे. तानाजी मालुसरेंचा मुलगा रायबा याच्याकडे पारगडची किल्लेदारी होती. भवानी मातेचे मंदिर आणि देवीची देखणी मूर्ती पहावी. चौकुळ-मार्गे आंबोलीला जावे. परिसर दाट झाडीचा आहे. प्रवास फारच रमणीय होतो. आंबोलीतला धबधबा पाहावा. तसेच हिरण्यकेशी नदीचा उगम आणि देवीचे मंदिर पाहावे. आंबोलीवरून सावंतवाडीला जाता येईल. अन्यथा आजऱ्याकडे निघावे. येताना वाटेत पुन्हा हिरण्यकेशी नदी लागते. रामतीर्थ मंदिर अवश्य पाहावे.
गंधर्वगड :-
चंदगड तालुक्यातील चंदगड-नेसरी राज्यमार्गावर चंदगडपासून 10 कि.मी. अंतरावर वळकुळी गावाचा फाटा लागतो. तेथून साधारण 3 कि.मी. अंतरावर गंधर्वगड आहे. गडाला लागूनच गाव आहे. सभासद बखरीप्रमाणे हा शिवनिर्मित गड आहे. पण शासकीय गॅझेटियरमध्ये मात्र याच्या निर्मितीचे श्रेय सावंतवाडीच्या थोरल्या फोंड सावंताच्य नाग सावंत या मुलग्यास दिले आहे. गॅझेटीयरमध्ये 1724 मध्ये नाग सावंतानी हा किल्ला बांधल्याचे म्हटले आहे. इतिहासात मात्र 15 जानेवारी 1687 मध्ये शिवराय स्वत: चार हजार सैन्यानिशी गंधर्वगडाच्या परिसरात असल्याचा उल्लेख आहे. गडावरील चाळोबाचे प्रशस्त मंदिर प्रसिद्ध आहे. मंदिराच्या भोवताली जुन्या काळातील मूर्त्या व नक्षीकाम केलेले दगड आढळतात. इतिहासकालीन आजही वापरात असलेली विहीर आहे. गडाची काही तटबंदी सुस्थितीत असून त्यामध्ये चोर दरवाजे पाहता येतात. गडावर फेरफटका मारताना मुजलेली विहीर व जुन्या इमारतींच्या चौथर्यांचे अवशेष दिसतात.
प्रेक्षणीय पण उपेक्षित : पारगड
कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यातील चंदगडपासून ३५ कि.मी.
अंतरावरील हा शिवनिर्मित किल्ला. गोव्याच्या पोर्तुगिजांवर वचक ठेवण्यासाठी
याची निर्मिती शिवरायांनी 1675 साली केली आहे. सह्याद्री पर्वताच्या
रांगेतील एका उंच शिखरावर हा बांधलेला आहे. समुद्रसपाटीपासून ६१० मीटर
उंचीवरील पारगडाभोवतीचे जंगल नानाविध वृक्षराजींनी व जंगली जनावरांनी आणि
पशु-पक्षांनी भरलेले आहे. ह्या हिरवाईमुळे कोणत्याही तूत गडास भेट देता
येते. शिवकाळापासून किल्ल्यावर आजही वस्ती आहे. किल्ला चढून जाण्यासाठी ३६०
पायर्यांची एक अरूंद चढावाची वाट आहे. किल्ल्याचा विस्तार ४८ एकर
क्षेत्रफळाचा असून पूर्व, पश्चिम व उत्तरेला नैसर्गिक अशी ताशीव कडय़ाची
तटबंदी असून दक्षिणेला थोडय़ा उतारानंतर प्रचंड खोल दरी आहे. गडावर शिवकालीन
जीर्णोध्दारात झालेले भवानी माता मंदिर आहे. याशिवाय गडावर महादेव मंदिर,
मारुती मंदिरही आहे.
पारगडावर फेरफटका मारताना आपणास चार तलाव, शिवकालीन बर्याचशा मुजलेल्या स्थितीतील १८ विहिरी, दगडी तटबंदी, तटबंदी व त्यावरील अनेक ठिकाणी केलेले बुरुजाचे बांधकाम, काही समाधी स्थाने, शिवकालीन पाणी पुरवठा करणारी कुडे, तोफा इत्यादी ऐतिहासिक वास्तूंचे दर्शन होते. संपूर्ण गड व्यवस्थित फिरण्यास दोन तास पुरतात. गडावर मुक्काम करायचे ठरवल्यास भवानी मातेचे मंदिर किंवा येथील शाळेत त्याची सोय होवू शकते. इ.स. १६८९ मध्ये हा गड जिंकण्याचा मोगलानी अयशस्वी प्रयत्न करून पाहिला होता. १७४९ मध्ये कोल्हापूर छत्रपतींनी हा किल्ला इनाम-जहागीर म्हणून सदाशिवराव भाउंना दिला होता. पारगड जवळचा तिलारी धरण परिसर इको टुरिझम झोन म्हणून विकसित करण्याचे प्रयास सुरू आहेत.
तिलारी :-
आपल्यातल्या बऱ्याच जणांनी यापूर्वी तिल्लारी बद्दल बरच वाचलं असेल, लिहलं असेल, बऱ्याच जणांना तिल्लारी माहित देखील असेल. कोल्हापूर जिल्ह्यातल्या दक्षिणेकडील सीमाभागातील लोकांना हे ठिकाण जरूर माहीत असेल. पण हे सगळं असूनही तिल्लारी हे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यातल्या, कोल्हापूर शहरातल्या आपल्यातला खूपशा लोकांना माहीत नाहीय,
तसं बघायला गेल्यावर आपल्यातल्या बहुतांशी कोल्हापूरकरांना आजरा व गडहिंग्लज हे दोनच तालुके जास्त परिचयाचे आहेत. चंदगड म्हणाल तर दुर्गम, लांब आणि जंगली भाग असच चित्र आपल्याला माहीत आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील दक्षिणेकडील शेवटचे टोक म्हणजे चंदगड तालुका व याचे शेवटचे टोक म्हणजे तिल्लारी. महाराष्ट्र, गोवा आणी कर्नाटक या राज्यांना जोडणारा सीमावर्ती भाग. पश्चिमेकडे वाहणाऱ्या व सह्याद्रीच्या घाट माथ्यावर उगम पावणाऱ्या तिल्लारी नदीमुळे या भागाला तिल्लारी म्हणून ओळखलं जातं.
तुम्ही कोल्हापुरातून निघून गडहिंग्लज नेसरी मार्गे चंदगड मध्ये पोहचाल व तिथून पुढे तिल्लारीकडे मार्गस्थ व्हाल तेव्हा चंदगडची वेस पार केल्यावर निसर्गानं स्वतः च तुम्हाला 'वेलकम टू द जंगल' असं ग्रीट केल्याचा फील येईल. साधारणपणे २० किमी अंतर आहे चंदगड ते तिल्लारी. तिथून पुढं मग सुळे, हेरे, मोटनवाडी व पार्ले ही लहान लहान गावं लागतात. पार्ले क्रॉस केल्यावर पुढं रस्त्यावर कळसगादे हे गाव लागतं. साधारण २ ते ४ किमी च्या अंतरावर ही छोटी छोटी गावे लागतात. जेव्हा तुम्ही कळसगादे ओलांडून तिल्लारीकडे कूच करता तेव्हा मात्र इथून पुढं तुम्हाला जे जे काही दिसणार आहे ते ते खूप अवर्णनीय आणी अत्यंत विलोभनीय असणार आहे.
कळसगादे पार केल्यावर तुम्हाला रस्त्याच्या उजव्या बाजूला विस्तीर्ण असा सपाट प्रदेश दिसेल की जो पुढं पारगडकडे जातो. जसं की टेबल टॉप म्हणता येईल असा भाग. तर डावीकडे कलांनदीगडाचा उत्तुंग अन भव्य असा नजारा तुमच्या डोळ्यांचं पारणं फेडेल. याच्या बरोबर मध्ये सलग सगळा मोकळा रस्ता की जो तुम्हाला तुमच्या शहरी बेचैनीपासून दूर कुठंतरी शांत ठिकाणी घेऊन जाणार आहे. मग रस्त्याच्या दोन्ही बाजूला लहान लहान भाताची शेतं, नाचण्याची रोपं, गवताची कुरणं, जास्त मोठी नाही आणि जास्त लहान ही नाहीत अशी झुडुपं आणि झाडं, मागं फुटबॉल खेळायला पाहिजे तसं विस्तीर्ण मैदानी भूभाग असं सुंदर दृश्य दिसेल. मग पुढं गुळम्ब गाव लागेल ते पण छोटसं त्याच्या बाजूलाच मस्त अगदी नियोजितपणे वसलेली बैठी घरं दिसतील ती म्हणजे MSEB कॉलनी. जसं जसं तिल्लारी जवळ येईल तसं तसं इथल्या आल्हाददायक वातावरणामुळे तुम्ही तुमचा थकवा, मरगळ मागे सोडून द्याल. मग तिथून पुढं तुम्ही लगेच तिल्लारी चौकात पोहचाल.
तिल्लारीनगरच्या चौकातून एक रस्ता डावीकडं जातो त्याला मेन डॅम रोड म्हणतात. चौकातून मेन डॅम जवळजवळ १५ किमी अंतरावर आहे. हा सगळा पूर्ण रस्ता जंगलाकडनं जातो. रस्त्याच्या एका बाजूला पूर्ण घनदाट जंगल आणि दुसऱ्या बाजूला काही ठिकाणी लांब पसरलेले गवताळ पठार दिसेल. या पठारावर परत मस्त छोटी छोटी रंगीबेरंगी फुलांचं गालीचे तुमचं स्वागत करायला तयार आहेतच. मेन डॅम च्या रस्त्याला लागूनच जंगलातून एक कालवा गेला आहे. तिल्लारी डॅम मधून या कालव्याद्वारे पुढं कोदाळी गावच्या पिछाडीस असलेल्या फोरबे धरणात पाणी सोडलं जातं. मग हे पाणी पुढे वीज निर्मितीसाठी वापरले जाते. या पाण्याच्या कालव्याच्या आजूबाजूचं जंगल खूप घनदाट आहे. या कालव्याचा प्रवास थक्क करणारा आहे. मेन डॅम मधून येणार पाणी technically वॉटर हेड सांभाळून जलसेतुमधून तर कधी जमिनीच्या खालून बोगद्यातून असं सगळं जंगलं, दऱ्या डोंगर, चढ सखल अडथळे पार करत फोरबे डॅम पर्यंत आणलंय. पाण्याचा हा प्रवास पाहून वर म्हटल्याप्रमाणे नक्कीच थक्क व्हाल तुम्ही. कालव्याच्या बाजूने एक पायवाट टाईपचा छोटा रस्ता परत मेन डॅम कडे जातो. या रस्त्यावर तुम्हाला परत अगदी तुमच्या डोळ्यासमोर गवे, भेकर, कोळशिंद्याचे कळप, बिबट्या, अस्वल व इतर निशाचर प्राणी दिसतील. इथं खूप प्रकारच्या पक्ष्यांचा किलबिलाट तुमचं मन प्रसन्न केल्याशिवाय राहणार नाही. तुमचं नशीब जोरावर असेल तर तुम्हाला या रस्त्यावर वाघाची डरकाळी पण ऐकायला येईल आणी नशीब लय म्हणजे लईच जोरावर असेल तर कदाचीत तुम्हाला इथं हत्ती पण दिसतील. हे सगळं पाहताना, अनुभवताना, इथं मनसोक्त हिंडताना तुम्हाला या जागेचा, या ठिकाणाचा 'एक्स फॅक्टर' नक्कीच कुठंतरी जाणवेल तेव्हा तुमच्या तोंडून आपसूकच बाहेर पडेल, "कसलं भारी हाय राव हे सगळं".
मग चौकातून सरळ वर कालवा क्रॉस करून गेल्यावर कोदाळी हे छोटसं व सुंदर गाव लागेल. माऊलीचं दर्शन घेऊन तुम्ही जेव्हा पुढं घाटाकडे मार्गस्थ व्हाल तिथून तिल्लारीचा घाटरस्ता सुरू होतो त्याच्या जरासं अलीकडं उजव्या बाजूला विस्तीर्ण असं लहानमोठ्या झाडाझुडपांनी आच्छादलेलं पठार दिसेल तिथं तुम्हाला पावसाळा सरल्यावर अगदी कास पठारावर आहेत तसली रंगीबेरंगी फुलं दिसतील. मस्त कलरफुल छोटया छोट्या फुलांचं गालिचे पाहिल्यावर तुम्ही कास पठार कशाला पाहिजे, हाय हेच लय भारी व नादखुळा आहे असं स्वतःशीच नक्की म्हणाल. मस्त उंच सखल टेकडीसारख्या भागात उमलणारे हे गालिचे पाहताक्षणी तुम्हाला प्रेमात पाडतील. हे झालं उजव्या बाजूला तर याच्या बरोबर डाव्या बाजूला एक विस्तीर्ण असे पठार दिसेल. या पठाराच्या एक टोकाला रावतोबा पॉईंट आहे. सगळी खरं तर याला रातोबा पॉईंट म्हणतात. विरळ झाडीच्या या पठारावर गवताळ कुरणे पसरलेली आहे. संध्याकाळ झाली की या कुरणांवर चरण्यासाठी गवा-सांबरांसारख्या प्राण्यांचे कळप गर्द जंगलातून हळूहळू बाहेर पडतात व या रातोबा पॉइंटचा ताबा घेतात. तुम्ही जेव्हा जेव्हा या रातोबा पॉइंटच्या ठिकाणी जाल, तेव्हा तेव्हा अगदी ९९.९९% वेळेला तुम्हाला गव्यांचा एकतरी कळप दिसणार म्हणजे दिसणारच. पावसाळ्यात हा पूर्ण परिसर हिरवागार असतो. पाऊस सरल्यावर ऑगष्ट-सप्टेंबर महिन्यात ही दोन्ही उजवी डावी पठारे रंगीबेरंगी फुलांनी बहरून जातात.
आता डावी बाजू झाली, समोरची बाजू झाली आता तिल्लारीच्या चौकातून तुम्ही उजव्या बाजूस गेला तर तुम्ही ग्रीन valley रिसॉर्टकडे याल. इथे तुम्हाला मस्त खाणे पिणे राहण्याची उत्तम सोय तर मिळेलच पण त्याहून जास्त पुढची व्हॅली पाहून तुमच्या अंगावर रोमांच उभा राहील. खूप खोल व सदाहरित झाडांनी आच्छादित अशी ही दरी तुम्हाला महाबळेश्वर व इतर प्रसिद्ध ठिकाणांची आठवण करून देईल. व्हॅलीच्या बरोबर मधून उंचावरून कोसळणारा धबधबा व त्याचा पाण्याचा आवाज ऐकून त्याची भव्यता सहज लक्षात येईल. इथं पण तुम्हाला गवा, भेकर, सांबर व सामान्य माणसाने कधीच पाहिले नसतील असे विविध पक्षी दिसतील. नयनरम्य व आकर्षक असं हे व्हॅलीतलं दृश्य पाहून तुम्ही स्वतःशी नक्की म्हणाल, कुठलं महाबळेश्वर आणी कुठलं पाचगणी, भावा सगळं तर इथंच आहे अगदी आपल्या चरणी. पुन्हा इथपण तुम्हाला कायतरी वैशिष्ट्यपूर्ण असं वेगळेपण जाणवेल. वातावरणाचा आल्हाददायीपणा व सभोवतालचा स्वच्छंदपणा तुमचं मन नक्कीच प्रफुल्लित करेल.
बहुतांशी आपल्यातील बऱ्याच लोकांना आंबोलीतील कावळेसाद, साताऱ्याचे कास
पठार, पाचगणी, राधानगरीचे दाजीपूर, आंबा, महाबळेश्वर, कोकण ही टिपिकल
निसर्गरम्य ठिकाणे माहीत असतात. पण तिल्लारी याला अपवाद आहे, खरा निसर्ग जर
पाहायचा असेल अगदी unseen, untouched आणी unexplored तर तिल्लारी हेच
योग्य ठिकाणी आहे तेही अगदी आपल्या घराजवळ, आपल्या कोल्हापूरजवळ. 
तिल्लारीतला पाऊस म्हणाल तर नेहमीच मुसळधार बरसणारा दररोज जवळपास १०० मिमी च्या पुढेच. दिवसातले १६ ते १८ तास पडणारच पाऊस, उघडीप अशी फार फार तर ५-१० मिनिटांची. सामान्य माणसांना जीव अगदी मेटाकुटीला आणणारा असा हा पाऊस असतो. एकतर तो सदैव बरसत असतो म्हणजे जसं इंग्लिशमध्ये म्हणतात तसं 'Raining Cats and_Dogs' या टाइपचा. जसं शहरी भागात थोडासा जरी पाऊस पडला आणि उघडला की एक वेगळीच स्फुर्ती आणि उत्साह आलेला असतो. वातावरण लय भारी झालेलं असतं, तेव्हाचा पाऊस हा लय हवाहवासा असा वाटतो. वर्षाकाठी पडणारा जवळपास ५००० ते ६००० मिमी. पाऊस हेच दर्शवितो की निसर्गाने खूप खुश होऊन तिल्लारीला पावसाचं वरदान दिलंय. तर हे सगळं झालं पावसाचं.... पण आता या वरच्या सगळ्या स्वप्नवत गोष्टी प्रत्यक्षात अनुभवायच्या असतील तर या पावसाळ्यात नक्कीच "तिल्लारी" ला आलं पाहिजे. एकदा का तुम्ही इथं आलात की समजा तुम्हाला स्वर्गीय सुखाचा आनंद मिळालाच. तिल्लारीत तुम्हाला बघेल तिकडं नयनरम्य व विलोभनीय अशी दृश्य दिसतील....अगदी नजरेत सामावणारी आणी नजरेच्या पल्याडची पण...!!! असाच एक विलोभनीय व डोळ्यांचं पारणे फेडणारा पॉईंट म्हणजे स्वप्नवेल पॉइंट....म्हणजेच कोल्हापूरचे प्रती महाबळेश्वर....पावसाळयात हिरवळीने नटलेले नयनरम्य असं हे ठिकाण...जिथं साक्षात ढग जमिनीवर उतरतात.....जिथं प्रत्यक्षात धरती धुक्याची दुलई पांघरून घेते....आणी जिथं नभ धरतीचा अनोखा संगम पाहून आपण निसर्गाच्या प्रेमात पडतो. निसर्गाच्या या सर्व अनोख्या व अप्रतिम छटामुळे एक मस्त असं आल्हाददायक वातावरण स्वप्नवेल पॉईंटला तयार होतं....... इथल्या जंगलातून वाहत येऊन ओढयाचे पाणी कडयावरून कोसळते आणि दोन सुंदर धबधबे तयार होतात. हे दोन्ही धबधबे आपल्याला अप्रतिम नयनसुख देतात....दरीतील वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे यातील धबधब्याचे पाणी कधी कधी अक्षरशः उलट्या दिशेला ही फेकले जाते. म्हणजेच उलटा खालून वर वाहणारा धबधबा ही आपल्याला पाहायला मिळू शकतो. तसेच योगायोगाने कधी कधी आपल्याला एखाद्या जंगली प्राण्याचेही दर्शन होऊ शकते आणी या सर्वांसोबत पक्ष्यांचा मनसोक्त किलबिलाट हा कानावर पडतच असतो. स्वप्नवेल पॉईंट पाहून झाल्यानंतर आपणांस परत तिल्लारी चौकाकडे येऊन परत वर कोदाळीच्या दिशेने थेट सर्ज पॉईंटला जायला लागतं, मग इथं असलेल्या लष्कर पॉईंट व सनसेट पॉईंटला छान सूर्यास्त दर्शन घेता येतं व सुर्यास्तासोबतच गोव्याला जाणार्या नागमोडी वळणाच्या घाटाचे विहंगम हिरवगार दृश्य येथून तुम्ही पाहू शकता. मग घाटातून जेव्हा तुम्ही खाली निघाल तेव्हा अवघड अशी दोन तीन वळणे पार केल्यानंतर, जयकर पॉईंटच्या थोडसं अलीकडे डावीकडे तुम्हाला तुमच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा अविरत असा जलप्रपात दिसेल. एक असा धबधबा जो बघताक्षणीच बघणारा स्तब्ध होऊन जाईल. उंचच्या उंच असा सह्याद्रीचा कडा आणी त्या कड्यावरून कोसळणारा हा धबधबा व त्यापासून बाजूला हवेत उडणारे तुषार पाहिल्यावर अक्षरशः तुम्ही जागेवरून हलणार नाही. पण हा धबधबा आपल्याला फक्त पाहताच येतो कारण त्याच्याजवळ आपल्याला जात येत नाही. (आजपर्यंत कोणीच या नैसर्गिकरित्या तयार झालेल्या सुंदर धबधब्याचा उल्लेख केलेला नाहीय). तुम्ही जसं जसं घाट उतरत खाली याल तसं तसं घाटातून कोसळणारे असंख्य छोटे मोठे धबधबे तुम्हाला भिजायला आमंत्रण देतील. त्यातल्या त्यात जयकर पॉइंटच्या खालच्या बाजूला अगदी कोपऱ्यात कॉर्नरला ठाण मांडून बसलेला धबधबा पाहून एखादा सिनेमाचा सेट आठवेल तुम्हाला. इथं पण या धबधब्यात फोटो काढल्याशिवाय कोणीच पुढं जाणार नाही. इतका सौंदर्याने ओतप्रोत भरलेला असा हा जलप्रपात आहे. पूर्ण घाटात नाही म्हटलं तर जवळपास २८ ते ३० छोटे मोठे नैसर्गिक धबधबे तुम्हाला दिसतील. सोबत आजूबाजूच्या सह्याद्रीच्या रांगातून उगम पावणारे इतर जलप्रपात पण तुम्हाला खुणावतील._ घाटाचा प्रवास करून परत घाटमाथ्यावर आल्यावर इथं तिल्लारीत तुम्हाला सूर्यनारायणाचे दर्शन तर पूर्ण तीन चार महिने दुरापास्तच. जरा पण ऊन नाही आणि उन्हाशिवाय जीवन म्हणजे नकोच. वाऱ्याची जशी झुळूक येते तशी धुक्याची झुळूक येते, तुम्ही अक्षरशः त्या धुक्याला हात लावू शकता. जरा लांबून पाहिलं तर ढगांच्या आच्छादनात आपण उभे आहोत असा भास होतो. कधी कधी एवढं धुकं येतंय की कायचं दिसत नाही. डोळ्यासमोर सगळं पांढरं वातावरण. सह्याद्रीच्या उंची आणि घाटमाथा याचा पुरेपूर वापर जणू हे धुकं आपलं अस्तित्व दाखविण्यासाठी करून घेत असावं. तुम्ही तिल्लारीच्या घाटमाथ्यावर उभं राहून अक्षरशः धुक्याला आलिंगन देऊ शकता व सोबत असणारा उनाड वारा व खट्याळ पाऊस निश्चितच तुमचा जीव वेडापिसा करून सोडणार.
कसे जाल :-
कोल्हापूर
- गडहिंग्लज - चंदगड - तिल्लारीनगर (साधारणत: १३० ते १४० किलोमीटर )_ कधी
जाल :- वर्षाचे पूर्ण १२ ही महिने हा परिसर विलोभनीय सौंदर्याने नटलेला
असतो, पण पावसाळयात जास्त नयनरम्य व आल्हाददायक वातावरण असते....(जून ते
ऑगस्ट) पावसाळ्यातील स्वप्नवेल पॉइंटच्या पुढील मेन डॅम येथील धबधबा व डोह
खूप धोकादायक आहे, त्यामध्ये पोहणे/जाणे टाळावे. पावसाळी वातावरणामुळे बरेच
स्पॉट हे निसरडे, ओलसर व धोकादायक झालेले असतात त्यामुळे पाहताना पूर्ण
काळजी घ्यावी. 
कलानिधीगड :-
कोल्हापूर
जिल्ह्याच्या दक्षिणेस चंदगड तालुक्यातील आटोपशीर आकाराचा सुस्थितीतील तट,
बुरुज, देखणे प्रवेशद्वार, घनदाट जंगल व सोपी चढण असलेला आणि सहकुटुंब
पाहता येण्यासारखा हा डाेंगरी किल्ला आहे. सभासद बखरीनुसार हा किल्ला
शिवरायांनी बांधला आहे. गडावरील उंचीने ठेंगणी व उतरती, पसरट छप्परे असलेली
बैठी दोन मंदिरे वैशिष्टय़पूर्ण आहेत. दोन विहिरी एकत्र असलेले विहिर संकुल
आहे. हा किल्ला तसा दुर्लक्षित आहे, पण तो पाहण्यासाठी अलिकडे पर्यटकांची
गर्दी होत आहे.
महिपाल गड :-
चंदगड तालुक्यातील हा फारसा इतिहास ज्ञात नसलेला किल्ला. याला चंदगडप्रमाणेच बेळगावमार्गेही जाता येते. गडावर गावाची वस्ती असून गडावर थेट वाहनाने जाता येते. येथील प्रचंड विहीर, शिवरायांनी स्थापन केलेले अंबाबाई मंदिर, प्राचीन गुंफा पाहण्यासारख्या आहेत. येथून जवळ असलेला वैजनाथ मंदिर परिसर प्रसिध्द असून पंचक्रोशीचे तीर्थस्थळ आहे. येथील प्राचीन जोड मंदिर वैद्यनाथ व आरोग्य भवानी यांचे असून असून ते भव्य आहे. मुख्य मंदिराजवळ चवदार पाण्याचे दगडी कुंड असून तेथे जुने दत्त मंदिर आहे. गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायात या ठिकाणाचा उल्लेख असून त्याला दक्षिणेचे महाक्षेत्र म्हटले आहे. या मंदिर परिसराचे व्यवस्थापन कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवस्थानमार्फत चालते.
पुर्व विभागः-
कात्यायनी देवी मंदिर
एक आकर्षक ठिकाण: नानाविध प्राचीन मंदिरांमुळे कोल्हापूर हया श्री. क्षेत्राचा एक विवक्षित सांस्कृतिक प्रभाव आहे. देवी महालक्ष्मीच्या रक्षणार्थ महालक्ष्मी मंदिरासभोवती, इतर देवतांची मंदिरे सुरवातीला स्थापन केली गेली. पूर्वेकडे सिध्द बटुकेश्वर, पश्चिमेकडे त्रयंबोली, उत्तर दिशेला ज्योर्तिलिंग तर दक्षिण दिशेला कात्यायनी. ‘करवीर माहात्म्या’मधे हया देवतेचा उल्लेख आहे.
फार प्राचीन काळी कोल्हासूर राक्षसाने रक्तबीज नामक दैत्याला प्रस्तुत परिसराच्या रक्षणार्थ, इथेच ठेवले. या दरम्यान कोल्हासूराविरूध्द महालक्ष्मीने युध्द पुकारले आणि, रक्तबीजाचा नि:पात करण्यासाठी तिने भैरवाला पाठविले. पण त्याच्यावर वार करताक्षणी, त्याच्या रक्तातून अनेक दैत्य उत्पन्न होऊ लागले. त्यामुळे भैरव निष्प्रभ ठरू लागला. लगेच देवी महालक्ष्मीने कात्यायनीला पाठविले. तिने अमृत कुंड घडविला. रक्तामधून निर्माण झालेले भासमान दैत्य तिने त्या कुंडामधे ठेवले. भैरवाच्या सेनेचे पुनरूज्जीवन करून, कात्यायनीने रक्तबीजाचा नाश केल्याचा उल्लेख पुराण कथेमध्ये सापडतो. शिकारी, स्वाऱ्या इ. प्रसंगी, छत्रपती शाहू, राजाराम, व आक्कासाहेब या मंदिराला भेट देत असत, असे दफ्तरी बाडामधील ऐतिहासिक नोंदींवरून लक्षात येते. थकलेल्या, रोजच्या कटकटींनी ग्रासलेल्या कोल्हापूरवासियांसाठी, हे मंदिर म्हणजे, एक विसाव्याचे, विरंगुळयाचे रमणीय ठिकाण ठरते.
हे
कोल्हापूर जिल्ह्यातील कर्नाटक सीमेवरील तालुक्याचे मुख्य गाव आहे. या
गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. १५७२मध्ये या गावाची जहागिरी विजापूरचा
आदिलशाही सुलतान महंमदशाह याने राजपूत वंशातील पिराजीराजे (घाडगे) यांना
दिली. त्यांना एकूण ६९ गावांची जबाबदारी देण्यात आली होती. पिराजीराजांना
झुंझारराव या नावानेही ओळखले जायचे. कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू
महाराज यांचा जन्म कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यात जयसिंगराव आणि
राधाबाई या दाम्पत्याच्या पोटी झाला. चौथ्या शिवाजी महाराजांच्या अकाली
निधनानंतर ते कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले. महाराष्ट्र व कर्नाटकच्या
सीमेवरील या गावात काँग्रेसच्या संस्थापकांपैकी गोपाळ कृष्ण गोखले यांनी
आपले प्राथमिक शिक्षण घेतले. प्रसिद्ध साहित्यिक आनंद यादव यांचे हे
जन्मगाव आहे. या गावामध्ये सुंदर राममंदिर आहे. कागल येथे श्री छत्रपती
शाहू सहकारी साखर कारखाना आहे. तसेच येथे पंचतारांकित एमआयडीसी आहे. 
श्रीराम मंदिर, कागल
गांधीनगर :
हे ठिकाण कोल्हापूरच्या पूर्वेस १० किलोमीटर अंतरावर असून, मुख्यत्वे येथे कापडाची होलसेल विक्री होते. स्वातंत्र्यानंतर येथे सिंधी लोकांची मोठी वसाहत झाली. जन्मतःच उद्योगी असलेल्या सिंधी लोकांनी येथे जम बसवून व्यापाराचे केंद्र बनविले आहे. दक्षिण महाराष्ट्रातील व उत्तर कर्नाटकातील लोक येथे खरेदीला येतात. येथे सुमारे १२०० फर्म्स आहोत. अलीकडील काळात कापडाबरोबर रेडिमेड कपडे, फर्निचर, फुटवेअर, नाइटवेअर , अंडरगार्मेंट्स, इलेक्ट्रॉनिक होम अॅप्लिकेशन्स, गिफ्ट अँड नॉव्हेल्टी आयटम्स, प्लास्टिक मोल्डेड फर्निचर, घड्याळे, प्लायवूड, रंग, सिरॅमिक्स आणि कन्स्ट्रक्शन मटेरियल या नवीन उत्पादनांचीही बाजारपेठ येथे आहे. गांधीनगर येथे काही प्लास्टिक शीट उत्पादन कारखाने आहेत.
जयसिंगपूर : -
जयसिंगपूर हे तंबाखू व्यापार व उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. कोल्हापूरचे श्री छत्रपती शाहू महाराज यांचे वडील जयसिंगराजे यांचे नाव या शहराला देण्यात आले आहे. रेल्वे स्टेशनजवळ चार-पाच घरे असलेल्या ठिकाणी राजर्षी शाहूमहाराजांनी हे योजनाबद्ध, टुमदार गाव वसविले. या गावातील राम मंदिर अतिशय आकर्षक आहे. हे गाव शैक्षणिक केंद्र म्हणूनही ओळखले जाते.
इचलकरंजी :
हे
ठिकाण वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध असल्याने महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून
ओळखले जाते. विठ्ठलराव दातार यांनी १९०४मध्ये व्यंकटेश रंग तंतू मिल या
नावाने इचलकरंजीमध्ये पहिला यंत्रमाग कारखाना स्थापन केला. त्यानंतर
इचलकरंजी इंडस्ट्रियल इस्टेटची स्थापना कृष्णदेव साळुंखे आणि फुलचंदशेठ शहा
या दोन द्रष्ट्या नेत्यांनी केली आणि वस्त्रोद्योगाला सुरुवात झाली.
पूर्वी इचकरंजी सुती साड्यांसाठी प्रसिद्ध होते; आता साड्यांच्या बरोबरीने
सुटिंग व शर्टिंगही येथे बनविले जाते. हातरुमाल, परकर, सदरे, धोतरे असे
वस्त्रांचे अनेक प्रकार येथे तयार होतात. येथे अंदाजे एक लाखांच्या आसपास
यंत्रमाग आहेत. दररोज एक कोटी २५ लाख मीटर कापडाचे उत्पादन येथे होते.
येथील वार्षिक उलाढाल अंदाजे २५ हजार कोटी रुपये आहे. सध्या अनेक अडचणींवर
मात करून उद्योग टिकविण्याची किमया उद्योजक करीत आहेत. येथील बहुतेक
रहिवाशांचे आयुष्य पॉवरलूमच्या उबदार चक्राच्या भोवती फिरते, जणू त्यांचे
हृदय पॉवरलूमच्या ‘खटखट’वर चालत असते. इचलकरंजी हे पश्चिम महाराष्ट्रातील
सर्वांत वेगवान औद्योगिक क्षेत्र आहे. 
इचलकरंजी संस्थानचे मूळ
संस्थापक नारो महादेव हे होय. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात रत्नागिरी
जिल्ह्यातील वरवडेकर जोशी येथे आले. नारो महादेवांचे वडील महादेवपंत हे
सावंतवाडी संस्थानातील म्हापण गावच्या कुलकर्णीपणाचे काम करीत होते.
नारोपंत हे अवघे चार-पाच वर्षांचे असताना, त्यांचे वडील महादजीपंत
निवर्तले. त्यामुळे महादजीपंतांची बायको गंगाबाई आपल्या मुलाला घेऊन
उदरनिर्वाह करण्याकरिता घाटावर बहिरेवाडी येथे आली. प्रसिद्ध मराठा सेनापती
संताजी घोरपडे यांचे हे राहण्याचे ठिकाण होते. या ठिकाणी असताना
नारोपंतांच्या अंगचे विलक्षण गुण संताजींच्या नजरेस पडल्यामुळे संताजींनी
त्यांना आपल्या दिमतीला ठेवले. लिहिणे, वाचणे, घोड्यावर बसणे, निशाण मारणे
इत्यादी त्या काळच्या सर्व विद्या शिकविण्याची व्यवस्था लावून दिली.
नारोपंतांवर संताजींची बहाल मर्जी होती व नारोपंतांचीही संताजीवर अतिशय
भक्ती होती. ती इतकी, की नारोपंतांनी आपले मूळचे जोशी हे आडनाव बदलले व
आपल्या धन्याचे-संताजींचे घोरपडे हे आडनांव धारण केले. अद्यापही,
नारोपंतांचे वंशज ‘घोरपडे’ हेच आडनाव अभिमानपूर्वक आपल्या नावापुढे लावतात.
संताजीराव घोरपडे यांनी नारोपंतांना मिरज प्रांताच्या देशमुखी,
सरदेशमुखीची वहिवाट दिली होती. तसेच इचलकरंजी व अजरे हे गाव इनाम दिले
होते. १८७० साली नेटिव्ह जनरल लायब्ररी या नावाने सुरू झालेले आणि आता आपटे
वाचन मंदिर या नावाने ओळखले जाणारे येथील वाचनालय महाराष्ट्रातील अतिशय
जुन्या वाचनालयांपैकी एक आहे. 
हुपरी येथील चांदीची कारागिरी
हुपरी :
भारतातील रुप्याची नगरी (सिल्व्हर सिटी) म्हणून हे गाव ओळखले जाते. इ. स. १३००पासून या भागात चांदी कारागीर या व्यवसायात गुंतले आहेत. कोल्हापूरचे महालक्ष्मी देवस्थान प्रसिद्ध असल्याने सतत येणारे भाविक येथील दागिन्यांच्या मोहात पडले व बघता बघता हा उद्योग विक्रीबरोबर दागिन्यांचे उत्पादन करणारा झाला. कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या कारकिर्दीत या हस्तकलेला प्रोत्साहन मिळाले. कृष्णाजी रामचंद्र सोनार यांनी सन १९०४पासून या व्यवसायास खऱ्या अर्थाने दिशा दिली. आजच्या घडीला १००० कोटींचा व्यवसाय येथून चालतो. येथे चांदीच्या गाळण्यापासून निरनिराळ्या आकाराचे पत्रे, दागिन्यांसाठी आवश्यक साचे तयार केले जातात. रूपाली, सोन्या, गजश्री आणि गजश्री छुम छुम या चार पारंपरिक प्रकारच्या हुपरी पैंजणांना महिला वर्ग पसंती देतो. चांदीच्या मूर्ती देव्हाऱ्यात ठेवणे आता प्रतिष्ठेचे झाले आहे. भेटवस्तू देताना चांदीच्या वस्तूंचा वापरही आता मोठ्या प्रमाणावर होतो. गेल्या काही वर्षांपासून हुपरीसारखे छोटे गाव भारतातील चांदीच्या दागिन्यांचे केंद्र म्हणून अधोरेखित झाले आहे. कोल्हापूरच्या पूर्वेला २० किलोमीटरवर हे गाव आहे.
पट्टणकोडोली व वाशीच्या प्रसिध्द बिरदेव यात्रा
सौजन्य संदर्भ - दैंनिक पुण्यनगरी, कोल्हापूर
पट्टणकोडोली व वाशीच्या प्रसिध्द बिरदेव यात्रा-1 धनगरांचे कोल्हापूरपासून 10 कि.मी. अंतरावरील बिरदेव देवस्थान पश्चिम महाराष्ट्रातील बिरदेवाचे सर्वात मोठे मंदिर म्हणून प्रसिध्द आहे. या बिरदेवाच्या यात्रेस खूप मोठी गर्दी जमते. बिरदेवाच्या पालखी मिरवणुकीत सारा परिसर भंडार्याने रंगून जातो. या यात्रेतील फरांडेबाबांची भाकणूक अत्यंत प्रसिध्द आहे. येथील धनगर जमातीची ही यात्रा मात्र पूर्ण शाकाहारी असते. येथे पुरण पोळीचा नैवेद्य लागतो. जिल्ह्यातील कोल्हापूरपासून 6 कि.मी. अंतरावरील वाशी येथील बिरदेवाची यात्रा महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये येणार्या या यात्रेस राज्यातून मोठय़ा संख्येने धनगर लोक जमतात. त्यावेळी बिरोबासमोर हजारो बकर्यांचे बळी देतात. वाशी येथील धनगरी नृत्याच्या पथकांनी राज्य व देशपातळीवर नाव कमावले आहे. येथील घोंगडीही प्रसिध्द आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात धनगर समाज लक्षणीय असून त्यांच्या 22 पोटजाती आहेत. त्यापैकी मेंढय़ांचे कळप बाळगणारे आणि बकर्या, मेंढय़ा व लोकर विकणारे मेंढे धनगर आणि सह्याद्रीच्या डोंगराळ भागात राहणारे व गुरे चारणारे, गुरांचा व्यापार करणारे डांगे धनगर या दोन पोटजाती प्रमुख आहेत. डांगे धनगरांना औषधी वनस्पतींची चांगली माहिती असते. डोक्याला सर्वसाधारण रंगीत पागोटे, खांद्यावर घोंगडी, काखेत पिशवी, अंगाज जाड कापडाचा कुडता, पायात करकर वाजणारे धनगरी पायताण, कमरेस लंगोटी व हातात जाड काठी अशी वैशिष्टपूर्ण वेषभूषा असणारी ही कष्टाळू, काटक व अतिथ्यशील जमात. हातात चांदीचे कडे, कानात सोन्याची बाळी असते. स्त्रिया व मुलांच्या अंगावर चांदीचे बरेच दागिने असतात. या धनगर जमातीचे आराध्य दैवत म्हणजे बिरदेव.
३०० वर्षांपूर्वी महान साधक बाहूबलींनी ज्या जागी तपाचरण केले होते, तिथे ऋषी बाहूबलींच्या नावाने १९३५ साली एक ‘सेलेबसी रिसॉर्ट’ बांधण्यात आले. चार मनोऱ्यांची संगत असलेली त्यांची समाधी येथे आहे. गुरूदेव, सामंत भद्र महाराज १०८ वे यांच्या मार्गदर्शनाखाली, ७५ वर्षांपूर्वी, अनेक रिसॉर्टस् व शाळा बांधण्यात आल्या.
मूळनायक : भगवान बाहूबली यांची श्वेत-मूर्ती, ही जवळपास ८५० सेमी. उंच असून खड्गासनातील आहे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी : हे तीर्थ म्हणजे, अनेक तपस्व्यांची तपोभूमी आहे. दिगंबर सन्यास्यांच्या नुसार हे क्षेत्र एक ‘अतिशय क्षेत्र’ आहे. ३५० वर्षांपूर्वी, महान व ज्ञानी आचार्य, सामंतभद्रजी महाराज साहेब यांनी हया जागी अतिशय उग्र तपश्चर्या केली. हया टेकडीवर प्राचीन मंदिरे आहेत. पण सामंतभद्रजी महाराज साहेबांच्या धर्मकारणाच्या विद्यमाने बाहूबलींच्या नव्या मूर्तीची अलिकडेच प्रतिष्ठापना झाली.
इतर मंदिरे : हया मंदिराच्या आवारात कलात्मकतेने व सौंदर्यपूर्ण रीतीने बनविलेल्या सिध्दक्षेत्र आणि सामोवसरण यांच्या भव्य तसेच मनमोहक प्रतिकृती आहेत. हया टेकडीवर श्वेतांबर तसेच दिगंबर मंदिर आहे.
कला व शिल्पाकृती : जंगलातील टेकडयांनी वेढलेल्या हया परिसरातले हे मंदिर फारच सुंदर व रमणीय आहे. बाहूबलीची मूर्ती व प्रवेशद्वारावरील दोन गज-आकृती हया भव्य आणि विलोभनीय आहेत. समावोसरणांच्या रचनेतून कलात्मक कौशल्य प्रतीत होते. हया मंदिराला भेट देणा-या उपासकांचे हृदय भक्तीने उचंबळून येते.
कुंभोज :
हे जैनधर्मीयांचे तीर्थक्षेत्र आहे. इ. स. ११५६मध्ये भगवान बाहुबलीची सहा फूट उंचीची मूर्ती येथे स्थापित केली गेली. येथे अनेक जैन संतांनी भेटी दिल्यामुळे हे पवित्र ठिकाण मानले जाते. २५० वर्षांपूर्वी तपस्वी संत श्री बाहुबली महाराज येथे राहत असत. येथे प्रमुख जैन तीर्थस्थळांच्या प्रतिकृती दर्शनासाठी ठेवल्या आहेत. तसेच २४ तीर्थंकरांच्या मूर्तीही आहेत. मुख्य बाहुबलीची मूर्ती २८ फूट उंचीची असून, ५० पायऱ्या चढून जावे लागते. संध्याकाळच्या सुमारास हा परिसर खूपच सुंदर दिसतो. तीर्थप्रतिकृतींमध्ये उजव्या बाजूला गजपंथा, तरंगा, मांगी-तुंगी, सोनगिरी, पावगिरी व डाव्या बाजूला कैलास पर्वत, शिखरजी आणि गिरनारजी आहेत. तसेच मुख्य मंदिराजवळ जलमंदिर, रत्नात्रय मंदिर, शांतिनाथ मंदिर, चंदप्रभा मंदिर, आदिनाथ मंदिर आणि समावाश्रम मंदिरदेखील बांधले आहे. कुंभोजजवळ आदिवन शंकरी शाकंभरीचे मंदिर आहे. शिक्षणमहर्षी पद्मविभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांचे हे जन्मठिकाण आहे.
जैन तीर्थक्षेत्र बाहुबली
ही बाहुबलीची मूर्ती इ.स. ११५६ मध्ये शके १०७८ च्या वैशाख शुध्द दशमीस श्री १०८ श्रृतसागर मुनिराज यांच्या प्रेरणेने स्थापन झाल्याचा उल्लेख दिगंबर चैन तीथक्षेत्र डिरेक्टरीमध्ये मिळतो. सुमारे ३०० वर्षापूर्वी नांद्रे येथील बाहुबली मुनींनी येथे केलेली तपश्चर्या, १९२६ मध्ये तेथे झालेला चक्रवर्ती आचार्य शांतीसागर महाराज यांचा चातुर्मास, धर्मप्रेमी श्री कल्लाप्पा निखे यांनी घातलेला रत्नत्रय मंदिराचा पाया व त्यासाठी बांधलेली दुमजली चिरेबंदी भव्य इमारत या सर्व गोष्टीमुळे या भागात या पहाडाला जैन धर्मियांच्या दृष्टीने वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.
JAHAJ MANDIR (जहाज मंदिर) - JAIN SHIP TEMPLE - KUMBHOJ, KOLHAPUR, MAHARASHTRA, INDIA.
०१. जहाज मंदिर - समोरील फोटो - Photo by @Rohan10
भारतातील जैन मंदिरे खूप लोकप्रिय आहेत कारण त्यांची सुंदर रचना तयार करण्याची परंपरा आहे. "श्री बाहुबली" अतिशय क्षेत्रांचे जहाज मंदिर हे उत्तम कारागिरीचे आणखी एक उत्कृष्ट उदाहरण आहे.
०२. जहाज मंदिर- बाजूकडील फोटो - Photo by @Rohan10
मुख्य संकुलाच्या अगदी समोर श्वेतांबर जहाज मंदिर आहे. या जहाज मंदिराची स्थापना १९९३ मध्ये झाली आहे. जहाजाच्या आकारात बांधले गेलेले मंदिर संपूर्णपणे संगमरवरी कार्याने ५५ फूट उंचीवर भव्यतेने उभे केले आहे. जहाज मंदिर सुंदर लँडस्केप केलेल्या बागांनी वेढलेले आहे आणि चारही बाजूंनी विदेशी फुलांसह एक छान चालण्यासाठी मार्ग केला आहे. या बागेमध्ये फुले व झुडपांच्या मदतीने बऱ्याच देवी देवतांचे आकार साधले आहेत. त्यांच्याबद्दल माहिती सांगायला एक व्यक्ती तिथे असते. संध्याकाळी, संपूर्ण परिसर दिव्यांनी चमकून निघतो आणि कारंजे चालू केले जातात. या ठिकाणी फोटो काढण्यास मनाई आहे. येथील प्रवेश शुल्क ७ वर्षे व वरील व्यक्तींसाठी रु. १०/- व त्याखालील व्यक्तींसाठी रु. ०५/- आहे.
०३. मंदिराचा समोरील फोटो- Photo by @Rohan10
संग्रहालयाकडूनच जहाजाच्या वरती असलेल्या मुख्य मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. वरती मुख्य मंदिराकडे पोचल्यावर हवेशीर अशी जागा आहे. समोर "श्री बाहुबली" अतिशय क्षेत्र आणि भव्य डोंगर. तिकडून येणारी मोकळी हवा, जहाजाच्या मागच्या बाजूस असणारे शेत परिसर. असा हा छान परिसर अनुभवायला मिळाला.
०४. जहाज मंदिर
कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी हे एक प्रसिध्द तीर्थक्षेत्र आहे. नृसिंहवाडी म्हणजे दत्तसंप्रदायची राजधानीच. कोल्हापूरपासून सुमारे ४५ कि.मी. अंतरावर कृष्णा आणि पंचगंगेच्या पावन संगमावर हे क्षेत्र वसलेले आहे. कोल्हापूरहून जयसिंगपूरमार्गे नृसिंहवाडीस जाता येते. त्याचप्रमाणे कोल्हापूरहून इचलकरंजी-कुरूंदवाडमार्गेही वाडीस जाता येते. मुंबई, पुण्याहून येणाऱ्या पर्यटकांना मिरज अथवा सांगली येथे उतरून नृसिंहवाडीत येणे सोयीचे होते. मिरज-कोल्हापूर लोहमार्गावरील जयसिंगपूर रेल्वे स्थानकापासून १२ कि.मी. अंतरावर नृसिंहवाडी आहे.
श्री दत्तगुरूंच्या अवतारामुळे नृसिंहवाडीचा परिसर पावन झाला असून, त्यांच्या स्वयंभू पादुकांची पूजा अर्चा येथे अखंड सुरू असते. श्री दत्तगुरूंचे साक्षात तिसरे अवतार मानले गेलेले श्री नृसिंह सरस्वती यांनी औदुंबर वृक्षांनी बहरलेल्या या अरण्यभूमीत १२ वर्षे वास्तव्य केले व त्यांनीच हा परिसर सुफल करून सोडला.
अमरापूर या नावाने या क्षेत्राचा महिमा गुरू चरित्रात वर्णिलेला आढळतो. श्री नृसिंहसरस्वती औदुंबरचा चातुर्मास संपवून भ्रमंतीस निघाले असता संचार करता करता ते याठिकाणी येऊन पोहोचले. त्यावेळी या ठिकाणी औदुंबर वृक्षाची बनेच बने होती. दत्तभक्तांच्या आग्रहपूर्वक विनंतीवरून स्वामींनी आपले पुढील वास्तव्य येथेच केले. सुमारे १२ वर्षे नृसिंह सरस्वती स्वामींे वास्तव्य याच ठिकाणी होते व त्याचमुळे या क्षेत्राला नृसिंहवाडी अर्थात नरसोबावाडी असे नामाभिधान प्राप्त झाले. स्वामींनीच या ठिकाणी श्री दत्त पादुकांची स्थापना केली. या क्षेत्राला कृष्णा-पंचगंगेच्या संगमामुळे व औदुंबर वृक्षांच्या घनदाट छायेमुळे मुळातच एक प्रकारची प्रसन्नता आलेली होती. त्यातच स्वामींच्या वास्तव्यामुळे त्यात आणखीनच पावित्र्याची भर पडली, येथील आकर्षकता वाढण्यास मदत झाली.
नृसिंहवाडीचे क्षेत्र कृष्णा व पंचगंगा या दोन नद्यांच्या मधोमध सुमारे एक चौरस मैल परिसरात पसरले आहे. गावची लोकसंख्या सुमारे चार हजारापर्यंत आहे. कृष्णेच्या प्रशस्त अशा घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षाखाली सुंदर व मनोरम असे मंदीर आहे. मंदिरातच स्वामींनी स्थापन केलेल्या दत्तपादुका आहेत. वाडीहून गाणगापूरला जाताना योगिनींच्या आग्रहावरून स्वामींनी वालुकामय पाषाणाच्या या पादुकांची स्थापना केली. त्यावरील सततच्या अभिषेकाने त्या झिजत नाहीत. म्हणून त्याची घडण चंद्रकांत पाषाणाची असावी असे म्हणतात.
सांप्रत उभे असलेले मंदीर विजापूरला अदिलशहा या मुसलमान बादशहाने बांधले आहे. विजापूरच्या बादशहाच्या मुलीचे डोळे गेल्यामुळे तिला अंधत्व आले. तेव्हा बिदरच्या बादशहाच्या सांगण्यावरून बादशहा नृसिंहवाडीस आला. त्याने श्री गुरूंचे दर्शन घेतले व नवस बोलला. पुजाऱ्याने अंगारा दिला तो त्याने मुलीच्या डोळयाला लावला असता, तिला दृष्टी प्राप्त झाली. त्यामुळे बादशहा आनंदित झाला. त्याने कृष्णेच्या पैलतीरावरील औरवाड व गौरवाड ही दोन गावे देवस्थानच्या पूजेअर्चेसाठी इनाम दिल्याची नोंद आढळते. सध्या उभे असलेले श्री गुरुमंदीर विजापूरच्या मुसलमान बादशहाने बांधले असल्याने त्यावर कळस नाही, तर लांबट आकाराची उंच अशी वास्तू आहे आणि त्यासमोरच कृष्णेचा विस्तीर्ण घाट व कृष्णा नदी संथ वाहत आहे.
मधोमध श्रीगुरू ज्या औदुंबर वृक्षाखाली बसत असत तो वृक्ष आणि त्याखाली कृष्णा नदीसन्मुख त्या मनोहर पादुका आहेत व त्यापुढे थोडी मोकळी जागा आहे. त्याच ठिकाणी पुजारी बसतात व आतील गाभाऱ्यात पादुकांचे पूजन करतात. या गाभाऱ्याचे दार अतिशय लहान आहे. पादुका ज्या सभागृहात आहेत त्याच्या दर्शनी भागावर चांदीचा अलंकृत पत्रा मढविला आहे. मधोमध गणेशपट्टी, त्यावर आजूबाजूला मयूर व जय-विजय आणि त्यांच्या वरील बाजूस नृसिंह सरस्वती महाराजांची प्रतिमा उठवलेली आहे. पुजारी येथे आसनस्थ होऊन पूर्जा-अर्चा करतात, त्यांच्या एका बाजूला श्रीगणेशाची भव्य मूर्ती स्थापिली असून तिचीही पूजा होते.
या मंदिराभोवती मोठा गोलाकार मंडप असून त्याला चारही बाजूंनी उंच व विस्तृत खांब आहेत.
दत्तमहाराजांची तपोभूमी - श्री क्षेत्र नृसिंहवाडी
कृष्णा-पंचगंगेच्या संगमावरती वसलेले कोल्हापूर जिल्ह्यातील छोटेसे गाव नृसिंहवाडी. श्री क्षेत्र नरसोबावाडी म्हणूनही या देवस्थानाची ख्याती आहे. 'श्रीपादश्रीवल्लभ' हा श्रीगुरू दत्तमहाराजांचा पहिला अवतार तर 'नृसिंहसरस्वती' हा 'दुसरा अवतार' समजला जातो. दत्त महाराजांनी या ठिकाणी 12 वर्षे अर्थात एक तप तपश्चर्या केली आणि आपल्या पादुका स्थापन केल्या. त्यामुळेच या स्थानास महाराजांची तपोभूमी मानली जाते. याठिकाणी तपश्चर्या केल्यानंतर ते औदुंबर, गाणगापूर आणि त्यानंतर कर्दळीवनात गेले आणि त्याच ठिकाणी त्यांनी अवतारसमाप्ती केल्याचा पुराणात उल्लेख आढळतो. दत्त माऊलींच्या स्पर्शाने पुनित झालेल्या या क्षेत्राची ख्याती सर्वदूर पसरली आहे. दररोज हजारो भक्तगण महाराजांच्या पादुकाचरणी नतमस्तक होतात. दोन नद्यांच्या संगमामुळे विस्तारलेले नदीचे पात्र, संथ पाण्यामधील नौकाविहार, स्वच्छ-सुंदर घाट, नदीपात्राला लागून वसलेल्या मंदिरामध्ये सुरू असणारा घंटानाद, अखंड नामजप... असा माहोल भक्तगणांना भारावून टाकतो...
संथ वाहणार्या कृष्णा नदीच्या एक्कावन्न पायर्यांच्या घाटावर, मध्यभागी औदुंबराच्या शीतल छायेखाली दत्ताचे मंदिर आहे. येथे श्रीदत्तात्रेय भगवंतांनी स्वयंभू श्यामसुंदर मनोहर पादुकांच्या स्वरूपाने वास्तव्य केले आहे. या देवालयाचा आकार बादशाही थाटाचा अर्थात घुमटाघुमटांचा आहे. याहून विशेष म्हणजे श्रींच्या पादुकांवरील वस्त्रही त्याच रिवाजाचे आहे. याचाच अर्थ गुरूचरित्रात उल्लेख असल्याप्रमाणे सर्व जातीधर्माचे लोक याठिकाणी एकाच भावनेने एकत्र येतात. 'श्री नरसिंह सरस्वती' हा दत्तावतार संन्यासी स्वरूपाचा मानला जातो त्यामुळे येथील भक्तगण संन्याशी लोकांचे पूजन करून त्यांचे आदरातिथ्य करतात. श्रीजनार्दन स्वामींच्या आज्ञेवरून एकनाथ महाराजांनी याठिकाणी घाट बांधला आहे. हा घाट पाहण्याजोगा आहे. येथील साधुसंतांच्या समाध्या आणि छोटी-छोटी मंदिरे पाहताना मन प्रसन्न होते.
या मंदिराचे आणखी एक वैशिष्ठ म्हणजे केवळ त्रिकाळपुजेवेळीच मंदिरामध्ये झांज किंवा घंटा वाजते. इतरवेळी ही वाद्ये वाजवायची नाहीत असा नियम आहे. भक्तगणांना एकचित्ताने ध्यान, जप करता यावा, असे यामागचे कारण असावे. पौर्णिमेला हजारो भक्तगण दर्शनासाठी लोटतात. पंचक्रोशीतील लोक पायी चालत येऊन पादुकांचे दर्शन घेतात. शनिवार हा दत्तमाऊलींचा जन्मदिवस असल्याने शनिवारीही गर्दी होते. दत्तजयंतीच्या दिवशी तर लाखो लोकांची उपस्थिती असते. दत्तमाऊलींचे स्थान म्हटले की श्वान आलेच, त्याचप्रमाणेच याठिकाणीही श्वानांचा मुक्तसंचार असतो. भक्तगण त्यांना खाऊ-पिऊ घालतात. वाडीचे पेढे, कवठाची बर्फी आणि बासुंदी तर प्रसिध्दच आहे.
कसे जाल -
एस.टी मार्ग - मुंबई व पुणे येथून कोल्हापूर अथवा सांगली येथे येण्यासाठी थेट बसगाड्यांची सोय असून मुंबईपासून सुमारे 500 तर पुण्यापासून सुमारे 245 किलोमिटर अंतर आहे. कोल्हापूर अथवा सांगलीतून नृसिंहवाडीसाठी बसगाड्यांची सोय आहे. कोल्हापुर- 40 सांगली-25
रेल्वे - महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यात दक्षिण मध्य रेल्वे मिरज-कोल्हापूर विभागाच्या जयसिंगपूर स्टेशनपासून 15 किलोमीटरवर. मुंबई, पुणे, बेळगांव येथून येथून कोल्हापूरसाठी रेल्वेगाड्या आहेत.
विमान - मुंबई व पुण्यातून कोल्हापूर येथे विमानसेवा आहे.
नरसिंहवाडी
पुरातन काळी इथे घनदाट जंगल होते. नरसिंह सरस्वती स्वामी हे भगवान दत्ताच्या १६ व्या अवतारांमधील एक. कुरूंदवाड ही त्यांच्या तपश्चर्येची जागा. इ. सन १०३४ ते १९८२ या दीर्घ कालावधीमधे, रामचंद्र योगी, नारायण स्वामी, मौनी महाराज, टेंबे स्वामी, महादबा पाटील या तपस्वी जनांच्या समाधी ‘वाडी’ येथे बांधल्या गेल्या. हया ठिकाणी कृष्णा-पंचगंगेच्या संगमावरती असलेल्या मंदिरास ५०० ते ६०० वर्षांची परंपरा लाभली आहे.
नित्य उपासनेमधे सोन्याचा मुकुट मूर्तीला घालून, पाने ग्रहण करण्याचा विधी असलेली, रोज पहाटे होणारी ‘महापूजा’ पाहण्यासारखी असते. चातुर्मास वगळता रोज रात्री देवाच्या पालखीची मिरवणूक निघते. हया मिरवणूकीच्या पूर्वी निरनिराळया मंत्रांचे उच्चारण होते, तेंव्हाचे मंगल, धार्मिक वातावरण प्रभावशाली असते.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या ‘भक्त मंडळा’मार्फत, हया मंदिराची सर्व व्यवस्था ठेवली जाते. दत्त संप्रदायाच्या वस्तूंची दुकाने तसेच मिठाईची दुकाने नरसिंहवाडीला आहेत. पैठण प्रमाणेच या ठिकाणचा घाट देखील संत एकनाथांनी बांधून घेतला. कान्यगत अवसर असताना, तसेच प्रत्येक पौर्णिमेस इथे जत्रा भरते. हे ठिकाण कोल्हापूरपासून, ४० किमी. वर आहे. आदिलशहा भाविक होता, व त्याने अनेक भू-भाग दान केल्याविषयी माहिती इथे सापडते. दरवर्षी १० लाख भाविक या जागेस भेट देतात. इथे ग्राम पंचायत असून, दळणवळणाची सुविधा आहे.
कोल्हापूर
शहरापासून हे गाव ५५ किलोमीटरवर आहे. कुरुंदवाड हे पटवर्धन सरदारांचे गाव
असून, नरसोबाच्या वाडीपलीकडे (नृसिंहवाडी) हे गाव पंचगंगा व कृष्णेच्या
संगमावर वसले आहे. येथील राजवाडा, रघुनाथराव पटवर्धन यांनी बांधलेला घाटही
प्रेक्षणीय आहे. पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमावरील सुब्रह्मण्येश्वर
महादेवाच्या समोर संताजी घोरपडे यांची समाधी आहे. येथे संताजी घोरपडे
यांच्या अस्थींचे रक्षाविसर्जन केले गेले. संताजी घोरपडे यांची म्हसवडजवळ
कारखेल गावात हत्या करण्यात आली होती. पटवर्धन घराण्याचे मूळ पुरुष हरिभट
यांचे तिसरे पुत्र त्र्यंबक ऊर्फ अप्पा हे कुरुंदवाडचे संस्थापक. राणोजी
घोरपडे यांनी त्र्यंबक पटवर्धन यांच्याकडून कर्ज घेतले होते. कर्जाच्या
परतफेडीत राणोजीने कुरुंदवाडची आपली जमीन १७३३ साली पटवर्धन यांच्या नावाने
केली. या गावातील पं. विष्णुपंत मोरेश्वर छत्रे यांनी आशियातील पहिली
सर्कस स्थापन केली. (प्रो. छत्रे यांच्याबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक
करा.) तसेच भारतातील संगीत परंपरा जोपासणारे पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर
यांचे कुरुंदवाड हे जन्मगाव आहे.










कोल्हापूर.कलानगरी.मी इथे गेलो आणि हरखून गेलो.मुख्य कारण मला येथे भेटलेली माणसे.जी काही भ्रमंती केली आज पर्यंत त्यात कोल्हापूरकर अतिशय आवडले.निदान मला तरी त्या तीन दिवसात अतिशय चांगली माणसे मिळाली.आपुलकीने वास्तपुस्त करणारी.काही माहिती विचारली तर लगेच मदत करणारी.जशी आधी पासूनची ओळख आहे अशी वागणारी.
महालक्ष्मी मंदिरामागे माउली लॉजवर उतरलो होतो.तिथले मालक आणि त्यांचे व्यवस्थापक श्री.काणे यांनी कोण कुठले याची चोकशी केली.मग म्हणाले आमच्या ओळखीचा रिक्षावाला देतो योग्य दरात तुम्हाला ठिकाणे दाखवील.मग रिक्षावाले बाबासाहेब भेटले.''साहेब उद्या बरोबर आठला तयार राहा.मी येतो''.मग दोन दिवस या माणसाने मला सर्व ठिकाणे जी मला पहायची होती ती आणि काही अशी जी सगळे लोक पाहतातच असे नाही,कारण त्यांना माहीतच नसते.तर ती ठिकाणे मला या बाबासाहेबांमुळे पाहता आली.
त्यात शिवालय-कैलासगडाची स्वारी मंदिर.या मंदिरा बाहेर बावीस फुटी अश्या दोन समया,दाराबाहेर बसलेला पितळयाचा एक टनी भरीव नंदी.पितळ्याची नक्षीकामयुक्त दारे.आत चांदीची सजावट.आणि गाभार्यात लावली आहेत चत्रा चित्र महर्षी कांबळे यांची तैल चित्रे.श्री कांबळे यांच्याबद्दल रिक्षावाल्यानी माहिती दिली ती ज्यांना माहित नाही त्यांच्याकरता देत आहे.कांबळे देवळात जात नसत.म्हणजे देव देव करणारे नव्हते.त्यांना शिवाजी महाराजांचे चित्र काढायचे होते पण राजा ना तर पहिले नाही मग कसे काढावे?या विचारात होते.त्यांना कुणी स्नेह्याने इथे आणले आणि सांगितले या देवाचा आशीर्वाद घे काही तरी नक्कीच सुचेल.त्यांनी पिंडीला हात लावून नमस्कार केला तर त्यांना ती थोडी नरम म्हणजे कुणा माणसाच्या त्वचे सारखी जाणवली.मग ते इथे नेहमी येऊ लागले.



एक दिवस त्यांना स्वप्नात देवाने सांगितले तुला राजांचे चित्र काढायचे आहे आणि त्यांना तू पहिले नाहीस म्हणून अडलंय न मग बघ असे होते राजे.आणि त्यांना शिवाजी महाराज दिसले.त्यांनी लगेच चित्र काढले,लोकांना खूप आवडले.कालांतराने सरकारला पाठ्य पुस्तकात आणि सरकारी कचेर्यात लावायला राजांचे चित्र हवे होते.कोल्हापूरवासियांनी यांचे चित्र आग्रहाने पाठवले.अनेक चित्रात ते निवडले गेले.पण सरकारने यांना म्हटले कि हे चित्र आम्ही एका डच कलाकाराने राजाना समोर बसवून काढलेले चित्र आहे हॉलंड येथे त्याच्याशी जुळवून पाहू मग घेऊ.आणि दोन्ही चित्रे अगदी जुळली.मग सरकारने यांना काही कोट रुपये रोयलटी म्हणून देऊ केले ते यांनी घेतले नाही.म्हणाले मी राजाना पहिले नाही देवाने दाखवले मी कसे पैसे घेऊ.आपण पुस्तकातून पाहतो ते राजांचे चित्र इथे आहे.


एक महाभारतातील गीता सांगितली तो विश्वरूप दर्शन प्रसंग आहे त्यात रथाचे चित्र कांबळे यांनी काढलेले लावलाय. यातील रथ जसे आपण पुढे मागे होतो तसा आपल्याकडे फिरताना दिसतो.राज्याभिषेक प्रसंगाच्या चित्रात प्रत्येक माणूस स्पष्ट दिसतो आणि फक्त मासाहेब आपल्या हालचाली बरोबर मान फिरवताना दिसतात.तीच गोष्ट शंकराच्या गळ्यातील नागाची.जरूर पाहून या.या कांबळेचे सुपुत्र नेमके तेव्हा आले.रिक्षावाल्यांनी ओळख करून दिली.लगेच तो माणूस मला घरी घेऊन गेला.त्यांनी काढलेली चित्रे दाखवली.अगदी वडिलांसारखेच प्रतिभावान.खूप बोलले.मुघले आझमची पोस्टर कांबळे यांनीच काढली होती.


ती पाहायला राणी विक्टोरिया सुद्धा थबकून पाहत राहिली असे कळले.मग आणखी एक मंदिर पहिले.याचे वेगळेपण म्हणजे नंदी आत आणि शंकर बाहेर आहे.आणि गुरुचरित्रात कथा आलीय.त्या घरात गेलो.दोन्ही ठिकाणी त्यांचे वंशज भेटले.एक शिरोळ आणि वाडी समोर पलीकडे छोटे घर आहे तिथे आजी आजोबा आहेत.या दोन्ही घरात दत्तात्रयांनी दिलले शिवलिंग आणि हाताचा ठसाआहे.ठसा शिरोळ आणि लिंग वाडी समोरील तीरावर.
Kumbhoj Bahubali
Day 1: Pune > Siddhagiri > Stavnidhi > Kothali > Khidrapur > Kuntugiri
Day 2: Kuntugiri > Ramlingh Tirth > Ichalkarnji > Kumbhoj
Day 3: Kumbhoj > Audumbar > Pune
Clocked 700+ KMs
How to reach: It’s on Kolhapur to Sangli highway. Take a left turn from Hatkalagne ST Stand and its about 6/7 kms.
Time of visit: May 2011, Dec 2005
After a huge round of shopping in Ichalkarnji we reached Kumbhoj in later afternoon. Had a late lunch in new bhojnalaya.
It is said that the name Kumbhoj seems to be connected with well-known ancient term Kamboja of Sanskrit/Pali literature. The main temple has a grand idol of Bhagwan Bahubali. It is situated on about 50 steps up and placed on a 28 feet high promontory.
The temple complex is huge one with school, residential hostel and dharmshala inside. There is a also modern Bhojnalaya built recently. There is huge parking facility.
Apart from these several models of temples of pilgrimage neatly built are truly worth seeing.
Just behind this on the hill about 400 steps up is another temple complex which houses various idols. Theres also a Shwetambar mandir in this complex.
Behind the complex is a historic Bhuabali idol. This artistic 6 feet high Satishaya idol of Bhagwan Bahubali was founded in Khak Samvat 1079. The surroundings near this idol are extremly pleasant if you are here in the evenings. With cool breeze its very beautiful to sit here for few hours...
Just outside the main complex is Shwetambar Jahaj Mandir. This beautifully architected temple in a Ship surrounded by well maintained lush Garden with a nice walkway with flowers all around. In the evening ata round 7 PM it looks beautiful when lightings and fountains are turned on.Since it was getting late we decided to stay back in Kumbhoj and proceeded to Audumbar next day.
http://ekpravas.blogspot.com/2011/05/kumbhoj-bahubali.html
Ramlingh Tirth
Day 1: Pune > Siddhagiri > Stavnidhi > Kothali > Khidrapur > Kuntugiri
Day 2: Kuntugiri > Ramlingh Tirth > Ichalkarnji > Kumbhoj
Day 3: Kumbhoj > Audumbar > Pune
Clocked 700+ KMs
Where: Near Ichalkaranji, off Hatkalgne (Around 30 KMs from Kolhapur)
How to reach: There’s diversion on on Kolhapur to
Sangli highway. Follow the road signs. It is few kms ahead of Kuntugiri
somewhat at the hill top.
Time of visit: May 2011
This
is a very old temple in the foothills of Alate. It is said that Lord
Shri Ram had been to this place in his 14 years if exile. The water
pours continuously on the shivlingh which is situated in the Cave.
There is small pond in front of the temple. The architecture of
the this temple resembles to that of Ratta and Chalukyan Period and
there is a Jod Nandi [Twin Cow] idol at the entrance of the cave.
There some historic carvings of idols and some inscriptions too.
Ichalkaranji
Day 1: Pune > Siddhagiri > Stavnidhi > Kothali > Khidrapur > Kuntugiri
Day 2: Kuntugiri > Ramlingh Tirth > Ichalkarnji > Kumbhoj
Day 3: Kumbhoj > Audumbar > Pune
Clocked 700+ KMs
How to reach: Its on Kolhapur to Sangli highway. Take a Right turn from Hatkalagne and its about 4-5 kms.
Time of visit: May 2011
What to do: Checkout- D.K.T.E. Society's Textile & Engineering Institute- Rajwada and SHOPPING
Ichalkaranji is situated some 30 kms from Kolhapur on the banks of river Panchaganga. It was ruled by the Ghorpade dynasty for the last two centuries. The development of decentralized textile industry as well as the co-operative movement in this town has a long and interesting history.
The palace belonging to Shri Narayanrao Babasaheb Ghorpade which is now converted to an engineering institute named Dattajirao Kadam Textile and Engineering Institute Ichalkaranji (DKTEI) is worth watching.
The city is well known for its textile industry. We did some shopping. Lot variety especailly in unstiched clothes was available. Somehow it seemed the temperature was low compared to Sangli side.
Shri Kshetra Kuntugiri
Day 1: Pune > Siddhagiri > Stavnidhi > Kothali > Khidrapur > Kuntugiri
Day 2: Kuntugiri > Ramlingh Tirth > Ichalkarnji > Kumbhoj
Day 3: Kumbhoj > Audumbar > Pune
Clocked 700+ KMs
Where: Near Ichalkaranji, off Hatkalgne (Around 30 KMs from Kolhapur)
How to reach: It’s on Kolhapur to Sangli highway.
Time of visit: May 2011, 2006
Reached in the picturesque and tranquil surroundings by late evening. Luckily the bhojnayala was still thankfully open and he served tasty Dal-Bhati. Amazing in early May when the atmosphere was roaring above 35C the place was very cool with continous strong winds.
The
dharmashala is a L shaped building with 2 floors and cleans rooms. In
night we had to close windows but scary noise of wind kept us awake for
some time but the glided into peaceful dreams. Woke early morning to
catch sunrise with peacocks melodious voices in background adding to the
charm. Through window we could locate few peacocks on the hill behind.
This
place is situated at foot hills of lush green mountains. The temple
complex is beautiful with a central parking and management office in
front and a beautiful garden beside it. On the left behind the
management office is a huge dharmashala and 2 bhojnalaya while the main
temple is on extreme right behind the garden.
The marble temple complex is grand one and white glowing temple stands out in green tranquil surroundings.
The Garden is complete with Fruit and Flower section on one side- I
could locate Mango (Amrai), Guavava, Aavla, Papayya, Chikko,
Pomegranate among many trees. The main garden has play area for children
dotted with palm trees. All over place there are flowering plants like
sadafuli, mogra, roses etc.
Behind the main temple complex lies the beautiful status of Gometeshwara.
http://ekpravas.blogspot.com/2011/05/shri-kshetra-kuntugiri.html
Kothali (Shantigiri)
Day 1: Pune > Siddhagiri > Stavnidhi > Kothali > Khidrapur > Kuntugiri
Day 2: Kuntugiri > Ramligh Tirth > Ichalkarnji > Kumbhoj
Day 3: Kumbhoj > Audumbar > Pune
Clocked 700+ KMs
Shantinath Digmbar Jain Temple
Where: 8 Kms Off Nipani, Taluka. Chikodi (Around 50/55 kms from Kolhapur)
How to reach: 5-6 Kms before Stavndi take a right
into Nipani Village. Pass Pattankuddi and Kuthali village and Proceed
to Kothali. The Roads were in bad shape when I visited. Also the road
sign are all in local language.
Time of visit: May 2011, 2006
Lodging-Boarding facilities are available
(On the way fro Nipani- View of Pattankudi village)
From
Sidhagiri Museum we proceed to Tavndi. After Darshan we proceed to
Kothali. It is the birth place of one of the revered Jain saints called
Acharya Deshbhushan Maharaj.
This is a huge temple complex on the top of hill built in late seventies.
There
is a 21 feet high statue of Bhagvan Shantinath in standing posture with
idols of 19 feet high Bhagvan Chnadraprabhu and Bhagvan Mahavir on
either side.
Samvasaran Mandir: It is housed in a 20 feet hall with colored glasswork depicting the creation of Samvasaran.
Nandishwar Mandir: It is housed in a 30 by 30 feet hall having 5
artificial hillocks having 52 idols of brass in Padamasan postures.
Lotus
temple: it is an octangular hall where the idols of 24 Tirthankars are
installed. The Mulnayak of this temple is Bhagwan Padamparbhu in the
center in standing posture. The other 23 tirthankars are in padamasan
postures. (4) 17 feet High marble idol of Bhagwan Parsvanath with shade
of 7 hoods on a lotus seat under the open sky.

































































































































































































































































No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.