य़लोस्टोन व ग्रँड टिटाँन - एक अदभूत सफर
यलोस्टोन व ग्रँड टिटाँन ही दोन नँशनल पार्क बघण्याचा बरेच दिवस विचार चालू
होता. शेवटी गेल्या महिन्यात हा योग आला. भारतातून आलेले पाहुणे
आमच्याबरोबर होते. आमच्याकडे ३ दिवस व चार रात्री एवढाच वेळ होता.
त्यासाठी बराच विचार करून ही ट्रीप आखली आणि भरपूर गोश्टी बघितल्या.
तुमच्याकडे जर असाच कमी वेळ असेल तर तुम्हाला या माहितीचा उपयोग होईल. इथे
इतके निसर्गाचे चमत्कार आहेत की ते तुमच्याशी शेअर करावेसे वाटले.
यलोस्टोन हे अमेरिकेतील पहिले नँशनल पार्क. १८७२ मध्ये ते सुरू झाले.
मोन्टँना, वायोमिंग व आयडाहो स्टेट ची बाँर्डर याला लाभली आहे. जगातल्या
सर्वात मोठ्या ज्वालामुखीवर ते वसलेले आहे. ज्वालामुखीची इतर ठिकाणे समुद्र
किंवा डोँगर अशा जागी आहेत पण ह्या ज्वालामुखीच्या बाजूला सगळी जमीन आहे,
हे त्याचे वेगळेपण आहे. इथला व्होल्कँनिक खडक rhyolite आहे ज्यात सिलिका
भरपूर प्रमाणात आहे.
हा
पार्क चा नकाशा आहे ज्यावर अंतरे व ठिकाणे दाखवली आहेत. इथे स्पीड बराच
कमी असतो हा लक्षात ठेवावे. वाटेत खाणे गँस याची सोय छान आहे. सिझनच्या
सुरूवातीला वा हवा बिघडल्यास रस्ते तात्पुरते बंद करतात.
वेस्ट यलोस्टोन मध्ये राहिल्यास मध्यवर्ती पडते हे नकाशावरून लक्षात येइल.
या पार्कच्या वेबसाइटवर भरपूर माहिती दिली आहे ती जाण्यापूर्वी वेळ काढून
जरूर वाचा.
थर्मल फिचर्स - जगातील सर्वात जास्त थर्मल फिचर्स या गायजर बेसिन मध्ये आहेत. ३०० पेक्षा जास्त गायजर्स इथे आहेत. गरम पाण्याचे झरे, वाफेची कुंडे भरपूर आहेत.

![]() |
| ओल्ड फेथफूल दर ९० मि ने उडतो. |
- गायझर - यासाठी उष्णता, पाणी, प्लंबिंग सिस्टीम व खडकातील फटींची गरज असते. खडकातून पाणी आत झिरपते. आत खूप जास्त उष्णता असल्याने पाणी उकळते. उकळत्या पाण्यमुळे खडकातील सिलिका बाहेर पडते व सिमेंट पाईप सारखे बारीक पाईप तयार होतात. या गोष्टीला बरीच वर्षे लागतात. वरून पावसाचे, बर्फाचे पाणी आत साठते. साठलेल्या पाण्याचे प्रेशर त्यात भर घालते. उष्णतेमुळे पाणी उकळून वाफ तयार होते व ती पाण्याला वर खेचते. अगदी सरफेसजवळ वाफेच्या खूप प्रेशरमुळे पाणी उंच उचलले जाते व हवेत उडते. प्रेशर कमी झाल्यावर इरप्शन थांबते. ओल्ड फेथफुल हा इथला सगळ्यात प्रेडिक्टेड गायझर. याचे कारण म्हणजे तो थोडा लांब आहे इतरांपासून म्हणून त्याच्या प्लंबिंग सिस्टीम मधे फारसा बदल होत नाही.
ग्रँड प्रिझमँटिक स्प्रिंगचा हा एरिअल व्ह्यू. सगळ्यात मोठा स्प्रिंग. याचा फोटो काढायचा असेल तर बाजूच्या टेकडीवर जावे लागते. लांबचा ट्रेक आहे पण वरून छान दिसते. आम्ही पार्ट बाय पार्ट फोटो काठावरून काढले.रूंदी व खोली दोन्हीत याचा पहिला नंबर आहे.
- मड पाँटस ही या पार्कमधील अँसिडिक फिचर्स आहेत. जिथे पाणी कमी असते तिथे ही दिसून येतात. काही मायक्रोब्स हायड्रोजन सल्फाइड एनर्जी म्हणून वापरतात. ते या गँसचे विघटन करून सल्फ्युरिक अँसिड बनवतात. हे अँसिड कडेच्या खडकाचे रूपांतर मातीत करते. या अोल्या मातीतून बरेच गँसेस बाहेर पडतात त्यामुळे बुडबुडे दिसतात. पाण्याचा साठा व हवामान यावर याची कन्सिस्टन्सी अवलंबून असते.

- फ्युमारोल्स जिथे पाणी कमी असते तिथे आतील उष्णतेमुळे त्या पाण्याची वाफ होते व ती बाहेर पडते. कधी कधी त्यातून आवाज येतो. जो एका डोंगरावर नीट ऐकता येतो. हिसिंग माउंटन वर तो ऐकता येतो.

या एरिआत आले की एकदम रहस्यमय वाटायला लागते. वाफ येत असते मधेच पाणी उडत असते. वेगवेगळे आवाज व वास यात असतात. डोळे, नाक कान सगळे बिझि असतात.
इथल्या फायरहोल रिव्हर मध्ये एवढे गरम पाणी व सिलिका मिसळते की ती थंडीत गोठत नाही.
काँटिनेंटल डिव्हइड- ही लाइन पाण्याच्या प्रवाहाची दिशा ठरवते. घराच्या कौलावर पडलेले पाणी जसे २ भागात वाहून जाते तसेच काँटिनेंटल डिव्हइड पाण्याची विभागणी करतो. ही लाइन डोंगरमाथे ठरवतात. यलोस्टोन मध्ये या डिव्हाइडच्या उत्तरेला पडलेला स्नो. पाउस हा झरे, नदी च्या रूपात अँटलँंटिक ओशन ला मिळतो तर साउथचे पाणी पँसिफिक ओशनला मिळते. काही झरे असे आहेत की त्याचे पाणी दोन्हीकडे जाते कारण ते लाइन क्राँस करतात.
लाँगपोल ठ्रीज - सध्या पार्कात या प्रकारची झाडे ८० टक्के आहेत. त्याच्या उंचीवरून हे नाव पडले आहे. वाटेत ठिकठिकाणी ही झाडे पडलेली दिसतात. ती न उचलता तशीच डिकंपोज होउ देतात. नवीन झाडे पण खूप दिसतात. त्याची लागवड रेंजर्स करत नाहीत तर नटक्रँकर नावाचे पक्षी करतात. ते आपल्या घशात डझनभर पाइन कोन्स ठेवू
शकतात.उडताना वाटेत काही पडतात. हिवाळ्यासाठी हे कोन पक्षी जमिनीत लपवून ठेवतात. थंडीत त्यांना ते परत बरोबर सापडतात. त्यांनी खाउन जे उरतात त्यात नवी लागवड होते. अस्वले पण हा मेवा शोधून खातात. याशिवाय काही कोन्स झाडांना चिकटवल्यासारखे असतात. मेणासारख्या पदार्थाने ते चिकटलेले असतात. जंगलात जेव्हा आगी लागतात तेव्हा वरचे आवरण वितळते व ते बाहेर येतात. किती योजनाबद्ध रीतीने लागवड होते पहा....
वन्यजीवन - या पार्क मध्ये माउंटन गोट, बायसन, कोल्हे, अस्वले, मूस, हरिणे दिसतात. आम्हाला अस्वल मात्र बघायला मिळाले नाही. त्यासाठी लमार व्हँलीत अगदी सकाळी किंवा अंधार पडताना जावे लागते. अधूनमधून ट्रँफिक जँम करायला या प्राण्यांना आवडते.
ग्रँड कंनिय़न अाँफ यलोस्टोन
पूर्वी पेंटर्सनी इथली चित्रे काढून काँंग्रेस मध्ये प्रेझेंट करून इथे पार्क करायचा आग्रह धरला होता. कलाकारांचे असेही योगदान महत्वाचे आहे.
पेट्रीफाइड फाँरेस्ट पूर्वी या ठिकाणी वेगळ्या प्रकारची झाडे होती. आता जास्त करून लाँगपोल ट्ीज दिसतात. या गोष्टीचापुरावा हे फांरेस्ट देते. व्होल्कँनिक अँशखाली, चिखलाखाली बरेच वर्षापूर्वी ही झाडे गाडली गेली. अाँक्सिजनची कमतरता व झाडांनी शोषलेले सिलिका यामुळे या झाडांचे फाँसिल्स बनले. आता इरोजन मुळे जेव्हा वरचे लेअर्स निघाले तेव्हा ही झाडे दिसली व लाखो वर्षापूर्वींचा इतिहास डोळ्यापुढे आला. जवळपास १०० जाति इथे दिसल्या आहेत. याचा एक नमुना आम्ही मँमथ व्हिजिटर सेंटर च्या बाहेर पाहिला. आता कुंपण घालून ठेवले आहे कारण लोकांनी तुकडे पळवायला सुरूवात केली.
| लेक मध्ये असे गरम पाण्याचे गायझर्स दिसतात. |
याच्या बाजूला वेस्ट थंब गायजर्स आहेत. वरती लेकचे गार पाणी व खाली गरम पाण्याचे झरे दिसतात. अगदी खोल हिरवे निळे पाण्याचे पूल इथे दिसतात.
| रंग व पँटर्न्स |
| टाँवर फाँल |
| लाव्हाने बनलेले काँलम्स |
![]() |
| लोअर फाँल विथ ग्लेशिअर |
| बायसन कळप |
| खोल स्प्रिंग वेस्ट थंब गायझर बेसिन |
| हिरवाई |
![]() |
| फायरहोल धबधबा |
| बोर्डवाँकवरून दिसणारी वाफ |
काही टिप्स....
- शक्यतो वेस्ट साइडला हाँटेल चे बुकिंग करावे. आत मिळाले तर उत्तम पण ते वर्षभर आधी करावे लागते. शेवटच्या दिवशी टिटाँन बघून तिथे मुक्काम करावा . यात खूप कमी वेळात जास्त गोष्टी बघता येतात.
- कधीही गेलात तरी थंडीचे कपडे न्यावेत. सतत बदलती हवा. टोपी, गाँगल, सन स्क्रीन मस्ट.
- पिण्याचे पाणी जवळ ठेवावे, आत कमी मिळते.... तशी सोय आहे पण ..
- २-३ दिवस असतील तर पहिल्या दिवशी - ओल्ड फेथफूल, मिड वे व बिस्किट बेसिन सकाळी व कँनिअन व्हिलेज, दोन्ही वाँटरफाँल्स संध्याकाळी करावे.
- दुसरा दिवस - मँमथ टेरेसेस, व्हिजिटर सेंटर सकाळी व लेक यलोस्टोन दुपारी करावे. वाटेत बरेच सिनिक स्टँप्स घेता येतात, वाँटरफाँल्स व वाइल्ड लाइफ बघता येते.
- शेवटी टिटाँन पार्क.
- हकलबेरी आइसक्रीम ची चव जरूर घ्या.
आम्ही व आमचे पाहुणे खाणे, पिणे व अनुभवणे एवढेच ३-४ दिवस करत होतो.
जोडीला गाणीही होतीच. नंतर व्हिडिओ बघताना मस्त, वाँव, किती छान ही
प्रत्यकाने दिलेली दाद पुनप्रत्यताचा आनंद देत होती.
इतके धगधगते ठिकाण असूनही, पूर्वी विनाशकारी भूकंप झालेले असूनही सध्या
अनेक नयनरम्य गोष्टी आणि निसर्गाचे चमत्कार इथे अनुभवायला मिळतात. शक्य
असेल तेव्हा या अदभूत सफरीचा अनुभव एकदा तरी प्रत्येकाने घ्यावाच.
डोअर काउंटी - डेथ डोअर

या एरिआत खूप प्रायव्हेट प्रीँपर्टीज आहेत. बरीच घरे रहाण्यासाठी भाड्याने देतात. दरवर्षी येणारे लोक खूप आहेत. अगदी पाण्याच्या जवळ घरे आहेत. बोटी, कयाक, मोटरबोट, सेल बोट, फिशिंग बोट भरपूर दिसतात. ५-६ स्टेट पार्कस असल्याने हायकिंग, बायकिंग याचे बरेच ट्रेल्स आहेत. झाडी अगदी पाण्यापर्यंत आहे त्यामुळे निळा व हिरवा या रंगांच्या खूप छटा दिसतात. हायकिंग करताना बरेचदा एकीकडे पाणी व एकीकडे झाडी त्यामुळे मस्त वाटते. पेनिन्सुला स्टेटपार्क मध्ये आम्ही २ तास हायकिंग केले. यात एका बाजुला पाणी व एका बाजूला हिल आहे. हवा पण मस्त होती. भरपूर हिरवी झाडी व निळेशार पाणी .. डोळे एकदम तृप्त होतात. वाटेत उंच क्लिफ्स लागतात. यातूनच
![]() |
| क्लिफ्स |
हे क्लिफ्स Niagara escarpment चा भाग आहेत. (साधारण नायागारा पासून इलिनांय पर्यंत हे खडक पसरलेले आहेत). त्याचे फार इरोजन होत नाही. त्यामुळे बरीच झाडे व इको सिस्टीम जपली गेली आहे. या खडकांचा काही भाग पाण्याखाली पण आहे. या खडकामुळे या एरिआत बरेच धबधबे दिसतात. या सगळ्या गोष्टी पुस्तकात वाचण्यापेक्षा अशा प्रत्यक्ष पाहून छान वाटतात.
फिश बाँईल - ही जागा लेक च्या काठी असल्याने फिश भरपूर. पूर्वापार चालत आलेली यांची ही एक खाण्याची परंपरा आज बिझिनेस मध्ये बदलली आहे. कांदे बटाटे व व्हाईट फिश एका मागोमाग मोठ्या भांड्यात उकळतात. १० मि त फिश तयार होतो व त्यातील चरबी बाहेर यायला लागते. या नंतर केरोसिन जाळात ओततात, त्यामुळे एकदम टेंपरेचर वाढते व सगळी फँट बाहेर येते. या साठी व्हाईट फिश वापरला जातो. हा ४० डिग्री तापमान आवडणारा फिश आहे त्यामुळे तो उन्हाळ्यात खूप खोल पाण्यात जातो. काटेही भरपूर असतात. ही जी काही फँट निघून जाते त्याची भरपाई वरून भरपूर बटर घालून करतात. नंतर चेरी पाय ची स्वीट डिश असतेच.
सेल बोट - इथे सेल बोटी खूप दिसतात. बरेच लोक हा धंदा करतात. सुरूवातीला मोटर वर पाण्याच्या आत साधारण १५-२० मिनिटे घेउन जातात. मग मोटर बंद करून शिडे उभारतात. वारा जसा असेल त्याप्रमाणे शीड हलवतात. हा अनुभव खूप छान होता. नुसता वारा किती जोरात बोट नेउ शकतो याचा अनुभव घेता आला. कँप्टन पण छान होता. हे सगळे प्रकरण एरो डायनँमिक्स च्या तत्वावर चालते. शिडाचा वापर विमानाच्या पंख्यासारखा होतो. खूप वारा असला तर त्या नुसार शिड खाली वर करता येते. काही वेळा बोट इतकी तिरकी होते की भिती वाटते पण खाली ८००० पाउंडाचे किल लावलेले असल्याने बोट उलटायचा चान्स कमी असतो. मला त्या कँप्टन ने सांगेपर्यंत कल्पनाही नव्हती की खाली एवढे वजन लावले आहे. हा सगळा अनुभव घेतल्यावर पुन्हा एकदा आपल्या पूर्वजांचे कौतुक वाटल्याशिवाय रहात नाही. त्याकाळी विशेष साधने नसताना लोक किती धाडसाने समुद्र सफरी करायचे.
चेरी स्पेशल - डोअर काउंटी मध्ये चेरी भरपूर होतात. त्याचे सगळे प्रकार पाय, जँम, सालसा व वाईन बनवतात. त्या नंतर सफरतंदाचा सिझन असतो. या प्रदेशात चीजही भरपूर बनते. या सगळ्या बागांच्या टूर्स अरेंज करतात व तुम्हाला जवळून सगळ्या गोष्टी बघता येतात. सगळाकडे लोकल बिझनेसेस ला वाव दिला आहे त्यामुळे नेहमीच्या चेन्स दिसत नाहीत. लोक छान फ्रेंडली होते इथले.
डोअर काउंटी ला झाडी भरपूर असल्याने फांल कलर्स अर्थातच सुंदर असतात. पाणी, कडेने झाडी व थोडेसे डोंगर यामुळे फाँल ला इथे गर्दी असते. वाँशिंग्टन आयलंडला फेरी ने जाता येते. ते एकदम टोकाला आहे. तिथून ३६० व्ह्यू मस्त दिसतो. ३-४ ठिकाणी रात्री नाटकांचे शो होतात.
एकंदरीत डोअर काउंटी चा अनुभव छान होता....
चौथा कोपरा..
अमेरिकेत आल्यापासून निसर्गाची वेगवेगळी रूपे बघितली. गेल्या आठवड्यात ् व्हरमोँंट ला मुलीच्या ग्रँज्युएशन
ला गेलो होतो. तिथून yetana अकेडिया पार्क ला भेट दिली. हे पार्क मेन मध्ये
आहे. तिथे गेल्यावर लक्षात आले की याआधी तीन कोपरे बघितले आणि आता हा
चौथा कोपरा. अलास्काचे ग्लेशिअर्स, हवाई चा ज्वालामुखी आणि प्रशांत
महासागर, वेस्ट चे सुंदर निळे पाणी आणि गल्फ आंफ मेक्सिको शेवटी आता बार
हार्बर वरून एटलांटिक चे ँ. प्रत्येक ठिकाणचे सौंदर्य वेगळे निसर्ग वेगळा -
अर्थात चारीही कोपरे आपल्या जागी सुंदर
बार हार्बर मध्ये अकेडिया पार्क आहे. ही जागा खूप मोठी नाही पण छान आहे. भरपूर हायकिंग ट्रेल्स,
लूप रोड, कँडिलँक माउंटन आणि फिश ईंडस्ट्री ही इथली वैशिष्ट्ये. पूर्वी
याला माउंट डेझर्ट म्हणत कारण पहिल्यांदा जे लोक आले त्यांना एकदम ओसाड भाग
वाटला, झाडे दिसली नाहीत. सुरूवातीला फ्रेंच लोक इथे जास्त आले. त्यातील
एकाने आपले नाव या डोंगराला दिले. या भागात रांकफेलर, जे पी मांर्गन यांची
भरपूर इस्टेट आहे. मोठे मँन्शन्स आहेत.
जाताना मस्त झाडीने भरलेला रस्ता आहे. दोन्ही बाजूना झाडांच्या भिंती उभ्या आहेत असे वाटते.
इथला पिंक ग्रँनाइट प्रसिद्ध आहे. सुरूवातीला आर्टिस्ट या जागेच्या प्रेमात
पडले..त्यांनी इथली चित्रे काढून लोकांना दाखवली व हळूहळू लोक इकडे येउ
लागले - साघारण १८०० चा सुमार. हे क्लिफ्स मस्त दिसतात. सन सेट च्या वाळेस
रंग अजून सुंदर दिसतात. हा फोटो थंडर होल चा आहे. इथे पाणी खडकात बरेच आत
घुसते व पूर्ण भरल्यावर जोरात बाहेर येते. ४० फूचापर्यंत वर पाणी उडते.
इथे धुके, मिस्ट व थोडा पाउस अधून मधून आसतोच. नसेल तेव्हा पाणी मस्त निळे
दिसते.
कँडिलँक माउंटन १५०० फूट उंच आहे. त्यावर हाइक करता येते किंवा वरपर्यंत
गाडीने जाता येते. व्हिजिबिलिटी नसेल तर वर जाण्यात अर्थ नाही..वरून काही
दिसणार नाही. वर्षातले काही दिवस इथे सूर्यकिरणे सगळ्यात आधी पडतात म्हणून
सनराइज बघण्याचे महत्व. खालती बेटे,अथांग समुद्र व छोटी बेटे छान दिसतात.
रस्ता छान आहे. वरती एक छोटा ट्रेल आहे. वाटेत १-२ लेक्स दिसतात. पूर्वी जे
फ्रेंच सेटलर्स आले त्यातल्या एकाने आपले नाव या डोंगराला दिले. कँडिलँक
गाडीच्या एम्ब्लेम मद्ये जे शिल्ड दिसते ता या फ्रेंच लोकांच्या लढाईचा
आठवण म्हणून आहे.
इथे
लोँबस्टरचा मोठा व्यवसाय चालतो. लोकांना कोटा दिलेला असतो. त्यावर
भांडणेही होतात. पकडलेल्या तील ठराविक फिश च वापरता येतात बाकीचे परत
टाकावे लागतात.
फिश खाणारे इथे खूष होतात.
गुड कोलेस्टरोँल देणारा फिश म्हणून खूप डिमांड असते. त्याबरोबर क्रँब ही भरपूर मिळतो. इतर फिश ही मिळतात.
मेन हे स्टेट लाइट हाउस साठी प्रसिद्ध आहे. या पार्क मघ्ये एक टूर आहे ते
बरीच लाइट हाउस दाखवतात. बास हार्बर इथले लाईट हाउस मात्र जवळून बघता
येते. ते साउथ वेस्ट साइड ला आहे. त्याच्या बाजूला बरेच पिंक ग्रँनाइट चे
खडक आहेत. समोर अथांग सागर. खूप छान दिसते. पाण्यात मोठ्या बेल्स लावलेल्या
आहेत. धुक्यामुळे कधी कधी लाईट दिसत नाही तेव्हा या बेल्स चा उपयोग होतो.
बोट टूर मध्ये ५-६ लाईट हाउस दिसतात. ती बोटीतून बघावी लागतात.
सुटीचे ३-४ दिवस घालवायला छान जागा आहे. हाइक साठी वेळ जरूर ठेवा. कयाक,
कनू व बोटिंग पण करायची सोय आहे. गाईडेड टूर घेतल्यास माहिती छान देतात.
गेल्या
आठवड्यात ३ दिवसांची सुट्टी होती तेव्हा ब्राईस व झायाॆन कॆनियन्स ही
युटातील दोन स्टेट पार्क्स पाहिली व त्याबरोबर लेक पोॆवेल आणि अॆंटेलोप
कॆनियन्स ही अरिझोनातील ठिकाणेही पाहिली. या सर्व जागा फार सुंदर आहेत.
वारा आणि पाणी यांचा सॆंडस्टोन वर
परिणाम होउन सुंदर फोॆरमेशन्स तयार झाली आहेत. बरेच डोंगर लाल केशरी
दिसतात. सूर्याप्रकाशानुसार ते रंग बदलतात. साहजिकच परतीच्या प्रवासात
डोळ्यासमोर हेच रंग दिसत होते आणि मन हे लाल रंगी रंगले..अशी अवस्था झाली
फोटो मोठे बघण्यासाठी त्यावर क्लिक करा....
.
आमच्याकडे
३ दिवस होते तेवढ्यात ही ३ पार्कस करायचे ठरवले. एल ए, aagate इलिनाॆय अशा
तीन ठिकाणाहून आम्ही लास वेगास ला पोचलो. सुटी असल्याने उशीरा पोचलो. गाडी
रेंट करून रात्री निघालो. लास वेगास मघ्ये उतरताना व रस्त्यावर लखलख
चंदेरी तेजाची न्यारी दुनिया दिसत होती. ३ तासाने झायाॆन पार्क जवळ पोचलो.
मग जी पी एस च्या सौजन्याने रस्ता चुकला.
१२-१३ मैल एकाकी
रस्त्याने गेल्यावर परत फिरलो कारण एकदम एकाकी भाग होता. मग मागे येउन
विचारले आणि शेवटी २ ३० ला पोचलो. तशी थोडी भिती वाटत होती कारण रस्ता एकदम
सुनसान. या सगळ्या प्रकारात बाहेर चांदणे फार छान दिसत होते. आकाशातून
चांदण्या आपल्या अंगावर झेपावत आहेत असे वाटत होते. आकाशात इतके ग्रह तारे
दिसत होते की बस. चांदण्यांनी इतके भरलेले आकाश पहिल्यांदाच पाहिले...थॆंकस
टू चुकीचा नकाशा...वाईटातून चांगले निघते ते असे. मग ३-४ तास झोप काढली व
उठलो. आमच्या बरोबर कोलोरॆडोहून आलेले अजून एक जण होते. थोड्या गप्पा, खाणे
करून निघालो.
आमचा झायाॆन नॆरोज चा ट्रेक करायचा ठरले. पूर्व तयारी म्हणून स्पेशल शूज,
मोजे काठी घेतले. तिथे एक माहितीपटही दाखवला. तोवर सगळे भुकेजले होते मग
ब्रंच करून निघालो. स्प्रिंगडेल या गावात छान छोटी दुकाने आहेत. या पार्क
मध्ये आत शटल ठेवली आहे. गाड्यांना बंदी आहे. त्यामुळे पोल्युशन कमी. शटल
ने जाताना मस्त डोंगर दोन्ही बाजूंना दिसतात...बरेच लाल रंगाचे आहेत. १०००
ते २००० फूटा पर्यंत आहेत. पूर्वी इथे नेटिव्ह इंडियन्स रहात त्यांच्या
बर्याच गोष्टी गाईड सांगत होता. शेवटच्या स्टांप पासून १ मैलावर हा ट्रेक
सुरू होतो. इथले क्लिफ्स - डोंगर पाण्यामुळे कापले गेले . दोन्ही बाजूला
उंच कपारी व मध्ये पाणी. खाली गोटे..माती...पाण्याला ओढ बरीच ..त्यामुळे
बरीच कसरत करत जावे लागते. काठीचा खूप उपयोग होतो. प्रत्येक वळणावर वेगळे
रंग दिसतात . उन्हामुळे क्लिफ्स चे रंग सुंदर दिसतात. ७५ टक्के पाण्यात व
थोडे कडेने चालता येते. २ एक मैल गेल्यावर हे कडे एकदम जवळ .ेतात. फक्त २०
फूट अंतर रहाते. गर्दी भरपूर पण मंडळी मजेत जातात. लहान मुले खूप भरभर
जातात. कुठेही धक्काबुक्की नाही लहान
मोठे सगळे चालत होते. मला वारीची आठवण झाली. आम्ही २ तासानी परत फिरलो. खूप दमलो पण मजा आली. एक वेगळा अनुभव मिळाला.
सतरंगी
लखलख चंदेरी
मधे असे छान स्टाॆप्स
याच पार्क मध्ये अजून बरेच ट्रेकस आहेत. त्यातील ऎंजल्स लॆंडिंग हा
प्रसिद्ध आहे. १००० - १२०० फूट कडा चढायचे आव्हान आहे. अगदी शेवटी चेन्स
लावल्या आहेत. खूप मंडळी वरपर्यंत जातात. याच्या वाटेत झाडी, सावली अजिबात
नाही. काही ठिकाणी अगदी चढी चढण आहे पण मला वाटते मनुष्याला चॆलेंज ची आवड
असतेच. वाॆल्टर नावाच्या इंजिनिअरने २१ स्विचबॆक्स बांधले आहेत. त्या वेळेस
धोड्यांना चढायला सोपे पडावे म्हणून हे बांधले. वरून मस्त व्ह्यू दिसतो.
हा ट्रेक पुढच्या वेळेस करायचे ठरले.

उभा कडा व त्यावर जातानाचा काही भाग....
यानंतर नेक्स्ट प्लान होता पेज या गावाला जायचा. जाताना बराच धाट लागतो.
रस्त्याचे काम चालू होते त्यमुळे थांबत थांबत जावे लागत होते त्याचा एक
फायदा झाला वाटेत मस्त सिनरी होती ती बघत बघत पुढे जाता आले. वारा पाणी आणि
ग्रॆव्हिटी यामुळे झालेले इरोजन बघता ये होते. दिशा व फोर्स यानुसार
डोंगरावर वेगवेगळे पॆटर्न्स तयार झाले आहेत. काही गुळगुळात, काहीवर चौकोन
काहीवर रेघा तर काही वर लेअर्स. एकंदरीत डोळ्यांना मेजवानी होती.
पेज हे गाव साधारण १९५७ च्या सुमारास अस्तित्वात आले. इथे लेक पोॆवेल आहे
त्याच्यावर एक धरण आहे. जवळच ५-६ मैलावर एॆंटेलोप कॆनिअन्स आहेत. त्याचे
अप्पर व लोअर असे दोन प्रकार आहेत. आम्ही लोअर मध्ये गेलो. ही जागा इंडिअन
रिझर्व्हेशन वर आहे त्यामुळे त्यांचा गाईड घ्यावा लागतो. जमिनीलापावसानंतर
इथे फ्लॆशफ्लड हा प्रकार होतो . जमिनीला एके ठिकाणी मोठी भेग पडली आहे.
त्यातून पावसाचे पाणी वेगाने आत घुसते. ते गोल गोल फिरत पुढे जाते आणि
त्यामुळे आत स्वर्ल्स तयार झाले आहेत, कुंभार जसे लाल माठ बनवतो तसा हा रंग
दिसतो. आतला रस्ता आगदी अरूंद आहे. काही ठिकाणी शिड्या लावल्या आहेत पण
एकंदर कसरत करावी लागते. अप्पर कॆनिअन्स एवढे अवघड नाहीत. इथे भरपूर
फोटोग्राफर्स होते. वरून येणारा प्रकाश परिवर्तन होउन वेगवेगळे रंग दिसतात.
डोळ्यांना वेगळे रंग दिसतात आणि फोटो फार वेगळे दिसतात.

आत जायचा रस्ता
दिसणारा रंग
कॆमेरा दाखवतो ते रंग
त्या नंतर लेक पोॆवेल वर बोट राईड घेतली. पाण्याचा रंग एकदस निळाशार होता.
बोट बरीच आत घेउन जातात. अगदी कडेच्या क्लिफ्स ना लागेल असे वाटते. ह्या
लेकची लांबी वेस्ट कोस्ट लांबीहून जास्त आहे म्हणे. आयजेनहोवर च्या काळात
ते बांधले. या लेकमुळे एल ए यांना पाणी मिळते

संध्याकाळी
वाटेवर (साउथ ८९) होॆर्स शू बेंड बघायला गेलो. थोडा उशीर झाला होता
त्यामुळे जरा पळापळ झाली पण इट वोॆज अमेझिंग. कोलोरॆडो नदी वहाताना बाजूचे
इरोजन जोस्त झाले त्यामुळेअसा शेप तयार होतो. ही बेट तयार होण्यापूर्वीची
स्थिती. अजून काही वर्षांनी इथे बेट तयार होईल.इथे पूर्ण फोटो काढायला वाईड
अॆंगल लेन्स लागते.
शेवटच्ा
दिवस होता ब्राईस कॆनियन चा. इथे बरेच गार होते. शटलची सोय इथेही होतीच.
सुरूवातीला आम्ही रिम वरून चक्कर मारली. वरून मस्त नजारा दिसत होता. इथे
गुलाबी, केशरी रंग जास्त होता. आपल्याला क्लिफ्स जवळून बघण्यासाठी खाली
उतरावे लागते. फार पूर्वी इथे पाणी होते. त्यानंतर अनेको (मिलिअन्स)
वर्षानी बदल होत होत हे खडकांचे पुतळ्यासारखे गिसणारे आकार तयार झाले.
गुलाबी, केशरी, पांढरा, काळा हे रंग दिसतात. सूर्य प्रकाश जसा बदलेल तसे हे
रंग छटा बदलतात.
आपण जसे बघू तसे आकार शोधत बसतो. या आकारांना हुडुज म्हणतात. पाणी पावसाचे आणि बर्फाचे या खडकात फटीत साठते. टेम्परेचर डिफरन्स खूप असल्याने
रात्री बर्फ व दिवसा पाणी आसे चक्र चालू असते. त्यामुळे इरोजन होते. वरचा
थर कडक असतो तो तसाच रहातो व शेवटी खालचा भाग कमकुवत झाल्यावर पडतो. मघूनच
रंगीत वाळूचे लेअर्स खूप छान दिसतात. रांगोळी आहे असे वाटते.
तिथे एक रेंजर चे प्रेझेंटेशन ऐकले. खूप छान माहिती सांगितली. ग्रॆंड
कॆनिअन पासून ब्राईस पर्यंत ५ भाग पडताच.
चाॆकलेटी,व्हर्मिलिओॆन,पांढरा,राखी,व गुलाबी असे वेगवेगळे रंग दिसतात.
प्रत्येक भागातले खडक वेगळे, इरोजन चा रेट वेगळा, त्यात सापडणारे प्राणी
वेगळे...हा साधारण ६००० फूटाचा भाग ५ स्टेप्स सध्ये डिव्हाईडेड आहे. याला
ग्रॆंड स्टेअरकेस म्हणतात. यावर बराच अभ्यास केलेला आहे लोकांनी.
एकंदर हे २-३ दिवस डोळे भरून निसर्ग बघितला, लाल रंगाच्या मोहात पडलो. मनसोक्त चांदणे पाहिले. काही ठिकाणी परत जायचे ठरले.

मन हे लाल रंगी रंगले..........
हेलनः निसर्गाच्या कुशीतले टुमदार गाव
हेलन या नावातच सौंदर्य आहे, नजाकत आहे हे कोणा भारतीयाला सांगायला नको. अमेरिकेतील जॉर्जिया राज्याच्या उत्तरेला "चट्टाहूची राष्ट्रीय उद्यान" आहे. त्याच्या तोंडाशीच असलेल्या जंगलाला 'युनिकॉय राज्यांतर्गत उद्यान' म्हणतात. या उद्यानाला खेटून 'हेलन' नावाचे टुमदार गाव आहे. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे विविध युरोपिय भागात असतात तशी घरे-हॉटेले आहेत. अमेरिकेत ज्याची कमतरता जाणवते त्या "गल्ल्या", खेटुन असलेली घरे, गर्दी, फेल्ट हॅटस घातलेले पुरुष, युरोपिय झगे (गाऊन्स) घातलेल्या ललना, घोडागाड्या-बग्ग्या, आनंदाने फसफसणारे पब्स, सिगार आणि गर्दी पित बसलेला म्हातारा, फिडल वाजवत गर्दीला रमवणारा वादक असे वातावरण कोणाला आवडणार नाहि. या गावाचे स्थळ हिदेखील निसर्गप्रेमिंसाठी पर्वणीच आहे. या गावाच्या जवळच बरेचसे धबधबे, अनेक लांबीचे ट्रेकिंग रुट्स, व्हाईट वॉटर राफ्टिंगपासून माऊंटन बायकिंगची संधी देणारे जंगल आहे. शिवाय खाणार्यांची चंगळ आहेच आणि विशेषतः चवीने पिणार्यांसाठी काहि वायनरीजदेखील आहेत.
आमच्याकडे एकच दिवस असल्याने ड्युक्स क्रीक फॉल नावाचा धबधबा आणि याच्या पर्यंत पोचायचा २ मैलांचा अगदी छोटासा ट्रेक करायचे ठरवले. भरपुर पाऊस असल्याने ओलाचिंब रस्ता, जंगलाचा पावसाळी गंध, नैसर्गिक ताजेपणा - ओलेपणा होताच पण पाऊस असल्याने पर्यटकांची वर्दळहि नव्हती. अर्ध्यातासाच्या पायपीटीनंतर आम्हि त्या छोट्याश्या पण सुंदर धबधब्यांच्या पायथ्याशी पोचलो.. बरेच छोटे छोटे झरे बर्याच उंचावरून उड्या मारत होते... फारच प्रेक्षणिय . असेच अनेक छोटे - मोठे ट्रेल या गावाजवळ आहेत.
मार्गः
अटलांटापासून आय-८५(उ.) हा राक्षसी महामार्ग पकडावा, त्यातून पुढे आय ९८५
हा राष्ट्रीय उपमहामार्ग पकडावा, पुढे जीए-११ हा अंतरराज्य महामार्ग आणि
पुढे जीए-७५ हा अजून लहान रस्त्यावरून हेलनला पोचावे. रस्त्याची रुंदी आपण
यांत्रिक जगातून अधिकाधिक मानवी जगात जातोय याची साक्ष पटवते.. आणि
हेलनमधील गल्ल्या गाडीतून बाहेर काढून चालत गाव फिरायला भाग पाडतात
रहाण्याची सोयः
इथे अनेक हॉटेले आहेत फक्त तुम्हाला जर्मन पद्धतीच्या, स्पॅनिश पद्धतीच्या
की ब्रिटीश पद्धतीच्या हाटीलात रहायचं आहे ते ठरवता यायला हवं
मदतः
गावात शिरण्यापुर्वी, हेलन वेलकम सेंटर आहे तिथून जवळपासच्या अनेक ट्रेक
ट्रेल्स, धबधबे, प्रेक्षणिय स्थळे, पर्यटन स्थळे यांची माहिती विनामुल्य
दिली जाते. शिवाय एखादे स्थळ आज(ठराविक दिवशी) जाणे सुरक्षित/रोचक आहे का?
नसल्यास कोणता पर्याय आहे? तिथे फी आहे का? वगैरे माहिती अगदी नीट दिली
जाते. शिवाय मदतीला एक स्पष्ट नकाशा दिला जातो.
काय पहालः
हेलन गाव
वायनरीज (संध्याकाळी ६ पर्यंत)
बग्गीचे प्रदर्शन (सशुल्क)
ऍना रुबी फॉल्स (१ मैल चाल)
ड्युक्स क्रीक फॉल (२ मैल चाल)
युनिकॉय स्टेट पार्क
रिचर्ड रसेल सिनीक हायवे
रेवन क्लीफ फॉल (१४ मैल चाल)
आप्लाशियन ट्रेल (जॉर्जियातुन सुरु होऊन नॉर्थ कॅरोलिनात संपणारा ३-४ दिवसांचा ट्रेल आहे अशी माहिती मिळाली)
योनाह् माऊंटन (इथे ट्रेकिंग ट्रेल आहे की नाहि माहित नाहि)
यातील काहि गोष्टी नाटकी - मुद्दामुहुन केल्या आहेत तर काहि त्यांच्या राहण्याचा भाग आहेत असे वाटले.
जसे गल्ल्या, खेटून असलेली घरे आहेत व त्यात खरोखरचे गावकरी राहतात.
घोडागाड्या, झगे- फेल्ट हॅट घालून वावरणे हा व्यावसायिकतेचा भाग वाटला तरी
आता त्यांच्या अंगवळणी पडल्यासारखा वाटला.
मात्र काहि खास युरोपिय वळणाच्या - जुन्या फाँटच्या पाट्या, घरांचा
चकचकीतपणा वगैरे खास नाटकी वाटले. (राहती घरे इतकी चकचकीत असली की
चित्रपटाचा सेट भासु लागतो :) )
शेवटी हे एक पर्यटन स्थळ असल्याने काहि ठिकाणी कृत्रिमता जाणवते.. काहि गोष्टी मात्र सुखद वाटतात.. असेच फिरता फिरता एक विंडमिल नजरेस पडली... चक्क चालु होती तेव्हा काहि गोष्टी खरोखरच असाव्यातसे वाटते.
केनेडी स्पेस सेंटर, फ्लोरीडा
मागील वर्षी ह्याच काळात फ्लोरीडाला एका संमेलनाला जायचा योग आला होता. फ्लोरीडा ह्याभूभागाचे वैशिष्ठ्य म्हणजे, भारताच्या अक्षांश/रेखांशाच्या अगदी मागच्या बाजूला तो येतो. फ्लोरीडाला उतरतांना तेथील मुख्य भूभागापासून विलग झालेली एका पट्टीसारखी भूरचना दिसते. ही खूप लांबलचक पट्टी असुन ती तुम्हाला अमेरिकेच्या नकाशावर ठळकपणे दिसेल.
![]() |
| From Florida |
फ्लोरीडात बघण्यासारखे खूप आहे. पण सर्वात जास्त थरार आहे तो केनेडी स्पेस सेंटर बघण्यात. केनेडी स्पेस सेंटर एका बेटावर (साधारण पुणे शहराएवढे) आहे व आजुबाजूने प्रशांत महासागर आहे. समुद्रामुळे अनेक अवजड भाग तेथे समुद्र मार्गाने सोयीने आणता येतात. पण स्पेस सेंटर तेथेच करण्याचे खरे वैशिष्ठ्य म्हणजे स्पेस शटल, रॉकेट्ला अवकाशात योग्य मार्गाने व कमीतकमी तांत्रिक अडचणींने नेण्यासाठी पृथ्वीवरची सगळ्यात योग्य जागा विषुववृत्ताजवळची असते. (दुसरे उदा. श्रीहरीकोटा. ही माझी ऐकिव माहिती आहे, त्यात चुक असु शकेल). आणि हेच कारण त्याबेटाला स्पेस सेंटर करण्यात महत्त्वाचे ठरले.
वेळ मिळताच केनेडी स्पेस सेंटरला भेट दिली. एक पुर्ण दिवस लागतो सर्व बघायला. फ्लोरीडा स्पेस स्टेशनची वेबसाइट आहे त्याठिकाणी तुम्हाला जाण्यायेण्याची सोय, वेळा, तिकीट, सुविधा, इ. सगळी माहीती मिळतेच. पर्यटन बिझनेस अत्यंत शिस्तबध्द कसा करावा हे ह्याच लोकांकडून शिकावे. आणि ह्याठिकाणी तर साक्षात केनेडी स्पेस सेंटर असल्यामुळे सर्व पर्यटक सुविधा/आखणी दहा घरे वरच. मी अजून स्पेस सेंटरच्या प्रदर्शनीय गोष्टींबद्दल बोलतच नाहीये- त्या सर्व सुविधा तेथे जाउनच पहायला पाहीजेत.
माझ्याकडे भरपूर वेळ होता त्यामुळे मी सगळ्यात मोठी टूअर घेतली. त्याचेच हे धावते वर्णन.
टूअरचे स्वरुप: प्रथम बसने सर्व लॉंचींग पॅड, रॉकेट असेंब्ली स्टेशन,
अंतराळवीर जिथून प्रसारमाध्यमांना फोटो देतात ती पारंपारीक जागा (नील
आर्मस्ट्रॉंगनेही इथूनच फोटो दिला), छोटे-मोठे कारखाने, व इतर काही
महत्वाची ठिकाणे दाखवत आपल्याला त्यांच्या एका अद्भूत अशा ठिकाणी आणुन
सोडतात. तेथे आपण आपल्याला हवा तेवढा वेळ घालवू शकतो. ह्यासगळ्याचे वर्णन
पुढे दिले आहेच.
गाइड आपल्याला आवर्जून सतत सांगत राहतो ते म्हणजे त्यांनी घातलेला निसर्ग आणि विज्ञान ह्याच्या मिलाफाबद्दल. त्या बेटावर त्यांनी वन्यप्राणीजीवन व निसर्ग जसे पुर्वापार होते तसेच ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. आपल्याला तेथे सुसरी, मोठाले गरुड सहज दिसतात. गाइडच्या सांगण्यावरुन तेथे सापही खूप आहेत.
हे सगळे ऐकता ऐकता गाइड आपल्याला एक एक छोटी छोटी लॉंचींग पॅड दाखवतो. बेटावर अनेक छोटी लॉंचींग पॅड आहेत. त्यांचा वापर अर्थातच छोट्या रॉकेट साठी करतात. अनेक ठिकाणी लोकांना छोट्याशा स्टेडियम सारखी रचना करुन बसुन यान आकाशात झेपावतांना बघण्याची सोय केली आहे. जेव्हा स्पेस शटल झेपावणार असते त्यादिवशी हजारो लोक मुलांसकट तेथे येउन मुक्काम करतात. यानाला काही कारणासाठी उशीर झाला तर थांबावे लागेल म्हणुन सगळी तयारी करुन येतात कारण बेटावर हॉटेलची सोय नाही.
हे पाहिल्यानंतर आपण जातो ते व्हेइकल असेंब्ली बिल्डींग पहायला.
![]() |
| From Florida |
येथेच स्पेस शटल, ई. ची असेम्ब्ली होते व रॉकेट + स्पेस शटल उभे जोडले जाऊन, एका प्रचंड मोठ्या खास वाहनावरुन (क्रॉउलर ट्रांन्सपोर्टर) लॉंचींग पॅडकडे नेतात. हे आपण सगळ्यांनी फोटोत पाहीले असेलच. व्हेइकल असेंब्ली बिल्डींग खूप प्रचंड आहे, उंच आहे. रॉकेट + स्पेस शटलचे वजन हजारो ट्न असल्यांमुळे, ज्यारस्त्याने ते क्रॉउलर ट्रांन्सपोर्टरने नेतात तो अतिशत उच्च तंत्राने बनवला आहे. वाळु व इतर काही साधनांचे एक-एक थर देउन शेवटी गारगोट्यासारखे दगड अंथरलेले आहेत. त्यावरुन रणगाड्यासारख्या पटेरी चाकांच्या क्रॉउलर ट्रांन्सपोर्टरवरुन अत्यंत धीम्या गतिने रॉकेट + स्पेस शटल नेतात. ह्यावेळेस त्यात इंधन भरलेले नसते.
६ किमी प्रवास करुन ते रॉकेट + स्पेस शटल लॉंचींग पॅडकडे ८ तासात
पोहोचते. लॉंचींग पॅडपाशी खूप मोठा रॅम्प आहे. त्यावरुन शेवटी ते जागेवर
जाते. लॉंचींग पॅड पाहून धडकी भरते इतके ते उंच, अक्राळविक्राळ आहे. "लॉंच
पॅड ३९" येथूनच पहिले यान चंद्रावर गेले. ते पाहताच आपण अंतर्मुख होतो.
लॉंचींग पॅडच्या आजुबाजूला मोकळी जमीन आहे. लॉंचींगच्यावेळी सगळ्यांना एका
ठराविक अंतरापर्यंतच जाता येते. यान एकदा लॉंचींग पॅडवर उभे झाले की,
सगळ्या चाचण्या घेण्यास सुरुवात होते. सगळ्यात शेवटी ईंधन भरतात. ते
भरण्यासाठी हजारो लिटरचे प्राणवायु व हायड्रोजनच्या टाक्या प्रत्येकी एका
बाजुला आहेत. यानासाठी लागणारे हजारो घनलिटर (घनरूप) इंधन अत्यंत वेगाने
कमीतकमी वेळात भरण्यासाठी शक्तीमान पंप आहेत. ते काही सेकंदात दोन्ही इंधन
भरतात. उलट्मोजणी सुरु होताच एका क्षणी, अंतराळवीर त्यात बसतात. शुन्य
सेकंदाला जेव्हा इंधन स्फोट होतो त्यावेळेस जो आवाज निर्माण होतो तो इतका
मोठा असतो की, तो सगळ्यात जास्त ताकदीचा मानवनिर्मीत आवाज ठरतो. तो आवाज
अतिशय उच्च वेगाच्या लहरी निर्माण करतो. त्या लहरींचा यानावरच आणि लॉंचींग
पॅडवर दुष्परिणाम होउ नये म्हणून, याना्च्या व लॉंचींग पॅडच्या आजुबाजूने
प्रचंड वेगाने पाण्याचा मारा करावा लागतो. ज्यामुळे त्यालहरी पाण्याने
निस्ताकद होतात. दुसरी अडचण असते ती ज्वाळांना बाहेर पडतांना वाट करुन
देण्याची. ह्यासाठी यानाच्या खाली लॉंचींग पॅडला एक भुयारी मार्ग असुन
त्यातुन त्या आपल्याला बाहेर आलेल्या दिसतात.
प्रचंड वेगाने येणाऱ्या ज्वाळा, आवाज ह्यामुळे तेथे जमीन भुकंपसदृश थरथरते.
ती थरथर इतकी जास्त असते की, त्यामुळे बेटावरील वन्यप्राणी सैरावैरा
पळतात, साप बाहेर येतात.
हे सगळे वर्णन एकल्यानंतर व तेथील वातावरणामुळे आपण आधीच भारलेले असतो तेव्हा आपल्यालाही काहीतरी चांगली कामगिरी करायची इच्छा होते.
त्यानंतर बस जाते ती दुसऱ्या लॉंचींग पॅडकडे. नशीबाने मी जेव्हा गेलो तेव्हा तेथे रॉकेट + स्पेस शटल उभे होते व काही दिवसांनंतर ते आकाशात झेपावणार होते. त्यामुळे बऱ्यापैकी जवळुन त्याचे दर्शन घेता आले. आजपर्यंत टिव्हीवर पाहीलेले हेच ते केसरी रंगाचे यान! सगळे पर्यटक ते यान पहाताच आनंदाने चित्कारतात. एक वेगळ्याच उत्साहाने सगळे भराभर फोटो काढतात, एक अद्वितीय आनंदाचा क्षण असतो तो. आपण ते यान प्रत्यक्ष पाहतोय ह्याचा आपला विश्वासच बसत नाही.
![]() |
| From Florida |
हे पाहिल्यानंतर आपण मंत्रमुग्ध होवुन परतीला निघतो. आता ते आपल्याला म्युझियम मधे नेतात. इतके सगळे पाहिल्यानंतर आता काय राहिले अशी आपली समजूत झालेली असते आणि आपल्याला एकामागोमाग धक्के बसायला सुरुवात होते. अंतर्मुख आणि मंत्रमुग्ध झालेलेच असतो, त्यात भर पडते ह्या धक्क्यांची आणि आपण थक्क होतो. हे मानवाचेच काम ना?- असा प्रश्न पडायला सुरुवात होते.
येथून आपल्याला नेतात ते स्पेस शटल पृथ्वीवर परतल्यावर ज्याठिकाणी उतरते ती धावपट्टी बघायला. स्पेस शटलचा उतरतांना वेग खूप प्रचंड असतो त्यामुळे धावपट्टीची लांबी विमानांना लागण्याऱ्या धावपट्टीपेक्षा जास्त आहे. तुम्ही पाहीले असेलच की स्पेस शटल एकीकडून दुसरीकडे नेतांना एका ७४७ बोईंग प्रवासी विमानाच्या वर बसवून नेतात. त्यासाठी एक असेंब्ली स्टेशन येथे आहे.
ह्यानंतर आपली बस टुअर संपते व आपल्य़ाला वेगवेगळी दालने पाहण्यासाठी एका ठिकाणी आणून सोडतात.
एका दालनात पहिल्या चंद्रस्वारीला जे जे काही वापरले त्या वस्तू, ज्यागाडीतुन नील व इतर अंतराळवीर बसुन यानापर्यंत गेले तेच वाहन, चंद्रावरचा एक दगड- ज्याला आपल्याला हात लावता येतो, अंतराळवीरांचा स्यूट ठेवलेले आहेत. पहील्या चंद्र मोहिमेनंतर ज्या यशस्वी मोहिमा झाल्या, त्यात त्यांनी एक बग्गी नेली होती तीची सहीसही प्रतिकृति तेथे आहे. पहिल्या यशस्वी चांद्रवारीच्या अपोलो स्पेस शिप आणि रॉकेट्ची पुर्ण प्रतिकृती इथे मांडली आहे! सगळे भाग सहीच्यासही. अंतराळवीर एका कुपीमधे आधी बसले, नंतर त्यातुन ते एका यानात बसले आणि ते यान चंद्रावर उतरले. रॉकेट व यान वेगवेगळे सुटे करुन मांडले आहेत. सगळ्यात मोठ्या रॉकेट्चा घेर २० मीटर असावा व संपुर्ण लांबी १२५ मीटर असावी. हे पाहून आपल्या तोंडातून शब्द फुटत नाहीत. खाण्यापिण्याची शुद्ध राहत नाही.
![]() |
| From Florida |
![]() |
| From Florida |
![]() |
| From Florida |
![]() |
| From Florida |
![]() |
| From Florida |
![]() |
| From Florida |
![]() |
| From Florida |
थक्क्यातुन (धक्क्यातुन नव्हे) सावरल्यावर तुम्हाला जाणीव होते ती तहानेची. पाणी आणि कॉफीने आपण ताजेतवाने होतो व अजुन एका दालनात जायला तयार होतो.
हे दालन म्हणजे एक थिएटर आहे. बसायला खूर्च्या आहेत. ह्यादालनात शिरताच आपल्याला दिसतात ते जमीनीवरच्या नियंत्रण कक्षाचे. जो समोर दिसतो तो आहे पहिल्या चंद्रवारीचा नियंत्रण कक्ष. तीच IBM मशिनं, त्याच खूर्च्या, त्यावेळेच्या तंत्रद्न्यांचे ओव्हरकोटही तेच तसेच खूर्चीच्या पाठीवर टांगून ठेवले आहेत. सगळे थिएटरमधे बसल्यानंतर नासाचा एक कर्मचारी येतो व आपल्याला माहीती द्यायला सुरुवात करतो. सुरेख ध्वनी-प्रकाशयोजना करत माहिती दिली जाते. चंद्रावर नील/इतर उतरतांना मोहीम अगदी शेवटच्या टप्प्यावर आलेली असतांना नियंत्रण कक्षात जे घडत होते, त्याचे रेकॉर्डींग आपल्याला ऐकू येते. समोर व्हिडीओवर त्यांनी जे पाहिले तेच आपण पाहत असतो. प्रकाशाचे झोत ठराविक खूर्चीवर टाकत तेथील तंत्रज्ञ त्यावेळेस जे बोलला तेच आपण ऐकतो. तेथला त्यावेळेचा उत्साह, हुरहूर आपण अनुभवू शकतो. चांद्रयान चंद्रावर पोहोचते व सगळे आनंदाने गलका करतात. नंतर एक भीषण शांतता...आणि मग नील बाहेर येतांना दिसतो, तो हळुहळू खाली उतरुन त्याचे पहिले पाउल चंद्रावर पडताच त्याने जे वाक्य उच्चारले ते आपण ऐकतो.. बरेच प्रक्षक/पर्यट्क ह्याक्षणी भावनांना वाट मोकळी करुन देतात व त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू घळाघळा ओघळतात.
ह्यानंतर सगळा सेट फिरतो व आपल्यासमोर येतो एक भन्नाट सेट. चंद्रावर जर तुम्ही त्यावेळेस उभे असता आणि जर त्रयस्थपणे चांद्रयान उतरतांना पाहत असता तर कसे दिसले असते तसे दिसते. नीकाळसर प्रकाश, समोर पृथ्वीचा गोळा आकाशात अतिशय सुंदर दिसतो. चांद्रयानाची पुर्ण प्रतिकृती वरुन खाली येते ती ज्या वेगाने चंद्रावर उतरली तोच वेग, तेच आवाज. मग दरवाजतून नील बाहेर येतो.... सगळेच अप्रतिम. ह्यावेळेस आपली मानसिक अवस्था आनंदाने भरलेल्या रांजणासारखी झालेली असते.
नंतर आपण जातो ते अशा एका दालनात की जेथे आपल्याला अनुभवायला मिळतो असा एक प्रसंग की त्याने आपण एका वेगळ्या विश्वात प्रवेश करतो. येथे आपण एका प्रेक्षकाच्या भुमिकेत शिरतो व हा प्रेक्षक उभा असतो तो लॉंचींग पॅडजवळ. त्याला काय अनुभव येतील, आवाज कसा असेल, जमीन कशी थरथरेल, इ गोष्टींची जाणीव होते. हा शो संपला की, आपण त्याच दालनाच्या दुसऱ्याभागात जातो ते असा अनुभव घ्यायला की जो कुपीत बसलेल्या अंतराळवीरांना यान शून्य सेकंदापासून झेपावतांना व पृथ्वीच्या वातावरणातून बाहेर पडेपर्यंत येइल. आपल्याला एका कुपीसदृश खोलीत नेतात. तेथे नेमकी तीच रचना आहे. अंतराळवीरांच्या खूर्च्या त्याच. त्यावर आपण बसतो, आपल्याला सीटबेल्ट घालायला सांगतात. दार बंद होते व उलट्मोजणी ऐकू येते. मग एक जोरदार धक्का बसतो, प्रचंड आवाज येतो, थरथर होते, आपली खुर्ची आणि प्लॅटफॉर्मसुद्धा त्यायानाच्या धक्क्यांनी हलत असतो व ग्रॅव्हीटीप्रमाणे तिरका/सरळ होतो. हे सगळे असेच चालू राहते. मग पहिल्या रॉकेटच्या निसटण्याच्या वेळेचा अनुभव मिळतो, एक धक्का बसतो. थोडी थरथर कमी होते. मग आपण अंतराळात प्रवेश करतो आणि अचानक आवाज, थरथर बंद होते. आपण अगदी शांत असा प्रवास करु लागतो व हा शो संपतो. आतापर्यंत आपण पृथ्वीवासी राहिलेले नसतो व एकदम ऐटीत वागयला लागतो.
दालनातून बाहेर पडताच आपल्याला दिसते ती एक्सप्लोरर यानाची प्रतिकृति.
![]() |
| From Florida |
त्यात आपण आत जाउन ते पुर्ण यान आतून कसे आहे हे पाहू शकतो. यानाचे नियंत्रणकक्ष, खाद्यपदार्थ, इ. सामान ठेवण्याची जागा, असे त्याचे विभाग बघायला मिळतात.
नंतरच्या दालनात रोबोच्या काही प्रतिकृति आहेत. चंद्रावर ते कसे काम करतील ह्याची कल्पना करुन त्यांचे नियंत्रण करुन काही शो दाखवतात. ते पट्पट पाहून होतात.
आतापर्यंत नासाने रॉकेट बनवतांना जी प्रगती केली ती पाहण्यासाठी एक मोकळ्या मैदानातील म्युझियम आहे व तेथे रॉकेट, इंजन ह्याच्या सहीसही प्रतिकृति ठेवल्या आहेत. त्याच ठिकाणी आणखी एक जबर्दस्त आकर्षण आहे. ते म्हणजे एक वॉकवे.
![]() |
| From Florida |
ह्याच वॉकवेवरुन नील व इतर त्यांच्या कुपीत शिरले. आपणही त्यावरुन चालत जाउन एका कुपीच्या दाराशी येतो. त्यांना त्यावेळेस कसे वाटले असेल त्याचा अनुभव घ्यायला मिळतो.
पुढचे आकर्षण म्हणजे IMAX थिएटरमधे दाखवलेले चित्रपट. हे ही सगळे बघण्यासारखे आहेत.
ह्यानंतर आपण भेट्वस्तु घ्यायला, खाणेपिणे करायला मोकळे होतो. नासाच्या ह्या भागात मात्र चीनचे आक्रमण आहे व बहूतेक सगळ्या भेट्वस्तु चायनीज आहेत पण खूपच मोहक आहेत. किचेनी, नासातले फोटो, पुस्तके, अशा अनेक घेण्यासारख्या गोष्टी आहेत.
फोटो घेण्यासाठी काही खास जागा आहेत, त्याठिकाणी नासाने त्यांचे लोगो लावले आहेत व त्यामुळे आपल्याला तो फोटो पाहून "तेथे" जाउन आल्याचा आनंद मिळतो.
![]() |
| From Florida |
[मी फार मोठ्या ताकदीचा लेखक नाही त्यामुळे चु. भु. दे. घे.]























No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.