Sunday, October 18, 2020

भाजे लेणी

 कार्ले आणि भाजे लेणी पुण्यापासून फक्त ४० km आहेत .
पुणे - मुंबई महामार्गाने भाजे ला जाण्यासाठी साधारण ४० मिनिटे लागतात . भाजे ला पुणे - लोणावळा लोकल ने पण आरामात जाता येते .साधारण लोकल ने १ तास जाण्यास लागतो .मळवली station पासून १५ मिनिटे चालत प्रवास केला की समोर भाजे लेणें दिसते .









 

* निवांत निसर्गाच्या सोबत एकांतात बसण्यासाठी भाजे हा चांगला पर्याय आहे .
* भाजे गावात जेवणाची चांगली सोय आहे .
भाजे आणि कार्ले किवा भाजे - विसापूर किल्ला किवा भाजे - लोहगड किल्ला एका दिवसात निवांत येतो . 







To reach the caves, it is a short climb of around 20-25 minutes on a properly laid out path.
The best time to visit Bhaja caves would be late evening, as the caves face west and the late evening light would be great for photographing the caves.
It was cloudy/raining for most of the time on the day we went, but the few minutes that the sun came out, the light was magical. The caves officially close around 6 pm and they dont allow anyone to enter beyond 5.45 pm, so time your visit leaving around 20-30 mins for the climb. We took it easy going up , spending lot of time taking photos

 

अप्रतिम भाजे लेणी

इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात भिक्षुक बौद्ध धर्मप्रसारासाठी संपूर्ण भारत पालथा घालत होते. फक्त पावसाळ्याचे चार महिने महिने सोडल्यास भिक्षुंना एकाद्या ठिकाणी तीन रात्रीपेक्षा जास्त राहण्याची मुभा नव्हती. त्यामुळे मग वर्षावास काळात निवास करण्यासाठी लेणी खोदायला सुरुवात झाली. बिहार येथील बाराबर लेणी भारतातील पहिले लेणे. मग महाराष्ट्रातील पहिले लेणे कोणते. त्याचे उत्तर आहे भाजे लेणी. पण मग भाजे लेणेच कशावरून पहिले लेणे? ह्या प्रश्नाचे उत्तर उत्तर चैत्यगृहातील कलते खांब देतात. चैत्यगृहाचा संपूर्ण भार खांबांवर येऊ शकतो आणि तो भार खांबांवर येऊ नये म्हणून खांब थोडे कलते खोदलेले आहे. आपण लाकडाचे बांधकाम करत नसून, दगडात खोदकाम करतो आहोत आणि तिथे असे खांब कलते दाखवायची काहीही गरज नाही असे निर्माणकर्त्यांच्या नंतर लक्षात आले. त्यामुळेच भाजे लेण्यांनंतर खोदकाम करण्यात आलेल्या इतर लेण्यात आपल्याला कलते खांब बघायला मिळत नाहीत.

चैत्यगृह

भाजे लेण्यांपासून महाराष्ट्रात वर्षावासाचे चार महिने मुक्काम करण्यासाठी लेणी खोदायला सुरुवात झाली. महाराष्ट्रातील हे पहिले लेणे हीनयान पंथीयांनी सातवाहन काळात खोदले. भाजे लेण्यांनी सुमारे २२०० वर्षांचा इतिहास जतन करून ठेवला आहे.

भाजे गाव मळवली रेल्वे स्थानकापासून साधारणपणे एक किलोमीटरवर आहे. गावाच्या पाठीमागे उभी आहे लोहगड-विसापूर ही बुलंद किल्ल्यांची जोडगोळी. या लेण्यांना विसापूर या बलदंड किल्ल्याने आपल्या कुशीत घेतले आहे. भाजे संकुलात एकूण २२ लेणी आहेत. भाजे गावातूनच ह्या लेण्यांपर्यंत जाण्यासाठी पुरातत्व विभागाने पायऱ्या बांधलेल्या आहेत. या पायऱ्या चढून गेल्यानंतर आपल्याला समोरच दिसते ते देखणे चैत्यगृह आणि चैत्यागृहाच्या आजूबाजूला असलेले एकवीस विहार. साधारणपणे इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात भाजे लेणी कोरण्यास सुरवात झाली. ही लेणी कोरण्यासाठी शिल्पकारांचे छिन्नी व हाथोडे अखंड काम करत होते. लेणी खोदायला किती वर्ष लागली हे माहिती नाही. पण त्या सर्व अज्ञात शिल्पकारांच्या श्रमाचे फळ म्हणजे भाजे लेणी.

विसापूरची तटबंदी
विसापूरची तटबंदी

भाजे लेण्यात प्रवेश केल्यानंतर सगळ्यात प्रथम आपले लक्ष जाते ते चैत्यागृहाकडे. येथील चैत्यकमान पिंपळपानाच्या आकाराची आहे. चैत्यागृहाच्या आजूबाजूला कातळात कोरलेल्या कामाचा मोठा थाट आहे. यात आपल्याला बघायला मिळतात, चैत्य गवाक्षांच्या माळा, कोरीव छज्जे, वेदिकापट्टीची नक्षी, कातळात खोदलेल्या कड्या आणि आणखीन बरेच काही.यातील काही सज्ज्यांवर कोरीवकामातून जाळी आणि पडद्याचा भास निर्माण केलेला आहे. काही गवाक्षात युगुले कोरलेली आहेत. चैत्यागृहाच्या डाव्या हाताला एक यक्षिणी कोरलेली असून तिच्या हातात तिने धरलेले झाड अजूनही स्पष्ट दिसते. भाजे येथील चैत्याकमान फार अप्रतिम आहे. ज्याप्रमाणे सुतार लाकडावर रंधा मारून लाकूड तासून सरळ सपाट करतो, त्याप्रमाणे ही कमान कातळात कोरली आहे. भाजे येथील चैत्यगृह १७.०८ मीटर खोल, ८.१३ मीटर रुंद आणि ७.३७ मीटर उंच आहे. या चैत्यागृहात ओळीने २७ अष्टकोनी खांब आहेत आणि मधोमध आहे वाटोळा गुळगुळीत केलेला स्तूप. या चैत्यागृहाचे छत गजपृष्ठाकृती असून या छताला आतल्या बाजूने लाकडी तुळ्यांनी सांधलेले आहे. भाजे चैत्यगृहातील खांब सरळ नसून ते आतल्या बाजूने थोडेसे कललेले आहेत. या खांबांवर कमळ, चक्र अशी काही शुभचिन्हे कोरलेली आहेत. एका खांबावर तर एक खुंटी कोरलेली असून त्या खुंटीवर हारही कोरलेला आहे.

चैत्यकमान
चैत्यकमान
स्तूप आणि तुळयांचे छत
स्तूप आणि तुळयांचे छत
शुभचिन्हे आणि खुंटीवरील हार
शुभचिन्हे आणि खुंटीवरील हार
शुभचिन्हे
शुभचिन्हे
शुभचिन्हे
शुभचिन्हे
चैत्यगृहातील खांब
चैत्यगृहातील खांब

पूर्वी सर्वच लेण्यांना आतल्या बाजूने माती-गवताचा गिलावा देऊन त्यावर रंगकाम केलेले असे. काळाच्या ओघात जरी आज हे रंग उडाले असले तरी भाजे येथील चैत्यागृहात गिलाव्याचे अजूनही काही अवशेष दिसतात. स्तूपाच्या पाठीमागच्या काही खांबांवर ध्यानस्थ बुद्धाच्या चित्रप्रतिमांचे पुसटसे अंश दिसतात. ही चित्र महायान पंथीयांनी रंगवली आहेत, कारण हीनयान पंथामध्ये बुध्दाची प्रतीकात्मक पूजा करण्यात येत होती.

चैत्यागृहातील स्तूप झिलईकामाने गुळगुळीत केलेला आहे. २००० वर्षांपूर्वी दगडाला झिलाई कशी दिले गेली असेल हे एक कोडे आहे. स्तुपावर असलेला हर्मिकेचा चौथरा स्वंतत्र दगडात कोरून बसवलेला आहे. या चैत्यागृहात असलेला तुळयांचे छत म्हणजे लेणीकलेतील आश्चर्य आहे. बावीस अर्धवर्तुळाकार आणि पाठीमागे निमुळत्या होत गेलेल्या भागात अकरा पाववर्तुळाकार तुळयानी हे छत साधले आहे. सुरुवातीला असलेलेया पाच-सहा तुळया सोडल्या तर बाकीच्या बावीसशे वर्षे जुन्या आहेत. १९६० च्या दशकात या लेण्याची साफसफाई करताना यातील दोन तुळयांवर ब्राम्ही लिपीत लिहिलेले दोन लेख आढळले. या लेखांमुळे या तुळयांनासुध्दा इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकाचा इतिहास असल्याचे सिद्ध झाले. दोनपैकी एका लेखाची चर्चा शिलालेख शिलालेख भाजे लेण्यातील ह्या ब्लॉग मध्ये केली आहे. दुसरा शिलालेख शोधण्याचा प्रयत्न करून सुध्दा सापडलेला नाही.

चैत्यगृह पाहून झाले की पावले आपोआप भोवताली असलेल्या विहारांकडे वळतात. येथील विहार काही साधे तर काही कोरीव कामाने नटलेले. चैत्यागृहाला लागून तर दुमजली विहार आहे. येथील विहारांना दरवाजे, खिडक्या आहेत आणि झोपण्यासाठी बाक सुद्धा आहेत. काही बाकांच्या खालती सामान ठेवण्यासाठी कप्पेही केलेले आहेत. काही विहारांना दगडातच कोरलेल्या जाळ्यांच्या खिडक्या आहेत. चैत्यागृहाच्या उजव्या बाजूला असलेल्या विहारात दरवाजा आतल्या बाजूने लावून घेण्यासाठी दगडातच कोरलेले एक ‘latch’ सुद्धा आहे.

कोरीवकाम
छज्जे
यक्षिणी
यक्षिणी
युगुले
युगुले
कोरीवकाम
वेयिकापट्टी आणि छज्जे

भाजे लेणे कोरण्यासाठी अनेकांनी दान दिले. त्यांनी केलेल्या दानाचे शिलालेखही इथे दिसतात. सुरुवातीच्या एका विहारातील (लेणी क्र. ६) एक लेख असा –

बाधया हालिकजयांना दान

या लेखाचा अर्थ असा, बाध या शेतकऱ्याच्या बायकोचे दान. अजून एका विहारात (लेणी क्र. १८) असलेल्या लेखानुसार हे लेणे भोगवत येथील नादसनाय याने दान दिले (नादसयस नायस भोगवतस गाभो दानं). महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या लेण्यांमागे इथे अनुकूल असलेल्या भौगोलिक, राजकीय स्थितीबरोबरच सर्वसामान्य जनतेचे दातृत्वही मोठे होते. लेण्यातील लेख हे त्याचेच पुरावे. भाजे लेण्यात ब्राम्ही लिपीतील दहा लेख आहेत व या साऱ्या लेखांचे वाचन झाले असल्यामुळे या लेण्यांच्या भूतकाळावर मोठा प्रकाश पडला आहे.

महाराष्ट्रातील लेण्यात जागोजागी पाण्याची कुंडे खोदलेली आहेत आणि तशीच पाण्याची टाकी भाजे येथे सुध्दा आहेत. चैत्यागृहाच्या दक्षिण दिशेस असेच पाण्याचे एक जुळे टाके आहे. या टाक्यात असलेले थंड मधुर पाणी इथे येणारे पर्यटक पितात आणि त्याचे पुण्य कुणी महारठी कोसिकीचा मुलगा विन्हुदत्त (विष्णुदत्त) कमावतो. पाण्याच्या टाके दान दिल्याचा त्याच्या शिलालेख या टाक्याच्या मागील भिंतीत कोरला आहे.

पाण्याच्या टाक्यावरील ब्राम्ही शिलालेख
पाण्याच्या टाक्यावरील ब्राम्ही शिलालेख

या टाक्यावरून आणखी पुढे गेलो की वाटेत एका मोठ्या गुहेत ओळीने कोरलेले १४ स्तूप आहेत. हे सर्व स्तूप बौद्ध भिक्षूंची स्मरणार्थ कोरण्यात आले आहेत. यातील काही स्तुपांवर त्यांचे नावही कोरलेले आहे. उदा. स्थविर संघदिन, स्थविर अंपकिण इ.

बौध्द भिक्षूंची स्मारके
बौध्द भिक्षूंच्या स्मरणार्थ खोदलेले दगडी स्तूप
बौध्द भिक्षूंची स्मारके
बौध्द भिक्षूंच्या स्मरणार्थ खोदलेले दगडी स्तूप
बौध्द भिक्षूंची स्मारके
बौध्द भिक्षूंच्या स्मरणार्थ खोदलेले दगडी स्तूप
बौध्द भिक्षूंची स्मारके
बौध्द भिक्षूंच्या स्मरणार्थ खोदलेले दगडी स्तूप

सुर्यलेणे

१८७९ साली भाजे लेण्यांजवळ ब्रिटीश संशोधकांनी साफसफाई केली तेव्हा शिल्पसौंदर्याने नटलेले आणखी एक लेणेच हाती आले आणि ते म्हणजे भाजे येथील प्रसिद्ध ‘सूर्यलेणे’.

सूर्यलेणे
सूर्यलेणे

व्हरांडा, आत एक दालन आणि त्याला आत पुन्हा खोल्या अशी या लेण्याची रचना आहे. तसे पाहायला गेल्यास हे लेणे म्हणजे विहार आहे, पण शिल्पकारांनी केलेल्या कोरीव कामामुळे एखाद्या चैत्यगृहाला पण पाठी टाकेल. पौराणिक प्रसंग, शस्त्रधारी द्वारपाल आणि चैत्य-स्तुपांचे नक्षीकाम यांनी ही लेणे भरून गेले आहे. यातही सूर्य आणि इंद्राचा देखावा तर अप्रतिम आहे. या विहाराच्या व्हरांड्याच्या उजव्या भिंतीवर हा देखावा आहे. यातील पहिल्या शिल्पात चार घोड्यांच्या रथावर सूर्य स्वर होऊन चालला आहे. रथात सूर्याच्या मागे-पुढे त्याची पत्नी अथवा दासी असून, एकीने छात्र धरलेले असून दुसरीने चामर धरलेले आहे. सूर्याच्या रथाखाली काही असुर तुडवले जात आहेत. दुसऱ्या शिल्पात इंद्र हत्तीवर झालेला आहे. इंद्राने हातात अंकुश आणि गळ्यात फुलांची माळ घातलेली आहे. इंद्राच्या पाठीमागे त्याचा दास असून त्याने हातात पताका धरलेली आहे. इंद्र शिल्पाखाली नृत्यकलाकार, वादक, देवदेवता, प्राणी, राजे, नोकर आणि आणिक निसर्गरूपके दाखवलेली आहेत. घोड्याचे शीर असलेली एक अश्वमुखी स्त्री इथे आहे. एकजण तबला वाजवताना दाखवला आहे. तबल्याच्या हा सर्वात जुना पुरावा असावा.

शस्त्रधारी द्वारपाल
द्वारपाल
शस्त्रधारी द्वारपाल
द्वारपाल
शस्त्रधारी द्वारपाल
द्वारपाल
तबलावादक
तबलावादक
इंद्र
इंद्र
सूर्य
सूर्य
सूर्य आणि इंद्राचा देखावा
सूर्य आणि इंद्राचा देखावा

या व्हरांड्यातच डाव्या बाजूस असलेल्या ओट्याखाली काही प्राणी आणि मानव दाखवले आहेत. यातील घोडा आणि बैलासारख्या प्राण्यांना चक्क पंख दाखवले आहेत. हा प्रकार फक्त पर्शियन संस्कृतीत दिसतो. या बाजूलाच कोपऱ्यात एका खांबाच्या टोकाला ग्रीकांची उपदेवता ‘सेन्तोर’च्या प्रतिमा कोरल्या आहेत. धड बैलाचे आणि घोड्याचे आणि शीर मानवाचे अश्या या वेगळ्या दम्पतींच्या जोड्या. विदेशी संस्कृतीचा आणि विदेशी व्यापाऱ्यांच्या हा प्रभाव.

सेन्तोर
सेन्तोर

दोन हजार वर्षांपूर्वीचा हा गुंता एका भेटीत पूर्णपणे कधीच सुटत नाही. पण हा गुंता पुढच्या भेटीत सोडवायचा हा निश्चय करून आपण भाजे लेण्यांची वाट उतरतो.

 

शिलालेख भाजे लेण्यातील

माहितीचा स्त्रोत म्हणून बौध्द लेण्यातील शिलालेखांकडे बघितले जाते. लेण्यातील दानी हा प्रत्येकवेळी राजघराण्यातील किंवा श्रेष्ठीच असला पाहिजे असा काही नियम नसतो. त्यामुळे लेण्यातील शिलालेखांचा अभ्यास केल्यानंतर राजा व श्रेष्ठी यांच्या बरोबरीने व्यापारी, यवन, शेतकरी, वैद्य, गंधीक, इ. लोकांनीसुध्दा दान दिल्याचे लक्षात येते. त्यांनी काय दान दिले, ते कुठे वास्तव्य करीत होते, तिथी काय होती, त्यांचा व्यवसाय काय होता इ. अनेक गोष्टींची माहिती शिलालेखातून मिळते.

भाजे लेणे हे महाराष्ट्रातील आद्य लेणे. हे लेणे साधारणपणे २२०० वर्षांपूर्वी कोरण्यात आले आहे, म्हणजेच सातवाहन काळात. परंतु ह्या लेण्यात राजसत्तेचा एकही शिलालेख नसल्यामुळे हे लेणे कोरायला एखाद्या राजसत्तेने मदत केली का हे कळायला काहीच मार्ग नाही आहे. पण भाजे लेण्याला दान देणाऱ्यांमध्ये शेतकऱ्याची बायको, धर्मभाग, श्रीधरसेन, नादसयनाम, विण्हुदत (विष्णूदत्त) यांचा समावेश आहे.

भाजे येथे भिक्षुकांच्या स्मरणार्थ चौदा दगडी स्तूप खोदण्यात आले आहेत. ह्या स्तूपांवर भिक्षुकांची नावे कोरण्यात आलेली असल्यामुळे कोणता स्तूप कोणत्या भिक्षुकाच्या स्मरणार्थ खोदण्यात आलेला आहे ह्याची माहिती मिळते. चैत्यगृह आणि विहारांचे खोदकाम पूर्ण झाल्यानंतर स्तूपांचे खोदकाम झाले असावे. त्यामानाने कान्हेरी येथील स्तूप साधारणपणे ५-६ व्या शतकातील असून ते पक्क्या विटांचे आहेत.

शिलालेख क्र. १

लेणी क्र. ६ मध्ये उजव्या बाजूच्या खोलीच्या दरवाज्यावर हा लेख कोरला आहे.

बाधया हालिकजयाया दानं

भाषांतर: बाध या शेतकऱ्याच्या बायकोचे दान

 शिलालेख क्र. २

चैत्यगृहात छताला लागून असलेल्या एका लाकडी तुळईवर कोरलेला आहे.

Bhaje02

धमभागस पसादो

भाषांतर: धर्मभागस याने दिलेला प्रासाद

शिलालेख क्र. ३

लेणे क्र. १८ च्या उजव्या बाजूला असलेल्या खोलीच्या दरवाज्यावर कोरलेला आहे.

नादसयस नायस

भोगवतस गाभो दानं

भाषांतर: भोगवतच्या नादसयसनाय याने या खोलीचे दान दिले

शिलालेख क्र. ५

लेणी क्र. १९ च्या पाण्याच्या टाक्यावर हा लेख कोरला आहे.

पाण्याचे टाके आणि शिलालेख

महारठीस कोसिकीपुतस

विण्हुदत्तस देयधम पोढी

भाषांतर: महारठीस कोसिकीपुतस विण्हुदत्त (विष्णूदत्त) याने धर्मासाठी दिलेली टाके (पोढी)

शिलालेख क्र. ६

लेणी क्र. २०, स्तूपसमूहातील स्तूप क्र. ६ वर लेख कोरला आहे. ह्या लेखाच्या सुरुवातीला स्वस्तिक कोरलेले आहे.

शिलालेख - स्तूप क्र. ६
शिलालेख – स्तूप क्र. ६
शिलालेख - स्तूप क्र. ६
शिलालेख – स्तूप क्र. ६
स्तूप क्र. ६
स्तूप क्र. ६

थेरानं भयंत संघदिनानं

भाषांतर: आदरणीय स्थविर संघदिनाचा

शिलालेख क्र. ७

लेणी क्र. २०, स्तूपसमूहातील स्तूप क्र. ७ वर लेख कोरला आहे. या लेखाच्या सुरुवातीला श्रीवत्स हे शुभचिन्ह आहे.

शिलालेख - स्तूप क्र. ७
शिलालेख – स्तूप क्र. ७
शिलालेख - स्तूप क्र. ७
शिलालेख – स्तूप क्र. ७
स्तूप क्र. ७
स्तूप क्र. ७

थेरानं भयंत अंपकिणकानं थूपो

भाषांतर: आदरणीय स्थविर अंपकिण यांचा स्तूप.

भाजे लेणे मुख्य ब्लॉग (अप्रतिम भाजे लेणी)

संदर्भ

  1. Inscriptions from the Cave-temples of Western India (J. Burgess and Bhagwanlal Indraji Pandit, 1881)
  2. महाराष्ट्र व गोवे शिलालेख-ताम्रपटांची वर्णनात्मक संदर्भ सूची (शांताराम भालचंद्र देव, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, १९८२)

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

भाजे येथील बौद्ध गुंफा भाग 1

भारतीय द्विपकल्पातील कृष्णा आणि गोदावरी या नद्यांच्या खोर्‍यांमधील प्रदेशाला दख्खनचे पठार असे सर्वसाधारणपणे संबोधले जाते. गेले काही महिने या दख्खनच्या पठारावर असलेल्या अनेक ठिकाणच्या बौद्ध गुंफांना मी भेटी देतो आहे. या बौद्ध गुंफा साधारणपणे इ.स.पूर्वीच्या तिसर्‍या किंवा दुसर्‍या शतकात प्रथम खोदल्या गेल्या आणि इ.स. नंतरच्या सातव्या किंवा काही ठिकाणी आठव्या शतकापर्यंत या गुंफात राबता चालू होता. या भेटींमध्ये माझ्या मनाला एक प्रश्न सतत पडतो आहे की गुंफा खोदून त्यात मठ स्थापन करण्याची ही पद्धत दख्खनमधील बौद्ध धर्मीयांत कधीपासून आणि कोणत्या गुंफेपासून सुरू झाली असेल? माझ्या मनातील हा प्रश्न दुसर्‍या पद्धतीने किंवा शब्दात विचारायचा ठरवला तर दख्खनमधे सर्वात प्रथम किंवा सुरुवातीच्या कालात कोणत्या गुंफा खोदल्या गेल्या असाव्यात? असाही विचारला जाऊ शकतो. माझ्या आतापर्यंतच्या भेटींच्यात इ.स.पूर्व दुसर्‍या शतकाच्या शेवटच्या काही दशकात खोदल्या गेलेल्या बर्‍याच गुंफा मी पाहू शकलो आहे. पितळखोरे येथील गुंफा, अजंठ्यामधील 9 व 10 क्रमांकाच्या गुंफा व नाशिक येथील 18 व 19 क्रमांकाच्या गुंफा या सगळ्या याच कालात खोदल्या गेल्या असल्याने त्यांच्यात खूपच साधर्म्य दिसून येते आहे.

मी आता पुण्याजवळच असलेल्या भाजे येथील गुंफा पहाण्यासाठी निघालो आहे. या गुंफांच्यात कदाचित माझ्या मनातील प्रश्नाचे उत्तर मला सापडेल अशी आशा मला वाटते आहे. मी या आधी भेट दिलेल्या कार्ले गुंफांच्या साधारण पश्चिमेला या गुंफा आहेत. त्यामुळे कार्ले गुंफांप्रमाणेच भाजे गुंफा या देखील भारतातील एक प्रमुख रस्ता असलेला मुंबई-पुणे हमरस्ता किंवा नॅशनल हायवे क्रमांक 4 पासून काही किमी अंतरावरच असल्याने, भेट देण्यासाठी अतिशय सोप्या आहेत. मुंबईहून प्रवास करत असल्यास खंडाळा घाट व लोणावळा हे हिल स्टेशन ओलांडल्यानंतर उजव्या हाताला मळवलीकडे जाणारा एक छोटासा रस्ता साधारण 8 ते 10 किमी अंतरावर लागतो. या रस्त्याची अवस्था मात्र सतत जाणवणार्‍या खड्याखळग्यांमुळे अगदी दयनीय अशी झालेली वाटते आहे. हा असा रस्ता चाकाखाली असल्याने साहजिकच आमच्या चारचाकीची गती आता अगदी मंद झाली आहे व चालकाला अतिशय कुशलतेने मार्ग काढावा लागतो आहे. रस्त्याच्या डाव्या हाताला मला एक छोटेसे तळे दिसते. त्याच्या काठावर एक शिवमंदिर आहे. मला मात्र या मंदिराच्या परिसरात असलेल्या बॉटल ब्रश फुलांनी फुललेल्या झाडाचा मोह पडतो आहे. एखाद्या ब्रशसारख्या दिसणार्‍या लालभडक फुलांनी हे झाड नुसते फुलून गेले आहे. आम्ही मात्र रडतखडत पुढे जात राहतो. समोर मुंबई-पुणे रेल्वे लाईनवरचे एक रेल्वे क्रॉसिंग दिसते आहे. मात्र सुदैवाने ते खुले आहे. रेल्वे क्रॉसिंगच्या लगतच, मुंबई-पुणे एक्सप्रेसवे क्रॉस करण्यासाठी म्हणून बनवलेला एक ओव्हर ब्रिज पार करून खाली उतरल्यावर एक खेडेगाव लागते. या खेडेगावात, अगदी लगतच असलेला एक ऊंच पर्वत सोडला, तर सांगण्यासारखे असे काहीच मला दिसत नाही. हा गावालगतचा पर्वत म्हणजे विसापूर किल्ला ज्या पर्वतराजीवर वसवलेला होता त्याच पर्वतरांगेच्या एका टोकाला असलेला हा पर्वत आहे. गावातून पुढे जाणारा रस्ता या पर्वताला प्रदक्षिणा घालत, वळत, वर चढत राहतो. थोडे पुढे गेल्यावर गेल्यावर एक गाव दिसते आहे. गावात मध्यभागी वाहनतळ आणि बसचा थांबा दिसतो आहे, समोर एक पाटीही दिसते आहे. पाटी वाचल्यावर माझ्या लक्षात येते की आम्ही ‘भाजे‘ गावात पोहोचलो आहोत. आमची चारचाकी वाहनतळावर सोडून आम्ही समोर दिसणार्‍या, धुळीने भरलेल्या व अर्ध्याकच्च्या बनवलेल्या रस्त्याने, पुढे चालण्यास प्रारंभ करतो. या रस्त्याचे कधीकाळी डांबरीकरण केलेले असावे. सध्या मात्र तो मधे मधे असलेल्या खड्यांच्यांत खडी टाकून जेमतेम जा ये करता येईल इतपतच तयार केलेला दिसतो आहे.

या रस्त्याने साधारण अर्धा किमी पुढे गेल्यावर मला समोरच्या डोंगराच्या खड्या चढावर, वर चढत जाणार्‍या पायर्‍या दिसत आहेत. पायर्‍यांचे बांधकाम दगडी आहे व बर्‍याच जुन्या काळातले दिसते आहे. मात्र त्यांची देखभाल योग्य रितीने होत आहे हे जाणवते आहे. मी पायर्‍या चढायला सुरुवात करतो. एकूण पायर्‍या 100 च्या आसपास असाव्यात. असाव्यात. पण पायर्‍यांची ऊंची जरा जास्तच वाटते आहे. त्यामुळे 2/3 वेळा मधे थांबणे मला भाग पडले आहे. दगडी बांधकाम केलेला एक तिकिटे विकण्याचा बूथ डाव्या बाजूला दिसतो आहे. मी तेथे जाऊन पुरातत्त्व विभागाने ठरवलेले 5 रुपये हे प्रवेश शुल्क भरतो. येथून साधारण 50 मीटर अंतरावर लेण्यांच्या आवाराचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वार खुले आहे आणि तेथे कोणीच रक्षक दिसत नाही. कदाचित 50 मीटरवरच तिकिट बूथ असल्याने येथे कोणी रक्षक ठेवलेला नसावा. तिकिट आधीच खरेदी केलेले असल्याने मी प्रवेशद्वारातून आत शिरतो.

प्रवेशद्वाराच्या अगदी समोरच भाजे लेण्यांमधील सर्वात प्राचीन मानल्या जाणार्‍या बौद्ध गुंफा आहेत. भाजे लेणी, अजिंठा किंवा नाशिक लेणी जशी एका आडव्या लांब पट्ट्यालगत पसरलेली दिसतात तशी न दिसता एकमेकालगत खोदल्यासारखी वाटत आहेत. लेण्यांचे प्रथम दर्शन त्यामुळेच थोडे निराळे वाटते आहे. या लेण्यांकडे टाकलेला एक दृष्टीक्षेप सांगून जातो की नंतरच्या कालात दख्खनच्या पठारावर खोदल्या गेलेल्या बौद्ध गुंफांचे उगमस्थान असे ज्या 2 किंवा 3 ठिकाणच्या गुंफांना म्हणता येईल ( भाजे, कोंडाणे व बेडसे) त्यापैकी एक किंवा त्यापैकी सर्वात आधी खोदलेल्या अशा या गुंफा असाव्यात. भाजे लेण्यांमध्ये पश्चिमेला मुख असलेल्या एकूण 18 गुंफा आहेत. यापैकी काही समोरील प्रांगणाच्या पातळीच्या थोड्याशा वर आहेत तर काही वरच्या मजल्यावर आहेत असे म्हणता येईल. उत्तरेकडून गुंफांना क्रमांक दिलेले आहेत. इतर ठिकाणच्या गुंफांप्रमाणेच मध्यभागी व प्रांगणाच्या पातळीला असलेल्या गुंफा सर्वात आधी खोदलेल्या आहेत व नंतरच्या कालात खोदलेल्या गुंफा कडांना किंवा वरच्या मजल्यावर आहेत. माझ्या समोर मला दिसत आहेत त्या मधल्या किंवा 12 आणि 13 क्रमांकाच्या गुंफा. 12 क्रमांकाची गुंफा म्हणजे एक चैत्यगृह आहे. हे चैत्यगृह व पितळखोरे येथील चैत्यगृह किंवा अजंठ्यातील 10 क्रमांकाचे चैत्यगृह, यांच्यात मला विलक्षण साम्य दिसते आहे. हे चैत्यगृह अतिशय साधे आहे व याच्या अंतर्भागात (खांबावर असलेल्या काही बौद्ध चिन्हांचा अपवाद वगळता) कोणत्याही प्रकारच्या शिल्पांचा किंवा कोरीव कामाचा संपूर्ण अभाव आहे. या एकाच गोष्टीवरून असे अनुमान काढणे सहज शक्य आहे की बौद्ध भिख्खूंनी डोंगरातील लेण्यांमध्ये बौद्ध मठ निर्माण करण्यास प्रारंभ केल्यानंतर यशस्वी रितीने निर्माण केलेली प्रथम किंवा त्या सुमाराची ही निर्मिती आहे.

जेम्स बर्जेस भाजे लेण्यांचे वर्णन करताना लिहितो:

” लाकडापासून व फक्त लाकडापासून निर्माण केलेल्या इमारतींत वास्तव्य करण्याची ज्यांना सवय आहे आणि ज्यांनी आता (डोंगरकपारीतील खडकांसारखे) जास्त टिकाऊ असे माध्यम वापरण्यास नुकतीच सुरुवात केली आहे अशा लोकांनी निर्माण केलेली ही वास्तू आहे. दगड हे माध्यम वापरून ज्या वास्तू बांधल्या जातात त्यांचे कोणतेच वैशिष्ट्य या वास्तूमध्ये दिसत नसून या वास्तूची सर्व वैशिष्ट्ये, फक्त लाकूड हे माध्यम वापरून केलेल्या वास्तूचीच स्पष्टपणे दिसून येतात. या ठिकाणी अतिशय रोचक असा एक निष्कर्ष काढणे सहज शक्य वाटते की या वास्तू निर्मितीच्या कालानंतरच्या पुढच्या हजार वर्षात, लाकडी इमारतींच्या बांधणीच्या ठराविक साचाच्या कल्पनांतून भारतीय स्थापत्य झगडत का होईना पण हळूहळू बाहेर पडत गेले आणि दगड वापरून बनवलेल्या अतिशय भव्य व वैभवशाली वास्तू भारतीयांनी उभ्या केल्या.”

भाजे लेण्यांना भेट दिल्यानंतर हे सहजपणे स्पष्ट होते आहे की पर्वत कपारींमध्ये गुंफा खोदून त्यात बौद्ध मठ स्थापन करण्याचे कौशल्य भाजे मठाच्या कामात बौद्ध भिख्खूंनी प्राप्त करून घेतले असले पाहिजे व नंतरच्या काळात या कुशलतेचा वापर करून ते आन्ध्रातील अमरावती, चाळिसगावजवळचे पितळखोरे आणि दक्षिणेला कार्ले या सर्व ठिकाणी असे बौद्ध मठ खोदले गेले. जेम्स बर्जेसच्या मताने भाजे लेण्यामधील सर्वात जुन्या गुंफा इ.स. पूर्व 200 च्या आधी परंतु सम्राट अशोकाच्या (इ.स.पूर्व 272) कालाच्या नंतर या कालखंडात खोदलेल्या असल्या पाहिजेत.

12 क्रमांकाचे चैत्यगृह हे 27 फूट रूंद आहे आणि साधारण 59 फूट खोल आहे. आतला अगदी मागचा भाग अर्धवर्तुळाकार आकाराचा आहे. मध्यवर्ती प्रार्थनागृह आणि बाजूचे 3-1/2 फूट रूंद पॅसेजेस या मध्ये 27 अष्टकोनी स्तंभ खोदलेले आहेत. आतल्या अंगाला असलेले स्तंभ इतर चैत्यगृहांप्रमाणेच अर्धवर्तुळाकार वक्ररेषेवर उभारलेले असून या अर्धवक्र रेषेच्या मध्य बिंदूवर स्तूपाची उभारणी आहे. स्तूप आकाराने बराच मोठा असून त्याच्या शिरावर 2 भागाची अवशेष मंजूषा ठेवलेली आहे. कडेच्या काहीं स्तंभांवर कमल पुष्प किंवा त्रिशूळ या सारखी बौद्ध पवित्र चिन्हे कोरलेली दिसत आहेत.

छताला कार्ले येथील चैत्यगृहासारखाच वक्र कमानीचा आकार दिलेला आहे. छताच्या खाली सागवानी लाकडाच्या व कमानीच्या आकाराच्या मोठ्या तुळया किंवा गर्डर्स छताजवळ बसवलेल्या आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 2200 वर्षांहून जास्त काल या तुळया टिकलेल्या आहेत. गुंफेच्या पुढच्या भागात खाली जमिनीवर व दोन्ही बाजूंच्या भिंतींवर लाकडी खुंट्या मारण्यासाठी खोदलेली चौरस आकाराची काही छिद्रे दिसत आहेत. या छिद्रांवरून आपल्याला असे म्हणता येते की गुंफेच्या मुखाजवळच्या भागावर जमिनीपासून ते वरच्या मोठ्या कमानीपर्यंत एक मोठे लाकडी पार्टिशन उभारलेले असले पाहिजे. कार्ले चैत्यगृहातील मुखाजवळचे या सारखे पार्टिशन हे पाषाणातच खोदलेले आहे. कार्ले गुंफा भाजे गुंफांनंतर 300 किंवा 400 वर्षांनी खोदल्या गेल्या असल्याने हे सहज शक्य वाटते.

मी चैत्य गृहातून बाहेर येतो व गुंफेच्या मुखावरील भागाकडे साहजिकच माझे लक्ष वेधले जाते. चैत्यगृहाचे संपूर्ण मुख अगदी वरच्या घोड्याच्या नालाच्या आकाराच्या कमानीपर्यंत पूर्णपणे खुले आहे. परंतु या कमानीच्या दोन्ही अंगांना व वरच्या बाजूस एखाद्या लाकडी बांधकामाच्या इमारतीला जसे कोरीव नक्षीकाम असावे त्याच पद्धतीचे नक्षीकाम पाषाणात कोरलेले दिसते आहे.

क्रमश:

 

भाजे लेणी महाराष्ट्रातल्या सर्वात जुन्या लेण्यांपैकी एक यात काहीच संशय नाही. इथल्या चैत्यगृहाला वरांडा न खोदता चैत्यगृहाची कमान मुख्य कातळातच कोरली गेली आहे. अर्थात पावसाचे पाणी झिरपून दर्शनी भागाचे काही प्रमआणात नुकसान झाले आहे. अशीच अवस्था इतक्याच प्राचीन असलेल्या कोंडाणे लेणीतही दिसून येते. नंतरच्या काळात मात्र ही चूक सुधारून घेत आधी वरांडा खोदण्याची पद्धत सुरु झाल्याचे दिसते.

भाजे लेण्यातील चैत्यगृहाचे स्तंभ आणि आतील भिंती देखील कलत्या ठेवलेल्या आहेत. कलत्या स्वरूपामुळे छताचा दाब ते तोलून धरू शकतील या उद्देशानेच अशी योजना केलेली दिसते. अर्थात नंतरच्या काळात मात्र अशा कलत्या स्तंभांची गरज नाही असे कारागिरांच्या लक्षात आले असावे व त्यामुळे तशी रचना नंतर दिसत नाही.

भाजे लेणीतील स्तूपसुद्धा गुळगुळीत आहे. मौर्यकालीन झिलईचा हा प्रभाव. स्तूपावर एका विशिष्ट प्रकारच्या रसायनाचा लेप देऊन स्तूप चमकदार आणि गुळगुळीत केलेला दिसून येतो. या स्तूपावर वेदिकापट्टीची नक्षी पण दिसत नाही.

 मोर्यकालीन पाषाणवस्तूंना झिलई देऊन अगदी गुळगुळीत करण्याची प्रथा होती हे भटक्या यांचे विधान अतिशय योग्य वाटते. पिप्रावा येथील स्तूपामध्ये कृष्ण मोहन श्रीवास्तव या भारतीय शास्त्रज्ञाला भगवान बुद्धांचे अस्थी अवशेष ज्या कलशात ठेवलेले सापडले होते त्या पाषाण कलशाला सुद्धा अशीच झिलई दिलेली होती. हा कलश सम्राट अशोकाने ठेवलेला असावा असे काही लोक मानतात.

 

ह्या लेण्यांना मी अनेक वेळा सहलीचा भाग म्हणून भेटी दिल्या होत्या. एकदा मळवली ते पौड (विसापूर-लोहगड-तिकोना मार्गे) असे पायी चालण्याच्या वेळी तेथे रात्री मुक्कामहि केला होता. अर्थात हे त्या जुन्या काळातच शक्य होते कारण तेव्हा लेणी पूर्ण 'बेवारशी' होती आणि कोणीहि तेथे जाऊन काहीहि करू शकत असे!

वरील लाकडी तुळया पहिल्यापासूनच्या असण्याचा उल्लेख मात्र बरोबर वाटत नाही. ते पुरातत्त्व खात्याचे अलीकडचे काम दिसते. अशा तुळया पूर्वी पाहिल्याचे स्मरत नाही. इतकी शेकडो वर्षे असे उत्तम लाकूड आसपासच्या खेडेगावच्या जनतेपासून सुरक्षित राहणे अशक्य वाटते. किल्ल्यांमधील ताशीव दगडहि उतरवून नेले जातात तिथे लाकूड कोण सोडेल?

Bombay Presidency Gazetteer Series, Vol XVIII Part III (पुणे भाग ३) येथे १०९-११० पानांवर ह्याच क्र. १२ च्या लेण्याचे १८८० च्या पुढेचे-मागचे वर्णन आहे. तेथे काही तुळया नाहीशा झाल्याचा आणि उरलेल्या काहींची नासधूस झालेली असण्याचा उल्लेख आहे. हे वर्णनहि आता बरेच जुने झाले तेव्हा असे वाटते की उरल्यासुरल्या तुळया गावातील जनेतेने काढून नेल्या असणार.

पाणी झिरपण्याचा वर उल्लेख आला आहे. त्या संदर्भात असे स्मरते की लेण्यांच्या वरील टेकडीवर गेले की उतारावरचे पाणी बाजूला वाहून नेण्यासाठी खडकामध्येच कोरलेला एक चर दिसतो. पावसाचे पाणी सरळ खाली प्रवेशद्वारापुढे पडण्याऐवजी बाजून निघून जावे ह्यासाठी ती व्यवस्था केलेली दिसते.

 

लाकडी तुळया या जुन्याच आहेत. पुरातत्त्व विभागाचा हा संदर्भ बघावा.

भाजे येथील बौद्ध गुंफा भाग २

(मागील भागावरून पुढे)

भाजे येथील चैत्यगृहाच्या मुखाजवळील कोरीव काम हे त्याच कालात खोदलेल्या पितळखोरे, अजंठा व नाशिक येथील चैत्यगृहांमधील कोरीव कामापेक्षा बरेच निराळे दिसते. पितळखोरे येथील चैत्य गृहाप्रमाणेच या चैत्यगृहाच्या मुखाचा संपूर्ण भाग पूर्णपणे खुला आहे आणि चैत्य गृहाचे छत सुरू होते त्याच उंचीवर पण बाहेरील बाजूस, इतर ठिकाणच्या चैत्य गृहांप्रमाणेच दिसणारी, घोड्याच्या नालाच्या आकाराची भलीथोरली कमान येथेही खोदलेली दिसते आहे. या कमानीखालच्या खुल्या भागात पुरातत्वज्ञ जेम्स बर्जेसच्या म्हणण्याप्रमाणे, एक लाकडी पार्टिशन पूर्वी उभे केलेले होते. मात्र वर असलेल्या या कमानीच्या दोन्ही बाजूंना व वरच्या बाजूस खूप मोठ्या प्रमाणात कोरीव काम केलेले येथे दिसते आहे.

कमानीच्या खालच्या भागाच्या दोन्ही बाजूंना (सांची येथील) बौद्ध रेलिंग पॅटर्नचा व 5 किंवा 6 पायर्‍या असलेला असा एक पट्टा कोरलेला आहे. मात्र डाव्या बाजूचा पट्टा हा उजव्या बाजूला असलेल्या पट्ट्याच्या थोडा खाली कोरला गेलेला आहे. डाव्या बाजूकडील कोरीव काम व उजवीकडील काम यात सारखेपणा किंवा साधर्म्य असे फारसे दिसत नसल्याने या दोन्ही बाजू निरनिराळ्या काळात सजवल्या गेल्या असाव्यात असे मला तरी वाटते आहे. या पट्ट्याच्या बर्‍याच वर, उलट्या ठेवलेल्या 5 पायर्‍या-पायर्‍यांच्या पिरॅमिडच्या डिझाइनसारखे डिझाइन असलेला एक सलग पट्टा आहे. या पट्ट्याची डावी व उजवी बाजू मात्र एका सरळ रेषेत कोरल्या गेलेल्या आहेत. कमानीच्या उजव्या हाताला असलेल्या दोन्ही पट्ट्यांच्या मधे, एक कोनाडा खोदलेला असून त्यात 2 धर्मचक्रे व लॅटिस डिझाइन कोरलेले आहे तर कमानीच्या डाव्या हाताला मात्र याच भागात अनेक छोटे छोटे कोनाडे खोदलेले दिसत आहेत. असेच कोनाडे, पिरॅमिडचे डिझाइन असलेल्या पट्ट्याच्या वरच्या बाजूसही (कमानीच्या दोन्ही बाजूंना) खोदलेले आहेत. या पिरॅमिडचे डिझाइन असलेल्या पट्ट्याच्या वर दोन्ही बाजूंना, घोड्याच्या नालाच्या आकाराच्या दोन कमानी खोदलेल्या आहेत व त्यांच्या आतल्या बाजूंना बेर्म रेल व लॅटिस डिझाइन कोरलेले आहे. या 2 वरच्या कमानींच्याही वरच्या बाजूस, बौद्ध रेलिंग डिझाइन असलेले 2 सलग पट्टे कोरलेले आहेत. डाव्या बाजूंच्या कोनाड्यांत, 3 ठिकाणी युगुले कोरलेली आहेत आहेत् तर उजव्या बाजूच्या खालच्या पट्ट्याच्याही खाली,आता खूप प्रमाणात नासधूस झालेले असे एका स्त्रीचे शिल्प आहे.

आपला डावा हात कंबरेवर ठेवून उभ्या असलेल्या या स्त्रीच्या कंबरेला जाळीचे डिझाइन असलेला शेला किंवा मण्यांनी बनवलेला पट्टा बांधलेला आहे. तिच्या डोक्यावर, राजस्थानी किंवा गुजराथी स्त्रिया आजदेखील जसे घुंघट घेतात तसेच घुंघट आहे. कोनाड्यातील अस्पष्ट दिसणार्‍या युगूल शिल्पांच्या गळ्यात, फुलांचे हार, हातात कंकणे व कानात कुंडले स्पष्ट दिसू शकत आहेत तर पुरुषांच्या डोक्यावर मुंडासे आहे. स्त्रियांची केशभूषा मात्र मोठी वैशिष्ट्यपूर्ण वाटते आहे. एका स्त्रीच्या डोक्यावर मुगुट असण्याची शक्यता आहे. एका शिल्पामधील स्त्री, शेजारील पुरुषाच्या गळ्यात पुष्पहार घालताना दाखवलेली आहे.

चैत्यगृहाच्या मुखाजवळच्या कोरीव कामाचे निरिक्षण करून झाल्यावर, मी 1 ते 11 क्रमांकांच्या गुंफांमधून एक धावती चक्कर टाकण्याचे ठरवतो आहे. यापैकी बहुतेक सर्व गुंफा या 2 किंवा 3 भिख्खूंच्या कोठड्या असलेले विहार आहेत. यापैकी एका विहाराच्या भिंतीवर मला अजिंठा गुंफातील 12 क्रमांकाच्या गुंफेत असलेल्या एका रेलिंग डिझाइनशी तंतोतंत जुळणारे डिझाइन दिसते आहे. या रेलिंग डिझाइनला असिरियन पॅटर्न (Assyrian pattern) या नावाने ओळखले जाते. पायर्‍या-पायर्‍या असलेले, एका शेजारी एक, काढलेले त्रिकोण या पॅटर्न मधे असतात व इराण किंवा पर्शिया मध्ये हा पॅटर्न आढळून येतो. अजंठा आणि भाजे येथे फक्त एकाच कोठडीच्या द्वाराच्या वर हा पॅटर्न कोरलेला आहे व तो तसा कोरण्यामागचे प्रयोजन मला समजू शकत नाहीये. कदाचित ती कोठडी वरिष्ठ आचार्यांची किंवा महत्त्वाच्या भिख्खूंची आहे हे दर्शवण्यासाठी हा पॅटर्न कोरलेला असावा. एका दुसर्‍या गुंफेत मला असाच व्हरांड्यासमोर उभारलेल्या स्तंभाच्या वर असलेल्या कॅपिटलचा एक ढासळलेला भाग दिसतो आहे. या कॅपिटलवर एकमेकाकडे पाठ करून बसलेले दोन हत्ती कोरलेले आहेत.

मी आता 12 क्र्मांकाच्या चैत्य गृहाकडे परत आलो आहे व दक्षिणेकडे पुढच्या गुंफा बघण्यासाठी पुढे निघतो आहे.

पुढच्या बहुतेक गुंफा, हिनयान कालातील साध्या व कोरीव काम विरहित अशाच आहेत. लॅटीस डिझाइनच्या खिडक्या काही ठिकाणी कोरलेल्या आहेत तर कोठड्यांवर बौद्ध रेलिंग डिझाइन व घोड्याच्या नालाच्या आकाराच्या कमानी या बहुतेक गुंफात आहेतच.

17 क्रमांकाच्या गुंफेच्या दक्षिणेस एका उघड्या गुंफेत, दोन पाण्याची टाकी खोदलेली दिसत आहेत. या टाक्यांवर एक शिलालेख आहे. या शिलालेखात फक्त एवढाच मजकूर आहे.

” कोसिकी महारथीचा पुत्र विन्हुदता याने धार्मिक कारणानिमित्त दिलेली भेट ”

या मजकुरावरून फारशी काहीच माहिती मिळत नाही. या पुढे अशाच एका उघड्या गुंफेत 14 बांधलेले स्तूप दिसत आहेत. वरिष्ठ भिख्खूंच्या अस्थी बहुदा यात ठेवलेल्या असाव्यात. यापैकी बहुतेक स्तूपांच्या डोक्यावर कॅपिटल्स वा अस्थी मंजूषा किंवा हर्मिका होत्या. आता फक्त उत्तरेकडे असलेल्या एका स्तूपाच्या डोक्यावर अशी हर्मिका किंवा अस्थी मंजूषा उरलेली दिसते आहे. त्यावर बरेच कलाकुसरीचे कोरीव काम केलेले दिसते आहे.

पूर्वेच्या दिशेने आणखी थोडे अंतर पुढे गेल्यानंतर एक जुनी पण अत्यंत रोचक अशी गुंफा समोर दिसते आहे. व्हरांड्याच्या बाहेरील बाजूस असलेल्या स्तंभांवरून व गुंफ़ा समुहाच्या अगदी एका कडेला असलेले या गुंफेचे स्थान, यावरून ही गुंफा चैत्यगृह खोदलेल्या कालाच्या बर्‍याच नंतर खोदली गेली असली पाहिजे हे स्पष्ट आहे. ही गुंफा दगड मातीने एवढी भरून गेलेली होती की इ.स. 1879 पर्यंत या गुंफेचा शोधच लागलेला नव्हता. आता 18 हा क्रमांक देण्यात आलेली ही गुंफा, संपूर्णपणे बौद्ध विहार असूनही काही अज्ञात कारणांमुळे, सूर्यदेवाचे मंदिर म्हणून ओळखली जात असली तरी या गुंफेला भाजे गुंफांमधील सर्वात प्रेक्षणीय व रोचक बौद्ध गुंफा असेच म्हणावे लागेल.

क्रमश:

 पितळखोरे येथे देखील असे छोटे स्तूप आहेत. मात्र ते मुख्य मठापासून जरा लांब व नदीच्या पैलतीरावर बांधलेले आहेत.

भाजे येथील बौद्ध गुंफा भाग 3

(मागील भागावरून पुढे)

एका अरुंद पायवाटेवरून थोडे अंतर चालून गेल्यानंतर मी 18 क्रमांकाच्या गुंफेच्या प्रांगणापाशी पोचतो आहे. मी वर म्हटल्याप्रमाणे ही गुंफा येथे असलेल्या गुंफांमधील सर्वात रोचक असलेली गुंफा म्हणून मानली जाते. प्रथम दर्शनी ही गुंफा नाशिक मधील 19 क्रमांकाच्या किंवा कृष्णराजाच्या गुंफेच्या समान असल्याचे भासते. परंतु जरा बारकाईने निरीक्षण केल्यावर व्हरांड्याचा बाह्य भाग आणि तेथे असलेले स्तंभ या पुरतेच हे साम्य सीमित आहे हे माझ्या लक्षात येते. याही गुंफेत असलेले व्हरांड्याच्या बाहेरील बाजूकडील स्तंभ, हे नाशिक मधील 19 क्रमांकाच्या गुंफेप्रमाणेच तळाला व छताजवळ चौरस आकाराचे आहेत व मध्यभागी त्यांना अष्टकोनी आकार दिलेला आहे. या स्तंभांच्या मागे असलेल्या व्हरांड्याच्या आतील भिंतीवर असलेल्या एका गवाक्षाला नाशिक गुंफेप्रमाणेच जाळीचे डिझाइन खोदलेले आहे.
ही गुंफा म्हणजे एक छोटा विहार किंवा बौद्ध भिख्खूंचे निवासस्थान आहे. या विहाराच्या रचनेत पुढे व्हरांडा व त्याच्या मागे एक 16 फूट रूंद आणि 17 फूट खोल या आकाराचा हॉल आहे. या हॉलच्या आतील भिंतीच्या मागे भिख्खूंसाठी 2 कोठड्या खोदलेल्या आहेत तर अशाच 3 कोठड्या पुढील व्हरांड्याच्या दोन्ही टोकांना खोदलेल्या आहेत. मी आधी बघितलेल्या सर्व विहारांमध्ये व्हरांड्यातून हॉलमध्ये जाण्यासाठी खोदलेली द्वारे ही साधारणपणे हॉल-व्हरांडा यांच्या सामाईक भिंतीच्या मध्यावर किंवा मध्याच्या दोन्ही बाजूंना समान अंतरावर अशी खोदलेली होती. परंतु या विहारात अशी 2 द्वारे एकंदर आराखड्याचा कोणताही विचार न करता जेथे जागा मिळेल तेथे खोदलेली दिसत आहेत. या शिवाय या भिंतीच्या डाव्या बाजूला असलेल्या द्वाराच्या आणखी डावीकडे जाळीचे डिझाइन असलेले एक गवाक्षही एका कोपर्‍यात जेथे जागा मिळाली तेथे खोदलेले आहे.
हॉलच्या आतल्या अंगाला ज्या भिख्खूंच्या दोन कोठड्या खोदलेल्या आहेत त्यांच्या दारावर इतर विहारांप्रमाणेच घोड्याच्या नालाच्या आकाराच्या कमानी कोरलेल्या आहेत. या कमानींच्या आतल्या बाजूस तुळयांची बाहेर आलेली टोके, बेर्म रेल आणि चौकटीचे जाळी डिझाइन कोरलेले दिसते आहे. कोठड्यांच्या द्वारामधील भिंतीमध्ये एक कोनाडा खोदलेला आहे. या कोनाड्याच्या 3 बाजू आयताकृती असून चौथ्या बाजूला घोड्याच्या नालाच्या आकाराच्या कमानीचा आकार दिलेला दिसतो आहे. या कमानीचा आकार द्वारावरील कमानींच्या आकाराशी मिळता-जुळता आहे. या कोनाड्याच्या खाली सांची पद्धतीच्या बौद्ध रेलिंगचे पट्टे कोरलेले आहेत. या पट्ट्याखाली मध्यभागी एक यक्षाची आकृती आपले दोन्ही हात उंचावून या विहाराला आधार देताना दर्शवते आहे. या यक्षाचे दोन्ही हात वरच्या बौद्ध रेलिंगला, बाजूच्या 2 कोठड्यांच्या द्वारांमधील अंतराच्या बरोबर मध्यभागी टेकलेले आहेत.
समोरच्या प्रांगणातून व्हरांड्यात प्रवेश घेण्यासाठी बांधलेल्या 3/4 पायर्‍या सुद्धा व्हरांड्याच्या मध्यावर नसून एका बाजूला आहेत. या पायर्‍यांच्या डाव्या बाजूला एक पूर्ण स्तंभ व एक कोरलेला स्तंभ (pilaster) आहे तर उजव्या बाजूस 5 स्तंभ आणि एक कोरलेला स्तंभ आहे. स्तंभांचा आकार (तळाला व छताजवळ चौरस आणि मध्यभागी अष्टकोनी) आणि जाळीच्या खिडकीचे डिझाइन यांचे नाशिक मधील कृष्णराजाच्या गुंफेशी असलेले साम्य लक्षात घेता ही गुंफा इ.स.पूर्व 200 च्या सुमारास आणि भाजे येथील इतर गुंफांच्या काही काळानंतर खोदलेली गेलेली असावी. मात्र व्हरांड्यातील मागच्या भिंतीच्या उजव्या कोपर्‍यात असलेला एक कोरलेला स्तंभ (pilaster) त्याच्या रचनेमुळे मला मोठा वैशिष्ट्यपूर्ण वाटतो आहे. या कोरलेल्या स्तंभाचा तळाजवळील आणि मध्यभाग हा बाहेरील स्तंभांसारखाच कोरलेला असला तरी छताजवळील भाग हा कार्ले किंवा नाशिक येथील इ.स.नंतरच्या पहिल्या शतकात कोरलेल्या स्तंभांच्या डिझाइन प्रमाणे, म्हणजे एका उलट्या ठेवलेल्या घटावर ठेवलेला पायर्‍या-पायर्‍यांचा उलटा ठेवलेला पिरॅमिड, या पद्धतीचा दिसतो आहे. यावरून असे म्हणता येईल की जरी ही 18 क्रमांकाची गुंफा मूलतः इ.स.पूर्व 200 मध्ये खोदलेली असली तरी आतील कलाकुसर बर्‍याच नंतर म्हणजे इ.स.पूर्व प्रथम किंवा दुसर्‍या शतकात किंवा 300 किंवा 400 वर्षांनंतर केली गेली असावी. त्यामुळेच या व्हरांड्यात जेथे जागा मिळेल तेथे बास रिलिफ पद्धतीची शिल्पे कोरलेली आहेत यात आश्चर्य व्यक्त करण्याजोगे मला फारसे काही दिसत नाही. मात्र ही शिल्पे बघून एवढे नक्की म्हणता येते की ही गुंफा म्हणजे अभ्यासकांसाठी असलेला एक अद्भुत कलाविष्कार आहे. या शिल्पांत काय नाही? मानवी आकृत्या, काल्पनिक प्राणी, पक्षी, राक्षस यांची येथे रेलचेल आहे. ग्रीक पुराणांतील काल्पनिक प्राणी, पेगॅसस, सेंटॉर हे तर येथे आहेतच पण त्यांचे भारतीय अवतारही येथे दिसत आहेत. मला हे सर्व बघितल्यावर कमालीचा उत्साह वाटतो आहे व मी अगदी बारकाईने या गुंफेतील शिल्पे बघण्यास प्रारंभ करतो आहे.
आधी मी भिंतीच्या उजव्या कोपर्‍यात असलेल्या ज्या कोरलेल्या स्तंभाचा उल्लेख केला आहे त्या स्तंभाच्या छताजवळ असलेल्या कॅपिटलवर मला अतिशय विचित्र भासणार्‍या काही आकृती कोरलेल्या दिसत आहेत. जरा जवळ जाऊन बघितल्यावर तेथे एकूण 4 आकृत्या आहेत असे लक्षात येते. अगदी डावीकडची व उजवीकडची या दोन्ही आकृत्या म्हणजे घोड्याचे माने पर्यंतचे धड व त्यावर कंबरेपासून वर मानवी पुरुष असलेल्या एका विचित्र प्राण्याच्या आहेत. हा ग्रीक पुराणांतील सेंटॉर हा प्राणी आहे हे माझ्या लगेच लक्षात येते आहे. आहे. मात्र कॅपिटलच्या मध्यभागात असलेल्या दोन आकृत्या या आणखीनच विचित्र आहेत. या दोन्हीमध्ये धडाचा मानेपासून खालचा भाग बसलेल्या गाई प्रमाणे कोरलेला आहे तर वरचा भाग म्हणजे कंबरेपासून वर दाखवलेला भाग हा एका मानवी स्त्रीचा आकार आहे. ही आकृती बहुधा सेंटॉरची देशी आवृत्ती असली पाहिजे. कॅपिटलवरील हे शिल्प माझ्या दृष्टीने सर्वात रोचक ठरते आहे. या स्त्री-गोमातेने केसात मोत्यांच्या अनेक माळा गुंफून मोठी वैशिष्ट्यपूर्ण पण भली-थोरली केश रचना केलेली आहे. तिच्या कानात मोठी कर्णकुंडले आहेत तर गळ्यात दोन सरींचा एक हार घातलेला आहे तर दुसरा घातलेला हार लांब असून तो तिच्या नाभी पर्यंत येतो आहे. या हारात एक मोठे पेंड मध्यभागी झळकते आहे. माझ्या डाव्या बाजूला असलेल्या स्त्री-गोमाता आकृतीने आपला उजवा हात वर करून छताला आधार दिलेला आहे तर माझ्या उजवीकडील तशाच आकृतीने आपला डावा हात वर करून छताला आधार दिलेला आहे. दोन्ही आकृतींच्या मनगटावर कंगणे आहेत. खाली असलेल्या गाईंच्या आकृतींच्या गळ्यात ( जेथून मानवी स्त्री आकृती वरच्या बाजूस कोरलेल्या आहेत.) मोठ्या मण्यांच्या माळा घातलेल्या आहेत.
माझ्या उजवीकडे असलेल्या सेंटॉर आकृतीने आपला आपला डावा हात खाली मोकळा सोडलेला आहे व उजवा हात शेजारी बसलेल्या स्त्री-गोमातेच्या पाठेवर ठेवलेला आहे. त्याच्या उजव्या हातात कंगण, कानात कर्णभूषणे आणि गळ्यात फुलांचा हार दिसतो आहे. डोक्यावर महाराष्ट्रातील शेतकरी जसे मुंडासे बांधतात तसे मुंडासे असून कंबरेला शेला बांधलेला आहे. हा शेला कंबरेला किंवा खालच्या घोड्याच्या आकृतीच्या मानेजवळ दाखवलेला आहे. माझ्या डाव्या हाताला असलेला सेंटॉरची आकृती साधारण अशीच आहे परंतु त्या आकृतीने आपल्या उजव्या हाताने छताला आधार दिलेला आहे आणि डावा हात शेजारी बसलेल्या स्त्री-गोमातेच्या पाठीवर ठेवलेला आहे.
या कोरलेल्या खांबाच्या उजव्या बाजूला किंवा व्हरांड्याच्या उजव्या टोकाला ज्या दोन भिख्खूंच्या कोठड्या खोदलेल्या आहेत त्यांच्या प्रवेशद्वाराच्या खालच्या बाजूस कोरलेल्या आकृत्यांचा एक पट्टा दिसतो आहे. या पट्ट्यातील आकृत्या म्हणजे सुद्धा एक अतिशय अनोखे असे मिश्रण आहे. माझ्या डावीकडून सुरुवात केल्यास प्रथम दिसते ती पंख असलेल्या दोन घोड्यांची किंवा पेगॅससची जोडी, त्याच्या पलीकडे आहे, एक हात उंचावलेला यक्ष, एक घोडेस्वार, उंच केशरचना असलेली किंवा डोक्यावर घट घेतलेली एक स्त्री, एक यक्ष व शेवटी एक बैल आणि घोडा यांच्या प्रतिमा. या प्रतिमांच्या खाली अगदी तळाजवळ काही आता अगदी अस्पष्ट दिसणार्‍या आकृत्या आहेत. पितळखोर्‍यामधील चैत्यगृहाकडे जाणार्‍या पायर्‍यांच्या कडांना पेगॅसस कोरलेले मी बघितले होते. तसेच पेगॅसस येथेही आहेत. पुढे असलेल्या पेगॅससच्या पंखावर असलेली पिसे शिल्पकाराने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. अजूनही ही दिसू शकतात. यक्षाच्या आकृतीवर त्याच्या गळ्यात असलेला व नाभी पर्यंत पोचणारा फुलांचा हार, कंगणे, कंबरेवरचे धोतर यासारख्या अगदी बारीकसारीक गोष्टीसुद्धा दाखवलेल्या आहेत.
यानंतर मी आता व्हरांडा-हॉल यांच्यामधल्या सामाईक भिंतीकडे वळतो आहे. या भिंतीवर सुद्धा मला असाच एक बास रिलिफ शिल्पांचा खजिना दिसतो आहे.

क्रमश:

 

सूक्ष्म निरीक्षणाने बनलेली ही लेखमाला अतिशय माहितीपूर्ण होत आहे.

भाजे लेणीतील ही गुंफा अत्यंत गूढ आहे यात काही वादच नाही.
बाकी पेगॅसस आदी ग्रीक शिल्पे इतरही काही ठिकाणी दिसतात परंतु सेंटॉरचे शिल्प निदान महाराष्ट्रातील लेण्यांमध्ये तरी इतरत्र असल्याची कल्पना नाही.

 

मी ही लेणी कित्येकदा पाहिली असल्याने त्यांची सर्वच प्रकाशचित्रे मजकडे आहेत.

मी काढलेले हे फोटो इतर सदस्यांच्या सोयीसाठी येथे डकवतो.

सूर्यगुंफा बाहेरून

सेंटॉर प्रतिमा

पॅगेसस

भाजे येथील बौद्ध गुंफा भाग 4

18 क्रमांकाच्या गुंफेच्या बाहेरील व्हरांड्याच्या आतील भिंतीवर, काही निराळ्याच पद्धतीची बास रिलिफ भित्तीचित्रे आहेत. या प्रकारची भित्तीचित्रे दख्खन मधील दुसर्‍या कोणत्याच गुंफेमध्ये बघण्यास मिळत नाहीत. या भितीचित्रांतील आकृत्यांच्या अंगावर दाखवलेले कपडे, त्यांची वेशभूषा आणि त्यांच्या जवळ असलेली शस्त्रे हे सर्व अगदी निराळे व मोठे वैशिष्ट्यपूर्ण दिसते आहे.

या भिंतीच्या डाव्या बाजूला म्हणजे घोड्याच्या धडांवर मानवी चेहरा असलेल्या सेंटॉरच्या कोरलेल्या आकृती ज्या खांबाच्या (pilaster) कॅपिटलवर कोरलेल्या आहेत, त्या खांबाच्या बाजूला, एका द्वाररक्षकाचे बास रिलिफ शिल्प कोरलेले आहे. हा द्वाररक्षक त्याच्या डावीकडे असलेल्या व्हरांडा व विहार यांमधील द्वाराकडे चेहरा फिरवून बघताना दाखवला आहे. या रक्षकाचा चेहरा लंबवर्तुळाकार व लांबसर असून हनुवटी टोकदार काढलेली आहे. पठाणी लोकांसारखा दिसणारा असा चेहरा दुसर्‍या कोणत्या दख्खनमधील लेण्यांमध्ये मी बघितल्याचे मला तरी स्मरत नाही. त्याचे केस खांद्यापर्यंत लांब आहेत व त्यावर त्याने एक घुमटाकार जिरेटोप घातलेला आहे. या प्रकारची शिरस्त्राणे मध्य एशियामधील सैनिक पूर्वी घालत असत. म्यानात असलेला व पुढे दोन अग्रे असलेला एक कमी लांबीचा भाला त्याने आपल्या छातीजवळ डाव्या हाताने धरलेला आहे. या भाल्याला असलेली दोन अग्रे त्यावर घातलेल्या म्यानामधूनसुद्धा स्पष्ट्पणे दिसत आहेत. थोडीफार वक्रता असलेल्या एका रूंद पात्याच्या तलवारीच्या मुठीवर त्याचा उजवा हात आहे. ही म्यानात असलेली तलवार त्याने आपल्या कंबरेला बांधलेल्या शेल्यामध्ये असलेल्या गाठीत अडकवलेली आहे. कंबरेवरच्या या शेल्याची गाठ त्याने पुढे बांधलेली आहे व शेल्याची दोन टोके पुढे लोंबकळत आहेत. सात वळी एकत्रित रित्या गुंफून बनवलेली वजनदार व मोठी अशी लोंबती कर्णभूषणे त्याने आपल्या कानात घातलेली आहेत. आपल्या गळ्यात निरनिराळी लांबी असलेले कमीत कमी 3 हार तरी त्याने घातलेले आहेत. यापैकी सगळ्यात खालचा हार सर्वात लांब आहे व त्यात 5 ते 6 पदके गुंफलेली आहेत व हाराच्या मध्यभागी अजूनही स्त्रिया तन्मणीचे खोड घालतात त्याप्रमाणे आकार दिलेले एक रत्नखचित पेंडंट आहे.सर्वात वरचा व गळ्याजवळ घट्ट असलेला मण्यांचा नेकलेस एखाद्या गंड्याप्रमाणे दिसतो आहे. मधला नेकलेस हा बर्‍याच प्रमाणात रत्नजडित असून बारीक कोरीव काम केलेला आहे. मनगटावर त्याने रत्नजडित अशी 3 कंकणे घातलेली आहेत तर दंडावर फुलाच्या 3 पाकळ्यांप्रमाणे दिसणारी एक रत्नजडित पोची बांधलेली आहे. सरकारी कचेर्‍यांतील पट्टेवाले जसा पट्टा बांधतात तसा एक कापडाचा पट्टा त्याने डाव्या खांद्यावरून घेतलेला आहे व त्याची गाठ त्याने आपल्या कंबरेच्या उजव्या बाजूला घट्ट बांधलेली आहे. कदाचित, कंबरेला बांधलेला शेला व हा पट्टा हे एकाच वस्त्राचा भाग या पद्धतीने बांधलेले असू शकतात. त्याने कंबरेला बांधलेले वस्त्र मोठे वैशिष्ट्यपूर्ण दिसते आहे. ही साधे धोतर न दिसता त्याला अनेक निर्‍या दिसत आहेत. हे वस्त्र दिसण्यास तरी रोमन किंवा ग्रीक योद्धे घालत असत तशा प्रकारचा आखूड स्कर्ट किंवा स्कॉटिश किल्टसारखे वाटते आहे. कदाचित निराळ्या पद्धतीने निर्‍या काढून नेसलेले धोतर सुद्धा हे वस्त्र असू शकते. आपल्या डाव्या मांडीवर गुढग्याच्या जरा वर त्याने एक पट्टा बांधलेला आहे. हा पट्टा प्रत्यक्षात काय असावा हे अस्पष्ट असल्याने नीट दिसू शकत नाहीये. या सगळ्या वर्णनावरून हा द्वाररक्षक काही सामान्य द्वारपाल नसून कोणीतरी सरदार किंवा वरिष्ठ अधिकारी असणार हे स्पष्ट होते आहे.

व्हरांड्यातून विहारच्या हॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी जी दोन द्वारे आहेत त्या मध्ये असलेल्या पुरुष आकृतीच्या भित्तीशिल्पाचा बराचसा भाग नष्ट झाला आहे किंवा केला गेला आहे. या आकृतीत दाखवलेला चेहरा मात्र सर्वसाधारण मराठी लोकांचा असतो तसाच म्हणजे गोलसर आहे व डोक्यावर पूर्वी शेतकरी डोक्याला जसे मुंडासे बांधत असत तसे मुंडासे दाखवलेले आहे. याच्या गळ्यातही 3 हार असले तरी ते मोठ्या मण्यांचे किंवा फुलांचे वाटत आहेत. कानात 7 वळ्यांची बनवलेली वजनदार व लोंबती कर्णभूषणे आहेत. खांद्यावरून घेतलेला व कंबरेशी बांधलेला पट्टा किंवा शेला याच्याही अंगावर दिसतो आहे. कंबरेला असलेल्या तलवारीचे मान शेल्यात खोचलेली आहे. तलवार कमी लांबीची असावी कारण आता फक्त म्यानाचे टोकच शिल्लक राहिलेले आहे.कंबरेला बांधलेले धोतर पायघोळ असून उजवा घोटा व डावा गुढगा यावर स्पष्ट दिसते आहे.

उजव्या हाताच्या द्वाराच्या उजव्या बाजूला एक जाळीचे डिझाइन खोदलेले गवाक्ष आहे. या दोन्हीच्या मध्ये आणखी एका योद्ध्याची आकृती कोरलेली आहे. या योद्ध्याच्या डोक्यावरही शेतकरी बांधतात तसेच मुंडासे बांधलेले आहे. हे मुंडासे म्हणजे प्रत्यक्षात कापडाचा एक लांब पट्टा असतो व डोक्याभोवती बांधून त्याची टोके मागच्या बाजूला खांद्यापाशी लोंबती ठेवण्याची पद्धत आहे. याच्या गळ्यात फुलांचे दोन हार दिसत आहेत. मनगटावर 4 कंगणे आहेत तर दंडावर 3 फण्यांच्या नागाचा आकार दिलेली पोची आहे. आहे.कानातील कर्णभूषणे मात्र निराळ्या डिझाइनची आहेत. त्याचा डावा हात म्यान केलेल्या एका वक्र तलवारीच्या मुठीवर असून त्याने ही तलवार आपल्या अंगाबरोबर घट्ट धरलेली आहे. याच्या उलव्या हातात एक धनुष्य आहे त्याच्या पाठीवर असलेला बाणांचा भाता शिल्पात स्पष्ट्पणे दिसतो आहे. कंबरेला व्यवस्थित व पायघोळ निर्‍या काढलेले व त्याच्या घोट्यापर्यंत येणारे धोतर हा योद्धा नेसलेला आहे.

या शिल्पाच्या खाली पाषाणातून कोरून काढलेले एक आसन आहे. या आसनाच्या कडांना गोलाई देऊन ते लाकडी आसन असावे या पद्धतीने चार पाय व त्यामधील आडव्या गोल सळया कोरून त्यावर बारीक नक्षीकाम कोरलेले आहे.

या आसनाच्या उजव्या हाताला आणि गवाक्षाच्या खालील बाजूस अनेक आकृती दिसत आहेत. जवळून बघितल्यावर माझ्या लक्षात येते आहे की हे एक मोठे म्यूरल आहे व ते इथून सुरू होऊन भिंतीच्या कोपर्‍यावरून पुढे उजव्या हाताच्या भिंतीवर असलेल्या भिख्खू कोठडीच्या द्वारा पर्यंत पसरलेले आहे. या म्यूरलमध्ये एक काहीतरी मोठी कथा सांगण्याचा शिल्पकाराचा प्रयत्न आहे. मात्र बर्‍याच आकृती आता अस्पष्ट दिसत असल्याने ही कथा अचूकपणे सांगणे शक्य नाही.

क्रमश:

 

माझ्यामते ते द्वारपालाचे शिल्प एखाद्या ग्रीक योद्ध्याचे असावे. वेषभूषा, चालढब तर अगदी तशीच आहे.
दुर्दैवाने या गुहेत कुठलाही शिलालेख नाही (असला तरी माझ्या पाहण्यात तरी आलेला नाही) त्यामुळे ही गुहा म्हणजे एक गूढच आहे.

या गुहेला धेनुकाटक (बहुतेक डहाणू) इथल्या यवनांनी दान दिले असावे किंवा त्यांच्यातल्याच कारागीरांनी हे लेणे खोदलेले असावे असा माझा तर्क आहे. कारण तिथे यवनांची वस्ती मोठ्या प्रमाणावर होती साहजिकच हे लेणे खोदताना किंवा खोदवून घेतांना त्यांनी आपली संस्कृती पण इथे दाखवण्याचा प्रयत्न केला असावा.

  मला तरी हे शिल्प ग्रीसपेक्षा मध्य एशियातील व्यक्तीचे वाटते. डोक्यावरील पगडी साधारण तुर्की (तुर्कमेनीस्थान) पद्धतीची वाटते. चेहरा लांब व निमुळती हनुवटी दाखवलेली आहे. अर्थात तुम्ही म्हणता तशी ग्रीको-रोमन व्यक्ती सुद्धा असू शकते.

 तत्कालीन तुर्कमेनीस्थान/ तुर्कस्थान रोमन बायझन्टाईन साम्राज्यात समाविष्ट होता. त्यामुळे एखाद्या ग्रीक -रोमन योद्ध्याने तसा वेष धारण करणे सहजशक्य आहे किंवा ग्रीकोरोमनबरोबरच तिकडली स्थानिक व्यक्ती सुद्धा इकडे येणे शक्य आहे.

 

भाजे येथील बौद्ध गुंफा: भाग 5

(मागील भागापासून पुढे)

18 क्रमांकाच्या गुंफेचा व्हरांडा व आतील हॉल यांच्या सामाईक भिंतीच्या उजव्या कोपर्‍यात जाळीचे डिझाईन असलेले एक गवाक्ष खोदलेले आहे, त्या गवाक्षाच्या बरोबर खालच्या भिंतीवर आणि त्याच्या उजवीकडे मिळून आणखी काही विलक्षण बास रिलिफ शिल्पे दिसत आहेत. यापैकी 3 आकृत्या गवाक्षाच्या अगदी खाली कोरलेल्या आहेत. याशिवाय गवाक्षाच्या उजव्या खालच्या कोपर्‍याला लागून, शिंगे असलेले एक हरीण आपली मान वळवून बघत असल्याचे एक बास रिलिफ शिल्प आहे.

हरिणाच्या शिल्पाखाली मागे कलून आणि दोन्ही हात मस्तकाच्या मागे घेऊन बसलेल्या एका बालकाचे शिल्प आहे. या बालकाचे डोळे मोठे, टपोरे आहेत. अनेक रिंगा गुंफलेली कर्णभूषणे कानात आहेत व उजव्या हातात 4 कंगणे दाखवलेली आहेत. त्याच्या कपाळावर एक रत्नखचित पट्टा किंवा मुगुट आहे व मस्तकामागे नेलेल्या उजव्या हातात त्याने एक काठी धरलेली आहे. बासरी हातात धरलेल्या बाळकृष्णाचे जे एक चित्र आपल्याकडे काढले जाते त्या चित्राशी मला या शिल्पाचे अतिशय साम्य वाटते आहे. या बालकाच्या डाव्या बाजूला मोठे राक्षसी डोळे आणि जबडाभर असलेले भलेथोरले दात वासून हिंस्त्र हास्य करणार्‍या एका लठ्ठमुठ्ठ राक्षसीचे शिल्प आहे. (या राक्षसीचा चेहरा तिबेटी चित्रांमधे सिंहाचा म्हणून काढतात काहीसा तसाच आहे.) या राक्षसीने आपल्या उजव्या हातात एक कुर्‍हाड धरलेली असून ती त्या कुर्‍हाडीने तिच्या उजव्या बाजूला असलेल्या बालकावर हल्ला करण्याच्या तयारीत वाटते आहे. ही राक्षसी व हरीण यांच्या मध्ये असलेले शिल्प अत्यंत अस्पष्ट आहे. माझ्या मते ते बहुधा एथना या ग्रीक देवतेचे घुबड असावे असे वाटते आहे.

हरीणाच्या शिल्पाच्या वरच्या बाजूला असलेले शिल्प अत्यंत अस्पष्ट झालेले आहे. एकूण आकारावरून एखाद्या राक्षसाचे ते असावे असे वाटते. हा राक्षस बहुधा त्याच्या बाजूला असलेल्या रथाचे (खाली वर्णन केलेल्या) चाक धरून तो रथ थांबवण्याचा प्रयत्न करतो आहे असे वाटते.

या राक्षसाच्या वरच्या बाजूस एका घोड्यावर आरूढ असलेल्या असलेल्या शिलेदाराचे शिल्प आहे. या स्वाराने आपले पाय रिकिबीमध्ये अडकवलेले आहेत. घोड्याच्या तोंडावर लगाम अडकवलेला असून त्याची टोके स्वाराने आपल्या डाव्या हातात धरलेली आहेत तर आपल्या उजव्या हातात त्याने एक भाला धरलेला आहे. घोड्याच्या मानेच्या खालच्या बाजूस मण्यांनी सजवलेला एक पट्टा आणि डोक्यावर मोरपीसांचा तुरा आहे. शिलेदाराच्या अंगावर गुढग्यापर्यंत येणारे धोतर आहे आणि डोक्याला मुंडासे गुंडाळलेले आहे. आहे. कानात लांब लोंबकळणारी कर्णभूषणे, हातात कंगण व गळ्यात एक मण्यांची माळ आहे. घोड्याला ज्या अलंकारानी सजवले आहे ते अलंकार या वेळेस बहुधा अतिशय प्रचलित असावेत कारण पितळखोरे गुंफांत मिळालेल्या एका बास रिलिफ शिल्पात दाखवलेल्या घोड्याच्या अंगावरही असेच अलंकार मी बघितले होते.

या घोडेस्वाराच्या उजव्या हाताला असलेले शिल्प याच चित्राचा भाग असले तरी ते व्हरांड्याच्या उजव्या टोकाच्या भिंतीवर कोरलेले आहे. या शिल्पात, 4 अश्व ओढत असलेल्या एका रथात, उभा असलेला एक राजा दाखवलेला आहे. राजाच्या डोक्यावर एक रत्नजडित मुगुट व गळ्यात दुहेरी पदर असलेला हार आहे. राजाच्या बाजूला रथातच, दोन स्त्रिया उभ्या आहेत. राजाच्या डाव्या अंगाला असलेली स्त्री त्याच्या डोक्यावर एक छत्र धरून उभी आहे तर उजव्या अंगाला असलेली स्त्री त्याच्यावर चवरी ढाळत आहे. दोन्ही स्त्रियांच्या कानात लोंबकळणारी कर्णभूषणे, गळ्यात रत्नजडित हार आणि कंबरेला कंबर पट्टे आहेत. रथाच्या बाजूस घोड्यावर आरूढ असलेला आणखी एक शिलेदार दिसतो आहे. वर वर्णन केलेल्या शिलेदाराप्रमाणेच हा शिलेदार कोरलेला आहे.

राजाचा रथ दोन राक्षसांच्या पाठीवरून मार्ग काढताना दाखवला आहे. कदाचित हे राक्षस राजाचे अपहरण करून त्याला आपल्या पाठीवरून घेऊन जाताना दाखवले असण्याची सुद्धा शक्यता वाटते.

व्हरांड्याच्या उजव्या टोकाच्या भिंतीमध्ये जी भिख्खूंची कोठडी खोदलेली आहे त्याच्या एका बाजूला वर वर्णन केलेले शिल्प आहे तर दुसर्‍या बाजूला एक मोठे विलक्षण चित्र कोरलेले आहे. या चित्राचा मध्यवर्ती बिंदू हा हत्तीवर स्वार झालेला एक महाराजा आहे. या राजाच्या गळ्यात, त्याच्या पायापर्यंत लांबी असलेले फुलांचे अनेक हार दिसत आहेत. त्याच्या दंडावर कोपरापर्यंत येणार्‍या फुलांच्या पोची आहेत. त्याने आपल्या उजव्या हातात हत्तीची पराणी धरलेली आहे तर डाव्या हाताने त्याने आपल्या छातीजवळ असलेला फुलांचा हार धरून ठेवला आहे. त्याच्या मागे एक पुरुष व्यक्ती हर्त्तीवर आरूढ असून त्या व्यक्तीने बौद्ध पद्धतीचे दुहेरी त्रिशूळ हातात धरलेले आहे. हतीने आपल्या सोंडेत एक झाड पकडलेले आहे.

या हतीच्या सभोवती अनेक पुरुष, स्त्रिया आणि पशु-पक्षी यांची चित्रे कोरलेली आहेत. या चित्रात मला एक बोधि वृक्ष, एक वाद्य वाजवत असलेली एक पुरुष व्यक्ती व एक नर्तिका हेओळखू येतात. या चित्रातून काहीतरी बोधपर कथा सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे हे नक्की! माझ्या मताने ही कथा साधारण अशी असावी. एका राजावर राक्षसांनी हल्ला करून ते त्याला पळवून नेत आहेत. भगवान बुद्ध येऊन त्या राक्षसांचा नाश करतात. अर्थात हे राक्षस म्हणजे दुष्ट किंवा पापी विचार असले पाहिजेत. व बुद्धांच्या शिकवणीने त्यांचा समूळ नायनाट होतो; असे सूत्र या गोष्टीमागे बहुधा असावे.

भिंतीवरील शिल्पचित्रे बघून झाल्यावर माझे छताकडे लक्ष जाते आहे. अगदी छताजवळ आळीपाळीने स्तूप व काही आकृती (बहुधा यक्षांच्या) यांची शिल्पे कोरलेला एक सलग पट्टा व्हरांड्याच्या 3 बाजूंना कोरलेला दिसतो आहे. या शिवाय पायर्‍या-पायर्‍यांचे डिझाईन असलेला एक सलग पट्टाही येथे छताला लागून कोरलेला आहे. छताला एक चतुर्थांश वर्तुळाकार कमानीचा आकार दिलेला आहे व त्यात अनेक वक्राकार तुळया कोरल्याने छत कप्याकप्यांचे दिसते आहे.

या गुंफेला अनेक लेखकांनी सूर्यदेवाचे मंदिर असे नाव दिलेले आहे. परंतु असे नाव का दिले असावे हे समजणे कठीण आहे. ही गुंफा म्हणजे एक बौद्ध विहार आहे हे उघड आहे. मात्र या गुंफेचे वैशिष्ट्य म्हणजे व्हरांड्यातील भिंतीवर असलेली व अतिशय बारकावे दर्शवणारी शिल्पे, असे खात्रीने म्हणता येईल.

भाजे येथील माझी भेट आता संपलीच आहे. सातवाहन कालात खोदलेल्या आणि दख्खनच्या पठारावर असलेल्या बहुतेक महत्त्वाच्या बौद्ध गुंफांना आणि दक्षिणेकडे असलेल्या बनवासी येथील मधुकेश्वर मंदिराला मी आता भेट दिली आहे. मात्र माझ्या हातातील हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मला उत्तर व पूर्वेकडे असलेल्या आणखी 3 स्थळांना भेट द्यायची आहे. मात्र ही तिन्ही स्थळे महाराष्ट्राच्या बाहेर आणि बर्‍याच दूर अंतरावर आहेत. अर्थात यावरून सातवाहन साम्राज्य किती दूरपर्यंत पसरलेले होते हे खचितच लक्षात आल्यावाचून रहात नाही.

समाप्त

या लेखासोबत असलेली छायाचित्रे पहाण्यासाठी या दुव्यावर क्लिक करा.

 

सुर्यगुंफेतील हे शिल्प आजही एक गूढ आहे.

काही जणांना डावीकडील शिल्प सूर्याचे आहे असे वाटते. सर्वसामान्यतः सूर्यरथ ७ घोड्यांचा असतो पण प्राचीन शिल्पांमध्ये सूर्यरथ चार घोड्यांसहसुद्धा दाखवलेला आहे. सूर्याच्याच बाजूला त्याच्या दोन पत्नी आहेत. संध्या आणि छाया. तर तो रथ ज्या राक्षसाच्या अंगावरून जात आहे तो राक्षस नसून राक्षसी आहे आणि दोन नसून एकच आहे. तीचे पाय उलटे वळलेले दाखवलेले आहेत.
तर उजवीकडील शिल्प हे इंद्राचे आहे असे म्हटले गेले आहे. इंद्र त्याच्या ऐरावतावरून स्वर्गात विहार करत आहे. नंदनवनातील इंद्रप्रजेचे सुखासीन, आनंदी जीवन येथे दाखवलेले आहे.
पण बौद्ध लेण्यांत इंद्र, सूर्य कसे असू शकतील? त्यामुळे ही उपपत्ती ग्राह्य मानता येत नाही.

दिव्यावदानातील मांधाता याची कथा या कथानकाशी जुळते. मांधाता हा राक्षसीचा नाश करून देवतांना मदत करत करतोय असे येथे दाखवलेले आहे तर उजवीकडच्या शिल्पामध्ये तो हत्तीवरून उत्तर कुरुंचे राज्य जिंकण्यासाठी जात आहे असे दिसते.
अमरावतीच्या (आंध्र प्रदेश) स्तुपातल्या कठड्यावर इंद्राने मांधात्याचा सत्कार केल्याचे तसेच मांधात्याचे इंद्रपदाच्या लोभामुळे स्वर्गपतन झाल्याचे दर्शवले आहे.
ही दोन्ही लेणी समकालीन असल्याने भाजेतील शिल्पपट हा मांधात्याच्या कथेचा आहे असे मला वाटते.

तर काही जणांना ह्यात ग्रीकांच्या हेलियोस आणि अपोलो यांचा भास होतो. आणि ही शिल्पे तर अगदी ग्रीक पुतळ्यांसारखी रेखीव आहेत. आणि याच गुहेतील सेंटॉर, पॅगेसस आदी ग्रीक प्रतिमा पाहिल्या की उपपत्ती पण ग्राह्य वाटू लागते.

 

बौद्ध कथात इंद्र ही व्यक्ती कधी मधी येते. मात्र सूर्य कधीच आलेला ऐकलेला नाही. तो वैदिक संस्कृतीचे प्रतीक आहे. बालकृष्णासमान दिसणारे शिल्प कोणाचे असावे? काही अंदाज? त्या शिल्पाला लागून असलेली अस्पष्ट प्रतिमा एथना देवीच्या घुबडासारखी मला तरी वाटते,तुमचे काय मत? या शिल्पाचा अर्थ लावणे सिंधू संस्कृतीतील लिपीचा अर्थ लावण्याइतकेच कठिण आहे.

अवांतर

मी नुकतीच जुनागढ येतील बौद्ध लेणी बघूब्न आलो. त्या लेण्यांचा बाज तर संपूर्ण निराळाच आहे. सवडीने त्यावर लिहिनच.

 

ही शिल्पे इतकी अस्पष्ट आहेत की नक्की हे कुणाचे शिल्प आहे ते ओळखणे खूप अवघड आहे. बाळकृष्णासारखे दिसणारे शिल्प माझ्यामते यक्षाचे असावे. मोठे डोके, बटबटीत डोळे ही यक्षांची वैशिष्ट्ये या शिल्पामध्येही व्यवस्थित जाणवतात. त्याचे पोट मात्र यक्षांप्रमाणे सुटलेले दिसत नाही. आणि ते मधले शिल्प अथेनाचेच आहे का दुसर्‍या एखाद्या पशूचे ते ही नीट कळत नाही इतके ते अस्पष्ट आहे.

बाकी ह्या अलीकडच्या डावीकडच्या शिल्पामध्ये एक स्त्री घोड्यावर रिकिबीत पाय अडकवून बसली आहेत तर उजवीकडच्या शिल्पामध्ये खालच्या बाजूला एक स्त्री तबला वाजवताना दिसत आहे.
रिकिबीचे आणि तबल्याचे हे दृश्य भारतीय शिल्पकलेमध्ये सर्वात प्राचीन समजले जाते.

भाजे लेणीतील ह्या सूर्यगुंफेवर मी मागे कधीतरी लिहिले होते, ते येथे पहा.

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...