Wednesday, October 21, 2020

मेक्सिको

 आम्ही ह्या ट्रिपमध्ये कॅनकुन, चिचेन इत्झा आणि टुलुम अशी ३ ठिकाणे पाहिली. कॅनकुन सोडून इतर २ ठिकाणी आम्ही गायडेड टूर घेतली होती त्यामुळे त्या ठिकाणांबद्दल आणि त्या जागेच्या इतिहासबद्दल सविस्तर माहिती कळली. ती अगदी संक्षिप्त स्वरूपात इथे मायबोलीकरांकरता लिहितेय. मेक्सिकोचे लोक अतिशय मेहेनती आणि आगत्याशिल! तुमचे तिथले वास्तव्य चांगले व्हावे ह्यासाठी कष्ट घेतात. एकंदरीत तिथला अनुभव अतिशय सुंदर होता.

कॅनकुन -
अत्यंत निसर्गरम्य असे हे ठिकाण! लांबच्या लांब पसरलेला शुभ्र रेतीचा समुद्रकिनारा आणि निळे हिरवे (ज्याला इंग्रजीमध्ये turquoise color म्हणतात) पाणी असलेला समुद्र ही कॅनकुनची खासियत आहे. पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेले कॅनकुन म्हणजे चिंचोळी पट्टी असलेला जमिनीचा भाग आहे ज्याच्या एका बाजुला समुद्रा आणि दुसर्‍या बाजूला लगून (मराठी शब्द माहिती नाही) आहे.

विमानातून दिसलेले कॅनकुन -

Cancun.jpg

खाली आहे कॅनकुनचा मुख्य रस्ता. डाव्या बाजुला समुद्र, उजव्या बाजूला लगून आणि मध्ये हॉटेल्स -

Cancun1.jpg

कॅनकुनचा समुद्रकिनारा

Beach1.jpgBeach3.jpgBeach4.jpg

चिचेन इत्झा -
चिचेन इत्झा हे ठिकाण मेक्सिकोच्या युकटन राज्यात आहे. चिचेन इत्झा हे मायन संस्कॄतीमधील एक अतिशय महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. साधारण ६ चौरस मैल क्षेत्रफळाच्या भागात शेकडो लहान मोठ्या इमारती एके काळी उभ्या होत्या. त्यापैकी जवळपास ३० इमारतींचे अवशेष अजुनही अजुनही पहायला मिळतात.
चिचेन इत्झाला २ प्रकारची वास्तुशिल्प पाहायला मिळतात, मायन संस्कॄतीचा प्रभाव असलेली साधारण इसवीसनानंतर सातव्या ते दहाव्या शतकात बांधलेली आणि टोल्टेक संस्कॄतीचा प्रभाव असलेली साधारण इसवीसनानंतर दहाव्या ते तेराव्या शतकात बांधलेली.
चिचेन इत्झाची सर्वात लोकप्रिय इमारत म्हणजे एल कॅस्टिलो पिरॅमिड. ह्याला कुकुल्कानचे टेंपल म्हणूनही ओळखले जाते. कुकुल्कान, म्हणजे पंख असलेला साप, मायान संस्कॄतीत देव मानतात. हा पिरॅमिड खगोलशास्त्राच्या दॄष्टीनेही महत्वाचा होता. वर्षात २ दिवशी (स्प्रिंग आणि फॉल एक्विनॉक्स, अनुक्रमे २० मार्च आणि २२ सप्टेंबर) सुर्याचा विशिष्ट कोन आणि पिरॅमिडच्या ९ पायर्‍या ह्यांच्या सावलीमुळे एक भलामोठा साप पिरॅमिडवरून खाली येत आहे असा भास होतो. हा सोहोळा पहायला प्रत्येक वर्षी हजारोंच्या संख्येने लोक जमतात.

एल कॅस्टिलो पिरॅमिड -

Pyramid.jpg

फेदर्ड सर्पंट -

Feathered_Serpent.jpg

टेंपल ऑफ थाउजण्ड वॉरियर्स -

TempleOfThousandWarriors.jpg

टुलुम -
टुलुम हे बर्‍यापैकी चांगले जतन केलेले मायन संस्कॄतीतले एक बंदर आहे. एका बाजूला करिबियन समुद्र आणि दुसर्‍या बाजूला उंच भिंत असलेले हे ठिकाण आपल्या महाराष्ट्रातल्या सागरी किल्ल्यांची आठवण करुन देते. टुलुमचा किल्ला हा सागरी हल्ल्यांपासून बचाव करण्याकरता वापरला जायचा. स्पॅनिश लोक जेंव्हा ह्या भागात सागरी मार्गाने आले तेंव्हा त्यांना टुलुमचा शोध लागला.

Tulum1.jpgTulum2.jpg

टुलुमचा समुद्रकिनारा

Tulum3.jpg

२१ डिसेंबर २०१२ बद्दल सगळ्यांच्या मनात बरीच उत्सुकता असल्याने त्याबद्दलचे प्रश्न गाइड्सना लोकांकडून विचारले जायचे. मुख्य प्रश्न म्हणजे मायन कॅलेंडरप्रमाणे खरच जगाचा अंत २१ डिसेंबर २०१२ ह्या दिवशी होणार आहे का? ह्याचे उत्तर "फ्रॉम हॉर्सेस माउथ" ऐकण्याची सगळ्यांची इच्छा असायची. सगळ्या गाइड्सचे एकमेव उत्तर असायचे - नाही. बरेच तांत्रिक कारण त्यामागे ते सांगायचे पण मतितार्थ असा होता की मायन कॅलेंडर हे खूप तंत्रशुद्ध पण क्लिष्ट आहे. त्यामधले एक पर्व जे ५१२६ वर्षांचे आहे ते २१ डिसेंबर २०१२ ला संपणार आहे. पण तो कॅलेंडरचा शेवट, जसे लोक समजतात, नसून त्या पर्वाचा शेवट आहे. त्यानंतर नवीन पर्व सुरु होणार आहे.

मेक्सिको चे काही फोटो...Koba 1.jpgKoba 2.jpgkoba 3.jpgCancun.jpgRiviara Maya.jpgTulum.jpg
टुलुम पनारोमिक

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...