Sunday, October 11, 2020

पाताळेश्वर गुफा मंदिर - Pataleshwar Caves

 लेणी बघायची म्हंटलं की कुठेतरी डोंगरावर घाम गाळात जायचं आणि मग तिथलं ते शेकडो वर्ष जुनं कोरीवकाम बघून तृप्त व्हायचं हे नेहमी लेणी बघतांना येणारा अनुभव आहे पण अगदी भर शहरी वस्तीत ही लेणी असू शकतात आणि असं एक लेण पुण्यात अगदी भरवस्तीत आहे. जंगली महाराज रोड वर , जंगली महाराज समाधीच्या शेजारी पाताळेश्वर हे हिंदू गुफा मंदिर आहे आणि ह्या लेण्यात शंकराच पुरातन मंदिर आहे. साधारण ८ व्या शतकात राष्टकुट काळात खोदलेल हे मंदिर आता पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत येतं. अर्थात ते पूर्वी शहराच्या बाहेर होतं पण शहराच्या वाढत्या वेशीने ह्या मंदिराला अगदी भरवस्तीत आणून ठेवलाय. सुदैवाने हा परिसर हिरवागार आहे. 

ह्या मंदिराचं आणखी एक वेगळेपण म्हणजे हे मंदिर जमीन खोदत खाली बनवलेलं आहे. कदाचित म्हणूनच ह्याला पाताळेश्वर नाव पडलं असावं. ज्वालामुखी ने तयार झालेल्या टणक खडकात वरपासून खाली खोदत जात नंदी मंडप आणि मग आडवं खोदत हे गुफा मंदिर बनवलेलं आहे जस वेरुळचे कैलास लेण ही अश्याच पद्धतीने बनवलं आहे.

जंगली महाराज समाधीला नमस्कार करून डावीकडे पाताळेश्वर मंदिर आहे. काही दगडी पायऱ्या उतरून मंदिरात जावं लागतं पण ह्या पायऱ्या उतरण्या आधीच आपलं लक्ष वेधून घेतो तो मंदिरा समोरील भव्य गोलाकार दगडी नदीमंडप. हा भव्य मंडप १६ खांबांवर उभा आहे. 

मंडपात नदीची कोरीव दगडी मूर्ती, ह्या नदीच्या गळ्यात माळा, घंटा वगैरे कोरलेल्या आहे. एकंदरीतच नंदीमंडप म्हणजे खास नदीसाठी मंडप मी पहिल्यांदा बघितला. हा मंडप अतिशय दणकट आहे पण ह्यात फारस सुबक कोरीव वगैरे नाही. तरी ही हा नदीमंडप कायम लक्षात राहावा असाच आहे हे नक्की जाणकारांच्या मते ही अपूर्ण लेणी आहेत त्याच्या मागचं बरोबर कारण ज्ञात नाही पण कदाचित परकीय आक्रमणाचा धोका असावा किंवा आणखी काही 

डावीकडे मागच्या बाजूस एक आणखी नंदी ची मूर्ती ठेवलेली आहे पण तिचा तसा काही संदर्भ लागलं नाही. ह्या नंदीच्या रेषेत मंदिराच्या दिशेने गेलो की बाजूला एक ओसरी आहे. दोन खांबावर उभी ही लहानशी ओसरी आणि त्याच्या समोर एक लहानसं पाण्याचं टाक. एक वडाच झाड ओसरीपुढे आहे जिथे वटपोर्णिमेला गर्दी होते 

मंदिरात प्रेवेश केला की त्याची भव्यता लक्ष्यात येते.  एकूण चोवीस खांबांवर उभ्या ह्या मंदिरात पाताळेश्वरची प्रतिष्ठापना केलेली आहे. मूळ गाभाऱ्या बाजूला दोन आणखी खोल्या आहेत. बाजूला राम लक्ष्मण सीता ह्यांची सुंदर मूर्ती ही आहे. अर्थात ती संगमरवरी मूर्ती ही पुरातन नाही पण सुबक नक्कीच आहे. मंदिराच्या मागच्या उजव्या भागात उंचवटा आणि काही पायऱ्या आहेत. बहुदा ध्यानधरणे साठी एकांत लाभावा म्हणून ही सोय असावी. मंदिराच्या भिंतींवर मोठी शिल्प कोराल्याच्या खुणा आहेत पण ती शिल्प आता ओळखण्या पलीकडे गेलेली आहेत. ही लेणी ब्राम्हणी पद्धतीची मानली जातात त्यामुळे बौद्ध लेण्याप्रमाणे विहार दिसत नाही. हे प्रार्थना मंदिर आहे.

मंदिराच्या प्रेवेश्याच्या उजव्या खांबावर देवनागरी भाषेतील शिलालेख आहे पण तो ही कालानुमानाने झालेल्या दगडाच्या झिजे मुळे वाचता येत नाही, फक्त काही अक्षर समजतात. मंदिराच्या बाहेर, नदी मंडपाच्या उजवीकडे दगडी पायऱ्यांची विहीर देखेल आहे पण सध्या ती विहीर वरती जाळी टाकून बंद केलेली आहे

ह्या मंदिराचा पुसटसा उल्लेख काही पेशवे दप्तरात आढळतो आणि श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी ह्या मंदिराचा जिर्णोधार ही केल्याचं समजत. इंटरनेट वर अधिक माहिती शोधली तर ह्या लेण्यांना काही मान्यवर परदेशी इतिहास तज्ञ आणि मोठ्या चित्रकारांनी खास भेट दिली आहे हे ही समजतं

मंदिरा च्या आजूबाजूला सुंदर बगीचा बनवलेला आहे आणि मंदिरातील स्वच्छता बघून खरच प्रसन्न वाटत. ह्या बगिच्या मध्ये एक पुरातन पिंपळाचा वृक्ष आहे त्याच्या पारंब्यांनी आपले पाय जमिनीत रोवून मूळ खोड कित्येक पटीने मोठं केलं आहे

ही लेणी सकाळी ८:०० ते संध्याकाळी ५:३० पर्यंत दर्शनासाठी उघडी असतात. हे राबत मंदिर आहे जिथे आजही पाताळेश्वराची पूजाअर्चा नियमितपणे होते आणि सणासुदीला भाविकांची दर्शनासाठी रांग लागते. संभाजी नगर रेल्वे स्टेशन पासून अगदी चालत जायच्या अंतरावर हे गुफा मंदिर आहे

 

पाताळेश्वर-पुण्यात भर गर्दीतल्या जंगली महाराज रोडवर असलेला हा कातळकोरीव ठेवा फारश्या कुणाच्या खिजगणीत नसलेला. हा वसलेला आहे जंगली महाराज मंदिराच्या अगदी शेजारीच.
पाताळेश्वराला याधीही भरपूर वेळा चकरा झालेल्या होत्या पण यावेळी काही मिपाकरांना बरोबर घेऊन जायचे ठरले, खरडाखरडी, फोनाफोनी झाल्यावर धनाजीराव वाकडे, अत्रुप्त आत्मा, ५० फक्त आणि त्यांचे एक स्नेही श्री. सुहास फडके हे ठरलेल्या वेळेवर बरोबर ४.३० वाजता जंगली महाराज रोडवर पोचते झाले. प्रवेशद्वारापाशीच व्यालप्रतिमा आणि कळसाचे काही अवशेष ठेवलेले आहेत. पुरातत्व खात्याने एक छोटीशी बागच त्याठिकाणी निर्माण केली आहे.
बागेतून थोड्याफार पायर्‍या उतरून आपला प्रवेश होतो ते थेट लेण्यांच्या प्रांगणात. आजूबाजूचा सर्व एकसंध कातळ छिनून हा लेणीमंदीराचा विशाल देखावा इथे निर्माण केला गेला आहे. पायर्‍या उतरताच डावीकडे एक नंदीची जीर्णावस्थेतील एक प्रतिमा ठेवलेली आहे. त्यानंतर लागतो तो गोलाकार खोदलेला नंदीमंडप. १२ स्तंभांनी फेर धरलेल्या या नंदीमंडपात आतमध्ये अजून चार स्तंभ आहेत व त्यामध्ये विराजमान आहे महादेवाचे वाहन नंदी. गळ्यातल्या माळा. माळांमध्ये गुंफलेल्या घंटा हे सर्वच अगदी खुबीने कोरलेले आहे.

१. अखंड कातळात कोरलेली लेणी व नंदीमंडप

२. नंदीमंडप

२. नंदी

४. नंदीचे जवळून दर्शन

५. नंदीमंडप

नंदीमंडप पाहून पुढे जाताच डावीकडे खडकात एक ओसरी खोदलेली दिसते. मध्ये दोन स्तंभ, आतमध्ये खोली आणि शेजारीच पाण्याचे टाके अशी याची रचना. हे पाहून येतो आपण ते मुख्य प्रवेशद्वारापाशी. तिथेच उजव्या बाजूला देवनागरीतील एक अस्पष्टचा शिलालेख दिसतो. श्री मारूती प्रसन्न, यादव असे काही शब्द ओळखू येतात त्यावरून हा शिलालेख यादवकालीन असावा हे स्पष्टच होते. पण ही लेणी खोदली गेली आहेत ती राष्ट्रकूट कालखंडात. इ.स. सातव्या ते आठव्या शतकात. यादवकाळात ही लेण्यांची कला लुप्तच झाली होती. ही लेणी आहेत ब्राह्मणी शैलीची. बौद्ध आणि ब्राह्मणी शैलीतील सर्वात मोठा फरक म्हणजे त्यांची रचना. बौद्धलेण्यांत विहार व चैत्य दिसतात तर ब्राह्मणी शैलीतील लेण्यांत सभामंडप व गर्भगृह. येथे विहार अजिबात दिसत नाहीत कारण विहार हे भिक्खू संघाच्या निवासासाठी असत व ही शैवलेणी म्हणजे निव्वळ प्रार्थनामंदिरे.

५. डावीकडच्या कोपर्‍यात असलेली ओसरी.

६. देवनागरी लिपीतला शिलालेख

लेण्यांमध्ये प्रवेश करायच्या आधी ५० फक्त यांनी त्यांची पोतडी उघडली व तिथून बाहेर काढले ते नागपूरचे प्रसिद्ध संत्रारसगुल्ले. संत्रा स्वादाच्या रसगुल्ल्यामध्ये आत अस्सल संत्रे असा हा जबरदस्त स्वादिष्ट प्रकार. सोबतीला केक, त्यामुळे आधी पोटोबा मग विठोबा हा कार्यक्रम लगेच उरकून घेतला गेला.

आता आम्ही लेण्यांमधे शिरलो. सभामंडप, तीन गर्भगृहे व बाजूने प्रदक्षिणामार्ग अशी याची रचना. सभामंडप तर अतिशय प्रेक्षणीय. भव्य अशा १०/१० स्तंभांच्या तीन ओळींवर याचे छत तोललेले आहे. लेण्यांच्या दोन्ही बाजूंना काही अर्धवट देखावे कोरलेले दिसतात तर काही भग्न देखावे दिसतात. डावीकडच्या एका कोपर्‍यात राक्षसवधासारखा कुठलातरी देखावा कोरलेला दिसतो. आता आम्ही गर्भगृहांमध्ये शिरलो. इथेही गर्भगृहाच्या बाहेर नंदीची मूर्ती कोरलेली आहेच. आत गर्भगृहामध्ये महादेवाची सुबक अशी पिंड कोरलेली आहे, तोच हा पाताळेश्वर. जमिनीच्या खालच्या पातळीत-पाताळात कोरलेला. पाताळेश्वर नाव अगदी यथार्थ योजिले आहे. डावीकडच्या गर्भगृहात गणपती व उजवीकडच्या गर्भगृहात पार्वतीची मूर्ती कोरलेली आहे. दरवाजांरील नक्षीकाम सुरेखच आहे. प्रदक्षिणामार्गात राम, सीता आणि लक्ष्मणाच्या हल्लीच कोरलेल्या संगमरवरी मूर्ती स्थापन केलेल्या आहेत. प्रदक्षिणामार्गात पाठीमागच्या उजव्या कोपर्‍यात अर्धवट खोदलेला खडक दिसतो. हे लेणे का अर्धवट राहिले हे काही कळत नाही कदाचित धनाची कमतरता हेच कारण असावे.

७. सभामंडपातील स्तंभांची अतिशय सुरेख रचना

८. सभामंडपातील स्तंभांची अतिशय सुरेख रचना व भिंतीतील अर्धवट देखावा

९. राक्षसवधासारखे कसलेसे कोरीव काम

१०. पाताळेश्वर महादेव

११. पाताळेश्वर महादेव

१२. गणपती व पार्वतीच्या मूर्ती

१३. अर्धवट खोदलेला दगड

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://mumbaichaganpati.blogspot.com back up incomplete

 http://mumbaichaganpati.blogspot.com/2010/08/shree-ashtavinayak-yatra-mahad-shree.html  Shree Ashtavinayak Yatra.- Mahad ( Shree Varad vina...